पाणी! पाणी!!

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf
________________

पाणी! पाणी!! तहानलेल्या महाराष्ट्राच्या कथा ________________

पाणी! पाणी!! तहानलेल्या महाराष्ट्राच्या कथा लक्ष्मीकांत देशमुख ' । ________________

पाणी! पाणी!! कथासंग्रह। लक्ष्मीकांत देशमुख Pani! Pani!! Short Stories Laxmikant Deshmukh © लक्ष्मीकांत देशमुख प्रकाशन क्रमांक - ६५३ आवृत्ती - २०१६ ॥ या कथासंग्रहाची पहिली आवृत्ती १९९७ मध्ये उदक' या नावाने प्रसिद्ध झाली होती. प्रकाशक साकेत बाबा भांड साकेत प्रकाशन प्रा. लि. ११५, म. गांधीनगर, स्टेशन रोड औरंगाबाद - ४३१ ००५ फोन- (०२४०)२३३२६९२/९५. www.saketpublication.com info@saketpublication.com पुणे कार्यालय साकेत प्रकाशन प्रा. लि. ऑफिस नं. ०२, ‘ए’ विंग, पहिला मजला धनलक्ष्मी कॉम्प्लेक्स, ३७३ शनिवार पेठ कन्या शाळेसमोर, कागद गल्ली पुणे -४११ ०३० फोन- (०२०) २४४३६६९२ अक्षरजुळणी धारा प्रिंटर्स प्रा.लि. ११५, म. गांधीनगर औरंगाबाद मुद्रक :प्रिंटवेल इंटरनॅशनल प्रा. लि. जी-१२, एम.आय.डी.सी. चिकलठाणा, औरंगाबाद, मुखपृष्ठ : संतुक गोलेगावकर किंमत : २०० रुपये ISBN-978-93-5220-068-9 आपले नाव,पत्ता व इमेल ९८८१७४५६०५ वर SMS करून नवीन पुस्तकांची माहिती घरपोच मिळवा. ________________

भावगंधी देणे जीवनी जमले उदकी लोपले सुख मोती। । " माझे प्रेमळ आणि कर्तव्यदक्ष श्वसूर व सासूबाई अॅड. मधुसूदन करडखेडकर सौ. कमल करडखेडकर यांना सादर! ________________

अल्ला, मेघ दे! मेघ दे, पानी दे, छाया दे रे रामा मेघ दे, शामा मेघ दे अल्ला मेघ दे रे! आँखे फाडे दुनिया देखे आज ये तमाशा हाय रे विश्वास मेरे हाय मेरी आशा! अल्ला मेघ दे, पानी दे, छाया दे रे रामा मेघ दे! - शैलेंद्र ________________

अनुक्रमणिका पाणी चोर लढवय्या २. १७ बांधा भूकबळी खडकात पाणी हमी ? कसली हमी ? कंडम मृगजळ ९. नारुवाडी ११३ १२५ दौरा १३९ १५५ १७१ दास्ता - ए - अलनूर कंपनी अमिना १३. जगण्याची हमी १४. उदक १८ ________________

१. पाणी - चोर “अरे महादू, तू इथं?' लखुजीनं कपाळाचा घाम खांद्यावर टाकलेल्या पैरणीनं पुसत आश्चर्यानं विचारलं. ‘होय बाबा, मीच, विषण्ण स्वरात महादू म्हणाला. लखुजीचा हा प्रश्न त्याला अपेक्षित होता. त्यामुळे नवल नाही वाटलं, पण खेद वाटायचा तो वाटल्यावाचून राहिला नाही. आज वसरणीचा ऊसतोडीसाठी नंबर होता. सकाळीच साखर कारखान्याभोवती पावसाळ्यात भूपृष्ठावर छत्राचं माळ उगवून पसरावं, तशा काडाच्या झोपड्या दाटून व खेटून उभ्या होत्या; त्यातून मार्ग काढीत कंत्राटदार माने येऊन महादूला वसरणीला जाण्यासाठी तयार राहण्याची सूचना देऊन गेले. झटपट त्यानं कारखान्यात बसवलेल्या सार्वजनिक नळावर स्नान केलं, बायकोनं भाजलेला भाकरतुकडा खाल्ला. दोन दिवसांची शिदोरी बांधून घेतली व आपली दोन पोरं घेऊन तो ठरलेल्या ठिकाणी वेळेवर हजर झाला. ऊस तोडल्यावर उरलेला पाला गोळा करण्यासाठी मुलांना सोबत घेतलं होतं. जनावरांना वैरण नाही, हा चारा तरी मिळावा हा उद्देश. बायको व थोरली वयात आलेली लेक कारखान्यातच रोजंदारीवर होत्या. | वसरणीला जाणा-या ट्रकचा ड्रायव्हर उस्मान चहा-पाण्याला गेला होता. तोवर वेळ जाण्यासाठी कानावर खोचून ठेवलेली मजूर बिडी महादूनं काढली व पाणी - चोर / ७ ________________

सदस्याच्या खिशातून माचीस काढून ती पेटवली व भसाभसा चार - दोनदा धूर ओकला. छाती गरम होताच जीवाला तरतरी वाटली. आणि समोर लक्ष गेलं. लखुजी उभा होता. तोही ट्रकची वाट पाहात असावा. तोही ऊसतोडीला निघाला असावा. | पुढे होऊन हाक मारावी असं महादूला वाटलं, पण ओठातून शब्द उमटण्यापूर्वीच त्याचा विचार बदलला. हा आपल्याला आता तो प्रश्न नक्की विचारणार, ज्याचं उत्तर काय द्यावं हे नक्की ठरत नव्हतं. म्हणून तो चेहरा फिरवून आपल्या वसरणीला जाणा-या एमएचक्यू १२७५ या ट्रकचा उस्मान ड्रायव्हर केव्हा येतो हे पाहात स्वस्थ राहिला. पण जरा वेळानं लखुजीचंच लक्ष गेलं, त्यानं मोठ्यानं हाक मारीत विचारलं ‘महादू, तू इथं?' 'होय बाबा, मीच.' विषण्ण स्वरात महादू उत्तरला. लखुजीचा हा प्रश्न त्याला अपेक्षित होता. त्यामुळे नवल वाटलं नाही, तरी खेद वाटल्यावाचून राहिलं नाही. लखुजी त्याच्या जवळ येऊन सलगीची चौकशी करणार तोच उस्मान ड्रायव्हरची हाक आली, 'चलो महादू भाय, हम आ गये !' | महादूला सुटकेच्या भावनेनं हायसं वाटलं. 'लखुजी मला गेलं पाहिजे, आधीच वेळ झालाय. ऊसतोड करून उद्या परतेन सायंकाळपर्यंत वसरणीहून तेव्हा भेटू. निवांत गप्पा मारू.' आणि घाईनं त्याचा निरोप घेऊन महादू ट्रकवर चढला. पोरं व इतर मजूर आधीच बसले होते. उस्माननं वसरणीला येणारे सर्व शेतमजूर ट्रकमध्ये बसल्याची ओरडून खात्री करून घेतली व ट्रक सुरू केला. । | महादू या वर्षी कारखान्यात ऊसतोडीसाठी येणार नव्हता, तर स्वतःचा ऊस कारखान्यात घालण्यासाठी ट्रकसोबत ऐटीत मिरवीत येणार होता. मागच्या वर्षी निरोप घेताना लखुजी व इतर जिवाभावाच्या मित्रांना त्यानं सांगितलं होतं, 'बाबांनो, आता आमची दैना संपली. पुढच्या वर्षी काही माझ्यावर ऊसतोड करायची पाळी येणार नाही. मी स्वतःचा ऊस घेऊन मालकाच्या ऐटीत येईन.' त्याच्या स्वरात ठाम विश्वास होता. चेह-यावर भावी सुखी आयुष्याचं गुलजार स्वप्न होतं. तो निःशंक होता. पाणी! पाणी!! / ८ पण आज... त्याला पुन्हा घराला कुलूप लावून बैलगाडीत कुटुंबकबिला टाकून परत कारखान्यावर यावं लागलं होतं. यापुढील सहा महिने रोज नव्या गावी ट्रकबरोबर जायचं आणि कारखान्याच्या वतीनं शेतक-यांच्या उसाची तोड करायची व उसानं । भरलेल्या ट्रकसह परत यायचं. मालकीण व थोरली लेक कारखान्यात रोजंदारीवर ऊसतोड करायची, तर धाकटी दोघं त्याच्यासोबत गावोगावी भटकायची. ऊसतोडीनंतर पाला गोळा करून आणायची. जनावरं जगवली पाहिजेत. बैलांना सोन्याचा भाव आहे. त्यांच्यासाठी वैरण नाही, पैसा नाही. शेती यंदाही पिकली नाही. लावलेला ऊस जळून गेला आणि बँकेचे कर्ज बोकांडी बसलं. त्याची फेड हा दूरचा प्रश्न राहिला. आधी स्वतः व बायकामुलं, जनावरं जगवायची कशी हा प्रश्न समोर उभा राहिला आणि गेल्या बारा - पंधरा वर्षांतला ठराविक मार्गच पुन्हा आपलासा करावा लागला. कारण जगणं भाग होतं आणि त्यासाठी पोटात भाकरीचे दोन घास हवे होते. कारखान्यावर ऊसतोडीच्या मजुरीखेरीज जगण्याचा दुसरा मार्ग महादूला ज्ञात नव्हता व करता येण्यासारखा तर नव्हताच नव्हता. | एक साधं स्वप्न किती वर्षांपासून महादू पाहात होता. आपल्या गावात, तालुक्यात धरणाचं पाणी येईल व तृषित जमिनीत बागायत पीक डोलून उठेल... ऊस लावू आणि पैका ओढू... आपलं दैन्य व अभावाचं जिणं थोडंतरी सुसह्य होईल... आजही ते स्वप्न स्वप्नच राहिलं होतं. पण एका विषादानं मन कडवटलं होतं. आजवर आपल्या तालुक्यात पाणी असतानाही, त्याबद्दल निसर्गाला दोष देता येत होता. पण यंदा स्वप्न साकार न होऊ देणारी माणसं होती. ती कोण होती हे जेमतेम शिकलेल्या महादूला माहीत नव्हतं; पण ती बलदंड पुढारी व मस्तवाल अधिकारी मंडळी होती. हे शेतकरी असलेल्या त्याला चार लोकात ऊठबस करताना माहीत झालं होतं. पण त्यांना आपण शासन करू शकत नाही. किंबहुना त्यांच्यापर्यंत आपले हात, आपले शब्द व आक्रोश पोचणार नाही याचीही खात्री होती. हाती होतं एकच-अख्ख्या जगावर जळफळणं आणि स्वतःवर धुमसणं... ते व्यक्त करावयाचे प्रकारही सीमित व ठराविक होते - पचापचा धुंकणं आणि सहनच झालं नाही तर पोरांना बदडून काढणं. पाणी - चोर / ९ ट्रक सुसाट धावत होता आणि मनात असे कडवट विचार आल्यामुळे महादू कावला होता. तो ट्रकच्या बाहेर पचकन थुकला आणि समोरच्या रामजीला म्हणाला, ‘बिडी असेल तर काढ बाबा, लई तलफ आलीय.' 'आपल्याला ही तलफ परवडणारी नाही महादू' रामजी म्हणाला, 'पण मी यातूनही मार्ग काढलाय त्यानं खिशातून एक मळकट पुरचुंडी काढली. ती सोडीत तो म्हणाला, 'कारखान्याच्या हफिसात साहेबलोक सिग्रेट ओढतात. त्यांची थोटकं पोरांना पाठवून भी गोळा करतो आणि तलफ आली की तीच ओढतो. चालेल तुला?' | महादूसमोर रामजीनं सोडलेली पुरचुंडी धरली होती. त्यात अर्धवट ओढलेल्या सिग्रेटचे तुकडे होते. त्याला मळमळून आलं. तो मान फिरवीत म्हणाला, 'नको मला असं काही.' | ‘याचा अर्थ अजूनही माझ्याइतकी वाईट परिस्थिती तुझी झालेली नाहीय, ठीक आहे.' रामजीनं एक थोटूक पेटवत आणि धूर काढीत गप्पा मारायच्या इराद्यानं विचारलं, 'तू माण तालुक्याचा ना? कोणतं गाव तुझं?' ‘डंगीरवाडी. तिथं शेती हाय माझी. बारा एकर. पण पाणी नाही. वर्षभर पण उगवलेली बाजरी पुरत नाही. महादू पण मनातलं सांगू लागला... 'काय सांगू बाबा, आमचा तालुका लई कोरडा. हलक्या हलक्या जमिनी, पाणी कमी पडतं, बाजरीच काय ती होते. दस-यापर्यंत कसंतरी पुरतं. गावची मारुतीची जत्रा संपली की निघालोच इकडं कारखान्याला.' | ‘आमच्या सांगोल्याची पण हीच परिस्थिती. आपले तालुके लागून लागूनच की, जिल्हा वेगळा असला तरी.' 'होय, मी ऐकून आहे. आमच्या इंगीरवाडीच्या पोलीस पाटलांची बहीण तुमच्या तालुक्यातच दिलीय तळणीला बघा. मी पाटलासोबत गेलो होतो एकदा.' महादूचं मन मोकळे होत होतं. तो पुढे म्हणाला, 'बहात्तरनंतर पुन्हा मागच्या वर्षीपासून दुष्काळ काटा काढतोय. गेल्या वर्षापाठोपाठ यंदापण पावसानं दगा दिला. काईसुदीक उगवून आलं नाही. दोन जनावरं पाणी! पाणी!!! १० विकून टाकली. काय करणार? वैरणंच झाली नाही. दोन राहिली ती बैलगाडीला हवी आणि शेतीला पण. त्यांना जगवलं पाहिजेच.' ‘कारखान्यात काम करताना एवढं बरं हाय-जनावरांना ऊस तोडल्यानंतरचा पाला घालता येतो.' रामजी अनुभवाचे बोल बोलला, "मीही सर्व जनावरं घेऊन आलोय?' ‘दरवर्षीची ही पिरपिर. राम जाणे किती दिवस हे असंच चालायचं आपलं?' महादूच्या आवाजात विखार दाटून आला होता. तो रामजीला पण समजला. तो समंजसपणे म्हणाला, | ‘भोग आहेत बाबा हे, कुणाला चुकलेत? आपल्या हाती काही नाही, तर मग उगीच कावून काय फायदा?' थोडं थांबून गंभीर होत रामजी पुढे म्हणाला, ‘एक अनुभवाचं सांगू? अरे दुःख आणि काळजी तरी किती करावयाची? आता कशातच काही वाटत नाही. आला दिवस तो आपला, गेला दिवस राम भला. येणा-या दिवसाची पर्वा कशाला?' रामजीचा तो स्थितिवादी समंजस शहाणपणा महादूला स्पशून गेला. त्याला वाटलं, आपणही असं बनावं म्हणजे खालीपिली त्रास नाही होणार. भन नाही कडवटणार आणि जीव नाही अस्वस्थ होणार. ट्रक वेगानं धावत होता. त्या वेगाची लय रामजीत भिनली होती. त्याला पेंग येत होती आणि संभाषणाला त्यामुळे खीळ बसली. महादूपण विचारात गुंगला. वसरणीला पोहोचल्यावर महादूचा विषाद चौधयांची बहरलेली ऊस शेती पाहाताच पुन्हा जागृत झाला. त्याला वाटलं... ज्या असंख्य बड्या शेतक-यांनी दबाव । आणून पाणी लाटलं, त्यात चौधरीपण असतील. या तालुक्यात निरेचं पाणी कालच्या मिळतं. यंदा कधी नव्हे ते पाणी कमी पडलं. आणि आपल्या मालाला मिळणारं पाणी इथंच अडलं गेलं आणि गेलं पाव शतक त्यांनी उसातून सोन्याचा धूर काढला. त्यांच्या जळणा-या उसाला पाणी प्राधान्यानं दिलं गेलं आणि ज्या तृषार्त तालुक्यास कालव्याचं काम पूर्ण झाल्यानंतर प्रथमच पाणी मिळत होतं आणि त्या पाण्यावर अनेकांनी प्रथमच पाणी - चोर / ११ ऊस लावला होता, त्यांच्यापर्यंत पाण्याचा दुसरा हप्ता पोचलाच नाही. त्यांची ऊस पाण्याअभावी कडक उन्हानं जळून गेला. हे असं कसं घडलं? का घडलं? राज्य सरकार आपलंच आहे, तर मग एक तालुका केवढा समृद्ध बनतो आणि दुसरा पिण्याच्या पाण्यालाही वंचित होतो. पाणी ही तर देवाची देणगी, मग एका तालुक्याला एवढं पाणी मिळतं, ज्यामुळे दुस-या तालुक्यात सर्वांची शेती करपून जावी? का? का म्हणून? त्या तालुक्याचा पाटबंधारे मंत्री आहे, तिथं साखर कारखाने आहेत, सहकारी बँकेचा राज्याचा अध्यक्षही इकलाच आहे. म्हणून हे कट होतात. आम्हाला न्याय मग कधी मिळणार? महादू यंत्रवत काम करीत होता. झपाझप उभे पोसलेले उसाचे दांडे आडवे । होत होते. काही मजूर मोळी बांधून ट्रकमध्ये चढवत होते. दुपारी भाकरी खायला शिदोत्या त्यांनी सोडल्या तेव्हा निम्मा वावर साफ झाला होता. महादूची भूक जणू आज मरून गेली होती. त्याला दोन तुकड्याहून जास्त खावंवलं नाही. तो हात धुऊन एका झाडाखाली निवांत बसला. | त्याला २६ जानेवारीचा दिवस आठवत होता. त्या दिवशी माण तालुक्यात कालव्याचे काम पूर्ण झालं होतं आणि तिथं आज धरणाचं पाणी येणार होतं. ज्या नीरा नदीनं शेजारचा तालुका समृद्ध केला होता, ती आज आपलं अमृत या तृषार्त मातीस पाजणार होती. शुभ्र पाण्याचे लोट नाचत कालव्याद्वारे आले आणि सर्व लोकांनी आनंदाची जल्लोष केला. त्या पहिल्या पाण्याची पूजा केली, नारळ फोडला. सर्वांच्या चेह-यावर समृद्धीची-सुखाची स्वप्नछटा तरळत होती. महादूपण त्या असंख्यांतला एक होता. आज त्याच्या चेह-यावर पराभूत निराशा दाटून होती. त्या दिवशी फुलारून आलेले त्याचे शेतकरी बांधव आज त्याच्याप्रमाणेच हताश असणार. नव्हे, आहेतच. आपण ज्यांना निवडून दिले ते आपले आमदार - खासदार काय करत होते, जेव्हा तालुक्याचं पाणी अलीकडेच अडवलं व चोरलं? शेतकरी संघटनेनं त्यांच्या घरावर मोर्चा नेला, त्यात महादूपण होता. पण तेव्हाही त्याला वाटत होतं- आपले पाणी! पाणी १२ नेते कुचकामी आहेत, कमअस्सल आहेत... ते काही म्हणून काही करू शकणार नाहीत.... किती उमेदीनं मेहनत करून आपण ऊस लावला. पाण्याचा पहिला हप्ता बंधा-यातून उसात फिरवला तेव्हा आनंद काळजात मावत नव्हता. दरवर्षी बाजरी पेरायची आणि पावसाच्या दयेवर विसंबून राहायचा आपला सदाचाच दुष्काळी तालुका. पाऊस फारच कमी व अनियमित. जे उगवून यायचं, ते खंडी दोन खंडीपण नसायचं. कसंतरी दसन्यापर्यंत पोट भरायचं आणि दसरा संपला आणि गावाच्या मारुतीची जत्रा आटोपली, की भ्रमंती सुरू. कारखाना सुरू होण्यापूर्वी मेंढरं घेऊन कोकणात जात असू, तर आता ऊसतोडीसाठी इकडे यावं लागतं. या वर्षी हे दुष्टचक्र संपणार, आपणही आता ऊस मालक आहोत. या दोन एकरात ऊस पुरा वाढला की बक्कळ पैसा येईल. थोडं कर्ज फेडू आणि बायकामुलांना कपडाचोपडा करू. कणगीत शिगोशीग वर्षभर पुरेल असे धान्य भरून ठेवू.. आणि या आषाढीला पंढरीची वारी करून येऊ. महादूच नव्हे, सबंध घर ऊस शेतीमध्ये खपत होतं. काळजीपूर्वक निगराणी अखंड होती. रोज कुठे तण वाढते, यावर घारीप्रमाणे सर्वजण नजर ठेवून होते. त्या नजरेत अवध्या जगाचा क्रोध आणि हताशता दाटून आली, जेव्हा पाण्याची दुसरी पाळी तालुक्यात आलीच नाही. स्थानिक नेत्यांसोबत महादूही पदरमोड करून पाटबंधारे खात्याच्या ऑफिसमध्ये गेला, तेव्हा बेपर्वा उद्धट उत्तर मिळाले, ‘आम्हाला कारण माहीत नाही. वरून आदेश आला त्याप्रमाणे पाणी याच तालुक्यात दिलं गेलं. माणला उरलंच नाही.' 'पण हा तर अन्याय झाला साहेब.' महादूला राहावले नाही. उग्र स्वरात . तो पुढे म्हणाला, 'आधी कबूल करूनही पाणी सोडलं नाही. आम्हा सर्वांचा ऊस जळून गेला. प्रथमच तो आम्ही लावला. त्यासाठी पाणीपट्टीकरिता बँकेचे कर्ज काढले आणि आता म्हणता, वरचा आदेश आला म्हणून पाणी माणला सोडलं नाही. आमचं केवढं नुकसान झालं माहीत आहे?' पाणी • घोर / १३ ‘त्याला मी काय करू?' ही त्या खुर्चीत बसलेल्या इंजिनिअरची थंड प्रतिक्रिया. त्यावेळी महादूला वाटलं, त्याचं बखोटं पकडावं आणि गदागदा हलवावं. पण यातलं तो काही करू शकला नाही. | किती वेळ तरी तो नुसताच आतल्या आत उकळत राहिला आणि मग कंटाळून थंड झाला. हे..हे सारं थांबलं पाहिजे. महादूच्या डोक्यात विचार येत होते... यावर्षी असं पाणी मध्येच श्रीमंत शेतकरी लाटतील, सरकारही त्यांनाच साथ देईल असं वाटलं नव्हतं. पुन्हा असं होऊ नये म्हणून खबरदारी घेतली पाहिजे. त्यासाठी भांडलं पाहिजे, ओरडलं पाहिजे... पण आपण एक सामान्य शेतकरी प्रपंचात आकंठ बुडालेले. या वर्षी आमदारासमोर निदर्शने केली, त्यात आपणही होतो. त्यानं काय फायदा झाला? आपल्या तालुक्यात समर्थ नेते नाहीत आणि जे आहेत ते कमअस्सल आहेत. त्यांना तालुक्याच्या विकासाची पर्वा नाही. आपण फार हतबल आहोत... आपली ही परवड कधीच संपायची नाही, असं दिसतंय.... त्यानं एक दीर्घ निःश्वास सोडला. तो उठून उभा राहिला. एक मनसोक्त । आळस दिला. इतर सर्वजण कामाला उठले होते. तोही कामाला लागला. चारच्या सुमाराला चौधरीच्या वाड्यावरून चहा आल्याची सूचना त्यांच्या मुनिमाने दिली, तसं काम थांबलं. सर्वजण चहा घेऊ लागले. एका कपात चहा महादूपुढे आला. त्याला क्षणार्धात काय वाटलं की... त्यानं चहा नाकारला आणि तो पुन्हा मळ्यात जाऊन कामाला लागला. उन्मादानं त्यानं स्वतःला कामाला जुंपून घेतलं. त्याच्या अंगात कसला आवेश संचारला होता की? वेगानं तो उसाच्या दांड्यावर घाव घालीत होता आणि तोंडाने पुटपुटत होता... पाणी! पाणी!! / १४ | मी थुकतो तुमच्या चहावर, या ऊसशेतीवर. तुम्ही लोक हरामी आहात, पाणी - चोर आहात. आम्हाला बर्बाद केलंत तुम्ही अन् मी तुमचा चहा पिऊ? छट्, मी थुकतो तुमच्या चहावर... तुमच्या या ऊसशेतीवर... है पाणी - चोर / १५ ८ १२ । १) -। । पाणी! पाणी!!/१६ : n 1. । ' Si ।।।।।।। 2444 l t ! \ ulfA 10 HAI । २. लढवय्या 'वाईफ - भल्या पहाटे शेतात जाऊन अंग मोडून काम केल्यानंतर घरी येऊन तुझ्या हातची न्याहरी खाण्यात काही औरच मजा आहे बघ!' महादूचं हे पेटंट वाक्य असायचं. 'सैन्यात सकाळी पी.टी. केल्यानंतर ब्रेकफास्ट, इथं गावी शेतात जाऊन आल्यावर न्याहारी - वा, क्या बात है...' अशा वेळी आवडा खुदकन हसायची - प्रत्येक वेळी ! ‘धन्याचं सारंच न्यारं असतं बाई' दुपारी चार बायकांत गप्पा मारताना आवडा सांगायची. ‘सारे शेतकरी शेतातच न्याहरी घेऊन जातात, पण त्यांना घरी येऊन गरमागरम खायचं असतं. ब्रेकफास्ट म्हणे...' इतर बायकांच्या आधी आवडाच तोंडाला पदर लावून खुसूखुसू हसायची. 'मला ते ‘वाईफ' म्हणून हाक मारतात सयांनो - विंग्रजीत...' | आजही महादू नेहमीप्रमाणे भल्या पहाटे उठून शेतात गेला होता. नेहमीच्या वेळेला तो घरी सैन्यातल्या सवयीप्रमाणे लांब लांब ढांगा टाकीत आला तो मान टाकलेल्या बैलावाणी ! कधी नव्हे तो आज त्यानं दाढी करायला फाटा दिला- ‘हे। आक्रीतच म्हणायचं बाई-' आवडा स्वतःशीच पुटपुटली. घोटून दाढी करणे व अक्कडबाज मिशा वळवणे, हा त्याच्या दैनंदिन जीवनाचा क्रम होता. तो आज त्यानं चुकवला. तेव्हाच आवडाच्या ध्यानी आलं की, कुठेतरी काहीतरी बिनसलं आहे. लढवय्या /१७ खरं तर आज ती त्याची वाटच पाहात होती. बन्याच दिवसांनी तिनं त्याच्या आवडीची न्याहरी बनवली होती. त्याला दही फार आवडायचं, म्हणून काल म्हशीचं दूध विकत घेऊन दही लावलं होतं. आणि शिळ्या भाकरी कुस्करून दही घालून लसणाची सणसणीत फोडणी दिली होती. महादूला ती फार आवडायची. सैन्यातून सेवानिवृत्ती घेतल्यावर गावी आल्यावर पहिल्या बाजारहाटाला तालुक्याहून त्यानं एक टेबलखुर्ची आणली होती. त्यावर बसूनच तो न्याहरी व जेवण करायचा. 'वाईफ, मांडी ठोकून बसत जेवायची सवय गेली बघ. आता टेबल खुर्चीबिना जेवता येत नाही.' आवडाला त्याची ही कृतीही आवडायची. कारण खेडेगावात टेबलावर बसून ब्रेकफास्ट घेणारा तोच एकटा आहे, हाही तिच्या अभिमानाचा भाग होता. आपल्या मैत्रिणीला हे पुन्हा पुन्हा सांगताना तिच्या स्वरात अभिमान व नव-याविषयीचा आदर झळकायचा. आज तो नेहमीच्या सवयीनं टेबल-खुर्चीवर येऊन बसला. आवानं वाडग्यात दयात कुस्करलेली व लसणाची खमंग फोडणी दिलेली शिळ्या भाकरीची न्याहरी ठेवली. पहिला घास घेताच गडगडाटी हसत तो 'वाईफ बा, क्या बात है!' असे उद्गार काढील अशी तिची अपेक्षा होती; कारण मागच्या मोसमात रोग होऊन बँकेचे कर्ज काढून घेतलेली म्हैस मेल्यापासून त्यांनी बकरीचं दूधच वापरायला सुरुवात केली होती. कारण महादूच्या लान्सनाईकपदाच्या तुटपुंज्या पेन्शनीत तेच परवडायचं. त्याला बकरीच्या दुधापासून बनवलेलं दही आवडत नसे, पण आताशी त्याची सवय झाली होती. पण काल तालुक्यात जाऊन त्यानं पेन्शन आणली तेव्हा तिनं खास म्हशीच दूध विकत घेऊन आजच्या न्याहरीसाठी दही बनवलं होतं. | पण त्याचं न्याहरीकडे लक्ष नसतं. तो कितीवेळ तरी न्याहरीला सुरुवात न करता तसाच मूक बसून होता. मग भानावर येत त्यानं एक घास घेतला, पण काही न बोलता गाईनं संथपणे खाल्लेला चारा रवंथ करावा, तसा तो पहिलाच घास त्याच्या तोंडात फिरू लागला. आवडा त्याच्यासमोर गुडघ्यात पाय मोडून बसली होती आणि अस्वस्थपण त्याच्याकडे एकटक पाहात होती. पण काही बोलायचा धीर होत नव्हता. महादूच आज काहीतरी बिघडलं आहे हे नक्की. त्याला वाटलं तर तो आपणहून सांगेल, नाहीतर तो हुं की चू करणार नाही, हे तिता माहीत होतं. पाणी! पाणी!! / १८ सकाळी आपल्या शेतावर जाऊन महादूनं गतवर्षी लावलेल्या फळबागेची पाहणी केली. शासनाच्या रोजगार हमीशी निगडीत फलोत्पादन कार्यक्रमाअंतर्गत । लाभार्थी म्हणून त्याची निवड झाली होती व त्यानं माजी सैनिक म्हणून मिळालेल्या सीलिंगच्या पाच एकर जमिनीच्या दोन एकरावर आंबा व डाळिंबाची झाडे लावली होती. यंदाचं हे दुसरं वर्ष. पुढल्या वर्षी पीक पदरात येईल, तोवर जपलं पाहिजे फळबागेला. पाणी घातलं पाहिजे, झाडे जगवली पाहिजेत. | उत्तरेला दोन फर्लागावर तीन वर्षांपूर्वी एक पाझर तलाव झाला होता. त्यात मार्च महिन्यातही पाणी शिल्लक होतं. तेथून त्यानं सैनिकी तडफेनं कावडीतून चार-पाच खेपा करीत पाणी आणून झाडांना दिलं होतं. ही फळबाग करपणार नाही एवढंच पाणी जेमतेम देता आलं. येत्या मृगात बरसात झाली की झाडं पुन्हा जोमाने वाढणार, पण तोवर त्यांना जपत्नं पाहिजे... | सैन्यात असतानाच त्यानं गावी जमीन मिळावी म्हणून अर्ज केला होता व निवृत्तीच्या एक वर्ष आधी गावातील सरपंच दाजिबा पाटलाची जमीन सीलिंग कायद्याखाली अतिरिक्त म्हणून जाहीर झाली होती. त्यातला पाच एकराचा तुकडा महादूला सहजपणे मिळून गेला होता. । | गावी परतल्यावर त्यानं मोठ्या मेहनत - मशागतीनं ही जमीन जोपासली होती. अक्षरशः खडकाळ असलेली जमीन त्यानं राब राब राबून पिकाखाली आणली होती. आजवर गावकुसाबाहेर त्याच्या वाडवडलांची जिंदगी धर्मातरापूर्वी म्हारकीची कामं करण्यात गेलेली, पण आज महादू जातिवंत शेतक-याइतकाच जमिनीवर जीव जडवून होता - त्यासाठी त्यानं रक्ताचं पाणी केलं होतं. । दाजिबानं आपली जमीन सीलिंगमध्ये जाऊ नये म्हणून काय काय लटपटी - खटपटी केल्या होत्या; पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तरीही महादूला मिळालेली जमीन त्याला सहजासहजी पचू नये अशा खटपटीत तो नेहमीच असायचा. ताबा मिळाल्यावरही सातबाच्यावर नाव लवकर आलं नाही; कारण गावतलाठी दाजिबानं फितवले. त्यासाठी तहसीलला दहा खेपा झाल्या, जिल्हा सैनिक बोडकडे अर्ज केले, तेव्हा कुठे फेरफार होऊन मिळालेल्या जमिनीच्या मालकी व वहितीच्या रकान्यात त्याचं नाव लावलं गेलं. तो सातबाराचा निर्जीव कागद व त्यावर मालक म्हणून प्रतिबंधित का होईना, मालक म्हणून असलेलं आपलं नाव पाहाताना कणखर सैनिक असलेल्या महादूच्या डोळ्यात पाणी आलं होतं. पिढ्यानपिढ्या गावकुसाबाहेर जिंदगी घालवणा-या त्याच्या घराण्याला मूळ धरायला जमीन नव्हती, ती आज मिळाली होती. ख-या अर्थाने आज तो भूमिपुत्र झाला होता ! ‘वाईफ, क्या बात है...' एवढंच कसंबसं डोळे पुसत महादू म्हणाला आणि आपलं नित्याचं गडगडाटी हसू हसला. लढवय्या / १९ पहिली दोन वर्षं निसर्गानंही चांगलीच साथ दिली. त्याला हिरवा नजराणा भरघोस मिळाला; पण मागच्या वर्षी अपु-या पावसानं सूर्यफूल व ज्वारी पूर्णपणे करपून । गेली... त्याच्यासाठी हा फटका जबर होता. पण महादू आघाडीप्रमाणे जीवनाच्या क्षेत्रातही लढवय्या होता. आपलं सैनिकी तत्त्वज्ञान सांगताना आवडाला तो म्हणाला : होता, ‘वाईफ, अगं, एक लढाई हरली म्हणजे युद्ध हरलं असं समजायचं नसतं !' आणि त्याचवेळी त्याची फळबागेच्या योजनेसाठी निवड झाली. शासनाच्या खर्चाने आपल्या जमिनीवर फळझाडे लावण्याची अनोखी योजना. मेहनत आपण करायची आपल्याच शेतामध्ये. मजुरी शासन देणार. पुन्हा फळबागाचं उत्पन्नही आपलं. खरिपाचं पीक गेल्यामुळे नाउमेद बनलेल्या महादूच्या मनाला त्यामुळे उभारी आली. दीड वर्षानंतर त्याच्या जमिनीच्या दोन एकरात आंबा - डाळिंबाची झाडं चांगलीच तरारून आली होती ! त्याची कड़ी निगराणी व सक्त मेहनत कामाला आली होती. पण दिवाळी गेली तशी जमिनीतली ओल कमी झाली, झाडांना पाणी कमी पडू लागलं. तसं महादूनं दररोज दोन फर्लागावर असलेल्या पाझर तलावातून कावडीनं ‘लेफ्ट-राईट' करीत पाणी आणून झाडांना द्यायला सुरुवात केली. दाजिबानं त्याच्याविरुध्द हा पाझर तलाव बांधणा-या जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाकडे तक्रार केली होती. पण शासनाची लाल फीत इथं महादूच्या पथ्यावर पडली. खरं तर त्या पाझर तलावाखाली जवळपास अर्धा - एक किलो मीटर क्षेत्रात एकही विहीर झालेली नव्हती; तलावाचं पाणी पाझरून खालच्या क्षेत्रात विहिरीचे पाणी वाढावं यासाठी पाझर तलाव बांधले जातात. पण खाली विहिरी नसल्यामुळे निव्वळ धूप होऊन जाणारं पाणी झाडांना पाजलं तर बिघडलं कुठं? हा त्याचा सवाल होता. पण यंदा दुष्काळाचं सावट गावावर आलं होतं. रब्बी पेर न झाल्यामुळे शेतमजुरांना व दुष्काळाचा फटका बसून खरीप गेलेल्या छोट्या - छोट्या शेतक-यांनाही पोटाची खळगी भरण्यासाठी काम हवं होतं. त्यात महादू - आवाचाही समावेश होता! | गावक-यांनी गावातच दुष्काळी काम निघावं म्हणून अर्ज केला होता. त्यात दाजिबाचा सरपंच या नात्यानं पुढाकार होता. या अर्जावर महादूनंही सही केली होती - लफ्फेदार इंग्रजीत. बरेचसे सहीचे अंगठे, काही मराठीत तोड़कीमोड़की सही यामध्ये त्याची ऐटबाज सही उठून दिसत होती ! । काही दिवसांतच सर्व्हसाठी डेप्युटी इंजिनिअर आले. पाझर तलावाची जागा निश्चित करून अलाईनमेंट घेण्यासाठी.... आणि महादूच्या अंगाचा तिळपापड झाला दाजिबाचा कावा त्याच्या ध्यानी आला. या पाझर तलावात जवळपास बारा एकर जमीन जाणार होती. त्यात महादूला सीलिंगमध्ये माजी सैनिक म्हणून मिळालेली पूर्ण पाच एकर जमीन जात होती. इंजिनिअरनी जेव्हा अलाईनमेंट केली, तेव्हा त्याच्या हे ध्यानी आलं. आणि पाणी! पाणी!! } २० नुकतीच जमिनीत रुजू लागलेली व जमीन धरू लागलेली आपली मुळे उखडली जाताहेत या जाणिवेनं तो हादरून गेला... | हा दाजिबाचाच डाव होता हे निश्चित. याची महादूला पूर्ण खात्री होती. त्याच्या शेजारी त्याचीच जमीन सीलिंगमध्ये मिळून आपणही शेतमालक बनलो, हे त्याला सहन होत नाही. अजूनही त्याच्या डोक्यात व मनात आपली - धर्मांतर करून बौद्ध झालो असलो तरी म्हारकीची भावना घर करून आहे, हे महादूला दाजिबाच्या शब्दातून नव्हे, तर कृतीतून जाणवत होतं. त्यानं तालुक्याला जाऊन सर्व्हेक्षण करणा-या इंजिनिअरची भेट घेतली व तळमळीनं सांगितले, | ‘साहेब, मी रिटायर्ड लान्सनाईक आहे महार रेजिमेंटचा. मला एकाहत्तर युद्धात पराक्रमाबद्दल वीरचक्रही मिळालं आहे सर. शासनानं आमचं पुनर्वसन व्हावं म्हणून ही जमीन दिली, ती पूर्णपणे तुम्ही घेणार? यात शासनाने त्याच्या खर्चानं मला फळबाग रोजगार हमीतूनच करून दिली आहे... आणि आमची पेन्शन किती कमी असते हे तुम्हाला मी सांगायला नको. त्यावर आणि या जमिनीच्या उत्पन्नावर आमचं कुटुंब कसंतरी जगतंय, तेच तुम्ही हिरावून घेतल्यावर आम्ही पोट कसे भरावं?" | पण तो उपअभियंता हा बिनचेह-याचा निर्जीव - बथ्थड नोकरशहा होता. त्यानं थंडपणे उत्तर दिलं, “अलाईनमेंटप्रमाणे या पाझर तलावाच्या बुडीत क्षेत्रात तुमची जमीन येते, त्याला मी काय करू?" तो निराश होऊन बाहेर आला. आपण पुन्हा भूमिहीन होणार ही भावना है। त्याला सहस्र इंगळ्या डसाव्यात, तशी वेदना देत होती ! | महादूला मागून कुणीतरी हाक मारली, तसा भानावर येत त्यानं वळून पाहिलं, या कार्यालयातील सव्हेंअर होता, जो गावामध्ये पाझर तलावाच्या सव्र्हसाठी आला होता. त्यानं चहा पीत जी माहिती दिली, ती ऐकून त्याला वेड लागायची पाळी आली आणि दाजिबा व त्या उपअभियंत्याची मनस्वी चीही आली. कारण मूळच्या सर्वेक्षणाप्रमाणे निश्चित झालेल्या अलाईनमेंटमध्ये महादूच्या शेताला लागून असणारी दाजिबाची बारा - तेरा एकर जमीन जात होती, तर महादूच्या जमिनीचा एक इंचही जात नव्हता. उलटपक्षी तिथपर्यंत आठ-दहा महिने पाणी राहणार असल्यामुळे महादूला रब्बीसोबत उन्हाळी पीकही त्यामुळे घेता येणार होतं. आपली जमीन बुडीत क्षेत्रात जाणं आणि त्याचा भरघोस फायदा महादूला होणं, हे दोन्ही दाजिबाला नको होतं. त्यानं आपल्या सरपंचकीच्या जोरावर मूठ गरम करीत उपअभियंत्याशी हातमिळवणी केली आणि चक्क पाझर तलावाची अलाईनमेंट बदलली होती. त्यामुळे खर्चही वाढत होता. या नव्या अलाईनमेंटप्रमाणे महादूची पूर्ण जमीन पाण्याखाली जाणार होती! । ‘ब्लड़ी सिव्हिलियन साला. महादूच्या ओठातून अस्सल शिवी आली. ‘साहेब, आम्ही सैनिक सीमेवर लढतो, पहारा देतो तो हा देश व या देशाची माणसं सुरक्षित राहावीत म्हणून. आणि हे आमची जमीन लुबाडतात, आमच्या जगण्याचं लढवय्या । २१ साधन हिरावून घेतात - का, का म्हणून आम्ही सैनिकांनी आपला जीव धोक्यात घालायचा ? या... या क्षुद्र स्वार्थी ब्लडी सिव्हिलियनसाठी?' | "मी आपलं दुखणं समजू शकतो कांबळे साहेब-" तो सव्र्हेअर म्हणाला. 'माझा मोठा भाऊ पण सैन्यात होता आणि एकाहत्तरच्या युद्धात बांगला देशात त्याला वीरगती प्राप्त झाली...' क्षणभर महादूही गंभीर झाला. सव्र्हेअरचा भाऊ त्याचा परिचित होता. एवढंच नव्हे, तर त्याच्याच तुकडीत जवान होता आणि युद्धाच्या धुमश्चक्रीत तो महादूच्या डोळ्यासमोर मारला गेला होता. | ‘पण अलाईनमेंट बदलणं हा घोर अन्याय आहे साहेब-' काही वेळानं महादू म्हणाला, 'तुम्हीच सांगा, आता मी काय करू?' 'त्यासाठी तुम्हाला वरपर्यंत गेलं पाहिजे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा कलेक्टर, पण तूर्त तुम्ही पाझर तलावाच्या कामासाठी तुमची संमती मागायला अधिकारी येतील, तेव्हा त्यांना ती देऊ नका. मग त्यांना तेथे काम करण्यासाठी जमीन भूसंपादन कायद्याप्रमाणे कार्यवाही करून संपादित करावी लागेल. त्यासाठी कायद्यानं तीन वर्षे लागतात. तोवर तुम्हाला प्रयल करता येतील...' सअरच्या मार्गदर्शनानं थोड़ी उमेद घेऊन महादू गावी परतला होता. | त्या दिवसापासून तो वेड्यासारखा आपल्या शेतामध्ये वेळी - अवेळी काम असो - नसो चकरा मारत होता. जमिनीचा तसू तसू निरखून पाहात बसायचा. एक एक आंबा - डाळिंबाचं झाड हळुवारपणे पानाफुलांना स्पर्शत कुरवाळायचा. ही काळी आई आपणास पारखी तर होणार नाही ना? या विचारानं मन य डोकं गड व्हायचा त्याच्या गावातच नव्हे, तर सबंध तालुक्यात त्यावर्षी दुष्काळ जाहीर झाला होता आणि मोठ्या प्रमाणावर रिकाम्या हातांना काम आणि पोटाला अन्न मिळावे म्हणून रोजगार हमीची कामं सुरू करण्यात आली होती. शेजारच्या गावात बंडिंगचे एक काम चालू होतं, तिथं मजुरीही चांगली पडत होती. महादूच्या गायचे जवळपास साठ-सत्तर मजूर कामावर जात होते. त्यामुळे महादूची जमीन बुडीत क्षेत्रात जाणा-या पाझर तलावाच्या कामाला मागणी नव्हती. त्यामुळे महादू काहीसा निवांत होता. पण सुमारे दीड महिन्याने बंडिंगचं ते काम संपलं. त्या गावातलं पाणलोट क्षेत्रातलं पूर्ण काम झाल्यामुळे आता तिथं या हंगामात तरी काम निघणं शक्य नव्हते. त्यामुळे त्या गावचे व महादूच्या गावचे जवळपास सव्वाशे मजूर कामाअभावी बेकार बसून राहिले होते. | याचा फायदा घेऊन दाजिबानं गावातलं पाझर तलावाचं मंजूर असलेले काम सुरू करावं, असा अर्ज तहसीलदारांकडे दिला. तेव्हा जमीन जाणा-या शेतक-याचा जमीन घेण्यासाठी संमती मिळवण्यासाठी तहसीलदाराच्या आदेशावरून तो उपअभियंता गावी आला, महादूसगट चार शेतक-यांची जमीन बुडीत क्षेत्रात जात होती. महा वगळता इतरांनी दाजिबाच्या सांगण्यावरून व त्यांची थोडी थोडी जमीन जात पाणी! पाणी!! / २२ असल्यामुळे व उर्वरित जमीन बागायत होण्याची शक्यता असल्यामुळे संमती लिहून दिली. मात्र महादूनं साफ इन्कार केला ! आणि ज्या गावानं एकेकाळी बांगला देश युद्धात अतुलनीय पराक्रम केल्याबद्दल वीरचक्र मिळालं म्हणून त्याचा सत्कार केला होता आणि ग्रामपंचायतीनं ‘जय जवान - जय किसान' कीर्तिस्तंभ उभारला होता, त्यांच्या नजरेतून तो यामुळे एकाएकी उतरला गेला. कारण त्यांच्या रोजगाराचा प्रश्न होता, भुकेचा प्रश्न होता ! त्यानं खूप तळमळून यातला गैरप्रकार व दाजिबाचा दुटप्पीपणा सांगायचा प्रयत्न केला, पण दाजिबा गावक-यांना बहकावण्यात चांगलाच यशस्वी झाला होता. त्यांचा उलट असा समज झाला की, गावचं विकासाचे - पाझर तलावाचं काम महादूच्या आडमुठेपणामुळे होत नाही आणि तोच मजुरांच्या उपासमारीला जबाबदार आहे. । | गावक-यांची बदललेली नजर महादूला विद्ध करीत होती, पण तो ठाम होता. त्यानं या अन्यायाविरुद्ध शेवटपर्यंत लढायचं ठरवलं होतं. गावचा रेशन दुकानदार त्याचा बालमित्र होता. त्याच्याशी बोलताना महादू निश्चयी सुरात म्हणाला होता - 'मी लढवय्या आहे. माझ्यावर पाझर तलावाची अलाईनमेंट बदलून मुद्दाम अन्याय करण्यात आला आहे. त्याविरुद्ध मी लढत आहे; पण वाईट याचं वाटतं की, हे गावकरी का समजून घेत नाहीत? त्यांच्या हाताला काम नाही हे मलाही फील होतं, पण मी तरी काय करू? गावासाठी त्याग करा म्हणणारे हे भोंदू - पोट भरलेले पुढारी स्वतःची जमीन का देत नाहीत?'- आज गावात तालुक्याचे तहसीलदार व बी. डी. ओ. साहेब येणार होते, पाझर तलावासाठी महादूची संमती मिळवण्यासाठी. मघाशी शेतातच कोतवाल येऊन खबर देऊन गेला होता. म्हणून आज न्याहरीत त्याचं मन नव्हतं. घास तोंडात फिरत होता. आवडानं केलेली फर्मास दही - भाकरी त्याला जात नव्हती. घुम्यासारखा तो बसून होता आणि त्याची ही अवस्था पाहून आवडा अवघडली होती. कशीबशी त्यानं न्याहरी आटोपली. नेहमीच्या सवयीनं आंघोळ केली आणि कपडे करून तो समोरच्या खोलीत बाजेवर अस्वस्थ पडून राहिला. | काही वेळानं तो भानावर आला, तो आवडीच्या हाकेनं. ‘धनी, कोतवाल आलाय जनू. तुमास्नी चावडीवर बोलविलंय... बिगी बिगी.' 'ठीक आहे, मी येतो म्हणून सांग!' बाजेवरून तो उठत म्हणाला. दारातूनच परत आला आणि कसल्याशा विचारानं त्यानं पेटीतून आपला कडक लष्करी ड्रेस काढला, वीरचक्र पदक काढलं. ते छातीवर लावून ऐटबाज चालीनं तो काही क्षणांतच चावडीमध्ये पोचला. । | तिथं चावडीसमोरच्या पटांगणात खुर्चीवर तहसीलदार व बी. डी. ओ बसले होते. त्यांच्या बाजूला सरपंच दाजिबा पाटीलही बसला होता. महादूनं कडक सॅल्यूट ठोकला व आपला हात पुढे करीत म्हणाला, लढवय्या /२३ "गुड मॉर्निग सर, आय अॅम लान्सनाईक महादेव कांबळे - विनर ऑफ वीरचक्र मेडल इन बंगलादेश यॉर...!" तहसीलदार तरुण, पौरगेलेले होते. त्यांनी हस्तांदोलन करीत त्याला बाजूची रिकामी खुर्ची देऊ केली. ते दाजिबाला तितकंसं आवडलं नाही. त्याच्या टक्कल पडलेल्या कपाळावरचं आधीच असलेलं आठ्यांचं जाळं जास्तच विस्तृत झालं. | 'महादेव कांबळे, तुम्ही एक सैनिक आहात. तुम्हाला यावर्षी किती भयानक दुष्काळ पडला आहे, हे मी सांगायला नको.' तहसीलदार बोलत होते. 'इथं या गावात कलेक्टर साहेबांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत पाझर तलावाचं काम मंजूर केलं आहे. ते सुरू करणं आवश्यक आहे. कारण इथल्या मजुरांना काम नाही. त्यासाठी तुमची संमती हवी आहे. तुम्हाला भूसंपादन होऊन रीतसर मावेजा मिळेलच. पण नव्या नियमाप्रमाणे ऐंशी टक्कै मायेजा आगाऊ मिळेल. मी स्वतः प्रयल करून तुम्हाला दोन महिन्यात तो मिळवून देईन. तरी आपण संमती द्यावी.' |'सर, याबाबतीत माझ्यावर घोर अन्याय झाला आहे' महादू म्हणाला, 'माझी अशी माहिती आहे की, या पाझर तलावाची अलाईनमेंट बदलण्यात आली आहे. त्यामुळे माझी पूर्ण जमीन बुडीत क्षेत्रात जातेय. मूळच्या अलाईनमेंटमध्ये केवळ अर्धा-पाऊण एका जाईल, त्यासाठी माझी आजही तयारी आहे; पण या सरपंचाने - दाजिबा पाटलानं त्या डेप्युटी इंजिनिअरशी हातमिळवणी करून चण अलाईनमेटच बदलून टाकली आहे. त्यामुळे त्याची जमीन याचते व माझी पूर्णपणे जाते, हा घोर अन्याय आहे माझ्यावर.' तहसीलदार व बी.डी.ओ. दोघेही अवाक् होऊन महादूकडे पाहात राहिले. ताइकनु उठत दाजिबा म्हणाला, 'हे-हे समदं झुट हाय साहेब, यो कांबळे झूट बोलतोया. अलाईनमेंट विजेनिअर साहेब करतात, ती मयासाठी ते कानून बदलतील ? तुमास्नी तरी ते खरं वाटेल? तुमीच बोला साहेब, हे आक्रीत नाय वाटत?” 'कांबळे... बी. डी. ओ म्हणाले, हे खरं नाही वाटत. अशी अलाईनमेंट बदलून डेप्युटी इंजिनिअरला काय मिळणार आहे?' 'ते मी सांगायला हवं साहेब?" महादू म्हणाला. मग तो तहसीलदाराला उद्देशून म्हणाला, 'सर, तुम्ही तरुण आहात. डायरेक्ट मामलेदार झालेले आहात, ' म्हणून न्यायाची अपेक्षा करतोय मी तुमच्याकडून. मी पूर्ण जबाबदारीनं बोलतो आहे, खरंच असा प्रकार घडला आहे. तुम्ही चौकशी केली तर तुम्हाला ते दिसून येईल, ' असं मला वाटतं. माझं म्हणणं बरोबर असेल तर न्याय करा, चूक असेल तर तुशाल । जमीन घ्या.' त्याच्या या स्पष्ट व निर्भीड बोलण्यानं तहसीलदाराचं मत महादूबद्दल अनुकूल । झालं होतं. असे अलाईनमेंट बदलण्याचे प्रकार होत असतात, हे त्यांना अनुभवाने ठाऊक होतं. आणि त्या संबंधित डेप्युटी इंजिनिअरबद्दल ब-याच तक्रारी होत्या. पण पाणी! पाणी! / २४ । ही बाब पूर्णतः तांत्रिक असते. त्यासाठी पुन्हा सर्व्ह करणा-या त्याच डेप्युटी इंजिनिअरला विचारावं लागणार. पण तो हे कधीच कबूल करणार नाही, हेही उघड होतं. तेव्हा रोजगार हमी शाखेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यकारी अभियंत्यामार्फत तपासणी करून घ्यावी लागेल... । तहसीलदार काही न बोलता विचारात गर्क झाले होते. पण या साच्या बाबीत फार वेळ जाणार होता. तोवर रिकाम्या हातांचं काय? हा प्रश्न होता. तहसीलदारांना ती चिंता होती. कारण या भागात शेतकरी - शेतमजूर पंचायत प्रबळ होती. त्यांच्यामार्फत मजुरांनी लेखी अर्ज विहित नमुन्यात करून काम मागितलं तर कुठलं द्यायचं ? ही अवघड समस्या होती. जवळपासच्या आठ किलोमीटर परिसरात दुसरं कोणतंही काम तातडीने उपलब्ध होण्यासारखं नव्हतं! म्हणून हे काम सुरू होणं गरजेचं होतं, त्याचा हा असा वांधा झाला होता. महादेव कांबळे हा खरंच बोलत असावा हे तहसीलदारांना जाणवत होतं, पण ते चौकशीत सिद्ध होईल का? मूळच्या सर्व्हेक्षणाची कागदपत्रे तर डेप्युटी इंजिनिअर ठेवणार नाही - कंटुरमॅपप्रमाणे पुन्हा इतर यंत्रणेमार्फत सर्व्ह करावा लागेल... | ‘साहेब, ह्यो कांबळे तुमास्नी येड पांघरून पेडगावला नेत हाय...' दाजिबा म्हणाला. 'म्याबी म्हंतो, हून जाऊ द्या, तुमी चवकशी करा....' त्याने थंड डोक्यानं विचार करीत महादूचं आव्हान स्वीकारण्याची घोषणा केली. त्याचाही हिशोब तहसीलदारांच्या विचाराप्रमाणे होता ! | काहीच निर्णय न घेता तहसीलदार व बी. डी. ओ. जीपमध्ये बसून निघून गेले. महादूही उपस्थित गावक-यांकडे पाहात घरी परतला. | पण दाजिबानं गावक-यांना थांबवून धरलं व महादू दृष्टिआड झालेला पाहून तो मधाळ स्वर पेरीत बोलू लागला, | ‘म्हटलं हाय ना, चोर तो चोर, वर शिरजोर... महादूची तीच गत हाय बाबांनो. तेस्नी मिलिटरीची लई ढोस हाय. पन तुमीच बगा, माजी सीलिंगची जिमीन निघाली, ती महादूला मिळाली, आजून दोघांना मिळाली... त्या मी मनात आणलं अस्तं तर रोकू शकलो असतो, कोर्टकचेरी करता आली असती, पण म्या नाय तसं केलं... असा हा दाजिबा आपुली सोताची जिमिन वाचावी म्हणूनशानी असं वंगाळ काम करेल? छ्या छ्या, नाय बाबांनू नाय, म्या असं करेन तर माह्या सात पिढ्या नरकात जातील... महादू झूट बोलतोया...' त्याच्या समोर हातांना काम नसल्यामुळे व पोटाला फाके पडू लागल्यामुळे समस्त गावकरी होते. ‘अलाईनमेंट बदलणं व पाझर तलावाची साईट सरकावून घेणं' या तांत्रिक बाबी, जाणान्या होत्या हे धूर्त दाजिबा जाणून होता, म्हणून त्याला स्पर्श न करता त्यांच्या काळजाला हात घालीत तो पुढे म्हणाला, | ‘तुम्ही आमचे मायबाप मतदार - तुमच्या जीवावर तर म्या सरपंच झालो... म्या तुमच्याशी कदी सुदीक बेइमानी करणार नाय... आता खरा सवाल हाय तुमास्नी काम देण्याचा... मला तुमीच सांगा, योका माणसाच्या आडमुठेपणापायी साठ-सत्तर लढवय्या /२५ मजुरांना मंजुरी मिळत नाय. चारीचं कुपन मिळत नाय.. योच खरा अन्याय हाय... तो तुमी चालू देणार ? - नाय, शाप नाय -! या - या महादूला लई ढोस चढलीया... तेस्नी चांगलाच धडा शिकवाया हवा-'। सारे उपस्थित गावकरी त्याच्या प्रभावाखाली आले होते आणि दाजिबाने त्यांच्याकडून खुबीनं महादूला धडा शिकवण्यासाठी त्याच्यावर सामाजिक बहिष्कार : टाकण्यासाठी कबूल करवून घेतलं होतं ! | आणि गावक-यांचा महादूवर अलिखित सामाजिक बहिष्कार सुरू झाला. दोन दिवस महादूला त्याची जाणीव झाली नाही. पण गिरणीत पीठ आणण्यासाठी शेव्हा त्याचा मुलगा गेला, तेव्हा गिरणीवाल्यानं त्याला शिव्या हासडून परत पाठवल, तर पाणवठ्यावर आवडाशी कोणी बोललं नाही. महादू स्वतः जेव्हा गावातल्या एकमेव किराणा दुकानात सामान आणायला गेला, तेव्हा दुकानदारानंही त्याला सामान दिल नाही. तेव्हा तो खवळला आणि थेट सरपंचाच्या घरी गेला आणि गरजला, | ‘सरपंच, हे बरं नाही. हा असा सामाजिक बहिष्कार टाकणं हा कायद्यान गुन्हा आहे. मी जर लेखी तक्रार केली तर तुमच्यासह सर्वानाच त्रास होईल व गंभीर परिणाम होतील...' | झोपाळ्यावर मंद झोके घेत सरपंच तंबाखू दाढेखाली धरून बैठकीत बसलेल्या गावक-यांशी व ग्रामपंचायत सदस्यांशी बोलत होते. क्षणभर त्यांनी थंडपणे महादूकई व उपस्थितांकडे पाहिलं व मग शांतपणे म्हणाले, 'अरे बाबा महादू, म्या नाई सांगितलं बहिष्काराचं. म्या सोता त्याच्या इरुद्ध हाय... म्या सरपंच हाय, कायदाकानून ठाव हाय मला. म्या असं कसं करेन? या नाय टाकला तुझ्यावर बहिष्कार....!' आणि क्षणभर थांबून नाटकी स्वरात म्हणाले, 'अरे बाबा, असा उभा का? ये, असा बस - माझ्या शेजारी - वकळ जाग हाय झोपाळ्यावर.... कारभारी, जरा च्या सांगा- वीरचक्नवाले महादेव कांबळे आल हाईत... महादू - ये बाबा, असा ये जवळ ...." | महादू त्यांच्या या पवित्र्यानं सर्द झाला होता. चार लोकांदेखत सरपंचान त्यांना आपल्या शेजारी झोपाळ्यावर जागा देऊ केली होती, चहाचा आग्रह केला होता आणि समोर उपस्थितांमध्ये काही दलितही होते. हा सारा बेत दाजिबानं व्यवस्थितपण जुळवून आणला असणार, यात काही शंका महादूला उरली नव्हती. | ‘महादू, दोन दिस म्यादी इयं नव्हतो.... गाववाल्यानं असा सामाजिक बहिष्कार टाकायला नाय पायजे... म्या सा-यांनी सांगतो - तुला काई तरास होणार नाय... बहिष्कार टाकला असेल गाववाल्यांनी, तर तो आग उठेल... म्या त्येंना हात जोडून इनंती करेन बाबा तुझ्यासाठी. तू आमच्या गावची शान हायेस- धीरचक्र मिळाल हाय ना तुवास्नी... तोवर तुला मीठ - मिर्ची देतो - कारभारी, ज्वारीचं पीठ द्या बांधून महादूला... अन् त्या गिरणीवाल्या जावयाला सांगावा धाडा- म्या बोलवलंय म्हनून..." महादू - मी तेला व दुकानदाराला सांगेन...' पाणी! पाणी!! | २६ महादू हतबुद्ध होऊन परतला. परतताना त्याला दाजिबानं हलकेच टोकलंसुद्धा 'जरा इचार कर बाबा - गावापुढे कुनाचं चालतं ? तेस्नी काम पायजे. म्या तुजी भावना जाणतो - समदी जिमीन जाणं लई दुख देणारं हाय - पन कोशीश करून तुवास्नी जादा किंमत - जादा पैका मिळवून दीन ... पन संमती दे बाबा... उभ्या गावाशी दावा करून जगणं मुश्किल हाय....!' आता मात्र वेळ गमावून चालणार नव्हतं. काहीतरी केलंच पाहिजे. महादू विचार करीत होता. त्यानं सरळ कलेक्टरांना जाऊन भेटायचं ठरवलं. त्या दिवशी कलेक्टर घरीच होते. बरीच वाट पाहून महादूनं त्यांना घरीच जाऊन भेटायचं ठरवलं. कारण जिल्ह्याला एक चक्कर म्हणजे पन्नास रुपयांचा चुराडा व्हायचा. पुन्हा येणं अवघड व खर्चाचं होतं ! कलेक्टरांनी अनिच्छेनंच त्याला भेटायची परवानगी दिली. । त्यानं कलेक्टरला एक कडक सॅल्यूट ठोकला. 'अरे, तू सैन्यात होतास?' 'होय सर, मी महार रेजिमेंटला होतो आणि एकाहत्तरच्या युद्धात मला वीरचक्र मिळालं आहे.' ‘म्हणजे तू लान्सनायक महादेव कांबळे ना?' ‘होय सर, पण तुम्हाला कसं माहीत?' 'अरे मीही सैन्यात कमिशन घेतलं होतं. मीही मेजर होतो बाबा." पाहता पाहता कलेक्टर मोकळे झाले. त्या जिल्ह्यात वीरचक्र मिळवलेला महादू एकमेव होता, हे सैन्यात मेजर म्हणून काम केलेल्या व नंतर डेप्युटी कलेक्टर म्हणून भरती झालेल्या, पदोन्नतीनं आज या जिल्ह्यात कलेक्टर म्हणून आलेल्या त्यांना माहीत होतं ! 'बोल कांबळे, काय काम काढलंस?' ‘सर, माझ्यावर अन्याय झाला आहे, त्याविरुद्ध दाद मागायला आलो आहे. सर.' महादू म्हणाला, 'मी गावच्या सरपंचानं केलेल्या अन्यायाविरुद्ध लढत आहे. आपल्या आर्मीची शिकवण आहे - मी लढवय्या आहे सर.' | 'येस - येस् - वुई आर्मी पीपल आर ऑलवेज फायटर...' मला तुझी जिद्द आवडली कांबळे. | महादूनं सारी हकीकत सांगितली, तसे कलेक्टर गंभीर झाले. “तू सांगतोस ते खरं असेल तर मी जरूर लक्ष घालतो. उद्याच मी माझ्या रोजगार हमीच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरला तपास करायला सांगतो, त्यांना गावी इन्स्पेक्शनला पाठवतो. तुझ्यावर खरोखर अन्याय झाला असेल तर तो निश्चितपणे दूर करीन मी!' | कलेक्टरांनी आपला शब्द पाळला. महादू खराच होता, म्हणून त्याची जमीन बुडीत क्षेत्रात जाणा-या पाझर तलावाची जागा दिलून मूळ अलाईनमेंटप्रमाणे ज्यात दाजिबाची पंधरा एकर जमीन जात होती, या पाझर तलावाला मंजुरी देण्यात आली. लढवय्या / २७ आता दाजिबानं वेगळाच पवित्रा घेतला, ‘काय सांगू बाबानू, ह्यो महादू धेड... आन कलेक्टरबी त्येच्याच जातीचा - दोगे योक झाले! या नव्या आदेशापरमाने पाझर तलाव झाला तर सरकारचा खर्च जादा व्हईल, पन तेचा गावास्नी कायसुदिक फायदा व्हनार नाय. योक महादूची जिमीन सोडली तर गाववाल्याला कायबी फायदा नाय. उगीच आपुन बोरगावचं धन कानून करायचं? ...आणि त्यानं आपली जमीन पाझर तलावासाठी देण्यासाठी नकार दिला, तेव्हा कलेक्टरांनी आपल्या अधिकाराचा वापर करून तातडीने जमिनीचे त्वरित अधिग्रहणाचे - रिक्विझिशनचे आदेश दिले. पण हिकमती दाजिबानं धावपळ करून हायकोर्टातून स्थगिती आदेश मिळवला. | ‘पाहिलंत गावक-यांनो, इतरांनी जमीन द्यावी असं सांगणं किती सोप अत: पण आपल्यावर पाळी आली की कोर्टबाजी पण करायची. ह्या दाजिबाकडे शंभर सव्वाशे एकर जमीन आहे, त्याची दहा - पंधरा एकर जमीन गेली तर काय बिघड आहे? - पण नाही, तेव्हा मारे सांगत होता - गावासाठी, गावच्या विकासासा माणसानं त्याग करावा - मजुरांना काम मिळावं, त्यांचे हाल कमी व्हावेत म्हणून ' सोसावी वगैरे वगैरे ! आता जा त्याच्याकडे व त्याला जाब विचारा...' | महादूनं गावक-यांना सडेतोडपणानं सांगितलं. तेव्हा आधीच दुष्का- करपून गेलेले व हात रिकामे राहिल्यामुळे रिकाम्या पोटाचे मजूर भडकले. १ मोचन जाऊन सरपंच दाजिबा पाटलाला जाब विचारला व पाझर तलावाचे काम होण्यासाठी त्यानं जमीन द्यावी, अशी मागणी केली. असा प्रसंग कधीतरी येऊ शकतो हे धूर्त दाजिबाला माहीत होतं व त्यासा त्यानं कावेबाजपणानं उपाययोजनाही करून ठेवली होती. | ‘माझ्या गाववाल्यांनो - म्या जानतो की यामागे त्यो महादू हाय ते. तुम्हास्नी समजत नाही. बापहो, तुमचे हात आन पोटबी रिकामं हाय, हे र म्हनूनशानी मला वळखता येत नसेल तर म्या नालायक हाय असं म्हना ला म्या कोर्टात गेलो, पण कोर्टानं स्टे कामून दिला? इचार करण्याजोगी बाब । कोर्टाला वाटलं की, मह्यावर अन्याय झाला हाय... एवढं भारी हाय औरंगाबादचं. लई इचार करून स्टे दिला असेल नव्हं? आता, त्यो म्हादू जमीन द्याया खळखळ करतो? झूट - सम्दं झूट -! याचं योकच परमाण दुसरं रोजगार हमीचं काम मंजूर करून आणलं हाय. सडकेचं हाय, त्यात माग जात हाय. ती जिमीन मी फुकट दिली हाय सरकारला दानपत्र करूनशाना: तुमीच न्याय कराया हवा मायबापहो. माजं मन साफ हाय. तुमास्नी काम म्हनूनशानी है सम्दं केलं. उद्यापासून सडकेचं काम सुरू होईल, चांगले दान महिने सान्यांना काम मिळेल - तोवर मंग बरसात हुईल...' Jळानं कले. त्यांनी साठी हाय, हे सरपंच गी बाब हाय ही. री हायकोर्ट ते चाकच परमाण देतो - म्या हाय, त्यात माजी जिमीन पत्र करूनशानी... आता उभास्नी काम मिळावं चांगले दोन - अडीच पाणी! आणी!! / २८ जाब विचारायला आलेला तो जनसमुदाय सरपंचाचा जयजयकार करीत व आपली जमीन दानपत्र करून सडकेचं काम उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांना दुवा देत निघून गेला. | मंदपणे झोपाळ्यावर बसून झोके घेत व आपल्या मिशा कुरवाळीत माघारी जाणारा तो जनसमुदाय पाहात स्वतःशीच दाजिबा पुटपुटला, ‘मूर्ख लेकाचे, खरं हाय - दुनिया झुकती है, बस् झुकानेवाला चाहिये!' | या नव्यानं मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामामुळे दाजिबाच्या बारा एकरच्या ‘शेंद्री' या नावाने ओळखल्या जाणा-या बागायती जमिनीच्या तुकड्यापर्यंत बारमाही पक्का खडीचा रस्ता होणार होता. या शेतावर आजवर ट्रक वा दुसरी वाहनं पांदणीमुळे व दलदलीमुळे जाऊ शकत नव्हती. त्यामुळे तिथला ऊस तोडून मोळीनं अर्धा किलोमीटर अंतरावर मजुरांकरवी आणावा लागत होता. तो जादा खर्च आता कमी होणार होता. हे गावक-यांच्या लक्षात आलं नव्हतं. ते हातांना काम, मजुरी आणि धान्य मिळतंय यातच खुश होते ! आपल्यावरचं संकट टळल्यामुळे महादूनंही त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. आता त्याची फळबाग चांगलीच वाढली होती, विकसित झाली होती. आणखी दोनेक वर्ष निसर्गानं चांगली साथ दिली तर शेतावर विहीर घेता येईल व पूर्ण क्षेत्र बागायत करता येईल, याची त्यानं स्वप्नं पाहायला सुरुवात केली! पण दाजिबानं त्याला पुन्हा चांगलाच तडाखा दिला. कलेक्टरांची काही दिवसांनी बदली झाली व नवीन डायरेक्ट आय. ए. एस. असलेले बिहारी असलेले तरुण कलेक्टर आले. त्यांना दाजिबानं भेटून आपल्यावर झालेल्या अन्यायाची कहाणी तिखट - मीठ लावून सांगितली, वर साखरपेरणीही केली, = == 'काय सांगू सायेब, तुमी डायरेक्ट आय. ए. एस. कलेक्टर. मागचे तसे नव्हते. पुना ते पडले महादूचे जातभाई - हे लोक एकच असतात. त्यामुळे मह्यावर घोर अन्याव झाला सायेब.' नव्या कलेक्टरांना थेट निवड झालेल्या आय. ए. एस. अधिका-यांप्रमाणे पदोन्नतीने आय. ए. एस. झालेल्या अधिका-यांबद्दल जसा सूक्ष्म आकस व तुच्छता असते, तसा आकस व तुच्छता होतीच. पुन्हा ते बिहारी खत्री जमातीचे. त्यांच्यात उच्चवर्णीयांचा दर्पही होता. त्यांनी फारसं खोलात न जाता दाजिबाची जमीन बुडीत क्षेत्रात जाणा-या पाझर तलावाचे आदेश रद्द केले व नव्या अलाईनमेंटप्रमाणे - ज्यात महादूची पूर्ण जमीन जात होती - त्या तलावाचे नव्याने आदेश दिले ! | हा घाव जिव्हारी होता. महादूला तो घायाळ करून गेला. पण मूळच्या . लढवय्या असलेल्या महादूनं पुन्हा त्याच तडफेनं प्रयत्न करायचं ठरवलं !! | पण हे नवीन कलेक्टर त्याचं काही ऐकून घ्यायला तयारच नव्हते. जिल्हा सैनिक बोर्डाच्या अधिका-याची मध्यस्थीही असफल ठरली. पुन्हा मिलिटरीवाल्या लढवय्या /२९ कलेक्टरांच्या आदेशाप्रमाणे ज्यांनी स्थळ पाहणी करून महादूची जमीन जाणा-या पाझर तलावाची अलाईनमेंट चुकीची आहे असा अहवाल दिला होता, ते रोजगार हमी शाखेचे कार्यकारी अभियंताही सेवानिवृत्त झाले होते, तर ज्यांनी मूळचा सर्व्हे व अलाईनमेंट बदलली, ते जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाचे उपअभियंता बढती मिळवून कलेक्टर कचेरीतच रोजगार हमी विभागात कार्यकारी अभियंता म्हणून रुजू झाले होते. त्यांचा ताजा अहवाल महादूच्या विरुद्ध व दाजिबांच्या बाजूने होता. , आता महादृच्या हाती एकच उरलं होतं. भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जमिनीची कामं करायला संमती न देणं, आणि जिल्हा व सत्र न्यायालयाच्या कोटात भूसंपादन प्रक्रियेला आव्हान देऊन 'जैसे थे' चा आदेश मिळवणं; पण वकिलांची फा परवडणारी नव्हती, म्हणून अजूनही महादू त्या दिशेनं गेला नव्हता ! यावर्षी रबीची पिके हातची गेल्यामुळे फेब्रुवारी - मार्चपासूनच रोजगार हमीच्या कामाची मागणी सुरू झाली. पुन्हा तहसीलदारांचा प्रयत्न, महादूचा ठाम नकार आणि मग तातडीने भूसंपादनाची सुरू झालेली कार्यवाही... दाजिबानं पुन्हा महादूवर दबाब यावा आणि तो कोलमडून पडावा म्हणून पुन्हा त्याच तंत्राचा व अस्त्राचा वापर केला. मजुरांचा मोर्चा त्याच्या घरावर नेण्या आला व त्यानं राजीखुशीनं जमिनीची संमती लिहून देऊन पाझर तलावाचं काम सुरू नाही करू दिलं तर त्याला गावक-यांच्या सामुदायिक बहिष्काराची धमकी देण्यात आली. महादू संमती देणं शक्य नव्हतं, तेव्हा गावक-यांनी त्याच्याविरूद्ध बहिष्कार पुकारला. त्यानं तहसीलदारांकडे धाव घेतली. पण तेही आता बदलले होते. हे पहा कांबळे, कुठली गोष्ट किती ताणावी यालाही काही मर्यादा असते ! दोनदा पाझर तलावाची अलाईनमेंट बदलली, या साया तांत्रिक बाबी असतात. पण अस वाट की, तुम्ही राईचा पर्वत करीत आहात. ठीक आहे, तुमची संमती नाही म्हणून याव पाझर तलावाचं काम होऊ शकणार नाही; पण भूसंपादनाची कार्यवाही सुरू झाल आहे. पुढील वर्षी रीतसर जमीन ताब्यात येईलच, तेव्हा तुम्ही काय कराल? कोटेबाजा हायकोर्टाचा स्टे? तो तुमचा अधिकार आहे कांबळे; पण यामुळे काम नसल्यामु उपाशीपोटी मजुरांनी तुमच्याशी चिडून जाऊन असहकार पुकारला तर त्यांना का म्हणून दोष द्यायचा? मी त्याला जातीयवादी दृष्टीने घातलेला सामाजिक बहिष्का म्हणणार नाही.' सुन्न होऊन महादू ऐकत होता. 'तुम्ही म्हणत असाल तर मी तुमची तक्रार ठेवून घेतो. गावातही येता, लोकांना समजावून सांगतो. त्यांनी ऐकलं नाही, बहिष्कार उठवला नाही तर पाल कार्यवाही पण करीन. तुम्ही बोट दाखवाल त्या एकेका व्यक्तीला अटक करायला Kी पाणी! पाणी!! | ३० पोलिसांना सांगेन.... पण तुमचं काय? तुम्ही गावापासून अलग पडाल आणि अलग पडून - फटकून तुम्ही जगू शकाल?' | टी.व्ही.वर पाहिलेल्या 'महाभारत' या मालिकेतील चहुबाजूंनी कौरवांनी घेरलेल्या व कोंडी झालेल्या अभिमन्यूची महादूला आठवण झाली. आपलीही आज तीच अवस्था झाली आहे. अभिमन्यू तर खैर मरून गेला, पण आपल्याला मरताही येत नाही. हे जिवंत सामाजिक मरण त्याहून भयंकर आहे. ‘साहेब, सैन्यात महार रेजिमेंटचं नाव गौरवानं घेतलं जातं; कारण त्यांचा इतिहास हा पराक्रमाचा - लढायांचा व देशप्रेमाचा आहे ! तेथे महार हे आदरार्थी नाव आहे, पण इथं माझ्या गावी, भारतातील खेड्यात ती शिवी आहे, शाप आहे. तो शाप वाहातच रोज थोडं थोडं मरत का होईना जगायचं आहे. पण... पण मी लढवय्या आहे तहसीलदार साहेब. मी लढणं जाणतो - हार-जितीची पर्वा नाही करत ! आणि ही हरणारी लढाई आहे, तरीही लढेन...' संतापानं आणि वेदनेनं महादूचा आवाज थरथरत होता. त्याचा कणखर लष्करी देहपण कापत होता. | ‘शांत व्हा कांबळे, शांत व्हा. मी तुमची भावना समजू शकतो. पण तहसीलदार म्हणून रोजगार हमीचं काम पुरवणं माझं कर्तव्यच आहे. त्यासाठी...' ‘पुरे साहेब, तुमच्या दिलाशाची मला आवश्यकता नाही. स्वतःला सावरीत घसा खाकरत महादू म्हणाला, ‘सीमेवर लढताना जीव झोकून लढायची सवय आहे या सैनिकाला साहेब. तिथं काश्मिरात - सायचीनमध्ये लढताना देशावरून जीव ओवाळून टाकला होता - या देशातील लोकांच्या सुरक्षेसाठी. आज मी माझी जमीन ओवाळून टाकीत आहे - मजुरांना काम मिळावं म्हणून! कारण त्यांच्याशी माझं भुकेचं नातं आहे ! पण या दाजिबासारखे घरभेदी - लोकांचे शत्रू आहेत, त्यांच्याविरूद्ध मात्र मी लढत राहीन. कारण तेही एका अर्थानं देशाचे शत्रूच आहेत. त्यांच्याविरूद्ध लढणं हा माझा धर्म आहे. मी लढत राहीन - हार - जितीची पर्वा न करता; कारण मी लढवय्या आहे साहेब, लढवय्या...!' 017 लढवय्या / ३१

