Jump to content

अन्वयार्थ

विकिस्रोत कडून



अन्वयार्थ
(लक्ष्मीकांत देशमुख यांच्या साहित्याची समीक्षा)
 
अन्वयार्थ
(लक्ष्मीकांत देशमुख यांच्या साहित्याची समीक्षा)
संपादक
डॉ. रणधीर शिंदे
दिलीपराज प्रकाशन प्रा.लि.TM
२५१ क, शनिवार पेठ, पुणे - ४११०३०.
अन्वयार्थ / Anvayartha
(लक्ष्मीकांत देशमुख यांच्या साहित्याची समीक्षा)
संपादक : डॉ. रणधीर शिंदे

◆प्रकाशक
 राजीव दत्तात्रय बर्वे,
 मॅनेजिंग डायरेक्टर,
 दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.,
 २५१ क, शनिवार पेठ, पुणे - ४११ ०३०.
 दूरध्वनी क्रमांक (फॅक्ससहित)
 २४४७१७२३। २४४८३९९५ । २४४९५३१४
◆© डॉ. रणधीर शिंदे प्रथमावृत्ती - १४ फेब्रुवारी २०१५
◆प्रकाशन क्रमांक - २२०५
◆ISBN - 978 - 93 - 5117 - 043 - 3
◆मुद्रक
 मधुराज प्रिंटर्स अॅण्ड पब्लिकेशन्स् प्रा. लि.,
  स. नं. २९/८-९, पारी कंपनीजवळ,
 धायरी, पुणे - ४११ ०४१
◆टाईपसेटिंग
 का. वि. शिगवण
 अक्षरवेल,
 दत्तवाडी, पुणे ४११ ०३०.
◆मुद्रितशोधन
 एस. एम. जोशी
◆मुखपृष्ठ
 हेमंत देशपांडे

◆मूल्य - ₹ चारशे मात्र
अनुक्रमणिका

भाग १ : एकूण साहित्य
• प्रस्तावना

११
 डॉ. रणधीर शिंदे

• लक्ष्मीकांत देशमुख यांची साहित्यसाधना
 अविनाश सप्रे
भाग २ : लक्ष्मीकांत देशमुख यांचे कथाविश्व
• देशमुखांची कथा : जीवनमूल्ये आणि वाङ्मय सौंदर्य
 प्रा.राजशेखर शिंदे
• लक्ष्मीकांत देशमुख यांचे कथालेखन डॉ. केशव तुपे • लक्ष्मीकांत देशमुख यांच्या लेखनातील समकालीनता भ. मा. परसावळे समृद्ध आशयसूत्रात बांधलेल्या कथा : एक अभिनव प्रयोग डॉ. आनंद पाटील • लक्ष्मीकांत देशमुख यांच्या कथांमधील स्त्रीरूपदर्शन विष्णू नारायण पावले । ग्रामीण वर्तमानाच्या कथा ना. धों. महानोर पाण्यावाचून दाही दिशा - सुन करणारा अनुभव . शंकर सारडा 'जलभान' देणाऱ्या कथा डॉ. मंगेश कश्यप ________________

. ११९ १२३ १२८ १३२ १४१ • खेळाडूंच्या जीवनसंघर्षाचे मनोज्ञ चित्रण सुनीलकुमार लवटे • खेळाडूंमधील 'माणूसपणाची' शोधयात्रा प्रा. मिलिंद जोशी • स्त्रीभ्रूणहत्या प्रश्नाचा ललित दस्तऐवज प्रा. पुष्या भावे .... • स्त्रीभ्रूण हत्येविरोधातील चळवळ आणि देशमुख यांची कथा मेघा पानसरे भाग ३ : लक्ष्मीकांत देशमुख यांचे कादंबरीविश्व • कादंबरीचे लोकशाहीकरण महेंद्र कदम • सत्ताकारण व समाजहित यांच्यातील द्वैत डॉ. अशोक चौसाळकर • लक्ष्मीकांत देशमुखांच्या कादंबरीतील मुस्लिम जीवनचित्रण रफीक सूरज • लक्ष्मीकांत देशमुख यांच्या कादंबरीची भाषा डॉ. नंदकुमार मोरे • राजकीय सत्यस्थितीचा आविष्कार : अंधेरनगरी चंद्रकांत बांदिवडेकर • राजकीय इतिहासाचे चित्रण ग. प्र. प्रधान . • 'इन्किलाब विरुद्ध जिहाद'मधील संस्कृतिसंघर्ष डॉ. सदानंद मोरे १४८ १५५ १७० १८० १८४ १९२ ________________

- .. .. . . . " . .... . .. . अनुक्रमणिका . - - . . .. .

. . . . . . . .. . . . . २०५ २१० २१५ २१८ २२६ • आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमीवरील शोकांतिका प्रल्हाद वडेर • इन्किलाब विरुद्ध जिहाद अरुण साधू • मोठा अवकाश पेलणारी महाकादंबरी अनंत मनोहर इन्किलाब विरुद्ध जिहाद विश्राम गुप्ते 'इन्किलाब विरुद्ध जिहाद'मधील धार्मिक आणि राजकीय चर्चा व चिंतन वि. दा. वासमकर क्रांतीच्या ज्वाला आणि धर्मांधतेची राख अभिजित वैद्य • 'इन्किलाब विरुद्ध जिहाद'ची कथनव्यवस्था दत्ता घोलप • भ्रष्ट व्यवस्थेचे शोकात्म दर्शन प्रा. अजित साळुखे • हरवलेलं बालपण कादंबरीचे वेगळेपण अविनाश सप्रे सहृदय माणसाला हादरून टाकणारी कलाकृती प्रा. अजित साळुखे २३६ २४३ २४८ २५३ २६० ________________

अनुक्रमणिका ... .... .. २८४ भाग ४ : लक्ष्मीकांत देशमुख यांच्या प्रशासनपर साहित्याचे विश्व • प्रशासनाचे चित्तवेधक विश्लेषण २६७ डॉ. प्रकाश पवार प्रशासननामा (लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी उद्बोधक चिंतननामा) २७४ प्रभाकर करंदीकर प्रशासननामा व बखर २७९ गूढ, गहन प्रशासनरूपी जंगलाचे चित्तवेधक दर्शन लीना मेहेंदळे • भारतीय प्रशासनाचे सकारात्मक विवेचन पांडुरंग भोये भाग ५ : लक्ष्मीकांत देशमुख यांचे नाट्यविश्व • आशयधर्मी नाटककार २९३ विद्यासागर अध्यापक भाग ६ : मुलाखती 'समकालीन वास्तव कलात्मकतेनं टिकणारा 'जागल्या' लेखक आहे....." ३०३ प्रा. रूपाली शिंदे व विनोद शिरसाठ 'प्रेमचंद' परंपरेचा पाईक ३४६ भ. मा. परसावळे • लेखक परिचय

३६३
भाग १
एकूण साहित्य
प्रस्तावना

 १९८० नंतरच्या काळात मराठी वाङ्मयीन पर्यावरणात अनेक नवे बदल घडत होते. लघुनियतकालिक चळवळ विसावली होती. अस्मिताकेंद्री वाङ्मयीन चळवळीना नवा अवकाश प्राप्त झाला होता. चळवळप्रेरित वाङ्मयीन आविष्काराचे जोरकस धुमारे अवतीर्ण होत होते. अशा वाङ्मयीन पर्यावरणात लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपल्या लेखनास सुरुवात केली. आपल्या संवेदनशीलस्वभावाला अनुसरून त्यांनी लेखनाचे अग्रक्रम ठरविलेले दिसतात. ते ज्या क्षेत्रात प्रदीर्घ काळ वावरले अशा जीवनक्षेत्रांतून त्यांना अनेक विषय स्फुरलेले दिसतात. मानवी जीवनाला व्यापून असणाऱ्या राजकीय सत्रासंबंधाचे व भोवतालच्या समाजचित्रणाला साकार करणारे लेखनविषय त्यांच्या साहित्यातून प्रकट झाले आहेत. प्रशासकीय काम करत असताना ज्या सामाजिक कार्याशी त्यांचा संबंध आला अशा कामाच्या प्रेरणेतून अनेक कथा - विषय प्रकटलेले दिसतात.
 देशमुख यांच्या एकूण लेखनकामगिरीचा धांडोळा घेणारा हा ग्रंथ आहे. या ग्रंथात देशमुख यांच्या साहित्यविषयीची मांडणी करणाऱ्या विविध लेखांचा समावेश करण्यात आला आहे. देशमुख यांच्या साहित्याचा अन्वयार्थ मांडणारे हे लेख आहेत. कथा, कादंबरी व त्यांच्या प्रशासनविषयक लेखनाचा लेखा-जोखा या ग्रंथात आहे. या ग्रंथासाठी मराठीतील नामवंत विचारवंत, लेखक व अभ्यासकांनी लेख लिहिले आहेत. ललित लेखकापासून ते सामाजिक शास्त्राच्या अभ्यासकांनी लिहिलेले हे लेख आहेत. तीन पिढ्यातील विविध समीक्षकांच्या नजरेतून देशमुख यांच्या लेखनाचे पुनर्वाचन केलेले आहे आणि लेखक, त्याचा संवेदनस्वभाव त्यांच्या चित्रणाचे आथाविषय लेखनसामर्थ्यचे विविध अन्वयार्थ अभ्यासकांनी लावलेले आहेत. या ग्रंथासाठी बरेचसे लेख नव्याने लिहिले गेले आहेत, तर काही त्या त्या काळात प्रकाशित झालेल्या नियतकालिकातील परीक्षणांचाही समावेश केला आहे.
 लक्ष्मीकांत देशमुख यांचे एकूण सहा कथासंग्रह प्रकाशित आहेत. १९८३ साली त्यांचा 'कथांजली' हा संग्रह प्रसिद्ध झाला. तर २०१३ साली 'सावित्रीच्या
गर्भात मारलेल्या लेकी' हा संग्रह प्रकाशित झाला. देशमुख यांच्या कथालेखनाधारित अकरा लेखांचा समावेश या संग्रहात आहे.
 डॉ. राजशेखर शिंदे यांनी देशमुख यांच्या कथेतील जीवनमूल्ये आणि वाङ्मयीन सौंदर्याचा शोध घेतला आहे. देशमुख यांच्या कथेतील विकासक्रमाचा व विविध वळणांच्या अनुषंगाने कथेतील आशयसूत्रे व शैलीचा शोध घेतला आहे. देशमुख यांच्या लेखनसंवेदनशील स्वभावाचे विविध पैलू उलगडून दाखविले आहेत. या लेखात कथावाचनाची आस्वादरूपे आहेत. डॉ. केशव तुपे यांनी देशमुख यांच्या कथेतून प्रकटणारी मुख्य जाणीवसूत्रे ध्यानात घेऊन कथावाचन केले आहे. स्त्री-पुरुष प्रेमसंबंधापासून समस्याप्रधान विषय त्यांच्या कथेतून कसे आले आहेत त्याची चर्चा केली आहे. बाह्य जीवनाचे तपशील त्यांनी कथेत कसे पुरवल्यामुळे या कथांना प्राप्त झालेली परिमाणात्मकता नोंदविली आहे. सामाजिक आशयसूत्रांना जोरकसपणे पॉईंटआऊट करणाऱ्या देशमुख यांच्या कथा मराठीत आगळ्यावेगळ्या ठरतात हे त्यांचे निरीक्षण महत्त्वाचे आहे. डॉ. आनंद पाटील यांनी देशमुख यांच्या कथेबद्दलची मोठ्या सांस्कृतिक फलकावर नोंदवलेली तौलनिक निरीक्षणे महत्त्वाची आहेत. सूक्ष्म कथावाचनाचे व तीमधील सुसंगत अन्वयार्थाचे तपशील त्यांच्या विवेचनात आहेत. या संहितांचा अर्थ लावण्यासाठी त्यांनी वाङ्मयबाह्य तपशीलाचाही उपयोग केला आहे. एकार्थाने त्यांनी म्हटल्याप्रमाणे हा लेख संहितापूर्व संहितांचे वाचन (EPI - TEXTS) आहे. देशमुख यांच्या कथेतील अनुभवविश्व अनेकतावादी असल्याचे सांगून, अनिल अवचटांच्या सामाजिक कार्यातून जन्मलेल्या माणसांप्रमाणे विकास प्रशासनाच्या ध्यासातून जन्मलेल्या रिपोर्ताज वळणाच्या या कथा आहेत असे महत्त्वाचे निरीक्षण त्यांनी नोंदविले आहे..
 विष्णू पावले यांनी देशमुख यांच्या कथांमधील स्त्रीरूपदर्शनाचा विचार केला आहे. देशमुख यांच्या कथेतून स्त्रीजीवनाचे विविधरंगी चित्रण आलेले आहे. माता, भगिनी, सहचारिणी व प्रेयसी रूपातील चित्रणाचे वेगळेपण शोधले आहे. तसेच या जीवनचित्रणामागे असलेला समाजसंदर्भही ध्यानात घेतला आहे. स्त्रीदुःखाचा व शोषणाचा सांस्कृतिक संदर्भ ध्यानात घेऊन त्यासंबंधीचे आकलन मांडले आहे. विशेषत: ‘पाणी! पाणी!!' मधील स्त्री-दु:खानुभूतीचे व शोषणाचे ‘साती आसरा' च्या रूपकातून मांडलेला अन्वयार्थ वेगळा आहे..
 देशमुख यांच्या स्वतंत्र कथासंग्रहावरील लेखही या संग्रहात समाविष्ट आहेत. त्या त्या कथासंग्रहाचे सामर्थ्य अधोरेखित करणारे. 'पाणी! पाणी!!' या संग्रहावर ना. धों. महानोर, शंकर सारडा व मंगेश कश्यप यांनी लिहिले आहे. नामवंत कवी व शेतीप्रश्नाचे अभ्यासक ना. धों. महानोर यांनी आजच्या ग्रामीण वर्तमानाच्या कथा

म्हणून या कथेकडे पाहिले आहे. ग्रामीण महाराष्ट्राचा पाणी प्रश्न, विकास-प्रगतीच्या पाऊलखुणात आलेल्या अडथळ्याच्या पार्श्वभूमीवर या कथेचे वेगळेपण मांडले आहे..
  चित्रकार व कवी भ. मा. परसावळे यांनी देशमुख यांच्या कथेतील एका वेगळ्या पैलूकडे लक्ष वेधले आहे. 'पाणी पाणी' व 'नंबर वन' या कथासंग्रहातून व्यक्त होणाऱ्या समकालातील जातिप्रश्नांच्या अंगाने चर्चा केली आहे. आजच्या काळातही जातिभेदाचे दाहक प्रश्न अजूनही अस्तित्वात आहेत. या प्रश्नाकडे देशमुख लेखक म्हणून सहानुभवाने पाहतात. या मागे त्यांच्यात संवेदनस्वभाव इहवादी, विज्ञाननिष्ठ भूमिका असल्याचे नोंदवितात. .
 मंगेश कश्यप यांनी 'पाणी पाणी' या संग्रहातील कथांकडे काहीशा शास्त्रीय दृष्टीने पाहिले आहे. भूजलातील साठे, त्याचे वितरण व प्रशासनातील गुंते या अंगाने कथेतील आशयसूत्रांची चर्चा केली आहे. शेती व ग्रामीण जीवनाच्या अर्थव्यवस्थेच्या पाणी व्यवस्थापन वितरणाचा संबंध सांगून त्यातले गुंते नोंदविले आहेत. देशमुख यांच्या ललित लेखनाने जलभानसंवेदना प्रभावी मांडल्याचे सांगितले आहे..
  प्राचार्य सुनीलकुमार लवटे व प्रा. मिलिंद जोशी यांनी 'नंबर वन' या कथासंग्रहाबद्दलचे आपले विचार मांडले आहेत. खेळाडूचा जीवनसंघर्षाचा व माणूसपणाची शोधयात्रा या कथामालेतून प्रकटल्याचे नोंदविले आहे. थीमबेस्ड कथामालेतील 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' हा देशमुखांचा एक वेगळा कथा आविष्कार. प्रा. पुष्पा भावे व डॉ. मेघा पानसरे यांना महाराष्ट्रातील या प्रश्नाची निकड व दाहकतेच्या पार्श्वभूमीवर या कथालेखनाचे वेगळेपण नोंदविले आहे. या कथांचा भूगोल संदर्भ व या प्रश्नावरील जागृतीच्या पार्श्वभूमीवरील हे विवेचन आहे. पुष्पा भावे यांनी या लेखनाकडे समाजवास्तवाचा ललित दस्तऐवज म्हणून याकडे पाहिले आहे, तर मेघा पानसरे यांनी या प्रश्नाच्या समकालीन पाश्र्वभूमीवर कथासंदर्भ न्याहाळले आहेत. भारतीय समाजात असलेल्या पितृसत्ताक दृष्टीचा समाजरचनेवर असलेला प्रभाव आणि स्त्री नेहमीच सत्तासंबंधात बळी पडली आहे. या सामाजिक, राजकीय अंगाने विचार केला आहे. कोल्हापूर परिसरातील या प्रश्नासंबंधीचे देशमुखांचे कार्य आणि त्यामुळे झालेली जाणीवजागृती या संदर्भाचाही विचार करीत या कथांचे वेगळेपण शोधले आहे व नेमकेपणाने मांडला आहे..

**

 लक्ष्मीकांत देशमुख यांचे कादंबरीविश्व वैशिष्ट्यपूर्ण असे आहे. त्यांच्या एकूण पाच कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. या कादंबऱ्यांतून विविध प्रकारची आशयसूत्रे व्यक्त झाली आहेत. प्रशासन व्यवस्था, राजकारण, समाजकारण ते आंतरराष्ट्रीय संस्कृतिसंबंधाचे चित्रण देशमुख यांच्या कादंबरीतून आले आहे. देशमुख यांच्या कादंबरी लेखनाचा परामर्श घेणारे जवळपास सोळा लेख या संग्रहात समाविष्ट आहेत. प्रा. अविनाश सप्रे, डॉ. महेंद्र कदम, डॉ. रफीक सूरज, व डॉ. नंदकुमार मोरे यांनी देशमुख यांच्या समग्र कादंबरी वाङ्मयाच्या विविध पैलूंवर लिहिले आहे.
 अविनाश सप्रे यांनी देशमुख यांच्या लेखनातील उदारमतवादी, मानवतावादी विचारव्यूह शोधला शोधला आहे. प्रशासनाची सर्जनशील चिकित्सा त्यांच्या कादंबरीवाङ्मयात आहे. समकालीन आंतरराष्ट्रीय राजकारणाचे धक्कादायक अंतरंग दाखविणारी 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' ही मराठीमधली एकमेव कादंबरी असल्याचे सप्रेनी नमूद केले आहे. अनुभवाचे कल्पितामध्ये रूपांतरण करणारी कादंबरी देशमुखांनी लिहिली आहे. तसेच देशमुख यांच्या कादंबरीची त्यांनी चित्रपट माध्यमाशी तुलना केली आहे. डॉक्युमेंटरीतील दृश्यमिती त्यांच्या कादंबरी रचिताला आहे. मराठीतील साने गुरुजी, वि. स. खांडेकर बोधवादी परंपरेतील देशमुखांची कादंबरी आहे असे महत्त्वाचे निरीक्षण नोंदविले आहे. बदलणारे जग कसे असेल याबद्दलची भूमिका देशमुखांच्या कादंबरीत आहे असे नोंदविले आहे.
 डॉ. महेंद्र कदम यांनी हिंदीतील सुप्रसिद्ध विचारवंत मॅनेजर पाण्डेय यांनी मांडलेल्या 'लोकशाही आणि कादंबरी' या विचारसूत्राच्या प्रकाशात देशमुख यांच्या कादंबरीचे स्वरूप विशद केले आहे. देशमुख यांच्या कादंबरीतील आशयसूत्रांचा समकाळातील लोकशाही मूल्यांशी असलेला संबंध स्पष्ट केला आहे. लोकशाहीचे बळकटीकरण करून रांगेतल्या शेवटच्या माणसाला या कादंबरीने केंद्रस्थानी ठेवले आहे, असा विचार मांडला आहे.
 मुस्लीम जीवनसंस्कृतीची विपुल चित्रणे देशमुख यांच्या कथात्म साहित्यात आहेत. डॉ. रफीक सूरज यांनी देशमुख यांच्या कादंबरीतील मुस्लीम जीवनचित्रणाच्या वेगळेपणाबद्दलचा विचार मांडला आहे. विशेषत: मुस्लीम स्त्रियांची अधिकांश रूपे त्यांच्या साहित्यात आहेत. मराठी साहित्याने या प्रकारच्या चित्रणाकडे पूर्वग्रही दृष्टीने पाहिले आहे. मुस्लीम संस्कृतीत असणाऱ्या पुरुषप्रधान संस्कृतीच्या प्रभावी चर्चा देशमुखांनी केली आहे. 'सलोमी' च्या तुलनेत 'इन्कलाब विरुद्ध जिहाद' मधील स्त्रिया अधिक बंडखोर व स्वतंत्र विचारसरणीच्या आहेत. या व्यक्तिरेखांतून त्यांच्या विचारसरणीचे वहन केले असून जगातील मुस्लीम संस्कृतीचे, त्यांच्या जीवनरीतीचे देशमुख यांनी बारकाईने केल्याचे चित्रण त्यांनी नमूद केले आहे. डॉ. नंदकुमार मोरे यांनी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या कादंबरीच्या भाषारूपाबद्दलचा विचार मांडला आहे. भाषेची संदर्भबहुलता ध्यानात घेऊन प्रशासन भाषेची तपशीलवार चित्रे त्यांच्या लेखनात आहेत. औपचारिक भाषारूपे, सिनेमॅटिक स्वरूपाची भाषा व भाषेची संमिश्ररुपे त्यांच्या कादंबरीत असून तीमध्ये काही प्रमाणात भाषिक आवाहकत्वाचा अभाव असल्याचे नोंदविले आहे.
  राजकीय जाणिवांचे चित्रण हा देशमुखांच्या कादंबरीचा एक महत्त्वाचा अक्ष

आहे. ग्रामपंचायत, जिल्हापरिषद ते नगरपालिका या जिल्हा प्रशासनातील राजकीय ताणांचे व डावपेचाचे चित्रण देशमुखांच्या कादंबरीत आहे. डॉ. चंद्रकांत बांदिवडेकर यांनी राजकीय सत्यस्थितीचा आविष्कार 'अंधेरनगरी' या कादंबरीतून झाला असल्याचे सांगितले आहे. निवडणुकीच्या यशाचे उद्दिष्ट ठेवून चालविलेले निर्दय खेळ असे वास्तव या कादंबरीतून अधोरेखित झाल्याचे नमूद केले आहे. डॉक्युमेंटरी स्वरूपाच्या या कादंबरीत अधिकारलालसेची प्रेरणा मानवी जीवनात सतत कशी कार्यरत असते हे मांडले आहे.
  डॉ. अशोक चौसाळकर यांनी सत्ताकारण आणि समाजहित यांच्यातील द्वैत 'अंधेरनगरी' या कादंबरीचित्रणात शोधले आहे. वेगवेगळ्या जीवनातील अनुभवचित्रणाने साहित्याला कसदारपणा लाभतो, तसेच साहित्याची प्रसरणशीलताही वाढते. या परिप्रेक्ष्यात 'अंधेरनगरीचे' आकलन मांडले आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकारणाचे भेदक चित्रण या कादंबरीत आहे. या कादंबरीतील सत्तासंघर्षाचे स्वरूप लेखकाने चार पातळ्यांवर उभे केले आहे. या सत्तासंघर्षात सहभागी झालेल्या व्यक्ती व त्यांना प्राप्त झालेले आयाम या कादंबरीत आहेत. कादंबरीचित्रणातील तीन वर्षाच्या कार्यकाळातील अनेक बारकाव्यांनिशी सत्ताकारणाचा वेध घेतला आहे. कादंबरी चित्रणातील जीवघेणा सत्तासंघर्ष डॉ. चौसाळकर यांनी राज्यसंस्थेच्या अंगाने न्याहाळला आहे. त्यामुळे या प्रकारच्या आकलनाला नवी दृष्टी प्राप्त झाली आहे.
  'इन्किलाब विरुद्ध जिहाद' ही देशमुख यांच्या कादंबरीप्रकल्पातील महत्त्वाची कादंबरी. या महाकथनात आंतरराष्ट्रीय पातळीवरील सांस्कृतिक पट मांडला आहे. अफगाणिस्तानातील सत्तासंघर्षाचे वेधक असे चित्र या कादंबरीत आहे. पारंपरिकता आणि आधुनिकता, सरंजामी धर्मांधतेचे प्रभावी अवशेष आणि साम्यवादी पक्षांची व्यूहनीती यातील तणावाचे चित्रण या कादंबरीत आहे. कादंबरीतील अनोख्या जीवनचित्रणामुळे मराठी सांस्कृतिक जगताकडून तिला चांगला प्रतिसाद मिळाला. प्रस्तुत ग्रंथात या कादंबरीवरील जवळपास नऊ लेखांचा समावेश केला आहे. या कादंबरीचे अनेकपदरी बहुमुखीत्व या अभ्यासकांनी मांडले आहे.
 ज्येष्ठ विचारवंत ग. प्र. प्रधान यांनी या कादंबरीकडे राजकीय इतिहासाचे चित्रण करणारी कादंबरी म्हणून पाहिले आहे. जवळपास अर्धशतकातील विशिष्ट भूप्रदेशातील राजकीय उत्पाताचे चित्रणस्वरूप मांडले आहे. डॉ. सदानंद मोरे यांनी या कादंबरीतील संस्कृतिकसंघर्षाचे स्वरूप मोठ्या विचारपटलावर शोधले आहे. मराठी लेखक क्वचितच महाराष्ट्राबाहेरील भूप्रदेशाचे चित्रण करतो असे निरीक्षण नोंदवून 'इन्किलाब' मधील संस्कृतिसंघर्षाचे स्वरूप सांगितले आहे. या कादंबरीतील संघर्ष तिपेडी स्वरूपात त्यांनी शोधला आहे. पाश्चात्त्य संस्कृती आणि साम्यवादी संस्कृती ही एकाच पाश्चात्त्य

आधुनिकतेची दोन रूपे आणि दुसऱ्या बाजूला मध्ययुगीन आचारविचारांचा आग्रह धरणारी इस्लामी संस्कृती यांच्या त्रिकोणमितीचे इन्किलाबमध्ये ललित अंगाने चित्रण केले आहे. यातला एक संघर्ष अमेरिका नियंत्रित पाश्चात्त्य संस्कृती आणि रशियन नियंत्रित संस्कृती यांच्यामधील, दुसरा साम्यवादी आणि स्थानिक संस्कृती व तिसरा पाश्चात्त्य व इस्लामी संस्कृती यांच्यातला आहे. या प्रश्नाची गुंतागुंत कादंबरीत तटस्थतेने हाताळली आहे. या संस्कृतीसंघर्षाकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन खुला आहे. कादंबरीतील स्त्री-चित्रणबद्दलचा प्रागतिक दृष्टिकोन व विचारसरणींकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी हे या कादंबरीचे यश आहे असे त्यांनी नोंदविले आहे. कादंबरीतील कथनसृष्टीकडे पाहण्याची व आकलनाची वेगळी दृष्टी या विवेचनात आहे.
 प्रल्हाद वडेर, अरुण साधू व अनंत मनोहर यांच्या लेखात आंतरराष्ट्रीय पातळीवरील शोकांतिका, कादंबरीचे बहुमितीपण व प्रसरणशीलता, आशयविस्ताराचा विस्तृत फलक - या कादंबरीच्या वैशिष्ट्यांचा निर्देश केला आहे. ही कादंबरी मराठीत नवी गुणात्मक भर घालणारी व नवा पायंडा पाडणारी कादंबरी असल्याचे अरूण साधू यांनी म्हटले आहे.
 विश्राम गुप्ते यांनी अर्धशतकाची कहाणी रोचक डॉक्युमेंटरीच्या अंगाने मांडल्याचे म्हटले आहे. या भव्य आकारात पन्नास वर्षाचा रक्तरंजित इतिहास ललित अंगाने उलगडून दाखविला आहे. राजकीय सत्तेची मानवतावादाच्या अनुषंगाने कठोर समीक्षा या कादंबरीत आहे. अनेकविध पात्रांच्या कादंबरीतील उपस्थितीमुळे भावनांचा समृद्धीविस्तार झाल्याचे गुप्ते यांनी म्हटले आहे. अभ्यास आणि प्रतिभाविलास यांचा मिलाफ हा या कादंबरीचा गुण असल्याचे त्यांनी नोंदविला आहे. डॉ. वि. द. वासमकर यांनी या कादंबरीतील धार्मिक आणि राजकीय चर्चाविश्वाचे विशेष नोंदविले आहेत. दत्ता घोलप यांनी 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' या कादंबरीतील कथनव्यवस्थेचे विशेष नोंदविले आहेत. कथनातील अनेक केंद्रित्व, संवादचर्चा, कथाबाह्य, कथांतर्गत निवेदन - हे समूहचित्रणासाठी उपयुक्त ठरल्याचे म्हटले आहे. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या 'दूरदर्शन हाजीर हो' व 'अखेरची रात्र' या नाट्यलेखन कामगिरीचा वेध सागर अध्यापक यांनी त्यांच्या लेखात घेतला आहे. मराठीतील एक श्रेष्ठ दर्जाची शोकात्मिका 'अखेरची रात्र' आहे असा त्यांचा निष्कर्ष आहे.

**

 प्रशासनविषयक लेखन हा देशमुख यांच्या लेखनाचा एक वेगळा पैलू. प्रदीर्घ काळ शासकीय व्यवस्थेत उच्चपदस्थ अधिकारी म्हणून देशमुख यांनी कार्य केले आहे. या क्षेत्रात दीर्घकाळ ते असल्यामुळे एक प्रकारच्या आंतरिक गरजेपोटी त्यांच्याकडून हे लेखन झाले असावे. 'प्रशासननामा' व 'बखर भारतीय प्रशासनाची' ही भारतीय

प्रशासनावरील त्यांची दोन पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांच्या या प्रशासकीय लेखनाचा लेखाजोखा चार लेखांमधून मांडला आहे. डॉ. प्रकाश पवार यांनी देशमुख यांच्या या लेखनाची विकासलक्षी प्रशासन आणि खाजगी, सार्वजनिक प्रशासन चौकटीमध्ये चर्चा केली आहे. या लेखनास अनुभवजन्य आधार असून आंतरविद्याशाखीय स्वरूपाचे लेखन आहे. असे पवारांनी म्हटले आहे. भारतीय लोकशाहीची वाटचाल, नोकरशाही व्यवस्थेचे अतिशय रोचक पद्धतीचे विवेचन त्यांनी केले आहे. भारतीय प्रशासनाचा विकासलक्षी चेहरा व तीमधील मूल्यात्मक चौकटीत झालेले फेरबदल देशमुख यांच्या लेखनात आहेत. लोकप्रशासनाच्या गरजेसाठी व वाढत्या ज्ञानविस्तारासाठी या प्रकारच्या लेखनाची आवश्यकता त्यांनी प्रतिपादिली आहे. ती महत्त्वाची आहे.
 ज्येष्ठ सनदी अधिकारी प्रभाकर करंदीकर यांनी देशमुख यांच्या 'प्रशासननामा'मधील लेखनाचे विशेष लेखात नोंदविले आहेत प्रशासनातील अनेकविध गुंते, तीमधील विविध प्रश्नांचा नेमकावेध या लेखनात आढळतो. असे सांगून या लेखनातल्या वाचनीयतेमुळे त्याचे नाते कादंबरी प्रकाराशी जोडले आहे. लीना मेहेंदळे यांनी देशमुख यांच्या या प्रकारच्या लेखनाचे काही मार्मिक विशेष नोंदविले आहेत. 'प्रशासननामा' ही छोट्या छोट्या प्रसंगातून फुलविलेली कथानके आहेत असे त्यांना वाटते. तर 'बखर भारतीय प्रशासनाची' हे पुस्तक भारतीय प्रशासनातील अकादमिक विश्लेषक या स्वरूपाचे आहे.
 या संपादनात अखेरच्या भागात देशमुख यांच्या दोन मुलाखती आहेत. भ. मा. परसावळे, विनोद शिरसाठ व रूपाली शिंदे यांनी या मुलाखती घेतल्या आहेत. एक प्रशासकीय अधिकारी व लेखक म्हणून झालेली देशमुखांची त्यांची जडण-घडण व त्यांच्या वाटचालीचे दर्शन या मुलाखतीत आहे. देशमुख यांचा लेखन-स्वभाव, निर्मितीप्रेरणा, वाचसंस्कार व निर्मितिप्रक्रियेचा उलगडा करणारी अनेक रहस्ये या मुलाखतीत आहेत. प्रशासकीय कामातील अनुभव आणि भवताल, वाचनाच्या दिशा त्यामध्ये आहेत. शेवटच्या माणसाच्या संघर्षाची कथा, त्याच्या दुःख, संवेदना लेखक म्हणून त्यांनी जोडून घेतल्या आहे. या अर्थाने त्यांना गांधीवादाचे व प्रेमचंदाचे आकर्षण आहे. त्या धारेला ते स्वत:ला जोडून घेतात. वाचक व लेखक यांच्यातला संवादसेतू अधिकाधिक घट्ट होऊन उद्याच्या सुंदर भविष्यासाठीची उत्कट स्वप्ने पाहावीत असा आशावादी दृष्टिकोन त्यांच्या विचारदृष्टीत आहे. लेखक लक्ष्मीकांत देशमुख जाणून घेण्यासाठी व त्याच्या साहित्याच्या निर्मितिप्रेरणांचे रहस्य आजमावण्यासाठी या मुलाखती महत्त्वाच्या होत.
 एकंदरीतच लक्ष्मीकांत देशमुख यांच्या एकूण लेखनाविषयीच्या कामगिरीचा आलेख या ग्रंथात पाहायला मिळतो. एका लेखकाची जडणघडण, त्याचा संवेदनशील
स्वभाव, आस्थाविषय व लेखनसामर्थ्येचा याचा धांडोळा विविध अभ्यासकांच्या लेखनातून साकार झालेला आहे. देशमुख यांचे कथात्म साहित्य व प्रशासकीय लेखनाचे वेगळेपण, त्यामधील अंत:सूत्रे याची चर्चा या ग्रंथात आहे. रोमँटिक संवेदनेपासून समाजवृत्तातपर विषयाचा आलेख देशमुख यांच्या साहित्यात आहे. थीमबेस्ड स्वरूपाच्या तीन कथामाला त्यांनी लिहिल्या. अनेक नवे विषय कथाकादंबरीत प्रवेशित केले. सामाजिक जीवनाची इतिवृत्ते त्यांच्या लेखनात आहेत. समस्याप्रधान कथा म्हणून या कथारचिताला वेगळे असे मूल्य आहे. ग्रामीण महाराष्ट्राचा पाणी प्रश्न ते स्त्रीभ्रूणहत्या यासारख्या विषयावरील कथामाला या ललित दस्तऐवज म्हणून पाहता येतात. तर हरवलेले दिवस ही बालमजुरांच्या प्रश्नावरील मराठीतील एकमेव कादंबरी असावी.
 देशमुख यांच्या कथात्म साहित्यातून मोठ्या प्रमाणात राजकीय जाणिवांचे चित्रण आलेले आहे. स्थानिक स्वराज्यसंस्थेपासून ते आंतरराष्ट्रीय राजकारणाचा नकाशा त्यांच्या लेखनात आहे. सत्तास्पर्धेतील डावपेचांचे, ढासळत्या मूल्यदृष्टीचे वेगळे असे भान त्यांच्या लेखनात आहे. राजकारणाच्या या सामूहिक समाजदर्शनाचा पट निर्माण करण्यासाठी सारा समूहच त्यांनी कादंबरीच्या केंद्रस्थानी आणला. अंधेरनगरी‘इन्किलाब विरुद्ध जिहाद’मधील पात्रांची संख्या ध्यानात यावी इतक्या वैपुल्याने या पात्रांचा वावर कादंबरीत आहे. त्यांच्या कादंबरीतील राजकीय सत्ताप्राप्तीच्या रचितात लेखक म्हणून त्यांची विशिष्ट भूमिका आहे. ती आदर्शवादाच्या अंगाने उलगडले आहे. त्यामुळे कथनविषयावर त्यांच्या या मूल्यदृष्टीचा प्रभाव आहे व त्या दृष्टीने त्या साहित्यकृती नियंत्रित केलेल्या दिसतात.
 आधुनिक विचारविश्वातील मानववादी विचारांचा संस्कारठसा त्यांच्या लेखनावर आहे. त्यामुळेच ते स्वत:ला प्रेमचंद परंपरेतील लेखक मानतात. उद्याच्या सुंदर दिवसाचे स्वप्न हा आशावाद त्यांच्या साहित्याचा स्थायीभाव आहे. त्यामुळेच एक बोधवादी, आदर्शवादी, नीतिवादी जाणिवेचा प्रभाव त्यांच्या एकूण लेखनावर आहे. देशमुख यांच्या साहित्यात प्रशासकीय जीवनाचे तिथल्या बारकाव्यांसह तपशीलवार चित्रण आले आहे. त्याचबरोबर भारतीय प्रशासनाचा उदय, वाटचाल व भवितव्य यावरील त्यांचे लेखन महत्त्वाचे आहे. राज्यसंस्थाविषयक हे लेखन अकादमिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे. त्यास आंतरविद्याशाखीय अभ्यासाची जोड आहे. तसेच ते रोचक ललीत भाषेत पद्धतीने सांगितले आहे.
 गेल्या चार दशकात विविध वाङ्मयप्रकारातून लेखन करणाऱ्या लेखकाच्या लेखनाची कळसूत्रे या विविध समीक्षापर लेखात सांगितली आहेत. समकालीन समाजजीवन आणि वाङ्मयीन परंपरेच्या संदर्भात देशमुख यांच्या साहित्याची चिकित्साही या लेखनात आहे. एक लेखक समजून घ्यायला व त्यांच्या साहित्यवाचनाकडे
१८ अन्वयार्थ

जाण्याच्या दिशा या लेखनात आहेत.
 या सर्व लेखांचा समग्र विचार केला तर हे जाणवते की, देशमुख हे समकालीन वास्तवाचा ताकदीने वेध घेणारे आजचे मराठीतले एक महत्त्वाचे लेखक आहेत. त्यांनी जे अनुभवविश्व मराठी साहित्यामध्ये आणले आहे, हे त्यांचे वेगळेपण त्यांच्या साहित्यविषयक असलेल्या भूमिकेतून आणि सामाजिक भानातून आलेले आहे. त्यांच्या या साहित्यविषयक वैशिष्ट्यांचा या ग्रंथातील सहभागी लेखकांनी सखोलतेने वेध घेतला असून त्यामुळे मराठीतला हा वेगळा लेखक समजून घेण्यास निश्चित मदत होईल.
 या ग्रंथाच्या निर्मितीसाठी अनेकांचे सहकार्य लाभले. महाराष्ट्रातील जुन्या - नव्या पिढीतील नामवंत अभ्यासकांनी वेळेत लेख लिहून दिले. विशेषत: ना. धों. महानोर, डॉ. सदानंद मोरे, डॉ. अशोक चौसाळकर व डॉ. आनंद पाटील यांनी त्यांच्या व्यस्त कार्यकाळात लेख लिहून दिले, त्याबद्दल त्यांचे आर. तसेच या ग्रंथासाठी लेखन केलेल्या सर्व लेखकांचेही आधार. पूर्वप्रसिद्ध लेख लक्ष्मीकांत देशमख यांनी उपलब्ध करून दिले. देशमुख यांच्या मुलाखतीसाठी भ. मा. परसावळे, विनोद शिरसाठ व रूपाली शिंदे यांचे साहाय्य लाभले. त्यांचेही आभार. दिलीपराज प्रकाशनाचे श्री. राजीव बर्वे व त्यांचे सहकारी यांचे आभार. विष्णू पावले, प्रवीण लोंढे, सीमा मुसळे व सागर शंकर या माझ्या विद्यार्थ्यांनी या कामात मला साहाय्य केले त्यांचेही आभार.

लक्ष्मीकांत देशमुख यांची साहित्यसाधना


अविनाश सप्रे

 श्री. लक्ष्मीकांत देशमुख हे महाराष्ट्राच्या प्रशासन सेवेतील एक कर्तव्यदक्ष, कर्तबगार, कल्पक व यशस्वी प्रशासक आहेत आणि मराठी साहित्यातले प्रतिभावान व प्रथितयश सर्जनशील लेखकही आहेत. प्रशासक आणि लेखक या त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील परस्परभिन्न भूमिका नसून त्या परस्परपूरक आहेत, हे या दोन्ही क्षेत्रांतले त्यांचे वेगळेपण आहे. लेखक असल्यामुळे त्यांच्या प्रशासकीय शैलीचा चेहरा मानवी राहिला आहे आणि प्रशासक या नात्याने त्यांना जनजीवनाचा अगदी थेट व आतून बाहेरून विविध अंगाने, विविध वैविध्याने आणि वैशिष्ट्यांनी जो साक्षात अनुभव घेता आला आहे त्यामुळे त्यांच्यातला लेखक समृद्ध आणि संपन्न झाला आहे. एक माणूस म्हणूनही त्यांची जीवनदृष्टी उदारमतवादी, परिवर्तनशील, पुरोगामी आणि मानवतावादी मूल्यांच्या संस्कारांतून आणि स्वीकारातून तयार झाली आहे. बदलत्या व गतिमान विश्वाचे त्यांना भान आहे. होत असलेल्या बदलाबरोबर वाहत न जाता त्यातले बरेवाईटपण जोखण्याची चिकित्सक वृत्ती त्यांच्यात आहे. मुख्य म्हणजे, कोणत्याही परिस्थितीत आपण अंगीकारलेली नैतिकता आणि निष्ठा यावरची श्रद्धा ते अढळपणे जपत आले आहेत. त्यांचे साहित्य म्हणूनच वाचतीय तर आहेच, पण वाचकांना अंतर्मुख करणारेही आहे. सर्जनशील लेखन 'सेडेटीव्हज' सारखे गुंगी आणणारे असून नये, तर वाचकामध्ये 'प्रक्षोभ' निर्माण करणारे (इरेटिव्ह) असायला हवे, असे प्रख्यात फ्रेंच लेखक ज्याँ पॉल सार्चने म्हटले आहे. लक्ष्मीकांत देशमुख यांचे लेखन अशा स्वरूपाचे आहे. एक लेखक म्हणून देशमुख यांना The insulted and the injured ...... The poor folk (डोस्तोव्हस्कीचे शब्द) बद्दल मनापासून कळवळा आहे आणि त्यांच्या भल्यासाठी साऱ्या प्रतिकूल परिस्थितीतही झगडणाऱ्यांबद्दल आदर आणि आस्था आहे.


 'पाणी! पाणी!' (कथासंग्रह, १९९८), 'अग्निपथ' (कथासंग्रह, २०१०), 'नंबर वन' (कथासंग्रह, २००८), 'अंधेरनगरी' (कादंबरी, १९९४), 'ऑक्टोपस' (कादंबरी) आणि 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' (कादंबरी) ही लक्ष्मीकांत देशमुख यांची साहित्यसंपदा आहे. या साहित्यातून त्यांनी समकालीन जीवनातील वास्तवाचा धीट आणि भेदकपणे वेध घेतला आहे.

 'पाणी! पाणी!!' आणि 'नंबर वन' मधल्या सर्व कथा 'थीम बेस्ड' आहेत, हे त्यांचे एक खास वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल. 'पाणी! पाणी!!' मध्ये पाणी हे मध्यवर्ती विषयसूत्र आहे. गोरगरिबांची पाण्याअभावी होणारी भयानक परवड आणि धनदांडग्यांनी केलेली पाण्याची लयलूट हे आजच्या ग्रामीण जीवनाचे अंगावर येणारे व शहारे आणणारे वास्तव आहे. शासकीय योजना, त्या राबवणाऱ्यांची मनोवृत्ती, हितसंबंधाचे राजकारण, गोरगरिबांच्या हाल-अपेष्टा, शोषण, धनदांडग्यांची मुजोर वृत्ती आणि एकूणच उजाड होत चाललेली खेडी - याचे भेदक दर्शन या संग्रहातल्या कथांतून घडवण्यात आले आहे. 'नंबर वन' या कथासंग्रहाचे मध्यवर्ती सूत्र क्रीडाविश्व हे आहे. खेळ-खेळाडू, त्यांच्यातील स्पर्धा, असूया, द्वेष, क्रीडाक्षेत्रातले राजकारण, खेळाडूंची यश मिळण्यासाठी आणि अच्युच्च पदावर पोहोचण्यासाठी चाललेली अखंड धडपड, खेळाडूंचे खासगी जीवन, खेळातले जय-पराजय, खेळाडूंना मिळणारी प्रसिद्धी इ. मधले रोमांचकारी अनुभव 'नंबर वन'मधल्या कथांतून आविष्कृत झाले आहेत.
 लोककल्याणासाठी निर्माण करण्यात आलेल्या सर्व प्रकारच्या व्यवस्था आणि संस्था यांमध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार, साध्य-साधनविवेकाला मूठमाती दिलेले अनैतिक राजकारण, समाजातील हासशीलता, मूल्यांची घसरण, व्यक्तिगत जीवनात आलेली हतबलता, अगतिकता, असहायता हे आजचे वास्तव आहे. आदर्शवादाला तर या वास्तवाने मूठमातीच दिली आहे. अशा विपरीत स्थितीतही आपण स्वीकारलेल्या भूमिकेशी प्रतारणा न करता, तडजोड न करता संघर्ष करणाऱ्यांचा जीवनकथा 'अग्निपथ'मध्ये वाचायला मिळतात. या संघर्षाचे मोल यशापयशाच्या तराजूने जोखायचे नसते. I think, I am right, I constitute the majority of one.' (थोरो) अशी त्यांची दृढ श्रद्धा असते. किंमत देऊन 'आतला आवाज' ऐकणाऱ्या अशा व्यक्ती अल्पसंख्यच असणार; पण त्यांचे असणे, त्यांच्या कृती (आणि प्रसंगी त्यांना आलेले अपयशही) प्रेरक असतात; जीवनावरची श्रद्धा टिकवणाऱ्या असतात. एक लेखक या नात्याने श्री. लक्ष्मीकांत देशमुख अशांचे महत्त्व आणि माहात्म्य 'आग्निपथ' मधून अधोरेखित करतात.
 हेच आशयसूत्र लक्ष्मीकांत देशमुख यांनी 'ऑक्टोपस' आणि 'अंधेरनगरी'
या कादंबऱ्यांतून व्यापक अवकाशात प्रस्तुत केले आहे. शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते अशा विविध सुविधांच्या रूपात शहरसुधारणा व विकास करण्याच्या हेतूने नगरपालिका ही संस्था अस्तित्वात आली आणि लोकशाहीच्या मार्गाने लोकांच्या प्रतिनिधींचा त्यामध्ये सहभाग करण्यात आला. कल्याणकारी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन यंत्रणा निर्माण करण्यात आली. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनवर्गाने परस्परांना पूरक राहून कारभार करावा, असे अपेक्षित होते. कालौघात या संस्थांतही हितसंबंधाचे व सत्तेचे राजकारण सुरू झाले आणि बघता बघता त्याचे स्वरूप निंद्य आणि अमानुष झाले. अशा संपूर्णपणे प्रतिकूल वातावरणात अत्यंत कर्तव्यदक्षतेने आणि सामाजिक बांधिलकीने काम करणारे नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. भांगे यांना केंद्रस्थानी ठेवून श्री. देशमुख यांनी 'अंधेरनगरी' या कादंबरीतून नगरपालिका या महत्त्वाच्या संस्थेची सर्जनशील चिकित्सा केली आहे आणि ती आजच्या वास्तवातली प्रातिनिधिक आहे.
 'ऑक्टोपस' या कादंबरीतही हेच दाहक वास्तव आले आहेत. 'ऑक्टोपस'सारखी सर्व बाजूने वेढलेली भ्रष्टाचारी व्यवस्था, व त्यात धैर्याने आणि धीटपणाने प्रशासन करणाऱ्याची होणारी दमछाक या कादंबरीत प्रभावीपणे मांडली आहे. 'अंधेरीनगरी'मध्ये एक शहर आहे; तर या कादंबरीत संपूर्ण जिल्हा आला असून जिल्हाधिकारी, त्यांचे दोन कर्तव्यदक्ष सहकारी कादंबरीच्या केंद्रस्थानी आहेत. महसूल खात्याची संपूर्ण जिल्हास्तरावर वावरणारी प्रशासकीय यंत्रणा, तिच्यात वावरणारे भ्रष्ट नोकरदार, त्यांचा वापर करून घेणारे राजकारणी, हितसंबंधांचे राजकारण, समाजकारण अशा विविध पडताळ्यांवरून यातल्या वास्तवाचा अंतर्वेध घेतला जातो. अशा वास्तवात काम करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्याचे कौटुंबिक भावजीवन, त्यातली ओढाताण व ताणतणाव कसे निर्माण होतात, हेही लक्षात येत राहते. अनेक भल्याबुऱ्या व्यक्ती, प्रसंग आणि घटनांतून ही कादंबरी गतिमान होते आणि वाचकाला खिन्न करून टाकते. व्यवस्थेत राहून व्यवस्थेच्याविरुद्ध झुंज देणे किती अवघड आहे, हे या कादंबरीतून पुनः पुन्हा लक्षात येते. ही व्यवस्था ध्येयवादी अधिकाऱ्यांचा पुन: पुन्हा पराभव करण्यातच धन्यता मानते आणि अशा व्यक्तीला व्यवस्थेतून बाहेर पहायला भाग पाडते. गाव, तालुका आणि जिल्हास्तरावर वावरणाऱ्या एका महत्त्वाच्या व्यवस्थेचे भ्रष्टाचारी स्वरूप आणि त्यात वावरणारी क्षुद्र, स्वार्थी माणसे यांचे अस्वस्थ करणारे दर्शन 'ऑक्टोपस'मध्ये विलक्षण प्रत्ययकारी स्वरूपात घडवण्यात आले आहे.
 लक्ष्मीकांत देशमुख यांच्या या सर्व कथाकादंबऱ्या महत्त्वाच्या आहेतच. पण 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' ही ९३४ पानांची बृहद् कादंबरी हे त्यांचे मराठ

२२ ० अन्वयार्थ कादंबरीविश्वाला (आणि म्हणून मराठी साहित्यविश्वाला) दिलेले अत्यंत महत्त्वाचे आणि मोलाचे योगदान आहे. प्रादेशिकतेच्या मर्यादा ओलांडून श्री. देशमुख यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या विषयाचे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले आहे. ही कादंबरी अफगाणिस्तानसारख्या अति संवेदनशील राष्ट्राच्या भौगोलिक परिसरातून निर्माण झालेल्या दहशतवादी राजकारणातून निर्माण होते; त्यामागे असलेल्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचे धागे-दोरे दाखवून देते. इथल्या दहशतवादाचे व्यक्ती - समाज आणि राष्ट्रजीवनावर झालेले विपरीत आणि उद्ध्वस्त करणारे परिणाम सांगते आणि असे करताना अफगाणिस्तानचा वैशिष्ट्यपूर्ण भूगोल, इतिहास, संस्कृती, कुटुंब व्यवस्था, धर्माचा पगडा, सामाजिक जीवन, परंपरा, राजकारण, अर्थकारण, इथला निसर्ग, वेळोवेळी झालेल्या क्रांत्या, आक्रमण, त्यांचे रक्तरंजित स्वरूप, सत्तांतरे, ती घडवून आणणाऱ्या व्यक्ती, दहशतवादाचा उदय आणि तो निर्माण करणाऱ्या संघटना, त्यांना मिळालेले छुपे आणि उघड पाठबळ, दहशतवादाचे हिंस्र स्वरूप आणि एकूणातच एका संपूर्ण राष्ट्राची झालेली शोकांतिका श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांनी फार फार समर्थपणे व प्रभावीपणे चित्रित केली आहे. त्यासाठी त्यांनी वापरलेला 'रूपबंध' (form) ही नावीन्यपूर्ण आहे. ही कादंबरी नुसती 'फिक्शन' (Fiction) नाही, तर ‘फॅक्शन' (Faction) आहे. याचा अर्थ अफगाणिस्तानाशी संबंधित असलेल्या अधिकृत ‘फॅक्टस' आणि सृजनशीलतेने निर्माण केलेल्या कल्पितांच्या (fiction) संयोगातून या कादंबरीची निर्मिती झाली आहे, म्हणून ही कादंबरी म्हणजे 'फॅक्शन.' हा एक प्रयोग आहे आणि तो यशस्वी झाला आहे. अनेक पात्रे, प्रसंग, घडामोडी, उलथापालथी यांची रेलचेल असणारी ही कादंबरी समकालीन आंतरराष्ट्रीय राजकारणाचे धक्कादायक अंतरंग दाखवणारी मराठीतली एकमेव कादंबरी आहे, कादंबरी या वाङ्मयप्रकाराचा आवाका केवढा मोठा असतो, त्याचे सामर्थ्य आणि सौंदर्य कसे असू शकते याचा एक वस्तुपाठच या कादंबरीने घालून दिला आहे.
 'एक लेखक म्हणून मी हे जग बदलू शकणार नाही; पण बदलणारे जग कसे असायला हवे, यासाठी भूमिका घेणाऱ्यांमधला मी एक निश्चितच असेन' असे अल्बेर कामूने म्हटले आहे. श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांचीही अशीच दृष्टी आहे, असे त्यांचे साहित्य वाचून वाटते.

अन्वयार्थ । २३








'

भाग २
लक्ष्मीकांत देशमुख यांचे कथाविश्व





















२६ अन्वयार्थ

देशमुखांची कथा : जीवनमूल्य आणि वाङ्मयसौंदर्य
प्रा. राजशेखर शिंदे
॥ १ ॥

 लक्ष्मीकांत देशमुख हे संवेदनशील व प्रातिभ व्यक्तिमत्त्वाचे अधिकारी व प्रतिभावान लेखक आहेत. ते प्रशासनात होते. प्रचंड वेळखाऊ सेवेत असूनही त्यांनी साहित्याची निर्मिती केली. आणि तेही जीवनसंबद्ध अशा साहित्याची. प्रशासनात कल्पितकल्प साहित्याची निर्मिती (अगर वाचन करणे) म्हणजे आलेला ताण किंवा शिणवटा घालवण्याची मौज! ही मौज लक्ष्मीकांत देशमुखांना परवडणारी नव्हती. हलकेफुलके, चुरचुरीत स्वरूपाचे लेखन करून वाचकांच्या अभिरुचीची आराधना करून लोकप्रिय रंजनपर निर्मितीच्याद्वारे ललामभूत होताही आले असते. 'अंतरीच्या गूढगर्भीत' तसा सूरही त्यांना लागला होता. त्याला बहुपेडी वीण घालणे शक्य होते. परंतु ते तसे न करता ज्या उद्देशाने, प्रेरणेने मुलकी सेवेत ते गेले तो उद्देश आपल्या कार्यात, विचारात आणि कल्पनासंबद्ध निर्माणशील सृजनशील आविष्कारातूनही सफल केला. प्रशासकीय सेवा साध्य न मानता साधन बनवून जीवनानंद भोगला आणि काही कृतीशील विचारांतून जीवन आणि समाज कसे सुंदर करता येईल हे आपल्या शब्दशिल्पातून सांगितले.

 लक्ष्मीकांत देशमुखांच्या पहिल्या कथासंग्रहापासून आज उपलब्ध असणाऱ्या शेवटच्या कथासंग्रहापर्यंत आपण वाचत गेलो तर त्यांच्या कथावाङ्मयात श्रेष्ठतर अशा मानव्याचे दर्शन घडते. रोजच्या जीवनात आपण अनुभवलेले व क्षुद्र वाटणारे प्रश्न त्यांनी मांडले आहेत. ते त्यावर आघात करत हळहळ उत्पन्न करतात. संबंध समाजाची करुणा उत्पन्न करत त्यांची कथा मानवतेचीच आराधना करते. त्यामुळे ती उन्नत आणि समाजहितैषी असल्याने ऊर्ध्वस्वल वाटते. ती उच्चतर रंजन आणि व्यापक प्रबोधन साधणारी कथा असल्याने मराठी वाङ्मयातील देशमुखांच्या या

अन्वयार्थ । २७

कथा म्हणजे मखमली पलिता आहेत. कथांविषय प्रबोधनपर असूनही नीरस, विरस आणि विटलेपणाचा लवलेशही नाही.

॥२॥

 लक्ष्मीकांत देशमुखांनी दहाव्या-बाराव्या वयालाच लेखनाला सुरुवात केली. त्यांच्या काही कथा सा. साधना, साप्ताहिक स्वराज्यमधून शालेय वयातच प्रकाशित झाल्या आहेत. पण चांगल्या संग्रहाच्या रूपात त्यांच्या कथेचे पहिले पुस्तक 'अंतरीच्या गूढगर्भी' जाने १९९५ मध्ये प्रकाशित झाले. · २००७ मध्ये ‘पाणी! पाणी', 'नंबर वन' (२००८), 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' (२०१३) अशी त्यांची आजवर प्रकाशित कथापुस्तके आहेत. या कथांचा परंपरेच्या कथेहून भिन्न असा एक विशेष आहे. परंपरेच्या कथा व्यक्तिभोवती फिरणाऱ्या, आशय वा व्यक्तिकेंद्री कथा असतात. देशमुखांच्या कथा व्यक्तिजीवनाच्या भोवती असणाऱ्या वा एखाद-दुसऱ्या व्यक्तीच्या सुखदु:खाचे चित्रण करणाऱ्या कथा नाहीत. त्या संपूर्ण गावाच्या, प्रदेशाच्या परिसरातील समस्येच्या, व्यवस्थेच्या, व्यवस्था लावणाऱ्या व्यवस्थेच्या कथा आहेत. समाजाच्या महावस्त्रावरचे हे विणकाम आहे. या लेखकाच्या कथांत येणाऱ्या व्यक्ती या घटकमात्र असतात. त्यांच्यायोगे लेखकाने सौंदर्य निर्माण केलेले आहे.
 दुसरा एक महत्त्वाचा विशेष म्हणजे देशमुखांचे कथालेखन एकसूरी नाही. चारही संग्रहांचे विषय आणि आशय निराळा आहे. एकीचा विषय दुसरीत असे 'पाणी घालून कढीला उतू' आणलेला नसतो. समोर येणाऱ्या समस्येचा हरएक पातळीवरून शोध घेणे या ध्यासातून या कथा आपोआपच अंकुरतात. विषय वेगळा म्हणून आशयाचा वेषसुद्धा संग्रहानुसार नवा. प्रत्येक कथेत जनसमुदाय असतो, किंवा मग ती समुदायावर बेतलेली असते. 'अंतरीच्या गूढगर्भा' तून जन्मून सबंध अवनीतलात विहरणारी, व्यापक पटलावरील गाभ्याला भिडणारी ही कथा आहे.
 प्रत्येक कथापुस्तकाचा एक विषय, आशयाची अनेक आवरणे, तितकाच त्यातील साधेपणा मनाला मोहित करणारा आणि विषयाच्या अनुषंगाने त्यातील रचनाकौशल्य, कलात्मदृष्टी मनाला थक्क करणारी आहे. देशमुखांच्या या कथांच्या विषयी उदात्तीकरण करून म्हणायचे झाल्यास गद्यरूपातील भौतिक जीवनगाड्याचे (आध्यात्मिक नव्हे) सारथ्य करणाऱ्या महंताच्या कथा आहेत. कारण या कथांच्या मागील उद्देश समाजाचे मांगल्य व माणूसपणाचे हितरक्षण असा आहे. माणूस म्हणून सुसंस्कृत समाजात जगताना 'राजाला' सर्व समाजाचे दुःखकारण कळले पाहिजे. प्रजेला, समाजालाही कर्तव्यपराङ्मुख होता येत नाही. अशा प्रबोधनाच्या
२८ । अन्वयार्थ

उद्देशाने प्रेरित झालेल्या कथा आहेत. म्हणून आधुनिक काळातील संतत्वाचा वेश असे या कथांविषयी म्हणता येईल.
 कथाकारांनीच आपल्या कथा 'थीमबेस्ट' आहेत, असे म्हटले आहे. वरील प्रबोधनविचार थीमबेस्डस लागू होतो. संतांना समाजाविषयी कणव, कळवळा होता. 'थीमबेस्ड' ची जातकुळी हीच असते. जेव्हा कणव आणि कळवळा यांचा अश्रू पुसण्याचा उद्देश असतो तेव्हा अशा स्वरूपाच्या वाङ्मयाचे मूल्यही त्यातच शोधावे लागते. साहित्याच्या तत्त्वज्ञानामधून ते पारखून पाहायचे नसते. याउलट देशमुखांच्या थीमबेस्ड वा प्रबोधनपर मूल्य असलेल्या कथांच्या वाङ्मयमूल्यांची विचक्षणा केली तरीही त्या सरस व दीप्तिमान वाटतात. कलात्म बांधणीतून एकही सुटलेली अगर ढिसाळ रचना झालेली नाही. कलात्मदृष्ट्या प्रत्येक कथा तर्कसंगत व रचनागत सौंदर्य असलेली अशीच आहे. प्रबोधन वा थीमबेस वाङ्मय रसवत्तेच्या दृष्टीने मिळमिळीत होते, पण इथे हाही दोष उत्पन्न होत नाही. 'पाणी! पाणी!' हा आक्रोश चिंतन करायला प्रवृत्त करतो; 'नंबर बन' मधील खेळाडूंमधील माणसांच्या कथा वाचताना अनेक प्रश्न उपस्थित होतात तर 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' तील कौर्याच्या परमसीमेने काळीज कापते. या रचनेतील नाट्याचा आणि भावनिक संघर्षाचा एक थरार आपण अनुभव म्हणून या कथा प्रबोधनाला वाङ्मयमूल्य प्राप्त करून देतात.

॥३॥

 देशमुखांच्या कथेला निश्चित असा विकासक्रम आहे. दर एका कथा-पुस्तकात नवीन विषय, नवीन आशय आणि नवा थीमबेस-रेनिसाँ-असे कथालेखनाचे सूत्र दिसून येते. 'फिरूनी नवी जन्मेन मी' हा त्यांचा थीमबेस आहे. 'माझ्या घरी मी पाहुणी' का, हा त्यांच्या कथेच्या अवकाशातील शोधाचा विषय होतो.
 कूस उजवणे व कूस बदलणे हे शब्दप्रयोग वेगळ्या संदर्भात उपयोजले जात असले तरी दरवेळेला नवीन रंगारूपाचे कथाविषय असल्याने येथे हे शब्द उचितच वाटतात. 'अंतरीच्या गूढगर्भी' हा लक्ष्मीकांत देशमुखांचा पहिला संग्रह. यावर रोमँटिक अटिट्यूडची छाया लख्खपणे दिसून येते. या कथापुस्तकात एक आत्मरत 'मी' आहे. तो म्हणतो, “स्वत:बद्दल सांगणं तितकंस योग्य नाही. तरीही आत्मस्तुतीचा दोष पत्करून मला हे नमूद करावेसे वाटते की, माझं व्यक्तिमत्त्व बरचं वैविध्यपूर्ण आहे. तसा दिसायला मी गोरागोमटा आहे थोडासा फॅटी असलो असलो तरी छाप पडावी अशी उंची व तब्येत आहे." (अंतरीच्या गूढगर्भी : माझे अबोलणेही : ११७) हे स्वच्या आत्मरत वृत्तीचे दर्शकच आहे. (कथाकारही असेच वर्णन

अन्वयार्थ । २९

केलेल्याप्रमाणे दिसतात!)
 देशमुखांची जीवनदृष्टी अत्यंत नितळ सौंदर्यवादी आहे. 'माझ्या जगण्याचे तत्त्वज्ञान' विषयावर व्याख्यानात ते म्हणाले होते की, “मी सौंदर्यासक्त आहे. या सौंदर्यासक्त वृत्तीने माझ्या जगण्याला बळ मिळते. आणि स्त्री मला अनेक नात्याने व रूपाने भेटते. तिचे सौंदर्य मला प्रेरक ठरते.” (गणेशोत्सव : जनता सहकारी बँक व्याख्यानमाला सोलापूर, ३० ऑगस्ट ९४). सौंदर्यासक्त असले तर संदिग्धपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा म्हणून पर्यवसायी साहित्याचा विशेष नाही. आपले जीवन, आपली वृत्ती (व्यवसाय साधन) आणि साहित्य निर्मिती यात अंतर ते करीत नाहीत. आणि म्हणूनच रसरशीत जीवनासक्ती 'अंतरीच्या गूढगर्भी कथापुस्तकाची प्रमुख प्रेरणा झाली आहे. हा नायक आत्मरत असल्याने ते कथापुस्तकही काव्यात्म झाले आहे. यामध्ये अधीरता, हुरहुर आणि तरीही नायक स्व-जीवनाविषयी सजग असलेला दिसतो. 'अंतरीच्या गूढगर्भी' तील सर्व सतरा कथांचा नायक एकटा 'मी' च आहे. तो 'सतरा वेळा' आपल्या अनेकविध तळा - कळांमधून व्यक्त झाला आहे.
 देशमुखांची काव्यात्मशैली आणि विशिष्ट असा सौदर्यासक्त संवेदनस्वभाव त्या एकाच संग्रहात ‘ग्रथित' (इथे ग्रथित म्हणजे शब्दबद्ध - असा अर्थ) झाला आहे. या संग्रहानंतर त्यांचा संवेदनस्वभाव व पिंडधर्मही पालवलेला व पालटलेला दिसतो. नंतरच्या कथेची प्रेरणा व प्रयोजन हे समाजस्थितीचे दर्शन, लोककल्याण, जागृती राहिली आहे. आपले जगणे आणि आपली निर्मिती यामधील अंतर त्यांनी मिटवलेले आहे. जीवनोद्देश आणि साहित्यप्रयोजन हे एकच साधन केले आहे. 'पाणी! पाणी!', 'नंबर वन', 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' या कथापुस्तकांत आपल्या प्रतिभाधर्माची ऊर्जा समाजाच्या उन्नयनासाठी उपयोगात आणली आहे. आणि या तिन्ही कथांपुस्तकांतील कथानायक हा प्रशासकीय अधिकारी आहे. तो आपल्या जनतेकडे पालकत्वाच्या, बापाच्या भूमिकेमधून पाहतो आहे. त्यामुळे त्याच्या ठिकाणी सामान्यातिसामान्यांविषयीची ममतेची भावना प्रकट झालेली आहे.
 'अंतरीच्या गूढगर्भी' त १७ कथा, 'पाणी! पाणी'त - १४, ‘नंबर वन'मध्ये १० व 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी'त ८ कथा व दिवाळी २०१४ च्या वेगवेगळ्या अंकात प्रकाशित ६ कथा अशा आज एकंदर ६० एक कथा उपलब्ध आहेत. प्रस्तुत लेखात प्रत्येक कथेचा विचार केलेला नाही. विश्लेषणाच्या उपयुक्ततेनुसार व सोयीनुसारच कथा घेतलेल्या आहेत.


३० अन्वयार्थ

॥४॥

 'अंतरीच्या गूढ गर्भी' त सेक्स भावनेचे आकर्षण प्रकर्षाने जाणवते. प्रेम भावना ही आदिम भावना आहे. ती स्त्री-पुरुष सहवासातून व्यक्त होते. संग्रहामधील तीन कथानायक अविवाहित आहेत. पीएच. डी. संशोधन मार्गदर्शकाशी न पटल्याने बँकेची चालून आलेली नोकरी धरतो आणि मैत्रिणींचे स्मरण करतो. त्यांच्याशी पत्रव्यवहारही करतो. “असं म्हणतात की हा प्लॉटोनिक प्रेमाचा प्रकार आहे व आज तो कालबाह्य आहे. आजचं मॉडर्न प्रेम शरीराच्या माध्यमातून जमतं व फुलतं. असेलही कदाचित ..... पण माझा तर असा अनुभव आहे. मी मराठवाड्याचा आहे व एक औरंगाबाद शहर सोडलं तर इतरत्र साधं मुलीशी चार शब्द बोलणेही दुर्मीळ असतं. पुण्याला काय चाललंय याच्याशी आपल्याला कर्तव्य नाही. खुद्द औरंगाबादही खूपच मॉडर्न बनलं आहे. माझे अनेक मित्र आपल्या अफेअरची रसीली चर्चा माझ्यापुढे करतात. खोटं कशाला सांगू, मला त्यांचा हेवा वाटतो.” (स्वत:च्या मनाचा एक्सरे रिपोर्ट : ३५) अशी सुप्त इच्छा मनात आहेच. त्यांच्या सहवासात तो फुलारतो, त्याची वृत्ती-प्रवृत्ती बहरून येते. सेक्स भावनेचे मुक्त चिंतन आहे. ती भावना म्हणजे काय यावर समंजसपणे, मोकळेपणाने कथारूपामधून विचार प्रकट झाले आहेत. स्त्री-पुरुष मीलनाला सृजनक्रीडा समजली आहे. त्यामुळे विवाहाशिवाय आलेले मातृत्व मोठ्या आवडीने स्वीकारले जाते. रिटा म्हणते. “माझं मातृत्व स्वैराचार नव्हता. मी वासनेला नेहमीच दुय्यम-सेकंडरी समजते. पण माझ्यासारखीला - जी मॅच्युरिटीच्या एका विविक्षित पॉइन्टपर्यंत पोहेचलेली आहे - मला सेक्स - वासना कधीही प्रथम दर्जाची, सर्वाधिक निकडीची वाटणार नाही. ही विकृती खचितच नाही. कारण मलाही देहधर्म आहेत. पण देहाची कायमची सोय व्हावी म्हणून लग्नाचं बंधन मला साफ नामंजूर आहे.” (सृजन कसा तडफड करी! पृ. १६३)
 सेक्स भावनेचा अत्यंत मोकळेपणा 'बास्टर्ड' कथेत आला आहे. शेवता पारधीण काळीभोर पण आकर्षक बांधा आहे. तिच्या दारू गाळण्याच्या कौशल्यामुळे नानासाहेब देशमुख तिला आपलेसे करतो. तीच त्याला ठेवून घेते. त्याच्यापासून तिला गोरागोमटा मुलगा होतो. देशमुखाच्या मृत्यूनंतर ती पाटलाला ठेवून घेते. याबद्दल तिचा मुलगा बबन विचारतो, तेव्हा ती आपल्या मुलालाच म्हणते, “तुला आज कळलं व्हय? आपलं समदं खुल्लम खुल्ला असतंया. अजून मी बुढी नाय झाले. अजून आग हाय इथं.” आग असणाऱ्या जागेला हात लावून मुलाशी बोलणारी बाई विरळाच! या शेवंताच्याविरुद्ध वर्तनाची देशमुखाची पत्नी, आई आणि 'हे खेळ मनाचे सारे' कथेमधील श्रीची आई. तरुणपणी विधवा झाल्याने लहानशा श्रीवर लक्ष केंद्रित करते

अन्वयार्थ । ३१

आणि श्री डॉक्टर झाल्यावर सर्व स्थिरस्थावर झाल्यावर कामभावना उत्पन्न झाली तेव्हा तिचे ती दमन करते. आणि तिच्यामध्ये भावगंड निर्माण होतो. तरुणपणात पुरुषसंग सोडलेल्या स्त्रीला आता प्रौढपणी, वृद्धत्वाकडे झकुताना ‘साहचार आठवल्याने' ती भ्रम झाल्याप्रमाणे वागते. “मी बाई आपली साधीसुधी, जुन्या बाळबोध वळणाची आहे. माझं पाऊल वाकडं पडणं शक्य आहे? मास्तर सारखं माझ्याकडं पाहतात, त्यांची नजर पापी आहे. ती माझा पाठलाग करते रे. मला भीती वाटते श्री!" श्रीची आई हे बोलते तेव्हा श्रीच्या मनात संशयाची पाल चुकचुकते. खरे तर बऱ्याच दिवसांपासून मनात दडून राहिलेली शिरीशिरी उफाळून येते; परंतु ती त्या भावनेचे अस्तित्व नाकारते आणि मनाच्या बेसावध अवस्थेमध्ये भयगंडासारखे वाटू लागले. लैंगिक सुखाची ओढ समजून उमजूनही ती नाकारते. मुलगा ही गोष्ट समजून घेतो आणि आईला शॉक ट्रिटमेंट देऊन घेतो. तिच्या मनातील वासनेचा निचरा होतो. 'ब्रदर्स फिक्सेशन' कथेत बहिणीला भावाची आंतरिक ओढ आहे. खेळाडू असणाऱ्या नवऱ्याला महत्त्व न देता आपल्या भावाचे कौतुक बहीण करते. दोघेही क्रिकेटर; मात्र ती भावाच्या ठिकाणीच पुरुष बघते आणि त्याच्याशी नवऱ्याची तुलना करू लागते. नवऱ्याची विकीची डबल सेंचुरी हुकलेली असताना त्याचे तिला - स्विटीला - काहीच वाटत नाही. परंतु भावाचे कॅलेंडर इयरमधील रेकॉर्ड हुकल्याचे तिला वाईट वाटते. भावाचीही बहिणीविषयीची - स्विटीची - ओढ आहेच. बहीण आपल्या नजरेसमोरच राहावी, तिला हवे तेव्हा भेटता यावे म्हणून तो बहिणीला आपल्या क्रिकेटर मित्राला देतो. त्याच्याशी तिचा विवाह झाल्याने त्याची समस्या सुटते. कुठल्याही देशात गेल्यानंतर तो बहिणीसाठी खरेदी करीत असतोच. विकी म्हणतोसुद्धा, "अरे भाई, आता ती माझी पत्नी आहे मी आहे ना, तिची हौस पुरवायला." तो शेवटी या नात्याला 'ब्रदर्स फिक्सेशन' असे नाव देतो.
 सौंदर्याच्या ओढी, सुप्तावस्थेमधील सेक्स, सृजनाचा साक्षात्कार या अंतरीच्या गूढगर्भातील विशेष गोष्टी होय. 'राधा', 'जोकर', 'सृजन कसा तडफड करी!', 'मर्सी किलिंग' या कथांमध्ये सृजनाची निर्मिती प्रक्रिया प्रतिबिंबित झाली आहे. पु. शि. रेगे हे आत्मनिमग्न कवी. रेग्यांनी प्रेमभावना व वासना या गोष्टींना व्यक्तिवाची रूपातून काढून वैश्विक, चिरंतन असे भावरूप काव्यातून प्रकट केले आहे. रेग्यांची 'राधा', त्रिधा राधा, 'बुंथी', 'चापेचिया पिवळा पवळण.....' या कविता प्रेमभावनेच्या नितांतसुंदर आवाहक स्वरूपाच्या आहेत. राधा-कृष्ण यांचा प्रेमविषय भारतीय मनाला आवडता विषय आहे. ते लोभस मिथक भारतातील अनेक कलावंतांनी उचललेले आहे. राधा-कृष्ण हे एकरूप, निरपेक्ष प्रेम कवितेत जसे प्रकटलेले दिसते तसे ते कथेमधून, लघुपट, काव्यातून घेणे म्हणजे कलेचे प्रकारांतरण होय. कलेला

३२ 0 अन्वयार्थ 

नुसतेच प्रकारांतरण नसून ते एक श्रेष्ठतर रूपांतरणही झाले आहे. ज्या कवितांत कथेचा अंश नाही, त्या कवितांतून लघुपट तयार करण्यासाठी अभिजात अशी कलादृष्टी असावी लागते. निर्मिती अनेक पदरातून, प्रकारातून आपले आविष्कृत रूप घेते. 'राधा' लघुपटातून कविवर्य पुरु शिव रेगे त्यांच्या मृत्यूनंतर वाहिलेली श्रद्धांजली होय. एखाद्या लेखकाला जागतिक स्तरावरही अशा पद्धतीने श्रद्धांजली वाहिलेली नसेल; असेलच तर क्वचितच. मराठीत तर अशा स्वरूपाचा हा पहिलाच प्रयोग आहे.
 राधेचे भावविव्हल रूप आदिबंधाच्या प्रतिमेतून प्रकट केले आहे. कृष्ण विषयरूप तर राधा आश्रयरूप आहे हे 'त्रिधा राधा' या कवितेमधून अप्रतिम दाखविले आहे. राधेच्या तीन रूपांचे अवस्थांतरण केले आहे. फुगडी, पार्श्वसंगीत, प्रकाश, ढगाळ झाकोळ, वाडा, राजस्थानी शैलीतील चित्रे, पडदा, रंगीबेरंगी परंपरागत वेषभूषा एवढ्याच साधनावर एक लघुपट तयार करणे कठीण. राधेचा उत्सुक शिणगार, तिची अधीरता, भावविभोरपणा दाखवून पडद्यावर दृश्यमालिका दाखविणे अवघड गोष्ट सोपी केली आहे. नुसते याच कथेत हा लघुपट येत नाही तर 'हे खेळ मनाचे सारे' ही उत्तम कथाच आहेच. सौंदर्याचा ध्यास आणि आस्वाद नाही, तर सौंदर्याची सहजाणिवेच्या रसिकांना लक्ष्मीकांत देशमुखांनी साक्षात प्रतीती दिलेली आहे. सौंदर्याचा आविष्कार स्व-जाणिवेतून प्रकट करणे तसे सुलभ आहे. परंतु प्रकट झालेल्या एका उत्कट भावनेमधून पुन्हा नवनिर्मिती - ही खचित दुष्कर. ते येथे साकार झाले आहे.

॥५॥

 'पाणी! पाणी' हा जगण्यासाठीचा आक्रोश करत फिरणाऱ्या खेळाडूंच्या माणसातील अलौकिक 'नंबर वन' शोधता शोधता 'सावित्रीच्या गर्भात लेकी मारल्या' जात असल्याची जाणीव जगण्यात भयानक पोकळी निर्माण करते. समकालीन मेलोमॅटिक ग्रामीण कथांपेक्षा 'पाणी! पाणी!' चा दर्जा कितीतरी वरचा आहे. देशमुखांच्या कथा या भयातून सुटलेल्या आहेत. त्यांच्या 'पाणी! पाणी!' करत फिरणाऱ्या 'नंबर वन! च्या 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' पर्यंत कथा भावविभोर, भावगंतवळीच्या आणि उत्कृट झाल्या आहेत. त्यांच्या या कथा समकालीन मेलोड्रॅमॅटिक ग्रामीण कथांपेक्षा कितीतरी वरच्या दर्जाच्या आहेत.

 थीमचे अंत:करण बाळगणाऱ्या कथांचा बाह्यवेष सृजनरंगाचा आहे. कथेला मिळणारी कलाटणी, वळण नि घेतलेले वळसे अत्यंत कलापूर्ण सौष्ठवाचे आहेत. अशा स्वरूपाच्या कथेत तर्क असतो. हा तर्क कठोर न करता, तर्कदष्ट न करता कथेच्या आशयात कणव आणि कळवळा उत्पन्न निर्माण केला आहे. भावनिक ओढ - नात्याची किंवा मग घेतलेल्या वश्याची असेल - व तीमध्ये जिवट ओलावा हा या

अन्वयार्थ ३३

कथांचा स्थायीभाव असतो. म्हणून या कथा वाचताना हटकून घेतलेली प्रचारकी भूमिका प्रसरण केली जात आहे, असे जाणवतही नाही. कथामूल्यात भावनेची परिणती असते. ही भावपरिणती वाङ्मयमूल्य रूपात झालेली असल्याचे ध्यानात येते. 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' ह्या अत्यंत गंभीर विषयाच्या कथा थीमबेस्ड वाटत नाहीत तर मुळातच माणूसपणाच्या संरक्षणार्थ घेतलेली हितैषी भूमिका वाटते. आतून हेलावून टाकणाऱ्या कथा आहेत.
 १९९७ साली प्रकाशित झालेला 'उदक' हा संग्रह २००७ साली 'पाणी! पाणी!' अशा आक्रोशाच्या शीर्षकाने प्रकाशित झाला आहे. मुखपृष्ठावरील मृगजळ आणि तडकून फुटलेला माठ या चित्रामधून पाण्याचे भीषण दुर्भिक्ष्य ध्वनित केले आहे. ग्रामजीवन अनेक पातळीवरून भयावह होऊन भेटते. किती समस्यांना लेखकाने संवेदनशीलतेने सामोरे जावे? तरीही दर एका समस्येत लेखकाची प्रश्न मांडण्याची भाषा टवटवीत, अथकच वाटते. अनेक पातळीवरून थीमला 'बेस' दिल्याने कथांचे रूप मोठे व्यापक, दांडगे झालेले आहे. शिवाय थीमला ‘भूमिके'चा बेस आहे. थीमला लेखकाच्या भूमिकेचा बेस नसेल तर कथेत औपचारिक प्रचारकी थाट डोकावतो. या कथांच्या निर्मितीत अभिजाततेच्या आणि कलात्मकतेच्या रंग - रेषांचाही मिलाफ झाला आहे.
 गावाचा एकेकाळचा सगळा कारभार जातव्यवस्थेचा होता. आता स्वरूप बदलत आहे. पण गावात जातीयता असूनही एकप्रकारचे सलोख्याचे संबंध त्या काळात होते. याची कल्पना 'कंडम' कथेमधून येते. बायजाचं वय झालेलं आहे. तिचा मुलगा-सून औरंगाबादेला पोट भरायला जातात. म्हातारी बायजा गावातील उच्चभ्रूकडून शिळंपाकं घेऊन कशीबशी जगते. तिला विहिरीचे पाणी गावातीलच लोक कालून देतात, सखोबा भुजबळ संजय गांधी निराधार योजनेमधून शंभर रुपयांची पेन्शन काढून देतात. बायजा जगण्यासाठी असमर्थ होती तेव्हा स्वाभिमानासाठी बंद म्हारकी वतनाची आठवण करून शेर - अदलीभर जोंधळा नेत असते. गावातील लोकच सुना-लेकींच, बाईचं दु:ख बाईलाच माहीत म्हणून पाणी काढून देतात. नजर अधू झालेल्या, पाठीत बाक आलेल्या बायजेचे जातभाई तिच्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत. ती एक दिवस रात्री विहिरीत चुकून पडून मरते तेव्हा जातभाईंचा प्रश्न तिच्या मरणाच्या दु:खापेक्षा “छान जिरली त्यांची. आमास्नी हक्क असून सुद्धा तिथं पानी भरू देत नाहीत. आता घ्या, आमची एक म्हातारी तिथं बुडून मेली' (पाणी! ..... पृ. ११०) हे दु:ख जास्त होते. म्हातारीचा मुलगा - सून आल्याचे पाहून एक टोळकं म्हणतं "चला कांबळ्याकडं, लग्नाचा टाइम होतोय.” स्वार्थापायी एकमेकांच्यातील आपुलकी व स्नेहभाव आटत चाललेले आहेत. एकेकाळी समाजातील बहिष्कृत लोक
३४ अन्वयार्थ

आपल्यात अनोळखी होत चालले आहेत. ते चळवळीत अत्यंत घातक असते. ही परिस्थिती, रागरंग ओळखलेला भीमा बायजाच्या मुलाला म्हणतो, “धर्मा, आपली जात एकदम कंडम आहे. त्यांना कोणी जगलं-मेलं याची काही सुद्धा पर्वा नाही. साऱ्यांना आपलीच पडली आहे." इथे कथा संपते. हे होत चाललेलं अध:पतन जातीय मानसिकतेला खतपाणी घालणारे आहे. याउलट, गावकऱ्यांत कणवेची भावना तेव्हाही आणि अजूनही आहे हे दिसते.
 जातीय प्रश्नाला थेटपणाने भिडणाऱ्या या कथा आहेत. जनकल्याण समितीचे भिडे गुरुजी संघाचे प्रचारक, म्हणून त्यांच्याकडे वाईट नजरेतूनच पाहिले जाते. समाज संघटनेत व आपत्तीच्या काळात अनेक संघटना माणुसकीच्या व भूतदयेच्या भूमिकेतून कार्य करतात. दुष्काळात गुरा-ढोरांना स्वयंसेवी संस्थेमार्फत उघडलेल्या छावणीत आश्रय मिळतो. जनकल्याण समिती छावणी उघडते. या तरदाळच्या छावणीत आजाराने बैल दगावतो. बीफ कंपनीत जनावरे विकण्यापेक्षा शेतकरी छावणीत जनावरे सोडण्याने कंपनीला मोठे नुकसान सहन करावे लागते. हा वचपा काढण्यासाठी जनकल्याण समितीचे भिडे गुरुजी संघिष्ट म्हणून, कलेक्टर भावेही संघिष्ट म्हणून - अपप्रचार व पेपरबाजी केली जाते. सेवाभावी वृत्तीने रचनात्मक कार्य करणाऱ्यांना असे हकनाक बळी दिले जातात.
 'अमिना' असेच धार्मिक कट्टरतेचे, अज्ञान, अशिक्षिततेचे भगभगीत दर्शन आहे. अमिनाला नऊ मुले झाली. नवरा कादर मद्यपान, बाई ठेवणं या व्यसनामध्ये गुरफटलेला, पण कट्टर धर्मवादी आहे. सामान्य लोकांना धर्मामधील तत्त्वांचे काहीच माहीत नसते. काझी सांगेल तेवढे. मुले ही अल्लाहाची देणगी लक्षात राहते. दारिद्र्य आहे. दररोज कामावर गेल्याशिवाय चूल पेटत नाही, अंगावर ठिगळ लावलेले कपडे आहेत. परंतु अशाही स्थितीत बायकोने बरखा घातला पाहिजे, ही दारुड्या नवऱ्याची बायकोला ताकीद आहे. बुरख्यालाच सतराशेसाठ गाठी आहेच, मध्यकाळात स्त्रियांची पळवापळवी करत आपल्या स्त्रियांवर ही वेळ येऊ नये भीतीपोटी बुरखा पद्धत रूढ झाली आणि आजही कमरेला खुरपे खोवून जाणाऱ्या स्त्रीलाही बुरखा घालूनच जावे लागते. निराधार स्त्री हे सर्व दावणीच्या बैलाप्रमाणे सहन करते. हे 'अमिना' कथेत अशा स्त्रीचे हृदयद्रावक चित्रण केले आहे. परंतु कथेचा थीमॅटिक पार्ट हा नाही. तो आहे कुटुंबनियोजन. रोजगार हमीच्या कामावर कुटुंबनियोजनाचे महत्त्व सांगणे व केसेस मिळविणे सोपे आहे. १९७२ नंतरच्या काळात कुटुंबनियोजन हा 'राष्ट्रीय प्रकल्प' होता. तो कलेक्टर, डे. क., तहसीलदार, इतर वैद्यकीय अधिकारी मोठ्या प्रमाणात राबवीत. तो राबविताना संवेदनशील अधिकाऱ्यालाच कोणत्या यातना भोगाव्या लागतात हे 'पाणी! पाणी!' मधून संवेद्य

अन्वयार्थ । ३५

केले आहे. रात्रभर नवऱ्याने भोगणे आणि दिवसा धुळीनं, उन्हाच्या कारानं आणि वखवखलेल्या नजरांनी भोगणे अखंड चालूच असते. हे दु:खभोग चित्रण 'अमिना' कथेमधून लक्ष्मीकांत देशमुखांनी करुणेपोटीच केले आहे.
 देशमुखांना स्त्रियांचं दुःख पाहवत नाही. हे अमिना, भूकबळी, बांधा या कथांमधून स्पष्ट होते. स्त्री हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, मुसलमान - कोणीही असो, ती स्त्रीच असते. ते एखाद्या जीवनात आनंदाची डहाळी अशी फुलवतात. 'खडकात पाणी'मध्ये सुनंदा सुपीक कराडच्या पट्ट्यातून माणदेशाच्या बरड, उजाड पट्ट्यात येऊन नांदू लागते. अगदी खाटल्यावर दोन तांबे स्नान (खाटलं स्नान) करून खालून ते पाणी साठवून वापरावे अशा ठिकाणी ती आली. ती नशीबवान-पाणीवान निघाली. तिचे गाव ज्या गटविकास अधिकाऱ्याकडे होते तो तिचा मावसभाऊ निघाला. आणि त्याच्या कृपेने आबा गुरुजी सांगतील त्या वाळलेल्या तलावात प्रस्तरात जिवंत तीन इंची झरा लागतो. अधिकारी लोकरीतीला, पाणी पाहण्याच्या अशास्त्रीय पद्धतीला, लक्षात घेऊन तलावात पाणी लागणार या अंदाजाने बोअर घेतो. खळखळ पाणी वाढ लागते. नियमांना मुरड घालणारा अधिकारी असतील तर विकासकामांना गती प्राप्त होते.
 'पाणी! पाणी!' हा कथासंग्रह आपल्यात सामावून घेतलेला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या व्यथा, त्यांच्यावर होणारे अन्याय, डावलले जाणे या गोष्टी त्यांना पुरस्काराच्या रूपाने कशा मिळतात याचे चित्र सरळपणे केले आहे. किती तळमळीने, कळकळीने अहोरात्र काम करीत असतात ते! सरळ सेवा भरतीमधील आय. ए. एस व पदोन्नती प्राप्त आय. ए. एस. यांच्यातही तणाव असतोच. राज्यसेवा भरतीमधील अधिकारी व केंद्रसेवेतील अधिकारी हा तणाव फार मोठा आहे. हे लक्षात येण्यासाठी ही एक कथा जरी पाहिली तरीही पुरेशी आहे. भ्रष्ट अधिकारीही आहेतच. भावे, देशमुख, जाधव, शिंदे यासारखे अधिकारी थीमबेस्ड कथासंग्रहातून भेटतातच. आपल्या व्यक्तिगत लाभाची, रागलोभाची काळजी न करता आपल्या कृतार्थ साध्यासाठी सतत चिंतनशील असणारे, समाजाविषयी उदार व पुरोगामी दृष्टी ठेवून कल्याणकारी राज्यातील जनतेच्या हिताची, फायद्याची - सुखसोयीची योजना कधी नियमाबाहेर जाऊन अंमलात आणतात. त्यांना मिळते काय? शिक्षा, बदली अगर पदोन्नती डावलून चापलूशी करणाऱ्यांना पदोन्नती - असा हा चीड व वैताग आणणारा खेळ आहे.
 देशमुख हे अष्टावधानी लेखक आहेत. प्रचंड दांडग्या निरीक्षणशक्तीमुळे ते कथांमध्ये छान रंगभरण करू शकले आहेत. त्यांना सौंदर्याची प्रचंड ओढ आहे. अंतरीच्या गूढगर्भी या संग्रहामध्ये ती भावना प्रकट झाली आहेच, परंतु नंतरच्या तिन्ही संग्रहात हीच सौंदर्यदृष्टी सहजपणे आविष्कृत करण्यास त्यांना अवसर नाही. कारण त्यांची कथा हजारोंच्या प्रश्नाला न्याय देण्याच्या प्रश्नाच्या समस्येला सामोरे
३६ अन्वयार्थ


जाते. ती व्यापक पटलावर गेल्याने व्यक्तित्वाच्या अभिरुचीला देशमुख बाजूला सारत आहेत. कदाचित काव्यात्म शैलीची हुरहुर लावणाऱ्या स्वप्नरत भासमान विषयवस्तूची कथा लिहिली असती तर एका नवीन जातकुळीची कथानिर्मिती झाली असती. 'अंतरीच्या गूढगर्भी' ची त्यासाठी साक्ष देता येईल. परंतु विहित विषय घेऊन आविष्कार केल्याने त्यांची सौंदर्यदृष्टी कथासौंदर्य वाढवण्यात गेली आहे. ते आपल्या निरीक्षणातून, आपल्या संपन्न जाणीवेतून भाषेच्या आधारेही एका भावनेला न्याय देतात, तसे सौंदर्यही प्रकट करतात. उदा. 'कंडम' कथेत हे असे प्रकटले आहे. “पण त्यांचा पत्त्या कुनाकडं हाय ! यवड्या मोठ्या औरंगाबादेत कंच्या झोपडपट्टीत हायेत, ते एक बुद्धच जाने....' (पाणी! पाणी! पृ. ११०) यातील बोलीचे सौंदर्य सोडा, पण 'बुद्धच जाने....' असे शब्द योजले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले धर्मांतर, बौद्ध धर्मस्वाद, हिंदूच्या देवकल्पनेचा नकार इत्यादी गोष्टीही त्यांनी स्वीकारल्या. डॉ. आंबेडकरांच्या नंतरच्या दुसऱ्या पिढीने हे सर्व बदल अंगवळणी करून घेतले. पूर्वापार हिंदूधर्माचे संस्कारातून देव जाणो' असे म्हणणे क्रमप्राप्त होते. पण 'बुद्ध' या धर्मसंस्काराचा स्वीकार किती सहज वळणाचा झाला हेच 'बुद्ध जाने' या शब्दयोजनेमधून उलगडले आहे. हे अर्थ सौंदर्य किती समंजसपणे व्यक्त झाले आहे!
 प्रशासनातील आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे दौरा. दौऱ्यावर जाणे, दौऱ्यात सहभागी होणे, दौऱ्याचे ब्रीफिंग करणे या गोष्टी प्रशासनाचा भागच बनून राहिल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी काही महत्त्वाचे पत्रकार (दौरा) आले आहेत. त्यामध्ये माणदेशाचा (सोलापूर जिल्हा) प्रदीप एक पत्रकार होता. त्याने माणदेशात दुष्काळ फार जवळून पाहिला आहे. दुष्काळी भागाची ज्येष्ठ पत्रकारांसमवेत पाहणी करण्यासाठी आलेल्या प्रदीपच्या पदरात निराशा पडते. पत्रकार हा लोकशाहीला मदत करणारा, पारदर्शीपणा अबाधित ठेवून जनतेला सत्य कथन करणारा एक महत्त्वपूर्ण काम पाहणारा घटक असतो. तो शासनधार्जिणा झाला तर जनतेला अंधारात ठेवण्यात शासनाला यश येते. प्रदीप ज्या दुष्काळ पाहणीच्या दौऱ्यावर आलेला आहे त्या दौऱ्यात वरिष्ठ पत्रकार आहेत. वृत्तांकन वस्तुस्थितीला सोडून करण्यात त्यांची हयात गेलेली आहे. प्रदीप नवखा आहे. पत्रकारांकडून काही शिकू पाहणारा, संस्कार करवून घेऊ पाहणारा आहे. परंतु भ्रष्ट पत्रकार त्याला चांगले, सखोल (दुष्काळाची पार्रवभूमी माहीत असल्याने) असलेले प्रश्नसुद्धा विचारू देत नाहीत. उलट मुंबईला आल्यानंतर त्याचे बातमीपत्रही छापले जात नाही. काही एक मिळमिळीत बातमी दुष्काळाच्या अनुषंगाने छापली जाते. सहकार सम्राट हे औरंगाबादचे पालकमंत्री असल्याने व वृत्तपत्र त्यांच्या

अन्वयार्थ ३७

कृपाप्रसादावरच चालत असल्याने बातमी फिरवून छापली जाते. देशमुखांना पत्रकारितेचे आकर्षण नाही. परंतु ते ज्या हायप्रोफाईल पेशात आहेत त्याचे पत्रकारितेशी जवळचे संबंध असतात. पत्रकरिता एक माध्यम आहे. पण या माध्यमाचा शासन आपले साधन म्हणून वापर कसे करते ते लक्ष्मीकांत देशमुख यांनी 'दौरा', 'दास्ता एँ अलनूर कंपनी' या कथांत फार पोटतिडकीने दाखविले आहे.
 राज्यांत कल्याणकारी योजनांची पोटतिडकीने अंमलबजावणी करतात ते शासकीय अधिकारी. 'जगण्याची हमी' मध्ये घटनादत्त सामाजिक न्यायाचे अभिसरण सर्जनाच्या रूपात केले आहे. भटक्या जातीतील आठवी नापास किसन कैकाडी गावाचा पोलीस पाटील होतो. राखीव जागा असते. किसनला पाटीलकीची नशा चढते. सारजाला असे अप्रामाणिक जगणे नको वाटते. ती कष्टाळू, हुशार आहे. प्रशिक्षणार्थी कलेक्टरबाईंना प्रभावित करण्याएवढी हुशार आहे. बाईं सारजाची केसस्टडी करते. 'रोजगार हमी कामाचा स्त्रीजीवनावर परिणाम' हा विषय त्या आपले असाइनमेंटस् करतात. प्रामाणिक अधिकारी आहेत.
 अशा प्रामाणिक, प्रांजळ प्रशासकीय अधिकाऱ्यांचे दर्शन 'ऑपरेशन जिनोसाईड' कथेत पडते. ज्योती मराठे या तहसीलदार रात्री ८.३० कलेक्टर फोनवरील आदेशानुसार तालुक्याच्या ठिकाणी आपल्या पित्या बाळाला सासूबाईंकडे ठेवून जाते. हे सारे पाहिले की समाज घडणीमध्ये अधिकाऱ्यांचा मोठाच हातभार आहे, हे ध्यानात येते.
 'नंबर वन' हा खेळाडूंमधील माणसाच्या कथा असा एक वेगळीच थीम असणारा संग्रह आहे. लोकांच्या मनात सिने नट - नट्यानंतर गॉसिपिंग असते ते खेळाडूंबद्दल. खेळाडू एकदा प्रकाशात आला की, त्याच्यामागे पैसा व प्रसिद्धी या गोष्टी अपरिहार्यपणे जोडून येतात. पण खेळाडूंची त्यामागची शारीर मेहनत, कष्ट, कसरत या गोष्टी बाजूला पडतात. लक्ष्मीकांत देशमुख खेळाडूंवर कथा न लिहिता त्यांच्यातील माणसावर लिहितात. हा देशमुखांचा नेहमीच'आऊटफिट' असा विषय आहे. लक्षितांच्या दुर्लक्षावर त्यांचा कॅमेरा बरेच काही काही टिपत असतो आणि त्यांना प्रमुख प्रवाहधारेत आणत असतो. ते माणूसपणाला हेरतात. त्यांच्या कुतूहलाचा विषय माणसातील निरागसपणा, नि:स्पृह निर्ममता आहे. 'प्रयासे जिंकी मना', 'बंद लिफ्ट', 'रन बेबी रन', 'फिरूनी नवी जन्मेन मी' कथा मनात घर करून राहतात.
 देशमुख समूहाला पाहतात. समूहाच्या सुखदु:खाला अग्रक्रम देतात, समूहाच्या हितैक्याला बाधा पोहोचणार नाही याकडे अत्यंत दक्ष व हेतुत: लक्ष देऊन असतात. 'पाणी! पाणी!', 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' या संग्रहांतून समूहाला, समाजाला आपल्या कवेत घेतले आहे. आपला प्रतिभाधर्म त्यासाठी पालवित करताना दिसतात. 'नंबर वन' खेळाडूंमधील माणसांच्या कथांत ते समूहामधून

३८ । अन्वयार्थ


एकटेपणाच्या पातळीवर येऊन त्याच्यामधील एकट्यातील विजिगीषू वृत्तीचे दर्शन घडवितात. सुंदर संस्कारांनी समृद्ध नि संपन्न झालेला माणूस एकाकी होताना या अवनीवरच्या मानव्यसरोवरापासून लांब जाऊ शकत नाही. त्याच्यामधील खेळाडूमध्ये हिणकस समाजकारण कसे भिनत जात आहे याचे स्वाभाविक दर्शन घडवितात.
 'रन बेबी रन', 'बंद लिफ्ट' या देशमुखांच्या कथा म्हणजे त्यांचे केवळ मानवतेवरील प्रेमदर्शक होय. बेबी ग्रामीण भागातील धावपटू आणि तिचे दलित कोच - गुरू यांच्या प्रांजळ गुरू-शिष्य नात्याची दुर्दैवी शोकात्मिका आहे. तिच्या नवऱ्याला गुरू - शिष्य नात्यातील पावित्र्य कळत नाही. तो संशय घ्यायला लागतो. दिसायला देखणा, हॉटेल व्यवसाय घराण्यानं खानदानी असलेला बेबीचा नवरा मनानं किडलेला, विचारानं बुरसटलेला आहे. राष्ट्रीय क्रीडापटू - धावपटू असलेली बेबी ऑलिंपिक स्पर्धेच्या निवड चाचणीची तयारी करीत असताना लग्न होते आणि ती क्रीडाजीवनाला मुकते. तिची सारी स्वप्ने धुळीस मिळतात. सर्वोकृष्ट परफॉर्मन्स करायला तयार असलेली एक मुलगी संशयाला बळी पडते. आणि पोटात मुलीचा गर्भ आहे, म्हणून तो पाडला. या सर्व गोष्टींनी बेबी वैतागलेली, पिचलेली, मनानं खचून गेलेली दिसते. 'तुला गर्भार केली तरच गुंतून राहशील' म्हणून तपासणी केली तर कळते - ती पुन्हा आई होणार नसल्याचे. बेबीचे उद्गार आहेत. “एकाच वेळी त्याचा विषाद वाटत होता आणि हायसंही. सैतानाचा गर्भ तसाच पुढं सैतान निपजला तर!" (नंबर वन : ११७) धावण्याच्या स्पर्धेत अखेर बेबी जगाच्याही पुढे जाते.
 बेबीचा गुरू मागासवर्गीय, पण बेबीच्या मनात कळत नकळत तिचा गुरूच रुतलेला आहे, पण याचा उलगडा तिला होत नाही. तिला कोच, गुरू, फादर, फिलॉसॉफर असेच त्याचे प्रकट रूप दिसते. कोणतं पाप मनात उत्पन्न न होताही बेबीच्या नवऱ्याच्या - बालाजीच्या - मनात पाप पक्कं बसलेले होते. या साऱ्याला वैतागून बेबी स्वत:ला पेटवून घेते. तिचा गुरूविषयीचा आदरभाव एवढा, की तिच्या चितेला भडानी आपल्या कोचनेच द्यावा, अशी तिची शेवटी इच्छा असते! या कथेला राष्ट्रीय धावपटू नंदा जाधव हिच्या करुण शोकांतिकेची पार्श्वभूमी आहे. शोकांतिका देशमुखांनी घेतली असलेली तरी रिपोर्टवजा असे काही यात नाही. मन गदगदणाऱ्या प्रसंगांना त्यांनी योग्य कलात्मक न्याय दिला आहे.
 'प्रयासे जिंकी मना' - जलक्रीडापटू असलेल्या दीप्तीचा नवरा दिलीप, मोठा मुलगा अजित हे दोघे पाण्यातच मृत्यू पावतात. दीप्ती राष्ट्रीय जलक्रीडापटू असूनही तिच्या मनात पाण्याची भीती घर करते. परंतु धाकटा मुलगा जयंत लपून जलक्रीडापटू होतो. आणि राष्ट्रीय स्पर्धेत अव्वल येतो. पाण्याची भीती पाण्यानेच काढली जाते. या

अन्वयार्थ ३९

तशा साधारण वाटणाऱ्या कल्पना आहेत. परंतु कथालेखकांनी या साध्या कल्पनेतील असामान्य मानसिक गुंतागुंत फार सुरेख केली आहे. कथेची लांबी-रुंदी कथेला न्याय देणारी नसते. कथेतील उठावदार, सौष्ठवपूर्ण जे वलय मिळते ते कथेला उंची देतात. ही वलयांकित उंची प्रस्तुत कथाकरांच्या सर्वच कथांत पाहायला मिळते. 'प्रयासे जिंकी मना' या कथेत खेळाडूतला माणूस उभा राहतो तसा 'बंद लिफ्ट' मध्ये खेळाडूतला माणूस कोसळत जाताना दिसतो.
 'बंद लिफ्ट' कथेत हॅम (विनोद कांबळी) क्रिकेटपटूची कारकीर्द त्याच्या अनिश्चित खेळाने, त्याच्यातील नखरेलपणामुळे, त्यातील बेपावईने संपुष्टात येते. सॅम (सचिन तेंडुलकर) त्याचा हॅमचा जिवाभावाचा मित्र. हॅमचा नैसर्गिक खेळ सॅमपेक्षा चांगलाच. सॅमला नशिबाने साथ दिली. परंतु हॅमला देव आणि माणसांची साथ मिळालीच नाही. कित्येक खेळाडू आले नि गेलेही. टी ट्वेंटीतील एक खेळाडू तर (मध्यप्रदेश) आता शेतीमध्ये रोजंदारी करतोय. हॅम आपल्या वर्तनाचे, खेळातील अपयशाचे खापर जातीय प्रवृत्तीच्या मुळावर फोडतो. कमकुवत झालेले मन, घटनेमुळे अधू झालेले मन, सामाजिक न्यायाची प्रतिकूल दिशा अगतिकतेमधून स्वीकारते. हॅमसारख्या श्रेष्ठ खेळाडूच्या मनात सामाजिक वितुष्टभाव कसा निर्माण होतो हे सांगताना कथाकार समाजकारणाची लंगडी बाजू प्रकाशित करतात. दक्षिण आफ्रिकेत दरबनला आयोजित स्पर्धेत हॅमला आमंत्रित केले जाते. तेथे हम समाजकारणाची घाणेरडी बाजू शिकतो. “तिथं मला काही महाराष्ट्रातले दलित नेते कार्यकर्ते भेटले व त्यांच्याबरोबर त्या परिषदेत सहभागी झालो. इट वॉज अँन आय ओपनर फार मी सॅम. तिथंच मला माझ्या कास्टची, त्याहून जादा त्यामुळे होणाऱ्या डिसक्रिमिनेशनची जाणीव झाली. मला जे माझ्या विरुद्ध सौरभ, राहुलच्या संदर्भात वाटायचं, त्याला एक प्रकारे पुष्टी मिळाली." (नंबर वन ८४) १९९५ साली मुहमद अझरुद्दीनही म्हणाला होता की, “मी अल्पसंख्याक असल्याने माझ्यावर मॅचफिक्सिंगचे आरोप होत होत आहेत.” तेव्हा मन्सूरअली पतौडींनी व इतर मुस्लीम क्रिकेटर्सनी अझरुद्दीनला प्रश्न केला होता. “मग तुला भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन केलाच नसता!' असे सुस्पष्ट बोलणारे किती नवाब आहेत? लक्ष्मीकांत देशमुख फितवला गेलेल्या हॅमच्या मनातील गदळ दुःखाचा 'सामाजिक व्यक्तिन्याय' अशा रीतीने प्रकट करतात.
 'कास्ट बायस' जसे मुखरित झाले आहे तसे 'जेंडर बायस'ही मुखरित झाले आहे. लिंगावरून मीना He की She हा प्रश्न उपस्थित होतो. आणि जेंडर बायस कारण पुढे करून मीनाचा बळी पडतो. ऑलिपिक परिषद तिचे रौप्यपदकही काढून घेते. तिच्यापेक्षा कमी योग्यतेची सानियाकरवी सारा खेळ उभी होतो. खेळातील

४० 0 अन्वयार्थ

राजकारण किती हिडीस असते याची कल्पना सर्वसामान्यांना या कथेतून येते. परंतु किसनला हळूहळू पाटीलकीची नशा चढते. गावातील फुटकळ दारू पिऊ लागतो. सारजा त्याची पत्नी - या गोष्टीला नंतर कंटाळते. प्रामाणिक जगण्याला महत्त्व देते. रोजगार हमी योजनेवर प्रशिक्षणावरील कलेक्टर अधिकारी बाई सारजाच्या विचाराने प्रभावित होते. आपल्या असाईनमेंटस्साठी ती 'रोजगार हमी कामाचा स्त्री जीवनावरील परिणाम' हा विषय ती सारजाच्या आधारेच करते, हे सारे होऊन, अधिकारी मागास समाजाच्या पाठीमागे उभे राहूनही, समाजसुधारणा होत नाही याचे कारण समाजाच्या मानसिकतेमध्ये बदल झालेला नाही.

।।६।।

 माणसं जिवंत ठेवणाऱ्या खेळाडूंमधील सामान्य माणूसपण दाखविणाऱ्या लेखकानं स्त्रीभ्रूणाच्या संवर्धनासाठी पुढाकार घेऊन 'सेव्ह द बेबी गर्ल' म्हणत आपल्या प्रतिभेचा अमिट ठसा उमटविलेला आहे. सुरुवातीला पाहिले आहे की, देशमुख हे प्रशासकीय अधिकारी होते आणि त्यांनी आपल्या सृजनशील व्यक्तिमत्त्वाचा उपयोग आपल्या प्रशासकीय कार्यात करून घेतला. परंतु ते सर्जन, नवनिर्माण असे वाङ्मय आहे. 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' ह्या कथासंग्रहाच्या प्रस्तावनेत पुष्पा भावे म्हणतात की, 'सेव्ह द बेबी गर्ल' या उपक्रमासाठी आणि त्या उपक्रमाचाच ललित दस्ताऐवज असणाऱ्या कथांसाठी मराठी वाचक देशमुखांचे वाचक आभार मानतील. देशमुखांनी समाजाला उपकृत करून ठेवले आहे.
 'मुली वाचवा' असा उपक्रम सरकाराला हाती. घ्यावा लागला. मुळातच मुलगा वंशाचा दिवा असा समज कोणत्या शास्त्रीय सत्यांतून निर्माण झाला हे पाहणे समाजशास्त्रीचे काम आहे. पण या संबंधीचे समाजाची मानसशास्त्रीय चिकित्सा करून म्हणता येईल, की तो स्वार्थी आहे. म्हातारपणी आपली देखभाल करणारे, आपला सांभाळ करणारे आपल्या हक्काचे कुणी असले पाहिजे. ते आपलेच रक्त संबंधी असतील तर ते काम जबाबदारीने होईल - या स्वार्थी कल्पनेला वंशाचा दिवा ह्या समजाची जोड देण्यात आली. आणि तेव्हापासून जेंडर बायस सुरू झाले. मुलींचा दुस्वास करणे, दुर्लक्ष करणे, छळ करणे, तिच्या वाढीला वान न देणे या गोष्टी पूर्वी होत. तिच्या विकासाला तर संधी दिली गेली नाही. स्त्रीच्या विकासाच्या संधीचे प्रमाण अत्यल्प होते. अशा लोकविचारात शास्त्रीय शोध लागून गर्भलिंग - तपासणी यंत्र रासवट वृत्तीच्या डॉक्टरांच्या हाती आले. वंशदिवा अपेक्षितांचाही हा तिसऱ्या डोळाच ठरला.
  कितीतरी सहस्र लेकी आईबापांनीच मारून टाकल्या. ही प्रवृत्ती किती क्रूर आणि

अन्वयार्थ । ४१

हिडीस म्हणावी? अर्भक कुत्र्यांनी खावे? आणि त्यासाठी डॉक्टराने वाघासारखे कुत्रे पाळावे ही केवळ कपोलकल्पित घटना म्हणावी? तर बीडमधील डॉ. मंड्याचा क्रौर्याचा इतिहास हेच सांगतो, की त्यांनी शेतामध्ये कुत्र्यांची फौजच पाळली होती. 'लंगडा बाळकृष्ण' ही कथा अत्यंत हृदयद्रावक आहे. बायकोवर अतोनात प्रेम करणारा नवरा मिळाला म्हणून स्वर्गीय सुखाने आनंदणारी पत्नी एके दिवशी नवऱ्याच्या हॉस्पिटला जाते. आणि खोलीतील दोन कुत्रे बाहेर पडतात. दुलईत लपेटलेलले बाळ कुत्रे पाहतात. कुत्र्यांना ओल्या जावळाचा वास सवयीचा झालेला असावा. ठेवलेले बाळ त्यांना सवयीने आणि तेही आपला भक्ष्यदाता विशिष्ट वेळेला समोरून जातो म्हणजे त्यांच्यासाठी ते आमंत्रणच. कुत्र्यांनी डॉक्टरच्याच बाळाच्या पायाचे लचके तोडले! रोमान्ससाठी कुतूहल, सुखी - समाधानी स्त्रीचे दर्शन आणि दुसरीकडे क्षणाक्षणाला किडा-मुग्यांना आदिवासींनी मारून खावे तशी डॉक्टरची पैशांची हाव - नाट्यपूर्ण कल्पनाविस्तार, वास्तवाचे थैमान, स्त्रीचे उद्ध्वस्त होणे, डोळ्यांदेखत कुत्र्यांना अर्भक खाऊ घालणे, प्रत्यक्ष याची देही याची डोळा हे सारे फेडण्यासाठी स्वत:च्या बाळालाच अक्षरश: कुत्र्यांना देणे ही अशी फँटसी इंग्लिश सिनेमात होत नसावी? अत्यंत खुबीने हे सर्व शब्दांकित केले आहे.
 देशमुखांचे हे काम फार मोठे आहे. महात्मा जोतिराव फुल्यांच्या पुरोगामी महाराष्ट्रातच पुन्हा लक्ष्मीकांत देशमुखांनी स्त्रीला कात्रीतून वाचवण्याचा अक्षय प्रयत्न केला. फुल्यांनी स्त्रीला शहाणी केली, महात्मा गांधींजीनी तिला सार्वजनिक जीवन दिले तर देशमुखांनी तिच्या जन्मासाठी स्वागतशील प्रवृत्ती व मानसिकता तयार केली. या संग्रहात अविस्मरणीय अशा आठच कथा आहेत. त्यांमधून स्त्रीच्या जगण्याचा, तिच्या मोहोरून येण्याच्या प्रवृत्तीचा साक्षात्कार होतो.
 देशमुखांच्या कथावाङ्मयातील मूल्यांविषयी बोलण्यापेक्षा जीवनमूल्यांची व सामाजिक मूल्यांची समीक्षा करणे गरजेचे वाटते. कारण ही मूल्ये देशमुखांना चिंतनीय वाटतात. त्यांच्या पहिल्या संग्रहातील मूड नंतर राहिलेला नाही. भगभगीत सत्य त्यांना अस्वस्थ करीत असावे. सर्व सुखे, सर्वस्व समोर असतानाच्या बेधुंद अवस्थेत विवेक हरवलेल्या मनात प्रबोधनाची आवश्यकता यंत्रवतजीवन जगणाऱ्या माणसाला असते. आपल्या कथासाहित्यात श्री. लक्ष्मीकांत देशमुख असे मानसिक सबलीकरण व लालित्यामधून वैचारिक प्रबोधन करतात, अशी नोंद मराठी वाङ्मयतिहासात होईल.

॥७॥

 देशमुखांच्या कथावाङ्मयाचा परीघ क्षितिजासारखा आहे. कथेच्या एका पुस्तकात ते विस्तीर्ण असून कुठेतरी आकाश जमिनीला टेकल्यासारखे वाटते. पुन्हा नवीन

४२ अन्वयार्थ

पुस्तक घेतले की आकाशाची कडा तिथून उठल्यासारखी दिसते, लांब होऊन विस्तीर्ण होते आणि रंगांची आभा मोठी विलाभनीय होऊन प्रकटते. आधीच्या चार पुस्तकांहून वेगळी धुमारे असणाऱ्या 'अग्निपथ'चे असेच आहे. 'अग्निपथ'चे प्रबोधन तरुणाई विरुद्ध मुर्दाड झालेली संवेदनशून्य आधीची पिढी असा संघर्ष आहे. उरात स्वप्ने आहेत; पण त्या स्वप्नांचा चक्काचूर झाल्याचे दिसून येते. ही तरुणाई काहीशी व्यवहाराने वागते. तसा निर्णय घ्यायला प्रस्थापित पिढीच प्रवृत्त करते. याला अपवाद आहे ती 'गद्दार' ही हुकूमशाहीचे दर्शन घडविणारी भयंकर कथा.
 देशमुखांच्या कथेची वाचनीयता हे मूल्यविशेष आहे. लेखक म्हणून ते शब्दरचना करीत नाहीत. अनुभूतीच्या, आविष्काराच्या अपरिहार्यतेमुळे ते कथालेखन करतात. कथालेखनात लेखनाची सारी तंत्रे उन्मळून त्यांच्यासमोर येतात. ते भाषेचे केवळ रंगभरण करतात. कोणत्याच कथेचा तोंडवळा एकमेकांसारखा नसतो. आशयाची आवश्यकता म्हणून हिंदी भाषेत ते सहज संचार करतात. ती सफाईदार आहे. महत्त्वाची गोष्ट, भाषेत कृत्रिमपणा नाही आणि अलंकारिक सोस धरत नाहीत. भाषेचा निरतिशय साधेपणा हाच अंगभूत सौंदर्य आहे. जातीच्या सौंदर्याला आभूषणाची गरज नसते, तसं देशमुखी कथासौंदर्याचे आहे. कथेचा आशय जोमदार असतो, की त्याला सजवायला तोशीस घ्यावी लागत नाही. हे देशमुखांचे आविष्कारविशेष आहे, की ते चार-चौघांसमोर घटनेचे कथन करीत आहेत, असे त्यांनाच जाणवत असल्याने भाषेच्या डौलाविषयी ते जागृत दिसतात. भाषेचा साज त्यांना ‘सादगी'त वाटतो. ही अनुभूती 'अग्निपथ' मधून येते.
 'अग्निपथ'च्या बारा कथांचा एक घोस आहे. प्रशासनातील भ्रष्टता, ग्रामजनांची विनातक्रार सोशिकता, शिक्षणसम्राटांची गल्लाभरू वृत्ती, समाजाचे हितरक्षणासाठी राजकारणात जाऊन व्यक्तिगत ममतेचा अनिवार मोह, जातपात व औरस-अनौरस कल्पना, बालमजुरी व बालगुन्हेगारी, देश बांधवांच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य व जगण्यासाठी लाचार, दंगलीत माणसे मारण्याची स्पर्धा, नातेसंबंधाची फसवाफसवी हे सर्व विषय वर्तमानकाळ थीमबेस असलेले आहेत. वर्तमानकालीन भविष्य, त्या काळातील तरुणांचा असतो. एकीकडे बाजारपेठांच्या प्रचंड स्पर्धेमुळे, व प्रचंड निकडीमुळे खुले धोरण स्वीकारले जात आहोत म्हणून दुसरीकडे वैश्विकीकरण अनुभवत आहोत. या दोन्ही गोष्टींच्या परिणामांना सामोरे जावे लागते ते दुर्बलांना, अगतिकतेला, शुभशकुनांच्या, पवित्र-अपवित्राच्या, राष्ट्रप्रेम, समाजप्रेम, नातेसंबंध या संबंधांना कवटाळून बसणाऱ्यांना. उदार आणि सहिष्णू अंत:करणाचा लेखक आपले विचार ललितरम्यतेमधून प्रकट करतो तेव्हा वाचकाला माणूसपणाच्या सर्व भावना, वेदना, संवेदना प्रतीतीला येतात. स्पर्धेचा महामार्ग खुला झाला की त्यावर सांडलेल्या

अन्वयार्थ ४३

रक्ताचे नाते माणुसकीशी राहत नाही, स्वच्छ रस्त्यावरची ती केवळ घाण असते. या विषयीची सहसंवेदना लक्ष्मीकांत देशमुखांनी मुखर केली आहे.
 'लाईफ' 'टाईम' 'फार्म्युन' कथेला घटितांचे कितीतरी संदर्भ आहेत. १९९९ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाला अटक झाली, ही कथा लिहून प्रकाशित झाल्यानंतर सांगलीच्या सचिन माळी, त्याची पत्नी शीतल साठे यांना सक्रीय नक्षलवादी म्हणून अटक झाली, अशा अनेक संदर्भाच्या उगाळा म्हणजे 'लाईफ टाईम फॉयूँन' कथा आहे. नामदेव, सिद्धार्थ, नेहा या प्रॉमिसिंग (होतकरू) तरुणांना ती अटक झालेल्या एम.पी.एस.सी. माजी अध्यक्षाच्या तोंडाला चिखल फासला म्हणून. अध्यक्षांनी पैसे घेऊन दोन भावंडांना डी. वाय. एस. पी. पद 'चक्क' दिले होते. (म्हणजे ऑलिपिक मध्ये ब्राँझ - कास्यपदक मिळविले म्हणून डेप्युटी कलेक्टर पद ‘पदक' रूपाने द्यावे असे!) या घटनेमुळे विरुद्ध झालेली, अशा पदांची ध्येयाकांक्षा बाळगून मेहनत घेणारी तरुणाई तोंडाला काळे (चिखल) फासण्याचे काम करते. त्यांना अटक होते. सूर्यवंशी नावाचे म.से.लो.आ.चे सदस्य त्यांची जामिनावर सुटका करतात; परंतु ही तरुणाई कधी-कधी आततायी वागते.
 सिद्धार्थ व नेहा नक्षलवादी होण्याचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर करतात तर नामदेव 'देशाला प्रामाणिक अधिकारी नको असतील तर नको; मी खाजगी मंडळात मोठ्या पगारावर नोकरी करेन' हे जाहीर करतो. ध्येय बाळगणाऱ्यांत संयम असावा लागतो. कारण जे साध्य करायचे आहे ते साधन प्राप्त करायचे असेल तर अनेक प्रकारांची स्पर्धा असते, हे न कळण्याइतपत स्पर्धाशील मनोवृत्तीचा तरुण नसतो. स्पर्धा म्हणजे गुणांच्यावर मात करणे. चांगुलपणावर निष्ठा असणारे तरुण अधिकारी होता येत नाही म्हणून आत्मघात करून घेत नाही. आपल्या ध्यासाचा उपयोग ते अन्य ठिकाणी करतात. ही प्रचंड नैसर्गिक साधनसंपत्ती वाया जाऊ नये म्हणून स्वहित धोक्यात घालून धडपडणारी सूर्यवंशीसारखी माणसे सदैव दक्ष असतात, आपल्या नियत वर्तनाबाहेर जाऊन वर्तन करणारे नंदितासारखे अधिकारी आहेत. असे असताना टोकाच्या निर्णयाप्रत जाणारी अपरिपक्व विचारांची तरुणाई दिसून येते. या कथेत विचार आणि योग्य कृती यातील संघर्ष पाहावयास मिळतो. कथेत नाट्य आहे आणि भावनाप्रधान कृतीने कथा शिगोशिग झाली आहे.
 आपापल्या अस्मितेच्या शोधामधून, संरक्षणामधून नक्षलवादी जन्मास येतात; परंतु भूमिका तार्किक असली तरी तो मार्ग आणि अवलंबिलेली प्रणाली फार घातक असते, कसे ते 'लाईफ टाईम फायूँन' कथेत फारच सहजसुंदरतेने प्रकट झाले आहे.
  भारतीय संस्कृती निवृत्ती आणि प्रवृत्तीच्या संघर्षात अजूनही अडकलेली आहे. आणि हा संघर्ष आहे म्हणून प्रतिकूल जगणे होत आहे. याचे फार स्वाभाविक प्रत्यंतर

४४ अन्वयार्थ


'भव शून्य नादे' या कथेमध्ये देशमुख देतात. त्यांच्या प्रज्ञा - प्रतिभेचा सुंदर मिलाफ या कथेत झाला आहे. मानवी मनाला मृत्यूचे तत्त्वज्ञान नेहमीच मोहित करीत आले आहे. आणि आध्यात्मिक तत्त्वज्ञानात तर ती मोहिनी भवसागरात तरून जायला पुरेशी आहे.
 परभणीच्या तामुलवाडीला नेहमीच पुराने वेढलेले असते. कित्येक वर्षांची समस्या सुटलेली नव्हतीच. प्रखर इच्छाशक्तीचा अभाव! अक्षयसारखा ध्येय घेऊन आलेला सरकारी अभियंता तामुलवाडीला येतो. तेथील नैसर्गिक अवकृपेने दीर्णविदीर्ण होतो. या परिस्थितीचा एकच उ:शाप म्हणजे 'शिवशंभो हर हर शिवशंभो!' मोरया गोसावी. निर्मम, निरागस आणि नि:स्पृह योगी - भवशून्यात आत्मानुभूतीचा प्रकाश देतो. तेवढेच मरण सुसह्य करतो. राजकारणी व अधिकाऱ्यांची भावनाशून्यता, अस्मानी सुलतानाची चोहोबाजूंनी प्रतिकूलता यांचे भयानक तांडव 'भव शून्य नादे' मध्ये दिसते. गाव पुराने वेढले जाऊन संपर्क तुटतो. बाळंत-वेदना सहन करण्यासाठी तंबाखूची गोळी भरविली जाते!
 अधिकारी येतात नि अधिकारी जातात. व्यवस्थेची पोलादी चौकट तोडू न शकणारा अक्षयही नोकरी सोडून मुंबईला जातो. मोरया गोसावी जलसमाधी घेतात आणि मास्तरांच्या अडलेल्या लेकीच्या पोटी मोरया म्हणून जन्म घेतात. परंपरेच्या समजातून कथाकारांनी फार मोठे सूचन केले आहे. व्यवस्था बदलणार नाही. मोरया गोसावीसारखे निर्भिक सज्जन जगण्याला बळ देतात. भारतीय व्यवस्थेत हा सनातन संघर्ष तर नसावा ना? अशी शंका कथेच्या अखेरीस उत्पन्न होते.
 'नेव्हर सी यू अगेन', 'स्वत:ला रचित गेलो', 'बच्चू', 'सर्वात कठीण काम', 'नशिबाचा खेळ' या कथांची प्रेरणा अनाथपण आहे. बाल्य वात्सल्योत्सुक राहिले तर मन कसे उद्ध्वस्त होते याचे दिग्दर्शन करणाऱ्या या कथा आहेत. मुरलीधर व राधाक्का हे देसाई पती-पत्नी आपला संजय मुलगा बेंगरूळ - कुरूप आहे म्हणून त्याचा दुस्वास राहतात, तिरस्कार करतात.
 आपल्या संपूर्ण घराण्यात हा असा कुरूप निपजला म्हणून! शेजारची बन्सी त्याला आपल्या उफाड्याने आमंत्रित करते; पण वडील आल्याने ही त्याच्यावर उलटते. देसाई पती-पत्नीला मुळातच तिरस्कृत वाटणारं हे कुरूप रूप. त्याला बेदम मारून डांबून ठेवतात आठ दिवस. ग्लानीतल्या संजयला सिस्टर अग्नेस ममतेने कवटाळतात. संजय मोठा चित्रकार होतो. जन्म न देणाऱ्या सिस्टर अग्नेस संजयच्या बक्षीस वितरण समारंभास उपस्थित नसतात. विमान अपघात तिचा दुसराही मुलगा, सून, नातू मृत्यूमुखी पडतात. उद्ध्वस्त झालेल्या अग्नेसला संजय मातृपद देतो. आईबापांना 'नेव्हर सी यू अगेन' असे सांगतो. त्याला जन्मभराचे वात्सल्य सिस्टर

अन्वयार्थ ४५

अग्नेसकडून मिळते. तर 'कमल' एक वर्षाची असताना अनाथालयातून स्वीकारली गेली होती हे सत्य नवरा असणाऱ्या देसायाला कळते. तेव्हा जात, रक्त असे प्रश्न उपस्थित करून तिला उद्ध्वस्त करतो. जणू कमलचे बालपणच अनौरस असल्याप्रमाणे. 'बच्चू' ही कथा मातेने टाकून दिलेल्या अनाथ मुलांची. 'सर्वात कठीण काम' ही कथा दंगलीत मुलांना ठार करण्याचे कठीण काम सांगते, तर 'नशिबाचा खेळ' मतिमंद विकलांग नवऱ्यापासून झालेल्या तशाच बाळाला भविष्यातील घृणास्पद गोष्टीपासून मुक्त करण्यासाठी मारून टाकते. या कथांमधून कथाकाराचा हळवेपणा स्पष्ट होतो आणि ही एक मोठी सामाजिक समस्या आहे, हे ते कथेमधून सांगतात.
 'कश्मीर की बेटी' व 'गद्दार' या राष्ट्राभिमान व जाज्ज्वल्य देशप्रेम व्यक्त करणाऱ्या कथा आहेत. माझ्या पिढीतील दोन घटना स्पष्ट आठवायला हरकत नाही. नव्वदीच्या दशकामध्ये तत्कालीन गृहमंत्री मुक्ती मुहमद सैद यांच्या मुलीचे अपहरण नाट्य. बदल्यात सोडलेले.अतिरेकी आणि त्यानंतरच्या आठ - एक वर्षांनी कंदहार विमान अपहरण (डिसेंबर १९९९) व स्वतः संरक्षणमंत्र्यांनी आय.एस.आय.च्या कट्टर अतिरेक्यांची कंदहारला विमानात नेऊन केलेली सुटका.
 त्या पार्श्वभूमीची ‘कश्मीर की बेटी' ही कथा देशाभिमान जाज्ज्वल्य करणारी आहे. डॉक्टरकी करणाऱ्या लेकीचे अतिरेक्यांनी केलेले अपहरण आणि अपत्यप्रेमापायी शरण आलेले तिचे गृहमंत्री वडील यांच्यावरील कथा आहे. जिचे अपहरण झाले होते ती राजकारणापासून लांब होते. तिची धाकटी बहीण (निकाह) राजकारण हा वडिलांचा वसा घेते; परंतु धाडसी, निर्णय घेण्यात चपळ आणि पंधरा-सोळा वर्षांपूर्वी वडिलांनी चूक केली होती, हे स्पष्ट करून राजकारण करणारी ही निडर, बेडर मुलगी आहे. वडिलांच्या पक्षातून वडिलांसह बाहेर पडून नवीन पक्षाची स्थापना करून त्याची धुरा सांभाळते आणि हौतात्म्याचीसुद्धा तयारी ठेवते.
 हल्ल्यातून 'बाल बाल बचावते. अतिरेक्यांना धडा शिकवत, युद्ध करून; पण त्यांच्या वैचारिक व मानसिक मनपरिवर्तनाला प्राधान्य द्यावे असे सांगते. शेजारील राष्ट्रधर्मबांधवांचे संरक्षण म्हणून थयथयाट करते; पण मुहाजिरांच्या कत्तली आपल्याच देशात करते. हे मुहाजीर कोण आहेत? १४ ऑगस्ट १९४७ (पाकिस्तान स्वातंत्र्य दिन) व १५ ऑगस्ट १९४७ (भारताचा स्वातंत्र्य दिन) वा दोन दिवसांनंतर पाकिस्तानात गेलेले मुसलमान! त्यांची हत्या चालूच आहे.
 तो प्रश्न सोडविणे सोडून कश्मीरचे स्वप्न पाहिले जात आहे. यावर ‘कश्मीर की बेटी' आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी मांडण्याचा प्रयत्न करते. 'गद्दार' मध्ये हुकूमशाहीविरुद्ध आवाज उठविणाऱ्या देशप्रेमीची हत्या केली जाते आणि त्यांचा मुलगा टॉर्चरिंगला भिऊन बापाविरुद्ध वृत्तपत्रातून लिहितो. बापाच्या मृतदेहाला लाथ मारून थुकतो.

४६ अन्वयार्थ

जगण्यासाठी गडबडाऽऽ लोळू लागतो. या दोन्ही कथा त्वेषयुक्त झाल्या आहेत. देशमुखांच्या नसानसात समाजप्रेम व देशमुख-अभिमान भिनलेला आहे, हे प्रत्ययास येते.














