चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न

विकिस्रोत कडून



चांदवडची शिदोरी:
स्त्रियांचा प्रश्न




शरद जोशी


संपादन : प्राचार्य सुरेशचंद्र म्हात्रे





प्रकाशकाचे मनोगत


 चांदवड येथील महिला अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद जोशी यांनी लिहिलेली 'चांदवडची शिदोरी' ही पुस्तिका विशेष महत्त्वाची ठरली. शरद जोशी यांनी लिहिलेल्या स्त्री प्रश्नांवरील इतर लेखांचे संकलन केल्यानंतर त्या सगळ्या संकलनाला 'चांदवडची शिदोरी' हेच नाव ठेवले आहे. 'चांदवड अधिवेशन' महिला चळवळीचा महत्त्वाचा टप्पा आहे.
 माजी आमदार सौ. सरोजताई काशीकर यांनी स्त्रियांच्या वतीने शरद जोशींपोटी कृतज्ञता म्हणून या संग्रहाला प्रस्तावना दिली, त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार!
 'मुक्ताईने केले ज्ञानेशा शहाणे' हा शरद जोशी यांचा लेख प्रस्तावनेसारखा सुरुवातीला वापरला आहे. प्राचार्य सुरेशचंद्र म्हात्रे यांनी हे सर्व लिखाण एकत्रित करून दिले. शरद जोशींच्या लिखाणाची सगळी उस्तवार गेली २५- ३० वर्षे ते करत आलेले आहेत. या त्यांच्या निष्ठेबद्दल काय बोलणार?
 रावेरी येथे होत असलेल्या महिला मेळाव्याच्या निमित्ताने शरद जोशी यांचे 'स्त्री-प्रश्नांबाबतचे लिखाण' एकत्र करून वाचकांच्या हाती देताना प्रकाशक म्हणून समाधानाची भावना आमच्या मनामध्ये आहे. शरद जोशी अमृतमहोत्सवी वर्षात हे लिखाण प्रसिद्ध करताना विशेष आनंद आहे.


श्रीकांत उमरीकर

औरंगाबाद


□ अनुक्रमणिका □

 शेतकरी स्त्रियांच्या वतीने चार शब्द - सौ. सरोज काशीकर

 मुक्ताईने केले ज्ञानेशा शहाणे

१३

एक  चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न

३७

दोन  अमरावतीची आयुधे

७७

तीन   शेतकरी महिला आघाडी :
 महिला आरक्षणासंबंधी व वारसाहक्कासंबंधी भूमिका

९०

चार  लक्ष्मीमुक्ती : मंगल सावकाराचे देणे

९५

पाच  दळभद्री चिंधी (म.शासनाचे महिला धोरण)

१०४

सहा  बेजिंग परिषद : अर्थ आणि इशारा

११६

सात  १९९७ च्या अधिवेनांपुढील कामगिरी

१३७

आठ  चांदवड जाहिरनामा व शपथ

१५२

नऊ  स्त्रियांच्या प्रश्नांची फुटपट्टी

१५६