  • 2 ३. बांधा

ती आता लख्ख जागी आहे, पण उठायला मन होत नाहीय. डोळे चुरचुरताहेत... काल रात्री झोप अशी लागलीच नाही. ती ग्लानी होती. डोळे जडावून विसावले होते एवढंच. | अंग कसं जडशीळ झालंय... मनाप्रमाणे साच्या शरीरातही एक अनिच्छा, एक विमनस्कता भरून आहे... गजराने मोठ्या प्रयासानं जडावलेले दुखरे डोळे उघडले. चांगलं फटफटून आलं होतं! आता उठायला हवं... घरचं सारं व्हायचं आहे...। | आणि ते करून रोजगार हमीच्या कामावर जायचं आहे... शरीराला आळोखेपिळोखे देत गजरा उठणार तोच हणमंताचा तिच्या शरीराभोवती हात पडला आणि झोपेतच त्यानं तिला कुशीत ओढलं... तीही तेवढ्याच सहजतेनं त्याच्या मिठीत शिरली... खरं तर काल रात्रीला रंग कसा तो चढलाच नव्हता. तो असमाधानी, ती बेचैन. तारा न जुळलेल्या त्या खोलीत रात्रभर ती एक ठसकी वेदना घेऊन तळमळत होती, तो मात्र कूस बदलून बिनघोर झोपी गेला होता. । एक अनाम बेचैनी गजराला स्पशून गेली आणि झटक्यात तिनं तिच्याभोवती पडलेला हणमंताचा कणखर हात बाजूस सारला... आणि उठून ती खिडकीजवळ बांधा / ३३ गेली. खिडकी उघडताच पहाटेचा थंड वारा तिच्या उतरलेल्या व ताठरलेल्या चेह-याला स्पर्श करून गेला. त्या ताजेपणानं ती सुखावली... | परसदारी जर्सी गाय संयपणे रवंथ करीत होती. तिच्या पुढ्यात मागल्याच आठवड्यात तगाई म्हणून मिळालेला वनखात्याचा चिपाड झालेला शुष्क चारा होता. पहिले दोन दिवस तर गाईनं त्याला तोंडही लावलं नाही. पण भुकेपोटी आता तिनं तोही गोड मानला होता... संथपणे ती त्या वाळक्या चा-याचं रवंथ करीत उभी होती! | किती वाळली होती ही गाय ! दोन वर्षापूर्वी ती चव्हाणाच्या गोठ्याची शान होती. दररोज पाच ते सहा लिटर दूध देणारी; पण दुष्काळाच्या अस्मानी संकटाने तिची पार रया गेली होती. आता तिची सारी हाई उठून दिसत होती... एकदम चिपाई झाली होती... शहरी विचंयानं नांगी मारताच वेदनेचा जाळ हावा, तशी गजरा मनोमन विव्हळून उठली. तिच्या मनात कसले कसले विचार येत होते, की त्यांच्या स्वैरपिसाट गतीचा आवेग तिला पेलवेना. एका तिरमिरीत ती पुढे झाली आणि खिडकी बंद केली. वळून भिंतीवरचा विरलेला छोटा आरसा हातात घेऊन आपलं शरीर वेगवेगळ्या कोनातून निरखू लागली... तिच्या कानात पुन्हा एकदा हणमंताचे रात्रीचे बोल घुमू लागले, 'गजरे, काय अवस्था करून घेतलीस जरा पहा - हाई हाई लागताहेत नुसते ... मजा नाही येत पूर्वीसारखी... ती जर्सी गाय आणि तु दोधीपण हाइकलात...' आणि त्यानं तिला दूर सारलं होतं ! | तिच्या हातून आरसा गळून पडला. फुटायचाच तो, पण खाली तिनं दूर केलेलं पांघरूण होतं, म्हणून बचावला एवढंच ! तिची नजर हणमंताकडे गेली. संथ लयीत तो घोरत होता. अंगावर फक्त लेंगा होता. त्याची उघडी, भरदार केसाळ छाती श्वासाच्या लयीनं खालीवर होत होती. त्या छातीत स्वतःचे मस्तक घुसळीत तो पुरुषी दर्प श्यासात खोलवर ओढून घेणं ही तिच्या सुखाची परमावधी होती ! पण आजचा दिवस वेगळेच रंग घेऊन आला होता. त्याचे कालचे काळजात घाव घालणारे बोल अजूनही तिच्या कानात घुमत होते. त्यामुळे त्याचं उघडं, पीळदार शरीर पाहून नेहमी रोमांचित होणारी गजरा आज कड़वटली होती. त्याच्या लेखी तिचं वळसेदार शरीर एवढंच सत्य होतं. त्या सुडौल देहात स्त्रीत्वाची भावना असलेलं तिचं स्त्रीमन त्याला कःपदार्थ होतं !... लग्नानंतर आठ वर्षानी गजराला हे प्रकर्षानं प्रथमच जाणवत होतं. त्याच्या लेखी ती व जर्सी गाय पाणी! पाणी!! / ३४ दोन्ही हाडकल्यामुळे निकामी ठरल्या होत्या, हेच सत्य त्यान काल रात्री बोलताना ठसठशीतपणे अधोरेखित केलं होतं. तिच्या मनावर मणामणाचे ओझे दाटून आले होते. जीवाच्या कराराने पाझरण्याच्या सीमेपर्यंत पोचलेले आपले डोळे ती कोरडे राखायचा प्रयत्न करीत होती. कारण जो दिवस कष्ट व श्रमाची एक प्रदीर्घ वाटचाल घेऊन आला होता, त्याची सुरुवात अशी पाझरलेली गजराला परवडणारी नव्हती. चव्हाणांच्या त्या गढीसमान वाड्याची झाडलोट, अंगणसडा, सर्वांचं चहापाणी, मग भाकया थापणं... कितीतरी कामं तिला यंत्रवत गतीनं उरकायची होती. तीन वर्ष सतत दुष्काळाच्या तडाख्यानंतर वाड्यावरचा गडी व बाईमाणूस तिनंच कमी केले होते. त्यामुळे वरकडीची सारी कामे तिलाच पाहावी लागत होती. आणि हे सारं करून दोन किलोमीटरवर चालू असलेल्या रोजगार हमीअंतर्गत पाझर तलावाच्या कामाला तिला साडेआठच्या ठोक्याला हजेरी लावायची होती... | पाच वर्षांपूर्वीची गोष्ट. अमाप पिकलेल्या उसामुळे जेव्हा वाड्यात लक्ष्मी प्रसन्नतेनं संचारत होती, तेव्हा हणमंतानं हौसेनं तिला शहरातून घड्याळ आणलं होतं - स्वयंचलित आकड्यांचं. त्याच्या जोरावर ती कामावर वक्तशीर पोचत असे. पण त्यामुळे सुरुवाती सुरुवातीला तिची प्रचंड टिंगलही झाली होती. तो हलकट मुकादम तिला फिदीफिदी हसत म्हणायचा, 'तालेवाराची बाई तू - घड्याळ लावून कामावर येतेस! कशाला उगीच एका जीवाचा रोजगार बुडवतेस ?...' खानदानी मराठा संस्कारात वाढलेल्या गजराला ते मनस्वी लागायचं. पण परपुरुषाशी फटकन काही बोलावं हा तिचा स्वभावच नव्हता. तेव्हापासून तिनं ते घड्याळ वापरणंच सोडून दिलं होतं! पण घरातून आठ ते आठ पाचला निघायचं, हा तिचा परिपाठ होता, ज्यायोगे ती कामावर वेळेवर पोचायची... पण रोज सकाळी आठाकडे झुकणारे ते घड्याळाचे काटे पाहिले की, तिला वाटायचं - हे घड्याळ उचलून फेकून द्यावं. नको ती धावपळ, नको ते कामावर जाणं आणि नको ते उरस्फोडी काम... ज्यामुळे शरीर सुकत चाललेय... मांसलता कमी होत चाललीय... । ‘धनी.. ते काय बोलून गेलात तुम्ही ?' तिच्या मनावर उठलेला हा दुसरा ओरखडा. 'जीव कसनुसा झाला बघा. पण तुम्हास्नी काय हो त्याचं ? आपलं पाठ फिरवून खुशाल घोरत पडल्यावर कसं कळावं ? गरीब ग्रामसेवकाची पोर असले तरी पण माहेर खानदानी आहे धनी. तिथली पण रीत हीच होती. घराबाहेर पडायचं ते बांधा /३५ देवदर्शनाला किंवा लगीन - हळदीकुंकवाला, पण हे अस्मानी संकट आलं आणि हे असं विपरीत झालं...' . भिंतीला लगटून गजरा किंचित ओणवी आपल्याच विचारात होती - 'मी - मी घराबाहेर पडले ते व्यंकूनं - पोटच्या गोळ्यानं भुकेसाठी रडणं सुरू केलं तेव्हा - घरी दूधच काय, पण भाकरीचा तुकडाही शिल्लक नव्हता. आणि हे धनी, तुम्हाला सांगून तरी काई उपेग झाला नसता. तुम्ही इनामदारीच्या तोयात. निसर्गाची कृपा होती - ऊस शेती होती तेव्हा हा तोरा खपून गेला. पण अतिपाण्यानं जमीन खारायली - फुटली. ऊस पिकेना. आणि मग लागोपाठ तीन वर्षे दुष्काळ, विहीर पण आटली. गतवर्षी जेमतेम हायब्रीड पदरी पडली...' चांदण्यासारख्या दाणेदार ज्वारीची पांढरीशुभ्र भाकर खाण्यास चटावलेली जीभ हायब्रीडची काळपटलेली जाड भाकरी पाहून रसना पाझरायची विसरली. पण भुकेच्या आगीनं लोचट होऊन ती त्यालाही नंतर सरायली म्हणा ! | असा हा दुष्काळाचा फटकारलेला आसूड. त्यात दुसरी विहीर खोदताना खडक लागल्यामुळे बोकांडी बसलेलं बँकेचं कर्ज. त्यांनीही ताठर धोरण स्वीकारून जमिनीचा लिलाव पुकारला वसुलीसाठी. स्त्रीधन म्हणून आलेला काळ्या आईचा पाच एकराचा तुकडा येभाव गेला, तेव्हा गजरा ओक्साबोक्सी रडली होती - पित्याचं मायेचं पांघरूण उडालं जाऊन ती जणू उघडी पडली होती... | "धनी - या अस्मानी सुलतानीनं भल्या - भल्यांची जिरली, पण तुमचे पाय जमिनीवर कधी आलेच नाहीत. कष्ट करायची, राबायची सवयच नाही तुमास्नी. त्याची लाजवी वाटते... म्हणून मला डोईवरचा पदर न घसरणा-या गणराला ऑचा मारून रोजगार हमीच्या कामावर मजूर म्हणून जावं लागलं ! घरचा धनी जेव्हा घरट्यातल्या पाखरासाठी घास कमवीत नाही, तेव्हा बाईला आपली मानमर्यादा विसरून पुढे यायं लागतं... यात माझं काय चुकलं?...' गजरा आपल्या निर्णयाबद्दल या दुख-या अवस्थेतही ठाम होती - तरीही सवाल होताच - मग हा बोल का? हा आपला बाईपणाचा अपमान का? ‘हाईहाई लागत आहेत - पूर्वीसारखी मजा येत नाही...' विरलेल्या खणाची चोळी दंडाला सैलावली होती. गुलाबी हात कामानं करपले होते, घट्ट झाले होते. डौलदार बांधाही आक्रसला होता ! है... हे बदललेलं रूप हणमंताला रुचेनासं झालं आहे ! गजरानं पुन्हा एकदा स्वतःकडे नजर टाकली... पाणी! पाणी!! / ३६ होय, मी बदललेय, माझं रूप बदललंय. हाडं चिवट झाली आहेत, शरीरात कष्टाची ताकद ठासून भरली आहे आणि त्याला वाट करून देण्यासाठी म्हणून तकलादू - श्रमाची आंच लागताच वितळणारं पोशीव मांस झडत गेलंय एवढंच... या नव्या हाडकलेल्या गजरेचा मला अभिमान वाटतो - ही मीच आहे, पण खुल्या आभाळाखाली मुक्त श्वास घेणारी - रोज दहा ते बारा रुपये कमवणारी एक उत्पादक स्त्री मजूर - कामगार ! या... या सा-याचा मला अभिमान आहे...' आपल्याच विचारात नादावलेल्या गजराला भान आलं ते सासूच्या हाकेनं. ‘सूनबाई, उठलीस की नाही ? हा व्यंकू जागा झालाय - दूध मागतोय...' लगबगीनं गजरा बाहेर आली आणि दैनंदिन संसाराच्या कष्टाची चक्रे फिरू लागली... घरची सारी कामं आटोपली, तरी हणमंता घोरतच पडला होता. त्याला उठवावं, त्याचं चहापाणी करून द्यावं, असं मनात आलं, पण वेळ नव्हता. आणि त्याच्याकडे पाहताना पुन्हा एकदा एक दुरावा उफाळून आला. एका झटक्यात ती बाहेर पडली आणि लगबगीनं कामाकडे चालू लागली. | पाझर तलावाचा निम्माअधिक बांध झाला होता. त्याच्याकडे पाहिलं की, गजराला अभिमान वाटायचा. जाणवायचं की, एक मजूर म्हणून याच्या उभारणीत माझेही श्रम सामील आहेत ! जेव्हा तो पूर्ण होऊन पाणी अडवला जाईल, तेव्हा या गावची बरीच जमीन बागायती होईल, विहिरींना पाणी वाढेल हळहळ एकच होती - बँकेनं लिलावात जो पाच एकराचा तुकडा विकला होता, तोही बागायत होत होता. पण आता त्याचा धनी वेगळा होता - | त्यांच्या गप्पा रंगत असताना मुकादम त्यांच्या समोरून गेला, पण त्यानं गजराकडे पाहिलं न पाहिल्यासारखं केलं. इतर चार बाईमाणसांप्रमाणेच ती एक... त्याच्या लुबया नजरेचा तिला तिटकारा होता, त्यामुळे त्याचं आजचं झालेलं दुर्लक्ष तिला दिलासा देऊन गेलं.. पण ते क्षणभरच. दुस-याच क्षणी सकाळपासून मनात उठलेल्या पिसाट विचारांना पुन्हा एकदा चालना मिळाली आणि ती मनस्वी घायाळ झाली... | हा मुकादम जेव्हा गजरा प्रथमच या कामावर आली, तेव्हा कसा डोळे फाडून फाडून आरपार पाहात होता... ती किती भेदरली होती! अशा परक्या पुरुषाच्या नजरेची तिला अजिबात सवय नव्हती. हा आपला घाटदार देह, हणमंताच्या अभिलाषेचा विषय, एका परपुरुषाच्या नजरेत वासना पेरतो व लाळ गाळायला प्रवृत्त बांधा | ३७ करतो याचा तिला विषाद वाटला, पण त्याकडे दुर्लक्ष करून ती काम करीत राहिली होती ! | त्या रात्री किती वेळ तरी ती हणमंताच्या कुशीत हमसून रडत होती. 'धनी, ही काय पाळी आणली वो तुमी माझ्यावर ?' "खरं सांगू गजरा, तुझं हे आजचं कामावर जाणं मला पसंद नव्हतं. मी तुला कालच म्हणलं होतं - ही आपली कामं नव्हेत. काही झालं तरी इनामदाराचं घराणं आपलं!' ‘ते नगा सांगू मला - घरात व्यंकू - आपलं एकुलते एक पोर भुकेनं रडतंय... त्याचं बोला...' 'मी आज - उद्या काहीतरी बंदोबस्त करतो पैशाचा - साले, सर्वजण चोर आहेत. एवढे त्यांच्यावर उपकार केले, पण वेळेला एकही मदत करीत नाही.' 'घनी, संकट का एखाद्यावर आले आहे? सान्यांनाच या दुष्काळाचा तडाखा बसला आहे. सायांचेच हे हाल आहेत.' क्षणभर गजरा घुटमळली, बोलायचं धाडस होत नव्हतं. तरी पण चाचरत धीर एकवटून म्हणाली, 'जो मार्ग मी पत्करलाय, तो नाही तुम्हाला जमणार ? - जोडीनं कामावर जाऊ रोजगार हमीच्या. अनेकजण तसे येतात. रोज तीन किलो धान्य मिळेल कुपनावर - हत्याला शंभरसव्वाशे रुपये पण मिळतील...' "काय म्हणतीस ? मी तुझ्यासंग रोजगार हमीच्या कामाला येऊ ? येडी का खुळी ? हा इनामदार , चव्हाणाच्या खानदानीचा मजूर म्हणून काम करील ? छुट्, ते शक्य नाही..' 'मी नाही जात ?' गजरा शांतपणे म्हणाली, “वेळवखत आला की मानपान बाजूस सारावा लागतो आणि कर्ज करण्यापेक्षा, उसनंपासनं घेण्यापेक्षा कष्ट करून रोजीनं दहा - बारा रुपयेच का होईना कमावणं चांगलं नाही का?” 'गजरे, एक दिवस कामावर गेलीस अन् चुचुरू बोलायला लागलीस ? हे तुझे भिकारडे विचार तुझ्याजवळच ठेव. मला ते पटायचे नाहीत. मी तुला कामावर जाऊ देतोय ते मोप हाय...' आणि त्यानं हा विषय तिथंच संपवून टाकला होता. हताश होऊन गजरा आपल्या नव-याकडे पाहात राहिली. हा पहिलाच प्रसंग होता, जेव्हा तिला आपल्या नव-याची मनस्वी चीड आली होती. 'असला कसला हो अट्टाहास?.. वेळवखत जाणता येत नाही.. घरी पोटचा पोर उपासमारीनं सुकलाय. पाणी! पाणी! / ३८ त्याच्या दुधाची परवड चाललीय... काही म्हणून काम करायला नको... अशा वेळी पण. मग याला पुरुष कशाला म्हणायचं? आपल्या शरीरावर हक्क गाजवतो म्हणून?' तिला वाटलं होतं... हणमंता आपलं ऐकेल. आपण जोडीनं कामावर जाऊ. म्हणजे मुकादमाची लुब्री नजर शांत होईल.. बिनधोकपणे काम करता येईल. पण छे... आपल्याकडे का पुरुष घरच्या बायकांचे ऐकतात... हा आपला नवरा तर शहाण्णव कुळीचा.. तो कसा ऐकेल? आपल्या मनातले बंडखोर विचार तिला पेलवेनात. तेव्हा प्रयत्नपूर्वक ते तिला मनाआड करावे लागले होते. पण आज तीन महिन्यानंतर पुन्हा तसेच विचार मनात येत होते आणि पुन्हा एकदा मन शिणत होते ! कामाची तपासणी करून इंजिनिअर साहेब गेले आणि कामाला सुरुवात झाली. गजराही आपल्या नॅगमध्ये काम करू लागली. पुरुष - गडीमाणसं माती खोदीत होती व टोपल्यातून ती माती भरावावर स्त्री मजुरांमार्फत टाकली जात होती... आता कामाला गती आली होती. उन्हं वाढत होती, त्याचे चटके बसत होते. अगं घामेजली होती; पण पदरानं घाम पुशीत काम अव्याहत चाललं होतं... दुपारी जेवायची सुट्टी झाली, तेव्हा झाडाखाली आपल्या मैत्रिणीसोबत गजरानंही भाकरीची पुरचुंडी सोडत जेवायला सुरुवात केली. भरपूर घाम गाळल्यानंतर हायब्रीडची भाकरीही आताशी गोड वाटत होती !... ती खुदकन हसली.. आपण बदलत आहोत... शरीरानं आणि मनानंही. शरीरानं जास्त चिवट, अधिक कणखर. मनानं बंडखोर व विचारी. पुन्हा एकदा ती सल ठसठसू लागली... मुकादम आता आपल्याकडे पहिल्यासारखं अभिलाषी नजरेनं पाहात नाही. का? या प्रश्नानं ती बावरली आणि कानात त्याच वेळी हणमंताचे ते बोल घुमू लागले. आता आपण पूर्वीसारखे आकर्षक राहिलो नाहीत?... देहाची पुष्टाई व गोलाई कष्टाच्या कामानं कमी झाली आहे हे खरं.. त्यामुळे का आपलं स्त्रीत्व.. बाईपण अनाकर्षक होतं? हा पुरुषी कावा आहे.. त्यांचा विकृत ओंगळ दृष्टिकोन आहे. बाईमाणूस म्हणजे फक्त तिचं शरीर? त्यातलं मन, त्या मनाचं प्रेम .. निष्ठा काहीच नाही? हणमंता हा आपल्या कुंकवाचा धनी. सारं काही आपण त्याला दिलं. हे शरीर तर त्याच्या हक्काचं आहे, पण हे मनही त्याला दिलं. त्याचं धन्याला काहीच अनुप नाही! बांधा / ३९ आपल्या शरीरातला बदल त्याला जाणवला, पण मनातला केव्हा जाणवणार? ज्या क्रमानं शरीर झडत गेलं, त्याच क्रमानं मन उन्नत होत गेलं. अनुभवाच्या शाळेत शिकता शिकता, रोजगार हमीच्या कामावर मुक्त श्वास घेता घेता खूप काही समजून येतंय आणि मनात नाना प्रश्न उभे करतंय... हे सारं हणमंताशी गजरा कधी बोलली नव्हती. का ? विचार करता तिच्या मनानं कौल दिला की, धनी हे कधी समजून घेणारच नाहीत. त्यांना फक्त देह कळतो, त्यात एक मनही असतं, हे त्यांना कधी समजून घ्यावसं वाटतंच नव्हतं ! मीच खुळी... सतत आपल्याभोवती धनी कबुतराप्रमाणे घुमायचे. माझ्या शरीराचे लाड लाड करायचे. आपण त्याला प्रेम.. प्रीती समजलो. संसार मानला. आपली ती चूक होती. तो केवळ वासनेचा उमाळा होता. शरीराची गोलाई कमी झाली, बांध्याचा उभार ढासळला आणि त्यांचं लक्षही उडालं... | गेल्या कित्येक रात्री रंगल्या नव्हत्या. प्रत्येक वेळी तो असमाधानी, ती बेचैन. त्याचं कारण हे तर नसेल...? ...दिवसभर गजरा यंत्रवत गतीनं काम करीत होती, पण मनात हे असे विचार पुन्हा पुन्हा येत होते आणि मन प्रक्षुब्ध होत होतं. चारच्या सुमाराला मुकादमानं सांगितलं... आज मागच्या हप्त्यांचा पगार होणार आहे. सायांचे चेहरे फुलून आले. गजरालाही बरं वाटलं. कारण कालच घरातल पीठ संपलं होतं. मीठ - मिर्चीपण जेमतेम होती. बरं झालं... कुपनावर रेशन दुकानात जाऊन गहू घेता येतील व इतर सामानही उद्या बाजारात खरेदी करता येईल... । कमरेला गाठीत पैसा मारून गजरा वेगानं परतीच्या वाटेला लागली होती... घराची ओढ मनाला अधीर करीत होती... व्यंकूच्या आठवणीनं वात्सल्य उफाळून आलं होतं. हल्ली व्यंकूला जवळही घेता येत नाही वेळेअभावी... औंदाचा मौसम जवळ येतोय. पीकपाणी ठीक झालं तर दैन्य कमी होईल. कदाचित रोजचं हे उरस्फोडी रोजगार हमीचं काम करायची पाळी येणार नाही. आराम मिळेल, हे सुकलेलं शरीर पुन्हा भरून येईल.. पुन्हा आपण हणमंताच्या प्रेमाला पात्र होऊ... | ‘आईऽगं...' गजराला जोरदार ठेच लागली होती. आपल्या विचाराच्या नादात चालताना तिला भान राहिलं नव्हतं. कळवळून ती काही क्षण खाली बसला: रक्ताळलेला अंगठा तिनं दाबून धरला. कळ ओसरताच पुन्हा ती उठून चालू लागला." पण आपण पूर्वीप्रमाणे हणमंताशी समरस होऊ...? पाणी! पाणी!! / ४०, गजरा या प्रश्नासरशी पुन्हा अडखळली... आताची ठेच ही मनाला होती, तरी चालण्याच्या गतीमध्ये खंड पडला नव्हता. हे तर सरळ बाजारबसवीप्रमाणे झालं! किंमत आहे ती केवळ मांसल देहाला... या मनाला काही मोल नाही? वाडा दिसू लागताच मनातले भरकटलेले विचार मागे पडले आणि समोर खेळत असलेला व्यंकू तिला पाहताच पळत येऊन चिकटला. तिनंही त्याचा मायेनं मुका घेतला ! अंमलसा विसावा घेऊन गणरा पुन्हा घरच्या कामाला लागली. चूल पेटवून चपात्या भाजू लागली. व्यंकू समोर ताट घेऊन बसला होता. सासूलापण तिनं वाढून दिलं होतं! ' हणमंता घरी नव्हता. सासूलाही बाहेर जाताना सांगून गेला नव्हता. त्या रात्री तो घरी आलाच नाही. त्यामुळे गजरालाही पोटात भुकेचा आगडोंब उसळूनही उपाशी निजावं लागलं... दिवसभराच्या कामानं शरीर मोडून आलं होतं. आदल्या रात्रीच्या जाग्रणानं आधीच डोळे चुरचुरत होते... परत आजही कितीवेळ तरी झोप आली नाही. केव्हातरी पहाटे तिचा डोळा लागला. आणखी एक नवा दिवस... पण आज बाजाराचा दिवस म्हणून कामाला सुट्टी होती. तरी दुपारी बाजाराला जायचं होतं... प्रपंचाच्या वस्तू खरेदीला. पण रात्रभर हणमंता न आल्यामुळे गजराचं कशातच मन लागत नव्हतं ! कुठे गेला असेल बरं हणमंता?... हा प्रश्न तिला सतत सतावत होता. शेजारच्या नामदेवानं सर्वत्र पाहिलं, पण पत्ता लागला नाही. एवढं मात्र समजलं होतं की, तो साखर कारखान्याच्या गावी जाऊन दुपारी परतला होता व संध्याकाळी परत बाहेर पडला होता. चहा झाल्यावर ती वेणीफणीला बसली, तोच आवाज आला. म्हणून तिनं डोकावून पाहिलं... दारात हणमंता उभा होता. त्याला स्वतःचा तोल सावरत नव्हता. डोळे तांबरलेले.. कपई विस्कटलेले... गजराच्या अंगावर भीतीचा काटा सरसरून आला. ती पुढे झाली आणि तिच्या नाकात एक घाणेरडा दर्प शिरला... हा दारू पिऊन आला आहे खचितच. । 'कुठे गेला होता धनी रातच्याला, सांगून पण गेला नाहीत सासूबाईनी?...' “वेडी का खुळी तू गजरा ?' खदाखदा हसत हणमंता म्हणाला, शेवंतावायकडे जाताना का आईला सांगून जायचं असतं?" ‘धनी, हे मी काय ऐकतेय?' बांधा / ४१ "खूप मजा आली. काय मस्त आहे शेवंताबाय! साली काय गच्च भरली आहे...' आणि बीभत्स हातवारे करीत तो सांगू लागला. ‘शी... शी...! इथे मी तुमची लग्नाची बायकू जिती हाय... तरी तुम्ही बाजार हुडकता?' तिचा संताप आवरत नव्हता. 'तुझ्यासंगं मजा नाही येत... हाडहाडं लागतात. छे! बाई कशी हवी!' संताप व कमालीच्या उद्वेगानं गजरा भणाणून गेली होती. काल दिवसभर मनात जे ठसठसत होतं, ते एवढं खरं व्हावं याची तिला खंतही वाटत होती... यावर्षी निसर्ग मेहरबान होता. पाऊसपाणी वक्तशीर व वेळेवर झाला. पुन्हा एकदा हणमंताच्या शेतात ऊस व गहू बहरून आले... पाझर तलावाचं काम संपलं होतं. पाऊस ओसरताच गावातच पुन्हा जमीन सपाटीकरणाचे काम निघालं. ग्रामपंचायतीनं दवंडी दिली आणि गणरा पण कामावर जायला निघाली. ‘गजरे, आता कशाला जातेस कामावर? आवंदा शेतं झकास पिकली आहेत. आता काय कमी आहे आपल्याला?' 'जरा स्पष्ट बोलू का? राग नाही ना धरणार धनी ?' गजरा धीटपणे म्हणाली, ‘कमी आहे ती माझ्यामध्ये... मी सुकलेय, नुसती हाडंहार्ड लागतात ना...!" “होय गजरे, पूर्वी तू किती छान दिसायचीस... या रोजगार हमीच्या कामानं पार रया गेली बघ तुझी.' 'म्हणूनच तुमचं बाजारबसवीकडे जाणं सुरू झालं!' गजरा धीटपणे म्हणाली, ‘मला हौस नव्हती कामावर जाण्याची. पण पोटाला फासे पडल्यावर कुणीतरी कमावून आणलं पाहिजेच की!' "बरं ते जाऊ दे. आता सारं ठीक झालंय ना?" 'नाही धनी, ठीक झालं असेल ते तुमच्यासाठी. या गजरेसाठी नाही.' 'तुला म्हणायचं तरी काय आहे?...' पाणी! पाणी!!/४२ ' ही गजरा नकोच होती तुम्हाला कधी... पाहिजे होतं ते तिचं शरीर! ते हाडकलं आणि तुम्ही बाजार जवळ केला!' गजराचा आवाज कापत होता, ‘धनी, आज बाजार जवळ केला... उद्या घरी सवतपण आणाल. परवा मला घराबाहेर पण काढाल...' ‘छे, छे ! असं कसं होईल?' ‘न व्हायला काय झालं? तुम्ही बाजारात सुख हुडकाल, हे तरी कुठं वाटलं होतं?...' गजरा म्हणाली. ‘मला कामावर गेलंच पाहिजे. कष्टाची सवय ठेवली पाहिजे. कारण मला केव्हाही घराबाहेर काढलं जाईल. या घराचा, या घरधन्याचा काही भरवसा देता येत नाही. माझा आधार तुटलाय, तेव्हा मला माझ्या पायावर उभं राहिलंच पाहिजे. संसारात जोडीदाराला जेव्हा फक्त बाईचा देहच पाहिजे असतो, त्या बाईसाठी तो संसार कुचकामी आहे. त्यात अख्ख्या जिंदगीचा आधार शोधता येत नाही, सापडत नाही... या रोजगार हमीच्या कामानं अशा बायांना... ज्यात मी सुदिक आहे... आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहायची ताकद दिली आहे... मार्ग दिला आहे, तो मला सोडून चालणार नाही...' ...आणि ती कामासाठी घराबाहेर पडली. 111 बांधा / ४३ ४. भूकबळी ‘सर - कलेक्टर साहेब लाईनवर आहेत' । टेलिफोन ऑपरेटरने सांगितलं, तेव्हा तहसीलदार शिंदेची झोप खाडकन उडाली व ते घाईघाईने म्हणाले ‘जोडून दे.' काल रात्री त्यांना झोपायला बराच उशीर झाला होता, काल दिवसभर त्यांनी साक्षरता अभियानाच्या प्रचारासाठी दहा-बारा खेड्यांना भेटी देऊन मिटिंगा घेतल्या होत्या व शेवटी मांजरीला सरपंच व साक्षरता अभियानाच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी बसवलेल्या कलापथकाच्याही कार्यक्रमाला थांबले होते. साहजिकच घरी परतायला रात्रीचा एक वाजून गेला होता व आज जाग आली तेव्हा आठ वाजून गेले होते.. मूड अजूनही आळसावलेलाच होता. रेणुकेनं दोनदा बजावूनही शिंद्यांनी अद्याप ब्रश केला नव्हता. त्यांची बेड - टीची सवय लग्नानंतर तिने मोडून काढली होती. आजही तिनं तेच बजावलं होतं, ‘ब्रश केल्याशिवाय चहा मिळणार नाही' पण उठावस वाटत नव्हतं, ते तसेच पडल्या पडल्या कालची वृत्तपत्रे वाचत होते. त्यांच्या तालुक्याला जिल्हा व प्रमुख वृत्तपत्रे सायंकाळी चारला येत असत. कारण मुख्य रस्त्यापासून तालुका दूर होता. त्यामुळे रोज सकाळी ताजी वृत्तपत्रे वाचायचा आनंद शिधाना इथे तहसीलदार म्हणून नेमणूक झाल्यापासून मिळत नव्हता. तेव्हा सायंकाळी आलेले पेपर्स रात्री ऑफिस किंवा दौरा करून आल्यानंतर वाचणे किंवा परतायला खूप उशीर झाला तर दुस-या दिवशी वाचणे व्हायचे. भूकबळी / ४५ कालची वृत्तपत्रे चाळत असतानाच टेलिफोनची रिंग वाजली, तेव्हा पडल्या पडल्याच हात लांबवून पलंगाच्या कडेला असलेल्या टेबलावरील फोनचा रिसीव्हर उचलला व ते जड स्वरात म्हणाले. 'हॅलो...' ‘सर कलेक्टर साहेब लाईनवर आहेत. शिंद्यांचा आळस क्षणार्धात उडाला. काही महत्त्वाचे काम असल्याखेरीज कलेक्टर सकाळी सकाळी घरी फोन करणार नाहीत, हे त्यांना ठाऊक असल्यामुळे ते ताडकन उठून बसले व म्हणाले 'जोडून दे.' खटकन् आवाज झाला, "हॅलो चंद्रकांत?' ‘गुडमॉर्निग सर !” शिंद्यांनी आवाजात आदब आणीत अभिवादन केलं. 'व्हॉट इज गुड़ इन धिस मॉर्निग, चंद्रकांत?' कलेक्टरांची रोखठोक स्वर कानी पडताच ते चमकले, सावध झाले. काहीतरी अघटित घडलंय, जे तहसीलदार असून आपल्याला माहिती नसावं किंवा आपण रिपोर्ट न केल्यामुळे इतर मार्गानी त्यांना काहीतरी समजलं असावं अन्यथा ते तसे शांत व खेळकर आहेत. पण आजचा नूर काही वेगळा दिसतोय. शिंद्याच्या मनाला एक अल्प भीतीची लहर स्पशून गेली. | ‘पाईन सर - माझं काही चुकलं का?' कलेक्टरांना काय म्हणायचं होते हैं माहीत नसलं तरी नोकरशाहीच्या शिरस्त्याप्रमाणे वरिष्ठापुढे - आपली असलेली नसलेला चूक कबूल करत शिंदे हळुवारपणे आवाजात नसलेली नम्रता आणीत म्हणाले. 'आजचा 'मराठवाडा' वाचला आहे', ‘नाही सर तो इथं दुपारी येतो चार नंतर -' शिंद्यांनी खुलासा केला, “काही । विशेष सर?' ‘भयंकर आहे - तुमच्या तालुक्यात भूकबळी पडल्याची बातमी आहे " समजलं !' आता कुठे कलेक्टराच्या तीक्ष्ण स्वराचे मर्म शिंद्यांच्या लक्षात आलं होत. महसूल खात्यात जरी ते नवीनच थेट तहसीलदार म्हणून लागले असले तरी खात्यासाठी भूकबळी पडणं ही किती नामुष्कीची गोष्ट आहे हे ते जाणून होते. यावर्षी पूर्ण जिल्ह्यात पावसाअभावी आवर्षण परिस्थिती होती, तर त्यांच्या तालुक्यात शासनानं मागच्याच आठवड्यात दुष्काळ जाहीर केला होता. रोजगार हमीची कामे फार मोठ्या प्रमाणावर सुरू होती, त्याच्या संदर्भात मजुरी - भ्रष्टाचाराच्या तक्रारी, धान्य कुपनावर धान्य न मिळणे किंवा जादा भाव लावणे इत्यादी तक्रारीही त्या प्रमाणात वाढल्या होत्या याखेरीज दररोज कुठल्याना कुठल्या गावातून नवीन कामाची मागणी येत होती. पुन्हा पाणी! पाणी!! { ४६ त्यांच्या तालुक्यात 'शेतकरी शेतमजूर पंचायत’ प्रभावी होती, त्यांच्या मार्फत लेखी फॉर्म भरून कामाची मागणी व्हायची. अशावेळी कायद्याप्रमाणे त्यांना त्वरित रोजगार हमीचे काम देणे भाग पडायचे. अन्यथा बेकार भत्ता देणे बंधनकारक होते व ते 'मागेल त्याला काम देणा-या राज्यशासनासाठी नामुष्कीची बाब होती. त्यामुळे शिंद्यांना फार दक्ष राहावं लागत होतं, पण रोजगार हमीचं प्रत्यक्ष काम करणारी मृदसंधारण, बांधकाम वा सिंचन विभागाची यंत्रणा मात्र तेवढी जागृत नव्हती, त्यांना दुष्काळाचे म्हणावे तेवढे भान नव्हते, त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षित सहकार्य शिंद्यांना मिळत नव्हतं. समन्वयक म्हणून त्यांना प्रसंगी स्वतःची तहसीलदारकी विसरून थेट कनिष्ठ अभियंता वा मस्टर असिस्टंटपर्यंत संपर्क साधावा लागत होता. | शिंदे तरुण होते, उत्साही होते व यावर्षीचा पडलेला दुष्काळ हे एक आव्हान समजून ते प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते, हे कलेक्टर जाणून होते व प्रसंगी मिटिंगमध्ये इतर तालुक्यांच्या तहसीलदारांना सांगत, 'शिंद्याप्रमाणे तुम्हीही सामाजिक बांधिलकीची भावना मनात रुजवा. थोडा रेहेन्यू खाक्या विसरून काम करा...' |आणि या पाश्र्वभूमीवर कलेक्टर जे फोनवर सांगत होते, त्यामुळे शिंदे अक्षरशः सुन्न झाले होते! त्यांच्या तालुक्यातील काळगाव दिघी या गावची एक मध्यमवयीन स्त्री रोजगार हमीचं काम न मिळाल्यामुळे उपासमार होऊन मृत्युमुखी पडल्याची बातमी आजच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती. सध्या राज्य विधि मंडळाचे अंदाजपत्रकीय अधिवेशन चालू होते व तालुक्याचे आमदार विरोधी पक्षाचे व रोजगार हमी योजनेच्या विधि मंडळ समितीचे सदस्य होते. त्यामुळे असेंब्लीमध्ये प्रश्न किंवा लक्षवेधी सूचना मांडली जाण्याची शक्यता होती. कलेक्टरांची काळजी व रागही रास्त होता. वृत्तपत्रात बातमी येईपर्यंत शिंद्यांना माहिती नव्हती, त्यामुळे वरिष्ठ पातळीवर कलेक्टरांना तोंड देणे अवघड होऊन बसले होते. 'सर, या क्षणी मी काही सांगू शकत नाही पण मी एक दीड तासात सर्व माहिती घेऊन फोन करतो आय अॅम एक्स्ट्रिमली सॉरी सर पण - पण...' . 'ओके - इटस् ऑल राईट : चंद्रकांत पण हे मॅटर तुला, मला जड़ जाणार आहे. मी आज रामपूरला आहे तिथं मला फोन करून कळव. किंवा फोन नाही लागला तर, चारनंतर सरळ माझ्याकडे हेडक्वार्टरला ये...' अक्षरश : दहा मिनिटाच्या आत रेणुकेच्या आग्रहाला न जुमानता शिंद्यांनी ब्रेकफास्टही न घेता कार्यालयात येऊन माहिती मिळवायला प्रारंभ केला. त्यांनी जीप भूकबळी / ४७ पाठवून रोजगार हमीचे नायब तहसीलदार भालेरावांना तातडीने येण्यास सूचित केले व एक शिपाई पाठवून शेतकरी - शेतमजूर पंचायतीचे तालुका चिटणीस विसपुतेंना बोलावून आणण्यास सांगितले. | कार्यालयात नेहमी नवाच्या आत येणारा एम. ए. जी. विभागाचा क्लर्क वाघमोडे सोडता शिंदे एकटेच होते व विचार करीत होते...। गेल्या दोन महिन्यात ज्या ज्या गावातून कामाची मागणी आली होती, तेथे तेथे प्रत्यक्ष जाऊन तेथील मजुरांना त्या गटातच शक्यतो रोजगार हमीचे काम देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. ज्या ज्या मजुरांनी त्यांना काम मागितले होते, त्यांना लेखी पत्र देऊन सोईच्या कामावर पाठवले होते. तरीही कोळगाव दिघीची एक महिला काम न मिळाल्यामुळे उपासमार होऊन मृत्युमुखी पडली होती व ही वार्ता खरी असेल तर तो भूकबळी ठरणार होता. ही शिंद्यांसाठी वैयक्तिक व तालुक्याचा तहसीलदार म्हणून नामुष्की होती. | विचार करूनही त्यांना आपण कुणाला कामाला नाही म्हणाल्याचं आठवतं नव्हतं. पुन्हा पुन्हा ते आपली डायरी चाळत होते, पण अवघ्या एकशेवीस गावांच्या तालुक्यात आजमितीला पंचाहत्तर काम चालू होती, तरीही काळगाव दिघीची एक महिला काम नसल्यामुळे उपासमारीनं मृत्युमुखी पडली होती ! शिंदे काहीसे भावनाप्रधान होते, त्यामुळे भूकबळीची बातमी त्यांना अस्वस्थ करून गेली होती. वृत्तपत्रातून किंवा व्हिडिओ मॅगेझिनवर त्यांनी कलहांडी या बिहार मधील उपासमारीच्या बातम्या ऐकल्या - पाहिल्या होत्या. सध्या तर सोमालिया देशातील भूकेची तीव्रता टी. व्ही. द्वारे अनुभवली होती. ती भुकेने चिपाड झालेली व सारी भूक डोळ्यात व सुन्न नजरेत सामावणारी काळी मुले पाहून त्या रात्री त्यांना जेवणही गेल नव्हतं. रेणुकेनं टी. व्ही. बंद करून म्हटलं होतं, ‘कान्त एवढं काय ते मनाला लावून घ्यायचं? तुम्ही तर पुरुष आहात, मन घट्ट हवं. पुन्हा ज्या खात्यात नोकरी करता तिथं दुष्काळाशी घडोघड़ी सामना करावा लागतोय. हा तालुका त्याबाबत अग्रेसर आहे. अशा वेळी काम करताना मन शांत ठेवायला हवं.!" तरीही त्यांची अस्वस्थता कमी झाली नव्हती. त्यानंतर टीव्हीवर किंवा 'द वर्ल्ड धिस वीक' हा कार्यक्रम पाहाताना सोमालियाची बातमी आली की ते टीव्ही सरळ बंद करायचे. खरंच रेणू मला कळतं की हा पळपुटेपणा आहे, मी नाही पाहू शकत. सहन करू शकत ती नजरेतली भूक आणि जीवघेणी सुन्नता त्या लोकांची -- आपण अशा वेळी सुस्थितीत आहोत, पोटात रोज गरम अन्न जातं, याची लाज वाटते. पण ती वांझोटी असते....' पाणी पाणी!! / ४८ तालुक्यात दुष्काळाशी सामना करताना उजाड खेडी, शुष्क रखरखीत प्रदेश पाहून त्यांना आपली सुस्थिती ही वाळवंटातील ओअॅसिसप्रमाणे वाटायची व ती मन विदीर्ण करून जायची. त्यामुळेच की काय ते अधिक तडफेनं व जिद्दीनं दुष्काळावर मात करायच्या विचारानं प्रेरीत होऊन काम करायचे. | पण यातला तोकडेपणा व मर्यादा त्यांना प्रकर्षाने जाणवायच्या. अजस्त्र पसरलेल्या प्रशासनातले तहसीलदार म्हणून ते फार छोटे चक्र होते, जे त्यांच्यापेक्षा मोठ्या चक्रात व त्यांच्यापेक्षा लहान चक्रात गुंफले गेले होते, त्यामुळे स्वतःची गती राखता येत नव्हती. तसंच दुष्काळ पडला की टैंकरने पाणी द्यायचे, रोजगार हमीचं काम पुरवायचं, धान्य द्यायचं, हे उपाय दुष्काळाची तीव्रता कम जरूर करणारे आहेत. पण त्यामुळे तो कायमचा हटत नव्हता. बहात्तरचा दुष्काळ ते फक्त ऐकून होते, पण त्यामानाने तीव्रता कमी आहे, असं अर्थशास्त्राचे विद्यार्थी असलेले शिंदे अनुमान जरूर काढू शकत होते. तरीही झालेले फार कमी आहे वे करायचं तर एवढे प्रचंड आहे की छाती दडपून जावी, या विचारानं ते बेचैनही व्हायचे. मागेपुढे कधी सवड मिळाली तर 'दुष्काळाचे अर्थशास्त्र व व्यावहारिक उपाययोजना' अशा त-हेचा विषय पीएच. डी. साठी घ्यायचा वे अधिक खोलात जाऊन त्याचा अभ्यास करायचा, अस त्यांनी मनोमन ठरवूनही टाकलं होतं. शिंद्याची विचारधारा थांबली ती भालेरावच्या येण्यामुळे, तहसीलदारांच्या चेंबरमध्ये येण्यापूर्वी ते आपल्या कार्यालयात गेले होते, तेव्हा कलेक्टर कचेरीचा वायरलेस नुकताच आला होता व तो वाचून आपल्याला कशासाठी तातडीने बोलावलंय याचा भालेरावांना अंदाज आला होता. 'भालेराव, मघाशी कलेक्टर साहेबांचा फोन होता. काळगाव दिघीची एक महिला रोजगार हमीचं काम न मिळाल्यामुळे मरण पावली...' ‘आताच त्यासंबंधी वायरलेस आला आहे सर!' भालेराव म्हणाले, 'भी सोबत काम मागितलेल्या व्यक्तींची नावे असलेले रजिस्टर आणले आहे. त्यांनी रजिष्टर उघडीत एक एक पानं उलटायला सुरुवात केली. । | शिंदे अस्वस्थपणे पेपरवेटशी चाळा करीत होते. काही वेळानं भालेराव म्हणाले 'सर मागील आठवड्यात काळगाव दिघीच्या एका कुटुंबानं लेखी अर्ज करून कामाची मागणी केली होती. त्यांची नावे आहेत राघु ननावरे, त्याची पत्नी पारू व बहीण ठकूबाई - आणि वायरलेस मध्ये भूकबळी म्हणून ठकूबाईचं नाव आहे...!' भूकबळी / ४९ आता शिंद्याना थोडासा उलगडा झाला होता. त्यांच्याकडे राघूनं ‘शेतकरी व शेतमजूर पंचायती' मार्फत कामाच्या मागणीसाठी लेखी अर्ज दिला होता, पण काळगाव दिघी पॉकेट मध्ये, ज्यात चार ग्रामपंचायतीचा समावेश होता, एकही काम चालू नव्हते. एक पाझर तलाव मंजूर होता, त्याच्या एका भरावाचं कामही मागच्या वर्षी पूर्ण झालं होतं. त्याचा दुसरा भराव शेतक-यांनी अडवला होता व भूसंपादनाची कार्यवाही अपूर्ण होती. शेतक-यांना किमान ऐंशी टक्के मोबदला, अॅडव्हान्स हवा होता. त्यासाठी स्वतः शिंदे प्रयत्नशील होते. पण शासनाकडून पतमर्यादा न आल्यामुळे तो देता येत नव्हता व त्यामुळेच हे पाझर तलावचे काम बंद पडले होते. | म्हणून त्यांनी सहा किलोमीटर अंतरावर नाला बंडिंगचे एक काम चालू होते, तिथे राघू व त्याच्या कुटुंबियांनी जावे असे लेखी आदेश दिले व त्याची एक । प्रत शिपायामार्फत बंडिंगचे अधिकारी चव्हाण यांनाही पाठवली. | आज राघूची बहीण ठकूबाईचा भूकबळी पडला होता. कागदावर तर शिंद्यांनी सर्व सोपस्कार पूर्ण केले होते. तरीही कुठेतरी काहीतरी चुकतेय, ही त्यांची टोचणी कमी होत नव्हती. ‘राम राम रावसाहेब...' शिंद्यांनी पाहिलं, विसपुते आले होते. त्यांनी अभिवादन स्वीकारून त्यांना बसायला सांगितलं. ‘मी आज तुम्हाला भेटणार होतोच. पण तुमचं पकड वॉरट आल शिपायामार्फत म्हणा ना, मग काय करता? तसाच आलो... झालं !' आणि विसपुत। गडगडाटी हसले. तसं कारण काहीही नव्हतं, पण शिंद्यांना विसपुते हा पहिल्यापासूनच आवडला नव्हता. त्याचं अघळपघळ बोलणं, गडगडाटी हसणं आणि त्याचे मांजरासारख हिरवे - घारे डोळे. सारचं त्यांना खटकायचं. वाटायचं हा ज्या शेतकरी व शेतमजू संघटनेचं काम करतोय, तिथं हा शोभत नाही, ही ती संघटना आपल्या पुढारीपणासार वापरतोय. त्याला शेतकरी व शेतमजुरांच्या प्रश्नांशी काही देणं - घेणं नाही. खर त हा त्यांचा स्वतःचा, व्यक्ती पाहून झालेला ग्रह होता. त्याला काही ठोस आधार " पुरावा नव्हता. पण आज मात्र शिंद्यांची खात्रीच झाली की, आपला हा ग्रह चुकीचा नाह: कारण आज त्यांना आपण का बोलावलं आहे हे माहीत असणारय. तरीही ते गडगडा हसत होते... कारण नसताना व विनोदाचं प्रयोजनही नसताना. . पाणी! पाणी!! / ५० ‘आपल्या पंचायतीमार्फत काम मागण्यासाठी अर्ज केलेल्या राघूच्या बहिणीचा भूकबळी झाल्याची वार्ता आलीय पेपरमध्ये. तुम्हाला काही माहीत आहे त्याबद्दल...?! | ‘वा ! माहीत तर आहे. अहो कालच मला पेपरचा वार्ताहर किनाळकर भेटला होता. त्याला मीच सांगितलं हे! तसचं राघूही होता माझ्या बरोबर -! | ‘विसपुते...!' तीव्र स्वरात शिंदे म्हणाले, 'हे... हे मला सांगता आलं नसतं तुम्हाला मी कधी तुमची भेट चुकवली आहे? किंवा सांगितलेल्या कामासंबंधी कार्यवाही केली नाही? तरीही...' ‘त्याच असं आहे रावसाहेब, गेले दोन दिवस तुम्ही सतत दौ-यावर होता साक्षरता अभियानाच्या कामासाठी. मग कशी भेट व्हायची?' विसपुते म्हणाले, “अहो, इथे दुष्काळात लोकांचे हाल आहेत आणि शासनाला हे काहीतरीच खूळ सुचतंय.. आधी हाताला काम द्या, पोटाला भाकरी द्या व मग त्यांना शिकवा.' आपल्याला विसपुत्यांनी आधी का कळवलं नाही हे खोलात जाऊन विचारण्यात आता काही अर्थ नव्हता व त्यांचा साक्षरता अभियानावरील रागही त्यांना माहीत होता. 'ठीक आहे. पण मी त्यांना रांजणीच्या नालाबंडिंगच्या कामावर पाठवलं होत.' ‘त्याचं असं झालं साहेब...' जरा पुढे सरसावत विसपुते म्हणाले, 'इथे माझ्या सोबत राघू आहे. तो बाहेर उभा आहे, तोच तुम्हाला सांगेल.' | राघू जेव्हा त्यांच्यासमोर आला, शिंद्यांच्या मनात एक अपराधी भाव चमकून गेला. आपण याच्या बहिणीच्या भूकबळीला जबाबदार आहोत, असं त्यांना वाटत होतं. त्यांनी राघूकडे निरखून पाहिलं - मध्यम वय, अंगावर मळकट धोतर व सदरा, दाढी वाढलेली, रापलेला काळाकभिन्न चेहरा, त्यावर सुन्नतेचा लेप...! ‘राघू... काय झालं बाबा? मी तर तुला व तुझ्या घराच्यांना रांजणीच्या कामावर पाठवलं होतं ना?' | ‘तेचं आसं हाय सायेब...' अडखळत राघू सांगू लागला... राघू ननावरे गाडीलोहार या भटक्या जमातीत मोडणारा. पण जहागीरदार किशनदेव रायांनी निजामाच्या आमदानीत त्याच्या आजोबाला बैलगाडी बनवण्याच्या कसबावर खुश होऊन काळगाव दिघी परिसरातली पाच एकर जमीन दिलेली. आज वाटण्या होऊन राघूच्या वाट्याला जेमतेम दीड एकर आलेली. भूकबळी / ५१ मुळात तालुकाच डोंगराळ, म्हणून कठीण, खडकाळ जमीन, तिथे नैसर्गिक पाण्यावर बाजरीखेरीज काही पिकायचं नाही. बाजरीचं पीकही दुष्काळात पुरेसं येत नाही. यावर्षीही असंच झालं. पावसाळा लांबला. मृग पूर्ण कोरडा गेला, त्यानंतर दोन जेमतेम पाऊस झाले. त्यावर कशीतरी तीन क्विंटल बाजरी पदरात आली. त्यातली एक बाजारात दरवर्षीच्या शिरस्त्याप्रमाणे पडत्या भावात ताबडतोबीने विकून आलेल्या पैशात किरकोळ उधार - उसनं देणं व मीठ - मिरचीची तरतूद करणं भाग होत. उरलेले धान्य राघू, त्याची बायको व दोन मुले आणि विधवा होऊन त्याच्याकडेच राहायला आलेली बहीण ठकूबाई एवढ्या प्रपंचाला कितीस पुरणार? दिवाळीला तर त्यातला एक कणही राहिला नव्हता. दरवर्षी शेजारच्या रामपूर तालुक्यात तो सर्व कुटुंबकबिल्यासह साखर कारखान्यावर उसतोडीला जायचा. यंदा ऊसही पावसाअभावी कमी झालेला, म्हणून फेब्रुवारीतच गळीत हंगाम संपला. ठेकेदाराकडून परततानाच पुढील वर्षाची आगाऊ रक्कम घेतली, तीही हां हां म्हणता संपून गेली आणि त्या कुटुंबाला आता राज हमीच्या कामाखेरीज जगण्यासाठी दुसरा मार्ग नव्हता. राधूनं कामासाठी शोधाशोध सुरू केली, तेव्हा सुदैवानं शेजारच्या गावी तांड्याला जोडणा-या जोडरस्त्याचे काम नुकतंच सुरू झालं होतं. या काम आवश्यकता असूनही जास्त मजूर मिळत नव्हते. कारण डोंगराळ भाग असल्या जवळपास माती नव्हती, खडक होता. तो फोडणं अवघड काम होतं. | याचा प्रत्यय राधूला व त्याच्या पत्नीला - बहिणीला आला. पहिल्याच दिवश खडी फोडून हाताला फोड आले होते. पण इतर कामापेक्षा मजुरीचे दर जादा हात आसपास दुसरे कोणतेही कामे सुरू नव्हते. म्हणून शरीर साथ देत नसतानाही त्या" कामावर जाणे भाग होते. घरधनी गेल्यानंतर पांढरं कपाळ घेऊन भावाकडे आल्यानंतर त्याच्या कमीत कमी भार पावा म्हणून अहोरात्र राबणं, रानात कामाला जाणं व उपास नावाखाली एकदाच दुपारी भाकर तुकडा खाणं, त्यामुळे ठकुबाई कमालीची रोडावल होती. तिला हे खडी फोडण्याचं काम झेपणारं नव्हतं. पहिल्या आठवड्यानंतर ॥ रोजगाराचं वाटप झालं, तेव्हा तिची मजुरी तिच्या भावजयीपेक्षा अर्धीच भरली हो" ‘वयनी, काय करू बघा' कपालीचं कुंकू गेल्यानंतर कुडीत जीवच नाय राहिला..' राघूची बायको मैनाचे गावातल्या व समाजातल्या बायका कान फु असल्यातरीं, जात्याच प्रेमळ असल्यामुळे तिला ठकुबाईकडे पाहिलं की पोटात कसत व्हायचं. आपल्याच उमरीची ही आपली नणंद. कुंकवाचा आधार गेला आणि विचारा" पाणी! पाणी!! / ५२ जिंदगी बर्बाद झाली. समाजात पुन्हा विवाह होत असे पण तिची खचलेली कुडी व गेलेली रया पाहून कोणी तयार होत नव्हता. दोन मौसम प्रयत्न केल्यानंतर, राघूनं अलीकडे नाद सोडून दिला होता. बहिणीला माहेरी जन्मभर पोसावं एवढी काही त्याची ताकद नव्हती, तरीही तो व मैना जमेल तेवढं वे तसे तिला सांभाळीत होते. पण तीही आपल्यापरीनं भार होऊन नये यासाठी कामाची पराकाष्ठा करायची. | हे कठीण काम तिला झेपणार नाही, है राघू व मैनेला पण ठकुबाईप्रमाणे समजत होतं. तिची मजुरीपण फार कमी पडत होती. तरीही ते चूप होते. कारण तेवढीच मजुरी प्रपंचाला मिळत होती व मुख्य म्हणजे मजुरी कितीही असली तरी दररोज एक किलो गव्हाचे कुपन मिळत होते. त्यामुळे त्यांच्याकडे आता दोन क्विंटल गव्हाएवढे कुपन साचले होते. ते वटवून गहू घ्यायचा व तो बाजारात विकून पैका करायचा राघूचा बेत होता. कारण घरी गहू परवडणारा नव्हता व त्याला परत तेल लागणार होतं... ते त्यांना शक्यच नव्हतं. | जोडरस्ता अवघ्या दीड किलोमीटरचा असल्यामुळे ते काम तीन आठवड्यात संपलं तेव्हा राघू तिघांचे कुपन एकत्र करून शेजारच्या गावात बोरसला गेला; पण ते दुकान मागच्याच आठवड्यात धान्याचा काळाबाजार केला असता तहसीलदारांनी रंगेहाथ पकडून निलंबित केलं होतं व ते गाव काळगायच्याच दुकानाला जोडलं होतं. सारा दिवस व चक्कर वाया गेली होती, पण राघूला त्याचं फारसं काही वाटले नव्हतं. कारण खेडेगावात रेशन दुकानं कधीच नीट चालत नाहीत, जावं तेव्हा उघडी असतातच असे नाही आणि उघडी असली तर धान्य कधी असतं, कधी नसतं. त्यामुळे आपल्या हक्काचंही धान्य नीटपणे वेळच्या वेळी मिळणं अवघडच होतं. हे सारं राधूला माहीत होतं. म्हणून तो निमूटपणे परत आला. . पण काळगावचं रेशन दुकानाला कुलूप पाहिल्यावर मात्र त्याचा धीर खचला. घरातलं सारं धान्य व पैसा संपला होता. अक्षरशः दोन वेळा पोटात घासही जात नव्हता. रानात कुठेच काही काम नव्हतं. तेव्हा जाणकार ठकुबाईनं डोंगरमाथा हुडकून कसलातरी पाला तोडून आणला होता व दोन दिवस त्यावरच ते कुटुंब पोट भरत होतं. | आज गहू मिळायला हवा होता, पण दुकान बंद. दुकानदार अचानक . बालाजीच्या यात्रेला गेला होता व आठ दिवस येणार नव्हता. तेव्हा तो गावात सरपंच-पोलीस पाटलाच्या उंबयाशी गेला व कुपन दाखवून त्यानं थोडे जोंधळे व बाजरी उसनी मागितली. सरपंच उर्मट होता. त्यानं भिका-याप्रमाणे राघूला हाकलून भूकबळी ! ५३ लावलं. पाटलाचा बाप माळकरी होता. त्याने दोन पसे बाजरी दिली. तेवढाच पोटाला दोन दिवस आधार झाला. | अशातच वणवणताना राघूला विसपुते भेटले. त्यानं संकोचानं रामराम घातला, तसे खुश होऊन त्यांनी राघूची अघळपघळ चौकशी केली आणि त्याचा प्रश्न जाणून घेतला. त्याच्याकडून निम्मी कुपनं घेऊन पन्नास रुपये दिले व एका फॉर्मवर अंगठा घेतला व आपल्या मोटारसायकलवर मागे बसवून त्याला तहसील कचेरीत नेलं. तिथे त्याच्यासमक्ष तो अर्ज रावसाहेब शिंद्यांना दिला. त्यांनी लगोलग त्याला रांजणीच्या बंडिंगच्या कामावर जाण्याचा हुकूम दिला. विसपुते तालुक्यालाच राहात असल्यामुळे त्याला एस. टी. चे पाच रुपये खचून परत यावं लागलं. पण त्यांनी दिलेल्या पैशातून राघूनं दोन दिवस पोटापाण्याची सोय केली. मग रात्री त्यानं हा विषय मैना व ठकुबाईपुढे काढला, ‘कारभारणे, रांजणी चागंली चार - सा कोस हाय पग जायला. पन तितं जायला पाहिजे, नाय तर जगण कठीण हाय बघ.' ‘जाऊ की कारभारी-पण ननंदबायला यवढं चालणं झेपेल का? काल सांजेपास्नं त्येच आंग मोडून आलंया आन् गरमबी जालंय...' 'मैनानं विचारलं तसा काहीसा गहिवरून राघू म्हणाला, ‘व्हय-म्या पघतो ना- ठकुबाय लई बीमार हाय, पन् म्या असा करटा भाऊ--जो भणीचं दवादारू करू नाय शकत. आसं कर ठकुबाय - तु पोरास्नी धि" इथचं रहा -एक हप्त्यानंतर म्या तुला नेतो.' | ‘नाय दादा - म्या बरी हाय -- म्या येते तुमासंगट- तेवढीच रोजी पदा पडेल.. जायला जरा येळ लागेल - पन म्याबी येते दादा --' ठकूबाई संकोचून म्हणाला. | राघू व मैना दोघांनाही तिची प्रकृती माहीत होती; पण प्रश्न रोजीचा होता, जगण्याचा होता, त्यांनी तिथंच विषय संपवला. | दुस-या दिवशी सकाळी भाकर-तुकडा फडक्यात बांधन ते मुलासह निघाल, रांजणीला जाणारा रस्ता रेशन दुकानावरून जाणारा होता त्याने थोडं थांबून चाक केली, पण अजूनही बालाजीला गेलेले शर्मा दुकानदार परत आले नव्हते. त्याच्या नातवाचं जावळ व बारसं तिथं होतं, अस घरातल्या मुनिमानं सांगितलं तेव्हा अजिजा" त्यानं म्हणलं, | ‘पन मुनीमजी, तुमी दुकान उघडाना. मह्या जवळ लई कुपनं हायती गव्हाची ती त्यवढी मोडून दिवा की - पोरंबाळं आन् भण भुकेली हायत हो...' पाणी! पाणी!! / ५४ 'हे बघ राघू, - शेटजी दुकान बंद ठेवायला सांगून गेले आहेत, मला उघडता येणार नाही. पुन्हा तुझी कुपनं ही बोरसरची. त्या गावचा माल अजून आणला नाही. समजलंस? जा आता, माझा जीव खाऊ नको.' | 'पन - शेटजी' न राहावून मैना मध्येच म्हणाली, 'म्या म्हंते - आसं दुकान न सांगता सवरता बंद ठिवता येतं? जंतेचे हाल हो केवढे? आमचंच बघा ना. गवळ लई कुपनं हायती - पण ती काई पोटास्नी घालता येत नाहीत - कसे भरावं खळगं? ल्हानी पोरं हायती- बीमार ननंद हाय - पोटाला नगो...?" 'ए भवाने मला जाब विचारतेस ?' संतापून आपल्या चिरक्या आवाजात मुनीमजी फणफणले, 'राघू तुझ्या बायकोला सांग - माझ्याशी नको बोलू म्हणून, मी बाईमाणसांशी नाही बोलत! सोशिक राघू आपल्या कारभारणीवरच चिडला, 'ए गप बये, तुला काई समजता का? उगी आपली पिरपिर... गप्प... गप रहा पघू!' आणि लाचारीच्या स्वरात तो मुनीमजीकडे वळून म्हणाला. 'गलती जाली मुनीमजी - कारभारनीला काई अक्कल नाय - माफी असू दे... म्या नंतर येतो कुपन मोडायला...! त्याला लाचारी पत्करून शांत राहणे भाग होते. कारण नेहमी रेशन दुकानात चारी साखरेसाठी जावं लागत असे. त्यानं फटकन् देणं बंद केलं तर ?' हा प्रश्न होता, पुन्हा आज नाही, चार आठ दिवसांनी का होईना परत त्याच्या दारी जाणं भाग होते. कुपनावरचे गहू घेण्यासाठी, अनेकदा तर शर्माच ते गहू विकत घेत असे. अथातच पडत्या भावानं, राधूची वा इतर गावक-यांची त्याबद्दल काही तक्रार नसे. | दम खात, अडखळत आपली शक्तिविहीन कुड़ी खेचत ठकुबाई आपल्या भावासंगे कशीबशी रांजणीला पोचली, तेव्हा ऊन उतरणीला लागलं होतं. आणि तिथलं नालाबंडिगचं काम संपायला आलं होतं. ठकुबाईनं मैनाच्या आधारानं तिथल्या एका झाडाखाली गलितगात्र होऊन बसकण मारली. | राघू तिथल्या मुकादमाकडे गेला. कामावरचा, कृषी सहायक केव्हाच तालुक्याला निघून गेला होता. राघूनं तहसीलदाराचं पत्र मुकादमाला दिलं, ते वाचून तो म्हणाला, "पण मंगळवारीच हप्ता सुरू झाला. हजेरीपटावर त्याच दिवशी नावं लिहिली जातात. आता पुढच्या मंगळवारी ये...!" 'नाय मुकादमदादा, म्या लई लांबून आलो हाय... आनी विसपुते सायेबांनी तुमास्नी त्यांचं नाव सांगाया सांगितलंय. तेंच्या पंचायतीमार्फत अर्ज दिलाय कामासाठी तवा --! भूकबळी / ५५ 'अच्छा - अच्छा तूही आता हमानं काम मागतो आहेस' मुकादम त्याच्याकडे आरपार संशयानं पाहात म्हणाला, 'ठीक आहे, आजचं तर काम संपलं. उद्या सकाळपासून घेतो तुला कामावर.' त्या रात्री तिथंच झाडाखाली ते कुटुंब झोपलं, सकाळ होताच तयार होऊन ते मुकादम येण्याची वाट पाहू लागलं. | मुकादम व कृषी सहायक एकदमच आले, तोवर सारे मजूर कामासाठी जमा झाले होते. त्याच वेळी ज्या शेतात नाला बंडिंगचं व सपाटीकरणाचे काम चालले होतं, त्याचा मालक आला आणि म्हणाला, 'रामराम साहेब, आजपासून काम बंद करा. मला इथे उन्हाळी भुईमूग घ्यायचं आहे, त्यासाठी पंचायत समितीनं बियाणे व खताची पिशवी पण दिलीय. विहिरीत थोडे पाणी आहे, त्यावर घेण्यासाठी शासनाने सांगितलं बघा !' सा-या मजुरांचे चेहरे काळवंडले. राघूच्या पोटात तर धस्स झालं. जमीन सपाटीकरणासाठी शेतक-याची संमती आवश्यक असते, ती नसेल तर काम करता येत नाही. या शेताचा मालक महादेव चेडे पाटलाला उन्हाळी भुईमूग घ्यायचा होता तेव्हा काम बंद करणे क्रमप्राप्त होतं. कृषी खात्याच्या नवीन धोरणाप्रमाने एका काऊडेपमध्ये नालाबंडिंग, जमीन सपाटीकरण ही कामे घेता येत असत. यापैकी या गावच्या एकमेव काऊडेपमधल नालाबंडिंगचं काम नुकतचं संपलं होतं व मंगळवारपासून चेडे पाटलाच्या जमिनीतले सपाटीकरणाचे काम चाललं होतं व आता ते काम त्यांच्या संमतीअभावी बंद ठेवण भाग होतं. रांजणीत दुसरा काऊडेप नसल्यामुळे त्या गायी आता रोजगार हमीचं काम संपुष्टात आलं होतं. राघू, मैना व ठकुवाई सारेच सुन्न झाले. काल दिवसभर वणवण करीत जवळपास सहा कि. मी. अंतर पायी मोठ्या जिकिरीनं तुडवलेलं, रात्री केवळ पाण्यावर पोटं मारून झोपली होती. आज मात्र काम नसल्यामुळे पुन्हा तेवढंच जीवघेणं अंतर परत तुडवीत गावी जाणं आलं. हातावर पोट असलेल्यांना फारसं बोलता येत नाही की आपल्या भावनांचे - प्रदर्शनही करता येत नाही. परिस्थितीचं भान कधीही हरवत नाही. राघूनं परतायच ठरवून त्याप्रमाणे परतीची वाट धरली. | कालच्यापेक्षा आज ठकुबाईला जास्ती त्रास होत होता. अंग चांगलंच तापले होत, सारेजण तीन - चार दिवसापासून उपाशी होते, ते त्याही आधी दोन दिवस पाणी! पाणी!! / ५६ ________________