अन्वयार्थ ४७

लक्ष्मीकांत देशमुख यांचे कथालेखन

_______________________________________________
डॉ. केशव तुपे


 १९९० नंतर मराठी कथेचा प्रांत विविधांगांनी समृद्ध झालेला दिसून येतो. अनेक कथाकार आपापल्या वकुबाने या काळात लेखन करताना दिसतात. त्या त्या काळाची स्पंदने तातडीने अभिव्यक्त करण्यात कथा हा वाङ्मयप्रकार अग्रभागी असल्याचे जाणवते. जागतिकीकरणाचा रेटा, त्याचा समाजजीवनावर झालेला परिणाम, त्याद्वारा बदललेली सांस्कृतिक - सामाजिक परिस्थिती; बदलते, गतीशील समाजवास्तव, चैतन्यहीन; उद्ध्वस्त दुष्काळग्रस्त होत जाणारे खेडे, राजकीय क्षेत्रातील मूल्यहीनता, भ्रष्टप्रवृत्ती; धर्म - जात, भाषा - लिंग या विविध जाणिवांची टोकदार अस्मिता यांसारख्या अनेकविध आशयसूत्रांना कवेत घेण्याचा प्रयत्न अलीकडचे कथालेखक करत आहेत. लक्ष्मीकांत देशमुख हे याच काळातील दमदारपणाने कथालेखन करणारे एक महत्त्वाचे असे नाव आहे.
 देशमुखांचा पहिला कथासंग्रह 'अंतरीच्या गूढगर्भी' हा १९९५ मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर 'उदक' (१९९७) - ‘पाणी! पाणी!!' या नावाने दुसरी आवृत्ती, 'नंबर वन' (२००८), 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' (२०१३) आणि 'अग्निपथ' असे एकूण त्यांचे पाच कथासंग्रह प्रकाशित झाले. या पाचही कथांसंग्रहांमधून समाजजीवनातील काही एका वेगळ्या विषयसूत्रांची मांडणी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. मानवी भावजीवनातील नातेसंबंधांची सूक्ष्म वीण व तिच्यातील आडव्या-उभ्या धाग्यांची गुंतागुंत, अस्थानी सुलतानी संकटांमुळे कोलमडून पडणारे उद्ध्वस्त होणारे ग्रामजीवनातील भावविश्व, जैविक गरजांसाठी करावा लागणारा संघर्ष, प्रेमविषयक गहिरी जाणीव, क्रीडा विश्वातील प्रवृत्ती आणि अपप्रवृत्ती, स्त्रीभ्रूणहत्या व त्यानिमित्ताने ढवळून निघालेला महाराष्ट्र - अशासारखा काही सूत्रांना ही कथा अधोरेखित करते. या दोन दशकातील समाजजीवनातील स्पंदने टिपण्याचाच ही कथा प्रयत्न करत आली आहे.

४८ अन्वयार्थ
॥१॥

 'अंतरीच्या गूढगर्भी' हा सतरा कथांचा समावेश असलेला संग्रह शीर्षकाप्रमाणेच मानवी मनाच्या तळाशी दडून असलेला गूढभाव, सहजप्रवृत्ती, प्रेमविषयक शारीरीअशारीरी जाणीव, नात्यांची वीण, गतस्मृतींची कातरता व ओढ अशा मानवी मनाच्या भावावस्था आविष्कृत करतो.
 मुळात प्रेमभाव ही मानवी जीवनातील सहजप्रवृत्ती आहे. त्या प्रवृत्तीची अनेक रूपे या कथांतून प्रकटली आहेत. 'राधा', 'स्वत:च्या मनाचा एक्सरे रिपोर्ट', 'अभिमान', 'माझे अबोलणेही' या कथांतून प्रायः मध्यमवर्गीय, शिकून नोकरी करणारा असा अविवाहित तरुण आलेला आहे. तो मुंबई, औरंगाबाद-सारख्या मोठ्या शहरांच्या ठिकाणी विज्ञानात पदव्युत्तर, पदवी वर्गांसाठी शिकून परभणीसारख्या छोट्या जिल्ह्याच्या ठिकाणी बँकेत नोकरी करतो. मुळात तो संवेदनशील लेखकमनाचा आणि बहुश्रुत, अभिरुची संपन्न असा आहे. उच्च दर्जाच्या साहित्यकृती, कलात्म चित्रपट, नाट्य, चित्र यांसारख्या कलाप्रकारांत त्याला विशेष रुची आहे. या छोट्या गावी त्याला त्यांचा आस्वाद घेता येत नाही. शिवाय ज्या मैत्रिणींसोबत काळ व्यतीत केलेला असतो त्यांच्या आठवणी येथील एकांतवासामुळे (अर्थात त्याच्या दृष्टीने) अधिक उचंबळून येतात. तेव्हा त्यांच्याशी पत्रमाध्यमातून संवाद साधत आपली वेगवेगळ्या विषयांवरील मते, मतभिन्नता, कुटुंब, समाज, लग्न या सामाजिक संस्थांसंदर्भात भूमिका या अंगाने 'स्वगत' पर चर्चा प्राधान्याने या कथांतून आली आहे. या कथांतील नायिका ह्या नायकापेक्षा धीट, काही एक स्वंतत्र विचार नीटपणाने मांडू पाहणाऱ्या अशा आहेत. कधी काळाबरोबर तर कधी काळाच्या पुढेदेखील दोन पावले टाकून विवाह वा कुटुंब संस्थेविषयक वेगळा विचार मांडणाऱ्या अशा आहेत. नायक मात्र पुरुषसत्ताक पारंपरिक विचार करणारा, कुठलीही मोडतोड न करता आहे त्या व्यवस्थेत सगळी सुखे कशी मिळवता येईल त्या अंगाने विचार करणारा असा आहे. 'अभिमान' कथेतील कान्त व बीना हे याचे उदाहरण म्हणून नमूद करता येईल. एकत्र शिकणारे हे दोघे चांगले मित्र आहेत. मात्र बीनाची ध्येयकेंद्रितता, तिची स्वतंत्र विचारशैली, आर्थिक स्वावलंबन त्याला नको असते; तर एक पारंपरिक, कुटुंबवत्सल स्त्रीच्या तो शोधात असतो. या मतभिन्नतेमुळे ते दोघे एकत्र येणे शक्य होत नाही.
 जैविक गरजांचे समाधान हे अस्तित्व टिकवण्यासाठी महत्त्वाचे असते. या गरजांच्या पूर्तीसाठी व्यक्ती विविध मार्गांचा अवलंब करते. मात्र त्यांची जेव्हा पूर्ती होत नाही अथवा सामाजिक नियमनांमुळे त्या जेव्हा दबल्या जातात, तेव्हा त्या

अन्वयार्थ ४९

विकृतीचे वा मनोविकारांचे रूप धारण करतात. 'बास्टर्ड' कथेतील पारधी समाजाच्या शेवंताचा नवरा बुळा, कर्तृत्ववान नसल्यामुळे ती नानासाहेब इनामदारांशी खुलेआम शरीरसंबंध ठेवते. त्यांच्यापासून तिला मुलगादेखील होतो. इनामदारांच्या मृत्यूनंतर ती पुन्हा अन्य पुरुषाबरोबर - महादजी पाटील - संबंध ठेवते. तिचा मुलगा बबन याला विरोध करतो. तेव्हा ती म्हणते, "आपलं समदं खुल्लम खुल्ला असतंया. अजून मी बुड्ढी नाय झाले. अजनू आग हाय इथं... म्या माझी जिम्मेदार हाय.” (बास्टर्ड, पृ. १७) ही शेवंताची वर्तणूक बबनला गैर, अनैतिक वाटते. मात्र तिला त्यात गैर काहीही वाटत नाही. एक प्रकारे आपली आदिम प्रेरणा, जैविक गरजच भागवतोय, असा शेवंताचा त्यापाठीमागे वर्तनभाव असतो.
 मात्र दुसऱ्या एका 'हे खेळ मनाचे सारे' या कथेत नेमके याच्या उलट घडते. निवेदक श्रीची आई नानी ही विधवा आहे. श्री लहान असतानाच वडील वारले. त्यामुळे आईला उभे आयुष्य एकाकी काढावे लागते. त्यांच्या शेजारच्या बंगल्यात विधुर असणारे मास्तर राहात असतात. त्यांच्याकडे नानींचे जाणे येणे असते. दरम्यान मास्तरांविषयी नानींना आकर्षण निर्माण होते. मात्र संस्कारशील पित्याची कन्या, वेदशास्त्रसंपन्न घराण्याची सून, डॉक्टर श्रीची आई - ही लेबले चिकटल्यामुळे मनातील भाव कुणाजवळ प्रकट करता येत नाही. त्याशिवाय सामाजिक नियमांचा, नैतिक मूल्यांचा प्रचंड दबाब असल्यामुळे असा विचार, कृती म्हणजे परंपरेच्या दृष्टीने 'वाकडे पाऊल' ठरणार असते. त्यामुळे ही सारी घुसमट, अतृप्त वासना मनातच दडून राहते आणि पुढे मनोविकृतीचे रूप धारण करते. आपल्या मनात आलेले परपुरुषविषयक विचार-विकार समाजभयापोटी आपले नसून ते आपल्या संदर्भात ते त्याच व्यक्तीचे आहेत. असा 'टाईप ऑफ प्रोजेक्शनचा' मनोविकार तिला जडतो. शेवंता व नानी या दोघींची तुलना केली तर दोघींचीही जैविक गरज पूर्ण झालेली नाही. त्यासाठी त्या पर्याय शोधू पाहातात. तेव्हा शेवंता करू पाहात असलेली पूर्ती ही तथाकथित सामाजिक विकृती ठरते; तर नानींची मनोविकृती ठरते. या दोघींच्या संदर्भात त्यांच्या मुलांचे वर्तनदेखील भिन्न स्वरूपाचे आहे. श्री स्वत: डॉक्टर, मनोविकार तज्ज्ञ असल्यामुळे आईला नीट समजून घेऊ शकतो; मात्र बबनला शेवतांचे वर्तन सामाजिक संस्कारांमुळे अनैतिक वाटते. जैविक गरजांना सामाजिक वर्तन आणि संस्कार कसे परावर्तित करतात, त्यांची 'कंडिशनिंग' करतात - हे इथे दिसून येते.
 'भुके'साठी, पर्यायाने जगण्यासाठी, करावा लागणारा संघर्ष 'रात्र' सारख्या कथेतून तीव्रपणे अधोरेखित झाला आहे. उच्चशिक्षित असूनही दिग्विजयला नोकरी मिळत नाही. तेव्हा गावातीलच महाविद्यालयाला विज्ञानाच्या प्रात्यक्षिकासाठी बेडूक
५० अन्वयार्थ

पकडून देण्याचे काम त्याला करावे लागते. आपण महार जातीचे असल्यामुळे शेवटी पुन्हा हाच धंदा आपल्या नशिबी यावा, याचे त्याला वाईट वाटते. आणि जातवास्तवाच्या दाहकतेने तो अधिक विचारप्रवण होतो.
 मानवी नातेसंबंध, भावबंध हे अलीकडच्या व्यक्तिवादी जाणीवेमुळे कसे तुटत, विस्कटत चालले त्याचे प्रत्यंतर काही कथा आणून देतात. 'अंतराय'मधील रामसिंग व लक्ष्मण हे दोघे सख्खे भाऊ आहेत. मात्र लक्ष्मणच्या मनात मोठ्या भावाविषयी क्षुल्लक कारणावरून असूया, द्वेष निर्माण होतो आणि त्याच्यापासून दूर जातो. मात्र ‘बास्टर्ड' मधील गायत्रीला आपल्या पतीने दुसऱ्या बाईबरोबर ठेवलेल्या शरीरसंबंधातून जो मुलगा झाला, त्याला पाहण्याची एक अनाम ओढ लागून राहिली आहे. तर 'अंतरीच्या गूढगर्भी' मधील नरेश आवडत्या जयाशी लग्न होऊनही बेचैन आहे. अगोदर तिचे लग्न दुसऱ्याबरोबर ठरलेले असते. त्याचे निधन होते. तेव्हा आपले प्रेम असलेल्या जयाला नरेश स्वत:हून मागणी घालतो. त्यांचे लग्नदेखील होते. परंतु अगोदरच्या ‘मकरंद' विषयीचा भुंगा सतत त्याचे डोके पोखरत असतो. नातेसंबंधातील संशयीवृत्ती जगणे असह्य करते - ते इथे दिसते
 'आयुष्य ओघळल्यावर' आणि 'विरत चाललेलं माणूसपण' या कथा देखील मानवी नात्यांतील सैल होत जाणारी वीण अधोरेखित करतात. 'आयुष्य....' मधील रमण इंग्लंडमध्ये स्थायिक झालेला. तिथेच पाश्चात्त्य मुलीबरोबर संसार थाटलेला, मात्र गावाकडे नांदेडला आल्यावर 'नॉस्टॅल्जिक' होतो. गतस्मृतीत रममाण होतो. आणि बालपणीच्या पाहिलेल्या, अनुभवलेल्या, जीव लावलेल्या वस्तूंशी, माणसांशी भावनिक गुंतत जातो. सारा भूतकाळ त्याला हवासा वाटतो आणि आपण परदेश स्वीकारच नव्हे; तर परसंस्कृती स्वीकार करतो आहोत, असा अपराधगंड निर्माण होतो. 'विरत चाललेलं....' या कथेतील निवेदक आजोबांच्या प्रथम श्राद्धासाठी निघतो; मात्र ओव्हरटाईम जाणार म्हणून काही काळ संभ्रमित होतो. भौतिक की भावनिक असा एक सांस्कृतिक संघर्ष या दोन कथांच्या निमित्ताने लेखक उभा करू पाहातो.
 दुःख ही एक सनातन मानवी जाणीव प्रत्येकाच्या वाट्याला ती नाही म्हटले तरी येतेच. प्रेमातील वैफल्य, हवे ते इच्छित न मिळणे, मनासारखी निर्मिती न होणे, कधी परिस्थिती, नियती आड येणे यामुळे हा दु:खभोग अटळ असतो. कलावंताला ही दुःखाची जाणीव अधिक गहिरी, सघन बनवते. किंबहुना त्याच्या दु:खाची जातकुळी ही सामान्यांपेक्षा काहीशी वेगळ्या कोटीची असते. तो जेव्हा भौतिक सामाजिक संरचनेला बाजूला सारून, त्यांच्या मर्यादा अधोरेखित करून काही नवे निर्मू पाहातो, आधिभौतिकतेचा शोध घेऊ पाहातो, हा दुःखाचा ससेमिरा

अन्वयार्थ ५१


त्याच्या पाठीशी अधिक लागतो. 'सृजन कसा तडफड करी' ही कथा अशाच एका मनस्वी कलावंताच्या असीम द:खाचा वेध घेते. गुरू व रीटा या चित्रपट क्षेत्रातील दोन कलावंतांची ही शोकात्म कथा. प्रत्यक्षातील गुरुदत्तच्या लौकिक जीवनातील संदर्भाचे स्मरण करून देणारी व या संग्रहातील महत्त्वाची ठरावी अशी कथा. गुरू हा एक कलात्म ध्यास असलेला दिग्दर्शक, मात्र सतत अस्वस्थ. सतत नवे काही शोधण्याची, निर्मिण्याची धडपड. आपल्याच विश्वात, कलाजीवनात मग्न; त्यामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष, पत्नीशी सतत संघर्ष. मुलगी पत्नीने त्याच्यापासून दूर ठेवलेली त्यामुळे दु:खाची खोलवर टोचणी. दुसरीकडे या कथेतील नायिका व गुरूच्या चित्रपटाची नायिका रीटा हिचा कुटुंबव्यवस्थेवर विश्वास नाही. एका मित्राबरोबर आलेल्या संबंधातून लग्नाअगोदर मुलगा होतो, त्याला वाढवते. मात्र तो फार काळ टिकत नाही. त्याचे जीवघेणे दुःख आयुष्यभर सांभाळते. या दोघांची मैत्री, एकत्र येणे, निर्मितीच्या जीवघेण्या वेणा, सामाजिक घटकांचा जाच, कौटुंबिक विस्कटलेपण, सततची अस्वस्थता, भणंगता अशा विविध ताणांवर तोललेली ही कथा एका आदिम सत्याचा शोध घेऊ पाहते. मानवी जीवनाकडून आधिभौतिकतेकडे झेपावू पाहाते. या निमित्ताने कथेत कुटुंब, विवाह या संस्थांच्या मर्यादा आणि आवश्यकतेचा परीघ यांकडे देखील अंगुलीनिर्देश केला गेला आहे. या संग्रहातील व देशमुखांच्या कथासंभारातील एक महत्त्वाची कथा म्हणून तिचा उल्लेख करता येईल. 'जोकर' ही कथा 'मेरा नाम जोकर' या चित्रपटाशी नाते सांगणारी, शारीर अपंगत्वामुळे जोकरच्या वाट्याला येणारे प्रेम- वैफल्य चित्रित करणारी अशी आहे.
 'किलिंग' या कथेत देखील कलांवत लेखकांचा जीवनानुभव आणि तो प्रकट करत असताना होणारी जीवघेणी घालमेल प्रकटते. कथेची नायिका प्रियू ही बालकांसाठी कथालेखन करते. तिचा मुलगा बंडू हा मतिमंद आहे. सतरा वर्षांचा असूनही त्याची नीट / पुरेशी बौद्धिक वाढ झालेली नाही. त्याला इतके दिवस महत्प्रयासाने वाढवले. अजून बरेच आयुष्य पडले. मात्र मातृत्वाची ओढ तिला स्वस्थ बसू देत नाही. त्याच्या रंजनासाठी, रिझवण्यासाठी विविध उपाय करते. त्याचाच भाग म्हणजे बंडूसाठी कथालेखन करणे. या कथेत ती नंदू नावाचा शूर, धाडसी असा बालनायक निर्माण करते. बंडूच्या अपंगत्वाची उणीव नंदूच्या निमित्ताने भरून काढते. नंदूच्या पराक्रमाच्या कथामालिका बालवाचकांना देखील प्रिय वाटतात. नंदला यशाच्या शिखरावर नेऊन बसवते. मात्र इकडे बंडूला आजारपणामुळे सांभाळणे दिवसेंदिवस कठीण होत आहे; तेव्हा त्याला 'मर्सी किलिंग' द्यावे की काय असा विचार विद्युत्वेगाने तिच्या मनात चमकून जातो. मात्र तिच्यातील आईपण तो लागलीच धुत्कारून लावते आणि ती बंडूच्या जगण्याच्या बाजूने

५२  अन्वयार्थ 


मूल्यनिर्णय घेते. त्यानंतर काही दिवसांतच बंडूला नैसर्गिक मरण येते. तेव्हा अगोदर मनात आलेल्या विचाराने ती बेचैन होते. आणि ही बेचैनी ती नंदू या कथामालिकेच्या बालवीराला 'मर्सी किलिंग' देऊन थांबवण्याचा प्रयत्न करते. माता आणि लेखिका या दोन्ही सृजनाच्या पातळ्या नैतिक मूल्यनिर्णयासंदर्भात कशा एकमेकींशी नाते सांगतात तर कधी एकमेकींवर प्रभाव टाकतात ते मांडले आहे. जीवन आणि कला यांचे विश्व कधी समांतरपणे; तर कधी एकमेकांत मिसळून पुढे जात असते. मात्र जीवनातील अस्वस्थता, वैफल्य वाढीस लागल्यावर ते संपवावे, की पुढे वाहते ठेवावे, असा मूल्यनिर्णय देण्याची वेळ येते, तेव्हा ती संवेदनशील व्यक्ती म्हणून जीवनाच्या बाजूने उभी राहते. मात्र जेव्हा नियती ते संपवते, तेव्हा तितक्याच प्रेमाने वाढवलेली कलाकृती देखील ती संपवते. या निमित्ताने कथालेखकाने जीवन व कला यासंदर्भात काही मूलभूत प्रश्न उपस्थित करून 'काव्यगत न्याया'वर जीवनव्यवहार प्रभाव टाकतो- त्याचे सूचन केले आहे.
 या कथासंग्रहातील 'राधा', 'हे खेळ मनाचे सारे' या दोन कथांतून निवेदनाच्या स्वरूपात काही प्रयोग करण्याचा प्रयत्न आहे. 'राधा' मध्ये सलग कथानिवेदन सुरू असताना मध्ये लघुपटाचे निवेदन आले आहे. तर 'हे खेळ...' मध्ये आलटून पालटून पात्रमुखी निवेदन तंत्र वापरले आहे. कधी धक्कातंत्राचा / कलाटणीचा देखील लेखक वापर करतो.

॥२॥

 मराठवाडा हा प्रदेश सतत दुष्काळाशी संघर्ष करत आला. या दुष्काळामुळे ग्रामजीवन मोठ्या प्रमाणात प्रभावित होते. कारण नागरी जीवनाप्रमाणे तिथे केवळ मानवी जीवनच अस्तित्वात असत नाही; तर या मनुष्यसृष्टीबरोबरच जनावरे, अन्य पशुपक्षी, वनस्पती, शेतातील पिके या साऱ्या 'पर्यावरणीय अधिवासा'तील घटकांना दुष्काळाची झळ सोसावी लागते. मात्र दुष्काळ निवारणासाठी शासकीय स्तरावर ज्या उपाययोजना केल्या जातात. त्या प्राय: 'माणूस' हे एकक ध्यानी घेऊन; परंतु आजूबाजूच्या या निसर्गसृष्टीचा ते फारसा विचार करत नाही. त्यामुळे ग्रामजीवनात दुष्काळाची तीव्रता अधिक जाणवते.
 लक्ष्मीकांत देशमुख यांचा ‘पाणी! पाणी!!' (२००७) हा कथासंग्रह याच विषयाला केंद्रित करतो. १९९७ मध्ये हाच संग्रह 'उदक' या नावाने प्रसिद्ध झाला होता. दहा वर्षांनंतरदेखील 'तहानलेल्या महाराष्ट्राची कहाणी' (संग्रहाचे उपशीर्षक) आहे तशीच आहे. यातील बहुतांश कथा ह्या मराठवाडा प्रदेशातील असल्या, तरी काही मात्र परिसरातील वातावरणाला अधोरेखित करतात.

अन्वयार्थ ५३


दुष्काळ हे नैसर्गिक संकट असले तरी त्याच्या निवारणाच्या उपाययोजना ह्या संस्थात्मक शासकीय पातळीवरील असतात. त्यामुळे तेथे मानवी हस्तक्षेपास बराचसा वाव असतो. देशमुखांनी या निमित्ताने प्रस्तुत संग्रहातील कथांमधून दुष्काळासंदर्भातील राजकारण, राजकीय पक्षांची श्रेय घेण्यासाठीची स्पर्धा, आपापल्या मतदारसंघात रोजगार हमीची कामे सुरू करण्यासाठी धडपड, धान्य वाटपातील काळाबाजार, धरणाचे - नदीचे पाणी वरचेवर अडवणे, टँकरच्या पाणी पुरवठ्यातील दंडेलशाही, एका पाणवठ्यावर पाळली जाणारी जातीय विषमता, अन्न-पाणी न मिळाल्यामुळे गेलेले भूकबळी, जगण्याचे पाण्याचे मूल्य म्हणून काही अपप्रवृत्तीनी केलेला स्त्रियांच्या शरीराचा वापर, गरोदर महिलेला प्रसूतीसाठी पाणी न मिळणे, प्रतिष्ठित म्हणवल्या जाणाऱ्या सरंजामी वृत्तीच्या पुरुषांच्या बायका खडीकाम / रोहयोच्या कामावर जाणे आणि त्यांनी प्रतिष्ठाहनन होऊ नये म्हणून गावातच थांबणे - अशा विविध आशयसूत्रांना या कथा आविष्कृत करतात. देशमुखांची पूर्वीची कथा ही व्यक्तिनिष्ठि स्वरूपाची होती. या कथांनी तिला सामाजिक आशयाचे एक व्यापक परिमाण मिळवून दिले. आपल्या काळाची, विशेषत: दुष्काळाची, तीव्रतर स्पदंने देशमुख इथे टिपतात. आशयसूत्रांचे परस्परांशी असणारे संबंध, स्थळ - कालावकाशाची सलगता, पात्रांची कथांतील पुनरावृत्ती व विकासक्रम, प्रदेशाची भाषेची समानता अशा बाबींमुळे या कथा सुट्या सुट्या असल्या तरी कांदबरी सदृश अशा सलग कथानकाचा प्रत्यय वाचकास देतात.
 एकाच जिल्ह्यातील दोन तालुक्यात असमान पाणी वाटपामुळे सामान्य शेतकऱ्यांना जो जाच सहन करावा लागतो त्याविषयीचा अनुभव ‘पाणी चोर' या कथेतून येतो. महादू हा ऊसशेतीचा मालक. मात्र धनदांडगे शेतकरी त्याच्यापर्यंत पाणी पोहोचू देत नाहीत. त्यामुळे डोळ्यादेखत उभे पीक पाण्याविना जळून जाताना तो पाहातो. आणि दुसऱ्याच्या शेतावर ऊसतोड मजूर म्हणून त्याला काम करावे लागते. 'लढवय्या' कथेतील महादू कांबळे हा सैन्यातून निवृत्त होऊन गावी स्थायिक झालेला आहे. गावचा सरपंच त्याला शासनाकडून मिळालेल्या जमिनीत वरच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून पाझर तलावाचे नियोजन करतो; गावकऱ्यांना त्यांच्या विरोधी उभे करतो. महादू कांबळे आपल्या परीने अधिकाऱ्यांना-गावकऱ्यांना समजावतो. मात्र कुणीही त्याचे ऐकायला तयार नसते. तेव्हा तो हतबल होतो आणि आपल्या देशातील व्यवस्थेविरोधातच उभा राहण्याचा निर्णय घेतो. इतके दिवस बाहेरच्या, परकीय शत्रूशी लढलो आता घरभेद्यांशी लढणे आले, असे समजून सरपंचाच्या विरोधात उभा राहतो. ऊसतोड मजूर महादू व 'लढवय्या' मधील महादू कांबळे हे दोघे भिन्न जातींचे, वर्गांचे आहेत. परंतु त्यांचे शोषक मात्र

५४ अन्वयार्थ


समानधर्मी असे आहेत. ते दोघेही त्यांच्याविरोधात संघर्ष करू पाहतात; मात्र त्यांचा हा संघर्ष सुटा, एकल स्वरूपाचा ठरतो, तो सामूहिकतेचे रूप घेत नाही. त्यामुळे तो विद्रोहाच्या पातळीवर पोहोचण्याऐवजी तात्कालिक क्रोधाचे, संतापाचे रूप घेतो.
 ग्रामजीवनात सरंजामी जाणीव सूक्ष्मस्वरूपात अद्यापही रुजून असल्याचे काही कथांतून दिसून येते. ही सरंजामी मानसिकता आणि पितृसत्ताक व्यवस्था या दोघोंच्याही बळी ह्या स्त्रियाच ठरलेल्या आहेत. विशेषत: मराठा, मुस्लीम आणि ब्राह्मण समाजातील स्त्रियांना याची झळ अधिक पोहोचते. (दलित स्त्रियांचे दुःख त्याहीपेक्षा अधिक दुहेरी पातळीवरचे आहे). ब्राह्मण समाज शिक्षणामुळे ही मानसिकता बाजूला सारण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. 'खडकात पाणी' या कथेतील ब्राह्मणाची सून सुनंदा हिच्या पायगुणाने दुष्काळग्रस्त आकाशवाडी-मध्ये पाऊस आला म्हणून गावकरी तिचे स्वागत करतात. तिच्या हस्ते कूपनलिकेची पूजा होते. संबंध गाव, तिचे कुटुंब आणि कथानिवेदक देखील तिच्याकडे आदराने पाहतात. मात्र मराठा व मुस्लीम समाजातील स्त्रियांची स्थिती नेमकी याच्या उलट आहे. घरंदाज, खानदानी म्हणवले जाणारे कुटुंब देशोधडीला लागते, तेव्हा रोहयोच्या कामावर जाण्याखेरीज गत्यंतर नसते. मात्र नवरा सरंजामी-वृत्तीचा असल्यामुळे अशा कामावर जाणे त्याला प्रतिष्ठेचे वाटत नाही. आणि तो स्वत:देखील जात नाही. 'बांधा' कथेतील गजरा आणि 'अमिना' मधील अमिना या दोघी अशा व्यवस्थेच्या बळी ठरलेल्या आहेत. 'जगण्याची हमी' मधील कैकाडी समाजाच्या सारजाचे दु:ख वेगळ्या प्रकारचे आहे. तिचा नवरा गावचा पोलीस पाटील आहे. तो पाटलांची काम न करण्याची परंपरा पुढे चालवतो. त्यामुळे कुटुंबाची उपासमार होते. सारजाला धीराने पुढे होऊन काम करून जगण्याची हमी मिळवावी लागते.
 दलित समाजातील स्त्रियांच्या दुःखाचे अंत:स्तर अधिक गहिरे आणि दुहेरी स्वरूपाचे असे आहेत. दलित म्हणून सामाजिक विषमतेचा जाच जसा असतो; तसेच तिला कुटुंबात देखील दुय्यमत्व असते. 'कंडम' कथेतील निराधार बायजा पाण्यासाठी व्याकूळ होते. पाटलांची सून, जोशांची बायको म्हाताऱ्या बायजाला पाणी वाढत नाही. शिवाय दलितांसाठीची पाण्याची विहीर दूर असते. तहानेने व्याकूळ झालेली बायजा अंधारात सवर्णांच्या विहिरीवर जाते; आणि पाणी शेंदत असतानाच पडून तिचा अंत होतो. दुसऱ्या दिवशी विहिरीतील तिचे प्रेत पाहून सवर्णीय खवळून उठतात. विहीर बाटली म्हणून तिची शुद्धी करून घेण्याचे ठरवतात. पाण्याअभावी एका वृद्ध दलित स्त्रीचा मृत्यू होतो आणि सवर्ण शुद्धाशुद्धतेची, तर दलित तिचे प्रेत वाहून न्यावे लागणार म्हणून तेथून पळ काढण्याची भाषा

अन्वयार्थ ५५


करतात. 'बायजा'सारख्या स्त्रियांचा छळ जिवंत असताना तर सुरू असतोच, मात्र मेल्यानंतरदेखील त्यांना त्याला सामोरे जावे लागते. 'मृगजळ' मधील रखमा आणि 'उदक' मधील प्रज्ञा या दोघी दलित तरुणी शिक्षित आहेत. मात्र पाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षात त्यांच्या शरीराचा वापर काही जण करून घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्या धीराने तोंड देऊन व्यवस्थेच्या विरोधात उभे राहण्याचे ठरवतात.
 'भूकबळी' ही या संग्रहातील एक महत्त्वाची आणि सर्वार्थाने दुष्काळी समाजाची प्रतिनिधी ठरावी अशी कथा आहे. सामान्य, हातावर पोट असणाऱ्या दलित कुटुंबाची दुष्काळात सर्व बाजूने कोंडी होऊन कशी होरपळ होते त्याचे साद्यंत शोकात्म असे चित्रण आले आहे. या कथेतील ठकूबाई ही नैसर्गिक अन्नधान्याच्या तुटवड्यामुळे भूकबळी ठरत नाही, तर शासन-प्रशासनाच्या गलथानपणामुळे ती बळी गेल्याचे दिसते. रोहयोची कामे असूनही या कुटुंबाची होणारी फरफट, कामाचा मोबदला म्हणून मिळाणाऱ्या धान्याच्या काळाबाजार, ते देणाऱ्या दुकानदारांची मनमानी, मजूर संघटनांची अपप्रवृत्ती, शासकीय अधिकारी-कर्मचारी यांची भ्रष्ट प्रवृत्ती, संवेदनाहीनता, अशा वेगळवेगळ्या घटकांच्या ताणामुळे ठकूबाईसारख्या महिला भूकबळी ठरतात हे इथे प्रत्ययास येते. तीव्रतर अशी सामाजिक समस्या कथाकाराने अतिशय संयतपणाने आणि तितक्याच कलात्मरीतीने हाताळली आहे.
 दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या जगण्याचा आधार ठरणारी जनावरे चारापाण्याअभावी सैरभैर होतात. पर्याय नसताना खुंट्यावर मरण्याऐवजी जो येईल त्याला जनावर बेभाव विकले जाते. अशा परिस्थितीत कत्तलखाने जोरात सुरू असतात. त्या संदर्भातील कारुण्यपूर्ण चित्रण 'दास्ता ए अलनूर कंपनी' या कथेतून आले आहे.

 बहुतांश ग्रामीण कथनात्म साहित्यातून प्रशासकीय अधिकाऱ्यांची भ्रष्टता, बोथटता आलेली आहे आणि ते सत्यही आहे. मात्र या संग्रहातील काही कथांत सरकारी अधिकारी संवेदनशील, जनतेप्रति बांधिलकी असलेले, प्रसंगी आपल्या उच्चपदस्थांचा रोष ओढवून घेणारे असे आहेत.
॥३॥

  लक्ष्मीकांत देशमुख यांच्या 'नंबर वन' या संग्रहातील एकूण दहाही कथा क्रीडाक्षेत्राशी संबंधित आहेत. मानवी जीवनातील सहजप्रवृत्ती ह्या जशा अन्य क्षेत्रात कार्यरत असतात तशाच त्या क्रीडाक्षेत्रात देखील कार्य करत असतात, त्याचा प्रत्यय या कथांच्या वाचनाने येतो. क्रीडाक्षेत्रातील खेळाडू, क्रिकेटर ह्या ‘पब्लिक

५६ अन्वयार्थ


फिगर' असतात. समाजमनात त्यांच्याविषयी एक विशिष्ट प्रतिमा असते. त्यामुळे त्यांच्या खासगी - वैयक्तिक व्यवहाराचे पडसाद त्यांच्या सार्वजनिक जीवनात; करिअरवर उमटत असतात. अशा अंगाने ही कथा खेळाडूंमधील ‘मानवी मन', त्यांचे 'मातीचे पाय' शोधण्याचा प्रयत्न करते.
 रनिंग, क्रिकेट, बॅडमिंटन, जलतरण, शूटिंग या क्रीडा प्रकारांच्या निमित्ताने त्या - त्या प्रकारांतील सूक्ष्म तपशील कथाकाराने मांडले आहे. क्रीडाक्षेत्राशी समरूप झालेला खेळाडू आजूबाजूच्या समूहभावाला बाजूला सारून 'लक्ष्या' वर केंद्रित होतो. मात्र त्याच्या भाववृत्ती, सहजप्रवृत्ती, त्याचा लहरी स्वभाव जेव्हा उफाळून येतो तेव्हा त्याच्या हातून काही प्रमाद घडतात. अशा समयी त्याचे यश बाजूला पडते आणि चाहत्यांच्या मनावर 'नायक' म्हणून विराजमान झालेला तो नंतर 'खल' नायक ठरतो. क्रीडाविश्व आणि मानवी भावविश्व यांची संमिश्र अशी गुंतागुंत कथाकाराने प्रकट केली आहे.
 'फिरूनी नवी जन्मेन मी' ही या संग्रहातील ग्रामीण भागातील पाथरवट समाजातील मुलीच्या जीवघेण्या संघर्षाची, क्रीडाक्षेत्रात तिला कराव्या लागणाऱ्या सामन्यांची कथा आहे. मीना ही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय धावपटू आहे. मात्र आशियन गेम्सच्या स्पर्धेत तिला 'लिंग निदाना' (जेंडर टेस्ट) ला सामोरे जावे लागते. आणि त्यात 'त स्त्री नाहीस' असे तिला सांगितले जाते. तेव्हा धावण्याच्या शर्यतीत अव्वलस्थानी असणारी मीना कोलमडते आणि 'आपण स्त्री आहोत' हे सिद्ध करण्यासाठी जीवतोड मेहनत करते. मात्र तिची स्पर्धक विरोधक सानिया वेगळा पवित्रा घेऊन तिला सातत्याने अडचणीत आणण्याचा प्रयत्न करते. तेव्हा ती आत्महत्येस देखील प्रवृत्त होते. स्त्री म्हणून होणारी कुचंबणा, घुसमट वेगळी आणि स्त्री असूनही पुरुषी गुणधर्म अधिक असल्यामुळे स्त्री नाही म्हणून वाट्याला येणारी वेदना त्यापेक्षा अधिक जीवघेणी, आणि त्यासंदर्भातील शह-काटशह यांचा प्रत्यय इथे येतो.
 'बंद लिफ्ट' ही क्रिकेट जगतावर अधिष्ठित असलेली एक कथा आहे. कथेच्या वाचनाने क्रीडा क्षेत्रातील प्रत्यक्षातील काही संदर्भ वाचकांच्या डोळ्यांसमोर उभे राहतात. हॅम व सॅम या दोन बालपणापासूनच्या एकत्र करिअर घडवून पाहणाऱ्या मित्रांतील नात्यांची आणि विशेषत: हॅमची शोकान्त अशी कहाणी आहे. सॅम उच्चवर्णीय समाजाचा. तो आपला खेळ, फॉर्म, खासगी जीवन हे सारे सांभाळून पुढे पुढेच जात राहतो. मात्र हॅम दलित समाजातील. तोही सॅम इतकाच खेळण्यात माहीर. क्रिकेट जगतात स्वत:चे स्थान असलेला आहे. परंतु खासगी जीवनातील वर्तन समाजनियमांना धरून न करणे, अभावग्रस्ततेमुळे उपभोगाच्या

अन्वयार्थ ५७


पाठी धावणे, आपल्या फॉर्ममध्ये सातत्य न टिकवणे आणि दलितत्वामुळे निवड समितीने आपपरभाव बाळगणे यामुळे तो या क्षेत्रापासून बाजूला फेकला जातो. आणि निराशेच्या, वैफल्याच्या गर्तेत अडकतो. परिस्थिती, नियती ह्या माणसाच उज्ज्वल भविष्य घडविण्याच्या जशा कामी येतात तशाच बिघडण्याचीदेखील भूमिका बजावतात. याचा इथे प्रत्यय येतो.
 बेबी राणे ('रन बेबी रन') ही एक उत्कृष्ट धावपटू आहे. तिचे कोच - गुरू यांचा मानसिक-भावनिक आधार घेऊन उभी राहते. पुढे लग्न झाल्यानंतर पुरुषसत्ताक मानसिकतेचा पती मिळतो, त्यामुळे आपले करिअर तर थांबवावे लागतेच, मात्र प्रचंड मानसिक - शारीरिक त्रासामुळे आत्महत्येस प्रवृत्त व्हावे लागते.
 'ब्रदर फिक्सेशन', 'दी रिअल हिरो', 'प्रयासे जिंकी मना', 'नंबर वन' यासारख्या कथा खेळाडूंमधील माणूसपण जपू पाहणाऱ्या. कधी त्यांच्यातील सहजप्रवृत्तींना अधोरेखित करणाऱ्या तर कधी महत्त्वाकांक्षा, खिलाडूवृत्ती यांचे देखील दर्शन घडवणाऱ्या अशा आहेत. 'शॉर्प शूटर' सारखी कथा अंडरवर्ल्डमधील शूटर भारताचा अव्वल नेमबाज कसा बनतो - त्याच्या हृदयपरिवर्तनाची काहीशी अतिरंजित वाटावी अशा स्वरूपाची आहे.
 कथांच्या निवेदनाला आलेला प्रवाहीपणा, कथानक सहज पुढे घेऊन जाण्याची क्षमता यामुळे या कथा वाचक सहजतेने, उत्कंठेने वाचतो. कथानक काहीसे परिचित - अपरिचिताच्या सीमारेषेवर वावरणारे. त्यामुळे वाचक डोक्याला फारसा ताण न देता पुढे काय होणार याविषयी अंदाज बांधायला लागतो. या खेळाडूंची मुमूर्षा आणि जिगीषा पाहून हरखून जातो. असे असले तरी ती कुठेही रंजनपर होत नाही. आपला कलात्म तोल ढळू देत नाही. मराठी साहित्याला क्रीडाक्षेत्र तसे अपरिचित नाही. मात्र अलीकडच्या काळात या क्षेत्रावर अधिष्ठित कथनपर साहित्य फारसे दिसून येत नाही. त्यादृष्टीने हा कथासंग्रह 'नंबर वन' ठरावा अशा स्वरूपाचा आहे.

॥४॥

 देशमुखांचा 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' हा कथासंग्रह अगदी अलीकडे, वर्षभरापूर्वी, प्रकाशित झाला. 'स्त्रीभ्रूणहत्या' या विषयाच्या वेगवेगळ्या बाजू या निमित्ताने देशमुखांनी वाचकांसमोर मांडल्या आहेत. स्त्रीभ्रूणहत्या ही समस्या गेल्या दोन दशकांपासून ज्वलंत उभी ठाकली आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या समाजधुरिणांच्या पुरोगामी महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालावयास लावणारी अशी ही बाब आहे. ती एकाएकी उद्भवली

५८ अन्वयार्थ


अशातला भाग नाही, तर तिच्या निर्मितीसाठी विविध सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक न्यू कार्यरत असल्याचे दिसून येते. धर्म-संस्कृतीमध्ये स्त्रियांचे स्थान, त्यांना मिळालेले दुय्यमत्व, विविध सामाजिक संस्थांतर्गत स्त्रियांची जागा व भूमिका यांचे देखील दुय्यमत्व, पितृसत्ताकतेमुळे वंशसातत्य - वारसा पुढे चालविण्यासाठी हवा असणारा 'दिवा', मध्ययुगीन सरंजामी मानसिकता, हुंड्यासारखा प्रश्न निर्माण झाल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांची मुळातच कमकुवत असलेली आर्थिक बाजू, स्त्रियांवरील वाढत्या अत्याचारांचे प्रमाण आणि तदनंतर समाजाची त्या स्त्रीला वा कुटुंबाला मानसिक-भावनिक पातळीवर समायोजित न करून घेण्याची अपप्रवृत्ती. कुटुंबाला आर्थिक आधार देणारा, म्हातारपणाचा सांभाळ करणारा केवळ मुलगाच; तर मुलगी म्हणजे परक्याचे धन ही समाजाची भावना - अशा अनेकविध बाबींमुळे अलीकडच्या काळात बहुसंख्याक (संख्येच्या दृष्टीने) समाजाला मुलगी 'नकोशी' झाली होती हे २००१ व २०११ च्या जनगणनेने सिद्ध झाले. त्यामुळे विषयासंदर्भात कधी प्रबोधनाने, तर कधी कायद्याने लोकमानसात जागृती करणे गरजेचे झाले.
 लक्ष्मीकांत देशमुख यांनी कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना 'सेव्ह द बेबी गर्ल' (लेक वाचवा) हे अभियान तीन वर्ष चालवले. त्या अंतर्गत विविध योजना - उपक्रम राबवले. हे करत असताना विविध अनुभव, अनुभूती त्यांच्या गाठीशी जमा झाली. त्याचे प्रत्यंतर म्हणजे प्रस्तुतचा 'सावित्रीच्या....' हा आठ कथांचा सामाजिक दस्तऐवज ठरावा अशा स्वरूपाचा कथासंग्रह होय. महाराष्ट्रीय समाजमनाला स्त्रीभ्रूणहत्येसंदर्भात केलेला तो एक ‘कांतासंमित उपदेश' च ठरेल.
 या संग्रहाची एक उल्लेखनीय बाब म्हणजे यातील बहुतांश नायिका ह्या भ्रूणहत्येला मनस्वी विरोध करतात. लिंगसमानतेसंदर्भात व्यापक विचार करून तो पतीच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करतात. मात्र पतीच्या पारंपरिक आणि पुरुषी मानसिकतेमुळे या कृत्याला त्यांना बळी पडावे लागते. या निर्णयप्रक्रियेत त्यांच्या मनाचा कुठेही विचार केला जात नाही. 'माधुरी व मधुबाला' या कथेमधील सरिता पाहिली मुलगी होणार म्हणून आनंदून जाते. मात्र नायक (?) गणेशला पहिला मुलगाच हवा असतो. त्यामुळे तो सरिताला फसवून, डॉक्टरशी संधान साधून तिचा गर्भपात घडवून आणतो. आपल्या मुलीची भ्रूणहत्या झाली म्हणून ती हिस्टेरिक होते. त्यानंतर त्याचे मन परिवर्तन होते आणि तो दुसरी मुलगी 'दत्तक' घेऊन ती वाढवण्याचा निर्णय घेतो. 'इमोशनल अत्याचार' मधील शिक्षिका असलेल्या आशाला दोन मुली आहेत आणि त्यांच्यावरच थांबण्याची तिची तयारी आहे. मात्र पतीला तिसरे मूल हवे असते. लिंगनिदान चाचणीत ती मुलगी आढळते. तेव्हा पती तिला गर्भपातासाठी प्रवृत्त करतो. तिच्या ठाम नकारानंतर देखील त्याची तयारी नसते,

अन्वयार्थ ५९

तेव्हा एका अटीवर ती डॉक्टरला गर्भपातासाठी तयार असल्याचे सांगते. ती म्हणते, "ते भ्रूण मला नवऱ्यासमक्ष दाखवा. जरा आपण खून केलेला जीव तरी पाहू द्या. तेवढं धैर्य तुमच्यात नक्कीच असणार. जो माणूस आपल्या बीजाला खुडून टाकू शकतो, तो नक्कीच धीटपणे हा मेलेला गोळा पाहू शकेल!' ('इमोशनल अत्याचार', पृ. ३९) मात्र तिचा हा आकांत, उफाळून आलेला क्रोध कुठल्याच व्यवस्थेपर्यंत पोहोचत नाही. तिने काही काळ पाहिलेली स्वप्ने, तिचे भावतरंग, आकांक्षांची क्षितिजे या साऱ्यांचा अस्त होतो.
 दुसरी एक काळीज पिळवटून टाकणारी कथा म्हणजे 'लंगडा बालकृष्ण.' या व्यवसायातील डॉक्टर कुठल्या पातळीला जाऊन हे काम करत असतील त्याचा अंदाज घेणे देखील तर्काच्या पलीकडचे ठरते. दररोज वीस ते पंचवीस भ्रूणांची हत्या करायची आणि पाठीमागे काहीही पुरावा राहू नये म्हणून ते दवाखान्यात पाळलेल्या कुत्र्यांना खाऊ घालायचे - ही अमानुष अशी बाब कित्येक वर्षापासून सुरू असते. 'केस स्टडीज' मधून असेच जर सुरू राहिले तर भविष्यात काय होऊ शकते, याचे सूचन करते. एकविसाव्या शतकाच्या अर्ध्यापर्यंत मुलींची संख्या अशीच झपाट्याने कमी झाली तर बहुपतीत्वाची (Polyandry) प्रथा अस्तित्वात येईल, अथवा मुला-मुलींना आपसात (गे) विवाह करावा लागेल, असा एक संभाव्यतेचा तर्क ते करतात. या विषयाच्या संदर्भात विविध शक्यता काळाच्या मागे जाऊन आणि पुढे पाहून कथाकार समजून घेण्याचा प्रयत्न करतो.
 या कथांतील नायक (?) हे प्रारंभी पारंपरिक मानसिकतेचे, पुरुषसत्ताक व्यवस्थेचे प्रतीक म्हणून दाखवले आहेत. मात्र भ्रूणहत्येनंतर त्यांना कलाटणी देऊन त्यांचे हृदय परिवर्तन घडवून आणले आहे. शिवाय नंतर त्यांना आपण केलेल्या कृत्याविषयीचा अपराधभाव देखील जाणवायला लागतो. त्यामुळे वाचकाला प्रारंभी खलप्रवृत्तीची वाटणारी ही पात्रे नंतर हळवी, संवेदनशील बनून आपल्या पत्नीचे काळजीवाहक बनतात. त्यांच्या हा हृदयपरिवर्तनाचा भाग कथावस्तूशी अस्वाभाविक, बेतलेला असा वाटतो. मुळात ह्या कथा गरीब, अल्पभूधारक, दलित कुटुंबात घडतात असे नाही; तर त्यांचा स्थलावकाश हा कोल्हापूरसारखा सधन परिसर आहे. तेथील उच्चशिक्षित, उच्चवर्गीय, शेतमालक - राजकारणी यांच्या प्रमुख भूमिका आहेत; त्यांना शिक्षणाची आणि पुरोगामित्वाची काही एक परंपरा आहे. त्यामुळे घटना घडून गेल्यानंतर 'मन्वंतर' ही बाब काहीशी खटकते.
 तसेच अनेक कथांतून 'कलेक्टर' ही व्यक्तिरेखा कधी प्रत्यक्ष; तर कधी अप्रत्यक्षरीत्या डोकावत राहतो. 'पाणी! पाणी!!' या कथासंग्रहामध्ये देखील ते घडते. प्रत्यक्ष जीवनातील त्याची भूमिका निश्चितच महत्त्वपूर्ण आणि निर्णायक अशी

६० अन्वयार्थ


असण्याची शक्यता आहे. मात्र इथे कथावस्तूमध्ये ती सातत्याने डोकावल्यामुळे त्या व्यक्तिरेखेचा 'हस्तक्षेप' वाचकांना कथारूपात बाधित करतो. उदा. “साने गुरुजी तर कोणत्याही मातेपेक्षा जास्त वत्सल, करुणामयी होते. कलेक्टरही स्त्रीपूजक आहेत. मीही माझं बाळ असंच चांगलं संस्कारित करेन.” ('ऑपरेशन जिनोसाईड' पृ. ९३) अर्थात हा तपशीलाचा भाग सोडला तर या आठ कथांनी प्रस्तुत प्रश्नांचा विविधांगांनी वेध घेऊन त्याची तीव्रता समाजमनासमोर अधोरेखित केली आहे.
 देशमुखांच्या या संग्रहातील आणि अगोदरच्या दोन्ही संग्रहातील कथा विशिष्ट विषयाला 'लक्ष्य' करून, त्या सूत्रांची नीट मांडणी करून आलेल्या असल्यामुळे त्या त्या विषयाची खोली, त्याचे विविध अंत:स्तर त्यातून प्रकटतात. त्यामुळे विषयाचा व्यापक पट तर उभा राहतोच; परंतु सलगतेमुळे कादंबरी सदृश्यतेचा प्रत्यय येतो.
 देशमुखांच्या या कथा अभ्यासल्यानंतर लक्षात येते की, ते 'कथा' हा वाङ्मयप्रकार आणि समाजजीवनातील प्रश्न या दोहोंनाही नीट समजून घेऊन वृत्तिगांभीर्याने लेखन करतात. अनेक कथांतून येणारे निवेदक, काही व्यक्तिरेखा ह्या कथाकार देशमुखांशी तुलनीय ठरतात. तसेच काही कथांतून त्यांनी केलेले निवेदनाचे प्रयोग आणि नव्या 'गाव विकणे आहे' या कथेतील विषयाची मांडणी पाहाता कथा प्रकाराच्या शक्यता ते नीट समजून घेताहेत असे दिसून येते.
 देशमुखांची ही कथासूत्रे पाहिल्यानंतर जाणवते की, ते महाराष्ट्रीय समजमनाची दुखरी नस पकडू पाहतात. आणि एवढेच करून थांबत नाहीत तर त्या दुःखावर इलाज देखील शोधण्याचा प्रयत्न करतात. या कथा 'कथा' म्हणून तर मराठी वाचकांच्या स्मरणात राहतीलच; परंतु त्यापेक्षा सामाजिक आशयसूत्रांना जोरकसपणे 'पॉईंट आऊट' करणाऱ्या आणि 'आऊट ऑफ बॉक्स' विषय मांडणाऱ्या म्हणून निश्चितच वाचकांच्या चांगल्या स्मरणात राहतील.




अन्वयार्थ ६१

लक्ष्मीकांत देशमुख यांच्या लेखनातील समकालीनता

________________________________________________
भ. मा. परसावळे


 लक्ष्मीकांत देशमुख हे कथा-कादंबरी या वाङ्मयप्रकारात लेखन करणारे साहित्यिक म्हणून महाराष्ट्रात ओळखले जातात. त्यांच्या लेखनाचा सारभूत विचार केला तर, आपल्या काळाचे संपूर्ण भान असणारा व मानवी मूल्यांसाठी प्रसंगी जोखीम पत्करून संघर्ष करणारा लेखक म्हणून त्यांची प्रतिमा मनात प्रतिबिंबित होते. 'सत्य असत्याशी मन केले ग्वाही' या दृढ निश्चयाने ते लिहितात. भय आणि तत्त्वांशी तडजोड या गोष्टी त्यांना माहीत नाहीत. आणि म्हणूनच त्यांचे जगणे आणि लेखन यात फरक जाणवत नाही. त्यांच्या लेखनाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सांप्रतच्या कोणत्याही साहित्यप्रवाहाच्या शिक्क्यापासून व गटा-तटापासून ते पूर्णत: मुक्त आहे.
 'पाणी! पाणी!' हा त्यांचा कथासंग्रह खेड्यापाड्यातील निम्नस्तरीय माणसांच्या अडीअडचणी व पाण्याच्या समस्येशी निगडित आहे. या संग्रहात देशमुखांनी सभोवतालचं उघडंनागडं ग्रामीण वास्तव साध्या, सरळ, अनलंकृत भाषेत, कलात्मक आढेवेढे न घेता मांडलं आहे.
लोक प्रतिनिधी, कर्मचारी, अधिकारी यांच्या कुकर्मामुळं चांगल्या योजनांची वाट लागते आणि, नाइलाजानं वर्षानुवर्षे लोकांना नारूचे जंतू असलेले पाणी प्यावे लागते (नारूवाडी); हक्काच्या पाण्याचे हप्ते परस्पर धनिक पुढाऱ्यांनी लाटल्यामुळे पाण्याअभावी सगळ्या घरादाराच्या अहोरात्र कष्टाची माती झालेला हैराण महादू (पाणी - चोर) - भ्रष्ट व्यवस्थेच्या भीषण परिणतीची ही चित्रं मन हेलावून टाकतात.
 लोकतंत्र, धर्मनिरपेक्षता व समाजवादाचा अंगीकार करून साठ वर्षे उलटून गेली, तरी सामाजिक आणि आर्थिक समता आपल्या स्थापित करता आलेली नाही. सामाजिक विषमतेच्या दृष्टीने सरकार आणि शासन पुरेसं गंभीर दिसत नाही. त्यामुळे अस्पृश्यतेची समस्या अजूनही शिल्लक आहे.
 मुकादम व सरकारी यंत्रणेचा हलगर्जीपणा आणि स्वस्त धान्य दुकानदार शर्माचे

६२ अन्वयार्थ

बेजबाबदार वर्तन यामुळे दलित मजूर ठकुबाईचा अन्नाविणा झालेला मृत्यू (भूकबळी).
 दलितांची दु:खं मांडायची ती दलितांनीच! काही क्षीण अपवाद वगळता अदलित लेखकांना हे आपलं दायित्व आहे असं वाटत नाही. देशमुखांनी मात्र प्रारंभापासूनच दलितांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधून घेणारं लेखन केलं आहे, आणि हे त्यांच्या सजगतेचं द्योतक आहे असं मी मानतो.
 खेडे भागात दलितांची परिस्थिती बिकट आहे. कमीअधिक प्रमाणात त्यांचं दमन अजून चालू आहे. उदा. दलितांना आपल्या वस्तीत जाण्यासाठी असलेली वाट कुंपण घालून अडवणारा चंपकसेठ, पाण्यासाठी मळ्यात आली म्हणून रखमाशी लगट करणारा दलपत, अॅड. भीमराव सपकाळची परिणामशून्य तक्रार; आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपले अतिक्रमण कायम राखणारा चंपकसेठ (मृगजळ); गावात पाणी न मिळाल्यामुळे अधूदृष्टीच्या वृद्ध बायजाचा विहिरीत पडून झालेला करुण अंत (कंडम); सरपंचाच्या द्वेषाचा बळी ठरलेला, महार रेजिमेंटचा वीरचक्रधारक रिटायर्ड लान्सनाईक महादू (लढवय्या); बहिष्कृत दलित तांड्यावर दिवस भरलेली वेदनाव्याकूळ रमा; गावात पाटलाने आधीच पाणी भरण्यास मना केलेली, बहिष्कृत म्हणून बैलगाडी मिळत नाही, तांड्यावर पाण्याचा थेंब नाहा, वेळेवर टँकर नाही; बेजार रमा शेवटी पाण्याअभावी ताप चढून मरते. नंतर बाळही जाते. पाण्यासाठी जीव तोडणाऱ्या प्रज्ञाचे (रमाची नणंद) सगळे श्रम वाया जातात. अशा दयनीय अवस्थेत टँकरचा ड्रायव्हर - इब्राहीम तिच्याशी हिडीस चाळे करीत असतो. केवळ पाण्यासाठी भाभीचा जीव वाचेल म्हणून प्रज्ञा सगळं सहन करते, परंतु कशाचा उपयोग होत नाही (उदक). या कथेतील इब्राहीमचं पात्र दलितांच्या संदर्भात प्रातिनिधिक स्वरूपाचं आहे. या पात्राच्या योजनेमागे देशमुखांचं सूक्ष्म निरीक्षण व दलितांविषयीची आत्मीयता सूचित होते. 'कंडम' या कथेत सईदाचा नवरा म्हणतो, “क्या बोली? येडी हो गयी क्या तू सईदा? वो म्हार - मांगो की बावडो है. वहा कैसे पाणी भरेंगे?" देशमखांनी सामाजिकदृष्ट्या वरील महत्त्वाच्या संवादातून अंतर्मुख करणारे बरेच काही सुचवले आहे. एकतर इस्लाममध्ये अस्पृश्यता नाही. वरील संवादात आढळणारा परिणाम हिंदू संसर्गाचा आहे. दुसरी गोष्ट, धर्मांतर करून मुसलमान झालेले पूर्वाश्रमीचे अस्पृश्य सार्वजनिक विहिरीवर पाणी भरून शकतात. परंतु स्वत:ला हिंदू म्हणवून घेणारा अस्पृश्य विहिरीवर पाणी भरू शकत नाही. हिंदूच्या ह्या आत्मविघातक प्रवृत्तीवर देशमुखांनी नेमके बोट ठेवले आहे. इथं मुलाण्याचा किंवा इब्राहीमचा काहीच दोष नाही. वर्णव्यवस्थेने केलेल्या माणसाच्या पशुतुल्य अवस्थेचा हा अनुषंगिक परिणाम आहे. देशमुखांची ही मूलग्राही दृष्टी खऱ्या अर्थानं रामानुज, बसवेश्वर, कबीर, फुले, बाबासाहेब, आंबेडकरांच्या जवळ जाणारी आहे. 'अमीना' ही कथा कुटुंबनियोजनाशी

अन्वयार्थ । ६३

संबंधित आहे. धर्म आणि कुटुंबनियोजनाचा तसा काहीच संबंध नाही. परंतु काही लोक खऱ्या हितावह प्रबोधनाच्या अभावी धर्माच्या नावाने मानवी कल्याणाच्या योजनांना ‘विरोध करून राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात गतिरोध आणतात. या कथेत मुलं आणि दारिद्र्याला जन्म देणारी गलितगात्र विवश नायिका अमीनाच्या माध्यमातून हा संदेश देण्याचा प्रय्तन लेखकाने केला आहे.
 मंत्र्याच्या आदेशानुसार दुष्काळाची पाहणी करण्यासाठी निघालेल्या ज्येष्ठ पत्रकारांच्या पथकांचे असली रूप प्रकट करणारी 'दोरा' ही कथा. पेपरची रायवल्सी विसरून दारू, सिगारेट आणि अश्लील जोक्समध्ये हरवलेल्या पत्रकारांना ना दुष्काळाशी देणे घेणे ना लोकशाहीशी. ईप्सिताविषयी काडीची आस्था नसणारे हे पत्रकार तुमडी भरून घेतात आणि मालक सांगेल तेवढंच आणि तसंच बोलतात आणि कळकळीच्या ध्येयनिष्ठ पत्रकाराला मूर्खात काढून दफा होतात. लोकशाहीच्या आतून किडलेल्या खांबाचे देशमुखांनी घडवलेले दर्शन चकित करणारे आहे.
'दास्ता ए - अलनुर कंपनी' ही कत्तलखान्यावरची कथा. कंपनीच्या चाऊसच्या सांगण्यावरून स्वार्थांध पत्रकार दिनेश सावंत दुष्काळात गुरांची छावणी चालवणाऱ्या भिडे गुरुजीविरूद्ध बदनामी करणाऱ्या खोट्या बातम्या देतो. या बातम्यांचे पर्यवसान छावण्या बंद पडण्यामध्ये होते. विरोधाचे कारण काय, तर भिडे गुरुजी हे संघ प्रचारक आहेत. गुरांची निगा राखणं, त्यांना पुष्ट करणं हे उद्दिष्ट पूर्ण होत असेल, तर काम करणारा कोण आहे ही बाब महत्त्वाची नाहीच! केवळ स्वत:च्या वैयक्तिक स्वार्थासाठी पत्रकार दिनेश सावंत गुरांच्या छावण्या बंद करतो व दास्ता ए - अलनूर कंपनीच्या चाऊसच्या बेभाव, व भरपूर ढोर मिळण्याचा मार्ग मोकळा होतो. कंपनी ती शिफ्टमध्ये चालू लागते. मुंबईतून अलनूर साहेबांकडून चाऊसला अभिनंदनाचा फोन येतो. अल्तमश आणि हयातखानला दहा हजार रुपयांचा एक्स ग्रेशिया मंजूर होतो.
 गुणग्राहकता, विवेक आणि आत्मपरीक्षणाचा अभाव असेल तर किती हानी होऊ शकते हेच दिनेश सावंतच्या द्वेषमूलक पत्रकारितेतून सिद्ध झाले आहे. ___'अगिनपथ' या संग्रहात विषयाच्या दृष्टीने बरेच वैविध्य आहे. 'लाईफ टाईम'चा फॉच्यून, अग्निपथ, हिरा जो भंगला नाही इ. कथा विविध क्षेत्रातील भ्रष्टाचारावर बेतलेल्या आहेत.
 'लाईफ' टाईमचा ‘फॉर्म्युन' ही कथा विद्यार्थी आणि सूर्यवंशी सरांच्या संवादातून आकाराला येते. एम. पी. एस. सी. अंतर्गत भ्रष्टाचार हे या कथेचे मूळ आहे. सारी यंत्रणा वेठीस धरून एक डी. आय. जी. आपल्या तीन मुलांना एकाच बॅचला डी. वाय. एस. पी. करतो, आणि अभ्यासाच्या बळावर प्रामाणिकपणे उत्तीर्ण होऊ पाहणारे सगळे विद्यार्थी संतप्त होतात. त्याची कोंडी, त्यांची घुसमट
६४ अन्वयार्थ

त्यांच्या भिन्न भिन्न प्रतिक्रियांसह लेखकाने शब्दबद्ध केली आहे. शेवटी विद्यार्थ्याचं मथित सार, "इथूनतिथून साऱ्या राजकीय व सामाजिक जीवनाला भ्रष्टाचाराच्या ऑक्टोपसने विळखा घातलाय, नथिंग विल हॅपन धिस कंट्री - हॅज रिअली नो फ्यूचर अॅटलिस्ट फॉर गुड अँड ऑनिस्ट पीपल" असे व्यक्त झाले आहे.
 जिथं राष्ट्र निर्माण करणारे युवक निवडले जातात त्या एम. पी. एस. सी. मध्ये असा गोंधळ असेल, तर म. न. पा. कडून काय अपेक्षा करावी?
 'अग्निपथ'मध्ये महानगरपालिकेतील संघर्ष ध्येयनिष्ठ कमिशनर विरुद्ध लोकप्रतिनिधी व संशयकल्लोळ निर्माण करणारे पत्रकार असा आहे. कमिशनरांचा मित्र जय, पत्रकार प्रणव जेटली इ. ध्येयवादी व निर्भय जीवन जगणाऱ्यांमुळे कथेची वीण घट्ट पकड घेणारी झाली आहे. एका सच्च्या अधिकाऱ्याला महानगरपालिकेमध्ये प्रमाणिकपणे काम करणं किती अवघड झालं होतं त्याची तीव्रता कमीशनरच्या खालील स्वगतातून लक्षात येईल.
 'इथल्या लोकप्रतिनिधींना विकासाचं काही देणं घेणं नाही, तर मी का एवढा जीव पाखडत आहे? माझं विवेकी व आदर्शवादी मन उत्तर द्यायचं, 'हे तुझं कर्तव्य आहे. शहर विकासासाठी तुला हे सारं केलं पाहिजे. इथल्या मूक, सोशिक जनतेसाठी. हे तर तुझे प्रोफेशनल इथिक्स आहे.' हा निर्धार या कथेतून संप्रेषित होतो. 'हिरा जो भंगला नाही' ही कथाही शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराला वाचा फोडणारी आहे. संस्कारी अप्पा ग्रामीण स्त्रियांच्या विकासासाठी एक शिक्षण संस्था चालवतो. त्याच परिसरात अनैतिक मार्गाने सपकाळ शिक्षण सम्राट होतो आणि अप्पासारख्या आदर्शवादी, स्वच्छ चारित्र्याच्या व्यक्तीची पैशासाठी अडवणूक केली जाते. तंग येऊन शेवटी अप्पाला लाच द्यावी लागते. अप्पा हे विवश होऊन करतो. तो म्हणतो, “हा पलायनवाद नाही की भीरुपणा नाही. पण आपली शक्ती पत्थरावर डोकं फोडून बर्बाद करायची नाही असं मी ठरवलं आहे.'
 निसर्गाच्या लहरीवर चढउतार झेलणाऱ्या व पुराच्या वेढ्यात वारंवार ग्रस्त होणाऱ्या तामुलवाडीच्या रामभरोसे लोकांची करुण कहाणी 'भव शून्य नादे' वाचायला मिळते. या कथेत दैववादी, नियतीवादी मोरया गोसावी, जो अध्यात्माच्या बळावर लोकांची दु:खं निवारण्यासाठी स्वत:ला समर्थ समजून जगत असतो. अभियंता अक्षय योगायोगाने तामुलवाडीच्या पुनर्वसनाच्या संदर्भात भयावह पावसात तेथे आलेला आहे. अक्षय तर्कशुद्ध विचार करणारा, संघर्षशील व सगळ्या मानवी समस्यांची उत्तरं भौतिक जगात शोधारा आहे. तो म्हणतो, ".......जन्माला आला त्याला किमान भौतिक सुखसुविधा मिळाली पाहिजे. ती त्याला मिळत नाही, कारण आम्ही प्रशासक व आमच्यावर अधिकार गाजवणारे राज्यकर्ते नालायक

अन्वयार्थ ६५

आहेत. इथं नियतीचा काय संबंध?"
 सगळी उत्तरं व कारणं नियतीत शोधणाऱ्या मोरयाला अक्षय म्हणतो, “गावाचा प्रश्न पुनर्वसनानं सुटेल. ओढ्याचं पाणी वळवून सुटेल. ते विज्ञान करेल. राज्यकर्ते करतील. येथे तुमची श्रद्धा, तुमचं दर्शन कुठे तरी फोल आहे असं नाही वाटत तुम्हाला?" हा प्रश्न मोरयाला विचारलेला असला, तरी तो सगळ्याच पारलौकिकवादी आध्यात्मिकांना विचारलेला आहे. अक्षयच्या निमित्ताने लेखक आपला विज्ञाननिष्ठ भौतिकवादी दृष्टिकोन पूर्ण ताकतीने प्रकट करतो आहे आणि ठसवणं आजही पूर्वीइतकंच महत्त्वाचं आहे. (भव शून्य नादे) 'काश्मीर की बेटी' आणि 'गद्दार' ह्या दोन्ही कथा सभोवतालच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित नसल्या, तरी त्याचा आमच्या राष्ट्रीय भावनेशी सतर्कतेच्या दृष्टीनं जरूर संबंध आहे.
 सारा, निगार आणि अब्बू यांच्या संवादातून खालील तथ्ये आपल्या हाती येतात.
 B काश्मीर समस्या भारत-पाकिस्तान अशी द्विपक्षीय नसून तिसरा पक्ष काश्मीरी अवाम आहे.
 B काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे असे भारतीय नेते मानतात.
 B पाकधार्जिणे हुरियत नेते व पाकिस्तानच्या प्रॉक्सीवॉरमुळे मूळचा हरिसिंग प्रणित दुबळा प्रस्ताव नगण्य झाला आहे.
 B फा. अब्दुलाच्या जमान्यापासून काश्मीरी अवाम आझाद काश्मीरचे स्वप्न पाहात आली आहे.
 B भारतात खाजगीमध्ये एल. ओ. सी. आंतरराष्ट्रीय सीमा करावी व काश्मीरला जास्तीत जास्त स्वायत्तता द्यावी.
 B काश्मीरीयत म्हणजे पंडितांसोबतची मिलीजुली अदबी रिवाजांची सुफियाना जीवनशैली.
 B आणि समजा, आंतरराष्ट्रीय दबावामुळे असं स्वतंत्र काश्मीर अस्तित्वात आलं तर पाक व त्याचा गाढा दोस्त चीन तत्क्षणी झडप घालून काश्मीरचा घास घेईल. ही काल्पनिक भीती नाही तर ही वस्तुस्थिती आहे.
 लेखकाचं मनोगत व्यक्त करणारे कथेतील शेवटचे तीन मुद्दे वस्तुनिष्ठ किती आणि भावनिक विरेचन करणारे किती? हे तर काळच सांगेल. परंतु लेखकाचे प्रतिपाद्य हे भारतीय मानस व्यक्त करणारे आहे हे निश्चित!
 मागे सांगितल्याप्रमाणे 'गद्दार'चे घटित या मातीचे नाही. परंतु हुकूमशाहीचे आपण विरोधक आहोत. कोणत्याही प्रकारचा दहशतवाद हे हुकूमशाहीचेच अंग असते. आणि दहशतवादाचे धक्के हा देश सहन करीत आला आहे. हुकूमशाही
६६ अन्वयार्थ

विरुद्धचा आपला प्रखर रोष लेखकाने या कथेत प्रकट केला आहे. या कथेचे नाते 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' या कादंबरीच्या आशयद्रव्याशी जुळणारे आहे. विषयानुरूप कथेत आलेला तपशील पाहता त्यातून लेखकाचा खोलवर झालेला अभ्यास प्रकट होतो. लतीफ आणि बिल्किसबी ही दोन्ही पात्रं हुकूमशहाविरुद्ध कृती आणि उक्तीतून आग ओकणारी आहेत. बिल्किसबीचे बंदुकीने हुकूमशाहाची तस्बीर फोडणे, भर चौकात त्या तस्बीरीवर 'तू गद्दार है' म्हणत नाचणे हा या कथेचा परमोच्च बिंदू आहे. याची दुसरी बाजूही तेवढीच महत्त्वाची आहे. लेखक लतीफच्या तोंडून उद्गारतो, 'युलामीत धन्यता मानणाऱ्या हिजड्यांची एकनिष्ठ फौज' निर्माण करण्यात त्यानं यश मिळवलेलं आहे.
 जनता चेतना हरवून बसते तेव्हा हेच घडत असतं. आमच्या इतिहासाची कित्येक शतकं अशाच एकनिष्ठ गुलामगिरीनं ओतप्रोत भरलेली आहेत.
 'भवशून्य नादे' मध्ये जी इहवादी परखड चर्चा लेखकाने घडवली आहे ती 'सारांश'मध्ये अधिक स्पष्ट व्यापक व गहिरी होताना दिसते. खरं तर हा चिंतनगर्भ विषय कथेच्या अवकाशात मावणारा नाही. परंतु देशमुखांनी अंकुरण व त्या विषयाचा प्रारंभ केला आहे. देवधर्म, सैतान आणि सतत आंदोलत राहणारा दुःखी माणूस, असा त्रिकोण या कथेचा गाभा आहे.
 मेरी ही पोथीनिष्ठ धर्मपरायण प्रवृत्तीचं प्रतीक आहे. आपल्यासारखंच पवित्र जीवन आपल्या मुलानं जगावं असं तिला मनोमन वाटतं. तिचा मुलगा तिच्या नवऱ्याप्रमाणं भौतिक जगात आपलं अंतिम शोधणारा व जीवनातले सगळे सुंदर, असुंदर व क्रूर विकार जगू पाहणारा आहे. व्हॅटिकन सिटीतील चर्चमधील कोंडलेले कृत्रिम पावित्र्य त्यानं केव्हाच झुगारलेलं आहे. बापाने सांगितलेल्या, “बेटा, जग किती अनोखं सुंदर व समृद्ध आहे. हे सर्वांगानं अनुभवणं हीच खरी जिंदगी आहे." या वाक्यातच त्याला जीवनाचं सारतत्त्व सापडलं आहे. तो स्वत: लेखक आहे. परंतु त्याच्यावर व त्याच्या लेखनावर धर्म-मार्तंडांकडून बहिष्कार टाकला जातो. इस्लामच्या खिलाफ 'सॅटनिक व्हर्सेस' लिहिणाऱ्या सलमान रश्दीचं लेखन-स्वातंत्र्य इंग्लंड मान्य करतं. परंतु, ख्रिश्चन धर्माविरुद्धचं लेखनस्वातंत्र्य इंग्लंड मान्य करीत नाही. ही विसंगती देशमुखांनी खुबीनं नोंदवली आहे. लेखक स्वत:ला प्रेषितापेक्षा श्रेष्ठ मानतो. कारण तो शब्दसृष्टीचा निर्माता आहे. अशा शब्दसृष्टीचा अभिमान ज्ञानेश्वरांनी अठराव्या अध्यायात मोठ्या गौरवाने (जी मजलागा स्वामी, दुजी सृष्टी केली तुम्ही, ती पाहोन हासो आम्ही, विश्वामित्राते.) नोंदवला आहे. भौतिक दृष्टिकोनातून धर्मचिकित्सा करणाऱ्या डी. एच. लॉरेन्सच्या 'लेडी चॅटरलीज लव्हर' या पुस्तकावरही बरीच वर्षे इंग्लंडमध्ये बॅन होता. असो, देशमुखांच्या एकूण लेखनातील

अन्वयार्थ । ६७


चिंतनशीलतेचे हे परिमाण वाङ्मयातील त्यांच्या विदग्ध वृत्तीचे परिचायक आहे हे निश्चित!
 'नंबर वन' हा क्रीडाविश्वाचे अंतर्बाह्य दर्शन घडवणारा संग्रह, सामान्य वाचकांसाठी अनुभवांचे अनवट दालन प्रस्तुत करताना दिसतो. देशमुखांच्या लेखनात गोचर होणारे व या संग्रहात प्रकर्षाने जाणवणारे त्यांचे वैशिष्ट्य हे, की ते सातत्याने दुर्बल - दलित - पीडित व उपेक्षितांच्या बाजूने उभे राहताना दिसतात.
 बॉर्न फायटर आणि फायटिंग स्पिरिट व पॉझिटिव्ह लाईफ अॅटिट्यूड असलेल्या शांतारामचा पाय कापावा लागल्यानंतरही तेवढाच दिलदार, उत्साही व कार्यतत्पर म्हणून शेष जीवनात राहू शकतो याचं देशमुखांनी अतिशय प्रेरणादायी वर्णन केलं आहे. कथेत अंध, मूकबधिर, मतिमंद इ. अपंग मुलांच्या आयोजित केलेल्या चाचण्यांच्या निमित्ताने त्यांच्या मुक्त आनंदी लीलांची केलेली वर्णनं लेखकाच्या हळव्या, प्रेमळ व निर्मळ मनाचा प्रत्यय देणारी आहेत. (रियल हिरो)
 अपंग हिरोच्या कथेनंतर दुसरी कथा (फिरूनी नवी जन्मेन मी) पाथरवट जमातीच्या मीनाची आहे. देशमुखांनी हे प्रमुख पात्र एखाद्या राऊंड स्कल्पचरसारखं सर्व बाजूंनी मन:पूर्वक घडवलं आहे. कथेचं स्वरूप काहीसं अवघड, गुंतागुंतीचं असून संरचनेच्या दृष्टीनं लेखकाला कसाला लावणारं आहे. मीनाला वयात येऊनही पाळी येत नाही. ती स्वभावानं आक्रमक; ओठावर अधिक लव असलेली, उंच व टोनड बॉडीमुळं व्यक्तिमत्त्वात पुरुषी झाक असलेली. तनूसोबत लेस्बियन कपल म्हणून राहिलेली, आणि किशोरशी शरीरसंग केलेली असं तिचं व्यामिश्र व्यक्तिमत्त्व आहे. पुढे जेंडर टेस्टमध्ये तिला मुलींच्या स्पर्धेत नाकारण्यात येतं. आणि तिच्या दयनीय अवस्थेची कहाणी सुरू होते व ती निराश होऊन जीवन संपवू पाहते. तिला त्या व्यूहातून बाहेर काढण्याचा अॅड. मंजुळा भाभी प्रयत्न करतात. अंतत: मीनाला स्वत: स्त्री असल्याचा आत्मविश्वास प्राप्त होतो.
 'शार्पशूटर' ही अदभुतरम्य व कल्पित वाटावी अशी कथा. हिंदू आणि मुसलमान अशी दोन पात्रं धर्मातीत होऊन मनोमीलनाचा सद्गदित करणारा एक उदात्त अनुभव घेऊ शकतात, याचं एक छान चित्र इथं साकार झालं आहे.
 'बंद लिफ्ट' मध्ये लेखक पुन्हा विनोद कांबळीच्या पाठीमागे उभा आहे. कथेत त्याचं नाव हॅम असलं आणि तेंडुलकरचं सॅम, तरी या उभय मित्रांचं वर्णन त्यांना अवगुंठित करू शकत नाही. दलित असल्यामुळं आपली उपेक्षा झाली असं हॅमला सतत वाटत आलं आहे. प्रत्येक घटनेचा शोध तो दलित अंगाने घेतो.
 कथेतील संवादात प्रसंगानुरूप लेखकानं मुद्दाम पेरलेली पुढील काही वाक्यं आज पुन्हा विचार करायला लावणारी आहेत.

६८ अन्वयार्थ 

 B ‘भारतात दलितांना पराक्रमापेक्षा नियतीवरच जास्त भरवसा ठेवावा लागतो.'
 B नाही दोस्त, इंडियात जात हे असं सत्य आहे की, सवर्ण ते नाही असं समजून दडपायचा प्रयत्न करतात. पददलितांना पदोपदी त्याचा सामना करावा लागतो."
 B ‘एक तर मी तसा काळा आहे, पुन्हा दलित. धिस इज जस्ट डिस्गस्टिंग, कॉम्बिनेशन, वुइच कॅन रुईन एनीबडी'
 या कथेत लेखकानं कर्ण आणि कृष्ण या पुराण प्रतिमांचा प्रतीकात्मक वापर चांगला साधला आहे.
 या कथेत दलितांच्या संदर्भात केली गेलेली सगळी विधानं सत्य असून ती जीवनानुभवातून आली आहेत. शेवटच्या विधानातील अनुभव दाहक असून वर्णव्यवस्थेच्या अमानुषतेची साक्ष देणार आहे.
 'नंबर वन' ही देशमुखांच्या उत्कृष्ट कथांपैकी एक आहे. गुंतागुंतीच्या घटना, पात्रांचे परस्परसंबंध, क्रीडा क्षेत्रातील बारीकसारीक तपशील, महत्त्वाचे संदर्भ, पात्रांच्या वैशिष्ट्यांमुळे आलेली सजीवता इ.मुळे आपण विम्बलडनच्या भूमीवर वावरत असल्याचा अनुभव येतो. पात्रांचे स्वाभाविक संवाद व निवेदनाची भाषा इंग्रजीच्या अपरिहार्य वापरांमुळे कथेला भरीव रूप प्राप्त झाले आहे. द्वेष-जन्य कृष्णकृत्याशिवाय मिळालेले यशच सच्च्या खेळाडूला खरे समाधान देऊ शकते, हा संदेश ही कथा लाऊड आवाजात देते.
 लक्ष्मीकांत देशमुखांच्या एकूण लेखनाचा स्थूलमानाने विचार केला, तर त्यांचे लेखन आजच्या वर्तमानाशी संबंधित आहे असे दिसते. भ्रष्टाचार, जातीयता व मूलतत्त्ववाद यावर ते सातत्याने प्रहार करीत आलेले, खऱ्या अर्थानं जागरूक समकालीन लेखक आहेत अशी माझी धारणा आहे. त्यांचे लेखन आशयकेंद्री असून अभिव्यक्ती सहज, सरळ पारदर्शी आहे. लेखन मुद्दाम रंजक - आकर्षक करणे हे त्यांच्या प्रकृतीत नाही. रूपवादापासून ते कोसों दूर आहेत. निर्भय परखडता हेच त्यांच्या लेखनाचे रूप आहे.
 देशमुख हे विज्ञाननिष्ठ इहवादी लेखक आहेत. त्यांचा सगळा भर अनुभवावर आहे. कल्पकतेचा वापर, अत्यल्प संरचनेचे अंग म्हणून झाला असेल. त्यांच्या लेखनात प्रामुख्याने प्रमाण भाषेचा वापर झाला आहे. आवश्यक तेथे ग्रामीण बोली, उर्दू, इंग्रजी इ. भाषा त्यांच्या लेखनात अवतरतात. प्रतिपाद्य विषयाला पुष्टी देण्यासाठी सिनेमाची गाणी, कविता व संतवाचनांचा क्वचित वापर करतात.

अन्वयार्थ ६९

समृद्ध आशयसूत्रात बांधलेल्या कथा
एक अभिनव प्रयोग
________________________
डॉ. आनंद पाटील

 To pity as empathy and radical hope, mario vargas Llosa adds The storyteller (1990) as trustee of the memory of a culture.
 Vargas Llosa chronicles the story of the machiguena, a tribe deep in the preiuvian forest who are held together by a story teller. The author discovers he is actually an anthropologist named Saul Zuritas. Zuritas was a jew, an outsider in his own society. Who became the core of a tribe, its trustee, as storyteller The anthropololgist has turned native, and the question one asks is whether auch an inversion is esthetically and ethically convincing. To become the other, to turn native, is to lose oneself. The question is, can the anthropologist as storyteller turned native resolve Shiv visvanathan "Listening to the pterodacty.”
 वरील उद्धृतातील विधानाच्या आधारे प्रशासक हाच "संस्कृतीच्या स्मृतीचा विश्वस्त' कथाकार बनू शकतो का या प्रश्नाचे उत्तर स्पष्ट करणे शक्य आहे. शिवाय अलीकडे एका सामान्य गृहिणीच्या असामान्य कथासंग्रहांसाठी नोबेल पुरस्कार मिळाल्याने कथा या वाङ्मय प्रकाराला तुच्छ समजणाऱ्यांनाही परस्पर उत्तर मिळाले आहे. बिनभांडवली आस्वादक समीक्षेच्या अहाऽ हा ऽऽ वाहऽ वाऽऽ नव जातवादी सांस्कृतिक मॅच फिक्सिंगच्या अज्ञान उत्पादनाच्या ढिगाऱ्या-बाहेर पडायला वर्गास ल्लोसा उदाहरण मला उपयुक्त वाटले. शिवाय कोल्हापूर जिल्ह्याचेच प्रवास लेखन इंग्रजीत लिहायला लावणाऱ्या लक्ष्मीकांत देशमुखांची नवे प्रयोग करण्याची तळमळ मला जवळून पाहता आली. 'चित्रपट' या त्यांच्या चित्रपट कथेचा इंग्रजी अनुवाद करतानाही प्रशासकाच्या

७०  अन्वयार्थ 

खुर्चीबाहेरचा 'माणूस' मला हळूहळू लक्षात येऊ लागला. आत्मष्लाघेचा आरोप फार बळकट होऊ नये म्हणून अन्य संदर्भ गाळतो. तुलनाकार - सांस्कृतिक - उत्तर वासहतिक लेखक म्हणून त्यांच्या तीन कथासंग्रहांचे हे विवेचन करतो. एरवी एक लेखक व त्याचे एकच पुस्तक अशा एकारलेल्या उद्योगात पडायचेच नाही ही तुलनाकाराची भूमिका कायम आहे.
 मात्र लेखकाने साने गुरुजींच्या वळणाची सुबोध भूमिका नम्रपणे घेतली आहे. नंबर वन (२००८) च्या चार पानी प्रस्तावनेच्या प्रारंभीच ते लिहितात.
 'या पुस्तकातील सर्वच दहा कथा या खेळाडूंच्या क्रीडा जीवनाशी निगडित आहेत. अशा अर्थाने हा विशिष्ट अशा मानवी समूहाच्या जीवनावर 'थीम बेस्ड' कथासंग्रह आहे हे याचे एक प्रधान वैशिष्ट्य आहे. यापूर्वी माझे 'अंतरीच्या गूढ गर्मी' व 'पाणी! पाणी! हे दीन कथासंग्रह पण असेच थीम बेस्ड होते. “पाणी! पाणी!" शीर्षकच मुळी 'तहानलेल्या महाराष्ट्राच्या कथा' असे होते (लेखकाचे दोन शब्द).'
 नव समीक्षकांना व प्रयोगक्षमतेचा डांगोरा पिटणाऱ्यांना हे प्रांजळ कथन भोवळ आणणारं आहे. ते म्हणतील. आशयसूत्र आधी गुंफलं आणि प्रशासनात सापडलेले कथेचे मणी माळेत गुंफले! दुसरीकडे गुणाढ्याच्या 'कथा सरितसागर' वर देशीवादी संधिसाधू लेख लिहिणारे लेखकराव देखील कथेबद्दल अज्ञानाचे उत्पादन किती मोठ्या प्रमाणावर करतात याचा शोध घेतला पाहिजे. प्रत्येक माणूसच अनेक कथांचा बनलेला असतो. स्वत:च्या प्रबंध प्रकाशनाचे अनुदान घेऊनही तो बढतीसाठी 'स्वतंत्र ग्रंथ' असल्याचा बनाव रचतो. ही रहस्य कथाच असते. देशमुखांना प्रशासनात अशा बनावाच्या असंख्य कथा / कहाण्या / किस्से बघायला - ऐकायला मिळाल्या. त्या एकाच सूत्रात बांधण्यात एक साचेबद्धतेचा मोठा धोका होता. मात्र वरील लेखकरावाप्रमाणे कथा प्रकाराला नगण्य ठरवण्याच्या तुच्छतावादाला ते बळी पडले नाहीत. उलट खेळ, स्त्री भ्रूणहत्या, पाणी वगैरे आशय सूत्रांचे विविध धागे निवडून कथांचाच गोफ कष्टाने विणण्यात ते रमले. त्याचे महत्त्व वेगवेगळ्या अंगांनी स्पष्ट केले पाहिजे. उदाहरणार्थ, प्रत्येक समाजसमूह सांस्कृतिक स्मृती व कथनांचा उपयोग करतो. त्याचे काव्यशास्त्रीय उपयोजन होत असते. कॅनडातील 'आदिवासी' मनोवैज्ञानिकाने आदिवासीच्या दृष्टिकोनातून कथांचे महत्त्व वेगळ्या प्रकारे स्पष्ट केले आहे. तो लिहितो,
 Stories are a type of medicine and like medicine, can be healing or poisonous depending on the dosage or type.

अन्वयार्थ ७१

Indigenous people have heard poisonous stories in the colonial discourse. To heal, people must write or create a new story or script their lives.(82)  Terry tafoya 2005 as quoted by jo-ann Episkenew "Contemporary Indigenous Literatnres in canada : Healing from Historical Trauma" pp.82
 शब्दांचा औषधी उपयोग वेदनाशमकासारखा होतो. कथेचे वासहतिकरण व जातीयीकरण आणि त्यातून मराठीत भिनलेले भयानक आधुनिक विष हा देखील स्वतंत्र संशोधनाचा 'अस्पर्श' विषय आहे. या तुलनेत देशमुखांच्या कथा नवजातवादी कथावर अॅन्टीडोट पुरवतात. नव्या विचार व कल्पनांना चालना देतात. उदाहरणार्थ, 'इमोशनल अत्याचार'मध्ये मुलग्याऐवजी मुलगी जन्माला घालण्यात कमीपणा नाही. गर्भलिंग निदान झाल्यानंतर तो मुलगा नाही हा धक्का संपूर्ण कुटुंबालाच बसतो. गर्भपात हाच सुटकेचा मार्ग परंपरेने बहुसंख्य कुटुंबात निवडला जातो. या घातक परंपरेला 'पोलिटिकल हेअर' (५६) मध्ये वेगळा पर्याय सुचवला आहे. गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूणहत्येविरोधी त्यांनी राबवलेल्या मोहिमांचा मी एक साक्षीदार आहे. या विषयाच्या अनेक बाजूंवर प्रकाश टाकणारे किस्से, बातम्या, कहाण्या, दंतकथा, आख्याने आणि उखाणे अजूनही अंधारात आहेत. त्यांच्या या दहा कथा आणि प्रदीर्घ परिशिष्टांना ही आशयसूत्रे मावणारी नाहीत. मुस्लीम तरुण प्रा. शकील शेख यांनी अलीकडेच 'एका गर्भाशयाची गोष्ट' ही अत्यंत प्रभावी कादंबरी प्रसिद्ध केली आहे. ती 'उदक' च्या तुलनेसाठी निवडता येईल.
 प्रकाशनाच्या कालानुक्रमे देशमुखांच्या 'थीम बेस्ड' कथा कशा विकसित झाल्या याची तुलनात्मक समीक्षा करण्यासाठी खालील तीन कथासंग्रह माझ्याकडे आले.
 १) उदक : औरंगाबाद, साकेत प्रकाशन, १९९७.
 २) 'नंबर वन' औरंगाबाद : संकेत प्रकाशन, २००८.
 ३) सावित्रीच्या लेकी : पुणे : मनोविकास प्रकाशन, २०१३
 परंतु अशा प्रकारच्या थीमबेस्ड कथा इंग्रजीत एकाच संग्रहात सहज सापडल्या नाहीत. विज्ञान कथा, गूढ कथा असे काही प्रकार आढळले. सतत ओढून ताणून तुलना करण्याचा बाळबोध उद्योग टाळला. मात्र हे विवेचन अहा ऽ हा ऽऽ वाहऽ वाऽऽ आस्वादनाच्या साथीत सापडणार नाही याची दक्षता घेतली आहे. मी कुठल्याही एका लेखकाची एकाच पुस्तकाची भोंगळ आस्वादक समीक्षा करणार नाही या व्रताला तडा जाऊ नये म्हणून वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवाव्या लागल्या.

७२  अन्वयार्थ 

 कथाकाराची आशयकेंद्रितता अर्पण पत्रिका व स्वत:च्या प्रास्ताविकातूनही फार ठळकपणे व्यक्त होते. त्यामुळे कलात्मक अभिव्यक्तिच्या कलाकुसरीच्या तंत्रमंत्राकडे लक्ष द्यायला त्याला सवड मिळत नाही. याचे कारण कथाकाराकडील प्रत्यक्ष अनुभवांचा प्रचंड साठा हे आहे. स्वत:चे श्वशुर व सासूबाईंना अर्पण केलेल्या 'उदक'च्या अर्पण पत्रिकेच्या सुरवातीच्या ओळीच शीर्षक बळकट करतात.

भावगंधी देणे जीवन जमले

उदकी लोपले सुख मोती

 याच्यामागे शेलेंद्रची 'अल्ला मेघ दे' ही कविता छापली आहे.
 'नंबर वन' तर अंजली देशमुख, शीतल महाजन, भीमराव माने व पोपटराव, सूर्यकांत कुलकर्णी व श्रीनिवास कुलकर्णी आणि किरण बेदी या देशमुखांच्या 'रिअल हिरोज - हिरॉईन' ना अर्पण केला आहे. यातच लेखकाला कलावंत व खेळाडू यांच्याविषयी खूप आकर्षण असल्याचे सांगून लेखक पुढे कथाबीजांची उगमस्थाने स्पष्ट करताना म्हणतो,
"नोकरीचा भाग म्हणून भारतीय प्रशासन सेवेत आय. ए. एस. मध्ये काम करताना संचालक क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र सेवा म्हणून तिसऱ्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेची जबाबदारी मला मिळाली. ती मी आनंदाने व एक आव्हान म्हणून स्वीकारली....
 “या सर्व देशी खेळाडूंच्या कथा आहेत. ते आपले 'रिअल हीरो' आहेत. त्यांना 'आयकॉन' चा दर्जा जेव्हा प्राप्त होईल. तेव्हा भारताने क्रीडासंस्कृती आत्मसात केली असे म्हणता येईल. जेव्हा अशी क्रीडा-संस्कृती तळागाळापर्यंत रुजली जाईल तेव्हा भारत क्रीडा महासत्ता जरूर होईल. तो दिवस जवळ यावा यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न होण्याची गरज आहे. तसंच या लेखनातून क्रीडा साक्षात्कार वाचकांना घडवून देऊन क्रीडासंस्कृतीच्या प्रचाराच्या यज्ञकुंडात माझीपण एक समिधा टाकली आहे."
 (अधोरेखित माझे, 'लेखकाचे दोन शब्द')
 या कथा संग्रहाचे उपशीर्षक आहे. 'खेळाडूंमधील माणसांच्या कथा.'

 “सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' हे लघुकथांना व्यापून उरणारे प्रदीर्घ शीर्षकही त्यांनी स्वत:च वर म्हटल्याप्रमाणे 'सेव्ह द बेबी' च्या 'प्रचाराच्या यज्ञकुंडात माझी पण एक समिधा' टाकण्याच्या व्रताचाच विस्तार आहे. विशेष म्हणजे या क्षेत्रात कार्य करणाऱ्या डझनभर स्त्री-पुरुषांच्या परिचयासह पानभर मजकूर

अर्पण पत्रिकेत छापला आहे. तो कथासूत्राचा मुख्य दोर बळकट करणारा आहे.
 या संग्रहाला "स्त्री भ्रूणहत्या प्रश्नाचा परिणामकारक दस्तऐवज" ही समाजाशी बांधिलकी जपणाऱ्या जाणकार समीक्षक पुष्पा भावे यांची प्रस्तावना जोडली आहे. त्या शेवटी महत्त्वाचा अभिप्राय नोंदवितात.

  कथासंग्रह प्रत्यक्ष अनुभवावर रोवलेला असला तरी कथात 'सेव्ह द बेबी गर्ल' या उपक्रमाचा वा जिल्हाधिकाऱ्यांचा उल्लेख असावा का? असा प्रश्न उपस्थित होतो. 'सेव्ह द बेबी गर्ल' या उपक्रमासाठी आणि त्या उपक्रमाचाच ललित दस्तऐवज असणाऱ्या कथांसाठी मराठी वाचक देशमुखांचे आभार मानतील. महत्त्वाच्या विषयावरच्या या पुस्तकाचे परिशिष्टही प्रस्तुत आणि वाचनीय आहे.
 त्यांच्या 'दस्तऐवज' या विशेष नामकरणामुळे अनिल अवचटांच्या सामाजिक कार्यातून जन्मलेल्या 'माणसं' प्रमाणेच 'विकास प्रशासना'च्या ध्यासातून जन्मलेल्या 'रिपोर्ताज'च्या वळणाच्या ह्या कथा आहेत असेही म्हणता येईल. उदा. 'नारूवाडी' हा प्रांताधिकाऱ्याचा संवेदनशील प्रशासकीय अहवालच आहे. पंधरा वर्षापूर्वी इराची वाडी या मराठवाड्यातील दुष्काळी गावात पाणी नळ योजना व रस्ता करून दिला होता. ते आय. ए. एस. होऊन कलेक्टर आल्यानंतर गाव जेथे होते तेथेच दिसते. जुन्या विहिरीचे प्रदूषित पाणी व्यायल्याने प्रत्येकाला घरोघर नारू झालेला असतो. राजकारणात नळ योजना शेजारचे केरगाव बंद पाडते. हे प्रखर वास्तव 'विकास' या संकल्पनेचीच खिल्ली उडवते.
 शीर्षकामुळे ‘पाणी चोर' घटनाप्रधान चातुर्य कथा वाटते, परंतु एका तालुक्यातील पाणी दुसऱ्या तालुक्यातील जमीनदार व राजकारणी चोरांनी अडवल्यामुळे दुष्काळात शेतीच बुडालेला महादू साखर कारखान्यात ऊस तोडायला मजूर म्हणून सहकुटुंब येतो. त्याने चहा नाकारणे एवढीच साधी घटना ‘सटायर' चे रूप घेते. 'लढवय्या' मधील महादू कांबळेला सैनिक म्हणून सरपंच दाजीबा पाटलांची लॅन्ड सीलिंगमधील जादा पाच एकर जमीन दिली जाते. तो ती कष्टाने करतो. परंतु दोनच वर्षात ती पाझर तलावासाठी ताब्यात घेण्याचे डावपेच खेळले जातात. त्याच्यावर गाव बहिष्कार टाकते. 'सामना' च्या वळणाची ही कथा प्रचारकी वळणावर जाण्याचा धोका लेखकाने कौशल्याने टाळला आहे. मी सध्या भारतीय साहित्यिकांचे व साहित्याचे जातीयीकरण आणि सौंदर्यशास्त्र या विषयावर अमेरिकेतील विद्यापीठ प्रकाशनासाठी ग्रंथ लिहीत आहे. या संदर्भात देशमुखांची स्वानुभव चित्रित करण्यातील तटस्थता पु. भा. भावेंच्या तुलनेत अत्यंत निकोप वाटते. मात्र ते जेव्हा जात -

धर्माच्या संदर्भात पात्रांचे चित्रण करतात तेव्हा त्यांची ओढाताण लपत नाही. भारतीय लेखकाची खरी कसोटी इथेच लागते. तुलनात्मक संस्कृती अभ्यासाचा मराठीला गंधच नसल्याने हे विवेचन लेखकावर अन्याय करणारे ठरेल. ते तेव्हा सैद्धांतिक आधारावर केले जातील तेव्हा नवे आय. ए. एस. कलेक्टर “पुन्हा ते बिहारी खत्री जातीचे", वीरचक्रवाला महादू कांबळे, आर. एस. एस. भिडे गुरुजी, कलेक्टर भावे वगैरेंच्या पात्र चित्रणांचे रंग अधिक स्पष्ट होतील.
 जिल्ह्याच्या प्रमुख पदासाठीच्या 'हॉट सीट' वरील प्रशासक भिन्न जातीधर्माशी संबंधित अनुभव पात्रे एखाद्या कथासूत्रात बांधतो तेव्हा त्याच्या 'इथिक्स' चीच परीक्षा होत असते. सामाजिक व धार्मिक चळवळीत बेडूकउड्या मारणारा लेखक एकांगी चित्रणाच्या चक्रव्यूहात सहज फसतो. देशमुख मात्र जोसेफ कॉनरॅड म्हणतो त्याप्रमाणे 'दाखवणे', 'ऐकवणे' आणि 'भावनेला जाणवून देणे' हे तिहेरी हेतू कथेत साध्य करतात. खरे तर 'पाणी' हे आशयसूत्र ‘अमिना' मध्ये फार दुबळे आहे. फक्त रोजगार हमीचे काम हा एकच दुबळा अदृश्य धागा उल्लेखात जाणवतो. उलट 'दास्ताँ ए - अलनूर कंपनी' ही कत्तलखान्यावरची कथा जनावरांच्या छावण्या आणि पाणी दुष्काळ या बळकट सूत्रामुळे फार उठावदार झाली आहे. मुसलमानविरोधी वाटणार नाही एवढे हे धगधगत्या वास्तवाचे चित्रण प्रत्ययकारी आहे. एरवी ‘मुसलमानविरोधी प्रचार' हे शस्त्र आहेच.
 गावठी तिढे आणि अडाण्यांचे कोडे शहाण्याला पिडे असेच असतात. त्यांची पुरेशी समज नसेल तर ग्रामीण, दलित, आदिवासी, बामणी वगैरे नवजातवादी कथा व त्यांचा वाचकवर्ग सहज अलग काढता येतात. शेती न करणारे व्यापारी व (ब्राह्मण) नोकरवर्ग कर नसल्यामुळे शेतीकडे वळलेले दिसतात. अलीकडे नटनट्यांनी व राजकारण्यांनी खरेदी केलेल्या शेतीची अनेक प्रकरणे माजली आहेत. 'मृगजळ' या कथेत चंपकशेठजी स्थानिक लोकांची शेती खरेदी करून त्यांनाच मजूर बनवतो. भय्याला हाताशी धरून ओढ्यात विहीर काढतो. दुष्काळात ती विहीर शासनाला ताब्यात घ्यायला कोर्टातून स्टे आणतो. पण अखेर भय्याचे वडील गावकऱ्यांना चंपकशेठच्या बदफैली मुलाला वठणीवर आणायचा गुरुमंत्र देतात. संपूर्ण शेती उद्ध्वस्त होते आणि भय्या जि. प. निवडणुकीच्या तयारीला लागतो. भ्रष्टाचाराचे या कथेतील संदर्भही फार बोलके आहेत.
  'भूकबळी' मधील 'मी' डेप्युटी कलेक्टर, 'हमी कसली हमी?' मधील 'मी' आणि 'दौरा'मधील वार्ताहर प्रदीप यांचे गुणधर्म बरेच जुळतात. देशमुख पात्रे व प्रसंगांना 'बोलू' देण्याऐवजी लेखकाच्या 'आवाजा'तील भाष्ये जास्त प्रमाणात करताना दिसतात.

 थेट तहसीलदार म्हणून सेवेत रुजू झालेले शिंदे माझे आवडते तहसीलदार होते. कारण त्यांच्यात मी दहा वर्षापूर्वीच्या 'मला' पाहात होतो. माझ्यासारखाच त्यांचा संवेदनाक्षम स्वभाव, भ्रष्टाचाराचा तिटकारा व सामाजिक बांधिलकीचं असलेलं भान ..... माझंच ते प्रतिरूप होतं व ते जपणं मी माझं कर्तव्य समजत होतो.
 (उदक : हमी ? कसली हमी? पृ. ९३)
 हेच आदर्श तहसीलदाराचे संदर्भ त्यांच्या 'फ्रॉम गुड टू ग्रेटनेस' या प्रशासनावरच्या ग्रंथाचे प्रसिद्धीपूर्व अवलोकन करताना आढळले होते.
 या कथांत आत्मनिष्ठ अभिव्यक्ती मोठ्या प्रमाणावर आहे. आधुनिकतावाद्यांना ती आक्षेपार्ह वाटण्याची शक्यता आहे. पुष्पा भावे यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केलेल्या वाङ्मयबाह्य घटकांचे प्राबल्यही बरेच आहे. रूपबंधाचे स्तोम माजवणाऱ्यांना हा एक धक्काच आहे. कथेचे केंद्र, कलात्मकता, लय, आशय आणि घाटाची एकरूपता अशा गतशतकात वाल, दभि इ. समस्त कुलकर्यांच्या सौंदर्यवादाला झुगारणाऱ्या या रचना आहेत. परंतु देशमुख त्याच संस्कृतीचे एक घटक असल्यामुळे 'खडकात पाणी' वर अंधश्रद्धा संवर्धनाचा आक्षेप येऊ शकेल. इथे 'पाणी' हे आशयसूत्र आधीच ठरल्यामुळे घाट जो सापडेल तो जुळवून वापरला जातो. लेखकाची दलितांबद्दलची सहानुभूती सर्वात जास्त कथात व्यक्त झाली आहे. तिचं अत्युच्च टोक 'उदक' मध्ये गाठलं आहे. गावातील दलित वस्तीवर बहिष्कार टाकणारे सवर्ण कायद्याचा बडगा दाखवूनही त्यांना मुळीच सहकार्य करीत नाहीत. वेळेवर पाण्याचा टँकर न आल्यामुळे बाळ व बाळंतीण दगावतात. अॅट्रासिटीत पाटलांना अडकवल्याची ही परिणती असते. आज याच कायद्याचा दुरुपयोग होत असल्याचे ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने ओढले आहेत. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ब्राह्मणांनी आरक्षण व अॅट्रॉसिटीच्या मागण्यासाठी मोर्चा काढला होता एवढे हे वास्तव दाहक आहे. त्याच ग्रामजीवनातील पाण्याशी संबंधित निवडक बाबी 'उदक' मध्ये कथारूपात प्रभावीपणे मांडल्या आहेत. या तिन्ही कथासंग्रहातील रूपबंध, भाषाशैली वगैरे वैशिष्ट्यांवर शेवटी भाष्य करू.
 "नंबर वन' मधील कथा शिकार कथा, भूत कथा या सारख्या विशिष्ट क्षेत्राशी संबंधित परिभाषेतील कथा आहेत. विशिष्ट संज्ञा व संकल्पनांचा अभ्यास असावा लागतो. 'फिरूनी नवी जन्मेन मी' भटक्या पाथरवट समाजातील मीना धावण्याच्या शर्यतीत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याच्या जिद्दीने दोहाला जाते. सानियाच्या व्हीलनगिरीमुळे तिला लिंगनिदान चाचणीला सामोरे जावे लागते. ती स्पर्धेतून बाद


होते. तिची पदके काढून घेतली जातात. हे राजकारण उघड करायला तिचा कोच व त्याची वकील पत्नी कोर्टाची पायरी चढायचे ठरवतात. मीना स्त्री असून पुरुष ठरवली जाते. या आघातामुळे ती दोन वेळा आत्महत्त्येचा अपशस्वी प्रयत्न करते. या कथेत आरोग्य चाचण्यांचे आंतरराष्ट्रीय नियम, अॅण्ड्रोजन हार्मोन्स, 'स्टिराईड', 'एक्स वाय क्रोमोझोम' अशा लिंगनिदानाशी संबंधित संज्ञा देशमुखांनी अभ्यासपूर्वक वापरल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या कथा ना. सी. फडकेंच्या बोगस प्रतिभा साधनेच्या कल्पित पातळीवर तरंगत राहात नाहीत. परंतु त्यातील कलाकुसरीच्या जंतर मंतरचे नमुने थीम बेस्डमुळे स्वाभाविकपणे आढळतात. 'शार्प शूटर' मधील पात्रे व प्रसंग अधिक मेलोड्रॅमॅटिक व फिल्मी वळणाची आहेत. देशमुखांच्यात एक आदर्शवादी युटोपियारामराज्याची स्वप्ने बाळगणारा सकारात्मक दृष्टिकोन बाळगणारा प्रशासक त्यांच्या कृती व उक्तीत वावरत असतो. याचा मी काही वेळा साक्षीदार होतो. आंतरराष्ट्रीय शार्प शूटरमधील पदक मिळवणाऱ्या कोल्हापूरच्या नेमबाजाला पुण्यात स्वत:च्या घरी बोलावून त्या मुलीचा सत्कार करताना त्यांना मी पाहिले आहे. हे मला पाहिल्या कथेतील मंजुळा वकील (देशमुखांची पत्नी), शार्पशूटरमधील ए. सी. पी. थोरात, 'जादूचा टी शर्ट' मधील रोहित (स्वत: लेखक) अशी त्यांच्या घरातील व जवळपासची पात्रेच कथेत कलम केल्यासारखे चटकन जाणवले. 'शार्पशूटर' मधील नाट्यमय प्रेस कॉन्फरन्स आणि 'डी' गँगचा दहशतवादीचा सदस्य दाऊद कुरेशीचा कोल्हापूरचा शूटर सोनार समाजातील देवनाथ सोळंकी बनवून हिंदू मुस्लीम ऐक्याचे संदेश - या आशावादातूनच प्रकट झाले आहेत. त्यामुळेच भावविवशता त्यांच्या कथात फार मोठ्या प्रमाणात आढळते. उदा. या कथेचा 'क्लोज्ड' शेवट असा केला आहे.
 बाबा आपलं भाषण संपवून परत आपल्या खुर्चीकडं जायला वळले. पण कशाला तरी अडखळले. त्यांचा क्षणमात्र तोल गेला. मी विद्युत-वेगानं पुढं होत त्यांना सावरलं. ते आता माझ्या मिठीत होते आणि माझ्या स्पर्शानं त्यांचाही बांध फुटला होता. जे सर्वांच्या साक्षीनं पुटपुटत होते.
 "पोरा - पोरा, माझी देवू माझा दाऊद"

(शार्पशूटर पृ. ४८)


 सार्वजनिक कल्याणाची उदार भूमिका स्वीकारणारा प्रकाशक जनसामान्यातील सर्वात कमी बुध्यांक असणाऱ्या वाचकाला समजून सांगण्यासाठी सुलभीकरणाची ही भूमिका निवडलेला विषयच लेखकाला घ्यायला लावतो असे दिसते. एरवी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळावे म्हणून गुन्हे माफ करून दाऊदला देवनाथ सोळंकी - कुरेशी या जुळ्या अस्मितेबरोबर पी. एस. आय. पदी नेमल्याचे पत्र बाबा देताच कथा संपते. या

कथेतही नेमबाजीशी संबंधित ‘पॅलेटस्' 'ट्रंप ॲन्ड स्किट' अशा काही संज्ञा वापरून कथासूत्र अधिकृत करण्याचा प्रयत्न केला आहे. 'थीम बेस्ड' कथा कन्ट्राईव्हड वाटू नये याची काळजी लेखकाला पडलेली दिसते. ती या कथेच्या निवेदनातच अशी प्रकटते.
 हे सारं अतयं होतं. कुणालाही असंभव वाटवं असं दुहेरी जगणं माझ्या वाट्याला आलं होतं. हिंदी सिनेमातही असे भडक मेलोड्रेमॅटिक प्रसंग आले तर ते फिके वाटतील, एवढं अजब जीवन मी जगत होतो. (४०)
 हे बोधवादी वळण व नाट्यमय कलाटणीचे प्रसंग दूरदर्शन मालिकेच्या प्रभावी ढाच्यात 'जादूचा टी - शर्ट' मध्ये आले आहेत. रोहितचा पुत्र मोहित, भारताचा नवा क्रिकेट टीमचा नायक पॅडीचं अनुकरण करतो. ते आफ्रिकेत त्याच्या पहिल्या ट्वेंन्टी कप साठीची मॅच बघायला जातात. तेव्हा विजयानंतर मोहित "पॅडी, टुडे यू हॅव वन वर्ल्डकप फॉर इंडिया. इन फ्युचर, वुई वुईल टू" हा फ्लाय कार्ड धरतो आणि पॅडी त्याला आपला 'जादूचा टी शर्ट' काढून भेट देतो. बक्षीस समारंभाच्या वेळी बोलताना कपिलदेव १९८३ साली वर्ल्ड कप जिंकल्यानंतर एका शहरातील मिरवणुकीत त्याचे अनुकरण करणाऱ्या शाळकरी मुलाला आपला ब्लेझर भेट दिला होता. तो मुलगा म्हणजे स्वत: पॅडीच होता ही 'गाठ सुरगाठ व उकल गाठ' फडकेप्रणीत तंत्रात अडकते. त्यामुळेच नेहमीप्रमाणे शेवटची बोधप्रद वाक्ये येतात.
 "डॉ. कलामांसारखा रोल मॉडेल भेटो व त्यांनाही जादूचा ब्लेझर किंवा टी शर्ट प्राप्त होवो. बस और क्या कहूँ? बहोत धन्यवाद. शुभरात्री.

(नंबर वन, ६०)


 हाच लोकप्रिय फॉर्म्युला एका घरातील दोन पिढ्यात पोहण्याच्या शर्यती जिंकणाऱ्यांच्या जीवनातील अपघात, सत्कार आणि ताणतणावाच्या चित्रणासाठी 'प्रयासे जिंकीली मना' मध्ये यशस्वीपणे वापरला आहे. मुलाने आईला लिहिलेले पत्र व तिची डायरी यांचा कलात्मक उपयोग केला आहे. मुलग्याने जिंकलेले सुवर्णपदक तो आईच्या गळ्यात घालतो हा प्रसंग मेलोड्रॅमॅटिक आहे.
 कथांसाठी आशयसूत्र एक असले तरी भारतीय बहुसंस्कृतीवादात 'प्लीज ऑल' ची भूमिका कुशल प्रशासकाला चांगली लोकप्रियता मिळवून देते. स्पष्टच लिहायचे तर ते कोल्हापूरला कलेक्टर झाल्यानंतर 'कुलगुरू धनागरेच्या' प्रमाणे या

ब्राह्मणाला त्रास होणार असे मला विचारणारे मला पुण्यात भेटले. ते त्यांचा कोल्हापूरात नागरिकांनी बदलीनंतर आयोजित केलेला सर्वात मोठा निरोप समारंभ बघायला हवे होते. त्यांचा 'सावित्रीच्या गर्भात मेलेल्या' हा संग्रह त्याची साक्ष आहे. आयुष्यात त्यांना कोल्हापूरचाच कालखंड सर्वार्थाने श्रेष्ठ वाटतो असे ते म्हणतात. हा वाङ्मयबाह्य उल्लेख तुलनेसाठी मुद्दाम आणला आहे. कारण या कथादेखील विशिष्ट संस्कृती व पर्यावरणाची ‘उत्पादने' आहेत. एरवी जास्तीत जास्त जाती व धर्मातील पात्रे 'पाणी', 'क्रीडा' व 'स्त्रीभ्रूणहत्या' अशा आशयसूत्रांना उठाव देण्यासाठी त्यांनी निवडली नसती. एरवी विज्ञान कादंबऱ्यांचे नायक आर एस. एस.वाले ब्राह्मणच का? हा प्रश्न हॉलंडमधील चर्चासत्रात जर्मन संशोधक डॉ. डार्डरने उपस्थित केलाच नसता. सबब देशमुखांचं अनुभवविश्व अनेकतावादी आहे.
 'बंद लिफ्ट' मध्ये झोपडपट्टीतला हॅम, व्हीनस व सेरेना या अमेरिकन 'ब्लॅक डायमंड' टेनिसपटूंशी वर्णभेदाचे बळी म्हणून नातं जोडतो. त्यांचा सामना तो क्रिकेटपटू व हवाई सुंदरी निलू बघत आहेत. धर्मांतरित दलित ख्रिश्चन आणि उच्चवर्णीय यांच्यातील क्रीडांगणावरील संघर्ष देशमुखांनी अत्यंत अलिप्तपणे चित्रित केला आहे. तो इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्याइतका भारतात कुणीही स्पष्टपणे मांडलेला नाही. जात-पंथभेद भारतातील प्रत्येक क्षेत्र कसे नासवतात हे समजण्यासाठी ही कथा उल्लेखनीय आहे. साहित्यात वाङ्मयबाह्य जात व राजकारण आणू नये म्हणणाऱ्या वांझ कलावाद्यांचा मुखभंग करणारे आंतरराष्ट्रीय परिमाण तिला लाभले आहे. जॉर्ज ऑरवेल म्हणायचा की, 'साहित्यात राजकारण आणू नये म्हणणे हेच एक मोठे राजकारण आहे.' देशमुखांनी हे शिवधनुष्य शासकीय हुजरेगिरीत कसे काय पेलले याचेच अनेकांना आश्चर्य वाटते. पुराणे व बखरींचे आधुनिकीकरण करीत लोकप्रिय ब्लॅक (मनीड्) लिटरेचर निर्माण करणारे शासकीय अधिकारी पैशाला पासरी मिळतील. कारण त्यात व्यवस्थेला सुरुंग लावणारी स्फोटके मुळीच नसतात. २० पेक्षा कमी बुद्ध्यंक असणाऱ्या समाजात अशा सुलभ व गुळगुळीत साहित्यकृती लोकप्रिय होतात असा सिद्धान्तच आहे. या पार्श्वभूमीवर देशमुखांच्या कथांतील वेगळेपण लक्षणीय आहे.
 देशमुखांनी कितीही निरनिराळे रंग फासले तरी ही कथा क्रिकेटर अनिल कुंबळेवर आहे, हे जाणकार वाचकाच्या लक्षात पुढील ओळीवरून येते :
 'मी - मी भरकटत गेलो. यशाची धुंदी मला फार लवकर चढली - आणि चित्रविचित्र चाळे, भडक रंगीबेरंगी ड्रेसेस घालणं, कानात भिकबाळी घाल कधी, तर कधी चमन गोटा कर, रात्र रात्र डिस्कोमध्ये घालव...' (बंद

लिफ्ट ८७)  या तुलनेत सचिन तेंडुलकर आठवतो आणि देशमुखांच्या तटस्थतेचा हेवा वाटू लागतो. एकदा ते म्हणाले होते 'लेखक म्हणून आपली जात एकच आहे.' याला म्हणतात खरा नवनीतिवाद. अनीतिवाद्यांनीच नवनीतिवाद मांडण्याची रहस्यकथा कशी असते याचा उल्लेख मागे केला आहे. हॅमसाठी लिफ्टच बंद केला गेला आहे. त्याला पुन्हा क्रिकेट खेळायची, संधी मिळणार नाही, हे कटू सत्य स्वीकारताना तो म्हणतो,
 'यस, आय अॅम टोटली फिनिशड् निलू.. जिथं अमेरिकेतही रंगभेदामुळं कृष्णवर्णीयाचं निर्विवाद वर्चस्व असणारा बास्केट बॉल या खेळात राष्ट्रीय खेळाचा दर्जा दिला जात नाही. तिथं भारतात माझी काय पन्नास ? एक तर मी तसा काळा आहे. पुन्हा दलित... धिस इज ए डिस्गस्टिंग कॉम्बिनेशन, वुईच कॅन रुईन एनिबडी...' साहित्याचे जातियीकरण आणि जातियीकरणाचे सौंदर्यशास्त्र या सिद्धान्ताला बळकटी देणारे हे उदाहरण मी इंग्रजी ग्रंथात वापरले आहे. तुलनात्मक संस्कृती अभ्यासाची साधने म्हणून या कथा महत्त्वाच्या आहेत.
 अमेरिकेला न जाताच अमेरिकेवर कादंबरी लिहिणाऱ्या थॉमस मानचं उदाहरण गाजलं होतं. अफगाणिस्तानला भेट न देताच 'इन्किलाब' लिहिणाऱ्या देशमुखांना काही प्रमाणात उपेक्षा सहन करावी लागली. आस्वादक समीक्षेच्या अफूच्या सांस्कृतिक उद्योगात असेच होत राहणार. याची जाणीव असूनही भारतीय मुसलमान टेनिसपटू मुलगी व पाकिस्तानी क्रिकेट कॅप्टनच्या 'आंतरराष्ट्रीय' विवाहाची बातमी अजून ताजी आहे. 'अखेरचं षटक' खेळ मुख्य आशयसूत्रात गुंफून वाचनीय करणं हे एक आव्हान होतं. या पार्श्वभूमीवर भारतीय हिंदू मुलगी तिचा पूर्वीचा प्रियकर संतोष आणि आताचा क्रिकेटपटू पती पाकिस्तानी सलीम यांच्या त्रिकोणाचे व ड्रॉ मॅचचे चित्रण नाट्यमय पद्धतीने केले आहे. 'एक फूल दो माली' हा साचा कायम आहे.
 एकाच आशयसूत्रावरील कथा एकसाची व कृत्रिम होण्याच्या धोक्याचा उल्लेख मागे केला आहे. 'ब्रदर फिक्सेशन' या कथेतील क्रिकेटपटू विकी आपल्या पत्नीच्या 'ब्रदर फिक्सेशन'चा त्रास सहन करीत असतो. त्याचा मेहुणाही क्रिकेटचा खेळाडू आहे. तो देखील आपल्या एकुलत्या बहिणीवर खूप प्रेम करतो. ती आपल्या भावावर जास्त प्रेम करते. विकी म्हणतो,
 माझं मलाच नवल वाटत होतं. एखाद्या मानसशास्त्राच्या डॉक्टरप्रमाणे तिहाईत व्यक्तिच्या भावविश्वाची जर मी मानसशास्त्रीय भाषेत चिरफाड करतोय ('ब्रदर फिक्सेशन' १२४)
 इथे पात्राच्या तोंडून स्वत: लेखकच चिंता व्यक्त करीत आहे. अर्थात गतशतकाच्या

उत्तरार्धात बोकाळलेला हा मनोविश्लेषणाचा अथवा संज्ञा प्रवाहाचा अतिरेकी वापर त्यांनी मुळीच केलेला नाही. चालू शतकात ते फ्राईडप्रणीत मनोविश्लेषण व मनातील संज्ञाप्रवाह ही तंत्रेच हास्यास्पद ठरवली आहेत. मध्यमवर्गीय इंग्रजाळलेल्या साहित्याकडून ते ग्रामीण व दलित साहित्याच्या तळागाळात अनुकरणाच्या रेट्यात पोहोचले. ते नव वसाहतवादाच्या परिभाषेत किती 'बालिश' होते हे आता उघड होत आहे. देशमुख त्या त्सुनामीतून वाचले.
 विस्तारभयास्तव शीर्षक कथा "नंबर वन'चाच सविस्तर विचार करू. ती देखील 'नंबर वन' म्हणवून घेणे आणि खरोखर तसे असणे यातील अंतर अत्यंत सूक्ष्म पातळ्यांवर स्पष्ट करते. तिची पार्श्वभूमी विम्बल्डनची व पात्रे परदेशी आहेत. या कथेचे प्रथमपुरुषी एकवचनी निवेदन जर्मनीतील नंबर वन ग्रँडस्लॅम विजयी ठरलेली सुझन करते आहे. अपघातामुळे पाच वर्षे स्पर्धेबाहेर असलेली ऑस्ट्रेलियाची मोनिका पुन्हा या स्पर्धेत उतरली आहे. स्वत:च नंबर वन असल्याचा दावा तिने केला आहे. सुझनचा चाहता हरमनने जखमी केल्यामुळे तिला पाच वर्षे स्पर्धेबाहेर राहावे लागले होते. त्यामुळे आपला 'नंबर वन' खरा नाही, डागाळलेला आहे याची सुप्त जाणीव सुझनला अस्वस्थ करीत असते. तशात वेडाचे झटके येणारी तिची बहीण वेड्यांच्या इस्पितळात अतिशय हिंसक बनल्यामुळे तिला विमानाने तिकडे जावे लागते. मेरी शाळेत असताना या खेळात नंबर वन होती. एकदा भांडणात तिला सुझनने जोराचा फटका मारल्याने तिचा एक पाय मोडला होता. त्यामुळे ती कायमची या खेळातून बाद झाली. ती बहिणीचा कमालीचा द्वेष करते. मोनिकाच खरी नंबर वन म्हणून बहिणीला दूरदर्शनवर त्यांचा खेळ बघताना शिव्या घालते. अखेर सूझन मोनिकाचा पराभव करते. शेवटी ती स्वत:च म्हणते
 नाही हरमन, मी कधीच नंबर वन नव्हते. नाहीय. मला माफ कर मेरी, मला माफ कर मोनिका. तुमच्या त्या अपघाताला मी जबाबदार नव्हते गं. मला अशा त-हेनं पुढं जायचं नव्हतं. पण पण...
 मी-मी खरंच नंबर वन कधीच नव्हते. नाहीय?

(नंबर वन १६०)


 अत्यंत वाचनीय अशा या कथा मोजक्या खेळांच्या विश्वात वाचकांना गुंगवूनगुंतवून ठेवतात.

