विकिस्रोत:सद्य घटना
Jump to navigation
Jump to search
मुद्रितशोधन अभियान, १-१५ नोव्हेंबर २०२० (Proofreadathon November 2020)[संपादन]
आपणा सर्वांना पुस्तक वाचनाचा आनंद घेता घेता प्रूफ रीडिंग व काही संपादने करून विकिस्रोतवर या अभियानात १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत सामील होण्यासाठी आवाहन करत आहे. मे २०२० मध्ये झालेल्या अभियानात मराठी समूहाने देशात सर्वोत्तम कामगिरी केली होती. तरी अवश्य नावे नोंदवा आणि पुस्तके निवडा.
- अभियान पान - विकिस्रोत:मुद्रितशोधन अभियान (नोव्हेंबर २०२०) येथे सहभागी सदस्य म्हणून नाव नोंदवा. आपल्या आवडीचे पुस्तक निवडून दुवा द्या, समोर आपले नाव नोंदवा.
- इथे सर्व पुस्तके आहेत - अनुक्रमणिका यादी
विकिस्रोत:मुद्रितशोधन अभियान (मे २०२०)[संपादन]
मराठी विकिस्रोत समूह आणि सीआईएस संस्थेच्या संयुक्त विद्यमाने १ मे ते १० मे या कालावधीत हे मुद्रितशोधन अभियान (Proofreadthon) आयोजित करण्यात आले आहे. सर्वांना पुस्तक वाचनाचा आनंद घेता घेता प्रूफ रीडिंग व काही संपादने करून विकिस्रोतवर पूर्णपणे प्रमाणित स्वरुपात पुस्तके उपलब्ध करून देणे याद्वारे शक्य होणार आहे. या अभियानात सामील होण्यासाठी आवाहन.
हे प्रकल्प पान येथील समन्वयासाठी तयार करण्यात आले आहे - विकिस्रोत:मुद्रितशोधन अभियान (मे २०२०)
स्थापना कालक्रम[संपादन]
- ५ ऑक्टोबर २०१० - शिजू अलेक्स यांनी मराठी विकिस्रोत चालू व्हावा म्हणून मेटावर प्रस्ताव मांडला.मराठी विकिपीडिया सदस्यांनी समर्थन नोंदवले
- २०११ मराठी ट्रॅक मधे विकिस्रोत प्रकल्पाच्या आवश्यकतेवर विचारविमर्श
- २४ जानेवारी २०१२ - लँग्वेज कमिटीकडून प्रस्तावास मान्यता
- फेब्रुवारी २ - ज्ञानकोशकार केतकरांच्या जयंती दिनी साईट स्थापना