जेवले नव्हते. कारण जंगली पाला उकडून खाल्ल्यामुळे पोट दुखत होते. चालण्याचे श्रम व अंगात मुरलेला ताप यामुळे एक एक पाय उचलणं तिच्या जीवावर येत होतं. आणि दोन - एक किलोमीटर अंतर त्यांनी जेमतेम कापलं असेल नसेल, साधी ठेच लागल्याचे निमित्त होऊन ठकुबाई अडखळून पडली आणि राघू मैना तिच्याकडे धावले. तिचं डोकं रस्त्यावरच मैनेनं आपल्या मांडीवर घेतलं, ठकुबाई नुस्ती तडफडत होती ! 'दादा, वयनी, लई तरास होतोय. म्या आता नाय जिंदा हात न्हाय आन् तेच बरं हाय म्या अशी कपाळकरंटी तुमास्नी भार!' | ‘असं बोलू नये ठकुमाय, तू मह्या पाठची भण - आगं, जीवात जीव हार्य तोवर म्या सांभाळीन तुला. आसं बोलू नये - जरा दम खा इथंच!' राघू कळवळून म्हणाला. जवळच एक वडाचं जंगली झाडं होतं, तिच्या सावलीत त्यानं व मैनानं तिला आधार देत आणलं व फडतरावर निजवलं, 'म्या पानी आनतो, जरा दम खा. ऊन कमी जालं म्हंजे निघू गावास्नी.' | पाणी प्याल्यामुळे व विश्रांतीमुळे ठकुबाईचं कण्हणं जरा कमी झालं होतं; थोड्या वेळानं तिचा डोळा लागला. तिच्या बाजूलाच मैनाही जरा लवंडली राघू समोर खेळणा-या मुलांकडे लक्ष देत गुमान बसून राहिला. । | उन्हें उतरत होती तेव्हा मैना उठली आणि सहज म्हणून तिनं ठकुबाईच्या कपाळावर हात ठेवला, मघाशी चटके देणारं कपाळं आता थंडगार पडलं होतं. ती चरकली, तिच्या मनात भीतीची शंका उमटली व ती किंचाळली, ‘धनी, जरा इकडं या पगा, पगा - ननंदबाईचं कपाळ आक्षी थंडगार लागतंया, राघूनं पुढे होऊन ठकुबाईच्या कपाळावर हात ठेवला, तिचा हात हाती घेतला आणि गदगदून म्हटलं, 'कारभारणे, आपली ठकुमाय गेली - मेली गं...' तहसीलदार शिंदे सुन्न झाले होते. सकाळपासून त्यांना छळणारी टोचणी अधिक तीव्रतेने दंश करू लागली होती. । राघू सांगतांना अडखळत होता, थांबत होता, एवढं एका वेळी प्रदीर्घ बोलायची त्याला सवय नव्हती. शब्द आठवत नव्हते आणि बहिणीच्या आठवणीनं तो गदगदून येत होता, पण डोळे कोरडे होते! नजर सुन्न होती...! 'ऐकलंत ना रावसाहेब । - सरळ सरळ भूकबळीचा प्रकार नाहीतर काय आहे!' विसपुते म्हणाले, 'त्या दिवशी म्हणजे परवा एका पत्रकार मित्राला घेऊन मी भूकबळी / ५७ चाललो होतो. रस्त्याच्या शेजारी हा राघू व त्याचे कुटुंब भेटलं ठकुथाई तिच मृतावस्थेत पडलेली...!' वर्तमानपत्रात 'ठकुबाईचा भूकबळी' या मथळ्याखाली आलेल्या बातमीचा उलगडा आता शिंद्यांना झाला होता. त्यांच्या नजरेसमोर न पाहिलेल्या ठकुबाईचा चेहरा भूक आणि वेदनेचं रूप घेऊन येत होता आणि त्यांचं मन अस्वस्थ बेचैन होत होतं! पण त्यांना असं स्वस्थ बसून भागणार नव्हतं. प्रयलपूर्वक त्यांनी मन शांत केलं आणि पेशकाराला बोलावून सांगितलं, 'जीप घेऊन जा - काळगावच्या दुकानदाराला गाडीत घालून आणा...! तसंच त्यांनी भालेरायला सांगून तालुक्याचे दोन्ही डेप्युटी इंजिनिअर वंडिंगचे मृदसंधारण अधिकारी यांना फोन करून बोलावून घेण्यास सांगितलं. इरिगेशनचे डेप्युटी इंजिनिअर पाटील रामपूरला राहात व इथे तालुक्याला येऊन - जाऊन करीत. आजही ते अपेक्षेप्रमाणे कार्यालयात नव्हते. कसल्यातरी मिटिंगसाठी जिल्ह्याला गेले होते. त्यांचा ऑफिस सुपरिंटेंडंट आला व त्यानं हे सांगितलं. "पण सर, काळगावचं तर काम सुरू झालं आहे. तिथं मजुरांची उपस्थिती फारच कमी आहे. तिथे हे आले असते तर हा प्रकार झाला नसता!' शिंदे चकित व त्याचबरोबर उद्विग्न झाले! राघूच्या गावातच बंद पडलेल्या । पाझर तलावाचं काम सुरू होतं आणि तरीही त्यांनी राघू व त्याच्या मृत झालेल्या बहिणीला रांजणीला पाठवलं होतं व चालत्याचे श्रम सहन न होऊन ती वाटेतच मेली होती. त्यांनी क्षुब्ध नजरेनं भालेरावकडे पाहिलं, तसे ते चाचरत म्हणाले, 'सर, मागच्या आठवड्याच्या चकली रिपोर्टमध्ये काळगाय दिधीचं पाझर तलावाचं काम बंद असल्याचे पाटील साहेबांनीच दाखवलं होतं. ‘बरोबर आहे सर-' इरिगेशनचा ऑफिस सुपरिंटेंडंट मान खाली घालून म्हणाला, 'काम मागच्या आठवड्यात सुरू झालं होतं. त्यासाठी पाटील साहेब गावात गेले होते. संबंधित शेतक-यांची समजूत घालून संमती घेतली व काम सुरू केलं होत ‘पण वीकली रिपोर्टमध्ये ते का आलं नाही'? आवाज चढवीत शिंदे म्हणाले. ‘त्याचं असं आहे सर, काम सुरू झाल्याचं मला ऑफिसमध्ये माहीत नव्हत, मागच्या गुरुवारी काम सुरू करून पाटील साहेब डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टरला इ. इ. साहेबांनी बोलवलं म्हणून परस्पर गेले. शनिवार - रविवार सुट्टी होती जोडून - ते थेट सोमवारीच आले, पण दर शुक्रवारी रिपोर्ट करायचा असतो आपल्याकडे कामाचा, म्हणून मी मागच्या आठवड्यात रिपोर्ट तसाच रिपीट केला...' पाणी! पाणी!! / ५८ | शिंद्यांनी वैतागानं आपली मूठ टेबलावर आदळली, पण त्यामुळे त्यांच्या हाताला झिणझिण्या आल्या एवढंच. ते हतबुद्ध होऊन ऑफिस सुपरिंटेंडंटकडे पाहात राहिले. | दर आठवड्याला शुक्रवारी सांयकाळपर्यंत कलेक्टर ऑफिसला रोजगार हमी कामाचा आठवडी अहवाल तहसीलदारांना सादर करणे बंधनकारक असते. त्यासाठी सर्व कार्यपालन यंत्रणांनी गुरुवारी सायंकाळी किंवा शुक्रवारी सकाळी त्यांच्या खात्यामार्फत कोणती रोजगार हमीची कामे चालू आहेत व कोणती बंद आहेत हे लेखी कळवायचं असतं. बरयाच वेळी प्रत्यक्ष काम करणा-या मस्टर असिस्टंट किंवा ज्युनिअर इंजिनिअर्सकडून वेळेवर अहवाल प्राप्त होत नाहीत, म्हणून मागच्या आठवड्याचा रिपोर्ट रिपीट केला जातो. इथं हाच प्रकार घडला होता. प्रत्यक्ष काळगाव दिघीत वर्षापासून बंद पडलेलं पाझर तलावाचं काम सुरु झालं होतं. तरीही त्याची माहिती कार्यालयात वेळेवर न आल्यामुळे ते काम बंद असल्याचं साप्ताहिक अहवालात नमूद केलं गेलं. ही माहिती तपासण्याची यंत्रणा तहसीलदाराकडे नसते, त्यामुळे कार्यालयात यंत्रणेची माहिती ग्राह्य धरून जिल्ह्याला व जिल्ह्यातून शासनाकडे अहवाल पाठवला जातो. | ‘इथंही नेमकं हेच घडलं होतं काम चालू असूनही माहिती न प्राप्त झाल्यामुळे ते काम बंद आहे' असं अहवालात नमूद केलं गेलं आणि त्या माहितीच्या आधारे राघूला रांजणीला दूरवर कामावर जाण्यासाठी शिंद्यांनी हुकूम दिला होता. त्याच्या गावात काम सुरू होतं, पण ते कुणालाच माहीत नसल्यामुळे राघूला व त्याच्या बहिणीला रांजणीला बरं नसताना जावं लागलं होतं. जर काळगाव दिघीचं काम सुरू असल्याचं माहीत झालं असतं, तर राघूच्या बहिणीला सहा किलोमीटर रांजणीला जाण्याचे व परत येण्याचं काम पडलं नसतं व कदाचित तिचा बळीही गेला नसता. त्याच वेळी बंडिंगचे गोसावी आले त्यांनी राघूनं जी माहिती रांजणीच्या कामाबद्दल सांगितली होती तिला दुजोरा दिला. त्यांचाही काही दोष नव्हता, असेल तर परिस्थितीचा व ठकुबाईच्या गरिबीचा होता. | शिंद्यांची मात्र घुसमट होत होती. मनोमन ते विलक्षण क्षुब्ध होते. जिवाला तीव्र टोचणी लागून राहिली होती. या भूकबळीला एक शासकीय अधिकारी म्हणून मीच जबाबदार आहे. भूकबळी / ५९ एका घंटयामध्ये जीप परत आली. आणि तहसीलदारांच्या चेंबरमध्ये हात जोडीतच शर्मा दुकानदाराने प्रवेश केला, 'जय रामजी की! त्यांच्यासमवेत गावचे सरपंच होते. शिंद्यांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतलं. शर्माला पाहताच त्यांचा सारा क्षोभ व संताप उफाळून आला, 'लाज वाटली पाहिजे तुम्हाला शर्माजी, खुशाल आठ आठ दिवस दुकान बंद ठेवता, मजुरांना कुपनावर धान्य देत नाही - होत नसेल दुकान चालवणं तर राजीनामा द्या!' 'रावसाहेब, माझं दुकान बंद नव्हतं. माझ्या मुनिमाकडे माझ्या गैरहजरीत दुकान चालवण्याचे अधिकारपत्र आहे. मी बालाजीला गेलो असता त्यांनी काळगाव दिघीमध्ये वाटप केलं होतं. पाहिजे तर तुम्ही रेकॉर्ड तपासा, या सरपंचांना विचारा हुजूर... आम्ही कधीही दुकान बंद ठेवलेलं नाही. रोज वाटप चालू आहे. राघू कधी दुकानावर आलाच नाही!" पुन्हा एकदा तीच हताशता शिंद्यांना जाणवली. शर्मानी रेकॉर्ड नीट ठेवलं असणार यात काहीच शंका नव्हती. पुन्हा त्यांना सरपंचाची साथ होती, त्यामुळे तपासात दुकान बंद होतं हे निष्पन्न होणं रेकॉर्डवर तरी शक्य नव्हतं. त्याचं दुकान सस्पेंड केलं तरी काही दिवसांनी तो सहसिलामात खात्रीपूर्वक सुटला असता...! 'आणि हुजूर, बोरसरचं दुकान नुकतंच आपण सस्पेंड केलंय. ते काळगाव दिघीला म्हणजे माझ्या दुकानाला जोडलंय - ते पत्र परवा तलाठ्यानं आणून दिलय मुनिमाकडे - पत्राच्या ओ. सी. वर त्यांची सही व तारीख आणि तलाठी अप्पाचा तामिली रिपोर्ट पहा - त्याप्रमाणे काल त्यांनी चलनानं पैसे भरले व आज गोडाऊनकडे मेटॅडोर पाठवलाय साहेब धान्य आणण्यासाठी...!' शर्माच्या राज्यात सारं काही आलबेल होतं, हाच याचा मथितार्थ होता. शिंद्यांना काही बोलणं शक्य नव्हतं. ते सारे गेल्यानंतर भालेराव म्हणाले, 'सर, मी वयाच्या वडिलकीनं सांगतो. आपण एवढा त्रास करून घेऊ नका जिवाला. तुमचा काहीएक दोष नाही. प्रत्येक कार्यकारी यंत्रणेचे काही नियम असतात, त्याप्रमाणे ते काम करतात. रांजणीला कुटुंब राहिलं असतं तर हा प्रकार घडलाही नसता, पण शेतक-यांनी अडविल्यावर जबरदस्तीन कामही करता येत नाही - पाटील साहेबाविरुद्ध रिपोर्ट करता येईल - पण त्यांच्या खातेनिहाय चौकशीत ते जरूर सुटतील!' पाणी! पाणी!! / ६० | ‘भालेराव, ते सारं खरं, पण ठकुबाई उपासमारीनं मेली हे सत्य काही नाकारता येणार नाही आय फिल गिल्टी - मला विलक्षण शरमिंदं वाटलं....!' “आपण नुकतेच या खात्यात आला आहात सर! हा पहिलाच क्रायसिसंचा प्रसंग आहे, पण इथं टफ झालंच पाहिजे. आणखी एक सांगतो, माझ्यापुढे म्हणालात पण चुकूनही यानंतर कुणापुढे ठकुबाईचा भूकबळी झाला असं म्हणू नका - ती अतिश्रम, आजारानं मेली, असाच आपण रिपोर्ट द्यायचा, मी तो तयार करतो व तो सारे जण मान्य करतील - कोणीही आक्षेप घेणार नाही, याची मी गॅरंटी देतो...!' भालेरावांनी तयार केलेला अहवाल वाचताना शिंद्यांचं मन त्यांना सांगत होतं, 'हे पांढ-यावर केलेलं काळं आहे, हा शब्दांचा खेळ आहे, रंगसफेदी आहे - खरं एकच आहे - ठकुबाईचा भूकबळी पडला आहे...!' पण मन आवरीत त्यांनी त्या रिपोर्टवर स्वाक्षरी केली. ‘सर, मी स्वतः हा अहवाल घेऊन कलेक्टर साहेबाकडे जातो व त्यांना सविस्तर माहिती देतो. तुम्ही रेस्ट घ्या. तुमच्या मनावर बराच ताण पडलेला आहे...! भालेराव जीप घेऊन कलेक्टरांकडे गेले व शिंदे घरी परतले. ‘किती उशीर हा कान्त? भूक लागली असेल ना? मी अन्न गरम करते....' ‘नको रेणू. मला जरा पडू दे शांतपणे. मग पाहू जेवणाचं. डोकं सुन्न झालं आहे...!' शांतपणे रेणू त्यांच्याजवळ आली व त्यांना तिनं पलंगावर झोपवलं व बाम घेऊन त्यांचे कपाळ आपल्या नाजूक - गो-यापान हातांनी हळुवारपणे चोळू लागली. | तिचं निकट सान्निध्य व तिचा हळुवार स्पर्श मात्र आज त्यांच्या क्षुब्ध मनाला सांत्वना देण्यास असमर्थ होता. तिचा गोरापान हात पाहाताना न पाहिलेल्या ठकुबाईचा वाळलेला कष्टानं रापलेला हात त्यांच्या नजरेसमोर येत होता. ...आणि जागच्या जागी अस्वस्थपणे ते क्षणाक्षणाला कूस बदलत होते, वा हात आपल्या कपाळावर घट्ट दाबून धरीत होते... तरीही ते शांत होत नव्हते. त्यांचा क्षोभ कमी होत नव्हता...! D भूकबळी / ६१ ५. खडकात पाणी कराड सुटल्यापासून बसमध्ये आपला नवरा अस्वस्थ आहे, आपल्याशी एक चकार शब्दानंही बोलत नाही, हे सुनंदाच्या लक्षात आलं होतं. पण ठासून भरलेल्या बसमध्ये जून महिन्याच्या रणरणत्या उन्हात कुकरमध्ये बटाटे उकडावेत तशी माणस गदगदत होती. सतत कपाळाचा घाम पुसून सुनंदा रडवेली झाली होती. तशात अंगात लग्नाची नवी कोरी वस्त्रं घामानं घट्ट चिकटलेली. त्यामुळे जीवाची तगमग होत होती. आईनं पाण्याची बाटली भरून दिली होती, पण त्यातलं गरम झालेलं पाणी कोरड पडलेल्या घशाची पिपासा जास्तच वाढवत होतं. | डोंगर कापीत नागमोडी वाटांनी एस. टी. बस धावत होती. समृद्ध, हिरवा ऊस शेतीनं बहरलेला कराड तालुका मागे पडला होता. आता दुर्गम, दुष्काळी माणप्रांत सुरू झाला होता. एका तासात म्हसवड येईल. तिथून बैलगाडीनं आकाशवाडीला-सासरी जायचं आहे. कसं असेल आकाशवाडी गाव? जिथं आपल्याला उभा जन्म काढायचा आहे? खडकात पाणी / ६३ नव-याकडे तिनं पाहिलं. सदानंद डोळे मिटून बसलेला होता. तिला वाटलं हलकंच त्याला हलवावं आणि विचारावं... मनात दाटून आलेलं! आपली हुरहूर... आपली भीती... सदाला तिची अवस्था माहीत होती. पण तरीही तिच्याकडे दुर्लक्ष करणंच त्यानं पसंत केलं होतं. तिच्या मनात अनेक प्रश्न आहेत, तिला आपल्याला काही विचारायचं आहे, हे सदाला माहीत होतं. पण तिच्या त्या प्रश्नांची उत्तरं आपणाकडे नाहीत हेही त्याला पक्कं ठाऊक असल्यामुळे तिच्याशी तो बसमध्ये बसल्यापासून बोलायचं टाळत होता. तिला आपणहून थेटपणे सत्याला - वास्तव परिस्थितीला सामोरं जाऊ दे असंच त्यानं ठरवून टाकलं होतं. | मांडवपरतणीसाठी बायकोला घेऊन जाण्यासाठी सदा कराडला परवा आला होता. दोन रात्री शृंगाराच्या खेळीतही तो मनोमन अस्वस्थ बेचैन होता. कारण समोरच्या खिडकीतून कृष्णा-कोयनेचा संगम व चांदण्यातलं चमचम करणारं पाणी तो पाहात होता आणि त्याच वेळी आपल्या आकशवाडीचा कोरडा टिपूस पडलेला तलाव आठवत होता. पाण्याचे दुर्भिक्ष आठवत होतं. टैंकरपुढे पाण्यासाठी उसळणारी गर्दी दिसत होती आणि सुनंदेचं नदीचं वेड स्मरून तो व्याकूळ होत होता. दोन्ही दिवस तिनं त्याला फिरायला नेलं ते संगमावरच. जूनचा पहिला आठवडा असूनही तिथं पाणी खळाळत होतं. मध्येच अवकाळी पाऊस दणकून झाला होता, त्यामुळे पाणी चांगलं होतं. त्याच्या डोळ्यात खळ्ळ्कन पाणी आलं होतं. आपण दुर्दैवी, आपलं गांव दुर्दैवी..... ज्याप्रमाणं विकासानं - समृद्धीनं आपल्या डोंगराच्या माथ्यावर पसरलेल्या, पठारात वसलेल्या आपल्या गावाकडे पाठ फिरवली आहे, तशीच निसर्गानंही. कोणत्या शापाचं ओझं आपले गांववाले शतकानुशतके वागवत आहेत की, का म्हणून? का? नदीकाठी सुनंदा लहान बाळ खेळणी दिसताच जसं फुलारून येतं, तशी उत्फुल्ल झाली होती. नदीकाठावर वय आणि नुकतंच झालेलं लग्न व सोबत असलेला नवरा विसरून धांवली होती, पाण्यात भिजली होती आणि त्यालाही तिनं धीटपणान भिजवलं होतं. पाणी! पाणी!! / ६४ ही सुनंदा वेगळीच होती. घरी सलञ्जतेनं वागणारी, आपल्या पुराणिक . वडिलांच्या मर्यादित वावरणारी सुनंदा ही नव्हती. ही होती निसर्गाशी एकरूप झालेली एक लसलसती देहवेल! सदासाठी हा अनुभव अनोखा होता. त्यानं आकाशवाडीच्या शाळेत मुलांना अनेक निसर्गकविता शिकवल्या होत्या 'निर्झरास - माझ्या गोव्याच्या भूमीत • पाऊस कधीचा पडतो...' पण त्यातलं सौदर्य, जिवंतपणा व एकतानता त्याला आज सुनंदाच्या रूपानं साकार होताना दिसत होती. आज सकाळी सासरेबुवांनी दोघांना संगमावर पाठवून नदीची विधिवत पूजा बांधायला सांगितली होती. ही त्यांच्या घराण्याची रीत होती. तेव्हा सुनंदानं सचैल स्नान केलं होतं, त्यालाही करायला लावलं होतं. त्या थंडगार पाण्याच्या स्पर्शानं तो रोमांचित झाला होता, तृप्त झाला होता. पण त्याच वेळी अतृप्तीची धारदार सुरी त्याला चराचरा कापीत होती.... तिच्या मिठीत खिडकीतून रात्री चमचमणारं चंदेरी पाणी पाहाताना अंगावर उठलेले रोमांच व आज सकाळची नदीची विधिवत पूजा-याच दोन दृश्यमालिका सदाच्या मनःपटलावर आळीपाळीने उमटत होत्या. आकाशवाडीत असं स्नानाचं मनसोक्त सुख गेली कित्येक वर्षे आपल्या वाट्याला आलं नाही. असे चवदार मधुर पाणी जिभेला तोषवून कधी गेलं नाही. कारण आकाशवाडीचं तळं म्हणजे पठाराच्या मध्यभागी नैसर्गिकरीत्या पडलेला मोठा खड़ा होता. त्यात पावसाळ्यात पाणी साठायचं. ते यथावकाश निवळायचं, मग ते पाणी आकाशवाडी आठ महिने पुरवून पुरवून प्यायचं. दर उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष... मग टैंकरसाठी प्रयल... तो रोज येणं म्हणजे भाग्याची परमावधी. त्याच्यापुढे उडणारी झुंबड... दोन घागरी पाणी पदरात पडणं म्हणजे लढाई मारल्याचा आनंद होता. कसं होणार सुनंदेचं आकाशवाडीत? कालपरवापर्यंत ही नदीकाठी वाढलेली जलकन्या पाण्याच्या अभावानं, जलाविना माशाप्रमाणे तडफडेल... नेमकं आपलं लग्नही मेअखेरीस झालेलं. या माणप्रांतात पाऊस पडायला जुनअखेर किंवा जुलै उजाडतो. आल्या आल्या हिनं घामानं चिक्क झालेलं अंग मोकळे करण्यासाठी स्नान करण्याची इच्छा व्यक्त केली, तर पाणी घरी असेल का? ही तर माहेरी उन्हाळ्यात तीन-तीनदा स्नान करते. आजही सकाळी सचैल न्हाली, मग संगमावर पुन्हा पाण्यात डुंबली... खडकात पाणी / ६५ हा भर दुपारचा कडक उन्हातला प्रवास-जीवाची लाही लाही होतेय. आपल्याला या कडक उन्हाची व दोन दोन दिवस स्नान न करण्याची सवय आहे पण सुनंदाचं काय?- | या प्रश्नाचं सदाकडे उत्तर नव्हतं - म्हणूनच बसमध्ये तीन-साडेतीन तासांच्या प्रवासात तो तिच्याशी एक चकार शब्दानंही बोलला नव्हता. म्हसवड फाट्यावर आपले हळदीने माखलेले पाय घेऊन सुनंदा उतरली, तेव्हा दुपारचे तीन वाजले होते. तेथे एका कोप-यात छप्पर घातलेली वैलगाडी उभी । होती. सदाच्या हातातून ट्रंक व तिच्या हातातली वळकटी घेणारा हा आपला दीर असावा, हे तिनं अनुमानानं ताडलं. त्या भर उन्हात गरम चहा घेणं तिच्या जीवावर आलं होतं. तिनं हळूच नव-याला विचारलं पण होतं, 'इथं चहाऐवजी सरबत नाही का मिळणार थंडगार?" त्यानं तिच्याकडे रोखून पाहिलं. क्षणभर ती भेदरली... आपण दीर व इतर लोकांसमोर त्याला बोललो हे त्याला आवडलं नाही का?... अशी तिच्या मनात शंका आली. सदाच्या नजरेत व्याकुळला दाटून आली होती. क्षणभर काय बोलावं हेच त्याला सुचेना. मग तो हलकेच म्हणाला, 'सुनंदा, हा दुष्काळी प्रांत आहे. इथं लिंबू दुर्मिळ आहे. झालंच तर इथं बर्फ कुठून आणायचा?' 'रांजणातलं थंड पाणीही चालतं की, लिंबू नसेल तर कैरीचे पन्हं.' ती पुन्हा भाबडेपणानं बोलली. पुन्हा तो स्तब्ध. “कसं सांगायचं हिला? आमच्या गावात पाणी वाया जाऊ नये म्हणून पंचायतीनं रांजण किंवा माठ वापरायचे नाहीत, असा ठराव केला आहे." हा डोंगराळ माळ मुळातच निष्पर्ण आहे, झाडी बेताची, आंब्याची झाडे फारच कमी. जी आहेत, त्याच्या केल्या व आये जिल्हा बाजारात विक्रीला जातात. कारण नापीक शेती - बाजरीखेरीज या खडकाळ भूमीत काही पिकतच नाही. तेव्हा कैरी या अंब्याच्या विक्रीतून सुटणारा पैसा प्रपंचाला - मीठ - मिर्चीला तेवढाच हातभार लावतो... तुझ्या घरीच कितीतरी दिवसांनी सरबत घेतलं...!' पाणी! पाणी!!/ ६६ ‘इथं सरबत मिळत नाही.' एवढंच त्यानं रुक्षपणे उत्तर दिलं. मग तिला नाइलाजानं तो कढत चहा घशाखाली उतरवावा लागला. तो गुळाचा चहा होता, ती तो प्रथमच पीत होती. त्याची चव तिला कशीशीच लागली! ‘ते आपलं गांव बघ सुनंदा. बैलगाडीचा ऊन लागू नये म्हणून लावलेला पडदा सारीत सदानं तिला हातानं डोंगरमाथ्याकडे दाखवलं. त्या विस्तीर्ण मैदानी प्रदेशात तो डोंगर ताठ उभा होता. त्याच्या माथ्यावर पठार होतं. त्या पठारात आकाशवाडी वसली होती. | हे सारं तिला नवलाचं वाटत होतं. त्याचबरोबर मनात एक अनाम ताणही होता. त्याचं नेमकं स्वरूप तिला कळत नव्हतं. त्याला विचारावं, तर धाडस होत नव्हतं. कारण बैलगाडीत दीर होता, गाडीवान होता. | ‘शंकर, सासरेबुवांनी पाच वाजून पाच मिनिटांनी गावात जोडीनं प्रवेश करावं असं सांगितलं आहे. सदा आपल्या भावाला म्हणाला.' ते ज्योतिष जाणतात. त्यांचं म्हणणं असं आहे की, आजची सात जूनची ही वेळ शुभशकुनाची आहे. तेव्हा इथंच थोडा वेळ आपण थांबू.' तिचा दीर व गाडीवान बैलगाडी थांबवून खाली उतरले व एका बाभळीच्या किचित छाया देणाच्या झाडाखाली खांद्यावरचा गमचा टाकून गप्पा मारीत बसले. गाडीत ते दोघेच होते. निःशब्द. ती मान खाली घालून गुडघे मोडून बसलेली, तर तो पाय लटकावीत बसलेला... आपल्या गावाकडे दुरून पाहात बसलेला. | ‘हा आपला स्वभाव नाही आपण आजच असे पुन्हा पुन्हा व्याकूळ का होत आहोत?-' तो विचार करीत होता. आपलं आकाशवाडी म्हणजे माणप्रांतातल्या इतर कुठलाही गावापेक्षा आकाशाला जवळचं. कारण ते उंच डोंगरावरील पठारात वसलेलं; पण इतर गावांशी फटकून वागणारं - अलग राहाणारं. लग्नाला आलेल्या मुंबईच्या कापड गिरणीत काम करणा-या आपल्या मावसभावानं काय बरं शब्द वापरला? हा डिटंच... सर्वांपासून तुटलेला. आपल्या या गावची, सान्यांची वृत्ती अशीच आहे डिटॅच, त्याला आपणही अपवाद नाही. भावनेची गुंतवणूक परवडत नाही; कारण दुष्काळ व दुर्भिक्षाला तोंड देता देता जगणं हेच मुळी कठीण आहे. मग अशा भरल्या देहाला शोभणा-या मन-मानसाच्या गोष्टी कशा परवडणार? खडकात पाणी / ६७ याच्या उलट आहे सुनंदाचं आजवरचं व्यतीत झालेलं जीवन, समृद्ध कराडला तिचं आयुष्य गेलं. नदीकाठच्या देवळाचे तिचे वडील पुराणिक, खाऊनपिऊन सुखी. खरं तर तिथंच कुठेतरी तिला उजवायची, पण लग्नगाठी स्वर्गात पडतात, असं जे म्हटलं जातं ते खोटं नाही म्हणायचं. त्याखेरीज का ती आपल्याला सांगून आली? दोधांचा कडक मंगळ ही एकच बाब हे लग्न जुळायला कारणीभूत ठरली. कशी जुळवून घेईल ही आकाशवाडीत? तिला माहीत आहे का बाजेवरची आंघोळ? वाजेवर बसून स्नान करायचं व स्नानाचं पाणी टोपलीत साठवायचं, ते मग वापरण्यासाठी उपयोगात आणायचं ! ...सदाला आपल्या विचारांचा भार पेलेना. तो खाली आला व आपल्या भावाकडे गेला आणि गप्पांत स्वतःला रमवू लागला. पावणेपाचला त्यांची बैलगाडी आकाशवाडीकडे चालू लागली. ‘दादा, आजचा दिवस शुभ खरा. कारण आज मृगाचा पहिला दिवस!' शंकर म्हणाला. । 'खरंच की, आज सात जून! मृगनक्षत्राचा पहिला दिवस. पावसाचा दिवस पण छे - या भागात गेल्या कित्येक वर्षात या दिवशी पाऊस झाला नाही. तो येतो जूनअखेर किंवा जुलैमध्ये... ‘पण पाऊस थोडाच पडणार आहे शंकर...!' किंचित खिन्न हसत सदा म्हणाला. ‘पडेलही. आमच्या वहिनीचा पायगुण म्हणून...' शंकर आपला अधोमुख वहिनीकडे पाहात म्हणाल्या.' आपल्या आकाशवाडीत आपल्या पिढीत भरपूर पाण्याच्या भागातून आलेली एकच सून आहे, ती म्हणजे आमची वहिनी.. देव करो व तिच्या पायगुणानं पाऊस पड़ो!' सदा मांडवपरतणीसाठी कराडात गेल्यावर गावात बेडकाची यात्रा काढली होती. त्या दिवशी टैंकर आला होता त्या पाण्यानं सचैल स्नान करून पांच सुवासिनीसह बेडकाची यात्रा काढून देवीच्या मंदिरात पावसासाठी प्रार्थना केली होती. दरवर्षीचा आकाशवाडीचा तो रिवाज होता. कारण पावसावरच त्यांचं सारं काही अवलंबून होते. पाणी! पाणी!! / ६८ शकंरला जेव्हा आपली वहिनी कराडची आहे हे समजलं होतं, तेव्हा त्याच्या मनात हाच विचार तरळून गेला होता. आताही बोलताना सहज ते ओठातून बाहेर पडलं होतं. सदा पुन्हा खिन्न हसला - आपल्या सा-यांच्या बोलण्या - चालण्यात पाण्याचे संदर्भच ठासून भरलेले आहेत. | सुनंदानं ते ऐकलं आणि तिच्या मनावर जो न समजणारा ताण मघापासून पडलेला जाणवत होता, त्याची दिशा स्पष्ट झाली होती. पुराणिकाची मुलगी आपण: बाबांनी पसंत केलेल्या मुलाचा गळ्यात डोळे झाकून माळ टाकली. पण तो प्राथमिक शिक्षक आहे. मॅट्रिक करून डी. एड. झाला आहे व बाहेरून बी. ए. करतो आहे, ही माहिती तिला सुखावून गेली होती. आठवीनंतर बाबांनी आपली शाळा बंद केली. नव-याची मागेपुढे तालुक्याच्या गावी बदली झाली तर शिकताही येईल.. तो शिकवेल आपल्याला... ही कल्पनाच तिला बेहद्द आवडली होती व मनाला गुदगुल्या करून गेली होती. पण नव-याच्या आकाशवाडीत पाण्याचे दुर्भिक्ष आहे, हे समजताच तिचा विरस झाला होता. जाणत्या वयापासून खळखळा वाहणारी कृष्णामाई तिची मैत्रीण होती. तिला या लग्नामुळे अंतरावं लागणार व अशा गावी जावं लागणार - जिथं सधा पाणीटंचाईमुळे टैंकर चालू आहे - हे नवग्याच्या आपल्याशी व बाबाशी झालेल्या संभाषणात तिला समजून आलं होतं आणि मनावर ताण पडला होता. तो आता दिराच्या बोलण्यानं पुन्हा जास्तच ताणला गेला होता. ‘उगी भाबडी आशा आहे ही शंकरा.' सदा म्हणाला ‘पायगुण वगैरे झूट । आहे - हा निसर्गाचा शाप आहे बाबा - आपलं गावच कमनशिबी आहे.' 'बरं ते जाऊ दे. गावात तुझ्या शाळेचा बँड घेऊन गावची पोरं व इतर मंडळी स्वागताला सञ्ज आहेत!' शंकरनं माहिती पुरवली. “अरे, पण मी का पुढारी - अधिकारी आहे बँड वाजवून माझं स्वागत करायला? झालंच तर - लग्न करणं म्हणजे काही पराक्रम नाही. ती सान्याचीच होतात.' खडकात पाणी /६९ ‘पण दादा, या गावात जिल्हा परिषदेची शाळा सुरू झाली ती तुझ्यामुळे - चांगले तालुक्याच्या जागी होतास, पण इथं आलास - गावची मुलं शिकावी म्हणून या आकाशवाडीत कोण यायला तयार होतं.? । “अरे, हे माझं गाव आहे. कसंही असलं तरी. मी काही विशेष केलं नाही. ‘पण गावाला वाटतं ना - म्हणून ते तुझ्या व नव्या वहिनीच्या स्वागताला सज्ज आहे. सरपंच - पोलिस पाटील पण स्वागताला येणार आहेत....!' आकाशवाडीच्या सीमारेषेवर शाळेच्या बाजूला सारं गांव जमलं होत. सदानंदचे वडील तात्या, सरपंच व पोलिस पाटील, गावचा रेशन दुकानदार ही खाशा मंडळी होती. शाळा एकशिक्षकी होती, म्हणून तिथे एकच खुर्ची होती ती बाहेर आणून ठेवली होती, तीवर सरपंच बसले होते. बाकीची मंडळी सोयीप्रमाणे उकिडवं बसला होती वा गटागटानं उभी होती. दूर डोंगराच्या पायथ्याशी एक बैलगाडी वर येताना दिसली. ती तरुण पोलिस पाटलाच्या तीक्ष्ण नजरेनं नेमकी टिपली. तो म्हणाला, 'तात्या, मंडळी येताहेत- पंधरा-वीस मिनिटात ते इथं येतील.' तात्यांनी अधू नजरेनं डोळे ताणून पोलिस पाटलानं दाखवलेल्या दिशेनं बराच वेळ पाहिलं, पण मंद दृष्टीला सरपंचानी सजवून पाठवलेली गाडी काही दिसली ना त्यांनी काही वेळानं तो नाद सोडून देत म्हणलं, 'जाऊ दे बाबा नजर आंधळी झाला तू पाहिलंस ना मग ठीक !' ...आणि वा-याची एक सुसाट लाट आली, धुळीचा लोळ उठला. " टळटळीत ऊन मंदावलं. आकाशात ढग आले होते काळे काळे! सरपंचाचा अनुभवी रापलेला चेहरा उजळून आला. आपल्या भर गलमिशा कुरवाळीत ते म्हणाले, 'तात्या म्या काय म्हणलो व्हतो- तुमची " पान्याच्या देशातली - सकुन घिऊन इल - पघा, पघा - आकाशात ढग आल्यत काळे.... आज मिरगाचा दिस.... पाणी पडेलसं दिसतंया........ ‘तुझ्या तोंडात साखर पडो बाबा-' तात्या म्हणाले. 'परवाच्या बेडका यात्रेनंतर काल व आज टॅकरच आला नाही, पाणी नाही..... आज पाऊस पड़ बहर होईल....!' ग आल्येत काळे पाणी! पाणी!! / ७० जमलेल्या सा-या मंडळीत उत्साहाची लाट पसरली. सान्यांच्या नजरा कधी आकाशात दाटी करून आलेल्या ढगाकडे तर कधी दुरून येणा-या बैलगाडीकडे जात होत्या. गाडी सीमारेषेवर आली व थांबली. गाडीतून प्रथम उडी मारून शंकर बाहेर आला व तात्यांकडे जात म्हणाला, 'आम्ही आलो तात्या, पण नव्या वहिनीच्या वडिलांनी बरोबर पाच वाजून पाच मिनिटांनी या गावच्या भूमीवर पाय ठेवायला सांगितलंय जोड्यानी - हा शुभमुहूर्त आहे म्हणे. म्हणून थोडं थांबावं लागेल! | ‘हात तिच्या मारी थांबू की !' सरपंच म्हणाले, 'तात्यो म्या सूनबाईच्या बापाला जानतो. आमचे मोहिते अन्ना त्येंना इचारूनच विलेक्शनचा फॉरम मुहुर्तावर भरायचे......!.. सान्यांची अधिरता उत्कर्षबिंदूला पोचली होती. त्या तृषार्त जनतेला पाण्याच्या समृद्ध हिरव्या प्रदेशातून आलेल्या गावच्या सुनेला पाहायचं होतं... आणि तिचा पायगुण पाहायचा होता. वास मंदावला होता, पण आकाशात ढगांची दाटी झाली होती. बरोबर पाच वाजून पाच मिनिटांनी सुनंदानं त्या आकाशवाडीचा भूमीवर पाय ठेवले. गावक-यांना हिरव्या शालूतली एक नवोठी तरुणी दिसली, त्यांच्या डोळ्यातली हिरवी स्वप्ने गडद करणारी..... तिनं वर आकाशाकडे पाहिलं.... आणि तिच्या तप्त चेह-यावर पाण्याचा एक टपोरा थेंब पडला. ती शहारली...... आणि दूर कुठे तरी वीज कडाडली. आणि भुरभुया पावसाला सुरुवात झाली. काही क्षणांतच पावसाने जोर पकडला. पाहाता पाहाता सारेजण भिजू लागले. सर्वप्रथम भानावर आला तो तरणी पोलिस पाटील. त्यानं लेझीम व लगी घेऊन येणा-या शाळेच्या मुलांना इशारा दिली • 'अरे, बघता काय - वाजवा रे वाजवा...!' खडकात पाणी / ७१ आणि लेझीम खळखळू लागले... हलगी तडतडू लागली... शाळेची मुलं वे तरणीताठी पोरं मनसोक्त नाचू लागली व पावसात भिजू लागली. आकाशवाडीची नवी सून - सदा गुरुजीची पत्नी गावासाठी शुभशकुनाची ठरली होती, येताना माहेरच्या गावच पाणी घेऊन आली होती. । दुस-या दिवशी सदानं सुनंदाला गावच्या मध्यभागी असलेलं तळं पाहायला नेलं. ते लाल पाण्यानं तुडुंब भरलं होतं त्यांच्यासोबत सरपंचही होते. ते म्हणाले, ‘पोरी, हे आक्रीतच म्हनायचं. गेल्या अनेक वरसात पयल्या पान्यानं असं तळे भरलं नव्हतं. तू गावासाठी शकुनाची ठरलियास माये...!' | ‘हे, हे असं पाणी तुम्ही पिता?' तिनं त्या लालतांबड्या पाण्याकडे पाहात शहारून विचारलं. “हो, अगं हे नैसर्गिक तळे आहे दोन दिवसात पहाशीलच पाणी कस नितळशंख होतं ते', सदा म्हणाला. 'पाणी इथं नैसर्गिकरीत्या फिल्टर होतं असं म्हटल पाहीजे....." | आणि तिला त्याचा प्रत्यय आला. चार दिवसांनी ती हट्टानं स्वतःहून पाणी आणायला तळ्यावर आली, तेव्हा ते शांत, निळसर पाणी पाहून तिला खात्री पटत पाणी पण चवीला बरं होतं - अर्थात, कृष्णामाईच्या पाण्याची त्याला सर नव्हती म्ह हळूहळू तिला गावच्या पाणीटंचाईचा आवाका समजत गेला आणि त्यात व्यापकता पाहून ती सुन्न झाली! त्या विस्तीर्ण मैदानी प्रदेशात मध्येच डोंगराचा हा सुळका घट्ट पाय ताठ उभा होता. आणि त्याच्या डोक्यावर अडीच-तीन मैलाचं पठार होतं, त्याव गाव वसलं होतं. डोंगरपायथ्याचं मूळ गाव सरळ सव्वा किलोमीटर दूर होत, नागमोडी वळणानं ते सहा-सात किलोमीटर पडायचं. | इथं पाऊणशे घराची वसती होती आणि जमिनीत पावसाच्या पा कशीनिशी बाजरी व हलगी पिकायची. मात्र गावात पशुधन बरंच होतं. कारण डा पावसाळ्यात काहीबाही हिरवं तरारून येतं, ते जनावरांना पुरतं! मात्र तरुण गाव सोडून मुंबई व जिल्ह्याच्या गावी नोकरी - धंद्यासाठी पळत होती. सदा खरं तर तालुक्याच्या गावी शिक्षक होता. पण गावात शाळा असा गावची मुलं शिकावीत हा त्याचा ध्यास होता. त्यानं सतत खटपट करून गावात च होतं. कारण डोंगरावर त! मात्र तरुण पिढी सन गावात शाळा पाणी! पाणी!! / ७२ मंजूर करवून घेतली होती. तिथं कुणी शिक्षक म्हणून जायला तयार नव्हतं, म्हणून स्वतःहून सदानं तिथं जायची संमती दर्शवली. गेली चार वर्षे तो इथं गावात मुलांना शहाणं करीत होता, प्रौढांसाठी साक्षरतेचे वर्ग चालवत होता. पण पाणीटंचाईनं तो अस्वस्थ व्हायचा. पण डोंगरपठारावर विहीर घेणं शक्य नव्हतं. आणि खालच्या पायथ्याच्या गावातून पाणी पाईपलाईनद्वारे वर आणणं फार खर्चिक काम होतं. गावची दोन - अडीचशेच्या वस्तीला पिण्याचे पाणी आणण्यासाठी एवढा खर्च करणं सरकारच्या नियमात बसत नव्हतं. म्हणून तळ्याचं पाणी आटलं की समस्या गंभीर रूप धारण करायची. मग दरवर्षी टैंकर सुरू व्हायच्या. पण टैंकर वर आणणंही अवघड होतं. कारण रस्ता हा कच्चा व खडकाळ होता. दरवर्षी हमखास एकदा तरी रस्त्यातच टॅकर बंद पडायचा. टॅकरचं पाणी जेमतेम पिण्यासाठी पुरायचं; पण आंघोळीसाठी व इतर कामासाठी फार काटकसरीनं वापरावं लागायचं. | पण हे साल बरं गेलं. कारण पाऊस उत्तम झाला होता. जवळपास मार्चपर्यंत पाणी पुरलं होतं. याचं सारं श्रेय गावकरी सुनंदाच्या पायगुणाला द्यायचे. एप्रिल उजाडला आणि तळ कोरडे पडू लागलं. इतके दिवस सुरू असलेली पंचायतीची पाणी वाटप समिती खाडकन् जागी झाली. तिनं' रेशनिंग करून पाणी वाटप करायला सुरुवात केली. | इतके दिवस तिच्या घराच्या मते तिची दररोज चालणारी आंघोळीची चैन बंद झाली. आणि ती तगमगू लागली. एक दिवस मग तिनं खाटलंस्नान केलं. बाजेवर बसून अंगाखांद्यावर चार-सहा तांबे पाणी घेऊन अंग विसळून घेतलं. ते पाणी खाली ठेवलेल्या टोपलीत जमा झालं होतं, पण बरंचसं आजूबाजूला सांडलं होतं. तो पाहून कधी नव्हे ती तिची सासू कडाडली, “अगं, किती पाणी वाया गेलं जमिनीत जिरून, जरा नीट खाटलंस्नान करत जा!' सदानं तिची समजूत काढीत म्हटलं, “अगं आई, तिला हा प्रकार नवा आहे. हळूहळू ती शिकेल सारं!' ती विलक्षण शरमिंदी झाली होती. ‘हे खरं स्नान नाही- हे तर अंग विसळणं झालं' तिच्या मनाला उभारी येत नव्हती. त्या सर्वांच्या त्या दिवशीच्या आंघोळीनंतर जमा झालेलं पाणी वरकामाला वापरताना तिला किळस वाटली होती, पण त्यामागची मजबुरी पण ती समजू शकत 'होती. या अशा आकाशवाडीला उभं आयुष्य कसं काढयचं? हा प्रश्न जेव्हा तिच्या मनाला पडला, तेव्हा ती मूळासगट हादरून गेली होती. पण हा प्रश्न मनाचा तळाशी तिनं निग्रहानं दडपून टाकला होता. खडकात पाणी / ७३ आता शाळेला सुट्या लागल्या होत्या. शाळेचा ग्रंथालयातील काही पुस्तकं वाचण्यासाठी सदानं घरी आणली होती. तिला वाचनाची आवड होती. अशाच एके दुपारी सदा जेवणानंतर झोपला होता व ती एक पुस्तक वाचीत मधल्या अंगणात भिंतीच्या सावलीत बसली होती. कडक ऊन, वारा मुळीच नाही. वाढतं उष्णतामान..... दोन दिवस स्नान नसल्यामुळे घामाची वाळून शरीरावर चढलेली पुटं - आपला घाम पुसताना त्याची तुरट लागणारी चव.... मन मिटून जावं, कोषात दडावं असं वातावरण; पण प्रयत्नपूर्वक ती त्या गुलजार कादंबरीत स्वतःला रमवत होती. । आणि कसलासा आवाज झाला, म्हणून ती पुढे झाली. दारात एक जीप थांबली होती. तिनं घाईघाईनं नव-याला उठवलं. तो शर्ट अंगात चढवीत पुढे झाला. 'अगं, ही तर बी. डी. ओ. ची जीप आहे तो पुटपुटला. 'इथं कशासाठी आले असतील ते कळत नाही." | तो सामोरा जात म्हणाला, 'नमस्कार साहेब, मी इथल्या प्राथमिक शाळेचा शिक्षक सदानंद कुलकर्णी....!" 'नमस्कार....! मी तुम्हाला ओळखतो कुलकर्णी सर! तुमच्या लग्नात में होतो' बी. डी. ओ म्हणाले, “मी सुनंदाचा राखीभाऊ आहे, माझी बहीण आहे ती | सुनंदा पुढे झाली. हा तर अभय होता. तिचा मोठ्या भावाचा वर्गमित्र तिच्याकडून दरवर्षी राखी बांधून घ्यायचा. हा केव्हा बी. डी. ओ. झाला? 'अगं तुझ्या लग्नाच्यावेळी माझी गटविकास अधिकारी म्हणून नुकता निवड झाली होती. ट्रेनिंग झालं व इथं पंधरा दिवसांपूर्वी पोस्टिंग झाली.' अभय म्हणाला. 'आधी आत ये ना दादा....!' ती म्हणाली. 'हो हो, आत या साहेब' सदा म्हणाला. 'पण मी बोलण्याच्या नादात विसरून गेलो माझ्या जीपमध्ये कोण " पाहिलंस का?" अभय महणाला. । तिनं जीपमध्ये डोकावून पाहिलं आणि तिचा विश्वासच बसेना. तिच्या गायचे आबा गुरुजी होते. । | ‘आबा तुम्ही? इथं? माझा विश्वासच बसत नाही.' तिला आनंदाने " फुटेना. 'या - या आत या?' | 'अगं पोरी, हा जीप घेऊन आला, तेव्हा विचार केला... तुला भेटून - तुझ्या बापानंही मला आग्रह केला - एकदा जाऊन पोरीचा संसार पाहून ये म "इतक्या दिवसांनी आठवण झाली आता आपल्या लेकीची.... । फुरंगटत ती म्हणाली. |'अगं हो- जरा दमानं ! मला घरात तर घे!' आवा म्हणाले, 'काय बापू - आज तुमचा पाहुणचार घ्यायला आपणहून आलोय न बोलवता, चाला "ने, 'काय जावई न ना?" ", पाणी! पाणी!! / ७४ हे काय बोलता? मला लाजवू नका.' सदा म्हणाला. 'हे तुमच्या लेकीचंच घर आहे. या आत!' | ‘पण मी थांबू शकत नाही. एक अर्जट मिटिंग आहे.' अभय म्हणाला. 'मी आता जातो व उद्या येतो - उद्या चवथ्या शनिवारची सुट्टी आहे. निवांत बोलता येईल ना मग मी गुरुजींना परत घेऊन जाईन...!' आणि अभय जीपनं निघून गेला. सुनंदा फुलारून आली होती. तिचे धर्मपिता - तिचे गुरुजी तिचा संसार पाहायला आले होते. तिचा राखीभाऊपण आला होता. इतक्या दिवसांची कसर भरून निघाली होती. सदाची व आबा गुरुजीची तार चांगलीच जुळली होती. रात्रीचं जेवण आटोपून ते बाहेर मोकळ्यावर बाज टाकून गप्पा मारीत बसले. सुनंदाही त्यात सामील झाली. आणि बोलण्याच्या ओघात सदानं आकाशवाडीच्या पाण्याच्या दुर्भिक्षाबद्दल कल्पना दिली. झालंच तर सुनंदाच्या पायगुणानं यावर्षी नेहमीपेक्षा तळ्याचं पाणी दोन महिने जादा कसं पुरलं, हेही सांगितलं. | ‘या गावात पाणीच नाही आबा, काय करणार? हा प्रश्न आमच्या पाचवीला पुजला आहे....!' सदाचा वैताग शब्दाशब्दातून प्रतीत होत होता. 'डोंगरावरचा हा पठारी मुलूख' इथल्या मातीत खडकच जास्त आहे. पाण्याचे झरेच नाहीत, असंच जी. एस. डी. ए. वाले सांगतात, त्यामुळे इथं नळयोजनाच होऊ शकत नाही....!' अचानक सुनंदाला स्मरण झालं की, आबा जमिनीतलं पाणी हेरतात, दाखवतात. ते जन्मतः म्हणे पायाळू होते. केवळ कान लावून, पदस्पर्शित जमिनीखाली पाणी आहे की नाही, हे सांगतात आणि त्यांचं अनुमान नव्वद टक्के प्रकरणात खरं ठरलेलं आहे. त्यांना विचारावं का, या गावात कुठे पाणी आहे का हे तपासून पाहायँला....। | ‘आबा, मी तुमचा लौकिक जाणते. तुम्ही जमिनीखालचं पाणी खात्रीनं आहे की नाही सांगता. मग उद्या या गावात चक्कर मारून सांगा ना - कुठे पाणी लागेल का?- सदा तिच्याकडे खुळ्यागत पाहात राहिला. 'अगं हे काय? भूगर्भशास्त्रज्ञांनी इथे पाणी नाही, असं सर्व्हे करून जाहीर केले. तेथे आबा काय सांगणार?' 'तसं नाही जावई बापू हेही आमचं शास्त्र आहे.' आबा गंभीर होत म्हणाले, फार तर म्हणा की - परंपरागत शास्त्र आहे. पायाळू माणसाला एक अतिरिक्त ज्ञानेंद्रिय असत. मलाही ते आहे व त्यामुळेच जमिनीखाली पाणी आहे की नाही हे मी सांगू शकतो. आणि दहामधील नऊ प्रकरणात माझा अंदाज आजवर खरा ठरलेला आहे....!' दुस-या दिवशी आबा व सदा आकाशवाडीचा फेरफटका मारायला निघाले. मध्ये मध्ये ते थांबत, पायातली वहाण काढून पायाने जमिनीवर थपथप करीत, कुठे उकिडवे बसून जमिनीला कान लावत. “नाही इथं नाही....' असं ते पुटपुटत. असं जवळपास घंटाभर चाललं होतं. सदा कंटाळला होता, पण सुनंदानं त्याला आबाबद्दल इत्थंभूत सांगितल्यामुळे विश्वास ठेवणं भाग होतं. T खडकात पाणी / ७५ असं करीत करीत ते तळ्याजवळ आले. तळे कोरडं पडलं होतं. सदाचा आधार घेत आया गुरुजी तळ्यात उतरले. तिथं गोल गोल फिरले, तिथल्या ओलसर मातीला कान लावले, क्षण, दोन क्षण ते तसेच होते आणि मग ओरडून म्हणाले, 'इथं - इथं पाणी आहे. या तळ्याच्या खाली जिवंत पाझर आहे आणि त पाणी अक्षय आहे....!' ‘पण आबा, या तळ्याखाली तर प्रचंड खडक आहे." 'तो फोड़ा, पाणी लागेल!' ‘पण ते किती कठीण - खर्चिक आहे. पुन्हा जी. एस. डी. नं इथं या गावात पाणी नसल्याचं सर्व्हेक्षणाअंती जाहीर केल्यामुळे शासन काहीच करू शकणार नाही. | 'ते मला माहीत नाही; पण माझ्या आजवरच्या अनुभवाच्या आधार सांगतोय, इथं या तळ्याखाली खडकाच्या आत पाणी आहे, हे निश्चित !'. सुनंदा ते ऐकून हर्षभरित झाली. 'माझी खात्री आहे, आबा म्हणाले म्हणजे तिथं पाणी नक्की असणार आहे....' पण त्यानं शासकीय अडचण सांगितली, तेव्हा ती झटकन म्हणाली, "पण आता इथं अभयदादा बी. डी. ओ. आहे, तो हा प्रश्न सोडवील ना!' दुपारी अभय आला, तेव्हा भोजनानंतर हा विषय निघाला. तो या तालुक्याचा गटविकास अधिकारी असल्यामुळे त्याला आकाशवाडीच्या भीषण पाणीटंचाई जाणीव होती. त्यामुळे आबांनी तळ्याच्या खाली पाणी असल्याचं सांगितलं तेव्हा तो म्हणाला, 'आबा गुरुजींना मी मानतो कुलकर्णी सर... कारण मी प्रत्यक्ष अनुभव आहे जिथं जी. एस. डी. ए. नं पाणी नाही म्हणून सांगितलं, तिथं आबांनी पा असल्याचं सांगितलं व तिथं खरंच पाणी लागल्याचं मी पाहिलं आहे. पण आता " थी. डी. ओ. आहे, मला जी. एस. डी. ए. चा सल्ला धुडकावता येणार नाही - तर ही पाहातो काय करायचं ते!' | सभापतींना अभयनं ही बाब एकदा चर्चेच्या ओघात सांगितली. तर सभापती हसून म्हणाले, 'मला माहीत आहेत आबा गुरुजी - ते पाणीवाले गु" म्हणून प्रसिद्ध आहेत. ते म्हणताहेत तर रिस्क घ्यायला हरकत नाही.....!', अभयनं आकाशवाडीच्या तळ्यात 'इनव्हेल बोअरिंग घेण्याचा निर्णय घदी। आणि तिथं बोअरिंग मशिन येऊन दाखल झाली. कामाला प्रारंभं करण्यापूर्वी सरपंचांनी सुनंदाला बोलावून घेतलं. 'पोरी इथं आजीस ते सकन घेऊनशानी - तुच नारळ वाढव इथं बोअरिंग होण्यापूर्वी... तिनं हात जोडून, डोळे मिटून देवाचं स्मरण केलं. आणि नारळ फाई: तिच्या डोळ्यापुढे कृष्णामाई होती! | जवळपास दीडशे फुटावर खडक फोडून जमिनीचा वेध घेतल्या बोअरिंगवाल्यानं जाहीर केलं, 'चमत्कार म्हणायचा हा! इथं चांगलं तीन ते साडे इंच पाणी लागलंय....!' पाणी! पाणी!! / ७६ पुन्हा एकदा गाव आनंदानं बहरून आलं. पाणी खेचण्याची कुपनलिका बसवली गेली. पुन्हा एकदा सरपंचांनी सुनंदाला हुकूम सोडला, ‘पोरी, - पयल्यांदा तूच खेच पंप आणि पानी आलं की, न्हाऊन पूजा कर. सदा, तुम्ही जोडीनं उभं राहा.... हे - सारं, पोरी तुझी पुण्याई म्हणायची.... तुझ्यामुळेच गावची पाणीटंचाई कमी होतेय....!' सुनंदानं पंपानं पाणी खेचायला सुरू केलं आणि दोन - चार खेचण्यातच तोंडावाटे भळ्ळकन पाण्याची सोंडेएवढी धार बाहेर पडली....! मग सदानं पंप खेचून तिला सबंध गावासमक्ष सचैल स्नान घडवलं सान्यांच्या नजरेत तिच्याबद्दल आदरभावच होता. दोघांनी ओलेत्यांनी त्या इनव्हेलपंपाची विधिवत पूजा केली. ‘कृष्णामाई, मी माहेरी येईन तेव्हा तुला खण - नारळाची ओटी वाहीन. तुझ्या अमृतमय पाण्यावर हा देह वाढला, मोठा झाला.....' सुनंदानं हात जोडले होते, ‘वाटलं होतं, मी तुला लग्नानंतर पारखी झाले - पण नाही कृष्णामाई तू माऊली आहेस माझी. इथं खडकातही तुझी कृपा मला सचैल न्हाऊ घालतेय... तुझी अमृतधार देतेय!' खडकात पाणी / ७७