 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' या संग्रहाची कुळकथा लेखकाने 'मनोगतात सविस्तर सांगितली आहे. शीर्षक, मुखपृष्ठ, प्रकाशक, लेखकाचे नाव व पत्ते, प्रकाशन वर्ष, प्रस्तावना, मनोगत, आतील चित्रे, परिशिष्टे व मलपृष्ठ या सर्व

वेगवेगळ्या स्वतंत्र पूर्व संहिताच असतात. त्यांना पूर्वसंहिता epi-texts म्हणतात. त्या मुख्य संहितेकडे वाचकांनी कसे बघावे याची दिशा दर्शवित असतात. म्हणजे एखाद्या घरात प्रवेश करण्यापूर्वी कुंपण, पटांगण, गेट, उंबरठा, परिसर व परर्ड अशा बाह्य संहिता घराच्या चिन्ह व्यवस्थेची थोडीबहुत पूर्व कल्पना देतात, तसेच हे असते. कधी कधी दारात सुंदर तुळशीवृंदावन आणि मध्य घराच्या कोपऱ्यात काळ्या पैशाचा गुप्तसाठा अशाही रचना असू शकतात. आत एक, बाहेर दुसरे असा प्रकार देशमुखांच्या लेखनात आढळत नाही. 'मनोगतात ते प्रांजळपणे लिहितात,
 गेली दोन वर्षे 'सेव्ह द बेबी गर्ल - कन्या वाचवा' या अभियानात मी बांधिलकी मानून काम करताना जे अनुभव आले, त्यातून या आठ कथा साकार झाल्या. त्या एकाच विषयाशी आधारित आहेत. तो विषय म्हणजे स्त्रीभ्रूणहत्या व त्याचे लहान मुले, पत्नी - स्त्रिया आणि समाजावर होणारे परिणाम... हा तिसरा थीम बेस्ड कथासंग्रह सादर करून एक वेगळी वाङ्मयीन हॅट ट्रिक मी केली आहे. त्याची वाङ्मयाचे अभ्यासक व समीक्षकांनी नोंद घ्यावी अशी अपेक्षा आहे.
 आपण हा ललित लेखनाचा प्रयोग करीत आहोत. केवळ सामाजिक प्रचाराचे साधन म्हणून या कथा रचलेल्या नाहीत - हा दावा करताना पुढे लेखक म्हणतो,
 या सर्व आठ कथांमधून मी विविध अंगाने स्त्रीभ्रूणहत्येवर प्रकाशझोत टाकला आहे. समाजाला मुली का नको आहेत हा प्रश्न मी कलात्मकतेच्या परिघात, ललित शैलीत पण पोटतिडकीने मांडायचा प्रयत्न केला आहे. त्यातला आशय गडद व्हावा म्हणून कथनशैलीतही काही प्रयोग 'लंगडा बाळकृष्ण' व 'केस स्टडीज' या कथांमध्ये केले आहेत. या कथा डॉक्यूमेंटरी अथवा अहवाल या गद्य प्रकारात डावलल्या जातील याचीही जाणीव लेखकाला आहे. १९३५ मध्ये शं. त्र्यं. शेजवलकरांनी सुखटणकरांच्या 'सह्याद्रीच्या पायथ्याशी' या 'ग्रामीण' कथासंग्रहाला फार अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिली होती. तेव्हा लेखकाने गोव्यातील व ग्रामीण बोलीतील काही शब्दांची सूची शेवटी जोडली होती. तेव्हा आपलीच खेडी व समाज आपणाला नीट माहीत नसतो. त्यांचा परिचय नागर वाचकांना करून देण्यासाठी लेखकाने नकाशे, चित्रे, टिपणे वगैरे कथा संग्रहात द्यावेत असे मत शेजवलकरांनी परखडपणे मांडले होते. पण पहिल्या महायुद्धानंतर अँग्लो-अमेरिकन महाप्रकल्पातील 'विश्व साहित्य आणि सौंदर्यानुभव' या आधुनिक सौंदर्यशास्त्राची व 'नव' समीक्षेची आयात मढेकरी

माध्यमातून झाली. हा नववसाहतवाद बळकट करणाराच महाप्रकल्प होता याचा उलगडा आजवर कुणी केलेला नाही. त्यामुळेच कथांच्या जोडीला परिशिष्टात बिगर कथा non-fiction गद्य मजकूर जोडण्याची कारणे लेखकाला देणे भाग पडले आहे. हा कालबाह्य, नव समीक्षेच्या मराठीतील जातियीकरणातून आलेल्या वर्चस्वाचा परिणाम आहे. रूपवादी समीक्षक या लेखनाला कथाच म्हणणार नाहीत, हे भय त्यांच्या 'मनोगता'त जागोजागी व्यक्त झाले आहे. लेखकाने स्त्रीभ्रूणहत्येच्या समस्येचा अभ्यास कसा केला आणि त्यावर कसे उपाय शोधले हे सांगून पुढे म्हटले आहे :
 प्रस्तुतचे पुस्तक हे एकाच वेळी ललित (ficition) तसेच ललितेतर (non-ficiton) आहे. 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' पुस्तकात अशी त्याची सांधेजोड का मला घालावीशी वाटली? कोणत्याही समीक्षक फूटपट्टीचा आधार न घेता मी म्हणेन की, आठ कथांमधून समाजाला मुलगी नको हे जीवनानुभूतीच्या अंगाने कालात्मकरीत्या आलं आहे, तर त्याची भारतातली जास्तच दाहकता समग्रतेत जाणवण्यासाठी हे लेख जरुरी आहेत. केवळ कलावादी म्हणतात तसे वाचकाचे निखळ रंजनच लेखकाने केले पाहिजे, असे मी मानत नाही. प्रबोधन व विचार-प्रवणतेची जोड देता आली तर साहित्यकृतीला नवे आयाम मिळू शकतील. कथेचा रसभंग करीत त्यात प्रबोधन करणारी आकडेवारी दिली तर कथेच्या कलात्मक सौंदर्यास बाधा येईल, म्हणून या कथांमध्ये त्याला भरपूर वाव असून मी कलात्मक तटस्थतेने ते टाळायचा प्रयत्न केला आहे... (मनोगत)
 मुळात कलावाद्यांच्या वसाहतिक संस्कारातून लेखक पुरेसा मुक्त झालेला नाही. त्यांनी आकडेवारी खरोखर दिली असती तर तो एक उत्तराधुनिक तंत्राचा प्रयोग ठरला असता. अर्थात, वाचक व संपादक - प्रकाशकांना तो पटला - पचला नसता, हे मी माझ्या अनुभवाने सांगतो. मात्र अठराव्या शतकात डॅनियल डिफोने 'रॉबिन्सन क्रूसो'मध्ये आणि जोसेफ स्टर्नने 'ट्रीस्टम शन्डी' मध्ये अनुक्रमे बाजार, किराणा मालाच्या याद्या, खर्चाचा हिशेब आणि पूर्ण काळी पाने, बोटाची चित्रे, रेखाकृती वगैरे कादंबऱ्यात घुसडल्या होत्या. तेव्हा ते प्रयोग गाजले होते. मराठी साहित्य व लेखकाच्या कल्पनेचेच नियमन संस्कृती कशी करते या सिद्धान्ताच्या आधारे देशमुखांच्या कथांचा अधिक चांगला अभ्यास होऊ शकेल.
 पुन्हा एकदा पुष्पा भावे ‘अत्यंत चिकित्सक व परखड' परीक्षणात काय

म्हणतात. ते पाहू :
 "कथासंग्रह प्रत्यक्ष अनुभवावर रोवलेला असला तरी कथात 'सेव्ह द बेबी गर्ल' या उपक्रमाचा वा जिल्हाधिकाऱ्यांचा उल्लेख असावा का? असा प्रश्न उपस्थित होतो. 'सेव्ह द बेबी गर्ल' या उपक्रमासाठी आणि त्या उपक्रमाचाच ललित दस्तऐवज असणाऱ्या कथांसाठी मराठी वाचक देशमुखांचे आभार मानतील. महत्त्वाच्या विषयावरच्या या पुस्तकाचे परिशिष्टही प्रस्तुत आणि वाचनीय आहे.” (प्रस्तावना)
गर्भवतीला तिची संमती नसता लिंगनिदानाला नेऊन फसवून तिचा गर्भपाताची बळी बनवणे हा 'माधुरी व मधुबाला'चा विषय आहे. सरिता ही विज्ञान शाखेची पदवीधर. गणेशाला तिने कंपनीत स्वत: घरात राहून मुले सांभाळत संसारात साथ द्यायचे ठरवले होते. पण मुलगाच हवा म्हणून नवऱ्याने करवलेला गर्भपात तिला वेडाचे झटके देतो. अखेर तो दत्तक मुलगी तिला आपलेच बाळ म्हणून आणून देतो आणि ती सावरते. 'मधुबाला पाठोपाठ माधुरी हवीय', ही तिची मागणी मूळ 'थीम'ला उठाव देण्यासाठी कथेचे शेवटचे वाक्य म्हणून येते आणि 'कन्ट्राईव्ह' प्लॉटचा डाग सोडून जाते. एरवी पात्रांच्या जात-धर्माचा संदर्भ ठळकपणे द्यायला न कचरणारा लेखक या कथेत मात्र सरिता व गणेशच्या अस्मितेची ती बाजू पूर्णपणे विसरला आहे.
'इमोशनल अत्याचार' मध्ये निवेदिकेवर तिला गर्भपातासाठी तयार करण्यासाठी आतल्या दोन जुळ्या मुलींचा वापर नवरा निर्दयपणे करतो. निवेदिका शिक्षिका आहे. तिने मिलिंदला बँकेत नोकरी लागण्यापूर्वी धाडसानं त्याच्याशी लग्न केले होते. गर्भपातानंतर पत्नीला मूलच होणार नाही हा धक्का त्याला जमिनीवर आणतो. इशाला स्वाईन फ्लू झाला तेव्हा मिलिंदने तिला आईकडून आपणाला भाऊच हवा हे वचन घ्यायला लावले होते. ती बरी झाली. चौघेच सुखात राहू असा हॅपी एन्ड पुन्हा एकदा 'मुलगी झाली हो' वर कुंकर घालतो. हे जोडपे देखील नाव-गाव जात-धर्म-पंथ अशा ओळखीशिवाय अवतरले आहे. 'उदक' मधील किंवा 'नंबर वन'मधील पात्रांच्या अशा वास्तव तपशीलांची रेलचेल पाहता हे तिसऱ्या संग्रहात लेखक प्रगल्भ होत असता हे असे का घडले? हा प्रश्न उरतोच.
 'धोकादायक आशावादी'मध्ये अशीच 'अधांतरी' पात्रांची लढाई सुरू होते. फक्त 'खोत' या आडनावावरून सांस्कृतिक ओळख नीट होत नाही. प्राथमिक शिक्षक पिताजी आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते आहेत. त्यांचा डॉक्टर पुत्र मात्र गर्भलिंग निदान व गर्भपाताचे रॅकेट चालवणारा दुष्ट डॉक्टर आहे. हे कळताच ते

आपल्या नातेवाईकांच्या मदतीने डिकॉय केसमध्ये त्याला पकडून देतात. लेखकच या कथेतील एक कलेक्टर-पात्र आहेत. हे तिसऱ्या परिच्छेदात लक्षात येते.
 कलेक्टर म्हणून मला नित्यनेमानं सर्व प्रकारची माणसं अनेकदा माझ्या खाजगी वेळेवर छोट्या-मोठ्या कामासाठी अतिक्रमण करायची. पण जेव्हा कलावंत - लेखक व इतर चांगली, विविध क्षेत्रात काम करणारी भेटायला यायची, मला आनंद व्हायचा... (सावित्रीच्या ... लेकी : ४१)
 या 'अतिक्रमण' करणाऱ्या पैकी मी एक आहे. 'इन सर्च ऑफ कोल्हापूर श्रू ट्रॅव्हलर्स आईज' त्यांनी माझ्याकडून लिहून घेतलं. त्यापूर्वीच मी असे अतिक्रमण करीत असे. पण श्रीमती भावे यांनी उपस्थित केलेल्या कलेक्टर व त्याच्या प्रकल्पाची कथेतील उपस्थिती आवश्यक आहे का? हा प्रश्न उरतो. त्याचे उत्तर आत्मकथन कथा, कादंबऱ्या, प्रवास लेखन वगैरे साचेबंद वाङ्मय प्रकारांचे घटक कथेत मिसळते तर त्यात वाईट काय? उत्तराधुनिक तंत्रात भारतीय शुद्ध जातीयवादी वाङ्मय प्रकारांना स्थान नाही. ती पोथ्या पुराणे व इतर घटक कथात मुद्दाम मिसळले तेव्हा अशाच प्रतिक्रिया येत होत्या. मात्र देशमुख निवडलेल्या आशयसूत्रांशी एवढे एकरूप झाले की त्यांना त्यापासून वेगळे काढणे सुचले नाही म्हणा किंवा शक्य झाले नाही असे म्हणा. वास्तव घटना वापरल्याने अब्रू नुकसानीचा दावा टाळण्यासाठी पात्रे अधांतरी ठेवली. 'पोलिटिकल हेअर' मध्ये एका उगवत्या नेत्याची सातवीमधील मुलगी लॅपटॉपवर गुगलसर्च इंजिनवर 'क्रोमोसोम' सर्च करते. वडिलांना 'राजकीय वारसदार' हवा असे म्हणाल्यानंतर तिचा हा शोध सुरू होतो. 'सेक्स एज्युकेशन' मुळेही तिची साक्षरता वाढली होती. नवऱ्याला राजकीय वारसदार हवा म्हणून केलेली भ्रूणहत्या आणि त्याचे पत्नी व मुलीवर होणारे परिणाम हा या कथेचा मूळ विषय आहे. शेवट मुलगी कलेक्टरांच्या 'सेव्ह द बेबी गर्ल' मोहिमेत भाग घेण्याचा व शरद पवारांना तिने पत्र लिहिण्याचा भाग येतो. त्यावर प्रचारकी 'कंन्ट्राईव्हड शेवट' असा आक्षेप येणे शक्य आहे. येथेही कथेचे लोकेशन, पात्रांची 'ओळख', जात-पात अंधारातच आहे. 'लंगडा बाळकृष्ण'मधील पाडलेल्या गर्भाना नष्ट करण्यासाठी क्रूर डॉक्टरने हाऊन्ड जातीचे दोन कुत्रे पाळले आहेत. या कथेतील रहस्यमय वातावरण भयानक (weird) आहे. पात्रांनाच कथेचे धागे जुळवत नेण्याचा प्रयोग खांडेकरी वळणाने केला आहे. शेवटी ते कुत्रे डॉक्टरच्या मुलाचाच पाय तोडतात हा पोएटिक जस्टिस की शिक्षा आहे. हेच त्याला कळत नाही. शेवटी मेलोड्रॅमॅटिक आहे. 'ऑपरेशन जेनोसाईड' म्हणजे गर्भपाताचे रॅकेट चालवणाऱ्या ग्रामीण भागातील डॉक्टरना पकडण्याची केस-हिस्ट्री

आहे. अस्पष्ट असले तरी मुख्य पात्राचे लोकेशन खेड्यात - तालुक्याच्या ठिकाणी दाखवले आहे. खबरीलालची पत्नी या रॅकेटला पकडण्यात अग्रभागी असते. शेवटी मोर्चात ती आक्रमक भाषण करते. हा भाग प्रचारसभेचे रूप धारण करतो. भिन्न पात्रांना प्रसंगांचे कोलाज करीत कथेचा गोफ गुंफायला लावला आहे. हे तंत्र पूर्वी कादंबऱ्यात होते. मात्र 'केस स्टडीज'मध्ये भिन्न नमुन्यांचे वेगळे कोलाज येते. ते उत्तराधुनिक तंत्रात बसणारे आहे. पण प्रसंग 'कन्ड्राइव्हड्' वाटण्याची अडचण आहेच. 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी'मध्ये पाडलेल्या मृत अर्भकालाच बोलते केले आहे. त्यामुळे एडवर्ड सईद ज्याला इहलौकिकता (worldliness) आणि संदर्भाचे जाळे (affiliation) म्हणतो त्याला या कथेत स्थान उरत नाही. निवेदक मृतात्मा अर्भकाच्या प्रौढ भाषेवर वाचकाला विश्वास ठेवावा लागतो. ही एक कॉमेडीच बनत जाते. मात्र त्यातील खालील प्रकारची विधाने लेखक अर्भकाकडून वदवून घेत आहे असे वाटत राहते :
 आज मी मानते निर्मिकाला. तो सांगणाऱ्या सत्यशोधक जोतिबा फुल्यांना आणि जगन्माता सावित्रीला. जोतिबाच्या पितृत्वातून मला 'सावित्रीची लेक' व्हायला आवडेल... (११५)
 'सर्मना' सारख्या या पत्र कथेचा शेवट पाहा :
 एक विनंती करू ममी, हे पत्र तू जसंच्या तसं कथा म्हणून कुठेतरी छापून आण. या कथेला शीर्षकही मीच सुचवते 'सावित्रीच्या गर्भात मेलेल्या लेकी.' मी स्वत:हून मेले हे वाच्यार्थानं खरंच. पण मला 'मुलगी नकोच नको' या पुरुषी मनोवृत्तीनं मारलंय हे व्यापक अर्थानं अधिक खरं आहे. ही कथा वाचून काही पुरुषांच्या डोळ्यात अंजन पडलं तरी माझ्या न जगलेल्या जन्माचं सार्थक होईल! करशील ना एवढं माझ्यासाठी? प्लीज?
 हरि नारायण आपटे व श्री. म. माटे यांच्या काळात कथेच्या शेवटी 'वाचक हो थांबा, या कथेचा बोध काय?' तो थोडक्यात 'तात्पर्य' म्हणून मांडत. इसापच्या नीतिकथापासून ही प्रथा चालत आली होती. परंतु इंग्रजाळलेल्या लघुसंस्कृतीत तो तात्पर्याचा तुकडा नाटकातल्या नांदीप्रमाणे छाटला गेला. उत्तराधुनिक तंत्रात त्याचे पुनरागमन अटळ आहे. मात्र कथाकाराची जागाच समाजसुधारक लोकशिक्षणाच्या तळमळीने बळकावू लागला तर श्रीमती भावेंनी सूचित केलेला पेच उभा राहील.
 येथवर या तीन संग्रहांच्या केलेल्या चर्चेवरून आशय आधारित कथांच्या गुच्छात आढळलेल्या बलस्थानांची व मर्यादांची कल्पना आली असेल. ग्रामीण पार्श्वभूमीवरच्या 'उदक'मधील कथांची तुलना मढेकरांच्या 'तांबडी माती' व 'पाणी'शी

करता येईल. मुख्यत: या दोन्ही लेखकांनी बोलीभाषेला मारक अशा संस्कृत-प्रचुर भाषेचा संवादातही केलेला वापर संस्कृतिस्टांच्या तुलनात्मक दृष्टिकोनातून तपासावा लागेल. ही लेखकाची मर्यादा नसून कथा व कथाकार हे विशिष्ट सांस्कृतिक उपगटाची उत्पादने आहेत; याचा हा परिणाम आहे. हे नीट स्पष्ट होण्यासाठी तुलनात्मक संस्कृती अभ्यास रुजावे लागतील. ते नसल्यामुळे अज्ञानाचे उत्पादन वाढते आहे.
लेखकाचे वेगळेपण आजवर अंधारात राहिलेल्या किंवा पुरेसा न्याय न मिळालेल्या विषयांची निवड, त्यासाठी करावे लागणारे फील्डवर्क व वाचन आणि निर्भयपणे वास्तवाला भिडण्याची ताकद यातच आहे. त्यामुळेच या सर्वच कथांची वाचनीयता ढासळलेली नाही. एरवी हे या तीन विषयावरील अहवाल / प्रबंध किंवा ट्रॅक्स ठरले असते. तिन्ही संग्रह तंत्रदृष्ट्या एकापेक्षा वेगळे करण्यात त्यांना बरेचसे यश आले आहे. या मागे त्यांची नितळ सामाजिक बांधिलकी व प्रशासकात क्वचित आढळणारा पारदर्शीपणा आहेत, हे उघड आहे. एकूण मराठी कथेत त्यांचे हे वेगळेपण अबाधित राहील असे वाटते.

लक्ष्मीकांत देशमुख यांच्या कथांमधील स्त्रीरूपदर्शन

विष्णू नारायण पावले

   

॥१॥

 लक्ष्मीकांत देशमुख हे भारतीय प्रशासनातील एक सनदीदार अधिकारी. महाराष्ट्रातल्या विविध शहरांमध्ये त्यांनी सेवा बजावली आहे. त्यांच्या एकूण लेखनाचा आवाका पाहाता मानवी जीवनासंबंधी, विविध जातसमूहांविषयी अतिशय तीव्रतर आणि अधिक संवेदनशील लेखन केले आहे. आपल्या लेखनाचा राष्ट्रीय स्वर नेहमी त्यांनी ठेवला आहे. तसेच राज्य, प्रदेश व राष्ट्रीय प्रश्नांविषयी जीवनाविषयीचा धांडोळाही घेतला आहे. जिल्हास्तरावरील प्रशासनाच्या अनुषंगाने प्रत्येक दिवशी कार्यालयीन कामकाजात विविध समस्या घेऊन येणारी माणसे, त्यांचे प्रश्न व त्या प्रश्नांवर काढलेला तोडगा हा त्यांच्या लेखनाचा एक महत्त्वाचा दुवा आहे. एकूणच लेखनाच्या बाबतीत प्रशासनात त्यांच्यामधला अधिकारी जेवढा सजग आहे तेवढाच त्यांच्यातील लेखकही आहे. म्हणूनच लोकशिक्षकाची एक समर्थ भूमिकाही त्यांच्या ठायी आहे. अनेकविध विषयसूत्रांचा मागोवा घेताना या दोहोंचा (समाज व प्रशासन) सुमेळ त्यांनी साधला आहे. भोवतालाकडे पाहणारी त्यांची दृष्टी अधिक गहिरी आहे. परंतु ती पोकळढोकळ वस्तुनिर्देश करत नाही तर गाभ्यालाच हात घालते. एकूण त्यांच्या लेखनरूपाचा एक उच्चतम आविष्कार ते साक्षात उभा करतात.
 लक्ष्मीकांत देशमुख यांच्या कथेचे दुसरे वैशिष्ट्य असे की, त्यांच्या कथांमध्ये कामगार, मजूर, कष्टकरी, गृहिणी ते खेळाडू, राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्या स्त्रिया आणि विविध नोकरीधंदा करणाऱ्या अलक्षित स्त्रियांचे विश्व साकारले आहे. महाराष्ट्रामध्ये स्त्री दाक्षिण्याची भूमिका चालत आलेली असताना जगण्याच्या वाटा धुंडाळणाऱ्या कर्तबगार, निराधार नि निरापराध अशा चौफेर परंतु सक्षम स्त्रियांचे रूप प्रकट झाले आहे. 'कथांजली', 'अंतरीच्या गूढगर्भी', 'पाणी! पाणी', 'नंबर वन', 'अग्निपथ' आणि 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' या सहा कथासंग्रहांमधून

स्त्रीच्या अलक्षित जीवनाचे एक अंग स्पष्ट होते. तिच्या रूपाचे दर्शन प्रस्तुत लेखात सादर आहे.
 

॥२॥

 'अंतरीच्या गूढगर्भी' हा लक्ष्मीकांत देशमुख यांचा दुसरा कथासंग्रह आहे. 'अंतरीच्या गूढगर्भी' मधील स्त्रीरूपे ही गुंतागुंतीची असली तरी जो स्त्रीचा आत्मभाव असतो तोच या कथांचा केंद्रबिंदू आहे. अबोध मनातील काही सूक्ष्म स्पंदनेही केंद्रित झाली आहेत. भावनेचा अत्युच्च कोटीचा उत्कट आविष्कार या स्त्रियांच्या ठायी आढळतो आहे. परस्पर नातेसंबंध हे किती नि:स्पृह, अतूट आहेत याचीही एक मीमांसा करता यावी इतकी समरसता या कथांत आढळली आहे. काव्यात्म अनुभव हे सहजपणे व्यक्त झाले आहेत.
 या संग्रहातील सर्वोत्तम कथा ही 'मी किलिंग' ही वाटते. या कथेची नायिका ही अत्यंत 'प्रिय लेखिका' म्हणून 'बालविश्व' च्या बालवाचकांमध्ये प्रसिद्ध आहे. ती त्यांची प्रेरणा आहे. पण नायिकेच्या प्रतिभेचा आविष्कार म्हणून मा. नंदू हा साहसीवीर मानसपुत्र तिने उभा केला आहे. मात्र प्रत्यक्ष जीवनात पूर्वी प्रेमात फसल्यामुळे ती एका पुत्राला जन्म देते. जन्मत:च त्याची मानसिक, बौद्धिक वाढ खुंटली आहे. तो धगुरडा झाला तरी गोष्ट सांगण्याचा अट्टाहास धरतो. त्यातून तिला लेखनाची प्रेरणा मिळाली आहे. प्रत्यक्षात बंडूचा 'मर्सी किलिंग' ने मृत्यू घडवून आणावा हाही विचार तिच्या मनात डोकावतो व ती अस्वस्थ होते. पण विधाताच तापाचे निमित्त साधून त्याला हिरावून नेतो. तेव्हा तिचा मानसपुत्र असणाऱ्या नंदूचा ती जाणून बुजून मृत्यू घडविते. अतिशय उंचीला पोहोचलेली ही कथा स्त्रीच्या मनोव्यापाराचे नेटके विश्व उभे करते. आईच्या मातृहृदयाची अगतिकता, तिच्या वेदना नि हे मातृरूप अगाध, अगूढ असल्याचे आढळते. आईचा एक नवा चेहरा हे या कथेचे एक सूत्र आढळते. काव्यात्म अनुभूती देणारी 'राधा' ही कथा एक मोक्याची कथा वाटते. पु. शि. रेगे यांच्या 'राधा' या त्रिधा-राधाचा काव्यात्म लघुपटाचा बंध या कथेत आला आहे. या कथेतील नायिका 'कविता' ही आहे. भाई तिच्या भेटीसाठी स्वत: निर्माते असूनही आतुरले आहेत. राधेची भावविभोरता या कथेतील आणि चित्रपटातील 'कविता' या नायिकेच्या भूमिकेत सामावली आहे. पण ही नायिका प्रत्यक्षात विरहिणीचे रूप घेऊन वावरते आहे. भाईंना वाटते ती आपल्यावर नाराज झाली आहे. परंतु याउलट तीच या गोविंदाच्या प्रेमासाठी आसुसली होते. प्रेमाचे अभिजात रूप घेऊन ती प्रत्यक्षात 'राधा' म्हणूनच वावरणारी आहे. इथे स्त्रीमनाची कोवळीकता आढळून येते. याउलट 'रात्र' कथेतील नायकाची

पत्नी ही प्रारंभी नवीन लग्न झाल्यानंतर एका धुंदीत वावरणारी वाटते. पण जेव्हा तिला आपला नवरा रोज रात्री बेडकांना धरून प्रयोगशाळेत विकण्याचा धंदा करतोय हे समजते तेव्हापासून ती शृंगारत होत नाही. तिच्या साऱ्या चेतना - उत्तेजना त्या किळसवाण्या स्पर्शाने बजवल्या आहेत. नायकाची पत्नी ही स्वप्नील आयुष्याचा चुराडा झाल्याने व्यथित झालेली स्त्री आहे.
 अर्धस्फुट मानवी भावनांची दुसऱ्या बाजूची स्त्रीरूपेही या संग्रहात आढळतात. 'जोकर' या कथेमधील लीना तो छोटू विदूषक बुटका आहे म्हणून त्याच्याकडे हीणत्वाने पाहणारी आहे. त्याची हेटाळणी करणारी आहे. सामान्य जोकराने त्या सौंदर्यवतीची अभिलाषा धरल्यामुळे ती त्याच्यावर खट्ट होते. छोटूच्या स्वप्नांचा बिलोरी आरसा फुटतो. तर 'हे खेळ मनाचे सारे' मधील डॉक्टर असणाऱ्या नायकाची आई शहरात आली आहे. तिच्या पतीचे निधन झालेले आहे याचा तिला अजूनही विसर पडलेला नाही. त्यामुळे शहरात तिला मोकळेपणाने वावरता येत नाही. मात्र शेजारच्या मास्तरांचे डोळे सातत्याने पाठलाग करताहेत या भयाने ती ग्रस्त आहे. सत्त्वशील आणि सात्त्विक परंतु चौकटीबाहेरचे जग पाहिले नसलेल्या स्त्रीच्या मनाची अवस्था चित्रित केली आहे. धर्म - संस्कार, चालीरीतींचा कोष तिच्या मनाभोवती अदृश्यपणे घट्ट विणलेला आहे. या परिणामाची एक भावनात्मक अभिव्यक्ती ही या स्त्रीमनाचे कथारूप आहे. हे स्त्रीरूप आहे. 'माझे अबोलणेही' ही एक सुंदर प्रेमकथा वाटावी इतकी सहज अवतरली आहे. शब्दकळेचे आपसूकपणे व्यक्त होणारे नमुने रिचवणारी ही कथा आहे. विद्याच्या मनस्वी पण बौद्धिक स्वभावाचे, लाघवी व्यक्तिमत्त्वाचे विशेषत्व नायकाच्या तोंडून व्यक्त होते आहे. एकाच मार्गदर्शकाकडे संशोधनाच्या निमित्ताने एकत्र आलेले हे दोन जीव पुन्हा परस्पर विभागले जातात. दोघांमधल्या पत्रसंवादाला अचानक ओहोटी लागते. विद्याची पत्रातील भाषा ही ओढ, आपुलकी न दाखवता अगदी वरवरचे अनुमान व्यक्त करते तेव्हा नायक अस्वस्थ होतो. थंड व मितभाषी विद्या नायकाचे मित्र सांगतात त्याप्रमाणे त्याच्या आर्थिक बाजूकडे पाहते. आजच्या युवतींच्या मानसाचे विद्या ही प्रतिनिधित्व करणारी आहे. मैत्रिणीच्या रूपाचे हे वेगळे अंग उत्तम शब्दकळेने साकारले आहे. तर 'सृजन कसा तडफड करी' कधील गुरू - रीटा या नात्याचेही भावबंध अनंताच्या पोकळीतले (स्त्री-पुरुष) प्रकृती - पुरुषाच्या अद्वैताचे चिंतन मांडणारे आहेत. इथेही स्त्री हाच चिंतनाचा विषय झालेला आढळतो. स्त्रीमनाचा चमत्कृतीशील आविष्कार रिटाच्या वर्तनातून, तिच्या बोलण्यातून अभिव्यक्त होतो. सृजनाचा सहसंबंध हा स्त्रीच्या निर्मितीप्रक्रियेशी जोडला आहे. या कथेला स्त्रीत्वाचे आदिम पदर लाभले आहेत.

॥३॥

'नंबर वन' या कथासंग्रहातील कथांमध्येही कणखर बाण्याच्या महिला खेळाडूंच्या विश्वाचे अनोखे रेखाटन प्रकट झाले आहे. यामधील स्त्रीरूपे ही प्रेरक - प्रेरणादायी ठरणारी आहेत. 'प्रयासे जिंकी मना' मधील ममा ही बालपण कोकणच्या समुद्रकिनारी गेल्यामुळे माशाप्रमाणे सहजगत्या पोहणारी, बटरफ्लाय व बॅक स्ट्रोकमधील दोन सुवर्णपदके ऐंशीच्या दशकात पटकावणारी मानिनी स्त्री आहे. तितकीच ती भावनाशीलही आहे. कारण ती जयवंत या मुलाला पाण्यापासून बाजूला ठेवू पाहते. परंतु जयवंत तिच्या मताविरुद्ध वागतो व पोहायला शिकतो. तिचे अजित (मुलगा) व दिलीप (नवरा) हे दोघे पाण्याचा बळी ठरल्याने तिच्या मनातील भीती ही बळावलेली असते. त्यामुळे ती भीती रास्त होती. पण जय गोहाटीच्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करतो. घरी येतो व आईच्या गळ्यात ते पदक घालतो. आई पुन्हा त्याच्या गळ्यात ते पदक घालते. इथे कोण जिंकले? हा प्रश्न येतो. तर दोघेही जिंकले गेले. मानवी भयगंडाचा आणि स्त्रीच्या औदार्याचा रूपशोध उकलण्याचा प्रयत्न या कथेत आढळतो. क्रिकेट, टेनिस, स्वीमिंग, इनिंग या स्पर्धांमधल्या महिलाविश्वाला साजेसे रूप देण्याचा त्यांचा प्रयत्न भारतीय स्त्रीरूपाचे दुसरे अंगही उलगडून दाखवतो. या महिला बाहेर स्वैर वागतात याचाही निर्देश त्यांच्या कथांमधून आढळतो. उपभोगाच्या पातळीवर आढळणारी लवचीक आवाहनं अनुबोधात्मक ठरली आहेत हेही जाणवते. या क्रीडा जगताशी निगडित अशा स्त्रिया कुणाच्या माता, भगिनी, सहचारिणी, प्रेयसी आहेत तर कुठे तटस्थ राहणाऱ्या आहेत.
 'अखेरचं षटक' ही कथा दुहेरी भावनात्मक पेचाचा उलगडा करणारी, मोकळ्या मनोविश्वाच्या बेगमची उत्कट अवस्था दर्शविणारी आहे. तिच्या मनातले विचार हे भारतीय स्त्रीच्या वेगळ्या नात्याचे व्यक्त होणारे विचार वाटतात. स्त्रियांना दोन पती करण्याची चाल जर असती तर....' दोन भिन्न भिन्न पुरुष सलीम (पती) व संतोष (प्रियकर) हे वेगवेगळ्या बाजूला दोन्हीकडे दोघे राहिले असते हा विचारही तिच्या मनात चमकून जातो. स्त्रीच्या मनातील पुरुषाची प्रतिमा हार - जीत न होता समांतर राहते हे या कथेचे अनोखे सूत्र राहिले आहे. एक तिचा प्रियकर आहे व एक तिचा पती आहे हे नाते तिने अधिक कोमलरीत्या जपले आहे. याच्या उलट 'ब्रदर फिक्सेशन' ही कथा आढळते. स्वीटी ही या कथेची नायिका. तिचा पती आणि भाऊ हे दोघेजण खेळाडू आहेत. ते एकाच टीममध्ये एकत्रच खेळत आहेत. तिचा पती मानसशास्त्राचा विद्यार्थी असणारा पण खेळाकडे ओढला गेलेला

एक चांगला खेळाडू होता. पण स्वीटीला आपल्या भावाविषयी प्रचंड प्रेम आहे. विकीच्या द्विशतकाची अपूर्वाई राहिली नाही. मात्र भावाचा एक कॅलेंडर इयरमध्ये हजार धावा पूर्ण करण्याचा मान हुकला यामुळे ती अस्वस्थ आहे. त्यामुळे वारंवार विकी खचतो आहे. मानसशास्त्राचा विद्यार्थी असणारा हा विकी स्वत:च कोणत्यातरी मानसिक भयगंडाने पोखरल्याची जाणीव व्यक्त होते आहे. स्वीटीच्या मृदू आवरण असलेल्या बोलण्याने मात्र तिचा नवरा घायाळ होतो आहे. बायकोचा टाळाटाळ करणारा स्वभाव त्याच्या करियरला बाधा ठरतो आहे. स्वीटीचा स्वाद भावाकडे ओढला जातो आहे. स्वीटीच्या वर्तनातून भावाविषयी असणाऱ्या आकर्षणाचे रूप आढळते आहे. तर मैदानावर सशक्त असणारी खेळाडू जगतातील माणसे मनाने किती अशक्त असतात याचा दुहेरी प्रत्यय या कथांमधून प्रत्ययास येतो. अशीच एक 'नंबर वन' ही कथा बेबी या टेनिसपटू महिलेची आहे. ती तुफान टेनिसपटू आहे, पण तिच्या मनावरती मोनिका या तिच्या समवयस्क खेळाडूने गारूड केले आहे. मुळात मोनिका ही उत्तम खेळाडू आहे परंतु तिला स्वत:ला यश या लोकांनी यश मिळू दिलेले नाही. बेबीवरील प्रेमापोटी हरसन तिला जखमी करतो. या प्राणघातक हल्ल्यामुळे तिला पाच वर्षे विश्रांती घेणे भाग पडते. शेवटी पाच वर्षानंतर मैदानात ती बेबी विरुद्धच उतरते. ही स्पर्धा बेबी जिंकते परंतु ती स्वत:च स्वत:ची शत्रू होते. नंबर वन बनण्यासाठी आपण आजवर किती कपटाने वागलो याबद्दल ती विव्हल होते. मोनिकेसह आणखी एक मैत्रिणीचे करिअर विश्व तिने बाद केले असते. मानवी सूड हा कोणते रूप धारण करतो हा या कथेचा बंध आहे. स्पर्धा ही मैदानावरती व त्या खेळापुरती असावी या तत्त्वाला इथे तिलांजली दिलेली आढळते. महिला ही कोमल अंत:करणाची असते हे जरी खरे असले तरी तिला असूया असते, न् प्रसंगी ती कठोरताही धारण करते हे स्त्रीरूप या कथेतून आढळते.
 या कथांच्या विरुद्ध जाणाऱ्या 'फिरूनी नवी जन्मेन मी' व 'रन बेबी रन' या दोन वेगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण कथा या संग्रहाची शान वाढविणाऱ्या आहेत. पहिल्या कथेमधील मीना ही एका रोजच्या जगण्याच्या गरजेचा अभाव असणाऱ्या पाथरवट कुटूंबातून पुढे आली आहे. अल्पावधीत ती भारतीयांची शान बनली आहे. परंतु स्पर्धेमधील तिच्या यशाने काही प्रतिस्पर्धी खेळाडू मैत्रिणींच्या पोटात शूळ उठला आहे. तिच्या आक्रमक व पुरुषीपणाचे भांडवल करून तिच्याविषयी 'तो' का 'ती' हा प्रश्नही उपस्थित केला जातो. एव्हाना प्रचंड वादळ उठते. या नैराश्येतून तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला असतो पण तो असफल ठरतो. कारण लिंगचाचणीनुसार मीनाला 'मर्दसिंग' म्हणून घोषित केले जाते.

त्यातून ती आत्महत्येस प्रवृत्त होते परंतु त्यातून ती बचावते. तिला आईच्या शब्दाने पुनर्जन्म लाभल्यासारखे होते. एक आई मुलीचा हरवलेला आत्मविश्वास नव्याने जागृत करते म्हणून कथेचे शीर्षकही सार्थ ठरते. तर दुसरी कथा ही 'बेबी' ची आहे. ही साताऱ्याकडील गरीब घरातील युवती राष्ट्रीय धावपटू म्हणून नावाजली जाते. तिचा प्रशिक्षक मात्र दलित असतो. बेबीचे लग्न होते. तिच्या इच्छेविरुद्ध तिचा नवरा तिच्यावर बलात्कार करतो. करियरला बाधा ठरू नये म्हणून ती संबंध टाळण्याचा प्रयत्न करते पण अखेर तिला गर्भ राहतो. त्यातूनही सोनोग्राफी होते. तो भ्रूण स्त्री असल्याने बेबी तो ठेवायचा मनात धरते परंतु सासरच्या लोकांकडून गर्भपाताचा घाट घातला जातो. तेव्हा तिचे गर्भाशयही छिनले जाते. ही संबंध कृती तिच्या मनाविरुद्ध होते. तिच्या डायरीतील प्रशिक्षकासोबतचा फोटो पाहून तिच्याविषयी शंका घेतली जाते. तिचे ऑलिम्पिकचे (सिडनी) स्वप्नही अधुरेच राहते.... अन् ही गुणी खेळाडू आत्महत्या करते. जातीचा प्रश्न आणि ग्रामीण महिला खेळाडूचा चेहरामोहरा या कथेत उत्तमरीत्या प्रकटला आहे. अतर्य मानवी वर्तनाचा मानसशास्त्रीय धांडोळा हा या कथांचा पाया आहे. मूलार्धाने आगळे-वेगळे आणि शास्त्रीय स्वरूपाचे पक्के परंतु वस्तुनिष्ठ असे हे क्रीडा जगताचे लेखन आढळते. महिला खेळाडूंची ही विविध रूपे आहेत.

॥४॥

 'अग्निपथ' मधील अनुभवविश्व हे देशांतर्गत स्तरावरील जातीय दंगली, दहशतवाद, धर्मवाद व त्याअनुषंगाने येणारे प्रश्न फार प्रभावीरीत्या उभे करणारे ठरले आहे. नामोहरम झालेली माणसे पुन्हा लोकशाहीवरच्या अढळ विश्वासाने वाटचाल करतात ही मोठी निष्ठेची बाब आहे. त्यामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांचेही कर्तव्य आणि तडजोड, प्रशासकीय कर्तव्य यामध्ये विवेक साधताना कराव्या लागणाऱ्या झगड्याचे चित्र आले आहे. संग्रहामधील 'काश्मीर की बेटी' या कथेमधील साराच्या धडाडीवृत्तीचा आलेख अधिकांशाने उंचावला गेला आहे. या कथेची नायिका सारा आहे. ती रणरागिणीचे रूप घेऊन उभी आहे. नादान नवऱ्यापासून आपल्या दोन्ही मुलींना घेऊन ती अलिप्त राहते आहे. एका अतिसंवेदनशील भागामध्ये राजकारणात उतरलेल्या या स्त्रीचा संघर्षमय प्रवास चित्रित केला गेला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेच्या दरम्यान तिच्यावर बॉम्ब हल्ला होतो. तरीही काश्मीरमध्ये शांती प्रस्थापित करण्याच्या निर्णयाप्रत ती येते. पंधरा वर्षापूर्वी तिच्या निगार या बहिणीचे अपहरण अतिरेकी करतात तेव्हा गृहमंत्री असणाऱ्या अब्बूंनी देशाच्या इज्जतीपेक्षा स्वत:चा स्वार्थ साधून तिची सुटका केलेली असते.

ही खरी दुखरी नस आहे. त्यामुळे सारा देशाच्या हिताच्या दृष्टीने पक्षाच्या ध्येयधोरणांशी बांधील राहून शांतीचा मार्ग अवलंबण्याचा विचार करते. शेवटी 'देश कुणासाठी असतो? तर तो जनतेसाठीच ना' या निष्कर्षाने ती मोहरते. 'आझाद काश्मीर की जंग' ही मोहीम हाती घेते. तिच्या या कार्यास अखेरी तिचे अब्बू व मुलगी दिलशादही सामील होण्याचा निर्णय घेतात. राजकारणाचा स्पर्श असणाऱ्या एका कणखर स्त्रीचा चेहरा या कथेस आहे. अशा स्त्रियांची गरज राजकारणास हवी हे अनमान योग्य वाटते. तिच्या कणखर, करारी बाण्याचे एक तेजस्वी रूप आढळून येते. धर्मापलीकडे देशाचा विचार करणारी ही स्त्री आहे.
 कमल नावाच्या मनोगंड - मनोविकारांची शिकार झालेल्या एका अनाथ मुलीची 'स्वत:लाच रचीत गेलो' ही अनोखी कथा आहे. मोठ्या घरची माणसे संदीपला बहीण असावी या हेतूने एका वर्षाची असताना कमलला घरी आणतात. मात्र जेव्हा तिला ती अनाथाश्रमातील आहे हे कळते तेव्हा तिला मनोगंडांनी घेरले जाते. अपराधी वाटते. पण डॉक्टरांच्या 'शॉक थेरपी' ने ती बरी होते. या वेदनेवर उपाय म्हणून तिची मूळची संगीताची आणि कवितेची आवड उफाळून वर येते. त्यामुळे तिला जीवनानंद गवसतो. जरी श्रीकांतने तिला अव्हेरले असले तरी त्याचा गर्भ तिच्या उदरात विकसित होतो आहे. या आनंदाने ती खूश आहे. जरी ती अनाथ असली तरी ते दु:ख पचवून नारायण सुर्वेच्या 'सूर्यकुलातील मी एक' असे स्वत:ला समजते. आणि नव्या निश्चयाने जीवन जगण्यास उभी राहते. जीवनाचा समर्थ अर्थ शोधणारी ही स्त्री आहे. तर 'नेव्हर सी यू अगेन'मधील सिस्टर अॅग्नेस ही एक प्रेरणादायी माताच आहे. इनामदारांच्या संस्कारशील घराण्यातून कुरूप, वेडाविदा असणारा संजय स्वत:च्याच आई-वडिलांकडून हेटाळला जातो. तो एकाकी बनतो. त्याला मनोरुग्ण ठरविले जाते. तेव्हा त्याच्यातील चित्रकाराला हेरून सिस्टर अॅग्नेस त्याची प्रतिभा फुलवते. स्वत:चा दुसरा वारलेला मुलगा लुई मानते. तिचा टोनीही मरतो तेव्हा ती शोकाकुल होते. त्यावेळीही संजय तिच्या आधारास जातो. ती त्याचा मुलगा म्हणून स्वीकार करते. आईपणाचे उदात्त नि उन्नत रूप या कथेतून विकसित झालेले आढळते.
 'गद्दार' ही सर्वात प्रभावी आणि भारतीय स्त्रीच्या मूळ रूपाची प्रचिती देणारी कथा आहे. बिल्कीसबी नावाची एक मुस्लीम स्त्री आहे. तिच्या पती-विषयीच्या निष्ठा व्यक्त झाल्या आहेत. धर्मांध राष्ट्राध्यक्षांच्या हुकूमशाहीचा, दहशतीचा बळी म्हणून लतीफला 'देशद्रोही' म्हणून भर चौकात गोळ्या घालून मारले जाते. प्रेताची 'गद्दार' म्हणून अवहेलना - विटंबना केली जाते. त्यावेळी तिच्या घरातील सर्वजण प्रेतावर धुंकणे, लाथ मारणे अशी निषेधात्मक कृत्ये करतात. पण बिल्कीसबी वरवरचा

निषेध व्यक्त करते. स्वतंत्र लोकशाही राष्ट्राची स्वप्ने पाहणाऱ्यांच्या वाट्यास अनन्वित छळ येतो. आणि या साऱ्या छळाचा, अन्यायाचा प्रतिकार म्हणून कडेलोट म्हणून ज्या राष्ट्राध्यक्षांचा दिवाणखान्यात फोटो लावलेला असतो त्या तसबिरीवर बिल्कीसबी गोळी झाडते व आपल्या जराजर्जर देहात सारी प्राणशक्ती एकवटून चौकात त्या तसबिरीवर नाचत हवेत बंदुकीच्या फैरी झाडते. राष्ट्राध्यक्षांच्या प्रतिमेवर थयाथया नाचण्यातून तिच्या विकाराची सीमा प्रकटते. हा भारतीय आदिम स्त्रीचा चेहरा या कथेतून प्रकटला आहे. स्वाभिमानी बाणा जपणारी ही स्त्री देशमुख यांच्या कथेचे प्राणतत्त्व वाटते. इतके ते स्वाभाविक झाले आहे.
 स्त्री आणि पुरुष ही पृथ्वीची नैसर्गिक आणि दोन तत्त्वे (प्रकृती आणि पुरुष) होत. त्यासंबंधाचा अनुभव या दोहोंच्या उत्सर्जनाचा म्हणता येईल. 'नशिबाचा खेळ' ही अतिशय बोलकी कथा वाटते. या कथेमधील स्त्रीच्या वाट्याला येणारा पती हा मानसिक आणि बौद्धिक वयानुसार तो पाचेक वर्षांचा वाटतो. त्याच्या फक्त शरीराची वाढ झाली आहे. या कथेमधील स्त्रीने आपल्या अपत्यास स्वत:स नरडीस नख लावून मारलेले आहे. बालपण अतिशय हालअपेष्टांत गेलेल्या हिचे बालपणीचे भावविश्व कोमेजले आहे. तिच्या आई-वडिलांच्या निधनानंतर तिच्या मामाने पैशासाठी तिला विकले आहे. तिची फसवणूक झाली आहे. कारण तिच्या पदरात मतिमंद नवरा येतो. परंतु एका नैसर्गिक क्षणी जे घडावयाचे ते घडते आणि जन्माला येणारे मूलसुद्धा बापाचेच दुसरे रूप वाटते. ते विकलांग म्हणून जन्माला येते. तेव्हा मात्र तिचा बांध फुटतो व ती त्या मुलाचा या घराण्याची, अन्यायाची परंपरा मोडीत काढण्यासाठी गळा घोटते. व स्वत:ची कैफियत न्यायालयात न्यायाधीशांसमोर सादर करते. अशी ही स्त्रीच्या वेगळ्या मुखवट्याची कथा साकार होते. आणि शेवटी मला 'मरेपर्यंत फाशी द्या' अशी विनवणी करते. नाही तर 'मी आत्महत्या करते' अशी चिथावणीही देते.
 मानवी भावभावनांचे, एक नव्या वासना - विकाराचे अतुलनीय चित्रण त्यांच्या कथेठायी आहे. स्त्रीच्या सर्जनाचा, तिच्या इच्छा - आकांक्षेचा आणि एका भावनिक कोलाहलाबरोबर तिच्या संघर्षाचा, विवेकाचा अनुबंध त्यांच्या कथेत प्रकटला आहे. स्त्रीच्या उन्नत परंतु अतर्व्य व्यक्तिमत्त्वाचाही पोषक परिपोष कथेमधल्या आशयाबरोबर साक्षात केला आहे.

॥५।।

'उदक' कथासंग्रहातील 'साती आसरा' चे स्वरूप : "साती आसरा"
 महाराष्ट्रातील स्त्रियांच्या भावविश्वाशी निगडित असे हे नाव. सात जणींनी जिथे आसरा घेतला ते ठिकाण म्हणजे जलाशयाचे ठिकाण होय. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्राचा

विचार करता या जलाशयात राहणाऱ्या देवता आहेत. त्यांच्याविषयी विविध आख्यायिका सांगितल्या जातात. त्यानुसार त्या भर दुपारी डोहाजवळ जाणाऱ्यास आत पाण्यात ओढून नेतात. त्याला किंवा तिला झपाटतात. अशी त्यांच्याप्रती जनमानसात एक प्रकारची भीती आहे. मात्र लोकमानसाचे, श्रद्धेचे ते एक रूप आहे. परंतु लक्ष्मीकांत देशमुख यांच्या या कथासंग्रहातील कथांमधील असणाऱ्या या 'साती आसरा' मात्र पूर्णत: भिन्न आहेत. जरूर त्या क्षणभर सुख देणाऱ्या नाहीत तर मणभर दु:खानुभूती देणाऱ्या आहेत. काही कुमारी आहेत तर काही दुर्भाग्यवती आहेत. त्या जरी सकलगुणमंडित नसल्या तरी कष्टगुणसंपन्न आहेत. म्हणू त्यांना रोजगार हमीच्या कामावर जावे लागते. वासनेची शिकार व्हावे लागते. घोटभर पाण्यासाठी जीव गमवावा लागतो. एकूणच त्यांची चरित्रे ही भगभगीत आहेत. मानवी मनाला त्या नुसत्या झपाटत नाहीत तर दंशही करतात. त्या पाण्यात राहणाऱ्या नसून पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या आहेत. अंतरीचे गूढ सांगणाऱ्या विरहिणी नसून कोरभर सुखाच्या भाकरीसाठी कष्टणाऱ्यातिष्ठणाऱ्या आहेत. न्यायासाठी संघर्षशीलव्रती आहेत. निर्दावल्या भोवतालात त्या दुर्लक्षित आहेत.
 या संग्रहातील स्त्रिया या कणखर बाण्याच्या आहेत. परिस्थितीने गांजल्या आहेत. स्वत:साठी, सुखी संसारासाठी, आपल्या नात्यासाठी, चिमण्या लेकरांसाठी सुखाचा घास मिळावा म्हणून त्या आसुसल्या आहेत. पण ही आसक्ती केवळ स्वत:च्या सुखानुभूतीसाठी नाही तर आपल्या जीविताबरोबर दुसऱ्याच्या जीवाची काळजी घेणे हे त्यांच्या रक्तात आहे. या संग्रहाच्या मुखपृष्ठावर 'तहानलेल्या महाराष्ट्राच्या कथा' असे उपशीर्षक दिले आहे. मात्र संग्रहातील स्त्रियांच्या रूपाने ती दाहकता आपल्याला जाणता येईल. मी उपहासाने किंवा उपरोधाने त्यांची चिकित्सा, त्यांचे स्त्रीरूप शोधताना 'साती आसरा' हा शब्द निंदनीय म्हणून वापरलेला नाही. मुळात या कथांमधल्या स्त्रियांची अनुभूती झपाटणारी आहे. या स्त्रियांच्या दु:खाने मन व्याकूळ होते. त्या भिडतात म्हणून त्यांचे हे रूप रेखाटले आहे.
१) पहिली आसरा : गजरा
 ‘बांधा' या कथेची ही नायिका होय. तिचे लग्न एका प्रतिष्ठित घराण्यातील हणमंताशी होते. पिढीजात इनामदारकी उपभोगणाऱ्या हणमंताची काविळी / हिरवी नजर गजराचे जीवन पालटून टाकते. खानदानी मराठा कुटुंबात लहानाची मोठी झालेल्या गजराच्या माथ्यावर दुष्काळाचा वरवंटा फिरतो. ज्याप्रमाणे परसदारी गाय हाडकून गेलेली असते त्याचप्रमाणे रोजगार हमीच्या कामावर तिला जावे लागल्याने तिचा देह हडकून जातो. सुडौल असणारा तिचा बांधा हळूहळू झडतो. पूर्वीची रया

उतरते. नि एके रात्री हणमंतराव तिच्या काळजाला घरं पडावीत असं म्हणतो, “हाडं हाडं लागताहेत नुसते..... मजा येत नाही.' पूर्वीसारखी म्हणजे स्त्री फक्त उपभोगाची वस्तूच असल्याचा निर्देश व्यक्त होतो. सबंध कथेत देशमुख यांनी ही अस्वस्थता पेरून ठेवली आहे. कामावर तर मुकादमाची लुबरी नजर तिचा पाठलाग करायची. दुष्काळी कामाने हरवून गेलेली काया आज ना उद्या पाऊस पडला आणि पीकपाणी वाढून समृद्धता येईल तेव्हा आपण मनाने पूर्वीसारख्या त्याच्याशी बांधील राहू काय? हा गजराचा प्रश्न अस्वस्थ करणारा वाटतो. पुरुषी आक्रमणाचा आणि स्त्रीच्या मूकपणाचा हुंकार या कथेतून व्यक्त होतो. नायिकेचे गजरा हे नाव हणुमंताच्या वासनेचे रूप म्हणावे लागेल. जेव्हा स्वत:ची बायको सुकून जाते तेव्हा तो शेवंता बाईकडे वळतो. रसवंती शरीराची अभिलाषा ही वासनेची पूर्ती समजून तो तिच्याकडे आकर्षित होतो. मात्र ऐतखाऊ हणमंताला तिच्या गजराच्या कष्टाचे कोणतेही सोयरसुतक नसणे हेही फार अस्वस्थ करणारे आहे.
२) दुसरी आसरा : ठकूबाई  दुष्काळ आणि गरिबी ज्यांच्या पाचवीला पूजली आहे, दिवसभर राबल्याशिवाय ज्यांची सांजेला चूल पेटत नाही, अशा दरिद्री महाराष्ट्रातील दारिद्र्याचे विलक्षण थरारचित्र 'भूकबळी' या कथेत श्री. देशमुख यांनी उभे केले आहे. राघू ननावरे या गाडीलोहार सामाजातील पुरुषाची ठकूबाई ही विधवा बहीण आहे. नवऱ्याच्या निधनानंतर भावाच्या घरी ती राहते आहे. त्याच्या जिवावर आयते बसून खाणे तिला पसंत नसल्याने थोडीफार मदत म्हणून तीही रोजगार हमीच्या कामावर जात असते. रोजगार हमीच्या कामाचा खोळंबा झाल्याने आणि रेशन दुकानदाराने वेळेत धान्य न दिल्यामुळे ठकूबाई ही उपासमारीने मरते. परंतु तिला कागदोपत्री आजारी ठरवले जाते. शासकीय सुविधांचा बोऱ्या कसा वाजतो यावरही या कथेत भाष्य येते. मात्र शिंदे या तहसीलदाराची अस्वस्थता या व्यवस्थेला कशी छेद देणार हाही एक अस्वस्थ प्रश्न उभा राहतो. ठकूबाईची उपासमारी ही मेळघाटातील उपासमारीची दुखरी आठवण करून देते एवढे निश्चित. एकूण व्यवहाराचे झालेले बाजारीकरण हा दुखरा घटक या कथेच्या मुळाशी आहे. एका स्त्रीचे भूकबळी जाणे म्हणजे आपण कोणत्या राज्यात वावरतो हा छळणारा प्रश्नही उपस्थित होतो. सोशिक आणि दरिद्री स्त्रीची अवहेलना हृदय पिळवटून टाकते. इतकी ती तीव्र झाली आहे.
३) तिसरी आसरा : बायजा  वयानं सत्तरी गाठलेली, कमरेत बाक आलेली नि नजरेनं अधू झालेली बायजा

ही 'कंडम' या कथेतील एक दलित स्त्री आहे. ती एकटीच झोपडीत राहते आहे. तिचा लेक-सून बाहेरगावी आहे. तिच्या झोपडीत पाण्याचा एक घोटही शिल्लक राहिलेला नाहीए. भर दुपारी ती पाणी आणायला जाते आणि घोटभर पाणी पिऊन पाण्याचे मडके घेऊन येत असताना ती अशक्तपणामुळे एका दगडाला ठेचकळून पडते. तिचे मडके फुटते. ती थकून घरी येते. पुन्हा सायंकाळी पाय ओढत ती सामुदायिक विहिरीकडे जाते व तोल जाऊन पाण्यात बुडते. टँकरवाला रात्रीचा घाईगडबडीने तीन खेपा करून पाणी विहिरीत सोडतो. दुसऱ्या दिवशी गावात दोन घरांमध्ये दोन ठिकाणी लग्ने असतात. पण सकाळी जेव्हा बायजा विहिरीत पडून मेल्याची खबर पोहोचते तेव्हा त्यांच्या अंगाचा तिळपापड होतो. दलितांसाठी दुसरी विहीर असताना ही इकडे का आली म्हणून गावकरी बायजेविषयी अनुद्गार काढतात. अपशब्द बोलतात. तिच्या प्रेतासाठी खड्डा खाणायला तिचे जातभाई हजर राहत नाहीत. कोण रोजगाराला तर कोण लग्नाकडे वळतो. संवेदनहीनांची ही वृत्ती पाहून भीमाच्या बोलण्यातून आपली जात ही 'कंडम' असल्याचा खेद व्यक्त होतो. तिच्या मृत्यूविषयी कोणालाच काही आत्मभाव नाही. 'माणूस आमचा धर्म अन् माणुसकी आमची जात' या तत्त्वाविरुद्ध वर्तन यात आले आहे. बायजाचा चटका लावणारा मृत्यू असाहाय्यतेची क्षुद्र जाणीव करणारा ठरतो. म्हातारपणाचे अभागी जीवन चटका लावणारे आहे.
४) चौथी आसरा : अमिना  'अमिना' या शीर्षक कथेत याच मुस्लीम स्त्रीची व्यथा तीव्रतर झाली आहे. अमिना ही धर्म परंपरेने बुरख्याआड राहणारी स्त्री आहे. तिला पाच-सहा कच्ची बच्ची आहेत. तिचा नवरा कादर हा गवंडी काम करायचा पण तो बाहेरख्यालीही करायचा. त्याची या प्रपंचाला कवडीमोल मदतही होत नाही. लेकराबाळांची काळजी वाहणारी ती माऊली असल्याने ती रोजगार हमीच्या कामावर जायची. एवढी मुलं ती एकटी पोसायची. कादरला मात्र तिचे शरीर हवे असायचे. पण सततच्या बाळंतपणानं तिच्या शरीराचा चोथा झालेला असतानाही तो तिच्या शरीराला झोंबायचा. 'साली चिप्पड हो गयी है. कुछ मजा नहीं आता' असे बोलायचा. त्याची ही वासना ‘बांधा' कथेतील हणमंताशी समांतर आहे. जणू त्याचाच भाऊ म्हणून तो या कथेत वावरतो. अमीनाला रोजगार हमीच्या कामावर ‘कुटुंब कल्याण' बाबत विचारणा होते. एकीकडे दारिद्र्य, उपासमार यांच्या कैचीत सापडलेली अमिना दुसरीकडे नवऱ्याची मारझोड सहन करून मनात नसतानाही शरीर त्याच्याच हवाली करते. दोन्हीकडून स्त्रीच्या वाट्यास येणारी कुचंबणा सोसणारी ही स्त्री आहे. जणू वणव्यात सापडलेली गाय म्हणावी एवढी ती अस्वस्थ करून जाते.

५) पाचवी आसरा : रखमा
 'मृगजळ' कथेमधील ही रखमा आपल्या समवयस्क 'भीमी' चे दुःख झेलणारी आहे. या दोघी समवयस्क आहेत. मात्र सततच्या काबाडकष्टाने भीमा लहान वयात झालेल्या लग्नामुळे पिचून गेली आहे. तर रखमा तालुक्याला हॉस्टेलमध्ये राहून डी. एड्. झालेली आहे. या गावात भीषण पाणीटंचाई आहे. या दोघीजणी भर उन्हात चंपकशेठच्या मळ्यातील पाण्याच्या विहिरीकडे जातात. साऱ्या गावात पाणीटंचाई असताना पाणीचोर चंपकशेठने ओढ्याच्या पात्रात विहीर खोदली आहे. कुंपण घालून मळा पिकविला आहे. दलितांची वाट बंद केली आहे. मात्र रखमा भर दुपारी जेव्हा विहिरीकडे वळते तेव्हा चंपकशेठचा दलपत हा वासनांध मुलगा तिला आपल्या कवळ्यात घ्यायला धजतो. ती त्यातून आपली सुटका करून घेते व याविरुद्ध आवाज उठवते. पैशाचा माज असणाऱ्या व गावाच्या जीवनमरणाशी खेळणाऱ्या शेठची विहीर गावासाठी खुली होते. भीमा ही सोशिक, असाहाय्य, दुबळी तर रखमा ही बंडखोर स्त्री आहे. मात्र दलित जातीतील स्त्रीची वेदना मात्र ठसठसती आहे.
६) सहावी आसरा : सारजा  दुष्काळाने श्रीमंतांचाही कणा मोडला तसाच सर्वसामान्यांचा कणा खिळखिळा केला. 'जगण्याची हमी' या कथेतील सारजाच्या वाट्यास येणारा दुःखाचा जो भोगवटा आहे तो सुन्न करणारा आहे. पैशावरून सतत मारझोड करणारा तिचा नवरा नुकताच आकस्मिकपणे पोलीस पाटील झाला आहे. एकतर 'ती' घरच्या गरिबीने त्रस्त आहे, 'तो' नाही. त्याला रोजगार हमीसारखी हलकीफुलकी कामं करणं म्हणजे त्याच्या पोलीस पाटील या पद-प्रतिष्ठेला बाधा ठरतं आहे. तो जेव्हा पोलीसपार्टीत असताना चैनीत जगायचा, दारू प्यायचा. तो तिला हे काम सोडून टाकण्यास सांगतो. मग पोराबाळाचं हाल होतील असं ती सांगते. त्याचा स्वाभिमान डिवचला जातो व तो मारहाण करतो. निरक्षर सारजा तो मार सहन करते. पण तिचं स्वगत मात्र चिंतनास भाग पाडते. ती म्हणते, "आपून सारीजणं काम करतो, बाप्पा गड्याइतकं कमावतो.... कितीतरी घरं पायलेत, जिथं बाप्पा गडी काम नाही करत बाईच करते. तिला गडीमानूस मारहाण करतो. कशाच्या जोरावर? कमावून आणतो तो खरा मरद गडी. इथं तर त्या बाईस्नी मर्द म्हनायला हवं."
७) सातवी आसरा : प्रज्ञा  कथासंग्रहातील शीर्षक ही कथेची नायिका. अतिशय व्यापक कालतत्त्वाचा परीघ या कथेला लाभलेला आहे (यावर कोल्हापूरच्या तरुणांनी एक एकांकिकाही निर्माण
केली होती), अस्वस्थ करणारा, मन विदीर्ण करणारा, भिडणारा अनुभव या कथेत आला आहे. कथेची नायिका प्रज्ञा आहे. तिची रमावहिनी रखरखत्या उन्हात प्रसववेदना सोसत आहे. तिचा तापही वाढत चालला आहे. सोजरमावशी या सुईणीने बादलीभर पाणी तिला हवे आहे असे सांगितले आहे. उन्हाच्या विखारी झळा वाढतच चालल्या आहेत. पाण्याच्या टँकरचा अजूनही पत्ता नाहीए. प्रज्ञा ही जात्याच हुशार आहे. म्हणून तर तिच्या बोलण्यामुळे निदान तिच्या वाडीपर्यंत कच्चा रस्ता तरी झालेला आहे. जातीमुळं गावकुसाबाहेरचं हे जिणं आहे. अखेर तिला टँकर दिसतो. ती रणरणत्या उन्हात पळत जाते. मात्र हब्राहिम ड्रायव्हर गेले कित्येक दिवस तिच्यावर नजर रोखून आहे. तो तिला कुस्करण्याची संधी शोधतो आहे. ती संधी त्याला आज चालून आली आहे. तिच्या अगतिकतेचा तो फायदा उठवतो. सर्वस्वी ही दहा मिनिटे घातचक्राची मिरासदारी ठरतात. अखेर ती टँकरमधून तांड्यावर येते, पाणी भरून घराकडे जाते. सोजरमावशीचा चेहरा वाचून ती तिच्या तोंडून हकिकत ऐकते. रमाचा ताप वाढून तिला वाताचे झटके येतात व ती जाते. आणि काही क्षणातच बाळही तापाने मरतो. एका प्रचंड कोलाहलाचे घनव्याकूळ दु:खद तळ आपल्यात सामावून घेणारी ही कथा आहे. प्रज्ञाचा अगतिक, असाहाय्य, आणि ममताळू कनवाळू चेहरा दाखविणारी कथा आहे. प्रज्ञा ही बुद्धीचे, कारुण्याचे रूप आहे.

॥६॥

 एकूणच श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या कथांमधील स्त्रीरूपाचा हा अल्पसा आढावा. सबंध भारतीय परंपरेतील स्त्रीचा समाजातील भूमिकेचा विशालं पट भांडणारी त्यांची कथा आहे. मनोविश्लेषणपर, पण एकाच एककाचे / अंगाचे चौफेर भान त्यांच्या कथेला आहे. चित्रदर्शी शब्दकळा व नाट्यात्मक अभिव्यक्तीने युक्त ही कथा आकस्मिक कलाटणी घेते. स्त्रीकडे पाहण्याच्या परंपरागत दृष्टिकोनाचा अव्हेर करून स्वतंत्र बाण्याच्या स्त्री व्यक्तिरेखा, स्त्रीविश्व उभे करणे हे देशमुख यांच्या कथेचे बलस्थान म्हणता येईल. अनेककेंद्री प्रगल्भ जाणिवांनी युक्त अशी ही मुक्त कथा स्त्रीरूपे रेखाटली आहेत. मांडणी स्वप्नवत भासली तरी समृद्ध अनुभवविश्व लाभले आहे.
 उदात्त आणि उन्नत, विचारशील, संस्कारशील ही स्त्री त्यांच्या कथेत आढळते. त्यांची कथा अनुभवदृष्ट्या आजच्या मराठी कथेच्या पुढे गेली आहे. श्री. देशमुख यांच्या कथेबाबत एक ठाम विधान करता येईल ते म्हणजे, आपल्या आमूलाग्र वैशिष्ट्यांनी श्री. देशमुख यांच्या कथेने मराठीचे कथादालन समृद्ध केले आहे. वेगळ्या अनुभवविश्वाची जाणीव ही मराठीत कथा विश्वाला पुढे नेणारी ठरली आहे.


 श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या कथेचे आगळे वैशिष्ट्य म्हणजे एखादी सामाजिक समस्या घेऊन त्याभोवती कथा गुंफणे. पण त्या कथांचा विषय हा गंभीर आणि एकूणच वाङ्मयव्यवहाराला महत्त्वाचा ठरावा असा असतो. आजवरच्या कथालेखनात त्यांनी पाणी टंचाईवर आधारलेल्या तहानले महाराष्ट्राच्या कथा (पाणी), खेळ व खेळाडूंच्या विश्वाचे दर्शन घडविणाऱ्या कथा (नंबर वन) आणि स्त्रीभ्रूणहत्या या सामाजिक प्रश्नावरील (सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी) अशा एकेका सामाजिक प्रश्नांवर विविध कथा रेखाटल्या आहेत. या सर्व विषयसूत्रांना 'थीम बेस्ड कथा' हा शब्दप्रयोग योजलेला आहे. 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' हा असाच एक स्त्रीभ्रूणहत्या हा विषय मांडणारा थीम बेस्ड कथासंग्रह आहे. संपूर्ण भारतीय परंपरेचा विचार केला असता कुटुंबव्यवस्थेमध्ये स्त्रीला हे दुय्यम स्थान दिलेले आढळते. त्यातही कुलदीपक (वंशाला दिवा) म्हणून 'मुलगाच हवा' हा अट्टाहास पोसला जातो. आणि त्याचे परिणामकारक रूप म्हणजे गर्भजल परीक्षा (चाचणी) घेऊन लिंगनिश्चिती केली जाते. आणि स्त्रीभ्रूण आढळून आले तर त्याची हत्या केली जाते. ही घटत्या बालिका दराची समस्या भविष्यातील मोठ्या अनर्थाची भयघंटा आहे. या प्रश्नामुळे व्यथित झाल्याने श्री. देशमुख यांनी एकाच विषयावर प्रथमपुरुषी निवेदनपद्धती तंत्रामधील वेगवेगळ्या आठ कथा लिहिल्या आहेत. या सामाजिक कुप्रथेला (मानसिकतेला) जाणीव जागृतीचा विचार दिला आहे. हे विचार फक्त कथेतून व्यक्त केले नाहीत तर स्वत: कोल्हापूरमध्ये जिल्हाधिकारी (२००९) असताना 'कन्या वाचवा अभियान' राबवले व त्याचे पडसाद तत्काळ उमटले. एक समाजपरिवर्तनाचा / जागृतीचा विचार कृतीतून लेखनात उतरवला व या दाहक प्रश्नावर तोडगा शोधला. आणि त्याच विचारांचा आविष्कार म्हणजे या संग्रहातील या कथा होत.
 वास्तवतेचा मुक्त ललित दस्तऐवज या कथेतून साकारला आहे. या प्रत्येक कथेतील स्त्रीला एक स्वत:चा चेहरा आहे. स्वत:ची अस्मिता जागी झालेली ही स्त्रीरूपे होत. या एकूण पर्यावरणाचा विचार या कथेतील मुख्य संलग्न असा वस्तुनिर्देश आहे. 'माधुरी व मधुबाला' ते 'सावित्रीच्या गर्भात...' पर्यंतच्या आठ कथांमधील स्त्रीचित्रण हे विवेकजागृतीचे नवे रूप असल्याचा निर्वाळा देता येतो. एका समंजस विचारसंकरातून या स्त्रिया बोलत आहेत. त्यांची विरुद्ध बाजूही पुरुषी खलत्वाला मानदंड देणारी नाही तरी एका समंजसाचे, दर्शनाचे भान आहे. तिला तिचा असा तिच्या विचारांचा, अस्मितेचा अर्थ उमगला आहे. मात्र एवढे खरे असले तरी ती कोणा एका पुरुषी मानसिकतेचा अंकुश माथ्यावर वागवणारी आहे. त्यास बळी पडणारी आहे. तिच्या मनाविरुद्ध ती भ्रूणहत्येसाठी तयार होत आहे. यात विविध स्तरातील स्त्रिया समाविष्ट आहेत. त्या निरक्षर आहेत असेही नाही तर चांगल्या
 सुशिक्षित गृहिणी आहेत, स्वत: स्वतंत्र नोकरी करणाऱ्या आहेत. स्वत:चे मनस्वी भावपण जपता जपता विशेषत्वाने आधुनिक जीवनशैलीने, यंत्रसुलभतेने त्या दुःखार्द अनुभूतीच्या बळी ठरतात.
 पहिल्या 'माधुरी व मधुबाला' या कथेतील सरिता ही एका ममताळू नायकाची पत्नी आहे. मित्राच्या सल्ल्याने तो लिंगनिदानाची चाचणी करून घेतो. पण या घटनेवर पडदा म्हणून की काय पुढे सरिता रक्तस्रावामुळे अपुऱ्या दिवसाची बाळंत होते. तेव्हा बेबी कमी वजनाची जन्मल्यामुळे तिला इनक्युबेटरमध्ये ठेवावी लागली आहे. मला तिला एकदा पाहू द्या अशी म्हणते. हा तिचा भ्रम बळावतो तेव्हा बालसंकुलातील एक गोंडस मुलगी तिचा पती दत्तक घेऊन येतो. सरिता तिचा स्वीकार करते. हा सामाजिकतेचा धागा अतूट वाटतो. 'इमोशनल अत्याचार'मधील आशा या शिक्षिकेचे निर्भय रूप प्रकटले आहे. ती स्वत: नोकरी करून पहिल्या जुळ्या (आवळ्याजवळ्या) मुलींची घडण करते आहे. परंतु एकेकाळी पती असूनही प्रियकरासारखा वागणारा तिचा मिलिंद आपल्या कोकणातील गावी जाऊन आल्यापासून जुन्या रुढीप्रियतेमुळे बिथरला आहे व त्यालाही मुलगाच हवा आहे. त्यावेळी जुळ्या इशा-निशा यांच्या भावनांचा वापर केला जातो. दुसऱ्यांदा गर्भार आशावर भावनिक अत्याचार केले जातात. त्यातूनही ती धीर धरते. परंतु इशा स्वाईन प्लूने जेव्हा गंभीर आजारी पडते तेव्हा या परिस्थितीचा फायदा घेऊन तिचा गर्भपात घडवला जातो. त्यानंतर ती 'तो भ्रूण नवऱ्यासमक्ष दाखवा' म्हणते. हा आपण खूनच केलाय असे नवऱ्याला वाटते. नेमके त्याचवेळी डॉक्टर, 'गर्भपात करताना दिसून आलं की, तुमच्या मिसेसच्या फॅलोपाईन ट्यूब्स फार कमजोर झाल्या आहेत. तुम्हाला यापुढे कदाचित, कदाचित मूल होऊ शकणार नाही' (पृ. ३९) या घटनेने मिलिंद हतबुद्ध होतो. तो मुलींना सोनपऱ्या मानू लागतो. आणि रात्री बेडरूममध्ये जेव्हा येतो तेव्हा डबल बेडच्या जागी दोन सिंगल बेड पाहून प्रश्नांकित होतो. तेव्हा ती म्हणते, 'माझ्यातली पत्नी परवा रात्रीच गर्भपात करताना संपली. आता केवळ मी इशा-निशाची आई आहे.' (पृ. ४८). समस्त पुरुषी मानसिकतेला जोरदार चपराक बसावी असे हे विधान स्त्रीच्या बदलत्या बंडखोर मानसिकतेचे, प्रगल्भ विचाराचे, धडाडीचे निशाण आहे. हे महत्त्वाचे होय.
  तपशीलांच्या रूपाने वेगळ्या आवर्तनाचा वेध घेणारी ही कथा नेमक्या प्रवाहाचे सैद्धान्तिक रूप दर्शविते. 'पोलिटिकल हेअर' मधील सुप्रिया ही विद्यार्थिनी असणारी मुलगी आजच्या वर्तमानाचे तेजस रूप आहे. आत्मनिर्भर आहे. तिच्या वडिलांना आपला राजकीय वारसा जपण्यासाठी वारसदार म्हणून मुलगाच हवा असतो. त्यामुळे आपल्या मम्मी (आई) वरील अत्याचार ती पाहते आणि शेवटी

धाडसाने पप्पांना खडे बोल सुनावते - ही बदलती भूमिका खचितच उचित आहे. संग्रहातील 'लंगडा बाळकृष्ण' ही खरी अस्वस्थ करणारी, घटना-प्रसंगांचा व्यापक उच्चतम परिणामबिंदू साधणारी कथा होय. नियतीतत्त्वाचे काही कालअंश या कथेच्या अंतरंगात आढळतात. या कथेतील 'आई' सोज्वळ माता आहे. नवऱ्याच्या कर्तबगारीवर (?) खूश होऊन ती वावरते आहे. तिला कशाची ददात नाही. बाळंतपणानंतर ती नव्या घरात राहायला येते व त्याच दिवशी लहान बाळाला घेऊन नवऱ्यास आश्चर्यमुग्ध करावे म्हणून त्याच्या दवाखान्यात जाते. पण तिथे वेगळेच नियतीनाट्य घडते. नवऱ्याने ज्या स्त्री भ्रूणांची हत्या केल्यानंतर ते भ्रूण खाण्यासाठी दोन हॉऊंड जातीची कुत्री ठेवलेली होती ती कुत्रीच या निरापराध नवजात बाळास (डॉक्टरच्याच) धरतात. त्याच्या पायाचा लचकाच तोडतात. या प्रसंगाने सुखदा (नवऱ्याने ठेवलेले एकांतातील नाव) हादरून जाते. कानकोंडी होते. एका सुखासीन मातेचे विदीर्ण रूप या कथेत साधले आहे. 'जे परा ते येई घरा' याची प्रस्तावना ठरणारी ही कथा दुःखाचे, भयकारी रूपाचे दर्शन घडविते.
 'ऑपरेशन जिनोसाईड' सारख्या कथेत अंतर्विरोधी स्त्री मानसिकतेचे चित्रण आले आहे. यात गर्भपात करण्यासाठी आलेल्या स्त्रिया आहेत. तोळामासा प्रकृती असूनही गर्भधारणा सोसणाऱ्या नि संसारात ससेहोलपट झालेल्या स्त्रियांचे विश्व उभारले आहे. यामधील एका स्त्रीचा भ्रूण मुलाचा निघतो. ते समजताच ती स्त्री बेभान होते. मात्र दुसऱ्या क्षणी सारवासारव करून ती खूश राहते. ते माझी कूस स्त्रीलाच नाहीतर पुरुषालासुद्धा उपजवू शकते या आत्मगंडाने ती सुखावते. याच कथेत स्त्रीभ्रूणहत्येसाठी आपल्या नवऱ्यांना साहाय्य करणाऱ्या महिला डॉक्टर सुद्धा येतात. या घटनेचा निषेध म्हणून खबरीलालची बायको - नंदा ही त्या स्त्री डॉक्टरांचा मोर्चात खरपूस समाचार घेते नि भावनेच्या भरात, ‘त्या डॉक्टर निपुत्रिक राहतील - वांझ राहतील - वांझ' हा शाप जाहिररीत्या देते. हा मात्र स्त्रीत्वाचा अपमान वाटतो. तर दुसरी ज्योती मराठे ही तडफदार तहसीलदार स्त्रीसुद्धा या मोहिमेत सहभागी होते.
 या घटत्या मुलींच्या संख्येने भावी समाजावर कोणते आघात होतील, त्या भयावह परिस्थितीचे चित्रण या कथांमध्ये आले आहे. 'केस स्टडीज' मधील कांद्या-पोह्यांची सेंचुरी करणाऱ्या नीरास एकूण ९९ स्थळांनी नाकारले आहे. मात्र १०० व्या वेळी मात्र मनाविरुद्ध मुलगा असूनही ती त्याला पसंत करते व बापाला 'माझं त्या माणसाशी लग्न होत नाहीय तर माझ्यावर बलात्कार करायला तुम्ही लग्नाच्या नावावर परवानगी देताय' अस सुनावते. तर १९९१, २००१ आणि २०११ या जनगणणावर्षातील घटत्या बालिकादराचे चित्र अधोरेखित केले गेले

आहे. या संग्रहातील शेवटची ‘सावित्रीच्या गर्भात...' ही शीर्षककथेतील त्या मुलीचे आत्मवृत्त मात्र डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे आहे. सुंदर मुलगी म्हणजे बापाला धोंड असते. ज्या मुली नको असतात त्यांना 'नकोशी' हे नाव दिले जाते. हे आपल्या समाजाचे कोणते प्रगत लक्षण म्हणावयाचे? कोणती स्त्रीदक्षिण्याची भूमिका म्हणावयाची? अशा अनेक प्रश्नांनी हा संग्रह स्त्रीचित्रण करतो.
 समर्थ आविष्कारतंत्रासह 'लंगडा बाळकृष्ण', 'ऑपरेशन जिनोसाईट' व 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' या, कथासंग्रहातील या कथा स्त्रीचित्रणाचे व्यापकविश्व उभारतात तसेच याच संग्रहातील परिशिष्टांचे तपशील एका भीषण सामाजिक समस्येचा दस्तऐवज ठरावेत इतके महत्त्वाचे आहेत. एका कृतिप्रवण अधिकाऱ्याने ज्या सामाजिक प्रश्नांची सोडवणूक ज्या पोटतिडिकेने केली आहे त्या सर्व प्रयत्नांचा आविष्कार म्हणजे या कथा होत. मराठी कथापरंपरेत वेगळ्या स्त्री चित्रणाचे आगळे परिमाण साधणारा हा कथासंग्रह आहे. तो घटत्या बालिका दराचे सुन्न चित्र रेखाटणारा आहे.

ग्रामीण वर्तमानाच्या कथा


ना. धों. महानोर

 अर्वाचीन मराठी साहित्यात गेल्या शंभर सव्वाशे वर्षांच्या इतिहासावर नवनवे विषय, माणसामाणसांचे संबंध, प्रेम, दुःख, राष्ट्रीय भावनेने, ध्येयवादाने आलेलं साहित्य, दु:खाचा आगडोंब आणि सुंदर असं हिरवं संपन्न जग खूप आलं. कथा, कविता, कादंबरी, ललित लेखन, नाटक आणि त्याची समीक्षा खूप खूप मराठी साहित्य व शाखा समाजासाठी देऊन गेली. दर एक पंचवीस वर्षांनी बदल नवं होत जाणारं साहित्य, परिवर्तन - होणारी शहरांकडून शिक्षणानं थेट खेड्याकडे आलं. जे जीवन खेडी - शेतीवाडी, दुष्काळ, पाणी आणि तिथल्या माणसांची व्यवस्थेची होणारी फरफट भक्कम व चांगल्या कसदार वाणानं उभी राहिली. अगदी वाड्यावस्ती, खेड्यातला, त्याच्या भवतालचा लेखक त्या जीवनाचं वास्तव साहित्यातून अधोरेखित करीत राहिला. मराठी साहित्यातील सगळ्यातच वाङ्मय हे ठळकपणानं व असामान्य प्रतिभेनं उभं राहिलं. या लेखकांच्या साहित्यानं खेड्यांसह शहरातील लेखकसुद्धा चकित झाला. तो ते वाचकांना आणि उघड्या डोळ्यांनी ते जग पाहतांना प्रसन्न झाला. खूप दुःखीही झाला. आपल्याला या कृषी केंद्रित खेड्यांच्या विशेषत: दुःखाला काही आधार देता येईल का? सामाजिक संस्थामार्फत शासनाकडून काही प्रमाणात दुःखाचं सावट निपटता येईल का? म्हणून कात टाकून उभाही ठाकला हे मी पाहतो आहे. र. वा. दिघे पाणकळा ‘पड रे पाण्या', व्यंकटेश माडगूळकरांचं बनगरवाडी माणदेशी माणसं व एकूण साहित्य, शंकर पाटलांचं टारफुला आणि मनाला उद्ध्वस्त करणाऱ्या भुजंग - वेणा सारख्या कथा, उद्धव शेळके यांच्या धग - शिळात कथा कादंबरी, शंकरराव खरात यांचे लेखन अशी पंचवीस तीस तरी नावं घेता येतील, त्यांच्या ग्रामीण जीवनाच्या थेट तळाला हात घालून लेखनातून समाजासमोर उभं केले. विशेषत: या तीस पस्तीस वर्षांच्या काळात हे अधिक तीव्रतेनं, डोळसपणानं नव्या लेखनामधून दिसून येते. प्रत्यक्ष त्या जीवनाचा सांधा त्याच्या सुख दु:खाचा पीळ यात

एकरूप असलेल्या ज्या लेखकांनी समर्थपणानं लेखन केलं, करताहेत त्यातलं एक नाव म्हणजे लक्ष्मीकांत देशमुख. मराठवाड्यातले असल्यानं इथल्या मागासलेल्या दुर्बल प्रदेशातलं खेड्याचं दुःख त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं भोगलं हे जसं खरं आहे तसंच प्रशासकीय सेवेत प्रांताधिकारी - जिल्हाधिकारी अशा पदांवर काम करताना अधिकाधिक जवळून पाहिलं. त्यांच्या सुखदुःखाचे वाटेकरी होता आलं तसे निर्णय शासनात घ्यायला आपली एक ओंजळ टाकली. प्रत्यक्ष सहभाग दिला. लेखनातून हे अस्वस्थ करणारं वास्तव त्यांनी आपल्या लेखनाला, मराठीला दिलं. त्यातले बारीकसारीक संदर्भ, भेदक वास्तवाची नग्नता, नीति-अनीति, पापपुण्य, भ्रष्टाचार या सगळ्यांना तिलांजली देऊन बेधडक शहाजोगपणानं चाललेलं राजकारण हे सगळं लक्ष्मीकांत यांच्या लेखनाचं शक्तिस्थान आहे. खेडी, तिथला समाज, ज्यावर संबंध राज्य देश उभा आहे ती शेतीवाडी, तिथली विकल माणसं देशोधडीला लागली. शहरांकडे घाणीत राहू लागली. हे वास्तव चीड आणणारं आहे. राजकीय सत्ता व त्यासाठीची साठेमारी करणारे बहुसंख्य नेते वगैरे कुठे आहेत? काय करताहेत? श्रीमंत धनदांडग्यांचं, हे राजकारण्याचं, हे खेडी - शेतीवाडी - पाणी याकडे दुर्बिणीतून पाहाणे असं पार पथ्थराच्या काळजाचं होऊ घातलं आहे असं या 'पाणी' कथा वाचताना आपल्या लक्षात येतं. कोरडीची बहुसंख्य बंजर जमीन कधीच शेतकऱ्यांना, त्यांच्या जीवनाला आधार देऊ शकत नाही. थोडंतरी शेतीला पाणी, पिण्याचं पाणी असलं तरच खेडी जगतील असं खुद्द शिवाजी महाराजांनी सुपा परगण्यात दुष्काळात सांगितलेलं होतं, व जास्तीत जास्त पैसा 'मोटस्थळ' व 'पाटस्थळ' पाणी निर्माण करण्यासाठीच निर्णय घेतले. नुसते घेतले नाही तर त्याला अग्रक्रम दिला हा इतिहास आहे तीच गोष्ट १९८३ ला ठोसपणानं या दैन्यदारिद्र्याचं वर्णन करून ठोस नवी चांगली उपाय योजना शासनाला सांगून 'शेतकऱ्याचा आसूड' महात्मा जोतिबा फुले यांनी अथक प्रयत्न केले. त्यासाठी खूप काही सोसले. त्यांचं आम्ही राज्यकर्ते त्या भोवती फिरपाट फक्त कारणपरत्वे नाव घेतो. सोयीस्कर प्रत्यक्ष करतो किती याचा हिशोब हवा. कमाल जमीन धारणेचा कायदा पहिल्यांदा १९५८ - ६० ला आला. दुसरा १९७५ ला आला. हा चांगला निर्णय मोठ्या जमीनदारांची जमीन वाचवताना, अनेक खोट्या करताना भ्रष्टाचार व लबाडी शिगेला पोहोचली. बड्यांची जमीन वाचवण्यासाठी जागाबदल, सर्वेबदल. मग समोरचा सामान्य शेतकरी, कष्टकरी, लहान शेतकरी, दलित लढवय्या फौजी आसला तरी पुढारी व शासकीय अधिकारी त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून अन्याय करतात, हे मी स्वत: या कमाल धारणेच्या टिब्यनलमध्ये समितीचा अध्यक्ष होतो तेव्हा उघड्या डोळ्यांनी पाहिले. खूप झगडलोही. ही स्वातंत्र्यातील हुकूमशाही निझामी व सरळ सरळ अन्याय्य. 'लढवय्या' मध्ये महाद कांबळेच्या

१०६ ० अन्वयार्थ

दुःखाच्या आणि भावनेने आपल्याला छिन्न भिन्न करते. भारत सरकारच्या, विशेष म्हणजे 'महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना दुष्काळ - शेती - पाणी - फलोद्यान - पर्यावरण - पाटबंधारे - लहान पाझर तलाव - शेततळी ह्यासाठी भक्कम निर्णय व पैसा उभा करून दिला पण ती कालबह्य व त्या त्या गरजांसाठी नीट उभी राहिलेली नाही. खूप दिलंय व शासकीय लालफितीच्या व क्रूरद्याच्या बंधनात अजूनहि; आहे म्हणून मरतांना पाणी द्यायचं - जिवंत असताना नाही असं योजनांचं चाललेले आहे. विकास आणि प्रगती कशी होऊ शकते. ते तुम्ही बदलवू शकता. रोजगार हमीच्या अतिशय चांगल्या निर्णयाचा गोंधळ झाला पण रेंगाळत व भ्रष्टाचारानं पार वेढलेल्या व्यवस्थेनं या योजनेचा बोजवारा उडविला. इथे रोज आशाळभूत नजरेनं उभा असलेला दीनदुबळा समाज त्याची कशी परवड झाली, होत आहे, चांगल्या योजनेचा बट्याबोळ करताना कोण कोण महाभाग त्याचे सारथी आहेत हे 'भूकबळी' सारख्या कथेतून वाचकांना अवस्थ करीत चीड आणतं. “पण आम्ही एवढे बथ्थड निळवलेले आहोत की आमचा कोणही बाल वाकडा करू शकत नाही." अशी यातली मुजोर व्यवस्था 'एक गाव एक पाणवठा' हे अत्यंत कळकळीनं असं सामाजिक ध्येयवादानं आयुष्यभर त्यात एकरूप असलेले समाज सेवक श्री. बाबा आढाव. या पुस्तकाला पस्तीसपेक्षा अधिक वर्षे झाली. त्यांची वाहवा करतात पण प्रत्यक्ष जातीजातीत फूट पाडून दलित यांना पाणवठ्यापासून तर सर्वच महत्त्वाच्या गोष्टींपासून सुदूर ठेवणारी ई. नीति म्हणजे 'कंडम' कथा. दुष्काळात पाण्याची विहीर ग्रहण करताना, संपूर्ण खेडं पाण्याविना मरताना आणि श्रीमंतांच्या विहिरीला कुठला न्याय? वरपर्यंत नाते-गोते संबंध, राजकीय संबंध व निवडणुकीच्या मतांसाठी लाचार असलेले पक्षापक्षाचे नेते राज्यकर्ते. त्यांना हात लावायचा नाही. मग उरतात ते सामान्य, विकल. त्याचं सत्यसुद्धा कोणी थोडंही ऐकायला तयार नाहीत. त्यातही धनसंपत्ती, राजकारण व श्रीमंताच्या मूर्ख मुलाच्या मनातील कामवासना. अगदी नग्न असं वास्तव. याला थोपविणं उलट त्याच्या दारी उष्टावळ्या वेचणारे आहेत. दुष्काळानिमित्त मोठ्या नेत्यानं, आमदार मंत्र्यांनी मुंबईच्या 'पत्रकारांचा दौरा मी वाचला. आपणही वाचा. मी तर हे विधान परिषदेत बारा वर्षे आमदार असताना अधिक जवळून महाराष्ट्रात पाहिलेलं आहे. 'प्रवीण' सारखा पत्रकार, त्याची अस्वस्थता, मेंदूला सुन्न करणारे आघात मी अनेक जागरूक चांगल्या पत्रकारांचे, काही संपादकांचे पाहिलेले आहे. त्यांची चीड, वज्रमूठ लेखणी काही तरी नक्कीच बदलवू शकते ते कुठे बांधले गेलेत. त्यांच्या हाती बेड्या आहेत. ते झोकून देऊन कसं जगता येईल हा सामान्य गरीब पत्रकारितेचा प्रश्न आहे ते मी पाहिलेलं आहे. असं जखडबंड करणाऱ्या व्यवस्थेचं वर्तुळ एक-दुसऱ्यात गुंतलेला या कथांमधून लक्ष्मीकांत यांनी आत्मीय भावनेनं व घट्टलेखणीनं उभं केलेलं आहे. 'अलनूर' सारखी

अन्वयार्थ । १०७

कथा कितीतरी प्रश्नांना पुन्हा उभी करून जातीपाती राजकारण, केवळ पैसा म्हणजे पैसा, कशा विकृतपणानं चाललेलं आहे हे सांगते. 'मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाणं', अशी म्हण आहे. 'जिवंत माणसांना मरणदारी उभं करून लोणी खाणं' असं इथे आहे. राजकीय पक्षापक्षातल्या किती पुरोगामी - प्रतिगामी - परिवर्तनवादी अशा घट्ट भिंती एकसंध हा देश अशा कण्याकण्यांनी चिरून जातो आहे आणि म्हणूनच विकल होतो आहे याची कोणालाही खंत नाही. विकासाची खरी किल्ली व त्याला पुढे छेदून जाणं हे राज्यकर्त्याच्या पेक्षाही दीर्घकाळ त्या सेवेत असणाऱ्या निष्ठांवत चांगल्या अधिकाऱ्यांच्या हाती आहे असं माझं मत आहे. जिल्हाधिकारी भावे व त्यासारखे अनेक अधिकारी तालुक्यापासून मंत्रालयापर्यंत मी जवळून पाहिले. त्यांचं कथेतल्यासारखं झाल्यावर किंवा त्यापेक्षाही भयानक शिक्षा त्यांना दिलेली मी पाहिली. विकास कामं सोडाच पण ही दु:खाची कुरतड पार भेदून टाकणारी खेडी, तिथला माणूस हा निष्पर्ण झाडासारखा उभा आहे. असं हे सत्य व वास्तव. अमीनचं दुःख, प्रज्ञाचं दुःख हे हृदयाला तडे पाडणारं आहे. आणि ते वाढतच चाललेलं. अमीनाची मुलं, प्रज्ञाची वहिनीसाठीची धडपड व अतिशय बोंगळ सोसणं हा कुठला समाज व स्वातंत्र्य? 'दुष्काळ आणि पाणी' तिथली शेतीवाडी आणि समाज पायगुणामुळे असं म्हटलं तरी खेड्यात अजूनहि भूगर्भ पाणी, वनस्पती आणि खूप काही चांगलं विज्ञान अडाणी म्हणवणाऱ्या खेड्यातल्या माणसांजवळ आहे. हे मीही पाहतो आहे. कंडममध्ये खडकातून निर्माण झालेलं पाणी हे शास्त्र थोडंबहुत नीट माहीत असलेले आहे. पाण्याचं नवं तंत्रज्ञान भूगर्भ यासह खेड्यातल्या जी थोडी अशी माणसं आहेत त्यांना घेऊन नक्कीच काही करता येईल, पण ते सातत्यानं होत नाही आणि पाणीप्रश्न सुटत नाही असं चक्र आहे.
 लक्ष्मीकांत देशमुख यांच्या या कथासंग्रहात, शेती, शेतकरी, पाणी टंचाई, गावगाडा आणि शासकीय यंत्रणेसंबंधी परवडीच्या कथा आहेत. आज उजाड होत चाललेली खेडी आणि तिथलं माणसांचं जिकिरीचं जगणं लेखकानं विविध कथांमधून समर्थपणे मांडलेलं आहे. आज पाणी प्रश्नानं सगळ्यांची झोप उडविलेली आहे. अशा वेळी श्रीमंत धनदांडग्यांनी गरिबांचे पाणी पळवणे, फळबाग योजनेचा मलिदा काहींच्याच पदरी पडणे, रोजगार हमी योजनेत घाम गाळणाऱ्या स्त्री जातीची होणारी घुसमट, भूकबळी झालेल्या ठकूबाईंना कागदपत्राच्या आधारे आजारी ठरविणे - सर्वच मार्गांनी पैसा कमवण्याची, सर्व क्षेत्रातल्या बहुसंख्य माणसांना नशा. दोन घोट पाण्यासाठी म्हातारीला जीव गमवावा लागणे; पाण्यापेक्षाही गावाच्या आरोग्याची परवड होणे, आणि सर्वच क्षेत्रातल्या ध्येयवाद्याची आज होणारी गोची, हे एक समान कथासूत्र लेखक विविध कथावृत्त सांगतो आहे.

१०८ अन्वयार्थ

 एका अर्थाने ही आजच्या ग्रामीण भागाच्या वर्तमानाची कथा आहे. सर्वच बिघडत चाललेल्या परिस्थितीमध्येही काही ध्येयाची हिरवळी बेटंही आहेत. आणि हेच समाजजीवनाला जिवंत ठेवण्याचे काम करीत असतात. हे जीवनमूल्य हे लक्ष्मीकांत देशमुखांच्या कथा संग्रहाचे वेगळेपण आहे.

 पाणी पाणी पाणी आणि पाणी पाणी पाणी
 पाण्याविना दाही दिशा आम्ही अनवाणी.
















अन्वयार्थ । १०९

पाण्यावाचून दाही दिशा - सुन्न करणारा अनुभव
शंकर सारडा

 'उदक' ('पाणी! पाणी!' या नावाने दुसरी आवृत्ती) हा श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांचा चौदा कथांचा संग्रह. उपजिल्हाधिकारी म्हणून शासनाचा विपुल अनुभव त्यांच्या गाठीशी जमा आहे. त्या अनुभवांची सामग्री त्यांच्या लेखनाला वेगवेगळे विषय पुरवते. एवढेच नव्हे, तर त्यांच्या आशयद्रव्याची विश्वासार्हता वाढवते.
  'उदक' या नव्या पुस्तकातील बहुतेक कथांमध्येही शासनातील वेगवेगळ्या खात्यांमधील आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या मानसिकतेमधील भिन्नतेची अनेकानेक उदाहरणे दिसतात. शासनयंत्रणेचे काम कसे चालते, मनात आणले तर एखाद्या कामात कोणीही कसे कोलदांडे घालू शकते, मूळ धोरणाचे धिंडवडे काढण्यात काही अधिकारी आपली बुद्धी व तर्कशक्ती कशी वापरतात, सरकारी कागदपत्रं कशी हवी तशी रंगवली जातात, सत्याला असत्य आणि असत्याला सत्य ठरविण्याची किमया त्यांना कशी साध्य असते, भ्रष्टाचार हाच शासनयंत्रणेचा परवलीचा शब्द म्हणून कसा काम करतो- याबद्दलचे या कथांमधून येणारे तपशील हे या कथांना एक सामाजिक व नैतिक परिमाण देऊन त्यांची आवाहकता वाढतात.
 या संग्रहातील बहुतेक कथा या दुष्काळी भागातल्या पाण्याच्या समस्येशी निगडित आहेत. या दृष्टीने 'उदक' हे संग्रहाचे शीर्षकही अर्थपूर्ण आहे. 'भूकबळी', 'खडकातील पाणी' या दोन कथा खास उल्लेख कराव्यात अशा आहेत. भूक वास्तवाचे वास्तव दर्शन घडवते, तर खडकात पाणी परिकथासदृश सज्जनांवर होणाऱ्या दैवी कृपेचे. हे पाणी 'उदक' या कथासंग्रहात वेगवेगळ्या रूपांत भेटते.
 उसाला दुसरी पाळी न देता आलेल्या जळलेल्या उसाच्या रूपात आणि त्यामुळे भग्न झालेल्या स्वावलंबी जीवनाच्या स्वप्नांच्या चुराड्यात.....
 नळपाणीपुरवठा योजनेची संबंधितांनी वाट लावल्यावर पायऱ्यांच्या विहिरीतले








११० अन्वयार्थ

पाणी पिऊन नारूने ग्रस्त झालेल्या गावकऱ्यांच्या रूपात ...... शिवाराला घातलेल्या कुंपणामुळे चोरून पाणी न्यायला आलेल्या रखमाने तरुण दलपतच्या विळख्यातून सुटून पळून जाताना टोचलेल्या काटेरी तारेने वाहू लागलेल्या रक्ताच्या रूपात....
 घरात चार बादल्या पाणी मिळणार, म्हणून टँकरपुढे लागलेल्या अगतिक बायांच्या रांगेच्या रूपात....

 थोडं पाणी भरून घ्यावं म्हणून अंधारात रात्री विहीरीवर गेलेल्या आणि तिच्यात पडून मेलेल्या म्हाताऱ्या बायजाच्या फुगून आलेल्या कलेवराच्या रूपात....
 नळ योजनेच्या टेंडरच्या देवाण घेवाणीच्या व्यवहाराच्या हस्तांतराच्या रूपात...
 रोजगार हमीवर उन्हातान्हात राबणाऱ्या हताश स्त्री-पुरुषांच्या गळणाऱ्या घामाच्या रूपात...
 मातीमोलाने विकल्या जाणाऱ्या गाईगुरांच्या गर्दीच्या रूपात आणि परदेशी निर्यात होणाऱ्या मांसाच्या फायदेशीर नोटांच्या चळतीच्या रूपात....!
पाणीचोरांची श्रीमंती
 ऊस तोडणीसाठी कुटुंबकबिला सोडून सहा-सहा महिने रोज नव्या गावी जायचं आणि उसाच्या ट्रकबरोबर परत यायचं, अशा दिनक्रमाला कंटाळलेल्या महादूनं कर्ज काढून स्वत:च्या बारा एकर कोरडवाहू शेतात ऊस लावला. उसाला पाहिलं पाणी धरणातून मिळालं. पुढं पाऊस नीट झाला नाही आणि पाटबंधारे खात्याकडून दुसऱ्या पाळीचे पाणी मिळालेच नाही. सगळा ऊस वाळून गेला. पाणीपट्टीसाठी काढलेले बँकेचे कर्ज अंगावर पडले. एवढेच नव्हे, तर पोटासाठी पुन्हा उसतोडणीचा कामगार बनणे भाग पडले. जेथे ऊस पाहून त्याला वाटते की, या शेताचा मालक हा पाणीचोर आहे; त्याने आमच्या वाटणीचे पाणी चोरून आपले शेत फुलवले आहे, त्या शेताच्या मालकाच्या घरचा चहा पिणेही त्याला घृणास्पद वाटते.
 'लढवय्या' या कथेतला नायकही महादेव कांबळे हा आहे, पण तो आहे सैन्यातून निवृत्त होऊन आलेला जवान. रिटायर्ड, वीरचक्रधारक माजी सैनिक म्हणून त्याला सरपंच दाजीबा पाटलाची अतिरिक्त सीलिंगची पाच एकर जमीन मिळते. तिच्यात दोन एकरांवर आंबा आणि डाळिंबाची झाडे तो लावतो. दोन फलल्गावरून पाझर तलावातून पाणी आणून फळबाग जगवतो. दाजीबा पाटील आपली जमीन गेली, त्याबद्दल अत्यंत चिडलेला असतो. तो नाना लटपटी करून पाझर तलावाच्या नव्या अलाईनमेंटमध्ये नेमकी अशी व्यवस्था करतो की, मूळ नकाशाप्रमाणे दाजीबाची जमीन बुडणार असते, आपण लावलेली फळझाडे उत्पन्न

अन्वयार्थ १११

देण्यापूर्वीच पाण्यात जाणार, आपल्या उत्पन्नाचे साधन हिरावून घेतले जाणार, म्हणून हा जवान व्यथित होतो. तो तहसीलदाराला भेटतो. तो तहसीलदार, डेप्युटी इंजिनिअरने मूळ प्लॅनमध्ये केलेल्या बदलीची नोंद घेतो. सरपंच दाजीबाला दम भरतो. महादेववर बहिष्कार टाकणाऱ्या गावकऱ्यांना समजावतो. महादेव कलेक्टरना भेटतो. कलेक्टरही माजी मेजर असतात. ते महादेववरचा अन्याय दूर करतात. पण दाजीबा हायकोर्टकडून स्टे मिळवतो. आलेला मेजरचा आदेश फिरवतो. महादेव सुन्न होतो.
 कंडम' ही कथा एकीकडे पाण्याच्या टंचाईने गावात होणारे वाद प्रकट करते; दुसरीकडे एका दलित म्हातारीच्या मृत्यूने उडालेला गोंधळ स्पष्ट करते.
 'भूकबळी' झाल्याची बातमी आल्यावर शासनयंत्रणा कशी खडबडून जागी होते, याची एक झलक 'भूकबळी' आणि 'हमी? कसली हमी?' या दोन कथांमधून दाखवण्यात येते.
 वृत्तपत्रात आलेली बातमी वाचून कलेक्टर झोपेत असलेल्या तहसीलदार शिंदेना सकाळीच फोन करतात आणि ती बातमी माहीत नसलेल्या शिंद्यांची झोप खाड्कन उडते. 'दुष्काळाचे अर्थशास्त्र आणि व्यावहारिक उपाययोजना' यावर प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळवण्याची उमेद धरणारे भावनाप्रधान शिंदे मग संबंधितांकडून माहिती मिळवतात. काळगाव दिघीची एक महिला ठकूबाई हिचा खरोखर भुकेने बळी पडलेला असतो. जवळ धान्याची कूपन्स व पैसे असूनही यामागची नोकरशाहीची नाठाळ आणि व्यवहारशून्य चालही अशी कागदोपत्री भरभक्कम असते की, तिच्यातून कोणावर ठपका ठेवणे शक्य होऊ नये. पत्रकार विसपुते या भूकबळीची बातमी प्रथम देतो. संबंधित ठकूबाईच्या भावाला, रघूला, साहेबांपुढे उभे करतो. कामासाठी दूरवर जावे लागते. रेशनचे दुकान लग्नामुळे बंद असते. खायला काही न मिळाल्याने ठकूबाई रस्त्यातच दम तोडते. रोजगार हमी कामाची माहिती तपासण्याची यंत्रणा नसल्याने गावात काम चालू असूनही राघूला परगावी पाठवण्यात येते. तहसीलदार शिंदे या भूकबळीला एक शासकीय अधिकारी म्हणून आपण जबाबदार आहोत, असे मानतात. त्यांच्या ऑफिसातले जुने कर्मचारी भालेराव त्यांना सांगतात, “आपण नुकतेच या खात्यात आला आहात सर! हा पहिलाच क्रायसिसचा प्रसंग आहे. पण इथं टफ झालंच पाहिजे. यानंतर कुणापुढे ठकूबाईंचा भूकबळी झाला, असं म्हणू नका. ती अतिश्रम - आजारानं मेली, असाच रिपोर्ट आपण द्यायचा. मी तो तयार करतो व तो सारे जण मान्य करतील. कोणीही आक्षेप घेणार नाही, याची मी गॅरंटी देतो."
 तसा तो रिपोर्ट तयार होतो, पण शिंद्यांना तो केवळ शब्दांचा खेळ वाटतो.
११२ अन्वयार्थ

त्यांच्या मनातला क्षोभ धुमसतच राहतो.
योजना होतात, पण ....
 खेड्यात योजना होतात, पैसा खर्च होतो; पण त्यांचा अपेक्षित फायदा मात्र गावकऱ्यांना होत नाही.
 इराची वाडी येथील विहिरीतील पाणी पिऊन गावातल्या प्रत्येक घरातला कोणी ना कोणी नारू होऊन आजारी पडलेला असे. जगदीश हा नव्याने आयएएस झालेला त्या गावाला भेट देऊन विहिरीची पाहणी करतो. केरवाडीतून पाणी आणता यावे म्हणून त्या दोन गावांसाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करतो. घरोघर स्वच्छ पाणी नळाने येऊ लागते. आपण एका गावाची समस्या समर्थपणे सोडवली, या आनंदात जगदीश असतो.
 पंधरा वर्षांनी त्याच भागात कलेक्टर म्हणून तो येतो आणि इराची वाडीचा सरपंच त्याला भेटण्यासाठी चिठ्ठी पाठवतो. त्याच्या पूर्वस्मृती जाग्या होतात. इराची वाडीमधील लोकांना अजूनही त्या विहिरीचे पाणीच प्यावे लागते, असे तो सरपंच सांगतो. तेव्हा जगदीशला आश्चर्य वाटते.
 केरगावच्या पश्चिमेकडील विहिरीतून या दोन्ही गावच्या नळ योजनेला पाणीपुरवठा होत असतो. दुष्काळात विहिरीचे पाणीही कमी झाले. केरवाडीलाही ते पुरेना, तेव्हा केरवाडीच्या सरपंचाने विहिरीपासून इराची वाडीला जाणारी पाईपलाइन तोडून टाकली. पाईप गायब केले. त्या पाटलाने कलेक्टरना मग जो सवाल केला, तो त्यांना निरुत्तर करणारा होता.
 'बांधा' मध्ये नवऱ्याकडून उपेक्षा होऊ लागलेल्या स्त्रीचे आपल्या कष्टांनी स्वावलंबी होण्याचे एक समर्पक तत्त्वज्ञान प्रभावीपणे मांडले जाते.
 दुष्काळात गाईगुरांची दैना होते. पाणी नाही, चारा नाही. शेतकरी मग मातीमोलाने ते विकतात. कत्तलखान्यात त्यांना मारून, मांस विकून भरपूर पैसा मिळवतात. अलनूर एक्सपोर्ट कंपनी बीफ व फ्रोझन फूड अरबस्तानात पाठवते. गुरांसाठी उत्तम छावण्या चालवून दुष्काळात गाईगुरांना कत्तलखान्यात पाठवण्याची शेतकऱ्यांवर वेळ येऊ नये, अशी व्यवस्था सेवाभावी संस्थेतर्फे भिडेगुरुजी करतात. त्यामळे या कंपनीचा धंदा बसतो आणि मग एका आजारी बैलाच्या बातमीचा बाऊ करून त्या छावण्यांवर टीका केली जाते. गाईगुरे कसायांच्या हाती जातात, असा किस्सा 'दास्ताँ - ए - अलनूर कंपनी' मध्ये वाचायला मिळतो.
 संपन्न कृष्णाकाठची सुनंदा माणदेशच्या दुष्काळी भागात विवाहानंतर पदार्पण करते आणि पावसाची सर येते. सुनेच्या पायगुणाची तारीफ होते. तिच्याच प्रयत्नाने

अन्वयार्थ ११३

तळ्याखालून असलेल्या कातळातून दीडशे फुटांवर पाणी लागते आणि साऱ्या गावाला जणू नवे जीवन मिळते. 'कृष्णामाई, मी माहेरी येईन तेव्हा खणानारळाची ओटी भरेन. लग्नानंतर तुला पारखी झालेय असे वाटले होते, पण इथं खडकातही तुझी कृपा मला न्हाऊ घालतेय. तू माऊली आहेस माझी!' असे भक्तिभावाने सुनंदा म्हणते. (खडकात पाणी)
 लक्ष्मीकांत देशमुख यांच्या या कथांमधील वास्तवतेमुळे पाणी प्रश्नांची वेगवेगळी अंगोपांगे समोर येतात. शासकीय अधिकाऱ्यांच्या व नोकरशाहीच्या संमिश्र कार्यपद्धतीमुळे आणि राजकारणी लोकांच्या हितसंबंधांमुळे या समस्येची सोडवणूक होणे हे जवळजवळ दुरापास्त आहे. नैराश्याचे ढग मनावर रेंगाळावेत, असाच या कथांचा रोख आहे. वास्तव घटनांचा आधार असल्यामुळे काही कथा केवळ हकिगतीच्या पातळीवरच घोटाळतात. आयुष्यात आगेमागे असतात. दैवदुर्विलास असतो, विसंगती असतात. काव्यात्म न्याय असतो. तरी 'कथा' हा एक वाङ्मयप्रकार आहे. काही तंत्रमंत्र वापरल्याने आपल्या आशयाचा बहुपेडीपणा हा अधिक सूक्ष्म तरल पातळीवर नेता येतो, त्यांच्या आवाहकतेची क्षमता वाढू शकते, मानवी मनाची काही अनोखी बाजू त्यामुळे एकदम झळाळून जाते. उपलब्ध परिचित व ज्ञात घटनाप्रसंग प्रतिभेच्या परिसस्पर्शाने नवनवोन्मेषशाली अर्थवत्तेने सुवर्णमय बनतात. लक्ष्मीकांत देशमुख थोड्यापार चिकाटीने अशा सुवर्णाच्या राशी वाचकांपुढे सहज ठेवू शकतील, असे वाटते.








११४ अन्वयार्थ

'जलभान' देणाऱ्या कथा
-
डॉ. मंगेश कश्यप

 इसवी सन २००५ ते २०१५ युनायटेड नेशन्सने 'वॉटर डिकेड' म्हणून जाहीर केले आणि 'मिलेनिअम डेव्हलपमेंट गोल'च्या अग्रस्थानी पाण्याचा विषय अत्यंत गांभीर्याने आला. गेल्या दशकभरात जगभरातील सर्व देशांनी आपापल्या परीने 'पाणी' या विषयावर विविध मोहिमा राबविल्या, परंतु दुर्दैवाने त्याचे हवे तसे सकारात्मक परिणाम समाजजीवनात दिसून असे नाहीत. पाणी ही वैश्विक संपत्ती आहे आणि या पाण्याच्या उपलब्धतेतवरच संपूर्ण जगाचे अर्थशास्त्र अवलंबून आहे, हे ज्या देशांनी ओळखले त्यांनी पाण्यासाठी दाही दिशा फिरण्यापेक्षा त्या त्या देशात उपलब्ध असलेल्या पाण्याचे संरक्षण, संवर्धन आणि गुणवत्ता टिकवण्यासाठी शाश्वत प्रयोग राबवले आणि आपापले देश जलसाक्षर करून संपत्तीचे निर्माण केले. आपणाकडे मात्र अजूनही असे घडते नाही. किंबहुना तसे घडू नये म्हणूनही प्रयत्न केले गेले असावेत असा जाणकारांचा आरोप आहे. ६०-६५ वर्षानंतरसुद्धा भारतातील तळागाळातील खेड्यापाड्यात राहणाऱ्या दूरवरच्या गावांना पिण्याचा पाण्याचा अधिकार आमची सरकारे देऊ शकली नाहीत. 'राईट टू वॉटर' हा उपेक्षितांपासून लांबच राहिला. आजही विश्वाचं जाऊ द्या, पण आपल्या महाराष्ट्राचंच उदाहरण घेतले तर पुरेसा पाऊस न साठवल्यानं अथवा पेरण्यानं लाखो गावात, वाड्या - वस्त्यांवर पाण्याचे दुर्भिक्ष तीव्रतेने जाणवत आहे. पाण्याच्या संदर्भातील अर्थात महत्त्वाचा प्रश्न आहे तो जाणीव जागृतीचा आणि संवेदनशीलतेचा, लक्ष्मीकांत देशमुख यांच्या तहानलेल्या महाराष्ट्राच्या 'पाणी! पाणी!!' या कथासंग्रहाने नेमके हेच काम अधोरेखित केले आहे. पाण्यामुळंच तर सर्व सृष्टीचा जन्म झाला म्हणून पाणी हाच समस्त जीवसृष्टीचा जन्मदाता आहे. म्हणून तर मंगळ असे अथवा शनीची कडी, किंवा धूमकेतू यांवर पाण्याचे अंश सापडतात का यासाठी जगभर संशोधन मोहिमा चालू आहेत, जमीन असो अथवा हवा, मूलभूत शोध पाण्याचाच घेण्यात येतो. माणसाचा स्वभाव जोखतानासुद्धा कुणात

अन्वयार्थ ११५

किती पाणी आहे असं उपरोधानं बोललं जातं. देशमुखांच्या या पाणीदार कथांची व्यथा आपल्या अंतर्मनाला अस्वस्थ करणारी आहे. पाणी हीच मध्यवर्ती संकल्पना घेऊन अनुभवाचं अधिष्ठान असलेल्या या कथांमधून मानवी मनाचे, व्यवस्थापनाचे, लहरी हवामानाचे अनेक पैलू आपल्याला जाणवतात. 'भूक बळी' आणि 'नारूवाडी' यासारख्या कथांमधून जाणवणारी पाण्याची दाहकता, शासकीय पातळीवरची संवेदनशीलता आणि अनास्था याचे एकाच वेळी दर्शन घडवते. राजकीय दबावगटाचे बळी ठरलेले अनेक शेतकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपापल्या मूकसंवेदना घेऊन जगत आहेत, याचं विदारक दर्शन जेव्हा या कथांमधून होते तेव्हा पाण्याच्या बाबतीत “कुठे आणून ठेवला महाराष्ट्र माझा" असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. देशमुखांच्या नजरेतून तहानलेला महाराष्ट्र कथांच्या माध्यमातून समजून घेताना विशेष करून शेतकरी आणि शेतकामगार महिला-पुरुष यांच्यातील संवेदनशील द्वंद्वाची तीव्र जाणीव होते, त्याचबरोबर काही कथांमध्ये निर्दय प्रशासनाचाही गलथान कारभार देशमुख चव्हाट्यावर मांडतात. स्वतः एक उत्तम संवेदनशील प्रशासकीय अधिकारी असलेले देशमुख या तहानलेल्या महाराष्ट्रासाठी कासावीस होतात. प्रशासनातील आणि प्रशासनाबाहेरही जाणीव-जागृती व्हावी, सहकारी योजनांचा मानवी चेहरा लाभून त्याचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावा इतपत पाणीसाक्षरता प्रशासनामध्ये घडवून आणण्यात देशमुख आग्रही असल्याचे त्यांच्या कथांमधून प्रकर्षाने दिसते.
 पाणी चोर, मृगजळ, अमिना या कथा वाचताना पाण्याच्या व्यवस्थापनाची दुर्दशा लक्षात आल्यावाचून राहात नाही. वाळवंटात किंवा कमी पावसाच्या प्रदेशात इतर जीवांप्रमाणे माणूसही पाणी साठवतो, घरांवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा थेंबन् थेंब साठवण्याची व्यवस्था राजस्थानच्या काही भागात केलेली आढळते. कारण या साठ्याच्या जोरावरच अतिउष्ण आणि अति कोरड्या वातावरणात तग धरायचा असतो. वाळवंटात हे आवश्यकच आहे. पण सृष्टीतील इतर जीवांचा विचार न करता जिथे कमी पाऊसमान आहे तिथे विविध उपाय योजून पावसाचा थेंब थेंब का साठवला जात नाही? अस्तित्वासाठी निसर्गात इतर जीवही पाणी साठवतात, त्याचा अन्य पिकांवर विशेष परिणाम होत नाही. माणसांमुळे मात्र तसं होतं, कारण छोटं गाव असो, वा खेडे - सर्वजण शासनाने काहीतरी करावे या अपेक्षेत उपलब्ध असलेल्या जलस्रोतांचंही संरक्षण करण्याचं भान सोडून देतात.
 दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरील कथांमधून माणुसकीचे भावपूर्ण दर्शन घेत असतानाच एका बाजूला माणसातील पशुत्वही पाणीप्रश्न हाताळताना वाचकाला थेट भिडते, स्वत:च्या जीवापेक्षाही पाण्याला जपणारे कथानायक वेळप्रसंगी पाण्यासाठी दुसऱ्याचा जीव घ्यायलाही मागे पुढे पाहात नाहीत, रोजगार हमी योजनेवरील कामगार आणि


११६  अन्वयार्थ 

ज्याची शेतजमीन पाझर तलावाखाली संपादित केली जाणार आहे त्यांच्या जीवाची घालमेल आणि अन्यायाविरोधात लढण्याची प्रवृत्ती देशमुखांच्या कथांमध्ये प्रामुख्याने अधोरेखित झाली आहे.
 पाणी वितरण हा एक न सुटलेला प्रश्न आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान कितीही या संदर्भात वापरले तरीदेखील पाण्याचे वितरण हा मोठा वादाचा विषय राहिला आहे. विकसित व अविकसित देश, शहरी व ग्रामीण विभाग, ग्रामीण भागातील बागायती आणि जिरायती विभाग, कोरडवाहू शेती असलेल्या गावातील असामान्य आणि सर्वसामान्य जनता यातील जो घटक अधिक शक्तिशाली तो नैसर्गिक साधनसामग्रीचा मालकी हक्काने वापर करू पाहतो आहे. एखाद्याला परवडते म्हणून पाचशे फूट खोलाची विंधन विहीर खणायला परवानगी द्यायची की नाही हे कोणी ठरवायचे? हा अधिकार कोणाचा ? हा खरा प्रश्न. असे असे अनेक प्रश्न देशमुखांच्या कथा वाचताना आपल्या पुढे फेर धरून नाचू लागतात.
 ग्रामीण महाराष्ट्राची संपूर्ण अर्थव्यवस्था पाण्यावरच तर अवलंबून आहे. दुर्दैवाने याकडे संपूर्ण काणाडोळा करून पाण्याच्या, विशेषत: त्याच्या वाटपाच्या योजना आखल्या जात आहेत. पाण्यासारखी मूलभूत महत्त्वाची नैसर्गिक संपत्ती विशिष्ट गटाकडे कशी ओढता येईल असेच प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे पाणी समस्येचे निराकरण केले नाही तर संपूर्ण अर्थव्यवस्थाच धोक्यात येईल याचे भान 'पाणी! पाणी!!' या कथासंग्रहातून देशमुख आपल्याला देतात.
 भूजल प्रवाह जितके गुप्त त्यापेक्षाही जास्त गुप्तपणे सामान्यांची मुस्कटदाबी करून पाण्याची चोरी केली जाते. एखाद्या गावात भूजलावर आधारित पिण्याच्या पाण्याची सार्वजनिक योजना तयार होण्याची चाहूल जरी कुणाला लागली तरी त्यात 'खो' घालणारे स्थानिक पुढारी आणि शासनाचेच अधिकारी असतात, आणि या सर्वांवर मात करून जर ती योजना मार्गी लागली तर ती केवळ २-३ वर्षेच टिकते असा पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्राचा अनुभव आहे. गावकीच्या मालकीच्या विंधन विहिरीतले पाणी स्वत:च्या खाजगी विहिरीत कसे येईल हे पाहणारे त्याच गावातील परंपरेने मान्यता पावलेले पुढारीच असतात. हे मान्यताप्राप्त पुढारी इतके चालाख असतात की, गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न टँकरने सोडवण्यासाठी पुढाकार घेतात. टँकर त्यांचे स्वत:चेच असतात. आणि तेच पुढारी टँकरमुक्त गाव झाला पाहिजे या मोर्चाच्या अग्रभागी ही असतात. सरकारमान्य टँकरही त्यांच्याच मालकीचा बनतो, कुठे टॅकर पाठवायचा आणि कुठे नाही या गोष्टी तो त्या त्या गावाशी असलेल्या त्याच्या वैयक्तिक संबंधावर ठरवतो. सर्वसामान्य जनता याविरुद्ध उठाव करीत नाही. तेवढी तिची ताकदं नाही किंवा तिच्यातील शक्तीची तिला





अन्वयार्थ ११७

जाणीव झाली नाही. या सर्वसामान्य जनतेला तिची ताकद जाणवून देणारी, तिच्या जलसंवेदनांना अधिक धार आणणारी वस्तुस्थिती लक्ष्मीकांत देशमुख यांच्या कथांमध्ये आपणास पाहावयास मिळते. मराठी साहित्यात पाणी प्रश्नाविषयी किती जण रस्त्यावर उतरून आंदोलनात सहभागी झाले? महाराष्ट्राच्या पाणी प्रश्नाविषयी मराठी साहित्यिकांची नेमकी भूमिका काय? या असल्या प्रश्नांच्या जंजाळात देशमुख स्वत: अडकत नाहीत. त्यांच्या कथांतून जाणवते ती त्यांची संवेदनशील साहित्यिक कार्यकर्त्याची भूमिका आणि हा साहित्यिक कार्यकर्ता तुमच्याआमच्या जलजाणिवा ढवळून काढतो इतके नक्की.










११८ अन्वयार्थ

खेळाडूंच्या जीवनसंघर्षाचे मनोज्ञ चित्रण
सुनीलकुमार लवटे

 मराठी कथासाहित्यात आजवर जीवनाच्या विविध अंगांचा वेध घेण्यात आला आहे, परंतु क्रीडा नि क्रीडांगण त्यात अपवादानेच प्रतिबिंबित झालेले दिसते. मराठी कथा साहित्यातील ही पोकळी लक्ष्मीकांत देशमुख यांनी 'नंबर वन' या आपल्या कथासंग्रहाद्वारे भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो त्यांच्या क्रीडाक्षेत्रातील अनुभवामुळे अत्यंत यशस्वी झाला आहे. मराठी चोखंदळ वाचकांना लक्ष्मीकांत देशमुख हे नाव परिचित आहे. अफगाणच्या वर्तमान तालिबानी आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' कादंबरी, साधना साप्ताहिकात सुरू असले 'प्रशासननामा' हे वैचारिक सदर, ललित लेख; याशिवाय त्यांच्या नावावर 'कथांजली', 'अंतरीच्या गूढगर्भी,' 'पाणी! पाणी!!', 'अग्निपथ' सारखे कथासंग्रह जमा आहेत. त्याचं लेखन शिळोप्याचा उद्योग असत नाही. आयुक्त, विशेष कार्यकारी अधिकारी, संचालक, जिल्हाधिकारी अशी पदं भूषवत असताना ते समाजाच्या सर्व स्तरांतील प्रश्न व लोक समजून घेतात. व प्रक्रियेत अनेक कथाबीजं त्यांच्या हाती लागतात. त्यांच्या मनोज्ञ कथा होतात. त्यामुळे कल्पनेपेक्षा वास्ताधारित लेखन हा त्यांचा पिंड होतो. त्यातून जन्मलेलं साहित्य नवं विश्व घेऊन उभं ठाकतं. ते वाचकांना नवं विश्व दाखवतं.
  'नंबर वन' नावाप्रमाणेच खेळाडूंमधील माणूसपणाचा शोध घेणारा, त्यातील संघर्ष व भावनाचं द्वंद्व चित्रित करणारा 'नंबर वन' (पहिला नि उत्कृष्ट अशा अर्थांनी!) कथासंग्रह आहे. हा 'थीम बेस्ड' असा कथासंग्रह असल्याने प्रयोग म्हणूनही मराठी कथाप्रांगणात त्याचं ऐतिहासिक महत्त्व आहे. भारत देश 'क्रीडा महासत्ता' का होत नाही, हा लेखकाला पडलेला प्रश्न आपलं सामाजिक शल्य आहे. या शल्यपूर्तीच्या ध्यासाची निर्मिती 'नंबर वन' मधील कथा. 'पढेंगे, लिखेंगे तो राजा बनेंगे! खेलेंगे, कुदेंगे तो खाक होंगे!!' ही भारतीय मानसिकता दूर करायची; तर खेळ हा धर्म आहे, ती वृत्ती आहे, तो जीवनाचा अविभाज्य भाग आहे,





अन्वयार्थ ११९


तो काही रिकामपणाचा उद्योग नाही असा संस्कार रुजवणं आवश्यक असल्याचं लेखकाचं मत विचारणीयच नव्हे, तर अनुकरणीय आहे. सामाजिक धारणेत बदल करण्याच्या उद्देशानं हेतुत: लिहिलेल्या या कथांना जीवन व कला दोन्ही दृष्टींनी असाधारण महत्त्व आहे.
 पुण्यात सन २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धा झाल्या. क्रीडा संचालक म्हणून लक्ष्मीकांत देशमुख यांचा त्या वेळी क्रीडाविश्वाशी जवळून संबंध येतो. खेळाडूंमधील ईर्ष्या, जोश ते न्याहाळतात. त्यांचं जगणं, खेळाडूंतील मानवी संबंध ते अनुभवतात. क्रीडा संयोजक, मार्गदर्शक, प्रशिक्षक, खेळाडू यांच्यामधील संबंधांचे बारकावे या प्रशासकातील साहित्यिक हेरतो, टिपतो अन् त्यातून अजाणतेपणी कथा आकार घेतात. क्रिकेट, बॅडमिंटन, रनिंग, स्विमिंग, शूटिंग अशा अनेक क्रीडाप्रकारांचा फेर धरत 'नंबर वन' मधील कथा समग्र क्रीडाविश्व शब्दबद्ध करतात.
 संग्रहात क्रिकेटचा वरचष्मा असणं स्वाभाविक आहे. तो खेळ ब्रिटिशांचा असला तरी भारतीयांसाठी मात्र धर्म, प्राण, श्वास बनून गेलाय. 'जादूचा टी-शर्ट', 'बंद लिफ्ट', 'अखेरचं षटक' आणि 'ब्रदर फिक्सेशन' या कथांमधून क्रिकेट खेळ, त्यातलं वैभव, ताण-तणाव, मानवी संबंध याची उकल करत भारतातील जातवास्तव, राजकारण, समाजजीवन कथाकाराने अधोरेखित केलं आहे. या कथासंग्रहाची जनक कथा म्हणून 'ब्रदर फिक्सेशन' कडे पाहाता येईल. माणसाच्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीचं गारूड, भूत असं असतं की, त्यापुढे तो आंधळा होतो नि मग नवरा नाही की अन्य कोणीही! 'ब्रदर फिक्सेशन' ची नायिका स्विटी. तिचा भाऊ क्रिकेटियर. त्याला ती भाई म्हणत असते. नवरा विकीही क्रिकेटियर. विकीच्या मनात भाईबद्दल ईर्ष्या असते, कारण त्यांच्या नावावर सतत हुकमी शतकं जमा होत असतात. नवरा विकी त्यापुढे फिका पडत जातो. विकीत खुत्रस निर्माण होतो. तो नाबाद द्विशतक झळकावतो. भारताला विजय मिळवून देतो. मॅन ऑफ द सिरीजचा बहुमान पटकावतो. त्याला वाटतं स्विटी येईल, चुंबन - आलिंगन देईल; पण ती त्याऐवजी लाडिक व जीवघेणी तक्रार करते की, तू भाईला खेळू दिलं नाही, कॅलेंडर इयरमध्ये एक हजार रन पूर्ण करायचं स्वप्न उद्ध्वस्त केलंस इ. इ. हे आंधळेपण येतं 'ब्रदर फिक्सेशन'-च्या मनोधारणेतून.
 असंच फिक्सेशन 'अखेरचं षटक' कथेत पत्नी, प्रेयसीच्या द्वंदतून मोठ्या प्रत्ययकारी रूपात चित्रित झालंय. 'ती' संतोषची प्रेयसी असते. परप्रांतीय, परजात - धर्मीय म्हणून संतोषचे आई-वडील तिला नाकारतात. ती स्वधर्मीय सलीमला स्वीकारते खरी, पण पत्नी होऊनही तिच्यातली पूर्वाश्रमीची प्रेयसी जिवंत राहते.



१२० अन्वयार्थ 

पतीचा रोमांचक खेळ पाहताना ती आपल्या पूर्वप्रियकराच्या स्मृतीत त्याची केव्हा होते, ते समजत नाही..... कथालेखनकानं मॅच ड्रॉ करून कथा कलात्मकरीत्या अंतहीन केलीय व तिचा निर्णय, कौल वाचकांवर सोपवलाय. ही कथा कराठी वाचकांस रत्नाकर मतकरींच्या 'खेकडा' ची आठवण करून देते.
 या संग्रहातील 'बंद लिफ्ट' ही कथा लक्ष्मीकांत देशमुख यांनी पात्रांची नावं बदलून लिहिली असली तरी ती सरळ-सरळ विनोद कांबळी, सचिन तेंडुलकर यांची आहे, हे सांगायला कोण्या भविष्यवेत्त्याची गरज उरत नाही. क्रिकेट हा अशाश्वततेचा शाप घेऊन जन्मलेला वैभवशाली खेळ होय. त्यातील यश तुमच्यात उन्माद, अहंकार जागवते. ते तम्ही किती संयमानं पचवता. यश पण किती नम्रतेनं स्वीकारता, यावर तुमचं या खेळातलं अधिराज्य अवलंबून असतं. क्रिकेटमध्ये माणसंच असतात. ती याच समाजातलं वास्तव, वृत्ती, विचार, विकार घेऊन वागत असतात. जात, धर्म इथंही पाठलाग करत असतो. पण खऱ्या खेळाच्या यशापुढे ते सारं निष्प्रभ, शून्य असतं. हेही तितकंच खरं! 'बंद लिफ्ट' चा प्रतीकात्मक प्रयोग करून लक्ष्मीकांत देशमुख यांनी हॅमच्या यशाचा अश्वमेध जातीपेक्षा उन्मादाने रोखल्याचं सूचित केलंय. ही लेखकाची दूरदृष्टीही व साहित्यिक भानही म्हणता येईल.
 सर्वाधिक कलात्मक क्रिकेटकथा म्हणून 'जादूचा टी-शर्ट' पाहावं लागेल. 'हिरो वर्शिप' च्या ध्यासातून जन्मलेला हा कथासंग्रह या कथेतून आपला हेतू वाचकांप्रत प्रभावीपणे नेतो. रोहित क्रिकेटियर असतो. त्याचा मुलगा मोहितलाही क्रिकेटचं वेड असतं. त्याला दक्षिण आफ्रिकेत होणारी मॅच 'याचि देही याचि डोळा' पाहायची असते. पण आर्थिक ओढाताणीमुळे ते शक्य नसतं. दुधाची तहान ताकावर म्हणत ती तो टीव्हीच्या छोट्या पडद्यावर पाहात असतो. पॅडी (हे बहुधा पतौडीचं संक्षिप्त रूप. तसं असेल तर मात्र कालक्रम विसंगत!) भारताचं नेतृत्व करत असतो. भारत जिंकतो. अँकर कपिलदेवला प्रतिक्रियेसाठी आमंत्रित करतो. कपिलच्या मनात या मॅचमधील पॅडीचं एका क्रिकेट फॅनकडून प्लेकार्ड घेऊन केलेलं अभिनंदन पाहून आपली एक जुनी आठवण ताजी होते. तो सांगतो.... मी विश्वकप जिंकला, तेव्हा असाच एक मुलगा - फॅन माझं अभिनंदन करता झाला होता. त्याला मी माझा टी-शर्ट, ब्लेझर काढून दिला होता नि असंच काहीसं म्हटलं होतं की, "Today You have won the world cup for India. In future we will too..." पॅडीनं मग रहस्योद्घाटन केलं.... तो फॅन मीच होतो अन् वाचक सद्गदित होतात. हे वेगळं सांगायला नको. ही असते लेखकाची किमया - लेखणी, भाषा, शैलीची कमाल! अन् प्रतिभेतून साकारलेली अपरा




अन्वयार्थ १२१

सृष्टीही!!
 बॅडमिंटनवर आधारित दोन कथा 'नंबर वन' मध्ये आहेत 'रिअल हीरो' आणि शीर्षक कथा 'नंबर वन'. 'दि रिअल हीरो' चा हीरो आहे शांताराम. तसा तो क्रीडा खात्यातील एक निवृत्त कर्मचारी, पण बॅडमिंटन वेडा. निवृत्त झाला तरी खेळाचं वेड त्याची पाठ सोडत नाही.









