Jump to content

पान:व्यवहारपद्धति.pdf/253

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४४। व्यवहारपद्धति. [ प्रकरण तसे करार लिहून देण्यास राजी झाला, तरी अटीचे व्याज किंवा भलतेच करार लिहून घेऊन कुळाची नागवण करणे, हें सावकारास योग्य नाहीं. व्यवहारांत सावपणे वागेल तो सावकार, बाकीचे सारे दगलबाज होत. । आतां सरकारदरबारांत आपली इभ्रत व वागणूक कशी असावी, याविषयी संक्षेपाने दोन शब्द सांगतो.. राजाने लोकरंजनतत्पर असावे, व प्रजाजनांनीं राजनिष्ठ असावे, ही दोन्ही तत्वे आपणा हिंदु लोकांस नव्याने शिकविली पाहिजेत असे नाही. कारण, आपण वैदिकधर्मानुयायी लोक, विशिष्ट मानव देहांत जे लोकपालांचे तेज विराजत असते, त्या तेजास राजा समजतो. त्या तेजाचे अधिष्ठान जें मानवकलेवर, त्यास राजा - णण्याची वहिवाट केवळ लाक्षणिक अर्थाने आहे, तत्वार्थाने नाहीं, व अशा उदात्त समजुतीमुळेच राजास * हे देव " अशा संबोधनपदाने प्रख्यापन करण्याची आपली पुरातन रीत आहे. यास्तव लोकानुग्रहकारक जें लोकपालांचे तेज, ते कोणत्याही जातीच्या व धर्माच्या मानवदेहांत पविष्ट होऊन आपले कल्याण व रक्षण करीत असेल, तर त्याविषयी आपण एकनिष्ठ असावे, हे १ अष्टाभिश्च सुरेंद्राणां मानाभिर्निर्मितो नृपः ।। - ( असे स्मृतिवचन आहे.)