6s. पाणी! पाणी!! | ७८ ६. हमी ? कसली हमी ? है पटत नाही मि. गायकवाइ - धिस इज सिंपली रविश. आय मस्ट से....' संतापानं लाल होत कलेक्टर भावे म्हणाले, तसा त्यांच्यासमोर उभा असलेला गायकवाड मनोमन शहारला.... | "मी तुम्हाला मागच्या महिन्यात ससाठी पाच जीप अधिग्रहित करून दिल्या. कडा विभागाचे व इतर जिल्ह्यांचे सर्व्हेअर दिले. अपेक्षा हीच होती की, तुम्ही एका महिन्यात मला प्रत्येक तालुक्यातील किमान दहा नालायंडिंगच्या कामाचे स - इस्टिमेंट करून मंजुरीसाठी सादर करावेत.... आज तुम्ही सांगता की, ऐंशी एस्टिमेटऐवजी फक्त बाराच तयार आहेत म्हणून... धिस इन थियौंड इमेजिनेशन-" भाव्यांचा राग प्रामाणिक व रास्त होता. | मी त्यांच्या बाजूलाच बसलेलो होतो. मलाही गायकवाडांच्या मख्खपणाचा राग येत होता आणि त्याला काही इलाज नाही हेही पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवत होतं. काही माणसं वयोमानाप्रमाणे उच्चपदाला पोचतात, पण त्यांचा यकृय त्याप्रमाणे नसतो... है गायकवाच्या बाबतीत मी जाणून होतो, पण भासाहेबांना ते माहीत नव्हतं. हमी ? कसली हमी ?/७५ सबंध जिल्हा दुष्काळानं होरपळून निघतोय. सर्वत्र रोजगार हमीच्या कामाची मागणी. सतत मोर्चे, निवेदन, धरणे... उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना' म्हणून नियोजनाचं व कामे मंजूर करून लोकांना काम पुरविण्याचं काम माझ्या शाखेचं. त्याचे नियंत्रक कलेक्टर. | यावर्षी कमी पावसामुळे खरीप पिके जवळपास पूर्ण जिल्ह्यात बुडालेली, रबीचा पेराच झाला नाही, अशी अवस्था त्यामुळे जानेवारीपासूनच रोजगार हमीच्या कामाची वाढती मागणी. खेडेगावात मजुरांना काम नाही, रोजगार नाही म्हणून भाकरीची विवंचना. त्यामुळे कामांची प्रचंड मागणी. । | हा जिल्हा तसा सुपीक गणला जातो. इथली जमीन भारी प्रतीची, काळी व कसदार. म्हणून पाझर तलावाला स्वखुशीनं जमीन इथं सहसा मिळत नाही. भूसंपादन कार्यवाही करून जमीन मिळवावी व मग काम सुरू करावं म्हटलं तरी लोक कोर्टातून स्टे आणतात व मग सुरू झालेला पाझर तलाव बंद पडतो वा सुरूच होत नाही. आमच्यासाठी पाझर तलावाचं फार महत्त्व. कारण एक तलाव किमान सहा महिने दोनशे मजुरांना रोजगार पुरवू शकतो. या जिल्ह्यात मी या पदाचा चार्ज घेतल्यापासून मागील १०-१२ महिन्यांत एक एक बंद पडलेले पाझर तलाव सुरू करण्याचा प्रयत्न करीत होतो, त्यासाठी दुहेरी पद्धतीचा मी अवलंब सुरू केला होता. एक म्हणजे गावोगावी जाऊन त्या शेतक-यांनी आपली जमीन पाझर तलावात जाऊ नये म्हणून विरोध करून काम एक तर सुरू होऊ दिलं नव्हतं वा बंद पाडलं होत, त्यांची लोकप्रतिनिधीसमवेत भेट देऊन समजूत घालणे व संमती मिळवणे, तर दुसरा मार्ग म्हणजे कोर्टात सातत्याने पाठपुरावा करून स्थगिती प्रकरणे बोडवर घेणे व स्थगिती उठविण्याचा प्रयत्न करणे. हे काम मोठं जिकिरीचं होतं व क्वचित प्रकरणात यश येत होतं. आजचच पाहिलं तर सकाळी मी होकर्णाला गेलो होतो. या परिसरात कामाची प्रचंड मागणी होती. स्थानिक आमदारांनी उपोषणाची धमकी दिली होती व इथे दोन पाझर तला मंजूर होते, पण दोन्ही सुरू होत नव्हते. आज मी मुद्दाम आमदारांशी माग आठवड्यात बोलून वेळ घेतली होती. ते त्यांच्या गावाहून सकाळी नऊपर्यंत होकण्यास पोचणार होते. पाणी! पाणी!!/ ८० मी वेळेवर पोचलो, पण आमदारांचा पत्ता नव्हता. एक घंट्याने त्यांनी एका कार्यकत्र्याबरोबर निरोप पाठवला की, कुठल्या तरी गावात अचानक एका समाजमंदिराच्या उद्घाटनासाठी ते गेले आहेत म्हणून... जो आमदार एकीकडे शासन लोकांना काम देत नाही म्हणून उपोषणाची नोटीस देतो व काम सुरू करण्यासाठी प्रयल करीत नाही, अधिका-यांना साथ देत नाही.... हे मोठं चीड आणणारं होतं. पण मला माझ्या मनाचा तोल घालून चालणार नव्हतंच. कारण दोन्ही तलावांच्या संदर्भात संबंधित शेतक-यांशी बोलायचं होतं, मन वळवायचं होतं आणि संमती मिळवायची होती. |...आणि चर्चेची मॅरेथॉन सुरू झाली. आतंरराष्ट्रीय प्रश्नावर 'युनो' मध्येही एवढी कस जोखणारी व परीक्षा पाहाणारी चर्चा होत नसेल. मी अंतःकरणापासून कळवळून बोलत होतो, संतापत होतो, चिडत होतो, त्यांना गावासाठी साद देत होतो... पण ते मख्य होते, शांत होते. त्यांच्या चेह-यावरून काहीच प्रतिक्रिया कळत नव्हती.... ‘पण साहेब, गावाच्या विकासासाठी आमी भकास का व्हायचं? हा त्यांचा सवाल तसा खरा होता. यापूर्वीही हजारो पाझर तलाय राज्यात झाले होते, होत होते; पण या जिल्ह्यात आजवर बहात्तरपासून अवघे बत्तीसच पूर्ण झाले होते व मंजूर पण सुरू नसलेल्या पाझर तलावांची संख्या ७८ होती; त्यातलेच हे दोन होकण्र्याचे होते. | शेतक-यांचे जमिनीवर - काळ्या आईवर मनस्वी प्रेम असतं, हे मला मान्य होतं. पण पाझर तलाव होणं हा गावच्या विकासाचा व शेकडो मजुरांच्या पोटापाण्याचा प्रश्न होता. आणि त्यासाठी माझी प्रामाणिक धडपड होती, ती त्यांना का समजू नये, याचा राग येत होता. जवळपास अडीच तासांच्या चर्चेनंतरही मी त्यांची संमती मिळवू शकलो नव्हतो व तसाच परतलो होतो. मुख्यालयी आल्या आल्या जिल्हा कोर्टात धाव घेतली; कारण मरखेल पाझर तलावाच्या प्रकरणातील भूसंपादन कार्यवाहीला कोर्टानं गतवर्षी स्थगिती दिली होती, तिची आज सुनावणी होती. सरकारी वकिलांना मी केकदा झापलंही होतं; पण पहिली तारीख ‘अँपिअरन्स' ची म्हणून पक्षकाराच्या वकिलानं मुदतवाढ मागितली, तर दुसन्या तारखेस त्यांना बरं नसल्यामुळे त्यांच्या ज्युनियरनं पुन्हा अॅइजर्नमेंट मागितलं होतं. हमी ? कसली हमी ? / ८१ आजही पक्षकारांचा वकील हजर नव्हता. तो औरंगाबादला एका रिट पिटिशनच्या संदर्भात गेला होता. ही त्यांची वेळकाढूपणाची ट्रिक होती, हे मी समजत होतो, तरीही चीड व वैताग आवरता आवरत नव्हता. आणि तारीख वाढली गेली. ती दीड महिन्याने लावली गेली. मी परत सरकारी वकिलांना संतापानं म्हटलं, 'का नाही तुम्ही कोर्टाला एक्सपार्टी स्थगिती उठवायला सांगत? ज्या न्यायानं एक्सपार्टी - एकतर्फी स्टे मिळू शकतो, तो पक्षकार उठू नये म्हणून घाणेरड्या ट्रिक्स खेळतो व वेळकाढूपणा करतो, तर तुम्ही ही बाब त्यांच्या निदर्शनास का आणून देत नाही? खरं तर भूसंपादन कायद्यात एकदा भूसंपादनाची कार्यवाही सुरू झाली, की स्थगिती आदेश वा जैसे थे स्टेटस् को देता येत नाही, हे यापूर्वीच्या काही प्रकरणांत सिद्ध झाला आहे. तरीही प्रत्येक नव्या प्रकरणात हे जज का स्थगिती आदेश देतात हे कळत नाही...!" 'आता काय सांगावं साहेब तुम्हाला? जर्जसुचा दृष्टिकोनही सरकारी वकिलाकडे पाहाण्याचा नीट नसतो.' ते सांगत होते, ‘टे कसा मिळतो - कायद्यात तरतूद नसताना हे मी तुमच्यासारख्या डेप्युटी कलेक्टराना सांगावं, एवढे तर तुम्हीं नवे नाहीत या क्षेत्रात साहेब !' आजवर मनात जी शंका होती, त्याला सरकारी वकिलांनी आज दुजोरा दिला होता. त्यामुळे माझ्या संतापात तेल ओतल्यासारखं झालं होतं. ‘हॉरिवल आहे हे सारं वकील साहेब, बाकी काही नाही; पण या मरखेलला आज दुसरं कुठलंही काम देता येत नाही या पाझर तलावाखेरीज... आणि तिथं शेतमजूर संघटना प्रबळ आहे. त्यांनी लिखित स्वरूपात कामाची रोजगार हमी नियमाप्रमाणे मागणी केली तर मला काम देता येणार नाही, त्यांना बेकारी भत्ता देण्याची नामुष्की येणार....!" क्षणभर थांबून मी पुढे म्हणालो, 'वकील साहेब, आपल्याला कल्पना नसेल, पण शासन है सहन करणार नाही. बेकारी भत्ता देण्यापेक्षा काम द्यावं, हे धोरण आहे. आमच्यासाठी बेकारी भत्ता देण्याची पाळी येणं हे कमीपणाचं आहे. आम्ही 'कॉम्पिटंट' नाही असा त्याचा अर्थ होतो....' पाणी! पाणी!! / ८२ त्यानंतरही काही वेळ मी न राहावून बोलत राहिलो, पण तो केवळ भावनेचा उद्रेक होता! वकिलांच्या हातातही फारसं काही नव्हतं हे का मला कळत नव्हतं ? पण माझे सहकारी डेप्युटी कलेक्टर म्हणत त्याप्रमाणे माझी अशा प्रकरणात नको तेवढी मानसिक गुंतवणूक असायची. प्रशासनानं थंड डोक्यानं करावं हे मान्य पण जिथे विकासाचा प्रश्न येतो, मानवी भावनांचा प्रश्न येतो तेथे अलिप्तपणे काम करणं मला जमत नसे. ते योग्यहीं नाही असंहीं माझं ठाम मत होतं. रोजगार हमीचं काम पुरवणं है भूक मिटविण्याचे काम होतं, दारिद्रयाशी निगडित काम होतं, कारण रोजगार हमीचं काम करणारे बहुसंख्य शेतमजूर व स्त्रिया होत्या. माझ्या प्रयत्नांनी काही कामं हुँ झाली तर विकास प्रक्रियेत आपलाही • खारीचा का होईना - वाटा असेल, ही भावना मला त्यात गुंतून पडायला व त्यासाठी अस्वस्थ व्हायला भाग पाडीत असे. त्यामुळेच मलाही गायकवाडांची चीड आली होती. त्यांना लागेल तेवढ्या जीप्स व सअर्स देण्याची आणि ७०-८० नालाबंडिंग कामाचा सर्व्ह करुन घेण्याची माझीच कल्पना होती व ती कलेक्टरांनी मान्य करून तसा आदेश दिला होता आणि महिन्याभरानंतर त्यांनी फक्त थारा ठिकाणी सर्व्हे केला होता. | त्यांनी मान खाली घालून, किंचित अपराधी भावनेनं काम का झालं नाही याचं स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली. पण माझं त्याकडे लक्ष नव्हतं; कारणं समर्थनीय मानली तरी प्रश्न सुटत नव्हता व माझ्यासाठी नयं प्रश्नचिन्ह निर्माण करीत होता. आमच्या जिल्ह्यात दोन तालुके कायम दुष्काळी म्हणून प्रसिद्ध त्यापैकी एकाचे आमदार हे विरोधी पक्षीच होते व गेले सतत पाच टर्मस् ते निवडून आले होते. अख्ख्या महाराष्ट्रात ते झुंझार व धडाकेबाज आमदार म्हणून प्रसिद्ध होते. वळपास दररोज ते नव्या • नव्या गावात काम पुरविण्याची मागणी करीत होते... मरखेल पाझर तलाय त्यांच्याच तालुक्यातला होता. | आणि दुसरे आमदार हे जरी सत्ताधारी पक्षाचे असले तरी ते रोजगार हमी समितीचे सध्याचे अध्यक्ष होते व त्यांचा त्या नात्याने दबदबा होता. तेही रोजगार हमी कामकाजामध्ये तपशिलात जाऊन रस घेणारे आणि भडकू म्हणून प्रसिद्ध होते! | या दोन्ही आमदारांना दुष्काळाच्या वेळी योग्य रीतीनं हाताळणं ही एक कठीण कसौटी होती. दोघेही भेटले की तास तास घेत. कलेक्टर हे मितभाषी व हमी ? कसली हमी ? / ८३ वेळेच्या बाबतीत पक्के इंग्रज. त्यांनी मला सांगितलं होतं, 'देशमुख, या दोघांना तुम्ही सांभाळा. माझा फार वेळ घेतात व बोलत सुटले की थांबत नाहीत.' आमदाराची तक्रार होती की, भावे साहेब हे प्रतिसाद देत नाहीत आम्ही भडाभडा बोलत असतो व ते शांतपणे आपल्या फाईली पाहात असतात. माझी मात्र तारेवरची कसरत होती. दोन्ही बाजू योग्य रीतीनं सांभाळण्यासाठी मला माझ्या पूर्ण क्षमता कामाला लावाव्या लागत. त्याबद्दल माझी काही तक्रार नव्हती. उलटपक्षी माझ्यासाठी हे आव्हान होत. ते मी स्वीकारलं होतं ते माझ्या कामावरील श्रद्धेपोटी. काही विशेष ध्येय मनी बाळगून मी त्या प्रशासकीय सेवेत बँकेची सुखासीन नोकरी सोडून आलो होतो व माझी त्यावरील श्रद्धा दृढमूल झाली, ती मला भेटलेल्या माझ्या पहिल्या कलेक्टरांमुळे. त्यांनी माझ्यावर जे संस्कार केले, ते आठ - दहा वर्षांनंतर आजही कायम आहेत. ते मला म्हणायच ‘ही महसूल खात्यामधील नोकरी तशी म्हटली तर फार सोपी आहे; कारण सार अधिकार आहेत व जनता लोकप्रतिनिधीही ते मानतात; पण त्याचा उपयोग करुन गोरगरीब, नाडल्यांचे काम करता आले तर त्या अधिकाराचा उपयोग; अन्यथा तो आज आपले बरेच अधिकारी त्यांना नाडून पैसे कमाविण्यासाठीच वापरतात. तसा , होऊ नयेस. यू आर माय प्रोबेशनर ऑफिसर... तो मला पुढेही सांगताना अभिमान वाटायला हवा, असंच तुझं वर्तन हवं!' मूळचे संस्कार व त्यांच्या सहवासातील प्रशिक्षणाची दोन वर्षे यामुळे माझ एक कमिटेड व ध्येयवादी उपजिल्हाधिकारी अशी प्रतिमा बनलेली आहे. पैसे कमवायची जशी नशा असते, तशी माझी चांगलं - अधिक चांगल व कल्पक काम करण्याची नशा होती आणि त्यात मला समाधान होतं. | पण इतरांची वृत्ती ‘चलता है' अशी असल्यामुळे ही अडथळ्यांची शय व्हायची. आपली गती कमी व्हायची. काही वेळानं गायकवाड निघून गेले. भावे माझ्याकडे वळून म्हणाले, 'वर व्हाट नेक्स्ट मि. देशमुख?' पाणी! पाणी!! | ८४ ‘आपल्यावरचं प्रेशर वाढत चाललंय सर. कामाची मागणी प्रचंड वाढलीय . आणि ती खरी आहे. लोकांना त्याची गरज आहे. भूकबळी नाही तरी उपासमारीची भीती वाटते सर...' "यू आर राईट, देशमुख. मीही दौ-यात ते पाहिलं आहे पण इम्प्लिमेंटिंग ऑफिसर्सना परिस्थितीच भान का नसावं हे कळत नाही.' | आणि त्याच वेळी शिपायानं येऊन निरोप दिला की 'दादासाहेब आले आहेत.' विरोधी पक्षाचे आमदार दादासाहेब म्हणून प्रसिद्ध होते, तर रोजगार हमी समितीचे अध्यक्ष असलेले सत्ताधारी पक्षाचे आमदार ‘बप्पा' म्हणून ओळखले जात. | भावे मिश्किलपणे म्हणाले, 'देशमुख, तुम्ही सांभाळा दादासाहेबांना... माझी बँकर्सची मीटिंग आहे. दादासाहेबांना सांगा 'सॉरी' म्हणून....' मी माझ्या चेंबरमध्ये आलो. तेथे दादासाहेब आपल्या तीन - चार कार्यकत्र्यांसह बसले होते. मी आल्या आल्या घंटी वाजवली व ऑर्डर दिली 'चहा सांगा दादासाहेबांना बिनसाखरेचा : विसरू नका..' आणि मी माझ्या खुर्चीवर बसत विचारलं, 'बोला दादासाहेब, कांही नवीन - विशेष?' 'नवीन काही नाही. विशेष तर काही नाहीच नाही! दादासाहेब म्हणाले, ‘आमचं नेहमीचं रडगाणं - आमची रयत - आमचा बळीराजा शेतकरी उपाशी मरतोय... आम्हाला तुम्ही मोठे धरणं - पाणी तर देत नाही, पण जगण्यासाठी कामही पुरवत नाही- माझ्या मतदारसंघात तुमच्या रोजगार हमीची पंचवीस पॅकेटस् (आठ-दहा गावांचा एक गट) आहेत - त्यात आज जेमतेम वीस - बावीस कामं आहेत. प्रत्येक पॉकेटला एक काम देऊन चालणार नाही - जवळपास प्रत्येक गावात एक काम तरी काढलं पाहिजे...' त्यांनी बोलता बोलता फाईलमधून एक निवेदन दिलं, “आता हा निर्वाणीचा खलिता आहे देशमुख साहेब. मी इथं तुमच्या चेंबरपुढे उद्यापासून उपोषणाला बसतो. माझी यादीत दिल्याप्रमाणे कामं मंजूर झालीच पाहिजेत. मी त्यांचे निवेदन वाचलं वे कामांची यादी तपासली. बहुतेक कामं ही रस्ताची वा खडी फोडायची होती. हमी ? कसली हमी ? । ८५ ‘दादासाहेब, तुम्ही एवढे अभ्यासू आमदार. तुम्हाला माहीत आहेच की, रस्त्यावर एकूण खर्चाच्या पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त खर्च करता येत नाही. ती मर्यादा आपण केव्हाच ओलांडलीय... तुमच्याकडे अनेक पाझर तलाव मंजूर आहेत, पण शेतकरी जमिनी देत नाहीत. कॅनॉलचं कमही कोर्टातून स्टे आणून बंद पाडलंय... तिथं तुम्ही का प्रयत्न करीत नाही?' | ‘हे तुमचं नेहमीचच आहे देशमुख साहेब-' दादासाहेब म्हणाले, 'मी तोही प्रयत्न करतो, पण शेतकरी आपली जमीन सुखासुखी सोडत नाही. त्याची ती माय असते...' 'मग कामं कशी होणार ? लोकांना रोजगार कसा मिळणार ?' मी म्हणालो, ‘एकीकडे शेतक-यांचं समर्थन करायचं - जे अशा कामांना जमीन देत नाहीत त्याचे - आणि दुसरीकडे कामही मागायचं - ते मिळत नाही म्हणून उपोषणाचा इशारा द्यायचा? हे विसंगत नाही वाटत तुम्हाला?' | माझ्या स्पष्ट बोलण्याची त्यांना सवय झाली असावी. त्यावर कसलीच प्रतिक्रिया व्यक्त न करता दादासाहेब आपली मागणी पुढे रेटीत म्हणाले, ‘साहेब, आमचे मतदार जसे रयत - गरीब शेतमजूर आहेत, तसेच शेतकरी पण आहेत. दोघांनाही सांभाळावं लागतं. बरं ते जाऊ द्या. ही रोडची कामं दुष्काळात घेतली तर पटकन सुरू होतील व तुमचंही प्रेशर कमी होईल...' ‘पण ती सारी योजनाबाह्य कामं आहेत दादासाहेब. ती मंजूर करायचा म्हटलं तर आयुक्तांची परवानगी लागते. त्यासाठी प्रोसीजर आहे आणि मुख्य म्हणजे एवढी कामं ते एकाच वेळी मंजूर करणार नाहीत...' 'ते तुमचं तुम्ही पाहून घ्या. हवी तर मी एक तार ठोकतो कमिशनर साहेबांना.. पण ही कामं मंजूर झाली पाहिजेत...' ‘पण दादासाहेब...' ‘महत्त्वाचं काय आहे देशमुख साहेब - लोकांना काम देणं की नियमाया कीस पाडणं ? अहो, हे नियम आम्हीच केले आहेत ना विधिमंडळात... रोडवरच खर्च मर्यादित हवा, नॉन - प्लॅन रोड मंजूर करू नयेत... पण मला सांगा कुठला प्लॅन हा कधी परिपूर्ण असतो का? त्यात काही राहून जातंच की?... खरा सवा आहे की, नियम हे माणसासाठी आहेत की माणसं नियमासाठी?' पाणी! पाणी!! / ८६ न अगदी नेमका प्रश्न विचारला होता त्यांनी. त्याचं माझ्याप्रमाणे त्यांच्याकडेही उत्तर नव्हतं. महराष्ट्र शासन हे खरोखरच पुरोगामी शासन आहे, रोजगार हमी योजनांद्वारे कामाची हमी देणारं हे एकमेव राज्य आहे; पण त्यासाठी नीतिनियमाचं गंजाळ बनवलं आहे. त्यात खरं तर लवचिकता हवी - परिस्थितीप्रमाणे त्यात सुधारणा करण्यासाठी यंत्रणा हवी. आज हे होत नाही म्हणून असे प्रश्न उद्भवतात. ‘साहेब, मी उद्या येतो. तेव्हा मला तुमचा निर्णय सांगा.' ‘निर्णय मी कोण हो देणार? बॉस कलेक्टर आहेत, त्यांना का भेटत नाहीत?" 'अहो, तुम्ही काय अन् भावे साहेब काय वेगळे आहात? उलट माझं म्हणणं माझ्यापेक्षा तुम्हीच त्यांना नीट सांगू शकाल... त्यांना एवढंच सांगा उद्या जर ही माझी कामं मंजूर झाली नाहीत तर मी उपोषणाला बसैन...!' किती वेळ तरी मी तसाच पेपरवेटशी चाळा करीत बसून होतो. दादासाहेबांनी किती नेमकं विचारलं होतं 'नियम, कायदेकानून हे माणसासाठी आहेत की माणसं त्यांच्यासाठी ?" मी गेले कित्येक दिवस पाझर तलावाची कामे सुरू करावीत, वैडिंगची कामं हावीत म्हणून धपात होतो; कारण रस्त्याच्या खर्चाची मर्यादा संपली होती व रस्त्याची कामं आमच्या विभागासाठी अनुत्पादक कामे होती. मला व्यक्तिशः हेच पटत नव्हतं की, रस्ते जे दळणवळणाचं सर्वात प्रमुख अंग आहे, ते अनुत्पादक काम कसं? ते काम जलसिंचन व मृदसंधारणापेक्षा कमी महत्त्वाचं असू शकेल, पण रोजगार हमीचा मुख्य उद्देश हा लोकांना काम देणं हा आहे, त्याचबरोबर गावउपयोगी व लोकांच्या फायद्याची कामं व्हावीत, हे वावगं नाही; पण जेव्हा इतर काम सुरू करणे शक्य नसेल, तेव्हा ही कामं का घेऊ नयेत? | मनात हे विचार घोळत असताना बप्पाचे आगमन झालं. त्यांचं आगमन है नेहमीच गटगाटी असतं. ते येण्यापूर्वी त्यांचा करडा आवाज कानी पडतो. माझ्याकडे येताना इंजिनिअर्सची रूम च स्टाफचा हॉल लागतो. तेथे थांबून उपस्थितांचा आपल्या गडगडाटी शैलीत समाचार घेत ते येतात. त्यांचा भारदस्त पहाड़ी आयाण त्यांच्या फाटक्या, काटकुळ्या देहाला शोभत नाही, पण त्यामुळेच ते समोरच्या मनात दरारा निर्माण करतात हेही तेवढंच खरं. हमी ? कसली हमी ? / ८७ ते तसे नेहमीच माझ्याकडे येतात. प्रत्येक वेळी काम असतंच असं नाही, बसल्या बसल्या ते महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना फोन लावतात. ते जिल्हाधिकारी वा कार्यकारी अभियंत्यांना रोजगार हमी मीटिंगच्या संदर्भात वा मीटिंगमधील निर्णयाच्या संदर्भात खडसावीत राहतात. या प्रकाराची सवय झाल्यामुळे अशा वेळी मी माझे काम करीत राहतो. आजही जेव्हा त्यांचं बोलणं संपलं, तेव्हा माझ्याकडे वळत म्हणाले, 'जरा चहा मागवा, घसा कोरडा पडलाय. या इंजिनिअर्स लोकांना सारखं झापावं लागतं, कामच करीत नाहीत.' मी चहा मागवला. तो पीत पीत त्यांना मघा दादासाहेब जे बोलले त्यासंदर्भात माझ्या मनात घोळणारे विचार सांगितले व म्हटलं, ‘बप्पा, मी फार विचार केला आणि याच निष्कर्षाला आलो आहे की, जर आपल्याला जिल्ह्यात लोकांना काम द्यायच असेल, तर पाझर तलाव आणि बंडिंगची कामं प्रयत्न करूनही फार काही देता येतील असं वाटत नाही. हां, वनीकरणाची कामं बरीच आहेत; पण तेथे फार कमी मजूर ‘अॅबसॉर्ब' होतील. त्यामुळे काय करावं ही चिंता वाटते...। आणि मग मी त्यांना सकाळचा होकण्र्याचा किस्सा, कोर्टातली मरखेल प्रकरणात वाढलेली तारीख व दादासाहेबांची उपोषणाची धमकी हे सारं सांगितलं. हे सारं सांगत असताना त्यांची शेरेबाजी चालूच होती. ‘तो आमदार, त्याला कोण विचारतो? होकण्र्यास त्याच्यामुळे शेतकरी संमती देतील? शक्य नाही ! साले गव्हर्नर्मट प्लीडर नुसते कुचकामी - आणि जजेस.. काही विचारू नका. ते स्वतःला गाई समजतात, असं वाटतं ! उद्या कुणी देव जगामध्ये आहे की नाही?... असा का रेफरन्स केला तर त्यावरही ‘देव आहे' म्हणणा-या वादीच्या विरुद्ध स्टे देऊन त्यांना कोर्टाच्या अंतिम आदेशापर्यंत देवपूजा करू नये वा देव मानू नये असा अंतरिम आदेश देतील...' आणि ‘दादासाहेब - अपोझिशनचा माणूस खरा, पण चांगला आहे. त्याचा व माझा मतदारसंघ हा दुष्काळीच आहे. तो म्हणतो ते खरं आहे...' अशा त्याच्या कॉमेन्टस् चालू होताच.' | ‘बप्पा, मी सीरियसली बोलतोय...' मी म्हणालो, 'काही प्रमाणात का होईना नॉन प्लान रोडची कामे सुरू करावी लागतील... कमिशनरकडे पाठवून ती मंजूर करुन पाणी! पाणी!! / ८८ घेणे अवघड आहे; कारण तिथं रोजगार हमी शाखेत ओ.एस.डी. यंदे साहेब बसलेलेत. ते इथं असताना त्यांचा एका रोडचा भ्रष्टाचार भी शोधून काढला व आता ते प्रकरण क्वालिटी कंट्रोलकडे गेलंय त्यामुळे त्यांना रेग्युलर एस. ई. चा चार्ज न मिळता ही साईड पोस्ट मिळाली. त्यांची माझ्यावर खुन्नस आहे. ते सरळपणे कामे मंजूर करणार नाहीत....' 'तो यंद्या होय, महाचालू ! मी त्याला सरळ करतो.' बप्पा त्यांच्या नेहमीच्या भाषेत गरजले, 'त्यांच्याकडे कामं तरी पाठवा.' 'मी मागच्या आठवड्यातच पाठवली आहेत. मरखेल पॉकेटमधील दोन नॉन प्लान रोडचे काम जस्टिफिकेशन देऊन पाठवलंय.' मी म्हणालो, 'आज • उद्या कळायला हवं!” त्याच वेळी आमची पेशकार लोणीकर हातात एक फाईल घेऊन आला व म्हणाला, 'सर, आत्ताच कमिशनर ऑफिसचं टपाल आलं आहे व मरखेल पॉकेट मधील आपण सादर केलेली दोन्ही नॉन प्लान रोइची कामं ओ. एस. डी. यंदे साहेबांनी 'ऑब्जेक्शन’ लावून परत केली आहेत.' 'काय ऑब्जेक्शन घेतली आहेत त्यांनी.' 'मरखेलच्या प्रकरणात स्टे उठविण्याचा प्रयत्न करावा व तेथे दोन वनीकरणाची कामे मंजूर आहेत, ती चालू असताना अजून दोन रोइची कामे कशाला पाहिजेत याचे परिपूर्ण स्पष्टीकरण द्यावे....' | मी बप्पाकडे वळून म्हणालो, 'पाहिलंत बप्पा, हा मार्गही अवघड झालाय. कलेक्टरांनी बोललं पाहिजे साहेबांशी.' ‘मग त्यांना सांगा तसं. मीही बोलतो, बप्पा म्हणाले, 'सांगा ऑपरेटरला फोन जोडून द्यायला.' ‘बप्पा, त्यातही अडचण आहे. कमिशनर साहेब एक महिन्याच्या ट्रेनिंगला आज - उद्याच जाणार आहेत इंग्लंडला व या काळात जिल्हाधिकारी औरंगाबादकडे चार्ज राहणार आहे व ते ही रिस्क घेतील का हा खरा प्रश्न आहे. पुन्हा आमचे भावे साहेब त्यांना सीनियर आहेत, ते विनंती करतील असं वाटत नाही.' 'च्या मारी ! है भलतंच त्रांगडे होऊन की हो बसलं.' बप्पा म्हणाले, 'पण दादा म्हणाला ते खरं आहे नियम है माणसासाठी आहेत, माणूस नियमासाठी नाही. हमी ? कसली हमी ? । ८९ यातून मार्ग तर काढलाच पाहिजे लोकांना कामाची फार गरज आहे, त्यांना काम तर दिलंच पाहिजे आणि तुम्ही म्हणता ते खरं आहे, पाझर तलावाची बंद असलेली कामं सुरू होणं कठीण आहे. फार जोर मारला तर माझ्या व दादाच्या मतदारसंघात दोन-चार कामं सुरू करता येतात. आजकाल पब्लिक पण लई बेरकी झालय बघा. आम्हाला मत देतील, पण आमचं ऐकतीलच असं नाही...' विचारात मग्न असताना किंवा काही नवीन सुचत असताना बप्पा डाव्या कानाची पाळी चिमटीत धरून हलवतात. आताशी तशीच क्रिया करीत संथपणे म्हणाले, 'मला वाटतं... हा तुम्हीपण विचार नक्कीच केला असणार की, नॉन प्लान रोडची कामं मोठ्या प्रमाणावर सुरू करणे आवश्यक आहे व कमिशनर नसल्यामुळे व ओ.एस.डी यंद्याच्या चावटपणामुळे प्रस्ताव त्यांच्याकडे पाठवून मंजूर करून घेणे वेळखाऊ प्रकरण ठरेल... तुम्ही असं करा ना ही कामे याच ठिकाणी कलेक्टर साहेबांकडून मंजूर करून द्या व कार्योत्तर मंजुरीसाठी पाठवून द्या. तोवर कमिशनर येतील व मग मी स्वतः त्यांना सांगेन, भावे साहेबही सांगतील. मंजुरी मिळण्यात फारशी काही अडचण येईल असं वाटत नाही.' बप्पा गेल्यानंतर किती तरी वेळ मी विचार करीत होतो. ही कल्पना माझ्या मनात येऊन गेली होती, पण त्यात फार मोठी रिस्क होती, करिअरचा प्रश्न होता. शासनामध्ये चाकोरीबाहेर जाऊन काम करणा-यांना कधीही संरक्षण नसतं. आय. ए. एस. कलेक्टरांचं फारसं काही बिघडलं नाही. खरा धोका असतो जिल्हा पातळीवरील अधिका-यांना. माझ्या नजरेसमोर अनेक प्रकरणं होती, जिथं कलेक्टर सहीसलामत सुटले होते व खालचे अधिकारी अडकले होते. पुन्हा कमिशनर हे नियमावर बा ठेवून काम करणारे, तर तिथं रोजगार हमीचं काम पाहणारे विशेष कार्य. अधिक ओ. एस. डी तथा अधीक्षक अभियंता यंदे हे पिना मारण्यात निष्णात असला गतवर्षी इथंच कार्यकारी अभियंता होते, त्यावेळी त्यांचा - माझा खटका उडाला होता अनेकवार. त्यातच बप्पाने तक्रार केली, म्हणून त्यांच्या विभागाच्या एका रोडची चौक केली आणि त्यात झालेला भ्रष्टाचार अक्षरशः सुन्न करणारा प्रकार होता. ते प्रकर आजही चाल आहे. यंदेंनी वरपर्यंत मलिदा चारून प्रयत्न केला आणि त्यांच्याविरु कसलीही कार्यवाही न होता केवळ ठपका ठेवून सदरचे प्रकरण मिटवण्यात आ त्यांच्याशी गाठ होती व ते झारीतील शुक्राचार्य ठरण्याचा दाट संभव होता. पाणी! पाणी!! / ९० पण इथल्याच पातळीवर रोडची कामे मंजूर करुन ती कार्योत्तर मंजुरीसाठीच पाठविणे, हाच एक मार्ग दिसत होता. अन्यथा लोकांची कामाची मागणी, वाढते दडपण ये त्यातून उफाळणारा असंतोष कोणते रूप धारण करील हे सांगणं कठीण होतं. मला मात्र राहून राहून जालन्याच्या जाधवांची आठयण येत होती. ते कांही वर्षापूर्वी तिथं उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) होते. वनीकरणाच्या कामात त्या खात्यानं रोपे न लावता लावली असं दाखवून बराच भ्रष्टाचार केला होता. हा प्रश्न बप्पांनी विधानसभेत गाजवला. वनखात्याच्या अधिका-यांना तर घरी जावं लागलंच, पण जाधवांनी नीट तपासणी न करता त्या विभागाला रोजगार हमी निधीचे पैसे दिले म्हणून त्यांनाही शासनानं सस्पेंड केलं. अर्थातच पुढे त्यांनी हायकोर्टातून स्टे आपल्यामुळे ते कामावर राहिले. पण मनस्ताप व्हायचा तो झालाच. मला एकदा ते संतापानं उबिग्न होत म्हणाले होते, 'देशमुख, पैसे खाते ते वन खात्याच्या ऑफिसरनी. मी फक्त क्रेडिट लिमिट रिलीज केली. तीही कलेक्टरांच्या मंजुरीनं. दोषी असू तर दोघेही ना! मला विनाकारण सस्पेंड केलं, कलेक्टरांना मात्र हात लावायची शासनाची हिंमत झाली नाही... कारण ते आय. ए. एस. ना... तोंडात सोन्याचा चमचा घेऊन पैदा झालेले. साली गव्हर्नमेंट गांडू- त्यांना टरकते, मला तर आता वाटतं, आय. ए. एस. म्हणजे इंडियन अॅडमिनिस्ट्रेटिक सर्व्हिस नाही, तर आय अॅम सेफ किंवा आपले निर्वाचन आयुक्त शेषन म्हणतात तसे 'आय अॅम सॉरी...' काम न करता फक्त सॉरी म्हणायचं बस्....." जाधवांचे ते बोल माझ्या कानात घुमत होते आणि माझं मन बप्पांचा सल्ला अमलात आणायला कचरत होते. पुन्हा रोजगार हमी विभागाचे काम करणे राष्ट्रपती जसे घटनाप्रमुख असूनही प्रत्यक्षात त्यांच्या हाती सत्ता नसते, ती असते पंतप्रधानांकडे- तसा प्रकार, कामाची मंजुरी आम्ही द्यायची, पण प्रत्यक्ष कामाचे सर्वेक्षण व काम करण्याचे अधिकार विविध यंत्रणांना, उदा. कार्यकारी अभियंता, वनाधिकारी किंवा मृदसंधारण अधिकारी इत्यादींना. ही मंडळी फिल्डवर दररोज काय करते हैं आम्ही पहाणार कसं? त्यामुळे रिस्क घेऊन योजनाबाह्य कामे मंजूर करावीत व रोजगार पुरयावा असं उदात्त विचारानं ठरवलं तरी ही कार्यकारी यंत्रणा त्याच भावनेने व तत्परतेने काम करील याचा काय भरवसा? पुन्हा बळीचे बकरे आम्हीच ठरू, ही जास्तीची शक्यता ! | माझा मनाची सारखी चलबिचल होत होती, त्यामुळे काय करावं हा निर्णय होत नव्हता.... गुंता वाढत होता, तिढा बसत हमी ? कसली हमी ? / ९१ | तो अचानक सुटला तो तहसीलदार शिंदे यांच्या भेटीमुळे. दुस-या दिवशी सकाळी तालुक्याहून थेट ते माझ्या घरी आले. पण त्यांचा उतरलेला चेहरा पाहाताच मी ताडलं की, काहीतरी गंभीर समस्या आहे. | थेट तहसीलदार म्हणून सेवेत रुजू झालेले शिंदे माझे आवडते तहसीलदार होते. कारण त्यांच्यात मी दहा वर्षांपूर्वीच्या ‘मला' पाहात होतो. माझ्यासारखाच त्यांचा संवेदनाक्षम स्वभाव, भ्रष्टाचाराचा तिटकारा व सामाजिक बांधिलकीचं असलेलं भान... माझंच ते प्रतीरूप होतं व ते जपणं मी माझं कर्तव्य समजत होतो. | काही वेळ मी त्यांना विसावू दिलं. चहा झाला. मग मी हलकेच विचारल, ‘शिंदे, एनी प्रॉब्लेम ? बी फ्रेंक...' ‘सर, माझ्या तालुक्यात एक भूकबळी झालाय...' कसेबसे ते म्हणाले आणि मी हादरलो. एका क्षणात त्यांच्या त्या वाक्यामागे केवढं महाभारत दडलंय त्याची मुळासकट मला जाणीव झाली आणि मीही गंभीर झालो. | शिंद्यानी जे सांगितलं ते ऐकताना जाणवत होतं की, जिल्ह्यात खरच रोजगाराची दुष्काळामुळे किती गंभीर समस्या बनली होती! 'सर, काळगाव दिघीची ठकुबाई आहे. तिथं पाझर तलावाचं काम शेतक-यांनी अडविल्यामुळे बंद पडलं होतं, या बाईनं व तिच्या भावानं रीतसर अग दिल्यामुळे त्यांनी जवळच्या पॉकेटमधील रांजणीच्या काऊडेपच्या कामावर जावं असा मी लेखी हुकूम दिला. तिथं ते पोचले, पण तिथल्या शेतक-याला आपल्या शेताम उन्हाळी भुईमूग घ्यायच्या असल्यामुळे त्यानं अडथळा केला व ते काम बंद पड: ठकुबाई व तिचा भाऊ परत गावी येताना वाटेतच ठकुबाई उपासमारीनं मेली के रिपोर्ट आला आहे....' ‘पण आधी कुठेतरी हे बहीण-भाऊ कामावर असतील ना? तिथ * धान्याची कुपनं मिळाली असतीलच की ते धान्य किती होतं किती दिवस पुरल अत ही माहिती काढली का? 'हो, मी ती चौकशी केली आहे. मागील रस्त्याच्या कामापोटी त्यांना ध कुपनं बरीच मिळाली होती, पण त्या गावचं धान्य दुकान मी मागेच तक्रारीवरून सर करून काळगावला जोडलं होतं. यात आणखी एक बाब अशी की, तालुक्या शेतमजूर पंचायतीचा अध्यक्ष विसपुतेनं ठकुबाईच्या भावाकडून कुपनं विकत । व त्याच्या हातावर फक्त पन्नास रुपये टिकवले. आता रेशन दुकानात विसपुत ने सस्पेंडे ता पाणी! पाणी!! / ९२ दुकानदाराने व्यवस्थित रेकॉर्ड करून ठेवलं आहे की, अवघ्या आठच दिवसांपूर्वी कुबाईच्या भावानं पन्नास किलो गहू कुपनावर उचललाय. त्यामुळे ऑफिशियली हा भूकबळी ठरत नाही.... तसा रिपोर्ट मी केला आहे सर कालच... पण माझं मन मला टोचणी देतंय - हे बरोबर नाही - हा खराच भूकवळी आहे.. मी फार अस्वस्थ आहे सर....!" | शिंदेची समजूत घालून मी त्याला पाठ्यून दिलं, पण मीही त्याच्याएवढाच अस्वस्थ झालो. ठकुवाईचा भूकबळी ख-या अर्थाने होता का नव्हता है मला फिल्डबर न जाता सांगता येणं कठीण होतं, पण त्यामुळे या वर्षी जिल्ह्याला दुष्काळानं केवढ्य जबरी तडाखा दिला आहे, याची तीव्रता मात्र त्याचं गांभीर्य अधोरेखित करून गेली. ...आणि माझा निर्णय झाला होता. प्राप्त परिस्थितीमध्ये पुढील संभाव्य भूकबळी टाळायचे असतील तर योजनाबाह्य रस्ते मंजूर करण्याव्यतिरिक्त कुठलाही पर्याय शिल्लक नव्हता! आणि त्याच्या जोडीला कुपनावर मजुरांना धान्य मिळण्यासाठी आठवड्यातून दोन दिवस कामावर जाऊन रेशन दुकानदाराने धान्य वाटप करावे असा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करणे, हा मार्ग मला सापडला. यात फार मोठा धोका होता • ओ. एस. डी. यंदे यामध्ये कोलदांडा घालेल अशी शक्यता नव्हे, खात्रीच होती, तरीही भी आज हा धोका घेण्यासाठी तयार झालो होतो. माझ्यातील संभ्रमित अर्जुनाला मीच कृष्ण होऊन तयार केलं होतं. मी कलेक्टर भावे साहेबांशी सविस्तर बोललो. ते तात्काळ सहमत झाले. योजनाबाह्य रस्ते जिल्हापातळीवरच मंजूर करून आयुक्ताकई कार्योत्तर मंजुरीला पाठवायचे व कुपनावर धान्य वाटपासाठी आठचयातून दोन दिवस प्रत्यक्ष कामाच्या जागी रेशन दुकानदारांनी जाऊन धान्य वाटप करायचं या दोन्ही गोष्टींना भावे साहेबांनी मान्यता दिली. 'सर...' मी उठता उठता माझ्या मनातली भीती व्यक्त केली, 'मी एक छोटा अधिकारी- डेप्युटी कलेक्टर आहे... उद्या न जाणो यात चौकशी झाली तर आय फिअर.. माझं करिअर धोक्यात येऊ शकतं सर....!" 'डोंट वरी देशमुख.... हा निर्णय तुमचा एकट्याचा नाही. फायनल अॅथॉरिटी म्हणून मीच सही करतोय ना... कारण फाईलवर हे सारं स्पष्ट लिहायचं. आणि मी यात तुमच्या बरोबर आहे... आय लाईक युयर अॅटिट्यूड.. मी स्वतःला कॉपीबुक कलेक्टर समजतो. नियमाच्या पलीकडे मी कधीच जात नाही पण हा प्रसंगच असा हमी ? फसली हमी ? / ९३ आहे की, परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी याची गरज आहे... हे भान मला तुम्ही दिलं. आय अॅप्रिसिएट युवर सोशल आऊटलुक... आय अॅम वुईथ यू.....!' त्यांच्या चेंबरमधून बाहेर पडताना मनावरचा सारा ताण कमी झाला होता. ! | पुढील दीड महिन्यात गरज व मागणीप्रमाणे आम्हाला जवळपास दीडशे नियोजनबाह्य रस्त्याची कामे मंजूर करावी लागली. प्रत्येक कामाची मंजुरी दिल्यावर लगेच त्याचा कार्योत्तर मंजुरीचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवत होतो. त्याची प्रथम छाननी व्हायची ती रोजगार हमी शाखेत, ओ. एस. डी यंदे विभागप्रमुख होते. तेही भले मोठे ‘ऑब्जेक्शन' लावून पाठवायचे, मी त्याचं पुन्हा उत्तर पाठवायचो व मंजुरीसाठी विनंती करायचो.... | अक्षरशः ते दोन-तीन महिने अनेक आघाड्या मला सांभाळाळ्या लागल्या, जिल्ह्याचे दुष्काळाचं नियोजन, नवनवीन कामे मंजूर करणे, ते सुरू करणे, त्यांना कुपनावर धान्य मिळतं की नाही हे जिल्हा पुरवठा अधिका-यांच्या मदतीने पाहाणे आणि यंद्यांच्या त्रुटीला उत्तर देणे. हे सारं करताना वेळ कसा जात होता तेच कळत नव्हतं ! जूनमध्ये पाऊस सुरू झाला आणि मजूर शेतीकामाकडे वळले. त्याच काळात भाव्यांची बदली झाली. नवीन कलेक्टर रुजू झाले. मीही निवांत होतो. ! |आणि एके दिवशी बॉम्बगोळा माझ्यावर एका कारणे दाखवा नोटिसी'च्या रूपात येऊन धडकला. 'जवळपास दीडशे नियोजनबाह्य रस्त्यांची कामे आयुक्तांच्या पूर्वपरवानगीविना मंजूर केल्याबद्दल आपणाविरुद्ध विभागीय चौकशी का करण्यात येऊ नये' अशी ती नोटीस होती. ती केवळ मला होती कलेक्टर भावेंना नव्हती. | मी थेट औरंगाबादला धडक मारली व यंदेंना भेटलो व म्हणालो, “सर, 4 नो' काम मंजूर करायचे अंतिम अधिकार कलेक्टरांना असतात. यातलं प्रत्येक का कलेक्टरांच्या मंजुरीनं झालंय... तर मी दोषी कसा? असू. तर दोघेही असू. मग त्यांना नोटीस नाही केवळ मलाच का ?' 'देशमुख, मी तुम्हाला जेव्हा पहिली ३-४ कामे ‘ऑब्जेक्शन' लावून पाठवा तेव्हाच पुढील कामे घ्यायला नको होती....' | ‘पण सर, तेव्हाची परिस्थिती भयानक होती आणि भूकबळी, उपोषण, मा टाळण्यासाठी त्यांची फार गरज होती... आणी हे सारं भावे साहेबांनी समजून उम" पाणी! पाणी!! / ९४ केलं आहे... माझ्यावर नोटीस का म्हणून? मी काम मंजूर करणारी अॅथॉरिटी नाही...' 'मी जर असं म्हणालो तर...' यंदे छद्मी स्वरात म्हणाले, “तुम्ही कलेक्टरांना नीट ब्रीफ केलं नाही. त्यांना अंधारात ठेवलं व ही कामे त्यांच्याकडून मंजूर करून घेतली...' त्यांनी आपले वाक्य अर्ध्यावर सोडीत खांदे उडवले. ‘धिस इज टू मच सर....' मी हतबुध्द होत म्हणालो, 'तुम्हाला असं म्हणायचं आहे की, भावे साहेबांना काही कळत नव्हतं - मी जे कागद त्यांच्यापुढे ठेवत होतो, त्यावर ते सही करायचे...' ‘तुम्ही विपर्यास करीत आहात' यंदे म्हणाले, 'पण जसं तुम्ही म्हणता की, कामे कलेक्टरांनी मंजूर केली, तसंच मीही म्हणेन की, ही नोटीस तुम्हाला आयुक्तांनी दिली, मी नाही. आणि तेही मी त्यांच्यासमोर ठेवलेल्या कागदावर न बघता सही करतात असं म्हणू का?' । | यंद्यांनी मला निरुत्तर केलं होतं. | मी आयुक्तांना भेटलो, पण त्यांच्याकडे वेळ फार कमी होता. पोलंडच्या राष्ट्राध्यक्षांचा वेरुळभेटीचा कार्यक्रम होता व सतत फोन खणखणत होते. मी त्यांच्याशी दहा मिनिटांपैकी एक मिनिटच बोलू शकलो. अखेरीस ते म्हणाले, ‘ओके तुमचं लेखी म्हणणं पाठवा - मी पाहतो...' मी त्यांच्या चेंबरच्या बाहेर आलो आणि उपायुक्तांकडे गेलो. ते जुने जाणते व समजूतदार म्हणून समजले जात. त्यांना मी सारं कथन केलं, तेव्हा ते म्हणाले, | ‘देशमुख, अहो, आपण रिस्क कधी घ्यायची नाही. कारण शासनात असं काम करणा-यांना कधीही प्रोटेक्शन मिळत नाही तरी मी तुम्हाला जाणतो व माझ्यापरीनं फारसं काही होणार नाही याची काळजी घेईन.... पण मलाही माझ्या मर्यादा आहेत हे तुम्ही जाणता. आणि पुन्हा कमिशनर साहेब माझं ऐकतीलच असं नाही.... आफ्टर ऑल ही इज अॅन आय. ए. एस. ऑफिसर... यू नो....' मी तडक मुंबई गाठली. हेतू हा होता की, भावे साहेबांना भेटावं. सारी कल्पना द्यावी. पण तिथं गेल्यावर कळलं की, चारच दिवसांपूर्वी ते दिल्लीला डेप्युटेशनवर रसायन विभागात गेले आहेत. हमी ? कसली हमी ? / ९५ | तरी मी त्यांना फोन मिळवून सविस्तर बोललो... ते म्हणाले, 'मी आयुक्तांशी बोलतो. हा तुमच्यावर अन्याय आहे. ही नोटीस खरे तर शासनानं मला द्यायला हवी... एनी वे.... आय विल सी....' पुढील सहा - सात महिने काही न होता गेले. माझाही क्षोभ व ताण काळाच्या ओघात बोथट झाला होता. आता मला वेध लागले होते प्रमोशनचे. अप्पर जिल्हाधिकारी म्हणून प्रमोशन यादीत माझं नाव होतं.... एकदा ते मिळालं की या बाबींवर पडदा पडला असता... निदान माझ्या बाबतीत तरी.... - काही दिवसांनी आयुक्तांनी सदर प्रकरण माझ्यावर ठपका ठेवून बंद करीत असल्याचं लेखी कळवलं आणि मी सुटकेचा निःश्वास टाकला. | आता वाट होती प्रमोशनची... माझ्या बॅचचे सारे जण वाट पाहात होते. माझ्या बॅचमध्ये मी सर्वप्रथम होतो; कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत माझ्या वेळी मी महाराष्ट्रात सर्वप्रथम होतो व मेरिटप्रमाणे मला सर्वप्रथम प्रमोशन मिळणार होतं. आणि घडलं ते आक्रीतच. प्रमोशनची यादी लागली, त्यात माझं नाव नव्हतंच. माझ्या बॅचमधले माझ्या खालचे डेप्युटी कलेक्टर प्रमोट झाले होते.... | मी खोलात जाऊन चौकशी केली, तेव्हा कळलं की, निवड समितीचे एक सदस्य म्हणून आमचे आयुक्तही होते आणि योजनाबाह्य कामे फार मोठ्या प्रमाणावर आयुक्तांची मंजुरी न घेता सुरू केल्याबद्दल माझ्यावर जो ‘ठपका ठेवण्यात आला होता, त्यामुळे माझी बढती एक वर्ष रोखण्याचा समितीनं निर्णय घेतला होता.... | हा माझ्यासाठी फार मोठा आघात होता. गेली दहा वर्षे मी डेप्युटी कलेक्टर म्हणून 'करिअर' घडवलं होतं. सतत चांगले व उत्कृष्ट गोपनीय अहवाल मिळवले होते. ज्यांच्या अधारे प्रमोशन होतं, मग या वर्षीच्या गोपनीय अहवालात 'रिव्यू करताना आयुक्तांनी 'ठपका ठेवल्याचे नमूद केल्यामुळे माझ्या दहा वर्षांच्या चांगल्या कामावर पाणी फेरलं गेलं.... यानंतर भावे साहेब एकदा कामानिमित्त केंद्रीय रसायनमंत्र्यासोबत औरंगाबादला आले असता मी त्यांना जाऊन भेटलो व कळवळून म्हणालो, 'सर, सामाजिक जाणीव ठेवून मी काम केलं, त्याचं हे फळ मी समजू का? हा कुठला न्याय सर? मी काही फायनल अॅथॉरिटी नव्हतो - ती तुम्ही होता.... माफ करा सर, पण तुम्ही आय ए. एस. असल्यामुळे सरकारनं काही केलं नाही तुमच्याविरुद्ध... त्यांना सापडला माझ्यासारखा छोटा मासा' । पाणी! पाणी!! / ९६ भावेही चांगलेच अस्वस्थ झाले होते. 1 थिस इज नो गुड देशमुख. आय फिल एक्स्ट्रिमली सॉरी फॉर यू....' 'सरे, रोजगार हमीद्वारे शासनाने प्रत्येक प्रौढाला रोजगाराची हमी दिली आहे. जगण्याची हमी दिली आहे! नाही दिली ती माझ्यासारख्या मध्यम पातळीच्या अधिका-याला... सामाजिक आंच ठेवून काम करणान्या अधिका-याला. ही कसली हमी आहे सर? हॅरासमेंटची, की झापड बंद करून आपली कातडी बचावीत काम करण्याची? तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर देऊ शकाल सर, उत्तर ?' हमी ? कसली हमी ?/ ९७ ७, कुंड ‘भौत देर हुई पाटलीनकाकू, मकान में एक थेंब बी पानी नहीं है। जरा ले लू?' अजिजीनं मुलाण्याच्या सईदानं विचारलं, तेव्हा रहाटानं पाणी शेंदता शेंदता पाटलीणकाकू थांबल्या व ठसक्यात म्हणाल्या, 'जरा थांब गं. माझं होऊ दे. मला घाई आहे....' निःशब्द चुळबुळत व स्वतःशीच चरफडत सईदा सामुदायिक विहिरीपासून जरा दूर झाली व बाजूच्या काटेरी बाभळीखाली फतकल मारून बसली. | केवळ सईदाच नव्हे, तर अनेक बायको पाटलीणकाकूचं पाणी भरून केव्हा होतं याची आतुरतेने वाट पाहात होत्या, पण त्यांचं पाणी भरणं काही संपत नव्हतं. त्यांच्या दोन्ही सुना पाण्याचे हंडे डोईवर वागवीत जात - येत होत्या व त्या शेंदत होत्या. खरं तर आता त्यांच्या घरची पाटीलकी संपली होती. सरकारदरबारी जुने मालीपाटील' अशीच त्यांची नोंद होती; पण पाटलीणकाकूचा सासरा देवमाणूस. साया गावात आजही त्याचा मान आहे. त्यापोटी त्यांना सारे पाटलीणकाकू म्हणत व नंबर न लावता पाणी घेऊ देत. कंडम / ९९ काल रात्री टैंकरच्या दोन खेपा झाल्या होत्या. सारं पाणी गायच्या मारुती देवळाजवळील बहात्तरच्या दुष्काळात अर्धकच्ची खोदलेल्या विहिरीत ओतलं होतं व आज सकाळपासून पाणी नेण्यासाठी बायकापोरांची झिम्मड उडाली होती. | पाणी क्षणाक्षणाला संपत होतं व सा-याच बायांना धास्ती वाटत होती की, आपली पाळी येईपर्यंत पाणी संपलं तर पुन्हा संध्याकाळपर्यंत वाट पाहणं आलं. पुन्हा टैंकर वेळेवर येईलच याचा भरवसाही नव्हता. भर मे महिन्यातील चटके देणारे उष्ण दिवस व रात्री-तहान भागवायलाही पाणी पुरत नव्हतं. पण टैंकरचं येणारं पाणी मर्यादित असल्यामुळे गावच्या सरपंचानं मागच्या आठवड्यात मीटिंग घेऊन फर्मान काढलं होतं, की घरटी चार कळशाच पाणी घ्यायचे; पण याला त्याचं, मालीपाटलाचं आणि तालुका संजय गांधी निराधार योजना कमिटीवर सदस्य असलेल्या सखोबा भुजबळ माळ्याचं घर अपवाद होतं. त्यांच्या घरच्या बाईमाणसानं व गड्यानं केव्हाही यावं, नंबर नसताना लागेल तेवढं पाणी भरावं हा शिरस्ता सान्यांनीच निमूटपणे मान्य केलेला. काल रात्री उशिरा आलेला टैंकर प्रथम आपल्या वाड्यासमोर उभा करून पाईपनं घरी पाणी भरल्यामुळे सरपंच वहिनी आज विहिरीवर नव्हत्या हे नशीब! तसंच भुजबळ अक्कासाहेब भाचीच्या लग्नासाठी मार्डीला गेल्यामुळे येणार नव्हत्या. साया बायकांना त्यामुळे हायसं वाटत असतानाच पाटलीणकाकू आल्या व त्यांचे पाणी भर काही संपेना. आज त्या नेहमीपेक्षा जास्तच पाणी नेत होत्या, तेव्हा माहिती घेण्यास जोशांच्या सरलाबाईनं विचारलंसुद्धा' 'काय पाटलीणकाकू आज काही विशेष : 'होय जोशीणबाई. रात्री आमदार व इतर मंडळी जेवायला येताहेत- ग्रामपंचायत इलेक्शन जवळ आलीय ना.... आणि त्यांनी वाक्य अर्धवटच सा होतं. त्यातून त्यांना त्यांच्या घराचं राजकीय महत्त्व व्यक्त करायचं होतं. | 'ते ठीक हो... पण आम्हालाही जरा पाणी मिळू द्या.' चव्हाणांची मॅट्रिकपर्यंत शिकलेली सून फटकळपणे म्हणाली, 'तुमचा मान मोठा; पण आम्हालाही पाणी । द्या. आमच्याही घरी पाण्याचा ठणाणा आहे.' तिथं जमलेला सान्याच बायांना चव्हाणांच्या सूनबाईचं बोलणं मनोमन में पडले होते. कारण पुन्हा पुन्हा त्यांच्या नजरा विहिरीतल्या कमी होणा-या पाण्या धास्तावल्याप्रमाणे जात होत्या. पाणी! पाणी!!/१०० ‘पुरे हो... एवढा अगोचरपणा तरुण वयात शोभत नाही...' आपल्या अंबाड्याला हिसडा देत पाटलीणकाकू म्हणाल्या व त्यांनी जरा जोर लावूनच रहाट ओढला आणि एकदम त्या मागे घसरल्या. त्यांच्या हातातून दोर निसटला आणि कळशी गडगडत विहिरीत जाऊन पडली. त्याचबरोबर कच्चा झालेला रहाटही निखळून विहिरीत गडप झाला. ‘आई 5 गंऽ' पाटलीणकाकूचा विव्हळण्याचा आवाज ऐकून चव्हाणांची सून पुढे सरसावली. तिनं हात देऊन त्यांना नीट उठवलं व बाजूच्या कड्यावर बसवलं. त्यांची कंबर धरली गेली होती. त्याचवेळी त्यांच्या दोन्ही सुना रिकाम्या घागरी घेऊन आल्या होत्या. त्यांच्या आधाराने पाटलीणकाकू घराकडे चालत्या झाल्या. आता सान्याचं लक्ष रहाटाविना ओकाबोका वाटणा-या विहिरीकडे गेलं. ती | विहीर अर्धी कच्ची बांधली गेली होती. रहाटाविना पाणी काढणं कठीण होतं. 'आता गं बया काय करायचं?' बारडकरांची आवडाबाई म्हणाली, 'ही विहीर कच्ची हाय. त्याच्या बांधावर उभं राहून पाणी शेंदणं धोक्याचं वाटतं....' | ते सान्यांना पटलं होतं, पण पाणी तर हवं होतं. पुन्हा ऊन वाढत होतं. पाणी आटायला किती वेळ लागणार? प्रत्येकीच्या मनात शंका, प्रश्न भिरभिरत होते. घरची कामंही खोळंबली होती. पाणी हा त्यांच्यासाठी जीवन-मरणाचा प्रश्न होऊन राहिला होता. त्यांची सोडवणूक केली ती पुन्हा चव्हाणांच्या सुनेनं. ‘मावशीबाय, असं म्हणलं तर पाणी नाही मिळायचं. सावधपणे वाकून लहान कळशीनं पाणी शेंदता येईल....' आणि मग एकाच वेळी विहिरीच्या चहूबाजूंनी गोळा होत बायकांनी आपापले दोर कळशीला बांधून विहिरीत लोटायला सुरू केली. या डोळ्यांवर हात धरून बायजानं आपल्या अधू नजरेत आभाळात चढत जाणारा सूर्य साठवायचा बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर दृष्टीला भान आलं आणि ती गुडघ्यावर हाताने जोर देत कष्टपूर्वक उठली आणि पालाच्या झोपडीत शिरली. कंडम / १०१ सकाळपासून उन्हात बसून घसा कोरडा पडला होता. गेले दोन - तीन दिवस चहाचा घोटही मिळाला नव्हता. कारण चहापत्ती व साखर दोन्ही संपलं होतं आणि पेन्शनची मनिऑईर यायला वेळ होता. "आज सखोबास्नी इच्यारायला हवं - बाबा रे तू यवडा मेंबर मानूस, जरा जल्दीनं धाड़ की पेन्शन....!' असं ती स्वतःशीच पुटपुटली आणि पाण्याचा एक घोट । घेतला. गावच्या सखोबा भुजबळामुळेच तिला शासनाची संजय गांधी निराधार योजनेची दरमहा शंभर रुपयाची पेन्शन सुरू झाली होती. तिचा एकुतला एक लेक व सून मागच्या दुष्काळात गाव सोडून औरंगाबादला गेले, ते परत आलेच नाहीत. सुरुवातीला कधीमधी गावाकडे येणा-यासोबत किंवा मनिऑर्डरने थोडे - फार पैसे यायचे. मग ते जास्तच अनियमित व दीर्घ अंतराचे होत येणे बंद झाले. सत्तरीच्या पुढे गेलेलं वय, कमरेत बाक आलेला आणि नजरेनं अधू असलेली बायजा स्वतःचं पोट भरायला असमर्थ होती. त्यामुळे कधी काळी लोकांनी स्वाभिमानपूर्वक बंद केलेल्या म्हारकी वतनाची आठवण देत बायजा सरपंच पाटलाकडे बुंधळे - पीठ तेल मागायची. नाही म्हटलं तरी पुन्हा पुन्हा यायची तेव्हा नाइलाजानं का होईना, तिच्या पदरात शिळापाका का होईना भाकरतुकडा पडायचा. असं भीक मागत अर्धपोटी का होईना, कशीबशी तिची कुड़ी तग धरून होती. । त्या वर्षी नव्यानं बदलून आलेला तलाठी अप्पा तिच्या जातीकुळाचा निघाला. त्यानं सखोबांना विनवलं, तसं एका मीटिंगमध्ये तिच्या नावे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पेन्शन मंजूर करण्यात आली. तेव्हापासून भीक न मागता कसंबसं तिचं पोट भरू लागलं. पण पेन्शनीचे पैसे वेळेवर म्हणून कधी यायचे नाहीत. कधी बजेट नाही, तर कधी मनिऑर्डर लिहिणं झालं नाही तहसीलला वेळेवर म्हणून उशीर व्हायची पुन्हा पोस्टमन व सखोबा दरवेळी त्यातले दहा-दहा हक्कानं कापून घ्यायचे. बायजाला त्यांना रागावून विचारताही येत नसे. कारण एक तर बोलायची भीती, पुन्हा दात पडल्यामुळे आवाज अस्पष्ट व कातर झालेला. मिंधेपणाची भावनाही होतीच त्यांनीच तर दया दाखवून पेन्शन मंजूर केली. तो तिचा हक्क आहे, हे कुठे तिला माहीत होतं? पाणी! पाणी!! { १०२ पाण्याच्या घोटानं घसा ओला झाला; पण पोट भड़कलेलंच होतं. त्याला गोडमिट्ट चहा किंवा भाकरतुकडा हवा होता. त्यासाठी पेन्शन येणं आवश्यक होतं. यावेळी जरा जास्तच उशीर झाला होता. । पुन्हा तिनं पाणी घशाखाली रिचवलं आणि तिच्या लक्षात आलं की पाणी संपलंय. तिच्या पोटात भीतीचा गोळा उठला. या रणरणत्या उन्हात विहिरीपर्यंत कमरेतल्या बाकासह पाय ओढीत अनवाणी जायचं, तिथं कुणी असलं तर पाणी वाढण्याची भीक मागायची. कारण या विहिरीवर त्यांना पाणी भरावयास मनाई होती. टैंकरचं पाणी चालू असलं तरी ते या सामुदायिक विहिरीत आणि नदीकाठच्या वाळूत असलेल्या महाराच्या वेगळ्या विहिरीत स्वतंत्रपणे टाकलं जायचं. ती विहीर खूप लांब होती. तिथवर जाणं बायजेला जमत नसे, म्हणून ती गावातल्या सामुदायिक विहिरीवरच यायची व तिथं पाणी भरणा-या बायोमुलांना पाणी वाढायची विनवणी करायची. पण केवढा त्रास... किती यातायात... नुसत्या कल्पनेनंही तिच्या पोयत भीतीचा गोळा उठला होता. पण पाणी हवंच. कारण दिवसभर पोटात काही जाईल याची शाश्वती नव्हती. सरपंच वहिनी आणि पाटलीणकाकुंनी काल पुन्हा न येण्याचं खडसावून सांगितलं होतं. दुष्काळानं प्रत्येक घरटं होरपळले असताना इतरत्र तिच्यासाठी उरलासुरला भाकरतुकडा मिळणं अशक्य होतं. मुख्य म्हणजे भुकेनं माणसातली तेवढी आस्थाही संपुथत आणली होती. तेव्हा निदान पोटभर पाणी तरी हवंच हवं! भुकेनं खंगलेल्या शरीराला मनाचा जोर लावीत बायजा पुन्हा कष्टपूर्वक आपल्या पायावर उभी राहिली. बाक आलेल्या कमरेत छोटं मडकं घेतलं, खांद्यावरून फाटलेला पदर सावरून बरगड्या दाखवणारी छाती झाकली आणि पाय ओढीत व चालण्याचे श्रम न सोसत असल्यामुळे बोळक्या तोंडानं खोल, घशातच अडकणारे विकले स्वर काढीत ती विहिरीकडे निघाली. अधू नजरेत आता डोक्यावरचा भंगभगता, तप्त प्रकाश अस्फूटपणे शिरत पायाखालची वाट अंधुकशी दाखवीत होता; पण त्यातले खाचखळगे व काटेकुटे मात्र दिसत नव्हते. त्यामुळे मधून मधून ठेचाळत, काटे टोचून घेत कशीबशी ती विहिरीवर कंडम / १०३ पोचली तेव्हा थकून तिनं बसकणच मारली. अवघ्या दहा-पंधरा मिनिटांची ती वाटचाल तिला प्रदीर्घ व वेदनामय वाटली होती. | चव्हाणांची सून अजूनही पाणी भरत होती. बायला ती तिचा हिरव्याकंच साडीमुळे - जी भर उन्हात जास्तच झळकत होती ओळखू आली. 'येसू पोरी जरा पानी वाढ व, लई मेहरबानी व्हईल... घसा कोरडा पडलाय बग...!" 'आलीस का पाणी मागायला?' त्रासिक सुरात येसू करवदली. 'रोज तुला काय मीच भेटते बरी पाणी मागायला?' 'तसं नाय पोरे... म्या तरी काय करू? अगं चालता येत नाही, नजरही धुरकटलीय... दया कर पोरी, जरा पानी वाढ.' 'मला वेळ नाही बायजे!” येसू निक्षून म्हणाली, 'मला फार कामं आहेत!' त्याच वेळी दुस-या खेपेसाठी जोशांच्या सरलाबाई येत होत्या. त्यांना बायजेची दया आली व त्यांनी तिचं मडकं पाण्यानं भरून दिलं. तिथच हाताची ओंजळ करून तिनं पोट भर पाणीही पिऊन घेतलं. पुन्हा तीच घराकडची कष्टप्रद वाटचाल... आता भरीस बाक आलेल्या कमरेवर छोटासा खापराचा माठ होता. एक मात्र बरं होतं. सूर्य माथ्यावर होता. त्यामुळे अधू नजरेतला प्रकाश कमी झाला नव्हता. रस्ता बयापैकी दिसत होता. पण त्याचा ताप कुडीला भाजून काढीत होता. शरीरातला सारा ओलावा त्यानं शोधून घेतल्यामुळे मुळचीच शुष्क त्वचा अधिकच रखरखीत झाली होती. आणि पायाशी आलेला मोठा दगड़ न दिसल्यामुळे बायजेचा तोल गेला. ती अडखळून पडली आणि कमरेवरचा माठ बाजूला पडून फुटला व त्यातल सा पाणी क्षणार्धातच तप्त जमिनीत शोषलं गेलं. तिच्या पायाला ठेच लागली होती व पडल्यामुळे अधू कुडीमध्ये वेदना उसळली होती; पण तिला माठ फुटल्याचं आणि पाणी सांडल्याचं जास्त दुःख हो: कितीतरी वेळ ती रस्त्यावर ती तशीच खिन्न बसून होती. उन्हाचा ताप जेका सहन होईना, तेव्हा ती पुन्हा उठली आणि कशीबशी आपल्या झोपडीत आली. पाणी! पाणी!!/ १०४ आणि थकून जाऊन तिनं बसकण मारली. मग आपोआपच तिचा देह कलंडला. पोटात भूक व तहान डंख मारीत होती, तरी एक प्रकारच्या ग्लानीमध्ये ती तशीच चुपचाप पडून होती. | तिला भान आलं तेव्हा नजरेतला प्रकाश कमी झाला होता. अंदाजानं तिनं खूण बांधली की, तिन्ही सांजा झाल्या आहेत. तिनं हात चाचपून पाहिलं. अजूनही घरात दोन - तीन छोटी मोठी खापराची भांडी होती. त्यातलं एक हाताशी आलं. आणि तिची पाण्याची तहान उकळ्या मारू लागली. बराच वेळ तिनं विचार केला आणि पुन्हा एकदा सामुदायिक विहिरीकडे पाण्यासाठी जायचं तिनं ठरवलं. आता डोळयातला प्रकाश फारच फिकट झाला होता. त्यामुळे रस्त्याचा अंदाज घेत धडपणे न ठेचाळता चालणंही कष्टप्रद होतं; पण तहान जवर होती व भुकेला अन्न नाही तर निदान पाणी तरी हवं म्हणून तर तिची धडपड होती. | कशीबशी ती विहिरीपाशी आली तेव्हा अंधार दाटला होता. तिला काहीच दिसत नव्हतं. कसलीही चाहूल तिला लागली नाही. कारण तिथं चिटपाखरूही नव्हतं. तिनं अंदाज बांधला की, आता सान्या जणी सकाळीच पाण्याला येणार. तोवर काय करावं? कुणी पाणी वाढेल का? या मनात उद्भवणा-या प्रश्नाला तिनं नकारार्थी मान हलवून उत्तर दिलं. काही वेळ ती तशीच काही न सुचून बसून राहिली. तिची शुष्क जीभ शुष्क वाळल्या ओठांना ओलावा देण्याऐवजी अधिकच शुष्क करीत होती. एकाच वेळी भूक व तहानेचा डोंब पोटात उसळला होता. अधिक काळ तिला राहावेना. ती उठली व विहिरीजवळ अंदाजानं आली. ही बहुजन समाजाची विहीर... इथं आपल्या जातीची माणसं पाणी भरत नाहीत. हीर बाटते म्हने... काय करावं? कसं करावं? नदीकाठची आपल्या जातीची विहीर तर लांब आहे. या अंधारात व ही जीवघेणी तहान घेऊन तिथं जाणं शक्य नव्हतं. सारा धीर एकवटून ती अजून विहिरीजवळ गेली. हात चाचपडून शोधू लागली काही क्षणांच्या धडपडीनंतर एक सोल हाती आली. तिला एक छोटी बादली पण लावलेली होती. बायजेची धाकधूक कमी झाली. कंडम / १०५ सकाळी पाटलीणकाकू पाणी शेंदताना रहाट मोडून पङ्कलं होतं. त्या जागी बायजा अंदाजानं एक एक पाऊल सावकाशपणे टाकीत आली. तिथला काठ बांधलेला नव्हता. तिथं ती उभी राहिली आणि अंदाजानं तो पोहरा विहिरीत हलकेच लोटला. होतं... विहिरीत पाणी होतं. तिच्या कानांनी पाण्यावर पोहरा आपटल्याचं टिपलं होतं. तिनं तो दोर हलवला आणि तो थोडा भरताच शेंदण्यासाठी तिची वाकलेली कुडी थोडी अधिक वाकली, हातात जोर येण्यासाठी... आणि बायजेचा तोल गेला. भूक व तहानेनं जर्जर झालेल्या तिच्या कुडीला व खारकेसारख्या काटकुळ्या हातांना पोहत्यातल्या पाण्याचं वजन पेललं नाही. पायाखालची जमीन निसटल्याचा भास झाला. आणि तिच्या दंतविहीन बोळक्या मुखातून एक घुसमटला स्वर कसाबसा बाहेर आला आणि काही क्षणात तो शांत झाला. आजही पाण्याच्या टॅकरला उशीर झाला होता. कारणंही नेहेमीचीच होती. डिपार्टमेंटचा हा सर्वात जुना टूक होता, काही किरकोळ दुरुस्ती निघाली. ती काढून घेण्यात व डिझेल घेण्यात बराच वेळ गेला. मग पांढरवाडीच्या लघुतलावावर जाऊन भरला व गावाकडे निघाला, तेव्हा रात्रीचे आठ वाजून गेले होते. ड्रायव्हरनं कितीतरी स्वतःशी चडफडाट केला होता; पण राग काढायला आज क्लीनरही सोबत नव्हता. तो ‘सिक' वर होता. गावाच्या पाट्यावर भुजबळआण्णा भेटले. ते तालुक्याहून शेवटच्या बसन गावी परतले होते. मग त्यांना गाडीत घेतलं. प्रथम त्यांच्या घरासमोर गाडी उभी राहिली. तिन्ही सांजेलाच आक्काबाई लग्न आटोपून आल्या होत्या, त्यामुळे घरी पाणी नव्हतंच. त्यांनी भरपूर पाणी भरुन घेतलं. मग सबंध गावाला वळसा घालून ट्रक सामुदायिक विहिरीजवळ गेला आणि पाण्याचा पाईप अंधारातच विहिरीत सोडण्यात आला. काही वेळातच तो टैंकर रित झाला. | रात्रीतून त्यानं तीन खेपा करून विहिरीत पाणी सोडलं. उद्या त्याचा ऑफ होता. गावातून बोंब होऊ नये म्हणून जादा पाणी सोडणं भाग होतं. तसं त्यानं "" पाणी! पाणी!! / १०६ संरपंचाना सांगूनही ठेवलं होतं. झालंच तर मघाशी भुजबळअण्णांचीही परवानगी घेतली होती. हा टैंकर ज्या ट्रकवर माऊंट केला होता, तो जुना असल्यामुळे व त्याचा सायलेन्सर काम देत नसल्यामुळे चालू स्थितीत प्रचंड आवाज करायचा. आज त्या ट्रकनं मोजून चार खेपा केल्या होत्या. प्रत्येक खेपेला गावाला प्रचंड आवाज करीत वळसा घालताना सान्या गावाला आपोआप कळून चुकायचं, की पाणी आलं आहे. उद्या गावात दोन लग्नं होती. एक धोंडे पाटलाकडे व दुसरं गावकुसाबाहेर कांबळ्याच्या घरी. झालंच तर गावातल्या एका फुटकळ पिराची स्थानिक यात्रा उद्या सुरू होणार होती. त्यासाठी अनाळ्याच्या मशिदीचा मौलवी आजच गावात आला होता. त्याचा मुक्काम शेख बद्रुद्दीनकडे होता. किरकोळ म्हटले तरी हजार - पांचशे लोक बकरी, कोंबडं कापायचे. सान्या मुसलमान आळीत यावेळी उत्साहाचं वातावरण असायचं. पुन्हा आज अनेक कुटुंबांना पाणी मिळालं नव्हतं. कारण वाढत्या उन्हामुळे बरंचसं पाणी विरून जायचं किंवा वाफ होऊन जायचं. पण आज सान्या गावातल्या गृहिणीमध्ये समाधानाचं वारं पसरलं होतं. कारण आज टैंकरच्या चार खेपा झाल्या होत्या. | सकाळी सकाळीच धोंडे पाटलाकडे गावकोतवालानं खबर धाडली की, सामुदायिक विहिरीत बायजा रात्री केव्हातरी पडून मरण पावली. रात्रीतून बँकरने पाणी ओतल्यामुळे तिचं प्रेत तट्ट फुगून पाण्यावर आलं होतं. या बातमीनं धोंडे पाटलांचं टकुरं चांगलंच गरम झालं. मळ्यातली विहीर आटल्यामुळे पाण्याचा वांधा होता. कालच पाहुणेरावळे आले होते. तालुक्याहुन पाण्याचा टैंकर मागवणं जिकिरीचं, खर्चाचं काम होतं. 'गाढवीचीला ह्योच टाइम मिळाला वाटतं तडफडायला...' त्यांचा त्रागा खदखदत होता, ‘सालीनं अपशकुन केला लग्नकार्याला...!' काही वेळानं त्यांनी हाक मारली, 'लेका नाम्या, काढ बुलेट आन् जा तालुक्याला समोर घालून टैंकर घेऊन ये. सोता भेट विंजनिअरसायेबांना... कंडम /१०७ चव्हाणांची येसू शिकलेली असली तरी माहेरी' 'जातीसाठी खावी माती' असं वातावरण. पुन्हा तिचा थोरला भाऊ मराठा महासंघाचा तालुकाध्यक्ष, सासरी चव्हाणांकडे पण शहाण्णव कुळीचा अभिमान दर्पासारखा सदैव दरवळता. तिची कडवट प्रतिक्रिया होती, ‘विहीर बाटवली बयेनं. आता प्रेत काढा, विहीरसुद्ध करुन घ्या... नाना उपद्व्याप आले... घरच्या पुरुषमंडळींना तिच्या फटकळपणाचं कौतुक होतं. त्यांनी तिच्या सुरात सूर मिसळून तिला दुजोरा दिला. मुलाण्याच्या सईदाला बायजेकडे पाहिलं की आपल्या मरहुम नानीची याद यायची. त्यामुळे जेव्हा तिला ही बातमी समजली, तेव्हा ती कळवळली, धावतच विहिरीजवळ गेली, वाकून पाहिलं - ते तट्ट फुगलेलं बायजेचं प्रेत भारी विकृत दिसत होतं. तिला ते पाहावेना. काही वेळात सईदानं स्वतःला सावरलं आणि तिला प्रखर वास्तवतेची जाणीव झाली. कालही तिला पाणी मिळालं नव्हतं व आज या प्रकारानं शक्य नव्हतं. आज रात्री तिच्या नव-यानं आनाळ्याच्या मौलवीसाहेबांना जेवायला बोलावलं होतं. ‘आता काय?' हा प्रश्न तिला घनघोर वाटू लागला. घरी आल्यावर नव-याला तिनं हे सांगितलं व हळूच विचारलं, “तो फिर मैं नदीवाले बावड़ी से पाणी लाऊ क्या?' ‘क्या बोली? येडी हो गयी तू सईदा? वो, म्हार - मांगों की बावडी हैं. वहाँ कैसे पाणी भरेंगे?' त्यानं तिला चक्क वेड्यात काढलं होतं, ‘शाम तक कुछ तो होगाच. नहीं तो मैं मस्जिद के बावडी परसे पानी लाऊंगा...' विहिरीभोवती गर्दी वाढत होती, पुरुषमंडळी आपसात चर्चा करीत होती, तर जरा बाजूला बायका - मुली सचिंत मुद्रेनं पुढं काय करायचं?' याबाबत खलबत करीत होती. ‘भुजबळ अण्णा आता काय करायचं? म्हातारीनं लई घोटाळा केला बघा ‘आणि त्यांची वेगळी विहीर असताना इथं का कडमडली कळत नाही... ‘विहीर बाटली हो. कितीही नाही म्हणलं तरी वाटतचं ना..!' ‘आता पाण्यात उतरून सोल लावून काढलं पाहिजे ते प्रेत मग मोटार लावून पाणी उपसायचं, विहीर कोरडी करून घ्यायची... राम राम ! किती उपद्व्याप!' ‘हो ना, आज गावात दोन लग्न, एक बाराव्याचं जेवणं....! | पाणी! पाणी!!/१०८ ‘और हम मुसलमानों की पीर की जत्रा....!' ‘पाण्यासाठी वांधा.. मंडळी नुसतं ओरडत आहेत....' ‘ते बरोबरच आहे. या उन्हात सारखं पाणी प्यावं लागतं. ही अशी भीषण पाणीटंचाई...! ‘मोठ्या मुश्किलीनं मी टैंकर मंजूर करून आणला - त्यात हा अपशकुन...!' ‘आता चर्चा नको मंडळी... कुणाला तरी म्हारवाड्यात पाठवा. तिथल्या नौजवान गब्रू गड्यांना सांगावा धाडा. पंचायतीमध्ये मोठी सोल पडली आहे ती आणा. चला... चला...' थोडं पलीकडे काटेरी बाभळीच्या असलेल्या - नसलेल्या सावलीत बायकांचा घोळकाही आपसात बोलत होता. | ‘पाटलीणकाकू काल तुमच्यामुळे रहाट मोडला. तिथूनच ती म्हातारी तडफडली बरं...। “येशे पोरे, कालच मी म्हणाले होते, तरुण जातीला असं बोलणं शोभत नाही. तुझ्यापेक्षा जुनी असून मी बरी. बिचारीला भाकरतुकडा देत असे. तू साधं काल पाणीही वाढलं नाहीस तिला' । ‘ते जाऊ द्या हो, आला काय करायचं पाण्याचं ते बोला ना...' ‘लई आबाळ व्हतीया बया पाण्यावाचून कालबी पानी नव्हतं, आन् आज हे आसं झालं!' ‘माझ्या घरी नणंदबाई पोराबाळासह आलीया. काल पाण्याने भरलेलं रांजण त्येनी टकराटकरीत फोडून टाकलं बगा. निस्ता ठणाणा चाललाय घरी पाण्याच्या नावानं!' गावाकुसाबाहेर गावकोतवालाकडून कळलेली बातमी अन् पाठोपाठ माली पाटलांचा सांगावा येताच त्या झोपडपट्टीत कालवाकालव सुरू झाली. बायजा आपल्याच जातीजमातीची, पण जरा पल्याड राहाणारी म्हणून दुर्लक्षित झालेली. ती गावच्या विहिरीत - जिथं त्यांना पाणी भरू दिलं जात नव्हतं तिथं बुडून मेली, हे कळताच त्यांच्या प्रतिक्रियाही मोठ्या मासलेवाईक उमटल्या. कंडम / १०९ ‘छान जिरली पांडबा त्यांची. साले, आमास्नी हक्क असूनसुद्धा तिथं पानी भरू देत नाहीत. आता घ्या, आमची एक म्हातारी तिथं बुडून मेली!' ‘त्याचा काही उपेग नाही - पुन्यांदा, ते हीर सुद् करून घेतील बामनाच्या तंतर - मंतरनं-!' ‘ही चर्चा आता नको बाबा आधी म्हातारीला बाहेर काढून नीट पुरलं पाहिजे. त्याची व्यवस्था बघा!' ‘हो - आम्ही तिकडे जातो व प्रेत बाहेर काढतो, तोवर तुम्ही मर्तिकाची तयारी करा.' ‘आणि दफनभूमीत चांगला खड्डाही करून ठेवा...' ‘आजचा खाडा पडला मजुरीला नुकतंच काम सुरू झालं होतं नालाबंडिंगचं - मजुरी बुडाली.' ‘आसं म्हणून कसं चालेल बाबानू, जातीचे काम हाय. पुन्हा ती एकटीच. तिचं पोर - सून इथं हायत कुठं?' ‘त्येस्नी कळवाया हवं-' ‘पन त्येंचा पत्त्या कुनाकडं हाय? यवड्या मोठ्या औरंगाबादात कंच्या झोपडपट्टीत हायेत, ते एक बुद्धच जाने.... । ‘नाय नाय, मागच्या हप्त्यात आपल्या भीमरावाकडनं म्हातारीनं चिट्टी धाडली होती की... हा बगा भीमराव आला...' 'होय तात्या, मीच चिट्ठी लिहिली होती. म्हातारीनं लेक - सुनेला गावाकडे बोलवल होतं. 'लवकर या' म्हणून मीच तिच्या आग्रहावरून लिहिलं होतं बघा... त्याचं बोलणं थांबलं ते एस. टी. च्या आवाजानं. त्यांच्या वस्तीजवळच बसचा स्टॉप होता. बस् फटफटत थांबली, धुराळा यांबला. बसमधून विहिरीत पडून मेलेल्या बायजेचे लेक - सून उतरत होते. 'हे बेस झालं. आता ते पाहुन घेतील आपला रोजगार बुडाया नको.' ‘आणि खड्डा खणायचं पण नको... तिथं पार खडक आहे, बाप्पा खणायला लै त्रास होतो...' ‘चला कांबळयाकडं, लग्नाचा टाइम होतोय...' आणि दोन - तीन तरुण सोडता ते सारे पाहता पाहता पांगले गेले. पाणी! पाणी!! / ११० भीमराव त्यांना सामोरं गेला, जयभीम केला, म्हातारीच्या दुःखाची बातमी दिली आणि पुढे म्हणलं, | ‘धर्मा, आपली जात एकदम कंडम आहे. त्यांना कोणी जगलं - मेलं याची काहीसुद्धा पर्वा नाही. सान्यांना आपलीच पडली आहे; पण दोस्ता, चल, मी येतो तुज्यासगं तिला मी मावशीबाय म्हणायचो... मलाही ती आईवाणीच होती बघ.' 12 कंडम / १११ ८. मृगजळ चंपकशेठची हिरव्याकंच मळ्यातली ओतीव बांधलेली विहीर. त्यामध्ये मे महिन्यातही परसभर असलेलं निव्वळशंख पाणी. किती वेळ तरी परशू कठड्याशी वाकून पाण्यात भर दुपारी पडलेलं आपलंच प्रतिबिंब उदास व शून्य मनानं पाहात आहे. मनात कसले कसले विचार येताहेत हेही समजत नाही अशी गूढ-भरली अवस्था. शेठचा तो बहरलेला मळा दोन ओढ्यांच्या संगमाच्या त्रिकोणात पसरलेला. तरारलेली ऊसशेती, मस्त पोसलेला गहू व हरभरा.... आणि कोप-यात एकरभर प्लॉटवर पसरलेला द्राक्ष मळा. | कुठल्याही जातिवंत शेतक-याची नजर भरून यावी अशी ही समृद्ध शेती, बहरलेलं व सर्वांगांनी फुलून आलेलं हिरवं स्वप्न! | पण - पण या वैभवाचा धनी आहे चंपकशेठ. त्याचे हात कधी काळ्या मातीमध्ये रापले नाहीत की, त्याच्या शरीराला उसाचे तुराटे दंश करून गेले नाहीत. हे भागधेय आपलं व आपल्यासारख्या आठ-दहा शेतक-यांचं. पण स्वतःची जमीन सोडून मजुरीवर चंपकशेठसाठी घाम गाळावा लागतोय. घाम गळाला की जमीन प्रसन्न होतेच. तिला हिरवे धुमारे फुटतातच. पण ते कुरवाळायचा आपला अधिकार नाही; कारण आपण इथे गडीमाणूस... मृगजळ / ११३ परशूचे डोळे पाहाता पाहाता भरून आले. तो वाहीनं ते कोरडे करायचा प्रयत्न करतो, पण विकल मनाला आवर घालता येत नाही, त्यामुळे डोळे पाझरायचे ते पाझरतच... त्याला आपला जमिनीचा भकास, विराण तुकडा आठवत असे. दोन वर्षे अपुल्या पावसानं शेती पिकली नाही... आणि मंजूर झालेली शासनाची जीवनधारा विहीर म्हणजे केवळ एक खोल खड्डाच झालाय. दिलेल्या बजेटमध्ये खडक मध्ये आल्यामुळे जेमतेम दहा मीटरच खाली जाता आलं. जिल्हा परिषदेचे अधिकारी म्हणतात की पंधरा मीटरवर पाणी आहे. गावातल्या एका पायाळू बामणानं इथं पाणी नाही असा छातीठोकपणे निर्वाळा दिला आहे. त्यामुळे उरलेलं खोदकाम करण्यासाठी बँकेचे कर्ज काढायला जीव धजावत नाही; कारण मागचंच पंधरा हजाराचं कर्ज... सरकारने दहा हजार माफ केलं असलं तरी उरलेलं फेडायचं आहेच की....। | त्यामुळे त्याच्या आसुसलेल्या, तहानलेल्या जमिनीला पाण्याचा टिपूस नाही. अपु-या पावसामध्ये पेरलेली हायब्रीड नुसतीच उगवली, दाणा भरलाच नाही. फक्त दीड-दोन महिने दोन्ही बैलांच्या चा-याची तेवढी सोय झाली, पण परशू व त्याच्या कुटुंबाला फाके पडून मजुरीच्या कामासाठी बाहेर पडावं लागलं. बायको व वयात आलेली पोरं बंडिंगच्या मातीकामावर जाते, सातवीतून शाळा सोडलेला शिर्पा पाटलाची गुरं वळीत रानोमाळ हिंडतोय व आपण या चंपकशेठच्या मळ्यात सालगडी म्हणून राबतोय. सारं शिवार उजाड व वैराण बनलेलं... जिथवर नजर घालावी तेवढं रान काळपटलेलं, रखरखीत. अपवाद होता चंपकशेठच्या मळ्याचा. तो यारा एकरांचा मळा ठायी ठाम हिरवागार बहरलेला, आणि याचं कारण याच एच. पी.ची मोटार सतत बारा घ८ चालली तरी न उपसा होणारं पाणी. ही विहीर चंपकशेठनं चक्क ओबामध्ये बांधून तेवढा भाग दगडी पीचिगन आपल्या मळ्याला जोडून घेतला होता. ओढा व सरकारच्या मालकीचा. इथं फक्त तेच विहीर बांधू शकतं, तेही पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी पण शेठचा हात वरपर्यंत पोचलेला. त्यांन म्हणे प्रांतसाहेबाकडून अपिलास स्टे घेतला होता. जणू सान्या गावाचं पाणी याच एका विहिरीत झिरपून पाझरत आलंय--- सारा गाव, सान्या गावचं शिवार तहानेनं व्याकूळ झालंय... आणि इथे मात्र जमिनीला उमाटा फुटावा एवढं जादा पाणी खळाळलंय... पाणी! पाणी!!/ ११४ ‘देवाघरचा न्याय इपरीत म्हानावा की काय.... परशूच्या मनाला पडलेलं कोडं सुटत नव्हतं. पण दाडून आलेला क्षोभ व एक प्रकारची सुन्न बधिरता मात्र जात नव्हती. ते हिरवं रान व बहरलेला मळा जीवाला त्रास देत होता, दंश करीत होता... अचानक काहीतरी सळसळत निघून गेल्याचा आवाज झाला, तेव्हा परशूनं दचकून पाहिलं आपलं गर्द हिरवं अंग दिमाखानं सळसळ करीत एक जातिवंत साप संथपणे येत होता ! परशू त्याच्याकडे नजर बांधल्यासारखा पाहात राहिला. मानवी चाहूल लागल्यामुळेच की काय, त्या सापाने फणा काढला? व ‘हिस्स्...' असा फुत्कार टाकला... आपले मांजरासारखे असलेले व किंचित हिरवी झांक मारणारे घारे डोळे रोखून परशू त्या फणा काढलेल्या हिरव्यागर्द सापाकडे एकटक पाहात होता. ...आणि पाहाता पाहाता त्या दोन मानवी डोळ्यात सर्प उतरला...! समोरचं तारेचे काटेरी कुंपण पाहाताच आपल्याच नादात उघड्या पायांनी तापलेल्या जमिनीचे चटके सोसत चटाचटा चालणा-या भीमी व रखमा थबकल्या. आणि त्यांच्या कपाळावर आठ्या उमटल्या. पूर्वेकडून वाहात येणा-या ओढ्याच्या दक्षिणेकडे गाव पसरलेला, तर उत्तरेकडे बौद्धवाडा व मातंग समाजाची वस्ती. त्याच्या टोकाशी भिडलेला व सुळक्यासारखा पात्रात शिरलेला चंपकशेठचा मळा. त्यातून गावामध्ये जायची पायवाट पूर्वापार होती. पण आवंदाच शेठनं तारेचे कुंपण घालून तो रस्ता बंद केला. त्यामुळे गावात जाण्यासाठी वाट वाकडी करून दोन फर्लागाचा फेरा घालून जावं लागायचं.... बौद्धवाड्यातला प्रत्येक माणूस गावात जाताना शेठनं मळ्याला घातलेलं. तारेचं भरभक्कम कुंपण पाहून थबकायचा. मनोमन किंवा उघडपणे शेठच्या बेचाळीस पिढ्यांचा उद्धार करणारी शिव्यांची लाखोली वाहायचा व दूरची वाट पकडायचा. आताही माहेरपणाला आलेली भीमी म्हणालीच, ‘रखमे, आक्रीतच की गं हे. बापूस म्हणालला, आता नदरेनं बघितलं. साया बुद्धवाड्याला तरासच की हा....' | ‘हां भीमे-' रखमा म्हणाली,' आपल्या समाजाची वाट शेठनं रोखली. दाद ना फिर्याद... तलाठ्याला दादांनी तक्रार लिहून दिली, पण कोण खबर घेतो? - आपण आधीच गावकुसाबाहेरचे. सान्यांनी झिडकारलेले. ही पायवाट तरी आपली का म्हणून राहील?' मृगजळ /११५ रखमा तालुक्याला हॉस्टेलात राहून मॅट्रिकपर्यंत शिकलेली व आता डी. एड. करून मास्तरीण व्हायचं स्वप्न पाहतेय. सध्या सुट्टी चालू आहे व मॅट्रिकच्या परीक्षेचा निकाल यायचाय. त्याची वाट पाहात गावात भाऊ-वहिनीसोबत राहातेय.... ‘निस्ती बामणावानी सुद्ध बोलतेस रखमे...' भीमी म्हणाली, 'चांगली शाळा शिकलीस... आमी मातुर या वयापासून सौंसार करतुया...' एक दीर्घ सुस्कारा तिनं सोडला... | 'अगं, पण केरबा चांगला आहे की. तुला सुख नाही देत?' | ‘धनी लई चांगलाय ग, - पन् सौंसाराचा व्याप का कमी हाय?- भीमी म्हणाली, 'आवंदा तर या दुष्काळानं पार कंबरडं मोडलं बघ. रोज कोसभराहून पानी आनायचं, पुना भाकया भाजायच्या, रोजगार हमीच्या, नाय तर शेतावर कामाला जायाचं... लई आब्दा व्हते बघ जिवाची....' आपल्याच वयाची, बिगारीत आपल्याच शेजारी बसणारी भीमी लहान वयात झालेल्या लग्नामुळे पिचून गेल्याचं रखमाला स्पष्ट जाणवत होतं. एके काळची रसरशीत काया व गव्हाळ रंग आता नाममात्रही शिल्लक नव्हता. पुन्हा अकाली झालेली जीवघेणी प्रसूती, अपु-या दिवसांची झालेली मुलगी, तिची सततची किरकिर व मुलगी झाल्यामुळे सासूकडून होणारा छळ... या सा-यांना रखमाच्या संगतीला वाचा फुटायची. आता ती पुन्हा पोटुशी असल्याचं मघाशीच तिनं सांगितलं, तेव्हा जाणत्या रखमानं तिला चांगलंच फैलावर घेतलं होतं. तशी कसनुशी होतं भीमी म्हणाली होती, ‘मह्यास्नी खुळी - येडी समज रखमे... पन ‘मी काय करू? धन्यास्नी रातच्याला एक बी खाडा चालत नाय... पुना सासूला पोरगा हवाय.... मंग मी काय करू?' तिचे हताश बोल ऐकताच रखमाचा पारा सर्रकन उतरला आणि भीमीच्या गळ्यात हात घालून ती म्हणाली, 'माझं चुकलंच भीमे... अगं, आधीच आपण दलित, पुन्हा आपण बायका म्हणजे दलिताहून दलित. आपली अवस्था पोते-यासारखी. मी तुला असं बोलायला नको होतं; पण काय करू? जिवाचा संताप होतो. मी... मी हे सहन नाही करू शकत!' माहेरवाशीण म्हणून बापाकडे भीमी आली होती खरी, पण इथेही खस्ता संपत नव्हत्या. तिची आई आजारी पडलेली आणि बापाचं दारूचं व्यसन मागच्या वर्षी : ती आली होती तेव्हापेक्षा वाढलेलं. परवा तर तिनं सासरहून आणलेल्या वीस रुपयांच्या नोटेवर पण बापानं डल्ला मारला होता, ‘परत सासरी जाताना देतो' असं म्हणून लगबगीनं सुकलेला, तहानलेला घसा ओला करायला तो बाहेर पडला होता! पाणी! पाणी!! / ११६ त्यात पुन्हा पाण्याचा सुरू झालेला त्रास, बौद्धवाड्यातला हापसा आटलेला गावात एक सामुदायिक विहीर होती. तिथं रोज या उन्हाळ्यात टैंकरनं चार-पाच खेपा करून पाणी टाकलं जायचं. | मघाशीच टैंकर येऊन पाणी ओतून गेल्याची खबर मिळताच सारेजण घागरी - बादल्या घेऊन पळत सुटले. बुद्धवाड्यात बांधलेल्या समाजमंदिरात रखमा-भीमी निवांतपणे सुखदुःखाच्या गोष्टी करीत बसल्या होत्या. त्यांना उशिरानं हे समजलं, तशा त्याही उठल्या व पाण्यासाठी घागरी कमरेवर घेऊन निघाल्या. रखमा आसुसून तो चंपकशेठचा हिरवागार मला पाहात होती. नजरेत ते वैभव सुख आणण्याऐवजी काट्यासारखं सलत राहिलं. मग ती हलकेच म्हणाली, 'भीमी, आपल्या गावात दरवर्षीच उन्हाळ्यात पाणी कमी पडतं; पण टैंकर प्रथमच लावला गेला हो ना?” 'व्हय रखने गेल्या साली या शेठ्जीची हीर सरकारनं ताब्यात घेतली व्हती व पाण्यासाठी खुली केली होती. बुद्धवाझ्यासाठी लई सोईचं व्हतं बघ.' 'मग यावर्षी काय झाले त्यांची विहीर अधिग्रहण न करायला? सारा गाव तहानलाय, माणसाला पाणी नाही; पण यांच्या उसाला व कडेच्या गाजर गवतालाही पाणी पाजलं जातंय...' रखमा म्हणाली, 'बरं ते जाऊ दे. आपल्याला लगबग करायला हवी. चल चल बघू...' 'उलीसं थांब रखमे नदर फिरतीय बग' भीमीला अशक्तपणामुळे व अर्धपोटी अवस्थेमुळे चक्कर आल्यासारखं होत होतं. तिचा चेहरा पांढराफेक पडला होता. | रेखमाला गहिवरून आलं. ती म्हणाली, 'भीमे, काय गं तुझी ही दशा? तू इथं त्या झाडाखाली बसं. मी आणते तुझं व माझं पाणी माझी सवय हॉस्टेलला राहिल्यामुळे काही मोडली नाही अजून.' 'अगं पन रखमे...' भीमीचं बोलणं अर्धवटच राहिलं, कारण गावातून बद्धिवाड्यातल्या चार-पाच बाया येत होत्या. या दोघींना पाहून त्यापैकी एक म्हणाली, बया-बया- बया... किती लेट भीमे - रखमे पानी संपलं की... आता पुना टैंकर उद्याच्याला येनार...' त्या निघून गेल्यावर भीमी म्हणाली, 'आता कसं व्हायचं रखमे... घरट्यात पान्याचा थेंब पन नाय...' क्षणभर विचार करीत रखमा म्हणाली, 'मी असं करते भीमे... हे तारेच्या कुंपणावरून मळ्यात जाते... तिथल्या विहिरीवरचं पाणी आणते. कदाचित तिथं मृगजळ/११७ परशूदादा असेल कुणब्याचा. परवा मला बाजारात गरजावैनी भेटली होती. सध्या शेठजीच्या मळ्यात परशूदादा सालगडी आहे म्हणे- ‘आगं पन रखमे–' भीमीला पुढे न बोलू देता रखमा म्हणाली, “पणबिण काही नाही. मी आत्ता येते बघ.' तिनं आपला ओचा गच्च केला. काटे टोचणार नाहीत या बेतानं तारेवर पाय ठेवीत वर चढली आणि पलीकडे मळ्यात उडी मारली. हरभरा व गव्हाच्या ओंब्यांतून वाट काढीत रखमा सरळ विहिरीजवळ आली, पण परशू काही दिसला नाही. कदाचित घरी भाकरतुकडा खायला गेला असावा. त्याची म्हातारी तिच्या भावाकडे दहिफळला गेली आहे, घरी वहिनी एकटीच आहे... या विचारानं रखमाला नकळत खुदकन हसू आलं. | ‘वा S-- काय माल आहे?' आवाजातून लाळेप्रमाणे वासना टपकत होती. रखमा दचकली, शहारली आणि पाहता पाहता संतप्त झाली. | समोर एक मवालीटाईप तरुण उभा होता. अंगात शहरी कपडे - टी शर्ट, जीन पॅट होती. क्षणार्धात रखमाला ओळख पटली... हा तर चंपकशेठचा वाया गेलेला दलपत होता. कधीकाळी तिच्या वर्गात होता, पण नापास झाल्यामुळे मागे पडला होता. ‘दलपत तू? अरे, किती घाण बोलतोस? शरम नाही वाटत?' रखमानं त्याला चांगलंच सणकावलं, तसा तोही रागाने म्हणाला, ‘वा गं वा, आमच्या मळ्यात एक तर वायर फेन्सिंगवरून आलीस, तेही चोरट्याप्रमाणे परवानगी न घेता व माझीच शरम काढतेस?' | ‘मी आलेय ते फक्त पाणी घेण्यासाठी; तुझ्या मंळ्यातला माल चोरण्यासाठी नाही.' रखमा म्हणाली, 'दरवर्षी तर तहसीलदार तुमची विहीर जनतेला पाणी मिळावे म्हणून ताब्यात घेत होते... पण यंदा तर काय तुम्ही काटेरी तारेचे कुंपण घातलंय, आमची पायवाटही बंद केली.!' 'ही जमीन आमची आहे व आम्ही यंदा पाण्याची विहीर अधिग्रहित करू नये म्हणून कोर्टातून स्टे घेतला आहे.' ‘बरं ते जाऊ दे... मला फक्त पाणी हवंय दोन घागरी.' रखमा म्हणाली, ‘मिळेल ना?' ‘जरूर! फक्त पाणीच काय मागतेस? दिल मांगो, वो भी देंगे...' दलपत रंगेलपणे म्हणाला. पाणी! पाणी!! / ११८ पुन्हा एकदा संतापाची तिडीक रखमाच्या मस्तकात उमटली; पण स्वतःला सावरीत एक शब्दही न बोलता ती विहिरीकडे वळली. मोटार चालू होती व पाईपातून पाणी धो - पो थाहात होतं. ती घागर घेऊन खाली वाकली. दलपतनं मागाहून तिच्यावर झडप घालून तिला कवटाळलं, 'रखमा, मेरी जान आ, मेरी प्यास बुझा दे... मैं तुझे मालामाल कर दूंगा...' आपल्या हाताचा कोपरा तिनं दलपतच्या पुढे आलेल्या देरीवर हाणला, तसा कळवळत तो मागे सरकला, रखमानं स्वतःला सावरत भरलेली घागर उचलली आणि पळत सुटली. पुन्हा काटेरी तारेवर पाय देऊन वर चढली व ओढ्याच्या कोरड्या पात्रात उडी मारली. तिच्या उघड्या पायाला तारेचे काटे थेभान झाल्यामुळे टोचले होते. पायातून रक्तही ओघळत होतं; पण आपली सुटका करून घेणं हेच तिचं लक्ष्य होतं. वाहाणा-या रक्ताकडे तिचं लक्षच नव्हतं. | जवळच झाडाखाली निवांतपणे भीमी बसून होती. तिनं अवाक् होऊन पाहिलं... धावत पळत रखमा येत होती. तिची अयधी कुडी थरथरत होती. ती भीमींच्या गळ्यात येऊन पडली व मिठी घालुन कसंबसं म्हणाली, 'भीमे... भीमे... आणि हमसून ती रडू लागली. रिकामी घागर बाजूला पडली होती, तारेवरून उडी मारताना सारं पाणी सांडून गेलं होतं. पण डोळे मात्र गम, अविरत वाहात होते... “काय करू भया? पण आता माझ्या हातात काही कारभार उरला नाही बघ. मी असा लोळागोळा होऊन पडलोय. सारा कारभार दलपत पाहातोय. तू त्यालाच सांग ना! म्हातारा चंपकशेठ खोकल्याची द्वास असह्य झाल्यामुळे वेदना आवरीत अडखळत बोलत होता; पण त्याचा धूर्तपणा कायम होता. भय्याला ते समजत होतं, पण माजी सभापती असलेल्या त्याच्या वडिलांचे ते गेल्या पन्नास वर्षांचे मित्र होते, भय्यालाही मागच्या वर्षी पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी चंपकशेठने भरभक्कम आर्थिक मदत केली होती. त्यामुळे संतामाला मुरड घालणं भाग होतं. | पण काल रात्री वाड्यावर गावक-यांनी भय्याची स्पष्टपणे केलेली हेटाळणी वे मांडलेली तक्रार आणि त्याच्या पाश्र्वभूमीवर आज सकाळी तहसीलदारांनी दिलेला इशारा आयला की भय्या प्रक्षुब्ध होत होता. मृगजळ / ११९ काल ज्या गावक-यांनी मागच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जवळपास शंभर टो मतदान भय्याच्या बाजूने करून त्याला निवडून दिलं होतं, ते गावकरी में खासकरून तरुण मंडळी त्याच्यावर कमालीची रुष्ट होती. कारण होतं पाणीटंचाई, भय्यानं तातडी करून टैंकर मंजूर करून घेतला होता; पण विहिरीतून पाणी शेंदायची सवय गेल्या चार-पाच वर्षापासून मोडली होती. कारण गावात भय्याच्या वडिलांनी सभापती असताना नळयोजना कार्यान्वित केली होती. गुत्तेदार त्यांचा मेहुणा व भय्याचा मामा होता. त्याने निकृष्ट पाईप खरेदी करून मोठा इत्ला मारला होता व ती पाईपलाईन आता फुटली होती आणि नळयोजणेची विहीर गाळाने भरुन गेली होती. गावात अनेकांना हे माहीत होतं, तेच काल रात्री प्रक्षुब्ध अवस्थेत बाहेर आलं होतं. 'भय्या या पंचक्रोशीत राजकारणात तुमची घराणेशाही आम्ही विनातक्रार मान्य केली ती जनतेची कामे व्हावीत म्हणून; पण तुम्ही पहिल्याच वर्षी पाण्यासाठी तरसावत आहात.' | ‘पण पाटील, मी नळयोजनेच्या दुरुस्तीची योजना मंजूर करून घेतली आहे. टेंडर फायनल झाले की काम सुरू होणार.' ‘पण तोवर जून येईल, पाऊस पडेल. त्याचा काय उपयोग? आणि तोवर पाण्याचं काय?" ‘त्यासाठी यंदाही चंपकशेठची विहीर ताब्यात घ्यायला हवी' । ‘पण त्यानं कोर्टातून स्टे आणला आहे. मी काय करू?' 'ते आज झालं हो; पण जेव्हा दलपतनं चक्क ओढ्यामध्ये विहीर बांधला व तेवढा भाग आपल्या शेतात यायर फेन्सिंग करून घेतला, तेव्हा प्रांतसाहेबाक पैरवी तुम्हीच केली ना दलपतची !' | भय्याची अवस्था मोठी अवघडल्यासारखी झाली होती. राजकारणात कस कसल्या तङजोडी कराव्या लागतात. त्यावेळी परिणामाची कल्पना येत नाही. कालात मात्र ते जेव्हा प्रत्ययास येतं, त्याची भीषणता जाणवते. भय्यानं दलपतला साथ दिली होती विहिरीच्या प्रकरणात, दलपतनं सरकी ओढ्यामध्ये चक विनापरवाना विहीर खोदली होती व गिरदावरला पैसे चारून फेरफार मंजूर करून घेतला होता. म्हणजे कागदोपत्री तेवढी जमीन व विहीर ही दलपत मालकीची होती. त्यावर गावातला पहिला दलित वकील भीमराव सपका प्रांतसाहेबांकडे अपील केलं होतं. पण त्यांनीही भय्या - दलपतच्या प्रभावाला पडून ते फेटाळलं आणि दलपतचं अतिक्रमण छानपैकी पचलं गेलं होतं. भावाला बळी पाणी! पाणी!! / १२० त्यानंतर दोन वर्षे पाणीटंचाई या विहिरीचे पाणी दलपतनं गावाला दिलं होतं. पण यंदा उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच शासनाने गतवर्षी विहीर टंचाईखाली अधिग्रहीत करूनही त्याचे पैसे न दिल्यामुळे व यंदा शेतीमध्ये उस व गहू पेरल्यामुळे त्या पिकांना पाण्याची आवश्यकता आहे व विहीर अधिग्रहित केली. तर त्याचं फार मोठे नुकसान होईल, असा युक्तिवाद करून दलपतच्या वकिलानं कायमचा मनाई हुकूम घेतला होता. । त्यामुळेच गावक-यांना यंदा भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावं लागत होतं. गावच्या जुन्या माली पाटलानं आपल्या शेवटच्या मुलीचं लग्न गायात न करता मुलाच्या गायी - शहरात मंगल कार्यालयात केलं होतं. गावजेवणाचा विषय निघाला, तेव्हा त्यांनी सरळ ती मागणी धुडकावीत म्हटलं होतं, 'गावजेवण नाही. बायांनों प्यायला पाणी कुठंय ?' हा टोला भय्याच्या वडिलांना होता. या दोन घराण्यांची परंपरागत दुष्मनी होती. व नळयोजनेच्या कामात भय्याच्या वडिलांनी पैसे खाऊन निष्कृष्ट काम केले, म्हणून आज पाईपलाईन फुटली व पुन्हा दुरुस्तीच्या नावाखाली त्यांचा वारस भय्या आता तेच करीत आहे, अशी माहितीही त्यांनीच पेरली असावी, असा भय्याचा कयास होता. यात सत्त्यांश जरी असला तरी राजकारणात तो अद्याप पूर्णपणे मुरलेला नव्हता व त्याची कातडी अजूनही संवेदनशील होती, म्हणून याचा त्याला थोडाबहुत मनस्तापही होत होता. म्हणूनच जेव्हा म्हाता-या चंपकशेठचा निरोप घेऊन भय्या बाहेर पडला आणि आपल्या बुलेटला किक मारीत धुराळा उडवीत वेगानं जाऊ लागला, तेव्हा त्याच्या मनात एकच विचार घोळत होता... दलपतला सरळ केलं पाहिजे. आता त्याची साथ राजकारणासाठी फायदेशीर उरलेली नाही. | पण दलपतही वस्ताद निघाला. भय्यानं 'विहीर खुली करून दे' असं दोस्तान्यात विनवूनही त्यानं दाद दिली नाही. उलट चक नकार दिला. वर साळसूद उपदेशही केला, 'भय्या, डोंट वरी, अजून एक टैंकर मंजूर करून घे. पुढल्या महिन्यात उपसभापतीची निवडणूक आहे. तेव्हा मी आहे तुझ्या पाठीशी. पैशाची चिंता नको.' पण या क्षणी भय्याला उपसभापतीपद दिल्लीएवढं दूर वाटत होतं. आण गावकरी चिडले होते व त्यांचा रोष भय्याला परवडणारा नव्हता. प्रथम आपलं गाव व मग मतदारसंघ सांभाळला पाहिजे. बाकी गोष्टीसाठी वेळ आहे... मृगजळ / १२१ घरी आल्यावर भय्यानं वडिलापुढे आपलं मन खुलं केलं. त्याचे वडील बाप्पासाहेब हेही चंपकशेठप्रमाणे वयोवृध्द होऊन घरीच बसले असले, तरी उभी हयात राजकारणात गेल्यामुळे त्यांचा मेंदू आजही तल्लख होता. । क्षणभर त्यांनी विचारमग्न होतं डोळे मिटून घेतले, तेव्हा भय्यानं ओळखलं आता आपल्या समस्येवर गुरुकिल्ली सापडतेय. बाप्पासाहेब योग्य वेळी अचूक निर्णय घेतात व राजकारणात ते कधीही खेळी चुकत नाहीत, असा त्यांचा लौकिक होता. एका रात्रीतून होत्याचं नव्हतं झालं होतं. चंपकशेठचा तो हिरवाकंच मळा साफ उद्ध्वस्त झाला होता. सबंध बारा एकरांच्या तुकड्याला दलपतनं अमाप पैसा खचून बांधलेलं काटेरी तारेचे कुंपण पूर्णपणे मोडून काढलं गेलं होतं. त्या हिरव्यागार शेतामध्ये शेकडो बैल व गुरे रात्रभर मनमुराद चरल्यामुळे उभं पीक नष्ट झालं होतं. विहिरीवर बसवलेल्या मोटारीची दुरुस्तीपलीकडे मोडतोड झाली होती. त्या मळ्याचा हिरवा दिमाख व दलपत - चंपकशेठचा पैशाचा रुबाब रात्रीतून ओसरला होता. पोलिस पंचनामा चालू होता, तहसीलदारही येऊन गेले होते. दूर अंतरावर लोक घोळक्या-घोळक्यात उभे होते. स्त्रियांच्या घोळक्यात रखमा - भीमी याही होत्या. त्यांच्या व इतर स्त्रियांच्या किंवहुना पूर्ण बुद्धवाड्याच्या प्रतिक्रिया समान होत्या. ‘बेस झालं ! आमची वाट मोकळी झाली....' ‘लई दिमाख होता दलपतला पैशाचा व या जमिनीचा.. पण गाव उलटलं की काय व्हतं हे आता तेस्नी समजून ईल...!' ‘पाण्यासाठी समद्या गावास्नी तरास दिला. भोग म्हना आता त्येची फळं.... ‘हा तर मोठा चोर हाय, पानी-चोर... समद्या गावाचं पानी ह्येच्या हिरीनं ओढून घेतलं... वंगाळ, लई वंगाळ... वर देव हाय- त्यो सान्यांचा हिसाब ठेवतो बाप्पा.... एक माळकरी वृध्द शेतकरी पुन्हा पुन्हा सांगत होता... त्यांचं बोलणं ऐकणान्यांत परशूदादाही होता. त्याच्या डोळ्यातला हिरवा । सर्प शांत झाला होता. आता त्याची एकच इच्छा होती - चंपकशेठच्या भरल्या विहिरीत एकदा मस्त उडी मारून मनसोक्त पोहण्याची व तप्त शरीर शांत करण्याची... रखमाला काळाठिक्कर पडलेल्या दलपतकडे पाहाताना एक अनामिक शांती लाभत होती. एक सूडाचं समाधान लाभत होतं. तिच्या पृष्ठभागाला त्या दिवशी त्याची पडलेली ओंगळ व वासनालब्ध मिठी व तिचा असह्य स्पर्श मिटून गेला होता. पुन्हा ती न्हातीधुती होऊन निर्मळ झाली होती. पाणी! पाणी!!