१२२ अन्वयार्थ

खेळाडूंमधील 'माणूसपणाची' शोधयात्रा

प्रा. मिलिंद जोशी

 लक्ष्मीकांत देशमुख हे हरहुन्नरी लेखक आहेत. साहित्याच्या विविध प्रांतात ते लीलया संचार करतात. खरं तर प्रशासन, न्याय व्यवस्था आणि राजकारण ही तीन क्षेत्रे अशी आहेत की या क्षेत्रात कार्यरत राहताना माणसांची संवेदनशीलता बोथट होण्याचा फार मोठा संभव असतो; कारण मानण्याचे नानाविध आकार आणि प्रकार तसेच माणसांचे अंतरंग या क्षेत्रात खूप जवळून अनुभवायला मिळतात. प्रशासनातले आपले कर्तव्य निष्ठेने बजावत असताना त्यांनी तेवढ्याच मनस्वीपणे साहित्यसेवा केली. पुलंनी म्हटल्याप्रमाणे काही वेळा माणसं अपयशापेक्षा यशानेच अधिक मुर्दाड बनतात. स्वत:च्या कर्तृत्वावर यशाची शिखरे सर्व करताना लक्ष्मीकांत देशमुख यांनी स्वत:चे संवेदनशील मन कधीही हरवू दिले नाही. सूक्ष्म निरीक्षणशक्ती, अतिशय तरल संवेदना, अनुभवातून जीवनाचा अन्वयार्थ लावण्याची त्रयस्थ वृत्ती आणि त्या अनुभवाला साहित्यरूप देण्यासाठीची खास लेखनशैली यामुळे त्यांच्या लेखनाला मोठा प्रमाणावर वाचक वर्ग लाभला. आपल्या लेखनातन विषयांचे वैविध्य जपत त्यांनी तो टिकवलाही. लेखनातले सातत्य आणि ते राखताना त्यांनी 'कसदारपणाशी कधीही तडजोड केली नाही. म्हणूनच आजच्या बिनीच्या साहित्यकारांमध्ये त्यांची गणना होते.
 नंबर वन' हा त्यांचा साकेत प्रकाशनाने प्रकाशित केलेला कथासंग्रह म्हणजे खेळाडूंमधील माणसूपणाची शोधायात्राच आहे. खेळाडू आणि कलावंत हे नेहमीच समाजाच्या आदराचा, कौतुकाचा आणि कुतूहलाचा विषय असतात. समाजातल्या इतर घटकांना आपापल्या वकुबाप्रमाणे मानमरातब, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी लाभते. पण कलावंत आणि खेळाडूंच्या वाट्याला या सर्वांच्या बरोबरीने येते ते लोकप्रेम. या लोकप्रेमावर लोकक्षोभाची गडद किनारही असते. खेळाडूंनी केलेल्या गुणवत्तापूर्ण कामगिरीमुळे ते लोकप्रेमाचे धनी होतात. त्यामुळे क्रीडाप्रेमींच्या अपेक्षा वाढत






अन्वयार्थ १२३

राहतात. त्या खेळाडूंकडून सतत उत्तम कामगिरीची अपेक्षा केली जाते. ती पूर्ण झाली नाही की मग त्यांना लोकक्षोभावर सामोरे जावे लागते. खेळाडूंचे प्रातिभ आणि व्यावहारिक आयुष्य चारचौघांसारखे कधीच नसते. ते अधिक व्यामिश्र असते. खेळात जय - पराजयाची मालिका अखंड सुरू असते. हातात आलेले यश चकवा देत डोळ्यासमोरून दूर जाते. आशा - निराशेचा खेळ मनात अखंड सुरू असतो. त्या खेळात मनातले सकारात्मकतेचे आणि इच्छाशक्तीचे दिवे शांत होणार नाहीत, मालवणार नाहीत याची काळजी घ्यायची असते. एकाग्रतेने खेळ करायचा असतो. तो करीत असताना व्यावहारिक आयुष्यातले ताणतणाव बाजूला ठेवायचे असतात. त्याचे मळभ मनावर दाटून येणार नाही याची दक्षता घ्यायची असते. जिव्हारी लागणारा पराभव झाला तर त्यातून चटकन बाहेर पडून नव्या सामन्यासाठी सदैव सज्ज राहावे लागते. खेळ सांघिक असो अथवा वैयक्तिक, जिथं माणसे असतात तिथे राजकारण येतेच. कलावंत, विचारवंत आणि क्रीडापटू यांच्यातले राजकारण अधिक कुटिल असते. राजकारणी लोकांनी-देखील आश्चर्यचकित, मुग्ध व्हावे असे अनेकदा या राजकारणाचे पदर असतात. शह-काटशहाच्या अनोख्या त हा असतात. त्या समजून घेत स्वत:चा बचाव करीत वाटचाल करायची असते. त्याचे ताण मनावर येत असतात. या साऱ्या संघर्षातच मोठी शक्ती जात असते. तरीही सर्जनाची कास न सोडता आपले कौशल्य पणाला लावून स्वत:चे वेगळेपण सिद्ध करायचे असते. यशश्री खेचून आणायची असते. ती टिकवायची असते आणि पचवायचीही असते. या साऱ्यातून तावून सुलाखून निघताना त्या खेळाडूमध्ये एक माणूसही असतो, त्यालाही इतरांच्यासारख्या भावभावना असतात. त्याच्याही जीवनाकडून आणि सहवासात आलेल्या माणसांकडून काही अपेक्षा असतात. त्यालाही मन मोकळे करायचे असते. त्या साऱ्यांचा अनेकदा त्यांच्या चाहत्यांना, मित्रांना आणि नातेवाईकांनीही विसर पडण्याचा मोठा संभव असतो. 'खेळाडूंना माणूस म्हणून समजून घेण्यात आपण अनेकदा कमी पडतो. कारण त्यांचा परफॉर्मन्स हाच आपला त्यांचे मूल्यमापन करण्याचा एकमेव निकष असतो.' खेळ, यशापयश, परफॉर्मन्स यांच्यापलीकडे असलेल्या खेळाडूंच्या जीवनाचे प्रत्ययकारी चित्रण 'नंबर वन' या कथासंग्रहात लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले आहे.
 नोकरीचा भाग म्हणून भारतीय प्रशासन सेवेत आय. ए. एसमध्ये काम करताना संचालक, क्रीडा व युवक सेवा म्हणून तिसऱ्या राष्ट्रकुल युवा स्पर्धेची जबाबदारी त्यांच्याकडे होती. ती त्यांनी समर्थपणे पेलली. अंतरराष्ट्रीय दर्जाच्या नऊ खेळांच्या क्रीडा सुविधा, स्टेडिअम, प्ले ग्राऊंड आणि हॉल बांधायचे काम त्याच्याकडे होते. त्यांनी आपले प्रशासनीय आणि व्यवस्थापकीय कौशल्य पणाला




१२४ अन्वयार्थ

लावले. त्यातून शिवछत्रपती क्रीडानगरी उभा राहिली. या साऱ्या प्रवासात खेळाडूंचे जीवन देशमुखांना अधिक जवळून पाहता आले असेल. त्यातून त्यांना या प्रकाराच्या कथालेखनासाठी प्रेरणाही मिळाली असेल. त्यामुळे या लेखनाचे महत्त्व अजिबात कमी होत नाही. आयुष्यात काही अनुभव चिमटीने प्यायचे असतात, तर काही ओंजळीने. स्वत:च्या किंवा दुसऱ्याच्या आयुष्यातील अनुभवाचा एखादा छोटासा तुकडाही सर्जनशील साहित्यकारासाठी पुरेसा असतो. त्याच्याच बळावर तो सर्जनाचे बांधकाम करीत असतो. अमूर्ताला मूर्त रूप देणे हे कठीणच काम, पण जे मूर्तरूपात आहे ते तसेच तसे साकार करणे हेही तितकेच आव्हानात्मक असते. कल्पिताइतकेच सत्याचे कलात्मक दर्शन घडविणे हे जास्त आव्हानात्मक असते. त्यामुळे त्या प्रकारचे अनुभवविश्व देशमुखांच्या वाट्याला आले म्हणून त्यांनी या वेगळ्या कथा लिहिल्या असे म्हणणे त्यांच्यावर अन्याय करणारे ठरेल. मराठी वाचकाला अपरिचित असणाऱ्या एका नव्या प्रांतातून भ्रमंती घडवून आणल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. मराठीत या प्रकारचे कथालेखन दुर्मीळ आहे. या विषयाला वाहिलेला हा मराठीतला बहुधा पहिलाच कथासंग्रह असावा. खेळाडूंनी लिहिलेल्या चरित्रातून त्यांना समजून घेण्याचा प्रमाण करणाऱ्या मराठी वाचकांना खेळाडूंच्या अनोख्या जीवनविश्वाची सफर लक्ष्मीकांत देशमुख यांनी या कथासंग्रहातून घडवली आहे.
 या कथासंग्रहात एकूण दहा कथा आहेत. प्रत्येक कथा वेगळी आहे. प्रत्येक कथेतला खेळ वेगळा आहे. त्या खेळाडूंच्या वाट्याला आलेला आयुष्याचा खेळ निराळाच आहे. त्यांना खेळवणाऱ्या माणसांची एक अजब दुनिया आहे. ती या कथांमधून प्रतिबिंबित झालेली आहे. वयाच्या पलीकडे असलेल्या खेळाडूंच्या जीवनाचे दर्शन घडविण्याबरोबरच देशमुखांनी या कथांमधून आपल्या क्रीडासंस्थांचेही दर्शन घडविले आहे, ते चिंता आणि चिंतन करायला लावणारे आहे.
 'फिरूनी नवी जन्मेन मी' या कथेत एका पाथरवटाच्या पोटी जन्माला आलेल्या धावपटू मुलीची शोकांतिका आहे. आपल्या अंगभूत गुणांच्या बळावर ही मुलगी आपला ठसा उमटविते. तिच्या स्त्रीत्वाविषयी संशय घेण्याचे गलिच्छ राजकारण खेळून तिला आयुष्यातून उठवण्याचा डाव रचला जातो. नैराश्य भावनेतून ही मुलगी अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न करते. तिच्यावरील बालंट दूर करण्याच्या सगळ्या वाटा बंद झालेल्या असताना वैद्यकीय आणि कायदेशीर गोष्टींचा आधार घेत तिचे हितचिंतक तिला आरोपमुक्त व जगण्याची नवी उमेद देतात. या कथेसाठी वापरलेले वैद्यकीय आणि कायदेशीर तपशील वाचल्यानंतर देशमुखांनी सर्व बाबींचा किती सूक्ष्म अभ्यास केला आहे हे जाणवते. 'शार्प शूटर' ही कथा





अन्वयार्थ १२५


एखाद्या रहस्यकथेसारखी वाचकांना गुंतवून ठेवणारी आहे. वाल्याचा वाल्मिकी होणे हा शब्दप्रयोग आपल्याकडे रूढ आहे. गुन्हेगारी टोळीत शार्प शूटरची भूमिका बजावणाऱ्या एका तरुणाचे आयुष्य एका संवेदनशील पोलीस अधिकाऱ्याचा जागरूक आणि व्यापक मनोवृत्तीमुळे कसे बदलते, शार्प शूटरचे एका उत्तम आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या नेमबाजात कसे अवस्थांतर होते याची कहाणी वाचताना अंगावर रोमांच उभे राहतात. स्वप्ने सत्यात उतरण्यासाठी प्रथम ती पहावी लागतात. स्वप्न वास्तवात अवतरण्याचे भाग्ययोग ते पाहणाऱ्याच्या वाट्याला कसे येतात हे हळुवारपणे 'जादूचा टी-शर्ट' कथेतून देशमुखांनी उलगडून दाखविले आहे. 'प्रयासे जिंकी मना' या कथेत असणाऱ्या आई-मुलाच्या हळव्या नात्याचा विलक्षण गोफ आहे. दोघेही जलतरणपटू आहेत. जलतरणातले चापल्य मुलाकडे आईचा वारसा म्हणून आलेले आहे. पण आईला याची कल्पना नाही. ती मुलाला पाण्यापासून दूर ठेवते. याची कारणं भावनिक आहेत. मानसिक आहेत. तरीही मुलाची पाण्याविषयीची ओढ कमी होत नाही. आई, मुलगा आणि पाणी यांच्यातल्या भावसंबंधावर प्रकाश टाकणारी ही खूप वेगळी कथा आहे. 'अखेरचं षटक' या कथेत प्रेमाचा त्रिकोण आहे. दोन क्रिकेटपटूंच्या जीवनात आलेल्या एकाच प्रेयसीची आणि त्यांच्या नातेसंबंधाची गोष्ट आहे. परस्परांविरुद्ध खेळणाऱ्या दोन देशांमल्या संघातून तिचे प्रियकर खेळत असतात. सामना रोमहर्षक स्थितीतून जात असताना तिच्या मनात उमटलेल्या भावकल्लोळांचे सुरेख दर्शन या कथेतून घडते. 'रन बेबी रन' ही गुरुशिष्यांच्या भावनिक नात्याची गोष्ट आहे. एका धावपटूला आपल्या गुरूविषयी वाटणारे आकर्षण आणि त्यातून तिच्या जीवनात निर्माण झालेले गुंते ही कथा उलगडून दाखवते. ती धावपटू नवऱ्याच्या मानसिक आणि शारीरिक माणसाला कंटाळून आत्महत्येचा मार्ग स्वीकारते. तिच्या डायरीतून तिच्या करुण आयुष्याची पानं उलगडत जातात. धावण्याच्या शर्यतीत जिंकणारी ती आयुष्याच्या स्पर्धेत आणि जगण्याच्या कोलाहतात कशी थिजत जाते, पराभूत होत राहते हे या कथेत वाचायला मिळते. ब्रदर फिक्सेशन, दी रिअल हिरो आणि नंबर वन या तीनही कथा खूप वाचनीय आहेत. या कथासंग्रहाचा कळस शोभाव्यात अशा या तीन कथा आहेत. संपूर्ण कथासंग्रह वाचल्यानंतर खूप काही तरी नवे आणि वेगळे वाचल्याचा अनुभव मिळतो.
 देशमुखांच्या कथांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सूक्ष्म गोष्टींचे विस्तृत तपशील त्यांच्या कथांमध्ये आढळतात. ज्याला अभियंत्रिकीच्या भाषेत Major details of the minor things असे म्हटले जाते. त्यामुळे त्या त्या कथेसाठी आवश्यक असलेला परिसर ते मोठ्या ताकदीने उभा करतात. त्यामुळे त्या परिसराशी एकरूप





१२६ अन्वयार्थ

होत, त्या कथांमधील व्यक्तिरेखांना समजून घेणे वाचकांना अधिक सोयीचे जाते. त्यामुळे क्रीडा या विषयाची आवड नसलेल्या वाचकांमध्येही ते त्यांच्या कथावाचनाची आवड निर्माण करू शकतात.
 साहस, प्रेम, राग, लोभ, महत्त्वाकांक्षा आणि उत्कट भावना हे सर्वच माणसांच्या ठायी असणारे ठळक गुण आहेत. आपण अमुक एका मार्गाने गेलो तर आपल्या वाट्याला उपहास, उपेक्षा, उपमर्द आणि अपेक्षाभंग येईल हे माहीत असूनही माणसे त्या मार्गाने जातच असतात. जीवनाच्या व्यर्थतेतला अर्थ शोधणे ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे आणि तीच त्याच्या माणूसपणाची खरी खूण आहे. हीच त्याच्या माणूस असण्याची कसोटी आहे. देशमुखांच्या कथांमधील व्यक्तिरेखा या माणूसपणाच्या कसोट्यांवर पूरेपूर उतरतात म्हणूनच त्या उपऱ्या किंवा परक्या वाटत नाहीत. त्या आपल्यातल्याच एक वाटतात. त्यामुळे त्यांच्या कथाविश्वाशी वाचक सहजपणे एकरूप होऊन जातात. माणसाचे जीवन सीमित आहे. लांबी, रुंदी आणि खोली हे शब्द केवळ क्षेत्रफळाशी निगडित असतात असे नाही. त्याचा मानवी जीवनाशी, जीवनव्यवहाराशी खूप जवळचा संबंध असतो. लांबी म्हणजे माणसाला लाभलेले आयुष्य, रुंदी म्हणजे त्याचे जगणे. खोली म्हणजे त्याला सापडलेला जीवनाचा अर्थ. साहित्यकृती म्हणजे घटना-प्रसंगांची जंत्री नसते, तर त्या लेखकाची ती जीवनदृष्टी असते. त्या आधारे जीवनातल्या अनुभवांचा अन्वयार्थ ती लावत असतो. स्वत:चे जीवनचिंतन तो मांडत असतो. लक्ष्मीकांत देशमुख यांनी 'नंबर वन' या कथासंग्रहातून केवळ खेळाडूंच्या आयुष्यातल्या कहाण्या किंवा गोष्टी सांगितलेल्या नाहीत. सकस कथा-बीजाच्या आधारे खेळाडूंच्या जीवनदृष्टीचेही त्यांनी प्रभावीपणे दर्शन घडविले आहे.
 त्यांनी कथालेखनाची स्वतंत्र शैली कमावलेली आहे. त्यांची भाषा चित्रदर्शी आहे. पाण्यासारखी प्रवाही आहे. वाचनीयता हाच कोणत्याही साहित्याचा श्रेष्ठतेच्या निकषांपैकी एक असते. त्यांच्या साऱ्याच कथा वाचनीय आहेत. 'नंबर वन' असे शीर्षक असलेल्या या कथासंग्रहाला गुणवत्तेच्या बाबतीतही नंबर वन देता येईल इतका हा सुरेख कथासंग्रह आहे.








अन्वयार्थ १२७

स्त्रीभ्रूणहत्या प्रश्नाचा ललित दस्तऐवज

प्रा. पुष्पा भावे

 प्रशासकीय सेवेत असणाऱ्या व्यक्तीने त्या सेवेच्या निमित्ताने आलेल्या जीवनानुभवाचा साहित्यिक आविष्कार करणे हे काही मराठी वाचकांना नवीन नाही. या स्वरूपाच्या लेखनाला ललित मानायचे की अललित असा प्रश्न लेखकाने मनोगतात उपस्थित केला आहे. अनुभव कल्पित असणे आणि प्रत्यक्ष असणे यातील अंतर लेखकांच्या मनात असावे. या शिवाय लेखकाने 'थीम बेस्ड' कथासंग्रह असा शब्द योजला आहे. एकाच विषयसूत्रावरचे कथासंग्रह असा अर्थ त्यांना अभिप्रेत आहे. अरविंद गोखल्यांसारख्या कथेचा ध्यास असणाऱ्या लेखकानेही असे संग्रह निर्माण केले होते. चित्रकारांच्या चित्रप्रदर्शनात एकाद्या शैलीने वा रंगलेपनाच्या पद्धतीने झपाटलेले कालखंड आपण पाहतो, पण त्यामागची प्रक्रिया वेगळी असते.
 श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांनी यापूर्वी दोन विषयसूत्रांशी निगडित कथासंग्रह 'पाणी! पाणी!' आणि 'नंबर वन' मराठी वाचकांसमोर ठेवले होते. एखादी सामाजिक समस्या, ती ज्या समाजात निर्माण होते त्याचे पर्यावरण, त्या समस्येत गुंतलेल्या माणसांचे संबंध याचा विचार फार गुंतागुंतीचा असतो. ती समस्या ज्या दृष्टिकोनातून निर्माण होते, त्यामुळे माणसामाणसातील संवाद तुटणे, विसंवाद होणे हे तर होतेच. पण माणसे आपल्या नेहमीच्या स्वभावापेक्षा वेगळ्या चालीने आणि अपराधभावाने स्वत: विद्धही होतात.
 श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांच्यासमोर स्त्रीभ्रूण हत्येची समस्या आहे. ही समस्या नवी नाही. वेगवेगळ्या समाजाने मुली नाहीशा करण्यासाठी वेळोवेळी अनेक मार्ग योजलेले आपण पाहिले आहेत. पण अशी प्रथा समाजाच्या मूकसंमतीने प्रत्यक्षात येते आणि सर्व समाज जणू काही काही घडलेच नाही असा आव आणीत असतो. गर्भनिदानाचे आधुनिक तंत्र प्रत्यक्षात आणताना प्रसूतिपूर्व जनुकीय विकृती








१२८ अन्वयार्थ

किंवा मेटाबोलिक विकृती किंवा गुणसूत्रातील विकृती, जन्मत: व्यंग किंवा लिंगसंबंधित विकृतीचे निदान होऊन जन्माला येणाऱ्या बाळांचा जन्मभराचा ताप वाचावा आणि पालकांना जन्मभराच्या वेदना, तगमग यापासून वाचवावे असा हेतू होता. पण 'मुलगा हवा' या भारतीय ध्यासाने त्याचा विनियोग स्त्रीभूणहत्येच्या मार्गाने संतती नियमन करण्यासाठी केला. व्यावसायिक नीतिमत्तेचा विसर पडलेल्या धंदेवाईक डॉक्टरांनी त्यातून ‘पाचशे करोडची इंडस्ट्री' (शब्द देशमुखांचा) उभी केली. जुन्या मार्गाने होणारी स्त्रीभ्रूणहत्या चालूच होती. त्यात आता नव्या तंत्रज्ञानाची भर पडली. स्त्रीकार्यकर्त्यांनी याविषयी बोलायला सुरुवात केली, तेव्हा त्या स्वत:च मुक्तीच्या मार्गाआड येत असल्याची तक्रार काही वैद्यकीय व्यावसायिकांनी आणि स्वयंघोषित समाजशास्त्रज्ञांनी केली. स्त्रीभूणहत्येमुळे निर्माण होणाऱ्या गंभीर सामाजिक परिणामांची दखल केवळ काही चर्चासत्रांच्या मर्यादित अवकाशात घेतली जात होती. मात्र २००१ च्या जनगणनेच्या निष्कर्षांनी वस्तुस्थिती किती गंभीर आहे हे प्रकाशात आणले.
 महाराष्ट्रात मात्र यापूर्वीच या वस्तुस्थितीची दखल देऊन चर्चा चालू झाली होती. अभ्यासक कार्यकर्ते रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी विशेष पुढाकार घेतला होता. आणि त्या काळातील विधानसभा सदस्य मृणालताई गोरे यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्रात या विषयीचा कायदा झाला त्याला PCPNDT अशा संकेतनामाने संबोधिण्यात आले. १९८८ साली 'महाराष्ट्र रेग्युलेशन ऑफ प्रिनॅटल डायग्नोस्टिक टेक्निक अॅक्ट' हा कायदा लागू केला, तर राष्ट्रीय पातळीवर प्रसूतीपूर्व निदान तंत्र (विनियमन व दुरुपयोगवरील प्रतिबंध) कायदा २० सप्टेंबर १९९४ रोजी पास झाला.
 या प्रकारचे कडक कायदे झाल्यावर अल्ट्रा सोनोग्राफीचे धंदे भूमिगत झाले, बालिका जन्मदर घटू लागला. (विशेषत: शून्य ते सहा वर्षातील बालिकांचे प्रमाण घटू लागले) समहितैषी नागरिकांना त्याचे दुष्परिणाम दिसू लागले. म्हणून सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाल्या, त्यावर न्यायालयाने दिलेल्या आदेशातून २००३ साली कायद्यात सुधारणा झाली. अनिष्ट जाहिरातींवर बंदी आली. अल्ट्रासाउंड मशिनविक्रीचे नियमन करण्यात आले. परंतु अवैध धंद्यातून (या स्वरूपाच्या संदर्भात 'व्यवसाय' शब्द योजणे अवघडच) मिळणाऱ्या पैशाचा मोह, सुबत्तेची लालसा आवरणे अनेक डॉक्टरना अशक्य होऊ लागले आहे. आपल्याला मृत्यूनंतर तर्पण करायला मुलगा हवा, आपले आडनाव चालविणारा मुलगा हवा, वारसदार हवा, अशी इच्छा असणाऱ्या पुरुषांना वंशाचा दिवा हवा होता. त्यामुळे डॉक्टर आणि पुरुषसत्ताक कुटुंबाची मनोवृत्ती याची युती होऊ लागली.
 एका बाजूला तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करायचा आणि दुसऱ्या बाजूला गुणसूत्रांची

विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकातही आलेली माहिती नजरेआड करून मुली होतात म्हणून बायकोला टाकून देणे, घरात तिचा छळ करणे चालूच होते. मुलगा न होणे यामधली पुरुषाची जबाबदारी झटकून स्त्रियांना परत परत गर्भपात करायला लावून तिच्या शरीराची नासाडी चालूच राहिली.
 कोणत्याही सामाजिक कुप्रथेला जेव्हा लोकमानसातील पूर्वग्रह कारणीभूत असतात, तेव्हा केवळ प्रबोधन वा कागदावरचा कायदा पुरेसा ठरत नाही. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते आणि तो प्रत्यक्षात उतरवायला प्रशासकीय इच्छाशक्ती आणि नियोजन लागते. अशीच इच्छाशक्ती दाखवून श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांनी कोल्हापूरला जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यावर 'सेव्ह द बेबीगर्ल' हा उपक्रम राबविला. या उपक्रमात माहिती तंत्रज्ञानाचा, उपलब्ध असणाऱ्या स्वयंसेवी संघटनांचा आणि काही प्रामाणिक डॉक्टरांचा सहभाग होता. या साऱ्यांचा कृतज्ञापूर्वक उल्लेख पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेत आहे. लेखकाच्या मनोगतात या प्रकल्पाविषयी माहिती असल्याने त्याचा अधिक उल्लेख करीत नाही. पण या संग्रहातील कथा कोल्हापूरच्या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर घडतात, याचे महत्त्व वाचकांच्या लक्षात आणून देऊ इच्छिते. स्त्रीभ्रूणहत्येचा विचार करताना हे सारे अल्पशिक्षित दरिद्री समाजात घडत असेल असा एक समज असतो. वस्तुस्थिती वेगळे चित्र पुढे आणते. सधन आणि सुशिक्षित समाजात बालिकांचा जन्मदर घटतो आहे, हे वास्तव लक्षात घेता कोल्हापूरची पार्श्वभूमी महत्त्वाची ठरते.
 वाचकांनी या समस्येवर विचार करावा असे श्री. लक्ष्मीकांत देशमुखांना वाटते म्हणून कथांसोबत परिशिष्टात महत्त्वाचे लेखही जोडलेले आहेत. म्हणून हे पुस्तक एकाच वेळी ललित, ललितेतर आहे असे लेखक म्हणतो.
 सामाजिक समस्या गाभा असणाऱ्या कथा लिहिताना पात्र निर्मितीविषयी विशेष काळजी घ्यावी लागते. पात्रे एकाच बाजूला लेखकाचे मुखमंत्र होऊ नयेत । पण दुसऱ्या बाजूला समस्येच्या दृष्टिकोनातून खलही होऊ नयेत ही काळजी घ्यावी लागते. प्रस्तुत कथासंग्रहातील अपत्य जन्माचे सूत्र असे आहे की, त्यात अपोआप दोन जीवांच्या - पती पत्नी नात्याचे सूत्र गुंतलेले आहे. समस्या सामाजिक असली तरी ती अवतरते कुटुंबात. पती-पत्नी नात्याचा विचारही केवळ दोन व्यक्तींमधील नाते म्हणून करता येत नाही. कारण नकळत हे नातेही सामाजिक संस्काराने घडत असते.
 नव्या अपत्याचा जन्म ही घटना ही कुटुंबाच्या अनेक अपेक्षांनी गुंतागुंतीची होत असते. आजच्या काळात कुटुंब जगते - वाढते. तो अवकाश छोटा असल्याने, पूर्वी लहान मुलांचे विषय आणि मोठ्यांचे - अशा ज्या भिंती होत्या त्याही फारशा

उरलेल्या नाहीत.
 त्यामळे श्री. देशमुखांच्या कथेमध्ये नव्या अपत्याच्या जन्माच्या कथानकात भावंडांचाही सहभाग आहे. कधी तो सरळ, निरागस तर कधी मोठ्यांच्या राजकरणातील प्यादे म्हणून, तर कधी प्रत्यक्ष आणि पाठ्यपुस्तकातील मजकूर यातील अंतरामुळे गोंधळलेल्या मनाचा आहे.
 प्रारंभीच म्हटल्याप्रमाणे लेखक पतीकडे खलनायक म्हणून पाहात नाही. उदा. 'माधुरी व मधुबाला' मधील पती संवेदनाक्षम, स्त्रीविषयक सहानुभूती बाळगणारा आहे. पण त्याचे विवेकी मन 'मुलगा हवा' या संस्काराला शरण जाते. आपली चूक उमगल्यावर तो अनाथ आश्रमातील बालिकेला आपल्या पत्नीच्या कुशीत ठेवतो आणि पुढच्या वेळी मधुबाला सारखी गोड लेक हवी असेही सांगतो.
 पण सारी नाती इतकी सरळ नसतात. 'इमोशनल अत्याचार' या कथेत आपल्या पत्नीवर प्रभाव टाकण्यासाठी आपल्या जुळ्या मुलींचा वापर करणारा नवरा आहे. या कथेत एकत्र कुटुंबाचे वंशाच्या दिव्यासाठी असणारे दडपणही वापरले आहे. काही कथांमध्ये डॉक्टरी व्यवसायाचे क्रूर धंद्यामध्ये होणारे रूपांतर आहे. पाडलेल्या भ्रूणाचे पुरावे नष्ट करण्यासाठी क्रूर कुत्र्यांचा केलेला उपयोग 'लंगडा बाळकृष्ण' डॉ. अरुण लिमये यांनी सत्तरीच्या दशकात वैद्यकीय व्यवसायाविषयी 'क्लोरोफॉर्म' मध्ये केलेल्या लेखनाचे स्मरण करून देते. डॉक्टरांच्या गच्चीवरील गुलाब विशेष का तरारतात असा सूचक प्रश्नही त्यावेळी वादळी वाटला होता.
 आदर्शवादी गुरुजी आणि त्यांचा धंदेवाईक मुलगा ही इतरत्र कथा - वाङ्मयात भेटणारी पात्रेही या संग्रहात भेटतात. 'पोलिटिकल हेअर' सारख्या कथेत वंशाचा दिवा ही कल्पना इतर क्षेत्रात कशी पसरते याविषयीची व्यथा आहे. तरुण वा पौगंडावस्थेतील मुले पालकांकडे सूक्ष्मपणे पाहात असतात याची जाणीव आहे.
 कथासंग्रह प्रत्यक्ष अनुभवावर रोवलेला असला तरी कथात 'सेव्ह द बेबी गर्ल' या उपक्रमाचा वा जिल्हाधिकाऱ्यांचा उल्लेख असावा का? असा प्रश्न उपस्थित होतो. 'सेव्ह द बेबी गर्ल' या उपक्रमासाठी आणि त्या उपक्रमाचाच ललित दस्तऐवज असणाऱ्या कथांसाठी मराठी वाचक देशमुखांचे आभार मानतील. महत्त्वाच्या विषयावरच्या या पुस्तकाचे परिशिष्टही प्रस्तुत आणि वाचनीय आहे.
 मनोविकास प्रकाशनाने सामाजिक महत्त्वाच्या विषयावरचे आणखी एक पुस्तक आपल्याला दिले आहे.

स्त्रीभ्रूण हत्येविरोधातील चळवळ आणि देशमुख यांची

कथा

मेघा पानसरे

 श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' या कथासंग्रहाच्या केंद्रस्थानी स्त्रीभ्रूण हत्येच्या भीषण सामाजिक समस्येचे चित्रण आहे. स्त्रीभ्रूण हत्या या विषयसूत्रावरील कथांत त्यांनी विशेषत: कोल्हापूर परिसरातील मध्यमवर्गीय कुटुंबांची मानसिकता ठळकपणे मांडली आहे.
 स्त्रीभ्रूण हत्येची प्रथा भारतीय समाजासाठी नवी नाही. या पितृसत्ताक व्यवस्थेत स्त्रीला प्रदीर्घ कालापासून दुय्यम स्थान आहे. स्त्रीला सर्वच स्तरांवर लिंगभेदाचा सामना करावा लागतो. जन्म व मृत्यू दरातील असमानता, आत्मविकासासाठी मूलभूत सुविधांची - विशेषत: शिक्षणाच्या संधीची - असमानता, रोजगार व व्यावसायिक क्षेत्रात असमानता, मालमत्ता मालकी हक्काची असमानता, कुटुंबसंस्थेतील विषमता अशा अनेक बाबींत लिंगभेद दृष्य वा अदृष्य स्तरावर अस्तित्वात आहे.
 स्त्रिया या मूलत:च अगदी आदिम कालापासून कमकुवत, पुरुषावलंबी व दुय्यम दर्जाच्या मनुष्य प्राणी आहेत, असा समज सर्वसामान्यपणे समाजमानसात रुजला आहे. परंतु वास्तवात मानवी सभ्यतेच्या प्राथमिक अवस्थेत मातृसत्ताक व्यवस्था प्रचलित होती. त्या काळात माणसाची ओळख त्याच्या मातेपासून, एका स्त्रीपासून असे. स्त्रिया या पुरुषांच्या बरोबरीने शिकार करत, अन्न मिळवत, टोळीच्या सदस्यांसाठी त्याची वाटणी करत, शिवाय मुक्त लैंगिक संबंधांतून मुलांना जन्म देत, त्यांना वाढवत आणि वंशसातत्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत. काळाच्या ओघात शेतीचा शोधही स्त्रीनंच लावला, असं समाजविज्ञान सांगते. त्यानंतरच्या मानवी समाजविकासाच्या टप्यात खाजगी मालमत्तेचा उगम, विवाह संस्थेचा उदय, पितृसत्ताक समाजाची घडण, त्यास मिळालेला धर्मसंस्थेचा आधार, आणि भारताच्या संदर्भात जातिसंस्थेचा उदय, परिणामी स्त्रीचं सामाजिक उत्पादनातून कुटुंबात - घरात बंदिस्त होणं आणि हजारो वर्षे मानसिक गुलामीत राहाणं, हा

इतिहास सांगितला जात नाही; शालेय व उच्च अभ्यासक्रमांतून सकसपणे, प्राधान्यानं शिकवला जात नाही. त्यामुळंच निसर्गानं केलेली स्त्री-पुरुष ही परस्परपूरक निर्मिती उच्च-नीच व श्रेष्ठ-कनिष्ठ अशा सांस्कृतिक व सामाजिक उतरंडीमध्ये एका शोषक व्यवस्थेच्या दलदलीत अडकली आहे. याच्याच परिणामी असंख्य स्त्रिया आज २१व्या शतकातही दुय्यम, शोषितांचं जिणं जगत आहेत. त्यांचं स्थान उंचावून त्यांना समाजात पुरुषांइतकाच समान दर्जा मिळावा, त्यांना समान मानवी अधिकार मिळावेत यासाठी त्या सातत्यानं संघर्ष करत आल्या आहेत. त्यांच्या रोमांचकारी संघर्षाचा इतिहास अर्थातच फारसा ज्ञात नाही. कारण मानवी समाजाचा हा इतिहास पितृसत्ताक दृष्टिकोनातून लिहिला गेला आहे. असो.
 हजारो वर्षे स्त्री-पुरुष विषमतेच्या पायावर चालत आलेल्या या समाजात आज स्त्रीच्या अस्तित्वालाच गंभीर धोका निर्माण झाला आहे. २००१ च्या जनगणनेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ०-६ वयोगटातील दर १००० मुलांमागे मुलीचं प्रमाण ९३१ (१९९१) वरून ८३९ इतकं कमी झाल्याचं निष्पन्न झालं, आणि अनेक संवेदनशील घटक, स्त्री संघटनांच्या कार्यकर्त्या कमालीचे चिंतित झाले. राज्यात १९९१ च्या तुलनेत मुलींच्या प्रमाणात १०० पेक्षा जास्त घट झालेले नऊ तालुके होते. त्यात पन्हाळा, कागल, राधानगरी व करवीर हे चार तालुके कोल्हापूर जिल्ह्यातील होते. १९८० नंतर विज्ञान व तंत्रज्ञानात मोठी प्रगती झाली. आधुनिक वैद्यक तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं प्रसूतिपूर्व लिंगनिदान करून स्त्रीगर्भ असल्यास गर्भपात करण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं. खरं तर 'माझ्या शरीरावर माझा हक्क' ही घोषणा स्त्रीवादी चळवळीने ठळकपणे समाजासमोर मांडली आहे. परंतु तरीही संतती नियमन, गर्भधारणा, गर्भपात वा अपत्याचा जन्म इत्यादी पुनरुत्पादनाशी संबंधित बाबींत स्त्रीशरीर विविध सांस्कृतिक बंधनात अडकलेलं आहे. 'मुलगी नको, मुलगा हवा' ही मानसिकता स्त्रीचा मातृत्वाचा नैसर्गिक हक्कही नाकारते. मुलीस जन्म देणाऱ्या मातेला मुलाच्या मातेपेक्षा समाजात, कुटुंबात कनिष्ठ दर्जा आहे. तिला धार्मिक, कौटुंबिक सण व उत्सवात दुय्यम स्थान आहे. दोन वा जास्त मुली असणाऱ्या मातेस कुटुंबात हीन वागणूक मिळते. मुलगा होण्याच्या अपेक्षेत तिच्यावर कित्येक वेळा गर्भधारणा, गर्भपात वा बाळंतपण लादलं जातं. परिणामी अनेक स्त्रिया स्वत:च स्त्रीलिंगी भ्रूणाच्या निदानानं वा मुलीच्या जन्मानं दुःखी होतात. अनेक जणी निखळ मातृत्व अनुभवण्याचा, मुलगी होण्याचा आनंदही व्यक्त करू शकत नाहीत. कोल्हापूरात मातेनं स्वत:च्या नवजात मुलीची हत्या केल्याची उदाहरणं आहेत. अशा स्त्रीसंबंधी ‘अतिशय क्रूर जन्मदात्री' असे उल्लेख बातम्यांत प्रसिद्ध झाले होते. परंतु प्रत्यक्षात स्वत: जन्म दिलेल्या निष्पाप जीवास

ठार मारण्याची कृती करण्यामागं स्त्रीला किती टोकाचा भावनिक व मानसिक ताण, छळ सहन करावा लागतो, ते त्या स्त्रीलाच माहीत असतं. मुलगी झाली तर पुन्हा घरी, सासरी जाता येणार नाही, माहेरी राहून अपमानित जिणं स्वीकारावं लागेल याचं भय स्त्रीला अशी अमानवी कृती करायला भाग पाडतं.
 या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिसरातील स्त्री संघटना गंभीरपणे या समस्येचा वेध घेण्याचा प्रयत्न करू लागल्या. भारतीय महिला फेडरेशननं २००७ - २००८ या काळात संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी (UNFPO) या संस्थेसोबत पन्हाळा तालुक्यात 'कन्या वाचवू या' ही व्यापक मोहीम राबवली. या मोहिमेच्या अंतर्गत प्रामुख्यानं समाजप्रबोधनाचं कार्य हाती घेतलं. लोकांना मुलीच्या जन्माबाबत भावनिक आवाहन करण्याचा प्रयत्न झाला. मुंबईतील ‘एक्सपेरिमेंटल थिएटर फाऊंडेशन' चे श्री. मंजुल भारद्वाज यांच्या साहाय्यानं 'कन्या वाचवू या' या विषयावर शालेय व महाविद्यालयीन तरुणांची दोन पथनाट्य शिबिरं आयोजित केली. त्यातून विद्यार्थ्यांकडून संहितालेखन, नाट्य दिग्दर्शन व अभिनय अशा सर्वच स्तरांवर काम करून घेण्यात आलं. मंजुल भारद्वाज यांच्या 'थिएटर ऑफ रिलेव्हन्स' या तत्त्वज्ञानानुसार झालेल्या नाट्यनिर्मिती प्रक्रियेतून सहभागी तरुण - तरुणींचा स्त्रीभ्रूण हत्या व विषयाशी वैचारिक व भावनिक बंध जुळला. या नाटकांचे १०० च्या वर प्रयोग पन्हाळा तालुक्यात खेडोपाडी करण्यात आले. कलाकार विद्यार्थी नाट्यप्रयोगानंतर गावातील लोकांशी बोलत, चर्चा करत. शालेय गटातील एका कलाकार मुलीनं तिच्या गावात सर्वांसमक्ष आपल्या कुटुंबात काकीवर गर्भलिंग निदानासाठी सोनोग्राफी करण्यास दडपण आणले जात असल्याची चर्चा जाहीरपणे केली आणि असे करण्यास आपला विरोध असल्याचं सांगितलं. नाटक पाहून अश्रू ढाळणाऱ्या काही मातांनी स्वत: गर्भपात करून घेतल्याचं कबूल केलं आणि पुन्हा गर्भलिंग निदान न करण्याचा संकल्प केला. नाटकाच्या माध्यमातून समाजातील प्रचलित पुरुषसत्ताक व्यवस्था, कुटुंबातील स्त्री-पुरुष विषमता, स्त्रियांचा अपत्य जन्माचा व गर्भपाताचा अधिकार, गर्भपाताविषयीच्या कायद्याच्या स्त्रीगर्भ हत्येसाठी होणारा गैरवापर, समाजात मुलांइतकंच मुलींच्या जन्माचं महत्त्व अशा विविध मुद्द्यांवर सर्वच स्तरांवरील लोकांच्यात एक वैचारिक मंथन घडवून आणण्यासाठी महिला फेडरेशन प्रयत्नशील राहिली.
 याच दरम्यान शालेयपूर्व शिक्षण घेणाऱ्या वयोगटातील म्हणजे अंगणवाडी व शिशुगृहातील मुलांच्या पालकांच्या अनौपचारिक बैठका घेतल्या. बहुसंख्य पालकांचं पहिलं वा दुसरं मूल अशा संस्थांत शिकायला असतं. पहिल्यावहिल्या अपत्यप्राप्तीचा आनंद, त्याचं कौतुक त्यांच्या जीवनात एक मौल्यवान आनंद

आणतं. त्यातील अनेक पालक भविष्यात दुसऱ्या अपत्यास जन्म देण्याचा विचार करत असतात. त्यांना गर्भाचं लिंग निदान करून न घेता मुलगा व मुलगीस जन्म देण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न या टप्प्यावर महत्त्वाचा ठरतो. विशेषत: पहिली मुलगी असणाऱ्या पालकांना असं करण्यास प्रवृत्त करणं अत्यंत निर्णायक असतं. खरं तर अशी जाणीव जागृती करणं, ही एक अत्यावश्यक सामूहिक कृती असते. स्त्रियांना कुटुंबात नातेवाईंकाकडून होणाऱ्या गर्भलिंग निदानाच्या आग्रहास बळी न पडण्यास, स्वत:चे मत मांडण्यास बळ देण्याची गरज असते.
  या मोहिमेअंतर्गत पन्हाळा तालुक्यातील २२० अंगणवाडी व बालवाडी शिक्षिकांचं दोन दिवसीय शिबिर घेण्यात आलं. अंगणवाडी व बालवाडी शिक्षिका व ग्रामीण भागातील घरोघरी संपर्क असणाऱ्या, गावात मान्यता असणाऱ्या स्त्रिया असतात. त्यांच्या शिबिरात या समस्येची सर्व अंगांनी मांडणी झाली. स्त्रीभ्रूण हत्येच्या सामाजिक कारणांची चर्चा झाली. कायद्याची ओळख करून देण्यात आली. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे दरगामी भीषण सामाजिक परिणामांची चर्चा झाली. हरियाना व राजस्थानात लग्नासाठी होणारी वधू खरेदी, फसवणूक वा जबरदस्तीनं कुटुंबातील एकापेक्षा जास्त पुरुष सदस्यांसोबत राहाण्यास भाग पाडलं जाणं या सर्व क्लेशदायी घटना स्त्रीभ्रूण हत्येशी संबंधित असल्याची वस्तुस्थिती प्रथमच त्यांच्यासमोर आल्याचं त्यांनी सांगितलं. स्त्रियांची संख्या कमी झाल्यास समाजात त्यांची मागणी वाढेल व त्यांना महत्त्व येईल, असा समज काही सहभागी स्त्रियांनी व्यक्त केला. परंतु प्रत्यक्षात स्त्रियांवरील लैंगिक हिंसा वाढेल, त्यांच्यावरील बंधने वाढून त्या पुन्हा घराच्या आत बंदिस्त होतील, असं भयावह चित्र त्यांच्यासमोर आलं. त्या या एकूण समस्येबाबत गंभीर झाल्या. गावातील गर्भवती स्त्रियांची नोंद ठेवून त्यांना गर्भलिंग निदानापासून परावृत्त करण्याची, त्यांच्या प्रसूतीबाबत माहिती घेण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. हे मोठेच यश होते.
 एका बाजूला मुलगी नको असणारी कुटुंबं आणि दुसऱ्या बाजूला उच्चशिक्षित, पण निव्वळ पैशासाठी सोनोग्राफी करून स्त्रीगर्भ हत्या करणारे डॉक्टर अशी परिस्थिती समाजात आहे. कोल्हापूरातील अशा काही डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करण्यात सहभाग असणारा एक घटक म्हणजे वकील. पन्हाळा तालुक्यातील वकिलांची एक कार्यशाळा पन्हाळा येथे झाली. त्यात गर्भधारणा व प्रसूतीपूर्व लिंग निदान चाचणी व लिंगनिवड आधारित गर्भपात रोखण्यासाठी असलेला PCPNDT कायदा, त्यातील पळवाटा यांची चर्चा झाली. अखेरीस अनेक सहभागी तरुण वकिलांनी अशा प्रकरणांत दोषी डॉक्टरांच्या बाजूने वकिली न करण्याचा निर्धार केला.

या व्यापक कृती माहिमेनंतरही लिंग निदान करणाऱ्या सोनोग्राफी केंद्राची संख्या वाढून गर्भपातांची संख्या वाढत असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत होतं. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रास काळिमा फासणाऱ्या अशा डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली. तसेच महिला फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी स्टिंग ऑपरेशन करून लिंगनिदान व लिंगनिवडीवर आधारित गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांना पकडण्याचे सत्र सुरू केले. परंतु त्यांच्यावरील कायदेशीर प्रक्रिया अतिशय त्रासदायक व किचकट होती. शासकीय इस्पितळातील सिव्हिल सर्जन, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी व पोलिस खाते यांच्यासोबत व्यवहार करणं कमालीचं त्रासदायक होतं. कार्यकर्त्यांना नैराश्य जाणवू लागलं.
 या पार्श्वभूमीवर २००९ साली कोल्हापूरात श्री. लक्ष्मीकांत देशमुख जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. ज्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळं स्त्रीगर्भ हत्या इतकी सहज व मोठ्या प्रमाणात होऊ लागली होती, त्याच (माहिती) विज्ञान - तंत्रज्ञानाच्या मदतीनं त्यांनी 'सेव्ह द बेबी गर्ल' हा उपक्रम आणि 'सायलेंट ऑब्झर्व्हर' हा प्रयोग सुरू केला. अनेक बेकायदेशीर सोनोग्राफी केंद्रांवर धाडी टाकल्या. स्त्री संघटनांच्या कार्यकर्त्यांना दोषी डॉक्टर पकडण्यात सहकार्य केलं. उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकारी जर सामाजिक समस्यांबाबत संवेदनशील असतील तर प्रगतीशील प्रवाहास मदत होते. दरम्यान हे शोध-तंत्रज्ञान विकसित झालं. इतर राज्यांत त्याची उपयुक्तता तपासून पाहाण्याचे प्रयत्न झाले. पण अद्यापही समाजातील स्त्रीगर्भ हत्या पूर्णपणे रोखण्यात यश मिळालेले नाही.
 श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांनी त्यांच्या संवेदनेच्या आविष्कारासाठी कथालेखनाचा सृजनशील मार्ग स्वीकारला आहे. त्यांच्या 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' या कथा संग्रहाच्या माध्यमातून लेखकानं पती-पत्नी, अपत्याचा जन्म, मुले म्हणजे कुटुंब आणि बाहेरचे जग यांच्यातील नात्याचं संवेदनशीलपणे चित्रण केलं आहे. 'माधुरी व मधुबाला' या कथेतील सरिता आणि गणेशची कहाणी प्रतिनिधिक आहे. पहिल्या गर्भधारणेनंतर मातृत्वाच्या चाहुलीनं फुलणाऱ्या नवविवाहित स्त्रीचं उत्कट भावविश्व इथं मोठ्या प्रभावीपणे उमटलेलं दिसतं. पण गर्भपातानंतर स्वत:च्या शरीराचा एक हिस्सा असणाऱ्या गर्भाशी असणारी तिची जैविक नाळ तुटून ती सैरभैर होते. तिचं रिकामपण तिला उद्ध्वस्त करतं. त्याचवेळी पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या 'वंशाला दिवा हवा' या तत्त्वाचा बळी असणारा पती अपत्यजन्माचा नैसर्गिक आनंदही उपभोगू शकत नाही. शेवटी निराधार मुलीस दत्तक घेऊन आपल्या अपराधाचं प्रायश्चित्त करणारा पती एक योग्य पाऊल उचलतो. इथं 'माझ्या शरीरावर माझा हक्क' ही स्त्रीवादी घोषणा महत्त्वाची वाटते. मुलाला जन्म देण्याचा

किंवा नियोजनाविना वा इच्छेविरुद्ध राहिलेल्या व नको असलेल्या गर्भधारणेत मुलाला जन्म न देण्याचा अधिकार स्त्रीला प्रत्यक्ष वापरता आला पाहिजे. कुटुंबामध्ये जर सामंजस्य व समता असेल तर हे निर्णय परस्परांशी चर्चा करून घेतले जाऊ शकतात. पण आपल्या कुटुंबरचनेत लोकशाहीचं तत्त्व नसल्यानं असंख्य स्त्रिया मातृत्वाच्या निर्णय प्रक्रियेत निष्क्रिय राहातात. त्यांच्यावर मातृत्व वा गर्भपाताचा निर्णय लादला जातो. 'इमोशनल अत्याचार' या कथेतही पहिल्या जुळ्या मुलींनंतर मुलाचा आग्रह धरणारा पती लिंगनिदान करून पत्नीला गर्भपात करण्यास भाग पाडतो. शिवाय यात स्वत:च्या मुलींचा वापर करतो. कुटुंबातील इतर नातेवाईक 'मुलगा हा वंशाचा दिवा' या पारंपरिक विचाराचं दडपण कसं आणतात हेही स्पष्टपणे दाखवलं आहे. 'धोकादायक आशावादी' या कथेतील एका प्रामाणिक व संवेदनशील बापाचा धंदेवाईक मुलगा पैशासाठी अनैतिक व बेकायदेशीर रीतीनं लिंगनिवडीवर आधारित गर्भपात करतो त्याचं चित्रण आहे. शेवटी स्वत:च्या मुलाविरुद्ध कृती करणारा आदर्शवादी शिक्षक ही व्यक्तिरेखा एक सकारात्मक भूमिका मांडते. 'पोलिटिकल हेअर' या कथेत पौगंडावस्थेतील मुलं कुटुंबातील सदस्यांच्या व्यवहाराकडे किती सूक्ष्म व सजगपणे पाहतात, ते स्पष्टपणे दिसते. गर्भपात व स्त्रीच्या शरीरावर त्याचा होणारा परिणाम याची माहिती इंटरनेटवरून मिळवून आईसाठी अस्वस्थ होणारी मुलगी मध्यमवर्गीय नव्या पिढीची प्रतिनिधी आहे. 'लंगडा बाळकृष्ण' या कथेत गर्भपातानंतर भ्रूणाचे पुरावे नष्ट करण्यासाठी ते क्रूर कुत्र्यांना खायला देणाऱ्या डॉक्टरचं चित्रण आहे. अवघ्या महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या एका घृणास्पद वास्तव घटनेवर आधारित ही कथा मानवी विकृती किती टोकाला गेली आहे त्याचा शहारे आणणारा अनुभव देते.
 अलीकडेच पुण्याच्या गोखले इस्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या एक प्रतिनिधी एका अभ्यासाच्या निमित्तानं कोल्हापूरात आल्या होत्या. सर्वात अलीकडील पाहाणीत कोल्हापूरातील ० ते ६ वयोगटातील दर हजारी मुलांमागं मुलींच्या प्रमाणात काही अंशानं वाढ झाली असल्याची माहिती मिळाल्याच्या पाश्र्वभूमीवर त्याची सत्यासत्यता तपासणे आणि ही माहिती सत्य असल्यास त्यामागील कारणांचा वेध घेणे या उद्देशाने त्या स्त्री संघटनांच्या प्रतिनिधींना भेटत होत्या. त्यांच्याशी चर्चा करताना एकूणच गेल्या दहा वर्षातील कोल्हापूर जिल्ह्यातील स्त्रीभ्रूण हत्येची समस्या आणि संबंधित घटकांच्या उपक्रमांचा आढावा घेता आला. या समस्येचं गांभीर्य पाहाता समाज त्याबाबत अतिशय असंवेदनशील आहे, अशी खंत सतत स्त्री कार्यकर्त्यांना जाणवत होती. परंतु स्त्री चळवळीचे विविध उपक्रम व संघर्ष यातून काही ना काही मूल्ये समाजमानसात झिरपतात, याची जाणीव

झाली. याबाबत समाजाची 'मुलगी नको' ही मानसिकता बदलण्यासाठी प्रबोधन करण्याच्या दीर्घ चळवळीबरोबरच कायद्याच्या कडक अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणं आणि स्त्रीभ्रूणांची निघूण कत्तल करणाऱ्या डॉक्टरांना कडक शिक्षा करण्यासाठी प्रयत्न करणं, त्यांना सामाजिक प्रतिष्ठा देणं थांबवणं याही पातळीवर लढा तीव्र केला पाहिजे.
 ज्या समाजात स्त्री सुरक्षित असेल, स्त्री-पुरुष समता असेल तोच समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकतो, हे सत्य समाजमानसावर बिंबवण्याची आवश्यकता आहे.






भाग 3
लक्ष्मीकांत देशमुख यांचे कादंबरीविश्व













१४० अन्वयार्थ

कादंबरीचे लोकशाहीकरण

महेंद्र कदम

“कादंबरी आणि लोकशाही यांच्या संबंधांचा विचार करताना एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे व ती म्हणजे लोकशाही ही फक्त एक राजकीय व्यवस्था आणि शासनपद्धती नाही. तो सहिष्णुतेची संस्कृती, इतरांविषयी आदरभाव, एकमेकांतील अंतराचा स्वीकार, विचारांच्या अनेकतांचा आदर, आविष्कार स्वातंत्र्य, संवादाची तत्परता यांचा विकास करणारी मानसिकता आहे. लोकशाहीची ही वैशिष्ट्ये कादंबरीचा स्वभाव व तिची संरचना यात अनुस्यूत असतात. आणि तीही अशाच मानसिकतेची निर्मिती करते. ती व्यक्तीच्या स्वातंत्र्यासोबत समाजहितही लक्षात घेते, जो लोकशाहीचा अनिवार्य असा गुण आहे" - मॅनेजर पांडेय *
 लक्ष्मीकांत देशमुख यांनी ‘सलोमी' (१९९१), 'अंधेरनगरी' (१९९४), 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' (२००२), 'ऑक्टोपस' (२००८), आणि 'हरवलेले बालपण' (२०१४) या पाच कादंबऱ्यांच्या माध्यमातून आपली लेखकपणाची भूमिका मांडली आहे. या कादंबऱ्या साधारणपणे १९९१ नंतर म्हणजे जागतिकीकरण सुरू झाल्यानंतर प्रकाशित झाल्या आहेत. असे असले तरी त्यांची कादंबरी वेगळे भावविश्व घेऊन अवतरते. पाचही कादंबऱ्यांचे आशय भिन्न असले तरी 'सलोमी' या कादंबरीचा अपवाद वगळता चारही कादंबऱ्यांमध्ये राजकारण - म्हणजे शासन आणि प्रशासन हे दोन केंद्रबिंदू म्हणूनच येताना दिसतात. या शासन - प्रशासनाचा थेट संबंध लोकशाहीशी येत असल्यामुळे मॅनेजर पांडेयचे विधान आपण येथे नोंदवले आहे. मॅनेजर पांडेय कादंबरीचा लोकशाहीशी संबंध जोडून दाखवतात; तसा लक्ष्मीकांत देशमुखांच्या कादंबऱ्यांचा लोकशाही व्यवस्थेशी काही संबंध आहे का? तो आहे तर कोणत्या प्रकारचा आहे? या प्रश्नांचा शोध या ठिकाणी घ्यावयाचा आहे. अर्थात हे प्रश्न उपस्थित होण्याचे कारण त्यांच्या कादंबऱ्यांमधले

भावविश्वच त्याला कारणीभूत आहे, हे लक्षात घ्यावे लागते.
 वरील प्रश्नांची उत्तरे शोधण्यापूर्वी त्यांच्या कादंबऱ्यांचा आशय पाहाणे उचित ठरेल. 'सलोमी' या लघुकादंबरीत मुस्लीम समाजात स्त्रीवर जो अन्याय होतो, त्याचे चित्रण आहे. सलोमी ही कॉलेजयुवती मुस्लीम समाजाचा सिनेमाबंद आदेश डावलून मैत्रिणींना सिनेमाला घेऊन जाते. त्यामुळे चिडून जाऊन तिचे वडील व्यसनी तरुणाशी लग्न लावतात. तो तिला सोडून देतो. पुन्हा घरी आल्यावर धाकट्या बहिणीच्या लग्नाचा प्रश्न निर्माण झाल्यावर ती अरबाशी दुसरा निकाह लावून स्वत:ला समस्येच्या गर्तेत घेऊन जाते. 'सलोमी' मधीलच 'दिलीप' या दुसऱ्या लघु कादंबरीत अस्पृश्यांच्या छळाची मानसिक चित्रे येतात. उच्चशिक्षित असूनही दिलीप आणि त्याची मैत्रीण मारीया (निग्रो) वर्णभेदाची आणि जातिभेदाची शिकार होतात. 'अंधरेनगरी'मध्ये नगरपालिकेचे राजकारण चित्रित झाले आहे. पक्षांतर्गत राजकारणात पाटील, शफी हे कसे एकमेकांवर कुरघोड्या करतात आणि त्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांना कसे वापरून घेतात, याचे चित्रण आहे. लालाणी आपली सत्ताकांक्षा पूर्ण करण्यासाठी स्वच्छ प्रतिमेच्या मागे मुख्याधिकाऱ्यास अडचणीत आणून स्वत:ची पोळी भाजून घेतात. फायद्यासाठी सगळे पक्ष एकमेकांना कसे सांभाळून घेतात याचे मर्मभेदी चित्रण हा कादंबरी करते.
'इन्किकलाब विरुद्ध जिहाद' ही कांदबरी अफगाणच्या रक्तरंजित इतिहासावर आधारित आहे. रशिया आणि अमेरिका यांच्या शीतयुद्धाच्या काळात अफगाणसारख्या । देशाची कशी फरफट होते याचे चित्रण करणारी ही कादंबरी मुस्लिमांच्या अंतर्गत प्रश्नांनाही भिडते. अन्वर, तराकी, अमीन, गुल, प्रा. करीमुल्ला, डॉ. अनाहिता, जमीला, सलमा आदी पात्रांच्या माध्यमातून तालिबान, अल कायदासारख्या संघटना कशा जन्माला आल्या, त्यांना कसा विरोध झाला, मुस्लिमांची मूळची कट्टर धर्मांधता, मार्क्सवाद, पाश्चात्त्य भांडवलशाही, अफगाणचे दारिद्र्य, मागासलेपण या साऱ्यांमुळे अफगाण, पाकिस्तानसारखी राष्ट्रेच केवळ अडचणीत आलीत असे नाही; तर संपूर्ण जगच दहशतवादाच्या छायेत कसे वावरत आहे, याचा प्रत्यय ही कादंबरी देते. 'ऑक्टोपस'ही कादंबरी जिल्हाधिकारी आनंद पाटील आणि भगवान काकडे (तलाठी) यांच्या जीवनकहाणीतून महसुलातल्या भ्रष्टाचाराचे चित्रण करते. प्रशासनव्यवस्था भ्रष्टाचाराने कशी पोखरली आहे; आणि त्यामुळे आनंदसारख्या प्रामाणिक जिल्हा दंडाधिकाऱ्यालाही कशा तडजोडी कराव्या लागतात याचे तपशील ही कादंबरी देते.
 'हरवलेले बालपण' ही कादंबरी अरुण पालिमकर आणि कलेक्टर मनीष दवेच्या माध्यमातून बालमजुरीवर प्रकाश टाकते. बालमजुरीची प्रथा बालपणच
. .

संपवते असे नाही; तर संपूर्ण आयुष्यात पोखरून टाकणारी, शारीरिक, लैंगिक शोषण करणारी प्रथा असल्याचे या कादंबरीच्या निमित्ताने लक्ष्मीकांत देशमुख नोंदवतात.
 या सर्वच कादंबऱ्यांच्या आशयसूत्रांचा विचार करताना प्रमुख गोष्ट लक्षात येते ती शोषण. कादंबऱ्यांचे नायक बहुतांशी उच्चकुलीन, श्रीमंत, उच्चवर्णीय, अधिकारी श्रेणीचे आहेत. तरीही कादंबरीचा केंद्रबिंदू ‘शोषणाला नकार' हा आहे. 'सलोमी' स्त्रीशोषणाला, लैंगिक शोषणाला नकार देते. 'दिलीप' जातीय शोषणाला आणि भोगवादाला नकार देतो. अन्वर, डॉ. अनाहिता (इन्किलाब...) मुस्लीम कट्टरपंथीय शोषणाला नकार देतात. भांगे मुख्याधिकारी (अंधेरनगरी) राजकीय आणि प्रशासकीय भ्रष्ट व्यवस्थेला नकार देतात. आनंद पाटील (ऑक्टोपस) आपले स्खलन थांबवण्यासाठी कलेक्टरपदाचा राजीनामा देऊन भ्रष्ट व्यवस्थेचा भाग होण्यास नकार देतात. अरुण पालिमकर स्वत:चे बालपणी झालेले शोषण लक्षात घेऊन आयुष्यभर बालमजुरीच्या प्रथेविरुद्ध लढा देतात. 'सलोमी' आणि 'दिलीप' वगळता शोषितांची भूमिका जगणारी मुख्य पात्रे लक्ष्मीकांत देशमुखांच्या कादंबरीत फारशी आढळत नाहीत. परंतु ज्या मुख्य व्यक्तिरेखा अधिकारी, राजकारणी, सत्ताधीश आहेत त्यांच्याकडून शोषणाला नकार देण्याचा प्रयत्न सातत्याने प्रत्येक कादंबरीत दिलेला दिसतो; आणि हे त्यांच्या कादंबऱ्यांचे लक्षणीय यश आहे. आपण शोषित, पीडित नाही आहोत. अधिकारी, राजकारणी आहोत. उच्चकुलीन आहोत याचे भान जपूनही ही पात्रे शोषणाच्या विरोधात ठामपणे उभी राहतात. प्रसंगी प्रवाहपतित होतातही. परंतु ती पुन्हा फिनिक्सप्रमाणे उभारी घेऊन लढायला सिद्ध होतात.
 मॅनेजर पांडेयचे विधान अधोरेखित करण्याचे महत्त्वाचे कारण लक्ष्मीकांत देशमुख यांच्या कादंबऱ्यांमधून लोकशाहीच्या बळकटीकरणाची प्रक्रिया होताना दिसते. लोकशाहीचे जे शासन, प्रशासक, न्यायव्यवस्था व प्रसारमाध्यमे हे चार महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. या चार स्तंभावरती जी भारतीय लोकशाही उभी आहे, त्या स्तंभांचा लोकशाही बळकटीकरणात किती प्रभावी वापर झाला आहे, याची चिकित्सा देशमुख करताना दिसातत. 'सलोमी' या कादंबरीचा अपवाद सोडला तर पुढच्या चारही कादंबऱ्यात लोकशाहीच्या भल्या-बुऱ्याची चिकित्सा केलेली आहे. लोकशाहीने जे घटनादत्त अधिकार माणसाला प्राप्त झाले त्यांचा वापर प्रत्येक राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी स्वार्थासाठी कसा करून घेतो याचे प्रभावी चित्रण 'अंधेरनगरी'त आहे. नगरपलिकेला जर उत्तम प्रशासन करणारा एखादा मुख्याधिकारी मिळाला तर शहराचा चेहरा-मेहरा बदलू शकतो याचे चित्रण या कादंबरीत आले आहे. परंतु असा प्रशासक या व्यवस्थेला चालत नाही. मग त्याची बदली अडचणीच्या आदिवासी किंवा नक्षलग्रस्त भागात करून त्याला

शिक्षा दिली जाते. मग आपोआपच लोकशाहीचा एकेक चिरा ढासळू लागतो. शासन आणि प्रशासनाने लोकशाहीला किती विकृत रूप दिले आहे, याचा प्रत्यय ही कादंबरी देते. जर आपण आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे बजावली तर कुणावर अन्याय होणार नाही. झाला तर मग 'ऑक्टोपस'मधल्या भगवान काकडेसारख्या प्रामाणिक माणसाचे आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाते. त्यातून काकडे पुन्हा सावरतो; पण भ्रष्ट व्यवस्थेचा भाग बनण्याशिवाय त्याच्याकडे कसलाच पर्याय उरत नाही. निलंबित झालेला तलाठी भविष्यात अव्वल कारकून होऊन महत्त्वाच्या पदावर कार्यरत होतो व भ्रष्ट व्यवस्थेला कंटाळून आनंदसारखा कलेक्टर आपल्या पदाचा राजीनामा देतो. भ्रष्ट व्यवस्थेचा केवळ राजकारणावर किंवा समाजकारणावर परिणाम होत नाही; तर तो शिक्षणावर आणि बालमनावरही होतो याचे प्रत्यंतर 'ऑक्टोपस'मध्ये येते. भगवानचा मुलगा आणि एस.पी.ची मुलगी या भ्रष्ट व्यवस्थेच्या शिकार बनतात. याचे अधिक प्रभावी चित्रण 'हरवलेले बालपण' मध्ये सापडते. बालमजुरीमळे एकेक पिढ्याच्या पिढ्या कशा बाद होतात आणि अकाली मृत्यूला बालपणीच कसे सामोरे जावे लागते, याचे चित्रण करताना देशमुखांनी महाराष्ट्र आणि बिहारमधील बालमजुरीचा प्रश्न अत्यंत गांभीर्याने हाताळला आहे. बालमजुरांच्या खरेदीची आंतरराज्यीय टोळी किती विकृतपणे बालकांचे आयुष्य संपवून टाकते आहे, याचे चित्रण करताना देशमुख प्रशासकीय व्यवस्थेवर बोट ठेवतात. बालकांच्या पुनर्वसनाचा कायदा व विभाग असतानाही ही व्यवस्था किती बेजबाबदारपणे काम करून बालकांचे बालपणच कसे संपवून टाकते, याची चिकित्सा केली आहे. एखाद्या गुंडापुढे राजकारणी आणि मग राजकारण्यांच्या माध्यमातून प्रशासकीय व्यवस्था कशी झुकते आणि त्यातून बालमजुरीचा प्रश्न कसा गंभीर बनत जातो, याचे अत्यंत तपशिलात चित्रण ही कादंबरी करते.
 या कादंबऱ्या केवळ शोषणाचे चित्र नोंदवून थांबत नाहीत; तर भारतीय लोकशाही प्रणालीमध्ये प्रत्येक शोषणप्रकाराला उत्तर आहे आणि पर्यायही आहेत. पण ते राबवण्याची मानसिकता या व्यवस्थेमध्ये उरली नसल्याचे लक्ष्मीकांत देशमुख नोंदवतात. ही नोंद करताना ते एका अर्थाने लोकशाही व्यवस्थेचे मजबूत दुवे काय आहेत, याची नोंद करायला विसरत नाहीत. अंतिमत: लोकशाही ही सामान्य माणसांच्या कल्याणासाठीची प्रक्रिया आहे, ती विसरून चालणार नाही. याचे समग्र भान असणारे देशमुख आपल्या कादंबरी लेखनातून लोकशाहीच्या बळकटीकरणाची प्रक्रिया तर नोंदवतातच; परंतु कांदबरीचे अधिकाधिक लोकशाहीकरण करतात.
 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' ही कांदबरी जरी अफगाणिस्तानचा रक्तरंजित इतिहास अधोरेखित करीत असली तरी धर्मांधता, हुकूमशाही यामुळे केवळ एक देशच नव्हे; तर संपूर्ण जागतिक व्यवस्था कशी अडचणीत येऊ शकते, याची मांडणी ही कादंबरी

करते. मूळच्या मुस्लीम समाजातील उच्च-नीचतेच्या कसोट्या, स्त्रियांचे सर्वांगीण शोषण, अतिधर्मांधता यामुळे दहशतवाद कसा जन्म घेतो याचे अत्यंत सूक्ष्मपणे चित्रण करणारी ही कादंबरी मराठीतली महत्त्वपूर्ण कादंबरी आहे. अफगाण, पाकिस्तान, रशिया, अमेरिका यांच्या संबंधामुळे आणि शीतयुद्धामुळे जसे जग धोक्यात आले; तसेच मार्क्स-लेनिनच्या सर्वांगीण क्रांतीतील रक्तरंजितपणामुळे समाजवादही धोक्यात आला. संशय बळावला. राजकारणाने हिडीस रूप घेतले. आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादाची पाळेमुळे रोवली गेली. या सगळ्यांस कारणीभूत आहे सर्वांगीण विकासाचा अभाव. आणि हा सर्वांगीण विकास फक्त लोकशाही प्रणालीमध्ये अवतरू शकतो. म्हणूनच एका भारतीयाला अफगाणचा विषय हाताळावा वाटणे यातही देशमुखांची लोकशाही व्यवस्थेवरची प्रगल्भ जाण आणि विश्वास व्यक्त होतो. अफगाणमधले चित्रण करताना मार्क्सवादसुद्धा एकांगी कसा राहतो, याचीही चिकित्सा देशमुख करतात. आंतरराष्ट्रीय पातळीवरचा विषय हाताळताना देशमुखांनी अत्यंत तटस्थपणे आणि तितक्याच तीव्र संवेदनशीलतेने हाताळला आहे. पृष्ठसंख्या जास्त असल्यामुळे पुनरुक्ती झाल्यासारखी वाटत असली तरी अत्यंत सूक्ष्म तपशिलांमधून दहशतवाद व धर्माधता कशी वाढीस लागते; माणसांचे स्वार्थ आणि अविवेकी, एकांगी विचार विवेक कसा संपवून टाकतात याचे नेमके तपशील ही कादंबरी देते. याही कादंबरीत अधिक प्रकाश शासन आणि प्रशासनावरच आहे. या दोन प्रणालींमुळे संपूर्ण व्यवस्था कशी मोडकळीस येते, याचे प्रत्यंतर ही कादंबरी देते.
 देशमुखांच्या कादंबऱ्यांमधील पात्ररचनाही लक्षणीय आहे. 'सलोमी' एक शोषित मुस्लीम तरुणी आहे. आपले स्त्री म्हणून मानसिक, शारीरिक आणि लैंगिक शोषण कसे झाले हे सांगताना कोणताही आडपडदा ठेवीत नाही. तीच दिलीपची तहा. आपल्यावर होणारे जातीय अन्याय तो स्पष्टपणे नोंदवतो. पण त्याचवेळी याच भारतीय व्यवस्थेत राहूनच तिला धक्के द्यायचे नक्की करतो. 'अंधेरनगरी' ही संपूर्ण व्यक्तिरेखाच बनून येते. राजकीय व्यक्ती ह्या नगरीचे लचके सगळीकडून कसे तोडतात याचे चित्रण करताना जी पात्रे येतात ती काळ्या अथवा पांढऱ्या रंगात रंगवली जात नाहीत; ती स्वाभाविकपणे येतात. पण 'अंधेरनगरी'त पात्रांची इतकी गर्दी होते की, त्या गर्दीत एक चांगला विषय हरवून बसतो. एखादे पात्र वाचक म्हणून लक्षात येईपर्यंत लगेच दुसरे नवीन पात्र अवतरते. त्याचा तपशील गोळा करेपर्यंत तिसरे अवतरते. या पात्रांच्या मालिकेमुळे कादंबरी निम्म्याच्या पुढे जाईपर्यंत वाचकांच्या हाती येत नाही. आणि एखादे नवीन पात्र आले की त्याला साकारताना लागणारे तपशील लगेच भरत राहिल्यामुळे कादंबरीची गुणवत्ता उणावत जाते. ही कादंबरी पात्रांच्या गर्दीमुळे गांभीर्य हरवून बसते. अगदी शेवटी-शेवटी ती वाचकांची पकड घेते. हीच तन्हा 'इन्किलाब

विरुद्ध जिहाद' या कादंबरीत झाली आहे. राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, मंत्री, वगैरेंचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तिरेखा सामान्यच वाटायला लागतात. मुळात त्या उंचीवर आणि अधिकारपदावर काम करणाऱ्या व्यक्तींचे सादरीकरण त्यांच्या पेशाला शोभेल असे जाणवत नाही. कादंबरीचा आशय अत्यंत उत्तम आहे; परंतु पात्रांच्या सामान्यीकरणामुळे आणि गर्दीमुळे पुन्हा याही कादंबरीची गुणवत्ता उणावत जाताना दिसते. _ 'ऑक्टोपस'मध्ये मोजक्याच आणि प्रभावी व्यक्तिरेखा आहेत. (याचा अर्थ असा नव्हे की, कादंबरीत अधिक व्यक्तिरेखा असू नयेत. असाव्यात पण त्या आशयाशी एकनिष्ठ होताना वाचकांच्या मन:पटलावरही आकार घेणाऱ्या असाव्यात.) कलेक्टर, मंडल अधिकारी आणि प्रशासनातील कर्मचारी यांच्याभोवती फिरणारी ही कादंबरी पात्रांचे नेमके तपशील नोंदवते. त्यांचे अंतर्बाह्य तपशील नेमकेपणाने आलेले आहेत. आनंद आणि भगवानची होणारी मानसिक कोंडी प्रभावीपणे नोंदली गेली आहे. प्रामाणिक भगवान मुलाच्या मानसिकतेपुढे आणि त्याच्या शिक्षणासाठी कसा स्खलनशील बनतो याचे जसे नेमके चित्रण आले आहे. तसेच स्वत:ची स्खलनशीलता वाचवण्यासाठी आनंद नोकरीचा राजीनामा देतो याचेही प्रभावी चित्रण आले आहे. या सगळ्या द्वंद्वात व्यक्तिरेखांची मानसिक अवस्था काय असते याचेही तपशील ही कादंबरी देते.
 'हरवलेले बालपण'मध्ये मात्र अनेक परिणामकारक बालव्यक्तिरेखा आल्या आहेत. अरुणदादापासून अनेक बालकामगार आपापल्या ओळखीसह कादंबरी उठून दिसतात. 'स्वप्नभूमी'ला साकार करणारे धाब्यावरील दोन बालकामगार जसे प्रभावी ठरतात तसे फटाक्यांच्या कारखान्यातील स्फोटात मृत्यू पडलेला बालक असो किंवा जरीकामाच्या कारखान्यातील आजारपणामुळे मृत्यू पावलेला मुस्लीम बालक असो किंवा अरुणची बहीण असो; या सगळ्या व्यक्तिरेखा बालमजुरीचे विदारक वास्तव मांडण्यात यशस्वी झालेल्या आहेत. अरुण वयाने मोठा झाला तरी तो बालकांच्या प्रश्नांनी बाल राहतो, हे या व्यक्तिरेखेचे लक्षणीय यश आहे. तो आपल्या भूमिकेपासून तसूभरही ढळत नाही.
 भाषा आणि निवेदनाच्या अंगाने देशमुखांच्या कादंबऱ्यांचा विचार करताना त्यांचे एक वेगळेपण ठळकपणे लक्षात येते, ते म्हणजे त्यांची भाषेवर आणि सांस्कृतिक तपशिलावर असलेली पकड. हिंदू आणि मुस्लीम अशा दोन्ही धर्मांच्या सामाजिक-सांस्कृतिक परंपरा, चालीरीती, वारसा त्यांना जसा नीटपणे माहीत आहे; तसाच भाषिक भानाचाही संदर्भ त्यांना नीट अवगत आहे. मुस्लीम धर्माचे, संदर्भाचे चित्रण करताना देशमुखांच्या निवेदानात मुस्लीम भाषेचे अनेक संदर्भ सहजपणे डोकावताना दिसतात. तीच भाषा जेव्हा प्रशासकीय निवेदन करू लागते तेव्हा कशी प्रमाण, इंग्लिशमिश्रित आणि प्रजासकीय भाषा बनते, हे पाहण्यासारखे
 आहे. प्रशासकीय भाषेची संदर्भबहुलता हा देशमुखांच्या कादंबऱ्यांचा खास विशेष आहे. मुस्लीम-हिंदू परंपरांनी आणि प्रशासकीय संदर्भानी बहुश्रुत बनलेली त्यांची भाषा उघड्यावाघड्या आणि स्पष्ट संवादाने संपृक्त बनत जाताना दिसते. आवश्यक तेथे, आवश्यक तेवढी भाषिक स्पष्टता लक्ष्मीकांत देशुखांनी बाळगली आहे. त्यामुळे त्यांच्या कादंबऱ्यांचे निवेदन परिणामकारक बनते. अनावश्यक निवेदनाला फाटा दिल्यामुळे व मोजके संवाद असल्यामुळे त्यांच्या कादंबऱ्या वाचनीय बनत जातात.
 वेगवेगळ्या आशयसूत्रांना प्रशासकीय भूमिकेतून हाताळल्यामुळे देशमुखांच्या कादंबऱ्या वेगळेपणा घेऊन अवतरतात आणि म्हणून त्या लक्षात राहतात. एकूण मराठी कादंबरीमध्ये आशयसूत्रांचे प्रशासकीय दृष्टीतून चित्रण फार कमी आहे. ती तूट भरून काढण्याचे काम ही कादंबरी करताना दिसते. लक्ष्मीकांत देशमुखांची कादंबरी कोणते विधान करू पाहते असा प्रश्न जेव्हा आपण उपस्थित करू, तेव्हा आपल्या लक्षात येते की, प्रशासनाने लोकाभिमुख होऊन लोकशाहीचे बळकटीकरण केले आणि रांगेतल्या शेवटच्या माणसाला केंद्रस्थानी ठेवले तर भारताचे चित्र वेगळे असेल. अर्थात हे जे विधान आहे ते केवळ आदर्शवादी नाही. त्या विधानासाठी त्यांनी आपल्या पाच कादंबऱ्यांमधून जी तीव्र संवेदनने मांडामांड केली आहे आणि त्या मांडणीतून भ्रष्ट व्यवस्थेवर जो प्रकाश टाकला आहे, त्या प्रकाशातूनच आपणाला त्यांच्या या विधानाची रेषा स्पष्ट दिसते. ही रेषा अधिक ठळक करण्याचे काम त्यांच्या 'हरवलेले बालपण' या कादंबरीने केले आहे, आणि या कादंबरीने त्यांच्यातल्या कादंबरीकाराची वाढही सूचित केली आहे. हे त्यांचे वेगळेपण येथे नोंदवायलाच आहे.


टीप : मॅनेजर पांडेय : कादंबरी आणि लोकशाही : अनुवाद - रंगनाथ पठारे, लोकवाङ्मय मुंबई. प्रथम आवृत्ती २०११
सत्ताकारण व समाजहित यांच्यातील द्वैत

डॉ. अशोक चौसाळकर

मराठी साहित्याचा सर्वच क्षेत्रात चांगल्या प्रकारे विकास व्हावयाचा असेल तर त्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी दान केले पाहिजे; कारण या व्यक्ती जीवनाच्या विविध क्षेत्रात काम करतात व त्या क्षेत्रातील जीवनाचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव असतो. साहित्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्यातून हे जीवन- अनुभव आपल्या विविध रसरंगासह, त्यातील अनोख्या अनुभवासह प्रकट व्हावेत अशी प्रा. श्री. म. माटे यांची इच्छा होती व 'भाषाभिवृद्धीची साधने' या आपल्या गाजलेल्या लेखात त्यांनी आपले हे विचार व्यक्त केले होते. ललित वाङ्मयाच्या कथा आणि कादंबरी या विभागात हे अनुभव जास्त अस्सलपणे व विस्ताराने मांडता येतात व गेल्या काही अशा प्रकारचे साहित्य मराठी भाषेमध्ये लिहिले जात आहे आणि जसजसा शिक्षणाचा प्रसार समाजातील उपेक्षित व ?? होत जाईल तसतसे हे प्रमाण वाढेल.
 परदेशात राहणारे मराठी भाषिक आता साता समुद्रापलीकडच्या मराठी जीवनाची असवंश आपल्यापुढे आणीत आहे. त्याचप्रमाणे प्रशासकीय सेवेत काम करणारे अधिकारी पण आता मोठ्या प्रमाणात लिहीत आहेत. भारत सासणे, विश्वास पाटील ही त्यातील काही नावे. त्यांच्याबरोबरच लक्ष्मीकांत देशमुख यांचे नाव आपणास घेता येईल. कारण गेल्या वीस-पंचवीस वर्षांत देशमुखांनी कथा आणि कादंबरी वाङ्मयात मोठ्या प्रमाणात भर घातली आहे. देशमुखांच्या लेखन-वैशिष्ट्यांचा अभ्यास प्रस्तुत लेखात त्यांच्या 'अंधेर नगरी' कादंबरीच्या प्रस्तावनेत केला आहे.
 त्यांची 'अंधेर नगरी' ही कादंबरी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये जे राजकारण चालते त्याचे भेदक विवेचन करणारी कादंबरी आहे. ही कादंबरी १९९५ साली प्रत्यक्ष प्रकाशित झाली आणि त्यानंतर १९९९ साली तिची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली. या जवळ जवळ २२५ पृष्ठे असणाऱ्या कादंबरीमध्ये मराठवाड्यातील नांदेड शहरात १९८८ ते १९९६ या काळात चाललेल्या नगरपालिकेच्या राजकारणाचे,


विशेषतः सत्तेच्या राजकारणाचे चित्रण करण्यात आले आहे. आज नगरपालिकेला नागरी जीवनात महत्त्वाचे स्थान आहे; कारण नागरिकांच्या रोजच्या नागरी समस्या सोडवण्याचे काम नगरपालिका करते आणि नगरपालिकेचे हे काम जर प्रामाणिकपणे केले नाही तर नगरपालिका शहरास मोठ्या झोपडपट्टीचे रूप देऊ शकतात; कारण व्यापारी, उद्योजक, बिल्डर, व्यावसायिक ?? नगरसेवक नगरपालिका प्रशासनात अनेक वर्षे काम करताहेत. अधिकारी व पत्रकार या सर्वांचा नगरपालिकेच्या विविध निर्बधात वाव असतो. कारण प्रत्येकाचा त्यामागे काही एक स्वार्थ असतो व तो स्वार्थ बाधण्यासाठी धर्म, जात, मागासपणा व इतर अनेक बाबींचा नगरसेवक आणि राजकारणी उपयोग करून घेत असतात. स्वत: देशमुख हे प्रशासकीय अधिकारी होते. आणि प्रशासनातील निर्णय घेण्याची प्रक्रिया, त्यातील नगरपालिकांचे अधिकार व नगरपालिकांची काम करण्याची पद्धत व या सर्वांचे शहरातील राजकारण सत्तारूढ पक्षाचे व विरोधी पक्षाचे राजकारण आणि डाव्यांचे राजकारण यांच्याशी जवळचे संबंध असतात. या आपल्या माहितीचा चांगला उपयोग त्यांनी या कादंबरीत करून घेतला आहे. ही संपूर्णत: सगरपालिकेत चाललेल्या तीन वर्षांच्या सत्तेच्या राजकारणाचे चित्रण करणारी कादंबरी आहे. त्यात वर्णन केलेले स्थानिक नागरी राजकारणाचे चित्र अस्सल असून ते लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांना अस्वस्थ करणारे आहे.
 या कादंबरीचे निवेदन मुख्यत: चार पातळीवर लेखकाने विकसित केले आहे. या चार पातळ्यांवर स्थायिक राजकारणात कसे संघर्ष निर्माण होतात व त्या पातळीवर त्या संघर्षाचे निराकरण कसे झाले याचे त्यात विवेचन केले आहे. या चार पातळ्या खालील प्रकारच्या आहेत
 १) शहराचे नगराध्यक्ष लालाजी व त्यांच्या विरोधात सातत्याने उभे राहिलेले सत्तेचे राजकारण. २) शहरात नव्यानेच आलेले ?? मुख्याधिकारी भांगे आणि नगराध्यक्ष लालाजी यांच्यातील संघर्ष. ३) मुख्याधिकारी भांगे आणि भ्रष्ट नगरसेवक आणि भ्रष्ट नगरप्रशासन यांच्यातील संघर्ष. ४) नगरपालिकेचे भ्रष्ट प्रशासन नगरसेवक - त्यांस पाठिंबा देणारे पक्षश्रेष्ठी, पत्रकार यांचा सामूहिक स्वार्थ आणि त्याविरूद्ध अत्यंत उदास वृत्तीने व पराभूत भावनेने संघर्ष करणारा नागरी समाज यांच्यातील संघर्ष. या चारही पातळ्यांवरचे संघर्ष वेगवेगळ्या व्यक्तींच्या मार्फत लढवले जातात व संघर्षाचे निरनिराळे आयाम देशमुखांनी या कादंबरीत हाताळले आहेत.
 लालाजी हे शहराचे नगराध्यक्ष. नांदेड शहरातील 'मोठ्या साहेबां'चे जे केंद्रीय नेते, आहेत. त्यांच्या आशीर्वादाने ते गेली तीन वर्षे या शहराचे नगराध्यक्ष आहेत. ते सिंधी निर्वासित असून त्यांनी नेकीने व मेहनत करून पैसा कमावला आहे. ते स्वभावाने सत्प्रवृत्त असून ज्या शहराने आपल्याला मोठे केले त्या

शहराचा आपण विकास केला पाहिजे अशी त्यांची भावना आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या राजकारणातून पैसा कमावण्याची त्यांची इच्छा नाही. त्यांची राजकारणावर आणि प्रशासनावर कमांड पक्की असून त्यांच्याजवळ राजकीय धूर्तता आहे. ही संपूर्ण कादंबरी लालाजी आणि त्यांचे पक्षांतील विरोधक यांच्या संघर्षाची कहाणी असून नगरपालिकेतील नगरसेवकांचा एक गट सातत्याने त्यांना पदच्युत करून आपला माणूस त्या जागी आपण्याच्या प्रयत्नात आहे; कारण त्या गटाचे आर्थिक हितसंबंधांचे लालाजी संरक्षण करीत नाहीत. लालाजी यांच्या विरोधात मुसलमान नगरसेवकांचा . एक गट आहे. मराठा नगरसेवकांचा एक गट आहे. व काही मागास जातीतील नगरसेवकही आहेत; पण या गटाचे राजकारण व बनाव लालाजी आपल्या मुत्सद्देगिरीने उधळून लावतात.
 लालाजी स्वत: जरी भ्रष्ट नसले तरी सत्तेवर वर राहण्यासाठी त्यांना आपल्या गटातील नगरसेवकांचे हितसंबंध जोपासावे लागतात. त्यांच्या काही निर्णयामुळे त्यांचा स्वत:चा व विशेषत: त्यांच्या ज्येष्ठ भावाचा व्यावसायिक लाभ होतो. स्वातंत्र्य सैनिक आबा गुरुजींच्या जागेच्या बाबतीत त्यांची भूमिका अशीच संदेहास्पद होती. लालाजींना सत्तेवर राहण्यासाठी आणि आपले बहुमत टिकवून ठेवण्यासाठी आपल्या गटातील नगरसेवकांना खूश ठेवणे भाग होते व त्यासाठी त्यांना कामाची कंत्राटे देणे नगरपालिकेच्या ?? व जास्त व्यवहारात वाटा देणे व त्यांच्या हातात सतत काहीतरी मलिदा देणे भाग होते. आपण अशा प्रकारच्या भ्रष्टाचारास प्रोत्साहन देत आहोत याची त्यांना खंत होती; पण व्यवस्थेत टिकून राहावयाचे तर हे करणे भाग आहे हे त्यांना कळत होते व त्यांची ?? तीव्र होती. शहराच्या हद्दवाढी प्रकरणात खुद्द खासदारांचेच हितसंबंध धोक्यात आले. हद्दवाढीची मागणी लालाजींनी मान्य करून आणली. या संघर्षात लालाजींना अध्यक्षपदावरून काढण्याचा निर्णय झाला. व त्यांनी राजीनामा द्यावा असे सांगण्यात आले; पण सुरुवातीस त्यांनी त्याची दखल घेतली नाही; पण आपल्याच जुन्या सहकाऱ्याच्या पाठीमागे बहुसंख्य नगरसेवक जात आहेत हे लक्षात आल्यावर त्यांनी राजीनामा दिला. पण राजीनामा दिल्यानंतर आपला दगा देणारा सहकारी प्रकाशभाई अध्यक्ष होऊ नये म्हणून त्यांनी हवे ते केले व त्याने विश्वासाने दिलेल्या कोऱ्या कागदाचा वापर करून त्यांचा राजीनामा लिहून मान्य केला. सत्तेच्या व सूडाच्या राजकारणात सत्प्रवृत्त भाणसाचा पण कसा नैतिक अध:पात होतो हे देशमुखांनी इथे दाखवले आहे.
 कादंबरीतील दुसऱ्या पातळीवरचा संघर्ष हा कर्तव्यदक्ष व स्वच्छ प्रशासनाचा ध्यास घेतलेला ध्येयवादी प्रशासकीय अधिकारी आणि नगरपालिकेतील भ्रष्ट प्रशासन यंत्रणा यांच्यातील आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होऊन आलेल्या
 भांगे यांना आपण ज्या शहरात शिकलो त्या शहराचा विकास करावयाचा आहे व त्यासाठी ते जिद्दीने काम करावयास तयार आहेत. नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यास नगरसेवक, नगरपालिकेचे प्रशासन व सर्वसाधारण जनता यांना विश्वासात घेऊन काम करावे लागते व जेणेकरून नगरपालिकेचे अहित होत नाही हे पाहावे लागते. आहेत नगरप्रशासनातील इतर घटक समाजातील हितसंबंधी व दबाव गटांना नगरपालिकेचे हित डावलून आपला स्वार्थ साधायचा असतो. त्यात जकात बुडवणे, कर चुकवणे, अनधिकृत बांधकाम करणे. सार्वजनिक उपयोगासाठी सरकारने ठेवलेल्या जुन्या आरक्षित जागा अनारक्षित करणे, बेकायदा गृहनिर्माण सोसायट्या स्थापन करणे, नरगपालिकेच्या जागा ताब्यात घेणे, या गोष्टींचा समावेश होतो. नगरपालिका कर्मचाऱ्यांनी वेळेवर काम करणे लोकांना आवश्यक त्या सेवा वेळेत पुरवणे या गोष्टी महत्त्वाच्या असतात. भांगे यांनी हे कार्य हाती घेऊन ती त्यांनी निर्धाराने पूर्ण करण्याचा धडाका लावला. त्यामुळे नगरसेवकांचे व प्रशासनातील इतर अधिकाऱ्यांचे हितसंबंध धोक्यात आले. भांगे यांनी तडफदारपणे हा एकहाती संघर्ष कशाप्रकारे केला याचे रोमहर्षक चित्रण देशमुखांनी या कादंबरीत केले आहे. भांगे निर्भय आहेत व प्रशासनाला त्यांनी चांगल्याप्रकारे आपल्या कामास जुंपले आहेत. त्यांना लालाजी यांच्याकडून अपेक्षित पाठिंबा मिळत नाही पण ते जकात, आरोग्यसेवा, सफाई, गटारे दुरुस्ती, रस्ते, पूल, याबाबतीत . धडाक्याने काम करतात.
 त्यांचा नगरसेवकांशी संघर्ष, झोपडपट्ट्यांचे अतिक्रमण निर्मूलनाच्या वेळी होतो; कारण नगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून सुमारे १०० कुटुंबं तेथे रहात होती व त्यातील बहुसंख्य मागास जातीतील मुस्लीम व गरीब घरांतील होते. १०० कुटुंबांचे भवितव्य आणि नगरपालिकेने, पर्यायाने नागरिकांचे हित यातील हा संघर्ष होता; पण विरोधाला न जुमानता भांगे यांनी अतिक्रमण निर्मूलनाचा कार्यक्रम अंमलात आणला. हे करीत असतांना गरीब लोकांना आपण बेघर करीत आहोत याचे त्यांना दु:ख होते तर अतिक्रमण काढणे हे त्यांचे कर्तव्य होते. हा आपल्या मतपेटीवर हल्ला आहे हे लक्षात येताच सर्वपक्षीय नगरसेवकांनी काहूर केला आणि नगरपरिषदेत त्यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर भांगे यांची बदली होणार हे नक्की झाले. व त्यांची बदली झाली. भांगे यांची कथा ही एकमेव कथा नाही आणि भारतात अनेक कर्तव्यदक्ष चारित्र्याचे कर्तव्यकठोर अधिकारी आपले कर्तव्य करीत असतांना बळी गेलेले आहेत. आज सर्वच शहरांत नगरपालिकांच्या जागांवर अतिक्रमणे झाली आहेत. या जागा कधी गरीबांच्या झोपड्यांनी व्यापलेल्या आहेत. तर कधी त्या धनदांडग्यांच्या ताब्यात आहेत. त्यावर कारवाई करून सार्वजनिक हिताचे कशाप्रकारे संवर्धन करावयाचे हा मोठा प्रश्न आहे; कारण येथील मुख्य प्रवृत्ती सार्वजनिक


संपत्तीचा अपहार करून आपला वैयक्तिक लाभ कसा करून घ्यावयाचा ही आहे व समाजातील सर्वच घटक या लूटमारीत सामील आहेत. भांगे या अधिकाऱ्याचा एकहाती संघर्ष देशमुखांनी यात रंगवला आहे.
 कादंबरीत तिसऱ्या पातळीवरील संघर्ष हा कर्तव्यदक्ष व शुद्ध चारित्र्याचा मुख्याधिकारी भांगे आणि स्वत:स शुद्ध चारित्र्याचा मानणारे नगरपालिकेचे अध्यक्ष लालाजी यांच्यातील आहे. खरे पाहिले असता भांगे आणि लालाजी यांच्यात संघर्ष होण्याचे कारण नव्हते; कारण दोघांचाही प्रमाणिक उद्देश आपल्या शहराचा चांगल्या प्रकारे विकास करणे हा होता. सुरुवातीच्या काळात लालाजी यांना भांगे यांच्या कर्तव्यदक्षतेचे कौतुक वाटले आणि त्यांच्या मदतीने आपल्या शहराचा विकास होईल असेही वाटले. पण नंतर त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. दोघेही नि:स्पृह आहेत. दोघांनाही शहराचा विकास हवा आहे; पण लालाजी हे राजकारणी आहेत. त्यांना राजकारण सांभाळून, आपले नगरसेवक व पाठीराखे यांचे हितसंबंध जपत पुढे जायचे आहे; तर भांगे यांना शहराचा विकास करीत असताना येणाऱ्या सर्व अडचणी दूर करीत विकासाचे व समाज कल्याणाचे कार्यक्रम पुढे रेटायचे आहेत; कारण नगरसेवकांना मलिदा खाऊ देणे म्हणजे जनतेचे नुकसान करणे असे त्यांचे मत होते. लालाजी व भांगे यांच्यात संघर्ष तीन बाबीत होता. लालाजींना भांगे आपणास न विचारता, आपल्याशी चर्चा न करता महत्त्वाचे निर्णय घेतात याचे वैषम्य वाटत होते. भांग्यांनी अतिक्रमण काढण्याचा राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा निर्णय आपणास न विचारता घेतला याचा पण त्यांना राग आला होता. तिसरी गोष्ट म्हणजे हद्दवाढीसारखे व इतर अनेक निर्णय लालाजींचे नातेवाईक व पाठीराखे यांना अडचणीचे वाटत होते; म्हणून वरकरणी जरी लालाजी पाठिंबा दाखवत असले तरी भांगे यांची बदली करण्यास त्यांची भूमिका होती; कारण इतका स्वतंत्र बुद्धीचा कायद्यानुसार चालणारा अधिकारी त्यांना नको होता. पण भांग्यांच्या बदलीमुळे लालाजींची बाजू कमजोर होईल हे त्यांचे मित्र वकील बाबू यांनी ओळखले होते व झालेही तसेच; कारण लालाजींच्या अधिकाराचा नैतिक पाया दुर्बल झाला.
 चौथ्या पातळीवरचा संघर्ष नगरपालिकेची भ्रष्ट प्रशासन यंत्रणा, त्यास तोलून धरणारे राजकीय नेते व नागरीसमाज यांच्यामधील आहे. हा संघर्ष अत्यंत क्षीण स्वरूपात त्यांनी दाखवला आहे. कारण सर्वच पातळीवर नागरी समाजात जागृती नाही. त्यात आबा गुरुजी आहेत, जे शिक्षक गृहनिर्माण सोसायटीसाठी प्रयत्न करतात, पराभूत होतात आणि माघार घेतात. दुसरे कर्नल मोडक आहेत जे हॉटेल दिलबहारच्या बेकायदा बांधकामाविरूद्ध खासदारांकडे तक्रार करतात; पण खासदार
 त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात आणि मोडकांची रवानगी पोलिस कोठडीत होते. कारण नगरपालिका व लोकप्रतिनिधी यांना कायद्याचे भान नाही, औचित्य-अनौचित्य कळत नाही. भांगेच्या आधीच्या व निवृत्तीस आलेल्या मुख्याधिकाऱ्यांना कणा नाही. राजकीय नेत्यांशी संघर्ष करण्याची तयारी नाही. मालखरेसारखे आक्रमक पत्रकार हितसंबंधांचा प्रश्न येताच स्तब्ध होतात व मुख्य म्हणजे या सर्व प्रकरणात ज्यांच्या हिताचा बळी जात आहे, ज्यांच्या नागरी सुविधांवर आच येत आहे तो सामाजिक समाज गप्प आहे. आबागुरूजी व मोडक एकाकी पडतात आणि पोतदारांसारखे समाजसेवक सरकारी मदतीपासून आपली कुष्टधाम संस्था वंचित होऊ नये म्हणून कोणत्याच प्रकारच्या संघर्षाच्या राजकारणात उतरत नाहीत. ते जपून वागतात.
 कादंबरीकारास ही परिस्थिती असह्य आणि निराशजनक वाटते. कादंबरीकार तरुण असताना सुमारे वीस वर्षांपूर्वी लिहिलेली की कादंबरी आहे आणि अनेक कर्तबागार नि:स्पृह अधिकाऱ्यांना नगरपालिका प्रशासनात जे अनुभव आले त्याचे हे चित्रण आहे. त्याला एक प्रकारचे वैफल्य आहे. राज्यकर्ता वर्ग, लोक प्रतिनिधी भ्रष्ट अधिकारी व पालिकेच्या मलिद्यावर जगणारे समाजातील काही हितसंबंधी गट यांच्या सामूहिक स्वार्थावर चालणारे नगरपालिकेचे राजकारण हे जाणत्या व संवेदनशील माणसाला विषण्ण करणारे आहे. म्हणून त्यास देशमुखांनी 'अंधेरनगरी' हे नाव दिले आहे. उत्तरपेशवाईतील एक मोठा कवि शाहीर परशुराम याने 'अंधेरनगरी' या लावणीत वर्णन केल्याप्रमाणे काही प्रमाणात चित्र आहे ही गोष्ट खरी आहे. पण मुख्य प्रश्न त्यात सुधारणा कशी करायची हा आहे.
 ही स्थानिक प्रशासनाची लोकशाही पद्धत आपण गेल्या सव्वाशे वर्षापासून राबवत आहोत. यात सगळ्याच गोष्टी वाईट आहेत, पालिकेचे सर्वच व्यवहार भ्रष्ट आहेत किंवा सर्वच लोक प्रतिनिधी भ्रष्ट आहेत असा प्रकार नसला तरी यात स्पर्धेचे जे राजकारण आहे ते संपूर्ण प्रक्रियेस भ्रष्ट बनवते आणि समाजात कार्यरत असणारे दबावगट व हितसंबंधी गट सातत्याने आपल्या गटस्वार्थासाठी प्रयत्न करीत असतात. निर्णय घेणाऱ्या यंत्रणेवर दबाव टाकत असतात. अमेरिकेत सर्वच सभागृहात या प्रकारचे 'लॉबिंग' चालते. अशा प्रकारचे दबावगटाचे व हितसंबंधी गटांचे राजकारण व सर्वसामान्यांचे हित जपणारे राजकारण यांच्यात जो सततचा संघर्ष आहे तो कसा सोडवायचा व नागरी समाजात निर्माण झालेल्या संघटना व संस्था यात काय भूमिका बजावू शकतात हे पाहाणे महत्त्वाचे आहे. देशमुखांनी ज्या काळात ही कादंबरी लिहिली, त्या काळात अजून अशा संघटना व संस्था निर्माण झाल्या नव्हत्या. नगरपालिकांच्या व्यवहारात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होत असला


तरी तिचे सर्वच व्यवहार 'अंधेरनगरी'च्या परिघात येत नाहीत. मुद्दा लोकांनी आपल्या अधिकार रक्षणार्थ जास्त जागृत होण्याचा आहे.
 या कादंबरीत केवळ तीन वर्षांतील नगरपालिकेतील राजकारणाचा वेध घेतला असून लेखक प्रशासकीय अधिकारी असल्यामुळे त्यातील बारकावे त्यात चांगल्याप्रकारे आले आहेत. उजेड कधी पडणार त्यावरच अंधेरनगरीतील अंधार दूर होणे अवलंबून आहे. कादंबरीत राजकारणाची निगेटिव्ह बाजू प्रत्ययकारकरीत्या आली आहे. कादंबरीच्या निवेदनाचा प्रवाह चांगला असून वाचक कोठेही कंटाळत नाही हे लेखकाच्या कथनशैलीचे यश आहे. मुख्य पात्रे ठाशीव स्वरूपात चित्रित झाले असून त्या चित्रणात कोणतीही अतिशयोक्ती नाही. मराठीतील प्रख्यात कादंबरीकार भाऊ पाध्ये यांनी अशा प्रकारच्या सत्ताकारणास डोंबाऱ्याचा खेळ म्हटले होते. नगरपालिकेतील राजकारणाचा ‘डोंबाऱ्याचा खेळ' या कादंबरीत देशमुखांनी यशस्वीरित्या दाखवला आहे.

लक्ष्मीकांत देशमुखांच्या कादंबरीतील
मुस्लीम जीवन चित्रण

रफीक सुरज

 लक्ष्मीकांत देशमुख यांचा १९८० नंतरच्या कालखंडातील एक हरहुन्नरी आणि समर्थ लेखक म्हणून उल्लेख करता येईल. कादंबरी आणि कथा या दोन्ही प्रकारांत त्यांची बंडखोर वृत्ती दिसून आली आहे. देशमुखांची एकूण जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बरीचशी भावुक, आत्मीयतेची आणि वास्तवतेकडे झुकणारी अशी आहे. त्यांनी आपल्या लेखनातून समकालीन वास्तवाचा धीटपणे वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या आतापर्यंत 'सलोमी', 'अंधेरनगरी', 'होते कुरूप वेडे', 'ऑक्टोपस' आणि 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' अशा एकूण पाच कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. या पाच कादंबऱ्यांपैकी 'सलोमी' आणि 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' या दोन कादंबऱ्यांतून मुस्लीम जीवनचित्रण प्रकर्षाने प्रकट झाले आहे. प्रस्तुत निबंधात या दोन कादंबऱ्यांच्या आधारे देशमुखांच्या कादंबरीतील मुस्लीम जीवन चित्रणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.
 देशमखांची 'सलोमी' ही कादंबरी १९९० साली तर 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' ही कादंबरी २००४ साली प्रकाशित झाली. 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' या बृहद्कादंबरीची पहिली आवृत्ती सुरुवातीस जवळजवळ साडेनऊशे पृष्ठांची इतक्या मोठ्या आकाराची होती. मात्र आता या कादंबरीची दुसरी आवृत्ती आवश्यक त्या बदलांसह पुष्कळच छोटी होत (सुमारे ४६० पृष्ठांची) वाचकांसमोर येते आहे. प्रस्तुत विवेचनासाठी 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' ची नव्याने येत असलेली दुसरी आवृत्ती आधारभूत मानली आहे.
_  'सलोमी' ही एका बंडखोर महाराष्ट्रीयन मुस्लीम स्त्रीच्या वाताहतीची कहाणी आहे. तर 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' मध्ये जीवघेण्या संघर्षात सर्वस्व गमावून बसलेल्या अफगाणिस्तान या देशाची आकांतकथा आहे. या दोन्ही कादंबऱ्यांतील भौगोलिक प्रदेश आणि संस्कृती एकदम भिन्न अशी आहे. म्हणूनच दोन्ही कादंबऱ्यांचा
स्वतंत्रपणे विचार करणे सोईचे ठरेल. मराठी साहित्यात मुस्लीम स्त्रीजीवन अगदी अल्प प्रमाणात प्रकट झाले आहे. मुस्लीम स्त्रीजीवनाचे मराठीत म्हणावे तितके दखल घेण्याजोगे लेखन झालेले नाही. मुस्लीम आणि मुस्लिमेतर लेखकांनी याबाबतीत मुस्लीम स्त्रीच्या खऱ्याखुऱ्या वास्तव जगाकडे पाठ फिरविली आहे. याबाबतीत जे काही स्त्रीजीवन चित्रणाचे मोजके प्रयत्न झालेले आहेत त्यामध्ये लक्ष्मीकांत देशमुखांच्या 'सलोमी' ची नोंद घ्यावी लागते.
 मुस्लीम स्त्रीच्या बाबतीत मराठी साहित्यात खूपच उपेक्षा वाट्याला आली आहे. काही अपवाद वगळले तर मुस्लीम स्त्रीकडे 'माणूस' म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याकडे निर्माण झाला नाही असे म्हणता येईल. एकूणच मराठी लेखकाच्या मुस्लीम धर्माविषयीच्या कल्पना आणि त्याचे मुस्लीम मानसिकता समजून घेण्यातील अनुभवविश्व खूपच तोकडे पडते आहेत. त्यामुळे मुस्लीम स्त्री साहित्यात येणेच दुरापास्त होऊन गेले आहे. मुस्लीम स्त्रीकडे आस्थेने पहावा असा व्यापक परीघ निर्माण करणे मराठी लेखकांना जमलेले नाही.
 मुस्लीम स्त्रीच्या कार्याची, कर्तृत्वाची दखल सामाजिक-राजकीय स्तरावर फारशी घेतली गेली नाही. साहित्यातही तिच्या अस्तित्वाची दखल पुरुषावर प्रेम करणारी एक उत्तम माता, पत्नी, पतिव्रता, बहीण किंवा दुसऱ्या टोकाला उत्तम मोहमयी गणिका आणि वाईट जीवनमूल्य असलेली बाजारी स्त्री अशा पद्धतीने घेतली गेली आहे. आपल्या एकूण व्यवस्थेत स्त्री दुय्यमच मानली गेली. मुस्लीम स्त्रीला तर अधिकच उपेक्षा सहन करावी लागून ती दुय्यमच नव्हे तर 'तिय्यम' स्थानावर राहिली आहे. हा तिय्यमपणा कायम टिकून राहावा म्हणून तिची जीवनपद्धती विशिष्ट चौकटीत आखून दिलेली आहे. रूढ आणि चाकोरीबद्ध जीवनामध्येच ती गुरफटून राहावी अशा व्यवस्था करण्यात आली. अशा जगण्यातच तिची इतिकर्तव्यता आहे असे सातत्याने तिच्या मनावर बिंबवले गेले आहे. तिचे सामर्थ्य क्षीण करून ती गुलामगिरीत कशी राहील याचे पद्धतशीरपणे नियोजन करण्यात आले. इस्लामने 'स्त्री' च्या हक्कांचे आणि स्वातंत्र्याचे समर्थन केलेले आहे. मात्र या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून सरंजामी व्यवस्था आणि तिच्या अंकित धर्मगुरूंनी मुस्लीम स्त्रीला एका विशिष्ट चौकटीत बंदिस्त केले. मुस्लीम स्त्रीवरील या अन्यायाला इस्लाम जबाबदार नसून कर्मठ, सनातनी, सरंजामी व्यवस्था अधिक जबाबदार आहे.
 'तलाक व बुरखा एवढेच प्रश्न म्हणजे मुस्लीम स्त्रीचे प्रश्न' अशा मनोवृत्तीतून मुस्लीम स्त्रीच्या दुःखाचे चित्रण सातत्याने पुढे आणले जाते. अधिकांश मुस्लीम समाज ग्रामीण भागात राहणारा असा आहे. ग्रामीण भागातील मुस्लीम स्त्री पुरुषांच्या
 बरोबरीने काबाडकष्ट करून द्रव्यार्जन करते. या स्त्रीवर्गाचे जगण्याचे इतर खूपच प्रश्न असूनही या प्रश्नांना बगल दिली जाते. स्त्रियांच्या समस्यांचे स्वरूप गुंतागुंतीचे आणि संमिश्र असते. सामाजिक परिस्थितीच्या संदर्भत या स्त्री-समस्यांचा खोलवर विचार केला गेल्याशिवाय व त्या समस्यांची गुंतागुंत लक्षात घेतल्याशिवाय वास्तव चित्रण कठीण होते. इस्लाममधील स्त्रियांचे स्थान अधोरेखित करताना साने गुरुजी म्हणतात- 'मुसलमानी धर्म काही स्त्रियांना पडद्यात बसा नाही सांगत. काबाला प्रदक्षिणा घालताना स्त्रियांनी तोंडावर जरा पदर ओढून घ्यावा, एवढेच पैगंबराचे सांगणे. महंमदांच्या काही पत्ल्या प्रवचने करीत. स्त्रीला वारसा हक्क देणारे पैगंबर स्त्रीला कमी मानीत नसत. 'पुरुष काय, स्त्री काय एकाच मातीतून आलात' असे ते म्हणत. अरबस्तानात लहान मुलींना वाळूत जिवंत पुरून मारीत. आई-बापांना मुलींना सांभाळणे कठीण जाई. कशाला मुलगी जन्मली, असे म्हणत. परंतु पैगंबरांनी या गोष्टीला आळा घातला. कुराणात पुन:पुन्हा मुलींना नीट वागवा असे उल्लेख आहेत. परंतु इस्लाममध्ये पडदा आला खरा. केमालपाशाने तुर्कस्थानातून तो दवडला. परंतु इतर मुस्लीम राष्ट्रांतून तो अजून आहे. हिंदुस्थानातही आहे. मुस्लीम संस्कृतीने हिंदू संस्कृतीसही हा बुरखा बहाल केला. पडदा म्हणजे प्रतिष्ठितपणाचे लक्षण! गरीबांना पडदा घेऊन कसे चालेल? त्यांना तर कामाला जायला हवे. गरीबात मोकळेपणा राहिला. ही दळभद्री चाल श्रीमंतात, नबाबात, राजेराजवाड्यात राहिली.' अगदी शंभर वर्षांपूर्वीपर्यंत इतर सामाजात विधवा विवाहास मान्यता नव्हती. पण इस्लामने विधवा विवाहाला चौदाशे वर्षांपूर्वीच मान्यता दिली आहे. स्वत: मुहम्मद पैगंबरांनी विधवेशी लग्न करून जगापुढे खूप मोठा आदर्श ठेवला आहे. इस्लामने लग्नाच्या संदर्भात स्त्रीच्या मताला महत्त्वपूर्ण स्थान दिले आहे. तलाक घेण्यासंदर्भातही तिला अधिक अधिकार दिलेले आहेत. पण इस्लामला अभिप्रेत असलेले स्त्रीस्वातंत्र्य वास्तव जीवनात मुस्लीम स्त्रीला का उपभोगता येत नाही? याचे मुख्यत्वे कारण पुरुषप्रधान संस्कृतीचे खोलवर रुजलेले संस्कार हेच होय.
 'अक्षरओळख म्हणजे साक्षरता' अशी जर आपण साक्षर असण्याची व्याख्या केली तर बहुसंख्य मुस्लीम स्त्रिया साक्षर ठरू शकतील. मुस्लिमांची धर्मभाषा अरबी आहे. स्त्रियांना कुराणपठण करता आले पाहिजे ही अपेक्षा सर्वसाधारण मुसलमान माणूस बाळगतोच. बहुतांशी स्त्रियांना नमाज पढण्यापुरती, कुराण वाचण्यापुरती अरबी भाषेच्या अक्षरांची ओळख आहे. मात्र अर्थाशिवायची ही अक्षरओळख बहुतेक जणींना व्यावहारिक गोष्टींत उपयोगी पडत नाही. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर, महाराष्ट्रातील मुस्लीम व्यवहारासाठी मराठी भाषा वापरतो. मराठी भाषेची

आळख मुस्लीम स्त्रियांच्या टक्केवरीच्या तलनेत अत्यंत अल्प अशी आहे. या अर्थाने निम्म्याहून अधिक मुस्लीम स्त्रीच्या जीवनात निर्माण होणारे प्रश्न मराठी साहित्यात प्रकट झाले आहेत काय? मुस्लिमांचे लोकसंख्येत १०.५ टक्के एवढे प्रमाण असूनही राजकारणात मात्र ३ टक्के, शिक्षणात १.५ टक्के, नोकरीत १ टक्का तर व्यापारात २ टक्के असे अत्पल्प आहे. अशीच आकडेवारी आपण मुस्लीम स्त्रियांच्या बाबतीत तपासून पाहिली तर धक्कादायक निष्कर्ष हाती येतील. खेड्यापाड्यातील मुस्लीम स्त्री ही श्रमजीवी आहे. पण कष्टकरी असूनही तिला नेहमीच असुरक्षितपणाच्या रेट्याखाली राहावे लागते आहे हे वास्तव चित्र मराठी साहित्यात कितपत प्रकट झाले आहे? शेतामध्ये राबणारी, मोलमजुरी करणारी, दारोदार भटकून खेळणी विकणारी, अत्तारीचा व्यवसाय करणारी, हलके फुलके उद्योग करून अत्यंत सामान्य जीवन जगणारी, हलाखीत संसारगाडा पुढे रेटणारी मुस्लीम स्त्री मराठी साहित्यात आलीच नाही. या पार्श्वभूमीवर लक्ष्मीकांत देशमुखांनी आपल्या कादंबरीतून अत्यंत जिव्हाळ्याने मुस्लीम स्त्री जीवन रेखाटण्याचा केलेला प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.
 "सलोमी' ही अवघ्या साठेक पृष्ठांची छोटेखानी कादंबरी. एका कर्मठ वातावरणात वाढलेल्या सलोमी या स्वतंत्र विचाराच्या आणि संवेदनशील तरुणीची ही कथा आहे. मुस्लीम स्त्रियांनी चित्रपट पाहू नयेत, त्यामुळे त्यांच्यावर अनैतिक संस्कार घडतील अशी हेतूने काढलेल्या मुल्ला-मौलवींच्या फतव्याला सलोमी विरोध करते. काही मुलींना घेऊन ती थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघून आपल्या परीने प्रत्यत्तर देते. मात्र तिला या कृतीचे खूप मोठे परिणाम भोगावे लागतात. सिनेमाबंदी विरुद्धच्या तिच्या आंदोलनामुळे घरची मंडळी नाराज होतात. सलोमीचे तिच्या इच्छेविरुद्ध एका चंगीभंगी, मंदिरा आणि मदिराक्षीच्या जगात मशगुल असलेल्या छान छोकी रईसजाद्याशी लग्न लावून दिले जाते. अन्वर नावाच्या रईसजाद्याने कपटनीतीने लग्नापूर्वीच सलोमीला आपल्या वासनेची शिकार बनविले होते. लग्नानंतरही तो सलोमीवर पाशवी अत्याचार करीत राहतो. सलोमी गर्भवती राहते पण दुर्दैवाने तिचे बाळ मृत जन्माला येते. अन्वरचा छंदी फंदी शौक चालूच राहतो. त्याचा सलोमीतील रस संपत जातो आणि दुसऱ्या एका नव्या स्त्रीच्या शोधात राहतो. यामध्ये सलोमीची अडचण वाटू लागल्याने तो सहजपणे तिला तलाक देऊन तिचा त्याग करतो. सलोमी माहेरी येते. पण आधीच नाराज असणारे तिचे माहेरचे लोक पुन्हा जास्तच तिचा तिरस्कार करू लागतात. सलोमी तलाकपीडित स्त्रियांची एक संघटना स्थापन करते. या सगळ्या घडामोडीत सलोमीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या विजयची अज्ञात मारेकऱ्यांकडून हत्या होते. खरे तर विजयमध्ये


सलोमीचा जीव गुंतत चालला होता. विजयच्या मृत्यूमुळे सलोमी मानसिकदृष्ट्या कोसळून पडते. आपल्या पाठीवरच्या बहिणींचे विवाह खोळंबले आहेत, याची जाणीव झाल्याने ती नाईलाजास्तव गल्फकंट्रीतील सुलेमान शेखशी विवाहबद्ध व्हायला तयार होते. खरे तर सुलेमान तिला पत्नीऐवजी रखेली म्हणूनच किंमत देणार याची तिला कल्पना आहे. पण तरीही ती या तडजोडीला तयार होते व स्त्रीच्या वाट्याला येणाऱ्या एका भयावह सत्याची जाणीव वाचकांना होऊन जाते. सलोमीचे यापुढील आयुष्य करुणाजनक असल्याचे वास्तव मनाला हुरहुर लावून जाते.
 लक्ष्मीकांत देशमुखांनी 'सलोमी' या कादंबरीतून मुस्लीम समाजजीवनातील विविध प्रश्न हाताळण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात प्रामुख्याने तलाक, धार्मिक रीतिरिवाज, स्त्री स्वातंत्र्य अशा काही घटकांविषयी मांडणी त्यांनी केली आहे. मुस्लीम कथाआशयाला आवश्यक अशा सांकेतिक खुणांचा खुबीदारपणे वापर देशमुख करतात. त्यामुळे मुस्लीम समाजजीवनाची पाश्वभूमी सहजपणे उभी राहते. मात्र दुसऱ्या बाजूला सलोमीची व्यक्तिरेखा प्रभावी किंवा ठसठशीतपणे समोर येत नाही. पुरुषप्रधान धर्मसंस्कृतीला छेद देण्याची पात्रता तिच्या मानसिकेत दिसत नाही. त्यामुळे मूकपणे ती या संस्कृतीला शरण जाते. अन्वरच्या छान-छोकी आणि नाटकी स्वभावाचा थोडाफार अंदाज येऊनही त्याच्याबरोबर डाक बंगल्यावर एकटीने जाणे; विवाहानंतर तो कोठेवाल्याबाईचे उंबरठे झिजवतो आहे हे समजल्यावर त्याच्याशी संबंध ठेवायला तयार होणे, त्याच्या सॅडिस्ट शृंगार-क्रीडा हव्याहव्याशा वाटू लागणे, आपल्यामुळे आपली छोटी बहीण आयेशा हिचे लग्न मोडू नये म्हणून पुनर्विवाहास तयार होणे, अरब शेखाची रखेली होण्यास तयारी दर्शविणे अशा अनेक ठिकाणी सलोमी आपल्या मनाचा कणखरपणा दाखविण्यात अपयशी ठरते. त्यामुळे सलोमीवर आलेल्या दुर्दैवी परवडीला सलोमीच अधिक जबाबदार ठरते. ती भाबडी नायिका वाटू लागते. सलोमीच्या तुलनेत अधिक बंडखोरपणा दाखविणाऱ्या नायिका देशमुखांच्या 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' मध्ये प्रकट झाल्या आहेत.
 निघृण सत्तास्पर्धा आणि निरंकुश नेतृत्व यांत गरफटलेले अफगाणिस्तानातील सत्ताकारण हे मुख्य आशयसूत्र 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' मध्ये पाहावयास मिळते. १९७८ साली तत्कालीन अखंड सोव्हिएत युनियनच्या साम्यवादी विचाधारेतून प्रेरणा घेऊन डाव्या विचारांची राजवट अफगाणिस्तानात सत्तास्थानी आहे. मात्र १२ वर्षे टिकलेली ही राजवट गैरइस्लामी आहे म्हणून ती त्याज्य आहे असे मानून तेथील मुल्ला मौलवींनी प्रतिकार सुरू केला. यातून १९७८ ते २०१३ या पाव शतकात अफगाणिस्तानाचा एकही दिवस असा गेला नाही, ज्या दिवशी गोळीबार,


रक्तपात आणि खूनखराबा झाला नाही. सारा अफगाण देश त्यात असाहाय्यपणे भरडत गेला. खास करून स्त्रियांना अपरिमित अत्याचारांना दोन्ही बाजूंनी बळी पडावं लागलं. अफगाणी मुलांच्या हातात शिक्षण सोडून बंदुका देण्यात आल्या. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील अफगाणिस्तानचा हा इतिहास आणि त्यामागचं आंतरराष्ट्रीय शीतयुद्ध, पाश्चात्त्यांची साम्यवादविरोधी आघाडी आणि पेट्रोलडॉलर्समुळे संपन्न झालेल्या अरब देशांतून सुरू झालेली इस्लामी पुनरुज्जीवनवादाची चळवळ; त्यामुळे सतत संघर्ष, संहार आणि रक्तपात, सामान्य अफगाणी माणसाची झालेली ससेहोलपट हा या कादंबरीचा मुख्य विषय आहे. आपण मूलत: ललित लेखक असल्यामुळे कादंबरीच्या माध्यमातून आम अफगाणी माणूस, त्याची सुखदुखं: आणि त्याच्या वाट्याला या संघर्षापुढे आलेला भोग हे मध्यवर्ती सूत्र ठेवून चित्रणाचा प्रयत्न केल्याचे प्रस्तुत लेखकाने प्रास्ताविकात मत नोंदवले आहे.
 अफगाणिस्तान हा बंडखोर टोळ्यांचा देश म्हणून ओळखला जातो. या देशाचा बहुतेक भाग डोंगराळ असून शेतीयोग्य जमीन अवघी वीस टक्केच आहे. त्यात थंडीच्या दिवसात जीवघेणी बर्फवृष्टीही होते. अफगाणी माणूस हा खोल सश्रद्ध, धार्मिक आहे व इस्लाम हा त्याचा जगण्याचा धर्म आहे. टोळ्या करून जगणाऱ्या अफगाणिस्तानात शिक्षणाविषयी फारशी आस्था नाही. काबूल या ठिकाणी जगप्रसिद्ध असे भव्य विद्यापीठ आहे. अफगाणिस्तानला सोव्हियत रशिया, चीन, इराण, पाकिस्तान व भारत अशा भिन्न भिन्न देशांच्या सीमारेषा लाभल्या आहेत. या देशांत साम्यवादी, राजेशाही, लष्करशाही, प्रजासत्ताक अशा राजवटींचा प्रभाव. साहजिकच अफगाणिस्तानमधील राजवटीवरही या गोष्टींचा प्रभाव आहेच. अफगाणिस्तानने अमानुल्लाच्या नेतृत्वाखाली तिसरे अँग्लो अफगाण युद्ध लढून आपलं राजकीय व परराष्ट्र धोरण ठरवण्याचं साम्राज्य मिळविलं होतं. ब्रिटनचं नामधारी मांडलिकत्व झुगारून दिलं होतं. राजा अमानुल्लाने सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. मुलींच्यासाठी शाळा सुरू करणे, गुलामी व वेठबिगारी कायद्याने बंद करणे, स्त्रियांना बुरख्याची सक्ती करता कामा नये असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय त्याने घेतले होते. विशेष करून ज्या हाजरा जमातीला राजद्रोहाची शिक्षा म्हणून कायमचं गुलामीत ठेवलं होतं, त्यांची गुलामी नष्ट करून तेही या देशाचे ताजिक पठाणांप्रमाणे समान अधिकार असलेले नागरिक आहेत असं त्यानेच ठासून सांगितलं. आपल्या दहा-बारा वर्षांच्या कारकिर्दीत अमानुल्लाला आधुनिक विचार रुजविण्यात बऱ्यापैकी यश येत होतं. पण १९२९ साली सत्तेवरून पायउतार व्हावं लागतं आणि पुढे जहीरशहा दीर्घकाळासाठी राजा बनतो. १९७३ साली अफगाणिस्तानातील त्याची सत्ता संपुष्टात येऊन दाऊदखान हा


राष्ट्राध्यक्ष बनतो आणि अफगाणिस्तानातील अस्थिर राजवटीला सुरुवात होते. पुढे चार-पाच वर्षांसाठी नवा राष्ट्राध्यक्ष, त्यासाठी सत्तांतर (कुदेत्ते) ची स्पर्धा सुरू होते. १९७८ साली सौर राष्ट्रकांती होऊन नूर महंमद तराकी राष्ट्राध्यक्ष होतो. तराकी हा सामान्य अफगाण, शेतकरी, कष्टकरी व टोळी जीवनाचं वास्तव चित्रण करणारा संवेदनशील लेखक आहे. सोव्हिएत युनियनप्रमाणे देशात समाजवादी राज्यशासन आणण्यासाठी धडपडणारा आणि समतेची स्वप्ने पाहणारा हा नेता आहे. तराकीला 'इस्लाम'ला केंद्रवर्ती करून राजसत्ता चालविणे पटत नाही. राज्यकर्ते अफूच्या गोळीसारखा इस्लाम धर्माचा वापर करतात व जनतेला दारिद्र्यातही बंड न करता पिचत ठेवतात असे तराकीचे स्पष्ट म्हणणे आहे. मात्र तराकीला राष्ट्राध्यक्षपदाचा उपभोग फार काळासाठी घेता येत नाही. दीड-दोन वर्षांतच त्याला ठार मारून हफीजुल्ला अमीन सत्ता स्थापन करतो. तर अमीनला दूर सारून बबराक कमाल राष्ट्रध्यक्ष बनतो. १९८६ ला राष्ट्रध्यक्षपदी डॉ. नजिबुल्लाहची निवड होते. पण देशांतर्गत वाढत चाललेल्या मुजाहिदिनांच्या प्रभावामुळे, नजिबुल्लाहला भर रस्त्यावर फाशी देऊन प्रो. रब्बानी राष्ट्राध्यक्ष बनतो. १९९२ साली कम्युनिस्ट विचारसरणी बाजूला सारली जाऊन रब्बानीसारख्या कट्टर, पुनरुज्जीवनवादी कर्मठ नेत्याचं नेतृत्व पुढे येतं. जवळजवळ दोन अडीच दशकांच्या कालखंडात अफगाणिस्तानने टोकाचा रक्तरंजित संघर्ष पाहिलेला आहे. सतत संघर्ष, संहार व रक्तपातामुळे सामान्य अफगाणी माणसांची झालेली ससेहोलपट हा 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' या कादंबरीचा मुख्य विषय आहे.
 १९३३ ते १९५३ या वीस वर्षांच्या कालखंडात दाऊदखान पंतप्रधान असताना, त्याने या काळात 'इन्फ्रास्ट्रक्चर' विकसित करण्यावर भर दिला. रस्ते, संदेशवहन, विमानतळ व वाहतुकीवर लक्ष केंद्रित केले. बग्राम व कंदाहार हे दोन विमानतळ बांधले. सैन्याच्या आधुनिकीकरणावर भर देऊन केंद्रीय सत्ता बळकट केली होती. मात्र या काळात रशियाचा अफगाणिस्तानातील सत्ताकारणातील प्रभाव वाढत चालला. तर दुसऱ्या बाजूला इस्लाम हीच जीवनपद्धती मानणाऱ्या बहुसंख्य वर्गाला रशिया आणि रशियाचा कम्युनिझम शत्रुवत वाटत होता. अफगाणिस्तान हा टोळ्यांचा देश आहे. आजच्या काळातही तो मध्ययुगातील देशी भटकं जिणं जगत आहे. जमीन, कुरणासाठी मुलुखगिरी करणं ही त्याच्या जगण्याची मूलभूत अट आहे. हे लोक भांडखोर आहेत पण त्याहीपेक्षा बंडखोर आहेत. ते स्वतंत्र, आझादवृत्तीने आहेत. कुणाचीही गुलामी ते कदपि सहन करीत नाहीत. अशा मनोवृत्तीमुळे अफगाणी माणसाने आपल्यावर अंकुश ठेवू पाहणारी सत्ता उलटून टाकल्याने स्पष्टपणे लक्षात येते.


