अंगारमळा मुखपृष्ठ

विकिस्रोत कडून



अंगारमळा




शरद जोशी





Janshakti logo (Angarmala) (page 2 crop)जनशक्ती वाचक चळवळ








माझ्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य
शेतकरी भावा-बहिणींना
दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने

 'अंगारमळा' या पुस्तकाला अतिशय चांगला प्रतिसाद वाचकांनी, समीक्षकांनी, अभ्यासकांनी आणि अर्थातच शेतकरी संघटनेच्या असंख्य पाईकांनी दिला. महाराष्ट्र शासनाने उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार देऊन गौरवले. दुसरी आवृत्ती ही केवळ पुनर्मुद्रण नसून चार लेखांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. शेतकरी संघटकच्या पूर्वी साप्ताहिक वारकरी' आणि नंतर काही काळ 'साप्ताहिक ग्यानबा' यांनी शेतकरी संघटनेच्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या नियतकालिकांमधून शरद जोशींनी केलेले लिखाण बाजूला राहून गेले होते. शरद जोशींचे समग्र वाङ्मय प्रकाशित करत असताना ही बाब प्रामुख्याने लक्षात आली. शेती, शेतकरी, आंदोलन या विषयावरील लिखाण इतर पुस्तकांमध्ये समाविष्ट केलेले आहे. नव्याने सापडलेल्या त्यांच्या चार लेखांची प्रकृती अंगारमळ्यातील लेखांशी जुळणारी होती. माजी पंतप्रधान कै. चरणसिंह, शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष अनिल गोटे आणि रामचंद्रबापू पाटील यांच्यावरचे व्यक्तिचित्रात्मक लेख शिवाय साप्ताहिक वारकरीची शरद जोशींनी सांगितलेली जन्मकथा या नवीन मजकुराचा समावेश सदर पुस्तकात आहे.
 महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रात नेतृत्व करणाऱ्यांनी लिखाण करण्याची एक मोठी परंपरा आहे. केवळ रुक्ष वैचारिक लिखाण न करता लालित्याचे पाझर काही नेत्यांच्या लिखाणात जागोजाग आढळतात. शरद जोशी हे अशा नेत्यांमधील अलीकडचे उदाहरण. विसाव्या शतकात अतिशय महत्त्वाच्या ठरलेल्या शेतकरी चळवळीच्या नेत्याने लालित्यपूर्ण भाषेचा वापर केल्याचा 'अंगारमळा' हे पुस्तक एक मोठा पुरावा होय.

दि. २४ फेब्रुवारी २०१५
श्रीकांत उमरीकर
 
औरंगाबाद..
प्रकाशक
 
अनुक्रम
१. १ अंगारमळा

२. माझ्या ब्राह्मण्याची गाथा

१६

३. इति एकाध्याय

२२

४. मुहूर्तम् ज्वलितम् श्रेयम्

३६

५. माझी शिक्षणगाथा

४६

६. विद्या नामे अविद्येचा शिक्षक

५७

७. शंकरराव गेले

६२

८. अफाट बाबूलाल

७०

९. मुशीतील आचेने सिद्ध झालेले कार्यकर्ते

८३

१०. दोन मनस्वी माणसे

८९

११. एका कामगार चळवळीचा अस्त

९६

१२. महाविद्यालयातील विद्यार्थ्यास पत्र

१०६

१३. शेतकरी आंदोलन आणि साहित्यिक

१११

१४. मी 'साहित्यिक' नाही!

१३१

१५. बस करा हे समाजसेवेचे ढोंग!

१४७

१६. शांत व मृदू स्वभावाचे चौधरी

१७७

१७. 'अनिल' जादूच्या दिव्यातील राक्षस

१८०

१८. वारकरीची जन्मकथा

१८७

१९. बापू नावाचे मोहोळ

१९३