/१२२ भय्या मात्र त्यावेळी तालुक्याला सभापतीसमवेत नळयोजनेच्या टेंडरची देवाणघेवाण व उपसभापतिपदासाठी खलबत करीत होता, तर घरी झोपाळ्यावर मंद झोके घेत तलख मेंदूचे बाप्पासाहेब स्वतःशीच मंदपणे हसत आपल्या टकलावरून हळुवारपणे हात फिरवत होते. | गावामध्ये मृगजळाप्रमाणे लखलखणारं हिरवकंच रंगभरित स्वप्न मृगजळाप्रमाणेच पाहाता पाहाता विरून गेलं होतं. 202 मृगजळ / १२३ ९. नारूवाडी नाव- पोलिस पाटील (माजी) इराची वाडी। काम- गावातली पिण्याच्या पाण्याची टंचाई कोणाला भेटायचे आहे: जिल्हाधिकारी. जगदीशपुढे शिपायानं चिट्ठी आणून ठेवली होती. ती वाचताच त्याच्या स्मृतीनं पंधरा वर्षे त्याला भूतकाळात क्षणार्धात खेचलं आणि त्याचं मन इराच्या वाडीभोवती रुंजी घालू लागलं. इथं कलेक्टर म्हणून आल्यापासून मागील आठ दिवसांत जिल्ह्यातील विविध माणसं भेटली होती. विशेषतः जिथे त्यानं पंधरा वर्षांपूर्वी उपजिल्हाधिकारी किंवा प्रांत ऑफिसर म्हणून काम केलं, त्या भागातली माणसं आवर्जून भेटत होती. जगदीशच्या स्मृतीमध्ये काही माणसं व गावं घर करून होती, तर काहींचं कालमानाप्रमाणे विस्मरण झालं होतं; पण त्यांनी ओळख देताच स्मृतीला ताण बसत होता व जुने दिवस पुन्हा जिवंत होत होते. | हा गमतीदार खेळ जगदीश मनापासून 'एंजॉय' करीत होता. नव्या प्रमोशनची- तीही महत्त्वपूर्ण अशा 'आय. ए. एस.' ची नवलाई आणि त्यात पुन्हा जिथे त्यानं आपल्या नोकरीची सुरुवात प्रांत ऑफिसर म्हणून केली व अक्षरशः प्रत्येक गाव पालथं घातलं होतं, तेथेच झालेली नियुक्ती. सारं हवंहवंस वाटणारं, पण त्याचबरोबर नव्या जबाबदारीच्या ओझ्यानं काहीसं ताण जाणवणारं. नारुवाडी / १२५ हातात ती भेटचिट्ठी घेऊन जगदीश काही क्षण आठवणीत रमला होता. इराची वाडी त्याला चांगली आठवत होती. तिचं त्यानं त्यावेळी विषादानं नाव ठेवलं होतं - नारूवाडी ! हा जर तोच पोलिस पाटील असेल तर... तोच असावा असं वाटतंय. कारण नावापुढे ‘माजी' हे संबोधन आहे... तर तोही जगदीशच्या चांगल्या आठवणीत होता. उंच, धिप्पाड शरीरयष्टी, उग्र चेहरा व भरघोस गलमिशा, पांढरं धोतर, पांढरी बंडी व मुख्य म्हणजे पांढराफेक फेटा... त्यामुळे त्याचा विसर पडत नसे. साधारणपणे रंगीत फेटे बांधायची पद्धत असते; पण इराच्या वाडीचे पोलिस पाटील मात्र शुभ्र फेटा लफ्फेदारपणे बांधायचे. | जगदीशनं बेल वाजवून शिपायाला पोलिस पाटलाला आत पाठवायची खूण केली आणि पेपरवेटशी चाळा करीत तो आपल्या खुर्चीवर रेलला. | दार करकरलं आणि जगदीशसमोर तेच पोलिस पाटील उभे होते. तसाच पांढराशुभ्र पोशाख.. आता मात्र वयोमानाप्रमाणे संपूर्ण केस पांढरे झालेले; काया वार्धक्यानं वाळलेली... | जगदीशनं त्यांना ओळखलं होतं. या पाटील... वयोमानाप्रमाणे होणारा बदल सोडला, तर तुमच्यात विशेष फरक नाही झाला या पंधरा वर्षात...!' | ‘साहेब, तुम्ही मला वळखलं?' - आपल्या काहीशा थरथरत्या आवाजात पाटील म्हणाले, 'लई बेस वाटलं. तेव्हा जसे होता, आज कलेक्टर होऊनपण बदलला नाहीत.. म्या गरिबाची व माझ्या दुर्दैवी गावाची आठवण ठेवलीत. तुम्ही धन्य आहात, साहेब, तुम्ही धन्य आहात !' “अरे ! असं काय म्हणता पाटील?' जगदीश म्हणाला, 'तुमच्यापासून व तुमच्या गावापासून मी फार काही शिकलो आहे. विकास प्रशासन कसं राबवावं ते... ‘तुमचा ह्यो शब्द - इकास परशासन माझ्या आजबी ध्यानात हाय साहेब' पाटील म्हणाले, ‘पण आजही तो केवळ सबुद वाटतो... आमच्या गावाला काही फायदा झाला नाही साहेब त्याचा ? आमचं गावचं दुर्दैवी म्हणायला हवं !' 'असं कसं म्हणता पाटील तुम्ही? तुमच्या गावाला मीच नाही का नवीन पाण्याची योजना सुरू करून दिली ?' पाणी! पाणी!! / १२६ 'साहेब, तुमी आशा दावली. तशी सुरुवात पण झाली आणि तुमची तेवढ्यात बदली झाली... आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्याप्रमाणे गावाची गत झाली की हो...!' आणि पाटील भाभड़ा सांगत सुटले. खरी तर आता जगदीशला एक मीटिंग अटेंड करायची होती व त्यानंतर केसवर्क होतं; पण त्या भाबड्या, दुर्दैवी जीवाला भरभरून तळमळीनं बोलत असताना थांबवावं असंही वाटेना... मुख्य म्हणजे जगदीशला त्याच्या विकास प्रशासन' या आपल्या संकल्पनेतील फोलपणा प्रकर्षाने जाणवत होता आणि पंधरा वर्षांपूर्वीची त्यानं इराच्या वाडीला डेप्युटी कलेक्टर म्हणून दिलेली भेट आठवत होती.... | कडक उन्हाचे दिवस... नेहमीच अपुरा पडणारा पाऊस... त्यात या वर्षी फारच अल्प पाऊस झालेला, म्हणून गावोगावी मार्च - एप्रिलपासून उद्भवलेली पाणीटंचाई. त्यावर मात करण्यासाठी जगदीशन विभागाची सारी यंत्रणा कामी लावलेली. तो स्वतः गावोगावी हिंडत होता व पाण्याचा प्रश्न सोडवत होता. | इतक्या वर्षांच्या नियोजनानंतरही अनेक गावांना उन्हाळ्यात पेयजलाची टंचाई भासावी ही वस्तुस्थिती नुकत्याच नोकरीत शिरलेल्या व संस्कारक्षम मनाच्या जगदीशला अस्वस्थ करीत होती. चुकीचे नियोजन, अयोग्य झालेले काम व त्यातला भ्रष्टाचार, सतत होणान्या वृक्षतोडीमुळे बिघडलेलं पर्यावरणाचे संतुलन व होणारी धूप... अनेक कारणं होतीच; पण एका बाजूला परकोटीची उदासीनता, तर दुस-या बाजूला राजकारणी व अधिकारी-कर्मचा-यांची भ्रष्टाचारासाठी होत असलेली हातमिळवणी... त्यामुळे नळयोजनांचा उडालेला बोजवारा... जगदीशला गावोगावी हेच चित्र थोड्या-फार फरकानं दिसत होतं आणि सरकारी उपाययोजना मूळ समस्येला हात घालायला अपुरी होती, केवळ भलमपट्टी असेच तिचे स्वरूप होते. असाच एक रखरखीत दिवस... सकाळपासून तीन गावांचा दौरा करून उन्हानं जगदीश काहीसा कावला होता आणि थोडा वेळ विश्रांतीसाठी ईटला विश्रामगृहात थांबला होता. तेव्हा त्याला गिरदावरनं निरोप दिला की, ईटच्या आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. देशपांडे त्याला भेटण्यासाठी आले आहेत. | जगदीशनं डॉक्टरांना बोलावलं. त्यांच्याबद्दल तो बरंच ऐकून होता ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्यालयी सहसा डॉक्टर घर करून राहत नाहीत; नारुवाडी / १२७ पण हा नवा डॉक्टर सहकुटुंब राहात होता आणि गावक-यांमध्ये बराच लोकप्रिय होता. त्याची सेवावृत्ती व ध्येयवाद अपवादसम होता. जगदीशलाही त्याला भेटायचं होतं. आज अनायासे स्वतः डॉक्टरच त्याला भेटायला आले होते. प्राथमिक चर्चेनंतर व्यवसायाचे विषय निघाले... ‘मला ठाऊक आहे, डॉक्टर, तुमचं कुटुंब कल्याणचं टार्गेट जानेवारीतच पूर्ण झालं आहे; पण तालुका अॅज सच मागे पडतोय. इतर पी. एच. सी.ज् आणि विशेषतः रूरल हॉस्पिटलचं काम फार कमी आहे. कॅन यू काँट्रिब्यूट ?' 'व्हाय नॉट?- एका गावाबद्दल मला विशेषकरून बोलायचं आहे... इराची वाडी. तिथली पाणी समस्या फार भीषण आहे. तेथे लोकांना प्यायचं शुध्द पाणी मिळत नाही. एक जुनी सामुदायिक विहीर आहे; पण तेथे नारूचे जंतू आहेत... आणि भयंकर बाब अशी की, लोक नाइलाजानं चक्क तेच पाणी पितात....!' | जगदीशच्या अंगावर नुसत्या कल्पनेनंही सरसरून काटा आला. ‘मी अतिशयोक्ती करत नाही देसाईसाहेब... मी नुकताच त्या गावी जाऊन आलो आहे आणि तिथं घरटी एक तरी नारूनं आज पिडलेला आहे आणि गावात असा एकही माणूस नसेल की त्याला कधी तरी - केव्हा तरी नारू झाला नसेल.' जगदीश अस्वस्थ झाला होता. तो शासनाचा एक उच्चपदस्थ अधिकारी. घरी प्यायला शुद्ध फिल्टर्ड पाणी. स्नानाला थंड व गरम पाण्याचा शॉवर. प्रवासात मिल्टनच्या थर्मासमध्ये आइसकोल्ड पाणी. अशा प्रखर उन्हाळ्यात प्रवास करताना ते पिणं म्हणजे एक अवर्णनीय आनंद वाटायचा... आणि त्याच्या कार्यक्षेत्रातील एक अख्खं गाव नारूच्या जंतूंनी बटबटलेलं पाणी पितं आणि रोगग्रस्त होतं... किती भयंकर, किती विषादपूर्ण ! | गेले दोन महिने जगदीश इथे आहे; पण या काळात आपल्या कार्यक्षेत्रात इराची वाडी नामक गाव आहे हे त्याला आजच कळलं, तेही या स्वरूपात... तो उठला आणि म्हणाला, 'डॉक्टर... मी आताच त्या गावी जाऊ इच्छितो तुम्ही येऊ शकाल?' ‘जरूर, पण प्रांतसाहेब गावाला रस्ता नाही. किमान दोन ते अडीच किलोमीटर चालावं लागेल.' ‘माझी तयारी आहे. लेट अस् गो....!' पाणी! पाणी!!/१२८ ‘बाहेर माझ्या दवाखान्यात इराच्या वाडीचे पोलिस पाटील आले आहेत, त्यांना सोबत घेऊ' त्यांची जीप दवाखान्यासमोर थांबली. डॉक्टर खाली उतरले. त्यांनी कंपाऊंडरला हाक दिली व पाटलांना बोलवायला सांगितलं. जगदीशसमोर पन्नाशी गाठलेला एक तगडा सशक्त माणूस उभा होता. त्याच्या अंगात पांढरी बंडी व पांढरंफेक दुटांगी काचा मारलेलं पांढरंशुभ्र धोतर होतं! आणि डोक्याला लफ्फेदारपणे बांधलेला तलम पांढराशुभ्र फेटा होता. त्याच्या सावळ्या रंगाला तो पोशाख शोभून दिसत होता. 'रामराम साहेब !' पोलिस पाटलानं अभिवादन केलं जगदीशनं मूकपणे प्रतिसाद देत त्यांना जीपमध्ये बसायची खूण केली. त्याप्रमाणे पोलिस पाटील जीपमध्ये बसले. धूळ उडवीत जीप वेगानं धावू लागली. मुख्य राज्यमार्ग सोडून गाडी आता कच्च्या रस्त्याला लागली होती. हा रस्ता उखडलेला, खडी बाहेर आलेली. जीप सारखी उडत होती. क्षणोक्षणी गचके बसत होते. हा सारा खडकाळ माळरान होता. आजूबाजूला वृक्षांची नामोनिशाणीही नव्हती. जगदीश अस्वस्थ नजरेनं आजूबाजूचा परिसर पाहात होता. त्याच्या बाजूला बसलेले डॉक्टर त्याला काही सांगत होते. जगदीश ते शांतपणे कसलीही प्रतिक्रिया व्यक्त न करता ऐकत होता. | ...आणि पोलिस पाटलाचा इशारा होताच जीप थांबली. समोर रस्ता संपला होता. त्यापुढे एक दरी होती व त्याच्यापुढे छोटा डोंगर होता. त्याला लगटून, त्याच्या पायथ्याशी एक छोटं गाव वसलेलं दिसत होतं, बहुधा हीच इराची वाडी असावी. जगदीश व डॉक्टर खाली उतरले. पोलिस पाटील पुढे होत म्हणाले, 'साहेब हीच आमची दुर्दैवी इराची वाडी... निजामाचं राज असताना योक मुनसफ घोड्यावरून आला व्हता, पन परतीच्या वाटेला घोड्यावरून तो पडला... तवापासून या गावाकडे कुणी फिरकलं नाही त्यानंतर चाळीस वरसानं भेटणारे तुमीच तालुकदार म्हनायचे. हां, मागचा हप्त्यात हे डॉक्टर मात्तुर आले व्हते.' अरुंद वाटेनं पायवाट तुडवीत ते तिघे दरी उतरू लागले, अशा रस्त्याने तोल सांभाळीत चालणं अवघड होतं. पोलिस पाटील मात्र सवयीनं भराभर चालत होते. जगदीश व डॉक्टरांना मात्र त्या वेगानं जाणं कठीण वाटत होतं. नारूवाडी / १२९ जवळपास पाऊण तासाच्या चालण्यानंतर ते तिघे इराच्या वाडीला पोचले. या कालावधीत तो उजाड माळरानाचा परिसर पाहून जगदीशच्या मनातील ‘ग्रामीण विकास' संकल्पनेचा पार फज्जा उडाला होता. | स्वातंत्र्यानंतर चाळीस वर्षांनंतरही इराच्या वाडीला पक्का रस्ता नव्हता, पिण्याचं शुध्द पाणी नव्हतं आणि हे केवढं विदारक होतं. हे बड्या शहरातील पंचतारांकित हॉटेलात ग्रामीण विकासावरील परिसंवादामध्ये शासनाच्या विविध विकास योजनामुळे ग्रामीण स्तर किती सुधारत आहे, याची चर्चा होत असताना एक दुर्दैवी गाव नारूमिश्रित पाणी पितं आणि उघड्या डोळ्यांनी तो भयंकर, किळसवाणा रोग ओढवून घेतं ! । 'काय सांगू तुम्हाला देसाईसाहेब, हा पाटीलही अशातच नारूग्रस्त झाला आहे. तो पाणी गाळून उकळून प्यायचा तरीही त्याच्या उजव्या पायाला नारू झालाय. आज जखम चिघळलीय म्हणून उपचाराला आला होता.' ‘आसपास पंचक्रोशीत डॉक्टर नाही?' ‘गावात कोणी डॉक्टर नाही. या पोलिस पाटलाचा मुलगा डॉक्टर आहे. त्याला मोठ्या जिद्दीनं पाटलांनी औरंगाबादला मेडिकलला घातलं. माझा तो बॅचमेटच आहे. त्यांची इच्छा होती की, मुलानं डॉक्टर होऊन गावच्या पंचक्रोशीत किंवा ईटला दवाखाना थाटावा आणि गावक-यांना इलाज करावा... पण तो मेडिकलला जॉईन झाला, तसा गावी आलाच नाही. आज औरंगाबादला तो प्रेक्टिस करतोय. ही हेट इराची वाडी... कारण त्याला भीती व किळस वाटतेय नारूची... | जगदीशच्या मेंदूची पेशीनपेशी हादरत होती. हे सारं त्यानं कधी ऐकलं नव्हतं, कल्पिलंही नव्हतं. गावाच्या प्रवेशालाच एक जुनीपुराणी, बरीच मोडकळीस आलेली कमान होती, त्याकडे बोट दाखवीत पाटील म्हणाले, ‘साहेब, हे आमचं परवेश दार. ही कमान जागिरदारानं बांधलेली बघा, आता त्योबी कोलापुरास्नी राहतो, मन तो जवा तरणाबांड जवान गडी व्हता, तवा त्यानंबी ठरवलं व्हतं. जागिरीची समदी गावं पाहायची. असंची वर्दी देऊन त्यो आमच्या इराच्या वाडीला आला. तवा गावानं त्याच्या सन्मानासाठी ही कमान तयार केली. तवा मी साळेत जात व्हतो. पन मला ते समदं ध्यानी हाय. म्याबी तवा काम केलं व्हतं... पाणी! पाणी!! / १३० पाटील क्षणभर जुन्या आठवणीत रंगले होते. मग उसासा टाकीत ते म्हणाले, ‘गावानं तेच्यापुढे पाण्याची आडचण मांडली, तवा जागिरदार म्हणाले, 'म्या तुमा गावक-यांवर खूस हाय... म्या गावात हीर बांधण्यासाठी दोनशे रुपये धाडून देतो... बांदून घ्यावी...' साहेब त्या येळेला दोनशे रुपये मोप होते... त्यातून हीर बांधली गेली... आदी आदी लई चवदार, निवळशंख पानी होतं... थंडगार... भर उन्हात ते पिलं की गार गार वाटायचं... पण नंतर ह्या पाण्यात नारूचे जंतू झाले... आनी गावात रोगराईचा शाप सुरू झाला...' चालता चालता बोट दाखवीत ते म्हणाले, 'ही पाहा विहीर सायेब...' जगदीश पुढे झाला... विहीर कच्ची बांधलेली होती. एका बाजूने ढासळलेली, तर दुस-या बाजूने कच्च्या पाय-या असलेली अशी होती. त्यामुळे कुणालाही विहिरीत उतरून खाली पाण्यापर्यंत जाता येत होतं... त्यानं वाकून पाहिलं... विहिरीत पाणी होतं, गढुळलेलं... तिथं एक स्त्री घागर बुडवून पाणी घेत होती. ती पाय-या चढून वर आली, तेव्हा पाटलानं तिला थांबवलं व तिच्या घागरीतलं पाणी आपल्या ओजळीत घेतलं. ती पाण्याने भरलेली ओंजळ जगदीशपुढे करीत ते म्हणाले, 'नीट पहा सायेब, उघड्या डोळ्यानं नारूचे जंतू दिसतील या पाण्यात... जगदीश थरारला, त्यानं पाहिलं, त्या ओंजळीतल्या पाण्यातही चार-सहा नारूचे पांढ-या दोन्यासारखे जंतू वळवळत होते. मुळापासून अंतर्बाह्य हादरणं म्हणजे काय असतं, याची जाणीव जगदीशला क्षणार्धात झाली. त्याच्या अंगावर सरसरून काटा आला. तो काहीसा थरकापलाही. हे सारं केवळ अतर्क्स, कल्पनेच्या पलीकडलं होतं. ‘हे असंच पाणी गावकरी पितात देसाई साहेब...' डॉक्टर म्हणाले, ‘मागच्या आठवड्यात मी आलो होतो, तेव्हा माझीपण हीच अवस्था झाली होती. इथं प्रत्येक घरात जवळपास प्रतेकाला नारू केव्हा न केव्हा झाला आहे. इतके दिवस इम्युन असलेले पाटीलही आता नारूग्रस्त झाले आहेत.' त्यानंतरच्या अध्र्या तासात जगदीशनं पूर्ण गाव पालथं घातलं. इनमिन दीडशे घराचं ते छोटं गाव होतं, पण प्रत्येक माणसाच्या पायात नारूची जखम दिसत होती, त्या जखमेतून नारूचे जंतू पडत होते. त्याची त्यांना सवयच झाली होती... नारूवाडी / १३१ तो परत कमानीपाशी आला, तेव्हा अख्खं गाव जमा झालं होतं. पाटील । त्याला म्हणाले, 'साहेब, दोन सबुद बोला गावासाठी. त्येस्नी तेवढंच बरं वाटेल.' 'काय बोलायचे पाटील? मला स्वतःला सरकारी अधिकारी म्हणून घ्यायची शरम वाटतेय. आम्ही लोकांनी व शासनानं काय केलं तुमच्यासाठी आजवर? आम्हाला काय अधिकार पोचतो तुम्हाला उपदेश करायचा?' जगदीशच्या आवाजात कंप, अपराधीपणा आणि विषाद होता. आणि विषाद होता. 'आसं कसं सायेब? तुम्ही तालुकदार.. अव्वल सायेब.. त्या निजामाच्या मुनसफनंतर तुमी गावाला भेट देणारे दुसरे सायेब...' पाटलानं मधल्या काळात घरी जाऊन एक जुनी चोपडी आणली होती. 'सायेब, हे पहा व्हिजिट बुक... लई जुनं हाय, पन ते भरलंच नाही... यात बगा दोन - तीनच नोंदी हायत.' जगदीशनं ती जीर्ण चोपडीवजा वही कुतूहलानं अलगदपणे उघडली. त्यात निजामाच्या मुनसफची उर्दू भाषेतली नोंद होती. सर्वप्रथम... 'या नोंदीत काय लिहिलंय ?" 'मी वाचून दाखवू का?' पाटील म्हणाले, 'सायेब, म्या साळंत उर्दूच शिकलो... मला येतं वाचायला?” 'वाचून दाखवू नका - मला उर्दू समजत नाही. तुम्ही फक्त अर्थ सांगा.' 'सायेब, मुनसफसायबानं लिहिलंयः डोंगराच्या कुशीतलं हे गाव लई सुंदर हाय, इथली आंब्याची झाडे, दरीतून वाहणारा छोटा ओढा थ गावामंदी टणाटणी उड्या मारीत पळणारी हरणं पाहून आनंद वाटला. गाक्चे लोकही चांगले च भले हायेत, हे पाहून समादान वाटलं....' | जगदीश जे पाहात होता, अनुभवत होता, त्यापेक्षा है काही वेगळंच लिहून ठेवलं होतं चाळीस वर्षापूर्वी भेट देणा-या निजामाच्या मुनसफनं. 'पाटील हे जे मुनसतं तेव्हाच्या तहसीलदारानं लिहिलंय ते खरं होतं ?' 'व्हय सायेब, म्या तवा न्हान होतो. तवा हे सारं व्हतं... पन वरच्या गावी जमीनदारानं बांध घातला आन् व्हता वढा आटला. तवापासून पान्याचे भोग सुरू झाले. मग आले जागिरदार,.. त्यांची ही नोंद मराठीत आहे, ती वाचा साहेब...' जुन्या मोडी वळणाचं, लफ्फेदार वळणाचं ते मराठी जगदीश वाचू लागला... पाणी! पाणी!! { १३२ "आज दहा जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीस, शुक्रवार रोजी इराच्या वाडीला भेट दिली. आमच्या जहागिरीतलं हेच गावे आम्ही जातीनं आजवर पाहिलं नव्हतं. गाव तसं भलं व लोकही सुस्वभावी आहेत. शेती चांगली पिकते, तरीही मुळातच ती कमी आहे. त्यामुळे रयतेचं भागत नाही. म्हणून या वर्षापासून आम्ही एक आणा जमीन महसूल प्रतिएकरी कमी करत आहोत. तसेच यापुढे जेव्हा जेव्हा या गावची शेती पिकणार नाही, तेव्हा रयतेकडून महसूल घेतला जाणार नाही. आज आमच्या नजरेसमोर गावक-यांनी पाण्याची समस्या आणली. या गावासाठी आम्ही दोनशे रुपये मंजूर करीत आहोत. त्यातून विहीर बांधून घ्यावी. आम्ही उद्याच मुनीमजीला रकमेसह पाठवीत आहोत.' आणि जहागिरदारांची उर्दूमधून झोकदार सही होती. 'अच्छा, म्हणजे एकोणीसशे त्रेचाळीस साली विहीर झाली म्हणायची....' जगदीश म्हणाला, “पण काय हो पाटील, त्यावेळच्या मानानं दोनशे रुपयेपण खूप होते. एवढ्या पैशात सहजपणे पक्की विहीर नाही का बांधता आली असती?' "होय सायेब, पण जागिरदारसायेबांचा मुनीमजी निस्ता भाडखाऊ व्हता... त्यानं निम्म्यापेक्षा जास्ती पैसे हाडपले आन् ही अशी कच्ची हीर बांधली.' बाकी काही असो - नसो; पण भ्रष्टाचार हा तेव्हाचा जहागिरदारांच्या राजवटीचा व आपल्या स्वतंत्र भारतातील राजवटीचा समान धागा आहे म्हणायचा...' अशी एक प्रतिक्रिया जगदीशच्या मनात टिपली गेली. आणि त्याखाली मागच्या आठवड्यात भेट देणा-या डॉक्टर देशपांडेचा अभिप्राय होता, | 'मी गावातल्या प्रत्येक व्यक्तीला झालेला नारू पाहून अस्वस्थ झालो आहे. दूषित पाणी व असुरक्षित विहीर हे याचं मूळ कारण आहे, ते दूर करणं डॉक्टर म्हणून मला शक्य नाही; पण ही बाब मी प्रशासनाच्या नजरेस आणून देईन. माझं काम आहे रोगप्रतिबंध करणं व झालेल्या रोगाची इलाज करणं ईटला प्राथमिक आरोग्य केंद्रात या गावच्या प्रत्येक व्यक्तीचा मी मनापासून इलाज करीन व दर पंधरा दिवसाला मी स्वतः इथं येईन पण विहिरीवर कट्टा बांधावा व पाय-या बुजवाव्यात व रहाट बसवून पाणी घ्यावं.. आणि ते उकळून प्यावं. म्हणजे ब-याच अंशी रोगाला आळा बसू शकेल.' नावाडी / १३३ जगदीशनं डॉक्टरांचा हात हाती घेऊन किंचित दाबला. काही न बोलता तो सोडला. पण त्या स्पर्शाद्वारे त्याला जे सांगायचं होतं, ते डॉक्टरांना खचितच समजलं होतं. जगदीशला एक समानधर्मी सापडला होता. ‘आता तुमचा अभिप्राय पायजे साहेब. पाटील म्हणाले, 'आनी लोकास्नी चार सबुद सांगावेत...' 'ठीक आहे, कसलासा निश्चय करून जगदीश म्हणाला, “आधी मी बोलतो, मग अभिप्राय लिहितो.' समोरच्या लोकांसमोर जात तो बोलू लागला, 'माझ्या बंधू-भगिनींनो... जुन्या काळी चाळीस वर्षांपूर्वी तेव्हाचे जहागिरदार या गावी आले होते. त्यानंतर मागच्या आठवड्यात डॉक्टर आले व आज मी येत आहे. म्हणजेच गेली चाळीस वर्ष हे गाव या जिल्ह्यात, या तालुक्यात असूनही नसल्यासारखंच होतं. एकही विकास योजना या गावापर्यंत पोचली नव्हती वा नाही... हे तुमचं दुर्दैव आहे व आमचा कमीपणा आहे. एक जबाबदार अधिकारी म्हणून मला याची शरम वाटते. आमच्या हाती एवढा अधिकार असूनही आजवर या गावाकडे कुणी अधिकारी, कुणी लोकप्रतिनिधी फिरकला नाही. मग विकास कसा येईल इकडे? मी तुमचा शतशः अपराधी आहे. पण एक सांगतो. आता मात्र मी माझ्या अधिकारांचा वापर करीन आणि तुमच्या गावाला रस्ता करून देईन आणि मुख्य म्हणजे नळयोजना देईन. एका वर्षात या गावातून नारूचे उच्चाटन झालं पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करीन. इथं वारंवार येईन हे जे बोलतोय, ते पोकळ आश्वासन समजू नका. मी ते कृतीमध्ये आणून दाखवीन... आणि जगदीशनं परतल्यापासून झपाटल्याप्रमाणे इराच्या वाडीसाठी योजना बनवल्या. रोजगार हमीमार्फत रस्त्याचे काम मंजूर करवून पंधरा दिवसात सुरू केलं, तसंच परिसर अभियांत्रिकी विभागाच्या उपअभियंत्यास घेऊन नळयोजनेसाठी स्थळपाहणी केली, पण गावात पाण्याचा स्त्रोत नव्हता. पलीकडच्या पठारावर ग्रामपंचायतीचं केरगाव होतं. त्याच्याअंतर्गत इराची वाडीला ग्रुप ग्रामपंचायत होती, तिथं पाण्याचा स्त्रोत भूजल सर्वेक्षण करण्यासाठी दिला. केरवाडीलाही पाण्याची टंचाई होती, म्हणून दोन गावासाठी संयुक्त पाणी योजना तयार करून तिचा सतत पाठपुरावा करून सहा महिन्यात मंजुरी आणली व कामाचा शुभारंभ केला. स्वतः वेळोवळी तो पाणी! पाणी!! / १३४ देखरेख करायचा. त्याचे सारे सहकारी त्याच्या या झपाटलेपणाची टिंगल करायचे, तेव्हा तो आवेशानं म्हणायचा, 'नाही दोस्त, ही बाब थट्टेवारी नेण्यासारखी नाही. विकास प्रशासनाची माझी जी कल्पना आहे, ती विकासापासून शेकडो मैल दूर असलेल्या या दुर्दैवी गावात मी राबविण्याचा पयत्न करीत आहे. डिटॅच होऊन हे होणार नाही, म्हणून हा अट्टहास आहे. किमान प्रत्येक पोस्टिंगच्या ठिकाणी एका गावाचा तरी माझ्या हातून कायापालट व्हावा ही मनीषा आहे. याची सुरुवात मी इराच्या वाडीपासून करीत आहे.' | पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली व गावी शुध्द, स्वच्छ पाणी टाकीतून तोटीद्वारे आलं, तेव्हा सबंध इराची वाडी आनंदाने बेहोष होत थयथया नाचू लागली आणि उत्सफूर्तपणे त्यात जगदीशही सामील झाला. काही क्षणांतच हा इतिहास जगदीशच्या डोळ्यासमोर चित्रपटासारखा उलगडत गेला आणि मग भानावर येत त्यानं विचारलं, ‘पाटील, काय झालं मी गेल्यानंतर ?' ‘ती एक चित्तरकथाच हाय सायेब.... पाटील म्हणाले. ‘सांगा मला, पाटील, मी ऐकू इच्छितो.' आणि पाटलानं पुन्हा बांध फुटल्यागत बोलायला सुरुवात केली. तो डिसेंबरचा महिना होता, जेव्हा इराच्या वाडीमध्ये केरगाव - इराची वाडी संयुक्त नळ पाणीपुरवठा योजनेचं स्वच्छ व शुध्द पाणी नळावाटे आलं होतं. सारं गाव बेहोष होऊन नाचलं होतं. त्यात पाटलांचा हात धरून जगदीशही सामील झाला होता. आजही ती याद पाटलांच्या मनात ताजी, बकुळफुलासारखी सुगंधी आहे. | दोन महिने पाणीपुरवठा नियमित होत होता. केरगाव व इराची वाडी या दोन्ही गावांतली पाण्याची समस्या सुटली होती, स्त्रियांची पाण्यासाठीची वणवण थांबली होती. इराच्या वाडीतील लोकांच्या नारूच्या ठसठसत्या वेदना लिंपल्या जात होत्या..... प्रत्येक वेळी गावकरी जगदीशला पाणी पिताना दुवा द्यायचे! आणि जगदीशची बदली झाली एप्रिल महिन्यात, तेव्हा चार्ज सोडण्यापूर्वी तो आवर्जून गावी गेला होता. तेव्हा त्यानं पाटलाला म्हटलं होतं, नारूवाडी / १३५ ‘पाटील, आता मी तुमचा भाग सोडत आहे. बदली झाली आहे. पण मला एक समाधान आहे, तुमच्या गावासाठी, इराच्या वाडीसाठी मी काहीतरी करू शकलो. आता मला व्हिजिट बुक द्या, आज पुन्हा मला अभिप्राय लिहायचा आहे.' पाटलानं व्हिजिट बुकाची जुनी चोपडी पुढे केली. त्यातील आपला प्रथम भेटीचा अभिप्राय जगदीशनं पुन्हा वाचला व काहीशा समाधानानं लिहिलं, | ‘आपण नेहमी खेदानं आपल्या इराच्या वाडीला ‘नारूवाडी' म्हणता. दुर्दैवानं ते खरंही होतं. पण आज तुम्हाला शुध्द पाणी मिळत आहे व ईटच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर देशपांडे यांच्यामुळे उपचारही. तेव्हा आणखी वर्ष - सहा महिन्यात इथल्या नारूचं पूर्ण उच्चाटन होऊ शकेल, असा विश्वास वाटतो. पुन्हा म्हणून आपण कधी ‘नारूवाडी' म्हणू नका.... आता गावात पायाभूत सोयी होत आहेत व भविष्यात या गावाचा चांगल्या रीतीनं विकास होऊ शकेल. त्यासाठी माझ्या शुभेच्छा! | जगदीशसमवेत, सेवेत प्रथमच या तालुक्यात रुजू झालेले तहसीलदार जाधव होते. त्यांना जगदीशनं या गावची सारी कहाणी येताना जीपमध्ये सांगितली होती. त्यांचा हात हाती घेऊन काहीसा भावनाविवश होत जगदीश म्हणाला, ‘जाधव, हे गाव, ही इराची वाडी माझ्यासाठी ‘स्पेशल' आहे. हे गाव मी आजपासून तुम्हाला दत्तक देत आहे. गावाकडे सतत लक्ष द्या.' तहसीलदार जाधवही संवेदनक्षम व कळकळीचे होते. त्यांनी ते वचन पाळल. किंबहुना त्यांची बदली या गावाच्या प्रेमापोटीच झाली काही महिन्यानंतर ! जगदीश गेला आणि एप्रिल महिना उजाडला. यावर्षीपण गतवर्षीप्रमाणे पाऊस अल्प झाल्यामुळे नदी, नाले व विहिरी आटल्या. गावोगावी परत पाण्याची ओरड सुरू झाली. | केरगावच्या पश्चिमेला दीड किलोमीटरवर संयुक्त नळयोजनेची बांधलेली विहीर होती. तिचं पाणी झपाट्यानं ओसरू लागलं. दोन्ही गावांना म्हणजे केरगाव व इराची वाडीला पाणी पुरेनासं झालं. केरगावचे सरपंच पहिल्यापासूनच या संयुक्त नळयोजनेवर नाराज होते कारण एक तर त्यांना बांधकामाचं टेंडर मिळालं नव्हतं. त्यामुळे सुटणारे पैसे बुडाले व दुसरं म्हणजे या गावानं त्यांना मागच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ते सदस्य म्हणून ईटमधून उभे असताना साथ दिली नव्हती, ते चाळीस मतांनी पडले होते व पाणी! पाणी!! / १३६ ईटचं पूर्ण सव्वाशे मतदान त्यांच्या विरोधात पडलं होतं. यामुळे इराच्या वाडीवर व खासकरून पोलिस पाटलावर त्यांची खुन्नस होती. नळयोजनेच्या विहिरीचं पाणी कमी झालं. पाण्याच्या निमित्तानं केरगावच्या सरपंचाला आपला जुना हिशोब चुकता करण्याची संधी मिळाली व ती त्यांनी पुरेपूर साधली. केरगावातही पाण्याची टंचाई जाणवत होतीच. गावक-यांनी सरपंच या नात्यानं त्यांच्याकडे तक्रार करताच त्यांनी संयुक्त नळयोजना हे कारण सांगून म्हटलं, ‘लोकहो, खरं तर या पाण्यावर आपल्याच गावचा हक्क असायला पाहिजे. कारण नळयोजनेची विहीर आपल्या शिवारात आहे. आपल्याला पाणी पुरत नसताना का म्हणून इराच्या वाडीला पाणी द्यायचं?' | हा इशारा लोकांना पुरेसा होता. एक रात्री गावक-यांनी विहीरीपासून इराच्या वाडीकडे जाणारी जाण्याची पाइपलाइन तोडून टाकली व सारेच्या सारे पाइप गायब केले. आणि पुन्हा इराच्या वाडीवर गावातल्या पडक्या विहिरीतलं नारूमिश्रित पाणी पिण्याची पाळी आली. हे वृत्त सजताच तहसीलदार जाधव घटनास्थळी आले. त्यांनी चौकशी केली व यामागे सरपंच (केरगाव) आहेत हे समजताच सरळ सरपंचाविरुध्द पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला. पण आता सरपंच प्रबळ बनले होते. मधल्या काळात विधानसभेची निवडणूक झाली होती व निवडून आलेल्या आमदाराचं सरपंचाशी नातं होतं. या जोरावर तालुक्याच्या राजकारणात सरपंचाची ऊठ-बस आमदाराचे उजवे हात म्हणून होत होती. आमदारांनी हा आपल्या प्रतिष्ठेचा प्रश्न केला व वरपर्यंत जाऊन राजकीय दडपणानं हा न्यायप्रविष्ट खटला मागे घेण्याचे आदेश आणले व त्याप्रमाणे खटला मागे घेण्यात आला. पण तहसीलदार जाधवांची या प्रकरणी तडकाफडकी बदली झाली. आणि त्यानंतर या गावाकडे कुणी फिरकलंच नाही. नारुवाडी / १३७ फक्त आमदारांनी केरगाव मुक्कामी त्यांना इराच्या वाडीचे लोक भेटायली आले असता 'तुम्हाला आमदार फंडातून नवीन स्वतंत्र नळयोजना मंजूर करून देत आहे' अशी घोषणा केली. केवळ घोषणा... तिला कधी मूर्त रूप आलंच नाही. इराच्या वाडीकडे जगदीश व जाधवांनंतर कोणी फिरकूनही पाहिलं नाही, हे विदारक वास्तव होतं. '...तर मग सांगा सायेब, हेच म्हनायचं का तुमचं ‘झकास परशासन?' तुमी रोड करून दिला रोजगार हमीतून... दोन सालातच विस्कटून गेला. पुना पहिल्यापरमाणं खड़ी बाहेर आली. पक्की डांबरी सडक काय नाही झाली अजूनपत्तुर आन पाणीपुरवठ्याची ही अशी चित्तरकथा... मग गाव दुर्दैवी का म्हणू नये? नाखवाडी का म्हणू नये? तुमीच सांगा सायेब... माजी सम्दी जिंदगी सरली या प्रश्नाचा पाठपुरावा करत.... बाहेर माझा तरणाबांड नातू हाय बसलेला... जवान गडी, पण उबं राहू शकत नाही फार काळ... कारणं ? कारण तेलाबी नारू झाला हाय साहेब, तेलाबी नारू झाला हाय....' 101 पाणी! पाणी!!! १३८ १०. दौरा ‘रोटेगाव....' बराच वेळ झाला तरी रेल्वे एका आडगावी उभी होती, म्हणून प्रदीपनं खिडकी उघडून प्लॅटफॉर्मवर रेंगाळणा-या एका खेडुताला गावाचे नाव विचारलं होतं. . त्यानं गावाचे नावे तर सांगितलं होतंच; पण गाडी एका मालगाडीच्या क्रॉसिंगसाठी थांबून आहे ही माहितीही दिली. तेव्हा प्रदीपला आश्चर्य वाटल्यावाचून राहिले नाही. मुंबई - औरंगाबाद एक्स्प्रेस मालगाड़ीसाठी एका छोट्या स्टेशनवर तब्बल अर्धा घंटा खोळंबून राहाते, हे त्याच्या कल्पनेपलीकडचं होतं. हा त्याचा पत्रकार म्हणून मराठवाड्याचा पहिलाच दौरा होता. | ‘पावनं म्हमईचे दिसत्यात...' त्या मळक्या पैरणीतल्या व विटका फेटा बांधलेल्या शेतक्यानं तंबाखू चोळीत विचारले, तेव्हा प्रदीपनं उत्तर दिलं, "होय, मुंबईचे. आम्ही काही पत्रकार औरंगाबाद जिल्ह्यातील दुष्काळ पाहण्यासाठी चाललो आहोत. तो छोटासा, फरशी नसलेला प्लॅटफॉर्म माणसाअभावी सुनासुना व तिथं कसलीही दुकानं, स्टॉल नसल्यामुळे ओकाबोका वाटत होता. प्रदीपला मुंबईतला गर्दीने गच्च भरलेला प्लॅटफॉर्म पाहायची सवय. हा विस्तीर्ण पसरलेला व संथ सुस्तावलेला प्लॅटफॉर्म ज्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी मुंबईच्या पत्रकारांचा पालकमंत्र्यांनी दौरा आयोजित केला होता, त्याची झलक दाखवीत होता. रुळांपलीकडे पसरलेलं विस्तीर्ण मैदान काळपट करडे व निष्पर्ण होतं. दौरा / १३९ 'दुष्काळ तर हाय बगा लई नामी यंदा तर पाणी बरसलंच नाही...' तो। शेतकरी सांगत होता, ‘पन मला येक कळत न्हाई, तुमी दुष्काळ बघून काय करणार?' ‘आमच्या पेपरात लिहिणार काय काय पाहिलं ते.' ‘त्येनं काय व्हणार?' या प्रश्नाची चपराक प्रदीपला चांगलीच जाणवली. त्याच्याजवळ खरंच या प्रश्नाचं काही उत्तर नव्हतं. ‘मिरगाला बखळ टाइम हाय, तोवर जंतेचे हाल हायत बघा.' 'तुम्हाला दुष्काळाची झळ बसली आहे?' हा प्रश्न त्यानं चाचरतच विचारला, आणि त्याला स्वतःलाच जाणवलं, किती निरर्थक प्रश्न आहे हा. तो अनाम शेतकरी तर मूर्तिमंत दुष्काळ वाटत होता. | ‘मंग? या गावातल्या परत्येक शेतकरी व मजुराला त्याची झळ बसलीय की. आवो, पाणीच बरसलं नाही तर शेती पिकेल कशी? हा सारा मुलूक कोरडवाहू. निस्ती बाजरी पिकते. आवंदा ह्ये पीकबी चार आणेसुद्धा पदरी पडलं नाय बघा...' आता तो शेतकरी चांगलाच मोकळा झाला होता. प्रदीपमधील पत्रकारही खुलून आला होता. जो दुष्काळ त्याला पालकमंत्री व सरकारी अधिका-याच्या नजरेनं पाहून रिपोर्टिंग करायचं होतं, त्यापलीकडे जाऊन पत्रकारी भाषेत ज्याला 'फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन' म्हणता येईल अशी माहिती अगदी सहजपणे रोटेगावच्या प्लॅटफॉर्मवर त्या अनाम शेतकंन्याशी गप्पा मारताना त्याला मिळत होती. त्याचा गंधही इतर पत्रकारांना नव्हता. त्यानं काहीसं सुखावून व अभिमानानं आत डब्याकडे नजर टाकली. सारे पत्रकार मस्तपैकी घोरत होते. 'फ्री प्रेस' ची स्त्री पत्रकार ज्योत्सनाही इतर पुरुष पत्रकाराच्या सुरात सूर मिसळून घोरत होती. प्रदीपला त्याची गंमत वाटली. स्त्रीपण घोरते, हे पत्रकारितेचा व्यवसाय स्वीकारलेल्या पण अजूनही मूळची ललितलेखनाची प्रवृत्ती असलेल्या प्रदीपला धक्कादायकच होतं. या पत्रकार दौ-यासाठी त्याची निवड अनपेक्षित होती. त्याच्या पेपरचे चीफ रिपोर्टर मुख्यमंत्र्यांबरोबर विदर्भात गेले होते, तेव्हा त्याला औरंगाबादला जाण्यास फर्मावण्यात आलं. त्याच्या तीन वर्षांच्या पत्रकारितेमधला हा पहिलाच दौरा होता. ज्याची ख्याती ‘सहकारसम्राट' अशी होती, अशा एका मंत्र्यानं आपल्या जिल्ह्यात या पाणी! पाणी!! / १४० वर्षी पडलेल्या भीषण दुष्काळात किती व कसं काम केलं आहे हे दाखवणं व केंद्रीय निरीक्षण तुकडी जी पुढील आठवड्यात दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी राज्यात येत होती, त्यांच्यापुढे त्याची समग्रता दाखवून अधिकाधिक केंद्रीय मदत मागण्यासाठी पार्श्वभूमी करण्यासाठी हा मुंबईच्या पत्रकारांचा दौरा होता. मराठी, इंग्रजी व गुजराथी पत्रकार त्यात होते. या सा-या ज्येष्ठ पत्रकारांबरोबर दौरा करण्याचं 'थ्रिल' प्रदीपला । जाणवत होतं. | महाविद्यालयीन शिक्षण व नोकरीच्या निमित्तानं जरी गेल्या दहा-बारा वर्षांत प्रदीप मुंबईकर झाला असला, तरी मूळचा तो माणदेशाचा. दुष्काळी भागातच तो लहानाचा मोठा झाला, म्हणून त्याला दुष्काळ, नापीक शेती व पाण्याचा प्रश्न या समस्यांबाबत रस होता व त्याला त्यानं पद्धतशीर वाचनाची जोडही दिली होती. आज या दौ-याच्या निमित्तानं त्याचा जुना माणदेशी अनुभव व केलेला अभ्यास त्याला तपासून पाहायचा होता व वेगळा, अभ्यासू वृत्तांत वाचकांपुढे सादर करायचा होता. यानिमित्ताने दौ-याच्या वेळी इतर ज्येष्ठ पत्रकारांशी चर्चा करावी, असा त्याचा मानस होता; पण एक्स्प्रेसनं मुंबई सोडली, तसं सायांचं खाणं, पिणं, टवाळकी, अश्लील जोक्स सुरू झाले. मद्याच्या बाटल्या फुटल्या. सिग्रेटीच्या धुराने तो फर्स्ट क्लासचा पूर्ण रिझर्व्ह केलेला डबा भरून गेला. एक्स्प्रेसचा रामन व ‘टाइम्स'ची ज्युथिका पेपरची ‘रायव्हल्सी' विसरून एकमेकांच्या जोक्सुना टाळ्या देत दाद देत होते, तर हिंदुत्वनिष्ठ दाते व उर्दू पत्रकार रहेमान एकमेकाना ‘शिवास रिगल' चा आग्रह करीत होते. ज्योत्स्ना खुमासदारपणे अफलातून चावट जोक्स पेश करीत होती. सारे वातावरण कसे सहलीला निघाल्यासारखे होते. त्यांच्या चर्चेचे विषय पण वैयक्तिक व मुंबई वर्तुळातले होते. ज्या भागात व ज्या कामासाठी आपण जात आहोत, तो विषय चुकूनही गप्पांमध्ये येत नव्हता. नवखा प्रदीप भांबावून गेला होता. तो ‘टीटोटलर' असल्यामुळे कंपनीतही अलग पडत होता. बाकीचे त्याची खिल्ली उडवीत होते. त्यामुळे तो अधिकाधिक बावरत होता, तसतसा त्यांना जास्तच जोर चढत होता. तशातच कुणीतरी पत्त्यांचा कॅट काढला आणि पाहता पाहता रमीचा डाव गत गेला. हातात स्कॉच वा ‘शिवास रिगल' आणि ओठात ‘कॅप्टन'ची सिगारेट अखंड जळत होती. दौरा / १४१ मग पहाटे केव्हा तरी रमीचा इाव संपवून ते सारे निद्राधीन झाले. आणि इतका वेळ वरच्या बर्थवर डोळे मिटून झोपेची वाट पाहणा-या पण त्यांच्या गलक्यानं व चित्रविचित्र आवाजानं ती न येणा-या प्रदीपनं सुटकेचा निःश्वास टाकला. मग त्यालाही झोप लागली. रात्री केव्हाही व कितीही उशिरा झोपले तरी प्रदीपला सकाळी सहा वाजता हुकमी जाग यायची. आजही त्यानं डोळे उघडून सभोवती पाहिलं, तेव्हा त्याचे सर्व पत्रकारबंधू अस्ताव्यस्त घोरत पडलेले होते. | जाग आली खरी; पण करावं काय हा प्रश्न होता. हलत्या गाडीत बर्थवर पडून वाचणं त्याला जमत नसे. त्यामुळे गाडी थांबलेली पाहताच त्यानं संधी साधली. त्या अनाम शेतकन्याशी गप्पा मारताना वेळ बरा जात होता आणि दुष्काळाची बरीच माहिती मिळत होती. । | प्रदीप त्या शेतक-यासमवेत रौटेगावचा कळकट चहा तुटक्या कपबशीतून प्याला. तो अखंड बोलत होता व त्यातून जाणवणारं दुष्काळाचं चित्र प्रदीपला भयावह वाटत होतं. । न पिकलेली शेती, पिण्याच्या पाण्याची समस्या, हाताला काम नाही म्हणून रिकामी पोटं, रोजगार हमीची तुटपुंजी कामे, रेशन दुकानदाराची मनमानी म्हणून, धान्य वेळेचर नाही.. या सान्यातून एक कडवट, काळ्या - करड्या रंगांचं चित्र उभ राहात होतं. औरंगाबाद आलं तरी प्रदीप आपल्यातच दंग होता. त्याला त्याच्या बालपणातला पंधरा - सोळा वर्षापूर्वीचा माणदेश आठवत होता. म्हसवडजवळ आकाशवाडी त्याचं गाव, पण म्हसवडला घर होतं. बहात्तरच्या दुष्काळात म्हसवड व तो सारा माण तालुका होरपळून गेला होता. ती अभावाची दाहकता शाळकरी प्रदीपला त्या वेळीही जाणवत होती व त्याची छाप आजही मनावर अमीट होती. कॉलेजला असताना सहलीच्या निमित्तानं त्यानं उत्तर भारत पालथा घातला होता. पंजाब - हरियानाची हिरवी श्रीमंती आणि तुडुंब भरून बारमाही वाहणा-या गंगा - यमुना या नद्या पाहिल्या, की त्याचं मन उदास व्हायचं. एक पावसाचा मोठा सडाका आला, की दोन दिवस लाल माती घेऊन खळाळणारी व इतर वेळी बहुतेक कोरडी असणारी माणगंगा आठवायची, जिचा उपयोग आता फक्त पहाटे परसाकडसाठीच व्हायचा. फक्त बाजरी पिकवणारी त्याच्या भागाची बंजर जमीन में पर्यनक्षेत्र असल्यामुळे, कमी पावसामुळे दुष्काळी तालुक्यात मुकुटमणी शोभेल असा पाणी! पाणी!!! १४२ । त्याचा तालुका... दुष्काळाची व दारिद्र्याची शान पिढ्यानपिढ्या कपाळावर मिरवणारी, ती मूक सोशिक माणसे... | आणि जवळच समृध्दीचा व पाण्यानं ओसंडणारा कराड, फलटण तालुका व त्यांची ऊस-शेती पाहिली, की प्रदीपला ती विषमता अधिकच जाणवायची. प्रगत विज्ञानाच्या काळात या भागातलं जादा पाणी माण-खटावमध्ये का आणता येत नाही, या प्रश्नाचं उत्तर त्याला तेव्हाही सापडलं नव्हतं व आजही माहीत नव्हतं. हे सारं त्याला रोटेगाव स्टेशनवर त्या अनाम शेतक-याशी झालेल्या संभाषणातून जाणवणाच्या दाहक दुष्काळाच्या जाणिवेनं आठवत होतं मनात नानाविध प्रश्नांची भेंडोळी गरगरत होती आणि एक प्रकारचा सुन्नपणा त्याला आला होता. औरंगाबादला पालकमंत्र्यांच्या पी. ए. नं व जिल्हा माहिती अधिका-यानं मुंबईच्या पत्रकारांचे जंगी स्वागत केलं होतं. त्यांच्या वाहनांची चोख व्यवस्था होती व त्यांची निवासव्यवस्था पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली होती. सारं काही चोख होतं- तरीही प्रदीपचा मूड येत नव्हता. उलट त्या वातानुकूलित हॉटेलच्या श्रीमंती थाटामाटाचा, उत्तम भोजनाचा आणि सरबराईचा प्रदीपला सूक्ष्म पण खोल असा तिटकारा जाणवत होता. त्याच्या नजरेसमोर न पाहिलेली रोटेगाव-वैजापूर परिसरातली वाळलेली बाजरीची शेते येत होती आणी घास तोंडात फिरत होता. दुपारी पालकमंत्र्यांनी सान्या पत्रकारांची भेट घेतली. त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी व इतर अधिकारी होते. त्यांना सविस्तरपणे जिल्ह्यात पडलेला भीषण दुष्काळ व त्यावर मात करण्यासाठी केलेले नियोजनबध्द प्रयत्न विशद करण्यात आले. केंद्र शासनाकडून नैसर्गिक आपत्तीच्या वेळी कमी मिळणाच्या मदतनिधीमुळे अनेक उपाययोजना करता येत नव्हत्या, हेही त्यांनी आकडेवारीसह सांगितलं. सारे पत्रकार भराभर टिपणं घेत होते. प्रदीपही यांत्रिकतेनं आकडेवारी आपल्या नोटबुकमध्ये टिपून घेत होता. त्याच्या मनात उठलेल्या प्रश्नांना उत्तरं मिळत नव्हती. | पालकमंत्र्यांचं ‘ब्राफिंग' संपल्यानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. सारेच जुजबी - वरवरचे प्रश्न, त्याला आकडेवारीतून दिलेलं तेवढंच निर्जीव उत्तर.. मूलभूत समस्येबद्दल कोणीच विचारत नव्हतं. प्रदीपला राहावलं नाही, त्यानं हात वर करीत प्रश्न फेकला, ‘महोदय, हे सारे प्रयत्न केवळ मलमपट्टी या स्वरूपाचे नाहीत का? कारण गेल्या वीस वर्षांत किमान चार ते पाच वेळा असा भीषण दुष्काळ महाराष्ट्रात पडलेला आहे व पंचाहत्तर - संत्याहत्तरपासून रोजगार हमी योजना लागू आहे. तरीही प्रत्येक दौरा / १४३ वेळी तीच समस्या कायम आहे... पाण्याची टंचाई व कामाची मागणी. या भागातला दुष्काळ कायमचा कमी व्हावा म्हणून काही ‘लाँगटर्म प्लॅनिंग' केलं आहे का तुम्ही?' त्याचा हा रोखठोक प्रश्न आणि आक्रमक सूर पालकमंत्र्यांना अपेक्षित नसावा. त्यांनी प्रदीपचं नाव, गाव व पेपर कोणता हे विचारून घेतलं आणि मग घसा साफ करीत ते उत्तरले, 'चांगला प्रश्न आहे. दुष्काळ जर कायमचा हटवायचा असेल तर जतसंवर्धनाला पर्याय नाही. शिवाय शेतक-यांनी शेतीबरोबर फळबागा आणि दूध-कुक्कुटपालनासारखे जोडधंदेही स्वीकारले पाहिजेत...' | ‘ह्या सान्या योजना आजही अस्तित्वात आहेत; पण गावपातळीवर त्याचं एक्झिक्युशन कसं होणार? आणि ते कोण करणार?' त्यासाठी कार्यकर्ते हवेत, चांगले अधिकारी - कर्मचारी हवेत आणि आपल्यासारखे जागरूक पत्रकारही हवेत.' पालकमंत्र्यांचा ‘ब्रीफिंग' नंतर हॉटेलमध्ये प्रदीपला काही सीनियर पत्रकारांनी सांगितलं, 'भाई, असे दौरा हे मौजमजेसाठी आहेत. 'ब्रीफिंग'च्या वेळी त्यांना अडचणीत आणायचं नसतं. बाबा, जे सांगितलं ते ऐकायचं.!' 'मला हे नाही पटत, बाबा. आपण काही त्यांचे प्रसिध्दी अधिकारी नाहीत. खोलात जाऊन काही प्रश्न विचारणे व माहिती जमवणे हा आपला हक्क आहे. प्रदीपनं उत्तर दिलं. | ‘जाने दो यार... अभी अभी आया है इस फिल्ड में... धीरे धीरे सीख जायेगा...' एकानं म्हटलं, 'शाम गांव में जाने का है। कुछ हिमरू शॉल लेने के है...!" 'उद्याच्या दुष्काळाची पाहणी झाल्यावर परवा वेरुळ - अजिंठा - पैठणची ट्रीपही त्यांनी ऑरेंज केलीय...' आणि बघता बघता सारे पत्रकार ट्रिपच्या गप्पात रंगून गेले. प्रदीपही . त्यांच्यापासून अलग होत गेला. | दुस-या दिवशी त्यांच्या दुष्काळ पाहणी दौ-यात माहिती अधिकारी आणि तालुक्याचे तहसीलदार होते. प्रदीपला त्यांच्याकडे पाहाताना चेहरा ओळखीचा वाटत होता; पण नेमकं स्मरत नव्हतं. | मिनी बसमध्ये प्रदीपच्या जवळच तहसीलदार येऊन बसले. तेव्हा त्यांनीच विचारलं, 'मला ओळखलं नाही का? मी भुजंग पाटील. साता-याला आपण कॉलेजला पाणी! पाणी!! / १४४ एकत्र होतो... पण बारावीनंतर मी कृषी महाविद्यालयात पुण्याला गेलो व आपला संपर्कच तुटला...!' प्रदीपला आता ओळख पटली. 'अरे पाटील ! मला कालपासून तुझा चेहरा ओळखीचा वाटत होता; पण रिकलेक्ट होत नव्हतं बध. एनी वे फार आनंद झाला बघ तुला भेटून. तू इथं या क्षेत्रात कसा?' | ‘बी. एस्सी. (अॅग्रि.) केल्यानंतर दोन वर्षे घरी शेती केली; पण आधीच शेतीवर दोन मोठे भाऊ होते. त्यांनाच पुरेसं काम नव्हतं, पुन्हा कोरडवाहू शेतीत नवीन काही करायला वाव तरी कुठे होता? म्हणून मग नोकरीचा प्रयत्न सुरू केला. एम. पी. एस. सी. पास झालो व एक - दीड वर्षापासून तहसीलदार आहे.' 'फारच छान. तुझ्यासारखा सुशिक्षित व शेतीची माहिती असणारी तहसीलदार इथल्या लोकांना लाभला हे त्यांचं भाग्यच म्हणायला हवं !" 'ते मला माहीत नाही. पण यार प्रदीप, मी प्रोफेशनल इथिक्स मानतो व सर्वस्वानं मला जे करता येईल ते करतो. या दुष्काळाचं म्हणशील तर मी शासनाची प्रत्येक योजना लालफितीचा अडथळा न येता कशी राबवता येईल हे पाहात आहे. किंबहुना मी सतत दौरे करून प्रत्यक्ष गावात जाऊन प्रॉब्लेम्स समजून घेतो व ते सोडवायचा प्रयत्न करतो.' तहसीलदार आता मोकळे झाले होते. | 'माझ्या तालुक्यातील प्रत्येक गावाची माहिती व तेथे दुष्काळाचा कसा असर पडला आहे, हे मला मुखोद्गत आहे...' "पण तुला असं वाटत नाही, हे सारं वरवरचं आहे ?” 'निश्चितच नाही. यंदापण तीव्र दुष्काळ आहे; पण तो विकासाचा परिपाक आहे, असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही! ‘धिस साऊंड स्टेंज !' 'मी एकच उदाहरण देऊन स्पष्ट करतो. अलीकडे दर वर्षी पाणीटंचाई जाणवते, हे आम चित्र आहे. याचं कारण आम्ही नळयोजना घेत नाही, धरणे बांधत नाही हे नसून पाण्याचा उपसा व वापर - तोही शेतीसाठी वाढला आहे हे आहे. अर्थात तो कॅश क्रॉपसाठी आहे, हे सत्य आहे व त्याचा फायदा मूठभर शेतक-यांनाच होतो, हेही तेवढंच सत्य आहे!" दौरा | १४५ तहसीलदारांचा अभ्यास व अनुभव त्यांच्या बोलण्यातून प्रदीपला जाणवत होता. एक समधर्मी भेटल्याचं समाधान होतं. मग त्यांच्या गप्पा सबंध दौ-यात रंगत गेल्या. जे त्यांनी पाहिलं, जे त्यांना दाखवण्यात आलं, त्यातून दुष्काळ जाणवत होता; पण त्याहीपेक्षा कुठेतरी मालकमंत्र्यांची महती ठसविण्यासाठी हा दौरा आयोजित केला आहे असं जाणवत होतं. त्यांनी किती योजना खेचून आणल्या, किती पैसे खर्च झाले व किती फायदा झाला, हे अधिकारी व पालकमंत्र्याचे दौ-यात सामील झालेले कार्यकर्ते पुनःपुन्हा ठासून सांगत होते. हा सारा पूर्वनियोजित दौरा असल्यामुळे प्रदीपला असंही वाटलं की, प्रत्येक कामाच्या जागी व गावी आधी पढवलेली व माहिती दिलेली गावकरी मंडळी उपस्थित ठेवली गेली होती. व त्यांच्या उत्तरातून पालकमंत्र्यांची प्रतिमा उजळ करण्याचा एक प्रयत्न होता. तहसीलदारानं त्याला स्पष्टपणे सांगितलं होतं, 'तुम्हा मुंबईच्या सॉफिस्टिकेटेड पत्रकारांना मंत्री वगैरे मराठी सिनेमात दाखवल्या जाणा-या सरपंच - पाटील टाईप वाटतात; पण हा भ्रम आहे. माझा अनुभव तर असा आहे, की बरेच मंत्री हे अतिशय चाणाक्ष व जनमानसाची नाडी गवसलेले असतात. पण आपलं दुर्दैव असं की, सान्याचे गोष्टी शासनानं करायच्या असा शिरस्ता रूढ झाल्यामुळे व भ्रष्टाचार - लालफितीच्या कारभारामुळे चांगल्या योजनांचा फज्जा उडतो. याबाबत तुम्ही शहरी लोक पुढारी - मंत्र्यांना दोष देता, ते चुकीचे आहे. ही कलेक्टिव्ह रिसपॉन्सिबिलिटी आहे, ती कोणीच पार पाडत नाही.' रात्री तहसीलदारांनी त्याला त्यांच्या घरी जेवायला बोलावलं होतं. प्रदीपला ब-याच दिवसांनी अस्सल कोल्हापुरी जेवणाचा योग लाभला होता. 'दौरा ठीक झाला; पण माझं समाधान नाही. पाटील, हा दौरा त्यांनी ठरविलेला सिलेक्टिव्ह गावांचा व कामाचा होता. मला यापलीकडे काहीतरी हवं आहे.' 'तसं असेल तर उद्या माझ्याबरोबर चल. मी तुला खरा दुष्काळ व त्याची भीषणता - व्यापकता दाखवीन.' पाटील म्हणाले, 'पण उद्या तुमचा वेरुळ - पैठण वे परवा अजिंठा असा दौरा आहे... जंगी बेत आहे.. तो कशाला सोडतोस?' 'नाही यार, हे सारं पाहिल्यानंतर आपण पंचतारांकित हॉटेलमध्ये राहाणं व साईट सीइंग करणं प्रशस्त वाटत नाही.' 'अजून तुझी ती कॉलेजच्या जमान्यातली स्वप्नाळू वृत्ती व संवेदनशीलता कायम आहे म्हणायची !' तहसीलदार म्हणाले, 'पण पेशंटचं दुःख पाहून डॉक्टर सीरियस झाला तर तो पेशंटला नीट करू शकणार नाही, हे विसरू नकोस. हां, पाणी! पाणी!! | १४६ इतरांच्या दुःख - वेदनांबद्दल कौडगं च कोरडे राहू नये हे खरं; पण त्यात एका मर्यादेपलीकडे इनव्हॉल्व्ह होही योग्य नाही. नाहीतर कामं करता येणार नाहीत यार!' 'ते ठीक आहे, पाटील, पण स्वभावाला औषध नसतं.' प्रदीप म्हणाला, 'मला प्रेक्षणीय स्थळाचं आकर्षण नाही, मी यापूर्वी सहलीत हे वेरुळ • अजिंठा पाहिलं आहे, फक्त पैठण राहून जाईल. पण यापेक्षा मला तुझ्याबरोबर दी करायला आबईत...!' । 'ओ. के., आपण उद्या सकाळी लवकर निघू. मला दोन रोजगार हमी कामांचे इन्स्पेक्शान करायचं आहे, एक गाथात पाण्याची टंचाई आहे, तिथली खाजगी विहीर अधिग्नति करायची आहे व एका गावात गुरची छावणी उघडण्यासाठी गौरक्षण संस्थेबरोबर बोलणी करायची आहेत. हे सारं आपण चारपर्यंत आटपू. आपल्या दौयाच्या शेवटच्या ठिकाणाहून पैठण केवळ वीस किलोमीटर आहे. तिथे आपल्याला जाता येईल व तुला धरण व ज्ञानेश्वर उद्यानही पाहाता येईल.' दुस-या दिवशी सकाळी प्रदीप पाटीलसह दौ-यावर निघाला. पहिल्या गाथ ते पोचले तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते. तिथून एका पाझर तलावाच्या कामावर जायचं होतं. 'प्रदीप - कामाची साईट आडवळणी आहे तिथे शीप जात नाही आपल्याला एक किलोमीटर पायी जायं लागेल सवय आहे ना?" | "सवय नाही - पण मी निश्चीत घेईन...!" पाटील सोबत पायी जाताना भोवतालचा परिसर तो पाहात होता • सारी शेत उजाड - काळपट... कुठेही झाडे नाहीत आणि रस्ता असा नाहीच. जवळपास वीस मिनिटांनी ते कामाच्या जागी पोचले. तहसीलदारांना पाहाताच कामावरचा मुकादम पुढे आला व म्हणाला, | ‘साहेब - अजून कामाला सुरुवात झाली नाही. लोक निवांतपणे दहापर्यंत येतात. कितीही सांगितलं तरी वेळेवर येत नाहीत.' | 'मला हे माहीत आहे. मस्टर काढ व लोकांना गोळा कर. मला हजेरी घ्यायची आहे व यापुढे जे मजूर येतील त्यांचा खावा. त्यांना उषा यायला सांगायचं.' | प्रदीप शांतपणे पाहात होता, न्याहाळत होता. कळकट कपड्यातले रापलेले काळेसावळे स्त्री-पुरुष, स्त्रियांची संख्या जास्त, सान्यांच्याच नजरेत एक थंड निरुत्साह.. तहसीलदारांनी हरी घेतली व कामावर उशिरा येत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. मग त्यांचे प्रश्न विचारले - अडचणी विचारल्या. त्या नेहमीच्याच मजुरी कमी पडते, खूप दुरुन यावं लागतं म्हणून वेळ होतो, कामाचं मोजमाप होत नाही, दौरा /१४७ रेशनचं धान्य मिळत नाही... आणि आठ दिवसांनी हे काम संपणार, तेव्हा दुसरं काम लवकर उपलब्ध व्हावं...मस्टर असिस्टंट अरेरावी करतो इ. तहसीलदार त्यांचं समाधान करायचा प्रयत्न करतात व जीपकडे वळतात. | ‘प्रदीप...' पाटील जीपमध्ये बोलू लागतात, 'रोजगार हमीच्या कामावर उशिरा येणं हे आम आहे, अनेकांना दुरून यावं लागतं हे खरं असलं तरी नियम तो नियम. म्हणून मी हजेरी घेऊन मस्टर क्लोज केलं. आता उशिरानं जे मजूर येणार, ते माझ्या नावानं बोंब मारणार... मजुरी कमी पडते... कारण इथं कठीण काम आहे व दुष्काळानं व निकृष्ट हायब्रीडच्या भाकरीच्या जेवणानं ताकद कुठे आहे माणसात ? पुन्हा श्रमाची वृत्तीही नाही. मजुरी कमी पडली की पुन्हा टीका, वृत्तपत्रात बातमी... आम्हाला पुन्हा चौकशी करावी लागते. किमान वेतन देणं भाग आहे, पण त्या प्रमाणात काम झालं नाही की, कामाचा खर्च वाढतो व मंजूर रक्कम संपली की काम बंद पडतं. मग उर्वरित कामासाठी पुन्हा रिव्हाईज एस्टिमेट करा.. ते मंजूर करा आलंच.. पण या अडचणी समजून न घेता टीका होतेच. आता हे काम संपत आलंय. - या परिसरात दुसरं काम मंजूर आहे; पण एका शेतक-यानं काम अडवलंय. त्याची संमती नसेल तर काम सुरू होऊ शकत नाही.' ‘मग ?- ‘आता गावात गेल्यावर त्याच्याशी चर्चा करायची. बघूया संमती मिळते का?' प्रदीपच्या शहरी मनःपटलावर तहसीलदार म्हणजे तालुक्याचा राजा असे बिंबलेलं होतं; पण या राजाला काय काय करावं लागतं हे तो प्रथमच जवळून अनुभवत होता. गावात गेल्यावर नेहमीप्रमाणे सरपंच - पोलिस पाटील आले. चहापाणी झालं. पाझर तलावासाठी संमती न दिलेल्या शेतक-याला बोलवून घेतलं. त्याला समजावून सांगितलं. प्रदीप पाहात होता. तहसीलदार पाटील त्याला तळमळीन समजावीत होते. मधेच हुकमी आवाजात धमकावीत होते, पण तो शेतकरीही तेवढाच ठाम होता. | ‘नाही साहेब - म्या जिमीन आडव्हान्स मिळाल्याबिगर देणार नाही. - मह्या पोरीचं लगीन रुकलंय पैशाअभावी.. म्या जिमीन दिली तर पैसा नाही मिळणार बगा बिगीनं....!” पाणी! पाणी!! / १४८ 'ठीक आहे, मी ऐंशी टक्के मावेजा देण्याबद्दल कलेक्टर साहेबाशी बोलतो.! पुढल्या गावचा दौरा सुरू. जीपमध्ये पाटील सांगत होते, “या शेतक-यांचंही बरोबर आहे. भूसंपादन कायद्याच्या प्रणालीमुळे जमीन घेतल्यावरही दीड-दोन वर्षे किमान निवाडा जाहीर व्हायला लागतो व पैसा मिळत नाही. त्याला जमीन कामासाठी द्यायची आहे, पण नियमाप्रमाणे मिळणारा ८० टक्के अॅडव्हान्स त्याला त्वरित हवा आहे.! 'मग त्यात अड्चण काय आहे? 'म्हणाल तर फार क्षुल्लक, पण तेवढीच कायदेशीर आहे. नियमाप्रमाणे कलम चारची अधिसूचना गॅझेटमध्ये प्रसिध्द व्हावी लागते व जमिनीची मोजणी व्हावी लागते; पण या दोन्ही कामांना फार विलंब लागतो. कारण या सर्वांची प्रचंड संख्या व अपुरा कर्मचारी वर्ग, पुन्हा सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीही सर्वच स्तरावर कमी. त्यामुळे विलंब होतो.' 'तरीही तू त्याला आश्वासन दिलंस?' “हो, आणि ते मी पुरं करणार आहेच कारण इथं काम दिलंच पाहिजे. मी यायर थोडासा प्रैक्टिकल तोडगा काढला आहे. कलम चारची सूचना वृत्तपत्रात प्रसिध्द झाली आहे. पैसे देण्यापूर्वी ताबा घ्यायचा व रक्कम वाटायची. आमचे कलेक्टर फार चांगले आहेत. तेव्हा हे थोडंसं चुकीचं असलं तरी आक्षेपार्ह नाहीय व ते कायद्यात नंतर बसवता येतं, असं मी त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करतो. मला आशा आहे की, ते मान्य करतील. लेट अस होप फॉर बेस्ट !' | प्रदीप पाटलांच्या कामाच्या पध्दतीनं बराच प्रभावित झाला होता. तोही मूळचा शेतकरी असल्यामुळे त्याला आस्था व तळमळ होती. पुढल्या गावात पिण्याचा पाण्याचा प्रश्न होता. गावक-यांची मागणी टैंकरची मागणी होती. पण तहसीलदारांच्या माहितीप्रमाणे तेथे दोन खाजगी बारमाही पाण्याच्या विहिरी होत्या व दोन्ही गावात होत्या. हे त्यांना तपासून पाहायचं होतं व निर्णय घ्यायचा होता. गावात त्यांनी स्वतः माहिती घेऊन पाहणी केली. त्यांची माहिती खरी होती. गावात एक खाजगी विहीर सरपंचाची होती व एक ओट्या दुकानदाराची होती. त्यांनी तेथेच दुकानदाराची विहीर शासन अधिग्रहित करीत असल्याचा व दररोज दोन घंटे दौरा । १४९ ही विहीर लोकांना पाणी रहाटानं भरण्यासाठी खुली आहे, अशी दवंडी पोलिस पाटलाला देण्याचा हुकूम दिला. ते निघताना जीपजवळ येत सरपंच म्हणाले, ‘पण साहेब, हे पाणी फार काळ टिकणार नाही. यापेक्षा टैंकर लावला तर बरं...!' | ‘सरपंच, पाणी कमी वाटतं का ? तसं असेल तर तुमचीपण विहीर अधिग्रहित करू का?' तहसीलदारांच्या हुकमी आवाजातील प्रश्नानं सरपंच भांबावले व क्षणभरानं सावरासावर करीत म्हणाले, 'तसं नाही साहेब, हा माझा अंदाज आहे. त्या गंगवालच्या विहिरीचे पाणी आटलं तर माझी विहीर आहेच की... 'ठीक ठीक....' आणि जीप सुरू झाली. ‘पाहिलंस प्रदीप, लोक खासकरून राजकारणी लोक कसे स्वार्थी असतात ते....' 'खरं तर सरपंचांचीच विहीर अधिग्रहित करायची. त्यांना चांगला धडा शिकवायचा...' ‘माझ्या मनात ते का आलं नसेल' पण काही ग्राऊंड रिअॅलिटिज् पाहिल्या पाहिजेत. हा सरपंच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा नातेवाईक आहे, त्याचं उपद्रवमूल्य बरंच आहे. मी त्यांची विहीर अधिग्रहित केली तरी लोकांना पाणी मिळालंच असतं, असं नाही. कारण तेही दडपणापोटी पाणी भरायला जाणार नाहीत. अशा परिस्थितीत दुसरी विहीर घेणंच योग्य वाटलं.. कारण पाणी मिळणं हे महत्त्वाचं नाही का?' ‘पण याचा अर्थ असा नाही की, तुम्ही राजकीय शक्तीपुढे झुकता?' ‘या कृतीमागे राजकारणाचा विचार जरूर आहे, पण महत्त्व आहे परिणामाला. लोकांना पाणी मिळायला हवं. इथं सरपंचाची विहीर मी अट्टहासान अधिग्रहित केली असती तर काय होईल? माझी शक्ती काही दिवस तरी या बाबीतच खर्ची पडेल? कारण हा पोलिटिकल प्रेशर आणेल. कदाचित मला मंत्र्यांचा फोन येईल... एवढं करूनही गावात त्याचं वजन लक्षात घेता लोक आपणहून त्या विहिरीवर जाणार नाहीत. प्रदीप, मोठं युध्द जिंकण्यासाठी लहानसहान चकमकी हराव्या लागतात कधी कधी. ‘ते या प्रकरणाला कसं लागू होतं?' पाणी! पाणी!! / १५० | ‘या सरपंचाचा ट्रॅक्टर आहे व त्याला काम हवंय म्हणून तो गावात पाणीटंचाईचा आरडाओरडा करून टॅकरची मागणी करतोय. शासनाकडे सरकारी टैंकर वा ट्रॅक्टर नाहीत. खाजगी घ्यावे लागणार. म्हणजे याच्या ट्रॅक्टरला दररोज काम व भरपूर पैसे मिळणार.... ते मला टाळायचं होतं, म्हणून हा पर्याय व त्याला गर्भित धमकी की, गंगवालच्या विहिरीचे पाणी कमी पडलं तर तुमची घेऊ... टैंकर न लावणं हा युध्द जिंकण्याचा प्रकार, तर त्यांची विहीर अधिग्रहित न करणं चकमक हरण्याचा प्रकार.' प्रदीपला आपल्या जुन्या मित्राचा अभिमान वाटला. तो म्हणाला, 'यार पाटील, तुझ्याबरोबर आज दौरा करून मला खूप काही मिळालंय. प्रशासनावरील विश्वास - जिथं अनेक चांगले अधिकारी आहेत.....हा !' । यापुढील गावात एका संस्थेमार्फत गुरांची छावणी उघडायची होती. त्यासंदर्भात पाहाणी व चर्चा होती. प्रदीप बारकाईनं तहसीलदारांच्या हालचाली व वर्तन पाहात होता. ही संस्था धार्मिक व राजकीय पक्षाशी संलग्न होती; पण शिस्त व चोखपणासाठी प्रसिध्द होती. तेथे पंचक्रोशीतील तीन तलाठी सज्जांमधील जनावरे ठेवण्याची योजना अंतिम केली, त्यांना दोन दिवसात पुरेसा चारा पाठवून देण्याचे तहसीलदारांनी आश्वासन दिले. गावातल्या दोन कोतवालांची सकाळ - संध्याकाळची ड्यूटी लावून दिली. जवळच एक कारखाना होता. तिथल्या कार्यकारी संचालकांशी पाटील आधीच बोलले होते. त्यांच्याशी भेटून त्यांच्या मार्फत पाण्याचे टैंकर जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी पाठविण्याचे आश्वासन मिळवले. | एव्हाना पाच वाजत आले होते, ‘यार, फार वेळ झाला. तुला पैठणला जायचं आहे... चल, तिकडंच जाऊया. ही कामं संपणारी नाहीत.' ‘नको पाटील - आज जायचा मूड नाही. आपण परतूया. तुझं जेवण पण राहिलंय.' | परतीच्या प्रवासात तीव्र दर्प आला, तशी प्रदीपनं प्रश्नार्थक मुद्रा केली. इथं बीफ फॅक्टरी आहे. यावर्षी त्यांची मजा आहे. कारण जनावरं त्यांना स्वस्तात मिळतात. मागच्या वर्षी उत्तम पीक-पाणी होतं, त्याच्या निम्यानंही आज मोठ्या जनावरांचे भाव राहिले नाहीत. या कंपनीचे दलाल गागोगावी जाऊन पडत्या भावात जनावरं खरेदी दौरा / १५१ करतात. यावर्षी कंपनीचा नफा भरपूर वाढेल. मी त्याचा बारकाईने अभ्यास केला आहे.' समोरून शंभर-सव्वाशे जनावरे येत होती. “बोलाफुलाला गाठ पडते ती अशी... ही सारी जनावरे कंपनीत चाललीत बघ.' । प्रदीप आपल्या सूटमध्ये दोन्ही तळव्यांची उशी करून त्यावर डोकं ठेवून पडला होता. नजर छतावरील नक्षी विमनस्कपणे निरखीत होती. मनावरचं मळभ कमी होत नव्हतं. त्याची ही घनभारली अवस्था परतीच्या प्रवासात कायम होती. त्याच्या पत्रकार मित्रांनी त्याला छेडायचा बराच प्रयल केला; पण त्याचं लक्ष नाही हे पाहून आवरती घेतली व त्याच्याकडे मग प्रवासात पूर्णपणे दुर्लक्षच केलं. मुंबईला परतल्यावर त्यानं कोरे कागद पुढे ओढले. आणि आपला आवडता पेन घेऊन लिहायला सुरुवात केली आणि मन मोकळं करायला सुरुवात केली. किती वेळ तरी तो लिहीत होता. जेव्हा दुष्काळ दौ-याचं वार्तापत्र लिहून झालं, त्यानं ते आपल्या मैत्रिणीला - सुमाला दाखवलं. तिनं ते वाचून उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली, ‘सिंपली सुपर्ब! या पद्धतीने दुष्काळाचं रिपोर्टिग कुणी केलं नसेल. हे जेव्हा प्रसिध्द होईल, तेव्हा वाचकांच्या अंतःकरणाचा ठाव घेतल्याविना ते राहाणार नाही...' | प्रदीपनं ते वार्तापत्र संपादकाला दिलं व चहाच्या कपावर तो आपल्या अनुभवाबद्दल बोलतच राहिला. संपादक कदाचित खूप बिझी असावेत. ते केवळ ‘हो- नाही' च करीत होते. ते लक्षात येताच प्रदीपनं आपला बोलणं आवरतं घेतलं. पण ते त्याचं सुमाला बेहद्द आवडलेलं वार्तापत्र त्याच्या वृत्तपत्रात प्रसिध्द झालंच नाही. त्याऐवजी जिल्हा माहिती अधिका-यानं दिलेला कोरडा वृत्तांत प्रदीपचं नाव टाकून छापला गेला होता. त्याची महत्त्वाची ‘स्टोरी' सरळसरळ मारली गेली होती. | प्रदीप घुश्शातच संपादकांकडे गेला व विचारलं. तसं थंडपणे संपादक म्हणाले, 'हा मालकांचा हुकूम होता. ते पालकमंत्र्यांचे स्नेही आहेत व त्यांच्याकडे माहिती व जनसंपर्क खातंही असल्यामुळे तुझं रिपोर्टिग छापून येणं त्यांना परवडणार नव्हतं.' ‘मग मला दौ-यावर पाठवलंच कशाला साहेब ?' पाणी! पाणी!!/१५२ 'खरं सांगायचं तर असे दौरै हेनिव्वळ मजेसाठी साईट - सीइंगसाठीच असतात. मीही रिपोर्टर असताना खूप दौरे केले आहेत. आणि हा दौरा तर पालकमंत्र्यांचा 'स्पॉन्सर्ड' दौरा होता. तिथं त्याच्या नजरेनं पाहायचं व आपल्या भाषेत मांडायचं, असाच हिशोब असतो प्रदीप.' संपादक आपली घसरणारा चष्मा पुन्हा डोळ्यावर चढवीत म्हणाले, 'यू आर न्यू. हळूहळू अनुभवानं तू तयार होशील. आणि एक सांगतो आपण वृत्तपत्रातली माणसं - शब्दांचे सैनिक तेवढेच स्वतंत्र असतो, जेवढे स्वातंत्र्य मालक आपल्याला देतो. काय? कळलं ना?” आणि ते खो-खो हसू लागले, हसता हसता त्यांना ठसको लागला व डोळ्यात पाणीही आलं. प्रदीप त्यांच्याकडे विस्मयानं पाहातच राहिला. तो इथं हरला होता. सपशेल हरला होता. ही हार छोट्या लढाईची होती, की मोठ्या युद्धाची? । त्याला काहीच समजत नव्हतं... काहीच समजत नव्हतं ! 100 दौरा ! १५३ ११. दास्ता - ए - अ अलनूर एक्स्पोर्ट कंपनी. महानगरपालिकेची हद्द संपताच अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर हायवेवर पन्नास एकरांच्या विस्तीर्ण जागेत पसरलेली कंपनी. । कंपनीवरून जाताना एक उग्न - असह्य दर्प प्रवाशांच्या नाकपुड्यात घुसायचा आणि नवखा प्रवासी शेणान्याला सहजच विचारायचा, 'कसला हा वास हो? भयंकर!" 'ही अलनूर कंपनी आहे. बीफ तयार करते य फ्रोझन फूड म्हणून अरबस्तानात एक्स्पोर्ट करते.!" पण हा वास?" ‘त्याला इलाज नाही. अहो, बैल, म्हशी, रेई, गाई सारे कापले जातात येथे. वास येणारच.' प्रवाशांमधील एखादा शुद्ध जैन असलं काहीबाही ऐकून नखशिखांत शहारून डोळ्यायन कातडी ओढून घ्यायचा. नॉनव्हेज प्रवाशालाही बैल, रेडे, म्हशींच्या उल्लेखानं मळमळून यायचं. दास्ता-ए-अलनूर कंपनी / १५५ अलनूर एक्स्पोर्ट कंपनी. प्रवेशद्वारी सुंदर कमान आणि अर्धवर्तुळाकार बोर्डावर इंग्रजी व उर्दूमध्ये कंपनीचं नाव वेलांटीदार अक्षरात कोरलेलं. त्यावर सुरेख रातराणीच्या वेली चढलेल्या. कंपाऊंडवालच्या आतून भिंतीवर चढलेल्या अनेक फुलझाडांनी तो परिसर रंगीबेरंगी दिसायचा. कंपनीच्या प्रांगणात अनेक खुशबूदार फुलझाडं आस्थेवाईकपणे जोपासलेली. हेतू हा, की उग्र दर्प कमी व्हावा.... मुख्य प्रवेशद्वारातून आत आलं की मधला डांबरी रस्ता थेट कंपनीच्या ऑफिसकडे घेऊन जायचा. दोन्ही बाजूंना अशोक व निलगिरीसारखी उंच वाढणारी झाई व जमिनीवर वाढलेलं हिरवं गवत. ऑफिससमोर एक कारंजं आणि विविधरंगी गुलाबांचा मालकाच्या सांगण्यावरून जोपासलेला ताटवा. | सारा प्रयास एकाच दिशेनं होता... येणा-यांच्या रंध्रारंध्रात भिनलेला दर्प काही प्रमाणात कमी व्हावा व त्यांना प्रसन्न वाटावं. अन्यया तेथे काम करणा-या कामगारांना विचारा... त्यांचं वासाचं इंद्रिय जवळपास निकामी झालेलं. तरीही काम करताना किळस जात नाही. 'तनखा बाझळ हाय; पन नरकपुरीचं काम हाय बघा...' एका कामगाराची ही उत्स्फूर्त बोलकी प्रतिक्रिया. 'पन काय करणार? पापी पोटासाठी वंगाळ काम करावं लागतं...' | पूर्ण कंपनीचा परिसर फिरून पाहायची आपली हिंमत असेल, तर तुम्हाला हे जाणवेल की, जनावरांच्या कत्तलीमुळे सतत घोंगावणारा किळसवाणा दर्प सोडला, तर कंपनीच्या मालकानं मोठ्या रसिकतेनं त्या पूर्ण परिसराचं एका सुरेख बागेत रूपांतर केलं आहे. कंपनीचे मालक अलनूर साहेब हे मुंबईत राहतात. एक्स्पोर्ट ऑर्डर्स मिळवण्यासाठी अरबस्तानाच्या दौ-यावर असतात. कधीतरी ते कंपनीच्या ऑफिसमध्ये येतात आणि चुकूनही एक घंट्याच्या वर थांबत नाहीत. त्यांचा हा एक तास सुखदायी पाणी! पाणी!!/१५६ व्हावा म्हणून फॅक्टरी मॅनेजर अल्तमश यांचा हा सारा खटाटोप. अलनूरलाही हा दर्प सहन होत नाही. ब-याच कालावधीनंतर अलनूर कंपनीमध्ये आलेले आहेत. त्यांच्यासमोर अल्तमश, फ्रिजिंग युनिटचे हयातखान आणि कामगारांचे प्रतिनिधी शिंदे आहेत. टेबलावर ड्रायफुटसु ठेवलेले आणि मिनरल वॉटरच्या बाटल्या. अलनूरच्या जाडजूड बोटात उंची तंबाखूचा सिगार पेटलेला. | ‘शिंदे, अरे साला, तुम लोग सिर्फ तनखाह - बोनस की बात करता... कंपनी का प्रॉफिट कम होता जा रहा है...' 'हाँ हुजूर, गेल्या तीन वर्षांत या विभागात भरपूर पाऊस झाला, अन्नधान्यं झालं..... अल्तमश कामगार नेते शिंद्यांना कळावं म्हणून मराठीत बोलत होते, त्यामुळे जनावरांचे भाव फार वाढले होते...' ‘इस एरिया में बड़े से बड़े इंडस्ट्रीज से भी ज्यादा तनखाह हमारे वर्कर्स की है...' हयातखान. ‘पण किती घाण काम करावं लागतं साहेब!' शिंदे म्हणाले, 'या उग्र वासात आठ घंटे काम करणं म्हणजे निव्वळ नरकयातना बघा. लोकांना एक मिनिट वास नको वाटतो. कंपनीसमोर तरळदचा बसस्टॉप आहे; पण प्रवासी बस पुढे शंभर फुटांवर थांबते. कारण वास सहन होत नाही.' 'ठीक है, शिंदे...' अलनूर म्हणाले, 'इस साल बोनस बढ़ाने की मैं सोचता हूँ... लेकिन एक्स्पोर्ट बढना चाहिये.' आणि चर्चा सुरू होते. ‘हुजूर - ए - आला...' हयातखान म्हणाले, ‘गये दो साल से चढे दाम से मार्केट से जानवर खरीदने पडे. इस साल भयानक अकाल पडा है, इस मुल्क में शेतकरी लोग अपने जानवर - बैल - भैसे जो मिला उस दाम से बेच रहे हैं. उसका कंपनी को बड़ा फायदा होनेवाला हैं. हमे कुछ नये तरीके अपनाने पडेंगे...' अलनूरचा चेहरा उजळतो. ‘अच्छा तो ये बात है?' दास्ता-ए-अलनूर कंपनी /१५७ 'आता अल्तमशलाही चेव आलेला. हुजूर हम इस एरिया के हर जिले और तालुके में एजंट भेजेंगे. वो सौदा तय करेंगे और हमे जादा से जादा जानवर मिलने चाहिये...' 'हुजूर...' शिदेही नकळत अल्तमश व हयातखानच्या पद्धतीने म्हणतो, 'हम पूरा साथ देंगे... लेकिन इस साल बोनस की रक्कम बढा दो...' ‘गये साल पंधरा परसेंट बोनस दिया था; इस साल पच्चीस दूंगा... लेकिन मशिन की पूरी कपॅसिटी युज होनी चाहिये' अलनूर म्हणाले, 'अल्तमश, प्रॉडक्शन टार्गेट फिक्स करो. हररोज कितना काम होना चाहिये ये सबको बता दो और उतना काम दिखाओ. बोनस मिल जायेगा...' यंदा मराठवाड्यात भयानक दुष्काळ पडलेला. पूर्ण खरीप पिके बुडालेली. पावसाअभावी रबीची तुरळक पैर झालेली. मुख्य म्हणजे पाणीटंचाईने उग्ररूप धारण केलेले! माणसांनाही पिण्याचे पाणी कमी पडत होतं. गावोगावी शासनाने टैंकर्सनी पाणीपुरवठा सुरू केलेला. | शेतक-यांच्या जनावरांचे फार हाल होते. त्यांच्यासाठी चारा नव्हता आणि बाजारातून कडबा घ्यावा तर त्याचे भाव अस्मानाला भिडलेले. म्हणून न परवडणारे आणि रोख पैसा कुठे असतो शेतक-यांकडे? जनावरांना प्यायला पाणीही भरपूर लागतं. गावोगावी टैंकरने पाणी पुरवले जायचं ते माणसांच्या संख्येप्रमाणे... जनावरांचा हिशोब जमेस नसायचा. शेतक-यापुढे जीवघेणा प्रश्न असायचा. जनावरं डोळ्यापुढे उपासानं वे तहानेनं मरू द्यायची की विकायची? | विकलं तर तेवढाच पैसा मीठ - मिर्चीला सुटायचा. दुष्काळाची धग त्या प्रमाणात कमी व्हायची. पुन्हा यंदा अलनूर कंपनीची माणसं गावोगावी येतात, सौदा करतात आणि मुख्य म्हणजे रोख पैसे देतात. | शेतक-यांच्या डोळ्यापुढे हिरव्या कोन्या नोटा आणि जनावरांची करुण नजर फिरायची, पण सरशी व्हायची ती नोटांची. पाणी! पाणी!! } १५८ अल्तमश आणि हयातखान खुश होते. नुकताच मुंबईहून अलनूर साहेबांचा बधाईपर फोन आला होता. त्यांनी ठरवून दिलेलं उत्पादनाचं लक्ष्य पूर्ण व्हायच्या मार्गावर होतं आणि जवळपास दोन महिने होते जूनला. या काळात उत्पादन दुपटीएवढं व्हायची अपेक्षा होती. त्याबद्दल अल्तमश व हयातखानचं अलनूर साहेबांनी खास अभिनंदन केलं होतं आणि दोघांनाही बोनसव्यतिरिक्त दहा हजार रुपयांचा एक्स-ग्रेशिया मंजूर केला होता. अलनूरचं डोकंच मुळी अफलातून होतं. मुंबईत कन्स्ट्रक्शन कंपनीला काही ‘डायव्हर्सिफिकेशन' असावं म्हणून आणि अरबस्तानातील बीफची वाढती मागणी व मार्केट पाहून त्यानं ही कंपनी मराठवाड्यासारख्या मागास भागात सुरू करण्याचं ठरवलं. त्यामागे अनेक हेतू होते. एक तर इथं जमीन स्वस्त होती. दुसरं मुबलक पाणी माफक दरात उपलब्ध होतं. याहीपेक्षा महत्त्वाचं कारण म्हणजे हा भाग कायम दुष्काळी म्हणून गणला जायचा. दोन-तीन मोसमात एखादा मोसम चांगला जायचा. बाकी दुष्काळ हा हमखास ठरलेला. अशा वेळी भरपूर जनावरे बेभाव मिळायची. त्यामुळे कंपनीला भरपूर नफा होणं सहज शक्य होतं. गेल्या दहा वर्षांत दोन वर्षांचा अपवाद वगळता अलनूरचा अंदाज कधी चुकला नाही. यंदाचा दुष्काळ हा दशकातला सर्वात उग्र दुष्काळ होता. म्हणूनच अलनूर कंपनी तिन्ही शिफ्टमध्ये पूर्ण क्षमतेने चालू होती. नेहमीपेक्षा यंदा तेथला दर्प जास्त उग्र व कडवट म्हणूनच असह्य होता. ‘सर, आपण जे आवाहन सर्व सेवाभावी संस्थांना केलं आहे, त्याला सारे जण आपापल्या परीनं प्रतिसाद देतील,' भिडे गुरुजी म्हणाले, 'पण आमच्या जनकल्याण समितीमार्फत आम्ही या जिल्ह्यात तीन ठिकाणी गुरांच्या छावण्या चालवूत. आमच्याकडे ध्येयवादी स्वयंसेवक तर आहेतच, पण प्रत्येक ठिकाणी दररोज तज्ज्ञ प्रशिक्षित पशुवैद्यकीय अधिकारी भेटी देऊन जनावरे तपासतील व योग्य तो औषधोपचार करतील. मी तुम्हाला खात्री देतो की, इथं जी जनावरं येतील ती शेतक-यांना शेती हंगामात पाऊस सुरू झाल्यावर धडधाकट व सशक्त अवस्थेत परत केली जातील. दास्ता-ए-अलनूर कंपनी /१५९ जिल्हाधिकारी कार्यालयात कलेक्टर भावे यांनी दुष्काळात जनावरे म नयेत या बेभावाने कत्तलखान्याकडे जाऊ नयेत म्हणून गुरांच्या छावण्या उघडण्यासाठी स्वयंसेवी सेवाभावी संस्थांच्या प्रतिनिधींना बैठकीला बोलावलं होतं. अनेक संस्थांनी गुरांची छावणी उघडण्याची तयारी दर्शविली होती. | जनकल्याण समितीचे भिडे गुरुजी हे लहानपणापासून संघाचे प्रचारक, या जिल्हयात गेली दोन तपे जनकल्याण समितीच्या माध्यमातून विविध सेवा प्रकल्प राबवत आहेत. एक निःस्वार्थी व सेवाभावी वृत्तीचे कार्यकर्ते म्हणून सारे त्यांना मानतात. | मात्र ते बोलायला फटकळ आहेत. 'सर, तुम्ही आम्हाला गुरांची छावणी उघडण्याची परवानगी दिली याबद्दल धन्यवाद ! यामागे आमचा हेतू शेतक-यांचे पशुपन नष्ट होऊ नये हा आहे. त्याचबरोबर गौरक्षण हाही आहे, हे मी कबूल करतो. त्यात मला संकोच वाटत नाही. सरकारदरबारी आम्ही अस्पृश्य ! म्हणून आधीच विचारतों. पुन्हा गैरसमज नकोत...' 'गुरुजी, गुरांच्या छावणीत कसलं आलं आहे राजकारण व धार्मिकता ? जो कोणी यासाठी पुढे येईल, त्याला शासनाच्या वतीने चारा दिला जाईल. बाकी आपण करायचं. माझी काही हरकत नाही. आपण गुरांच्या छावण्या चालवायला घ्या.' भावे म्हणाले. या बैठकीला काही लोकप्रतिनिधीपण उपस्थित होते. काही आमदार व काही जिल्हा नियोजन व विकास मंडळ - डी. पी. डी. सी. चे सदस्य. आमदारांमधील शिवसेना • भाजप आमदारांनी भिडे गुरुजींच्या जनकल्याण समितीला तीन गुरांच्या छावण्या देण्याचे समर्थन केले. काँग्रेस आमदारांनी विरोध केला नाही. कारण भिडे गुरुजींच्या निःस्वार्थ कामाची त्यांना माहिती होती. | सभेचा मूड पाहून डी. पी. सी. चे सदस्य असलेले व अल्पसंख्याक सेलचे सचिव असलेले चाऊसशेठ मात्र अस्वस्थ झाले, पण काही बोलू शकले नाहीत. पाणी! पाणी!!/१६० 'शेतकरी बंधूंनो, पशुधन हे बळीराजाचं - शेतक-याचे भूषण आहे, वैभव आहे. ते सान्यांनी जपलं पाहिजे. यंदाचा दुष्काळ मोठा आहे. पाणी व चाराटंचाई प्रचंड आहे. पण त्यावर मात करण्यासाठी शासन प्रयलशील आहे, त्याला तुम्ही साथ दिली पाहिजे. आपली गुरेढोरे आपण आम्ही स्वयंसेवी संस्थांमार्फत उपलेल्या गुरांच्या छावणीत पाठवा. तेथे त्यांची उत्तम देखभाल केली जाईल. हे पशुधन शेतीसाठी अत्यावश्यक आहे. ते आपण पडत्या भावानं किंवा जनावरांना चारा घालता घेत नाही म्हणून भाव विकू नका. शासनाच्या वतीनं मी तुम्हास आश्वासन देतो की, तुमचं पशुधन आमच्या छावणीत सुरक्षित राहील. शेती हंगाम सुरू होताच ते परत पाठवू.' | भाथे गेले दोन दिवस जिल्ह्यामध्ये सतत फिरून गुरांच्या छावण्यांना भेट देत होते, गावात शेतक-यांशी बोलत होते. त्यांच्या अपेक्षेपेक्षा स्वयंसेवी संस्थांनी चांगल्या पद्धतीने गुरांच्या छावण्या चालवल्या होत्या. तरळद हे त्यांच्या दौ-यातलं शेवटचं गाव व अखेरची गुरांची छावणी होती. तेथे त्यांचं स्वागत भिडे गुरुजींनी केले व त्यांना गुरांची छायणी फिरुन दाखवली. सारी व्यवस्था चौख होती. गुरांच्या माथी पर उभारून सावलीची सोय केली होती, चार मोठे हौद गुरांना पाणी पिण्यासाठी बांधले होते आणि जनकल्याण समितीने स्यखचने बोअर घेऊन त्यावर मोटार बसवून पाण्याची सोय केली होती. गुरांसाठी लागणारी औषधीही पुरेशी होती. तेथे दाखल झालेली जनावरे अंग धरत होती. | ‘वा गुरुजी ! फारच छान ! एवढी चांगली व्यवस्था शासनही करू शकणार नाही.' भाचे म्हणाले, 'याचं एकच कारण मला दिसतं आपली निःस्वार्थ सेवावृत्ती आणि समाजाबद्दलचा कळवळा." ‘सर, माझी जादा तारीफ करू नका. तुमच्यावर संघाचा शिक्का बसेल." भिड्यांना मनमोकळ्या स्तुतीचाही स्वीकार करता येत नसे. ते आपल्या फटकळपणाला अनुसरून बोलून गेले. । ‘ते मी जाणतो; पण तुमचं काम पाहिलं की वाटतं, हीं लेबले अनबॉरंटेड आहेत. प्रत्येक ठिकाणी इझम आणायची गरज नाही.' 'आणखी दोन बाबी मला स्पष्ट करायच्या आहेत.' भिडे गुरुजी म्हणाले, 'एक तर या परिसरात अलनूर नावाची कंपनी आहे. बीफ एक्स्पोर्ट करण्याचा त्यांचा दास्ता-ए-अलनूर कंपनी / १६१ कारखाना आहे. यंदा त्यांनी केवळ आपल्या जिल्ह्यातच नव्हे, तर मराठवाड्यातील सातही जिल्ह्यांत व सर्व तालुक्यांत एजंटस् पाठवून बेभाव जनावरे खरेदी केली आहेत; पण आता आपण या जिल्ह्यात जवळपास चाळीस गुरांच्या छावण्या उघडल्यामुळे त्याला फार मोठी खीळ बसली आहे.' ‘मग त्यात वाईट काय आहे गुरुजी ? शासनाचा सारा प्रयास या दुष्काळात पशुधन वाचवावं यासाठीच आहे.' भावे सरळपणे म्हणाले. ‘सर, आपण शासनाचे आदेश ‘लेटर अँड स्पिरिट' प्रमाणे घेता - पाळता व तसे काम करता. पण शासनाचे काही लोकप्रतिनिधी... त्यांना हे रुचत नाही. ते तुम्हालाही बदनाम करायला मागे - पुढे पाहणार नाहीत.' ‘तुमचा इशारा माझ्या लक्षात आला गुरुजी; पण आपल्या जिल्ह्यात इतक्या खालच्या पातळीवर येऊन विचार करणारे लोकप्रतिनिधी असतील असं वाटत नाही... असले तरी माझ्या डोळ्यास डोळा भिडवून ते सामना करतील हे शक्य नाही.' भावे आत्मविश्वासानं म्हणाले. ‘बरं, दुसरी बाब कोणती' ‘या भयानक गर्मी - उन्हामुळे जनावरांचे काही रोग बळावतील. आमच्या तिन्ही छावण्यांत पुरेशी औषधी आहे; पण सर्वत्र ही परिस्थिती नाही. काही ठिकाणी प्रशिक्षित व्हेटरनरी डॉक्टर वा कंपाऊंडर नाहीत. तुम्ही पशुवैद्यकीय खात्यामार्फत दररोज डॉक्टर्सची व्हिजिट सर्व ठिकाणी लावली तर बरं होईल.' ‘तुमची ही सूचना रास्त आहे. मी लगेच त्यावर कार्यवाही करतो.' चाऊसशेठनी पुन्हा एकदा काजू-मनुकांचा बोकणा भरला आणि पलंगावरचे पाय लांब केले. बेचैन असले की घडीघडीला त्यांना ड्रायफूटसू लागायचे मघाशीच अल्तमश व हयातखान त्यांचा निरोप घेऊन गेले होते व बजावूनही गेले होते, | ‘चाऊसशेठ, आप हमारे कम्पनी के इस जिले के मेन एजंट, इस साल ये क्या हो गया ? पूरे जिले में गुरों की छावनी खुलने से इस दस-पंधरा दिन में हमे एक भी जानवर काटने को नहीं मिला.' पाणी! पाणी!! / १६२ चाऊसशेठला हे माहीत होतं. खरं तर दुष्काळाच्या वेळी नेहमीच गुरांच्या छावण्या उघडण्याचे शासनाचे आदेश असतात. कुठेतरी साखर कारखान्याच्या परिसरात दोन चार छावण्या उघडल्या जातात. पण भावे साहेबांनी यंदा कमालच केली. स्वतः प्रत्येक तालुक्यात व महसूल मंडळात जाऊन तेथे चांगलं काम करणा-या संस्थांना प्रोत्साहित करून जवळपास चाळीस गुरांच्या छावण्या उघडल्या. त्यामुळे शेतक-यांनी जनावरे बेभाव विकण्याऐवजी ती छावण्यांमध्ये दाखल केली. परिणामतः कंपनीला या पंधरा दिवसांत एकही जनावर मिळालं नाही. तीन शिफ्टमध्ये कंपनी गेले दीड महिना चालू असताना आता जेमतेच एक शिफ्टचंच काम उरलं होत होतं - तेही इतर जिल्ह्यांतील जनावरांमुळे; पण त्यात वाहतूक खर्च फार होता. ‘अलनूर साहब आपसे सखुत नाराज है चाऊसशेठ.' हयातखान म्हणाला, ‘कुछ कीजिए, कुछ कीजिए. वर्ना कम्पनी आपकी खातिरदारी बंद कर देगी.' चाऊसशेठ संतप्त नजरेनं पाहात आहेत हे जाणवताच हयातखान सावरीत म्हणाला, 'ये साहब ने गुस्से में कहा होगा. हम उनको समझायेंगे. लेकिन सवाल हल नहीं होता इतने से. जूनपर्यंत कंपनीच्या तिन्ही शिफ्ट चालल्या पाहिजेत. गेल्या दोन वर्षातला लॉस भरून काढायचा हाच मौका आहे. कुछ करो शेठ, कुछ करो.' | ते अलनूर साहेबांना चांगले ओळखून आहेत. त्यामुळे जरी हयातखानने सौम्य शब्दांत त्यांची नाराजी पोचवली असली तरी त्यामागची धग चाऊसशेठनं ताडली होती. आज त्यांना पूर्ण जिल्हा चाऊसशेठ म्हणून जाणतो. सत्ताधारी पक्षाच्या अल्पसंख्याक सेलचे ते सचिव आहेत. एका परमिट रूमसह हॉटेल आणि दोन ट्रक व चार टेम्पोसह चालणारी ट्रान्स्पोर्ट कंपनी हे वैभव गेल्या चार-सहा वर्षातलं. त्याला कारणही अलनूर साहेब होते. त्यांनी चाऊसला कंपनीचा मुख्य एजंट बनवलं आणि कंपनीच्या कामात अडथळे न येण्यासाठी राजकीय - प्रशासनिक आघाडी सांभाळण्याचं काम दिलं. आजवर चाऊसशेठ अलनूरच्या कसोटीला सहजतेनं उतरले होते. त्यामुळे हातात पैसा खेळू लागला, समाजात पत वाढली आणि त्यांनी सत्ताधारी पक्षात ऊठबस सुरू करून स्वतःचं एक स्थान निर्माण केलं. दास्ता-ए-अलनूर कंपनी / १६३ प्रत्येक दुष्काळात चाऊसशेठनं कंपनीला मागणीप्रमाणे मोठी जनावरं - गाय, म्हशी, बैल व रेडे कमी भावानं पुरवले होते. त्यांनी आपल्या हस्तकांचे जिल्हाभर पद्धतशीर जाळंच उभारलं होतं. पुन्हा प्रशासनाची शिथिलता त्यांच्या पथ्यावर पडायची. जनावरं वाचविण्यासाठी यापूर्वी कधी शर्थीचे प्रयत्न झालेच नाहीत, त्यामुळे चाऊसशेठना फारसं काही करावं लागलं नव्हतं. | पण यंदाचा प्रसंग बाका होता. भावे कलेक्टरांनी चाळीस गुरांच्या छावण्या जिल्ह्यात उघडल्यामुळे व तेथे जनावरांची उत्तम देखभाल होत असल्यामुळे शेतकरी जनावरे न विकता गुरांच्या छावणीत दाखल करीत होते. आणि यापूर्वी ज्यांनी वाट न पाहता कमी भावात जनावरं विकली, ते हळहळत होते. चाऊसशेठची माणसं हात हलवीत परत येत होती. दररोज अल्तमश व हयातखानचा तगादा वाढत होता. भाषाही दिवसेंदिवस अधिकाराच्या दर्पानं कडवट होत होती. चाऊसशेठ स्वतःला प्रतिष्ठित समजत असल्यामुळे त्याच्या लेखी हे दोघे कंपनीचे नोकर म्हणून कमी दर्जाचे होते; पण त्यांचं बोलणं व इशारे जळफळत का होईना निमूटपणे ऐकून घ्यावे लागत होते. या पंधरा दिवसांत कंपनीकडून एक पैसाही मिळाला नव्हता. 'कुछ तो करना ही पडेगा.' चाऊसशेठच्या मनात विचार पक्का होत होता. या गुरांच्या छावण्या बंद पडल्या पाहिजेत किंवा शेतक-यांचा विश्वास उडाला पाहिजे, तरच शेतकरी आपली जनावरे पाठवणार नाहीत किंवा काढून घेतील. असं काही घडलं तरच कंपनीचं नुकसान भरून निघेल. पण हे कसं करावं हे उमगत नव्हतं. सरकारविरोधी सतत लिहिण्यातच आपल्या वृत्तपत्राचा स्वदेशी व डावा बाणा सिद्ध होतो, अशी श्रद्धा असणारया वृत्तपत्राचा दिनेश सावंत हा वार्ताहर होता. गेली तीन वर्षं या पेपरमध्ये काम करीत असल्यामुळे त्याचाही दृष्टिकोन पक्का झाला होता. पाणी! पाणी!!/१६४ त्याला दुष्काळाच्या निमित्ताने वार्तापत्र लिहिण्याचे आदेश संपादकानं दिले होते. त्यासाठी तो झटत होता. शासकीय कार्यालयातून माहिती घेतली होती व रोजगार हमी - पाणीटंचाईच्या संदर्भात काही गावं पालथी घातली होती. यंदा प्रशासनाने प्रभावी पावलं उचलल्यामुळे जरी टंचाईची समस्या असली तरी उपाययोजना तातडीनं घेऊन त्या कार्यक्षमतेनं राबविल्या जात असल्याचं दिनेशला दिसून आलं. हे सारं वार्तापत्रात नमूद करणं म्हणजे सरकारची री ओढण्यासारखं झालं, असं दिनेशला वाटत होतं. कुठेतरी प्रशासनाचा गलथानपणा दिसावा, म्हणजे तो भाग ‘हायलाईट' करून वार्तापत्र खमंग, चुरचरीत बनवता येईल. यासाठी दिनेश धडपडत होता, माहिती जमा करीत होता. | आणि चौकामध्ये एक चहा मारून बाहेर पडताना त्याला त्याचा एक मित्र भेटला. हा कालच गावाकडून आला होता. त्यानं बातमी दिली की, त्याच्या गावी म्हणजे तरळदला गुरांच्या छावणीत एक बैल रोगग्रस्त होऊन मेला होता. दिनेश खुश झाला. त्याला 'क्लू' सापडला होता. मित्राच्या पाठीवर थाप देत तो म्हणाला, 'हे सरकार नुसतं नाटक करतं गुरांच्या छावण्या उघडण्याचं; पण देखभाल करीत नाही, काळजी घेत नाही.' 'अंहं, तसं नाही दिनेश.' तो मित्र म्हणाला, 'अरे, तिथली गुरांची छावणी भिडे गुरुजी चालवतात जनकल्याण समितीच्या वतीनं. फार चांगली काळजी घेतली जाते यार ! पण काय झालं, चार दिवसापूर्वी आपल्या गावच्या भीमराव नाईकाचं एक जनावर छावणीत दाखल झालं. ते बिमारच होतं. त्याला औषधपाणी दिलं, पण काही उपयोग झाला नाही बघ.' मित्र निघून गेला आणि दिनेश भानावर आला. त्याच्या डोक्यात भराभर विचारचक्र फिरत होते. गुरांच्या छावणीत बैल दगावला ! ही छावणी जनकल्याण समितीची म्हणजे संघवाल्यांची. आपला पेपर कड़ा समाजवादी - डाव्या विचारसरणीचा. संघावर सदैव तुटून पडणारा. वार्तापत्रात हे सारं आलं तर किती मजा येईल! मोठं खमंग, चुरचुरीत वार्तापत्र होईल. संपादक महाशय खुश होतील... आणि मुख्य म्हणजे वार्तापत्रात केवळ सरकारच्या चांगल्या कामांची माहिती देण्याची वेळ आली होती, ती टळली. दास्ता-ए-अलनूर कंपनी / १६५ आपल्याला ताबडतोब तरळदला जायला हवं. प्रत्यक्ष गुरांची छावणी पाहता येईल च भीमराव नाईकांशी बोलता येईल. एखाद - दुसरी चौकटीची बातमीही मिळेल. दिनेश बसस्टैंडला आला आणि त्याला 'सलाम आलेकुम दिनेश साब!' असं अभिवादन आलं. त्यानं आवाजाच्या दिशेनं पाहिलं - समोर चाऊसशेठ उभे होते. ‘वालेकुम सलाम !' दिनेशनं प्रतिअभिवादन करीत विचारलं, 'क्या चल रहा है चाऊसशेठ?' ‘हमारा ठीक है.' चाऊसशेठ म्हणाले. 'आप कहाँ जा रहे हैं?" दिनेशनं आपण तरळदला जात असल्याचं सांगताच चाऊसशेठचे डोळे लकाकले. गेले आठ दिवस 'कुछ करना चाहिये' असं आपण स्वतःला बजावत होतो, तो क्षण आता आला आहे व खरंच काहीतरी करता येईल हे त्यांनी जाणलं ! | "ये बात है!' चाऊसशेठनं आपल्या स्वरात नसलेला कळवळा आणीत म्हटलं, 'गवर्नमेंट ने अकाल के लिए कितने डिसिजन लिए है, लेकिन प्रशासन नाकाम साबित हो गयी है. ये जानवर का मर जाना उसकी मिसाल है, चलो, मैं भी आता हूँ. मेरी गाड़ी से जायेंगे तरलद." दिनेश मारुती कारने जायला मिळणार यामुळे खुश झाला होता. कधीमधी असा योग यायचा. गाडीमध्ये चाऊसशेठनं दिनेशच्या वृत्तपत्राची जातकुळी व विचारसरणी माहीत असल्यामुळे त्याला व्यवस्थित ‘पंप' करायला सुरू केलं आणि प्रशासन कसं जातीयवादी बनलं आहे हे सांगायला सुरुवात केली आणि पुढे ते म्हणाले, 'दिनेश, मैं मानता हूँ कि हमारे कलेक्टर भाबे साब एक नेक अफसर है. लेकिन वे संघवालों की तरफ झुके नजर आते हैं. वर्ना उन्हें क्या जरूरत थी कि वे भिडे गुरुजी को तीन - तीन जानवरोंकी छावनियाँ दें....। दिनेशमधल्या वार्ताहराला चांगला मालमसाला मिळाला होता. पाणी! पाणी!! / १६६ “तुम्हाला सांगतो साने साहेब, काहीतरी अनिष्ट घडेल असं वाटतं. भीमराव नाईकचा बैल मेला. कारण इथं आला तेव्हाच तो रोगग्रस्त होता. त्याच्यावर औषधोपचार केला, पण तो वाचला नाही. भिडे गुरुजी नगरसेवक सानेंना सांगत होते. ‘पण गुरुजी, त्यात तुमचा काय दोष ? तुमचं रेकॉर्ड तर व्यवस्थित आहे. बाकीची जनावरे तर दृष्ट लागण्याइतपत सुदृढ दिसतात.' 'नाही, साने साहेब. काही लोकांना उत्तम चाललेल्या गुरांच्या छावण्या नको आहेत, सलतात त्यांना. आजवर काही कुसळ मिळाले नाही. या निमित्ताने ते मिळणार व त्याला मुसळाएवढं रूप देऊन आपली - जनकल्याण समितीची आणि संघाची बदनामी काही जण करणार. हे सारं मला स्पष्ट दिसतंय.' 'असं होणार नाही. गुरुजी, तुम्हाला या जिल्ह्यात सारे जाणतात. तुमचा स्वार्थत्याग, तुम्ही उभारलेले सेवाप्रकल्प... त्यांची नोंद देशपातळीवर आहे...' | "पण आज या छावणीला तो हरामखोर वार्ताहर दिनेश सावंत आणि डी. पी. सी. चे सदस्य चाऊसशेठ भेट देऊन गेले. तसंच भीमरावलाही भेटले. त्यांच्या पेपरमध्ये विपर्यस्त बातमी येण्याची मला भीती वाटते.' 'गुरुजी, आपल्याला हे लोक आज को झोडपत आहेत? त्यांच्या टीकेची का म्हणून पर्वा करावी? "ते ठीक आहे साने, पण यात त्यांनी कलेक्टर भावे साहेबांना गोवू नये म्हणजे मिळवली; पण...' आपलं वाक्य अर्धवट तोडीत गुरुजींनी खांदे उडवले आणि मनातले विचार झटकून टाकीत चा-याची पेंढी जनावरांना देऊ लागले. ‘शासनप्रणीत गुरांच्या छावणीत जनावरांची दुर्दशा !' 'तरळदच्या छावणीत एका बैलाचा हेळसांडीमुळे मृत्यू !' 'शेतक-यांत तीव्र नाराजी. आपली जनावरे ते छावण्यांतून काढून घेणार ! दास्ता-ए-अलनूर कंपनी / १६७ ________________