 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' या कादंबरीतून वास्तव, खरीखुरी पात्रे घेऊन अफगाणिस्तानचा विसाव्या शतकाच्या उत्तरार्धाचा इतिहास मांडणे एवढीच गोष्ट लेखकाने केलेली नाही. कादंबरीच्या प्रास्ताविकात लेखकाने नोंदविल्याप्रमाणे ही कादंबरी Faction स्वरूपाची आहे, ज्यात Fact आणि Fiction दोन्हीचं कलात्मक मिश्रण आहे. राजा अमानुल्ला ते मुल्ला मोहम्मद उमर या तालिबानच्या सर्वोच्च धार्मिक नेत्यांपर्यंतची खरी वास्तव पात्रं आहेत. अमेरिका व सोव्हिएत युनियनचा संघर्ष आहे. पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि इराणचा हस्तक्षेप आहे. हा सारा वास्तव इतिहास, घटना व प्रसंग आहेत. म्हणून कादंबरीत तारखा, सनावळ्या, मुलाखती व पत्रकार परिषदा आहेत. प्रमुख नेत्यांचं लौकिक दर्शन वास्तव धर्तीवर, तर वैयक्तिक जीवन कलात्मक पद्धतीनं रंगवताना ती पात्रं जिवंत करण्यासाठी सत्याला कल्पनेची ही तीन विचारधारांची प्रतिनिधित्व करणारी काल्पनिक पात्रं असून त्यांची व त्यांच्या कटुंबाची पन्नास वर्षांची कहाणी आहे.
 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' या कादंबरीची मुख्य व्यक्तिरेखा म्हणजे या कादंबरीचा नायक अन्वर. हिंदुकुश पर्वताच्या वळचणीला वसलेल्या काबूलपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेलं पगमान हे अन्वरचं गाव. डोंगरमाथ्यावर व दरीत चिनार आणि देवनारच्या उंच देखण्या झाडांच्या गर्दीत वसलेलं. पगमानच्या जमिनीत पिकणाऱ्या सुक्या मेव्याला काबूलमध्ये फार मागणी आहे. अन्वरचे वडील पेशइमाम, त्यामुळे घरातील वातावरण धार्मिक. इस्लाम हे त्यांच्या जीविताचं पहिलं व सर्वोच्च ध्येय. रशियाच्या मॉस्को विद्यापीठात इंजिनिअरिंगचं उच्च शिक्षण घेण्यासाठी अन्वर चार वर्षांसाठी निघाला आहे. येथून या कादंबरीचे कथानक सुरू होते. काबूलच्या शाळेत शिकत असताना हाफिजुल्ल अमीन या विज्ञानाच्या शिक्षकामुळे अन्वर आधुनिक व पुरोगामी विचारसरणीकडे झुकतो. अमीन त्याला लेनिन मार्क्सची पुस्तके वाचायला देतात. सोव्हियत रशियामध्ये लेनिन-मार्क्स विचारांमुळे क्रांती घडून आली व कष्टकऱ्यांना चांगले दिवस आले. याउलट आपल्या अफगाणिस्तानात राजेशाहीमुळे देश पिचतो आहे आणि मूठभर जमीनदार, मुल्लामौलवी ऐशारामात लोळत आहेत असे विचार अन्वरच्या मनावर अमीननी बिंबवले. घरचं वातावरण कट्टर धार्मिक आणि बाहेर समाजवादी विचारांचा प्रभाव अशा कारणांमुळे अन्वरची मन:स्थिती सदैव संभ्रमित, द्विधा व्हायची. तो जसे वय वाढत जाईल तसा दिवसेंदिवस अंतर्मुख व गंभीर होत गेला. अन्वरचा एक थोरला बंधू हैदर राजकीय चळवळीत सक्रीय राहिल्याने तुरुंगवास भोगून तो कुठेतरी परागंदा झाला होता. तर आणखीन एक भाऊ सईद हा मात्र धार्मिक वृत्तीचा व शेती व्यवसाय बघणारा असा आहे. अन्वरवर त्याची बालपणीची सवंगडी झैनब


ही त्याच्यावर मनापासून प्रेम करते. तिने त्याला आपला भावी पती समजून टाकलं आहे. पण पुढे अन्वर मॉस्कोला गेल्यावर तान्या ऊर्फ तरानाच्या प्रेमात पड़न विवाहबद्ध होतो. तान्या ही खरे तर रशियन गुप्तचर संघटनेतील आहे. याचा उलगडा कित्येक वर्षानंतर अन्वरला होतो व तो तिच्याशी संबंध तोडतो. हे सहन न होऊन तराना आत्महत्या करते. अन्वर पुन्हा झैनबकडे वळून तो तिच्याशी निकाह लावतो. अन्वरची पुतणी जमीला ही अफगाणिस्तानातील एक प्रतिनिधिक स्त्री व्यक्तिरेखा म्हणून चित्रित झाली आहे. जमीला ही अत्यंत तरल काव्यवृत्तीची संवेदनशील कवयित्री आहे. अफगाणिस्तानात समतेसाठी, लोकशाहीसाठी आणि स्त्री स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणाऱ्या जमीलाच्या आयुष्याची परिणिती तिला दगडाने ठेचून मारण्याच्या शिक्षेत होते व कादंबरी आपल्यासमोर अनेक प्रश्न उभे करून संपते.
 कैरोच्या अल - अझर या जगप्रसिद्ध इस्लामिक विद्या केंद्रातून धर्मशिक्षणाची सर्वोच्च पदवी प्रावीण्यसह संपादन केलेले धर्माचार्य म्हणजे प्रो. करीमल्ला. त्यांनी आपल्या धर्मविषयक व्याख्यानांनी व कुराण, हदीस, शरीयतच्या भाष्यांनी अनेक प्रतिष्ठित अभिजन व धार्मिक नेत्यांना आकर्षित केलं होतं. आपल्या देशातील वाढती आधुनिकता, युरोपियन पेहराव-चालीरितींना येत असलेली प्रतिष्ठा, सोव्हियत युनियनची वाढती मैत्री व डावीकडे झुकणाऱ्या विचारांना बुद्धिजीवी वर्गात मिळत जाणारी प्रतिष्ठा - या साऱ्या बाबी करीमुल्लांसाठी चिंतेच्या आहेत. ते सतत या गोष्टींना आपल्या भाषणांतून विरोध करतात. 'माझ्या अफगाणिस्तानची प्रगती मला पण हवीय - पण ती इस्लाम सोडून नव्हे! इस्लाम हा केवळ व्यक्तींनी पाळायचा धर्म नाही, तर ती एक जीवनपद्धती आहे, सर्वश्रेष्ठ व कोणत्याही बदलांची आवश्यकता नसलेली. तिच्याविना होणारी प्रगती ही केवळ भौतिक भोगवादी असेल! त्यात आपण आपला इस्लामी आत्मा गमावून बसू!' (पृष्ठ ४२) ही प्रो. करीमुल्लांची पुनरुज्जीवनवादी विचारसरणी आहे. त्यांनी स्त्रियांच्या बुरखा पद्धतीचा कडाडून आग्रह धरला. मात्र आधुनिक विचारसरणीच्या विद्यार्थ्यांकडून करीमुल्लांच्या या आग्रही भूमिकेला प्रचंड विरोध होतो. 'प्रेषितांनी त्यांच्या काळात जो क्रांतदर्शीपणा व पुरोगामीपणा दाखवला, पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना समान दर्जा दिला. त्याच्यापुढे आपण आजच्या काळात जायला हवं, किमानपक्षी तेवढं तरी कायम ठेवायला हवं!' अशी भूमिका घेतली जाते. करीमुल्ला. आणि अन्वर यांच्या भूमिकेत खूप मोठे मतभेद आहे. अन्वर कम्युनिस्ट विचारांचा पुरस्कर्ता आहे. मात्र प्रो. करीमुल्ला कम्युनिस्ट राजवटीवर जोरदार टीका करतात. कम्युनिस्ट राजवटीत माणूस व त्याच्या आध्यात्मिक जाणिवांना काही स्थान नाही. त्यापेक्षा इस्लाम हाच परिपूर्ण


धर्म आहे. 'इस्लामनं केवळ माणसाच्या पारलौकिक व आध्यात्मिक जाणिवेचा, भुकेचा विचार केला नाही, तर इहलोकाच्या व माणसाच्या सर्व अंगांनी व्यापलेल्या जीवनाचा विचार केला आहे. इस्लामी राजवटीचा आम्ही ध्येय म्हणून अंगीकार केला आहे. कारण त्यात माणसाच्या सर्वांगीण प्रगतीला वाव आहे. तो जसा अस्सल इहवादी, भौतिकतेचे महत्त्व जाणणारा व्यवहारी धर्म आहे, तसाच त्यानं संपूर्णपणे माणसाच्या आध्यात्मिक जाणिवेचा व त्याच्या कमतरतेचा विचार करून ते तत्त्वज्ञान आचरणासाठी दिलं आहे, ते अंगीकारलं तर राजकारण व सत्तेचा पाया शांती व माणुसकी हाच राहतो आहे. हे लक्षात येईल! आज आपली दीन - हीन अवस्था त्याचं योग्य आकलन न झाल्यामुळे आहे. म्हणून मी इस्लामी मूलतत्त्ववादी नाही तर इस्लामी पुनरुज्जीवनवादी आहे.' (पृष्ठ १२२ - १२३). प्रो. करीमुल्लांनी आपल्या या भूमिकेचा सतत पाठपुरावा केला. त्यासाठी व्यक्तिगत जीवनात त्यांना खूप मोठा मनस्तापही सहन करावा लागला. त्यांचा स्वत:चा मुलगा हाफिज हा त्यांच्या विचारसरणीच्या विरोधात आहे. तो कम्युनिस्टांच्या बाजूने लढताना जिहादी हल्ल्यात मारला जातो. आपल्या विचार आणि तत्त्वांना विरोध करणाऱ्या मुलाच्या अंत्यविधीलाही हजर राहण्यास करीमुल्ला नकार देतात. इस्लाम धर्माला मान्य नसणारी आत्महत्येसारखी कृती करून मरणाला कवटाळण्याची आपल्या पत्नीची कृती करिमुल्लांना खूप व्यथित करते. आपल्या पत्नीने अधर्मवर्तन केले असे मानून ते तिच्याही दफनविधीला हजर राहात नाहीत. आपल्या तत्त्वांशी कट्टरपणे जागणाऱ्या करीमुल्लांना इस्लामी मुजाहिदीन मंडळीच्याही काही गोष्टी मान्य नाहीत.
 अफगाणिस्तानात अनेक सत्ताधारी मंडळींच्या भागिदारीत अफूचे शेतमळे फुलवितात व त्यातून मिळणारा अमाप पैशाचा वापर धर्मरक्षणासाठी करतात ही गोष्ट प्रो. करीमुल्लांना मान्य नाही. ते अनेक तहांनी अफू पिकविणाऱ्या मंडळींना समजविण्याचा प्रयत्न करतात. हजरतसाहेबांनी कोणत्याही मादक पदार्थ व पेयास निबिद्ध ठरवलं आहे. त्यांनी यासंबंधी दहा प्रकारच्या कामांशी संबंधित असणाऱ्या माणसांना शाप दिला आहे. मादक पदार्थ वा पेय प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे तयार करणं, त्या क्रियेत भाग घेणं, त्याचा वापर करणं, खरेदी - विक्री करणं वगैरे क्रिया करणारी माणसं कुराणच्या दृष्टीनं गैरइस्लामी आहेत. (पृष्ठ ८७). प्रो. करीमुल्ला स्त्रियांच्या बुरखापद्धतीचा आग्रह धरतात तेव्हा त्याने प्रेरित होऊन काही जहाल मुस्लीम तरुण उघड्या पायांनी वावरणाऱ्या काही तरुणींवर तेजाब-अॅसिड फेकतात. मात्र या घटनेमुळे करीमुल्ला नाराज होतात. हतबुद्ध झालेले करीमुल्ला आपल्या सहकारी मित्रांजवळ आपलं मन मोकळं करताना म्हणतात ‘ऐसा बर्बर खूख्वार सलूक करके हमारे मुसलमानही इस्लाम को दाग लगाते है... इस्लाम म्हणजे शांती


व भाईचारा हे सांगायची पाळी यावी, हे दुर्दैव. अशा अघोरी मार्गांनी धार्मिकता येणार नाही, हे या युवा पिढीला केव्हा कळणार? औरत जातीला हजरत साहेबांनी कधीही कमी लेखलं नाही. तिच्यावर असे अत्याचार मला मान्य नाहीत!' (पृष्ठ ४६) आपल्या तत्त्वांसाठी जागरूक राहणाऱ्या करीमुल्लांना मात्र अनेक वेळा त्यांना न पटणाऱ्या मंडळींशी संगत करावी लागते, त्यांचे नेतृत्व स्वीकारावे लागते. सत्य पुरेसे समजूनही त्यांना अगतिक, असाहाय्य व्हावे लागते.
 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' या कादंबरीत अन्वर, करीमुल्ला यांच्या जोडीलाच आणखीन एक तिसऱ्या विचारधारेचा प्रतिनिधी म्हणून इलियास या व्यक्तिरेखेची निवड लेखकाने केली आहे. इलियास हा पदव्युत्तर शिक्षण घेतलेला, विद्यापीठात ऑनररी क्लासेस घेणारा उच्चविद्याविभूषित आहे. कट्टर साम्यवादी विचारसरणीचा नूर महंमद तराकी जेव्हा इस्लामला केंद्रवर्ती ठेवून राजसत्ता करणे नुकसानीचे ठरू शकते असे विचार मांडतो; तेव्हा इलियास याबाबतीत समन्वयाची भूमिका घेत इस्लाममधील सामाजिक सुधारणांच्या संदर्भात जे समज गैरसमज वा रूढी असतील त्यांच्यावर घणाघाती टीका करण्यापेक्षा प्रेमानं शिक्षण, प्रबोधन करून आणि त्यांच्यात मिसळून त्या कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशी मते मांडतो. टोळीजीवन जगणाऱ्या अफगाणांचा एक देश म्हणून बांधून ठेवणारे जे मोजकेच धागे आहेत, त्यामध्ये इस्लाम प्रमुख आहे. हा आपल्यासाठी केवळ धर्म नाही तर जीवनपद्धती आहे आशी त्याची स्पष्ट धारणा आहे. कम्युनिझमचं प्रिस्किप्शन रोगापेक्षा इलाज भयंकर होईल अशी त्याला सतत भीती वाटत राहते. त्याची ही भीती अगदीच अनाठायी नाही हे बदलत्या अफगाण राजवटीचा विचार केल्यास पटते.
.  'इन्किलाब विरुद्ध जिहाद' या कादंबरीत सलमा, जमीला अशा अनेक मस्लीम अफगाण स्त्रीच्या गुलामीचं व दर्दशेचे चित्रण प्रकट झाले आहे. त्याबरोबरच अफगाणिस्तानातली पहिली स्त्री मंत्री बनलेल्या स्वतंत्र विचाराच्या अनाहितासारखी व्यक्तिरेखाही दिसते. झैनब, तराना, बेनझीर अशाही अनेक आत्मसमर्पण आणि दुसऱ्याकरिता झिजणे हा स्वभावधर्म असणाऱ्या, दुःखाचे हलाहल पचविणाऱ्या व्यक्तिरेखा दिसून येतात. मात्र या बहुतेक स्त्रिया उच्चवर्गीय स्तरातील आहेत. स्त्री जीवनाबद्दल आणि त्यांच्या भावविश्वाबद्दल लक्ष्मीकांत देशमुख यांना अखंड कुतूहल आहे. त्यामुळे या कादंबरीत डोकावणारी सर्वच स्त्रीचित्रे फारच बोलकी उतरली आहेत. त्यांच्या 'सलोमी' या कादंबरीच्या तुलनेत 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' मधील मुस्लीम स्त्री जीवन चित्रण एकांगी न राहता, व्यापक पयावर मांडले गेले आहे. ___ अफगाणिस्तानातील टोळीजीवनात स्त्री हा मालकीचा, इज्जतीचा आणि अभिमानाचा विषय. स्त्रीची इज्जत लुंटली, तिची कुणी छेड काढली तर त्या


पुरुषाला क्षमा नव्हती. त्या अत्याचारी पुरुषाला त्याबद्दल अधोरी शिक्षा दिली जायची. पण कलंकित झालेल्या स्त्रीलाही पठाणी पुरुषासाठी काही स्थान उरत नसे. त्यामुळे बहुसंख्य स्त्रिया बलात्कारित जीवन जगण्यापेक्षा विष घेऊन आत्महत्या करीत. त्याला समाजातील समस्त पुरुष वर्गाची मान्यता असे. जगात प्रथमच क्रांतिकारी इस्लामने स्त्रीला मिळवण्याचा व संपत्तीचा अधिकार दिला. शिक्षणाचा समान अधिकार दिला व ज्ञान मिळवण्यासाठी प्रसंगी चीनला पण जायला हरकत नाही असे वचन दिले (पृष्ठ ४२२). ही इस्लामी शिकवण विसरून 'औरत चार दिवारी में रहे तो अच्छी है..... तिचं स्थान घरात आहे, समाजात नाही' (पृष्ठ ४१२), अशा प्रकारची पुरुषप्रधान मानसिकता पुढे येते. स्त्रियांवर घातलेल्या निबंधाविषयीचे एक पत्रक तालिबानी पोलीस आंतरराष्ट्रीय संघटना व दूतावासांना पाठवितात. त्या पत्रकातील अनेक सूचना खूपच बोलक्या आहेत. 'इस्लामी अफगाणिस्ताननं धर्माला अनुसरून स्त्रियांवर काम न करण्याचे निर्बंध घातले आहेत. अपवाद म्हणून फक्त काही क्षेत्रात त्यांना कामाची परवानगी दिली जाते, याची सर्व आंतरराष्ट्रीय संस्था व दुतावासांनी गंभीरपणे नोंद घेऊन त्याचं पालन करावं. इस्लामी कानूनप्रमाणे अत्यावश्यक कामाखेरीज मुस्लीम स्त्रियांनी घराबाहेर पडायचं नसल्यामुळे त्यांना वैद्यकीय क्षेत्राखरीज इतरत्र काम करता येणार नाही. आंतरराष्ट्रीय संघटनांनी अफगाण किंवा इतर स्त्रियांना कामावर ठेवण्यापूर्वी आमच्या विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या अफगाणी स्त्रीनं परदेशी संस्थांकडून चालवल्या जाणाऱ्या दवाखान्यात वरिष्ठ पद घेता कामा नये. अॅम्बप्युलन्स वा इतर वाहनातून जाताना तिनं ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसू नये. तसेच ज्या वाहनातून परदेशी माणसं जातात, त्यातही बसून तिनं प्रवास करू नये. अफगाण स्त्रियांवर असेही निर्बंध घालण्यात आले आहेत की, त्यांनी त्यांच्या आजारी व रुग्ण पुरुष नातेवाईकांना दवाखान्यात जनरल वॉर्डमध्ये जिथं अपरिचित व गैरमर्द शरीक झाले आहेत, भेटीस जाऊ नये. तसेच आधुनिक, आकर्षक कपडे घालून त्यांनी दवाखान्यात जाऊ नये. स्त्रियांनी ह्या आज्ञा पाळीत भारदस्तपणे वागलं पाहिजे. पायांतील बुटांचा आवाज होणार नाही, असं हळुवारपणं चाललं पाहिजे.' (पृष्ठ ४४३) या पत्रकातील निर्बंधावरून अफगाणी स्त्रीच्या वाट्याला काय स्थिती अनुभवास आली आहे याचा पडताळा येईल.
 अन्वरची पुतणी आणि कवयित्री जमीला हिच्या वाट्याला पराकोटीचा अन्याय येतो. तिच्यावर एकतर्फी प्रेम करणारा झाकीर जमीलासमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवतो. खरे तर ह्या झाकीरने पूर्वीच चार जणींशी निकाह केलेला आहे. 'स्त्री म्हणजे उपभोगाचे साधन' अशी समजूत करून घेतलेला झाकीर पुरुषी अहंकाराने जमीलाला, 'या देशात जे प्रमुख चार वंश आहेत पठाण, हाजरा, ताजिक व उज्बेकी त्या


वंशातील चार मुली माझ्या बायका आहेत. मी खराखुरा अस्सल अफगाणी आहे' असे मस्तवालपणे म्हणतो. तो जमीलासाठी यातल्या कोणत्याही मुलीला सहजपणे तलाक द्यायला तयार असल्याचे सांगतो. तेव्हा जमीलाला त्याची भयंकर घृणा वाटते. ती त्याची निर्भर्त्सना करते. त्यामुळे चिडलेला झाकीर खोटे पुरावे गोळा करून जमीलाला गुन्हेगार म्हणून शाबीत करतो. जमीलाला भर चौकात जमावाकडून दगडाने ठेचून मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात येते. जमीला आपल्यावरील आरोप नाकारत मोठ्या धैर्याने शिक्षेला सामोरी जाते. चौकात जमलेल्या गर्दीसमोर मोठ्या आवेशात जमीला शिक्षा भोगण्यापूर्वी जमावाला उद्देशून बयान करते’ - 'जे पटत नाही, चुकीचं व अन्यायाचं वाटतं, त्याविरुद्ध लढणं हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. तुम्हाला आजची राजवट अन्यायी व अवामविरोधी वाटत असेल तर प्रतिकाराचा तुम्हाला अधिकार आहे. तो वापरावा. माझ्या या अघोरी शिक्षेनं तुमचे डोळे उघडावेत नि तुम्ही विचार व कृतीला सिद्ध व्हावं, एवढीच माझी अखेरची इल्तिजा आहे' (पृष्ठ ४५७ - ४५८).
 गेल्या दोन - तीन दशकात सत्तास्पर्धेतून सर्वसामान्य माणसाच्या वाट्याला आलेल्या पराकोटीच्या दयनीय स्थितीचे चित्रण 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' या कादंबरीत प्रभावीपणे मांडले गेले आहे. प्रत्येक गावातील तरुणाला चिथावणी देऊन त्याला 'जिहाद' च्या नावाखाली लढण्याचे सैनिकी प्रशिक्षण देणे, सरकारी कार्यालय, आस्थापनांवर अवचित हल्ला चढवून जमेल तेवढी लूट करणं, पूल उडवून देणे, शाळा उद्ध्वस्त करणे, शिक्षक-शिक्षिकांना धमक्या देणे, मुला - मुलींनी शाळेत जाऊ नये म्हणून धाक दाखवणं अशा गोष्टींमुळे सर्वसामान्य माणसाच्या वाट्याला अशांतता, हिंसाचार, असुरक्षितताच येते आहे. सर्वसामान्य माणसाच्या प्राथमिक गरजा पूर्ततेची कुणालाच काळजी नाही. गावांच्या गावं उजाड पडत चालली आहेत. सुशिक्षित, नोकर पेशातले व बऱ्यापैकी श्रीमंत लोक अमेरिका, युरोप वा भारताकडे स्थलांतरित होत होते. तर गरीब, मध्यम दर्जाचे आणि मदरसा शिक्षण घेतलेले म्हणजेच कम्युनिस्टांचा द्वेष करणारे पेशावर, क्वेट्टा या पाकिस्तानी क्षेत्रात जात. त्यापैकी काही जण मुजाहिदीन बनत, तर बाकीचे निर्वासितांचं कठीण जिणं जगत. ज्यांना हेही जमायचं नाही ते सतत होणारे हवाई हल्ले, बॉम्बिग आणि गोळीबाराने जीव वाचवण्यासाठी व पोट भरण्यासाठी काबूलसारख्या मोठ्या शहरात स्थलांतरित होत. निदान या शहरात जिवाच्या सुरक्षिततेबरोबरच कष्ट करून निदान दोन नानच्या रोट्या मिळण्याची शाश्वती होती. काबूल शहरातील स्थिती मधल्या काळात एवढी भयावह झाली की लोकांना खायला रोटी मिळेना. महागाई प्रचंड वाढली. नानच्या पन्नास किलो आट्याच्या बोरीचा दर पस्तीस अमेरिकन डॉलर पर्यंत वाढला. त्यावेळी सर्वसामान्य अफगाणी


माणसांचं वार्षिक उत्पन्न जेमतेम दीडशे डॉलरच्या आसपास होतं. अशा महागाईच्या परिस्थितीत जगण्याचे वांधे होऊन बसले होते. तेल साबणासाठी आणि कोंबडीच्या खाण्यासाठी हाडांची गरज असते. तेव्हा काही हाडांचे व्यापारी हाडांच्या बदल्यात नानरोट्या देऊ लागले. त्यामुळे हाडांचा हा नवा धंदा तेजीत आला. लहान मुले जनावरांची हाडे शोधून, व्यापाऱ्यांना विकून त्याबदल्यात आपली भूक भागवू लागले. पण जनावरांची हाडं संपली, मिळेनाशी झाली. तेव्हा नाईलाजास्तव कबरी खोदून त्यातून हाडं शोधून व्यापाऱ्यांना विकण्याचा नवा फंडा सुरू झाला. इतकी नैतिक आणि आर्थिक अधोगती या काबूल शहराची झाली. _अफगाणिस्तानची भौगोलिक स्थिती, सामाजिक स्थिती, तिथला निसर्ग अफगाणी माणसाचे स्वभावदोष अशा सर्व बाजूंनी विचार करून 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' ही कादंबरी आकारास आली आहे. एक आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा विषय आणि एका अपरिचित मुस्लीम जगाचा व तेथील माणसांच्या सुखदुःखांचा संघर्ष व जीवनप्रवाह या कादंबरीतून मराठी भाषेत पहिल्यांदाच प्रकट होतो आहे हे लेखक म्हणून लक्ष्मीकांत देशमुखांचे महत्त्वपूर्ण साहित्यिक योगदान आहे.
 या कादंबरीसाठी देशमुखांनी वृत्तांकन (रिपोर्टिंग) सारखा आकृतीबंध अनेक ठिकाणी वापरला आहे. अपरिचित अनुभवविश्व शब्दांत मांडताना त्याची गरजही असते. पण निव्वळ माहितीचे रकानेच्या रकाने, पृष्ठामागून पृष्ठे भरत चालण्याने काही वेळा कादंबरीतील कथानक गतिमान न होता थांबून राहिल्यासारखे होते. त्यामुळे एकामागून एक बदलत जाणाऱ्या राजवटी, असंख्य पात्रांची गर्दी त्यांचे एकमेकांशी संबंध नसल्यासारखे फटकून राहणे, वर्णनपरता, घटना प्रसंगांची जंत्री अशा काही कारणांमुळे कादंबरीतील अनेक व्यक्तिरेखा मनाची पकड घेत नाहीत. व्यक्तिरेखांमधील ताण किंवा नाट्यमयता बघायला मिळत नाही. कादंबरीतील बहुतांश व्यक्तिरेखा श्रीमंत व्यापारी, जमीनदार, राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, मंत्रीगण, राजदूत, उच्च हुद्यावरील अधिकारी अशा उच्चवर्गीय आहेत. या व्यक्तिरेखांत सर्वसामान्य वर्गातील व्यक्तिरेखा येताना दिसत नाही. त्यामुळे या सत्तास्पर्धेस सर्वसामान्य अफगाणी माणसाच्या दैनंदिन गरजा आणि जीवनमानात काय बदल होत जातात हे पुरेसे ध्यानात येत नाही. सर्वसामान्य जनतेच्या जीवनाबद्दल लेखकाने निव्वळ वर्णनपर माहितीच समोर ठेवली आहे.
 व्यक्तिरेखांच्या स्वभावचित्रणात लेखकाने फारसे बारकावे शोधलेले नाहीत असे वाटते. आपल्या बालपणीच्या सवंगडी असलेल्या झैनबला सहजासहजी टाळून अन्वर रशियन तान्याबरोबर विवाहाला तयार होतो. यात अन्वरसारख्या उच्चशिक्षित, संवेदनशील आणि धार्मिक वातावरणात वाढलेल्या घरातील व्यक्तीच्या मनात कोणताच अपराधी किंवा मानसिक उलाघालीचा भाव उमटलाच नसेल का?


कट्टर आणि जहाल मस्लीम तरुणांच्या अॅसिडफेकीत सलमा बळी पडते व तिच्या दोन्ही मांड्या भाजून जातात. जळालेल्या मांडीवर रशियातील प्लॅस्टिक सर्जनकडून सर्जरी करून घेण्यात अन्वर सलमाला मदत करतो. अन्वरने केलेल्या मदतीच्या उपकारांच्या उतराईसाठी सलमा त्याबद्दल्यात आपला देह अन्वरला अर्पण करते. अन्वरही कोणतीही खळखळ न करता सहजपणे ती गोष्ट मान्य करतो व त्याची परिणीती सलमाला विवाहपूर्व मातृत्व मिळण्यात होते. अशा काही गोष्टींमुळे अन्वरची व्यक्तिरेखा दुटप्पीपणाची आणि ठिसूळ बनत जाते. प्रखर वास्तवाला कवेत घेणाऱ्या या कादंबरीतील हिंदी सिनेमासारखे काही रोमँटिक प्रसंग मनाला खटकतात.
 असे असले तरी या बारीकसारीक उणीवा वगळूनही देशमुखांनी मुस्लीम जीवनशैलीचा बारकाईने अभ्यास केल्याने जाणवते. मुस्लीम जीवनातील (पुन्हा त्यात अफगाणिस्तानातील) असणाऱ्या अनेक रीतिरिवाज, लोकजीवन, भाषिक, समृद्धी, सण, उत्सव, श्रद्धा - अंधश्रद्धा अशा अनेक बाबींचा पूर्णांशाने अभ्यास निव्वळ माहिती संकलनातून हाती येणे कठीणच आहे. त्यासाठी प्रत्यक्ष अनुभव गाठीला असणे अधिक महत्त्वाचे ठरते. एका आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या आणि दहशतवाद या संवेदनशील विषयावरील कादंबरी लेखनाचा देशमुखांचा हा प्रयत्न निश्चितपणे कौतुकास्पद आहे. 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' मधील निरंकुश सत्तास्पर्धा ही जगातील कोणत्याही भूप्रदेशातील, भाषिक समूहातील धर्मसमूहातील असू शकेल. कारण सत्तालालसा ही उपजतच एक आदिम प्रेरणा आहे!

.
संदर्भ

 १) देशमुख लक्ष्मीकांत, इन्किलाब विरुद्ध जिहाद, २०११
 २) देशुमख लक्ष्मीकांत, सलोमी, १९९०
 ३) साने गुरुजी - भारतीय नारी
 ४) देवरे श्रावण - परदेशी रणजित, मंडल आयोग व नवे शैक्षणिक धोरण.


लक्ष्मीकांत देशमुख यांच्या कादंबरीची भाषा

डॉ. नंदकुमार मोरे

कादंबरी या वाङ्मय प्रकाराचा उदय एका सामाजिक जाणिवेतून झालेला आहे. त्यामुळे आजअखेर हा वाङ्मय प्रकार प्रामुख्याने समाजवास्तव मुखर करण्यासाठीच हाताळण्यात आलेला दिसतो. कादंबरीकडे चालू काळाचा साहित्य-प्रकार म्हणून पाहिले जाते. कादंबरीची एक साहित्यप्रकार म्हणून अधोरेखित झालेली क्षमता, तिच्याकडून अनेकांगी समाजवास्तवाला कलात्मकतेने भिडण्याची ठेवलेली अपेक्षा यामुळे कादंबरीचे आवाहकत्त्व व्यापक बनलेले आहे. व्यक्तीच्या सूक्ष्म, तरल भावभावनांच्या चित्रणापासून विराट समाजजीवनाचे दीर्घकालीन चित्रण स्वत:त सामावून घेण्याची क्षमता कादंबरीत आहे. त्यामुळे कादंबरीचा रूपबंध खुला आणि सतत बदलता राहिला आहे. तिच्या व्यापक, खुल्या रूपामुळे कादंबरी तेवढ्याच व्यापक आणि विविधांगी भाषिक अवकाशाची मागणी करते. कादंबरीतील आशयद्रव्य जेवढे व्यापक, प्रदीर्घ काळाला कवेत घेणारे आणि विविधांगी समाजजीवनाचे चित्रण करणारे असेल तेवढा विविधांगी भाषावापर ही कादंबरीकारासमोरील मोठी कसोटी असते. चित्रित समाजगटांच्या भाषेची सूक्ष्म जाण ही कादंबरीकाराची महत्त्वाची गरज असते. कादंबरीची कलाकृती म्हणून श्रेष्ठता, तिचे व्यापकत्व कादंबरीकाराच्या भाषिक जाणिवेवर अवलंबून असते. त्यामुळे कादंबरीचा विचार करताना कादंबरीकाराच्या भाषिक क्षमतेचा, त्यासाठी त्याने घेतलेल्या मेहनतीचा, वापरलेल्या कौशल्यांचा आणि केलेल्या प्रयोगांचा विचार करणे आवश्यक ठरते.
 लक्ष्मीकांत देशमुख यांच्या कादंबरीचा या अंगाने विचार करणे हा प्रस्तुत लेखाचा विषय आहे. लक्ष्मीकांत देशमुख मराठीतील एक महत्त्वाचे लेखक आहेत. ते पेशाने उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकारी असून ते एक संवेदनशील ललित लेखक आहेत. त्यामुळेच अधिकारी म्हणून काम करीत असताना अतिशय संवेदनशीलतेने विविध सामाजिक प्रश्नांना ते भिडू शकले. प्रशासकीय सेवेत

कार्यरत असल्याने आपल्या आजूबाजूला चाललेला भ्रष्ट व्यवहार, सबंध व्यवस्थेत खोलवर झिरपलेला भ्रष्टाचार, आजूबाजूची किडलेली माणसं त्यांना अस्वस्थ करतात. आपण ज्या व्यवस्थेचे घटक आहोत, कार्यरत आहोत त्याच व्यवस्थेतील भ्रष्टाचार, बरबटलेपण, तेथील गैरव्यवहार लेखनाचे विषय करणे ही गोष्ट धाडसाची आणि लेखकाची नैतिकता अधोरेखित करणारी आहे. त्यांनी आपल्या संबंध लेखनातून जोपासलेली ही नैतिकता, आपल्या आजूबाजूचे वास्तव भेदकपणे मांडण्याचे दाखवलेले धारिष्ट्य ही बाब त्यांचे लेखक म्हणून श्रेष्ठत्व सिद्ध करणारी आहे.
 लक्ष्मीकांत देशमुख यांच्या 'अंधेरनगरी', 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' आणि 'ऑक्टोपस' या तीन कादंबऱ्यांचा येथे विचार करणार आहोत. त्यांनी प्रशासनांतील आजचे दाहक वास्तव मुखर करणारी आशयसूत्रे, 'अंधेरनगरी' आणि 'ऑक्टोपस' या कादंबऱ्यांतून मांडली आहेत. आपल्या देशात आज शिष्टाचारच बनलेला भ्रष्टाचार, व्यवस्थेतील अनैतिक राजकारण, सर्वच पातळ्यांवर झालेली मूल्यात्मक घसरण हा या कादंबऱ्यांचा विषय आहे तर 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' या कादंबरीचे आशयसूत्र आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणाचा व्यापक संदर्भ असून प्रस्तुत कादंबरीतील अवकाश मराठी प्रदेशाबाहेरील आहे. ते या कादंबरीतून अफगाणिस्तानच्या पन्नास वर्षाच्या वाटचालीची, तेथील युद्धग्रस्त परिस्थितीची कथा सांगतात.
 साहित्याचे माध्यम भाषा असल्याने एखादा लेखक - कवी आपली निर्मिती करताना भाषेतील सर्जनशील तत्त्वांचा आणि घटकांचा कसा वापर करतो हे अभ्यासणे महत्त्वपूर्ण ठरते. कलाकृतीची संरचना घडवताना आणि साहित्यकृतीला साहित्यमूल्य प्राप्त करून देताना त्या कलाकृतीची भाषा महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. त्यामुळे लेखकाजवळ असणाऱ्या भाषेची संदर्भबहुलता तपासणे कलाकृतीच्या आकलनाला एक परिमान प्राप्त करून देते. त्या दृष्टीने येथे वरील तिन्ही कादंबऱ्यांची चर्चा करू. विवेचनाच्या सोयीसाठी देशमुखांच्या वरील कादंबऱ्यांचे दोन गट कल्पिता येतील. पहिल्या गटात 'अंधेरनगरी' आणि 'ऑक्टोपस' या कादंबऱ्यांचा विचार करावा लागेल; आणि दुसऱ्या गटात 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' या कादंबरीचा विचार करता येईल. हे दोन भिन्न गट कल्पिण्यामागे या कादंबऱ्यासाठी लेखकाने वापरलेल्या भाषेच्या दृष्टीने निश्चित अशी एक भूमिका आहे. लेखक ज्या व्यवस्थेचा, समाजाचा भाग आहे त्या व्यवस्थेचे चित्रण करणाऱ्या दोन कादंबऱ्यांचा पहिला गट आहे. लोकशाही राज्यव्यवस्थेत अस्तित्वात आलेली प्रशासकीय, राजकीय व्यवस्था ही त्या व्यवस्थेत काम करणाऱ्या आणि न करणाऱ्या साऱ्यांच्याच जगण्याचा भाग आहे. कारण ती साऱ्यांसाठी अस्तित्वात आलेली बहुउद्देशीय


व्यवस्था आहे. या व्यवस्थेचा प्रत्येकाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध येत राहातो. लक्ष्मीकांत देशमुख तर स्वत:च व्यवस्थेचे घटक. म्हणून या व्यवस्थेला ते आतबाहेरून थेट सामोरे गेलेले आहेत. एखाद्या व्यवस्थेत राहून त्या व्यवस्थेविषयी बोलणं हे बरंच अवघड काम देशमुख यांनी आपल्या लेखनातून केलं आहे. भालचंद्र नेमाडे यांच्यासारख्या मराठीतील महत्त्वाच्या लेखकानेही आपल्या कादंबरीलेखातून हेच . धारिष्ट्य दाखवले आहे. देशमुखांनी हे काम करताना जी संयमी आणि संयत भाषा वापरली आहे तिचे विश्लेषण प्रथम करू. आणि नंतर आपल्या भाषिक प्रदेशाच्या कक्षेपलीकडील, मराठी भाषा आणि माणूस यांचा थेट संबंध नसलेल्या अमराठी भाषिक अवकाशात घडणाऱ्या घटना-प्रसंगावर लिहिलेली 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' चा विचार स्वतंत्रपणे करणे सयुक्तिक ठरेल.
 'अंधेरनगरी' आणि 'ऑक्टोपस' या कादंबऱ्यांची आशयसूत्रे अनुक्रमे नगरपालिकेतील सत्तासंघर्षाचे राजकारण आणि शासनाच्या महसूल खात्यातील भ्रष्ट कारभार अशी आहेत. या दोन्ही कादंबऱ्यांमध्ये प्रशासन आणि राजकारणाचे अनेक सूक्ष्म संदर्भ आहेत. 'अंधेरनगरी' या कादंबरीमध्ये एका निमशहरातील नगरपालिकेच्या सत्तासंघर्षात शहरांतर्गत शिजणारे राजकारण, तेथील लोकांच्या वर्तन, बोलण्याचे राजकीय संदर्भ, गट-तट, जात-पात आणि प्रदेशवास्तव, त्यासंदर्भातील लोकांच्या तीव्र अस्मिता, राजकारणात प्रशासकीय अधिकाऱ्यांची होणारी कोंडी, व्यवस्थेतील साऱ्यांचेच शहराच्या भवितव्याशी उघडउघड चाललेले खेळ, हितसंबंधांचे राजकारण - असा एका शहराचा वरून दिसणारा चेहरा; आणि याच शहराची दुसरी बाजू असणारे तिचे अधोविश्व अतिशय बारकाईने या कादंबरीमध्ये देशमुख यांनी चित्रित केले आहे. राजकारण आणि प्रशासनव्यवहारासाठी वापरली जाणारी विशिष्ट भाषा या कादंबरीचे आशयसूत्र साकारण्यास मदत करते.
 प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या क्षेत्राशी संबंधित भाषिक भांडार तयार झालेले असते. हे संदर्भविशिष्ट भाषिक भांडार त्या त्या क्षेत्राच्या आकलनासाठी महत्त्वपूर्ण ठरत असते. कोणत्याही क्षेत्रातील व्यवहारभाषेत त्या क्षेत्राचे म्हणून काही भाषिक संदर्भ तयार झालेले असतात. त्याचबरोबर त्या क्षेत्रापुरता शब्दनिधीही तयार झालेला दिसतो. या साऱ्या गोष्टींचे भान कादंबरीकाराजवळ असावे लागते. अलीकडच्या बऱ्याच मराठी कादंबऱ्यांमध्ये हे भाषाभान येत आहे. ग्रामीण परिसरातील राजकारण, तेथील गटातटाचे राजकीय संदर्भ, सहकारी संस्थांतील आणि सरकारी कर्मचाऱ्यांची या परिसरात तयार झालेली खास भाषा अनेक कादंबऱ्यांतून व्यक्त होते. मराठीतील अलीकडच्या काही कादंबऱ्यातून हे भाषा भान त्या क्षेत्राचे तळस्पर्शी चित्र उभे करण्यात यशस्वी झालेल्या दिसतात. सदानंद देशमुख यांची 'बारोमास', कृष्णात


खोत यांच्या 'रौंदाळा'मध्ये आलेली ग्रामीण परिसरात काम करणाऱ्या प्रशासकांची आणि गावपातळीवरच्या राजकीय घडामोडींचे नेमके सूचन देणारी भाषा उल्लेखनीय आहे. गाव पातळीवरच्या राजकीय संदर्भानी शंकर पाटलांच्या 'टारफुला' पासून नुकतीच प्रकाशित झालेल्या नामदेव माळी यांच्या 'छावणी', रामचंद्र नलावडे यांची 'कुरण'पर्यंत भाषाभानाचा विचार नोंदवता येईल. परंतु नगरपालिका आणि महसूल खात्याच्या रूपाने या क्षेत्राचे व्यापक संदर्भ असलेली भाषा देशमुखांनी प्रथमच मराठीमध्ये आणली आहे. मोठ्या शहरांपेक्षा खेड्यात आणि नगरपालिका अस्तित्वात असणाऱ्या निमशहरात राजकारण खोलवर झिरपलेले दिसते. ते तेथील जगण्याचा भाग बनलेले असते. हे वास्तव अधोरेखित करणारी भाषा लक्ष्मीकांत देशमुखांच्या 'अंधेरनगरी'मध्ये आलेली दिसते.
 वाचकाला खिळवून ठेवणारी किंवा त्याच्या मनाची पकड घेणारी भाषा आणि व्यवहारबोलीचा वापर देशमुखांच्या वरील दोन्ही कादंबऱ्यांमध्ये दिसत नाही. समाजातील सर्व स्तरातील बोलीरूपांचे सूक्ष्म भान ठेवून ही बोलीरूपे कादंबरीत मांडण्याचे कौशल्य मराठीत फार कमी कादंबरीकारांकडे आहे. यामध्ये भाऊ पाध्ये, भालचंद्र नेमाडे, राजन गवस, सदानंद देशमुख, रंगनाथ पठारे, विलास सारंग, रमेश इंगळे उत्रादकर, प्रवीण बांदेकर, कृष्णात खोत या कादंबरीकारांकडे हे भान दिसते. त्याचबरोबर पुरुषोत्तम बोरकर, किरण नगरकर यांच्या कादंबरीमध्येही हे भाषिक ज्ञान प्रत्ययास येते. लक्ष्मीकांत देशमुखांच्या कादंबरीची भाषा बोलीरूपापेक्षा प्रमाण मराठीकडे अधिक झुकते. प्रथमपुरुषी निवेदनातून कादंबरीचे कथासूत्र वाचकांसमोर ठेवताना लेखक केवळ मराठीचे प्रमाणरूप वापरताना दिसतो. त्यासाठी निवदनाचे कोणतेही नावीन्यपूर्ण तंत्र, शैली अवलंबत नाही. भाषिक पातळीवर ते कोणत्याही वेगळ्या वाटा चोखळत नाहीत. मराठीतील अनेक कादंबऱ्यांमध्ये दिसणाऱ्या निवेदनाच्या शैली, विनोद आणि उपरोध देशमुखांच्या भाषेत दिसत नाही. तरीही देशमुखांच्या भाषेचे म्हणून काही विशेष नोंदवता येतील.
 लक्ष्मीकांत देशमुख विषयाला थेट भिडण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपल्या कादंबरीतील भाषावापरातून करतात. भाषा आणि कथनाच्या पातळीवरचे काही प्रयोग न करता; अनुभवलेले वास्तव प्रांजळपणे समोर ठेवण्याचा प्रयत्न करतात. वरील दोन्ही कादंबऱ्यांच्या कथनातून आपल्या सभोवतालचे वास्तव ते ज्यापद्धतीने समोर ठेवतात; त्यातून कादंबरीच्या निवेदकाचा म्हणून एक सरळ स्वभाव व्यक्त होतो. परिणामी निवेदनात येणारी भाषा प्रांजळ आणि सरळपणे येते. ती कोणताही आडपडदा किंवा वळणे घेताना दिसत नाही. त्यामुळेच तिचे स्वरूप बऱ्याच प्रमाणात औपचारिक भाषावापराचे असते. 'आजच्या बैठकीस जिल्हाध्यक्ष संबोधित


करणार आहेत,' 'एवढंच नव्हे, तर त्यात त्यांनी प्रावीण्यही मिळवलं होतं!', 'हा शफीच्या अभ्यासाचा व काही प्रमाणात कौतुकाचा, तर काही प्रमाणात मत्सराचा विषय आहे!' अशी औपचारिक लेखनातील भाषा निवेदनात सतत येत असल्याने ती वाचकाच्या मनाची पकड घेण्यात कमी पडते. कारण ही भाषा व्यवहारभाषेपासून बरीच फारकत घेते. कादंबरी हा वाचक आणि लेखक यांच्यामध्ये चाललेला एक व्यवहार किंवा दीर्घ संवाद असतो. या व्यवहारातील नैसर्गिकता अशा औपचारिक भाषेमुळे हरवते. संवादाचा सूर टिकवून ठेवता येत नाही. परंतु या कादंबरीत राजकारणाची भाषा अतिशय प्रभावी आणि कौशल्याने वापरलेली दिसते. राजकारण गतिमान आणि अस्थिर असल्याने या कादंबरीतील घटना-प्रसंगांध्ये एक प्रकारची गतिमानता आहे. नगरपालिकेच्या संदर्भात लालाणी आणि पाटील यांच्यामध्ये चाललेला सत्तासंघर्ष आणि शहराचे प्रश्न टिपताना नेमकी भाषा या कादंबरीमध्ये येते.
 कोणत्याही भाषेतील शब्दांची अर्थपातळीवरील संदिग्धता तो शब्द प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आल्यानंतर संपते. या संदर्भाने अनेक शब्दांचे अर्थक्षेत्रांनुसार विश्लेषण करता येते. 'अंधेरनगरी' मध्येही येणारे असे काही शब्द कादंबरीच्या आशयासूत्रानुसार अशी अर्थवत्ता देतात ते पाहता येते. या कादंबरीमध्ये येणारे धोरणी, मुत्सद्दी, दुराग्रही, तहकूब, तोष, अनुमोदन, अंतस्थ हित, संधी, मंजूर, पक्ष शिस्त, अनुचित, खीळ, झुंडशाही, प्रमाद, सेय, निर्देश, टिट, शिजणे, डावे असे शब्द राजकीय आशयाच्या परिप्रेक्षात अभ्यासल्यानंतर; या शब्दांना प्राप्त होणारा राजकीय संदर्भातील अर्थ लेखकाने नेमकेपणने वापरला आहे. हे शब्द मराठी भाषिक व्यवहारात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या संदर्भात वापरले जातात. परंतु हे शब्दच कादंबरीतील राजकीय आशय आणि समकालीन वास्तव प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण अर्थवत्ता देतात.
 वरती उल्लेख केल्याप्रमाणे लक्ष्मीकांत देशमुख भाषावापरासंदर्भात कोणता प्रयोग न करता आपल्या समोरील वास्तवप्रश्नांना थेट भिडणे पसंत करतात. जे आहे ते प्रांजळपणे समोर ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करत असल्याने एक कलाकृती म्हणून त्यांच्या कादंबरीला आपोआपच मर्यादा येतात. कथापि, सभोवतालचे वास्तव समजून घेण्याचा त्यांचा आवाका या दोन्ही कादंबऱ्यांमधून दिसून येतो. निवेदनात येणारी प्रमाण मराठी आणि औपचारिक व्यवहाराची भाषा व्यक्तिरेखांच्या भाषेतही येण्यामागील कारण हेच आहे. या कादंबरीतील लालाणींच्या तोंडचे हिंदी भाषेतील संवादही याला अपवाद नाहीत. 'लेकिन मुझे दोस्ती और रिश्तेदारी जादा अहम लागती हैं।' यासारख्या संवादातून येणारी प्रमाण हिंदी त्यांच्या औपचारिक


भाषावापराचे उदाहरण आहे. वास्तविक दैनंदिन जीवनातील भाषावापर एवढा कृत्रिम आणि औपचारिक नसतो. यासंदर्भाने 'अंधेरनगरी'तील पुढील दीर्घ संवाद अभ्यासता येतील. पवारांची कन्या केतकी आणि पाटलांचे चिरंजीव आनंदराव यांचे प्रेमसंबंधातून लग्न ठरवण्याच्या प्रक्रियेतील आनंदरावाचा हा संवाद आहे. 'पण पपा - बिलिव्ह मी - केतकीमुळे तुम्ही माझेच आहात. तुमच्यापुढे मी प्रांजळ आहे. यामध्ये माझ्या बाबांचं कसलंही राजकारण नाही. त्यांनी मला हे दूरान्वयानेही सजेस्ट केलेलं नाही. अजूनपर्यंत त्यांना कदाचित आमच्या प्रेमाचं माहीत पण नसावं. पण तुमची शंका साधार आहे. त्यांच्या मनात अजूनही शहाण्णव कुळीचा वृथा अहंकार आहे, जो मला साफ नामंजूर आहे.” “आता मी जे बोललो, ते माझ्या व केतकीच्या चर्चेतून निघालं होतं!" या संवादातील भाषा कृत्रिम आणि औपचारिक स्वरूपाचीच वाटते. त्यामुळे हे संवाद एखाद्या चित्रपटातील संवादासारखे वाटतात. तथापि लेखकाला जे सांगायचे आहे ते खूप सच्चे आहे हे नजरेआड करता येत नाही. बरबटलेल्या राजकारणाची, भ्रष्ट व्यवहाराची लेखकाला असणारी चीड त्यांच्या भाषेतून व्यक्त होत राहते. निवेदनाच्या भाषेतून व्यक्त होणारे पारदर्शी असे एक स्वच्छ आणि प्रामाणिक मन दिसते. यासंदर्भात खालील निवेदन अभ्यासता येईल. "हा सारा खर्च काही आपल्या कमाईतून देत नाही. आणि ते शक्यही नाही. दिवाळं वाजायचं तसं केलं तर! हा खर्च भरून काढण्यासाठी मुख्य स्वच्छता निरीक्षकाला ढील द्यावी लागते. तो अनधिकृत बांधकामाच्या फायली दडपण्यासाठी म्हणून किंमत वसूल करतो व हा खर्च निघतो. तसंच, जकात अधीक्षकाकडूनही सरबराई व इतर खर्चासाठी दरमहा पाच हजार रुपये वेगळे काढून ठेवावे लागतात. हा उत्पन्नातला तोटा नगरपालिकेच्या माथीच बसतो."
 "काही अपवाद वगळता सर्वच नगरसेवक व बहुसंख्य नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी दोन्ही हातांनी मिळेल तेवढं कमावताहेत.... नवीन काम मंजूर करणं म्हणजे खायची पर्वणी. या सर्वांचे प्लॉटिंगचे धंदे आहेत, न. प. च्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करणं, प्रत्येक खरेदीत कमिशन उपटणं..... प्रत्येक विभागात प्रत्येक कामात पैसा कसा खायचा याचं टेक्निक किती परिपूर्ण केलं आहे." (पृष्ठ ६६) राजकारणामध्ये बऱ्याच वेळा व्यक्तीपेक्षा प्रवृत्ती प्रबळ ठरत असते. त्यासंदर्भाने येणारी या कादंबरीतील भाषा राजकीय वर्तनाचे वास्तवदर्शी सूचन करते. “मै मजबूर था भांगे साहब.... मै आपको रोक सकता था, लेकिन रोक नही पाया ..... क्योंकी मझे इनके साथही रहना है।" ही लालाणीची अगतिकता ज्या शब्दातून व्यक्त होते; ती भाषा आणि त्यावर वकीलबाबूंच्या तोंडी येणारा संवाद राजकारणाचे आजचे वास्तव आहे. ते म्हणतात, “लाला, एकच सांगतो, आज आपली खुर्ची


वाचावी म्हणून तू सी. ओ.ना रोकू शकला नाहीस..... पण मला भीती वाटते ..... तूही फार काळ राहू शकणार नाहीस.... वॉच माय वर्ड. हे भाकीत चुकलं तर मित्र म्हणून मला आनंद वाटेल... पण यावेळी तू घसरलास. एक चांगला माणूस तू घालवलास. मला काळजी वाटते ती या शहराची ..... सी. ओ.नी त्या दिवशी काय म्हटलं ते आठवतं ना - जर कौन्सिलनं भावनेच्या भरात अतिक्रमणाच्या बाजूने कौल दिला तर भविष्यकाळात हे शहर म्हणजे एक प्रचंड बकाल झोपडपट्टी बनेल..... आय फियर टॅट, आय फियर टॅट - लाला....! (पृष्ठ १७७) या भाषेमधून नगरपालिकेच्या वरून दिसणाऱ्या कारभारापेक्षा या व्यवस्थेच्या अधोविश्वात चाललेले व्यवहार देशमुखांची ही भाषा पृष्ठस्तरावर आणण्याचे काम करते. राजकीय वर्तनाची ही बाजू म्हणजे भयानक वास्तव असते. तिचे नेमके आकलन वरील भाषेतून लेखक मांडतो. त्यामुळेच या कादंबरीतून समकाळातल्या एका जिवंत विषयाला लक्ष्मीकांत देशमुख न्याय देऊ शकले आहेत.
 'ऑक्टोपस' कादंबरीमध्ये शासनाच्या महसूल खात्यातील भ्रष्ट व्यवहाराचे चित्र येते. शासनव्यवस्थेतील महसूल हे एक महत्त्वाचे खाते आहे. लोककल्याणासाठी अस्तित्वात आलेले हे खाते म्हणजे भ्रष्ट व्यवहाराचे, हितसंबंधाच्या गोष्टींनी व्यापलेले एक मोठे जाळे बनले आहे. वरून महसूल खात्याचे दिसणारे एक भव्य रूप सर्वांसमोर असते. पद-प्रतिष्ठेसाठी प्रशासनाच्या पातळीवर या खात्याचे सर्वांना आकर्षण असते. परंतु या खात्यांतर्गत चाललेले गैरव्यवहार, भ्रष्टाचार सामान्यांच्या आकलनपलीकडील आहे. 'ऑक्टोपस' हे शीर्षक या व्यवहाराचे प्रतीक आहे. या खात्यांतर्गत कार्यरत असणारे जिल्हाधिकारी आनंद पाटील आणि तलाठी भगवान काकडे यांच्या माध्यमातून या खात्यातील कारभाराचा उभा छेद लेखकाने या कादंबरीत घेतला आहे.
 या कादंबरीत भगवान काकडेची व्यक्तिरेखा मध्यवर्ती असून त्याच्या जीवनात खात्यांतर्गत राजकारण, ताणतणाव, आरोप, चढउतार अतिशय नाट्यपूर्ण पद्धतीने रेखाटले आहेत. योगायोगाच्या घटना, घडवून आणलेले काही प्रसंग पाहता ही कादंबरी सिनेमॅटिक होताना दिसते. संवादांचे स्वरूपही पटकथेतील संवादासारखे असल्याने ही कादंबरी एखाद्या चित्रपटाची कथाच वाटते. ती असे वाटण्याचे एक कारण या कादंबरीत येणारे संवाद आणि भाषा हे आहे. काही ठिकाणी आलेले संवाद रोमँटिक झाले आहेत. कादंबरीच्या प्रारंभीच “या साडीत तू फारच आकर्षक व चित्तवेधक दिसतेस!", "या फोटोत दोन देवी आहेत. एक सर्वांची माता देवी, तर दुसरी फक्त माझी एकट्याची गृहदेवी!", “येस, माय डिअर. यू आर परफेक्टली टाईट!" असे संवाद कादंबरीपेक्षा चित्रपटातील वाटतात.


 'ऑक्टोपस' या कादंबरीतील अवकाश उस्मानाबाद परिसरातील आहे. केवळ लेखक सांगतो म्हणून हे कथानक या परिसरात घडत आहे असे म्हणायचे. कारण नावगावाशिवाय या परिसराची भाषिक संस्कृती या कादंबरीतून आविष्कृत होताना दिसत नाही. या परिसराची भाषा या कादंबरीत कोणाच्याही तोंडी येताना दिसत नाही. ग्रामीण भागात तलाठ्याची नोकरी करणारा भगवानही “नाही, साहेब! तुमचा त्यात काय दोष? कुणाही अधिकाऱ्यांनी हेच केलं असतं. तुम्ही साऱ्यापेक्षा वेगळे आहात म्हणून आशा होती. मला कळलं साहेब की, तुम्ही मला सेवेत जाताना पुन:स्थापित करण्याचे आदेश सादर करायला पेशकार साहेबांना सांगितलं होतं, पण त्या जोशी प्रकरणामुळे आपण सही केली नाही! तुमच्यावर त्याच नीच जगतापनं घाणेरडा आरोप केला, मलाही रिइनस्टेट केलं असतं तर त्यानं जास्तच गरळ ओकलं असतं. असो. पण साहेब, आपण जोशीला न्याय दिला, पण माझ्यावर मात्र अन्याय झाला साहेब!" (पृष्ठ ३१) हा संवाद तलाठी पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या भाषेतील वाटत नाही. वरील कादंबरीप्रमाणेच याही कादंबरीतील प्रथमपुरुषी निवेदन बऱ्याच प्रमाणात औपचारिक भाषेतूनच येते.
 लक्ष्मीकांत देशमुख यांच्या लेखकीय वाटचालीतील 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' ही अतिशय महत्त्वाची आणि उल्लेखनीय अशी कादंबरी आहे. सुमारे ९३४ पृष्ठांची ही बृहत कादंबरी अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. अफगाणिस्तानच्या सुमारे पन्नास वर्षाच्या धगधगीत अवस्थेचा तटस्थपणे आणि अभ्यासपूर्ण घेतलेला वेध या कादंबरीच्या आशयसूत्रातून लेखकाने मांडला आहे. ही कादंबरी परिश्रम आणि कष्टपूर्वक लिहिली गेल्याच्या खुणा या कादंबरीत सर्वत्र पाहायला मिळतात. या कादंबरीत लेखकाने सांगितलेली अफगाणिस्तानची सुमारे पन्नास वर्षांच्या वाटचालीची कथा दोन भिन्न विचारांच्या संघर्षाने व्यापलेली आहे. ही कादंबरी म्हणजे जगातील एक महत्त्वाचा इतिहास असला तरी तो लेखनाने काही काल्पनिक पात्र - प्रसंगांच्या आधाराने कादंबरीच्या रूपात मांडला आहे. तो मांडताना कादंबरीच्या अनेक शक्यता देशमुखांनी अजमावून पाहिलेल्या आहेत.
 अफगाणिस्तानच्या दुर्बल, अगतिक आणि अविकसित परिस्थितीची ही कथा म्हणजे जागतिक राजकारणात एखाद्या देशाचा कसा बळी घेतला जातो याचा ज्वलंत इतिहास आहे. या कथेला व्यापक असे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे संदर्भ लाभले आहेत. त्यामुळेच ती मराठीतील एक महत्त्वपूर्ण कादंबरी ठरली आहे. या कादंबरीने आशयसूत्रासंदर्भात मराठी कादंबरीच्या कक्षा विस्तारण्याला मदत केलेली आहे. विश्राम बेडेकर, विलास सारंग आणि विश्राम गुप्ते यांनी आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमी असलेली आशयसूत्रे कादंबरीतून मांडली आहेत. गुप्ते यांची 'अल


तमीर' सौदी अरेबियातील परिस्थितीवरील कादंबरी आहे. या सर्व कादंबऱ्यांच्या पाश्र्वभूमीवर देशमुखांची प्रस्तुत कादंबरी अनेक दृष्टीने वेगळी आहे.
 अफगाणिस्तानच्या वरील परिस्थितीची कहाणी देशमुख यांनी अन्वर, त्याचे कुटुंबीय आणि मित्र यांच्या अनुषंगाने सांगितली आहे. ही पात्रे काल्पनिक असली तरी त्यांची कहाणी खरी आहे. आंतराष्ट्रीय पातळीवरील धार्मिक आणि दहशतवादाचा विषय कादंबरीतून मांडताना येऊन पडणारी जबाबदारी, त्याचे दडपण देशमुख यांनी लीलया पेलले आहे. या कादंबरीचा विषय हे देशमुख यांनी स्वीकारलेलं आव्हान होते. कारण भाषा, प्रदेश, परिस्थिती आणि संस्कृती या सर्वच पातळीवर देशमुखांसमोरील आव्हाने मोठी होती. या आव्हानांचे स्वरूप ही कादंबरी वाचताना लक्षात येते. देशमुखांनी या कादंबरीच्या निवेदनासाठी आणि संवादांसाठी वापरलेली भाषा अफगाणिस्तानच्या सामाजिक आणि राजकीय पर्यावरणाचा नेमका प्रत्यय देणारी आहे. उर्दू, हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषांचे एकजीव केलेले मिश्रण बेमालूमपणे कादंबरीत वापरले आहे. जगातील एक सुंदर प्रदेश जागतिक राजकारणाचा बळी ठरून कसा उद्ध्वस्त होत जातो हे लेखकाने नेमकेपणाने चित्रित केले आहे. त्यासंदर्भातील भाषेचे उपयोजन हे वास्तव प्रभावीपणे मांडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे. या संदर्भातील हा संवाद पाहा, “खरंय अन्वर, मी मिलिटरीतील कामानिमित्त अनेक देश पाहिलेत. रूस, अमेरिका, इराण... पण अपने वतन का जवाब नही. आणि हा काबूल पगमानचा परिसर - माशा अल्ला! उपरवालेने क्या नजारा बक्शा है" (पृष्ठ १३) ही भाषा या परिसराचे एक चित्र उभे करते. हा शांत परिसर पुढे अशांत आणि उद्ध्वस्त होत जातो. त्याचे चित्र पुढील संवादातून मुखर होते. 'गेले तीन दिवस काबूलवर आपल्या तालिबानी फौजा अंगाराप्रमाणे बरसत आहेत. मुल्ला मुहंमद रब्बोनीच्या नेतृत्वाखाली आमचे नौजवां तालिब जान की बाजी लगाके लड रहे है।” (पृष्ठ ८४६) या संवादांमध्ये येणारी भाषा तेथील भाषिक संस्कृतीचे आणि मराठीचे एक अवीट मिश्रण तयार झालेले आहे. हा भाषेचा टोन अफगाणिस्तानची सुमारे पन्नास वर्षांची प्रदीर्घ वाटचाल सांगताना कायम टिकवला आहे. या कादंबरीच्या भाषेमध्ये येणारे दिलो दिमागपर, महजबी संस्कार, सना पठणाचे स्वर, बेहद खूबसूरत, इरादा, बहू, शादी, काफिर, पगमान, बेशक, सच्चाई, शागीर्द, तशरीफ, इज्जत, मदहोश, अफसोस असे शेकडो उर्दू, हिंदी शब्द मराठी भाषेमध्ये चपखलपणे एकजीव झालेले आहेत. या शब्दांच्या वापरातून तयार झालेली वाक्ये अफगाणसंस्कृतीला वाचकाच्या डोळ्यांसमोर उभी करण्यात यशस्वी होताना दिसते. 'आजच्या पवित्र शुक्रवारी अब्बाजाननी तान्याला इस्लामची दीक्षा देऊन अन्वरशी निकाह लावून दिला होता. मात्र समारंभात तिनं


बुरखा वापरण्यास निक्षून नकार दिला होता, अन्वरनंही तिला साथ दिली होती! अब्बाजान, सूलतान, रहिम व सईद सारे भडकले. मग अम्मीनंच मध्यस्थी केली, 'देखो - ती ज्या शौरवी देशातून आली आहे, तिथं पडदा पद्धत नाही. एकदम सारं कसं ती स्वीकारील? जरा उसका भी सोचो. हमारे अन्वर के लिए उसने मुल्क छोडा, इस्लाम कबूल किया - धीरे धीरे ये सब वो अपनायेगी....” (पृष्ठ १७३) अशी मिश्र भाषाच तेथील घडामोडी, सर्व पातळीवर चाललेले संघर्ष टिपू शकणार होती. त्यामुळे देशमुख ही भाषा कौशल्यपूर्वक वापरताना दिसतात.
 अफागणिस्तानात सुरू असणाऱ्या भिन्न विचारांच्या संघर्षात जी भाषा देशमुख वापरतात त्यातून तो संघर्ष नेमकेपणाने व्यक्त होताना दिसतो. येथील कर्मठ आणि मवाळ अशा दोन्ही लोकांची भाषा ते अतिशय जबाबदारीने वापरताना दिसतात. येथे अमेरिकेबद्दल द्वेष रुजवणाऱ्या संघटनांची भाषा, येथील बरबादीच्या वाटेवरील तरुण पिढी, त्यांची अगतिकता, भुकेसाठी तळमळणारी जनता, लहान मुलं, त्यांचा सुरू असलेला छळवाद आणि एकूणच तेथे तयार झालेली अनागोंदी - भाषेतून वास्तवदर्शी पद्धतीने देशमुख कादंबरीतून मांडतात. त्यांच्या वरील दोन कादंबऱ्यांपेक्षा या कादंबरीची भाषा नि:संशय प्रगल्भ आणि कादंबरीच्या भाषावापरासंदर्भातील क्षमतेचा पुरेपूर उपयोग करून घेणारी आहे. त्यामुळेच ही कादंबरी त्यांच्या इतर कादंबऱ्यांच्या तुलनेत प्रगल्भ आणि कादंबरीच्या भाषिक अवकाशाची मागणी पूर्ण करणारी यशस्वी कादंबरी आहे.


राजकीय सत्यस्थितीचा आविष्कार : अंधेरनगरी

चंद्रकांत बांदिवडेकर

 लक्ष्मीकांत देशमुख यांची अलीकडे (१९९४) प्रसिद्ध झालेली 'अंधेर नगरी' राजकीय कादंबऱ्यांत वैशिष्टपूर्णतेने भर टाकणारी कादंबरी आहे. देशमुखांनी नगरपालिका आणि त्यातून प्रतिबिंबित होणारे भ्रष्ट समाजकारण, त्या भ्रष्ट समाजकारणाला गती देणारे सत्तेचे राजकारण आणि सर्व देशाच्या सत्तापिपासेतून उत्पन्न होणारे हिंस्र, क्रूर, स्वार्थांध, आत्मकेंद्रित शासन या वास्तवाचा वेधक शोध घेतला आहे. एका बाजूने आपला मुख्याशय नगरपालिकेच्या राजकारणापुरता आणि प्रशासनापुरता मर्यादित करून घेतला तरी त्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या एकूण पतनशील होत चाललेल्या लोकशाहीच्या प्रणालीचा ताकदीने कलात्मक निर्देश केल्यामुळे हे वास्तव विश्लेषण सर्व देशाच्या राजकारणाचे प्रातिनिधिक ठरले आहे. वरकरणी काही ठरावीक पात्रांपुरते आणि छोट्या पैसापुरते मर्यादित हे वास्तव अनेक दिशांतून येणाऱ्या चिवट धाग्यांमुळे कसे गुंतागुतीचे व व्यापक झाले आहे ते देशमुखांनी दाखवले आहे. माणूस चांगला असतो, वाईटही असतो, तो काही प्रसंगी चांगला वाटतो, तर काही प्रसंगी चांगला वाटणारा माणूस क्रूर व वंचकही बनू शकतो. माणसाच्या स्वभावाबद्दलची ही प्रवाही व्यामिश्रता स्वीकारल्यामुळे या कादंबरीतल्या ढोबळ रेखांनी चित्रित केलेल्या पात्रांना महत्त्व आले आहे.
 ही कादंबरी वाचताना असे वाटत जाते की माणसाची मूलभूत प्रेरणा फ्रॉइड म्हणतो, तशी कामभावनेपुरती मर्यादित नसते, तर ती कामभावनेपेक्षाही अधिक मूलभूत असलेल्या अधिकार लालसेची असते. अॅडलरने आपल्या गुरूला - फ्रॉईडला - योग्य मुद्यावर विरोध केलेला आहे याची खात्री अशा कादंबऱ्या वाचताना होते. राजकीय कादंबरीमध्ये राजकारणातील विविध डावांच्या - प्रतिडावांच्या मुळाशी ही सत्तापिपासा, ही अधिकारभावना अधिराज्य करत असते आणि तिचा खेळ मोठा रहस्यमय, अतार्किक, हादरवणारा असतो. माणसाचा विवेक आणि


त्याची संकल्पशक्ती, त्याचे मूल्यभान आणि त्याची माणुसकी या गोष्टी सत्ता-मोहापुढे दुर्बळ ठरतात. लोकशाहीचा, मूलतत्त्वाचा बळी देऊन एकाद्या हुकूमशाहासारखी सत्ता मिळवणारा हिटलर जर्मनीच्या लोकशाहीत कसा वरचढ झाला असेल त्याचा प्रत्यय ही कादंबरी नकळत देते. त्याचप्रमाणे लोकशाहीत अराजकही कसे निर्माण होऊ शकते त्याचेही दर्शन घडते. या सर्व अंधेरनगरीत नेस्तनाबूत होतो तो सामान्य, सत्प्रवृत्त माणसू.
 अंधेरनगरीतली नगरपालिका ही एकप्रकारे देशाच्या लोकशाही प्रयोगाचा छोट्याशा पडद्यावर घेतलेला क्लोजअप आहे. जात, धर्म, राजकारणाचे तत्त्वज्ञान, समाजसेवेचे व्रत, वैयक्तिक आचरणाचा पवित्रपणा, सार्वजनिक जीवनातील समाजाशी बांधिलकी आणि मूल्यनिष्ठा, मैत्री या सर्वांचा हीनपणे कसा दुरुपयोग केला जातो याची प्रचिती हा जीवनानुभव आणून देतो. या सर्व गावगाड्यात एखादा वकीलबाबू सच्छील राहू शकतो पण तो नि:शक्त ठरतो. एखादा खरी मूल्यनिष्ठा असणारा, समाजकार्य, करण्याची इच्छा आणि काहीतरी चांगले करावे अशी आकांक्षा बाळगणारा, समर्थ, हुशार, तडफदार, आणि आत्माभिमान बाळगून जगू पाहणारा, भांगेसारखा नगरपालिका अधिकारी निवडणुकीच्या राजकारणाची वरून मोहरी हलवणाऱ्या पक्षश्रेष्ठींच्या बुलडोझरचा कसा बळी ठरतो याचे प्रभावी चित्र देशमुखांनी रेखाटले आहे.
 यात वेगवेगळ्या पक्षांची, धर्माची, जातीची, राजकीय पक्षाची माणसे येतात, पण देशमुख यांना माणसांच्या चित्रणात फारसा रस नाही आणि त्यांनी जो विषय समोर ठेवला आहे, त्यासाठी त्याची आवश्यकताही नाही. या माणसांचे ओझरते, कामापुरते, साधनस्वरूप, ढोबळ चित्रण येते. यातले वास्तव मुख्यत्वेकरून सिंधी नगराध्यक्ष लालाणी आणि नगरपालिका अधिकारी भांगे यांच्याद्वारा प्रस्तुत केले आहे. काहीसे महत्त्व जातीचे पाठबळ घेऊन नगराध्यक्ष बनू पाहणाऱ्या पाटील यांना व त्यांचे सोयरे बनू पाहणाऱ्या पवारांना आणि कादंबरीच्या उत्तरार्धात लालाणींना मात देऊ पाहणाऱ्या प्रकाशबापूंना आहे. पण यांचीही अनेक बारकाव्यांनिशी व्यक्तिचित्रे काढण्याचे प्रयत्न लेखकाने केलेले नाहीत. लालाणींचे मित्र जनता दलाचे वकील बाबू एक चांगले मित्र म्हणून आणि लालाणींना विवेकाचे भान देणारी व्यक्ती म्हणून थोडे ठळकपणे समोर येतात. भांगे यांची पत्नी यशोदा हिचेही एक समजूतदार गृहिणी या नात्याने ठळक चित्र आले आहे. यात जुने स्वातंत्र्यसैनिक पण नव्या भ्रष्ट राजकारणात एकटे पडले आहेत, सेवानिवृत्त सेनाधिकारी, समाजसेवा करू पाहणारे कणखर व जिद्दी मोडक आहेत. पण नव्या राजकारणात ते दोघेही निस्तेज होत आहेत. या सर्व माणसांपेक्षा लेखकाला मुख्यत्वे उभे


करायचे आहे ते राजकारणाचे भ्रष्टाचाराने बरबटलेले, वास्तवमूल्यांचा चुराडा करणारे स्वार्थकेंद्रित राजकारण; खालपासून वरपर्यंत या राजकारणाचे एकमेकात गुंतलेले धागेदोरे आणि ते प्रभावीपणे कादंबरीकाराने दाखवले आहेत.
 लालाणी नगराध्यक्ष झाले ते डावपेचाने. त्यांना या नगराने निर्वासित म्हणून आलेले असताना आश्रय दिला म्हणून नगरासाठी काही करण्याची त्यांची कृतज्ञतापूर्ण जिद्द. इतरांच्या रागालोभाची पर्वा न करता धडाधड काम करण्याची वृत्ती आणि यामुळे अहंकारावर आघात झालेल्या माणसांच्या इतराजीची काळजी न करता आपल्या बुद्धीच्या, कर्तृत्वाच्या आणि कार्यकुशलतेच्या बळावर नगरपालिकेचा . गाडा ओढण्याचे लालाणींचे धडाकेबाज व्यक्तित्व काहीसे नाट्यमयतेने तर पुष्कळसे वर्णनात्मक शैलीने कांदरीबकाराने चित्रित केले आहे. नगरपालिकेतील विविध गट, त्या गटांतील स्वार्थामुळे निर्माण झालेले उपगट, त्यांचे डावपेच, सत्तेसाठी, खऱ्या खोट्याचा विधिनिषेध न बाळगता चाललेली दौड, राजकारणात कायमचे शत्रू व मित्र नसतात याची खूणगाठ बांधून निर्लज्जपणे आपली खेळी खेळणाऱ्या नगरपित्यांचा खेळ, स्वार्थासाठी एकमेकांशी जमवून घेण्याचे व प्रसंगी मैत्रीचीही आहुती टाकण्याचे बेमुर्वतखोर आचरण यांचे प्रचितीपूर्ण चित्रण देशमुखांनी केले आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद, राज्याचे राजकारण आणि देशाचे राजकारण यातला केवळ निवडणुकीच्या यशाचे उद्दिष्ट ठेवून चालवलेले निदर्य खेळ हे या कादंबरीचे वास्तव आहे. लालाणींनी नगराध्यक्षपद अडीच वर्षे भोगले. आता उरलेला वर्षाचा काळ ते आपण भोगावे या आणि एवढ्याच उद्देशाने प्रकाशबाबू गटबाजी करतात आणि लालाणींना पराभव पत्करायला भाग पाडतात. त्यांच्यातील परस्परांच्या डावपेचांचे विश्वसनीय चित्र हा या कादंबरीचा महत्त्वाचा भाग. त्यात लेखकाला चांगलेच यश आले आहे. शेवटी लालाणी प्रकाशबाबूंनाही अध्यक्षपद भोगता येऊ नये म्हणून त्यांच्यापाशी असलेल्या प्रकाशबाबूंच्या सही असलेल्या कोऱ्या कागदाचा उपयोग करतात. हा प्रसंग एका बाजूने काहीसा नाटकी वाटतो, पण दुसऱ्या बाजूने मूल्यनिषेध न बाळगता सज्जन माणसेही कशी खालच्या स्तरावर येऊ शकतात याचे वास्तव यात दर्शवले आहे. या सर्व घोडदौडीत मालखरे यांच्यातील समर्थ पत्रकारही मूल्यविचार गुंडाळून ठेवून लालाणींच्या विरुद्ध आघाडीत सामील होतात. बुद्धिवादी लोकांची ही घसरण चिंताजनक आहे आणि ते वास्तव नाकारणेही कठीण आहे. ही कादंबरी एक प्रश्न उभा करते - लालाणींच्या माध्यमातून मुख्यत: आणि इतरांच्या माध्यमातून गौणत: - तो प्रश्न असा - शेवटी या सत्तापिपासेतून केलेल्या डावपेचांचे फलित काय? निरर्थक धडपड. पण सत्तापिपासेचा भोग हाच मोठा सम्मोहित करणारा भाग आहे. मात्र या प्रश्नाकडे लेखकाने बोट दाखवले


असले तरी या प्रश्नाचे भावनात्मक (वा निवेदनात्मक) चित्रण झालेले नाही.
 या कादंबरीत नगरपालिका अधिकारी म्हणून आलेले भांगे यांची व्यक्तिरेखाही लालाणींइतकीच महत्त्वाची आहे. ते कुशल प्रशासक तर आहेतच पण नोकरशाहीत निर्माण झालेल्या दोषांपासून मुक्त आहेत. भ्रष्टाचार, कामचुकारपणा, सत्तेसाठी कायदेकानून धाब्यावर ठेवून वागण्याची तयारी, नेत्यांच्या मर्जीसाठी जनहिताला तिलांजली देऊन मन मानेल तसे वागण्याची पद्धत या सर्व दोषांच्या विरोधात ते उभे आहेत. आपण ज्या गावात वाढलो, मोठे झालो त्या गावात काही चांगली कामे करण्याची त्यांची मनःपूर्वक इच्छा आहे. पण त्यांची अवस्था चक्रव्यूहाचा भेद करून आत गेलेल्या अभिमन्यूसारखी झाली आहे. नेते, नगरसेवक, कामगार या सर्वांविरुद्ध त्यांना सचोटीच्या भूमिकेसाठी जबर किंमत द्यावी लागते. दुःखाची गोष्ट ही, की लालाणीसारखा नगरपालिकेचा काही चांगली कामे करू पाहणारा अध्यक्षही आपली खुर्ची सांभाळण्यासाठी जाणूनबुजून भांगे यांच्याविरुद्ध भूमिका घेतो. भांगे यांची बदली होते. यात नगरसेवकांपासून केंद्रीय मंत्रिमंडळात असलेल्या सर्वांचा जाणता - अजाणता हात असतो. आजही शासनाधिकाऱ्यांमध्ये असलेल्या थोड्याशा उत्तम प्रशासकांचे भांगे प्रतिनिधित्व करतात. लोकशाहीच्या या चौकटीतल्या प्रशासनात, राजकारण्यांत, नेतृत्वात किमान कुवतीची माणसे कशी वरचढ ठरतात आणि जनहिताची खरी कळकळ असणारे सचोटीचे लोक कसे दूर फेकले जातात याचे प्रत्यंतर ही कादंबरी देते. लक्ष्मीकांत देशमुख यांच्याकडे भाषेचे आगळे सामर्थ्य नाही. त्यांनी जो विषय घेतला आहे, त्यासाठी त्याची फारशी जरुरीही नाही. पण व्यक्तिचित्रे अधिक भेदक करण्यासाठी, वर्णनाचे चित्रमूल्य अधिक वाढवण्यासाठी, संवादातील सामर्थ्य अधिक धारदार करण्यासाठी शब्दसामर्थ्याची जरूर असते. देशमुखांची शैली काहीशी डॉक्युमेंटरी स्वरूपाची वाटते. स्वातंत्र्योत्तर काळातील माणसांच्या प्रेरणा आणि प्रवृत्ती कशा अध:पतनाच्या मार्गावर घसरत चाललेल्या आहेत, माणसाचा स्वभाव भ्रष्ट होत जात आहे, त्यांच्यातील संवेदनशीलता कशी बधिर होत आहे याचे समर्थ चित्र देशमुखांनी काढले आहे. राजकीय सत्यस्थितीचा आविष्कार करणारी ही एक लक्षणीय कृत्ती आहे. अतिशय वस्तुनिष्ठ दृष्टीने राजकीय-सामाजिक वास्तव रेखाटणाऱ्या कादंबऱ्या मराठीत तशा कमी आहेत. त्यात देशमुखांची कादंबरी खूपच आशा निर्माण करणारी आहे.

राजकीय इतिहासाचे चित्रण

ग. प्र. प्रधान

 १९९८ सालचा 'अक्षर प्रतिष्ठान' चा दिवाळी अंक वाचीत असताना 'हरवलेला देश' या शीर्षकाखाली पुढील मजकूर होता. “हरवलेला देश' या अफगाणिस्थानच्या पार्श्वभूमीवरील इस्लामविरुद्ध कम्युनिझमच्या संघर्ष रंगवणाऱ्या व १९५० ते १९९८ या कालखंडातील अफगाण जनजीवनाचे दर्शन घडविणाऱ्या कादंबरीचे एक प्रकरण."
 मी कुतूहलाने ते प्रकरण वाचू लागलो आणि मला ते अतिशय आवडले. त्याचे लेखक लक्ष्मीकांत देशमुख हे मला परिचित नव्हते. परंतु या लेखकाला आपला अभिप्राय आणि अपेक्षा कळवाव्यात असे मला वाटले आणि मी त्यांना 'अक्षर प्रतिष्ठान'च्या परभणीच्या पत्त्यावर पत्र लिहिले काही दिवसांनी लक्ष्मीकांत देशमुख माझ्या घरी आले त्यावेळी मी चकित झालो. ते एक उच्चपदस्थ शासकीय अधिकारी आहेत हे कळल्यावर मला अधिकच विस्मय वाटला. मी लक्ष्मीकांत देशमुखांना म्हणालो, "आपण १९५० पासून १९९८ पर्यंतच्या अफगाणिस्थानचे चित्र रेखाटले. आता उपसंहार लिहिणार का?" त्यावर ते म्हणाले, “मी समग्र इतिहास लिहीत नाही. इतिहासातील एका कालखंडाचे चित्रण करणारी कादंबरी लिहिली आहे. कादंबरी आता प्रकाशनाच्या वाटेवर आहे. आपण कादंबरी वाचून योग्य वाटल्यास प्रस्तावना लिहावी." कादंबरीस प्रस्तावना लिहिणे उचित होईल की नाही अशा मन:स्थितीत मी होतो. परंतु ती वाचल्यावर मला कादंबरी तिच्या गुणावगुणांसह आवडली आणि लक्ष्मीकांत देशमुखांचा शब्द मोडवेना. त्यामुळे मी हे प्रास्ताविक लिहीत आहे. कादंबरीची सुरुवात होते ती अन्वर या तरुणाच्या कुटुंबाच्या चित्रणापासून. दुर्राणी वंशातील परमान गावचे हे अफगाण जमीनदाराचे कुटुंब. अन्वरचे वडील अब्बाजान यांची कुटुंबावर मायेची सावली आणि खानदानी घराण्यातला दबदबा. धर्मनिष्ठा आणि अल्लावरील श्रद्धा हे त्यांच्या जीवनाचे आधार. एक मुलगा सईद, शेतमजुरांना जरबेत ठेवून बागाईत शेती फुलवणारा. थोरला मुलगा 'वीश झलमायन'


या राजकीय संघटनेत गेला होता. ही संघटना बंडखोर नव्हती. परंतु तरीदेखील त्याची 'मंत्रीमंडळ संसदेला जबाबदार असावे' ही मागणी अफगाणिस्थानचे अमीर जाहीर शहा यांना मान्य झाली नाही आणि हैदरला त्याच्या सहकाऱ्यांबरोबर तुरुंगात डांबण्यात आले. दोन वर्षे झाली, त्याची सुटका झाली अशी बातमी आली पण ते घरी परतला नव्हता. अन्वर हा कॉलजमध्ये शिकत असतानाच मार्क्सवादाकडे झुकलेला. आता मोठ्या मुष्किलीने अब्बाजान आणि अम्मी यांची परवानगी मिळवून मॉस्कोला चाललेला. हा उमदा तरुण बाबरक करमाल या विद्यार्थी नेत्याच्या मार्क्सवादी विचारांमुळे आणि फा वक्तृत्वामुळे प्रभावित झाला होता. एकीकडे त्याचे मन प्रफुल्लित होत असतानाच अन्वरला टी. व्ही. वर बातम्या देणाऱ्या आणि आधुनिक कपडे घालून मनमोकळ्या फिरणाऱ्या सलमाच्या अंगावर कट्टर इस्लामी तरुणांनी तेजाब टाकल्यामुळे तिच्या मांड्या जाळल्या होत्या याची आठवण होते आणि विषण्णतेने त्याने मन झाकोळून जाते. या सर्व चित्रणातून पाहिल्या प्रकरणातच इस्लाम आणि कम्युनिझम यांच्यातील तीव्र तणावाची जाणीव वाचकाला होते.
 दुसऱ्या प्रकरणात लक्ष्मीकांत देशमुख यांनी राजे अमानुल्ला यांच्या निधनानंतर त्यांचे शव इटलीतून अफगाणिस्थानमध्ये आणण्यात आल्याचे सांगून, दीर्घकाळ मातृभूमीला पारखा होऊन विजनवासात राहिलेल्या या राजाच्या मृत्यूच्या वार्तेने सर्व अफगाण नागरिकांना जबरदस्त मानसिक धक्का बसला हेही सांगितले आहे. अमानुल्लांनी इंग्रजांशी लढून आणि राजनैतिक मुत्सद्देगिरी लढवून अफगाणिस्थानचे सार्वभौमत्व मिळविल्यामुळे अफगाण नागरिकांना ते अत्यंत प्रिय होते. परंतु ज्यावेळी त्यांनी सामाजिक सुधारणा करण्यात सुरुवात केली त्यावेळी धर्मात ढवळाढवळ करण्याचा त्यांना अधिकार नाही ही भूमिका घेऊन टोळीग्रमखांनी त्यांना पदच्युत केले. १९६० ला त्यांच्या दफनविधीसाठी प्रचंड संख्येने लोक एकत्र जमले असले तरी त्याच्यामध्ये अमानुल्लांच्या प्रमाणेच अफगाणिस्थानचे आधुनिकीकरण करू इच्छिणारे, कम्युनिझमकडे झुकलेले काही तरुण आणि पवित्र इस्लामच्या परंपराचा आग्रह धरणारे मुल्ला मौलची हे दोन प्रवाह होतेच. येथे लेखकाने भूतकाळ वर्तमानकाळात कसा वावरतो हे स्पष्टपणे दाखविले आहे. तिसऱ्या प्रकरणात राज्यशास्त्राचा गाढ अभ्यासक असलेल्या आणि अमेरिकेत काही वर्षे राहून शिकलेल्या प्रगतिशील विचारांच्या इलियास द्वारा लेखकाने अफगाणिस्थानच्या राजकीय जीवनाचे नेमके वर्णन केले आहे. डेनिस या वार्ताहराला दिलेल्या मुलाखतीत इलियास म्हणाले, "काबूल विद्यापीठात अफगाणिस्थानमधील सर्व प्रवाहांचं प्रतिबिंब पडलं आहे. पहिला प्रवाह 'विश झलयामान' पासून सुरू झालेला उदारमतवादी लोकशाहीवाद्यांचा आहे. हा सुखवस्तू, सुशिक्षित आणि अभिजन वर्गाशी संबंधित


पश्चिमात्य शिक्षण घेतलेला आहे. दुसरा प्रवाह हा रशियाच्या प्रभावामुळे डावीकडे झुकलेला आणि समाजवादी विचारसरणीकडे आकृष्ट झालेला आहे. तिसरा प्रवाह इस्लामी मूलतत्त्ववाद्यांचा आहे आणि विशेष म्हणजे अनेक सुशिक्षित तरुणांमध्ये इस्लाम पुनर्जीवनवादाच्या प्रेरणा प्रबळ आहेत. इलियास पुढे म्हणाले, “धार्मिक मूलतत्त्ववाद्यांचा प्रवाह वाढत जाईल हे सांगायला भविष्यवेत्त्यांची गरज नाही." येथपर्यंत ज्याप्रमाणे अफगाणिस्थानमधील राजकीय संघर्षाचे स्वरूप स्पष्टपणे मांडले आहे त्याचप्रमाणे पहिल्या तीन प्रकरणांत कादंबरीतील मुख्य व्यक्तिरेखांचेही ठसठशीत चित्रण केले आहे. अन्वर हा रशियात शिक्षण घेऊन, रशियन स्त्रीशी विवाह करून परत काबूलला येऊन तेथील विद्यापीठात शिकवू लागला होता. अन्वर बुद्धिमान आणि उमदा आहे. त्याची डाव्या विचारांशी प्रथम ज्यांनी ओळख करून दिली त्या अमीन सरांचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव आहे. तरुण कम्युनिस्ट नेता करमाल यांच्याबद्दल त्याला आकर्षण वाटत असले तरी अमीनसरांच्याबद्दल त्याच्या मनात गाढ प्रेम, किंबहुना भक्तीची भावना आहे. अन्वर विचाराने मार्क्सवादी असला तरी कुटुंबीयांच्यात त्याच्या भावना गुंतलेल्या आहेत. त्यांना दुखावणे त्याला फार कठीण जाते. त्याच्या रशियन पत्नीने स्वखुशीने इस्लाम धर्म स्वीकारल्यामुळे अन्वरची घराशी ताटातूट होत नाही. अर्थात त्याचे विचार आणि वागणे त्याच्या वडिलांना मुळीच मान्य नव्हते. अन्वरच्या मनात विचारांबद्दल द्वंद्व नसले तरी तो सरळ मार्गाने जाणारा असून भावनाप्रधान, कोणातरी नेत्याच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होणारा आहे हे लक्षात येते. करिमुल्ला ही या कादंबरीतील दुसरी महत्त्वाची व्यक्तिरेखा, त्यांनी अल अझर या इजिप्तमधील इस्लामिक विद्याकेंद्रात दीर्घकाळ राहून धर्माचा अभ्यास केला आणि नंतर ते काबूल विद्यापीठात इस्लामी धर्मशास्त्राचे विद्याप्रमुख आणि प्राध्यापक झाले. त्यांनी ताश्कंद आणि बुखारा येथे जाऊन तेथील भौतिक प्रगती आणि आधुनिक जीवन यांचे निरीक्षण केले होते. करिमुल्ला हे चारित्र्यवान, बुद्धिमान असून इस्लामचे कट्टे समर्थक असतानाच इस्लामच्या मानवतावादी स्वरूपाबद्दल होणारे हल्ले त्यांना अमान्य होते. काबूल विद्यापीठाच्या सिनेटवर डॉ. अनाहिता या स्त्री प्रतिनिधी निवडून आल्यावर त्यांच्या अभिनंदनाच्या सभेतील भाषणात करिमुल्ला यांनी त्यांचा स्त्रीबद्दलचा उदार दृष्टिकोन सांगताना इस्लामचीच ही दृष्टी आहे असे प्रतिपादन केले आणि त्याचवेळी कम्युनिझमला असलेला त्यांचा प्रखर विरोधही स्पष्टपणे मांडला. इस्लाम ही सर्वश्रेष्ठ उदात्त जीवनपद्धत आहे असे सांगतात. त्यांच्या मनात मूळ वाळवंटी अरेबिक जीवनपद्धती आणि आधुनिकतेशी इस्लामची सांगड घालणारा तुर्की समाज यांची तुलना सुरू झाली की ते अस्वस्थ होत. या उदार-मनस्क धर्मपंडिताचे व्यक्तिमत्त्व लक्ष्मीकांत देशमुख यांनी अत्यंत मार्मिक आणि कलापूर्ण
 रीतीने रेखाटले आहे.
 ही ऐतिहासिक कादंबरी आहे आणि जहीर शहाच्या राजवटीत पंतप्रधान असणारे दाऊदखान, कट्टर मार्क्सवादी तळातून वर आलेले, शेतकऱ्यांबद्दल अपार सहानुभूती असलेले कम्युनिस्ट नेते, आणि प्रभावी लेखक नूर महंमद तराकी, बुद्धिमान; विचारवंत आणि राजकीय डावपेच उत्तम जाणणारे आणि कुशलतेने डावपेच करणारे, हमिनुल्ला अमीन सर; आकर्षक व्यक्तिमत्त्व, अमोघ वक्तृत्व आणि कडवी मार्क्सवादी भूमिका असणारे तरुण बाबरक करमाल या व्यक्तिरेखांचे देशमुख यांनी ऐतिहासिक सत्याचा यत्किंचितही विषर्यास न करता, प्रभावी चित्रण केले आहे. या कादंबरीत अनेक स्त्रियांच्या जीवनाची कहाणी आहे. त्यांच्यापैकी सलमाची कहाणी मनाला चटका लावणारी आहे. ही इतिहासावर आधारलेली कादंबरी आहे. इतिहासातील घटनाचक्र आणि इतिहासात प्रामुख्याने वावरणाऱ्या नेत्यांचे उदय आणि अस्त यांचे चित्रण नाट्यपूर्ण आणि चित्तवेधक आहे. परंतु या कादंबरीचे सौंदर्य अन्वर, करिमुल्ला, सलमा आणि जमिला यांच्या जीवनातील सुखदु:खे, त्यांच्या मनातील वादळे आणि इतिहासाचे गतिचक्र वेगाने फिरत असताना त्यांच्या जीवनाची झालेली शोकात्मिका यामध्ये आहे. अन्वरला अफगाणिस्थानमध्ये रशियन राज्यक्रांतीप्रमाणे क्रांती व्हावी असे वाटते. त्याला श्रमिकांच्या दुःखाबद्दल सहानुभूती आहे. त्यांच्याच घरात शेतमजूर म्हणून राबणाऱ्या इस्माईलला तो शक्य ती मदत करतो. पुढे अनेक दिवस शेतकऱ्यांमध्ये काम करून प्रगतीचा मार्ग शोधतो. परंतु हे करताना तो अमीन सर, नूर महंमद तराकी आणि करमाल यांच्या नेतृत्वामागे वेळोवेळी फरपटत जातो. शेवटी तालिबानांचा विजय झाल्यामुळे त्याचे जीवन उद्ध्वस्त होते. ही एका उदारमनस्क आणि ध्येयवादी व्यक्तींची शोकांतिका आहे. करिमुल्ला यांना कम्यूनिझमचा व्हावा इस्लामी राजवट यावी असे वाटत होते. तालिबानची इस्लामी राजवट येते परंतु ती करिमुल्लाच्या अनेक अपेक्षा भग्न करणारी असते. त्यामुळे करिमुल्ला स्वत:च्या मनाला विचारीत असणार, 'मी जिंकलो की मी हरलो?' धर्माच्या उदात्त आशयाशी एकरूप झालेल्या श्रद्धाळू व्यक्तीची ही शोकांतिका आहे. सलमाच्या जीवनातील दुःखाची मोजदाद करणेही शक्य नाही. काही माणसे नियतीच्या हातची खेळणी असतात. अशीच होती दुर्दैवी सलमा. तिच्या राजकीय स्वप्नांच्या ठिकऱ्या उडाल्या आणि तिला कॅन्सरही झाला. अखेर तिची जगण्याची इच्छाच आटून गेली आणि मृत्यूने जणू तिला विश्रांती दिली. सलमाच्या दुर्दैवाच्या दशावतारामुळे वाचकाचे मन कळवळेल.
 जमिलाची कहाणी वेगळी आहे. तिच्या व्यक्तिमत्त्वाचा आविष्कार काव्यातून होतो आणि तिला जो समाजवादी विचार भावला त्याच्या यशासाठी लढताना,


त्याचे अपयश समोर दिसत असतानाही लढताना, तिला साफल्य वाटत असते. पहिले प्रेम वैचारिक मतभेदामुळे विफल झाले तरी विल्यम्सशी गाठ पडल्यावर ती त्याच्यावर अपार प्रेम करू लागते. विल्यम्स तिच्यापेक्षा अनेक बाबतीत उणा असला तरी दोघे अखेर लग्न करतात. परंतु तालिबानला शरीयतशिवाय अन्य कायदा मान्य नसतो. ते सिव्हिल मॅरेजला मान्यता देत नाहीत आणि म्हणून विल्यम्स व जमिला यांना प्रथम फटके आणि नंतर दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा देण्यात येते. जमिला निर्भयपणे शिक्षा सोसते, अखेर दगडांच्या वर्षावामुळे तिची शुद्ध हरपते. ती मरते तेव्हा अन्वर आणि इलियास 'ती कम्युनिस्ट विचारासाठी शहीद झाली' असे म्हणतात आणि करिमुल्लाही म्हणतात की जमिला औरत जातीच्या सन्मानासाठी आणि देशासाठी शहीद झाली. जमिलाच्या मृत्यूमध्ये उदात्तता, भव्यता - ट्रॅजिक पूँजर आहे.
 या कादंबरीत स्त्री-पुरुषांच्या संबंधाचे जे वर्णन आहे ते काही ठिकाणी मला अनावश्यक आणि अप्रस्तुतही वाटले. वासना हा मानवी जीवनाचा एक भाग आहे हे नाकारता येत नसले तरी कथानकाच्या मुख्य सूत्रापासून ढळणाऱ्या काही घटना कलादृष्ट्याही मला अयोग्य वाटतात.
 अफगाणिस्थानच्या इतिहासातील एका प्रदीर्घ कालखंडातील मुख्य प्रवाहाचे आणि त्या प्रवाहामुळे होणाऱ्या प्रचंड उलथा-पालथींचे चित्रण या कादंबरीत आहे आणि लेखकाने ते सुयोग्य रीतीने केलेले आहे. सुरुवातीस जहीर शहांच्या राजवटीत दाऊदखान हे पंतप्रधान म्हणून हळूहळू सर्वसत्ताधीश होतात. आणि जाहीर शहांचे राजकीय अस्तित्व संपुष्टात येते. दाऊद खान यांनी सत्ता हातात ठेवताना अफगाणिस्थानमधील गरीब जनतेच्या जीवनात काही सुधारणा केल्या. मात्र ते रशियाकडे फार झुकले नाहीत. नंतर कटकारस्थानांचे राजकारण सुरू होते. तराकीच्या प्रेरणेने मशिनगनधारी सैनिकांनी राजवाड्यावर हल्ला करून दाऊद खान आणि त्यांचे सहकारी यांना ठार मारले. ही जनक्रांती नसते. फ्रेंचमध्ये ज्याला 'कू दे ता' म्हणतात त्याप्रमाणे मूठभरांनी शस्त्राच्या जोरावर घडवून आणलेले हे सत्तांतर असते. नूरमहंमद तराकी आणि त्यांचे कम्युनिस्ट सहकारी रशियाच्या मदतीने हे करतात. नंतर तराकींची हुकूमशाही काही काळ चालल्यावर त्यांनाही खतम करून अमीन हे काही काळ सत्ता घेतात. त्यानंतर रशियाचा प्रभाव अधिकाधिक वाढत जातो आणि रशियन सत्ताधारी अमीन यांना संपवून बाबरक करमाल यांच्याकडे सत्ता सोपवितात. तराकींच्यापासून करमाल यांच्या राजवटीपर्यंत अफगाणिस्थान रशियाच्या पूर्णपणे अंकित होतो. अफगाण जनता रशियन सैन्यामुळे दबली असली तरी इस्लामी राजवट आली पाहिजे हा प्रवाह प्रबळ असतोच, या प्रवाहाला मुख्यत: पाकिस्तानकडून बळ मिळते. गुलमहंमद हिकमतयार आणि रब्बानी यांची



आपापसांत भांडणे चालली असली तरी आम जनता मुख्यत: इस्लामविरोधी कम्युनिस्ट राजवटीचा तिरस्कार करीत असते. करिमुल्ला हे सर्व इस्लामवादी व्यक्तींना एकत्र येण्याचे आवाहन करतात. ते यशस्वी होत नाहीत. त्यामुळे कडवे मूलतत्त्ववादी तालिबान प्रभावी होऊ लागतात. अमेरिकेतील सत्ताधीश तालिबानला शस्त्रे आणि पैसा याचे अफाट साहाय्य करतात. आणि करमाल यांची राजवट संपुष्टात येते. दरम्यान रशियन सत्ताधीश गोर्बाचेव्ह हे अफगाणिस्थानातून फौजा मागे घेण्याचा निर्णय घेतात. रशियाचे विघटन झाल्यामुळे महासत्ता म्हणून अमेरिका निरंकुश होते. या आंतरराष्ट्रीय उलथापालथीमुळे अफगाणिस्थानामधील कम्युनिस्ट राजवट कोलमडू लागते. डॉ. नजीब यांनी सत्ता हातात घेऊन काही काळ तडजोडी करीत कारभार केला, परंतु त्यांनाही सत्ता सोडावी लागते. तालिबान सत्ताधीश होतात. नजीब यांना ठार मारून त्यांचे मुंडके काबूलच्या चौकात टांगण्यात येते. हा सर्व रक्तरंजित इतिहास वस्तुनिष्ठपणे या कादंबरीत रेखाटलेला आहे. सत्ताधाऱ्यांचे क्रूर वर्तन, कार्यकर्त्यांची ससेहोलपट, जनतेचे अनन्वित हाल यामुळे अफगाणिस्थान हा एक 'हरवलेला देश' हे बदलण्यासाठी तालिबान इस्लामवर आधारित हुकमत स्थापन करतात. येथेही शस्त्रबळच महत्त्वाचे असते. थोडा विरोध दर्शविणाऱ्याला ठार मारण्यात येते. स्त्रियांना बुरख्यात कोंडण्यात येते. घरात डांबण्यात येते. जमीलाच्या निघृण हत्येत या कादंबरीची अखेर होते. अफगाणिस्थानच्या राजकारणातील ही भीषण हत्याकांडे, त्यात वावरणाऱ्या प्रमुख नेत्यांनी सत्ता मिळविण्यासाठी कम्युनिझम वा इस्लाम यांचा उद्घोष करीत विरोधकांना नेस्तनाबूत करून सत्ता बळकावणे, हा सारा रक्तलांच्छित घटनाक्रम यथातथ्य रीतीने या कादंबरीत दाखविला आहे. एकीकडे इतिहासाचे फिरणारे हे गतिमान चक्र आणि दुसरीकडे अन्वर, करीमुल्ला, सलमा, तराकी, अमीन, करमाल, जमीला आदींच्या जीवनाची वाटचाल यांची गुंफण लक्ष्मीकांत देशमुख यांनी अत्यंत कुशलतेने आणि कलात्मकतेने केली आहे. या प्रमुख व्यक्तिरेखांच्या भोवतालच्या साध्यासुध्या पण संवेदनशील स्त्रीपुरुषांच्या भावविश्वातील वादळे आणि त्यांच्या जीवनाच्या प्रवाहाला मिळणारी अनपेक्षित वळणे यांचेही चित्रण या कादंबरीत प्रभावीपणे केलेले आहे. भाषेचा सुयोग्य वापर आणि वातावरणनिर्मिती हे या कादंबरीचे विशेष गुण. ही कादंबरी लिहिण्यासाठी लक्ष्मीकांत देशमुख यांनी किती गाढ व्यासंग केला आहे आणि राजकारणातील विचारप्रवाहांचे आणि इस्लामच्या स्वरूपाचे किती अचूक आकलन केले आहे याचा प्रत्यय कादंबरी वाचताना येतो. 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' मधील राजकारणाच्या जाणकारीने केलेल्या चित्रणामुळे ती केवळ ऐतिहासिक कादंबरी राहात नाही. तिचे रूप मुख्यत: राजकीय कादंबरी असे आहे. परदेशातील राजकीय


घडामोडीचे चित्रण करणारी मराठीतील ही पहिलीच कादंबरी असावी. श्री. विश्वास पाटील यांच्या 'महानायक' या कादंबरीतील सुभाषबाबूंच्या जपानमधील वास्तव्याचे व कार्याचे केलेले व्यासंगपूर्ण चित्रण हा एक अपवाद. अफगाणिस्थानमधील राजकीय जीवनातील रशियाच्या प्रवाहामुळे आलेला कम्युनिस्ट विचार आणि त्याला इस्लामच्या प्रभावामुळे झालेली तीव्र प्रतिक्रिया आणि या दोहोंच्या संघर्षात इस्लाम धर्माची जागा कडव्या मूलतत्त्ववादी इस्लामने घेणे यांचे चित्रण आहे. त्याचप्रमाणे सत्तेच्या राजकारणातील असहिष्णू प्रवृत्तींचा निघृण कत्तलीत होणारा भीषण आविष्कारही लेखकाने दाखविला आहे. मूलतत्त्ववादी इस्लाम आणि कम्युनिझम ही विचारांची तसेच जीवनपद्धतीची दोन टोके असली तरी एका बाबतीत त्यांच्यामध्ये विलक्षण साम्य आहे. तालिबान आणि कम्युनिस्ट हे दोघेही स्वपक्षातील वा स्वत:चे जे लोक किंवा जे नेते शंभर टक्के त्यांच्याबरोबर नाहीत त्यांना शत्रू मानून नष्ट करतात. त्यामुळे तालिबान हे हिकमतयार आणि रब्बानी यांच्याशी लढतात. आणि त्याचप्रमाणे तराकी दाऊद खानाला सफा करतो, अमीन तराकीला ठार मारतो आणि करमाल अमीनला संपवतो. या भीषण सत्तासंघर्षाचे वास्तव चित्रण लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले आहे. अशा अमानुष सत्तासंघर्षाच्या वातावरणात मानवतावादी भूमिका असणाऱ्या करिमुल्लांना तालिबान राजवटीत स्थान नाही. तेथे मुल्ला ओमरसारखा धर्माध नेता श्रेष्ठ ठरतो आणि दुसरीकडे तराकी, अमीन आणि करमाल या सर्वांना इलियास आणि अन्वर दुबळेच वाटतात. कम्युनिस्ट आणि तालिबान या दोघांनाही लोकशाही अमान्य असते. शांततेच्या मार्गाने समाजपरिवर्तन हेही त्यांना मान्य नाही. मूठभर फॅनॅटिक सत्ता हाती घेऊन आपला विचार समाजाला स्वीकारण्याची सक्ती करणे हीच त्यांना क्रांती वाटते. ही भूमिका मानवतावादी विचारांना पूर्णपणे विरोधी आहे आणि या भूमिकेचे पर्यवसान जुलमी रक्तपिपासू राजवट हेच आहे.
 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' हा अफगाण जनतेच्या जीवनातील अत्यंत खडतर प्रवास. तीव्र राजकीय संघर्षामुळे जीवनाची जी उलथापालथ होते त्यात शेतीचे अतोनात नुकसान होते. हे मानवनिर्मित दु:ख कमी आहे की काय म्हणून निसर्गही कोपतो. भीषण दुष्काळ पडतो आणि हजारो माणसे मरण पावतात. जगण्यासाठी काहीतरी केले पाहिजे म्हणून इस्माइलसारखा इमानदार शेतकरी अफूची लागवड करणाऱ्या शेतावर कामाला जातो. अफू - चरस विकणाऱ्या आंतरराष्ट्रीय तस्करांच्या टोळ्या यातूनच निर्माण होतात आणि या तस्करीचा आधार घेऊन गुलबुद्दीन हिकमतयार, रब्बानी आणि सर्व तालिबान नेते शस्त्रास्त्रे खरेदी करतात. अमेरिकेचे कुटिल राजकारणी धर्माध तालिबानांना कोट्यवधी डॉलर्स देतात आणि अफूच्या


तस्करांशी अमेरिकेतील सी. आय. ए. ची हातमिळवणी राजरोस होते. एकीकडे मार्क्सवादी कम्युनिस्ट समतेच्या उदात्त ध्येयासाठी हवे ते अनिष्ट आणि दुष्ट मार्ग स्वीकारतात. धर्माच्या नावाखाली तालिबान तेच करतात आणि जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच नेतेही अशाच भ्रष्ट मार्गाने जातात. अमेरिकन मदतीवर प्रबळ झालेले तालिबान आणि रशियन मदतीवर सत्ता बळकावणारे कम्युनिस्ट यांच्या साठमारीत अफगाण जनतेचं जीवन मात्र उद्ध्वस्त होते. हिंदुकुश पर्वताच्या दऱ्याखोऱ्यांतील अफगाण टोळीवाले हे राकट, रांगडे जगण्यासाठी सतत शस्त्र जवळ बाळगणारे, मरणाला न भिणारे आणि काही वेळा क्रूरपणे कोणालाही मारून टाकणारे. राजवटी बदलताना कत्तली घडणारच हे ते गृहीत धरतात त्यामुळे अफगाणिस्थानमध्ये गेल्या शतकात झालेल्या राजकीय उलथापालथीतील रक्तपातांमुळे ते धास्तावले नाहीत. पण असे असले तरी अनेक अफगाणांच्या कौटुंबिक जीवनाची पडहाड, वाताहत झाली ?? कादंबरी वाचताना येते. अफगाणिस्थानच्या जीवनातील १९५० ते १९९८ या कालखंडातील इतिहासाचे राजकीय उत्पातांचे चित्रण करणारी ही कादंबरी मला चित्तवेधक वाटली. वाचकांनाही ती आवडेल असा मला विश्वास वाटतो.


'इन्किलाब विरुद्ध जिहाद'मधील संस्कृतिसंघर्ष

डॉ. सदानंद मोरे

 श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांची 'इन्किलाब विरूद्ध जिहाद' ही कादंबरी मराठीतील वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग मानावा लागतो. मराठी लेखक सहसा महाराष्ट्राबाहेरील पार्श्वभूमीवर लेखन करीत नाहीत. ही वस्तुस्थिती आणि त्यातही अशा प्रयोगासाठी अभ्यास आणि व्यासंग यांची आवश्यकता असेल तर त्या वाटेला जायची त्यांची तयारीच नसते. अशा परिस्थितीत देशमुखांनी आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या समस्येला केंद्रस्थानी ठेवून तिच्यातील वास्तवाची कोर न सोडता तिच्यावर आधारित कादंबरी लिहावी ही गोष्ट केवळ लेखकालाच नव्हे तर एकूणच मराठी साहित्याविश्वाला अभिमानस्पद वाटायला हवी. खरे तर ही कादंबरी देशमुखांनी इंग्रजी भाषेत लिहिली असती तर तिला जागतिक ख्याती मिळाली असली असे माझे मत आहे.
 अफगाणिस्तान या देशातील शे-पाऊणशे वर्षांमधील घडामोडींवर देशमुखांची कादंबरी आधारित आहे. जवळपास निम्मी पात्रे प्रत्यक्ष होऊन गेलेली आहेत. पण देशमुखांना या पात्रांची ऐतिहासिक हकिगत सांगायची नव्हती. त्यांच्या माध्यमातून त्यांना अफगाणिस्तानातील सर्वसामान्य स्त्री पुरुष ज्या दिव्यातून भरडून निघाले त्याचे दर्शन घडवायचे आहे. त्यामुळे त्यांना कादंबरीतील उर्वरित पात्रे कल्पनेने निर्मावी लागली. म्हणून तर या प्रसंगात ते स्वत: 'ते Fact आणि Fiction यांचे मिश्रण पसल्याने Faction' असे म्हणतात. वाङ्मयाच हाच 'फॉर्म' निवडणे देशमुखांसाठी अपरिहार्यच होते. इतिहासाचे कर्ते कर्तबगार नेते मंडळी असतात हे खरे असले तरी इतिहासाचे 'धर्ते' सामान्य माणसेच असतात हे लक्षात घ्यायला हवे. कार्यकर्त्या मान्यवरांची नावे इतिहासात नोंदवली जातात. पण धा जनसामान्यांची नावे केव्हाच गहाळ होतात. त्यामुळे त्यांची कल्पनाच करावी लागते. मात्र ही काल्पनिक पात्रे खऱ्याखुऱ्या पात्रांप्रमाणे विशिष्ट व्यक्तीच असल्या तर त्याच प्रतिनिधिक असतात. वास्तवातील विशिष्ट व्यक्ती आणि कल्पनेतील प्रातिनिधिक व्यक्ती यांचे


प्रस्तुत कादंबरी म्हणजे एक रसायनच होय.
 अर्थात एक वाङ्मयीन कृती नात्याने मला या कादंबरीची समीक्षा करायची नसून तिच्यातून व्यक्त होणाऱ्या सांस्कृतिक संघर्षाकडे मी लक्ष वेधणार आहे.
 प्रसिद्ध लेखक विचारवंत सॅम्युअल हटिंग्टन यांचे The Clash of Civilizations हे पुस्तक बरेच गाजले. हटिंग्टन यांच्या विचारांच्या खोलात जायची आपल्याला गरज नाही. जगाच्या इतिहासाकडे पाहायची एक वेगळी दृष्टी ते देतात हे मात्र खरे. अशी एक दृष्टी कार्ल मार्क्स यांनी दिली होती. मार्क्सच्या मते जगाचा इतिहास हा वर्गयुद्धाच्या इतिहास होय. वर्ग ही संकल्पना मुख्यत्वे आर्थिक असून उत्पादन साधनांची मालकी असलेला वर्ग, आणि अशी मालकी नसल्यामुळे केवळ श्रमावर जिवंत राहणाऱ्या माणसांच्या वर्ग यांच्यातील संघर्ष मार्क्सला अभिप्रेत आहे. असा संघर्ष अपरिहार्य असतो, कारण साधनांची मालकी व त्यानुसार नियंत्रण असणारा वर्ग त्यापासून वंचित असलेल्यांचे शोषण करतो. प्रस्तुतच्या, म्हणजे भांडवलशाहीच्या, युगात अशा शोषितांनी म्हणजे श्रमिकांनी एकत्र येऊन शोषक भांडवलदार वर्गाविरुद्ध क्रांती करावी असे त्याने सुचवले. या क्रांतीसाठी एका बाजूला श्रमिकांच्या संघटना Trade unions आणि दुसऱ्या बाजूला राजकीय साम्यवादी Communist पक्ष अशी व्यूहरचनाही त्याने सुचवली. अशा प्रकारची क्रांती आणि तिच्यातून प्रस्थापित झालेली श्रमिकांची सत्ता पाहायचे भाग्य मार्क्सला आपल्या हयातीत लाभले नाही. तथापि त्याच्या मृत्यूनंतर आधी रशियात आणि नंतर चीनमध्ये अशी क्रांती होऊन तेथे साम्यवादी सरकारे आली.
 हटिंग्टन यांना हा वर्गयुद्धाच्या इतिहास माहीत नाही असे नाही. पण त्यांचे विवेचन भविष्यलक्ष्यी आहे. रशियात भांडवलशाहीविरोधी कम्युनिस्ट शासन यावे. त्याने साऱ्या जगाला लाल झेंड्याखाली आणण्याचा म्हणजेच जगभर साम्यवादी विचाराने चालणारी सत्ता प्रस्थापित करण्याचा कसोशीने प्रयत्न केला हे खरे असले तरी या प्रयत्नाचे पर्यवसान त्याचे स्वत:चेच पतन होण्यात झाले. साम्यवादाचा स्वीकार केलेला दुसरा बलाढ्य देश म्हणजे चीन, पण धूर्त चीनने काळाची पावले ओळखून साम्यवाद केव्हा सोडला आणि भांडवलशाहीचा स्वीकार करून प्रस्थापित भांडवलशाही राष्ट्रांना त्यांच्याच पद्धतीने केव्हा आव्हान देऊ लागला हे समजले सुद्धा नाही. याच धूर्तपणाचा एक भाग म्हणजे त्याने हे सारे केले ते त्याच्या उच्चार करता!
 हटिंग्टनच्या विचाराने पुढे जायचे झाल्यास मार्क्सच्या पद्धतीनुसार होणाऱ्या वर्गसंघर्षाचा काल आता संपुष्टात आला आहे. म्हणजे 'कम्युनिझम' नावाची


भांडवलशाही विरोधात उभी ठाकलेली विचारसरणीच संपली आहे. त्यामुळे आता संघर्ष होणार आहे तो वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये (civilizations).
 मार्क्सची मांडणी आणि हटिंग्टनची मांडणी यांच्यातील एक साम्यस्थळ म्हणजे संघर्षाच्या अंतिम फेरीसंबंधीचे विचार. मार्क्सच्या म्हणण्याप्रमाणे वर्गसंघर्षाच्या प्रक्रियेत भांडवलदार आणि श्रमिक हे दोन वर्ग सोडले तर इतर लहानमोठे वर्ग एक तर भांडवलदारांबरोबर जातील किंवा श्रमिकांबरोबर. त्यांना स्वतंत्र अस्तित्व उरणारच नाही. आणि इतिहासाच्या अंतिम टप्प्यावर भांडवलदार आणि श्रमिक या दोन वर्गामध्ये क्रांतिकारक संघर्ष होऊन श्रमिक वर्गाचा निर्णायक विजय होईल.
 हटिंग्टन संघर्षातील प्रतिस्पर्धी म्हणून वर्गाऐवजी संस्कृतींना स्थान देतो. आजमितीला जगात अनेक संस्कृती असल्या तरी शेवटी त्यांना दोन पैकी एक संस्कृतीच्या अंगीकार करावा लागेल. संस्कृती म्हणजे युरोप-अमेरिकेन विकसित झालेली, व्यक्तिस्वातंत्र्यावर विश्वास असणारी, विज्ञान-तंत्रज्ञानाधिष्ठित विवेकवादी आधुनिक पाश्चात्त्य संस्कृती. दुसरी संस्कृती म्हणजे इस्लाम.
 पाश्चात्त्य विवेकवादी संस्कृती ही चिकित्सेवर Criticism आधारित आहे. तिच्यात धर्माचे महत्त्व कमीत कमी आहे. ती सेक्युलर इहवादी आहे. म्हणजे तिने धर्माला पारलौकिक व्यवहारापुरते मर्यादित केलेले आहे. तिचे ऐहिक किंवा लौकिक व्यवहार धर्मनिरपेक्षपणे चालतात. चिकित्सक विवेकवादासाठी प्रत्येक व्यक्तीला विचारस्वातंत्र्य हवे. ते आधुनिक पाश्चात्त्य संस्कृतीने देऊ केलेले आहे. धर्मग्रंथातील श्रद्धांचे आंधळेपणाने पालन न करता त्यांनाही प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य ही संस्कृती मान्य करते. विचारस्वातंत्र्याला मान्यता दिल्यावरही आचाराचा प्रश्न उरतोच. या बाबतीतही आधुनिक पाश्चात्त्य संस्कृती पुरेशी उदार आहे. ती मनुष्य जीवनाचे खाजगी आणि सार्वजनिक असा भेद करू शकते. दुसरे असे, की भविष्यकालीन घटितांच्या संदर्भात ती खुली आहे. याच्या अर्थ, आज आदर्श मानली जाणारी गोष्ट उद्या तशी न मानली जाण्याची शक्यता ती गृहीत धरते. या सर्व वैशिष्ट्यांचे सार सर कार्ल पॉपर यांनी केलेल्या शब्दप्रयोगाने सांगता येते. Open Society - तो शब्दप्रयोग आहे.
 अलीकडच्या काळात या संदर्भात धोका निर्माण केला होता तो साम्यवादी विचारधारेने - खरे तर, साम्यवादी विचारधारासुद्धा पाश्चात्त्य आधुनिकतेचेच अपत्य आहे. खरे तर पाश्चात्त्य आधुनिकतेच्या व्यक्तिनिष्ठ भांडवली उदारमतवाद आणि समाजनिष्ठ साम्यवाद अशा दोन शाखा मानता येतात. त्यांच्यात अनेक गोष्टी समान आहेत. (यहुदी, ख्रिस्ती आणि इस्लाम हे सेमिटिक परंपरेमधील तीन धर्म असल्याने त्यांच्या अनेक गोष्टी समान आहेत.) तसेच भांडवलवादी आणि

साम्यवादी संप्रदाय एकाच पाश्चात्त्य विचारधारेचे दोन प्रवाह असल्याने त्यांच्यातही अनेक गोष्टी समान आहेत. खाजगी संपत्तीचा हक्क हा कळीचा मुद्दा सोडला तर हे साम्य कोणाच्याही लक्षात यावे असेच आहे.
 परंतु देशमुखांच्या कादंबरीच्या आणि एकूणच इस्लामच्या संदर्भात आणखी एक मुद्दा महत्त्वाचा ठरतो. कम्युनिस्टांची म्हणजे साम्यवादी विचारसरणी पूर्णपणे निरीश्वरवादी आणि धर्म नाकारणारी आहे. याउलट पाश्चात्त्य उदारमतवादी लोकशाहीत निरीश्वरवाद्यांना शत्रू न मानता ईश्वरावर निष्ठा ठेवायची तरतूद आहे. तीच गोष्ट धर्माची. ही विचारधारा धर्मस्वातंत्र्य मानते. त्यात निधर्मी असण्याच्या स्वातंत्र्याचाही समावेश होतो.
 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' या देशमुखांच्या कादंबरीतील संघर्ष तिपेडी आहे. तेथे पाश्चात्त्य युरोअमेरिकन, कम्युनिस्ट आणि इस्लामी अशा तीन विचारधारा समोरासमोर उभ्या ठाकल्या आहेत.
 आता हटिंग्टन आणि देशमुख यांच्यात लेखनाच्या व्याप्तींची तुलना केली तर काय दिसते? जगातील विविध संस्कृतींचे विश्लेषण करताना हटिंग्टननी काही ऐतिहासिक संदर्भ दिले असतील, परंतु त्यांच्या विवेचनाचा रोख भविष्यलक्ष्यी आहे. देशमुखांच्या कादंबरीच्या कथानकाच्या कालाची व्याप्ती स्थूलमानाने लगतच्या म्हणजे साधारणपणे शंभर वर्षांचा इतिहास एवढ्यापुरती मर्यादित आहे.
 हटिंग्टन यांचे सामाजिक व राजकीय विश्लेषण संस्कृती या कॅटेगरीच्या चौकटीत केले गेलेले असल्यामुळे त्यांनी पाश्चात्त्य आचार-विचार, शैली आणि इस्लामिक (व अन्यधर्मीय युद्धा) आचार-विचार, शैली यांना एकाच पातळीवर ठेवले आहे. जरी इस्लामिक जीवनशैली ही धर्मकेंद्रित, ग्रंथाधारित आणि श्रद्धायुक्त असते. याचा पद्धतीच्या अवलंब करून कम्युनिस्टांच्या आचारविचारांना अर्थात जीवनशैलीत एक वेगळी संस्कृती समजून घटना समजावून घेतल्या त्यांचे विवेचन केले तर त्यात गैर काहीच नाही. मला वाटते देशमुख नेमके हेच करतात. एक बाजूला पाश्चात्त्य संस्कृती आणि साम्यवादी संस्कृती ही एकाच पाश्चात्य आधुनिकेतेची दोन रूपे आणि दुसऱ्या बाजूला मध्ययुगीन आचार-विचारांचा आग्रह धरणारी इस्लामी संस्कृती यांच्या त्रिकोणमितीचे हे ललित अंगाने केलेले आकलन व घडवलेले दर्शन आहे. त्यात एक संघर्ष अमेरिका नियंत्रित पाश्चात्त्य संस्कृती आणि रशियन नियंत्रित साम्यवादी संस्कृती यांच्यामधील आहे.
 दुसरा संघर्ष साम्यवादी संस्कृती आणि इस्लामी संस्कृती यांच्यामधील तर तिसरा संघर्ष अधार्मिक (न - धार्मिक) मानल्या गेलेल्या भोगविलासवादी पाश्चात्त्य संस्कृती आणि इस्लामिक संस्कृती यांच्यातील आहे. या संघर्षांमधील शत्रुमित्रांची


जुळवाजुळव लक्षणीय आहे. पाश्चात्त्य संस्कृतीमधील भोगविलासवाद आणि साम्यवादी संस्कृतीतील पाखंड या दोन्ही गोष्टींना इस्लामच्या विरोधी मानणाऱ्या अफगाणी मुलसलमानांची साम्यवादी संस्कृती राजकीय सत्तेच्या रूपाने त्यांच्या देशात शिरली तेव्हा तिला हुसकावून देण्यासाठी पाश्चात्त्य संस्कृतीचे नेतृत्व करणाऱ्या अमेरिकेची मदत घेण्यास अनमान केला नाही. या उलट साम्यवाद हा आपला जागतिक पातळीवरील आंतरराष्ट्रीय शत्रू आहे असे मानणाऱ्या अमेरिकेला इस्लाममधील मूलतत्त्ववादी गटांना जहाल सर्व प्रकारची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करून रशियाविरुद्ध वापरण्यात काही गैर वाटले नाही.
 पुढे हेच इस्लामी मूलतत्त्ववादी दहशतवादी गट भस्मासुराप्रमाणे अमेरिकेवर उलटले हे आपण जाणतो. ओसामा बिन लादेन हे अफगाण संघर्षाचेच अपरिहार्य परिशिष्ट किंवा खिल पर्व आहे. पण तो देशमुखांच्या कादंबरीच्या समाप्तीनंतरचा भाग आहे. त्याच्या उल्लेख यासाठी केला, की या प्रश्नाची गुंतागुंत लक्षात यावी. आपण इस्लामी दहशतवाद्यांना हाताशी धरून सोविएट रशियाचे खच्चीकरण करण्यात यशस्वी झाले म्हणून अमेरिकेने मुत्सद्दीपणाबद्दल आपली पाठ थोपटून घ्यावी की एक आधुनिक विचारसरणीच्या मदतीने दुसऱ्या आधुनिक विचारसरणीच्या सत्तेला आपण देशाबाहेर घालवू शकलो याबद्दल अफगाणी आणि इतर दहशतवादी मुसलमानांनी समाधान मानावे याचा निर्णय याच गुंतागुंतीमुळे करता येत नाही.
 या साऱ्या सांस्कृतिक संघर्षाची गुंतागुत आणि तीव्रता पेलण्यात देशमुख यशस्वी झाले आहेत. कादंबरी केवळ राजकीय स्वरूपाची नाही. राजकीय संघर्षाच्या मागे असलेल्या सांस्कृतिक संघर्ष विचारसरणींचे द्वंद्व महत्त्वाचे आहेत. राजकीय संघर्षाचा पापुद्रा उलगडून संस्कृतीच्या आणि विचारांच्या संघर्षात देशमुख उतरतात.
 इस्लामच्या मध्ययुगीन शृंखलांच्या बंधनांमुळे गती कुंठित झालेल्या अफगाणिस्तानमध्ये साम्यवादाच्या आधारे परिवर्तन घडवून आणून त्याला आधुनिक बनवण्याच्या प्रक्रियेला म्हणजेच क्रांतिसदृश परिवर्तनाला देशमुख इन्किलाब मानतात. ही क्रांती रोखून पारंपरिक इस्लामी मूल्यव्यवस्थेला चिकटून राहण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांच्या प्रतिकारी गटांचा तो जिहाद - असा हा 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' च्या लढा आहे. जिहादला समर्थन आहे ते इस्लाममध्ये अनुस्यूत असलेल्या धर्मतत्त्वांचे. स्वत: लेखकाला धर्माच्या नावाखाली व्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या संकोच करणाऱ्या, विशेषत: स्त्रियांवर अन्याय - करणाऱ्या जिहादींचे कौतुक वाटायचे कारण त्यांच्या सहानुभूतीचे पारडे इन्किलाबकडेच झुकलेले आहे. आणि हे त्यांनी हातचे काही राखून न ठेवता स्पष्ट केले आहे. “इन्किलाब म्हणजे क्रांती. क्रांती ही नेहमीच पुरोगामी, नवी मूल्ये मानणारी व ती प्रत्यक्षात साकार करण्यासाठी
 झालेली असते. अफगाणिस्तानच १९७८ चे सत्तांतर म्हणजे अशीच क्रांती होती. (डाव्या विचारांचे लोक वगळता इतरांना ते केवळ लष्करी बंड वाटतं. पण एक लेखक व अभ्यासक म्हणून मला ती क्रांती वाटते) डाव्या विचारांची समतेसाठी झालेली क्रांती होती." हा त्यांच्या खुलासा पुरेसा स्पष्ट आहे.
 याच क्रांतीच्या बाबतीत देशमुख पुढे सांगतात की, "ही क्रांती इस्लामी धर्मश्रद्धांवर घाव घालणारी असल्यामुळे तिच्या प्रतिकारासाठी व तिला संपविण्यासाठी कट्टर मूलतत्त्ववादी नेत्यांनी धार्मिक शस्त्र निवडलं. त्याचं नाव होतं. 'जिहाद' (धर्मयुद्ध). यातूनच प्रथम मुजाहिदिन (धार्मिक नेते) व नंतर तालिबान (धार्मिक विद्यार्थी) निर्माण झाले. म्हणून या संघर्षाचं स्वरूप इन्किलाब (क्रांती) विरुद्ध जिहाद (धर्मयुद्ध) असं आहे. त्याला अनेक पैलू व संदर्भ आहेत. त्यामध्ये लोकशाहीवादी मूल्यं विरुद्ध कट्टर धार्मिक मूल्यं यांचा रोमहर्षक सामना आहे. स्त्रीच्या समतेसाठी संघर्ष विरुद्ध बुरख्याच्या कालात अंधारात सर्वला दडपाण्याची धार्मिक व पुरुषी प्रवृत्ती आहे. आधुनिक पाश्चात्त्य उदारमतवादी मूल्यं ही भोगवादी व स्वैर जीवनातील प्रतीकं आहेत व ती गैरइस्लामी असल्यामुळे त्याज्य आहेत असं मानून पाश्चात्त्य जग, विशेषत: अमेरिका, इस्लामसाठी शत्रुवत आहे - ही रुजत जाणारी विचारधारा विरुद्ध जगात जहाल इस्लाम हाच खरा श्रद्धेय इस्लाम आहे असं समजून तो दृढ करण्यासाठी चाललेला प्रयास आहे."
 स्वत: लेखकाला मान्य असलेली मूल्ये कोणतीही असोत. या तीनही संस्कृींचे वर्णन करताना त्याने पक्षपात करून इस्लामी विचारधारा काळ्या रंगाने चितारली नाही. उलट इस्लामची कट्टर भूमिका मांडणाऱ्यांचे म्हणणेही त्याने सहानुभूतीने सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचे दिसून येते. लेखकाची वैयक्तिक धारणा एक गोष्ट झाली, आणि ती गृहीत धरूनही कलात्मक तटस्थतेला धक्का न लावणे ही दुसरी - याचे भान लेखकात असल्याचे जाणवते, याचा आवर्जून उल्लेख करायला हवा.
 जगाच्या पाठीवरील विशिष्ट भूराजकीय स्थान आणि स्थानिक लोकांच्या विशिष्ट (स्वतंत्र्यप्रिय, भांडकुदळ वगैरे) स्वभाव, शिवाय अशा स्थानी असलेल्या अशा स्वभावाच्या लोकांनी केलेला एक कट्टरवादी धर्माच्या अंगीकार, यातून अफगाणिस्तानची शोकांतिक उद्भवते. त्याच्या या स्थानामुळे त्याच्यावर आपले नियंत्रण असावे असे इतर स्पर्धिष्णू राष्ट्रांना वाटणे ही एक राजकीय अपरिहार्यताच म्हणावी लागेल. त्याचप्रमाणे अशा राष्ट्रांचा कडवा प्रतिकार करणे हा तेथील लोकांच्या स्वाभावाचाच भाग झाला. या प्रतिकाराने विशिष्ट रूप धारण करणे हा तेथील लोकांनी स्वीकारलेल्या धर्माच्या परिणाम होय. भूमी, लोकस्वभाव आणि


लोकांची वैचारिकता (त्यात धर्म आलाच) यातूनच संस्कृती साकार होते हे वेगळे सांगायला नको. हे सर्व देशमुखांच्या कांदबरीतून आपोआप उलगडत जातं हे विशेष.
 विशिष्ट भूमीतील विशिष्ट स्वभावाचे आणि धर्माचे हे लोक बऱ्याचदा इराणी साम्राज्याच्या तर क्वचित हिंदुस्थानातील राजसत्तेचा हिस्सा असत. त्यांना राजकीय अस्मिता देऊन त्यांचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याचे श्रेय अहमदशहा अबदाली याचे. इराणचा बादशहा नादिरशहा याच्या सैन्यातील या सेनानीने नादिरशहाच्या खुनानंतर इराणी सत्तेविरुद्ध बंड पुकारून अफगाणांचे स्वतंत्र राज्य स्थापिले हेच अफगाणिस्तान. अबदाली या कृत्यामुळे त्याची तुलना राष्ट्रनिर्मात्या शिवाजी महाराजांशी करण्याचा मोह शेजवलकरांसारख्या साक्षेपी इतिहासकाराला आवरता आला नाही. अहमदनशहाच्या काळात पूर्वेकडे हिंदुस्थानमध्ये मोगलांची सत्ता असली तरी व्यवहारात ती मराठ्यांच्या हाती गेली होती. त्यामुळे अफगाण व मराठे यांचा संघर्ष अटळ होता. हिंदुस्थानातील तेव्हाचा म्हणजे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धातील सत्तासंघर्ष हा मराठे आणि इंग्रज यांच्यातील होता असे वरकरणी दिसत असेल तरी त्या संघर्षाचा अफगाण हा आणखी एक भिडू असण्याची जाणीव मराठे आणि इंग्रज या दोघांनाही होती. हा त्यांच्या कल्पनाविलास नसून हिंदुस्थानातील मोगलांच्या राज्यमधील लढवयाच्या अफगाण्यांची लक्षणीय संख्या या वस्तुस्थितीवर आधारित जाणीव होती. त्याच्या अगोदर शेरशहा सूरीसारख्या अफगाणाने हिंदुस्थानात राज्य करून आपण मोगलांना पर्याय ठरू शकतो हे दाखवून दिले होतेच. त्यानंतर नशीब काढण्यासाठी हिंदुस्थानात येत राहिलेल्या अफगाणांनी उत्तर हिंदुस्थानात विशेषत: गंगायमुनेच्या दुआबात पठाणांनी चांगलेच बस्तान बसवले होते. त्यांच्यातलाच एक नजीबखान रोहिला हा मराठ्यांच्या पानिपतास निमित्त ठरला होता. आधी मराठ्यांनी आणि नंतर शिखांनी अफगाण्यांना आपल्या अंगावर घेऊन थोपवल्यामुळे इंग्रजांचे काम सोपे झाले. हिंदुस्थानच्या सत्तास्पर्धेत व संघर्षात अफगाणांना तोंड देण्याच्या प्रसंग त्यांच्यावर कधीच ओढवला नाही. मराठ्यांनी मात्र एकीकडे अफगाण आणि दुसरीकडे इंग्रज यांना टक्कर देत हिंदुस्थानचे पारतंत्र्य किमान पन्नास वर्षे तरी पुढे ढकलले.
 मराठ्यांवर मात करीत इंग्रजांनी हिंदुस्थान घशात घातला तरी त्यांचा आणि अफगाणांचा संघर्ष मात्र वेगळ्या स्वरूपात चालूच राहिला. विशेष म्हणजे अफगाणिस्थानच्या विशिष्ट भूराजकीय स्थापनामुळे त्याला आंतरराष्ट्रीय राजकारणाचे वेगळे परिमाण लाभले.
 युरोपमधील आपला क्रमांक एकचा शत्रू असलेल्या फ्रान्सला त्याची जागा

इंग्रजांनी नेपोलियनचा पराभव करून दाखवून दिली हे खरे असले तरी इंग्रजांचा मार्ग पूर्णपणे निर्वेध झाला होता असे म्हणता येत नाही. त्यांना शह देऊन आपण .
 साम्राज्यविस्तार करण्यास झारच्या ताब्यातील रशिया सिद्ध होता. आणि मुख्य मुद्दा हा होता त्यासाठी रशियात त्याच्या हद्दीला हद्द लागून असलेल्या अफगाणिस्तान या राज्याच्या उपयोग होणार होता. तो होऊ न देण्यात इंग्रजांचे यश होते. म्हणून अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापासूनच ब्रिटिशांचे लक्ष अफगाणिस्तानावर नियंत्रण ठेवण्याकडे लागले. त्यासाठी त्यांना अफगाणिस्तानबरोबर तीन युद्धे करावी लागली. त्या तपशिलात जायचे कारण नाही परंतु साम्राजपिपासू सत्तांच्या संघर्षात अफगाणिस्तान पाहिल्यापासूनच कसा भरडला जात होता हे यावरून लक्षात येईल. या संघर्षातील आधीचे प्रतिस्पर्धा होते रशिया आणि ब्रिटिश. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटनची जागा अमेरिकेने घेतली. अफगाणिस्तानचे भरडले जाणे चालूच राहिले.
 'इन्किलाब' च्या प्रारंभी अँग्लो अफगाण संघर्षातील शेवटच्या पर्वाचा उल्लेख करून देशमुखांनी इतिहास आणि कलात्मकता यांचे औचित्य साधले आहे. विवेकाने येणारी आधुनिकता आणि धर्माने येणारी गतानुगतिकता यांच्या संघर्षाचे चित्रण करणाऱ्या या कादंबरीत ब्रिटिशांना शह देणाऱ्या आणि त्यासाठीच अफगाणिस्तानचे आधुनिकीकरण करून पाहणाऱ्या अमानुल्ला या अमिराचे कर्तृत्व सांगितले गेले आहे. त्याच्या या कर्तृत्वाचे वर्णन करणारे एक पुस्तकच तेव्हाचे पत्रकार श्री. रा. टिकेकर यांनी लिहिले होते, 'सिंहाला शह' हे त्याचे नावच त्याची समर्पकता सूचित करते. सिंह हे तेव्हाच्या ब्रिटिश सत्तेचे प्रतीक समजले जात होते. अमानुल्लाने आपले सामर्थ्य वाढवून अफगाणिस्तानला राजकीय सार्वभौमत्व प्राप्त करून दिले. तो रशियाच्या मदतीने हिंदुस्तानवर स्वारी करणार आहे अशी हवा तेव्हा निर्माण झाली होती आणि त्यामुळे येथील ब्रिटिश सत्ताधारी हवालदिल झाले होते.
.  कादंबरीकाराच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुर्कस्तानाचा सत्ताधीश कमाल पाशा अतातुर्क याने आपल्या देशाच्या आधुनिकीकरणाची सुरुवात करण्यापूर्वीच अमानुल्लाने ही प्रक्रिया अफगाणिस्तानात राबवण्याच्या प्रारंभ केला होता. ब्रिटन, रशिया यांच्यासारख्या पाश्चात्त्य शत्रूना तोंड द्यायचे झाल्यास त्यांच्यासारखेच आधुनिक होण्याशिवाय पर्याय नाही हे त्या राजाने ओळखले होते. पण कमाल पाशाला यश मिळाले तर अमानुल्ला अपयशी ठरला. 'स्वातंत्र्य आणि समते'चा पुरस्कार करणाऱ्या या अमीराला नेमक्या याच कारणामुळे पायउतार व्हावे लागले. त्यानंतर आयुष्यातील अखेरची तीस वर्षे इटालीमध्ये अज्ञातवासात काढून तो १९६० मध्ये मरण पावला. कादंबरीच्या प्रारंभीच त्यांच्या मृत्यूची खबर आणि त्याचा दफनविधी त्याच्याच इच्छेनुसार अफगाणिस्तानात कसे केले जाते याचे


वर्णनही येते.
 बलाढ्य ब्रिटिश साम्राज्यवादी सत्तेला शह द्यायचा असेल तर तोडीस तोड ठरू शकणाऱ्या रशिया या दुसऱ्या महासत्तेशी संधान बांधायला हवे हे अमानुल्लाने ओळखले होते. म्हणूनच ब्रिटिशांना त्याच्याशी जुळवून घ्यावे लागले. साहजिकच अमानुल्ला हाच विसाव्या शतकातील नव्या अफगाणी राजकरणाचे प्रेरणास्थान ठरला.
 लेखनात वा चर्चेत पण 'अफगाणिस्तान, अफगाणी' अशा प्रकारचे शब्द प्रयोग सररास करीत असले तरी वास्तवात अफगाण समाज हा वेगवेगळ्या टोळ्यांनी बनलेला आहे. त्या प्रत्येक टोळीचे रीतीरिवाज वगैरे एकमेकांपेक्षा वेगळे असतातच. परंतु त्यांची एकमेकांशी स्पर्धा असते व एक टोळी दुसऱ्या टोळीच्या वर्चस्वाखाली नांदायला तयार नसते. या वांशिक भेदाचाही परिणाम अफगाणिस्तानच्या राजकारणावर आणि राजकीय संस्कृतीवर झाला असल्याचे भान देशमुखांना आहे. अर्थात असे असले तरी त्या सर्वांचा धर्म एकच, म्हणजे इस्लाम; पंथही एकच म्हणजे सुनी आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सर्वांना सारखेच स्वारस्थ असलेल्या तीन गोष्टी म्हणजे झर (सोने) झन (बाई) आणि जमीन या तीन वस्तूंसाठी त्यांची धडपड चालू असते. अशा परिस्थितीत त्यांचा एक एकसंध राजकीय समाज बनवणे, राजकीय संस्कृतीची निर्मिती करणे किती अवघड आहे याची कल्पना यावी. जे काही ऐक्य वगैरे दिसून येते त्याचे कारण इस्लाम धर्म आहे. कारण इस्लाम हा एक सर्वंकष धर्म आहे. जीवनाची खाजगी आणि सार्वजनिक, ऐहिक आणि पारलौकिक अशी सर्व अंगे त्याने व्यापिली असून तो त्याचे नियंत्रण करीत असतो. कुराण हा त्यांचा फक्त धर्मग्रंथच नसून तो कायद्याचा म्हणजे शरीयतचाही मुख्य आधार आहे. जर काही संदिग्धता किंवा उणीव जाणवली तर ती महंमद पैगंबरांच्या आयुष्यातील बोधदायक प्रसंगांनी (हदीस) भरून काढली जाऊ शकते. कुराणातील ईश्वरी वाणी आणि हदीमधील पैगंबरचारित्र्यातील अनुकरणीय आदर्श यांनी इस्लामी कायदा परिपूर्ण होतो. शिवाय स्वत: महंमद हे ईश्वराचा संदेश मुनष्यजातीपर्यंत पोहोचवणाऱ्या प्रेषितांमधील अखेरचे प्रेषित असल्यामुळे या कायदा आता अंतिम ठरत आहे. त्याच्यात कोणत्याची परिवर्तनाची, सुधारणेची गरज नाही व तशी शक्यताही नाही. तसे करायचा कोणी प्रयत्न केलाच तर त्यांना धर्मद्रोही ठरवणे हे अगदीच सोपे आहे.
 इस्लामची अशा प्रकारची मांडणी हा खरे तर इस्लामचा मुख्य प्रवाह आहे. .यापेक्षा वेगळे काही म्हणणारे अस्तित्वात नाहीतच असे नाही, परंतु त्यांचा आवाज अत्यंत क्षीण असल्याने तो दडपून टाकणे अवघड नसते. तरीसुद्धा या प्रवाहाची

नोंद घेण्यास देशमुख विसरत नाहीत. भारतातील इस्लामी सुधारक अशगर अली इंजिनियर यांचा व त्यांच्या दृष्टिकोनाचा ते आदरपूर्वक उल्लेख करतात. कादंबरीतील स्त्री (मुक्ती) वादी अनाहिता कुराणामधील आयतांच्या आधारेच स्वत: महंमद स्त्रीपुरुष समानतावादी होते असे पटवून देण्याच्या प्रयत्नात असते. तिच्या दृष्टिकोन ऐतिहासिक आहे. महंमदानंतर "इस्लामी समाज सरजामी वृत्तीच्या पर्शिया व बायझंटाइन समाजाच्या प्रभावाखाली आला. हे समाज इस्लामपूर्व जाहिलिया काळापासून पुरुषप्रधान समाजरचनेचं अनुकरण करणारे होते आणि त्याचे पुरुष अनुयायी क्रांतिकारी आणि पुरोगामी नव्हते. त्यामुळे कुराणाचं भाष्य करताना त्यांनी पुरुषांना झुकतं माप दिलं. स्त्रीसाठी प्रेषितांनी जे दिलं ते चुकीच्या व तात्कालिक संदर्भात लागू करणारं भाष्य करीत स्त्रीला दुसऱ्या व तिसऱ्या हाजरा शतकात चार भिंतीआड जेरबंद करण्यात हनाफी परंपरेच्या भाष्यकरांना यश मिळालं."
 अनाहितासारख्या मुक्त स्त्रीकडून असले विचार समजून घेण्याच्या मन:स्थितीत अफगाणी पुरुष कसे असणार? म्हणून इस्लामचे काटेकोरपणे पालन करणारे करीमल्लासारखा पंडितही देशमुख रंगवतात. करीमुल्ला पवित्र कुराणाचा हवाला देऊन सांगतो की "इस्लामनं स्त्री-पुरुषांच्या नात्याला समानता बराबरी बक्क्ष केली आहे. एका आयतीत म्हटलंय की, स्त्री-पुरुष दोघंही एकाच नफ्स जिवंत हस्तीपासून बनलेले आहे. म्हणून एक दुसऱ्यापेक्षा वरचढ नाही. माझ्या मते ही आयत समानतेचा पाया आहे. या भूमिकेमुळेच करीमुल्लाला पत्नीला तलाक देणे मान्य नाही. दिव्य कुराणानं तलाक ही अबगाज अल मुबाहत' म्हणजे परवानगी असलेली पण सर्वांत वाईट व नापसंत असलेली कृती मानली आहे."
 करीमुल्लाच्या विवेचनाचा अर्थ असा होतो की प्रेषितांनी अपवाद म्हणून केवळ मुभा दिलेल्या कृतीला उत्तरकालीन पुरुषवर्चस्ववादी लोकांनी जणू नियमच बनवून टाकले.
 करीमुल्लासारख्या पात्रामुळे देशमुख इस्लाममधील आणि विशेषत: तेव्हाच्या अफगाणी मुसलमानांमधील आंतरिक संघर्ष टिपण्यात यशस्वी झालेले आहेत. आधुनिक पाश्चात्त्य (आधुनिक) साम्यवादी आणि इस्लाम अशा तीन सांस्कृतिक विश्वांमधला संघर्ष उभा करताना देशमुख इस्लाममधीलच दोन प्रवाहांमधील संघर्ष दाखवायला विसरत नाहीत हे महत्त्वाचे आहे. दुर्दैवाची बाब अशी, की दोन जबरदस्त व प्रभावी आधुनिक विचारधारांच्या दबाव-दडपणाखाली इस्लाममधील अंत:संघर्ष दडपला जातो व कुराणाच्या आधारे इलाममध्ये सुधारणा करण्याची इच्छा असणाऱ्यांनाही इस्लामच्या रक्षणासाठी शेवटी कर्मठ, प्रतिगामी विषमतावादी

प्रवाहाबरोबर वाहवत जावे लागते!
 धार्मिक मुद्द्यांबरोबरीने राजकीय संस्कृतीचाही विचार करावा लागतो. कादंबरीत जाता जाता का होईना परंतु गंभीरपणे केलेल्या पंडित नेहरूंनी आखलेल्या अलिप्ततावादी धोरणाचा उल्लेखही कौतुकाने करण्यात आलेल्या आहे. त्याच्याशी अफगाण सत्ताधीशांच्या परराष्ट्र धोरणाची तुलना करता येण्यासारखी आहे. या धोरणाला 'बेतर्फी' असे नाव देऊन त्याचे समर्थन करणारी पात्रे कादंबरीत आहेत. हे धोरण आणि नेहरूंचा अलिप्ततावाद यांच्यात मूलभूत फरक आहे. 'बेतर्फी' धोरणात दोन्ही बाजूंना झुलवत ठेऊन त्यांच्याकडून सारखेच फायदे उपटण्याची चलाखी अनुस्यूत आहे. अलिप्ततावादात दोन्ही सत्तांना सारख्याच अंतरावर ठेवण्याचे व प्रसंगी त्यामुळे होणारे नुकसान सोसण्याचीही तयारी आहे.
 देशमुखांच्या कादंबरीचा विस्तार कादंबरी या वाङ्मय प्रकाराला साजेसाच आहे. पण तो अधिक होऊ नये या व्यवहारिक कारणांसाठी त्यांना अनेक महत्त्वाचे मुद्दे केवळ स्पर्श करून सोडून द्यावे लागले आहेत. धर्माला विरोध करण्याचा, त्याला अफूची गोळी मानणाऱ्या मार्क्सवादी विचारधारेचे स्वरूपही उत्तरकालीन मार्क्सवादी भाष्यकारांमुळे इस्लामसारखाच कर्मठ धर्माप्रमाणे बंदिस्त झाले याचे सूचन कादंबरीत आढळते. त्याला निराश्वरवादी धर्म म्हणणे त्याच्या पाठिराख्यांना आवडणार नाही, पण ते एक प्रकारची धर्मप्राय श्रद्धाच बनली असे म्हणण्यास हरकत नाही याउलट भांडवलशाही विचार हा खुला व समावेशक राहिल्याने तो परिस्थितीला प्रतिसाद देत सतत बदलत राहिला. कालमानाप्रमाणे व परिस्थितीच्या रेखाट्याने अनावश्यक, ओझे ठरू शकणाऱ्या गोष्टींना टरफलाप्रमाणे फेकून देत त्याने आपला गाभा अबाधित ठेवला. नवनवी रूपे धारण केली. मार्क्सचा 'कॅपिटल' ग्रंथ कम्युनिस्टांसाठी कुराणाप्रमाणेच धर्मग्रंथाइतका प्रमाण ठरला. त्यांनी त्याची जणू पोथी केली. तसा प्रकार भांडवलशाहीने ना अॅडम स्मिथच्या बाबतीत केला, ना केन्सच्या. भांडवलशाहीचे रूप प्रवाही राहिले. तिच्या प्रवाहीपणाची नीट दखल घेण्याऐवजी त्याच्याकडे फसवेपणा म्हणून पाहिले गेले. खरे तर एकीकडे धर्माच्या विरुद्ध मानल्या गेलेल्या मार्क्सवादात धर्माचे मूलभूत कार्य करण्याची क्षमता आहे हे लक्षात घेतले गेले नाही मार्क्सवादाचे हे सहसा अपरिचित राहिलेले रूपही देशमुख दाखवून देतात. ते रशियन तान्याच्या (ऊर्फ अफगाणी तराणा) तोंडून, "या उच्च प्रतीच्या बुद्धीला मी धार्मिक न म्हणता नैतिक म्हणेन. जी समतेची स्वप्नं पाहणाऱ्या व ती साकार करणासाठी धडपडणाऱ्या माणसात जरूर असते. त्या माणसांच्या बुद्धीचं समाधान करण्याचं सामर्थ्य मार्क्सवादात आहे. स्वत:च्या पलीकडे असलेल्या तत्त्वाशी एकरूप होऊन निसर्गाशी वा इतर माणसांशी संवादाचं नातं

जोडण्याची जी धार्मिक प्रेरणा माणसाच्या ठिकाणी असते त्याचे समाधान करील असं हे तत्त्वज्ञान आहे."
 इस्लाम आणि मार्क्सवाद यांच्यात हे आणखी एक साम्य आहे. इस्लामला भाष्यकारांनी बंदिस्त करून टाकले तसाच काहीसा प्रकार मार्क्सवादाच्या बाबतीतही घडलेला दिसतो. खरे तर मार्क्सवादामधील अंत:संघर्ष हा एका स्वतंत्र क्रांतीचा विषय होऊ शकतो. लेलिन-स्टॉलिनच्या काळातील रोझा लुक्झेंबर्ग, ट्रॉटस्कीपासून शरद पाटलांपर्यंत हा अंत:संघर्ष चालला आहे. रोझाची आठवण कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांनी आपल्याला मुलीला तिचं नाव ठेवून जागृत ठेवली एवढंच. देशमुखांच्या कादंबरीत डांग्याचे उल्लेख येऊन जातात याची जाता जाता नोंद घ्यायला हवी.
 जागतिक पातळीवर ठिकठिकाणाच्या साम्यवादी पक्षांची सूत्रे रशियाकडे गेली कारण रशियामध्ये साम्यवादी राजवट होती व तिच्याकडून या पक्षांना रसद मिळायची. पर्यवसान रशियाच्या वर्चस्वात झाले. आणि रशियन कम्युनिस्ट मार्क्सवादाचा जो अर्थ लावतील तोच प्रमाणभूत असे मानण्याकडे इतर कम्युनिस्टांची प्रवृत्ती होऊ लागली. असे असले तरी भारतीय कम्युनिस्ट आपले स्वत्व राखण्यात त्यातल्या त्यात यशस्वी झाल्याची देशमुखांची धारणा आहे. ती आनंद आणि अनघा या भारतीय कॉग्रेड दंपतीच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसते. साम्यवादाला अभिप्रेत असल्याप्रमाणे हे जोडपे निधर्मी आहे. मात्र धर्म आणि संस्कृती यांच्यातील फरक त्याला चांगलाच समजतो. धर्माला दूर ठेऊन सांस्कृतिक सोहळे, उत्सव साजरे करून जीवन अर्थपूर्ण करीत त्याचा आनंद कसा घ्यायच्या याचे इंगित या दोघांना कळलेले असते. ते पाहून अफगाणी कॉमेडस् चकित होतात. हिंदूना हे शक्य होते तर मुसलमानांना का होऊ नये? इस्लाम हा हिंदू धर्माच्या तुलनेत सर्वंकष आणि बंदिस्त असण्याच्या हा परिणाम असाव्या हे उघड आहे. इस्लामी संस्कृतीत धर्म जीवनाच्या कोणत्याही क्षेत्राला आपल्या कक्षेच्या बाहेर ठेवण्याची परवानगी देत नाही. इतरत्र धर्म हे संस्कृतीचे एक अंग असते. कदाचित अत्यंत महत्त्वाचे अंगही असेल. पण धर्माला पुरून संस्कृती दशांगुले उरते, तसे इलाममध्ये होत नाही. तेथे धर्मच संस्कृतीला व्यापून राहिलेला आहे. अशा प्रकारची सार्वभौम सर्वकषता हे जसे इस्लामचे वैशिष्ट्य आहे तसेच ते मार्क्सवादाचेही आहे. आता या वैशिष्ट्याचा जसा चांगला उपयोग करता येणे शक्य आहे. तसा गैरवापरही शक्य आहे. त्यामुळे टीकेचा रोख त्या विचारसरणींच्या विरुद्ध न राहाता त्यांच्या दुरुपयोग करणाऱ्यांच्या विरुद्ध असला पाहिजे. व त्यांच्या विषयातून या विचारसरणींना मुक्त करण्याच्या प्रयत्न करायला हवा. असे करता आले तर दोन्ही विचारांमधील योग्य गोष्टींच्या समन्वय करता येईल. इस्लामवर

मार्क्सवादाचे कलम करता येणे शक्य होईल. देशमुखांच्या कादंबरीत दोन्ही विचारप्रणालींकडे सकारात्मकपणे पाहणारी पत्रेही आहेत. खरे मार्क्सवादी स्त्रीपूजक असतात असे एका रशियन मार्क्सिस्टाला ठणकावून सांगणारी जमिला आपल्याला भेटते. तसेच स्त्रियांचा आदर करणारा धर्मनिष्ठ मुसलमान करिमुल्लाही भेटतो.
 इस्लाम वाचवण्यासाठी काम करीत आहोत अशी भूमिका घेणाऱ्या मुजाहिदीन आणि तालिबान यांच्या संघटनांना अफगाणिस्तानात धर्माच्या नावाखाली आपल्याच स्त्रियांवर कसे अत्याचार करतात त्याचा हिशेबच देशमुख या कांदबरीत मांडतात. इस्लामप्रमाणे आचरण करण्याचा आग्रह धरणाऱ्या या धार्मिकांचे स्वत:चे वर्तन इस्लामशी कितपत सुसंगत आहे असा प्रश्न त्यामुळे आपोआपच उपस्थित होतो.
 शेवटी कोणत्याही संस्कृतीचे मूल्यमापन करण्याची महत्त्वाची व निर्णायक कसोटी या कांदबरीतून हाती लागते ती म्हणजे त्या संस्कृतीत स्त्रीला कोणत्या प्रकारची वागणूक मिळते. संस्कृतीच्या संघर्षात आपण कोणाची बाजू घ्यायची हे ठरवताना देखील याच कसोटीचा उपयोग केला जावा असा संदेशही वाचकांपर्यंत अप्रत्यक्षपणे पोहोचतो. जिहादच करायचा असेल तर तो 'इन्किलाबसाठी' का करू नये असा प्रश्नही त्यांच्या मनात निर्माण होतो. आणि त्यातच या कादंबरीचे यश आहे.

आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमीवरील शोकांतिका

प्रल्हाद वडेर

 'नरेच केला हीन किती नर' याचा प्रत्यय देणाऱ्या या कादंबरीत रशियन आणि अमेरिकन संधिसाधू राजकारणाच्या आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमीवर अफगाणी जनतेची होणारी परवड, कौटुंबिक जीवनाची झालेली शोकांतिका प्रभावीपणे व्यक्त होते.
  मराठी पुस्तकांना खप नाही, अशी प्रकाशकांची तक्रार असतानाच अलीकडे विश्वास पाटील, मधू मंगेश कर्णिक, गंगाधर गाडगीळ, अरुण साधू अशा काही लेखकांची जाडजूड पुस्तके, कादंबऱ्या प्रकाशित होताना दिसतात. त्यात लक्ष्मीकांत देशमुख यांच्या ९३३ पानी 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' या महाकादंबरीचा आता समावेश केला पाहिजे. त्यांचे यापूर्वी तीन कथासंग्रह व दोन कादंबऱ्या प्रकाशित झाल्या असल्या, तरी अफगाणिस्तानातील इन्किलाब (क्रांती) आणि 'जिहाद' (धर्मयुद्ध) यावरील कादंबरीनेच यापुढे त्यांची खरी ओळख होईल, यात शंका नाही.
  अफगाणिस्तान गेल्या दशकात तेथील रशियन राजवटीमुळे आणि टोळीवाल्यांच्या गनिमी युद्धाने प्रकाशात आला. रशियाचे विघटन झाल्यावर अमेरिकेने तेथील रशियन राजवट उलथून टाकली आणि मग तालिबानी राजवट संपविली. रशिया व अमेरिका या दोन महासत्तांमधील राजकीय संघर्ष आणि स्वत:चे बाहुले अफगाणिस्तानात सत्तेवर आणून बसविण्याची त्यांची स्पर्धा यामुळे तेथील जनतेची फरफट झाली. त्यातच कडव्या इस्लामी राजवटीमुळे सामान्य जनता व विशेषत: स्त्रिया यांना जी मुस्कटदाबी स्वीकारावी लागली आणि कडव्या मूलतत्त्ववाद्यांनी माणुसकीला न शोभणारे जे अत्याचार केले, त्यामुळे सगळे सुसंस्कृत जग अंतर्बाह्य हादरून गेले. अमीर अमानुल्ला, राजा झहीरशहा, जनरल दाऊदखान, अब्दुल कादीर, नूर महंमद तराकी, बबराक करमाल, हिकमतीयार रब्बानी, मुल्ला ओमर आणि मसूद ही अनेक नावे जगाला परिचित झाली. या सर्वांनी अफगाणिस्तानच्या सुंदर प्रदेशाचा जमेल तेवढा अक्षरश: नरक केला.


धगधगती वाटचाल
 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' ही कादंबरी गेल्या अर्धशतकातील अफगाणिस्तानच्या धगधगत्या वाटचालीची कथा आहे. साम्यवाद आणि भांडवलशाही या दोन प्रभावी विचारप्रवाहांत फरफटत गेलेल्या आणि अखेर कडव्या इस्लामी राजवटीत परिवर्तन झालेल्या त्या देशातील माणसांच्या सुखदुःखांची ही कहाणी देशमुखांनी पूर्वी उल्लेखिलेले वास्तव व राजकीय व्यक्ती आणि त्याभोवती अन्वर, त्याचं कुटुंब व त्यांचा मित्रपरिवार या काल्पनिक पात्रांच्या साह्याने सांगितली आहे. अफगणिस्तानच्या रूपानं आंतरराष्ट्रीय धार्मिक म्हणजे इस्लामी दहशतवादाचा विषय कादंबरीच्या माध्यमातून मांडण्याचा आपण मराठीत प्रथमच प्रयत्न केला आहे, हे त्यांचं म्हणणं खरं आहे.
 भारतीय माणसाला अफगाण माहिती आहे, ते महाभारतातील गांधारी कंदाहारमधून आली यामुळे आणि रवींद्रनाथांच्या काबुलीवाला कथेने. आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांनी भारताच्या 'आयसी ८०४' विमानचं अपहरण केलं व मौलाना अजहर मसूद याची सुटका दडपण आणून करून घेतली. ही अलीकडची घटना आहे. लक्ष्मीकांत देशमुखांनी अफगाणिस्तानमधील दोन प्रेरणा व त्यातून फोफावलेला मूलतत्त्ववाद यांचा इतिहास कादंबरीच्या माध्यमातून विस्तारानं मांडला आहे. आधी रशियातील साम्यवादी विचारधारा तराकी व इतरांनी रुजवून लष्कराच्या-विद्यार्थ्यांच्या साह्याने सशस्त्र क्रांती घडवून सत्ता मिळविली. पुढे त्याविरुद्ध मुल्ला-मौलवींचा प्रतिकार सुरू झाला. हिकमतयार रब्बानीसारख्या कट्टर पुनरुज्जीवनवादी, कर्मठ मुस्लिमांनी राष्ट्राध्यक्ष करमालविरुद्ध लढा पुकारला आणि रशियन सेनेमुळे देश गुलाम झाला, धर्म धोक्यात आला, हा प्रचार सर्वसामान्य लोकांच्या डोळ्यांत घुसवून अधिक जहाल व अधिक प्रतिगामी सरकार सत्तेवर येऊन अफगाणिस्तानच्या जनतेला अक्षरश: बरबाद केलं. आणीबाणीच्या रोषाला बळी पडल्या त्या स्त्रिया. त्यांचं शिक्षण थांबवलं, नोकऱ्या थांबल्या; पडदा व अन्य जाचक बंधने आली आणि स्त्रियांचा श्वासच घुसमटला. याचं चित्रण देशमुखांनी अप्रतिम केलं आहे. इस्लामची एकेक बंधनं आणि त्यांनी दिलेल्या मध्ययुगातल्या क्रूर शिक्षा अंगावर काटा आणतात. शाळा, शिक्षण व खेळाविना युद्धाच्या छायेत अफगाण बालकांच्या दोन पिढ्या वाढल्या. त्यांच्या हातात पुस्तक न येता एके ४७ मशिनगन्स आल्या आणि अफगाणी माणूस, त्याची सुख - दु:खं, त्याच्या वाट्याला आलेला संघर्ष, भोग हे मध्यवर्ती सूत्र ठेवून आपण कादंबरीची रचना केल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे. ही कादंबरी फॅक्शन स्वरूपाची आहे अशी एक मराठीत नवी कल्पना त्यांनी मांडली आहे. म्हणजे तिच्यात ‘फॅक्ट' आणि 'फिक्शन' यांचे कलात्मक मिश्रण आहे. इंग्रजीत ‘इन कोल्ड ब्लड' सारख्या अशा फॅक्टवर


आधारलेल्या कादंबऱ्या आहेत. मराठीत अशा वास्तव व कल्पनेचे मिश्रण असलेली कादंबरी प्रथमच लिहिली गेली आहे, यात शंका नाही.
इतिहास व कादंबरीचा तोल

 अफगाणिस्तानानं क्रांती आणि धर्मयुद्ध (इन्किलाब आणि जिहाद) या दोन्हींचा अनुभव घेतला. तिथं १९७८ मध्ये डाव्या विचारसरणीचं झालेलं बंड ही क्रांतीच होती. पण ती इस्लामी श्रद्धा दुखावणारी असल्यानं तिच्यातून प्रतिक्रांती म्हणजे जिहाद आला. त्यातून अमेरिकेबद्दल तीव्र द्वेष रुजवला गेला. रशिया, अमेरिका, पाकिस्तान सगळ्यांनाच तिथं पाय रोवायचा होता आणि हे महासत्तांमधील शीतशुद्ध होतं व आहे. या सर्वांचे चित्रण करताना इतिहास आणि कादंबरी यांचा तोल देशमुखांनी बऱ्याच यशस्वी प्रमाणात साधला आहे. मात्र काही ठिकाणी इतिहासाचे पारडे थोडे अधिक खाली गेलेले दिसते आणि काल्पनिक व वास्तव अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्तिरेखांच्या भाऊगर्दीमुळे कादंबरीचे एक स्वायत्त जग निर्माण होण्यात थोडाफार अडथळा येतो, नाही असे नाही. वाचकांचाही थोडा गोंधळ उडतो. पण एका विशाल कॅनव्हासवर इतिहास सांगत असतानाच कादंबरीतील पात्रांच्या सुखदुःखांशी तो निगडित करताना थोडेफार अडथळे व अडचणी येतातच. तरीही कादंबरी व इतिहास ही दोन सूत्रे लेखकाने आलटून पालटून एकमेकांत मिसळून व अलग करून अखेर कादंबरीचे एक देखणे शिल्प रचण्यात यश मिळविले आहे.
 सन १९५० ते १९९८ हा कालखंड या कादंबरीत येतो. झहीरशहाच्या राजवटीत जे नेतृत्व उदयाला आलं त्यात दाऊद खान, तरावी, करमाल वैगरे व्यक्तिरेखांचे वैशिष्ट्यपूर्ण चित्रण लेखकाने केले आहे. तालिबानी राजवटीत सर्वांत जास्त कुणी सोसले असेल, तर ते स्त्रियांनी. सलमा, जमिला, रशियन वंशाची तराना, अॅसिडचे डाग मांडीवर झालेली सलमा, झैनाब या सगळ्याच स्त्रिया पुरुषी अहंकाराच्या बळी आहेत. त्यातील जमीलाला तर दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा होते. कारण तिने एका ब्रिटिशाशी लग्न केले, हा तिचा गुन्हा. साम्यवाद, आधुनिकतावाद, धार्मिक मूलतत्त्ववाद यांच्या आंदोलनातून झालेले सत्तापरिवर्तन, शह-काटशह, रक्तपात यांचा हा इतिहास आहे. त्यातील अन्वर... मध्यवर्ती ठेवून लेखकाने त्याच्या भोवताली राजकारणाचा पट विणला आहे.
 प्रारंभी अमेरिकनांमुळे 'इस्लाम खतरे मे हैं' या घोषणेला फसून जे अतिरेक्यांना मदत करतात, त्यांना पुढे पश्चात्ताप होतो व यापैकी अनेकांच्या वाट्याला क्रूर हत्याकांड येते. त्यांना त्यांची चूक फार उशिरा कळून चुकते. तरुण पिढी अफू, चरस, गांजाच्या नशेत मश्गूल आहे... विद्यापीठाच्या

प्राध्यापकांना भाजी विकणं नशिबी आले आहे. कारण विद्यापीठं बंद पडली आहेत.... पाऊस नाही, दुष्काळ पडला आहे.... काही थोडे चैनीत गढले आहेत, इस्लामची तत्त्वं त्यांनी गुंडाळून ठेवली आहेत... युवा पिढी बरबाद झाली आहे. त्यातील एक प्रसंग अफगाणिस्तानचं कब्रस्तान कसं झालं आहे, हे दर्शवितो. कोवळी मुलं 'हड्डी ले लो नान दे दो' असं नान - चहाच्या दुकानापुढे घोळक्यानं जमून ओरडत आहेत. 'माझी हाडं आधी घ्या. माझा नंबर पहिला आहे' या प्रकाराचा अर्थ असा की, एक किलो हड्डींना दुकानदार एक नान देतो आहे. पूर्वी तो दोन द्यायचा. ही हाडांची काय भानगड आहे? शहरातून धान्य, फळं गायब आहेत. औषधं नाहीत. धट्टेकट्टे जिहादी लढ्यात कॅम्पमध्ये घरी जखमी; लाचार पुरुष आणि बायका. मग या मुलांची भूक कशी भागणार? आधी त्यांनी मारून खाल्लेल्या जनावरांची हाडं तेल, साबण नि कोंबडीच्या खाद्याच्या सौदागारांना दिली. ती संपली, तेव्हा या मुलांना त्या हाडांच्या व्यापाऱ्यांनी एक नवा मार्ग दाखविला. वीस वर्षात दहा हजार अफगाणी मारले गेले. सगळ्यांच्या नशिबी चांगली कबर कुठली? त्यामुळे कसं तरी पुरलेल्या खडड्यातून अद्याप माती न झालेली हाडं शोधून काढायची नि ती विकायची; त्या बदल्यात नान व पैसे मिळवायचे. एक आठ-दहा वर्षांची बालिका एक किलो हाडांना एकच नान मिळणार हे ऐकून विचारते, “या हिशोबानं मला तीनच नान मिळणार... घर में पाच आदमी है, कैसे भूक मिटेगी?" हे दृश्य फारच करुण आहे.

 अफगाणिस्तानच्या या भयानक अवस्थेला सगळेच जबाबदार आहेत. इस्लामी शिक्षा, छळ या जोडीला आले आहेत. जमीलाला फटके मारून आणि दगड फेकून जाहीरपणे मारलं जातं, जमीलाची व्यक्तिरेखा एका तेजस्वी स्त्रीची आहे. ती ज्या धैर्यानं शिक्षेला सामोरी जाते, तो प्रसंग काळजाचा थरकाप उडवितो.
तालिबानींचं भीषण चित्र
}

 तालिबान हा शुद्ध इस्लामी राजवटीचा प्रयोग कसा होता, याचं भीषण चित्र या कादंबरीत आहे. तालिबाननं दिलेल्या हुकमाप्रमाणे प्रत्येक अफगाण पुरुषानं दाढी राखली की नाही, पाच वेळा नमाज तो पढतो की नाही.... कबुतरं पाळणं, पतंग उडविणं हे इस्लामला निषिद्ध असणारे शौक कोण करतोय, हे पाहण्यासाठी पोलीस पेट्रोलिंग करतात. दाढी नसलेला पुरुष दिसला की, त्याला ती वाढेपर्यंत जेलमध्ये टाकणं, फटके मारणं, चोऱ्यांबद्दल हात-पाय तोडणं या शिक्षा. स्त्रियांनी तर एकटं बाहेर जायचंही नाही. बरोबर कुणी मर्द हवा. जाण्याचं कारणही योग्य हवं. शिक्षण बंद, नोकरी बंद. गोषा पायघोळ हवा. त्यातून पाय दिसले की पायावर फटके. असे किती तरी फतवे तालिबानी राजवटीने काढले. स्त्रियांनाही या गुलामीची

सवय होते. अफूची शेतं जाळून टाकली; पण पुढं काहींनी त्यातही खोटेपणा करून गांजाची तस्करी केली. या कादंबरीची अखेर जमीलाला दगडाच्या वर्षावाने ठार मारण्यात येते. ती शहीद झाली. करीमुल्ला म्हणतात की, “इन्किलाब आणि जिहाद यांच्यामधला उदारमतवादी इस्लामी लोकशाही हाच खरा मार्ग. त्यासाठी नव्याने लढायला तयार झालं पाहिजे. जमीला बेटीच्या हौतात्म्याचा हाच संदेश आहे." अल्लाच्या नावानं एका नव्या जिहादासाठी पूर्वतयारी करायला हवी. रशियन व अमेरिकन संधिसाधू राजकारणाच्या आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमीवर अफगाणी जनतेची होणारी परवड, कौटुंबिक जीवनाची झालेली शोकांतिका या कादंबरीतून प्रभावीपणे व्यक्त होते.
 कादंबरीत दोष नाहीत, असे नाही. तिचा ९०० हून अधिक पृष्ठांचा विस्तार खटकतो. (आणि कादंबरीचे वजनही) तसेच या कादंबरीतील भाषा व विशेषत: संवादांत उर्दू, फारसी शब्दांचा वापर काही वेळा अनाकलनीय व गती रोधणारा ठरतो. आपला वाचक मराठी आहे याचे भान ठेवून आवश्यक तेवढ्याच उर्दू व फारसी शब्दांचा वापर वातावरणनिर्मितीसाठी लेखकाने केला असता, तर तिचे वाचन अधिक आनंददायी झाले असते. काही वेळा तिच्यातील चर्चाही बऱ्याच लांबतात व मग अन्वरचे कुटुंब मध्यवर्ती राहून बाजूला पडते. स्त्री-पुरुष संबंधांची काही वर्णनही खटकतात. ती सूचक असती, तर कादंबरीचा परिणाम मुळीच उणावला नसता!
 अशा काही उणिवा असल्या तरी एका वेगळ्या पार्श्वभूमीवर इतिहास, संस्कृती, राजकारण, समाजजीवन, स्त्री जीवन या सर्वांना कवेत घेऊन 'नरेच केला हीन किती नर' याचा प्रत्यय देणारी ही कादंबरी मराठीत एक महत्त्वाची भर टाकते. भरपूर छायाचित्रे, नकाशे हेही या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.


इन्किलाब विरुद्ध जिहाद

अरुण साधू

 आकाराने प्रचंड असूनही तिला सुसंगत असा आवाका, आशयगर्भता व भव्यता, मानवी व्यवहाराची व सृष्टीच्या गुंतागुंतीची बऱ्यापैकी समज, विस्तृत पटावर सोंगट्याप्रमाणे विखुरलेल्या पात्रांवर घट्ट पकड, वास्तवता पोटात घेणारी कल्पनारम्यता, राजकारण, तत्त्वविचार आणि कथात्मक गुंतवणूक यांची बेमालूम पेड विणण्याचे कौशल्य - अशी गुणसंपन्न व महत्त्वाकांक्षा कांदबरी मराठीत गवसणे हा दुर्मीळ योग आहे. लक्ष्मीकांत देशमुख यांची 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' ही ९०० पानांची घसघशीत कादंबरी त्या दृष्टीने मराठी साहित्यप्रेमिकांना आशेचे किरण दाखविणारी आहे. विषय, आशय, विस्तार आणि खोली या सर्व गुणविशेषांमध्ये ही कादंबरी मराठीतील पहिल्या रांगेतील कादंबऱ्यांत बसू शकेल, असे म्हणणे पुरेसे नाही; विषय आणि आशय या बाबींमध्ये ती नवी वाट चोखाळणारी कादंबरी आहे. विषय आहे अफगाणिस्तान. तेथील कोणी बादशाह, नेता, व्यक्ती वा प्रेमीयुगल नव्हे. दुर्दैवाच्या, हिंसेच्या व रक्तपाताच्या फेऱ्यात सापडलेल्या अभागी देशाची ही कहाणी. खरे म्हणजे, सामान्य वाचकांना बिचकवून टाकणारा हा विषय, पण देशमुखांनी मानवी कथेचा, त्या देशाचा दुर्दैवाचा, वैचारिक, राजकीय आणि हिंस्र संघर्षाचा असा काही नजारा खुलविला आहे की, जाणकारांनी स्तिमित व्हावे आणि सामान्य वाचकांनीही खिळून जावे.
 अफगाणिस्तान हा स्वातंत्र्यपूर्व काळातील आपला शेजारी, अफगाणी पठाणांना भारताविषयी आपुलकी आहे तो तेव्हापासून. कित्येक अफगाणी नेते, बुद्धिमंत त्या काळातील हिंदुस्तानी विद्यापीठांमधून शिकून जात. गिरण्यांच्या फाटकांसमोर उभे राहून सोटे दाखवीत कर्ज आणि व्याज वसूल करणारे मस्तवाल पठाण, एवढीच आपल्यासामोरची अफगाणी लोकांची प्रतिमा. फार झाले तर 'दीवार' मध्ये अभिताभ बच्चनला मदत कणारा, सच्च्या दिलाचा, शब्दाला प्राणापलीकडे जपणारा, बिनधास्त पण प्रेमळ असा अभिनेता प्राणने साकार केलेला पठाण. अफगाणातही सुशिक्षित,


सुसंस्कृत असा मध्यम किंवा उच्च मध्यमवर्ग आहे, हे लगेच लक्षात येत नाही. मराठ्यांचे पानिपत करणारा अहमदशाह अब्दाली हा तर अफगाणी राष्ट्रीयतेचे प्रेरणास्थान. हा टोळ्यांचा देश. खरे म्हणजे, काश्मीरप्रमाणे येथेही इस्लामच्या कडव्या अंधनिष्ठेचे प्राबल्य नव्हते.
 पहिल्या महायुद्धानंतर तुर्कस्तानच्या केमाल पाशापासून स्फूर्ती घेऊन सामाजिक व धार्मिक सुधारणा येथे प्रथम झाहीरशाहने सुरू केल्या. त्याला पदच्युत करणाऱ्या दाऊदखानने त्या पुढे नेल्या. त्यानंतर १९७७ ते १९९० - ९१ च्या साम्यवादी खल्क अथवा पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ अफगाणिस्तानच्या राजवटीत तर येथे सामाजिक क्रांतीचे वारेच निर्माण झाले होते. पूर्वीही येथील स्त्रिया बुरख्याच्या बाबतीत कर्मठ नव्हत्या. या काळात स्त्रिया शिकू लागल्या. डॉक्टर, इंजिनिअर, मॅनजर, मंत्री बनू लागल्या. मध्यवर्गीय स्त्रिया आधुनिक वेषभूषा करू लागल्या. सन . १९८५ ते १९८९ हा नजीकच्या राजवटीचा कालखंड सुख - समृद्धी व शांततेचा मानला जातो. पण त्याच काळात अफगाणिस्तानात पीडीपीएच्या मदतीला आलेल्या सोव्हिएत सैन्याला हुसकावून लावण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानामार्फत अफगाणिस्तानातील कडव्या मूलतत्त्ववाद्यांना सर्व तहेची मदत द्यायला सुरुवात केली. त्याची परिणती कशात झाली, ते आज आपण बघतोच आहोत.
 या सर्व फेऱ्यातून जाताना अफगाणी अवामचे मोठे हाल झाले. (अमेरिकेने विध्वंसक बॉम्बहल्ले करून तालिबान राजवट उलथून टाकली, तरी अजून अफगाणी जनतेचे हाल संपलेले नाहीतच.) कधी विज्ञानाने भारलेला आधुनिकवाद, तर कधी मध्ययुगाकडे नेणारा धार्मिक मूलतत्त्ववाद यांच्या हादरविणाऱ्या आंदोलनातून समाज गेला. सत्तापालट, रक्तपात, कुटुंबाची ताटातूट, वैचारिक झगड्यांचे गोळागोळीमध्ये परिवर्तन.... ती प्रदीर्घ गुंतागुंतीची कहाणी देशमुख यांनी मानवी सहृदयतेने आणि सहनशीलतेने चितारली आहे. त्याला भव्य परिमाण आहे ते धर्मसत्ता विरुद्ध राजसत्ता, धार्मिक मूलतत्त्ववाद विरुद्ध धार्मिक सहिष्णुता व उदारमतवाद; मार्क्सवाद विरुद्ध इस्लाम आणि मार्क्सवाद विरुद्ध उदारमतवाद अशा सनातन वैचारिक संघर्षाचे.
 मोठी समाधानाची गोष्ट म्हणजे देशमुखांनी कादंबरीमध्ये या संघर्षावर निबंध किंवा प्रवचने लिहिली नसून कथावस्तूच्या वाटचालीतून व पात्रांच्या जीवनप्रवाहातूनच हे झगडे मांडून व उलगडून दाखविले आहेत. आणि पात्रे तरी किती? यामध्ये कोणी एक नायक आहे, असे म्हणता येणार नाही. जमीनदारी घराण्यांतील उदारमतवादी तरुण युवा नेता अन्वर पगमानी हा केंद्रस्थानी धरला, तर त्याच्यापेक्षा किती तरी अधिक रसरशीत, शक्तिमान पात्रे यात आहेत. 

 अफगाणिस्तानातील दोन टोकाच्या विचारसरण्यांच्या झगड्याचा निरीक्षक म्हणूनही अन्वरला केंद्रस्थानी घेणे कादंबरीकाराला सोयीचे गेले असेल. अन्वरचे धर्मश्रद्ध परंतु मूलतत्त्ववादी नसलेले वडील, त्याचे आधुनिक काका, लष्करातील आधुनिक विचारांचा ज्येष्ठ बंधू, जमीनदारी पाहणारा आणि अफूच्या माध्यमातून मूलतत्त्ववादी तालिबानी चळवळीत शिरलेला मधला भाऊ.... त्याची आई, आजी, आत्या आदी स्त्रिया; त्याची रशियन पत्नी तान्या ऊर्फ तराना, अॅसिडचे डाग मांडीवर बाळगणारी सलमा, त्याची चुलत बहीण व वाग्दत्त वधू झैनब.... दूरच्या नात्यातील धर्माचे प्रकांड पंडित व खोल धर्मश्रद्ध करिमुल्ला - जे तालिबान्यांना सुरुवातीला मदत करतात खरे, पण अखेर त्यांच्या अतिरेकी वागणुकीने हतबल व विफल होतात.... अशी असंख्य काल्पनिक पात्रे देशमुख यांनी या बहुभीतीयुक्त संघर्षाच्या भोवऱ्यात सोडली आहत. त्यांना आधार आहे प्रत्यक्ष इतिहासाच्या पानांतील हाडामांसाच्या व्यक्तिरेखांचा. स्वत: झाहीरशाह, पहिला बंडखोर क्रांतिकारक दाऊदखान, साम्यवादी क्रांतीतील प्रसिद्ध त्रिमूर्ती - नूह महंमद तराकी, हाफिझुल्ला अमीन, बबरक करमाल आणि त्यांच्यानंतरच्या पराभवाचा मरणप्राय भार आपल्या बलिष्ठ खांद्यावर तोलणारा नजीब ..... तसेच धार्मिक मूलतत्त्ववाद्यांचे नेते गुलबदीन हेकमतयार, नंतर ओसामाचा सहकारी आणि आध्यात्मिक नेत्याचे स्थान प्राप्त झालेला मुल्ला ओमर, मेवांडवाल, बुर्हानुद्दीन रब्बानी, दोस्तम......
 अशी बलिष्ठ ऐतिहासिक पात्रे आपापली ताकद घेऊन जेव्हा कादंबरीत उतरतात, तेव्हा देशमुख त्यांना भरकटू न देता आपल्या निवेदनाच्या अंतर्गत शिस्तीत बसवितात. कादंबरीतील स्त्रियाही तेवढ्याच उंच आणि देशाच्या राजकारणात स्वत:ला बेगुमानपणे झोकून देणाऱ्या. पात्रे अतिरकी मूलतत्त्ववादी असोत, की कर्मठ कम्युनिस्ट किंवा उदारमतवादी मध्यममार्गी; ती आपापल्या जागी आपल्या निष्ठा व मूल्ये सांभाळत घट्टपणे उभी आहेत. मूल्यनिष्ठांच्या अतिरेकी कठोरपणाने जेवढी विकृती येत असेल, तेवढीच.
 देशमुख हे काही नवखे लेखक नव्हते. 'अंधारयात्रा' ही त्यांची कादंबरी आणि 'उदक' हा कथासंग्रह रसिकांना परिचित आहे, तो त्यातील वातावरणाच्या व तपशिलांच्या अस्सलपणामुळे. तसे देशमुख हे मराठी भाषेचे फार मोठे जादूगार आहेत, असेही म्हणणे कठीण आहे. पण संघर्षांना टोक आणणाऱ्या प्रसंगांमध्ये त्यांची लेखणी ओजस्वी बनू शकते. प्रस्तुत कादंबरीत अशा पुष्कळ घटना आहेत. पुल-ए-चराखीच्या तुरुंगातील भयाण रात्र, पहिल्या क्रांतीच्या वेळी सुरक्षाप्रमुख गुलाम हैदर रसुली याची घालमेल आणि त्याने आपल्या जावयाला गद्दारी करण्याचा दिलेला सल्ला, आपला गुरू आणि प्रतिस्पर्धी तराकी याला ठार मारताना स्वत:च्या मुलीलाही ठार मारून तिच्या प्रेताशेजारी शोक करणारा आणि अखेर स्वत:च खड्डा

खोदून तिचे दफन करणारा राष्ट्रप्रमुख अमीन, करमालचे पुनरागमन, नजीबची भयंकर अखेर आणि पळून जाण्याची संधी असूनही तालिबानच्या राजवटीत दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा पत्करणारी जमीला..... अशा किती तरी घटना वाचकाला अंतर्बाह्य हादरून सोडतात. ही किमया लेखणीची नसून देशमुखांनी निर्माण केलेल्या माहोलची आणि वास्तवतेशी राखलेल्या इमानदारीची; त्यामुळेच त्यांच्या पात्रांचा रोमान्स कधी अतिरेकी किंवा बाळबोध वाटला तरी खटकत नाही, कारण अफगाणिस्तानचे पाणीच तसे असावे.
 देशमुख गेली सात - आठ वर्षेतरी या कादंबरीची तयारी करीत असावेत. अफगाणिस्तानचा भूगोल आणि इतिहास त्यांनी आत्मसात केला आहे, याचा प्रत्यय येतो. काबूल, कंदाहार, पगमान इत्यादी ठिकाणांचे अफगाणी निसर्गाचे खास सौंदर्य तर ते नेटके उभे करतातच; पण शहरांचे, रस्त्यांचे, पुलांचे तपशीलही सराईतपणे उभे करतात. काबूल विद्यापीठाचे बुद्धिवादी वातावरण, अफगाणी रईस, उच्चबूंच्या सुसंस्कृत राहणीची नजाकत, त्यांच्या कविता, त्यांचा इतिहास, त्यांच्या बागा आणि रसिक कलाकारी, भूमिहीनांचे शोषण त्यांचे दारिद्र्य, पिचलेपण, देशातील विविध टोळ्यांमधील सत्तास्पर्धा आणि त्याचे राजकारण, धर्माचे अफगाणी जीवनातील स्थान आणि स्त्रियांची हतबलता.... अनाहिता, सलमा, जमीला आदी बंडखोर स्त्रियांना सोसावा लागणारा सामाजिक छळ...... इत्यादी गोष्टींचे प्रत्ययकारी चित्रण कथानकाच्या सहज ओघात येते.
 धर्मचिकित्सेची चिकित्सा, कर्मठ मूलतत्त्ववाद्यांची चिकित्सा, उदारमतवाद की साम्यवाद असा अफगाणी परिस्थितीत उपलब्ध नसलेला विकल्प; किंबहुना या दोहोंची (उदारमतवाद व साम्यवाद) अफगाणी भूमीत पेरणी व रुजवणूक होण्याची असंभाव्यता आणि या विचित्र विरोधाभासाने निर्माण केलेले राक्षसी संघर्ष असेही सर्व या कादंबरीत येते. त्याचबरोबर स्त्रियांचे इस्लाममधील स्थान, उदारमतवादी मुस्लिमांची मूलतत्त्ववाद्यांकडून होणारी कोंडी, साम्यवादी विचारांच्या राजवटीने हाती घेतलेल्या प्रागतिक जमीन सुधारणांना होणारा कडवा विरोध..... पाकिस्तानी, रशियन आणि अमेरिकन गुप्तहेरांच्या कारवाया...... कम्युनिस्टांचा पाडाव करण्यासाठी कडव्या मूलतत्त्ववाद्यांना पोसण्याचे अमेरिकेचे बेगुमान धोरण..... या सर्व गोष्टीचे चर्वितचर्वण कथानकांच्या, संभाषणाच्या आणि घटनांच्या ओघात एवढे सहजपणे येते की, आपण वैचारिक चर्चेमध्ये गुंतून जातो आहोत, हेही वाचकांच्या ध्यानात न यावे. देशमुखांची कादंबरी लिहून झाल्यावरही अफगाणी काबूल नदीमधून पुष्कळ पाणी वाहून गेले आहे. मुल्ला ओमरचा प्रभाव अजूनही पुष्कळ भागांवर आहे. अमेरिकेने एवढा धुमाकूळ घालूनही तालिबानचे सत्तेवरील पुनरागमन शक्यतेच्या

कोटीतील आहे आणि काहीही झाले तरी करझाईची, म्हणजेच अमेरिकेची, सत्ता काबूलपुरतीच मर्यादित आहे. अशा प्रवाही परिस्थितीत देशमुखांची ही महाकादंबरी मराठीत अवतरते आहे.
 'राजहंस प्रकाशन' चे दिलीप माजगावकर यांनी ती आपल्या चोखंदळ शिस्तीने प्रकाशित केली आहे. कादंबरीचे मूळ हस्तलिखित उचलले तेव्हा त्यांचा नाजूक खांदाच निखळला होता. असे सांगतात, पण तेवढ्याने हार न मानता कादंबरीतील शब्द शब्द तपासून, तीमधील जादा मेद काढून ती सर्वसामन्य वाचकांनाही फारशी दमछाक न होता पेलता येईल अशी सुटसुटीत करवून घेतली. विशेष श्रम घेऊन करवून घेतलेले मुखपृष्ठ, आतील छायाचित्रांची रेलचेल, नकाशे वगैरे गोष्टी पाहता, माजगावकरांनी देशमुखांच्या या महाकादंबरीवर जीव लावलेला दिसतो. 'राजहंस' च्या सगळ्याच कादंबऱ्यांना हे भाग्य लाभते, असे नव्हे. त्यांचे अंदाज सहसा चुकत नाहीत, यावरूनही चाणाक्ष वाचक आणि अर्थातच हिशेबी ग्रंथविक्रेते कादंबरीचे आपापल्या परीने मूल्यमापन करतील, यात शंका नाही.
 कादंबरीकाराने आपल्याच भाषेतील दुसऱ्याच्या कादंबरीचे मन:पूर्वक कौतुक . करणे किती अवघड असते, हे मराठी भाषकांना, किमान साहित्य वर्तुळांना चांगलेच ठाऊक असावे. पण ते तेवढेच आनंदाचे व समाधानाचे असते, हे कित्येकांना माहीत नसेल; तशी ही देशमुखांची कादंबरी आहे. मराठी साहित्यविश्वात नवी गुणात्मक भर घालणारी आणि कदाचित नवा पायंडा पाडणारीही.

मोठा अवकाश पेलणारी महाकादंबरी :

अनंत मनोहर

 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' ही महाकादंबरी आहे.
 महाकादंबरी म्हणजे (पृष्ठसंख्येने) मोठी नव्हे; तिने व्यापलेला अवकाश मोठा आहे. तिने फार मोठ स्पॅन व्यापला आहे, म्हणून ती महा; तिच्यात वाङ्मयीन महात्मतेचा प्रत्येय येतो.
 ज्याला अनेक पदर आहेत, पैलू आहेत, अंग - उपांगे आहेत, अनेक स्तर आहेत - अशी ही महाकादंबरी आहे. ती अनेक ठिकाणी वास्तवाला भिडते, परंतु त्यात अडकत नाही. या वास्तवातील रस, कस शोषून ती अधिक पुष्ट व संपन्न बनते.
 वैयक्तिक आशयसूत्रात बांधली गेलेली कादंबरी एकारते. तिची वाढ उंचीच्या एकच एक परिमाणात होते. तिला एकच मिती असते. तसे या कादंबरीचे होत नाही, कारण तिचे आशयसूत्र बहुमितींचे व प्रसरणशील आहे.
 ज्या देशात निर्नायकी गेली कित्येक दशके चालू आहे, अत्याचार आणि विध्वंस हा जिथे परवलीचा शब्द बनला आहे... एकाधिकारशाही, जुलमी राजसत्ता, लष्करशाही अशा राजवटीत माणसांची जीवने कुस्करली जात आहेत; अशा एखाद्या देशाचं, समाजाचं चित्रण करणं हा एक महकादंबरीचा विषय आहे, हे देशमुखांनी बरोबर हेरलं. अफगाणिस्तानात तर टोळीवाल्यांचे राज्य गेली अनेक शतकं चालू आहे. अजूनही तिथे काबूलच्या मध्यवर्ती शासनाच्या शब्दापेक्षा टोळीप्रमुखांचा आदेश जास्त मानला जातो.
 अफगाणिस्तानची लोकसंख्या दीडएक कोटी.
 देशमुखांनी कादंबरीच्या पटावर हा देश घेतला. त्याची शेजारी राष्ट्रे भोवती मांडली. राजकीय, सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक हे त्याचे स्तर तपासले. ऐतिहासिक व राजकीय घटनाचित्रणात आपल्याला फारसे स्वातंत्र्य मिळत नसतं.

याचं देशमुखांना भान आहे. ते या दोन घटकांचा उपयोग वास्तव सत्य म्हणून करतात आणि सामाजिक व सांस्कृतिक या घटकांच्या मदतीने 'Fiction' उभी करतात.
 आंतरराष्ट्रीय शीत युद्धातील शह-काटशह, आजचा तिथला जहाल इस्लामी आंतरराष्ट्रीय दहशतवाद, बामियानमधील महाकाय बुद्धमूर्तीचे विध्वंसन करण्यामागील मानसिकता, आत्यंतिक धर्मांधता, मुजाहिद व तालिबान यांच्या हातात आलेली सत्ता आणि सत्तेचा मद, श्रद्धाळू अफगाणांची त्यांच्याच नेत्यांनी केलेली दिशाभूल, साम्यवादी सोव्हिएत युनियन आणि पाकिस्तनच्या मागे उभी असलली अमेरिकन भांडवलशाही विचारधारा यांतील संघर्षामध्ये भूमी म्हणून वापरले जाण्याचे परिणाम..... यांच्या जोडीला जहाल इस्लाम पुनरुज्जीवनवाद्यांनी सुधारणा व आधुनिकता आणि ज्ञान व स्वातंत्र्य यांना शत्रू मानून समाजाला धर्माच्या नावाखाली चौदा-पंधराव्या शतकात ढकलण्याचा केलेला प्रयत्न, तालिबानी फतव्यामुळे अफगाण स्त्रीचे उद्ध्वस्त झालेले जीवन.... या वास्तवाला लक्ष्मीकांत देशमुखांनी सर्वसामान्य अफगाणी माणसाच्या वाट्याला आलेले भोग, दुःख, हाल, अपेष्टा, अनिश्चितता याचा नवा आयाम जोडला व त्यातून कादंबरी बनत गेली.
 अन्वर, करीमुल्ला, इलियास व त्यांचे कुटुंबीय; सलमा, बेनझीर, जमीलाच्या माध्यमातून अफगाणी स्त्रीची प्रखरता; देशाच्या व औरत जातीच्या सन्मानासाठी शहीद झालेली जमीला आणि तिच्या मृतदेहाभोवती उभी असलेली बेनझीर.... हा अत्युच्च बिंदूकडे कांदबरीचा झालेला प्रवास हे या कादंबरीचे वैशिष्ट्य आहे.
 एखाद्या दीर्घ कालातील ऐतिहासिक धागे राजकीय घटनांच्या अन्वयार्थाला जोडून त्यात कल्पित पात्रांचे उपयोजन करीत त्यांना उभं करणं, हे आव्हान देशमुखांनी पेललं आहे.
 भाषेचा बाज, आवश्यक तेथे केलेल्या भाष्यातील नेमकेपणा, संवादलेखन चातुर्य, आशयसूत्राचे कथानकात केलेले सुरेख रूपांतर, कन्सिव्ह केलेले रसपूर्ण प्रसंग ही अंगेही उत्तम आहेत.
 पण यापेक्षा महत्त्वाच्या इतर काही बाबी आहेत आणि त्यामुळे ही कादंबरी मोठीच नव्हे, तर महत्त्वाची ठरते.
 मुंबईत झालेले बॉम्बस्फोट, ९ / ११ ची घटना, अल् कायदाचे दूरवर पोहोचणारे हात, जळणारा काश्मीर या स्टिम्युली देशमुखांना आवाहन करीत असतील; परंतु Artist has an ability not to react to immediate stimuli हे तत्त्व देशमुख मानत असावेत. त्यांच्या अंतर्मनात हा विषय मुरत गेला, वाढत राहिला, त्याला निरनिराळ्या मिती मिळत गेल्या आणि जेव्हा या सर्वांचे वजन देशमुखांना असह्य झाले - या ताणातून मुक्त होण्याची निकड त्यांच्या मनाला भासू लागली व

लेखन करणे अपरिहार्य झाले; तेव्हाच 'इन्किलाब विरुद्ध जिहद' कडे ते वळले.
 लेखनपूर्व आत्मनिष्ठा त्यांना चिंतनशील बनवते. त्यातून आशय - विषयाच्या अपूर्वत्वातून आणि कोणत्याही विचारसरणीची गुलामी न पत्करता कलाकृतीचं शुद्ध रूप जपत तिची देशमुखांकडून निर्मिती झाली आहे, हा मला आजच्या भाषेत म्हणायचं तर युनिक सेलिंग पॉइंट वाटते.


इन्किलाब विरुद्ध जिहाद

विश्राम गुप्ते
राजकीय सत्तेची समीक्षा

 "आपण बंदिस्त व जगाच्या अंतापर्यंत न बदलणाऱ्या धर्माच्या आधारे जगण्याचा व पुढे जाण्याचा प्रयत्न करू, तर आपली गती एवढी मंद राहील, की सारं जग कुठच्या कुठे निघून जाईल. आपण इररेलेव्हंट - निरर्थक ठरू."
 पुढे अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष होणाऱ्या नूरमहंमद तराकीच्या तोंडचे हे शब्द 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' या लक्ष्मीकांत देशमुखांच्या ९३४ पानांच्या कादंबरीत सुरुवातीसच भेटतात. इस्लामची तरफदारी करणाऱ्या इलियसला पटवून देताना नूरमहंमद तराकी हे बोलून जातो. त्यातून अफगाणिस्थानच्या भविष्याचे भीषण संकेत मिळतात. कादंबरीतला इलियस काल्पनिक आहे. तराकी मात्र ऐतिहासिक आहे.
 कल्पना आणि इतिहासाची सरमिसळ असलेली ही कादंबरी म्हणजे, अफगाणिस्थानमधला अपरिवर्तनीय कडवा इस्लाम विरुद्ध पोथीनिष्ठ; साम्राज्यवादी कम्युनिझमची अतिशय अभ्यासपूर्ण, रोचक, डॉक्युमेंटरीच्या अंगानं विकसित होणारी अर्ध्या शतकाची कर्मकहाणी आहे. आकारानं भव्य असलेली, ही कादंबरी अफगाणिस्थानचा गेल्या चाळीस-पन्नास वर्षाचा रक्तरंजित पण लालित्यपूर्ण इतिहास आहे.
 अफगाणिस्थानची सर्वंकष सत्ता आपल्या हाती यावी म्हणून सोव्हिएट रशियाप्रायोजित कम्युनिस्ट विचारधारेविरुद्ध स्थानिक इस्लामिक मूलतत्त्ववाद्यांनी दिलेल्या प्रदीर्घ टकरावाची ही कथा आहे. साम्यवाद आणि त्याला प्रतिक्रिया म्हणून, अफगाणिस्थानमध्ये बुलंद झालेल्या इस्लामिक चळवळीचं ध्येय हे अनिबंध राजकीय सत्ताच. एकदा सत्तेची अपरिहार्यता मानली, की हिंसा तर्काधिष्ठित ठरून सर्वसामान्य जनतेचं कर दमन ओघानं आलंच. हेच कादंबरीचं प्रमुख विधान.
 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' ही एकूणच राजकीय सत्तेची, तिच्यातल्या अंगभूत

हिंसक प्रेरणांची - विशाल मानवतावादाच्या अंगांनं केलेली कठोर समीक्षा म्हणता येईल. वा इतिहासात दोनच प्रमुख पात्रं. 'इन्किलाबी' म्हणजे कम्युनिस्ट्स आणि 'जिहादी' म्हणजे इस्लामिक अतिरेकी. दोघांच्या हातांवर निरपराध जनतेच्या रक्ताचे डाग आहेत. पैकी इन्किलाबीच्या हातावरचे डाग सुकले असले, तरी जिहादीच्या पंज्यांवरचं रक्त ओलंच आहे.
 आंतरराष्ट्रीय दहशतवादाची पार्श्वभूमी लाभलेली ही कादंबरी इतिहासात रममाण होणाऱ्या मराठी वाचकांसाठी चांगला रुचिपालट आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या अवतीभवती घडून गेलेल्या ऐतिहासिक अफगाणिस्थानच्या पुरुषसत्ताक सांस्कृतिक वास्तवाच्या पार्श्वभूमीवर ही कादंबरी अफगाणी स्त्रीच्या मनाचं पर्यावरण, तिच्या मुक्तीच्या ऊर्मी, तिच्या समतेचा लढा स्त्रीवादी दृष्टिकोनातून चित्रित करते त्यामुळे या मोठ्या कादंबरीचा तोल केवळ पुरुषकेंद्री किंवा केवळ स्त्रीकेंद्री न होता तो उभयकेंद्री होतो. कादंबरीची ही जमेची बाजू. कादंबरीत भेटणाऱ्या सलमा, अनाहिता, तराना, झोरा, झैनाब, झरीना, मरुफ आणि जमिला या मनस्वी स्त्रिया या राजकीय कादंबरीला खऱ्या अर्थाने भावनांची समृद्धी देतात.
 घटनांमध्ये स्वत:चा वर्तमानकाळ बुडवून टाकणारा भावुक मराठी वाचक 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' वाचताना एकदम अटकेपार म्हणजे, टागोरांच्या काबुलीवाल्याच्या देशात, अफगाणिस्थानातच जाऊन पोहोचतो. वाचता वाचता तो या देशाच्या इतिहासाशीच नव्हे, तर भूगोलाशीसुद्धा एकरूप होतो.
 रम्य आणि तपशीलवार भौगोलिक वर्णनं ही कादंबरीची वैशिष्ट्यं 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' मध्ये ठासून भरलेली आहेत. ती वर्णनं वाचून लेखक अफगाणिस्थानमध्ये राहून आल्याचा वाचकाला प्रत्यय येतो. परंतु ती वस्तुस्थिती नाही. देशमुखांनी कल्पनेच्या भरारीवर अवघा अफगाणिस्थान उभा केला आहे. अफगाणिस्थानची गेल्या अर्ध्या शतकातली गोष्ट सांगता सांगता लेखकाची स्कॉलरशिप संपते कुठे आणि त्याचा प्रतिभाविलास सुरू होतो कुठे, याचा वाचकाला थांग लागत नाही.
 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' ही कादंबरी नेमकी कशी समजून घ्यायची? त्यातले राजकीय तपशील आणि विश्लेषण तथ्यावर आधारित असले, तरी काही प्रमुख पात्रांचे भावजीवन, प्रतिभेची निर्मिती आहे. ही सरमिसळ जशी कादंबरीची शक्ती ठरते, तशीच ती आस्वादाच्या अंगाने कूटप्रश्न निर्माण करते. सत्तेची अपरिहार्यता एकीकडे, तर तिच्याशी झुंजणाऱ्या व्यक्तींच्या अंतर्मनाचा कौल दुसरीकडे, असं काहीतरी कादंबरीभर घडतं. हा ताण वस्तुनिष्ठ विरुद्ध व्यक्तिनिष्ठ शक्तींचा आहे. लोकप्रिय, वाचकसापेक्ष ऐतिहासिक कथनाचं, हे वैशिष्ट्यच मानलं पाहिजे.


 या ऐतिहासिक कादंबरीची कथावस्त स्थानिक, म्हणजे पेशवाई, मराठेशाही किंवा मुख्य धारेच्या इतिहासाने दुर्लक्षिलेली अशी ‘सबआलटर्न' नाही तर ती 'परदेशी' आहे. त्यामुळे सर्वसाधारण वाचकाला स्पष्ट होईल, असं विवेचन करणं लेखकाला क्रमप्राप्त झालं असावं. त्यामुळे कदाचित कादंबरीत केलेली आंतरराष्ट्रीय घडामोडीची चर्चा काही ठिकाणी पाठ्यपुस्तकांच्या वळणानं जाते. ऐतिहासिक कादंबरीची ही मजबुरी मानली, तरी हिला कवेत घेऊन देशमुखांनी कादंबरी वाचनीय केली आहे, याचं कारण त्याचं राजकीय तथ्यांचं भान उत्तम आहे.
 मात्र कादंबरी इन्किलाब-केंद्रित वाटते. कादंबरीचा दोन-तृतीयांश भाग हा कम्युनिस्टांच्या राजवटीवर खर्ची पडला आहे. जिहादला प्राणभूत असलेल्या तालिबान चळवळीचा उल्लेख, साडेनऊशे पानी कादंबरीत सुमारे अठशेव्या पानावर म्हणजे फारच उशिरा येतो. इन्किलाबी म्हणजेच कम्युनिस्ट्स, रशियन महासत्तेच्या अस्तानंतर जवळजवळ नामशेषच झाल्यात जमा आहेत. त्यामुळे या लाल महासत्तेच्या अफगाणिस्थानमधल्या प्रभावाचं विच्छेदन ऐतिहासिक असलं, तरी त्याची धार कालानुरूप बोथट झालेली वाटते.
 जिहाद मात्र धगधगीत आणि चालू काळातली एक जाचक कल्पना असल्यामुळे, ही कादंबरी जरा जिहाद-केंद्रित झाली असती, तरी चाललं असतं, कारण त्यातून कादंबरीचं दिशादर्शक मूल्य खचितच वाढलं असतं. जिहादांनी अफगाणिस्थानचा कसा सत्यानाश केला, हे इन्किलाब्यांनी केलेल्या सत्यानाशाच्या तुलनेत कमी प्रत्ययकारी रीतीनं व्यक्त झालेलं वाटतं. लेखकाचा इन्किलाबवरचा रिसर्च हा जिहादच्या रिसर्चच्या तुलनेत समग्र वाटतो. मात्र एका कादंबरीसाठी, एखाद्या विषयाचा

आठ वर्ष पाठपुरावा करणाऱ्या या लेखकाला मानाचा मुजरा केलाच पाहिजे.
पौर्वात्य विरुद्ध पाश्चात्त्य द्वंद्व

 भारतासारखाच अफगाणिस्थानसुद्धा परंपरा आणि प्रगतीच्या चक्रीवादळात सापडलेला एक देश आहे. स्वदेशी परंपरेचं ‘मागासवाणं' चेटूक सामूहिक मनावरून उतरवण्यासाठी पाश्चात्त्य विचारसरणीचा भौतिकवादी, विवेकशील झाडूच हवा, हे आशियामधल्या विकसनशील आणि अर्धविकसित देशांतल्या (मूठभर) बुद्धिवादी अभिजनांना वाटतच असतं. कादंबरीत भेटणाऱ्या ऐतिहासिक पुरुष पात्रांना म्हणजे नूरमहंमद तराकी, बबरक करमाल, अमिन, मजिबुल्ला या इन्किलाबी नेत्यांना प्रकर्षाने वाटतं, तसंच ते अनाहिता, सलमा व जमिलासारख्या ठसठशीत स्त्रीव्यक्तिरेखांनासुद्धा.
 देखणा, बुद्धिवान आणि कम्युनिझमची दीक्षा घेतलेला अफगाणी युवक,


अन्वर पगमानी, हा कादंबरीचा नायक म्हटला पाहिजे. यालाच कादंबरीत सर्वाधिक जागा, स्पेस मिळाली आहे, हा समतेच्या विचाराला स्वीकारणारा आणि मुख्य म्हणजे विचारापेक्षा व्यक्ती महत्त्वाची आहे हे मानणारा सामान्य अफगाणी माणूस आहे. अन्वर हाच खरा कादंबरीचा प्रोटागॉनिस्ट आहे. कादंबरी त्याच्या युवावस्थेपासून तो त्याच्या प्रौढावस्थेपर्यंतची सारी भावनिक स्पंदनं टिपते. अन्वरच्या जगण्याची परवड आणि अफगाणिस्थानची परवड एकमेकांत गुंफली गेली आहे.
 अफगाणिस्थानमधली जमीनदारी-प्रथा, धर्मांधता, स्त्री-पुरुष विषमता इ. सामूहिक वैगुण्यांबद्दल अन्वरला सच्ची चीड आहे. त्याचे वडील जरी धर्मभीरू आणि स्थानिक मशिदीचे पेशइमाम असले, तरी अन्वर इस्लामबद्दल चिकित्सक दृष्टिकोन बाळगून आहे. समतेचा घोष करणारा इस्लाम आणि समतेच्या विचाराची टवाळी करणारी जमीनदारी प्रथा एकत्र कशा नांदू शकतात, हा अन्वरला पडलेला प्रश्न आहे. म्हणूनच तो त्यांच्या युवावस्थेत कम्युनिस्ट होतो, मॉस्कोत इंजिनिअरिंगची विद्या शिकायला जातो, तिथे रशियन सौंदर्यवती तान्याच्या प्रेमात पडतो. तिच्याशी लग्न करतो आणि देशाची सेवा करण्याच्या उदात्त हेतूने अफगाणिस्थानमध्ये परतून येतो. अन्वर हा सत्ता हस्तगत करणाऱ्या सगळ्याच अफगाणी राष्ट्राध्यक्षांच्या मर्जीतला असूनही सत्तेच्या सारीपाटावर मात्र तो केवळ एक प्यादंच ठरतो. सत्तेच्या राजकारणात साधारण नागरिकाची हीच नियती असते.
 कादंबरीत अन्वरहून किंचित कमी जागा व्यापणारी व्यक्तिरेखा म्हणजे प्रो. करिमुल्ला. प्रोफेसरमहाशय इस्लामचे गाढे अभ्यासक आणि शुद्ध इस्लामचे बंदे आहेत. त्यांचे प्रकांड इस्लामिक ज्ञान कादंबरीवर एखाद्या सर्वव्यापी छायेसारखं पडलेलं आहे. गंभीर प्रवृत्तीच्या प्रोफेसरमहाशयांचा इस्लामिक विचार हा कडवा, पश्चिमविरोधी आणि कुराणाला अपरिवर्तनीय मानणारा आहे. मुख्य म्हणजे त्यांच्या विचारांना जितकी इस्लामिक वर्तुळात मान्यता आहे, तितकीच त्यांच्या विरोधकांच्या, इन्किलाबी वर्तुळातसुद्धा.
 कादंबरी जशी अन्वर पगमानीच्या आयुष्याचा दीर्घ आलेख मांडते, तशीच ती प्रो. करिमुल्लांच्या खाजगी आणि सार्वजनिक जीवनाचासुद्धा आलेख मांडत त्यातले विरोधाभास पुढे आणते. इस्लामवर अचल निष्ठा असलेल्या प्रोफेसरमहाशयांना इस्लामचा बंदिस्त की खुला विचार प्रिय आहे, हे सुरुवातीला नीट उलगडत नाही. मात्र त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात ज्या घटना घडतात, त्यावरून त्यांना उपरती होते आणि ते इस्लामचा खुला, स्त्री-पुरुष समतेचा विचार शिरोधार्य मानून, वा ध्येयाप्रत कार्य करण्यासाठी कटिबद्ध होतात. हे कादंबरीच्या शेवटी घडतं. तोपर्यंत इन्किलाबी व जिहादी विचारसरणीनं अफगाणिस्थानला स्मशानभूमी करून टाकलेलं असतं.

कादंबरीची संवेदनशीलता

 अफगाणिस्थानच्या पुरुषसत्ताक सांस्कृतिक वास्तवाच्या पार्श्वभूमीवर ही कादंबरी अफगाणी स्त्रीच्या मनाचं पर्यावरण, तिच्या मुक्तीच्या ऊर्मी, तिचा समतेचा लढा स्त्रीवादी दृष्टिकोनातून चित्रित करते. त्यामुळे या मोठ्या कादंबरीचा तोल केवळ पुरुष-केंद्री किंवा केवळ स्त्री-केंद्री न होता तो उभयकेंद्री होतो. कादंबरीची ही जमेची बाजू. कादंबरीत भेटणाऱ्या सलमा, अनाहिता, तराना, झोरा, झैनाब, झरीना, मरुफ आणि जमिला या मनस्वी स्त्रिया या राजकीय कादंबरीला खऱ्या अर्थाने भावनांची समृद्धी देतात.
 या स्त्रियांशिवाय ही कादंबरी म्हणजे अफगाणिस्थानचा रक्तपिपासू, पण शुष्क इतिहासच ठरला असता. पुरुषांमध्ये सेक्सइतकीच सत्तेची प्रेरणा आदिम असते. या पार्श्वभूमीवर जर ही कादंबरी इन्किलाबी विरुद्ध जिहादीच्या सत्तासंघर्षाची कथा म्हणून पेश केली गेली असती, तर या सत्तापिपासू नरांच्या खेळात फक्त AK.47 चे निनादच ऐकू आले असते. नरकेंद्रित शह आणि काटशह, लष्करी बंड आणि रक्ताच्या चिळकांड्यांना कादंबरीत पुरेसा अवकाश (space) असला, तरी या राजकीय कादंबरीचा तोल राज्यशास्त्रीय किंवा शीत युद्धाच्या अतिरिक्त समालोचनाने . पूर्णपणे ढळतो असं म्हणता येणार नाही.
 याला कारण, या साऱ्या समालोचनाला अर्थ देणारे स्त्री-पात्रांचे व्यक्तिनिष्ठ भावसमृद्ध संदर्भ. ही मानवकेंद्रित व्यक्तिनिष्ठा आणि भावनाच कादंबरीचा आत्मा असते. भावनांच्या उद्रेकांतून आकार घेणाऱ्या अनपेक्षित प्रेरणा जेव्हा वाचकाला भेटतात, तेव्हा वाचकाची स्वतःशीच गाठभेट होण्याची शक्यता असते. कादंबरी वाचण्यामागे ही गाठभेटीची, आत्मज्ञानाची प्रेरणा कधी मध्यवर्ती, तर कधी काठावरची म्हणून वाचकाला नकळत सोबत देत असते. म्हणूनच वाचक कादंबरीच्या प्रमुख आणि दुय्यम पात्रांच्या आयुष्यांशी एकरूप होतो. आत्मज्ञानाशिवाय कादंबरीची इतर प्रयोजनं दुय्यम आहेत.
 'इन्किलाब विरुद्ध जिहाद'मध्ये ही प्रक्रिया घडते का? घडते. ती किती जास्त किंवा किती कमी प्रमाणात हा तपशील वाचकसापेक्ष ठरतो. पण १९९९ च्या डिसेंबर महिन्यात, ज्या अफगाणी जिहादींनी भारतीय विमानाचं कंदाहारमध्ये अपहरण केलं आणि त्यातून भारतीय समूहमनाला जी ठसठसणारी अपमानस्पद वेदना दिली, त्या संशयास्पद देशाची प्रथम कम्युनिस्ट्स आणि नंतर जिहादी जी वाताहात करतात, ती वाचताना मराठी वाचक सुटकेचा नि:श्वास न टाकता कादंबरीच्या पात्रांच्या सुखदुःखांशी समांतर जाऊ लागतो, हे 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' या


कादंबरीचं यश ठरतं.
 मात्र या भावनांचा कल्लोळ आदर्शवादी, पुरेसा रोमँटिक आणि बराचसा ख्रिस्ती संवेदनशीलतेच्या जवळ, म्हणजे उपरतीच्या अंगानं जाणारा आहे. प्रखर निष्ठा, अचल श्रद्धा जेव्हा जीवनसंहारक ठरतात, तेव्हा त्या तपासून बघणं आणि त्यांना सोडचिठ्ठी देणं, ही नुसती शक्यतासुद्धा व्यक्तींच्या आत्मज्ञानाची पावती असते. कादंबरीत भेटणारी बरीचशी पुरुषपात्रं आपला घोषित मार्ग बदलून दुसऱ्या मार्गाने जाताना दिसतात. या सर्वांत डोळ्यांत भरणारं उदाहरण हे इस्लामिक स्कॉलर प्रो. करिमुल्ला यांचं आहे. इस्लामिक शुद्धतेचा आग्रह धरणाऱ्या करिमुल्लांचा जिहादींना पुरेपूर आशीर्वाद असतो. त्यानंतर जिहादीचं क्रौर्य आणि त्यांची असहिष्णुता बघून त्यांना उपरती होते आणि ते सूफी तत्त्वज्ञानाला जवळ जाणाऱ्या, सर्वसमावेशक, सहनशील इस्लामाची तरफदारी करू लागतात.
 जे इस्लामिक नाहीत, ते नापाक आणि काफीर ठरवणाऱ्या एका धर्माध व्यक्तीचा हा अंतर्गत प्रवास अचंबित करणारा, म्हणूनच अविश्वसनीय वाटतो. हे घडतं; कारण तराकी, करमाल, अमीन, नजिबुल्ला किंवा मुल्ला ओमर या ऐतिहासिक पात्रांच्या तुलनेत करिमुल्ला हे काल्पनिक पात्र म्हणून कादंबरीत येतं. करिमुल्लांच्या हळहळू परिपक्व होत जाणाऱ्या जाणिवेत व संयत होत जाणाऱ्या स्वरात सामंजस्याचे प्रतिध्वनी ऐकू येतात; कट्टर भूमिका घेणाऱ्या एका पात्राच्या मनाचं हे परिवर्तन कादंबरीला शेवटी विशालतेचं परिमाण देतात. हे जरा आदर्शवादी वाटतं.
 जिहादचा नारा देणारा जिहादी मनात उपरतीची भावना बाळगत नसतो. आपल्याला कयामतीच्या दिवशी पूर्ण न्याय मिळणार आहे, ही त्याची धार्मिक श्रद्धा असते. ही जेव्हा कमी होते तेव्हाच उपरती होते. कडवेपणा हा प्रचलित इस्लामचा गुणधर्म आहे, उपरती किंवा पश्चात्ताप हा फार तर ख्रिस्ती गुण म्हणता येईल. (आठवा : बायबलमधली 'रिटर्न ऑफ द प्रॉडिंगल सन'ची कथा) हिंदूंना होणारी उपरती बहुधा संन्यासाच्या मार्गानेच व्यक्त होते. स्वत:च्या हरवलेल्या केंद्रात परतून जाणारी ही संवेदनशीलता म्हणूनच ख्रिस्ती ठरते. कादंबरीतील बऱ्याच वक्तींचा प्रवास हा 'रिटर्न ऑफ द प्रॉडिगल सन'च्या वळणाने जातो.
 मनाला कायम टोचणी देणारी कठोर श्रद्धा खरी, की श्रद्धेला मुरड घालणारी सर्वसमावेशक समजूत? हे द्वंद्व सामान्य माणसाच्या मनात वसत असलं, तरी सत्तेच्या खेळात जर या आंतरिक द्वंद्वाला प्राधान्य दिलं, तर ते सत्तेच्या खेळाशी सुसंगत ठरत नाही. कादंबरीत भेटणाऱ्या इन्किलाबी नेत्यांना, तसंच जिहादींना हे पुरेपूर कळलेलं आहे. राजकीय सत्तेची अपरिहार्यता त्यांना उमगली आहे. तुम्ही तुमची सद्सद्विवेक आणि सत्ता एकत्रपणे भोगूच शकत नाही. सद्सद्विवेकाला
अन्वयार्थ □ २२३

गोंजारलं तर सत्ता हातून सटकते आणि सत्तेला गोंजारलं तर विवेकाला रामराम ठोकावा लागतो, हे वास्तव कादंबरीतले ऐतिहासिक नेते स्वीकारतात, हेच 'रिअलपॉलिटिक'. कादंबरीतले काल्पनिक पात्रं मात्र नेमकं यांच्याविरुद्ध वागताना दिसतात.

 कादंबरीच्या ऐतिहासिकतेला कधी समांतर जाणारे तर कधी छेद देणारे करिमुल्ला, इलियस किंवा अन्वरसारखे पुरुष मात्र स्वत:च्या मनाचा आवाज ऐकत, अंतर्मनाच्या प्रकाशाला अनुसरून प्रवास करतात. कादंबरीच्या शेवटी - म्हणजे जमीलाचे शोकात्म हौतात्म्य घडते तेव्हा कादंबरी संपते. पण त्यापूर्वी ऐतिहासिक अपरिहार्यतेला शरण जाणारी कादंबरी व्यक्तिनिष्ठ, भावुक वळण घेते. अप्रत्यक्षपणे का होईना, पण राजकीय सत्तेच्या शुष्क वास्तवावर आदर्शवादाचा उतारा सुचवला जातो. तो उपरतीच्या काल्पनिक अंगाने विकसित होतो. म्हणून 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' हा प्रचंड मोठा पट असलेला एक रोमँटिक जाहीरनामा ठरतो. याच संवेदनशीलतेमुळे कादंबरीतल्या काही घटना नाटकी वाटतात.
सत्तेवर कादंबरीची अधिसत्ता

 सत्तेच्या प्रेरणेचं स्वत:चं तर्कशास्त्र असतं. या तर्कात शुद्धतेचा दुराग्रह जसा स्थायिभाव असतो, तसाच 'आम्ही आणि इतर' हे द्वंद्वसुद्धा या द्वंद्वातले 'आम्ही' शुद्ध तर 'इतर' अशुद्ध ठरतात. अफगाणिस्थानच्या या कादंबरीपुरतं बोलायचं झालं, तर सुरुवातीला सोव्हिएट रशिया प्रेरित कम्युनिस्ट राजवट अफगाणिस्थानच्या केंद्रस्थानी म्हणून 'आम्ही' या कल्पनेत गणली गेली होती. ही 'आम्ही' मंडळी

वैचारिक शुद्धतेची खेळी करतात आणि आपल्या विचारांशी समांतर न जाणाऱ्या 'इतर' विचारव्यूहांना अशुद्ध घोषित करतात. त्यांच्याविरुद्ध हिंसेचा वापर करून इतरांचा नि:पात घडवून आणतात. या नि:पाताचं एक तर्कशास्त्र निर्माण झालं की कम्युनिस्ट राजवटीमधलं विरोधकाचं 'पर्जीग' समजून घेता येतं.
 शुद्धतेची ही खेळी उलटते आणि अफगाणिस्थानमध्ये 'इस्लाम खतरे में हैं' ची हाळी सर्वत्र ऐकू येते. मग जिहादी शक्तिमान होतात. कालचे 'इतर' आज 'आम्ही' होतात आणि काफिर कम्युनिस्टांच्या नि:पाताच्या योजना राबवल्या जातात. रक्ताच्या चिळकांड्या उडू लागतात. जन्नतचे दरवाजे उघडले जातात. जिहादींना आश्वस्त वाटू लागतं. इस्लामच्या शुद्धतेचा आग्रह सर्वव्यापी होत आंतरराष्ट्रीय स्तर गाठतो. कादंबरीत येणाऱ्या दोन्ही विचारधारा या अंतिमत: निरंकुश सत्तेच्या आकांक्षा व्यक्त करणाऱ्याच आहेत. अवघं जग पादाक्रांत करण्याचं संभावित स्वप्न बघणाऱ्या आहेत. म्हणूनच कम्युनिझम काय किंवा इस्लाम काय, दोन्हीही साम्राज्यवादी शक्तीच ठरतात.


 'महान' विचारधारेची ही शोकांतिकाच म्हटली पाहिजे. प्रत्येक 'महान' विचारधारा - मग ती साम्यवादाची असो की इस्लामाची, हिंदुत्ववादी असो की सेक्यलर. लिबरल डेमॉक्रॅटिक असो की कंझर्वेटिव्ह, अभिजन असो की बहुजन, प्रस्थापित असो की विस्थापित - सगळ्यांमध्ये विरोधाभास असतातच; पण त्यांच्याकडे कानाडोळा करत या विचारधारा स्वविरोधी, 'महान नसलेल्या' विचारांना संपवून टाकण्याचा विडा उचलतात. 'महान विचारांची' खासियत ही निरंकश सत्ता, तिचं समर्थन आणि तिच्याआड येणाऱ्या लहानमोठ्या विरोधांची मुस्कटदाबी हीच असते. यातूनच पुढे एकसंध समाज निर्माण करण्याची देदीप्यमान स्वप्नं बघितली जाऊन विचारवैविध्याचं निघृण निर्दालन होतं. जसा कालचा 'इन्किलाबी' विचार याला अपवाद नव्हता, तसाच आजचा 'जिहादी' विचारसुद्धा याला अपवाद नाही.
 कृतक् वैचारिकता ही स्वत:मध्ये रममाण होणाऱ्या, स्वत:च्या प्रेमात पडलेल्या रमणीसारखी असते, तिला स्वत:च्या आवाजाचे प्रतिध्वनीच तेवढे ऐकू येतात. ती सूक्ष्मरूप धारण करत असली तरी तिचे दमनयंत्र बटबटीत असतं. कुठल्याही विचारधारेची (ideology) शोकांतिका ही तिची सत्ताकांक्षाच असते. पण इतके स्वच्छपणे हे कुठल्याही सत्ताधीशाला कळलेलं नसतं. आपल्या सत्तेचं समर्थन देत तिचा परीघ वाढवणं हेच त्याचं आद्य कर्तव्य. मात्र जे राष्ट्राध्यक्षांना, पक्ष कार्यकर्त्यांना, श्रद्धाळू अनुयायांना किंवा बलिदानाच्या प्रेरणेने मुसंडी मारणाऱ्या “मानवी बाँब'ला दिसत नसतं ते लेखकाला दिसतं. कादंबरीकाराला उमगतं.
 समूहजीवनाच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक कप्प्यांमधल्या घडामोडींना अतिरिक्त महत्त्व देत व्यक्तीच्या मानवी आकाराच्या व्यक्तिगत आशा-आकांक्षांना हीन लेखणाऱ्या, त्यांना तुच्छ लेखणाऱ्या राजकीय । धार्मिक / आदर्शवादी वगैरे वगैरे विचारांचं वैयर्थ्य फक्त कादंबरीकारालाच उमगतं. कारण त्याच्या निर्मितीची कच्ची सामग्री निसरडे विचार नसून धगधगीत भावना असतात.
 अर्थ हरवलेल्या शब्दांचा बेरका वापर करून सत्तापालक प्रजेला भूल देतो. तर शब्दांचा हरवलेला अर्थ लेखक वाचकाला शोधून देत त्याचे अर्थाचे भान तीव्र करतो. राजकीय विचारसरणी संपते कुठे आणि वैचारिक दडपशाही सुरू होते कुठे, हे फक्त अस्सल राजकीय कादंबरीकारच सांगू शकतो. तोच सामान्य वाचकाला वैचारिक शुद्धतेच्या आग्रहाकडे खेळकर नजरेनं बघणं शिकवतो. कादंबरी सत्यअसत्याचे पाठभेद शिकवते. 'इन्किलाब विरुद्ध जिहाद'मधून हे काही अंशी साध्य होतं म्हणून ही कादंबरी सत्तेच्या निघृण वाटमारीच्या तुलनेत आगळीवेगळी मौलिक घटना ठरते. यासाठीच तिचं स्वागत!


'इन्किलाब विरुद्ध जिहाद' मधील धार्मिक आणि

राजकीय चर्चा व चिंतन


वि. दा. वासमकर

 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' ही लक्ष्मीकांत देशमुख यांची महत्त्वाची कादंबरी आहे. सतत हिंसाचाराने त्रस्त असणाऱ्या अफगाणिस्तानच्या जनतेच्या हलाखीची नरकप्राय यातनांची कथा आहे. १९७० नंतरचा अफगाणिस्तानचा इतिहास कथन करणे आणि रशियाप्रणीत धोरणाला अनुसरून चालणाऱ्या राजवटी आणि इस्लामला महत्त्व देऊन वाटचाल करणाऱ्या मुजाहिदीन, तालीबान टोळ्यांचा सत्ता प्रस्थापित करण्यापर्यंतचा व्यापक पट लक्ष्मीकांत देशमुख यांनी कादंबरीत मांडला आहे. आकाराने प्रचंड असूनही या कादंबरीला सुसंगत आवाका लाभला आहे. राजकारण आणि धर्म यांचा वास्तव पातळीवर वेध घेताना देशमुख यांनी कल्पनेचाही कौशल्याने वापर करून ही कादंबरी सिद्ध केली आहे.
 प्रस्तुत निबंधात 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' या कादंबरीतील धार्मिक आणि राजकीय पातळीवरील चर्चा आणि चिंतन यांचे स्वरूप काय आहे, याचा विचार करावयाचा आहे.

 प्रस्तुत कादंबरीतील केंद्रवर्ती असलेल्या दोन पक्षांचे वर्णन पुढीलप्रमाणे येते सहाव्या दशकाच्या उत्तरार्ध व सातव्या दशकाचा प्रारंभ हा अफगाणिस्तान - विशेषत: काबूल शहरासाठी धार्मिक - इस्लामिक पुनरुज्जीवनाच्या चळवळीनं व्यापलेला आहे. वाढत्या कम्युनिझमला विरोध म्हणून तेवढ्याच तीव्रतेनं धार्मिक निदर्शनं, चळवळी चालू होत्या. त्याच्यामागे शोर बाजारचे हजरतसाहेब, नक्शबंदी संप्रदायाचे जनाब मीर अली व पीर सय्यद जिलानीसारखे परंपरेतून पुढे आलेले नेते आहेत. तसेच प्रोफेसर करीमुल्लांसारखे धार्मिक बुद्धिवादी नेतेही आहेत व संसद सदस्य लतीफसारखे लोकप्रतिनिधीही आहेत. सर्वात महत्त्वाचे योगदान आहे ते मात्र गुल, रब्बानी, शमसू या त्रयीचं. पुढील काळात ही त्रिमूर्ती आणि सोव्हिएन युनियनवादी तराकी, करमाल, अमीन ही त्रिमूर्ती यांचा दिलचस्प तीव्र संघर्ष
धर्म विषयक चिंतन आणि चर्चा

 प्रस्तुत कादंबरीतील करीमुल्ला ही व्यक्तिरेखा महत्त्वाची आणि केंद्रवर्ती आहे. करीमुल्ला धर्मशास्त्राच्या चौकटीतच वावरणारे बुद्धिवादी नेते आहेत. त्यांना प्रगती हवी आहे ती इस्लामच्या चौकटीत. करीमुल्ला व अन्वर यांची धर्मविषयक आणि अफगाणिस्तानच्या विकासासंबंधी चर्चा होते. अन्वर हा त्या कादंबरीचा नायक, तो मार्क्सवादी विचारांचा पाईक आहे. या दोघांमधील चर्चा परंपरा आणि विकास यावर प्रकाश टाकते. 'खल्क' या साप्ताहिकातील नूर महमद तराकी यांच्या लेखावरून करीमुल्ला आणि अन्वर यांच्यामध्ये विचारमंथन होते. तराकीच्या लेखाचा सारांश असा की, "अफगाणिस्तान हा देश इस्लामपायी विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला नकार देत आहे त्यामुळे तो मागास राहिला आहे. इस्लामच्या पलीकडे जगच नाही या भावनेवर तराकी हल्ला करतो. विज्ञान व तंत्रज्ञान यांच्याविना गरिबी आणि भूक नष्ट होणार नाही. धर्मपरंपरेच्या नावाखाली आधुनिक तंत्रज्ञानाचं शिक्षण देण्याऐवजी मदरसा शिक्षणावर भर देणे योग्य नव्हे. युरोपनं विज्ञानयुगाची कास धरल्यामुळे त्याचा विकास झाला. पवित्र दिव्य 'कुराण' मधील मथितार्थ जाणून त्यानुसार आजच्या जमान्याशी सुसंगत गोष्टींसाठी पुढे येणं हाच आपल्या प्रगतीचा पाया ठरणार आहे. कमी बुद्धीच्या मौलवींच्या हट्टासाठी गरीब भुकेल्या व पशुवत जिणं जगणाऱ्या अवामसाठी आपण लढले पाहिजे.” या भूमिकेवर करीमुल्ला म्हणतात, “मी व्यक्तिश: कोणत्याही प्रकारच्या स्वातंत्र्याच्या संकोचाविरुद्ध आहे.... पण आता धर्मग्रंथावर समाजसंस्था उभारण्याचे दिवस गेले, हा त्यांच्या लेखातील मुद्दा मला पटत नाही. आपल्या देशाची प्रगती मलाही जरूर हवी आहे, पण इस्लामियत सोडून नव्हे. मी सश्रद्ध मुस्लीम आहे व 'दीनेकामील' ची भूमिका म्हणजे आपल्या पवित्र धर्मग्रंथात बदल संभवत नाही, हा याचा पाया वा गाभा आहे. माझ्यावर 'अल अझर' मध्ये त्याचाच संस्कार झाला आहे. बहुसंख्य अवामची पण यावर श्रद्धा निष्ठा आहे. ते. धर्मग्रंथांच्या आधारेच प्रगती घडवून आणली पाहिजे. त्यासाठी शास्त्रार्थ दिला पाहिजे, तरच अवाम तिचा स्वीकार करील.”
  त्यावर 'आपण धर्मचिकित्सेला का घाबरतो' असा प्रश्न अन्वर त्यांना


विचारतो. त्यावर करीमुल्ला संभ्रमित होतात. इस्लाममधील बहुपत्नीत्वाची पद्धत अन्वरला काळानुरूप अयोग्य वाटते. परंतु धर्माज्ञा म्हणून इस्लामी जनता तिला मानते हे त्याला खटकते. अन्वर तर्कनिष्ठ पद्धतीने आपले म्हणणे मांडत राहतो. तो म्हणतो, “सर, प्रत्येकाला धर्म हा लागतोच, त्या अर्थानं मीही धार्मिक आहे. मुसलमान आहे. आपला धर्मग्रंथ अनेक बाबतीत प्रगतीशील आहे. त्यानंच मानवी इतिहासात प्रथम स्त्रीला मालमत्तेचे अधिकार दिले आहेत. तरीही आज ज्या वेगानं जग बदलत आहे, त्याच्याशी आपण मिळत जुळतं घेऊ शकत नाही, कारण डोक्यावर धर्मग्रंथाचं ओझं आहे. प्रत्येक बाबीसाठी कुराण - हदीसचा आधार घेण्याचा अट्टाहास का? धर्माचं खरं महत्त्व आहे, माणसाची आध्यात्मिक भूक भागवण्यासाठी, पण आधुनिक काळात राजसत्ता व धर्मसत्ता अलग झाली आहे. युरोपात हेच घडलं आहे, तुर्कीमध्ये केमाल पाशानं हाच प्रयत्न केला आहे. आपला शेजारी पाकिस्तान इंग्रजी शिक्षणाने काही प्रमाणात तरी आधुनिक होत आहे ..... जनाब तराकी वा आमचा हाच दृष्टिकोन आहे की, आम्हाला अवामची जिंदगी बेहतर करायची आहे. त्यासाठी प्रत्येक बाबीसाठी कुराणे शरीफ वा हादिसकडे धाव घेण्याची गरज नाही. धर्माचं स्थान उपासनेसाठी व आध्यात्मिक भुकेच्या पूर्तीसाठी महत्त्वाचं आहे, हे आम्हीही अमान्य करीत नाही." यावर अन्वरच्या तर्कशुद्ध प्रतिपादनाचं कौतुक करीत आपलाच मुद्दा पटवत राहतात व शेवटी म्हणतात. 'अन्वरभाई, मलाही अवामची प्रगती हवी आहे, तुझ्या मार्गानं नव्हे, तर इस्लामच्या चौकटीत. मला खात्री वाटते की, ती मुमकीन आहे.” (पृ. ८१,८२) यावर अन्वर हतबुद्ध होतो. या ठिकाणी करीमुल्ला हे प्राध्यापक असूनही धर्मभावनेच्या जोखडातून बाहेर येऊ शकत नाहीत असे दिसून येते. यावरील "कमी बुद्धीच्या कर्मठ मौलवीशी साधा संवादही शक्य होणार नाही. अवामला प्रागतिक विचार समजणं सोडा, त्यांच्यापर्यंत आपण पोचूही शकणार नाही." हे अन्वरचे भाष्य वाचकाला खूप अंतर्मुख करणारे आहे. हेच प्रा. करीमुल्ला युनोच्या आश्रयाला असलेल्या नजीब यांना तालीबान सैनिक निघृणपणे मारताना पाहून आणि समस्त स्त्रीवर्गाला घर आणि बुरखा यांच्यात डांबलेले पाहून तालीबानशी नातं तोडून टाकताना आपली बहू बेनझीरला म्हणतात, “बेटी, मी आजपासून तालिबानशी नातं तोडून टवकत आहे. त्यांच्या इस्लामसंमत नसलेल्या कृत्यांबाबत आवाज उठवेन. त्यासाठी लेखणी चालवेन ....!" आणि कादंबरीच्या शेवटी जमिलाला तालिबानी कायद्याने जमाव ठार मारतो त्यावेळी प्रा. करीमुल्ला पूर्ण बदलतात आणि तालिबानींच्या विरुद्ध लढायला सिद्ध होतात. प्रा. करीमुल्ला यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास लेखकाने कौशल्याने वर्णिला आहे.


 तराना ऊर्फ तान्या ही अन्वरची बायको. ती अन्वरच्या प्रेमासाठी रशिया सोडून अफगणिस्तानात येऊन राहते. मात्र आपण के. जी. बी. ची गुप्तहेर आहोत हे अन्वरपासून लपवते. अन्वर आणि तरानाचे धर्मविषयक विचार थोडक्यात पाहू. तरानाशी लग्न केल्यानंतर लवकरच अन्वरची काबूल विद्यापीठात प्राध्यापक म्हणून नियुक्ती होते. तेथे रुजू झाल्यावर तरानाशी गप्पा मारताना अन्वर म्हणतो, “तान्या, मला आता खरंच धर्म ही संकल्पनाच निरर्थक वाटू लागली आहे. मार्क्स म्हणाला ते खोटं नाही. धर्म ही खरंच अफूची गोळी आहे!" त्यावर तराना म्हणते, “मी तर साम्यवादी देशात वाढलेली आहे. आमची पूर्ण जीवनपद्धती या सूत्राभोवती गेल्या चाळीस वर्षांत विकसित झाली. 'चर्च हटाव' ची मोहीम स्टालिननं राबवली खरी, पण महायुद्धाशी सामना करताना त्यालाही चर्चचा आधार घ्यावा लागला. आणि म्हणूनच मला वाटतं, मार्क्सवादी असूनही धार्मिक राहता येतं.... धर्माचा मार्क्सने व्यापक अर्थाने विचार केला नव्हता. तो फक्त संस्थात्मक धर्माचा विचार करीत होता. पण याहून उच्च प्रतीची धार्मिक बुद्धी असू शकते, नव्हे आहे, असं माझं मत आहे." यावर आजच्या विज्ञानयुगात इहवादच युगधर्म बनतोय, या अन्वरच्या मतावर तराना पुढे बोलते, “पण माणसाचं एवढ्यानं भागत नाही, अन्वर. माणसाला विश्वाच्या व मानवी व्यक्तिमत्त्वाच्या समग्र स्वरूपाचं एक चित्र हवं असतं. असं चित्र बनविण्याची त्याची खोल प्रवृत्ती असते आणि या चित्राच्या संदर्भात कशा रीतीनं जगलं असता खरंखुरं साफल्य मिळतं हे त्याला समजून घ्यायचं असतं. इहवादी विचारसरणीला असं समग्र चित्र बनविता येत नाही." या तरानाच्या विचारावरून ती धर्म आणि मार्क्सवादी भूमिकेचा समन्वय साधू इच्छिते हे दिसून येते. ती अन्वरच्या आई-वडिलांच्या इच्छेखातर धर्मांतर करते. अन्वरला तिच्या धर्मांतराची कल्पना रुचत नसते. यावर ती जे विचार प्रकट करते त्याला सारांश असा - हजरत महंमद हे शेवटचे प्रेषित आहेत अशी सर्व मुस्लिमांची जी श्रद्धा आहे ती योग्याच आहे. इस्लाममधीलही 'खातमुल नबुवत' ही भूमिका महत्त्वाची आहे. त्यानुसार येशू व ज्यू धर्माचा मोझेस हे एका परीने इस्लामचे प्रचारक आहेत. याचा अधिक अर्थ स्पष्ट करताना तराना म्हणते, “मानवजातीच्या विकासासाठी परमेश्वराने अनेक प्रेषित पाठविले पण प्रेषितांचे संदेश लोक स्वार्थासाठी उलटे सुलटे करीत. म्हणून अलम माणूस-जातीसाठी परमेश्वरानं शेवटचा एक प्रेषित पाठवला. हे शेवटचे प्रेषित म्हणजे हजरत मोहमद पैगंबरसाहेब! ते शेवटचे प्रेषित असल्यामुळे पवित्र कुराणात काही बदल होऊ शकत नाही. ज्यू व ख्रिश्चन हे इस्लामपूर्व धर्म आणि मोझेझ आणि येशू हे त्यांचे प्रेषित; पण परमेश्वरी संदेशात गढूळता आली म्हणून शेवटी महंमद पैगंबरांना पाठवलं. म्हणून पवित्र कुराण हा

परमेश्वराचा संपूर्ण व शुद्ध उपदेश आहे. मुस्लिम पंडित म्हणतात की, ज्यूंच्या, ख्रिश्चनांच्या काही चालीरीती इस्लामनं उचलल्या, ही भूमिकाच बरोबर नाही. खरी गोष्ट अशी की मोझेझ व येशू हे दोघेही इस्लामचाच प्रचार करीत होते. म्हणून ज्या बाबी समान आढळतात त्या सर्व बाबी परमेश्वराने जगताच्या प्रारंभापासून सांगितलेल्या इस्लामचाच भाग आहेत. त्या शुद्ध इस्लाममध्ये सापडतात." हे तरानाचं अखंड अस्खलित भाष्य ऐकून अन्वर थक्क होतो. आपल्या धर्मनिष्ठ वडिलांनाही हे जमणार नाही असे त्याला वाटते. तराना हे सर्व अभ्यासपूर्वक बोलते. या प्रतिपादनातून आपण इस्लामचा डोळसपणे स्वीकार करीत आहोत हे तिला दाखवायचे आहे. आणि अन्वरचा विश्वास संपादन करून तिला आपला कार्यभाग साधायचा आहे, हे ती अन्वरपासून लपवते. अन्वरवरचे तिचे प्रेम मात्र सच्चे आहे आणि ते शेवटपर्यंत ती टिकवते.
राजकीय विचार व चर्चा

 प्रस्तुत कादंबरीत राजकीय स्वरूपाची जी चर्चा येते ती मार्क्सवाद, समाजवाद आणि साम्यवाद या संकल्पनांच्या संदर्भात. अफगाणिस्तानातील तरुणांनी सुरू केलेली राजकीय व धर्मविषयक सुधारणांची चळवळ पी. डी. पी. ए या संघटनेच्या वतीने चालविली जाते. 'धर्म ही अफूची गोळी आहे.' ह्या कार्ल मार्क्सच्या विचाराने प्रभावित झालेल्या अन्वरला वाटते की, अवामच्या बेहतर जिंदगीसाठी समाज आणायचा आहे. त्यांना शिक्षण-आरोग्य सुविधा द्यायच्या आहेत. त्यांना त्यांच्या गुलामीची, हलाखीची जाणीव करून देत त्यांच्यात वर्गसंघर्षाची बीजं पेरायची आहेत, हेच तर आपल्या पक्षाचं इतिहासदत्त कार्य आहे व त्याचे आपण निष्ठावान सैनिक आहोत.” (पृष्ठ ९१) या त्याच्या चिंतनातून अन्वरचे व्यक्तिमत्त्व उठून दिसते.
 अन्वर व अमीन तराकीला भेटून हेरतला परत येत असताना जी चर्चा करतात त्यातून अमीनचा आणि तराकी यांचा लष्करी क्रांतीचा विचार अन्वरला कळतो. अमीन म्हणतो, "नेमक्या याच (सरकारवर दबाव आणणे) थिंकिंग प्रोसेसमधून मीही गेलो आहे. या मार्गानी क्रांती घडवायला शतकं लागतील. शिवाय शिक्षणानं मन नवोन्मेषशाली बनतंच असं नाही! तुझे ते प्रोफेसर करीमुल्ला घे. एवढे विद्वान, पण पक्के धार्मिक, म्हणून आपल्या क्रांतीसाठी अडसर. खरंच, या धर्मांधतेच्या सीमेवर पोचलेल्या कट्टर इस्लामिक बांधवांमध्ये क्रांतीची बीजं रोवणं फार कठीण .... म्हणून मी आणि जनाब तराकी वेगळा मार्ग चोखाळत आहोत. लष्करी अधिकारी व विद्यार्थी त्यांच्यात क्रांतीचा स्फुल्लिंग पेटवला की त्यांच्या माध्यमातून


लष्करी क्रांती होऊ शकते, पण तिची विचारधारा मात्र मार्क्सवादी असेल.' (पृ. ९२)

 मार्क्सवाद हा समता मानणारा विचारव्यूह आहे. पण तो अमलात आणणारे लोक कसे आहेत यावर त्याचे स्वरूप अवलंबून राहणार हे उघड आहे. पीडीपीए पक्ष फुटतो. त्यातून करमाल व अनाहिता वेगळे होतात. आणि तराकी व अमीन एका बाजूला. इलियास या फुटीची कारणमीमांसा अन्वरला सांगतो, त्यातनू उच्च-नीचतेचा विचार साम्यवादी विद्वानांमध्येसुद्धा कसा असतो याचे प्रत्यंतर येते. करमाल हा सरदार घराण्यातला तर तराकी अन् अमीन हे अफगाणिस्तानच्या समाजरचनेत हलक्या वंशाचे समजले जातात. त्यामुळे ही फूट अटळ होती.
अफगाणिस्तानातील राजकीय स्थित्यंतरे.

 ऐंशी आणि नव्वदच्या दशकात अफगाणिस्तानात सतत सत्तांतरे होत होती. कधी हिंसक मार्गाने तर कधी रक्तहीन राज्यक्रांतीने. या सत्तातरांना कुदेते असे म्हटले जाते. प्रथम अफगाणिस्तानच्या बादशहाला तो रोमला उपचारासाठी गेला असता १७ जुलै १९७३ रक्तहीन राज्यक्रांती होऊन जनरल दाऊदखान हा सत्तेबर आला; तर एप्रिल ७९ मध्ये दाऊदखानला हटवून नूर महमद तराकीची कम्युनिष्ट राजवट आली - या घटनेला सौरक्रांती असं संबोधण्यात आलं. १६ सप्टेंबर १९७९ रोजी हाफिजुल्ला अमीन यांनी नूर महंमद तराकीला ठार करून सत्ता मिळविली आणि अमीनला विषप्रयोग करून डिसेंबर ७९ मध्ये बबराक करमालने सोव्हिए युनियनच्या मदतीने काबूलवर ताबा मिळविला. आणि नजीबने १९८६ मध्ये त्याची सत्ता संपवली व आपण अध्यक्षपादाची सूत्रे घेतली. ही सर्व साम्यवादी विचारसरणीची सरकारे होत. आणि नजीबची शेवटची साम्यवादी सत्ता संपवून १९९३ च्या सुमारास मुजाहीदन टोळ्यांची राजवट आली. शेवटी तालिबानी समर्थकांनी शेवटचा कम्युनिस्ट प्रसिडेंट नजीबला अत्यंत निघृणपणे ठार केले.

सौरक्रांती :

 एप्रिल १९७९ मध्ये नूरमहंद तराकीचे सरकार आले याला पहिली सौरक्रांती म्हटले जाते तर डिसेंबर ७९ मधील बबराक करमालच्या सरकार स्थापनेला दुसरी सौरक्रांती म्हटले जाते.
 या सौरक्रांतीबद्दल नूरमहंमद तराकी आणि अन्वर यांच्यामध्ये जी चर्चा होते तिचा आशय असा. तराकी म्हणतो, “अन्वर, मी प्रत्यक्ष जगण्यातून मार्क्सवाद

शिकलो आहे. तुझ्यासारखं वा जनाब करमालसारखं बुद्धी व विचाराने नव्हे! त्यामुळे मी कधीच परंपरा व रूढीला मानलं नाही. पण अवामच्या दिलोदिमागावर त्याचा केवढा गहरा असर असतो व बदलाला ते किती अनुत्सुक असतात, हे मात्र मी ध्यानात घेतलंच नाही. आणि मुख्य म्हणजे सामाजिक सुधारणा, बदल यासाठी टप्पाटप्यानं होणाऱ्या दशकांच्या, नव्हे शतकांच्या उत्क्रांतीवर माझा विश्वास नाही. मला तेवढा वेळ नाही... मेरे जीते जी मैं वो सारा इन्किलाब और बदलाव देखना चाहता हूँ।"

 पण ही सौरक्रांती म्हणजे एक मिथ आहे का अशी शंका तराकी बोलून दाखवतो. कारण या सौरक्रांतीनंतर लगेचच सामान्य नागरिकांनाही, तसेच प्रशासनातील सामान्य सेवक, लष्करातील नोकरांनाही या सौर क्रांतीच्या दमनचक्राचा त्रास होऊ लागला तेव्हा सौरक्रांती ही अवामसाठी आहे, की मूठभर मार्क्सवाद्यांसाठी आहे, असा सवाल निर्माण झाला. या दमनचक्राचा रोख मुल्ला मौलवीविरुद्ध होता. पण ते अवामचे धर्मगुरू असल्याने जनतेची नाराजी वाढू लागली. हीच गोष्ट दुसऱ्या सौरक्रांतीचीसुद्धा सांगता येईल. त्यामुळे अतिरेकी विचारसरणीच्या राजकीय गटांना बळ मिळू लागले. आणि त्यातून नरसंहार सुरू झाला. अवामवर कडक इस्लामी कायद्याचा वरवंटा फिरू लागला. मुजाहिदीन किंवा तालिबानी विचारसरणीचे अंमली पदार्थाच्या तस्करीच्या द्वारे सत्तेत येऊ लागले. इस्लामला मंजूर नसलेल्या अनेक घटना घडू लागल्या. असे जेव्हा होत असते त्याचा सर्वात जास्त फटका स्त्रीला बसतो. याचे ज्वलंत उदाहरण म्हणून रशियन शिक्षक लायकाचं सांगता येईल. लायका ही अफगाणिस्तानमध्ये कृषिसाक्षरता वर्गासाठी आलेली होती. ती स्त्रियांना शिकवते हे तिथल्या पुरुषांना आवडत नाही. आणि एका दिवशी ते तिच्यावर बलात्कार करून तिच्या नवऱ्यासह मारून टाकतात. शेवटी जमिलालाही जमान दगडांनी ठेचून मारतात. यातूनही हेच दिसून येते. यातून धर्मभावनेशी लढाई करणे किती अवघड आहे याचा प्रत्यय येतो.
जिहादी विचार :'

 परकी सत्ता उलटून टाकण्यासाठी जिहाद पुकारला जातो. सौर क्रांतीने सत्तेवर आलेल्या कम्युनिस्ट राजवटीला उलथवून टाकण्यासाठी प्रा. करीमुल्ला आसुसलेले होते. प्रा करीमुल्लांना आर्मी कोअर ग्रुपशी समोरासमोर झालेल्या चकमकीचं वर्णन करताना अब्बास म्हणतो, “मामला मोठा कठीण होता. पण उमरची दिलेरी, जिगर आणि सैन्यातलं प्रशिक्षण कामी आलं! विषम संख्येचा


सामना असूनही आम्ही जवळपास तीस जणांना कंठस्नान घातलं. बाकीचे पळून गेले, तर काही शरण आले." आपल्या शिष्यांना जंगे मैदानवर पाठवून करीमुल्ला कुराणेशरीफचे पठण करू लागले. दुपारी अल्ला हो अकबरचा बुलुंद गगनभेदी जल्लोश त्यांना ऐकू आला तेव्हा आपले बहादूर शिपाही फतेह हासील करून आल्याची त्यांना जाणीव होते. या युद्धाचं वर्णन शमशुद्दीन करतो. “भाई जान, बडा मजा आया! दुश्मनची संख्या आमच्या दुप्पट होती. दोन टॅक्स व पाच ट्रकसह शेकडो बंदुका अन दारूगोळा घेऊन त्यांचा काफिला जात असताना आम्ही दबा धरून त्यांच्यावर धावा बोललो. किती घमासान लढाई झाली म्हणून सांगू! उमरसाहेबांच्या बहादुरीची कमाल बया करायला माझ्याजवळ शब्द नाहीत. अब्बास भाई पण काय लढले. मीही, भाईजान, तुमच्या सदिच्छेने नेटानं लढलो." तुम्ही सारे सलामत आहात ना? असे विचारल्यावर दुसरा म्हणतो, “जंगमध्ये प्राणांचा बळी द्यावाच लागतो.” उमरचा एक डोळा फुटतो यावर तो म्हणतो, “ये जिहाद के लिए बहोत कम है सर!" वरील चर्चेवरून जिहादी तरुणांची मानसिकता लक्षात येते.
जमिलाचे राजकीय विचार

 जमिला ही अन्वरची पुतणी. लहानपणापासून तिच्यावर मार्क्सवादी विचारांचे संस्कार झालेले होते. मात्र ती जशी पोथीनिष्ठ मार्क्सवादी नाही तशीच पोथीनिष्ठ मुसलमानसुद्धा नाही. नजीबच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यावर ती जे निवेदन करते यावरून तिचे हे व्यक्तिमत्त्व लक्षात येते. शेवटचा रशियन सैनिक फेब्रुवारी १९८९ मध्ये परतला तेव्हा जमिलानं मुजाहिदीना आवाहन केलं. त्याचा आशय असा - डिसेंबर १९७९ मध्ये महासत्ता सोव्हिएन युनियनने एक लाखाच्यावर रेड आर्मी पाठवून आपला देश गुलाम केला तेव्हा मी मार्क्सवादी असूनही मुजाहिदीनांना साथ दिली कारण कारण रेड आर्मी परकी होती. आमच्या देशात कोणतं सरकार असावं हे ठरविण्याचा अधिकार आम्हाला हवा. म्हणून मीही एक मुजाहिदीन झाले. आता नजीब सरकारने रशियन सैन्य परत पाठवून आपले वचन पाळले आहे. आणि मुजाहिदीन टोळ्या इथल्या आवामला छळत आहेत. स्त्रियांना अंधारकोठडीत डांबत आहेत. मुजाहिदीनांच्या या प्रतिगामी विचारसरणीशी मी तेव्हा सहमत नव्हते आणि आजही होऊ शकत नाही. म्हणून आमचे रस्ते आता अलग झाले आहेत. अफगाण देशाच्या आबोहवामध्ये कट्टर धार्मिकता कधीच नव्हती. अफगाण संस्कृती ही इस्लामचे प्राणतत्त्व घेऊन जरूर वाढली आहे. पण त्यात अतिरेकवादाला आणि कुराणप्रणीत इस्लामिक राज्याला फारसं स्थान नाही. खर

तर, इस्लामला किंवा कुराणला इस्लामिक राज्य असं काही अभिप्रेत नाही. त्यामुळे इस्लामशी फारशी सुसंगत नसलेली जिहादी चळवळ बहुसंख्य अवामला मंजूर नाही. झपाट्यानं जग बदलत असताना त्याच्या गतीशी जुळवून घेत देशाची प्रगती साधायची असेल तर आधुनिक विचार अर्थात भोगवाद, स्वच्छंदता टाळून आपण स्वीकारला पाहिजे. हे तथाकथित जिहादी मार्क्स व त्याचा मार्क्सवाद कम्युनिझम देव मानत नव्हता म्हणून परका, काफिर मानतात. पण त्या मार्क्सनं गरीब शोषितांच्या भाकरीचा विचार केला. लोकसंख्येचा अर्धा भाग जो आम्हा स्त्रियांचा आहे, त्यांचा समतेचा विचार केला, आणि कोणतं तत्त्व धर्मपंथाच्या नावानं मूठभरांना श्रीमंत करीत बहुसंख्यांना कंगाल करतं, दारिद्रयात खितपत ठेवतं, याचं विश्लेषण केले आहे. त्यामळे त्याचे काही विचार देशाच्या भवितव्याचा विचार करून स्वीकारून त्यांना देशी वळण देऊन त्या आधारे देश चालवला पाहिजे. म्हणून सर्व मुजाहिदीन बांधवांना आवाहन आहे की त्यांनी जिहादी जुनूनची मानसिकता त्यागून आधुनिक पुरोगामी विचारांची साथ द्यावी. व जगाच्या बरोबर राहावं! या विचारातून मी पुन्हा पी. डी. पी. ए. मध्ये सामील व्हायचा निर्णय घेतला आहे.' (पृ. ३३९)
 या जमिलाच्या आवाहनात इस्लाम व मार्क्सवाद यांच्या विचाराचं यथायोग्य भान दिसतं. असंच भान तिनं कम्युनिस्ट विचारसरणीच्या आपल्या सहकाऱ्यांना जे आवाहन केले आहे त्यातही दिसते. ती म्हणते, “मेरे अजीजो, आपण कितीही अफगाण जीवनात आधुनिक इहवादी मूल्यं रुजवायचा प्रयतन करीत असलो तरी हा देश मूलत: इस्लामी देश आहे व अवामला इस्लाम सोडून कोणतीही प्रगती फारशी पसंद नाही. या पार्श्वभूमीवर आपण व पी. डी. पी. ए. ला अवामनं का स्वीकारलं नाही, हे लक्षात घ्या..... ज्यांच्यासाठी आपल्याला सारं काही करायचं आहे त्यांच्यापासून अलग राहून कसं करता येईल?" (पृ. ३४३)
 जमिलाच्या या विवेचनात तिचे समतोल वृत्तीचे व्यक्तिमत्त्व उठून दिसते. परंतु याच जमिलासारख्या स्त्रीला इस्लामी कायद्यान्वये दगडाने ठेचून मारले जाते हे पाहून मन उद्ध्वस्त होते. निडर स्वभावाची जामिला आपला मृत्यू अटळ असल्याचे पाहून न डगमगता काझीला आपले मनोगत व्यक्त करते, त्यातून ती सर्व स्त्री जातीचीच प्रतिनिधी आहे असे वाटते. ती म्हणते, "..... मला हा गुन्हा कबूल नाही, तशीच ही शिक्षाही मान्य नाही. काझीसाब, मध्ययुगीन काळातल्या या शिक्षा - देहदंड सरेआम देणं, हात-पाय तोडणं आज जगातील कोणत्याच मुस्लीम देशात लागू नाहीत.... मध्ययुगीन काळाचे कायदे व शिक्षा आजच्या नव्या दुनियेत पुन्हा लागू करून आपला देश आणखी पाच-दहा शतकं मागे नेणार आहोत? नाही

काझीसाब, हे मला देशावर प्रेम करणारी एक इन्सान म्हणून मान्य नाही. म्हणून तुमच्या या तथाकथित इस्लामी कायदेकानूनचा मी सरेआम निषेध करते. ते बदलन आधुनिक नागरी कायदे आणावेत, अशी इल्तिजा करते. तरीही त्याचं पालन करून मी देहदंडाला मी देहदंडाला सामोरी जाणार आहे. लेकिन खुदा करे, मैं इस कानून तहत मरनेवाली आखरी इन्सान ठरूँ, फिर कमी किसीपर थे नौबत न आये...." (पृ. ४५७)
 जमिलाच्या आवाहनात संपूर्ण स्त्रीजातीचं दुःख लपले आहे. जमिलाच्या संपूर्ण विचारात समतोल विचार आढळतो. या कादंबरीला कोणताही एक नायक किंवा नायिका आहे असे दिसत नाही. पण अन्वर ही व्यक्तिरेखा मध्यवर्ती आहे. आणि मध्यवर्ती नसली तरी जमिला आपल्या समतोल आणि परखड विचाराने या कादंबरीत उठून दिसते आणि वाचकांच्या मनावर आपला ठसा उमटवते असे म्हणता येईल.
 सारांश, लक्ष्मीकांत देशमुख यांनी वास्तववादी चित्रण करणाऱ्या कादंबरीत आपल्या प्रतिभेने प्रचंड आवाका असलेल्या आशयाचा वाचकांच्या मनावर प्रत्ययकारी ठसा उमटवला आहे, असे म्हणता येईल.

 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' ही श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांची कादंबरी आधुनिक मराठी साहित्यातील अनेक अर्थानी एकमेवाद्वितीय, मराठी साहित्याला नवी वाट दाखवणारी धाडसी कलाकृती आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणारी नाही. उच्चशिक्षित अक्षरशत्रूची नवी पिढी वाढत असण्याच्या या काळात सव्वानऊशे पानांची कादंबरी लिहिणं हेच एक धाडस आहे. त्यातही कादंबरीचा पट अफगाणिस्तानसारख्या देशाच्या आणि तिथल्या गेल्या अर्धशतकाच्या राजकीय, सामाजिक आणि धार्मिक स्थित्यंतराच्या भव्य पाश्र्वभूमीवर बेतणं हेही एक धाडसच मानलं पाहिजे. मराठी साहित्याच्या इतिहासात भारताच्या सीमा उल्लंघून हे धाडस करणारे लेखक अपवादानेच आढळतात. या ठिकाणी विश्राम बेडेकरांची 'रणांगण' आणि रमेश मंत्री यांची ‘महानगर' या कादंबऱ्याचा उल्लेख अपरिहार्य आहे. यातील रणांगण ही छोटेखानी कादंबरी दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडात घडणाऱ्या मृत्यूच्या तांडवाच्या पाश्र्वभूमीवर युरोपात फुललेली. एक भारतीय तरुण आणि पाश्चात्त्य तरुणी यांच्यातील विलोभनीय काव्यमय प्रेमकथा आणि शोकांतिका. 'महानगर' लक्षणीय असली तरी वाचकांच्या मनावर साहित्यिक कलागुणांनी दीर्घकालीन ठसा उमटवण्यास असमर्थ ठरते. पाश्चात्त्य लेखकात बालवाङमय लिहिणाऱ्या लेखकांनी देशांच्या सीमापलीकडे जाऊन टारझन, गलिवर्स ट्रॅव्हल्ससारख्या अभिजात कलाकृती निर्माण केल्या. तरीही त्यात निखळ मनोरंजन करणारी अद्भुत सृष्टी निर्माण करण्यापलीकडे दुसरा हेतू नव्हता. मागरिट मिचेलच्या 'गॉन विइथ द विंड'ला अमरिकन यादवी युद्धाची भव्य पार्श्वभूमी लाभली असली तरी ती एक मानवी नातेसंबंधांच्या गुंतागुंतीचा वेध घेणारी कादंबरी होती. मिचेल स्वत: अमेरिकन असल्यानं हे सारे अनुभव तिला परके नव्हते टॉलस्टॉयच्या 'वॉर अॅड पीस' बद्दल असंच म्हणावं लागेल. सॉमरसेट मॉमनं जगभर हिंडून विविध भौगोलिक पटाच्या
पार्वभूमीवर अनेक कथा ताकदीनं लिहिल्या, परंतु तिथलं जीवन रेखाटण्याचा मॉमचा मूळ हेतू नव्हता. असा प्रयत्न पाश्चात्त्य लेखकानं जबरदस्त ताकदीनं केला तो पर्ल बकनं. 'गुड अर्थ' सारख्या कादंबऱ्यातून पर्ल बकनं चीनच्या ग्रामीण जीवनाचा, तिथल्या मातीत वाढलेल्या साध्या माणसांच्या सुखदु:खांचा जिवंत आणि अस्सल अनुभव दिला. परंतु इथेही पर्ल बकला चिनी जनजीवन जवळून अनुभवायला मिळालं होतं हे विसरून चालणार नाही. देशमुखांची कादंबरी याच जातकुळीतील असली तरी ती देशमुखांनी अफगाणिस्तानात प्रत्यक्ष न जाता लिहिली आहे, हे लक्षात घ्यायला हवं. जो भौगोलिक प्रदेश आपण पाहिलेला नाही; जो समाज, संस्कृती आपण जवळून अनुभवलेली नाही अशा प्रदेशावर आणि समाजावर कादंबरी लिहून तिथल्या समाजाचं रसरशीत चित्र वाचकांपुढे उभे करायचं, त्या समाजाच्या वेदनांचा जिवंत अनुभव वाचकांना द्यायचा, तिथल्या राजकीय स्थित्यंतरांचा अधिकारवाणीने वेध घेत त्याचं विश्लेषण करायचं. यासारखं आव्हान दुसरं असू शकत नाही आणि देशमुखांनी ते अत्यंत समर्थपणे पेललं आहे हे मान्यच करायला हवं.
 लेखकाच्या प्रतिभेची झेप आणि धाडस यांचा हा वेगळा पैलू मात्र अनपेक्षितपणे माझ्यासमोर आला. कादंबरीची पहिली दोन एकशे पानं मी वाचली आणि ध्यानीमनी नसताना खुद्द लेखकाची भेट झाली. स्वाभाविकपणे मी त्यांना विचारलं, “आपल्याला अफगाणिस्थानात किती काळ वास्तव्य करण्याची संधी मिळाली?" यावर देशमुख हसून उतरले, "छे हो! मी अजून अफगाणिस्तानाला गेलोच नाहीये. अनेक अडचणींमुळे ते शक्य झालं नाही.” हा मात्र मला धक्काच होता. कारण तोपर्यंत मी मनानं अफगाणिस्तानात पोहोचलो होतो. 'एका बाजूला चमकदार निळ्या रंगाचं आकाश तर दुसऱ्या बाजूला चकचकीत सोनेरी पिवळं ऊन. पांढऱ्या शुभ्र बर्फाच्या सोनेरी-रुपेरी शाली पांघरलेले निळे-जांभळे डोंगर. चहूबाजूंनी वर्तुळ केलेल्या प्रशस्त दरीमध्ये काबूल व त्याच्या आसपासचा परिसर. पगमान हे त्यातलं एक गाव.....' अशा वर्णनांतून अफगाणी निसर्गसौंदर्याचा अभिजात नमुना असलेलं 'काबूल' आणि एखाद्या पर्शियन काव्याची दाद देणारं, 'पगमान' यांची अनुभूती घेत होतो. खानदानी मुस्लीम घरातील रस्मोरिवाज, सुसंस्कृत वागण्यातील नजाकत आणि ताणे-बाणे अनुभवत होतो. हा सारा माहोल, अफगाणी निसर्ग आणि माणसं खूप जवळून अनुभवलेला कोणी निर्माण करू शकतो असं शब्दगणिक वाटत असतानाच स्वत: लेखकानंच मला हा धक्का दिला, हे सत्य कळूनही मन ते नाकारत गेलं आणि मी तितक्याच झपाटल्यासारखी पुढची सातशे पानं संपवली. प्रत्यक्ष अनुभूती न घेता वाचकाला वेगळ्याच विश्वात नेण्यासाठी लेखकाकडे अपूर्व प्रतिभा आणि अपरंपार कष्ट वेचण्याची तयारी लागते. देशमुख या दोनही

कसोट्यांवर पुरेपूर उतरले आहेत. या ठिकाणी डेबोरा एलीस या कॅनडातील ख्यातनाम लेखिकेने लिहिलेल्या 'द ब्रेडविनर' या कादंबरीचा उल्लेखही अपरिहार्य आहे. अर्थात ही कथा आहे ‘परवाना' नामक एका अफगाण मुलीच्या अतुलनीय धाडसाची, तालिबानी राजवटीचा अमानुष चेहरा उघडा करणारी, युद्धात बेचिराख होणाऱ्या शहरांची, होरपळणाऱ्या स्त्रिया, मुले आणि माणसांची. 'द ब्रेडविनर' आणि 'इन्किलाब' दोनही कादंबऱ्यांत स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांचे, राखेतून हाडे शोधणाऱ्या माणसांचे आणि रक्तमांसाचे, चिखलातही शिल्लक राहिलेल्या माणुसकीचे अनुभव देणारे सारखेच प्रसंग आहेत. परंतु डेबोरा यांनी अफगाण निर्वासितांत दीर्घकाळ काम केलं होतं, या सर्वाचा थरारक अनुभव जवळून घेतला होता, हे लक्षात घ्यायला हवं.
 देशमुखांनी अफगाणिस्तानला प्रत्यक्ष भेट दिलेली नाही हे कळल्यावर एक प्रश्न मात्र माझ्या मनाला सारखा सतावू लागला की मग अफगाणिस्तानच का? प्रत्यक्ष अफगाणिस्तानात वास्तव्य करण्याची संधी मिळालेल्या साहित्यिकाला तिथल्या पाश्र्वभूमीवर लेखन करावंसं वाटणं हे स्वाभाविक ठरलं असतं. देशमुखांच्या एवढ्या प्रदीर्घ लेखनप्रपंचाची प्रेरणा काय असावी? कारण ही कादंबरी म्हणजे नुसत्या मानवी नातेसंबंधांची कहाणी नाही, वा एखादी प्रेमकथा नाही, किंवा नुसती सामाजिक वा राजकीय कथा नाही. ही कादंबरी म्हणजे अफगाणिस्तानच्या गेल्या अर्धशतकाच्या धगधगत्या राजकीय वाटचालीची, दोन राजकीय विचार-प्रणालींच्या रक्तरंजित संघर्षाची आणि यात भरडल्या गेलेल्या अफगाणी अवामची कहाणी आहे. जागतिक महासत्तांच्या शीतयुद्धात निघृणपणे एखाद्या प्याद्याप्रमाणे बळी गेलेल्या एका अभागी देशाची ही कहाणी आहे. या साऱ्याला पाश्चात्त्य संस्कृती आणि इस्लाम यांच्यातील सॅम्युएल हंटिंग्टनच्या 'संस्कृती संघर्षाच्या सिद्धान्ताची ही पार्श्वभूमी आहे आणि त्याचबरोबर धार्मिक मूलतत्त्ववाद आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या उगमाचा मागोवा घेण्याचाही हा एक प्रयत्न आहे. या साऱ्या संदर्भाचा संबंध आपल्या देशात धर्माच्या जोरावर राजकीय सत्ता बळकावण्याच्या प्रयत्न करण्याऱ्या 'भगव्या तालिबान्यांशी'ही आहे आणि म्हणूनच 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' ही कोण्या एका देशाची कहाणी न राहाता एक जगतिक संदर्भ बनून येते.
 ही संपूर्ण कादंबरी ऐतिहासिक सत्य अणि कल्पनाविलास यांचं बेमिसाल मिश्रण आहे. अफगाणिस्तानच्या इतिहासातील अनेक वास्तव व्यक्तिरेखांच्या बरोबर अनेक काल्पनिक व्यक्तिरेखाही कांदबरीमध्ये इतक्या सहजपणे आणि कथानकाचा अविभाज्य भाग बनून वावरतात की वास्तवापासून कल्पना वेगळी करणे जाणकारालाही
अशक्य वाटावं. यातील ऐतिहासिक व्यक्तिरेखा त्यांच्या राजकीय वाटचालीला आणि तत्त्वज्ञानाला न्याय देऊन रेखाटणं हे एक आव्हानच हातं. १९१९ साली इंग्रजांविरुद्ध लढून अफगाणिस्तानला स्वातंत्र्य मिळवून देणारा आणि पुरोगामी विचारांची किंमत मोजून १९२९ नंतर इटलीत निर्वासिताचं जीवन जगणारा अमीर अमानुल्ला आणि राणी सोरय्या, १९३३ पासून अफगाणिस्तानचा असलेला बादशहा जहीरशहा, त्याला रक्तहीन क्रांतीत पदच्युत करून १९७३ मध्ये राष्ट्राध्यक्ष झालेला राजांचा पंतप्रधान व चुलतभाऊ जनरल दाऊदखान, १९७८ मध्ये जनरल दाऊदखानला हटवून 'सौरक्रांती' यशस्वी करणारा जनरल अब्दुल कादीर आणि त्यानंतर आलेल्या कम्युनिस्ट राजवटीत राष्ट्राध्यक्ष होणारा, समाजवादी राजवटीची स्वप्ने पाहणारा नेता व प्रतिभावंत लेखक तराकी; १९७९ मध्ये तराकीला मारून राष्ट्राध्यक्ष होणारा अतिमहत्त्वाकांक्षी प्रा. अमीन, त्यानंतर थोड्याच दिवसांत सौरक्रांतीशी प्रतारणा करणाऱ्या अमीनला रशियाच्या मदतीनं पदच्युत करून राष्ट्राध्यक्ष झालेला, मार्क्सवादी पक्षाचा मूळचा आधारस्तंभ आणि १९८६ मध्ये डॉ. नजीबुल्लाकडे सत्ता सोपवून विजनवासात जाणारा करमाल, कम्युनिस्ट राजवटीचा अंत करून मुजाहिदीनांच्या काळात राष्ट्राध्यक्ष झालेला प्रा. रब्बानी आणि शेवटी तालिबानचा सर्वोच्च नेता मुल्ला उमर. अशा अनेक ऐतिहासिक व्यक्तिरेखा लेखकाने समर्थपणे रेखाटल्या आहेत. राष्ट्रप्रेम, राजकीय तत्त्वज्ञानावरची निष्ठा आणि व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा या तीनही गोष्टी सत्तेच्या उलथापालथीत कमी अधिक भूमिका कशी बजावतात आणि आपली राजकीय महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी राजकीय नेते किती निघृण वागू शकतात याचं स्तंभित करणारं दर्शन यात घडतं. त्याचबरोबर धार्मिक मूलतत्त्ववादी जेव्हा राजकीय सत्ताकांक्षेने पछाडतात, तेव्हा तर ते किती हिंस्र आणि क्रूर बनतात, सर्व मानवी नीतिमूल्ये कशी पायदळी तुडवतात याचंही भीषण दर्शन घडतं. या सर्व राजकीय सत्ता - आकांक्षांमध्ये रशिया आणि अमेरिकेसारख्या महासत्तांचे स्वार्थ मिसळतात तेव्हा तर राजनीती अमानवी चेहराच धारण करते. परक्या महासत्तांच्या आधाराने होणाऱ्या सत्ताबदलात सर्वसामान्य जनतेच्या इच्छा-आकांक्षांचं प्रतिबिंब कधीच उमटत नाही. आणि देशातील आम जनतेला अशा राजवटी परक्याच वाटत राहतात, हे एक कटू ऐतिहासिक वास्तव या व्यक्तिरेखांच्या अनुषंगानं आपल्यापुढे येतं. ही सर्व वास्तवं आपल्या देशापुढे वाढून ठेवलेल्या भविष्यातील धोक्यांची पूर्वसूचनाच देत आहेत, असंही वाटून जातं.
 प्रत्यक्षात इन्किलाबचा साक्षीदार आणि मार्क्सवादाच्या मानवी चेहऱ्यावर अढळ श्रद्धा ठेवणारा अन्वर पगमनी आणि जिहादचा तात्त्विक पाया रचणारा, पण इस्लामधील मानवी मूल्यंवर गाढ श्रद्धा ठेवणारा प्रकांड पंडित करीमुल्ला या दोन

काल्पनिक व्यक्तिरेखांच्या अक्षांभोवती ही कादंबरी खऱ्या अर्थानं फिरत राहते. या दोन काल्पनिक व्यक्तिरेखांच्याभोवती त्यांच्या कुटुंबाचा भाग बनून इतरही अनेक व्यक्तिरेखा येतात. या सर्वच काल्पनिक व्यक्तिरेखांचा ऐतबार लेखकानं प्रस्तावनेत केलेला असूनही कादंबरीच्या प्रवाहाचा त्या एक अविभाज्य भाग बनतात आणि वाचकालाही गुंगवून टाकतात. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्क्सवाद आणि इस्लाम या दोन्हीची अन्वर आणि करीमुल्ला यांच्या व्यक्तिरेखांच्या आधाराने लेखकाने केलेली परखड चिकित्सा, इस्लामची चर्चा हा यातील सर्वात नाजूक भाग. देशमुखांनी कादंबरीतील विविध व्यक्तींमध्ये घडणाऱ्या संवादरूपाने ती अशा पद्धतीनं केली आहे, की इस्लामच्या जाणकारालाही तिची दखल घ्यावीशी वाटावी; आणि सर्वसामान्य वाचकालाही खिळवून ठेवणारी वाटावी. कोणत्याही तत्त्वज्ञानाचं टोक हे तीक्ष्णच असतं. ते माणसाला अतिरेकाकडे नेतं आणि शेवटी माणसाचंच रक्त मागतं! आणि म्हणूनच कादंबरीच्या शेवटी करीमुल्ला अन्वरला म्हणतात, “तुझा इन्किलाब आणि आमचा जिहाद यांच्या मधला मार्ग...... उदारमतवादी इस्लामी लोकशही.... हाच खरा मार्ग.... त्यासाठी नव्यानं लढायला तयार झालं पाहिजे... तरच मादरे वतनमें चैन अमन येईल.....
  या कादंबरीचं आणखी एक बलस्थान म्हणजे त्यातील स्त्रियांच्या व्यक्तिरेखा. यातील डॉ. अनाहिता ही वास्तव तर सलमा, जमिला या काल्पनिक. या सर्वच स्त्रिया अत्यंत बद्धिमान, स्वतंत्र आधुनिक विचारांच्या, इस्लामची गुलामी झुगारणाऱ्या आणि त्याचबरोबर आपल्या मातृभूमीवर प्रेम करीत, समर्थ राजकीय नेतृत्व करणाऱ्या; वेळप्रसंगी बलिदानास सज्ज असलेल्या आहेत. त्यांच्या आयुष्यात आलेल्या पुरुषांच्या बरोबरीने त्या 'कॉग्रेड' च्या भूमिकेत वावरतात. त्याचबरोबर भावनिक नात्यांसाठी नैतिकतेची रूढ बंधनंही झुगारतात आणि वेळप्रसंगी वास्तवाला कठोरपणे सामोरे जाऊन त्याचे परिणामही भोगतात. यातील जमिला ही तर प्रतिभावंत कवयित्री, जी पुढे कम्युनिस्ट राजवटीत केन्द्रीय मंत्रिपदापर्यंत पोहोचते, तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर झाकीर धार्मिक अतिरेक्यांकडे ओढला गेल्यानं पुरोगामी जमिला त्याचा त्याग करते. पण तालिबानी राजवटीत जमिलावर बलात्कार करूनही तिच्यावर पुरेसा सूड उगवला गेला नाही असं वाटून ईर्षेनं तिच्याविरुद्ध व्यभिचारांचा खोटा बनाव झाकीर रचतो आणि मौलवींतर्फे जमिलाला जाहीरपणे दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा देववितो. धर्माचा पवित्र झेंडा खांद्यावर घेणारे धर्माच्या नावाखाली सैतान कसे बनतात याचा 'झाकीर' हा प्रतीकात्मक नमुनाच! मानवी इतिहासात सर्व धर्मांच्या कडव्या अनुयायांनी ही सैतानी वृत्ती दाखवली आहे. जमिला मात्र निर्भयपणे शिक्षेला सामोरं जाते. इतकेच नाही तर जमावाला, “आधुनिक तालमीत तयार झालेली माझ्यासारखी

स्त्री मृत्यूला किती बेडरपणे सामोरी जाते, हे इथे शेवटपर्यंत पाहा.' असं ऐकवून मृत्यूला कवटाळते.
 या अफगाणी स्त्रियांबरोबर लेखकानं रेखाटलेली अन्वरची रशियन पत्नी तान्या उर्फ तराना ही एक विलोभनीय व्यक्तिरेखा, अन्वराच्या प्रेमात आकंठ बुडून अफगाणिस्तानला मातृभूमी आणि इस्लामला आपला धर्म म्हणून स्वीकारणारी, तान्याची झालेली ही तराना! कादंबरीच्या शेवटी तिने आपल्याशी केलेला प्रेमविवाह हा के. जी. बी. या रशियन गुप्तहेर संघटनेचा आदेश होता हे सत्य उघड झाल्यानं अन्वर कोलमडतो आणि अन्वरबरोवरील वैवाहिक वाटचालीत खरोखरच त्याच्यावर अलोट प्रेम करायला लागलेली तान्या त्याच्यावरील निष्ठा सिद्ध करण्यासाठी मरण कवटाळते. अशा एक ना अनेक व्यक्तिरेखांच्या आयुष्याच्या अनुषंगाने देशमुखांनी या कादंबरीत मानवी नातेसंबंधांच्या गुंत्यांचे गहिरे रंग भरले आहेत.
 तान्याच्या व्यक्तिरेखेतून सत्तेच्या खेळात मानवी नाती ही आपल्या मर्जीनुसार बेतून त्यांना कळसूत्री बाहुल्या बनवण्याचा प्रयत्न जागतिक महासत्ता कसा करतात, हेही आपल्यापुढे येतं. तरुणपणातील अमेरिकेच्या वास्तव्यात एका धनाढ्य व्यक्तीमुळे गामवलेली अमेरिकन प्रेयसी प्रा. अमीनना परत मिळवून देण्यासाठी त्या व्यक्तीच्या खुनाचा सी. आय. ए. ने. रचलेला बनाव हा भाचाच एक पुरावा. महासत्तांच्या मदतीनं मिळवलेल्या सत्तेला आणि ती मिळवणाऱ्या सत्ताधीशाला जनमानसाच्या हृदयांत स्थान मिळत नाहीच; परंतु सत्ता टिकवण्यासाठी आणि महासत्तांचे राजकीय, आर्थिक स्वार्थ साध्य करण्यासाठी आपल्याच जनतेवर अत्याचार करून असंतोषाचा आवाज चिरडण्याची वेळ येते, हे सत्य यातून लक्षात घ्यायला हवं. त्याचबरोबर अशी सत्ता उलथवल्याशिवाय जनता राहात नाही, हेही विसरून चालणार नाही. परंतु अशा वेळेला जनताही तितकीच क्रूर बनू शकते. कादंबरीत सक्तीनं प्रौढ साक्षरता वर्ग चालवणाऱ्या आणि अफगाणी स्त्री-पुरुषांना तुच्छतेनं वागवणाऱ्या रशियन शिक्षिकेवर पुरुषांनी केलेला सामूहिक बलात्कार, तिच्या नवऱ्याची केलेली खांडोळी आणि या बलात्काराला आपल्या नवऱ्यांना प्रोत्साहन देत शेवटी स्त्रियांनी तलवारींनी केलेली तिची हत्या हा प्रसंगच अंगावर शहारे आणणारा आहे. उन्मत्तपणे सत्ता गाजविणाऱ्यांबद्दलचा सूड घेताना जनता पाशवी उन्मादानं कशी बेहोष होते हेच यातून दिसतं. इथेच महात्मा गांधीची प्रकर्षाने आठवण झाल्याशिवाय राहात नाही. पाशवी उन्मादांच्या आहारी न जाता, माणसातील माणूसपण टिकवून जनता परकीय सत्ता उलथवून टाकू शकते हा विश्वास त्यांनी जगाला दिला, ज्याचा विसर जगाला आणि दुर्दैवानं आपल्यालाही आज पडला आहे.
 अशा अनेक राजनीतिक सत्त्यांसाठी 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' चा संदर्भ

आज आपल्या देशासाठीही महत्त्वाचा ठरतो. मानवी इतिहासात धर्माची निर्मिती हा माणसच्या वैचारिक उत्क्रांतीचा एक टप्पा होता. धर्मानं विषमतेविरुद्ध कधी दंड थोपटले नाहीत. धर्म नाकारून समतेचा आग्रह धरणारा मार्क्सवाद हा वैचारिक उत्क्रांतीचा पुढचा क्रांतिकारक टप्पा होता. परंतु समतेचं गीत गाणारा मार्क्सवाद अतिरेकी साम्यवाद आणि हुकूमशाहीच्या वाटेवर जाऊन विरोधकांना चिरडण्याची भाषा करायला लागल्यावर लोकांना पुन्हा धर्माचा आश्रय घ्यावासा वाटू शकतो. परंतु धर्माधिष्ठित राजसत्ता आणि ती राबवणारे अशा हुकूमशहांपेक्षाही अधिक क्रूर ठरतात हेही इतिहासानं दाखवून दिलं आहे. आपल्या देशातही नरेंद्र मोदीनं घडवलेला नरसंहार आणि तोगडियांची बेलगाम भाषा याचीच आठवण करून देतात. प्रश्न अफगाणिस्तानच्या ह्या फरफटीतून आपण आत्मपरीक्षण करून काही शिकणार आहोत की नाही, एवढाच आहे आणि यासाठी लोकशाही आणि समतेवर विश्वास असणाऱ्या आणि नसणाऱ्यांनीही 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' आवर्जून वाचायला हवं.

