साहित्यिक:लोहिया शैला

विकिस्रोत कडून
शैला लोहिया
(१९४०–२०१३)
    शैला लोहिया (जन्म: १९४० , मृत्यू: २४ जुलै२०१३)- बालपण धुळे येथे ध्येयवादी व सामाजिक चळवळीशी बांधिलकी असलेल्या वडील शंकरराव व आई शकुंतला बाई परांजपे यांच्या निगराणीत गेले. विकेंद्रित लोकशाही, समाजवाद, विज्ञान निष्ठा, सर्वधर्मसमभाव, सामाजिक न्याय या तत्त्वांवर श्रध्दा ठेवून राष्ट्रप्रेमाची शिकवण देणाऱ्या राष्ट्र सेवा दलाचे काम करत त्यांची जडण घडण झाली. पुढे १९६२ मध्ये डॉ. व्दारकादास लोहिया यांच्याशी आंतरजातीय विवाह करुन त्या आंबेजोगाई इथे आल्या. १९७० मध्ये स्वामी रामानंद तीर्थ कला व वाणिज्य महाविद्यालयात मराठी विषयाच्या अधिव्याख्यात्या म्हणून रुजू. १९८२- मानवलोक संस्थेच्या स्थापनेत प्रमुख भूमिका. १९८४- तेरे डेस होम्स,जर्मनी या संस्थेच्या मदतीने १ एप्रिल १९८४ ला मानवलोक संचालित 'मनस्विनी' महिला प्रकल्पाची सुरुवात. प्रकल्प प्रमुख म्हणून स्वयंसेवी वृत्तीने काम. संस्था सुरू करतानाच मनाशी खूणगाठ बांधली होती की, एकाने संस्थेसाठी पूर्णवेळ द्यायचा. दुसऱ्याने भाकरीची सोय पाहायची.

    प्राचार्या डॉ. शैला (भाभी) लोहिया या सिद्धहस्त लेखिका आहेत. त्यांच्या साहित्याला वास्तवाचा भक्कम आधार आहे. अनेकदा हे वास्तव म्हणजे सामाजिक, कौटुंबिक अत्याचाराने घेतलेले भीषण रूप असते. त्यामुळे या वास्तवाचे यथार्थ चित्रण, कलेचा बाज बिघडू न देता त्यांच्या साहित्यातून व्यक्त होताना दिसतो. बहुतेक कथा स्त्रीवादी साहित्य आहेत व उपेक्षित स्त्रियांच्या जीवनातील विदारक व्यथा आहेत. स्त्रियांना आत्मभान आले पाहिजे. त्या निर्भय झाल्या पाहिजेत ही तळमळ त्यांच्या लेखनातून दिसून येते. त्यांच्या ललित लेखनातून त्यांच्या संवेदनशीलतेचे, विचारांचे व काव्यात्म प्रतिभेचे दर्शन होते.

    For works with similar titles, see Author: शैला लोहिया.

    ग्रंथसंपदा[संपादन]

    कादंबऱ्या[संपादन]

    कथासंग्रह[संपादन]

    कविता संग्रह[संपादन]

    अन्य ललित वाङ्मय[संपादन]

    संशोधन / समीक्षा ग्रंथ[संपादन]