‘कलेक्टर भावे की स्वयंसेवक भावे ?” वार्तापत्रात असे चटकदार व खमंग मथळे देत दिनेशनं शैलीदार भाषेत आपलं दुष्काळविषयक वार्तापत्र सजवलं होतं त्यावर वृत्तपत्राचे संपादक बेहद्द खुश झाले होते व ते त्यांनी प्रथम पृष्ठावर छापलं होतं. चाऊसशेठ पेपर वाचून खुश झाले होते काहीही प्रयत्न न करावे लागता त्यांना अपेक्षित असणारा परिणाम या वार्तापत्राने घडून यायची शक्यता निर्माण झाली होती. इतर वृत्तपत्रांत यासंदर्भात काही यायचे असेल तर आपण आपली जाहीर प्रतिक्रिया स्वतःच लिहून पाठवली पाहिजे, हे चाऊसशेठना माहीत होतं. त्यांनी लगेच प्रतिक्रिया लिहून काढली 'योगायोगाने मी झुंजार पत्रकार दिनेश सावंत यांच्या सोबत तरळदला गेलो होतो. गुरांची छावणी पाहून वाईट वाटलं. एका गरीब शेतक-याचा बैल देखभाल नीट न झाल्यामुळे मेला हे वाईट झाले; पण याला जबाबदार जिल्हा प्रशासन आहे. जिल्हाधिकारी भावे मनोवृत्तीने संघीय वाटतात. त्यांनी अकारणच जनकल्याण समितीला तीन - तीन गुरांच्या छावण्या दिल्या आहेत. त्यांचे कार्य व्यापारी मध्यमवर्गापुरते सीमित आहे. त्यांना शेतक-यांची सुख - दुःखं, समस्या काय माहीत? हा त्यांचा प्रांत नव्हे. येणारी निवडणूक लक्षात घेऊन शेतक-यांच्या जवळ जाण्याचा हा एक त्यांचा स्टंट होता, असंच माझं मत झालं आहे; पण त्यांना तो स्टंटही नीट करता आला नाही व त्यात एक बैल दगावला. एका गरीब शेतक-याचं पशुधन नष्ट झालं ! चाऊसशेठची ही प्रतिक्रिया सर्व वृत्तपत्रांत ठळकपणे प्रसिद्ध झाली आणि वाचकांच्या पत्रव्यवहारात अनेक पत्र - उलटसुलट मतांची येत राहिली. आठ दिवसांतच सर्व वृत्तपत्रांत एक छोटी बातमी प्रसिद्ध झालीः 'तरळद येथील गुरांची छावणी शेतक-यांनी आपली जनावरे काढून घेण्यास सुरुवात केल्यामुळे भिडे गुरुजींनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.' | ‘वा चाऊसशेठ ! इस बार आपने जो कर्तब दिखाये हैं, उसका जवाब नहीं...' अलनूर साहेबांनी कडकडून मिठी मारीत चाऊसशेठना बधाई दिली. कारण पाणी! पाणी!!! १६८ : ________________