'इन्किलाब विरुद्ध जिहाद'ची कथनव्यवस्था


दत्ता घोलप

 लक्ष्मीकांत देशमुख यांची 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' (२००४) ही एका वेगळ्या विषयावरची कादंबरी आहे. या कादंबरीत एका विशिष्ट भूप्रदेशातील निश्चित काळातील समाजस्थिती आणि समाजाच्या विविध स्तरावरील अंत:-संबंध या अनुषंगाने येणारे सत्यशोधन या संबंधाने आशयाचा विचार येतो. अफगाणिस्तानातील जवळ जवळ पन्नास वर्षांच्या राजकीय स्थित्यंतराला कवेत घेत हा आशय आकाराला आला आहे. हा आशय विविध सामाजिक स्तरांना, मानवी संबंधातील जगण्याच्या पातळ्यांना स्पर्शत जातो. अफगाणिस्तानातील हे जीवनदर्शन सामाजिक सांस्कृतिक परिप्रेक्षात घडविले असून यामागील आंतरराष्ट्रीय राजकारणाची पार्श्वभूमीही उलगडून दाखविली आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण, धर्मकारण, दहशतवाद आणि त्याचा परक्या भूमीवरील उच्छाद हे मराठी कादंबरीच्या इतिहासात हे प्रथमच आलेले आहे. हा सबंध अवकाश उभा करताना वापरलेली कथनव्यवस्था, स्वीकारलेला रूपबंध महत्त्वपूर्ण आहे.
 कादंबरी विस्तृत अवकाशात घडत, विकास पावत असते. अनेक केंद्र आशयांची सजगतेने मांडणी करताना लेखक कथनाच्या विविध पद्धतींचा तारतम्याने उपयोग करत असतो. कादंबरी कथनरूपाचा अन्वयार्थ लावताना हे वेगळेपण विचारात घ्यावे लागते. “आधुनिक काळातील कादंबरीकडून वास्तवचित्रणाची अपेक्षा असते. कादंबरीत वाचकांना खरेखुरे वाटावे असे एक जग उभे केलेले असते. वास्तव हे अनेक पदरी, अनेक केंद्री असते. स्थळ - काल - घटिते यांच्या साहाय्याने कादंबरीकार वास्तवाची रचना करतो. बाह्य जगातील व्यक्तींशी, स्थळांशी, घटितांशी साधर्म्य हा वास्तवाविषयीचा एक दृष्टिकोन आहे. मन आणि विचार असलेल्या विविध व्यक्तींची समजात गुंतागुंत असते. कादंबरीकार केवळ घटनांचे चित्रण करीत नसतो, तर त्या घटनांमध्ये सामील असलेल्या व्यक्तींच्या मनांचीही

क्रिया - प्रतिक्रिया, उलाघाल व्यक्त करतो. कादंबरीकार स्वत:शी वास्तवाचे आकलन करून घेतो, त्याचा अर्थ लावतो, आणि मग त्याचे चित्रण करतो हे चित्रण करताना कथनाच्या निवेदनाच्या कोणत्या पद्धती वापरायच्या हेही ठरवतो. (वसंत डहाके : मराठीतील कथनरूपे पृ. १२७) हे ठरविणे कादंबरीच्या बाबतीत महत्त्वाचे असते. या निवेदनाच्या कृतीतून हा सगळा व्यवहार अभिव्यक्त होत असतो. कादंबरीतील कथानक घटना आणि पात्र कथनातूनच आविष्कृत होतात. त्यांच्या अवतरण्याचे महत्त्वाचे सूत्र हे कादंबरीतील कथनतंत्रामध्ये असते. कादंबरीतील जग कथनातून वाचकापुढे येते. म्हणजे या कथनातून कादंबरीतील कथा आकार घेते. 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' या बृहतकादंबरी संरचनेच्या आशयाचा आविष्कार करताना लक्ष्मीकांत देशमुख यांनी कथाबाह्य (तृतीय पुरुषी) कथन पद्धतीचा वापर प्रामुख्याने केला आहे. समूहजीवनाची वाटचाल व्यापक पटावर चित्रित करताना कथनासाठी हा कथाबाह्य निवेदक उपयुक्त ठरतो.
 कथाबाह्य निवेदन असणाऱ्या या कादंबरीत कथांतर्गत निवेदनाचाही वापर होतो. लक्ष्मीकांत देशमुख यांनी कथाबाह्य निवेदनाबरोबरच कथांतर्गत निवेदनाच्या शक्यता वापरल्या आहेत. या दोन्ही पद्धतींच्या सीमारेषा धूसर करून पात्राचा भोवताल आणि त्याची भावस्थिती प्रभावीपणे व्यक्त केली आहे. कादंबरीची सुरुवात, “कितीतरी वेळ अन्वर दोन्ही हातांच्या तळव्यांच्या उशीवर डोकं ठेवून अस्तास जाणाऱ्या फिकुटलेल्या चंद्रकोरीकडे पाहात स्वस्थ पडून होता. अंगावर अम्मीनं स्वत:च्या हातानं विणलेली उबदार मखमली रजई होती. त्यामुळे पहाटेच्या थंडावा सुखदायी वाटत होता. पगमानला आलं की, उन्हाळ्याच्या दिवसांत घराच्या समोरील अंगणात देवदार, पाईन व चिनारच्या झाडांनी सावल्या धरलेल्या मोकळ्या जागेत नवारीचा लाकडी पलंग टाकून झोपायची त्याची जुनी सवय.” (पृ. ०१) या पद्धतीने होते. तेथे कथाबाह्य निवेदन आणि कथांतर्गत निवेदन यांची सरमिसळ दिसते. निवेदक अन्वरविषयी सांगतो. पगमानची त्याची जुनी झोपायची सवय सांगतो. तसेच ‘पहाटेचा थंडावा सुखदायी होता.' हे अन्वरचे वाटणेही निवदेकच सांगतो. तृतीयपुरुषी निवेदनात आत्मनिवेदनाची वैशिष्ट्यं सहजपणे येतात.
 कथाबाह्य निवेदनाबरोबरच कथांतर्गत निवेदनाच्या शक्यता वापरल्या आहेत या दोन्ही कथनपद्धतींचा आशयाच्या गरजेतून उपयोग होतो. समाजवास्तवाची तपशिलात मांडणी करताना कथाबाह्य निवेदनाच उपयोग केला आहे उदा. “अचानक विद्यार्थ्यातून पोलिसांच्या दिशेनं एक दगड येतो, पोलिस काठ्या सज्ज करीत पुढे होतात. समूहाची सुरू झालेली रेटारेटी. पुन्हा काही दगड. दोन पोलिसांची डोकी फुटून रक्ताची वाहू लागलेली धार, लाल झालेले चेहरे, पोलीस इन्पेक्टरचा हुकूम ‘अॅटॅक'. पोलिसांनी

सुरू केलेला लाठीहल्ला. घाबरलेल्या विद्यार्थ्यांची सुरू झालेली पळापळ.. चेंगराचेंगरी, पोलिसांचा वाढता उन्माद..... अचानक एका मागोमाग दोन तीन गावठी हात बॉम्बचा स्फोट. काही विद्यार्थी व दोन पोलिसांचे त्यामुळे जखमी होऊन कोसळणं... बेभानं जमावाकडून त्यांची होणारी तुडवातुडवी... फागरचा आदेश ... गोष्टीबार आसंमतात उमटलेल्या करुण किंकाळ्या ‘या अल्ला'. पाहता पाहता विद्यार्थीवर्ग विखुरला जाणं.... आणि पार्लमेंट हाऊससमोर चार मृत विद्यार्थी, त्यात एक मुलगी आणि शंभर दीडशे घायाळ, जखमी विद्यार्थी...' (पृ. ७५) या घटनाप्रसंगातील बारीकसारीक तपशील दिले आहेत. त्यामुळे स्थळकालासहित घटनाप्रसंग उभा राहतो. कथाबाह्य निवेदक सर्वसाक्षीत्वाने घटना दाखवत असल्याने वाचकांसमोर प्रसंग घडतो आहे असे वाटते तर कधी हाच निवेदक पात्रांच्या मनोविश्वातही प्रवेश करून त्यांच्या अंतर्मनाचे तळकोपरे प्रकाशमान करतो.
 “रात्रभर अन्वरला झोप आली नाही. टीचभर इवल्याशा हृदयात आनंदाच्या व भावी अफगाणिस्तानच्या आदर्श समाजवादी स्थितीबद्दलच्या स्वप्नांच्या कल्पनांची कारंजी भुईभुई नाचत होती. त्यामुळे डोळ्यांतील झोप कुठे गेली होती कुणास ठाऊक, पण ताण नव्हता. पर्वाही नव्हती.” (पृ. ७७) येथे कथाबाह्य निवेदक कथांतर्गत निवेदकाच्या शक्यता वापरताना दिसतो. तेही सहजतेने येते. कथनाच्या दोन्ही पद्धतींच्या शक्यता आजमावत कथा आशय जोरकसपणे अभिव्यक्त करण्याकडे लेखकाचे कौशल्य दिसते. या कथन पद्धतीच्या सर्व शक्यता अजमावत कथाविश्वाकडे व्यापक परिप्रेक्षातून पाहतो. व्यक्तिरेखा आणि घटनाप्रसंग निर्मितीमध्ये निवेदकाच्या व्यापक दृष्टी प्राप्त होते. या आपल्या सामर्थ्यांचा उपयोग करत कादंबरीचा आशय सामाजिक वास्तवाला व्यापक पटावर चित्रित केला जातो. समूह जीवनाच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय घटना घडामोडींना या कथपद्धतींमधून समग्रतेने कवेत घेण्यात येते.
 कथाबाह्य आणि कथांतर्गत कथन पद्धतीच्या सजग वापरातून साकार होणाऱ्या या कादंबरीत संवाद व चर्चा व कथनरूपाचाही उपयोग मोठ्या प्रमाणावर केला आहे पात्रांच्यामधील गुंतागुंतीचे संबंध या चर्चात्मक रूपातून साकार होतात. सामाजिक, राजकीय, धार्मिक, दहशतीच्या पातळीवरील कादंबरीगत वास्तव उभे राहते. कादंबरीत समाजवास्तवाचा तळठाव, तत्त्वशोधन करण्यास या चर्चांचा उपयोग होतो. पात्रांमधील चर्चामुळे आशयाभिव्यक्तीला अनेक परिमाणे प्राप्त होतात. पात्रांच्या क्रिया-प्रतिक्रिया यातून दुसऱ्या प्रदेशातील अनुभवविश्व उलगडण्यास या संवादांचा उपयोग होतो. एकाच घटनेकडे अनेक संभाव्य कोनातून बघणे लेखकाला शक्य होते. “पण सर, पाकिस्तान चूप बसेल? त्यांच्या भूमीवर लाखो

अफगाण निर्वासित आहेत, तोवर त्यांचा इथला रस कमी होणं शक्य नाही. त्यांच्या देशकारणाचा पायाच मुळी इस्लाम. आपल्या देशात कम्युनिस्ट विचारधारा मजबूत होणं त्यांना परवडणारं नाही. त्या भीतीपोटी झिया जिहादी भूत जिवंत ठेवायचा प्रयत्न करणारच. तसंच सौदी अरेबिया, गल्फ आणि इस्लामी खोमेनीचा इराणही मुजाहिदीनाना मदत करीत राहणार. रूसी सेनेविना आपण त्यांचा मुकाबला करू शकू?"
 "त्याचं ब्लॅक अँड व्हाईट असं साफ उत्तर आजच्या घडीला माझ्याजवळ नाहीय.” स्वच्छ कबुली देत नजीब म्हणाला होता, “पण प्रत्येक अनुकूल संधीचा लाभ उठवीत आपली सौर क्रांती मजबूत करणं व मुजाहिदींचा तात्त्विक पाया किती पोकळ आहे, हे अवामला पटवून देणं या दुहेरी नीतीनं काम केलं पाहिजे. त्याचवेळी युद्धभूमीवर मुजाहिदीनांना परास्त केलं पाहिजे.... पुढील वर्ष-सहा महिने निर्णायक आहेत. अन्वर, आपण दोन वर्ष टिकाव धरू शकलो तर जिंकलो. फक्त हा काळ कठीण परीक्षेचा आहे." त्यात तुम्ही जरूर उत्तीर्ण व्हाल सर.” अन्वर मनापासून म्हणाला होता, “वीर धैर्यशील पुरुषाला नेहमी यश मिळतं.' (पृ. ३३५, ३३६) या पद्धतीने कादंबरीभर चर्चा येतात. बहुतांश आशय पात्रांच्या संवादातूनच अभिव्यक्त होतो. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय संदर्भात घडणाऱ्या घडामोडींचे, व्यक्तीच्या संदर्भातील मनोव्यापाराचे दर्शन या संवादातून घडते. अफगाणिस्तानातील धार्मिक कट्टरतावाद, मार्क्सवादी जाणिवा, स्त्रियांचे असाहाय्य जगणे यासंबंधीच्या मुस्लीम जगतातील समूहदर्शन, त्याचबरोबर त्याला असणारे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे दाब या चर्चातून साकार होतात. आशय व्यापक स्तरावर पोहचतो; परस्परविरोधी आवाज यात मिसळले जातात. त्यामुळे ही कादंबरी अनेक आवाजी होते. पात्रांच्या संवादलेखनाचा आणखी एक विशेष नोंदवता येईल की, पात्रांच्या बोलण्यातून त्याचे मनोविश्व, वैचारिकता जशी कळते त्याच पद्धतीने प्रसंगही या बोलण्यातूनच उभा केला जातो. घटना आणि तिचे कथन एकाच काळात येते हे याच संवादाचे वैशिष्ट्य आहे.
 यथोचित वर्णन हा आणखी विशेष या कादंबरीच्या कथनव्यवस्थेच्या बाबतीत नोंदवता येईल. घटना, प्रसंग, निसर्ग वर्णन किंवा व्यक्तिरेखा संदर्भाने येणाऱ्या वर्णनाने या कथनाला प्रत्ययकारिता प्राप्त होते. “पाना-फुलांवर व गुराढोरांवर प्रेम करणारा, त्यांची निगा राखणारा, त्यांना जपणारा सईद शेतात राबणाऱ्या कुळांसाठी मात्र अस्सल जमीनदार होता. तो रोज सकाळी नाष्टा करून जमीनदारीच्या गावांची आळीपाळीनं पाहणी करायला निघायचा. एक एक शेत, पीक व फळबाग काळजीपूर्वक निरखायचा. पाच हजार जिदाब जमिनीवर अनेक शेतमजूर कुटुंबं कामाला असायची.

त्यांच्या कामाची माहिती घेणं, कामचुकारांना अस्खलित शिव्या हासडणं, प्रसंगी चाबकानं फोडून काढणं, क्वचित कामावरून काढणं, गावातून हाकलून लावणं.... असं त्याचं दुपारपर्यंत काम चालायचं. खांद्यावर रुळणारा चामड्याचा चाबूक, पायात काबूलच्या कोना बाजारातून आणलेले युरोपियन गमबूट, लष्करी धाटणीचा व शेता-मळ्यांतून हिंडण्यासाठी उपयुक्त असलेला तंग सुरवार व बंडीचा पोशाख, कमरेला आवळलेला पट्टा, भरघोस गलमिशा असा त्याचा रुबाब पाहिला की कुळांच्या छातीत धडकी भरायची.” (पृ. ०६) या वर्णनात सईदचा दिनक्रम आला आहे. यातून त्याचा वर्तनव्यवहार तसेच स्वभाव-विशेषही येतात. व्यक्तीच्या स्वभाववर्णनानंतर त्याच्या बाह्य व्यक्तिमत्त्वाचे वर्णन येते. या वर्णनात अनावश्यक तपशील कुठेही येत नाही. अतिशय सामान्य प्रसंग चित्रित करून जीवनदर्शन अर्थपूर्ण बनविले आहे. त्यामुळे या वर्णनपरतेला आशयाभिव्यक्तीचे परिमाण प्राप्त होते.
 कथन, संवाद तसेच वर्णनातून घटनाप्रसंग निवेदित करताना भाष्यं येतात. ही भाष्यं मुस्लीम धर्माच्या आणि मार्क्सवादाच्या पोथीनिष्ठतेच्या संबंधाने येतात. ही भाष्यं लेखकाच्या वैचारिकतेची, त्याने केलेल्या चिंतनाची साक्ष देतात. या संपूर्ण समाजाचे कादंबरीगत समाजवास्तवाचे आतून दर्शन होते. यासाठी कादंबरी संरचनेत कथनाच्या विविधांगी शक्यता वापरल्या आहेत. फोनवरील संवाद, किंवा वेगवेगळ्या माध्यमातील 'बातमी'चाही वापर मोठ्या कौशल्याने केला आहे त्यामुळे दोन स्थळकाळ एकदम जोडले जाऊन आशय प्रवाही होतो. हे सर्व कथन आशयभिव्यक्तीच्या मागणीतून होते. विविध दिशांनी फाकत जाणारा आशय या कथनातून साकार होतो. व्यापक परिप्रेक्षातनू साकारणारे आशयदृष्य या कथनव्यवस्थेने तोलून धरले आहे.

भ्रष्ट व्यवस्थेचे शोकात्म दर्शन

प्रा. अजित साळुखे

मराठी साहित्यातील मोजक्याच पण निवडक विषयांवर ताकदीच्या कादंबऱ्या लिहून स्वत:चे स्थान मिळवणाऱ्या लेखकांमध्ये लक्ष्मीकांत देशमुख यांचे स्थान अग्रणी आहे. विशेषत: मराठी साहित्यिकांच्या वेगाने गमावत चाललेल्या सामाजिक जाणिवांच्या पार्श्वभूमीवर विद्यमान समाजातील उग्र असलेल्या सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे, त्यातील समकालीन दाहक प्रश्न मुखर करण्याचे महत्त्वाचे कार्य लक्ष्मीकांत देशमुख यांच्याकडून होत आहे. त्यातूनही ठळकपणे समोर येणारी बाब म्हणजे भारतीय प्रशासन सेवेत सनदी अधिकारी म्हणून काम करताना स्वत:ची संवेदनशीलता व विवेक जागृत ठेवून अभ्यासपूर्ण पद्धतीने तरीही बोजड न वाटता विविध समस्यांचा वेध घेणारे लेखन देशमुख करीत आहेत.
 या पार्श्वभूमीवर या दशकाच्या पूर्वार्धात देशमुखांच्या 'भ्रष्टाचार' या विषयावर लिहिलेली लघु - कादंबरी 'ऑक्टोपस' चे विश्लेषण करणे ही मराठी साहित्यातील अनिवार्य गोष्ट ठरते. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर भारतीय समाजात अलीकडच्या काळात मोठे रणकंदन उभे राहिलेले असताना व राजकीय सत्ताबदलापर्यंत या एका मुद्द्यावर भारतीय जनमानसाचा प्रवास झालेला असताना ही कादंबरी महत्त्वाची ठरते.
 कादंबरीचा नायक आहे जिल्हाधिकारी पदावर काम करीत असलेला मध्यमवयीन व आदर्शवादी आनंद पाटील. त्याच्या जोडीला दुसरा समांतर नायक आहे आनंद पाटील यांचा आदर्शवाद हे सर्वोच्च मूल्य मानून उभा राहिलेला तलाठी भगवान काकडे. कादंबरीत भ्रष्टाचाराच्या अजस्र ऑक्टोपसच्या विळख्याशी लढताना हे दोन्ही नायक विविध स्तरांवर अपयशी होत जातात व अखेरीस वैफल्यग्रस्त होऊन व्यवस्थेला शरण जातात किंवा पलायतवादी भूमिका स्वीकारतात. तसेच दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आलेला तलाठी भगवान काकडे याचा मुलगा आनंद

काकडे, जो वडिलांच्या Love - hate Relationship मध्ये सापडलेला असतो, जो संघाचे कथित आदर्शवादी विचार बाळगून मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन नंतर गरिबांच्या सेवेचे स्वप्न पाहात असतो, त्याच्या अध:पतनाची, स्वप्नभंगाची दुर्दैवी कहाणी देशमुखांनी अत्यंत तरलपणे साकारलेली आहे.
 आनंद पाटील हा ध्येयवादी व मध्यमवर्गीय तरुण सुरुवातीस प्रांताधिकारी म्हणून हजर होतो व पदावरील नवीन अधिकारी असतानाच लाखांचा भाविक जमाव व मूठभर पोलिस यांच्यातील बाचाबाचीतून उद्भवलेल्या दंगलीचा अत्यंत संवेदशील व जबबादार पद्धतीने गोळीबार होऊ न देता लाखोंचा जमाव नियंत्रणात आणतो व त्या दिवसापासून त्याची कीर्ती वाढू लागते. त्याच भागात तलाठी असलेला भगवान काकडे हा आदर्श तलाठी म्हणून नावारूपास येतो व दोघांचे स्नेहसंबंध जुळतात. भगवान काकडे हा ध्येयवादी साहेब आनंद पाटील यांचंच नाव स्वत:च्या मुलाला ठेवतो.
 सामाजिक वनीकरणामध्ये, कुटुंबकल्याण योजना व अल्पबचत या क्षेत्रांमध्ये पुढाकार घेऊन भरीव कामगिरी करणारा भगवान काकडे हा एक आदर्श व स्वच्छ तलाठी म्हणून काम करत असतो. परंतु एक दिवस लाचलुचपत प्रतिबंधक खात्यातर्फे भगवान काकडेला फेरपाराच्या नोंदीसाठी चारशे रुपयांची लाच घेताना अटक होते. आनंदला या गोष्टीचा धक्का बघतो. भगवान काकडे पुन:पुन्हा विनवून सांगतो की मी कुठलीच लाच घेतली नाही व हा केवळ एक सापळा आहे. तरीही तहसीलदार पाध्येच्या रिपोर्टवर पूर्ण विश्वास ठेवून आनंद स्वत:ची आदर्श प्रतिमा जपण्यासाठी काकडेला निलंबित करतो. एम. ए. मराठी झालेला, वाचनाचे वेड असलेल्या काकडेला खितपत पडावे लागते. त्याची भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असलेली बायको भागीरथी, काकडेला सोडून टग्या पुढारी खंदाडेची रखेल म्हणून राहू लागते. भगवान काकडेचा मुलगा आंदू हा काकडेचा विलक्षण द्वेष करू लागतो. काकडेची केस ही खोटी असते व त्याच्या दुर्दशेला आपण कारणीभूत झालो ही अपराध भावना कलेक्टर आनंद पाटीलला छळत राहते. दुसऱ्या बाजूला काकडे व्यसनाच्या आहारी जातो. बायको सोडून गेलेली, मुलगा द्वेष करणारा अशा स्थितीत काकडेच्या गावातली जुनी मैत्रीण रुक्मी हे पात्र त्याला दिलासा देण्यासाठी अवतरते. दैववशात् रुक्मीचे भरपूर धिंडवडे निघालेले असतात व ती वेश्या बनलेली असते. भगवान काकडेला रुक्मी मानसिक आधार देते, इतकेच नव्हे तर काकडेच्या मुलाला आईसमान वागणूक देते. भगवान काकडेच्या जीवनातील उलथापालथ आणि जिवापाड प्रेम असलेला त्याचा मेरिटमधला मुलगा आंदू तसेच रुक्मी ही पात्रे अत्यंत ठसठशीतपणे डोळ्यांपुढे उभी राहतात.

 आदर्श कलेक्टर आनंद पाटील व व्यवहारी' पोलीस अधीक्षक मराठे यांच्यामध्ये कॉलेजकन्येचा पोलिस स्टेशनमध्ये विनयभंग करणाऱ्या पोलिस निरीक्षक गायतोंडेची केस उभी राहते. मुलीला खरोखरीच विनयभंग व मारहाण करणाऱ्या गायतोंडेच्या पाठीशी मराठे उभे राहतात, कारण तो त्यांचाच 'माणूस' असतो. शिवाय गायतोंडेचे मंत्रीपातळीवर संबंध असतात. भ्रष्टाचाराच्या साखळीच्या जोरावर जिल्ह्याचा प्रमुख एक पोलीस निरीक्षकामुळे हतबल होतो. स्वच्छ असलेल्या भगवानला निलंबित करणारा आनंद पाटील खरोखर भ्रष्टाचारात लडबलेल्या अधिकाऱ्यांवर काहीही कारवाई करू शकत नाही. तो म्हणतो “ 'भ्रष्टाचार' हा परमेश्वराप्रमाणे शासनात सर्वत्र पसरलेला आहे. आपण फक्त आपल्याच प्रामाणिकतेचा हवाला देऊ शकतो. इतरांवर आपल्या सच्च्या वर्तनानं थोडंफार नियंत्रण ठेवू शकतो इतकंच. मात्र हा भ्रष्टाचार उखडून टाकणं सर्वस्वी अशक्य आहे."
 अशाप्रकारे मूळ आदर्शवादी असलेला आनंद पाटील काळाच्या ओघात भ्रष्टाचाराच्या - ऑक्टोपसच्या वर्चस्वाला मान्यता देऊ लागतो. अपराध बोच व भ्रष्टाचाराची अपरिहार्यता यांच्या कोंडीत सापडलेल्या आनंद पाटीलची व्यक्तिरेखा लेखकाने ताकदीने उभी केलेली आहे. प्रत्यक्ष पैशांच्याद्वारे भ्रष्टाचार न करणारा आनंद उत्तरकाळात पालक मंत्र्याच्या मेहुण्याने गिळलेली शासकीय जमीन नियमित करण्यासाठी व स्वत:च्या मुलांची शैक्षणिक कारकिर्द बिघडू नये म्हणून बदली टाळण्यासाठी भ्रष्टाचाराला पाठिंबा देतो व कादंबरीतील समांतर नायक • आता मंडलनिरीक्षक असलेला - भगवान काकडे याचा बळी देतो! आनंद पाटीलची भ्रष्टाचाराच्या अक्राळविक्राळ ऑक्टोपस समोर सुरू झालेली ही अंतिम घसरण असते!
 गिरदावर म्हणून पुनर्स्थापित झालेला भगवान काकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांची रात्रंदिवस सरबराई करणे, त्यांना सर्व प्रकारच्या दारू, मटण, तमाशा, बाया इ. सुविधा पुरवणे याला विटून स्वत:ची बदली करून घेतो व पुनश्च आदर्शवादाची वाटचल सुरू करतो. जो आदर्श होता त्याचे अध:पतन व जो पूर्ण वाया गेलेला होता त्याचे ऊन्नयन लेखकाने उत्कटपणे मांडलेले आहे. परंतु आता कादंबरीतील पुढची पिढी या नाट्यात अवतरते. आनंद पाटीलचा मुलगा करण, भगवान तलाठीचा मुलगा आनंद व पोलीस अधीक्षक मराठे यांची मुलगी निशा एकाच वर्गात शिकत असतात. बुद्धिमान असलेला आनंद काकडे जिल्ह्यात सर्वप्रथम येतो, निशा तिसरी येते व करण पाचवा येतो. वडिलांप्रमाणे करण आय. ए. एस. परीक्षेसाठी कला शाखेत प्रवेश घेतो तर आनंद व निशा मेडिकलला जाण्यासाठी सायन्सला प्रवेश घेतात.

 बिनधास्त व फटाकडी आणि सुंदर असलेली निशा व तारुण्याच्या उंबरठ्यावरील आनंद यांना एकत्र शिकता शिकता आलेल्या जवळीकीतून जबरदस्त आकर्षण निर्माण होतो. या कोवळ्या प्रेमसंबंधाचे चित्रण लेखकाने अत्यंत भावस्पर्शी व तरलपणे केलेले आहे. मेडिकलचे स्वप्न पाहाणारा आनंद निशाच्या रोजच्या भेटीगाठीतून अभ्यासातून हद्दपार होत जातो. तर निशाला पोलीस अधिकारी असलेले वडील कुठेही डोनेशन देऊन मेडिकलला प्रवेश घेऊन देतील, हे माहीत असते व त्यामुळे ती बिनधास्त असते.
 बारावीच्या परीक्षेचे निकाल धक्कादायक लागतात व प्रेमात गुरफटलेले दोघेही जीव कसेतरी पास होतात व मेडिकलचे स्वप्न धुळीला मिळते. निकाल लागल्यानंतर आनंद व निशा यांची चर्चा आदर्शवादला तिलांजली देऊन भ्रष्टाचारी व्यवस्थेचा उघड उघड स्वीकार करण्याकडे जाते. सध्याच्या तरुण पिढीची भाषा लेखक निशाच्या तोंडून व्यक्त करतो. “तू आदर्शवादी आहेस, नैतिकता मानतोस. पण आनंद, आज जगात या दोन्ही गोष्टी आऊटडेटेड झाल्या आहेत. ज्याला तू व तुझे पप्पा आदर्श मानत होतात, त्या कलेक्टरांचे पायही मातीचे निघाले. तुझ्या पप्पांनीही कलेक्टरांप्रमाणे व्यवहार पाहून तडजोड स्वीकारली असती तर ते इथंच राहिले असते व तेही मालामाल झाले असते. आदर्शाना आजच्या जगात स्थान नाही.' भ्रष्ट व्यवस्थेने घेतलेला हा अखेरचा बळी म्हणजे पुढची पिढी. व्यवहारी जगात टिकण्यासाठी 'वाटेल ते' करण्याची तयारी व कुठलेही बंधन झुगारून देण्याची इच्छा यातून आनंद काकडे त्याच्या आदर्शवादी पित्याचे, भगवान काकडेचे, मतपरिवर्तन करतो. एकेकाळी करप्ट म्हणून बापाचा द्वेष करणारा आनंद आता पुन: सदाचाराची वाट चोखाळलेल्या बापाला निशाबद्दलचे आकर्षण व खाजगी कॉलेजमध्ये मेडिकलला प्रवेश घेणे यासाठी भ्रष्टाचारी बनण्यास स्वत:च प्रवृत्त करतो ही शोकांतिका कादंबरीत विलक्षण पद्धतीने समोर येते. तर भ्रष्ट व्यवस्थेतून सर्व प्रकारच्या अपराध भावनेने निराश झालेला कलेक्टर आनंद पाटील राजीनामा देऊन बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी पत्करतो!
 अशा प्रकारे ओघवत्या भाषेत विद्यमान समाजव्यवस्थेतील आंतरिक हितसंबंधांचे जाळे, शासन व प्रशासनातील बारकावे, मानवी भावभावनांचे हेलकावे हे तरल पद्धतीने मांडत लेखक लक्ष्मीकांत देशमुख वाचकाला आपल्या सोबत घेऊन जातात. विचार करायला, अंतर्मुख व्हायला भाग पाडतात. या घडामोडी जरी एका उस्मानाबाद जिल्ह्यातील दाखवल्या असल्या तरी त्या संपूर्ण भारतीय वास्तवाचेच चित्रण करतात. समकालीन लिहिणे हे सर्वात अवघड काम असते, मात्र लेखक त्यात कमालीचा यशस्वी झालेला आहे.

तशा अर्थाने ही कादंबरी म्हणता येणार नाही, कारण तिचा पट विस्तीर्ण आहे व त्यानुसार लेखकाने अजून परिश्रम घेतले असते तर याहीपेक्षा उत्कृष्ट व तपशिलांचा वेध घेणारी कादंबरी देशमुखांसारख्या प्रतिभावंत लेखकाला शक्य झाली असती. कादंबरीतील मित्रा, करण व रुक्मीसहित इतर स्त्री प्रतिमांच्या मानसिक आंदोलने व प्रकटीकरण याला अधिक वाव देणे अपेक्षित होते. आनंद पाटील व भगवान काकडे या दोघांची द्वंद्वात्मक अशी ही कादंबरी असून गोविंद निहलांनी यांच्या गाजलेल्या 'अर्धसत्य' या चित्रपटाची आठवण करून देते. आजच्या काळातील महसुली व्यवस्थेच्या चक्रातील आरे म्हणून काम करणाऱ्यांसमोरील आव्हाने, मोह व असाहाय्यता यांचे अंगावर येणारे चित्रण करणारी, आशा-निराशेच्या गर्तेत हिंदकाळे घ्यायला लावणारी आणि अखेरीस शोकांतिकेचे दर्शन झाल्यामुळे सुन्न करणारी ही महत्त्वाची समकालीन कादंबरी आहे.

हरवलेलं बालपण कादंबरीचे वेगळेपण

अविनाश सप्रे

('डॉकु - नॉवेल' स्वरुपाची वाचकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी कादंबरी)
 लक्ष्मीकांत देशमुख यांच्या 'हरवलेलं बालपण' या कादंबरीतमध्ये 'बालमजुरी' (चाईल्ड लेबर) या समस्येचा मूलगामी वेध घेण्यात आला आहे. बालमजुरी करावी लागलेल्या मुलांच्या सर्वांगीण शोषणाचे अस्वस्थ करणारे दर्शन त्यामध्ये आहे. बालकामगारांचे दीनवाणेपण, अस्वस्थपण, गरीबपण, निराधारपण, हतबलता असाह्यता संबंध कादंबरीभर सावलीसारखे पसरून राहिले आहे. तशी लहानमुलं आपल्या अवतीभवती काही काही प्रकारचे काम करताना आपण बघत असतो (आणि त्याकडे दुर्लक्षही करीत असतो) पण बालमजुरी ही एक समस्या आहे, एवढंच नव्हे तर, एक गंभीर समस्या आहे आणि ती सर्वत्र आहे याचे भान ही कादंबरी सुजाण आणि संवेदनशील वाचकाला घडवते.
 श्री. लक्ष्मीकांत देशमुख एक उच्चपदस्थ अधिकारी म्हणून शासकीय सेवेत कार्यरत राहिले. व्यवस्थेत राहूनही कल्याणकारी परिवर्तन करण्यासाठी अखंडपणे, आणि प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहिले. आपल्या कार्यकाळात नानाविध प्रकारचे जे बरेवाईट अनुभव त्यांना आले, ते त्यांच्यातल्या सर्जनशील दृष्टीने टिपले आणि अक्षरबद्ध केले. त्यातून त्यांच्या साहित्यसंपदेला अधिकृतता प्राप्त झाली. अनुभवांना कल्पकतेने कल्पितामध्ये (फिक्शनमध्ये) रूपांतरित केल्यामुळे त्यांना वाचनीयता प्राप्त आली; आणि "What we thought but never expresse so well" (पोप) असे त्यांना स्वरूप प्राप्त झाले. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या इतर कथा । कादंबऱ्याप्रमाणेच 'हरवलेले बालपण' या अलीकडेच प्रकाशित झालेल्या कादंबरीतूनही याचा प्रत्यय येतो.
 श्री. देशमुख यांची लेखक म्हणून असलेली कथनपद्धती तशी पारंपरिक

आहे, पण आशय आणि विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन 'आधुनिक' आहे, मानवतावादी आहे आणि मुख्य म्हणजे आशावादी आहे. जगण्यातही 'व्यस्तता' आणि 'अर्थशून्यता' जाणवली तरी One has to create and live amidst the desert (अल्बेर कामू) अशी त्यांची भूमिका आहे. आणि आशयद्रव्य वास्तववादी आहे.
 चित्रपटामध्ये 'डाक्यूफिल्म' नावाचा एक प्रकार आहे. डाक्युमेंटरी आणि 'चित्रपटा'ला अंगभूत असणाऱ्या आवश्यक घटकांच्या 'मेळातून' फ्युजनमधून अशी फिल्म तयार केली जाते. (उदाहरणार्थ, अमोल पालेकर यांचा र. धो. कर्वे यांच्या जीवनावरचा 'ध्यासपर्व' किंवा डॉ. जब्बार पटेल यांचा यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावरचा चित्रपट) कादंबरी हा अत्यंत लवचीक आणि खुला वाङ्मय प्रकार असल्यामुळे तिच्यामध्येही 'डाक्यु नॉव्हेल' असा प्रकार निर्माण होऊ शकतो असे देशमुखांच्या प्रस्तुत 'हरवलेले बालपण' या कादंबरीचे आविष्काररूप लक्षात घेता म्हणता येते. वास्तवाचे कल्पित कथेत रूपांतर करताना श्री. देशमुख यांनी बाळमजुरीला प्रतिबंध करणारे जो कायदे शासनाने केले आहेत, ज्या योजना केल्या आहेत, ज्या प्रकारचे उपक्रम प्रायोजित केले आहेत, शासकीय यंत्रणांना जे आदेश दिले आहेत. त्यांचा थेट उल्लेख केला आहे; त्यातून काय साध्य करायचे आहे, अपेक्षित आहे, याची चर्चा केली आहे; शासकीय यंत्रणेचे स्वरूप विशद केले आहे. या संदर्भात सर्वसाधारणपणे शासकीय नोकरशाहीचे स्वरूप आणि वर्तन कसे असे असते तेही निवेदनाच्या ओघात सांगितले आहे. आणि या साऱ्या समवेत कल्पितरूपातले पात्र - प्रसंग - घटना - घडामोडी इ. चे चित्रणही केले आहे. चित्रपटात ज्याप्रमाणे लाँगशॉट्स, क्लोजशॉट्स, झूम्स, व्यक्तिदर्शन, समूहचित्रण, इ. चा वापर केलेला असतो, त्याचप्रमाणे 'हरवलेले बालपण' या कादंबरीची रचना केलेली आहे. कादंबरीत कविता आहेत. गाणी आहेत, संवाद आहेत. फ्लॅशबॅक्स आहेत. आणि प्रसंगोपात्त घडामोडींविषयीची थेट भाष्येही आहेत. माहिती देणे, प्रबोधन करणे आणि जाणीव जागृती करणे अशा विविध स्वरूपात हरवलेले बालपण प्रस्तुत करण्यात आली आहे.
 अरुणभैय्या हा या कादंबरीचा नायक आहे (तसा तो लेखकाचा माऊथपीसही आहे) बालमजुरी निर्मूलन आणि बचपन बचाव हे त्याचे जीवितकार्य (मिशन) आहे आणि आपले अवघे आयुष्य पणाला लावून तो हे काम करतो आहे. या क्षेत्राची निवड करण्यामागे त्याच्यासाठी एक खास कारण आहे. लहानपणी तोही बालमजुरी करीत होता. शिवकाशीच्या फटाक्याच्या दुकानात बालमजूर म्हणून काम करीत असताना मोठा स्फोट झाला, पण सुदैवाने तो त्यातून वाचला. बाप हमाली करताना रक्त ओकून मेला आणि आई धोंडीने आधारासाठी काशिनाथशी लग्न

केलं. काशिनाथ दारुडा होता, या सावत्र बापाने अरुणला रॉकेल विक्रीच्या आपल्या गाडीचे काम करायला भाग पाडले, हा रॉकेलचा गाडा 'चौधरी अँड सन्स' शी संबंधित होता. काळाबाजार करून या धंद्यातून भरपूर कमाई केली जात होती. काशिनाथ अरुणला राबराब राबवून घ्यायचा. आईला मारझोड करायचा. अरुणचे बालपण अशा विपरीत परिस्थितीत गेले. अनेक भयंकर प्रसंगांतून त्याला जावे लागले, पण याही परिस्थितीवर मात करून आणि स्वकर्तृत्वाने अरुण मोठा आला. बालमजुरी हे या देशातले एक भयानक वास्तव आहे हे त्याच्या लक्षात आले आणि म्हणूनच याच क्षेत्राच्या उद्धाराचे काम करण्याचा पण त्याने केला आणि तो धडाडीने कामाला लागला. निराधार, निराश्रित बालमजुरी करणाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी त्याने एका महाप्रकल्पाचा संकल्प केला आणि त्याचे नाव 'स्वप्नभूमी' ठेवले. हा संकल्पही त्याने प्रत्यक्षात आणला आणि अनेक बालमजुरांना नवजीवन आणि नवसंजीवन दिले. हे एक असिधारा व्रत होते. अनेक आव्हाने पुन्हा पुन्हा पुढे ठाकत होती. हताश होऊन जावे असे प्रसंग येत होते. पण या साऱ्याला त्याच्यातला दुर्दम्य आशावाद पुरून उरत होता. "अनंत आमुची ध्येया-सक्ती, अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला" या कुसुमाग्रजांच्या कवितेतील ओळींचा साक्षात आविष्कार म्हणजे अरुणभैय्याचे जीवन आणि कार्य होय. एका स्तरावर 'हरवलेले बालपण' ही अरुणच्या उदंड जिद्दीची आणि कर्तृत्वाची रोमहर्षक आणि प्रेरक कहाणी आहे.
 बालमजुरी करणाऱ्यांचे हरपलेले बालपण, करपलेले जीवन आणि सर्वांगीण शोषण पहिल्यांदाच इतक्या सविस्तरपणे आणि प्रभावीपणे मराठी कादंबरीत आले आहे. हे वास्तव संवेदनशील आणि विचारी वाचकांना अत्यंत अस्वस्थ करणारे आहे. कँटीन, हॉटेल, गॅरेज, वीटभट्टी, फटाक्यांचे कारखाने, रॉकेलविक्री, बालवेश्यागृहे, बांधकाम, जरीचे काम, सराफी दुकाने अशा अनेक ठिकाणी ही अमानुष बालमजुरी राजरोसपणे चालू असते आणि अशा ठिकाणी या मुलामुलींचे नुसते आर्थिक शोषणच नव्हे तर लैंगिक शोषणही होत असते. बाल लैंगिकतेचे असे अनेक प्रसंग प्रस्तुत कादंबरीत चित्रित करण्यात आले आहेत. एवढेच नव्हे, तर या बालकांमध्येही लैंगिक विकृती कशी निर्माण होते तेही इथे स्पष्टपणे दाखवले आहे. बच्चू, अस्लम, सुकय्या, खंडू, राजू, कचऱ्या, बबन्या, लुल्ला, टिपू अशा किती तरी बालव्यक्तिरेखा या कादंबरीतून सामोऱ्या येतात, आणि त्यांच्या जगण्यातली परवड दाखवली जाते. ही मुले या व्यवसायात कुठून कुठून आली? का आली? कशी आली? अशा अनेक प्रश्नांचा वेध कादंबरीत घेतला जातो. त्यांचे कुपोषण, त्यांचे विकार, त्यांची वाढ खुंटणे, इ.वरही प्रखर प्रकाशझोत टाकला जातो. डोळ्यावर ताण देणारं आणि बसून-वाकून काम करावं लागत असल्यानं पाठीच्या

कण्यावर विपरीत परिणाम करणारं जरीचं काम करण्यासाठी जहांगीर मालिकनं बिहारहून आणलेल्या शंभर-सव्वाशे बालकामगारांची मुंबईतून सुटका करून अरुण आणि संदीप त्यांच्या मूळगावी रेल्वेने घेऊन जातात तेव्हा तिथलं दारिद्र्य, अज्ञान आणि असाह्यता त्याना दिसून येते, चांद मुखीयासारखे मोठे दलाल, तिथल्या गरीबांना अडचणीच्या वेळी भरमसाठ व्याजाने पैसे देतात आणि त्यांची परतफेड करता न आल्याने त्या गरीबांची मुले ताब्यात घेतात आणि आणि त्यांना जरीकामासाठी मुंबईला आणले जाते, हे त्यांच्या लक्षात येते. त्या मुलांची सुटका केल्याचा आनंद असला तरी गावाकडे कामधंदा नसल्याने ही मुलं काय करणार? मग त्यांच्या कुटुंबीयांना कशी मदत होणार? अशा प्रश्नांनी अरुणच्या अस्वस्थतेत भर पडते. "क्या करेंगे घर जावे साब? यहाँ कमसे कम पेटतो भरता है," हे एका बालकामगाराचे उद्गार त्याच्या मनात उद्विग्नता निर्माण करते. भले, बालमजुरीला प्रतिबंध करणारे कायदे शासनाने केले असोत किंवा अरुण पालीमकर सारखे समाजसेवी ‘स्वप्नभूमी' च्या माध्यमातून अशा बालकामगारांचे पुनर्वसन करण्याचे, त्यांना शिक्षण देण्याचे, त्यांच्या अंगभूत कौशल्यांना विकसित करण्याचे अथक प्रयत्न करीत असोत- मूळ प्रश्न देशातल्या महाकाय दारिद्र्याचा असतो, आणि त्याचबरोबर आपल्या सामाजिक मानसिकतेच्या विकृतीचा असतो. उपभोगवादी 'आहे रे' वर्गातल्यांना त्याबद्दल फिकीर नसते, चिंता नसते. 'हरवलेले बालपण' आपले लक्ष अशा मूलभूत प्रश्नांकडे वेधते, आणि बालमजुरीमध्ये अमानुष प्रकारचे शोषण तर आहेच, पण त्याच्याही पुढे जाऊन ही शोषणप्रक्रिया एकूणच आपल्या समाज आणि संस्कृतीचाच अभिन्न भाग आहे की काय, असे वाटू लागते.
 या अनुषंगाने आर्थिक, राजकीय, सामाजिक, कौटुंबिक आणि शासकीय अशा विविध प्रकारच्या ज्या व्यवस्था कार्यरत असतात आणि त्यातून जे प्रश्न, समस्या निर्माण होतात, त्यांनाही ही कादंबरी स्पर्श करते, आणि त्यांची वर्तमानकालीन स्थिती-गती कशी आहे, त्यांचे स्वरूप कसे आहे हेही लक्षात आणून दिले जाते. राजकारणातल्या हितसंबंधांमुळे दुर्गाभाईसारखे गुंड निर्माण होतात आणि पोसले जातता. त्यांचा मोकाट वावर सोयिस्कररीत्या दुर्लक्षिला जातो, 'दुर्गाभाई एक व्यक्ती नाही, प्रवृत्ती' बनत त्याला शिक्षा करायची म्हटले तरी कायद्यातल्या पळवाटा कामी येतात. अशा लोकांच्या अवैध धंद्यांना राजकारण्यांचा, लोकसेवक म्हणणाऱ्यांचा असलेला पाठिंबा आर्थिक हितसंबंधातून निर्माण झालेला असतो. अशांच्यामुळे कर्तव्यदक्ष आणि कायद्याचं पालन करीत काही कृती करणाऱ्या अधिकाऱ्यांची कशी पंचाईत होते हे या कादंबरीत प्रसंगानुरूप दाखवण्यात आले आहे. शासनाने लोकांच्या कल्याणासाठी कायदे केलेले असतात आणि त्यांची

अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शासकीय यंत्रणेतील सर्व स्तरावरील अधिकाऱ्यांची असते; जिल्हाधिकारी हा जिल्हा स्तरावरील सर्वात प्रमुख अधिकारी असतो. या यंत्रणेतले सर्वच जिल्हाधिकारी सरसकटपणे वाईट असतात, भ्रष्ट असतात असे लेखक दाखवत नाही. याही व्यवस्थेत मनीषसारखे कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी असतात आणि ते कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी दक्षही असतात. पण असे अधिकारी हितसंबंधांच्या आड येत असल्याने त्यांना मोठीच किंमत द्यावी लागते, मनस्ताप सहन करावा लागतो. या उलट, याच यंत्रणेत काम करणारे पांडेसारखे उच्चपदस्थ अधिकारी अंगालाही लागणार नाही, त्रास होणार नाही अशा सोयीस्करपणे आणि ब्युरोक्रॅटिक मानसिकतेने प्रशासन करीत असतात, देशमुखांनी बालमजुरी प्रतिबंध कायद्याच्या अंमलबजावणीच्या संदर्भात नोकरशाहीच्या या दोन प्रवृत्ती मनीष आणि पांडेच्या कार्यपद्धतीच्या रूपाने दाखवल्या आहेत अधिकारपदाकडे बघण्याचे दृष्टिकोनही दोन प्रकारचे असतात. एक - मिळालेल्या पदाचा उपयोग निष्ठेने, निर्भयपणे आणि कर्तव्यबुद्धीने अपेक्षित कार्यासाठी करणे. जिल्हाधिकारी मनीष या दृष्टिकोनाचा अंगीकार करणारा आणि म्हणून Value conscious (मूल्यभान असलेला) आहे आणि दोन - मनीषची पत्नी मीनल अशा उच्चपदाकडे व्यावहारिक दृष्टीने पाहणारी, मूल्यांपेक्षा व्यवहार, यश, महत्त्वाकांक्षा यांना महत्त्व देणारी; त्यासाठी तडजोडी करायला हव्यात, संबंधित माणसांशी जवळीक ठेवायला हवी असे मानणारी आणि म्हणून करीअर कॉन्शस आहे. या दोन भूमिकांमुळे निर्माण होणारा तणाव मनीष आणि मीनलच्या स्वभावातून व्यक्त होत राहतो. 'आदर्शवादाचा जमाना संपला. बी पॅक्टिकल' असे मीनल मनीषला वारंवार सांगता असते आणि मनीष मूल्यासाठी किंमत द्यायला तयार असतो. मनीषला अरुण करीत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल मन:पूर्वक आस्था आहे. त्या कामाचे महत्त्व त्याने जाणले आहे, बालमजुरीच्या विरोधात शासनाने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करणे, त्याला आपल्या कर्तव्यच्या आड येणारे, मग ते कोणीही असोत, त्यांच्या विरोधात कारवाई करण्यास तो कचरत नाही. त्याची किंमत त्याला मोजावी लागते. मनीषची बदली होते. त्याच्या जागी आलेले सिद्धार्थ पांडे विचाराने आणि कृतीने अगदीच वेगळी आणि सोयीस्कर भूमिका घेणारे. जोवर देशात गरिबी आहे, पुरेशा शाळा नाहीत, तोवर बाल कामगार राहणारच हे त्यांचे ठाम मत आहे, त्यामुळे बालमजुरीबद्दल ते गंभीर नाहीत. एवढेच नव्हे, तर आपल्या सहकाऱ्यांकरवी सव्र्हे केल्याचे नाटक करून ते आपल्या जिल्ह्यांत फक्त अकरा बालकामगार आहेत असे पत्रकार परिषदेत जाहीर करतात. शासकीय यंत्रणेत एखादा अधिकारी काही चांगले काम करीत असेल किंवा असे काम करण्याला साहाय्य करीत असेल, आणि त्याची

बदली झाली, तर त्याच्याजागी येणारा नवा अधिकारी हे काम पुढे चालू ठेवेलच असे होत नाही, किंबहुना द्वेषबुद्धीने अशी कामे बंदही करतो आणि त्याचे हुशारीने समर्थनही करीत असतो ही बाब इथे लेखकाने अधोरेखित केली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असणाऱ्या पोलीस यंत्रणेबाबतही असेच म्हणता येते. कायदे आणि नियम कुणाची सोय बघतात आणि कुणाला डावलतात हे या कादंबरीमध्ये अनेक प्रसंगांतून दाखवले आहे. अर्थात, याही क्षेत्रात कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आणि पोलीस अपवादाने का होई ना, असतात आणि आपले काम ते चोखपणे करीत असतात असे प्रदीप कांबळेच्या व्यक्तिरेखेतून लेखक दाखवून देतो.
 अरुणभय्याने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने रेलशाळा, पोलीस शाळा सुरू करणे, बालमजुरी करणाऱ्या मुलांना त्या त्या उद्योगातून सोडवून आणणे, त्यांचे पुनर्वसन करणे, शासकीय आदेशांचा पाठपुरावा करणे, मुलांच्यातल्या अंगभूत कौशल्यांचा विकास करणे, त्यांच्या अभिनव अशा फॅशन शोचे आयोजन करणे, चर्चच्यावतीनं उदारपणे देण्यात आलेल्या इमारतीत आणि मोकळ्या जागेत 'बचपन बचाव ट्रस्ट'च्या वतीनं नर्सरी आणि के. जी. ची शाळा सुरू करणे, कचऱ्याच्या आयुष्यावर फिल्म तयार करून 'जी' पत्रकारांना दाखवून त्याद्वारा या जगाचं भयंकर रूप लोकासमोर आणणे, स्वप्नभूमीच्या मार्फत माया बेबीचा चंदा, मधू अशा एकेकाळच्या अडगळीतल्या वंचित आणि उपेक्षित मुलींच्यामधल्या कौशल्यांचा विकास करून त्यांना रोजगारक्षम बनवणे, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, बालवेश्यांची सोडवणूक करणे अशी कितीतरी विधायक कामे सुरू केलेली असतात. अरुण वंचितांचा आधारवड झालेला असतो. हे सारे तो निरपेक्ष आणि समर्पण वृत्तीने करीत असतो. त्यामागची त्याची भूमिका अल्बेर कामूच्या 'प्लेग' या कादंबरीतल्या नायकाप्रमाणे "What interestme is living and dying for what one loves" अशी असते. (ज्याच्यावर आपले प्रेम आहे, त्यासाठी जगणे आणि मरणे यातच मला रस वाटतो.)
 एखादा दुसरा अरुण पालिमकरसारखा नि:स्वार्थ आणि समर्पण वृत्तीचा कार्यकर्ता आणि 'स्वप्नभूमी' सारख्या संस्थेमुळे बालमजुरीचा जटिल प्रश्न सुटेल असा भाबडेपणा कादंबरीतून व्यक्त होत नाही, पण असे प्रकल्प आणि असे काम ‘पथदर्शी' निश्चित उरू शकते असा सकारात्म दृष्टिकोन ही कादंबरी दाखवते.
 मराठीमध्ये बोधवादी कादंबऱ्यांची एक दीर्घ परंपरा आहे. वि. स. खांडेकरांनी या परंपरेला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, तर साने गुरुजींची 'श्यामची आई' ही कादंबरी या परंपरेतून कळस ठरली. श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांची 'हरवलेले बालपण' ही कादंबरी या परंपरेला पुढे नेणारी आणि वर्तमान वास्तवाबद्दल

वाचकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे.
 ता. क. - 'बचपन बचाव' हे आंदोलन करणाऱ्या समाजसेवक श्री. कैलाश सत्यार्थी याना या वर्षीचा जागतिक कीर्तीचा 'नोबल पुरस्कार' मिळाला आहे. त्यामुळे श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या 'हरवलेले बालपण' मधली बालमजुरी हा विषय आता जागतिक स्तरावर अधोरेखित झाला आहे. एका अर्थाने, श्री देशमुख यांच्या या साहित्यकृतीचा हा सन्मानच आहे असे म्हणता येईल.

सहृदय माणसाला हादरून टाकणारी कलाकृती

प्रा. अजित साळुखे

 भारतीय समाज नव्या आर्थिक परिवर्तनाकडे वेगवान वाटचाल करीत असतानाच आणि ‘सर्वांगीण विकास' व 'समृद्धी' हे मध्यमवर्गाचे स्वप्न साकार होत असताना, त्याच वेळी या संपूर्ण समाजाला भेडसावणारे प्रश्न अकराळ विकराळ स्वरूपात पुढे येत आहेत. समाज म्हणजे केवळ मध्यमवर्ग, उच्च श्रीमंत वर्ग, बडे उद्योगपती, राजकीय नेते, अंडरवर्ल्डमधील दादा, नोकरशहा यांनीच बनत नाही. उलट या सर्वांची शक्ती प्रचंड असली तरी फार मोठा जनसमुदाय परिघावर जगत असतो. गरीब, दारिद्री, अशिक्षित, आदिवासी, शेतमजूर, वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला यांचा प्रत्येक दिवस नव्या जागतिक नफेखोर अर्थव्यवस्थेत नरकतुल्य अवस्थेकडे निघालेला आहे. या नरकातील सर्वात भेसूर बळी आहेत लहान मुले...! सर्व जाती-धर्माच्या अवकाशातील अत्यंत गरीब व वंचित समाजातील मुले व मुली यांना जगभर अत्यंत छळ, दमन, पीडन व लैंगिक अत्याचार यांना तोंड द्यावे लागत आहे.
 मुलांचे प्रश्न, त्यांच्यावर होणारे अत्याचार व त्यांचे पुनर्वसन करण्याचा विडा उचललेले भारतीय सामाजिक कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी यांना नुकतेच शांततेच्या नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले. सत्यार्थी यांच्या नावाची घोषणा झाल्यावर दगडी राज्यकर्ते, वर्तमानपत्री, वाचनावर अवलंबून असलेले मध्यमवर्गीय, बातम्या 'इन्स्टंट' व ‘फास्ट' 'तयार' करण्यात माहीर असलेले पत्रकार हे अचानक गोंधळून गेले. कारण त्यापैकी बहुतेकांना कैलाश सत्यार्थी यांचे काम व त्याचा विस्तार याबद्दल कोणतीच कल्पना नव्हती! सत्यार्थी यांनी मुलांचे आर्थिक, शारीरिक व लैंगिक शोषण तसेच मुलांची तस्करी, वेठबिगारी याविरुद्ध जगभर आवाज उठवलेला आहे व त्याविरुद्ध सक्रिय चळवळ उभी केलेली आहे. एकशेवीस कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात शाळेचा उंबरठा देखील न ओलांडलेली, बालपणापासूनच अनाथावस्थेत भटकणारी,

फूटपाथवर राहून पोट भरणारी, फटाके किंवा विणकाम, जरीकाम या प्रकारच्या कारखान्यांत बालमजूर म्हणून अठरा तास काम करणारी निदान २ कोटी मुले असावीत असा अंदाज आहे. शिवाय असंघटित क्षेत्रातील वीट कामगार, हॉटेल कामगार, सफाई कामगार, ऊस तोडणी कामगार याशिवाय बालवेश्या, बारबाला; सक्तीने भिकारी बनवलेली मुले, चोरीच्या उद्योगात स्मलिंगमध्ये केला जात असणारा बालकांचा वापर यांची अचूक आकडेवारी आजमितीला भारतासारख्या खंडप्राय देशात मिळणे जवळपास अशक्य आहे. त्यातही नवीन ट्रेंडनुसार लहान मुलांना पळवून आणून विविध दहशतवादी गट त्यांना शस्त्र चालवण्याचे व स्फोटके हाताळण्याचे प्रशिक्षण देत आहेत. थोडक्यात, मुलांचा प्रश्न हा केवळ स्थानिक नसून तो जागतिक स्तरांवरचा गंभीर विषय आहे आणि त्याची भीषण उग्रता ही आशियाई देशांत, विशेषत: भारतात, अंगावर येण्याइतकी तीव्र आहे.
 अशा पार्श्वभूमीवर मराठीतील नामवंत लेखक श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांनी लिहिलेल्या 'हरवलेले बालपण' या अत्यंत दर्जेदार व उत्कृष्ट कादंबरीचा विचार करणे व त्यांनी या विषयाला ज्या जबरदस्त पद्धतीने वाचा फोडलेली आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व स्वागत केले पाहिजे.
 शिवकाशी येथील फटाक्यांच्या कारखान्यात काम करीत असताना स्फोटात भाजून निघालेला आणि त्यातून वाचलेला बारा वर्षांचा मुलगा अरुण हा भविष्यात चांगले शिक्षण घेऊन बालमजुरीच्या निर्मूलनाची शपथ घेतो व त्यासाठी स्वयंसेवी चळवळ उभी करतो. दरम्यानच्या काळात अरुण रॉकेलची हातगाडी चालवणे, बूट पॉलिश करणे, गॅरेजकाम करणे ही कामे करीत रस्त्यावरच जगतो व वाढतो. अरुण पालिमकर 'बचपन बचाव' या चळवळीतून पन्नास गावे बालमजुरीमुक्त करतो व त्यानंतरचा पुढचा टप्पा म्हणून बालहक्कांच्या संदर्भात भव्य प्रकल्पाची आखणी करतो. 'स्वप्नभूमी' - हजारो बालकांचं शिक्षण, खेळ, आरोग्य व मनोरंजनाचं स्वप्न पूर्ण करणारी स्वप्नभूमी. या प्रकल्पात त्याच्या मदतीला सक्रिय उभे राहातात फायदर मायकल गायकवाड, गावचे सरपंच लोखंडे आणि शासकीय अधिकारी कलेक्टर मनीष दवे!
 पालकमंत्र्यांच्या जवळचा असलेला रॉकेल माफिया, संघटित भिकारी व्यवसाय चालवणारा व फटाक्यांचे कारखाने बालकांच्या वेठबिगारीवर चालवणारा दुर्गाभाई आणि अरुण पालिमकर यांच्यात सुरू झालेल्या संघर्षातून कादंबरीची सुरुवात होते. फटाक्यांच्या कारकान्यात झालेल्या स्फोटांत सतरा बालमजूर गंभीर जखमी होतात व अरुण पालिमकर कलेक्टर मनीष दवेच्या सहकार्याने दुर्गाभाईला अटक करवतो. मिंधे असलेले पोलीस अधिकारी, दडपणापुढे कच खाणारे नोकरशहा

आणि सोयिस्कर मीडियावाले यांच्यासमोर अरुणला बालकांना न्याय मिळवून देण्यासाठी अखंड संघर्ष करावा लागतो. सुदैवाने त्याला मनीष दवे सारख्या नि:स्पृह व संवेदनशील कलेक्टरची साथ मिळते.
 मनीष दवे एके ठिकाणी म्हणतो, “बालकामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्रिसूत्री आहे बालक केंद्रित शिक्षण, पालक केंद्रित आर्थिक पुनर्वसन आणि मालक केंद्रित दंडशासन - यामधील फक्त पहिल्या मुद्द्यासाठी शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराचा कायदा आला. गरीब व दारिद्री समाजाचे आर्थिक पुनर्वसन करण्याचा विचारही आता राजकीय - आर्थिक व्यवस्थेने मागास ठरवून सोडून दिला आहे. तर मुलांना मजुरीला लावणाऱ्या मालकांना दंड किंवा शिक्षा करण्याऐवजी त्यांच्याकडून हप्तेबाजी करणे व सोईस्कर काणाडोळा करणे, हीच मानसिकता संबंधित अधिकाऱ्यांची दिसून येते. सत्तासोपानाच्या खेळात दुर्गाभाई स्वत:च्या राजकीय हितसंबंधांच्या जोरावर कलेक्टर मनीष दवेची बदली करतो. आणि आता एकट्या पडलेल्या अरुण पालिमकरला व्यवस्थेच्या अकराळ विकराळ हातांशी स्वत:च लढण्याची वेळ येते.
 या कथानकात अरुण दुर्गाभाईला भेटण्यासाठी त्याच्या घरी स्वत:हून जातो व त्याचे मतपरिवर्तन करायचा प्रयत्न करतो- हा प्रसंग हृदयद्रावक पद्धतीने लेखकाने चित्रित केला आहे. लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणारा दुर्गाभाई एडस्ने बाधित झालेला असतो. अरुण त्याच्यासारख्या बाहुबलीलासुद्धा विचार करायला भाग पाडतो. दुर्गाभाई म्हणतो, "भरपूर झोकली, तरी पण टकुऱ्यातून तुझे बोल जात नाहीत. आमच्या धंद्यात परतीची वाट नाही. पुना इथं पॉवर आहे, पैसा आहे, सर्व प्रकारच्या नशेचं सुख आहे. जमेल तेवढं लुटायचं. मग मरून जायचं एडस्नं किंवा हार्ट बंद पडून. काय फरक पडतो? त्यामुळं पुनांदा ठरलंय की, म्या असंच जगणार. यातच मला गोडी आन् सुख हाय. तू माझ्याशी उगी लढू नकोस. तुला मी बर्बाद करीन. पण आज तरी तुला एक डाव माफ केलं....!"
 कादंबरीतील सामाजिक कार्यकर्ता अरुण पालिमकर ही व्यक्तिरेखा लेखकाने अत्यंत ताकदीने उभी केलेली आहे. अरुणचे बालपण, घरातील सावत्र बापाकडून झालेला छळ, घर सोडून निघून जाणे, रस्त्यावरचे जीवन याशिवाय स्वत:च बालकामगार म्हणून व्यवस्थेचा बळी ठरल्यामुळे लढाईमध्ये येणारी आत्यंतिक निष्ठा व उत्कटता यांसह अरुणची मानसिक आंदोलने लेखकाने बिनतोड उभी केलेली आहेत.<br.  रेल्वेस्टेशनवर आश्रयाला आलेल्या मुलांसाठी रेलशाळा सुरू करणारा अरुण वेश्या व्यवसायातून मुलींची सुटका करून त्यांना आधार देणारा अरुण, विद्यमान

व्यवस्थेतील प्रशासनावर दबाव टाकणारा अरुण, तर समाजातील विविध घटकांना आपलेसे करून स्वत:चे नैतिक बळ उभारणारा अरुण. ही व्यक्तिरेखा लेखक अक्षरश: जगलेला आहे. त्यासाठी लागणारा ध्यास व तळमळ ही लेखक देशमुख यांच्या ठायी ओतप्रोत असल्याशिवाय असे चित्रण लिहिणे शक्य नाही, हे नोंदवणे आवश्यक आहे.
 कादंबरीतील शेवटचे कथानक म्हणजे बिहारमधून रोजगार मिळवून देतो म्हणून महाराष्ट्रात जरीकामाच्या कारखान्यात आणून डांबून ठेवलेल्या मुलांची यशस्वी सुटका. रोज सकाळी सहा ते रात्री बारापर्यंत सतत काम करणारी मुले. त्यांना सतत अर्धपोटी ठेवून वर सतत मारहाण केली जात असे. अठरातास काम करताना हात थकायचे, डोळे दुखू लागायचे. वाकून काम केल्याने पाठ दुखायची. सुया टोचून बोटं रक्ताळायची. चुकारपणा झाला तर जेवण मिळायचे नाही. शिवाय भयंकर मारहाण.
 या भीषण जाचातून चांगल्या पोलीस अधिकाऱ्याच्या साहाय्याने अरुण सव्वाशे बालमजुरांची मुक्तता करतो. इतकेच नव्हे तर त्या बालकांना स्वत: घेऊन ट्रेनने बिहारला जातो. परंतु गावात पोहोचल्यावर त्याच्या लक्षात येते की गावातील ज्येष्ठांची मानसिकता बालमजुरीला अनुकूलच असते. गावाचा मुखिया चाँद अरुणला सुनावतो, 'वो काम नहीं करेंगे, तो भूखे मरेंगे! वो सब गरीब है! काम करना उनकी मजबूरी है। आप उनके मुँह का निवाला छीनते हो।"
 प्रत्यक्षात चाँद मुखिया व जमीनदार वर्ग हे मुंबईतल्या कारखानदारांसाठी दलाल म्हणून काम करीत असतात. लग्न, आजारपण, मर्तिक यासाठी गरिबांना व्याजावर पैसे देऊन थकलेल्या कर्जापोटी मुलांना सक्तीने महाराष्ट्रात कामाला पाठवीत असतात. परंतु याही वेळी बिहारमधील कलेक्टर पियूष शर्मा याला अरुणचा राग येतो व या प्रकरणात 'बिहार' बदनाम होत आहे असे त्याला वाटते.
 संपूर्ण कादंबरीचे कथानक सांगणे हा या लेखनाचा उद्देश खचितच नाही. असंख्य संकटे व अडचणी, बदनामीचे आरोप इत्यादीशी अरुण तत्त्वनिष्ठेने लढा अखेरपर्यंत चालूच ठेवतो. वेगवान व घडामोडींनी भरलेल्या या कथानकाचे प्रवाही व संवादपूर्ण सादरीकरण लेखकाने शैलीदार पद्धतीने केलेले आहे. यातील बालकामगार असलेली पात्रे सुबन्या, अफजल, बच्चू, कचऱ्या, लुळ्या इत्यादी मुलेमुली तसेच हिंदू-मुस्लीम दोन्ही समुदायांतील चांगल्या व वाईट व्यक्तींचे चित्रण लेखक पारदर्शी पद्धतीने करतो. कादंबरी जात-धर्म-लिंगभावाच्या पलीकडे घेऊन वाचकाला गुंगवून टाकते, अस्वस्थ करते व समस्येची दाहकता वाचकाच्या हृदयात पेटवत ठेवते.
 कादंबरीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन सामाजिक, राजकीय, परिस्थिती, बाबरी

मशीद पाडल्यानंतर झालेल्या जातीय दंगली, तळागाळातील मुलामुलींची साधी भाषा. हिंदू व मुसलमान यांच्यातील विविध व्यक्ती रेखा काटेकोरपणे कथेत अवतरत राहतात. कधी जुन्या तरी कधी नवीन घटना - अशा प्रकारे वाचकाला गुंतवून ठेवत कादंबरी एखाद्या चित्रपटाप्रमाणे सरकत राहते.
 ही कादंबरी वाचताना पाश्चात्त्य लेखिका 'डेबोरा एलीस' यांनी अफगाण निर्वासित मुलांवर लिहिलेल्या कादंबऱ्यांची आठवण येते. तसेच काही वर्षांपूर्वी 'मीरा नायर' यांनी काढलेला गाजलेला चित्रपट 'सलाम बाँबे'ची सुद्धा आठवण येते. या अव्वल कादंबरीत लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांनी बालकांच्या प्रश्नाला अत्यंत प्रखरतेने वाचा फोडलेली असून या कादंबरीचे मराठी नाट्यरूपांतरसुद्धा भेदक होऊ शकेल. तसेच या कादंबरीची गणना केवळ मराठीच नव्हे तर श्रेष्ठ दर्जाच्या भारतीय साहित्यात करावी लागेल असे मला वाटते. कादंबरीचा इंग्रजी व हिंदी अनुवाद करण्याचा विचार लेखक व प्रकाशकांनी करावा अशी नम्र सूचना आहे. या विषयावर इतकी सखोल विश्लेषण करणारी व तरीही खिळवून टाकणारी ही कदाचित पहिलीच मराठी कादंबरी असावी.
 कादंबरी लिहीत असताना लेखक देशमुख यांच्यातील कवी आपसूक जागा झालेला दिसतो. सरपंच लोखंडे यांच्या तोंडी आलेली ही बालमजुरीबाबतची कविता अत्यंत बोलकी आहे.

"तरटाच्या पडद्याआडून
एक बारा-तेरा वर्षांचा चेहरा डोकावला
तो चेहरा
 वसंतातल्या पहिल्या फुलासारखा ताजा होता
आणि डोळे
पहिल्या प्रेमासारखे निर्मळ
 पण त्याच्या हातावर

 भाज्या कापत राहिल्याच्या चिरा होत्या, आणि त्या चिरांमध्ये भांडी घासण्याची . राख जमलेली होती, त्याचे हात त्याच्या चेहऱ्यापेक्षा वीस वर्षांनी मोठे होते."

भाग ४

लक्ष्मीकांत देशमुख यांच्या प्रशासनपर साहित्याचे विश्व
प्रशासनाचे चित्तवेधक विश्लेषण


डॉ. प्रकाश पवार

 'प्रशासननामा' आणि 'बखर भारतीय प्रशासनाची' अशी दोन पुस्तके लक्ष्मीकांत देशमुखांनी लिहिली आहेत. याखेरीज त्यांनी अन्य पुस्तकेदेखील लिहिली आहेत. इथे वरती नोंदविलेल्या दोन पुस्तकांच्या संदर्भात परिचर्चा केली आहे. विकासलक्षी प्रशासन आणि खाजगी-सार्वजनिक प्रशासन या चौकटीमध्ये प्रशासनांच्या संकल्पनेची चिकित्सा त्यांनी केली आहे.

यक्षप्रश्नाची परिचर्चा

 लक्ष्मीकांत देशमुखांचा प्रशासनविषय दृष्टिकोन विकास प्रशासन आणि नव्वदीच्या दशकानंतर खाजगी-सार्वजनिक प्रशासनाच्या चौकटीमध्ये विकसित झालेला दिसतो. लोकप्रशासन हे शास्त्र असण्याबरोबर ती एक कला आहे, या मुद्द्यांचे सखोल आणि व्यापक आत्मभान त्यांच्या या दोन्ही पुस्तकांमध्ये सुस्पष्टपणे दिसते. कला या शब्दामध्ये व्यवहार कौशल्य हा अर्थ इथे अभिप्रेत आहे. या कलेचा संबंध मानवी व्यवहाराशी येतो. त्यामुळे लोकप्रशासन हे सकारात्मक अर्थाने लोकांच्या इच्छा, अपेक्षा व आकांक्षा यांच्याशी संबंधित आहे. लोकांच्या जीवनाचा स्तर उंचविण्यामध्ये या कलेची भूमिका महत्त्वाची होती, आणि आहे. त्यातून लोकांच्या जीवनात आनंद, सुख आणि समाधान येते (happiness) हा मानवी जीवनाचा मध्यवर्ती आशय आहे. परंतु या गोष्टी प्रशासन करते तेव्हा समाजाचा त्या प्रशासकीय प्रक्रियेला प्रतिसाद सकारात्मक मिळत नाही- हा सर्वात मोठा सामाजिक प्रश्न आहे. त्या प्रश्नाची परिचर्चा लक्ष्मीकांत देशमुखांनी अनुभवजन्य पद्धतीने सुरू केली आहे, हे प्रशासकीय क्षेत्रातील त्यांचे नेत्रदीपक योगदान आहे. लोकांना व्यक्तिगत हित अपेक्षित असते आणि प्रशासनाला सार्वजनिक हित अपेक्षित असते. मथितार्थ, व्यक्तिगत आनंद, सुख, समाधान, संपत्ती, प्रतिष्ठा यांच्या सीमारेषा प्रशासनाला ओलांडाव्या लागतात. प्रशासनाचा अर्थ सार्वजनिक विवेक असा होतो.

त्यामुळे सार्वजनिक दृष्टिकोनातून प्रशासन व्यवहार करत असते. सार्वजनिक व्यवहार हा व्यापक अर्थाने घटनात्मक चौकट आणि स्थानिक अर्थाने कायद्यांच्या चौकटीमध्ये घडतो. त्यामुळे व्यक्तिगत आणि सार्वजनिक हा वादविषय प्रशासनामध्ये कळीचा आणि मध्यवर्ती आहे. लक्ष्मीकांत देशमुखांची प्रशासननामा आणि बखर भारतीय प्रशासनाची अशी दोन पुस्तके व्यक्तिगत आणि सार्वजनिक वादविषयाची सूक्ष्मपणे परिचर्चा करणारी आहेत. भारत सरकारचा पंधरावा अहवाल - दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचा २००९ मध्ये आला आहे. त्या अहवालातील वस्तुस्थिती देखील लक्ष्मीकांत देशमुखांच्या पुस्तकांतील सत्यस्थितीशी मिळतीजुळती आहे. खरे तर प्रशासननामा आणि बखर भारतीय प्रशासनाची ह्या दोन्ही पुस्तकामधील लेखन हा भारत सरकारच्या पंधराव्या अहवालाचा अनुभवनिष्ठ पुरावा ठरतो. मथितार्थ, ही केवळ पुस्तके नाहीत, तर त्या पुस्तकांमध्ये भारतीय समाजाची वस्तुस्थिती सुस्पष्टपणे आली आहे. यामुळे भारतीय समाजाचा व्यवहार या अर्थाने समाजशास्त्र, भारतीय समाजातील व्यक्तीचे मानसशास्त्र, सत्तासंबंध, भारतीय समाजातील विकासाचा प्रयत्न या अर्थाने अर्थशास्त्र- अशा विविध समाजशास्त्राच्या उपशाखांच्या चौकटीमध्ये ही पुस्तके लिहिली आहेत. त्यामुळे या पुस्तकांचे स्वरूप खरे तर अंतरविद्याशाखीय या प्रकारचे आहे. त्यांची लेखनशैली अर्थातच अंतरविद्याशाखीय प्रकारची आहे. त्यांचा वाचक त्यामुळे शैक्षणिक या क्षेत्राच्या खेरीजचा देखील आहे. शैक्षणिक हा शब्दप्रयोग पांडित्यदर्शक (अकादमिक) या अर्थाचा आहे. ही पुस्तके अध्ययनात रुची असलेल्या शैक्षणिक पंडिताना उपयुक्त ठरणारी आहेत याबद्दल दुमत नाही. परंतु या खेरीज ही पुस्तके प्रत्यक्ष लोकप्रशासनाचा व्यवहार करणाऱ्या प्रशासनाला मार्गदर्शक ठरणारी आहेत. त्यामुळे या पुस्तकांचे महत्त्व शैक्षणिक आणि व्यावहारिक अशा दुहेरी स्वरूपाचे आहे.
 लक्ष्मीकांत देशमुखांनी लोकशाही संस्था ही एक संकल्पना आणि दुसरी त्या संस्थामधील प्रत्यक्ष व्यवहार ही संकल्पना- यांची तुलना केली गेली आहे. या चौकटीमध्ये स्पष्टीकरणे त्यांनी दिली आहेत. लोकशाही संस्थांमध्ये सार्वजनिक धोरणनिश्चितीबरोबर सार्वजनिक धोरणाची अंमलबजावणी हा व्यवहार आहे. या व्यवहारांची चिकित्सा देशमुखांनी केली आहे. एव्हाना त्यांनी लोकशाही चौकटीमधील प्रशासन वेस्ट मिन्स्टर प्रारूप म्हणून भारतात आले तरी त्यास भारतीय पद्धतीचा आकार कशा पद्धतीने मिळाला आहे यांची लक्षवेधक चिकित्सा केली आहे. वेस्ट मिन्स्टर प्रारूपाचे भारतीयकरण झाल्याची ही चिकित्सा आहे. वेस्ट मिन्स्टर प्रारूपाचे भारतीयकरण घडण्याची चतुःसूत्री या पुस्तकामध्ये दिसते. एक, प्रशासनाच्या

भारतीयीकरणावर धर्म या घटकांचा खोलवर प्रभाव पडला आहे. हिंदू-मुस्लीम यांच्यातील वादविषय प्रशासनाचे भारतीयीकरण करतात. दोन, प्रशासनाच्या भारतीयकरणाचा दुसरा अर्थ प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय अभिजन यांच्यामधील वाद-विवादाच्या क्षेत्रामध्ये आहे. राज्यघटना किंवा कायदा आणि जनतेचा प्रतिनिधी यांच्यामधील वाद हा मुख्य समस्याप्रधान विषय झाला आहे, या मुद्द्याची सखोल परिचर्चा त्यांनी केली आहे. तीन, राज्यघटना किंवा कायदा विवेकी आहे. कायद्याच्या राज्याचा व्यवहार प्रशासन करते, या अर्थाने प्रशासन विवेकी आहे. यामध्ये अविवेकी घटकांचा हस्तक्षेप वाढतो. म्हणजेच अविवेकीकरण हा घटक प्रशासनाला वेस्ट मिन्स्टर प्रारूपापासून वेगळा करतो. चार, भारतीय रुढीवादी समाजाशी जुळवून घेतो. हे चार प्रशासनाच्या भारतीयीकरणाचे सूत्र म्हणून नोंदविता येईल. त्या संदर्भातील अनेक पुरावे लक्ष्मीकांत देशमुख नोंदवितात.

अभ्यास पद्धती

 लक्ष्मीकांत देशमुखांनी त्यांच्या साहित्यांची वाचनीयता आणि रोचकता वाढविण्यासाठी त्यांनी 'बखर' साहित्यप्रकारामध्ये सादरीकरण केले आहे. या प्रकारामध्ये देखील संशोधन साहित्य हे अभ्यास पद्धतीवर आधारलेले असते, या बाजूकडे लक्ष्मीकांत देशमुखांनी पुरेसे लक्ष दिलेले दिसते. भारतीय प्रशासन व्यवस्था समजून घेणे आणि समजून देण्याची लक्ष्मीकांत देशमुखांची पद्धती मोठी रोचक आहे. प्रत्येक प्रकरणामध्ये त्यांनी स्वतंत्रपणे मुद्दा मांडला आहे. अभ्यासपद्धतीच्या आधारे देशमुख सर्वसामान्यीकरण करतात. म्हणजेच नियमाचे विवेचन करतात. मुद्यांचे नियमांमध्ये रूपांतर करताना त्यांनी प्रत्येक प्रकरणात लेखकांच्या पुस्तकाचा अभ्यासपूर्ण पुरावा सादर केला आहे. एव्हाना सर्वसामान्यीकरण करताना वैचारिक, संकल्पनात्मक आणि अभ्यासपूर्ण पुस्तकाच्या पुराव्यांचे सादरीकरण हीच एक मोठी वैचारिक, घड़ामोड पुस्तकाच्या प्रत्येक पानावर दिसते. त्यामुळे अध्ययन पद्धतीने ज्ञानाचे सादरीकरण, असे त्यांच्या लेखणीचे वैशिष्ट दिसते. भारतीय प्रशासनव्यवस्था विश्लेषणात त्यांनी वैचारिक संकल्पना आणि अभ्यासपूर्ण ग्रंथाच्याखेरीज अनुभवजन्य पुरावे सादर केले आहेत. या पद्धतीने विषयाची मांडणी करताना त्यांनी नोकरशाही व्यवस्थेचे विश्लेषण केलेले आहे. त्यांच्या या पुस्तकांमध्ये नोकरशाही व्यवस्था या अर्थाने मांडलेली संकल्पना आहे. एकमेकांवरती प्रक्रिया करणाऱ्या घटकांचा संच अशी संकल्पना त्यांनी मांडली आहे. त्यांनी नोकरशाहीचे पर्यावरण मांडले आहे.

व्यवस्था आणि पर्यावरण
 नोकरशाहीच्या पर्यावरणाची संकल्पना त्यांनी विश्लेषणात्मक पद्धतीने मांडली आहे. सांस्कृतिक हा घटक प्रशासकीय पर्यावरणाचा एक भाग आहे, अशी देशमुखांची संकल्पना आहे. या भारतीय संस्कृतीची तीन वैशिष्ट्ये प्रशासकीय पर्यावरणाचा भाग म्हणून त्यांनी मांडली आहेत. धर्म, सहिष्णुता, विश्वासात्मकता ही तीन वैशिष्ट्य त्यांनी सांस्कृतिक पर्यावरण म्हणून नोंदविली आहेत. सांस्कृतिक पर्यावरणाचा संबंध त्यांनी सामाजिक पर्यावरणाशी जोडला आहे. म्हणजेच, प्रशासकीय पर्यावरणाचा सामाजिक मुद्दा त्यांनी नोंदविला आहे. जात, जमातवाद, हिंसा, दहशतवाद हे घटक त्यांनी प्रशासनाच्या सामाजिक पर्यावरणाचे मांडले आहेत. याखेरीज त्यांनी राजकीय पर्यावरणाची संकल्पनादेखील मांडली आहे. भारतीय लोकशाहीचे स्वरूप, वाढता राजकीय हस्तक्षेप, वाढता भ्रष्टाचार, शासकीय नोकरशाहीतील आरक्षण हे घटक त्यांनी राजकीय पर्यावरणाचे घटक म्हणून नोंदविले आहेत. तसेच त्यांनी आर्थिक पर्यावरण व प्रशासन यांचा संबंध जोडला आहे. प्रशासनाचे घटनात्मक पर्यावरण ही संकल्पना स्पष्ट केली आहे. भारतीय घटनेचा उद्देश, घटनात्मक पर्यावरणाचे स्वरूप, घटनात्मक स्वरूप, भारतीय राज्यघटनेतील प्रशासकीय मूल्य या गोष्टींचा समावेश त्यांनी घटनात्मक पर्यावरणात केला आहे. थोडक्यात, रॉबर्ट डाल यांनी राजकीय व्यवस्थेची संकल्पना मांडली होती, त्या पद्धतीने देशमुखांनी प्रशासनाच्या व्यवस्थेची संकल्पना मांडली आहे. वर नोंदविलेले पर्यावरण परस्पर संलग्न आहे. तसेच ते परस्परांवर प्रक्रियादेखील करते हा सिद्धान्त मांडला आहे. थोडक्यात- त्यांच्या पुस्तकामधून व्यवस्था विश्लेषणाचा आग्रह दिसून येतो. व्यवस्था विश्लेषण करण्यामुळे त्याचे पुस्तक हे भारतातील एका मोठ्या समस्येला भिडते. प्रशासन ही गोष्ट बदनाम आहे- या गोष्टीचे देखील चित्र त्यांनी उभे केले आहे. प्रशासनाच्या बदनामीचा प्रशासनावर पडलेला बोजा दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. मात्र प्रशासनाच्या बदनामीकरणाची लेखकाने कुठेही री ओढली नाही.
विकासलक्षी प्रशासन
 त्यांनी सरदार पटेल व लालबहादूर शास्त्रींच्या प्रशासनविषयक दृष्टिकोनाचे समर्थन केले आहे. तर याबरोबरच त्यांनी प्रशासन हे ब्रिटिश प्रशासनापेक्षा वेगळे असावे या पंडित नेहरूंच्या मतापेक्षा सरदार पटेलांच्या मताशी सहमती दर्शविली आहे. प्रशासनाने गेल्या ७० वर्षांमध्ये केलेल्या कामगिरीचे समर्थन केलेले आहे. या समर्थनास लेखकाचा विकासवादी दृष्टिकोन कारणीभूत ठरला आहे. विकासलक्षी

प्रशासन हा त्यांच्या दृष्टिकोनाचा मध्यवर्ती भाग आहे. विकासलक्षी प्रशासनाचे त्यांनी सातत्याने समर्थन केले आहे. याचे कारण लेखक हे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात निर्माण झालेल्या विकासलक्षी प्रशासनाचा एक भाग आहेत. त्यांनी मुख्यतः विकसनशील देशांपुढील प्रशासनापुढील आव्हाने व जबाबदाऱ्या यांचे विश्लेषण केले आहे. उपलब्ध साधनसामुग्रीचा हिशोब, सांख्यिकी विश्लेषण, नोकरशाहीवरील खर्च, लोकशिक्षणाची जबाबदारी, सेवा व सुविधांचे समताधिष्ठित वाटप, विकासाची प्राधान्यक्षेत्रे या गोष्टींना प्रमुख स्थान त्यांनी दिले आहे. यामुळे त्याच्या लिखाणात उपलब्ध साधनांचा पुरेपूर वापर, ध्येयनिश्चिती, सामाजिक न्यायाची दृष्टी याचाही अंतर्भाव होतो. त्यांनी निव्वळ तटस्थ प्रशासन निर्माण करण्यापेक्षा मानवतावादी, कार्यक्षम, शिस्तबद्ध प्रशासन निर्माण करण्याचे महत्त्व मांडले आहे. त्यामुळे लेखक हे सरदार पटेलांच्या विचारांचे समर्थन करतात. शिवाय प्रशिक्षण देणारी संख्या ही लोकशाही संख्या आहे. त्या संख्येच्या अपेक्षांचा विस्तार लेखक करतात. म्हणून विकासलक्षी प्रशासन आणि लोकशाही संख्या यांच्यामध्ये सुसूत्रीकरणाचा विचार त्यांनी मांडला आहे. या गोष्टीची दूरदृष्टी लेखकांनी वाचकाना दिली आहे. विकसनशील देशातील प्रशासनाची कार्यकक्षा व्यापक असते याचे लेखकाला आत्मभान आहे. मोठ्या समाजाला सेवा-सुविधा पुरवाव्या लागतात, जनतेशी सतत संबंध आल्याने प्रशासनाचा विस्तार होतो- या गोष्टी लेखकाच्या नजरेमधून अचूकपणे मांडल्या गेल्या आहेत. प्रशासकीय नीतिवाद त्याच्या पुस्तकांमध्ये दिसतो.
 प्रशासनावरील दोन्ही पुस्तकांमध्ये १९५० ते १९९० ते आजपर्यंत असे वर्गीकरण करण्यास जागा उपलब्ध आहे. कारण लेखकाचा मूल्यात्मक दृष्टिकोन १९५० ते १९९० या कालखंडातील विकासलक्षी प्रशासनामधून तयार झाला आहे. त्यामुळे कल्याणकारी राज्याचे समर्थन व त्याच्याबद्दलची बांधिलकी त्याच्या लिखाणात दिसून येते. याबरोबरच विकासाची विचारप्रणाली म्हणून विकासवाद नावाचा विचार स्वीकारतात. याबरोबरच त्यांनी अधुनिकीकरणाचा आग्रह धरलेला दिसून येतो. त्यांच्या आधुनिकीकरणाच्या संकल्पनेला विवेकीकरण हा अर्थ लाभला आहे. कारण लेखक प्रशासनाचा हिशोब मांडतो, मोजमाप करतो त्यावरील नियंत्रणाचादेखील विचार करतो. लेखक प्रशासनाला राजकीय क्षेत्रापासून अलिप्त करतो. तसेच जातिव्यवस्थेपासूनदेखील वेगळे करतो. सार्वत्रिक कायद्यावरती आधारलेली प्रशासन व्यवस्था असण्याचा आग्रह धरला आहे. म्हणजे एका अर्थाने लेखक नोकरशाहीला स्वायत्तता मिळावी. तिने स्वायत्तपणे काम करावे असा सार्वत्रिकीकरणाचा सिद्धान्त मांडतो. यास लेखकांनी भारतीय प्रशासनातील ऐतिहासिक तथ्यांचे पुरावे

जोडले आहेत. याबरोबरच पटेल व शास्त्री यांच्या भूमिकाचे पुरावे दिले आहेत. त्यांच्या लेखनातील हा एक टप्पा आहे.
मूल्यात्मक चौकटीमधील फेरबदल
 लक्ष्मीकांत देशमुखांच्या प्रशासकीय विचारांमध्ये नव्वदीच्या दशकात फेरबदल झाले आहेत. १९९० नंतरच्या बदलानंतर लेखकाची दृष्टी, विचारप्रणाली, मूल्यात्मक चौकट यामध्ये फरक झाला आहे. याची तीन कारणे आहेत. एक, भारतीय प्रशासनाच्या पर्यावरणामधील समस्या पार करण्यासाठी लेखक नव्याने विचार मांडतो आहे. दोन, जागतिक पातळीवरील बदलते प्रशासन, जागतिक अर्थकारण यांचा प्रशासनावर प्रभाव पडलेला दिसतो. तीन, देशांतर्गत आर्थिक सुधारणा कार्यक्रम राबविले गेल्याने त्या फेरबदलांकडे लेखकाने सकारात्मक दृष्टीने पाहिलेले आहे. यामुळे लोकप्रशासनातील सार्वजनिक खाजगी भागीदारी हा विचार लेखकाने स्वीकारल्याचे दिसते. लेखक यामुळे प्रशासनाच्या १९५० ते १९९० पर्यंतच्या काळाचे टीकात्मक मूल्यमापन देखील या पुस्तकात केले गेले आहे. या टीकात्मक मूल्यमापनाचे चार मुद्दे सांगता येतात. १) राजकीय अभिजनांचा प्रशासनामधील हस्तक्षेप, २) सार्वजनिक धोरणानिश्चितीमधील प्रशासनाने केलेल्या योगदानाकडे जे दुर्लक्ष झाले त्यास पुन्हा प्रकाशात आणले आहे. ३) प्रशासनाची वाढती संख्या व प्रशासनावर होणारा खर्च या गोष्टी नोंदविलेल्या आहेत. ४) प्रशासनाने सार्वजनिक धोरण निश्चितीमध्ये निर्भय व स्वतंत्रपणे काम करण्याचा विचार मांडला आहे. थोडक्यात, लेखक काळानुसार बदललेल्या गोष्टींना प्रतिसाद देतात व गतइतिहासाची चिकित्सा करतात. मात्र त्यांना प्रशासन जास्तीत सुशासन व्हावे असे सातत्याने वाटते. कमीत कमी शासन व जास्तीत जास्त सुशासन हा अर्थ त्यांच्या लिखाणातून ध्वनित होतो.
निष्कर्ष  लक्ष्मीकांत देशमुखांनी प्रशासनामधील विविध विषय सहजपणे मांडले आहेत. त्यांनी भारतीय आणि बिगर भारतीय प्रशासनांची तुलना गरजेप्रमाणे केली आहे. पुस्तकामध्ये 'बखर' या साहित्य प्रकाराचा विस्तार केला आहे. या मुद्द्यांच्यावरती वैचारिक क्षेत्रामध्ये लेखकांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे विकास आणि समाधान या दोन वैचारिक गोष्टींची परिचर्चा केली आहे. राजकीय तत्त्वज्ञानामध्येदेखील व्यक्तीचा विकास आणि व्यक्तीचे समाधान या गोष्टीवर भर दिलेला आहे. त्या तत्त्वज्ञानामधील कळीचा प्रश्न देशमुखांनी मांडला आहे. त्यांची भाषाशक्ती सरळ,

सुस्पष्ट, अचूक या प्रकारची आहे. याखेरीज इंग्रजी पुस्तकांतील ज्ञान- व्यवहाराचा त्यांनी सहजपणे वापर केला आहे. यामुळे त्यांचे प्रशासन विषयावरील लेखन हे लोकप्रशासन या विद्याशाखेला केलेले योगदान ठरते. २०१० आणि २०१३ मध्ये सामाजिकशास्त्राचा जागतिक अहवाल प्रकाशित झाला आहे. त्या अहवालामध्ये विभाजित ज्ञान आणि बदलते जागतिक पर्यावरण या दोन मोठ्या समस्यांची नोंद केली गेली आहे. हे दोन्ही मुद्दे लक्ष्मीकांत देशमुखांनी परिचर्चेचा एक भाग म्हणून पुढे आणले आहेत. कारण विभागलेले ज्ञान आणि पर्यावरण या दोन्ही संकल्पना लक्ष्मीकांत देशमुखांनी मांडलेल्या आहेत. या अर्थाने त्यांचे काम भारतीय संदर्भातील असले तरी जागतिक सामाजिकशास्त्राला आणि लोकप्रशासन या विद्याशाखेला योगदान देणारे आहे, असे सामाजिकशास्त्राच्या जागतिक आहवालांशी तुलना करताना दिसते. त्यामुळे त्यांच्या या बखर साहित्यकृतीचे रूपांतरण भारतातील प्रादेशिक भाषांमध्ये आणि इंग्रजी या ज्ञान व्यवहाराच्या भाषेत होण्याची गरज आहे. ही गरज लोकप्रशासनाची आहे. तशीच ती शुद्ध ज्ञानविस्तारांची देखील आहे.

प्रशासननामा

(लोकप्रतिनिधी व प्रशासकिय अधिकाऱ्यांसाठी उद्बोधक चिंतननामा)


प्रभाकर करंदीकर

 'प्रशासननामा' चे लेखक लक्ष्मीकांत देशमुख हे भारतीय प्रशासन सेवेतील माझे सहकारी. आपल्यावर सोपविलेली जबाबदारी कार्यक्षमतेने पार पाडण्याचा आटोकाट प्रयत्न करणारा अधिकारी अशी त्यांची प्रतिमा आहे आणि माझा अनुभवही तसाच आहे. 'इन्किलाब आणि जिहाद' किंवा 'अंधेरी नगरी' या त्यांच्या साहित्यकृतींचे वाचकांनी चांगले स्वागत केले याचे मला विशेष समाधान वाटते. कारण त्यांचे विषय हटके आहेत. अलंकारांची जड वजने पेलण्याचा अट्टाहास न करता, साध्या परंतु ओघवत्या भाषेतील त्यांचे लिखाण थेट वाचकांच्या हृदयास भिडते. ललित साहित्याप्रमाणेच वृत्तपत्रीय स्तंभलेखनही त्यांनी केले आहे, हे मला माहीत नव्हते. 'प्रशासननामा' हे त्यांचे सदर टोपणनावाने त्यांनी चालवले. आता हे सर्व लेख प्रस्तकरूपाने प्रसिद्ध होत आहेत हे त्यांनी मला सांगितल्यावर मी चकित झालो; पण या पुस्तकाची प्रस्तावना मी लिहावी असा स्नेहपूर्ण आग्रह त्यांनी धरला, तेव्हा माझी खऱ्या अर्थाने विकेट पडली! मी यापूर्वी कधीही, कोणत्याही पुस्तकाला प्रस्तावना लिहिलेली नाही. त्यामुळे हे काम माझे नाही अशीच माझी पहिली प्रतिक्रिया होती. तथापि, ‘ह्या पुस्तकाचा विषयच असा आहे की, याची प्रस्तावना प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या व्यक्तीनेच लिहायला हवी' हा आपला मुद्दा त्यांनी नेटाने लावून धरला. त्यामुळे शेवटी नाईलाजाने मला न पेलवणारी ही जबाबदारी मी स्वीकारली आहे.
 ह्या पुस्तकात समाविष्ट होणारे लेख मी एकसंधपणे वाचले, तेव्हा एखाद्या कादंबरीची प्रकरणे आपण वाचत आहोत की काय, असा भास झाला. काही प्रकरणे मी दोन-तीनदा वाचली, इतकी ती सुंदर आहेत. वाचकांनी उत्स्फूर्तपणे नोंदविलेल्या प्रतिक्रिया वाचल्यानंतर मला वाटून गेले की, 'ह्या पुस्तकाला वेगळ्या प्रस्तावनेची गरज नाही. वाचकांच्या प्रतिक्रियाच प्रस्तावना म्हणून छापाव्यात, ते अधिक संयुक्तिक ठरेल.' अर्थात, माझी ही सूचना लेखकाने स्वीकारली नाही, हे वेगळे

सांगायला नको.
 'प्रशासननामा' अर्थातच प्रशासनासंबंधी आहे. विशेषत: प्रशासनाचे ‘कटिंग एज' मानले जाणाऱ्या जिल्हा प्रशासनाचे अनेक पैलू यांत मांडले आहेत. दुर्दैवाने प्रशासनात कित्येक कार्यतत्पर आणि प्रामाणित अधिकारी - कर्मचारी असूनही, एकंदरीत प्रशासनाची प्रतिमा मात्र दिवसेंदिवस खालावत चालली आहे. न्यायव्यवस्थेबाबतही असाच सूर वारंवार ऐकू येतो. एकेकाळी 'पोलादी चौकट' असा लौकिक असणाऱ्या प्रशासनाची आजची अवस्था खरोखरच चिंतनीय झाली आहे. याचे विदारक चित्रण एका कवितेत आहे.

डोळस

एक डोळा.... रिकाम्या खाचीतला
होता कसा, आठवत नाही.
सुटला बिचारा, केव्हाच फुटला!
दुसरा डोळा, सावध मुरलेला
तुम्ही सांगाल, तेवढेच पाहतो
नको म्हणता? प्रश्नच मिटला!
तिसरा डोळा, शेपूट घातलेला
तेल संपलेय, पण पीळ फूलवातीचा
भावली डुचकी, खुशाल बोंबला!

 जिल्हाधिकारी काय, किंवा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काय किंवा महानगरपालिकेचे आयुक्त काय, यांची कर्तव्य आणि जबाबादाऱ्या यांची समावेशक यादी बनवणे कठीण आहे. कारण अनेकविध कामे, नानविध विषय आणि शेकडोवारी शासकीय योजना त्यांचेकडे सोपविलेल्या असतात. त्यातूनही मंत्रालयीन विभाग प्रमुख आणि विभागीय आयुक्त यांचाही एक 'अजेंडा' असतो. कोणत्या कामांना आणि योजनांना विशेष प्राधान्य द्यावयाचे ह्याविषयी त्यांचे काही आग्रह असतात. जिल्ह्यांतले मंत्री, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांचेही काही आग्रह असतात. त्यातूनच भूकंप, पूर किंवा दुष्काळ अशी आपत्ती ओढवली, की सगळे प्राधान्यक्रम बदलणे भाग पडते. या सगळ्या भाऊगर्दीत प्रशासकीय अधिकाऱ्यांची तारांबळ उडते. या उप्पर त्या अधिकाऱ्याच्या वैयक्तिक आवडी-निवडी, रस आणि कल असतात. वेळात वेळ काढून त्या कामांकडे आणि उपक्रमांकडे लक्ष द्यायचे असते. नागरिकांच्याही काही अपेक्षा आणि वेदना असतात. त्यांना अधिकाऱ्यांकडून 'तत्काळ न्याय' हवा असतो. हाताखालच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे

काही प्रश्न लोंबकळत पडलेले असतात. त्यांची सोडवणूक वेळीच झाली नाही तर त्यांचे 'मोराल' ढासळू शकते. त्यांचेकडून सहकार्य मिळवायचे झाले तर निव्वळ अधिकाराचा दंडुका उगारून चालत नाही. त्यांचा विश्वास संपादन करून, त्यांना प्रेरित करून, त्यांच्या मनावर ठसविणे, याकडेही खूपच लक्ष पुरवावे लागते. अशा अनेक आघाड्यांवर एकाच वेळी लढणाऱ्या अधिकाऱ्याला अष्टावधानी असावे लागते, सतत तोल सांभाळावा लागतो. 'वहाडी माणसे' ह्या नाटकात घरंदाज सुनेबाबत एक छान उदाहरण दिले आहे, ते मला आठवते. 'दिवा विझला नाय पायजे आणि तो घेऊन चालणाऱ्या बाईचा पदर पण पेटला नाय पायजे' अशी कसरत त्या सूनबाईंना करावी लागते. प्रशासकीय अधिकाऱ्याची स्थितीही वेगळी नसते, याचा प्रत्यय लक्ष्मीकांत देशमुख आणून देतात.
 बरे, इतके करून, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या जीवनात वैयक्तिक आणि कौटुंबिक स्थैर्य आणि स्वास्थ्य अभावानेच आढळते; कारण बदलीची तलवार त्यांच्या डोक्यावर कायमच टांगलली असते. विशेषत: महिला अधिकारी आणि कर्मचारी यांच्याबाबतीत हा प्रश्न अधिकच बिकट असतो. कारण कुटुंब आणि 'करियर' ह्या दोन्ही आघाड्यांवर त्यांना लढायचे असते.
 आपल्याकडे राजकीय कार्यकारी आणि कायम स्वरूपाचे पगारी कार्यकारी यामधील संबंधांना इतके विकृत स्वरूप आले आहे की, त्यामुळे कित्येकदा सत्प्रवृत्त आणि स्वाभिमानी अधिकारीही नाईलाजाने काही तडजोडी करताना आढळतात. ब्रिटिश संसदीय राज्यपद्धती आपण स्वीकारली असे आपण म्हणतो. पण कर्मचारीवृंदाच्या निवडीपासून ते नेमणुका, बदल्या, पदोन्नती, विभागीय चौकशा, निलंबन या सर्व बाबी पूर्णतः प्रशासकीय असतात आणि त्यात लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप करावयाचा नसतो. त्यांनी फक्त धोरणे आखून द्यावयाची असतात आणि अंमलबजावणीचे काम प्रशासनाने करावयाचे असते, हा खरे तर ह्या संसदीय राज्यप्रणालीचा गाभा. परंतु तोच आपल्याकडे दुर्लक्षिला गेला आहे. प्राथमिक शिक्षक आणि ग्रामसेवक यापासून ते मुख्य सचिव या सर्व स्तरांवर हस्तक्षेप करणे आणि निर्णय घेणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे, अशी समजूत राजकीय नेत्यांनी करून घेतली आहे. 'मला माझ्या मतदार संघातील साध्या नायब तहसीलदाराची किंवा विस्तार अधिकाऱ्याची बदली करता येणार नसेल तर मग मी मंत्री होऊन काय फायदा?' अशी भावनाही बोलून दाखवली जाते. मा. अण्णा हजारे यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी चळवळ उभारून आणि राज्यकर्त्यांवर दबाव आणून शासनाला बदलीविषयक कायदा करणे भाग पाडले हे खरे, पण प्रत्यक्षात घडले असे की, बदल्यांच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण होण्याऐवजी, त्याच कायद्याअंतर्गत काढलेल्या 'नोटिफिकेशन'

चा भक्कम आधार घेऊन, त्यांचे मंत्रालयात केंद्रीकरण झाले आहे. आपल्या मर्जीनुसार प्रशासन वाकविण्याचे एक साधन म्हणून बदलीचे शस्त्र सररासपणे वापरले जाते आहे हीसुद्धा आपल्या प्रशासनाची एक शोकांतिका तिचे पैलू 'प्रशासननाम्या'त जागोजागी आपल्या नजरेस पडतात.
 कित्येकदा माध्यमे काय, लोकप्रतिनिधी काय किंवा सर्वसामान्य नागरिक काय, - प्रशासकीय अधिकाऱ्याला जी तारेवरची कसरत करावी लागते त्याचे यथार्थ आकलन करून घेऊ शकत नाहीत. अनेकांच्या अपेक्षा शासकीय चौकटीत राहून, वेळापत्रक सांभाळून, पूर्ण करणे किती कर्मकठीण असते याची नेमकी कल्पना नसल्याने, त्यांचेकडून होणारे मूल्यमापन कित्येकदा सदोष असते. लोकप्रतिनिधींच्या बाबतीत बोलायचे, तर त्यांनी आग्रह लावून धरलेल्या दहा कामांपैकी नऊ कामे मार्गी लागली तर त्याचे काही कौतुक होत नाही, पण मागे राहिलेल्या एका कामाबद्दल मात्र त्या अधिकाऱ्याला धारेवर धरले जाते, याचा अनुभव बहुसंख्य अधिकाऱ्यांना नेहमीच येतो. काही वेळा माध्यमे एखाद्या अधिकाऱ्याला वारेमाप प्रसिद्धी देऊन त्याची ‘या सम हाच' अशी प्रतिमा उभी करतात. परंतु ती प्रतिमा अवास्तव असू शकते. काही वेळा कर्तव्यदक्ष आणि मेहनती, प्रामाणिक अधिकाऱ्यावर वरिष्ठांची निष्कारण खप्पा मर्जी होऊ शकते. प्रशासकीय अधिकारी कोणकोणत्या मर्यादा पाळून आणि कोणकोणत्या ताणतणावाखाली काम करतो याची यथार्थ कल्पना वाचकांना देण्याचे मोठे कार्य लक्ष्मीकांत देशमुखांनी 'प्रशासननामा' ह्या लेखमालेद्वारे केले, हे नि:संशय; त्याकरता तरी प्रशासनातील त्यांचे सहकारी त्यांचे सदैव ऋणी राहतील.
 सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांच्या लेखनात अभिनिवेश किंवा पक्षपात यांचा लवलेशही आढळत नाही. त्यांच्या संवेदनशील मनाला भिडलेल्या किंवा 'कलात्मक तटस्थता' भंगणार नाही याचे पूर्ण भान राखूनच, त्यामुळे अनुभवातून आलेले 'इनसाईट' कागदावर उतरवताना, त्यांचा कुठही तोल ढळलेला नाही हे विशेषत्वाने जाणवते.
 जीवनाच्या हरेक क्षेत्रात अनेक बरेवाईट अनुभव आपल्या सर्वांनाच येतात. त्या त्या वेळी आपण कधी प्रक्षुब्ध होतो, कधी हळहळतो, कधी सुखावतो तर कधी सुन्न होऊन जाते. अशा तात्कालिक भावना बाजूला सारून, त्या मूळ अनुभवाचे शांतचित्ताने विश्लेषण करण्याची आपली तयारी किंवा कुवत नसते. समजा असे चिंतन केलेच, तरी ते नेटक्या शब्दांत मांडणे फार थोड्या जणंना जमते. त्यासोठी आवश्यक ती प्रगल्भता, चिंतनशील प्रवृत्ती आणि शब्दांकनाची हातोटी हे सर्व घटक पदार्थ एकत्र आल्यामुळेच. 'प्रशासननामा' सारखे लज्जतदार

पक्वान्न वाचकांच्या ताटात पडले आहे. व्यक्तिगत अनुभूतीचे सार्वत्रिकीकरण करणारी साहित्यकृती श्रेष्ठ मानली जाते. त्या कसोटीवर हे पुस्तक नक्कीच खरे उतरावे.
 प्रशासनाचे प्रश्न मूलत: सामाजिक प्रश्नातूनच उद्भवलेले असतात. केवळ लोकशाही शासनप्रणाली अवलंबली, कायदे केले, प्रशासकीय यंत्रणा उभी केली, कायद्याचे राज्य आणले की आपोआप सर्व सामाजिक आर्थिक समस्यांची उकल होईल अशी अपेक्षा बाळगणे अवास्तव ठरेल. समाज प्रबोधन आणि सामूहिक प्रयत्न यांची जोड नसेल तर निव्वळ प्रशासन आणि न्यायव्यवस्था यांचेकडून फारसे काही साध्य होणारे नसते. काही 'फ्लॅश पॉईंटस' उदभवल्यानंतर चंद्रकांत सारख्या हुशार अधिकाऱ्याने परिस्थिती हाताबाहेर जाऊ दिली नाही तर चांगलेच, पण तेवढ्याने मूळ प्रश्न सुटत नाहीत. जाती, धर्म, भाषा, बेरोजगारी, जीवनावश्यक वस्तूंचे वितरण, लैंगिक शोषण यासारख्या कारणांमधून उद्भवणारे लहान मोठे उद्रेक आटोक्यात आणणे हेसुद्धा प्रशासकीय यंत्रणेपुढील आव्हान असते. पण उद्रेक शमला म्हणजे झाले, संपले अशा भ्रमात कोणी राहू नये. अशा उद्रेकांपाठीमागील मूलभूत समस्यांकडे लक्ष्मीकांत देशमुख एका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या भूमिकेतून अंगुलीनिर्देश करतात. रविवारच्या वृत्तपत्रीय पुरवणीतील एक वाचनीय सदर लिहिणे याच्या किती तरी पुढे जाऊन, ते खुबीने वाचकांच्या सामाजिक जाणिवांना हात घालतात, त्याला अंतर्मुख करतात. त्यामुळे 'प्रशासननामा' एक वेगळी उंची गाठतो, समाजप्रबोधनाच्या व्यापक चळवळीचा तो एक हिस्सा बनते. प्रस्तुत पुस्तकाचे प्रकाशन त्या दृष्टीने मला महत्त्वाचे व औचित्यपूर्ण वाटते. वाचकही याच भावनेतून प्रशासननाम्याचे स्वागत करतील अशी मला अशा आहे. प्रशासनात ज्यंनी नव्याने प्रवेश केला आहे (जे अद्याप ‘बनचुके' झालेले नाहीत), किंवा ज्यांना प्रशासनाचे करियर निवडायचे आहे अशांचे बाबतीत तर 'प्रशासननामा' हे एक आवश्यक वाचन समजले जावे. लोकप्रतिनिधी आणि राजकीय सामाजिक नेत्यांनाही प्रशासननामा नक्कीच उद्बोधक वाटेल.

प्रशासननामा व बखर

गूढ, गहन प्रशासन रूपी जंगलाचे चित्तवेधक दर्शन


लीना मेंहदळे

 प्रशासनात कल्पक, कृतिशील व आशावादी म्हणून ओळखले जाणारे श्री. लक्ष्मीकांत देशमुख नुकतेच त्यांची शासकीय कारकिर्द संपवून निवृत्त झाले. त्याच सुमारास त्यांनी माझ्याकडे आग्रह धरला की त्यांच्या प्रशासनिक लेखनाबद्दल मी माझे मत व्यक्त करावे. तेही एका लेखाच्या स्वरूपाने.
 आधी हे प्रांजळपणे कबूल करायला हवे की त्यांचे इतर साहित्यिक लेखन मी वाचलेले नाही. मात्र "प्रशासनाची बखर' हे पुस्तक आधी वाचलेले होते. ते आणि "प्रशासननामा" अशी दोन पुस्तके त्यांनी लिहून काढली. ती वाचतांना प्रशासकीय अधिकाऱ्यांना तर, “अरे, मी पण अशी परिस्थिती अनुभवली आहे." प्रत्यय वारंवार येतो.
 प्रशासकीय अधिकारी दोन गोष्टी सहसा करत नाहीत, ज्या लक्ष्मीकांत देशमुखांनी या पुस्तकांच्या माध्यमातून केल्या आहेत. पहिली म्हणजे प्रशासकीय अनभुव लिहीत रहाणं! एरवी उत्तमोत्तम नोटिंग करणारे, नव्या स्कीम्सचे आराखडे मांडणारे, एन्कायरी रिपोर्ट लिहून पूर्ण करणारे, एव्हॅल्यूएशन रिपोर्ट लिहिणारे असे खूप अधिकारी पाहिले आहेत. ज्यांचे ते लेखन वाचल्यावाचल्या त्यांची विद्वत्ता व विषयावरील पकड लक्षात येते. लिहिण्याची हातोटी तर असतेच. तरी पण प्रशासकीय लेखन मात्र त्यांच्याकडून फारसे होत नाही. त्यामुळे लोकांच्या दृष्टीने प्रशासन हे अजूनही एक गूढ, गहन जंगलच असते. आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांना देखील त्यांच्या उदाहरणातून पटकन शिकता येत नाही. हा पायंडा बदलणारे अधिकारी अगदीच नाहीत असेही नाही, पण त्यांचे लिखाण इंग्रजीतून माधव गोडबोले, राम प्रधान यांच्या अनुभवांवर त्यांची गाजलेली पुस्तके इंग्रजीतूनच पुढे आली. देशमुखांची पुस्तके मात्र मराठीतूनच लिहिली गेली त्यामुळे त्यांचे वाचन अधिक अस्सल वाटते. पैकी 'प्रशासननामा'मध्ये छोट्या छोट्या प्रसंगातून फुलवलेली

कथानके आहेत. 'हे असे घडले' असे रंजकतेने सांगून टाकून पुढे वाचकाला अंतर्मुख करणारे, विचार करायला लावणारे असे एक किंवा दोनच प्रश्न मांडले आहेत. या कथानकांमधून गेल्या पंचवीस तीस वर्षात प्रशासनातील व त्याहीपेक्षा राजकारणातील मूल्ये कशी कशी बदलत गेली ते कळून येते. नव्याने प्रशासकीय करियरमध्ये येऊन इच्छिणाऱ्यांना एक इशारा मिळतो व सोबत एक आव्हानही मिळते. पहिलेच कथानक एका इंजिनियरला आमदाराचे कार्यकर्ते मारहाण करतात. उपजिल्हाधिकारी पोलिस आणि तहसीलदार सर्व मिळून कारवाई करतात ती कायद्याच्या चौकटीप्रमाणेच. मात्र त्यांनी कारवाई मागे घ्यावी म्हणून आलेले दडपण, बदलीची धमकी आणि या तणावाखाली उपजिल्हाधिकारी वावरत असतानाच तिकडे इंजिनियरने मात्र तडजोङ मान्य केलेली असते; कारण तसे न केल्याने आमदार आपली कुलंगडी बाहेर काढेल ही भीती. पाप कुणाचे ताप कुणाला- असा शेराही हसत हसत मारला आहे, पण ते उपजिल्हाधिकारी जे करत होता ते निव्वळ इंजिनियरला झालेल्या मारहाणीपुरतेच होते? की ते प्रशासनाची भविष्यकालीन मोठी दुर्दशा रोखण्याकरीता होते? सुज्ञ वाचक हा सारासार विचार करतो आणि माघार न घेण्याच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या निर्णयाशी सहमत होतो.
 दुसरे पुस्तक 'प्रशासनाची बखर' हे मात्र कथनाकात्मक नसून अत्यंत चिकित्सक, विश्लेषणात्मक तरीही रंजकतेने लिहिले आहे. हे सुंदरसे टेक्स्ट बुकच आहे म्हणा ना! पण विषय रटाळ न होऊ देता लिहिलेले. खूपसे थिअरेटिकल, संपूर्ण विवेचन भारतीय पृष्ठभूमीच्या अंगाने केलेले आढळते. म्हणून ते चटकन लक्षात येते, पटते आणि त्या विषयाची गोडी निर्माण होते. अगदी मोगलकालीन ते शिवकालीन ते बिटिश राजवटीमधील प्रशासन पद्धती काय होती इथपर्यंत लेखकाने आढावा घेतला आहे. त्यानंतर भारत स्वतंत्र झाला. ब्रिटिश गेले, लोकशाही आली, त्यामुळे राज्यकारभाराबाबत दिशा आणि धोरणे ठरवणारी यंत्रणा बदलली. त्यांची विचारसरणी आणि वागणूक बदलली. प्रशासन यंत्रणा मात्र तीच राहिली. कायदेकानूही तेच राहिले. मग हळूहळू विसंवाद निर्माण होऊ लागले. या सर्वांना परिणाम काय झाला ते देशमुखांनी “फॉल अॅण्ड फॉल्स ऑफ इंडियन ब्यूरोक्रसी' या भागात मांडले आहे. तत्पूर्वी स्वातंत्र्योत्तर साठ वर्षाच्या काळातील बदलांना समजून घेण्यासाठी त्यांनी मॅनेजमेंटच्या पुस्तकांत प्रसिद्ध असलेले “सिक्स थिंकिंग हॅट्स" चे प्रतीक वापरून भारतीय प्रशासनातील किती मंडळी कोणत्या प्रसंगी कोणती हॅट वापरत होती. म्हणजेच कोणत्या मनस्थितीने काम करत होती त्याचाही आढावा घेतला आहे. या सर्वच भागांमध्ये मूळ सिद्धान्तांचे विवेचन विस्ताराने पण रंजकतेने केले आहे. "प्रशासन' चा सिद्धान्त काय, भारतीय प्रशासक कसा वागतो, तसा

का वागतो आणि परिणाम काय होतात असे चौपदरी धागे प्रशासनातील वेगवेगळ्या सिद्धान्ताबाबत उलगडले आहेत.
 त्यापुढील भागांत देशमुखांनी अमेरिका व ब्रिटनमध्ये होत असलेल्या प्रशासकीय सुधारणांचा आढावा घेत त्यासोबत भारतीय प्रशासनातील सुधारणांची, किंबहुना सुधारणेसाठी असलेल्या चौकटीची तुलना केली आहे. आपल्याकडे अजून खूप प्रशासकीय सुधारणा होण्याला वाव आहे, नव्हे, त्यांची फार गरज आहे. तर मग काय असावी त्यांची दिशा? अमेरिका व ब्रिटन हे प्रगत देश आहेत तर भारत हा विकसनशील- म्हणजे जिथे विकास अजून व्हायचा आहे असा देश आहे. ब्रिटिशकालीन प्रशासकीय चौकटीपेक्षा महत्त्वाचा बदल म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमातून विकास करवून घेताना प्रशासनात निर्माण झालेले बदल जिल्हा परिषदा, ग्राम सभा तसेच स्थानिक आमदार व खासदार यांना असलेले वेगळे अधिकार आणि प्रशासनाबरोबर त्यांचा समन्वय कसा होतो किंवा होत नाही- या सर्व चर्चेचा एका अख्खा भाग 'आय ए एस असावे की नसावे.' या गाजलेल्या प्रश्नासाठी अपरिहार्यपणे वापरलेला आहे. त्याच बरोबर भारतीय प्रशासनासमोरील आव्हाने काय- त्यांची चर्चा देखील शेवटच्या भागांत केली आहे. देशमुखांचे लेखन आशावादी आहे व ही आशा निर्माण होण्यासारखी किंवा टिकून रहाण्याची जी कारणे आहेत त्यातील दहा ठळक कारणेही त्यांनी नोंदलेली आहेत. तरुणांमधील ऊर्जा, त्यांचा वाढता प्रोफशनॅलिझम, आणि 'यापुढे सहन करणार नाही' ही मनोवृत्ती ही तीन ठळक कारणे. या सोबत भ्रष्टाचारविरुद्धची जगजागृती, स्त्रिया तसेच दुर्गम भागातून आलेल्यांचा राजकारण आणि प्रशासनातील वाढता सहभाग, माहिती अधिकाराचा कायदा व लोकपाल विधेयक, न्यायालयांची सक्रीयता व नीतिशकुमार सारख्यांनी राजकारणातून आणलेले विकासाचे मॉडेल अशा बाबींचा समावेश त्यांनी केला आहे.
 ही पुस्तके वाचतांना देशमुखांनी स्वत: अफाट वाचनही केले आहे याचा प्रत्यय येतो. त्याचप्रमाणे ते तपशिलातही जातात, विस्ताराने तपशील देतात हे ही महत्त्वाचे आहे. मग यात काही राहून गेले आहे का, हे ठरविण्यासाठी मला नील्स बोर या वैज्ञानिकाची एक गोष्ट सांगावी लागेल. काळ १९०५ च्या आसपास. एव्हाना अणूच्या रचनेत इलेक्ट्रॉन नावाचा एक ऋणभार घेतलेला घटक असतो हे निर्विवादपणे दाखवून दिले गेले होते. सबब धनभार घेतलेले घटकदेखील असणार हे उघड. तर हे दोन्ही विद्युत्भार एकमेकांना संपवत का नाहीत याचे उत्तर नील्स बोरने शोधलं. सूर्याभोवतीची जशी ग्रहमालिका- त्याचप्रमाणे जर हे इलेक्ट्रॉन अणुकेंद्रापासून थोड्या ठरावीक अंतरावर वर्तुळाकार फिरत राहिले तर त्यांचा ऋणभार नष्ट न होता त्यांना स्थायित्व प्राप्त होते असा तो सिद्धान्त होता. अशा एका स्थायी वर्तुळावरून दुसऱ्या वर्तुळाच्या

कक्षेत त्यांनी झेप घेतली तर प्रकाश किरणे उत्सर्जित होतात, त्यांचा अभ्यास करून ही नवीन कल्पना सिद्ध होते. एवढेच नव्हे तर इलेक्ट्रॉनने कुठून कुठे उडी मारली तेही समजू शकते वगैरे. या संकल्पनेमुळे अणु रचनेतील काही कोडी सुटली. नील्स बोर यांना नोबेल पारितोषिकही मिळाले पण अजूनही बरीचशी कोडी सुटायची राहिली होती.
 मग दुसऱ्या एका वैज्ञानिकाने सिद्ध केले की इलेक्ट्रॉनचा प्रवास वर्तुळाकार नसून लंब वर्तुळाकार आहे असे मानून गणित केले तेव्हा अजून काही कोडी सुटली. पण तरीही मोठा पल्ला गाठायचा शिल्लक होता. मग अजून एका वैज्ञानिकाने 'स्पिन' या संकल्पनेचा आधार घेतला म्हणजे इलेक्ट्रॉन उलट व सुलट दोन्ही दिशांना फिरू शकतात. (क्लॉकवाइज व अॅण्टीक्लॉक वाइज) हे ध्यानात आल्यावर नव्याने गणित मांडले तेव्हा अजूनही काही कोडी सुटली. मग पॉलीचे एक्सक्ल्यूजन प्रिन्सिपल, श्रोडीजरची इलेक्ट्रॉन वेव्ह थियरी, टनेल इफेक्ट इत्यादी सिद्धान्तांमुळे अजून काही कोडी सुटली. त्यातूनच ड्यूएल नेचर ऑफ लाइट म्हणजे प्रकाश किरणे कधी किरणांच्या तत्त्वाप्रमाणे चालतात तर कधी एखाद्या ठोस कणाप्रमाणेहा सिद्धान्तही पुढे आला त्यातून खूपशी कोडी सुटली.
 या गोष्टीतून मला असे म्हणायचे आहे की प्रशासन हा विषय देखील एका ठरावीक चौकटीत ठेवता येऊ शकत नाही. सामान्य माणसाला रंजनकतेसाठी किंवा नव्याने प्रशासनात येणाऱ्याने प्राथमिक धडे शिकण्यासाठी अत्यंत उपयुक्त असे देशमुखांचे हे लिखाण आहे. पण तेवढ्यानेच प्रशासनातील कोडी आणि कोंडी सोडवण्याची दिशा सापडणार नाही. त्यासाठी "प्रशासन' या विषयाच्या "सैद्धान्तिक' अभ्यासापलीकडे जावे लागेल. प्रशासनामध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे, त्यासाठी कडक कायदेकानू हवेत, कडक शिक्षा हवी, त्यासाठी लोकपाल विधायक हवे, हे म्हणजे एका सरळ रेषेत उत्तर शोधण्यासारखे आहे. मुळात शिक्षण व्यवस्थेतून चारित्र्यनिर्मिती होत नाही तोपर्यंत भ्रष्टाचार कसा थांबणार? जीडीपी वाढला म्हणजे विकास झाला असा अर्थशास्त्राचा एक सरळधोपट सिद्धान्त आहे आणि प्रशासनात जीडीपी वाढला म्हणून खूश होणारे अधिकारी देखील आहेत. म्हणून पाटी-पेन्सिल घालवून वह्या-पेन आणली की जीडीपी वाढतो असा आनंद मानणारे आहेत. पण त्यामुळे पर्यावरणाचा किती हास होतो हा विचार प्रशासनात केला जात नाही. ई-टेंडर काढून टेंडर देण्याच्या प्रक्रियेमुळे भ्रष्टाचार थांबेल, पण कार्टेलिंग कसं थांबणार? टेंडर मिळवल्यानंतर ज्यांनी खराब रस्ते बांधले आणि बांधू दिले त्यांचे काय? थोडक्यात ई-टेंडरने काम सोपे होते असे म्हणणे माझ्या मते वास्तववादी आहे, पण त्याने भ्रष्टाचार थांबण्याची स्वप्ने बघणे हे अवास्तववादी आहे. त्यासाठी प्रशासनाच्या बाहेर जाऊन नैतिक अधिष्ठान

तपासावे लागेल.
 थोडक्यात, प्रशासन या विषयाचे स्वत:चे म्हणून जे मूलभूत सिद्धान्त होते ते मांडून झालेत. पण अजूनही प्रशासन या विषयाचे इतर विषयांसोबत इंटिग्रेशन साधणारे "इंटर डिसिप्लिनरी' लिखाण अजून खूप प्रमाणात लिहिले जायला हवे. मग ते देशमुख लिहोत अथवा इतर कुणी साधनाने इतर प्रकाशित करावेत अथवा इतर कुणी. पण हवे, हे मात्र खरे.
 प्रशासनात सहसा न केली जाणारी दुसरी गोष्ट देशमुखांनी या लिखाणात केलेली आहे. प्रशासनात इतरांना सहसा चांगले म्हटले जात नाही. 'त्याच्यामुळे मी शिकले / शिकलो' असा ऋण - निर्देश अजिबात नाही. 'त्यांच्या चांगल्या कामाला पुढे नेत मी त्या पायावर आजचा उत्तम कळस रचला' हे सहसा कोणी कबल करत नाही. ते सर्व देशमुखांनी केले. त्यामुळे त्यांच्या या गुणाचे कौतुक तर व्हायलाच हवे. शिवाय तुमच्या 'सैद्धान्तिक' विवेचनाची उदाहरणे दाखवा म्हटल्यावर जामख मक्तपणे त्या इतरांनी केलेल्या चांगल्या कामाकडे बोट दाखवितात. हा गण आल्यास प्रशासनात मोठ्या सुधारणा होतील असे माझे मत आहे.