आता पुन्हा अलनूर कंपनी तिन्ही शिफ्टमध्ये पूर्णपणे चालू होती. जूनला अजून एक महिना होता. 'शुक्रिया हुजूर !' नम्रपणे चाऊसशेठ म्हणाले आणि त्यांनी समोरच्या डिशमधल्या ड्रायफूटचा बोकणा भरला. दास्ता-ए-अलनूर कंपनी / १६९ ________________

। पाणी! पाणी!! | १७० ________________

१२. अमिना राणंद बुद्रुक गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर मुख्य रस्त्याच्या कडेला झालेल्या शासकीय घरकुलाच्या वसाहतीतील - ज्याचं राजीवनगर असं नामकरणही झालेलं आहे - कादरचं घर त्याच्यासमोर फडफडणांच्या कोंबड्यांच्या खुराड्यानं आणि तीन - चार बक-यांच्या इतस्ततः वावरणाच्या वास्तव्यानं सहज ओळखू येत असे. कादरच्या घराची दुसरी खूण म्हणजे त्या घराभोवती सदैव खेळणारी व मातीच्या रंगाशी एकरूप झालेली पाच-सहा कच्चीबच्ची. झिपरे केस, गळणारं नाक, पडा असेल तर शर्ट नाही, मूली चिटाच्या पोलक्यात. जरा मोठीच्या कडेवर रांगतं गुल - ज्यात प्रतिवर्षी भर पडणार हे साच्या राजीवनगराला ज्ञात असलेलं. पाच-सहा वर्षांपूर्वी बांधलेल्या घराचा उडालेला चुना, घरासमोरच्या मोरीमुळे ओलसर व घाणेरडी झालेली जमीन, पत्रा उडून गेल्यामुळे तिथं केलेली शाकारणी, सतत पायात घोटाळणान्या कोंबड्या व पिले आणि बक-यांचं इतस्ततः चरणं... यांच्या एकरूपतेतून कादरचा संसार साकार व्हायचा. । | दाराशी मात्र जीर्ण झालेला व विटलेल्या रंगाचा एक पडदा असायचा, जी अमिनासाठी सीमारेषा होती. त्याच्या आत ती बेपर्दा वावरायची, मात्र बाहेर पडताना असाच केव्हातरी घेतलेला, असंख्य ठिगळे जोडलेला व रफू केलेला बुरखा ती घ्यायची. अगदी रोजगार हमीच्या कामावर जातानाही. तिथं मात्र बुरखा काढूनच काम करणं भाग असायचं. खरं तर खेडेगावात पडद्याचा फारसा वापर नसतो; पण तालुक्याच्या अमिना / १७१ ________________

गावी मजहबी कामासाठी अधूनमधून जाणा-या कादरचा मात्र अमिनासाठी सक्त हुकूम होता 'पर्दाच हमारी औरतों की शान है, उसे पहेननाच मंगता है...' त्याच्या फाटक्या किरकोळ देहात मात्र जबरदस्त हुकमी आवाज होता. तो तिला त्याची आज्ञा बिनचूक पाळण्यास मजबूर करायची. आज सकाळीच त्यानं तिला जवळ ओढून यथेच्छ भोगलं होतं. त्यांच्यामध्ये त्यांची चार महिन्यांपूर्वी जन्मलेली पोर होती. तिचं रडणे चालूच होतं, तरीही त्याचा कादरवर सुतरामही परिणाम झाला नव्हता. वेळी - अवेळी त्याला तिचं शरीर लागायचं. तिच्या इच्छेचा प्रश्नच येत नसे. खरं तर सकाळी उठून घरची कामं करून नऊ वाजता बंडिंगच्या कामावर जायच्या वेळी असं शरीर कुस्करून, दमवून घेणं तिला परवडणारं नव्हतं. तिचं मन तर केव्हाचं विझून गेलं होतं. निकाहनंतर पहिल्या वर्षा-दोन वर्षातली रक्ताची उसळ निवत गेली. त्याचं कारण म्हणजे कादरसाठी असलेलं फक्त तिच्या शरीराचं अस्तित्व. तिला मन, भावना व शृंगार असतो, हे त्याला कुठे माहीत होतं? सततच्या बाळंतपणानं शरीराचा चोथा झाला होता. मन तर देहभोगाला किळसलं होतं. पुन्हा त्याचे टोमणे ‘साली चिप्पड हो गयी है. कुछ मजा नहीं आता.' अशा वेळी ती विझून जायची. स्वतःला अलिप्ततेच्या कोशात दडवून घ्यायची आणि आपलं मन शून्य करून त्याला देह द्यायची. आजही असंच घडलं. तो पुन्हा अलग होऊन घोरू लागला. अमिनाला मात्र एक किळसवाणी ठसठूस डाचत होती. ठणकणा-या, दमलेल्या शरीरात नेटानं बळ आणीत ती उठली. दाताला मिश्री लावत केस बांधले. स्टोव्ह पेटवून चहा करून घेतला. गुळाचा चहा तिला आवडत नसे; पण गेले तीन महिने रेशन दुकानात साखरच आली नव्हती. त्यामुळे गुळाचा चहा घेणं भाग होतं. मग भाकया थापणं, पोराना खाऊ घालणं, मधूनमधून मोठ्या पोरीला - सकिनाला धपाटे घालीत काम सांगण उठलेल्या कादरला चहा देणं, स्वतःची आंघोळ उघड्यावर कशीबशी उरकणं, त्यावेळी इतर हिरव्या पुरुषांच्या वाळलेल्या तरी स्त्रीत्वाच्या खुणा बाळगणारया देहावर नजरेन सरपटणा-या वासनांचे आघात सहन करणं, कादरचं पुन्हा हुकमी ओरडणं, ‘बेशम, नाचीज, बड़ा मजा आता है ना तुझे सरेआम नंगी होकर नहाने में?' खरं तर रोजगार हमीच्या कामावर जाऊन आल्यावर सारं अंग धुळीनं माखलेलं असायचं, सायंकाळी स्वच्छ स्नान करावंसं वाटायचं; पण कादरचा दराराच असा होता की, तिची हिंमत व्हायची नाही. असंच दोन - तीन दिवसांत केव्हातरी भल्या पहाटे स्नान करायची ती. पाणी पाणी!!/ १७३ ________________

आजही ती चार दिवसांनंतर स्नान करत होती, तरीही त्याचे तेच टोमणे. पण तिनं आताशी आपलं मन मुर्दाड बनवून त्याकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष करायला सुरुवात केली होती. 'आज मैं तालुक्याला जाता हैं अमिना. हो सकता है दो रोज नहीं आऊ वापस मैं...' | तो गवंडीकाम करायचा. अलीकडे त्याने तालुक्याला जाऊन काम करायला सुरुवात केली होती. तसा त्याचा हात कसबी होता. काम मिळायचं, मिळकतही चांगली व्हायची; पण ती तो दारूत उडवायचा. अमिनाची शंका होती की, तालुक्याला एकीला ठेवलं असावं. एक - दोनदा तिला झोंबताना तो म्हणून गेला होता. 'चांद, चांद...!' त्याचंही अमिनाला फारसं काही वाटत नसे; पण आपला देहभोग टळत नाही हा विषाद होता. आणि मुख्य म्हणजे आपल्या व्यसनामुळे आपल्या पाऊण डझन पोरांना धड दोन वेळचं जेवणही देता येत नाही, याचं त्याला काही वाटत नसे. तो म्हणायचा, ‘हरेक ने खुद को देखना. अल्लातालाने जनम दिया है, तो वो जरूर दानापानी देंगा ही !' त्यामुळे मोठी सकिना व तिच्या पाठचा बब्बर गावात काही ना काही काम करत आणि ते मिळालं नाही तर चार काटक्या किंवा हिरवा पाला तरी आणत. हे मात्र अमिनाला फार खुपायचं. नकोशा वाटणा-या संगातून झाली असली तरी तिला आपली पोरं जीव की प्राण होती. त्यांचं करपलेलं व कसलंही भविष्य नसलेलं बालपण तिला दुखवून जायचं. त्यामुळेच गेल्या वर्षापासून तिनंच कंबर कसून रोजगार हमीच्या कामावर जायला सुरुवात केली होती. नवव्या बाळंतपणानंतर तिला कमालीची अशक्तता आली होती; पण दोन महिने होताच तिनं पुन्हा कामावर जायला सुरुवात केली. आज ती जेव्हा कामावर पोचली, तेव्हा अजून कामाला सुरुवात झाली नव्हती. कारण अजून मुकादम यायचा होता, अजून हजेरी व्हायची होती. अमिना / १७३ ________________

मग ती आपल्या नेहमीच्या गॅगमध्ये सामील झाली. गजरा, लंका, सोजर या तिच्या राजीवनगरमधल्या मैत्रिणी. त्या झाडाखाली तंबाखू मळत बोलत बसल्या होत्या. ‘ये अमिना, तब्येत बरी हाय ना तुजी? सोजरनं आपुलकीनं विचारलं.' आणि पाहता पाहता तिचे डोळे भरून आले. ‘क्या धाड पडलीय मेरे तब्येत को सोजर? बच्चे पैदा करने की मशिन जो हूं मैं.... मशिन को थोडाच दिल होता है?' ‘ऐसा क्यों बोलती है पगली? हम हैं ना तेरे साथ.' लंका म्हणाला. ‘वो तो हैच. बस तुम से बोलती हूँ और दिल को तसल्ली कर लेती हूँ...' ‘पण ते जाऊ दे, अमिना - लंका, माहीत आहे, आज पगार होणार आहे दोन पंधरवड्याचा....' गजरानं माहिती दिली, ‘म्या निघत व्हते कामाला, तवा मुकादम जात होता बस-स्टॅडवर सायेबांना आणण्यासाठी.' । या बातमीनं अमिनाच्या चेह-यावर थोडी टवटवी आली. निदान दीडशे रुपये तरी सुटत होते. याशिवाय गेल्या वर्षात अमिनाने सतत दीडशे दिवस रोजगार हमीचे काम केल्यामुळे पंधरा दिवसांचा रोजचे बारा रुपये याप्रमाणे बाळंतपणाचा भत्ता नियमाप्रमाणे मिळणार होता. | मुकादमनं तिचा फॉर्म भरून घेतला होता व त्यानं तिचा अर्ज साहेबाकडून मंजूर करून घेतला होता. यासाठी त्याला त्यातून पन्नास रुपये द्यायचे ठरले होते. कदाचित आज ते पैसेही मिळण्याची शक्यता होती. ते काम पाहणारा कनिष्ठ अभियंता - ‘विंजेनिअर सायेब' मुकादमासह आला. त्याच्या हातात भलीमोठी फुगलेली चामड्याची बॅग होती. त्यात रोजगार हमी वाटपाच पैसे असणार हे सान्यांच्या लक्षात आलं होतं व त्यांच्या अंगात उत्साह संचारून आला होता. पैशाचे वाटप दुपारी चार वाजता होणार होते. सारेजण उत्साहाने कामाला लागले होते. मुकादमनं अमिनाला सांगितलं होतं, आज तुझे बाळंतपणाचे पैसे मंजूर झाले आहेत, ते पण साहेब देतील.' पाणी! पाणी!!/ १७४ ________________

अशिक्षित अमिना बोटे मुडपीत पुन्हा पुन्हा दोन पंधरवाड्यांचा मिळणारा पगार व बाळंतपणाचा भत्ता मिळून किती पैसे मिळतील याचा हिशोब करीत होती, पण प्रत्येक वेळी वेगळाच आकडा येत होता. एक निश्चित होतं की, मिळणारा पैसा किमान एक महिना तरी पोराबाळांना दोन वेळचं जेवण नीट देण्याइतका जरूर होता... त्यामुळे कितीतरी दिवसांनी अमिना खुलून आली होती. जेवायच्या सुट्टीमध्ये त्या चौघी भाकरतुकडा खात असताना मुकादमानं येऊन सूचना दिली की, कामावरचे मुख्य साहेब डेप्युटी इंजिनिअर आले आहेत. ते सर्वांना काहीतरी सांगणार आहेत. तरी जेवण होताच सर्वांनी जीप उभी आहे तिथं जमावं. अमिनाच्या मनात शंका चमकून गेली. पुन्हा मोठे साहेब ‘कुटुंब कल्याण बद्दल तर सांगणार नाहीत? तीन महिन्यांपूर्वी असेच ते आले होते व कामाच्या साईटवरच त्यांनी कुटुंब नियोजन शिबीर घेतले होते. त्यासाठी मेडिकल कॉलेजची फिरती व्हॅन - ज्यामध्ये ऑपरेशन करता येतं मागवली होती. त्या शिबिरात ऑपरेशन करून घेण्यासाठी अमिनानंही नाव नोंदवलं होतं पण... 'चला चला... वेळ लावू नका... साहेबांना दुस-या साईटवर जायचं आहे...' असा मुकादमानं कालवा केल्यामुळे अमिना आपल्या तिन्ही मैत्रिणींसह उठली. | जीपमध्ये गॉगल लावून एक पोरसवदा वाटणारा अधिकारी बसला होता. त्या जीपसमोर काही मिनिटांतच दोन रांगा करून स्त्री व पुरुष अलग अलग उकिडवे बसले. मुकादमानं सर्वांना शांत केलं, तसं तो इंजिनिअर गॉगल काढून जीपच्या बाहेर आला. सर्वांकडे एक नजर टाकीत म्हणाला, | ‘हे पहा, आपल्याला पुन्हा या महिन्यात कुटुंब कल्याणाचं शिबिर घ्यायचं आहे. तसा कलेक्टर व सी. ई. ओ साहेबांचा आदेश आहे. मागच्या मार्चमध्ये अनेकांनी नावे देऊनही ऑपरेशन करून घेतलं नाही, हे बरोबर नाही. आज पगार वाटप होताना सवनी आपल्याला किती मुलेबाळे आहेत, हे मुकादमाला सांगायचं आहे. ज्यांना तीनपेक्षा जास्त मुले असतील त्यांनी हे ऑपरेशन करून घ्यावं, अशी माझी विनंती आहे. त्यात तुमचाच फायदा आहे. लहान कुटुंब असेल तर मुलांना नीट वाढवता अमिना / १७५ ________________

येईल, त्यांना शिक्षण देता येईल, हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. तुमचं दारिद्रय व अज्ञान हे कशामुळे आहे याचा विचार करा आणि निर्णय घ्या.' इंजिनिअरच्या स्वरात कळकळ होती. ती अमिनाला आजही जाणवली. मागेही जाणवली होती. म्हणून तर तिनं त्यावेळी शिबिरात नाव नोंदवलं होतं. ‘पन सायेब, हे ऑप्रेशन बायाचं हुईल का बाप्याचं ?' एक तरुण मजूर उठला व त्यानं प्रश्न विचारला. ‘दोघांचंही करता येतं; पण पुरुषाचं सोपं असतं.' । ‘छा छा ! माझ्या बाईचं करा सायेब...' त्यानं ठामपणे सांगितलं, तसा तो इंजिनिअर उसळला व म्हणाला, पुरुषाचं का नको? ते उलट सोपं व कमी वेळेत होतं!' ‘पन आमची मर्दानगी कमी व्हते तेचं काय?' इंजिनिअर हतबुद्ध 'तुम्हाला किती वेळा समजावून सांगायचं? केवळ पोरं पैदा करणं म्हणजे मर्दानगी नव्हे. यामुळे कसलाही विपरीत परिणाम होत नाही. मी स्वतः ऑपरेशन करून घेतलं आहे दोन मुलांवर. त्यावरून मी सांगतो.' 'तुमी जीपमध्ये हिंडता सायब. आम्हास्नी मेहनत, मशागतीचं काम करावं लागतं. हे नाय जमणार बगा....!' आता मात्र इंजिनिअरची सहनशक्ती संपुष्टात आली होती. त्यांनी आवाज चढवीत मुकादमाला म्हटलं, 'या लोकांना तुम्ही त्यांच्या पद्धतीनं समजावून सांगा. हे चालणार नाही.' 'साहेब, तुम्ही काळजी करू नका. मी पाहतो. मुकादमानं साहेबाला शांत करीत त्यांना बाजूला नेत म्हटलं, 'साहेब, तुम्ही आकडा सांगा. तेवढ्या केसेस मी देतो. पण या गावची ही पुरुषमंडळी लई बिनडोक, साहेब, तेव्हा या केसेस बायांच्या होतील.' पैसे वाटणारा कनिष्ठ अभियंता म्हणाला, 'साहेब, सर्वत्र स्त्रियांच्याच केसेस होतात. आपल्याला केसेसशी मतलब आहे. साहेब, आम्ही दोघे या ठिकाणी पंचवीस केसेस निश्चित देतो बघा.' पाणी! पाणी!! / १७६ ________________

इंजिनिअर हळूहळू शांत झाले होते; पण त्यांच्या मनातला उद्वेग कमी झाला नव्हता. आजचा अनुभव काही वेगळा नव्हता. सर्वत्र हेच. पुरुषांना नसबंदी म्हणजे आपल्या पौरुषाचा अपमान वाटतो. पगारवाटपाच्या वेळी रांगेत उभ्या असलेल्या अमिनाच्या मनात मात्र अनेक विचारांची वादळ उठत होती. तिच्या लग्नाला अवघी दहा वर्षी झालेली; पण दरवर्षी होणा-या बाळंतपणामुळे तिची रया पार गेलेली. कादरच्या शब्दात ती ‘चिपाड' झालेली. लग्नानंतरच्या नव्हाळीच्या दिवसांत कादर तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करायचा. तिचं अपरं नाक पाहून तिला ‘मुमताज' म्हणायचा. मुमताज ही त्याची आवडती नटी. तिचे सारे सिनेमे पाहायचा ‘गच्च भरी हुई है लौंडी' हे त्याच्या आवडीचं कारण. लग्नाच्या वेळी अमिनाही रसरशीत उफाड्याची होती; पण त्याच्या राक्षसी उपभोगाच्या पद्धतीमुळे व सततच्या बाळंतपणामुळे तिची तब्येत दोन वर्षांतच खालावून गेली. | पहिल्या तीन - चार मुलांपर्यंत तिलाही कधी मुलं बंद होण्यासाठी काही उपाय करावेत, असं वाटलं नव्हतं. कारण त्यांच्या मुस्लिम मोहल्ल्यात सर्वच घरी पाच-सात मुलेबाळे ही आम बाब होती. जास्तीत जास्त मुले असावीत, ही इतरांप्रमाणे कादरचीही ओढ होती. पण तिला रात्री त्याच्या कुशीत झोपणं, तो देहभोग व ते गर्भारपणाचं ओझं आणि बाळंतपणाचा शारीरिक दुर्बलतेमुळे होणारा त्रास नको नकोसा वाटायचा. तिचा विरोध कादर जुमानत नसे. तो तिला चक्क धमकी देत असे, ‘मुझे क्या, कितनी बी बीबियाँ मिल सकती, तुझे तलाक दिया तो पोतेरा होगा तेरा - कोई नहीं पूछेगा. ऐसे बछडे सहित गाय से कौन शादी करेगा ?' ही भीती सार्थ होती. त्यामुळेच ती नेटानं त्याचे अत्याचार व दरवर्षीची बाळंतपणं सहन करीत होती. राजीवनगर घरकुल वसाहतीमध्ये त्यांना शासकीय घर मोफत मिळून गेलं. त्यांचा मुस्लिम मोहल्ला सुटला व संमिश्र वस्तीत ते राहायला आले. तिथं दलित होते, कुणबी होते, मातंग - वंजारी होते; पण तेच एकमात्र मुस्लिम कुटुंब होतं. इथं मात्र कादरनं तिच्यासाठी बुरखा व दाराला पडदा सक्तीचा केला होता. अमिना / १७७ ________________

तरीही दुपारी सर्व स्त्रिया एकत्र जमत. आधी आधी अमिना संकोचामुळे व कादरच्या धाकामुळे त्यांच्यात मिसळत नसे. मग त्यांनीच तिला ओढून आपल्यात नेलं. लंका, सोजीर व गजरा तिच्या मग जिवाभावाच्या मैत्रिणी झाल्या. त्यांच्या सहवासात मात्र तिला जाणीव झाली की, आपल्याला जादा पोरं आहेत. त्यांना आपण नीट पोसू शकत नाही. शिक्षण दूरच राहिलं... यापुढे मुलं बंद केली पाहिजेत. भीत भीत एकदा तिनं कादरला हे सांगितलं, तेव्हा त्यानं तिला काठीनं फोडून काढलं. “खबरदार, जो ऐसी बात फिर जबान तक लाई तो ! ये इस्लाम के खिलाफ है. वो मौलवी साब कहते हैं....' | ‘उनका हाल देखो - पहनने को कपड़े नही है... खाने की बोंबाबोंब - कैसा चलेगा ?' | ‘अल्लातालाने जनम दिया है, तो वो दानापानी भी देगा !' कादरनं ठामपणे सांगितलं. ‘और सिर्फ दोही तो लडके हैं. बाकी पांच लडकियाँ, मुझे और दो बच्चे चाहीये. समझी? मैंने ही तुझसे शादी करके भूल की तेरे मैके में सबके यहाँ लडकियाँ ही जादा हैं. लड़के पैदा करने के गुणही तुझ में कम हैं.' त्याच्या या अजब तर्कशास्त्राला तिच्याजवळ उत्तर नव्हतं. निमूटपणे त्याला देह देणं, एवढंच तिला आता करायचं होतं. मुलांचं वेड असलं तरी प्रपंचाबद्दल कादर पूर्ण बेफिकीर होता. कामासाठी धडपड करणं त्याच्या वृत्तीतच नव्हतं. तसा हुनर होता त्याच्या हातात. गवंडी कामात तो तरबेज होता; पण आळस व मौजमस्तीचा स्वभाव असल्यामुळे महिन्याकाठी आठ-दहा दिवसही तो काम करीत नसे. बाकीचा वेळ विड्या फुकणे व लहर आली की अमिनाचा भोग घेणे, हाच त्याचा विरंगुळा होता. | तालुक्याला गेला की तीन-चार दिवस तिची सुटका व्हायची; पण तिथं त्यानं एक बाई ठेवली होती. कमावलेला सारा पैसा तो दारूत व तिच्यावर उधळायचा. हेही तिला एक स्त्री म्हणून संतापजनक वाटायचं आणि आई म्हणून वाईट वाटायचं. कारण पाणी! पाणी!! / १७८ ________________

मुलाबाळांच्या खाण्यापिण्याची तो फिकीर करीत नसे. त्यामुळे मुलं भूक - भूक करू लागली, की तिच्या डोळ्यांतून वाहणा-या पाण्याला अंत नसे. त्यावरचा उपाय तिला दाखवला लंकाने. ती रोजगार हमीच्या कामावर नित्यनेमाने जात असे व महिन्याकाठी दीडशे ते दोनशे रुपये कमावत असे. अमिनानं यावेळी कादरच्या विरोधाला जुमानलं नाही. कारण तिच्यातील आई... मुलांच्या पोटात दोन वेळा पोटभर अन्न जावं असं वाटणारी आई तिच्यातील दुबळ्या स्त्रीवर मात करून गेली होती व त्याचा काही प्रमाणात साक्षात्कार कादरलाही झाला असावा. त्यानं एवढंच सांगितलं.... 'मुसलमान हो, काम को जाते वक्त बुरखा पहेनना.' आणि कणाकणानं अमिना रोजगार हमीवरील कामामुळे व त्याद्वारे मिळणा-या पैशामुळे बदलत होती, कणखर होत होती. काही प्रमाणात हा होईना आपण स्वतंत्र होत आहोत, मोकळ्या होत आहोत, ही सुखद जाणीव तिला होत होती. तरीही कादरची हुकमत किंचितही कमी झाली नव्हती आणि रात्री तिचा राक्षसी उपभोग घेणेही. म्हणून मार्चमध्ये इंजिनिअरनी रोजगार हमीच्या कामावर कुटुंब नियोजन शिबिर घ्यायचा बेत केला, तेव्हा तिनं आनंदानं त्यात नाव नोंदवलं. तिनं आपणहून स्वातंत्र्य घेत कादरला त्याबद्दल काही सांगितलं नव्हतं. अग, कशाला नव-याला सांगतेस?' हा लंकाचा रास्त सल्ला पटला होता, त्येस्नी य सुदिक कळणार नाय. अगं, दुर्बिर्णीचं आप्रेशन लई सोपं असतं. सकाळी यायचं, शामला घरी जायचं. बस्स !' । | त्या स्त्रियांच्या सोयीसाठी व वेळ-दिवस वाया जाऊ नये म्हणून इंजिनिअरनं लेप्रोस्कोपिक' ऑपरेशन ठेवलं होतं. पण कसं कोण जाणे, अमिना ऑपरेशन करून घेणार आहे हे कादरला मजलं. त्यानं तिला पुन्हा गुरासारखं झोडपून काढलं, 'तुझे मैंने बताया था... यह अमिना / १७९ ________________

हमारे मजहब के खिलाफ है... और दो लडके हम मंगता है... साली, हरामजादी ! फिर यह ऑपरेशन की बात निकाली तो जबान काट दूंगा !' | ‘जरा सोचो मियाँ, मुझे कितनी तकलीफ होती है. तुम मुझे चिपाड कहते हो...' अमिना कळवळून म्हणाली, 'मै ऐसी क्यों हो गयी? हर साल पांव भारी होने से.... और क्या भरोसा फिर बच्चा हो !' 'जब तक बच्चे नहीं होते, तब तक यह सिलसिला जारी रहेगा !' कादरनं स्पष्टपणे सुनावलं, तसा तिच्या पोटात भीतीने व भवितव्याच्या आशंकेनं गोळा उठला होता. 'ठेर, बहोत जबान चलाती है !' कादरची लहर फिरली होती. 'आज ही मैं तुझे छोडता हूँ. साली जा, मर... मैं अभी तीन बार 'तलाक' कहके तुझे छोडता हूँ, फिर जाके कर आप्रेशन !' | अमिना समूळ हादरून गेली. तिच्या जिवाचा तलाकच्या कल्पनेनं थरकाप उडाला. तिनं चक्क त्याच्या पायावर क्षणार्धात लोळण घेतली. ‘नहीं ! मुझे माफ करो. मैं फिर जुबान पे ऐसी बात कभी नहीं लाऊगी. सच्ची, तुम्हारी कसम. बस्स, माफ कर दो एक बार मुझे.... । आणि ती मग कामावर पंधरा दिवस गेलीच नाही. एक तर शिबिरात नाव नोंदलं असल्यामुळे कसं जायचं व सांगायचं की, आता मी ऑपरेशन करणार नाही... आणि दुसरं म्हणजे पुन्हा तिला गर्भ राहिला होता आणि आत्तापासूनच तिला मळमळीन हैराण केलं होतं. याच बाळंतपणाचा तिनं त्यापूर्वी सलगपणे दीडशे दिवस रोजगार हमीच काम केलं असल्यामुळे भत्ता आज मिळणार होता. तिचं मन या विचारानं कडवटून आलं होतं. स्वतःशीच ती कडू जहर गिळल्याप्रमाणे विमनस्क हसली ! तिचा नंबर लागला, तेव्हा पगार व बाळंतपणाचा भत्ता - त्यातले पन्नास रुपये काटून तिला मुकादमानं वाटप केला आणि विचारलं, 'अमिनाबाई, यावेळी तरी ऑपरेशनला आलं पाहिजे. साहेबांनी पंचवीस केसेसचं टार्गेट दिलं आहे. सर्वात जास्त मुलं तुम्हाला आहेत. तुम्ही नाही केलत पाणी! पाणी!! / १८० ________________

ऑपरेशन तर आणखी चार - पाच केसेस फिस्कटतील. यावेळी साहेबांनी गुत्तेदारांना तयार करून प्रत्येक केसमागे साडी - चोळी द्यायचं निश्चित केलंय. तुमचं नाव मी नोंदवतोय.' तिनं कसलीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. अंगठा करून पैसे घेतले, ‘लक्षात ठेवा, येत्या शुक्रवारी - जुम्मे को ऑपरेशन है....' तिनं केवळ मान हलवली व मैत्रिणींसह घरी परतली. उद्यापासून आठ दिवस ती कामाला जाणार नव्हती; कारण तिला ऑपरेशन करून घेणं परवडणारं नव्हतं. कारण कसाही झाला तरी तिचा हक्काचा संसार होता. तलाकशुदा जिंदगी तिला परवडणारी नव्हती. ते आयुष्य म्हणजे मुलींची उपासमार... कारण कादरनं फक्त मुलांना ठेवून घेऊन तिला व पाच मुलींना हाकलून दिलं असतं. तिचं मनच उतरलं होतं. कशातच रस वाटत नव्हता. त्याचा परिणाम तिच्या प्रकृत्तीवर झाला व तिला अधूनमधून बारीक बारीक ताप येऊ लागला होता. | तिला त्या कामावर जावंसं वाटत नव्हतं. कारण दोन्ही वेळा शिबिरात तिनं ऑपरेशन करून घेतलं नव्हतं. मुकादम व त्या इंजिनिअरला तोंड कसं दाखवायचं, हा प्रश्न तिच्यापुढे होता. काम सुटलं, तसे पुन्हा फाके पडू लागले. कादरच्या कमाईचा मोठा वाटा दावबाजीत व तालुक्याला ठेवलेल्या बाईत जात होता. त्यामुळे मुलांना धड दोन वेळा पोटभर जेवणही मिळत नव्हतं. मुलांच्या केविलवाणेपणाकडे अमिना दुर्लक्ष करीत होती. | कादरनं तिला कामावर का जात नाहीस याबद्दल दोन - तीनदा विचारलंही तिच उथ्तर ऐकून म्हणाला, 'वो पूछते हैं ऑपरेशन के बारे में तो पूछने दो. कोई जोर जबरदस्ती तो नहीं है इसके लिए... तू ना कह दे....! तिनं प्रत्युत्तर दिलं नाही; पण ती कामावरही गेली नाही. एके दिवशी दुपारी लंका तिला भेटायला आली. आज बाजार असल्यामुळे रोजगार हमीच्या कामाला सुट्टी होती. अमिर IT / १८१ ________________

“काय चाललंय अमिना? बाजारला येतेस?' ‘नहीं लंका, पैसा कहाँ है बाजार के लिए? तू जा. मैं नहीं आ सकती उदासवाणी अमिना उद्गाली. ‘काल सकिना माझ्याकडे आली व्हती...' लंका सांगत होती, 'तुझी पोरं भुकेनं तळमळत होती. म्या त्येंना चार-पाच भाकन्या दिल्या... पण रोजचं काय? तुझे । कादरमिया ध्येन देणार नायती हे का मला ठाव नाय? पण तुझं काय? तू अशी का वागतेस अमिना? अगं, मला सम्दं समजलंय, पण आपरेशनला जबरदस्ती हाय का? नाय केलं म्हणून का काम मिळणार नाय?' । ‘मुझे सब समजता है.... ‘अमिना म्हणाली, 'लेकिन दिल नही करता...' ‘बच्चे पैदा केलेत, त्येस्नी खायला घालाया नगं?' लंका म्हणाली, 'असं काळीज भारी करून कसं झागेल? बये, तुला काम केलंच पाहिजे. चल, नवं काम सुरू झालंय - रस्त्याचं. निस्तं मातीकाम हाय. हलकं काम हाय... तवा उद्यापासून जाऊ....। आणि अमिनाचा कंठ दाटून आला. स्वतःच्या आवना काबूत ठेवणं तिला शक्य नव्हतं. ती भरभरून बोलू लागली. | ‘क्या बताऊ लंका, मेरा क्या हाल है... बच्चा बंद नहीं करना, मजहब नहीं परवानगी देता, ऐसा ये कहते हैं. मुझे नहीं मालूम सच क्या है... लेकिन लगता है, जिसे मैं खिला-पिला नहीं सकती, उसे पैदा क्यों करू ? और घर बैठे तो अल्लाताला दानापानी देनेवाला नहीच है. हातपैर तो हिलानेही पडेंगे... लेकिन जो इसका जिम्मेदार है, वो नहीं कुछ करता.... मैं क्यों करू ? क्यों?' 'तू आय हायेस पोरांची - बाईल हायेस... सोसणं आपलं नशीब हाय । अमिना, त्येला तू आन् म्या तरी काय करणार?' लंका अनुभवाचे बोल सुनावीत तिची समजूत काढत होती. | ‘सच्ची बोलती है तू लंका, माँ का दिल बच्चे की भूख देख नहीं सकता, हम औरते प्यार से मजबूर हैं.... मजबूर !' भापले डोळे पुसत ती म्हणाली, 'ठीक है. मैं पाणी! पाणी!'! | १८२ ________________

कल से काम पर आऊंगी. इन पर बेकाम गुस्सा करके मैं बच्चों को ही भूखा रख रही थी. अच्छा हुआ, तूने बताया. तू मेरी अच्छी सहेली है....' दुस-या दिवशी कादरच्या हुकमाप्रमाणे कामावर जाताना घरातून बाहेर पडताना बुरखा ओढून रात्री व पहाटे दोनदा कादरनं चोळामोळा केलेला व थकला - भागलेला देह जिवाच्या करारानं ओढीत अमिना कामाला जात होती. अमिना / १८३ ________________

१३. जगण्याची हमी खाटेवर तिचा नवरा मुडद्यासारखा बिनघोर घोरत पडला होता. सारजेला आयुष्यात प्रथमच आपल्या नव-याची एवढी भयंकर चीड आली होती. काल सायंकाळी पैशावरून झालेली वादावादी व रात्री उशिरा दारू पिऊन आल्यावर त्यानं केलेली मारहाण... सारं अंग काळेनिळे पडलं होतं. आताही अंग चुरचरत होतं; पण उठणं भाग होतं. रोजगार हमीच्या कामावर पळवर जाणं भाग होतं. पूर्वी कसं आरामात अर्धा - एक घंटा उशिरा गेलं तरी मुकादम काही म्हणत नसे; पण मागच्या आठवड्यात कलेक्टरांनी सकाळी नऊ वाजता कामाची पाहणी केली होती, तेव्हा बरेच मजूर आलेले नव्हते. त्या सर्वांचा खाडा लावण्याचा याचा हुकूम होता. सुदैवानं त्या दिवशी सारजा वेळेवर पोचली होती कामावर. त्यामुळे चा हजेरी बुडाली नव्हती. पण त्या दिवसापासून कामावर आरामात जायचं सुख पलं. आता मुकादम वेळ पाहतो. पुन्हा कालच्या साप्ताहिक सुटीनंतर आजच या ध्यान सुरू होणा-या कामाच्या पंधरवड्याचा पहिला दिवस. कनिष्ठ अभियंता स्वतः ऊन कामाचं मोजमाप घेतात व नव्या कामाचं देतात. पुन्हा नवा मस्टर रोल सुरू होतो. त्यामुळे सारजेला वेळ करून भागणार नसतं. ती चुरचुरणाच्या अंगानिशी निग्रहाने मनाला बजावीत उठली. 'बये, तुला निस्त बसून नाय भागणार ! नवरा हा असा मुडदेफरास. कच्याबघ्यांची पोटं असं निस्तं बसून नाय जगण्याची हमी / १८५ ________________

.. आपून काम केलं तरच भरतील... त्यासाठी तरी तुला उठाया हवं, कामाला जाया हवं.' परवा पंधरवड्याचा पगार झाला होता. त्यामुळे कालच्या बाजारात ती मीठ-मिरची, तेल व इतर सामान आणायला नव-याला घेऊन गेली होती. रोजगार हमीचं काम केल्यावर दररोज अर्धा किलो ज्वारीचं कुपन मिळायचं. ती कुपनं मोडून रेशन दुकानातून ज्वारी घ्यायची होती; पण दुकान बंद होतं. तिनं कानशिलावर दुकानदाराचा उद्धार करीत कडाकडा बोटं मोडली होती. पुन्हा पुढल्या आठवड्यावर हे काम गेलं. नाही तर रोजगार बुडवून बाजाराच्या गावी धान्यासाठी जायला आलं. पुन्हा कुपनाची मुदत संपायची भीती होती. आज इंजिनिअर साहेबांना हे सांगायला हवं. म्हणजे ते तहसीलदारांना सांगून काहीतरी व्यवस्था करतील.' त्यांच्या गॅगमध्ये चांगल्या वीस-बावीस बाप्यांची गर्दी असूनही त्या गॅगची तीच लीडर होती. सारे तिला ‘पाटलीण' म्हणत. कारण धीटपणे ती सायांशी बोलायची. हे संबोधन तिला सुखवायचं. त्याला कारणही तसंच होतं. | गावचा जुना पोलिस पाटील दारूच्या पाई लोळागोळा होऊन मेला, तेव्हा प्रांत ऑफिसरनं तिच्या नव-याला पोलिस पाटील केलं होतं. त्यांना स्वप्नातही असं घडेल असं वाटलं नव्हतं. कारण ते कैकाडी - भूमिहीन, मजुरीवर पोट भरणारे. सारजा व किसन दोघेही मिळेल तिथं मोलमजुरी करत. जेव्हा गावात व पंचक्रोशीत रोजगार हमीचं काम निघायचं, त्यावर ते जात. इतर वेळी शेतामध्ये किंवा दोन मैलांवर असलेल्या तालुक्याच्या गावी जाऊन किसन बसस्टॅडवर हमाली करायचा, तर ती गावीच सरपंच किंवा सावकाराच्या घरी वरची कामं करायची. पण नवीन प्रांतानं ही पोलिस पाटलाची जागा राखीव म्हणून भटक्या जमातीसाठी घोषित केली होती. किसन आठवी नापास होऊन शाळा सोडलेला. सहज गंमत म्हणून अर्ज केला आणि मुलाखत दिली. मग तो हे सारं विसरून गेला. जवळपास एका महिन्यानं त्याला नेमणुकीचं पत्र आलं आणि दोघांच्याही आनंदाला पारावार उरला नाही. त्या सबंध जिल्ह्यात कैकाड्याचा तो एकमेव पोलिस पाटील ठरला होता. आता मात्र त्याला मजुरीची, हमालीची कामं करायला नको वाटू लागलं होतं आणि प्रपंचाचा सारा भार तिच्यावर पडला. दोघांच्या श्रमानं कशीतरी तोंडमिळवणी पाणी! पाणी!! / १८६ ________________

व्हायची, पण आता तिच्या एकटीच्या कमाईत कच्याबच्यांची पोटं भरता भरता जड जाऊ लागलं. किसनला मात्र पाटीलकीची मिजास चढली होती. आधीच्या पोलिस पाटलाचा दरारा व रुबाब तो पाहात होता. पण केवळ तो कैकाडी असल्यामुळे त्याला पोलिस पाटील करण्यात आलं होतं, हे गाव विसरायला तयार नव्हतं. परत आलेल्या पोलिस व महसूल खात्याच्या साहेबलोकांचा बंदोबस्त करणं त्याला पैशाअभावी जमत नसे. त्यामुळे गावचा तलाठी पण त्याला मान देत नसे. तरीही तो आपला नसलेला रुबाब सांभाळायचा प्रयत्न करायचा. त्यामुळे त्याला आता पोटासाठी काम करणं कमीपणाचं वाटू लागलं होतं आणि त्या प्रमाणात सारजेवरचा प्रपंचाचा भार वाढत चालला होता. त्याला पोलिस पाटील म्हणून मानधन मिळायचं ते तुटपुंजे व तेही तीन महिन्यांतून एकदा. त्याच्यापेक्षा रोजगार हमी कामावरील सारजेची साप्ताहिक मजुरी जादा असायची. तरीही आपला नवरा पोलिस पाटील आहे, याचं तिलाही अनुप होतं. म्हणून तीही त्याचं काम न करणं सहन करायची. | एकदा गावात चोरीची केस झाली होती. त्याच्या तपासाला फौजदार आले होते. त्यांना रात्री पहिल्या धारेची लागायची. तेव्हा त्यांनी किसनला बोलावून ती आणायचा हुकूम दिला. तो कचरला. खिशात तर दमडाही नव्हता. तेव्हा गावकोतवालानं त्याला बाजूला नेलं आणि सांगितलं, | ‘आवं, असं वं कसं पाटील तुमी? जरा गस्त घालत जा. मंग कळेल गावात कोन कोन हातभट्टी लावीत असतो ते. चला माझ्यासंगट, म्या दावतो.' | आणि कोतवालानं किसनला पोलिस पाटलाच्या परंपरागत अधिकाराची ख-या अर्थानं जाणीव करून दिली. त्या दिवशी फौजदार ढेर होऊन झोपल्यावर कोतवालाच्या हातानं त्यानंही पहिला प्याला घेतला. | कोतवालाचा गुरुमंत्र किसनचं जगच पालटून टाकणारा ठरला. पाटीलकीच्या रुबाबावर त्याचं फुकट खाणं-पिणं निर्वेधरीत्या सुरू झालं. जगण्याची हमी / १८७। ________________

सारजाला दारू व मांस -मच्छीचा तिटकारा होता. कारण तिचं माहेर गेल्या कित्येक पिढ्या गळ्यात वारक-याची माळ घालणारं व सचोटीनं जगणारं. तिच्यावर ती निरक्षर असली तरी हेच संस्कार झालेले. | एकदा किसननं आलेल्या साहेबाच्या बंदोबस्तासाठी बकरे कापलं होतं. त्यातलं उरलेलं घरी आणलं अन् तो म्हणाला, “पोरास्नी दे, तेवढंच वशट खातील.' 'हे इख हाय, इख ! मह्या घरात ते नगो...' तिनं स्पष्टपणे नकार देत ते टोपलं सरळ फेकून दिलं होतं. तेव्हाच आयुष्यात लग्नानंतर प्रथमच ते जिवाला जीव देऊन सुखानं जगणारं जोडपं कडकडून भांडलं होतं. | गावात कामासाठी - मुक्कामासाठी पोलिस खात्याची वा महसूल खात्याची माणसं येणं म्हणजे किसनसाठी पर्वणी असायची. मस्तपैकी झणझणीत खाणं व भरपूर पिणं बाहेरच्या बाहेर व्हायचं. पण रोज कोण येणार? पुन्हा तालुका मोठा होता. इतर वेळी त्याला नशा अस्वस्थ - बेचैन करायची. जीभ वशट - झणझणीत कोंबडी - बिर्याणीला लसलसायची. त्याला मिळणारं मानधन मग वरच्या वर उडून जायचं. | गावक-यांच्या मनात असो वा नसो, त्यांचं पोलिस पाटलाशी काम पडतंच. हळूहळू किसननं आपला जम बसवला होता. पण त्याच्या पाटीलकीचे चटके सारजेला बसू लागले होते. एकेकाळी तिला पाटलीण हे सुखविणारं संबोधन आता नकोसं वाटू लागलं होतं. त्याचा घरात पाय ठरत नव्हता व तिला कामातून घराकडे पाहायला फुर्सद नव्हती. आई-बाप असूनही तिची पोरं उघडी पडली होती; पण केवळ हळहळ करण्यापलीकडे तिला काही करता येत नव्हतं. परिस्थितीचा रेटा तिला मन कठोर करायला शिकवत होतं. तिनं लगबगीनं सारं आवरतं घेत आणलं होतं, तेव्हा किसन जागा झाला होता त्यानं बाजेवरूनच ऑर्डर सोडली ‘च्या...!' ‘आदी तोंड तरी खंगाळून या धनी !' ‘नाय, म्या असाच च्या पिणार हाय...,' तो म्हणाला, “ही बड्या सायेब लोकांची पद्धत हाय म्हनलं...' पाणी! पाणी!! / १८८ ________________

आपला संताप आवरीत तिनं त्याच्यापुढे चहाचा कप ठेवला. ‘धनी, काय टाइम हो जाला?' ‘आता बग, आठ वाजूनशान इस मिंट जाली....' त्यानं घड्याळ पाहात म्हटलं. हे आकड्याचं चाळीस रुपयाचं घड्याळ त्यानं पहिल्या मानधनातून घेतलं होतं. ‘म्या पोलिस पाटील हाय. मला मोट्या मोठ्या मान्सात उठावं - बसावं लागतं. टाइम कळाया नगं?' हे त्याचं घड्याळ घेण्यामागचं स्पष्टीकरण तेव्हा तिलाही पटत्नं होतं.' “अगं बया, मला आता निगाया हवं. कामावर नऊ वाजेपर्यंत पोचाया हवं.' तिची अधीरता शब्दांतून प्रगट झाली. | ‘मार गोली कामाला, सारजे...?' किसनचा रात्रीचा हँगओव्हर अद्यापही उतरला नसावा. अजूनही त्याची जीभ जडच होती. काहीसं अस्पष्ट व तुटक तो बोलत होता. ‘हे... हे, सोभत नाय तुला सारजे. अगं, तू पाटलाची बाईल हायस. सोड ते रोजगार हमीचं काम !' 'मग खावं काय ? बिब्बा? का तुमचं कपाळ धनी?' भडकून ती म्हणाली, ‘पोलिस पाटील काय जालात तुमी अन् कमाई बंद जाली. म्या एकटीं मरते, तवा कुटं पोरं चार घास खात्यात... तुमाला वो त्याचं काय? बापय मानूस तुमी. पन् मला कसं जमेल ? म्या बाईल, पोराचं म्या नाय पाहानार, तर ती जातील कुठं?' 'तू नगं कालजी करू. म्या बघतोना... म्या नाय कमी पडू देणार पोरास्नी?' ‘बघते ना म्या, तुमी पाटील जाल्यापासून....' तीही फुटकळपणे म्हणाली, ‘आदी आदी मह्यास्नीप छान वाटलं तुमी पोलिस पाटील झालात म्हनूनशान; पन् आता वाटतं, नाय जाला असता तर बरं व्हतं. ही झूटी शान नाय परवडणार आपल्यास्नी धनी. तुमी पण कामावर चला. आता मोठा बबन्या शाळेला जायच्या उमरीचा जालाय. त्येचा पाटी - पेनसिलीचा खर्च कसा झेपेल आपल्यास्नी? जरा इचार करा.... | ‘च्या मायला... सकालच्या पारी ही कसली भुनभून लावलियास सारजे?' तोही भडकून बोलला, “रातीचं इसरलीस वाटतं....!' | मघापासनं सकाळचे प्रातःविधी आटोपण्यात, भाकरतुकडा करण्यात आणि अंग धुण्यात सारजा रात्रीची मारहाण विसरली होती. जगण्याची हमी / १८९ ________________

“कशी इसरेन? लई मर्दपणा दावला ना... तुमा बाप्यांना एवढंच करता येतं मर्दपणाच्या नावाखाली....! तुमाला काय वाटलं, म्या तुमाला रोकू शकले नसते? पन् काय करणार? तुमच्या नावाचे कुकू लावलंय ना, ते रोकतं, बाई, ते रोकतं.... पन एक शाप सांगते धनी, पुना असं व्हता कामा नये... एकदा जालं ते जालं....' | तिचा तो कालीचा अवतार त्याला नवलाचा वाटला. चहा प्याल्यामुळे बुद्धी ताजीतवानी झाली होती आणि रात्री आपण अकारणच बायकोवर हात टाकला होता, हेही मनात येऊन गेलं त्याच्या. ‘म्या निगते आता. बाहेर कुटं उकिरडं फुकायला जानार नस्ताल तर पोरांकडे ध्यान द्या. भाकरतुकडा ठिवलाय तो खावा दुपारी.... आणि येळ असेल तर तालुक्याला जाऊनशानी तहसीलदारास्नी सांगा, रोजगार हमीची जवारीची कुपनं मोडण्यासाठी राशन दुकानदारास्नी सांगा म्हणावं. काल बाजार असूनशानी त्या मेल्यानं दुकान बंद ठिवल होतं.' हे काम त्याच्या आवडीचं होतं. साहेबलोकांना भेटण्यासाठी किसनला असं काही निमित्त लागायचं. ‘हां हां, म्या जाऊन भेटतो रावसाहेबास्नी. त्या दुकानदाराला झाडायला सांगतोच बग!' ती झपझप पावलं टाकीत कामाच्या दिशेनं जात होती. रोजगार हमीचं काम गावाच्या पूर्वेला दीड किलोमीटर अंतरावर होतं. वेळेवर जाण्यासाठी ती शिकस्त करीत होती. पण मघाचा उडालेला भडका अजून विझला नव्हता. तिचा स्वभावच होता संतापी. किसनलाही तिचा धाक वाटायचा. तिची जीभ फटकळ होती. म्हणूनच काल दारूच्या नशेत सदैव तिच्यापुढे पडत खाणान्या किसनचा पुरुषीपणा उफाळून आला होता व त्याचा हात सैल सुटला होता. | सारजा निरक्षर होती, पण विचार करायचा तिचा स्वभाव होता. काल नव-यानं आपल्याला मारलं, हे तिला कुणाला सांगणं शक्य नव्हतं. कारण ते आम होतं. पण ते तिला पटत नव्हतं. ती म्हणायची,' आपून सारीजणं काम करतो, बाप्या गड्याइतकं कमावतो... कितीतरी घरं पायलेत, जिथं बाप्या गडी काम नाही करत बाईच करते. तिला गडीमानूस मारहाण करतो. कशाच्या जोरावर? कमावून आणतो तो खरा मरद गडी - इथं तर त्या बाईस्नी मर्द म्हनायला हवं.' पाणी! पाणी!! / १९९० ________________

| तिचे हे अपरिचित विचार ऐकून तिच्याबरोबर कामाला येणारी मुलाण्याची अमिना खुसूखुसू हसत म्हणाली होती, | 'ये तो मैं वेगळंच सुनती हूँ. फिर तुझे भी तो मरदसिंग कहना चाहिए तेरा नवरा कहाँ काम करता है?' “वो क्यों करेगा ? तो पाटील हाय - पोलिस पाटील...!' सारजाला पड घेणं माहीत नव्हतं. तसंच आपल्या घरचं उघडे पाडणंही आवडत नसे. म्हणून तिनं नव-याची पडती बाजू सावरून घेतली होती. तरीही तिच्या मनातून तो शब्द ‘मरदसिंग' जात नव्हता. अमिना काही खोटं बोलली नव्हती. आपला नवरा पोलिस पाटील झाल्यापासून काम करीत नाही, उगीच पोकळ शान मारत हिंडत असतो. झालंच तर दारू प्यायला व मांस - मच्छी खायला शिकला आहे. प्रपंचातलं लक्ष कमी झाले आहे, आयतोबा झाला आहे...!' तिची मात्र कामाच्या धबडग्यातून सुटका होत नव्हती. रोजगार हमीचं पाझर तलावाचं आठ घंट्यांचं उन्हातान्हात काम करायचं. पुन्हा घरी भाकरी थापायच्या, पोराचं करायचं. बाजारही आपणच करायचा. गेल्या महिन्यापासून गावातली पिठाची गिरणी बिघडली होती. त्यामुळे भरीस भर म्हणून घरी जातं सकाळी उठल्या उठल्या फिरवावं लागत होतं. | वाटेत तिला अमिना भेटली. दोघी बोलत बोलत वेळेवर कामावर पोचल्या. सारजेला हायसं वाटलं. आज त्यांच्या अँगला इंजिनिअरनी नवीन साईट दिली होती. तिथली माती खोदून भरावावर टाकायची होती. हे काम मिळताच सारी गॅग खुश झाली. कारण हे अंगावरचं काम होतं. जेवढं जोमानं काम होईल, तेवढी जादा मजुरी मिळणार होती. सारेजण कामावर तुटून पडले होते. दुपारच्या वेळी जेवणाची सुट्टी मुकादमानं जाहीर केली, तेव्हा जवळच्या झाडाखाली ती व अमिना भाकरीचं फडकं सोडून गप्पा मारीत जेवू लागल्या. मग त्यांच्यात म्हातारी बायजाबाईपण सामील झाली. ही तिथं कामावर सहा-सात स्त्रियांची तान्ही बाळं पाळणाघरात सांभाळीत राहायची. तितक्यात मुकादमाचा आवाज आला म्हणून त्यांनी भाकरतुकडा खायचं थांबवून विचारलं, 'काय वो मुकादम ? जरा दमानं खाऊ द्या की.' जगण्याची हमी / १९१ ________________

“अगं बायांनो बिगी बीगी आटापा. लाल दिव्याची मोटारगाडी आलीय. कुणीतरी साहेबलोक काम तपासायला आलेले दिसतात. चला - चला...' | ‘आले तर येऊ द्यात !' सारजा पटकन म्हणाली, 'कुनीबी उटायचं नाय. ही आपली भाकरतुकडा खाण्याची वेळ हाय. थांबतील साबलोक. ‘और क्या देखते ये साबलोक ?' अमिना म्हणाली, 'गिनती करते, कितने मर्द हैं और कितनी औरते....' | ‘आनी पगारपानी येळेवर मिळतं का? राशन दुकानावर कुपनाचं धान्य मिळतं का?' सारजानं पुस्ती जोडली होती, पण कदी हे नाय इचारत की, आमचं भागतं का? यवढ्या उनातानात राबावं लागतं, आमचं सुकदुक काय हाय?' आणि गाडीतून उतरत एक पोरसवदा तरुण मुलगी आपले माळरानावरील वायानं उडणारे केस सावरीत व डोळ्यावरचा गॉगल काढीत त्यांच्याकडेच येत होती. | ‘बसा बसा... तुम्ही उटू नका. तुमचं जेवण होऊ द्या.' ती मराठीत पण कानडी ढंगानं बोलत होती, 'मी इथं तुमची विचारपूस करायला आले आहे.' तिच्यासोबत कामावरचे इंजिनिअर होते, ‘या शिकाऊ कलेक्टर आहेत. त्या काम कसं चालतं हे पाहायला व तुमच्याशी बोलायला आल्या आहेत.' 'ठीक हाय, साहेब.' सारजा म्हणाली, 'आमी काय तमाशातले सोंगाडे. कुनी कुनी येतं पाहाया आमास्नी. पण आमालाबी दोन हात आन् दोन पायच दिलत देवास्नी म्हणावं.' 'तसं नाही बाई. आज मी तहसीलदारांकडे बसले होते. तिथे इथल्या गावच पोलिस पाटील तक्रार घेऊन आले होते की, तुम्हाला कुपनावरचं धान्य मिळत नाही, मजुरी वेळेवर मिळत नाही. म्हणून विचारपूस करायला आले....' तिच्या आवाजातली कळकळ, मार्दव व तिचं स्त्रीत्व त्या सान्या कष्टकरी स्त्रियांना स्पर्शेन गेलं. सारजा फटकन म्हणाली, 'बया... बया, हे आक्रीतच म्हनायचं बया... आजच तकरार केली माह्या नव-यानं आन् तुमी आला इचारपूस करायला?' तुमचे पतीराज पोलिस पाटील आहेत?' ‘व्हय बाईजी, म्याच त्यांना म्हनलं होतं, जाऊनशानी सांगा तालुक्याला. काल आम्हा सा-या बायांचा बाजार फुकट गेला. त्या भडव्यानं दुकान बंद ठिवले होतं.' पाणी! पाणी!!/१९२ ________________

" तुम्ही पाटलीण असून काम करता?' त्या प्रश्नानं सारजा अवाक् झाली. क्षणभर काय उत्तर द्यावं हेच तिला सुचेना. मग ती हलकेच म्हणाली, | ‘बाईजी, काम तर आम्ही लगीन जाल्यापासून करतो - पोटासाठी. पन धनी पाटील जाले आन् काम करायची त्येंना सरम वाटू लागली. आता म्या एकटीच राबते...' । ती बंगलोरहून या जिल्ह्यात प्रशिक्षणासाठी आलेली आय. ए. एस. अधिकारी तरुणी अचंब्यात पडली होती. | कामावर नव्वद टक्के स्त्रिया होत्या. त्याबद्दल तिनं विचारलं, तशी पुन्हा सारजा म्हणाली, 'बाईजी, तुमी कुटंबी जा, हेच दिसंल रोजगार हमीच्या कामावर बायाच जास्त असतात.' ‘पण का? पुरुषांना बाहेर काम मिळतं का?' । ‘याची लई कारणं हायती...' जरा विचार करीत सारजा म्हणाली, 'तुमी म्हंता तसंबी हाय. तालुका जवळ हाय, तिथं गड्यास्नी जादा पैशावर कामं मिळतात. बरेच जण सालगडी म्हनूनशानी असतात... पन आणखी एक कारण हाय - ते आमा बायांसाठी भयंकर हाय बगा.' 'ते कोणतं बाई?' | ‘या रोजगार हमीमुळे गावातच काम मिळतं बायांना; मन् पुरुषाइतकी मजुरी पडते. कामबी हलकं असतं. नऊ ते पाच असं ठरलेलं असतं. म्हनूनशानी इथं बाया जास्ती येतात. त्यामुळे बगा, पुरुष गडी काम करीनात. आन् काम नसलं की दारू आली. गड्यांनी घरी बसून दारू प्यायची, बायकांना मारायचं आणि परपंचासाठी - लकीपोरांसाठी आमी बायांनी घरचं करून हे कामबी करायचं. परतेक मोट्या गांवामंदी दारूचे दुकान - हरेक वस्तीवर हातभट्टी लावलेली. म्या तर म्हंते बाईजी, दहामधले सात - आठ गडी दारू पितात आणि आमास्नी भाजतात बगा.' ती अधिकारी स्त्री अवाक् होऊन ऐकत होती. तिच्या प्रशिक्षणाच्या कालावधीत तिला काही ‘असाइनमेंटस' करायच्या होत्या. तिच्या मनाचा निश्चय झाला होता. 'रोजगार हमी कामाचा स्त्रीजीवनावरील परिणाम' हा एक विषय निश्चित झाला होता. त्यासाठी सारजा ही ‘टिपिकल केस स्टडी' होती! 'बाईजी, म्या आंगठेबहाद्दर....' सारजा पुढे सांगत होती, ‘मह्यास्नी नीट बयजेपार सांगता येनार नाय, पन म्या इचार करते, लई इचार करते... हे असं का? जगण्याची हमी / १९३ ________________

हे तसं का? असे सवाल म्या मलाच इचारते; पन् जवाब नाही सापडत. तुम्ही द्याल का याचा जबाब बाईजी?' | इतका वेळ त्या दोघींचं संभाषण ऐकणारे इंजिनिअर पुढे होत म्हणाले, 'पुरे "बायांनो, किती बोलायचं?' | ‘नाही, त्यांना बोलू द्या. मला कितीतरी नवीन कळतंय.' ती म्हणाली. तशी सारजा आपल्या मूळच्या फटकळ स्वभावाला अनुसरून म्हणाली, | ‘पन काय उपेग त्येचा बाईजी? तुम्हास्नी कळलं की, आमा बायामानसांची अवस्था इपरीत हाय. पन आमाला काय? आमची परिस्थिती सुदरनार हाय थोडीच? तुमी काय थोड्या येळानं गाडीत बसून जाल, पुना आमी, आमचं काम, आमच्या पुरुषमानसाचं तेच दारू ढोसणं आणि बायांना मारणं...' । ती नवीन अधिकारी वरमली होती. किती खरं म्हणाली होती सारजा! काय फरक पडणार आहे त्यांच्यात? आपण फार तर एक असाइनमेंट करू या प्रश्नावर. पुढे काय? ही सुद्धा यांची एक प्रकारे क्रूर थट्टा ठरणार आहे. 'बरं ते जाऊ द्या, बाईजी; पन या सायबास्नी मजुरी येळच्या येळी द्याया सांगा ना. हातावरचं पोट आमचं. तसंच रासनपानी ठीक नाय... ते सुदिक सुदराना...' ती तरुणी आपल्या डायरीत नोटस् घेत होती व आपल्या कर्मचा-यांना सूचना देत होती. काही वेळानं ती गाडीत बसून निघून गेली. आणि इंजिनिअर शिर्केनी गाडी दिसेनाशी होताच रुद्रावतार धारण करीत सारजेला प्रश्न केला, 'काय पाटलीणबाई? त्या कलेक्टरबाईपुढे जीभ फारच चुरचूर चालत होती. वाटलं, बाईमाणूस आहे, त्यांना तुमी सांगाल ते खरंच वाटेल...!' ‘म्या वो काय झूट बोल्ले? दोन हप्त्याची मजुरी परवा तुमी दिली. आनी कुपन पन उशिरानं वाटले. या दुस्काळात कंच्याबी घरी जा... दानापानी नाय हाय. कमावलं तरच पोट भरतं. म्हनूनशान मनाले...' सारजा किंचित नरम स्वरात म्हणाली. तिच्या अंतर्मनाला धोक्याचा इशारा मिळाला होता. हा इंजिनिअर भडकलेला दिसतोय. त्या बड्या सायेबिणीपुढे ह्याचा अपमान झाला. पुन्हा तिनं बोलणं म्हणजे अपमान वाटला असणार... त्यामुळे तिनं नमतं घेण्याच्या उद्देशानं हळू शब्दांत आपली बाजू मांडायचा प्रयत्न केला. ' ‘ते मला सांगता येत नव्हतं? तुम्हाला सवयच लागली कुणीही तपासणीला आलं की तक्रार करायची. इथं आम्हाला किती काम असतं हे तुम्हाला सांगून काय पाणी! पाणी!! / १९४ , ________________

उपयोग? बजेट मिळत नाही, तहसील ऑफिसमधून वेळेवर कुपन्स मिळत नाहीत.... पण नाही, तुम्हाला तक्रार करण्याखेरीज काय येतं? पुन्हा काम करायला नको तुम्हाला - मजुरी मात्र जास्त हवी.' | मुकादमानं वेळप्रसंग ओळखून मध्यस्थीचा प्रयत्न केला.' 'जाऊ द्या साहेब, मी सान्यांना समजावतो. पुन्हा असं होणार नाही, हे नक्की.' ‘ते काही नाही. ही सारजा पाटलीण फार दिमाख दाखवते. तिचं नाव मस्टरवरून कमी करा. आपल्याला मजूर एवढे नकोत. क्वालिटी मेंटेन होत नाही.' सारजा हादरली. आपलं नाव या मस्टरवरून पहिल्याच दिवशी कमी केलं तर पंधरा दिवस काम न करता राहावं लागेल. किमान शंभर - सव्वाशे रुपयांची मजुरी व आठ - दहा किलो धान्य बुडेल. काल जरा जादाच बाजारहाट केला. सारी शिल्लक संपली होती. काम न करता चालणार नव्हतं. । 'नाई सायेब, एक डाव माफी द्या. पुना आसं नाय कुनापुढे बोलणार... पण कामावरून कमी करू नगा.' | ‘पण माझा किती अपमान झाला ठाऊक आहे?' शिर्केचा पारा अद्याप उतरला नव्हता. 'कोण कुठली शिकाऊ - प्रोबेशनर आय. ए. एस. बाई... मला चक्क सुनावते... आणि हे.... हे तुमच्यामुळे बरं का पाटलीणबाई? मुकादम, त्याचं नाव कमी करा व त्यांना जायला सांगा.' सारजानं कितीतरी विनवणी केली. आपल्या संतापी व लढाऊ स्वभावाला मुरड घालून शिर्केना विनवणी केली. कारण प्रश्न पोटाचा होता, पोरा-बाळांच्या भुकेचा होता. त्यासाठी स्वाभिमान कामाचा नव्हता. पण शिर्के ढिम्म हलले नाहीत. त्यांच्या झालेल्या अपमानाची धग त्यांना सारजेकडे कणवेनं पाहण्यापासून परावृत्त करीत होती. | आपले जड झालेले पाय टाकीत, मणामणाचे जणू ओझे वागवीत सारजा घरी परतली. कसंतरी भाकरतुकडा खाल्ला आणि ढालजेतच ती विसावली. विचार करण्याची तिची वाईट खोड तिला परेशान करीत होती. तिचं अवसान गळालं होतं, ती निःस्त्राण झाली होती. एक काळी छाया तिचं मन व्यापून होती. त्या अवस्थेतच केव्हातरी तिचा डोळा लागला. ती जागी झाली ते किसनच्या आवाजानं. तिनं डोळे उघडून पाहिलं. तिन्ही सांज झाली होती. समोर रस्त्याच्या कडेला पोरं खेळत होती. किसनाच्या हातात बाटली होती. जगण्याची हमी / १९५ ________________

‘सारजे, तो पारधी शेरू माजा यार हाय. तेनं आज ही बाटली फोकट दिली बग !' त्याला पाहताच तिचा संताप उफाळून आला आणि ती आपला सारा राग त्याच्यावर ओकू लागली. “तुमी सोताला पोलिस मनवून घेता ना? मंग जा सायबाकडे आन् सांगा, - सादं गाराणं मांडलं म्या त्या बाईसायबाकडे तर त्या शिक्र्यानं मह्यास्नी कामावरून कमी केलं. ही तर मुगलाई जाली. हा... हा अन्याव हाय. तो कमी करा. तुमी गावचे पाटील ना....' ‘बरं जालं तुजं काम सुटलं ते. नाई तरी म्या त्येच्या इरुद्धच व्हतो. अगं पाटलाच्या बाईलनं काम करणं मह्यास्नी सोभा देत नाय...' त्याच्या या प्रतिक्रियेमुळे जणू आगीत तेल पडल्याप्रमाणे तिच्या अंगाचा तिळपापड उडाला. ‘मंग खायाचं काय? तुमी कमावून आणणार?' क्षणभर तिच्या स्वरात व्याकुळता दाटून आली, ‘धनी, माजं आयका जरा... ही पाटीलकीची मिजास नाय परवडणार आपुनला. सोडून द्या आन् कामावर चला - जाऊ आपून जोडीनं - श्रम करू नि सुकानं दोन घास खाऊ... म्या.. म्या म्या. तुमची संगत हवी!' 'जाली तुजी पिंगाणी पुन्हा सुरू?' किसनला तिच्या स्वरातली आर्तता जराही भिडली नव्हती. तो पोलिस पाटील बनल्यापासून बदलला होता हेच खरं. 'तुला काई सुदिक कवतिक नाय. पुन्या जिल्ह्यामध्ये म्या एकटाच कैकाड्याचा पोलिस पाटील हाय....! अगं, आब राखून वागावं लागतं. आसं मला कुठंशिक काम करून नाय चालणार...' ‘आवं पन घरच्या परपंचाला पैका लागतो, तो आनायचा कुठून?' ‘म्या पोलिस पाटील हाय. तसा चिक्कार पैका सुटतो रोब दावला की... ते सारं आता मला समजलंया...' ‘पण असा पैका वंगाळ हाय. म्या तेला इख मानते...!' | ‘इथंच तर आपलं पटत नाय. आगं, सारे पाटील तेच करतात. म्या केल तर वंगाळ ठरतं? किसन म्हणाला, “कशापायी एवढं राबतेस सारजे? तू निवांत रहा घरी. म्या सारं दुरुस्त करतो. तू बगच...!' ‘पन धनी, हे हे वंगाळ वाटतं?' वारकरी संस्कार तिला किसनचं म्हणणं पटविण्यास असमर्थ होते. पाणी! पाणी!! / १९६ ________________

'तर मर तू. तुला सांगून काई उपेग नाही हे म्या वळखायला हवं होतं आदीच!' किसन म्हणाला, 'तू आणि तुंज काम. मला काई सुदिक सांगू नगंस...!' त्यानं बाटली तोंडाला लावली आणि खाटेवर आडवा झाला. त्याच्या घोरण्याकडे कितीतरी वेळ ती पाहातच राहिली - सुन्नपणे काय करावं हे न सुचल्यामुळे हतबुद्ध होऊन! थोड्या वेळानं तिच्या घरी मुकादम आला. तो म्हणाला, 'पाटलीणबाई, मी शिर्केसाहेबांची समजूत घातली. ते कबूल झालेत. तुम्ही उद्यापासून कामावर या. फक्त आज दुपारचा खाडा पडेल एवढंच.' 'तू माजा धरमाचा भाऊ बनून आलास बाबा. बस, च्या टाकते, पिऊन जा. सारजेच्या मनावरचा मोठा भार उतरला होता. तिचा रोजगार बुडणार नव्हता. तिला नाइलाजानं नवग्याच्या विष वाटणा-या पैशावर पोटाची खळगी भरायची पाळी येणार नव्हती. दुस-या दिवशी ती कामावर, वेळेवर पोचली, सपाटून काम केलं आणि भाकरतुकडा खायला दुपारच्या सुट्टीत बसल्यावर अमिनाला म्हणाली. 'अमिना काल ती सायबीण आली व्हती. तिनं इचारलं व्हतं - रोजगार हमी कामामुळे बायामाणसावर काय परिणाम जाला. तवा म्या मनलं व्हतं, पुरुष मानस आळशी बनलेत नि दारू ढोसायला लागलेत... आमा बायावरचं कामाचं वझं त्येच्यामुळे लई वाढलंय... ते तर खरं हायच, पण आजून एक मह्या लक्षात आलंय - ही रोजगार हमी नाय हाय. आम्हा बायास्नी - गरिबास्नी सायेबलोग कवाबी कामावरून काढू शकतात. इथं कामाची हमी नाय हाय... त्येच्या दयेवरच काम मिळणार, त्येंची मर्जी असंल तोवरच काम मिळणार. ही... ही रोजगार हमी नाय अमिना रोजगार हमी नाय... म्हणून जगण्याची, पोटापाण्याची पण हमी नाय हाय!' जगण्याची हमी / १९७ ________________

१४. उदक ‘किती वेळा सांगितलं सिद्धार्थ - करुणा की, उन्हात खेळू नका म्हणून. जा त्या झाडाखाली बसून खेळा. घरात पाणी नाही प्यायला, सांगून ठेवते. उन्हात खेळून तहान - तहान कराल!' प्रज्ञानं पुन्हा एकदा आपल्या उन्हात खेळणा-या भाच्यांना हटकलं व सावलीकडे पिटाळलं. काटेरी बाभळीच्या झाडांची सावली ती, तरीही रणरणत्या दुपारी उन्हात खेळण्यापेक्षा तिथं झाडाखाली बसून खेळलेलं त्यातल्या त्यात बरं, असा तिचा हिशोब होता. मघाशी त्यांना घागरीतून पाण्याचा शेवटचा पेला प्यायला दिला होता; कालपासून तांड्यावर टॅकरचा पत्ता नव्हता. परवाही टॅकरच्या चारऐवजी फक्त दोनच खेपा झाल्या होत्या. त्यामुळे प्रत्येक घराला नेहमीपेक्षा अर्धच पाणी मिळालं होतं व ते मघाशी संपलं होतं. भाच्यांना पुन्हा तहान लागण्यापूर्वी पाणी यायला हवं आणि हे आपल्यालाच पाहायला हवं. दादा रोजगार हमीच्या कामावर भल्या पहाटे गेलेला आणि वहिनी केव्हाही बाळंत होऊ शकेल. कालपासून तिच्या वेणा सुरू आहेत. तिची पण कडक उन्हानं लाही होतेय. तिच्यासाठी वेगळं घोटभर पाणी राखून ठेवलंय. प्रज्ञा आपल्या झोपडीबाहेर आली. एका टेकडीवर वसलेला हा नवबौद्धांचा तांडा. पाच वर्षांपूर्वी इथं सवर्णांच्या बहिष्कारामुळे यावं लागलेलं. गावापासून दूर, उंच टेकडीवरील पठारावर. इथं चार - सहा जणांची नापीक व खडकाळ जमीन होती व पाणी! पाणी!! / १९९ ________________

टेकडीची सरकारदरबारी गायरान म्हणून नोंद होती. इथं कसलीही सोय नव्हती, तरीही त्यांना इथं येऊन राहावं लागलं होतं - वेगळा तांडा करावा लागला होता. या टेकडीच्या दक्षिण टोकाला उभं राहिलं की अवघी पंचक्रोशी दिसते. खाली वसलेलं गाव एका दृष्टिक्षेपात नजरेत सामावतं. मात्र रस्ता नसल्यामुळे वळणावळणानं जावं लागतं. हाही रस्ता झाला तो टॅकरच्या सतत येण्या - जाण्यामुळे पण खाचखळगे व दगडगोट्यांनी भरलेला हा रस्ता टैंकरला पण सोसत नसे. टॅकरचा लोचट ड्रायव्हर इब्राहिम एखदा हसत प्रज्ञाला म्हणाला होता, ‘मेरी जान, दूसरा कोई यहा टैंकर नहीं ला सकता. ये बंदा ही सिर्फ ये काम कर सकता है, उसकी वजह भी सिर्फ तुम हो प्यारी - सिर्फ तुम!' त्याची ही सलगी प्रज्ञाला रुचत नसे, पण सहन करावी लागायची. कारण तो त्यांच्या तांड्याला जवळपास बारा महिने हँकरने पाणी पुरवायचा. या भागात पाणी लागत नाही, असं भूगर्भशास्त्रज्ञांनी पाहणी करून सांगितलं होतं. पर्याय म्हणून एक पाणीपुरवठा योजना प्रस्तावित होती; पण अवघ्या सत्तर घरांसाठी एवढी मोठी योजना मंजूर होत नव्हती. तांड्याचे पुढारी किसन रणबावळे पंचायत समिती कार्यालयात खेटे मारून मारून थकले होते. | तांड्याचं सारं अस्तित्वच मुळी टॅकरच्या पाण्यावर अवलंबून होतं. तरी एक बरं होतं, गतवर्षी नव्यानं बदलून आलेल्या बी. डी. ओ. नं पाहणी केल्यानंतर टॅकर बारमाही केला होता. बी. डी. ओ. च्या त्या भेटीत प्रज्ञानं त्यांना सांगितलं होतं ‘साहेब, हा तांड्यावर येणारा रस्ता तरी रोजगार हमीतून करून द्या... म्हणजे टैंकर धडपणे वरपर्यंत येत जाईल. नाही तर आज अशी अवस्था आहे की, दोन-तीन दिवसाला एकदा टैंकर कसाबसा येतो. वर येता येता बिघडतो - मग पुन्हा आमची पंचाईत. साहेब, पोटाला भूक दिवसातून दोनदाच लागते; पण या उघड्या माळावर व अशा प्रखर उन्हात पाणी पुन्हा पुन्हा लागतं. भाकरी कमवावी लागते. ती पुरेशी नसते, मग पाणी तरी घोटभर मिळावं साहेब!' बी. डी. ओ. अवाक् होऊन तिच्याकडे क्षणभर पाहात राहिले. मग म्हणाले, "बरोबर आहे, बाई तुमचं. मी कायमस्वरूपी पाणीपुरवठा स्कीमचा पाठपुरावा जरूर करतो. मग रोजगार हमीतून रस्ताही प्रस्तावित करतो तहसीलदाराकडे.' ब-याच पाणी! पाणी!! / २०० ________________

प्रयत्नांनी रस्ता मंजूर झाला होता; पण काम सुरू होऊन अवघ्या आठ दिवसांतच बंद पडलं होतं. कारण रस्त्याच्या जागी कठीण खडक होता व खडी फोडत रस्ता करणं जिकिरीचं काम होतं. जवळच बंडिगचं मेहनतीला कमी असलेलं काम सुरू होतं. तिथं सारे मजूर वळले व हे काम मजूर नसल्यामुळे बंद पडलं. प्रज्ञानं तांड्यावरील आपल्या भावाबहिणींना कितीदा तरी विनवलं होतं, 'हा रस्ता आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. हा तांडा इथं कायमस्वरूपी वसावा असं वाटत असेल, तर आपणच हे जिकिरीचं काम केलं पाहिजे. मला माहीत आहे, हे काम अवघड आहे. मजुरीही बंडिंगपेक्षा कमी मिळते. तरीही केलं पाहिजे. निदान पाण्याचा टॅकर वेळेवर नीटपणे यावा यासाठी हा रस्ता हवा!' तिच्या तांड्यावरील नवबौद्ध बांधवांना ते पटत नव्हतं थोडच? पण सतत मोलमजुरी करणा-या व काळ्या हायब्रीडच्या भाकरीचं भोजन करणा-या हाडात व पाठीशी गेलेल्या पोटानिशी जगणा-या देहात मेहनतीचं काम करण्याची ताकद उरली नव्हती. पुन्हा आज रस्ता नसतानाही टॅकर येत होताच; म्हणून त्याची तीव्रता जाणवत नव्हती. तांड्याचे नेते किसन रणबावळेनी तिची पाठ थोपटीत म्हटलं होतं, ‘बाबानू, ही पोर म्हंतेय ते समदं खरं हाय. ह्यो रस्ता व्हायलाच हवा. गावातले मजूर नाय येणार या कामाला... त्यांचा बहिष्कार हाय.. नाही!' ‘पण दादा, लय जिकरीचं काम हाय. अन् बंडिंगच्या कामावर मजुरीबी जादा मिळते....' एक म्हणाला. | ‘आनी हे रस्त्याचं काम थोडंच पळून जातं? बंडिगचं काम झाल्यानंतर करूकी...' दुस-यानं म्हटलं. आणि सायांनी मग 'हो हो, ह्ये बेस हाय.' असं म्हणत दुजोरा दिला व तो विषय तिथंच संपला. प्रज्ञा मात्र हताशपणे त्यांच्याकडे पाहत राहिली. किसन रणबावळे मग तिची समजूत काढीत म्हणाले होते. ‘ए जाऊ दे पोरी, तू नगं इतका इचार करू... इथं आल्यापासून मात्तर तू निस्ती रिकामी हायंस... या तांड्यावर मॅट्रिक शिकलेली एकमेव पोर तू... भीम्याच्या सौंसारात खस्ता खातीस... मह्या मनात हाय इथं एक बालवाडी सुरू करावी. तू इथल्या लहान पोरास्नी शिकवू शकशील....!' पाणी! पाणी!!/२०१ ________________

प्रज्ञाचे डोळे आशेनं लकाकले. ती म्हणाली, ‘दादा, खरंच असं होईल? गावात असताना माझी बालवाडी नीट चालायची. इथं मात्र जिल्हा परिषदेची अँट हवी. कारण इथं फी कोण देणार?' 'व्हय पोरी, म्या सभापतीशी बोललूया परवाच. ते म्हणाले, जरूर परयल करू!' तिच्या आई-बापाचा विरोध असतानाही भीमदादाच्या प्रोत्साहनानं ती मॅट्रिकपर्यंत शिकली. एवढेच नव्हे, तर चांगल्या दुस-या श्रेणीत पास झाली होती. तिनं मग बालवाडीचा सर्टिफिकेट कोर्स करून गावातच समाजमंदिरात बालवाडी सुरू केली होती. ती चांगली चालत असतानाच बहिष्काराचं प्रकरण उद्भवलं. । त्यावर्षी गावात दुष्काळामुळे पाणीटंचाई होती. अजून टैंकर सुरू व्हायचा होता. गावात एक खाजगी विहीर होती जुन्या मालीपाटलाच्या मालकीची. तिला भरपूर पाणी होतं. त्यावर सारं गाव पाणी प्यायचं; पण नवबौद्ध व इतर दलितांना पाणी स्वतःहून घ्यायला पाटलाची मनाई होती. त्यांचे दोन नोकर प्रत्येक घराला एक घागर पाणी शेंदून द्यायचे. हे सुशिक्षित प्रज्ञाला खटकलं होतं, पण ती चूप होती. मात्र काही दलित लोकांना त्यांची चीड आली होती. एका सभेसाठी पँथरचे काही नेते औरंगाबाद - नांदेडहून आले होते. जेव्हा हा प्रकार त्यांना समजला, तेव्हा त्यांनी जाहीर सभेत मालीपाटलाचा निषेध केला व दुस-या दिवशी वृत्तपत्रात मोठी बातमी छापून आली. त्यामुळे चिडून जाऊन पाटलानं आपल्या विहिरीचं पाणीच साया दलितांसाठी बंद करून टाकलं! याचा जाब विचारायला किसनभाई मिलिंद कॉलेजमध्ये शिकणा-या आपल्या भाच्यासमवेत पाटलाकडे गेले असता त्यांना शिवीगाळ करून पाटलानं हाकलून लावलं, ‘जा, ही माझी विहीर आहे. मी माझ्या मर्जीनं पाणी देतोय. तुम्हाला काय करायचं ते करा.' तेव्हा किसनभाऊच्या भाच्यानं सरळ तालुक्यात जाऊन पोलिस स्टेशनमध्ये पी. सी. आर. ची केस केली आणि दुस-या दिवशी पाटलाला अटक झाली. सारा गाव दलितांविरुद्ध खवळून उठला. त्यांनी त्यांचं काम व मजुरी बंद केली. पिठाच्या गिरणीत दळण मिळेना, की गावाच्या दुकानात किराणा मिळेना. त्या बहिष्कारानं त्यांची चांगलीच कोंडी झाली. पाणी! पाणी!! / २०३ ________________

काही दिवस हा बहिष्कारही सहन केला; पण त्यामुळे जीवनगाडा चालेना. तशी त्यांनी पुन्हा आपल्या दलित नेत्यांना कल्पना दिली. त्याला पुन्हा वृत्तपत्रात मोठी प्रसिद्धी मिळाली. समाजकल्याणमंत्र्यांचा दट्टया आला व तहसीलदार गावात आले. त्यांनी शांतता समितीची बैठक घेऊन बहिष्कार उठविण्याचे आवाहन केलं. त्याला सवर्णांनी तोंडदेखला होकार भरला. पूर्वीइतका नाही, पण काही प्रमाणात का होईना बहिष्कार राहिलाच. शेतीत मजुरीचं काम आधी इतरांना द्यायचं; फारच गरज पडली तर दलितांना बोलवायचं. एकाही दलिताला उधारीवर माल द्यायचा नाही... अशा पद्धतीनं कोंडी चालूच होती. ही कोंडी फुटावी कशी? हा प्रश्न किसनभाऊंना व प्रज्ञाला पडायचा. त्यांची खलबतं, चर्चा व्हायची. कारण मुळातच गावात भीषण पाणीटंचाई होती व पाटलानं आपली खाजगी विहीर शासनानं पिण्याच्या पाण्यासाठी अधिग्रहित करू नये म्हणून कोर्टाचा स्टे आणला होता. तिथं आता कुणाला हक्कानं पाणी भरता येत नव्हतं. पाटलाच्या मर्जीनं आजही सवर्णांना पाणी मिळायचं, पण दलितांना व विशेषतः नवबौद्धांना तो स्टे दाखवायचा व साळसूदपणे नकार द्यायचा. त्यामुळे काही करणं अवघड झालं होतं. त्यातूनच ही स्थलांतराची कल्पना पुढे आली. त्यांना निर्णय घेणे कठीण नव्हते. कारण कुणाचीच घरे पक्क्या स्वरूपाची नव्हती. सान्यांचीच काडाची पालं होती. एका दिवसात त्यांनी आपला कुटुंबकबिला व खटलं या उजाड पठारावरील माळरानावर हलवलं. प्रज्ञाला आताही हे सारं क्षणार्धात आठवलं आणि अंगावर काटा आला. केवढी जीवघेणी लाचारी! केवळ मागास जमातीचा कपाळी शिक्का म्हणून? का त्यातही आपले बांधव शिकत आहेत व मुख्य म्हणजे संघर्ष करीत आहेत- त्याची ही शिक्षा?' तिनं एक दीर्घ निःश्वास टाकला व पंचक्रोशी न्याहाळू लागली. दुपारच्या झगझगत्या उन्हात दूरवरही कोठे टॅकर दिसत नव्हता. तिच्या पोटात भीतीचा गोळा सरकून गेला... कसे होणार रमावहिनीचं? आत झोपडीतून सतत विव्हळण्याचा स्वर येत होता. प्रज्ञाची वहिनी रमा अडली होती. कालपासून वेणा सुरू होत्या; पण अजून मोकळी झाली नव्हती. खरं तर प्रज्ञानं भीमदादाला अनेक वार म्हटलं होतं, जवळच जवळा बाजार आहे. तिथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रमाला डिलिव्हरीसाठी दाखल करावं म्हणून पण तिथं पाणी! पाणी!! / २०३ ________________

जाण्यासाठी सध्या एस. टी. नव्हती; कारण मधल्या पुलाचे काम चालू होतं म्हणून बंद पडलेली एस. टी. सुरू झाली नव्हती. त्यामुळे न्यायचं कसं हा प्रश्न होता. तांड्यावर कुणाकडेही बैलगाडी नव्हती व गावात मागूनही बैलगाडी मिळणं शक्य नव्हतं. हे माहीत असूनही प्रज्ञानं भीमदादाला गावात जाऊन पाहण्याचं सांगितलं. तसा तो अनिच्छेनंच गेला होता. अनेक शेतक-यांना भेटला होता. त्यांना एक दिवस बैलगाडी देण्यासाठी विनवलं होतं. पण छे! त्याला निराश होऊन परतावं लागलं होतं. गाव सोडलं तरी अढी व छुपा बहिष्कार कायम होताच. प्रज्ञाला काळजीत पडलेलं पाहून रमावहिनीनं स्वतःहून आपल्या कळा कशाबशा सहन करीत म्हटलं होतं, 'तुमी कायसुदिक इचार करू नका ननंदबाई... इतं आपल्या तांड्यावर सोजर मावशी हाय की सुईण. तिला तेवडं बोलवा म्हंजे झालं. म्या नीट बाळंत व्हते. काही गरज नाही दवाखान्यात जाण्याची!' प्रज्ञाला ते पटलं नव्हतं, पण काही इलाजही नव्हता. 'ठीक आहे. पण दादा, आज तू कामावर जाऊ नकोस.' "नाही प्रज्ञा, आज पगारवाटप आहे. एक महिन्यापासून जे. ई. साहेब नसल्यामुळे वाटप झालं नाही. मला गेलंच पाहिजे. कारण पैसा नाही तर घर कसं चालणार?' असे म्हणून तो कामाला निघून गेला होता. | सोजरमावशी रमा वहिनीजवळच बसून होती. तिच्या ओटीपोटाला मालिश करीत होती, वेणा काढीत होती व प्रज्ञाला धीर देत होती. पण अठरा - वीस घंटे झाले तरी सुटका होत नव्हती. त्यामुळे प्रज्ञाचा जीव करवदला होता. | त्यातच मघाशी सोजरमावशीनं सांगितलं होतं की दोन बादल्या पाणी पाहिजे म्हणून... कडक गर्मीचा रमाला त्रास होत होता. सारं अंग तापलं होतं. तिचं अंग थंड पाण्यानं सतत पुसणं भाग होतं. झालंच तर बाळंतपणानंतर स्वच्छतेसाठी व बाळाला आंघोळ घालून स्वच्छ करण्यासाठी पण पाणी हवं होतं. मोठ्या मुश्किलीनं साठवलेलं अर्थी बादली पाणी मघाशी संपून गेलं होत. प्रज्ञानं तांड्यावरील दोन - चार घरांतून तांब्या - तांब्या पाणी जमा करून कसंबस आणखी अर्धी बादली पाणी जमा केलं होतं. पण रमावहिनीचं अंग तापानं तप्त झालं होतं. तिच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्टया ठेवणं व अंग पुसून घेणं आवश्यक पाणी! पाणी!! / २०४ ________________

होतं. त्यातच हेही पाणी संपणार हे उघड होतं. ते संपल्यावर मात्र थेंबभर पाणी मिळणंही मुश्किल होतं. पुन्हा एकदा बाहेर येऊन प्रज्ञानं पंचक्रोशी न्याहाळली. “आता टैंकर आलाच पाहिजे, आलाच पाहिजे!' ती स्वतःशीच पुटपुटली. एका नव्या जीवासाठी बादलीभर पाणी हवं होतं. आणि ते मिळणं किती कठीण झालं होतं! यात जसा निसर्गाचा हातभार होता, तसाच जातीच्या शापाचा, लाल फितीचा व बेपर्वाई अनास्थेचाही वाटा होता. कितीही शिकस्त केली तरी विचार करू शकणारं प्रज्ञाचं मन एकाच वेळी क्षुब्ध व अगतिक व्हायचं. जातीमुळे गावकुसाबाहेरचं निकृष्ट जिणं. संघर्ष केला, आवाज उठवला म्हणून बहिष्कृत होणं, याच्या जोडीला पोटाची विवंचना. आणि या सर्वात भीषण बाब म्हणजे पाण्याची समस्या - जिनं आज जीवन मरणाचं स्वरूप धारण केलं होतं. रमावहिनीसाठी ती व्याकूळ होती. तिच्यावर प्रज्ञाचा फार जीव होता. कारण रमावहिनीनं तिला भीमदादाच्या संसारात आल्यापासून मुलीप्रमाणे वागवलं होतं व नवयाच्या बरोबरीनं तिनंही प्रज्ञाला शिकण्यासाठी उत्तेजन दिलं होतं. एवढं शिकून - सवरून प्रज्ञानं रिकामं घरी बसावं व तिला काही काम मिळू नये, याची रमावहिनीला सर्वात जास्त खंत होती. आज तिची लाडकी रमावहिनी जीवन - मरणाच्या सीमारेषेवर तळमळत होती. तिचा ताप वाढत होता. हात लावला तरी चटका बसावा एवढे अंग तापलं होतं. सोजरमावशीजवळ ताप कमी करण्यासाठी गवती चहाखेरीज कसलाच उपाय नव्हता व तो चहा या तांड्यावर उपलब्ध नव्हता. सकाळी प्रज्ञा तंगडेमोड करून जवळाबाजार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गावात असलेल्या सबसेंटरला गेली होती; पण तिथं भलंमोठं कुलूप पाहून तशीच परत आली होती. नर्स भेटली असती तर निदान चार गोळ्या तापासाठी मिळाल्या असत्या व तिला घेऊन येता आलं असतं रमावहिनीची तब्येत दाखवायला; पण सबसेंटर कधीतरी उघडं असतं. कारण नर्स तालुक्याला राहते. | सोजरमावशी निष्णात सुईण खरी; पण तीही गंभीर झाली होती. 'प्रज्ञा, पोरी, लई अवघड केस हाय तुझ्या वहिनीची. म्या शिकस्त करतेय पन् तिचा ताप पाणी! पाणी!! / २०५ ________________

कमी व्हत नाही. त्यासाठी औवशुद हवं. ते नाही तर पानी तरी हवं. अंग, पुना पुना पुसलं तर ताप कमी व्हईल. जा पोरी, पानी बघ पानी.' त्यामुळे आज - आता पाण्याचा टॅकर यायला हवा होता. प्रज्ञा कितीतरी वेळ तशीच उभी होती. ...आणि तिच्या नजरेला दुरून येणारा पिवळा ट्रक उन्हामुळे झगमगताना दिसला. होय, हाच पाण्याचा टॅकर आहे! ट्रकवर पाण्याची टाकी फिट करून त्याचा टैंकर म्हणून उपयोग खातं करीत होतं. आता दहा मिनिटात टैंकर तांड्यावर येईल आणि मग आपण रांजणभर पाणी भरून घेऊ... वहिनीचं सारं अंग थंड पाण्यानं पुसून काढू म्हणजे तिचा ताप झटकन उतरेल आणि ती सुखरूप बाळंत होईल व नव्हा बाळाला आंघोळ घालून स्वच्छ करता येईल. प्रज्ञा एकटक खालून वर तांड्यावर येणा-या ट्रककडे पाहत होती. एक एक क्षण तिला प्रदीर्घ वाटत होता. आणि तो ट्रक वर येईचना. प्रज्ञानं डोळे चोळून पुन्हा पाहिलं. तो वाटेतच रस्त्यावर थांबला होता. 'तो ट्रक बिघडला की काय?' हा प्रश्न तिच्या मनात चमकला आणि तिच्या पोटात पुन्हा एकदा भीतीचा गोळा आला. आणि ती बेभान होऊन, पायात चपला नाहीत हे विसरून तशीच वेगानं धावत खाली जाऊ लागली. आणि दोन मिनिटात धापा टाकीत, ठेचा खात, अडखळत जेव्हा ती ट्रकजवळ आली, तेव्हा तिथं ट्रकला टेकून इब्राहिम शांतपणे विडी फुकीत धूर काढीत उभा होता. 'मेरी जान, परेशान लगती हो! क्यात बात है?' लोचटपणे इब्राहिम तिचा उभार बांधा आसक्त नजरेनं न्याहाळीत म्हणाला. जेव्हा जेव्हा इब्राहिम विखारी नजरेनं प्रज्ञाला पाहायचा, तेव्हा तिला वाटायचं, तो नजरेनंच आपल्याला विवस्त्र करून उपभोग घेतोय. तिच्या मणक्यात एक थंड असह्य स्त्रीत्वाची भीती चमकून जायची, पण तिला फारसा विरोधही करता येत नसे. कारण त्यानं एनेकदा गर्भित धमकी दिली होती, पाणी! पाणी!! / २०६ ________________

‘प्यारी, इस तांडे पे ट्रक-टैंकर लाना बडी जोखीम भरी बात है. दूसरा कोई ड्राइवर यहा नही आता. सिर्फ मै. आता हू तो तुम्हारे लिए. तुम पे दिल जो आ गया | जेव्हा संधी मिळेल तेव्हा तिच्याशी तो लगट करायचा. प्रज्ञाला त्याच्या विषयांध स्पर्शाची घृणा - किळस वाटायची तरीसुद्धा त्याला झिडकारता पण येत नसे. त्याची माफक लगट तिला कौशल्याने - तारेवरची कसरत करीत अंतर राखीत सहन करावी लागायची. पळत आल्यामुळे प्रज्ञाला धाप लागली होती व तिची उभार छाती वर-खाली होत होती. त्याकडे एकटक इब्राहिम पाहत होता. हे तेव्हा तिच्या ध्यानी आलं, तेव्हा ती शहारली व छातीवर हात घेत तिनं विचारलं, “काय झालं ड्रायव्हर साहेब? टैंकर बंद पडला का?' 'वैसाच बोलना पडेगा... रेडिएटर में फॉल्ट है... पानी ठहरताच नहीं. इंजन इस वजह से गरम हो गया है. फटने का डर है.' इब्राहिम जे सांगत होता, त्याला तिला अर्थबोध होत नव्हता; पण एवढे कळत होतं, की टैंकर बंद पडला होता. ‘पाण्याची लई जरुरी आहे, ड्रायव्हरसाहेब. माझी वहिनी बाळंत होतेय, तिला ताप चढलाय. प्लीज, काहीतरी करा व ट्रक वर आणा ना. माझ्यासाठी. कळवळून प्रज्ञा म्हणाली. “तेरे लिए जान भी हाजिर है.' इब्राहिम नाटकी ढंगात म्हणाला, “लेकिन थोडा ठहरना पडेगा. इंजन ठंडा होने दो... अभी मैंने रेडिएटर में पानी भरा है... कुछ समय रुकना पडेगा...' तिनं सुटकेचा एक निःश्वास टाकला. 'म्हणजे ट्रक फारसा बिघडलेला नाही. वर येऊ शकेल...!' ‘तब तक क्या ऐसे ही धूप में खड़ी रहोगी? नहीं प्यारी, तुम मुरझा जाओगी.' इब्राहिमचं हे लागट बोलणं तिला सहन होण्याच्या पलीकडे होतं, पण चूप बसणं ही या क्षणी तिची मजबुरी होती, असहायता होती. ‘मला... मला सवय आहे, ड्रायव्हरसाहेब त्याची.' ‘लेकिन मुझसे देखा नहीं जाता. चलो, ट्रक में बेठते है.' त्याच्या सूचक बोलण्यानं प्रज्ञाचं स्त्रीत्व नखशिखांत थरकापलं. त्याला नाही म्हणणं म्हणजे आपल्या पाणी! पाणी! / २०७ ________________

हातानं पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं होतं. न जाणो, तो ट्रक घेऊन वर येत नाही म्हणाला तर.. तिच्या नजरेसमोर तळमळणारी व प्रसूति वेदना सहन करणारी रमावहिनी आली, तिचं तप्त पोळणारं शरीर आठवलं आणि सोजरमावशीचे शब्द - ‘पोरी, दोन बादल्या पानी हवं. काय बी कर, लय गरज हाय तेची... ह्या रमेचा ताप वाढतुया. तो कमी करण्यासाठी पानी हवं... नाय तर मला इपरीत व्हण्याची भीती वाटते...' ड्रायव्हरनं तिला हात देऊन ट्रकच्या केबिनमध्ये खेचलं. त्यावेळी कौशल्यानं त्याने तिला एक झटका दिला व हात सोडला, तशी बेसावध प्रज्ञा त्याच्या अंगावर कोसळली. त्यानं संधी सोडली नाही व तिला गच्च मिठी मारली. | इब्राहिमच्या कित्येक दिवस आंघोळ नसलेल्या, घामेजलेल्या, वास मारणा-या शरीराचा दर्प प्रज्ञाच्या अंगांगावर किळस पेरून गेला. ती आक्रसली गेली व म्हणाली, ‘ड्रायव्हरसाहेब, हे... हे बरं नाही. प्लीज, मी फार परेशान आहे... माझी वहिनी तिकडं तडफडतेय, प्लीज. लवकर गाडी सुरू करून पहा.' 'ठीक है मेरी जान. मैं कोशिश करता हूँ. त्यानं तिच्यापासून अलग होत म्हटलं आणि स्टिअरिंग हाती घेऊन चावी फिरवायला आरंभ केला. ट्रक नुसताच दोन-दीनदा गुरगुरला व थांबला. 'नहीं प्यारी, अभी इंजन गरम है. ठहरना पडेगा....। | ते कितपत खरं होतं कोण जाणे; पण प्रज्ञानं कसलीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. एक एक क्षण तिच्यासाठी जीवघेणा होता. वहिनीच्या काळजीनं जीव कसनुसा होत होता, तर ट्रकमध्ये इब्राहिमची शारीरिक लगट तिच्या स्त्रीत्वाचे लचके तोडीत होती. तरीही तिला ते निमूटपणे सहन करावं लागत होतं. पुन्हा इब्राहिम तिच्याजवळ सरकला. त्याचा राकट हात तिच्या देहाचे वळसे व वळणं शोधू लागला, चाचपू लागला. तसा तिनं प्रतिकार केला, ‘नको, नको, हे बरं नाही ड्रायव्हरसाहेब..." ये प्यार - मोहब्बत है मेरी जान... हम दोनो जवान हैं और ऐसा तनहा मौका बार बार नहीं आता!' त्याच्या स्वरातून वासनेची प्रच्छन्न लाळ गळत होती. 'पण तिकडं माझी वहिनी मरणाच्या दारात आहे. प्लीज, माझं मन नाही ड्रायव्हरसाहेब...'

  • पाणी! पाणी!!/२०८ ________________

इब्राहिम काही क्षण तिला आरपार न्याहाळीत राहिला व मग गुरकावीत म्हणाला, 'ठीक है, ये ट्रक फिर वापस जायेगा. ऊपर नहीं आयेगा. इसमें इतने फॉल्ट है कि, मैं ही सिर्फ उसे चला सकता हूँ। ये जोखीम मैं सिर्फ तुम्हारी मोहब्बत की खातिर उठाता हूँ, समझी! तुम नहीं चाहती हो तो...। | ‘नाही, नाही... माझ्या बोलण्याचा तो मतलब नाही ड्रायव्हरसाहेब...' प्रज्ञा । म्हणाली, 'मी - मी, मला - मला....' ठीक है, कुछ बोलने की जरूरत नहीं है प्यारी....। इब्राहिमनं तिची असहायता पुरेपूर ओळखली होती. एक कुंवार स्त्री त्याला विनासायास मिळत होतं - केवळ पाण्यासाठी. 'वाह रे मालिक, अजीब दस्तूर है तेरा!' • पण या रस्त्यावर व यावेळी त्याची अभिलाषा पूर्णपणे पुरी होणं शक्य नव्हतं, तरीही तिच्या शरीराशी त्याला मनसोक्त खेळता आलं. दहा मिनिटे का होईना तिला मिठीत घेऊन तिचा कुंवारा गंध त्याला लुटता आला. या दहा मिनिटात एक स्त्री म्हणून ती पुरुषाच्या पशुरूपाच्या दर्शनाने अनेकवार जळून खाक झाली होती. तिच्या मनात एवढा संताप, एवढी अगतिकता दाटून आली होती, की तिला शक्य असतं तर तिनं इब्राहिमचा कोथळा फाडला असता, त्या ट्रकला आग लावली असती आणि मनसोक्त रडली असती. आता इब्राहिमनं तृप्त मनानं चावी फिरवताच ट्रक चालू झाला व दोन - तीन मिनिटात तो तांड्यावर आला. सारे जण ‘पाणी आलं - पाणी आलं' म्हणून धावू लागले; पण इब्राहिमनं प्रथम तिला पाणी भरून घ्यायला सांगितलं. तिनं क्षणापूर्वीचं सारं विसरून उत्साहानं दोन्ही रांजण पाण्यानं भरून घेतले. तो पाईपमधून पडणारा पांढराशुभ्र फेसयुक्त जलौघ पाहून तिचे डोळे व काही प्रमाणात मनही निवून निघालं. | पाणी भरून होताच ती आपल्या झोपडीकडे धावली आणि दारातच सोजरमावशी गुडघ्यात तोंड खुपसून बसलेली पाहिली... आणि प्रज्ञा थरकापली.... मनात एकाच वेळी अनेक पापशंका चमकून गेल्या. 'मावशे, मावशे, काय झालं?' ‘पोरी...' मान वर करीत थरथरत्या आवाजात सोजरमावशी म्हणाली, 'लई येळ झाला. रमाचा ताप तू गेल्यावर वाढतच गेला,... आनी तिला वाताचे झटके आले... आनी पोराला जनम देताच तिनं डोळे मिटले....' । पाणी! पाणी!! / २०९ ________________

‘नाही, नाही... माझी रमावहिनी मला सोडून जाणार नाही...' बेभानपणे प्रज्ञा म्हणाली. ‘पोरी, सुदीवर ये... सम्दं संपलंय गं... म्या लई कोशिश केली... पानी जर असतं तर रमाचा ताप कमी करता आला असता...' सोजरमावशी म्हणाली. “बरं, बाळ कसा आहे त्याला पाहायचंय!' ‘चल पोरी, त्योबी निपचित पडलाय. जन्मल्यापासून तेचं आंगबी तापलंय बघ.' सोजर म्हणाली. 'एक बादली पानी घे. बाळास्नी आंगूळ घालू... म्हंजे तेची तलखी कमी व्हईल बघ...!' ती धावतच गेली. रांजणात बादली बुडवून ती घेऊन आली. ते नुकतंच जन्माला आलेलं मूल निपचित पडलं होतं. छातीचा भाता वेगानं वर-खाली होत होता. त्याला ते सहन होत नसावं. मधूनच वेदनायुक्त हुंकार तो देत होता. तिनं आपला पदर पाण्यात बुडवला आणि बाळाचे अंग पुसू लागली. तो थंड पदर अंगावरून फिरताना बाळ झटके देत होता... तिचं लक्षच नव्हतं. ती बेभानपणे थंड पाण्यानं त्याचं अंग पुसत होती. आणि सोजरमावशीनं गळा काढला, 'थांब पोरी, काईसुदिक उपयोग नाही जाला याचा... पहा पहा, याचे हात-पाय थंड पडत आहेत... “अगं मावशे, मग हे ठीकच आहे की, त्याचा ताप उतरतोय...' 'नाही पोरी, हे इपरीत वाटतंया...' मावशी म्हणाली, तसं किंचित भानावर येत प्रज्ञानं बाळाकडे पाहिलं. त्याच्या छातीचा वर - खाली होणारा भाता बंद पडला होता... त्याचा हात तिनं हाती घेऊन पाहिला आणि तिच्या हातातून तो निर्जीव बनलेला हात गळून पडला. तिचा चेहरा आक्रसून दगडी बनला होता.... ‘पोरी, नको तेच झालं बग. रमाबी गेली आनी बाळबी गेलं गं... सोजरमावशीचे हुंदकेही घुसमटले होते. प्रज्ञा मात्र तशीच निश्चल बसून होती. किती वेळ कुणास ठाऊक! पाणी! पाणी!! / २१० ________________

भानावर येताच ती लगबगीनं उठली. प्राणपाखरू उडून गेलेल्या आपल्या प्रिय रमावहिनीच्या व नवजात अर्भकाच्या कलेवराकडे तिनं एकवार डोळाभरून पाहिलं व ती बाहेर आली. ट्रक निघून गेला होता. सायांचं पाणी भरून झालं होतं. ती आपल्या झोपडीजवळील पाण्याने भरलेल्या रांजणाजवळ आली आणि बादलीनं पाणी घेऊन ती आपल्या शरीरावर उपडी करू लागली व सचैल न्हाऊ लागली. एक रांजण पाणी संपून गेलं, तरी बेभानपणे ती न्हातच होती. | सोजरमावशीनं तिला कळवळून विचारलं, 'पोरी, हे काय करतेस गं? भानावर ये...' | ‘मी, मी... माझ्या देहाचं उदक दिलं पाण्यासाठी... माझी वहिनी बरी व्हावी व बाळाला जीवन लाभावं म्हणून. पण दोघंही मला सोडून गेले. आता हे उदक, हे पाणी डोईवर घेऊन सचैल न्हातेय त्यांच्यासाठी; आणि... आणि या देहाचा ओंगळपणा जाण्यासाठी...!' आणि बोलता बोलता तिचा स्वर कापरा झाला, मन व डोळे दोन्ही पाझरू लागले आणि तशीच ती सोजरमावशीच्या दुबळ्या मिठीत कोसळली... ‘मावशे... मावशे...!" पाणी! पाणी!! / २११ ________________

लक्ष्मीकांत देशमुख यांच्या या कथासंग्रहात शेती, शेतकरी, पाणी टंचाई, गावगाडा आणि शासकीय यंत्रणेसंबंधी परवडीच्या कथा आहेत. आज उजाड होत चाललेली खेडी आणि तिथल्या माणसांचे जिकरीचे जगणं लेखकाने विविध कथांतून समर्थपणे मांडले आहे. आज पाणी प्रश्नाने सर्वांची झोप उडविली आहे. अशा वेळी श्रीमंत धनलांडग्यांनी गरीबांचे पाणी तोडणे, फळबाग योजनांचा मलिदा फक्त काहींच्या पदरी पडणे, रोजगार हमी योजनेत घाम गाळणाच्या स्त्री जातीची होणारी घुसमट, भूकबळी झालेल्या ठकूबाईना कागदपत्रांच्या आधाराने आजारी ठरविणे, सर्व मार्गानी पैसा कमावण्याची सर्वच क्षेत्रातील माणसांना चढलेली नशा, दोन घोट पाण्यासाठी म्हातारीला जीव गमवावा लागणे, पाण्यापेक्षाही गावाच्या आरोग्याची परवड होणे आणि सर्वच क्षेत्रातील ध्येयवाद्याची आज होणारी गोची, हे एक समान कथासूत्र लेखक विविध कथांतून सांगत आहेत. एका अर्थाने ही आजच्या ग्रामीण भागाच्या वर्तमानाची कथा आहे. सर्वत्र बिघडत चाललेल्या परिस्थितीमध्येही काही ध्येयांची हिरवळीची बेटंही आहेत आणि तेच समाज जीवनाला जिवंत ठेवण्याचे काम करत असतात. हे जीवनमूल्य लक्ष्मीकांत देशमुखांच्या कथासंग्रहाचे वेगळेपण आहे. - ना. धों. महानोर ISBN 978-93-5EED-LE B -१ १॥789352211685॥ | INR 200/ www.saketpublication.com