भारतीय प्रशासनाचे सकारात्मक विवेचन

पांडुरंग भोये

 कोल्हापूरचे जिल्हाधिकारी श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांनी भारतीय प्रशासनासंदर्भात 'साधना' या साप्ताहिकात २००९ ते २०१० या दोन वर्षांत जे लेख लिहिले, त्या ३१ लेखांचा संग्रह 'बखर : भारतीय प्रशासनाची' या पुस्तकरूपाने १ जून २०११ रोजी प्रकाशित झाला. या पुस्तकात त्यांनी भारतीय प्रशासनासंदर्भातील ऐतिहासिक पार्श्वभूमी व कार्यपद्धती, नोकरशाहीचे रूप, अमेरिका व ब्रिटनमधील नोकरशाही आणि भारतीय नोकरशाहीसमोरील आव्हाने या प्रशासनाशी निगडित बाबींवर प्रकाश टाकला आहे व प्रशासनासंदर्भात लेखकाने वेगवेगळ्या अंगांनी चर्चा केली आहे.
 पुस्तकाला बखर का म्हटले आणि या बखरीचे स्वरूप कसे आहे, याबद्दल लेखकाने सुरवातीलाच आपले मत स्पष्ट केले आहे. नोकरशाहीचा उगम आणि विकास कसा झाला याचा आढावा सुरुवातीच्या भागात घेतला आहे. भारतीय प्रशासनाचा मूळ आधार हा भारतीय संविधान हा आहे. या आधारावरच प्रशासन कसे चालते, याचे उत्तम विवेचन लेखकाने केले आहे.
 भारतीय संविधानाची प्रस्तावना, राज्यविषयक मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत अधिकार हा आपल्या संविधानाची प्राणतत्त्वे आहेत. त्या आधारावर काम करणारी नोकरशाही ही राष्ट्रासाठी आवश्यक असून नोकरशाहीला मिळालेल्या अधिकारांतून तिच्यात दोष व कुरूपता निर्माण होते यावर नेमके बोट ठेवत नोकरशाहीची आवश्यकता त्यांनी स्पष्ट केली आहे. मार्क्स व वेबरने नोकरशाहीबद्दलच्या केलेल्या सैद्धान्तिक मांडणीबद्दल लेखकाने नेमकेपणाने विवेचन केले आहे. अनेक बाबतीत नोकरशाहीचे सिद्धान्त चकीचे नसून अमलात आणणारे अधिकारी व कर्मचारीही विकारपीडित आणि स्वार्थमूलक आहेत, अशी स्पष्ट भूमिका लेखकाने मांडली आहे. नोकररशाहीबद्दलचे तर्कचित्र स्पष्ट करून त्याला 'किनडे साईड' यांनी

नोकरशाहीबद्दल मांडलेल्या भूमिकेचा आधार दिला आहे. भारतीय प्रशासनासंदर्भात प्राचीन काळातील ऐतिहासिक पार्श्वभूमी लेखकाने स्पष्ट केली आहे. कौटिलीय अर्थशास्त्रातून प्रशासनासंदर्भात मांडलेली भूमिका स्पष्ट करून त्यांनी असे म्हटले आहे की, कौटिल्याने आपल्या ग्रंथाचे १४ भागांत विभाजन करून राज्यातील प्रशासन कसे चालावे, याबद्दल सविस्तर मांडणी केली आहे. त्याने राज्याची सप्तांगे सांगितली आहेत. लेखकाने हे सांगतानाच मॅकॅव्हेली व कौटिल्य यांच्या विचारांचीही तुलना केली आहे. भारतातील प्रशासनाबाबत. ऐतिहासिक दाखले देताना राजा तोरडमल यांनी केलेले मुघलकालीन महसूल प्रशासनाबद्दलचे विवेचन लेखकाने केले आहे. राजा तोरडमल यांनी मनसबदारी प्रथा, न्यायदान पद्धती, जमिनीचे सर्वेक्षण व मोजणीपद्धत आणि जमिनीचे वर्गीकरण करून कर आकारणे याबद्दलचे विवेचन केले होते.
 ब्रिटिश काळात भारतीय प्रशासनाची चौकट कशी पक्की झाली, याबद्दलचे सविस्तर वर्णन लेखकाने केले आहे. आय. सी. एस. परीक्षांद्वारा ब्रिटिशांनी भारतात प्रशासकीय सेवा सुरू केल्या. सुरुवातीला ब्रिटिश तरुणांनाच त्या सेवांत सामील होता येत होते; परंतु काळाच्या ओघात भारतीयांनाही ब्रिटिशांनी त्यात सामील करून घेतले. ब्रिटिश साम्राज्याच्या विस्ताराबरोबरच या सेवा विस्तारल्या. वॉरेन हेस्टिंग्ज, लॉर्ड कॉर्नवॉलिस, वेलस्ली आणि मॅकॉले यांसारख्या अधिकाऱ्यांनी या सेवा मजबूत करण्यात दिलेले योगदान महत्त्वपूर्ण होते. ब्रिटिश राजवटीने आपले साम्राज्य पक्के करताना भारतासंदर्भात वेगवेगळे कायदे केले. राणीचा जाहीरनामा, १८६१ कायदा, १८९२ चा कायदा व १९०९ चा कायदा या कायद्यांद्वारे केंद्रीय व प्रांतीय कायदेमंडळाचा विस्तार झाला. लॉर्ड रिपन हे स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक जरी असले, तरीही १६८८ ला भारतात मद्रासमध्ये नगरपालिका स्थापना झाली होती. हा दाखला देऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण केले, असे मत लेखकाने व्यक्त केले आहे. ब्रिटिश साम्राज्याचा भाग असणाऱ्या अधिकाऱ्यांनी भारतात चंगळवादी जीवन कसे व्यतीत केले, याबद्दलचे वर्णनही त्यांनी केले आहे. या चंगळवादी अधिकाऱ्यांप्रमाणे काही कर्तव्यदक्ष व कार्यक्षम अधिकारीदेखील होते. यामध्ये हंटर यांनी गॅझेटियर निर्मितीतील दिलेले योगदान, वॉल्टन जॉन खिस्ता यांनी १९४३ मध्ये इंडियन फूड डिपार्टमेंट स्थापनेतील व फाळणीनंतर दोन्ही राष्ट्रांत संपत्तीचे वितरण कसे करावे यासाठी लिहिलेले ३३ पानांचे टिपण यांतील योगदान इ. उदाहरणे दिली आहेत. ब्रिटिश अधिकाऱ्यांप्रमाणेच भारतीय अधिकाऱ्यातील सत्येंद्रनाथ टागोर, गुरुदास दत्ता आणि सी. डी. देशमुख यांच्या योगदानाचे विवेचनही केले आहे.
  स्वातंत्र्यानंतरच्या भारतीय नोकरशाहीचे व्यापक वर्णन लेखकाने केले आहे. स्वातंत्र्यानंतर ब्रिटिश राजवटीच्या धर्तीवर असणारी नोकरशाही स्वीकारायची की अमेरिकन धर्तीवरची नोकरशाही स्वीकारायची, यावर झालेल्या चर्चेचा आढावा त्यांनी घेतला आहे. भारतीय नोकरशाहीबद्दल सरदार वल्लभभाई पटेल यांची भूमिका व योगदान याचा त्यांनी आढावा घेतला आहे. त्यांनी पं. नेहरू आणि लालबहादूर शास्त्री यांनी सांगितलेल्या नोकरशाहीच्या समस्या व मर्यादाही विशद केल्या आहेत. अस्थिर राजकीय परिस्थिती, देशाच्या अखंडतेचा व एकात्मतेचा प्रश्न, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आणि वाढलेली नोकरशाही हे भारतीय प्रशासनावर प्रभाव टाकणारे प्रमुख प्रवाह आहेत. यावर लेखक प्रकाश टाकतात. भारतीय प्रशासन हे बदलत असून त्यांत लोकप्रतिनिधींचे नियंत्रण कसे महत्त्वपूर्ण आहे, याबद्दलचे वर्णनही त्यांनी केले आहे. भारतीय राज्यसंस्थेचे स्वरूप, परंपरा व वैशिष्ट्ये विशद केली आहेत. भारतीय राज्यसंस्थेच्या वैशिष्ट्यांमध्ये उदारमतवादी लोकशाही, केंद्रीभूत सत्ता, केंद्रीभूत प्रशासनव्यवस्था, धर्मनिरपेक्ष राज्यसंस्था, कल्याणकारी राज्यसंस्था आणि प्रशासकीय व्यवस्था यांची चर्चा केली आहे. भारतीय प्रशासनाच्या पर्यावरणासंदर्भात धर्म, सहिष्णुता व विश्वात्मकता हे भारतीय संस्कृतीचे आधार कसे आहेत, याचेही विवेचन केले आहे. जात, धर्म व जमातवाद आणि हिंसा - दहशतवाद यांच्या भारतीय प्रशासनावर विपरीत परिणाम कसा होतो, याचे वर्णन श्री. देशमुखांनी केले आहे. भारतीय प्रशासनाचे राजकीय पर्यावरण स्पष्ट करताना त्यावर भारतीय लोकशाही, वाढता राजकीय हस्तक्षेप आणि नोकरीतील आरक्षण या घटकांचा प्रभाव कसा पडतो, हे स्पष्ट केले आहे. आर्थिक पर्यावरणाचा जो प्रभाव पडतो, त्याचेही विवेचन त्यांनी केले आहे. एडवर्ड डी बोनो यांच्या 'सिक्स थिंकिंग हॅट' या प्रारूपाच्या आधारावर भारतीय प्रशासनातील सर्वसाधारण प्रवृत्तींवर नेमके बोट ठेवले आहे. भारतीय प्रशासनात ज्या वाईट प्रवृत्ती निर्माण झाल्या आहेत, त्याबद्दलचे विवेचन लेखकाने केले आहे. मॅनेजमेंट गुरू गुरुचरण दास व नामांकित प्रशासकीय अधिकारी पी. एस. अप्पू यांची भूमिकादेखील त्यांनी मांडली आहे.
 अमेरिकन नोकरशाहीच्या प्रतिमानाची चर्चाही त्यांनी केली आहे. त्यांनी अमेरिकन नोकरशाहीचे स्वरूप सांगून नोकरशाही आणि राज्यकर्ते यांचा परस्परसंबंध सांगितला आहे. अमेरिकेमध्ये ज्या प्रशासकीय सुधारणा झाल्या, त्यांचा उल्लेख त्यांनी केला आहे. प्रशासकीय सुधारणांच्या माध्यमातून लालफीत ही कमी करणे, . नागरिक केंद्रस्थानी ठेवणे, कार्यक्षम प्रशासनासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधिकार देणे आणि अनावश्यक सूज कमी करणे, ही भूमिकादेखील मांडली आहे. इंग्लंडमधील प्रशासकीय सेवांचीही चर्चा केली आहे. त्यांच्या मते, इंग्लंड लोकशाहीच्या

जननीप्रमाणेच नागरी सेवांचीही जननी आहे. त्यांनी इंग्लंडमधील नोकरशाहीच्या विकासाचे टप्पे व नोकरशाहीबाबतची भूमिका मांडली आहे. इंग्लंडमध्ये ज्या प्रशासकीय सुधारणा झाल्या. त्यांचे विवेचन करून मागरिट थेंचर यांचे प्रशासकीय सुधारणांतील योगदान विशद केले आहे. नागरिकांची सनद विशद करून या सनदेचा जो जगाने स्वीकार केला, त्याचे वर्णन केले आहे. जगाप्रमाणेच भारतानेही याचा स्वीकार केला आहे, याबद्दलची माहिती देत 'सर्व्हिसेस फर्स्ट' चार्टर पुढे कसे आले याचे वर्णन केले आहे. तिसऱ्या टप्प्यातील इंग्लंडमधील सुधारणा सांगून सार्वजनिक जीवनातील सात तत्त्वेही सांगितली आहेत. इंग्लंडने १९९७ मध्ये सरकार आधुनिक करण्यावर जो भर दिला, त्याचे विवेचनही त्यांनी केले आहे. सर अँड्रयूंनी २००२ मध्ये प्रशासनविषयक जी निरीक्षणे नोंदवली, त्यांचा उल्लेख केला आहे. सन २००४, २००९ आणि २०१० या वर्षांत कोणत्या वेगवेगळ्या प्रशासकीय सुधारणा झाल्या. याचेही विवेचन केले आहे.
 भारतीय प्रशासनासंदर्भात प्रशासनाचा चेहरा कसा बदलत आहे, याचीही व्यापक चर्चा लेखकाने केली आहे. गरिबी, प्रतिकूल परिस्थिती, असंख्य अडचणी आणि सामाजिक वास्तवावर मात करून प्रशासकीय सेवांत येणाऱ्या तरुणांचा उल्लेख लेखकाने केला आहे. पूनम मलिक, संदीप कौर, कृष्णात पाटील, राजलक्ष्मी कदम व डॉ. फैजल शहा यांसारख्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या आधारावर प्रशासकीय सेवांत येणाऱ्या तरुण आणि तरुणींची भूमिका आज परिवर्तनकारी ठरत आहे. भारतीय प्रशासनाचा बहुआयामी चेहरा पुढे येत आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे, श्री. ज्ञानेश्वर मुळे होत. त्यांनी भारतीय परराष्ट्र सेवांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. भारतीय प्रशासनाच्या संस्कृतीची चर्चा करताना वैयक्तिक मूलव्यवस्था, कुटुंब, समाज, शिक्षण, धर्म, राजकीय व्यवस्था आणि आर्थिक घटक हे या संस्कृतीला प्रभावित करतात, याचे विवेचन केले आहे. प्रशासनात आढळणाऱ्या समस्या समजावून घेऊन त्यांचे निराकारण करण्यासाठी प्रशासकीय सुधारणा का गरजेच्या बनतात यावरही भर दिला आहे. भारतात प्रशासनाचे राजकीयीकरण व सचोटीचा प्रश्न; जबाबदेहीपणा व कार्यक्षमता, भ्रष्टाचारनियंत्रण, कर्मचाऱ्यांची वाढती संख्या आणि लोककेंद्रित प्रशासन यासाठी प्रशासकीय सुधारणा कशा आवश्यक बनतात, यावर भर दिला आहे.
 भारतामध्ये प्रशासकीय सुधारणांसंदर्भात गोपालस्वामी समिती, ए. डी. गोरवाला समिती, पॉल ॲपलबी समिती, एल. पी. सिंग व एल. के. झा समिती, कोठारी समिती आणि अशोक मेहता समिती या भारताच्या पातळीवर सुधारणा समित्या स्थापन करण्यात आल्या. त्यांच्या कामाचा आढावा लेखकाने घेतला आहे. राज्यांच्या

पातळीवर आलेल्या प्रमुख प्रशासकीय सुधारणा आयोगांचा आढावाही त्यांनी घेतला आहे. प्रशासकीय सुधारणा संदर्भात केंद्र शासनाने कोणती उत्तरे शोधली पाहिजेत, याबद्दलची स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे. भारतीय प्रशासकीय सेवांतील आयएएस सेवा बंद कराव्यात व त्याला बदली व्यावसायिक सेवा आणाव्यात, हे जे नारायण मूर्ती यांनी मत मांडलेले आहे, त्याबद्दलची भूमिका मांडताना लेखक असे म्हणतात की - त्याने प्रश्न सुटणार नाही. आयएएस सेवांबाबत वेगवेगळ्या सर्वेक्षणांतील निरीक्षणेही नोंदवली आहेत. भारतीय प्रशासकीय सेवा पद्धतशीर चालाव्यात, यासाठी प्रशासकांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे व पोस्टिंगच्या गरजेप्रमाणे ठरावीक कालावधीत तीन वर्षे पदाची हमी द्या, त्यांच्या कामात हस्तक्षेप नको, कार्यक्षमता पडताळली जावी, चांगल्या अधिकाऱ्यांना संरक्षण मिळावे आणि अकार्यक्षम अधिकाऱ्यांना वेसण घालावी, असे स्पष्ट मत लेखकाने मांडले आहे.
 ५. भारतीय प्रशासकीय व्यवस्थेचा प्रमुख आधार म्हणजे जिल्हाधिकारी होय. जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्व, पार्श्वभूमी आणि आजच्या जिल्हाधिकाऱ्यांचे स्थान याबद्दलचे विवेचन त्यांनी केले आहे. जिल्हाधिकारी जिल्ह्याचा प्रमुख म्हणून, महसूलप्रशासनविषयक प्रमुख म्हणून, जिल्हा दंडाधिकारी आणि आपत्कालीन व्यवस्थापनाचा प्रमुख म्हणून जिल्ह्याच्या ठिकाणी प्रमुख भूमिका पार पाडतो, याबद्दलचे विवेचन केले आहे. विकास प्रशासनाची संकल्पना सांगून त्यामधील नोकरशाहीची भूमिकादेखील सांगितली आहे. व्याहत्तरावी घटनादुरुस्ती व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था याबद्दलचे विवेचन केले आहे.
 भारतीय प्रशासनासमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. त्यांतील भ्रष्टाचार हे मोठे आव्हान आहे. त्याबद्दल व्यापक चर्चा केली आहे. भूतकाळाचा वारसा, विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेतील मूल्यसंघर्ष, भीषण गरिबी, भ्रष्टाचाराविरुद्ध जागृत जनमत नसणे, आर्थिक गरज आणि शासनव्यवहाराची गुंतागुंत ही भ्रष्टाचाराची कारणे होत. यावर प्रकाश टाकीत भारतीय प्रशासनासमोरील आव्हाने स्पष्ट केली आहेत. भविष्यामध्ये भारतीय प्रशासनात तरुणांचा दबदबा वाढेल, असा आशावाद व्यक्त केला आहे. नोकरशाही हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, हे स्पष्ट करून बखरीचा आशावादी समारोप केला आहे. मूळ बखरीव्यतिरिक्त 'झपाटलेपणा ते जाणतेपणा' - लेखकाच्या जडणघडणीचा आणि उल्लेखनीय प्रशासकीय कामांचा आढावादेखील पुस्तकात घेण्यात आला आहे.
 या पुस्तकाची काही वैशिष्ट्ये सांगता येतील. पहिले वैशिष्ट्य हे सांगता येईल की, पुस्तकाचे एकूण पाच टप्पे दिसून येत. पहिल्या टप्प्यात ऐतिहासिक पार्श्वभूमी व नोकरशाहीचा उगम हा पहिल्या ते अकराव्या अध्यायातून; दुसऱ्या
२८८ □

टप्प्यात स्वातंत्र्योत्तर भारतीय नोकरशाहीचा विकास व वास्तव याबद्दलची मांडणी बाराव्या ते अठराव्या अध्यायातून; तिसऱ्या टप्प्यात अमेरिका व ब्रिटनमधील नोकरशाही याबद्दलची माहिती एकोणिसाव्या ते चोविसाव्या अध्यायातून व चौथ्या टप्यात भारतीय प्रशासनाचे बदलाचे टप्पे, प्रशासकीय सुधारणा व आव्हाने ही पंचवीस ते एकतिसाव्या अध्यायातून स्पष्ट होतात. पाचव्या टप्प्यात तर संकीर्ण बाबींचा उल्लेख आढळतो. त्यात लेखकाची जडणघडण व इतर बाबींचा उल्लेख आढळतो. दुसरे वैशिष्ट्य असे सांगता येईल की, लेखक स्वत: प्रशासकीय सेवांत सहभागी असल्याने अनुभवावर आधारित वास्तवाचे चित्रण व प्रसंगी परखड मतेही मांडली आहेत. तिसरे वैशिष्ट्य हे सांगता येईल की, लोकप्रशासन या विषयातील लोकप्रशासनाचे सिद्धान्त, विकास प्रशासन, भारतीय प्रशासन आणि सार्वजनिक धोरण या अभ्यास शाखांचा अभ्यास करून आपल्या अनुभवांना चांगल्या माहितीचा आधार दिला आहे. चौथे वैशिष्ट्य हे सांगता येईल की, लेखकाने वेगवेगळ्या मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांची मूळ इंग्रजी पुस्तके वाचली आहेत. या इंग्रजी पुस्तकांतील उदाहरणे इंग्रजीतच पुस्तकात दिली आहेत. जर या इंग्रजीतील असणाऱ्या वाक्यांचा आणि उताऱ्यांचा स्वैर मराठी अनुवाद केला असता, तर लेखकाचे प्रतिपादन इंग्रजी येत नसणाऱ्या अनेक वाचकांना समजून घ्यायला सोपे गेले असते. कारण ही वाक्ये व उतारे महत्त्वपूर्ण आहेत. लेखक पुढील आवृत्तीत याची नक्कीच दखल घेतील, अशी आशा आहे.
 एकंदरीत हे पुस्तक विद्यार्थी, कार्यकर्ते, प्रशासक व राज्यकर्त्यांनी वाचले पाहिजे. केवळ भारतीय प्रशासनाची चौकट न सांगता त्याची पार्श्वभूमी, वास्तव, अनुभव आणि इतर आधार यांचे लेखकाने विवेचन केले आहे. प्रशासनाकडे सकारात्मक दृष्टीने कसे पाहावे आणि प्रशासनाच्या माध्यमातून विकास कसा करता येऊ शकतो, याचे स्वत: लेखक हे उत्तम उदाहरण आहेत. समाजातील वेगवेगळ्या घटकापर्यंत या पुस्तकाचे निश्चितच स्वागत होईल. प्रशासनात कार्यरत असणाऱ्या व ते समजावून घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी हे पुस्तक जरूर वाचावे.

भाग ५
लक्ष्मीकांत देशमुख यांचे नाट्यविश्व
आशयधर्मी नाटककार


विद्यासागर अध्यापक

 सध्या मराठी रंगभूमीवर अनेक एकांकिका आणि नाटके येत आहेत. एकूण नाट्यविश्वाच्या दृष्टीनं ही बाब स्वागतार्हच आहे. निरनिराळे प्रयोग आणि संहिता रंगभूमीवर येऊन त्याचे वेगवेगळे प्रयोग होणे हे रंगभूमीचा विकास होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते. सध्या निरनिराळ्या पद्धतीचे प्रयोग रंगभूमीवर होत असताना दिसत असले तरी आशयधन नाट्यसंहिता उपलब्ध होत नाहीत अशी निर्माते आणि दिग्दर्शकांची नेहमीची तक्रारही आपल्याला दिसते. त्याचबरोबर सुमार विनोदी नाटके दरवर्षी येऊन प्रेक्षकांना हसवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतच असतात. सिनेमा आणि टीव्ही सिरीयलच्या मायाजालात प्रेक्षक इतके गुरफटले आहेत कि त्यांना पुन्हा रंगभूमीकडे कसे वळवायचे हा प्रश्न सगळ्या रंगकर्मीनाच भेडसावतांना दिसतो. बऱ्याच नाटकांची कथानके टीव्ही सिरियल लिहणाऱ्यांनी जवळ जवळ पळवलेलीच आहेत. कौटुंबिक नाटक हा प्रकार आता डेली सोपमध्ये जास्त प्रमाणात दिसतो - प्रेक्षकांना घरबसल्या बघायला मिळतो. मग तेच कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाटक पाचशे रुपये देऊन थिएटरमध्ये जाऊन कोण बघणार? हा प्रश्न निर्माण होतोच.
 सिनेमा हा मुळात फॉर्मचा असतो तर नाटक हे आशयाचे असते असे मानणाऱ्यांपैकी मी आहे. एकेकाळी कौटुंबिक जिव्हाळ्याची नाटके आज रंगभूमीवर चालत नाहीत. अंगविक्षेपांनी भरलेली विनोदी नाटकेसुद्धा आता टीव्हीवर स्टँडअप कॉमेडीमध्ये दिसू लागतात. अमेरिकेमध्ये टीव्ही माध्यमाने नव्वदच्या दशकात इतकी मोठी झेप घेतली की लोक घरी बसून टीव्हीवरच चित्रपट बघू लागले. हॉलिवूड संपणार का काय अशीही चर्चा रंगू लागली. पण सिनेमातल्या दिग्दर्शकांनी त्या प्रश्नावर मात करत, सिनेमाच्या तांत्रिक अंगांचा विकास करत भव्य, दिव्य आणि थिएटरमध्ये प्रेक्षक जाऊन बघतील असे सिनेमे निर्माण केले. टायटेनिक,

ज्युरॅसिक पार्क किंवा टर्मिनेटर ही त्याची उदाहरणे. लोक हे सिनेमे घरात बघण्यापेक्षा थिएटरमध्ये जाऊन त्या सिनेमांचा आनंद घेऊ लागले आणि चित्रपट माध्यमाने जणू कात टाकली. अशी कात टाकणे मराठी रंगभूमीला शक्य आहे का? तर माझ्या मते त्याचे उत्तर होय असे आहे. आशय हा नाटकाचा केंद्रबिंदू आहे. जितकी जास्त सखोल आशयनिर्मिती करणारी नाटके रंगमंचावर येतील तितकी रंगभूमी जास्त सशक्त होईल असे माझे मत आहे. नाट्यलेखनामध्ये तंत्र असावेच लागते पण त्याहून अधिक महत्त्वाचा असतो तो आशय. मी एक दिग्दर्शक म्हणून निरनिराळ्या आशयघन संहितांचा शोध घेत असताना माझी ओळख झाली ती लक्ष्मीकांत देशमुख ह्या नाटककाराशी. काही वर्षांपूर्वी मी त्यांचे 'अखेरची रात्र' हे नाटक दिग्दर्शितही केलेले होते, तर 'दूरदर्शन हाजिर हो' हे लहान मुलांसाठी बालनाट्य वाचले होते. 'अखेरची रात्र' आणि 'दूरदर्शन हाजिर हो' ह्या नाटककार लक्ष्मीकांत देशमुख यांनी लिहिलेल्या नाट्यसंहितावरची माझी काही निरीक्षणे.
 'अखेरची रात्र' हे नाटक भारतीय चित्रपटसृष्टीतील महान कलावंत गुरुदत्त ह्यांच्या आयुष्यातील शेवटच्या रात्री काय घडले असावे ह्या कल्पनेवर बेतलेले आहे. नाटककाराने ह्या मनस्वी कलावंताच्या आयुष्यातील शेवटची रात्र दाखवताना काही स्वातंत्र्येही घेतली आहेत. नाटककाराचा मूळ हेतू त्या रात्री प्रत्यक्ष गुरुदत्तच्या आयुष्यात काय घडले असेल त्याच्या घटना दाखवण्यापेक्षा त्या रात्री ह्या मनस्वी कलाकाराच्या मनात कोणकोणते विचार येऊन गेले असतील, हा आहे. मराठी रंगभूमीवर शोकांतिका ह्या तशा तुलनेने कमीच आढळतात. बऱ्याचशा पाश्चात्त्य नाटककारांकडून उधार घेतलेल्या. नाटककाराने गुरुदत्त ह्या व्यक्तिरेखेवर नाटक लिहिण्यात प्रामुख्याने दोन गोष्टी दिसतात. पहिली म्हणजे नाटककाराची ओरिजनालिटी आणि दुसरी म्हणजे शोकांतिका ह्या नाट्य प्रकाराचा चांगला अभ्यास.
 शोकांतिकेमध्ये नायकाचा प्रवास हा फक्त अधोगतीच्या दिशेने असत नाही तर त्या नायकाने आयुष्यात खूप यशही मिळवलेले असते. जितक्या उंचीवर नायकाच्या प्रतिमेची राजमान्यता, समाजमान्यता असते तितकी त्याची नियतीने केलेली शोकांतिका मोठी ठरते; म्हणूनच बऱ्याचशा शोकांतिकामध्ये नायक हा बहुधा राजा असतो. त्याने नियतीविरुद्ध केलेला प्रवास जरी त्याची शोकांतिका ठरली तरी त्याचा तो प्रवास आपल्याला हवाहवासा वाटतो.
 गुरुदत्त हा कलावंत हा नियतीशरण नव्हता, तसा तो तद्दन गल्लाभरू चित्रपट काढणाराही नव्हता. त्याने चित्रपटमाध्यमात केलेले प्रयोग नावीन्यपूर्ण होते. त्याने ह्या उद्योगात प्रचंड पैसा जरी मिळवला नसला तरी अनेक सिनेरसिकांनी त्याला 'दिग्दर्शकांचा राजा' ही उपाधी दिली. ह्या अर्थाने सिनेरसिकांवर त्याने राज्य

केले. काळाच्या पुढे असणाऱ्या ह्या दिग्दर्शकाची म्हणावी तशी दखल त्याच्या हयातीत घेतली गेली नाही. काहीवेळा कालातीत असणाऱ्या कलाकृतींची दखलसुद्धा अनेक वर्षांनी घेतली जाते. गुरुदत्तच्या बऱ्याच सिनेमांच्या बाबतीत असेच म्हणावे लागेल. ह्या अर्थाने गुरुदत्तसारख्या कलावंताने त्या काळात जन्म घेणं हीसुद्धा शोकांतिकाच म्हणावी लागते. म्हणूनच नाटककाराने शोकांतिक सिनेमांच्या बादशहालाच आपल्या नाटकाचा नायक करणे यथायोग्य वाटते.
 शोकांतिकेचे दुसरे ठळक वैशिष्ट्य असते ते म्हणजे सर्वगुणसंपन्न असणाऱ्या नायकाची एखादी दुबळी बाजू. जसे शेक्सपिअरच्या किंग लिअरमध्ये लिअर हा सर्वगुणसंपन्न असतो पण त्याचा रागावर ताबा नसणं ही त्याची दुबळी बाजू ठरते. त्याचमुळे कॉर्डेलिया ही त्याची मुलगी त्याच्यापासून दुरावते आणि सर्वार्थानं यशस्वी असणाऱ्या लिअरची शोकांतिका सुरू होते. ज्यांनी ज्यांनी चांगल्या शोकांतिका लिहिल्या त्या त्या नाटककारांचा मानवी मनाचा अभ्यास खूप होता असे आपल्याला दिसून येईल. उत्तम शोकांतिकांमध्ये नायकाची दुबळी बाजू दाखवताना ती परिस्थितीजन्य न दाखवता नायकाच्या स्वभाववैशिष्ट्यांशी संबंधित अशी दुबळी बाजू दाखवली जाताना आपल्याला दिसेल. म्हणून शोकांतिका ह्या एखाद्या व्यक्तिरेखेच्या फक्त आयुष्याचा चरित्रपट न दाखवता त्यांच्या मनाचा पट दाखवत असतात. त्या नायकाच्या मनाचा पटच आपल्याला जास्त आकर्षिक करतो. आणि तिथेच शोकांतिका एका परिपूर्ण आशयाच्या जागी पोहोचत असते. माणसाच्या जगण्यातील अपूर्णतेचे दर्शन आपल्याला त्याच ठिकाणी होते.
 नाटकाराने 'अखेरची रात्र' हे नाटक लिहिताना गुरुदत्तच्या आयुष्यात गीता दत्त आणि वहीदा रहेमान ह्या दोन स्त्रियांवरील त्याच्या प्रेमाला त्याच्या मनाचा कमकुवतपणा म्हणून दाखवलेले आहे. नाटकामध्ये ह्या पात्रांची नावे प्रतिभा आणि प्रेरणा अशी येतात. नाटककाराने नाटक लिहिताना स्वातंत्र्य वापरत ह्या पात्रांची खरी नावे न देता नायक गुरूच्या मनाची दोन रूपे म्हणून अशी नावे दिली आहेत. प्रतिभा आणि प्रेरणा ह्या दोनही स्त्रियांवर प्रेम करणारा गुरू नाटकामध्ये प्रेमाबद्दलच्या त्याच्या मूलभूत प्रेरणा सांगत प्रेमाबद्दलच्या सामाजिक मान्यता आणि खोट्या कल्पनांना विरोध करत राहातो. एका पुरुषाला एकाच वेळी दोन स्त्रिया आवडू शकतात. किंवा एखाद्या स्त्रीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त पुरुष. पण सामाजिक परंपरेची ओझी वाहणाऱ्या माणसांना हे विचार बदफैलीपणाचे वाटू शकतात, पण मनाच्या पातळीवर मात्र ते खरे असू शकतात. ह्या अर्थाने 'अखेरची रात्र' ह्या नाटकाचा नायक प्रेमाच्या तथाकथित सामाजिक परंपरांना धक्का लावू पाहातो. असे म्हणतात की, स्त्री ही जन्मत:च सृजनशील असते. त्यामुळे ती मुलाला जन्म

देऊ शकते. पुरुष मात्र स्वत:च्या सृजनशील प्रेरणा विकसित करत राहिला तरी अखेरपर्यंत अपूर्णच राहातो. असा अखेरपर्यंत सृजनासाठी प्रतिभा आणि प्रेरणावर अवलंबून असलेला गुरू शेवटी निराशेच्या खोल गर्तेत जातो. दारूच्या आहारी जातो. बऱ्याचदा दारू पिणे समाजात कितीही वाईट समजले जात असले तरी ज्या माणसाला आजूबाजूचे भयंकर वास्तव विसरायचे असते त्याच्यासाठी ते औषध ठरते. कोणताही मार्ग नसलेला गुरू शेवटी दारूच्याच आहारी जात स्वत:ची जीवनयात्रा संपवतो.<>br  लक्ष्मीकांत देशमुख यांनी गुरुदत्त या अतिशय संवेदनाशील, प्रतिभावंत कलाकाराची शोकांतिका मांडत असताना त्याच्या व्यक्तिमत्त्वातील गुणांना आणि अवगुणांना नाट्यात्मतेची जोड दिली आहे. नाटककार जेव्हा वास्तवात होऊन गेलेल्या व्यक्तिरेखेवर नाटक निर्माण करतो तेव्हा त्या व्यक्तिरेखेच्या गुणांचा किंवा त्यानं केलेल्या कार्याचा उदोउदो करण्याने त्यातील नाट्यात्म मूल्य हरवण्याचा धोका असतो. 'अखेरची रात्र'मध्ये मात्र गुरू हा जसा प्रतिभावान दाखवला आहे तसेच त्याच्यातील दोषही उघडपणे मांडण्यात आले आहेत. गुरुदत्त ह्या व्यक्तिरेखेच्या प्रेमात न पडता त्या व्यक्तिरेखेचे सारासार मूल्यमापन करण्याला नाटककार प्राधान्य देतो.
 शोकांतिकांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भावनाप्रधानता. नायकाची शोकांतिका आपल्याला भावनिक करते. प्रेक्षक जितका भावनिक होईल तितकी ती कलाकृती श्रेष्ठ अशी एक धारणा असते. शोकांतिका म्हणजे कॅथार्सिस. म्हणजेच कलाकृती पाहाताना प्रेक्षक जणू काही आपल्याच मनातील भावनांचा निचरा करत असतो. हे वैशिष्ट्य लक्षात घेऊन नाटककार नाट्यप्रसंगांची निर्मिती करत असतो. 'अखेरची रात्र' या नाटकात मात्र नायक फक्त भावनिक पातळीवर न राहाता वैचारिक पातळीवरही येतो. गुरूच्या स्वत:च्या शोधात त्याला येत गेलेले आत्मभान या कलाकृतीला वैचारिक पातळीवर नेते. शोकांतिकांमध्ये वैचारिक आणि भावनिक अशा दोन्ही पातळ्यांवर कलाकृती जाणे हे जास्त महत्त्वाचे.
 नाटकामध्ये शब्द महत्त्वाचा असतो असे मानणारा मी दिग्दर्शक आहे नाटककाराने लिहलेला शब्द अभिनेता कशा पद्धतीने प्रेक्षकांपुढे सादर करतो यावर बरेचसे नाटकाचे यश अवलंबून असते. शोकांतिकांचे एक वैशिष्ट्य असेही असते ते म्हणजे त्याची काव्यात्म भाषाशैली. लेखन करणाऱ्याला हा प्रकार आव्हानात्मक असतोच आणि अभिनेत्यालासुद्धा एखाद्या व्यक्तिरेखेच्या मनाचे कंगोरे दाखवत असताना ही काव्यात्म भाषा आपल्याला त्या व्यक्तिरेखेच्या मनात नेऊन ठेवते. बऱ्याचदा शोकांतिकांमधील स्वगते अनेक नटांना भुरळ घालतात. 'अखेरची रात्र'मध्ये

नाटककाराने काव्यात्मक भाषा आणि दैनंदिन वापरात असणारी भाषा ह्याचा सुरेख संगम केला आहे. गुरू ह्या प्रतिभावंत कलावंताच्या अंतर्मनातील द्वंद्व आणि विचार ह्यासाठी काव्यात्म भाषा आणि त्याच्या आयुष्यात घडत जाणारा बाह्य घटनाक्रम यासाठी दैनंदिन वापरातील भाषा, असे वर्गीकरण नाटकाराने केलेले दिसते. नाट्यसंहिता ही मुळात प्रयोग करण्याकरिता लिहलेली असते त्यामुळे प्रयोगाच्या दृष्टीने त्याचा विचार करणे आवश्यक ठरते. एकाच पद्धतीची काव्यात्म भाषा सातत्याने वापरली गेल्यास त्याची गोडीसुद्धा नष्ट होऊ शकते तसेच फक्त दैनंदिन वापरातील भाषा वापरल्यास नाट्यात्म उंची कदाचित कलाकृती गाठू शकत नाही. प्रयोगाच्या ह्या मर्यादा लक्षात घेता लक्ष्मीकांत देशमुख ह्यांनी दोन्ही पद्धतीच्या भाषा प्रकाराचा सुंदर गोफ यामध्ये विणला आहे.
 या नाटकाचे संवाद लिहितानासुद्धा नाटकाकाराने शब्दांचे फुलोरे असणारे संवाद लिहिण्यापेक्षा नाटकातील घटनाक्रम आणि व्यक्तिरेखेच्या मनातील स्पंदने स्पष्ट होतील अशी स्पष्टता बाळगत ते लिहिले आहेत. विशेषत: काव्यात्म संवाद प्रयोगरूपात सादर होत असताना कित्येकदा नाटककाराने वापरलेल्या शब्दांना प्रेक्षक दाद देतात. माझ्या मते ही चांगली गोष्ट नसून ती रसभंग करणारी गोष्ट आहे. अशा संवादातील शब्द कितीही उत्तम असले तरी प्रेक्षकाला ते कलाकृतीमधून बाहेर घेऊन येतात. 'अखेरची रात्र'मधील संवाद हे प्रेक्षकांना असे घायाळ वगैरे न करत बसता नेमकी मनोवस्था स्पष्ट करतात हे ह्या संहितेचे बलस्थान मानावे लागेल.
 नाट्यसंहितेत जसा आशय महत्त्वाचा असतो तसेच त्या आशयाची मांडणीसुद्धा. शोकांतिकेमध्ये प्रामुख्याने नायक केंद्रस्थानी असल्याने त्याच्याबरोबर असणारी इतर पात्रे दुय्यम ठरण्याची शक्यता असते. बऱ्याचदा ती दुय्यम असतात. 'अखेरची रात्र'मध्ये नाटककार गुरूचे संपूर्ण आयुष्य व्यापून टाकणाऱ्या दोन स्त्रिया आणि त्याचा सहलेखक अब्बास एवढ्या चारच पात्रांवर अख्खे नाटक तोलतो. प्रेरणा आणि प्रतिभा ह्या दोघींचे अस्तित्व गुरूच्या मनात सतत एक अंतर्विरोध निर्माण करत राहातात, तर अब्बास हा त्याचा सहलेखक ह्या नाटकाचा सूत्रधार म्हणून वावरतो. प्रत्यक्ष घडणाऱ्या घटनाक्रमातही अब्बास सहभागी होतो तो एखाद्या संस्कृत नाटकातल्या विदूषकाप्रमाणे, जो राजावर मनापासून प्रेम करतो आणि टीकाही. एका लेखकालाच सूत्रधार करून त्याला विदूषकाच्या एका आगळ्या वेगळ्या प्रकारात नाटककाराने सादर करून ह्या व्यक्तिरेखेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. बऱ्याचदा शोकांतिकेमध्ये विदूषक ह्या पात्रामार्फत कित्येकदा नाटककार स्वत:चे भाष्य करत असतो. विदूषक हा फक्त मनोरंजन करणारा नसून

तो एक विचारवंत म्हणून शोकांतिकांमध्ये वापरला जातो. इथेही अब्बास हा एक विचारवंत म्हणून गुरूच्या आयुष्यावर तटस्थपणे भाष्य करताना दिसतो.
 कलाकारला त्याची कला वृद्धिंगत व्हावी म्हणून काही स्वातंत्र्य हवे, की त्याने सामाजिक परंपरांची जोखडे वाहत जमेल तेवढी कला सादर करायची असा एक प्रश्न कलाकारासंदर्भात नेहमी उपस्थित केला जातो. कलाकाराची कलाकृती हा एक प्रकारे स्वातंत्र्याचा आविष्कार असतो. कित्येकदा नैतिकतेच्या चौकटीत न बसणाऱ्या कलाकृतींना कालांतराने समाजमान्यता मिळालेली दिसते. त्या कलाकाराने त्याचे जीवन कसे जगावे ह्याचे नीतिनियम समाजाने ठरवणे कित्येकदा त्या कलाकाराला जाचक ठरू शकते. कलाकाराने मनस्वी जगणे, त्याच्यावर लादली जाणारी बंधने, वेगवेगळ्या धर्मातील स्त्रीपुरुषांच्या प्रेमात येणारी धर्माची बंधने, मनाची अतिशय संवेदनशीलता हे कलाकाराला मिळालेले वरदान आणि तोच शाप अशा कित्येक गोष्टींवर 'अखेरची रात्र' प्रकाश टाकते. आजच्या काळातील एक सशक्त शोकांतिका ठरते.
 ह्याच नाटककाराचे मी वाचलेले दुसरे एक बालनाट्य म्हणजे, 'दूरदर्शन हाजिर हो.' रूढ अर्थाने जरी ह्या बालनाट्य असे म्हटले जात असले तरी ते सर्व वयोगटातल्या स्त्री-पुरुषांसाठी आहे असे मानावे लागेल. बालनाट्य लिहिणे हीही सगळ्यात अवघड गोष्ट आहे असे मला वाटते. मुळात कुठल्याही मुलांना उपदेश नको असतो. आईबाबा तो करतच असतात. मग तोच उपदेश परत नाटकाला जाऊन कानावर आदळून का घ्यायचा, हा मुलांचा प्रश्न असतो. त्यामुळे नाटककाराला मुलांच्या मानसिकतेचा विचार करून, त्यांना उपदेशाचा डोस वाटणार नाही तर मनोरंजन करत करत त्यांच्यापर्यंत आपला विचार पोहोचवणे हे खुबीनं करावे लागते.
 'दूरदर्शन हाजिर हो' या बालनाट्यात एक बादशहा आणि त्याचा दिवाणजी वेष बदलून ह्या नगरीत येतात. सगळ्यांवर टीव्ही या माध्यमाने घातलेले गारूड पाहून चकित होतात आणि वकील बनून प्रत्यक्ष टीव्ही या माध्यमाला आरोपी करून एका अभिरूप न्यायालयात त्याविरुद्ध खटला चालवतात. टीव्हीमुळे नव्या पिढीचे होत असलेले फायदे आणि नुकसान हा विषय नाटककार हळूहळू बाल प्रेक्षकांपर्यंत पोहेचवतो. नाटक लिहितांना नाटककाराला ते नाटक सगळ्यांना आपले वाटेल किंवा त्यातल्या व्यक्तिरेखेशी किमान तादात्म पावेल असा काही गुण संहितेत घालणे गरजेचे असते. 'दूरदर्शन हाजिर हो' या बालनाट्यात ते काम विषयच करून टाकतो. हा विषयच असा आहे की मुलांनी किती टीव्ही पाहावा यावर प्रत्येक घरातले लोक राजकारणापेक्षा जास्त चर्चा करत असतात.नाटककाराने


ह्या घराघरात घडणाऱ्या चर्चांना प्रातिनिधिक स्वरूप देऊन अभिरूप न्यायालयात आणून त्यावर विचारमंत्रथन घडवण्याचा प्रयत्न केलाय. हे सगळे विचारमंथन अतिशय हलक्याफुलक्या शब्दात, मुलांचे मनोरंजन होईल अशा पद्धतीनं घडवत नेले आहे.
 मनोरंजनाचा हा विषय मांडत असताना नवरा बायकोची भांडणे, त्यांनी आपल्या पाल्याची बाजू घेणे किंवा स्वत: टीव्ही बघण्याची सवय असल्याने मुलांना बोलू न शकणे अशा पालकांच्या निरनिराळ्या घातक सवयींवर झणझणीत प्रकाशही टाकला आहे. ह्या नाटकातले एक बाबा चिमणराव ह्यांना कुठेही झोप येत असते. चिमणरावांना सारखी सारखी येणारी झोप विनोद निर्माण तर करतेच पण पालक झोपी गेले आहेत हेही हेही सुचवते. टीव्ही या माध्यमाचा आजच्या मुलांवर होणारा परिणाम एवढा आहे, की त्याचे फायदे काय आणि तोटे काय हा विचार करण्याच्याही मनोवस्थेत आजचा पालक राहिलेला नाही. एखाद्या लहान मुलाने स्वत:ला शाहरुख खान असे समजणे आणि त्याला स्वतःला त्याच्या नावाबद्दल घृणा उत्पन्न होणे हा परिणाम खूपच भयानक आहे. त्या मुलाच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर त्याचा परिणाम आयुष्यभर होत राहाणार. त्याचे जगणे वास्तववादी होण्यापेक्षा तो स्वतः तयार केलेल्या भ्रामक विश्वात जगण्याची शक्यता अधिक. लक्ष्मीकांत देशमुख ह्यांनी हा विषय निवडून त्यातला आशय केद्रस्थानी मानून संहितेची बांधणी केलेली आहे. ह्या नाटकात फक्त बालक-पालक ह्यांनाच आरोपी न करता नाटककार शासनालाही आरोपी करतो. जबाबदारीचं भान ठेवून फक्त मुलांनीच वागावं अशी अपेक्षा करणंही चुकीचे आहे - हा विचार नाटककारक या नाट्यातून प्रखरपणे मांडतो. स्वत:ला अमीर खान आणि शाहरुख खान म्हणवणारी मुले आणि त्याचं कौतुक वाटून घेणारे पालक दाखवत आपले पालकही ह्या प्रश्नाला जबाबदार आहेत हे नाटककार दाखवतो. तसेच या टीव्हीच्या मायाजालाला न भुलतासुद्धा काही कुटुंबे त्याचा योग्य वापर करत आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करत आहेत हेही नाटककार दाखवतो.
 या बालनाट्याची मांडणी करताना कुठेही नाटककारानं विचार मांडण्याचा आव आणलेला नाही. मुलांना असलेले पौराणिक कथांचे आकर्षण लक्षात घेत नाटककार हळुहळु विषयापर्यंत प्रेक्षकाला पोहोचवतो. अभिरूप न्यायालयातील न्यायमूर्तीसुद्धा भीतीदायक न वाटता हसत खेळत न्यायानिवाड्याचे काम करतो. नाटकातील आई स्वत: टीव्ही च्या आहारी गेल्याची प्रामाणिक कबुली देते; सिरियलच्या ब्रेकमध्ये कसा कसा स्वयंपाक करते ते सांगते. स्त्रियांची ही सवय खरोखरच सर्वमान्य होऊ लागली आहे. वडिलांना सतत झोप येते - आपण ह्या

प्रश्नाबद्दल किती कमालीचे उदासीन आहोत हे दाखवणारी ही परिस्थिती. प्राजक्ता हा मुलीचा आणि तिच्या आईबाबांचा टीव्ही ह्या माध्यमाकडे कसे पाहावे ह्याचा दृष्टिकोन, प्रबोधन न करता, ह्यातून आपण नेमके चांगले काय निवडावे हे दाखवतो. या बालनाट्याचा शेवट नाटकाकाराने 'मिले सुर मेरा तुम्हारा' ह्या टीव्ही वरच गाजलेल्या एका गाण्याने केलेला आहे. हा शेवट टीव्ही माध्यमाचा प्रभाव दाखवतोच, पण त्या गीतातल्या ओळी खूप काही सांगून जातात. टीव्हीमुळे आजची मुले एकलकोंडी होत जाताना दिसत आहेत. त्यांचे सूर कोणाशीही जुळत नाही आहेत. नात्यातला विसंवाद आणि संवादच नसणं ह्या दोन्ही गोष्टी वाढत आहेत. आयुष्याच्या गाण्यात सूर गवसणं फार महत्त्वाचं. मुलांच्या आयुष्यातल्या गाण्याची नोट त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीलाच कुठेतरी चुकते आहे हे नाटककार लक्ष्मीकांत देशमुख बालनाट्यातून मोठ्या कल्पकतेनं सांगतात.

भाग ६
मुलाखती
समकालीन वास्तव कलात्मकतेनं टिपणार'जागल्या'
लेखक

मुलाखतकार : प्रा. रूपाली शिंदे व विनोद शिरसाठ

प्रा. रूपाली शिंदे :
 सर्वप्रथम मी व विनोद शिरसाठ तुमचे ३६ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्याबद्दल अभिनंदन करून मुलाखतीला आरंभ करू या. पहिला प्रश्न हा की, ललित लेखन व एकूणच साहित्याकडे पहाण्याचा तुमचा दृष्टिकोन काय आहे? तुम्ही याबाबत सविस्तर बोलावेसे वाटते.
लक्ष्मीकांत देशमुख :
 तसं तर मी शालेय वयापासून लेखन करीत आहे. माझी लेखनाची सुरुवातच मुळी 'साधना' दिवाळी अंकात प्रकाशित झालेल्या एका बालकथेनं झाली. मग कॉलेजमध्ये प्रौढ कथालेखन सुरू केलं. पण त्यात सातत्य नव्हतं. पण साधारणपणे १९८० पासून बऱ्यापैकी सातत्य माझ्या लेखनात आहे. १९८२ ला पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला, तेव्हापासून माझे सहा कथासंग्रह, सहा कादंबऱ्या व इतर ललितेतर स्वरूपाची तीन पुस्तके असे माझे आजवरचे लेखनसाहित्य आहे. त्यामुळे या तीन दशकात लेखन करताना समविचारी लेखकमित्रांशी चर्चा, वादविवाद करताना व इतरांचे साहित्य-समीक्षा वाचताना माझे काही एक चिंतन साहित्याबाबत निश्चितच झाले आहे.
 त्यामुळे आज ललित लेखन व साहित्याकडे मी एकूणच कसा बघतो हे प्रथमदर्शनी सांगायचं झालं तर एक आंतरिक ऊर्मी आणि व्यक्त होण्याची आत्यंतिक निकड ही माझ्या लेखनाची मूलभूत प्रेरणा आहे. तशी ती हरेक लेखकाची असते. पण त्या मार्गाकडे जाऊन मी काही सांगणार आहे.
 मी मूलत: ललित लेखक आहे. कथा, कादंबरी व ललितलेखन हे माझ्या अभिव्यक्तीचे प्रमुख माध्यम आहे. मी ज्या प्रकारचे लेखन केले आहे व जे विषय हाताळले आहेत त्या अनुषंगाने मी जर माझ्या साहित्याकडे पाहिले तर आपल्या

भवताली जे समाजजीवन आहे, ज्याचा आपण एक घटक आहोत. त्या समाजजीवनाचे प्रश्न, समस्या आणि सुख-दु:ख याची अभिव्यक्ती करणं हा माझ्या लेखनाचा स्वाभाविक कल राहिला आहे. किंबहुना, समाजभिमुखता हा माझा मनःपिंड आहे व तो माझ्या लेखनाचा अंत:स्वर आहे. एका अर्थाने मी लोकजीवनाची काही रूपे साहित्यरूपी आरशातून समाजापुढे उभी केली आहेत, ज्याद्वारे त्यांना सहअनुभूती व्हावी; 'अरे, हे तर आपल्या जगण्याचं व प्रश्नांचं प्रभावी व प्रत्ययकारी दर्शन आहे व त्यातूनही आहे ते जीवन उद्या बदलू शकते, अधिक चांगले होऊ शकते' हा दिलासा व आशावाद जाणवावा... अशी माझी लेखनामागची प्रमुख प्रेरणा आहे, असावी असं आज मागे वळून पाहाताना वाटतं.
 खरं तर एखादा लेखक का लिहितो? जीवनातील अनेकविध अनुभवांपैकी काही अनुभव लेखनासाठी का निवडतो? कथाबीज एखादी व्यक्तिरेखा, एखादा प्रसंग, एखादा विचार किंवा एखादी समस्या वा मनातील संघर्ष यापैकी नेमके कशातून सुचते? कधीही ज्याचे समाधानकारक उत्तर मिळणार नाही असे हे काही गहन प्रश्न आहेत. माझ्या लेखनाचे कथाबीज या सर्वच प्रकारे सुचले आहे हे मी सांगू शकतो. जेव्हा एखादे कथाबीज सुचल्यानंतर मनात ते घर करते, वेळी-अवेळी त्याबाबत मनात विचार चालू राहातो आणि एखाद्या क्षणी आता लिहिणं अपरिहार्य आहे असं जाणवतं तेव्हा पांढरे कागद व काळी शाई (मी माझ्या हाताने कागदावर लिहितोसंगणकावर नाही.) माझ्या मनाचा कब्जा घेतात व लेखन सुरू होते. पण लिहिताना मला सुरुवात माहीत असते, पण पूर्ण कथानक नाही. लेखनाची सुरुवात मात्र माझी अडखळत होते. दोन तीन वेळा लेखनाचे पहिले - दुसरे पान मी लिहून रद्द करतो, मग केव्हातरी वाटतं, लेखनाचा प्रारंभिक अडथळा किंवा स्टार्टिंग ट्रबल दूर झालाय... मग त्यानंतर कथालेखन अंत:स्फूर्तीने पुढे सरकते. अनेकदा लेखन पूर्ण झाल्यानंतर त्याचा जो शेवट होतो व एकूणच आपण जे लिहिलं आहे, जे सुचलं, अस्पष्टपणे जाणवलं त्यापेक्षा खूप वेगळं झालं आहे हे जाणवून माझा मीच चकित होतो. इथे तुम्हांला व तसेच वाचकांना प्रश्न कदाचित पडू शकेल की मग मूळ कथाबीज हरवलं, बदललं की विकसित झालं? तिन्ही शक्यता असू शकतात, नव्हे असतातच. हा माझा स्वानुभव आहे. पण शेवटी मनाचा तळ कितीही गाठायचा म्हटला तरी माणसात तो पूर्णत: गाठता येतो का? अशक्य आहे ते. तसंच लेखनाचं आहे. जे अभिव्यक्त करायचं होतं, लिहिण्यापूर्वी जे सुचलं होतं ते लिहिताना तसंच्या तसं प्रत्येक वेळी व्यक्त होतंच असं नाही. अशा वेळी मी पुन्हा शांतपणे माझी कथा वाचतो व एक वाचक म्हणून मला ती कशी वाटते हे कळावं म्हणून जणू काही मी नव्यानं वाचत आहे, लेखकाने काय लिहिलं आहे हे माहीत नाही अशा पद्धतीनं वाचतो. ती वाचताना

मला आनंद मिळतो का? मला काही त्यातून नवं मिळालं का? ती वाचताना वाचनीय आहे का? मी स्वत: त्यातला काही भाग गाळतो का? वरवर वाचत पुढे जातो, की पूर्ण शब्दन् शब्द वाचत जातो का हे पाहातो. जर वाचक म्हणून मला वाचताना आनंद मिळाला, काही तरी वेगळं मौलिक अनुभवायला मिळालं वा पुन:प्रत्ययाचा, सहअनुभूतीचा अनुभव जिवंत झाला व त्यातला कुठलाही भाग वाचताना मला गाळावासा- स्किप करावासा वाटला नाही, तर मी उत्तम लिहिलं आहे असं वाटतं. हे एक लेखक म्हणून मला असं वाटतं. ती कथा प्रकाशित झाल्यावर वाचकांना ते तसंच वाटतं का? अर्थातच नाही. कारण त्यांचं आकलन, त्यांचा जीवनानुभव, त्यांचे एकूण वाचनसंस्कार व समृद्धी आणि त्यांचे चिंतन, त्यांचे जगण्याचे तत्त्वज्ञान आदीच्या कसोटीवरच वाचक त्यांच्या नकळत वा सहजतेनं साहित्य वाचतात व मग ते त्यांना खूप आवडते किंवा मुळीच आवडत नाही. आवडले तरी काही भाग, काही प्रसंग खटकतात. असं काही होत असणार. माझंही इतरांचं साहित्य वाचताना असंच होतं. म्हणून मला हे विधान करताना मी सत्याचा अपलाप करीत आहे असं वाटत नाही.
 कादंबरी लेखन हे दीर्घ कालावधीचं असतं. विशेषत: जेव्हा तुम्ही समाजातील प्रश्नांवर लिहिता, एका मोठ्या कालखंडाविषयी वा त्यांच्या जगण्याच्या संघर्षाविषयी लिहिता तिथं लेखनप्रक्रिया ही भिन्न असते. तेथे पूरक वाचन, माहिती व चिंतनाची नितांत गरज असते. पुन्हा प्रत्येकाची रीत ही वेगळी असणार- असतेच. मी फार तर माझ्याविषयी सांगू शकेन. जेव्हा कादंबरी तुमच्या अनुभवाचा- कामाचा विषय असते तिथं लेखनासाठी फारशी पूर्वतयारी करावी लागत नाही. उदाहरण देऊन बोलायचं झालं तर माझी 'अंधेरनगरी' ही कादंबरी नगरपालिकेचा निघृण सत्तासंघर्ष मांडणारी आहे. मी स्वतः प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केले आहे, म्हणून ती लिहिताना तो माझ्या जगण्याचा, कामाचा भाग असल्यामुळे व त्यावर त्या कालखंडात सतत विचार-चिंतन होत असल्यामुळे प्रत्यक्ष लिहिताना पूर्वतयारीची गरज नव्हती. ते सहज लिहून झालं. तीच बाब 'ऑक्टोपस'ची म्हणता येईल. मी महसूल विभागात अधिकारी होतो, त्यामुळे तलाठी ते कलेक्टर या पातळीवरचा भ्रष्टाचार व त्याचा व्यक्ती व कुटुंबावरील होणारा परिणाम मी पाहात होतो, त्याचा सामना करीत होतो (म्हणजे स्वत: भ्रष्टाचार न करणे व इतरांचा रोखणे यात माझी बरीच शक्ती पण खर्च पडली आहे) त्यामुळे त्याचे कथाबीज, संघर्ष-बिंदू व तलाठी आणि कलेक्टर ही पात्रे सुचताच मी कादंबरी झपाट्याने पूर्ण केली.
 मात्र 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' ही बृहद् कादंबरी लिहिताना फार वेळ लागला. मोठी दमछाक झाली. कारण दहशतवाद, इस्लाम मधला मूलतत्त्ववाद, कम्युनिझम व मार्क्सप्रेरित क्रांती (इन्किलाब), जगातील सत्तासंघर्ष, अफगाणिस्थानचा इतिहास,

भूगोल व तेथील माणसांची मानसिकता, जगण्यातून बनलेला त्यांचा स्वभाव... साठ वर्षात घडलेल्या घटना व संघर्ष... हे सारं आधी मला समजून घ्यावं लागलं. त्यासाठी प्रचंड अभ्यास मी केला... अर्थात, मला आधी विषय सुचत होता. एक दीर्घकथा व सव्वाशे पानाची छोटी कादंबरी आधी मी लिहिली. पण मला जे मांडायचं होतं ते फार व्यापक, विस्तृत पटलावरचं होतं म्हणून ती रद्द करून आज जी कादंबरी वाचकापुढे आहे ती लिहायचा घाट घातला. वीस भागांची ही कादंबरी. प्रत्येक भाग लिहिल्यावर पुढला भाग लिहिण्यापूर्वी वाचन-अभ्यास करणं अपरिहार्य होतं. पुन्हा हा अभ्यास कथानकात दुधात साखर विरघळावी तसा विरघळून सहज कलात्मकतेनं व ललित अंगानं आला पाहिजे हे कादंबरीकार म्हणून माझं कौशल्य असणार होतं. त्यासाठी प्रतिभा (असलेली) पणाला लागत होती. पण लिहिताना समाधान वाटत होतं व जाणवत होतं की आपण कदाचित आपल्या लेखकीय जीवनातलं एक मॅग्नम ओपस लिहीत आहोत... नुकतीच प्रकाशित झालेल्या माझी कादंबरी 'हरवलेले बालपण'चा विषय बालमजुरीच्या प्रश्नाशी संबंधित आहे. मी प्रशासनात याबाबत प्रत्यक्ष काम केलं व अनुभव घेतला. मग लघुप्रबंध लिहिण्याच्या निमित्ताने विडी उद्योगातील मुलींचे प्रश्न यावर संशोधन-अभ्यास केला. तसंच या प्रश्नाचे कायदेशीर पैलू व प्रशासकीय प्रश्न जाणून घेतले. एवढी प्रदीर्घ तयारी झाल्यावर प्रत्यक्ष लेखन झालं. पहिल्या खात माहिती, चर्चा व चिंतन जास्त होतं. म्हणून तो बाद केला. नव्यानं पुनर्लेखन केलं. मग माझं समाधान झाल्यावर ती प्रकाशित केली.
  ते सारं सांगताना स्वत:च्या काही लेखनाविषयी व प्रक्रियेविषयी मी थोडं दीर्घ बोललो, पण एकप्रकारे ते माझं मुक्त चिंतन होतं. त्यातून तुम्हाला आणि पुस्तकात आल्यावर वाचकांना वाचताना माझ्या लेखनाकडे पहाण्याचा दृष्टिकोनाविषयी पुरेसं आकलन झालं असेल असं वाटतं. सारांशरूपानं सांगायचं म्हणाल तर माझा लेखनाचा दृष्टिकोन हा सामाजिक-बहिर्मुख आणि आजचं वर्तमान, धगधगतं वास्तव आणि प्रश्न-समस्या टिपणारं व ते माझ्या अनुभव - चिंतन व प्रतिभेद्वारे व्यक्त करणारं असं आहे. येथे मी हे ठसठशीतपणे अधोरेखित करीन की, मी मूलत: एक ललित लेखक आहे. मी कादंबऱ्यातून व ‘पाणी! पाणी!!', 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' मधून जे सांगितलं आहे, ते ललितेतर प्रकारात संशोधन - अभ्यास म्हणूनही मांडता येऊ शकत होतं. नव्हे, तसं अनेकांनी लेखन केलं आहे. पण मला या समस्या व प्रश्न मानवी अंगानं जाणवतात, मनाला भिडतात. पाणी समस्या किती मोठी आहे व त्याची भौगोलिक व पर्यावरणीय कारणे काय आहेत हे प्रश्न ललित लेखक म्हणून मला पडत नाहीत, तर त्यामुळे माणसाच्या जीवनात काय घडतं, त्यांचे नातेसंबंध-परस्परांशी व समाजाशी असलेले कसे

प्रभावित होतात हे तीव्रतेनं जाणवतं. म्हणून मी लिहितो. मग त्याची कथा होते व कादंबरी होते.
 एका उदाहरणानं हे स्पष्ट करेन. 'बांध' या कथेत दुष्काळामुळे घरच्यांची पोटं भरली जावीत म्हणून कधी उंबरठा न ओलांडलेली एक खानदानी मराठा स्त्री रोजगार हमीवर काम करू लागते व श्रमानं ती काळवंडते. तिची मांसल पुष्टता कमी होते, म्हणून नवऱ्याला सेक्स करताना मजा येत नाही. तो बाजार जवळ करतो. आणि ती अपमानित होते. पण त्यातूनच तिला आत्मप्रतिष्ठेचा मार्ग कामाच्या माध्यमातून गवसतो... अशा आशयाची ही माझी कथा आहे. तिथं दुष्काळानं माणसाचं जगणं कठीण होतं, यापेक्षा त्यामुळे एका स्त्रीच्या जीवनात काय बदल घडून येतो हे मी रेखाटलं आहे. इथंच माझा ललित लेखनाचा पिंड म्हणा, आत्मस्वर म्हणा, मुखर होतो- व्यक्त होतो. उरस्फोडी कष्टानं स्त्रीआरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. पण तिची आकर्षकता कमी होते व संसारात विसंवाद निर्माण होतात. पण यातूनच त्या स्त्रीचा एक स्त्री म्हणून विकास होतो. तिची आत्मप्रतिष्ठा व सन्मान तिला कामातून मिळतो व स्वत:कडे, नवऱ्याकडे एका नव्या जाणिवेनं ती पाहू लागते. आपण म्हणजे आपलं मांसल-सेक्सी नवऱ्याची वासना तृप्त करणारं केवळ शरीर नाही, तर आपण एक स्वतंत्र माणूस आहोत व आपल्यालाही नवऱ्याप्रमाणे आत्मप्रतिष्ठा आहे आणि ती जपायची असेल तर आपण आर्थिकदृष्ट्या व त्याद्वारे मनानंही आत्मनिर्भर-स्वावलंबी बनलं पाहिजे. ही जाणीव तिला होते व कथा पूर्ण होते. हे मी जरा सविस्तर सांगितलं. कारण दुष्काळाचं भेदक वर्णन मी एका संसारी पारंपरिक स्त्रीचं आत्मनिर्भर व कणखर स्त्रीमध्ये कसं रूपांतर होतं हे या द्वारे मांडलं आहे. हा माझा ललित लेखनाचा पिंड आहे. मला वाटलं, मी लेखनाकडे कसं पाहातो याचं पुरेसं समर्पक उत्तर दिलं आहे.
 जसं सामाजिक वास्तव मला लेखक म्हणून लिहिण्यासाठी ओढून घेतं; तसंच नातेसंबंध आणि अंतर्मनाचा संघर्ष पण मला आव्हान देतो. माझ्या 'अंतरीच्या गूढगर्भी' कथासंग्रहात बहुतेक सर्व कथा ही अंतर्मनाची चित्रे आहेत. माझा आगामी कथासंग्रह 'मृगतृष्णा' मधील सर्वच कथा रिलेशनशिपच्या- स्त्री-पुरुष संबंधाच्या आहेत. पुन्हा अनेक कथा, ज्या प्रसिद्ध झाल्या आहेत - मासिक व दिवाळी अंकांतून - पण अजून पुस्तकरूपाने आल्या नाहीत, त्या विविध विषयाच्या, व्यक्तिरेखेच्या आहेत. सलग तीन थीमबेस्ड - एकाच विषय सूत्राभोवती फिरणाऱ्या विषयाचा कथासंग्रह प्रकाशित झाले म्हणून मी केवळ समाजिक विषयांवरच लेखन करतो असं वाचकांना वाटू शकतं. पण 'अंतरीच्या गूढगर्भी' व 'नंबर वन'मधील
P

कथाही या प्रामुख्याने अगम्य अशा मानवी मनावर प्रकाश टाकणाऱ्या आहेत असं वाटतं. कारण एक लेखक म्हणून मला स्वत:वर कोणताच शिक्का असावा असं वाटत नाही. मुख्य म्हणजे मला विविध क्षेत्रांवर, तसंच विषयावर सुचत असतं. तरीही अंतर्मनाचा शोध ही माझी एक लेखक म्हणून प्रेरणा आहे. माझं 'अखेरची रात्र' हे नाटक त्याचं लखलखतं उदाहरण म्हणून सांगेन.
  पण तरीही मागील तीन दशकातील बदलत्या काळाचं समकालीन वास्तव टिपणारा मी 'जागल्या' लेखक आहे. असा जागल्या लेखक की जो जागरूकतेनं व संवेदनशीलतेनं माणसं, समाज व त्यांचे प्रश्न टिपतो व त्याला स्वत:च्या भावविश्वात व विचारात मुरवून कथा / कादंबरीच्या रूपात प्रगट करतो. मी स्वभावाने सकारात्मक विचाराचा व आशावादी आहे. मला सिनिसिझम आवडत नाही. ती माझी वृत्ती नाही. मला उदात्ततेचं व मांगल्याचं आकर्षण आहे. आणि आजचं सडलेलं वर्तमान जगतानाही ध्येयवाद व 'सुबह कभी तो आयेगी' हा दुर्दम्य आशावाद मी बाळगतो. हा माझा मनःपिंड आहे, माझा स्वभावधर्म आहे. आणि त्यामुळेच माझे लेखन सिनिसिझम, अॅबसर्डिटीकडे झुकत नाही. ही माझी मर्यादा आहे का बलस्थान, त्याचा निवाडा वाचक व समग्र भान असणाऱ्या साक्षेपी समीक्षकांनी करायचा आहे. त्यांचा काहीही कौल असला तरी मी माझा अंत:स्वर जपतच व तो प्रगट करीतच लिहीत जाणार. वाचकांचा, प्रसिद्धीचा वा समीक्षकांच्या मान्यता / टीकेचा विचार न करता माझं सामर्थ्य-प्रतिभा आणि मर्यादेसह (ती कुणा लेखकाला, शेक्सपिअर वा शरदचंद्रासारखे कालातीत लेखक वगळता कुणाला, नाहीय?) लिहीत रहाणार. हे माझ्या लेखनाचे तत्त्वाज्ञान म्हणा ना!
. प्रा. रूपाली शिंदे :
 साहित्य लेखनाची सुरवात, त्याला मिळालेला प्रतिसाद आणि आज स्वत:च्या लेखनप्रवासाकडे मागे वळून पाहाताना या साऱ्यांचा विचार तुम्ही कसा करता? हे जाणून घ्यायला आवडेल.
लक्ष्मीकांत देशमुख :
 फार चांगला आणि विचार करायला लावणारा हा प्रश्न आहे. माझ्या घरात शिक्षणाची परंपरा असली तरी साहित्याची परंपरा व वाचण्याची हौस पण नव्हती. अपवाद माझ्या आईचा. ती पट्टीची वाचक होती. पण ती ज्या परंपरागत व धार्मिक संस्कारात वाढली व ज्या कनिष्ठ मध्यमवर्गीय स्त्रीजीवनाचा ती भाग होती, त्यामुळे तिचं वाचन हे खांडेकर, फडके आणि शैलजा राजे- शकुंतला गोगटे या परिघातलं होतं. पण तिनं मला वाचनाची गोडी लावली. हे माझ्या जडणघडणीत फार महत्त्वाचं

ठरलं असं मला म्हणता येईल. त्यामुळे मला का लिहावंसं वाटलं व त्याला सुरवातीचा प्रतिसाद कसा होता, हे सांगायचं म्हटलं तर आसपास साहित्यिक वातावरण असं नव्हतं, त्यामुळे हा मुलगा काहीतरी लिहितोय, ते छापून येतंय याचं कौतुक व्हायचं. पण त्यात चिकित्सा वा डोळस वाचन हा प्रकार नव्हता. पुन्हा मी सायन्सचा विद्यार्थी, म्हणून कॉलेजमध्ये पण लेखनप्रेमी मित्र असा नव्हता. तरीही मी आत्मप्रेरणेनं कसा लिहीत राहिलो याचं मला आजही न सुटलेलं कोडं आहे. पण तरीही नांदेडला माझ्या कॉलेज जीवनात नरहर कुरुंदकर तेव्हा पूर्ण जोमात असल्यामुळे त्यांचा अप्रत्यक्ष प्रभाव होता. त्यांना माझी एका कथास्पर्धेमधली बक्षिसपात्र कथा आवडली होती व त्यांनी त्याचं कौतुकही केलं होतं. ते मला हुरूप देणारं टॉनिक होतं. पहिल्या पाच-सहा कथांना विविध स्पर्धेत पारितोषिकं मिळाल्यावर आपण बरं लिहू शकतो हे जाणवलं; मग लेखनाचा सिलसिला जारी राहिला.
 'अंधेर नगरी', 'अंतरीच्या गूढगर्भी' या सुरुवातीच्या पुस्तकांना मात्र चांगला प्रतिसाद मिळाला. त्यावर अनेकांनी वृत्तपत्रात परिक्षणं लिहिली. मराठवाड्याचे थोर समीक्षक सुधीर रसाळांचं मला 'अंधेर नगरी' वाचून लिहिलेलं पत्र आजही माझ्या संग्रही आहे. पण तरीही माझा मराठवाड्यातील लेखक-समीक्षकांशी निकटचा (सतत प्रशासकीय बदलीमुळे) संबंध येऊ शकला नाही. त्यामुळे माझ्या साहित्यावर तेवढं लिहून आलं नाही हेही खरं. पण 'पाणी! पाणी!!' आणि 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' प्रसिद्ध झाल्यावर हे चित्र बदललं. या दोन कलाकृतींवर बरंच परीक्षण प्रसिद्ध झालं. वाचकांचाही पत्र-फोन द्वारे मिळणारा प्रतिसाद लेखक म्हणून मला सुखावून गेला. आता मला लेखनासाठी स्वप्रेरणा पुरेशी आहे. प्रतिसाद हा मी बोनस समजतो. बोनस हा पगारावर दिला जातो. त्यावर आपल्याला हक्क सांगता येत नाही. लेखन हे माझं काम. ते वाचकांना आवडलं वा ना आवडलं- दोन्ही त-हेचा प्रतिसाद... हा मला बोनस वाटतो. तो मिळाला तर आनंद आहे; पण मला हेही माहीत आहे का, आपला निश्चित असा वाचकवर्ग आहे. जेव्हा शास्त्रीय गायिका अश्विनी देशपांडे वा अभिनेत्री ज्योती सुभाष योगायोगानं झालेल्या भेटीत 'मी तुमचं अमुक तमुक वाचलंय आणि ते आवडलंय' असं सांगतात, तेव्हा समाधान वाटतं. लेखक म्हणून आपण नक्कीच प्रस्थापित झालो आहोत असं वाटतं
 मला दोन दिग्गजांच्या प्रतिसादाचा उल्लेख केला पाहिजे. एक म्हणजे विजय तेंडुलकर. त्यांना माझी 'अंधेरनगरी' ही कादंबरी खूप आवडली होती. त्यांनी मला एक त्याबाबत पत्र लिहिलं होतं, पण ते मला मिळालं नाही, याची हळहळ वाटते. पण 'ललित' मासिकात त्यांच्या आवडत्या ५० पुस्तकांत त्याचा समावेश केला होता, त्याचं मला समाधान आहे. दुसरी व्यक्ती आहे समीक्षक चंद्रकांत बांदिवडेकर.

त्यांनी 'अंधेरनगरी'वर प्रथम हिंदीत मग मराठीत परीक्षण लिहून माझी बरीच प्रशंसा केली. जेव्हा त्यांनी माझी 'इन्किलाब' वाचली, तेव्हा ती त्यांना प्रचंड आवडली होती. त्यांच्या पत्नीनी मला फोनवर सांगितलं होतं की, सरांना ते वाचल्यावर नाचावंसं वाटलं. प्रा. म. द. हातकणंगलेकर सरांना तिची जातकुळी टॉलस्टॉयच्या 'वॉर अँड पीस'शी आहे असं वाटलं. पण या दोघांनी त्यावर त्याकाळी वाङ्मयीन मासिकात परीक्षण लिहिलं असतं तर मला लेखक म्हणून त्याचा अधिक प्रस्थापित होण्यात मदत झाली असती. हीच बाब डॉ. सदानंद मोरे यांची. पण त्यांनी माझ्या साहित्य समीक्षापर ग्रंथात- ज्यासाठी आपण माझी ही मुलाखत घेत आहात- त्यात एक लेख लिहून मला उशीरा का होईना न्याय दिला आहे; असं म्हणता येईल.
 आज या टप्प्यावर मागे पाहताना वा विचार करताना वाटतं की प्रतिसाद हा लेखनाला मदत करतो असं नाही, पण लेखकाला हे सांगणारा असतो की, तू जे काही लिहित आहेस ते चांगलं आहे, ग्रेट आहे वगैरे वगैरे. पण त्यामुळे लेखकाला लिहिताना विशेष फरक पडतो असे नाही. काही लोकप्रिय बेस्टसेलर लेखक आम्ही केवळ वाचकांसाठी लिहितो, समीक्षकांची पर्वा करीत नाही असं जे म्हणतात तसं मी म्हणणार नाही. कारण समीक्षा व प्रतिसाद ही लेखकानं 'राईट स्पिरीट'नं घेतलं तर पुढील लेखनासाठी अप्रत्यक्षपणे ते अधिक कसदार होण्यासाठी मददगार सिद्ध होतात असं वाटतं. नांदेडच्या फेब्रुवारी २०१५ च्या होऊ घातलेल्या ३६ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने रणधीर शिंदे संपादित समीक्षा ग्रंथामुळे मला माझ्या लिखाणाकडे समीक्षकीय दृष्टीने पहाता येण्याची संधी मिळते आहे. समीक्षेमुळे लेखकाला त्याची बलस्थानं व त्याच्या लेखनाची जातकुळी पुन्हा ठसठशीतपणे जाणवते, तशीच त्याची त्यांना वाटणाऱ्या उणिवा, मर्यादाही लक्षात येऊ शकतात. अर्थात समीक्षकांचा शब्द हा काही अंतिम नसतो. तो त्यांचा दृष्टिकोन, त्यांचं मत असतं. पण सर्जनशील लेखन हे लेखकसापेक्ष असतं. त्याचा व्यक्तिमत्त्वाची, जीवनाची आणि त्याच्या अनुभवाची, ती घेण्याची आणि त्याच्या संवेदनशीलतेची मर्यादा त्याच्या लेखनाला असते. ते त्याचं एकप्रकारे वेगळेपण असतं. व सामर्थ्यही असतं. जेव्हा प्रा. अविनाश सप्रे यांनी 'हरवलेले बालपण' ही 'सिनेमासारख्या डॉकु-नॉव्हेल (docu - Novel) म्हणजे डॉक्युमेंटरी आणि कादंबरी याची सांधेजोड करणारी वेगळ्या परिमाणाची कादंबरी आहे' असं निरीक्षण नोंदवलं, मला ते पटलं. आणि आपण काही वेगळं लिहिलं याचं समाधान वाटलं!
विनोद शिरसाठ :
 साहित्य लेखनामागची आपली मूळ प्रेरणा कोणती आहे, जी तुम्हांला सर्व

साहित्यकृतींच्याद्वारे व्यक्त करावीशी वाटली असे वाटत आले आहे? जिचा शोध सातत्याने आपण घेतला पाहिजे असं तुम्हांला नेहेमीच वाटतं अशी कोणती गोष्ट आहे का?
लक्ष्मीकांत देशमुख :
 तुमच्या प्रारंभिक प्रश्नाला उत्तर देताना याबाबत थोडं विवेचन येऊन गेलं आहे, तरीही मला पुन्हा या प्रश्नाचं उत्तर जरा विस्तारानं द्यायला आवडेल. याचं प्रमुख कारण म्हणजे लेखक म्हणून माझ्यापरीनं हा प्रश्न मला मी सतत विचारत आजवर आलो आहे. याचं उत्तर असं देता येईल की, प्रत्येक लेखक हा जसा त्याच्या काळाचं प्रॉडक्ट असतो- त्याचा जन्म ज्या गावी / भागी झाला आहे, त्याचं घर-भवताल कसं आहे आणि त्याचे जीवन कशा व कोणत्या प्रकारे घडत गेलं आहे, त्यावर त्याचं लेखकपण व लेखनातलं (असेल तर) वेगळेपण- त्याहून अधिक त्याचा अंत:स्वर ठरला जातो. ही नियती म्हणा, योग म्हणा वा अन्य काही. ते काही आपल्या हाती नसतं. पण त्याचा एक फायदा असा की, एका सारखा दुसरा लेखक नसतो. कारण प्रत्येकाचं जगणं- अनुभव- त्याचा साद-प्रतिसाद, त्याचा नजरिया आणि नकारात्मक-सकारात्मक दृष्टिकोन, त्याचा ध्येयवाद वा त्याचा अभाव, जगाकडे गंभीर खेळकर, तिरकस किंवा अॅबसईतेनं पाहाणं वेगळं असतं. त्यावरून त्याच्या लेखनातून तो कांही एक जीवनाचा शोध घेत असतो. आणि तो त्याचा स्वत:चा स्वतंत्र असतो. माझाही आहे.
 माझा जन्म व पहिली किमान चाळीस वर्षे मराठवाड्यातील विविध गावात गेली. माझा जन्म, शिक्षण, नोकरीची पहिली पंधरा वर्षे, लग्न आदी तिथंच झालं. निजामकालीन संस्कार व खुणा आज पुसट झाल्या तरी त्या माझ्या घडणीच्या काळात बऱ्याच दृश्यमान होत्या; कारण हैद्राबाद शहर व आजच्या तेलंगण राज्याशी सतत संपर्क, नातेसंबंध. पुन्हा घरचं वळण मध्यमवर्गीय भाबड्या संस्काराचं. जीवनमान नेमस्त आणि समाजसंमत नीती-नियमानं बांधलं गेलेलं. पण माझं अफाट वाचन, जगाकडे पहाण्याची दृष्टी आणि अखंड जिज्ञासा यामुळे मनात डावीकडे झुकणारे विचार रुजत गेले. प्रथम औरंगाबादचं पदव्युत्तर जीवन, मग बँक आणि प्रशासनातले अनुभव- भेटणारी सर्व स्तराची माणसे यामुळे मी अनुभवसंपन्न झालो. समाजाचं एक व्यापक आकलन सहजतेनं होत गेलं आणि लेखन-वाचनात रमणारं माझं तीव्र संवेदनशील मन ते सारं जगण्यातून-पहाण्यातूनअनुभवण्यातून आणि वाचनातून आलेलं टीपकागदाप्रमाणे टीपत गेलं. आणि माझ्यातला लेखक घडत गेला.

 शेतीचं उदाहरण द्यायचं झालं तर काही पिकं- काही फुलं लवकर पक्व होतात, फुलून येतात; तर काहींना वेळ लागतो व उशिरानं फुलतात. जसा साधा ऊस व आडसाली उसाचा परिपक्व होण्याचा कालावधी कमी-अधिक आहे. मी आडसाली ऊसासारखा किंवा दीर्घकाळानं फुलोऱ्यात येणाऱ्या पिकासारखा 'लेट ब्लुमिंग' वर्गातला लेखक आहे. अजूनही माझी पक्व होण्याची व फुलण्याची प्रक्रिया थांबलेली नाही, त्यामुळे अजून दीर्घकाळ माझ्यात निर्माणक्षमता राहील असं माझं मन मला सांगतं. त्यामुळे एक फायदा असा होतो व मला झालाही आहे की, पक्व होण्याचे काही टप्पे गृहीत धरले तर प्रत्येक टप्यावर माझं लेखनाचं अनुभवक्षेत्र भिन्न भिन्न राहिलं. एका रंगात रंगणारा मी लेखक नाही. मी अनुभवाच्या संदर्भात सप्तरंगी इंद्रधनुष्यासारखा लेखक आहे. त्याचं थोडं विवेचन करतो.
 प्रथम किशोर-कॉलेजवयीन- लग्न होईपर्यंतच्या जीवनटप्प्यावरचे माझे लेखन काहीसे आत्मपर व भवतालचे होते. प्रेम, भिन्नलिंगी आकर्षण, मैत्री, रिलेशनशिपची गुंतागुंत या परिघातले होते. 'कथांजली' आणि 'अंतरीच्या गूढगर्भी'मधील कथा अशा स्तरावरच्या आहेत. पण बालपणापासून माझ्यात एक सामाजिक माणूस दडला होता, तोही तेवढाच जागृत होता. त्यामुळे त्याही काळात 'हिबकुशा', 'रात्र', 'जोकर'सारख्या कथा किंवा 'सलोमी' ही लघुकादंबरी लिहीत होतो. मग प्रशासनातील अनुभवावर 'अंधेरनगरी', 'ऑक्टोपस' लिहून झाले. मग जगताना, काम करताना ज्या प्रश्नांनी वा विषयांनी अस्वस्थ केलं, पछाडलं किंवा मिठीत घेतलं, त्यावर लेखन झालं. त्यातूनच थीमबेस्ड अशा तीन कथामालिका, कथासंग्रह रूपातून साकारले. 'तहानलेल्या महाराष्ट्राचा कथा' या उपशीर्षाचा पाणी प्रश्नाचा वेध घेणारा 'पाणी! पाणी !!' हा कथासंग्रह, स्त्री भ्रूणहत्येची दाहकता मांडणारा सामाजिक दस्तऐवज स्वरूपाचा संग्रह 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' आणि बालमजुरीच्या प्रश्नाचा वेध घेणारी कादंबरी 'हरवलेले बालपण' लिहून झाली. माझा आणखी एक अंत:स्वर आहे, तो म्हणजे मला कलावंतांच्या खाजगी जीवनाचं निकोप कुतूहल आहे. त्यात खेळाडू व सिनेकलावंत महत्त्वाचे. 'नंबर वन' मधून खेळाडूंमधील सामान्य माणूस शोधायचा मी प्रयत्न केला, तर 'अखेरची रात्र' मधून मी एका कलावंताच्या आत्महत्येचा शोध कला विरुद्ध माणूसपणा अशा द्वंद्वाची निर्मिती करून शोधला.
 आणि 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' बद्दल काय सांगावे? मला देश व जगातील घडामाडींचं व प्रश्नांचं चांगलंच भान व जागरूकता आहे. जगापुढे दहशतवाद, युद्ध, धर्माचा अतिरेक आणि 'खाऊजा' (खाजगीकरण, उदात्तीकरण, आणि जागतिकीकरण) मुळे जगातील गरीब राष्ट्रातील नागरिकांवर झालेला विपरीत

परिणाम... हे सारे प्रश्न मला एक लेखक व जागरूक माणूस म्हणून खुणावतात, प्रसंगी अस्वस्थ करतात. माणसाचं जगणं किती कवडीमोल आहे, हे दहशतवादामुळे जाणवतं. धर्म व विचारधारा अंतिमत: माणसाला अधिक छळतात- उद्ध्वस्त करतात. माझ्या या चिंतनातून 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' लिहून झाली. दुसऱ्या महायुद्धातील हजारो पोलंडवासी सोव्हिएत युनियनच्या तडाख्यातून जीव वाचवून कोल्हापूर नजिक निर्वासित म्हणून चार वर्षे (१९४४ ते १९४८) राहिली होती, त्यावर माझी आगामी कादंबरी आहे. तसेच काश्मीर प्रश्न आणि हैद्राबादचा मुक्तिसंग्राम यावरही मला कादंबऱ्या लिहायच्या आहेत. मुस्लीम धर्म, संस्कृती, दहशतवाद आणि सेक्युलरिझमची लागणारी कसोटी असे प्रश्न व त्यात अडकलेली व हेलपटून गेलेली, उद्ध्वस्त होणारी सामान्य माणसांची परवड व ससेहोलपट मला लेखक म्हणून खुणावत आहे.
 हे सारे मला लेखनातून शोधले पाहिजे व आपल्या प्रतिभा व प्रज्ञेनं जमेल तेवढं हे विश्व मराठी वाचकांपुढे मांडलं पाहिजे, ही माझी लेखनामागची बहुमुखी व बहुरंगी प्रेरणा आहे. आजवर आल्बर्ट कामूनं माणसाचं तुटलेपण व निरर्थकता यावर लिहिलं. ते मौलिक अर्थातच आहे; पण हेमिंग्वे आणि दोस्तोवस्की' यांनी विविध स्तराचे जीवन रसरसून भोगत ते लेखनातून मांडलं. मी स्वस्तुतीचा दोष पत्करूनही धाडसानं, पण तरीही नम्रतेनं सांगेन की मी त्या दुसऱ्या जातकुळीचा लेखक आहे. माझी लेखकाची आणखी एक जात आहे- ती 'प्रेमचंद' व 'आवारा मसीहा' म्हणून प्रसिद्ध असलेले कलंदर लेखक शरदचंद्र चटर्जी (शरद बाबू) यांची आहे. ती 'नाही रे' वर्ग, शोषित समाज आणि सामान्य माणसाप्रती कळवळा दाखवते व लेखनातून ती जिवंत करते. त्यामुळेच माझ्याही लिखाणात सामान्य वंचित गरीब माणूस आहे. प्रामुख्याने आणखी एक प्रवाह माझ्या लेखनात आहे, तो म्हणजे जीवनवादाचा. वि. स. खांडेकर हे जीवनवादाचे पुरस्कर्ते. तसेच साने गुरुजी, मामा वरेरकरही. आज कला व जीवनवादाच्या सीमारेषा एकमेकांत मिसळल्या आहेत; पण मला हा जीवनवादी अंत:स्वर प्रेरणारूप आहे. हे नक्की की, मी कुणाचंही अनुकरण करीत नाही, पण हे सारे स्तर माझ्या लेखनात कमी जास्त उमटलेले आहेत असं मला वाटतं.
 आज तुम्ही मला प्रश्न विचारून बोलतं केलं म्हणून हे सारं मलाच माझ्या संदर्भात जाणवलं, ते मी थेट व्यक्त केलं आहे. मला आशा आहे, यानं तुमचं समाधान झालं असेल.
प्रा. रूपाली शिंदे :  प्रशासक व लेखक या दोन पैलूंचा तुम्ही समन्वय कसा साधलात? प्रशासनातले

कामकाज, जबाबदारी पूर्ण करताना कधी लेखकाची नजर त्याचे चिंतन किंवा हे तीव्रतेने लिहिलेच पाहिजे या प्रकारचा अनुभव- स्वत:शी भांडण, कोंडमारा तुम्ही अनुभवलात का? तो अनुभव, ते विचार सांगावेत.
लक्ष्मीकांत देशमुख :
 माझ्या एका आत्मपर लेखनात मी माझ्यासाठी लेखन आणि प्रशासन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असं म्हटलं होतं, ते शंभर टक्के खरं आहे, असं मी आजही म्हणू शकतो. कारण लेखनाप्रमाणेही मी निर्मितीक्षम, रचनात्मक असं कल्पक प्रशासन केलं आहे. मी गंमतीनं म्हणतो, जशी मला कथा सुचते, तसं प्रशासनातलं कामही सुचतं. जसा माझ्यातला लेखक एखाद्या प्रसंगाकडे- एखाद्या माणसाकडे नव्या पद्धतीने बघतो, तसंच काम करताना प्रश्नांच्या नव्या अनोख्या बाजू मला चटदिशी समजतात आणि 'आऊट ऑफ बॉक्स' उत्तर सुचतं. त्यामुळे लेखक आणि प्रशासन असं द्वंद्व माझ्यासाठी नाहीय. हां, हे खरं आहे की, जे काही सुचतं ते त्याक्षणी कामाच्या व्यापामुळे लिहिता येत नाही, पण मी ते मनात काही काळ घोळवतो आणि त्याची डायरीत नोंद करतो. अनेकदा मनात त्याची उजळणी करतो व मग लिहितो. खरं सांगू का, कथानक सुचणं हाच एक क्षण प्रतिभेचा- हवं तर दैवीपणाचा क्षण असतो. बाकी ते कागदावर उतरविणं ही बरीचशी कामगिरी असते.
 दुसरं म्हणजे माझ्यातल्या लेखकाला अनुभवसमृद्ध होण्यात प्रशासकाची मदत झाली आहे. मला अनुभवासाठी प्रवास- स्थलांतर फारसं वगैरे करावं लागत नाही, तर ते कामकाजात माझ्या विविध पदांमुळे आपोआप माझ्यासमोर उभे राहातात. हां, त्याला हेरण्याची- पकडण्याची नजर- प्रतिभा हवी. ती मला थोडी नक्कीच साध्य आहे. 'पाणी! पाणी!!' मधील अनुभव हे मला प्रशासक म्हणून टिपता आले. ते इतर कोण्या- अगदी ग्रामीण कथाकाराला पण टिपता आले नसते कदाचित. पुन्हा केवळ ज्यांच्या वाट्याला दुःख, भोग येतात, तो तसाच मांडण्यापुरताच माझा अनुभव मर्यादित राहात नाही. त्याला कारण असलेले राजकारणी, नोकरशाही व त्यांची बाजू पण माहीत असते. त्यातून कशाप्रकारे सोडवणूक होऊ शकते हेही प्रत्यक्षरूपाने माहीत असतं. त्यामुळे माझ्या कथा केवळ प्रश्न मांडत नाहीत, दुःख रेखाटत नाहीत, तर त्याची दुसरी बाजू आणि त्याचं भविष्य- त्याची सोडवणूक कशी झाली, होऊ शकते, हेही मांडू पाहातात. अनेक कथेमध्ये हे घडलं आहे असं मला वाटतं. त्यामुळे प्रशासनानं मला अनुभव श्रीमंती व व्यापक नजर दिली, हे नक्की म्हणता येईल!

 लेखकानं धाडसी असलं पाहिजे व निर्भीडपणे व्यक्त झालं पाहिजे, असं म्हणण्याचा प्रघात आहे. माझ्याबद्दल सांगायचं तर जगण्यापेक्षाही मी लेखनात फार धाडसी व सच्चा आहे, असं माझं मत आहे. राजकारण, धर्मवाद, दहशतवादावर लिहिणं तसं सोपं नसतं. सांगलीत असताना एका व्याख्यानात मी इस्लाम संदर्भात 'इन्किलाब विरुद्ध जिहाद'च्या निमित्ताने काही वास्तव मांडले होते. ते एक स्थानिक वृत्तपत्रात संदर्भ सोडून आले, त्यामुळे माझ्या निषेधाचे सत्र सुरू झाले. अगदी पोलिस गुप्तचर विभागाकडून त्यावर अहवाल शासनाने मागवला गेला. त्यावेळी माझ्यावर चौकशी किंवा निलंबन - शिक्षा आदी कार्यवाही होण्याची पाळी आली होती. पण मी ठाम होतो. एका वाचनप्रेमी व मला जवळून ओळखणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यामुळे काही झालं नाही. दुसरं असंच एका लेखामुळे मला शासनाचा मेमो व तीव्र नापसंती व्यक्त करणारा खलिता आला होता. अशी दडपणं प्रशासक असलेल्या लेखकाला सहन करावी लागतातच. कारण मी आजचं वास्तव लिहितो हे त्याचं कारण आहे.
 एक प्रशासक म्हणून धार्मिक दंगली, हिंसाचार आणि जातीय ताण-तणावाला भिडावं लागतं, काही एक निर्णय घ्यावे लागतात. हे सारे अनुभव एक माणूस म्हणून, एक लेखक म्हणून काम करतानाही मनाच्या एका कोपऱ्यात खुणावत असतात, त्याची नोंद घेत असतात. हे अनुभव मी 'अंधेरनगरी', 'अग्निपथ' व 'जात नाही ती जात', 'हिरा जो भंगला नाही' आदी कलाकृतींमधून धीटपणे व्यक्त करायचा प्रयत्न केला आहे. धार्मिक दंगल, दलितांवर होणारे सामुदायिक बहिष्कार आणि सत्ताधाऱ्यांची मनमानी... या साऱ्यांवर मी यापुढे अधिक लिहिणार आहे... प्रत्यक्ष काम करताना त्याचा मी जरूर समर्थपणे सामना केला आहे, त्यासाठी वारंवार होणारी बदली आणि दोन वेळा अकारण मानसिक खच्चीकरण करणारी चौकशी मी सहन केली आहे. हे अनुभव मला माझ्या प्रशासकीय कारकिर्दीत मांडता आले नाहीत, कारण पदाची मर्यादा, कायदे कानून- नीतीनियम.पण आता यापुढे कदाचित त्यावर मी नक्कीच लिहू शकेन असं वाटतं !
प्रा. रूपाली शिंदे :
 प्रशासनातील नोकरी करताना 'लेखक' असणं याचा साहित्य वर्तुळात वावरताना फायदा झाला का? लेखक असणं हे तुमच्यातील प्रशासकाला एक "रिलीफ' आहे असं वाटतं, की व्यक्त होण्याचा अवकाश आहे?
लक्ष्मीकांत देशमुख :
 अगदी स्पष्टपणे सांगायचं झालं तर माझं नि:संदिग्ध उत्तर 'नाही' असंच आहे. मला प्रशासकीय नोकरीत असल्याचा लेखक म्हणून साहित्यवर्तुळात फायदा नाही,

उलट तोटाच झाला आहे असं मला वाटतं. कारण लेखकांच्या वर्तुळात असणं व त्याचं नेटवर्किंग करणं हे आज मराठी साहित्यक्षेत्रात गुण (?) मानले जातात, ते माझ्यात अजिबात नाहीत. ते माझ्या वृत्तीत नाहीत म्हणा, की ते मला योग्य वाटत नाही म्हणा; किंवा प्रशासकीय कामाचा व्याप- बदल्या यामुळे जमले नाही म्हणा, पण मी साहित्यक्षेत्राच्या परिघाबाहेरचा राहिलो आहे. त्यासाठी मी कधी जाणीवपूर्वक प्रयत्न फारसे केले नाहीत. आज मागे वळून पाहाताना ते केले असते तर लेखक म्हणून अधिक प्रस्थापित (?) झालो असतो. प्रशासनातील काही अन्य लेखकांनी हे असं केलं आहे याची माहिती आहे. पण माझ्याकडून ते झालं नाही, हे मात्र खरं.
 लेखन हे माझ्यातल्या प्रशासकाला 'रिलीफ' आहे असं मी मानत नाही. त्याचा अर्थ असा होतो की, काम हे (माझ्या संदर्भात प्रशासकीय काम) केवळ पोट भरण्यासाठी करायचं असतं. त्यासाठी पाट्या टाकायच्या असतात. आणि मन मारून . काम करावं लागतं. कनिष्ठ पातळीवर काम करणाऱ्या प्रशासक कर्मचारी लेखकाबाबत कदाचित लेखन 'रिलीफ' होऊ शकतं. मला आता सहज आमचा परभणीच्या बी. रघुनाथांचं नाव आठवतं. ते सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ कारकून (आधी हंगामी पण) होते. त्यांना वरिष्ठांच्या जुलुमाचा, लहरीचा सामना करावा लागत होता. त्यांना लेखन रिलीफ नक्कीच वाटत असणार. कारण त्यांच्यासारख्या अव्वल दर्जाच्या प्रतिभावंत साहित्यिकाचं खात्याला फारसं सोयर-सुतक नव्हतं. उलट तो दुर्गुण ठरत होता. माझं तसं नाही. कारण एक तर मी 'बॉय चॉईस' बँकेची आरामदायी, कमी मानसिक कटकटीची नोकरी सोडून प्रथम डेप्युटी कलेक्टर- मग कलेक्टर झालो. दुसरं, प्रथमपासून मी क्लास वन ऑफिसर होतो. पुन्हा मला प्रशासनात बरंच भरीव काम करता आलं. अनेक प्रशासकीय पुरस्कार - अगदी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे प्राप्त झाले. त्यामुळे कुचंबणा अशी झाली नाही. त्यामुळे लेखनात रिलीफ शोधणे हे माझ्यासाठी अपरिहार्य नव्हते. उलटपक्षी लेखक असल्याचा प्रशासनात झालाच तर फायदा झाला. कारण इतरांपेक्षा लोकांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, पुर्नवसनांचे प्रश्न मी अधिक संवेदनशीलतेने समजून त्यावर उपाय योजीत गेलो.
 माझ्यातला लेखक व माझ्यातला प्रशासक एका अर्थाने दोन्ही क्षेत्रात फायदेशीरच राहिला. हां- प्रशासनाच्या नियमाप्रमाणे प्रत्यक्ष नेत्यांचे नाव घेऊन लेखन करणे, धोरणावर टीका करणे शक्य नव्हते, पण ते त्या विभागाचे नियम असतात आणि ते पाळावे लागतातच. पण लेखन हे कळ दाबून काढायचे, टिपायचे छायाचित्र नसते, तर प्रतिभेचे रंग मिसळलेले, अंतरंगातून उमटलेले पेंटिंग असते. वृत्तपत्रीय लेखन छायाचित्र असते तर सर्जनात्मक कथालेखन हे पेंटिंगप्रमाणे अलग कलात्मक वैश्विक वा सार्वत्रिक सत्य असते. माझ्या समजुतीप्रमाणे माझे लेखन पेंटिंगप्रमाणे आहे,

छायाचित्राप्रमाणे खचितच नाही - हे स्वत:कडे कठोरपणे पाहात आपल्याच लेखनाची चिकित्सा केली तरी ते सत्य आहे असे मी ठामपणे म्हणू शकतो. माझ्यात - वाचकसमीक्षकात मतभेद एवढेच होऊ शकतात की ते किती उच्च दर्जाचे व वेगळे आहे. ते पेंटिंग आहे का छायाचित्र असा प्रश्नच उद्भवत नाही.
प्रा. रूपाली शिंदे :
 वास्तव चित्रणावर भर दिल्यामुळे तुमच्या साहित्यकृतीमध्ये व्यक्तिरेखेचे मनोविश्लेषण अतिशय कमी प्रमाणात येते असे वाटते. त्याला जोडून आणखी एक मुद्दा. कादंबरीत भोवताल, गांव यांचं विस्तारानं वर्णन केलं तर वास्तवाची पकड सैल होईल असं वाटत असल्यामुळे तुम्ही त्याचे तपशिलाने वर्णन केल्याचे आढळत नाही. यावर आपणास काय म्हणायचे आहे?
लक्ष्मीकांत देशमुख :
 आपल्या या निरीक्षणाशी मी पूर्णत: सहमत होऊ शकत नाही. आज मुलाखतीच्या निमित्ताने मला माझे लेखनविश्व तपासण्याची संधी आहे. त्यामुळे शक्य तितके निर्लेपपणे व प्रामाणिकपणे मी उत्तर देणार आहे- देत आहे. आजच्या वर्तमानाचा आणि धगधगत्या सामाजिक वास्तवाचा मी भाष्यकर्ता लेखक आहे, इथवर तुमचं निरीक्षण मला मान्य होण्याजोगे आहे. मात्र आपण जर 'अंतरीच्या गूढगर्भी', 'अग्निपथ', "नंबर वन' मधील कथा पाहिल्या वा 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' मधील तराना व झैनब, कारमाल- अनाहिता व अन्वर-तरानाचे परस्पर नातेसंबंध, स्त्रीपुरुषांच्या रिलेशनशिपचे नातेसंबंध पाहिले तर तेथे तुम्हास सखोल मनोविश्लेषण आढळून येईल. मात्र तुमचे निरीक्षण 'अंधेरनगरी' वा 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी'ला काही प्रमाणात लागू होईल. तेथे पात्रापेक्षा समजाचित्रण- तेही सामूहिक जीवनाचं चित्रण मला करायचं होतं, तेथे अनुभवाचा एकेरीपणा, सत्तेसाठी काय वाट्टेल ते करणे वा 'मुलगाच हवा' या अट्टाहासातून स्त्रीभ्रूण हत्या करणे हे ठसठशीतपणे मांडणे जरूर आहे. पण जर वास्तव काळे- करडेच असेल व तेथे ग्रे छटा नसेल तर उगीच लेखनात ती का मांडायची? जो मालक बालकामगारांचे शोषण करतो, तो काळाच रंगवणार मी- कारण तेच वास्तव आहे, तेथे त्याचे अकारण मानवीकरण करणे सत्यापासून दूर जाण्यासारखे आहे. जगात क्रूर, विकृत आणि भावनाशून्य माणसे असतात, त्यांना उगाच 'ग्रे' शेड देत त्यांचे मानवीकरण करण्याची मला गरज वाटत नाही, उलटपक्षी ते माझ्यासाठी कलात्मक असत्यच आहे! एखाद्या प्रश्नाभोवती, एखाद्या संस्थेभोवती कथानक फिरत असेल तर तेथे माणसांपेक्षा तो प्रश्न, ती संस्था व तिचे स्वायत्त व्यक्तिनिरपेक्ष जगच अधिक प्रमाणात येणार. तेथे फारसे मनोविश्लेषण

येणार नाही हे उघड आहे.
 पुन्हा मी ज्या त-हेचे अनुभव लिहून मांडतो, जे जग- ती माणसं मी साहित्यकृतीमधून दाखवतो, त्याप्रमाणे लेखनाचा घाट निर्माण होतो. त्यामुळे तुमचे निरीक्षण काही कलाकृतींच्या संदर्भात ढोबळपणे मान्य करता येईल. पण त्यात मनोविश्लेषण येत नाही हे मला मान्य नाही. फार तर लेखक म्हणून माझी मर्यादा आहे असे म्हणता येईल.
 तुमचं आणखी एक निरीक्षण, की माझ्या लेखनात गाव - भवताल फार तपशिलानं येत नाही, वास्तववादाची त्यामुळे पकड कमी होईल म्हणून... यावर मी थोडासा संभ्रमित आहे. खरंच असं माझ्या लेखनात होतं का? वाचकसमीक्षकांना असं खरंच वाटतं का? जर प्रकट चिंतन करायचं म्हटलं तर एक विधान मी करू शकेन. मला माझं स्वत:चं म्हणता येईल असं गाव नाही. कारण मला शेतजमीन नाही, त्यामुळे एका गावाशी कायम असं माझं नातं नाही. पुन्हा शिक्षण, बदलीमुळे मी निम्म्या महाराष्ट्रात वावरलो आहे. कोठेच तीन वर्षांपेक्षा जास्त राहिलो नाही. त्यामुळे असेल की काय, पण मी स्वत:ला 'बंजारा' समजतो. जरा तुम्ही विचार करा, गुन्हेगारीचा शिक्का असल्यामुळे एका गावी न रहाणारी पारधी जमात, अन्य भटकी मंडळी यांना तरी कुठं गाव असतं? त्यांनी लिहिलंलिहीत आहेतच की- त्यांच्या लिखाणात गाव कुठे असतं त्या अर्थानं जे आपल्या अंतरंगात पूर्णपणे मुरलेलं कुठं असतं? असा अदेशी भटका 'जनम् जनम् का बंजारा' हा लेखक म्हणून माझा फार मोठा तोटा आहे. मला नेहमीच ग्रामीण भागात शेतकरी व अन्य कारागीर जाती-जमातीत जन्मास आलेल्या व बाल ण व किमान नोकरीपर्यंतचा काळ तरी एका गावात व्यतीत केलेल्या, मुळे घट्ट असणाऱ्या लेखकांचा हेवा वाटत आला आहे. कारण आज शहरांच्या यांत्रिकीकरणामुळे व अमानवीकरणामुळे माणसे भेटत नाहीत, बोलत नाहीत. त्यामुळे ती कळत नाहीत. मुख्य म्हणजे त्यांच्या जीवनात फारसं घडत नाही ... मग लेखनाला कच्ची सामग्री व अनुभव कसे मिळणार?
 माझा आणखी एक वेगळाच वांधा आहे. मी धड ग्रामीण नाही अन् शहरी पण नाही. दोन्हीत वावरणारा, पण दोन्हीत फिट न होणारा. उच्चवर्गीय प्रशासनवर्तुळात वावरत असूनही विचार व संस्कारानं मध्यमवर्गीय मूल्यं मानणारा असल्यामुळे तेथेही मिसफिटच आहे. पण असे माझ्यासारखे अनेक आहेतच की. त्यामुळे त्यांच्या लेखनाचा घाट आपोआपच वेगळा राहाणार. तिथं कदाचित गाव असणार नाही- पण माणसं व प्रश्न असणारच की, असतातच की.
 आपण 'अंधेरनगरी' ही माझी कादंबरी जर बारकाईनं वाचली तर एका

शहराचं ते विस्तृत तपशिलाचं चित्रण आहे, असं तुम्हाला म्हणता येणार नाही? माझ्या मते तेथला शहर व त्याचा गाळीव अर्क म्हणजे नगरपालिका हेच या कादंबरीचं मध्यवर्ती पात्र आहे. 'पाणी! पाणी!!' मधील सर्वच कथांमधून येणारा अनुभव हा प्रातिनिधिक स्वरूपातील तहानलेल्या गावाचा व गावगाड्याचा आहे असं नाही का म्हणता येणार? म्हणून माझ्या लेखनात गाव - भवताल नाही असं म्हणणं कदाचित उचित ठरणार नाही.
प्रा. रूपाली शिंदे :
 निवेदन प्रधानता- निवेदनाचा दृष्टिकोन हा अतिशय महत्त्वाचा आहे ही भूमिका घेऊन लेखन होते का? पात्रप्रधानता तितकीशी महत्त्वाची नाही असे तुम्हास का वाटते?
लक्ष्मीकांत देशमुख :
 या प्रश्नातून तुम्हांला जे सूचित करायचे आहे वा रोख आहे, तो मला यथार्थ वाटत नाही. पण याचं माझ्या लेखनाच्या संदर्भात उत्तर द्यायचं झालं तर प्रत्येक कथा वा कादंबरी स्वत:चा फॉर्म घेऊन येते असं म्हणलं जातं, ते मला पटतं व माझ्या साहित्यातही ते आढळून येऊ शकतं, असं माझं प्रांजळ मत आहे. अर्थात निवेदनप्रधानता हा कथानकासाठी महत्त्वाचा आहे, जसा तो एकमेव व माझ्या प्रत्येक कृतीमध्ये आलेला आहे, असं मला नाही वाटत. उलट मला पात्र प्रधानता अधिक महत्त्वाची वाटते. उदाहरण देऊन बोलायचं झालं तर 'स्वत:लाच रचित गेलो' या कथेमधील अनाथ असल्याचं जन्मरहस्य कळल्यावर नवऱ्याकडून झिडकारल्या गेलेल्या कमलचं काव्यवेड व त्यामुळे तिचं ‘पोएट्री थेरपी'नं बरं होणं यात कमलचं पात्र कथेचा गाभा असून त्या पात्राच्या व्हयू पॉईंटनं कथा आकारास येते. 'जोकर' मधील बुटका जोकरच्या उंचीपुढे त्याचे माणूसपण झिडकारले जाते, या कथानकात जोकरचं चरित्रचित्रण महत्त्वाचं आहे. 'अंधेरनगरी'मध्ये निवेदनशैलीत एका नगरपालिकेची कहाणी- तिच्या असंख्य पात्रे व घटनातून साकार होते, तर 'ऑक्टोपस'मध्ये घटनाप्रधानता आहे. पण तेथेही प्रमुख पात्रांचे चरित्र-चित्रण ठशठशीतपणे आले आहे. त्यामुळेच गजेंद्र अहिरे या प्रतिभाशाली दिग्दर्शकाला त्यावर सिनेमा करायचा आहे. त्यामुळे तुमच्या निरीक्षणाशी मी सहमत होऊ शकत नाही.
 पण ललित साहित्यातून लेखकाला काहीतरी सांगायचं असतं. मी संदेश वा विचार म्हणत नाही, तर नात्यांची गुंतागुंत वा समाजिक राजकीय प्रश्नांकडे लक्ष वेधायचं असतं. त्यामुळे लेखकाचा 'व्हयू पॉईंट' महत्त्वाचा ठरतो. तो ते कसा व्यक्त

करतो? त्याचे 'डिव्हाईस' काय आहे? निवेदन, भाष्य, पात्रांचे चरित्रचित्रण, संवाद, घटनाप्रधानता- हे सारे रायटींग डिव्हायसेस आहेत. अमुक एक 'डिव्हाईस' वापरायचा म्हणून लेखन होत नाही, तर जे कथाबीज लेखक साकारतो, तो कथाशय डिव्हाईस निवडतो. तरीही कळत-नकळत प्रत्येक लेखकाचा एक वा काही विशिष्ट डिव्हाईस वापरण्याकडे स्वाभाविक कल असतो.
माझी स्वत:ची लेखन प्रक्रिया अत्यंत स्वाभाविक व नैसर्गिक आहे. मला फक्त सुरुवात सुचायला वेळ लागतो. पहिला परिच्छेद जमला की पुढे नैसर्गिक ऊर्मीनं लिहीत जातो. आणि जेव्हा कथा पूर्ण होते, तेव्हा मीच चकित होतो. 'अरेच्चा! हे कथाबीज सुचताना मनात नव्हतं, पण ते अंत:प्रेरणेतून लिहिताना आलं कसं?-' पण हे असं माझं मीच लेखक म्हणून चकित होणं मला लेखक म्हणून समाधान देणारं असतं. आणि मग ती वाचताना वाटतं, की मी अमुक एक लेखनाचं 'डिव्हाईस' वापरलं आहे. म्हणून माझ्या लेखनात मी पात्रचित्रणास महत्त्व देत नाही हे तितकेसे प्रस्तुत वाटत नाही. अर्थात साक्षेपी समीक्षक व मराठीचे अभ्यासक म्हणून तुमचं हे मत मला पटत नसलं तरी असू शकतं, हे मान्य करण्यास मला संकोच वाटत नाही.
प्रा. रूपाली शिंदे :
 'पाणी! पाणी!!' (उदक) या 'तहानलेल्या महाराष्ट्राच्या कथा' या उपशीर्षकासह असलेल्या कथासंग्रहास दुष्काळ, पाण्याचा अभाव आणि त्या अनुषंगाने अनेक उपविषय- पुरुष सत्ता, जातजाणीव, प्रशासनाची भूमिका, शहरी मंडळीचा दृष्टिकोन असे अनेक विषय आले आहेत. त्यामुळे नेम एकीकडे धरताय आणि दगड दुसरीकडे लागतोय असं घडतं? तुम्हांला काय वाटतं?
लक्ष्मीकांत देशमुख :
 क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही या प्रश्नानं गुगली टाकलीय, पण लक्षात घ्या, मी 'नंबर वन' हा खेळावरचा कथासंग्रह सिद्ध केलाय, त्या अर्थानं मी खेळाडू आहे आणि अशा प्रश्नाची गुगली कशी परतवावी हे मी जाणतो. जोक्स अपार्ट, या प्रश्नानं माझ्या पुस्तकाचं महत्त्व तुम्ही अधोरेखित केलंय असं मला वाटतं. कसं ते सांगतो.
 पाणी टंचाई व त्याची परिणती म्हणजे कोरडा दुष्काळ मी जवळून पाहिला आहे, त्याचा सामना केला आहे. त्याचा मानवी जीवनावर, जगण्यावर व नातेसंबंधांवरमग ते पती-पत्नीचं असो, कुटुंबाचं असो, गावकीचं असो वा सामान्य माणूस विरुद्ध राजकारण-प्रशासन असो, त्यात मला ललित लेखक म्हणून कुतूहल कणव, कन्सर्न आणि सहअनुभूती आहे. त्यात मला कथा दिसते- ती वेदनेची,

पराभवाची तसेच संघर्षाची; जिद्दीनं पुन्हा सावरण्याची आणि प्रसंगी कोसळण्याची असते. ती घडते, तिला अनेक पदर असतात-अनुस्यूत जाणिवा असतात. पुरुषप्रधानतेमुळे स्त्रीला दुय्यम लेखलं जातं व तिचं मांसल शरीर हेच महत्त्वाचं, ते कष्टानं सुकलं तर बाजार जवळ करणं या पुरुषसत्तेच्या वास्तवाला जेव्हा दुष्काळाची जोड मिळते व स्त्रीला घराबाहेर पडावं लागतं तेव्हा 'बांधा' ही कथा साकारते. त्यातला पुरुषप्रधान वर्चस्वाचा पदर वगळा, ती कथाच संभव होणार नाही. इथं नेम व दगड एकाच लक्ष्यावरचा आहे असं मी ठामपणे म्हणेन. 'कंडम' कथेत पाण्यावरून जातीच्या जाणीवा प्रखरतेनं पढे येतात. एक दलित स्त्री विहिरीत पडून मरते व पाणी विटाळतं, यामध्ये जातजाणीव ही केंद्रस्थानी आहे. मी तर समीक्षकांना एक नवा दृष्टिकोन या पुस्तकाच्या निमित्तानं असा देतो की, पाण्याला जात असते असं मी दाखवलंय. हो- पाण्याला जात असते. ब्राह्मण कुटुंब पाणी टंचाईचा कसा सामना करते हे परिकथा सदृश्य 'खडकात पाणी' मध्ये आलं आहे, तर दलितांना बहिष्कृत करताना त्यांचं पाणी पण तोडलं जातं आणि त्यांचा जीवन उद्वस्थ कसं होतं हे 'उदक'मध्ये मुखर झालं आहे. मराठ व बहुजन समाजासाठा पाणी टंचाईचा प्रश्न हा जातीच्या जाणीवेनं कसं विपरीत वळण घेते हे 'कंडम' व 'मृगजळ'मध्ये आलं आहे. किंबहुना, बऱ्याच दिवसांपासून माझ्या मनात या चार कथांचं मिश्रण करून 'पाण्याच्या चार जाती' असं एक नाटक लिहावं असं घोळत आहे. पाहू या ते कसं जमतं ते! असो. पण या अनुषंगाने तुम्ही समीक्षकांनी जरा 'ऑऊट ऑफ बॉक्स' विचार करावा असं मी सुचवलं तर तो माझा अगोचरपणा समजू नये, ही नम्र आशा. मी इतर कथेचा संदर्भ देत विवेचन विस्तारानं जरूर करू शकेन, पण तो विस्तारभयास्तव न करता एवढंच म्हणेन की, एक लेखक म्हणून मला लेखनाबद्दल, समीक्षेबद्दल जेवढं कळतं त्यावरून मी असं ठामपणे म्हणू शकतो की, माझा नेम व दगड अचूक लक्ष्यावरच लागलेला आहे.
प्रा. रूपाली शिंदे :
 थेट जगण्या-मरण्याचा प्रश्न आला की माणूस असाहाय्य होतो- अमानुष होतो, अगतिकतेचा गैरफायदा घेतो, याचं रोकडं चित्रण तुम्ही मांडलं आहे. ते अनेकदा अतिरंजित होतं- वेगवान घटनाक्रम आणि दाहक वास्तव यांची सांगड घालताना कलात्मक विश्वासार्हता निर्माण करण्याची आपणास गरज होती असं वाटत नाही का? याबाबत तुमचे मत काय आहे ते सांगावे.
लक्ष्मीकांत देशमुख :
 बरं झाले हा प्रश्न तुम्ही उपस्थित केला ते. कारण माझी याबाबत काही विशिष्ट

मतं आहेत. मी माणसाच्या जगण्याच्या संघर्षाच्या कथा लिहितो, माणूस जगताना किती असाहाय्य होतो, कधी अमानुष वागतो तर कधी अगतिकतेचा (इतरांच्या) गैरफायदा घेतो, हे रोकडे सत्यच आहे. ते मी अनेक कलाकृतींतून मांडले आहे. ते अतिरंजित आहे का? त्यात घटनाक्रमाचा वेग व परखड दाहक वास्तवाची सांगड घालताना कलात्मक विश्वासार्हता निर्माण माझ्या लेखनातन होत नाही- असं आपलं प्रश्नवजा निरीक्षण आहे. त्यावर मी हे सांगू इच्छितो की, अतिरंजितपणा कशाला म्हणायचा हाच मुळी प्रश्न आहे. जेव्हा माणूस (स्त्री पण) जुनाट परंपरेला कवटाळीत भ्रूणहत्या करतो, डॉक्टर पुरावा राहू नये म्हणनू स्त्रीभ्रूण कुत्र्याला खाऊ घालतात- हे वास्तव आहे. ते अतिरंजित कसं म्हणायचं? मालक जेव्हा बालकांना कायदे धाब्यावर ठेऊन कामावर ठेवतो व त्यांचं शोषण करतो व त्याचं बालपण करपून जातं - हे ज्यांना ते विश्व माहीत नाही त्यांना अतिरंजित वाटणं साहजिक आहे. पण ते धगधगतं वास्तव आहे आणि (तथाकथित) कलात्मक विश्वासाहर्ता समीक्षकांना जाणवावी म्हणून जे काळं गडद आहे, ते पुसट करून त्यात 'ग्रे' शेडस् शोधलीच पाहिजेल का? मान्य, की क्रूर व जुलमी व्यक्तींनाही मानवी भावना असतात- त्या भीतीच्या असतात. खचितच करुणा- प्रेमाच्या नसतात. 'हरवलेले बालपण' मध्ये दुर्गाप्रसाद हा बालकांचं शोषण करणारा उन्मत्त अती भोगानं एडस्चा शिकार होतो व मरणाच्या दाराशी भीतीनं हतबल होतो. हे मी दाखवलं आहे, ते कलात्मक विश्वासार्ह नाही का? पण त्याचा सुशिक्षित मुलगा अंबाप्रसाद थंडपणे क्रौर्याचे शोषणाचे अनैतिक तत्वज्ञान सांगतो, तो वाचताना वाचकांच्या अंगावर काटा येईल, पण तो वास्तव नाही का? प्रत्येक पात्राचं 'ग्रे' शेडमध्ये मानवीकरण करणंच कलात्मक असत्य मी म्हणतो. त्यामुळे बळी जाणाऱ्या शोषित माणसांच्या चित्रणात सहृदयदेनं स्पर्श देत मी कलात्मक विश्वासार्हता निर्माण केलीय असं मला वाटतं. तसेच मेलोड्रामा- अतिरंजिकपणाला साहित्यात का त्याज्य मानायचं? सिनिसिझम व अबॅसर्डिटीला आपण कलात्मक सत्य मानत असू तर अमानुष वागणाऱ्या माणसाचं रेखाटन करतानाचा डार्कपणा अतिरंजित समजून कलात्मकतेच्या फूटपट्ट्यावर कमअस्सल का मानायचा? बोधवाद, ध्येयवाद, मंगलता यांना साहित्यात तुच्छ का लेखायचं? जर ते कथेद्वारे लेखकाचं तत्वज्ञान म्हणून न घेता कथेचा अविभाज्य भाग म्हणून येत असेल तर का नाही स्वीकारायचं?
 मी येथे रामायण व महाभारताचं उदाहरण देईन. त्याला मी वाल्मीकीदृष्टी (रामायणकार) व व्यासदृष्टी (महाभारतकार) असं म्हणतो. व्यासदृष्टी काय सांगते? माणसाचा लोभ, विकार, सत्तासंघर्ष, पतन, कोसळणं व अनैतिकता सांगते. दाजी पणशीकरांनी तर महाभारत हा एक सूडाचा प्रवास आहे असाच अन्वयार्थ लावला आहेच की! या उलट वाल्मीकदृष्टी आदर्शवाद सांगते, उच्च मूल्यांचा आग्रह धरणाऱ्या

व्यक्तिरेखांना देवत्वाच्या सीमेपर्यंत नेते, एकपत्नीव्रत, पित्याची (चुकीची असली तरी) आज्ञा पाळणे, बंधधर्म (भरत-लक्ष्मण) आणि सेवाभाव (हनुमान) सांगते. हे आदर्श आहेत. ते मानवी संस्कृतीचं ध्येय आहे. तो एक असा 'युटोपिया' आहे. ज्याकडे वाटचाल करणं हे मानवी संस्कृतीच्या विकासाची खूण आहे. माणूस तसा शंभर टक्के आहे का? नाही, पण बऱ्याच प्रसंगी तसा वागतो. सीमेवर देशाच्या रक्षणासाठी जवान प्राण का देतात? कुष्ठरोग्यासाठी बाबा आमटे जीवन का वेचतात? हे सारे आदर्श आहेत. उद्या बाबा आमट्यांवर कुणी कादंबरी लिहिली तर ती आदर्शवादीच असणार. तिला का अतिरंजित कलात्मक म्हणायची?
 तर मला सांगायचं आहे की, साहित्यात व्यासदृष्टी व वाल्मीकीदृष्टी दोन्हींना स्थान आहे, असावं. त्यामुळे अकारण कलात्मक विश्वासार्हतेचं स्तोम माजवीत केवळ व्यासदृष्टी साहित्यात श्रेष्ठ व वाल्मीकीदृष्टी कमी प्रतीची मानायचं कारण नाही. मराठी समीक्षकांची समीक्षा बऱ्याच प्रमाणात वाल्मीकीदृष्टी नाकारते याचा मला खेद वाटतो. माझं लेखन व्यासदृष्टीनं वास्तव मांडीत असताना त्या जोडीनं वाल्मीकीदृष्टीनं त्यात आशावाद पेरणारं आहे, असं मी स्वत:बद्दल म्हणू शकेन.
प्रा. रूपाली शिंदे :
 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' ही तुमची बृहदकादंबरी. त्यासाठी आपण केलेले मनन, चिंतन व अभ्यासाबद्दल थोडं सांगावं. मराठी साहित्यिक अभ्यास-चिंतनाच्या बाबतीत कमी पडतात. 'प्रतिभावंत' असणं हे कारण आहे का? त्याचबरोबर वाचनचिंतन-लेखन-पुनर्लेखन याची तुमची काय पद्धत आहे हे जाणून घ्यायला आम्हांला आवडेल.
लक्ष्मीकांत देशमुख :
 आपण एकाच प्रश्नात अनेक उपप्रश्न विचारले आहेत; पण त्याचं उत्तर द्यायला मला आवडेल. प्रथम मी तुमच्या या निरीक्षणाशी सहमत आहे की, मराठीमधले लेखक अभ्यास - चिंतनाबाबत कमी पडतात. त्याचे कारण 'प्रतिभावंत' असणे हे आहे का? हा फार मार्मिक प्रश्न आहे. तुम्ही हे वचन- कोटेशन- जाणता की, प्रतिभा एक टक्के असते (सुचणे) व नळ्याण्णव टक्के परिश्रम असतात. टक्केवारी जाऊ द्या, पण केवळ नवं काही सुचलं पण अभ्यास-चिंतन नसेल तर कलाकृती मोठ्या होत नाहीत. स्वानुभव आणि सार्वत्रिक अनुभवावर लिहिण्याबाबत अभ्यासाची कदाचित गरज नसेल. पण जेव्हा आपण मोठा विषय घेतो, त्याचा आवाका कुटुंब व स्वत:चा सीमित भवतालापलीकडचा असतो, तो जेव्हा गांव-प्रांत-देशाच्या सीमा ओलांडणारा असतो, तेव्हा अभ्यास तर लागतोच. आपण नेहमीच वाचतो की परदेशातील लेखक

कादंबरी लिहिण्यापूर्वी वर्ण्य विषयाचा किती अभ्यास करतात ते. अगदी रंजनपर 'बेस्ट सेलर' ठरवून लिहणारा आर्थर हेलीनं 'हॉटेल', “एअर पोर्ट', 'प्राईज'सारख्या कादंबऱ्या लिहिताना केवढा प्रचंड अभ्यास केला होता. कथानकाच्या विश्वासार्हतेसाठी ते आवश्यक असतं. आपल्या भालचंद्र नेमाड्यांनी 'कोसला' व चांगदेवच्या चार कादंबऱ्या जरी स्वानुभवावर लिहिल्या असल्या तरी 'हिंदू' लिहिताना त्यांनी किती प्रचंड व विविधरंगी अभ्यास केला आहे हे ती कादंबरी वाचताना जाणवतं. माझी 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' ही बृहद्कादंबरी लिहायला जसा वेळ लागला, तसा प्रचंड अभ्यासही करावा लागला.
 कादंबरीची कथा- साठ वर्षाच्या कालखंडाची व अफगाणिस्थान या देशातील रक्तरंजित संघर्षाची आहे. त्यामुळे त्या देशाचा इतिहास व भूगोल मला प्रथम अभ्यासून तो अंतरंगात मुरवावा लागला. ही जशी 'फिक्शन' (ललित - कल्पनारम्य) कहाणी आहे, तशी ती वास्तव इतिहासाधारित ‘फॅक्ट' (सत्य) कहाणी होती. त्या दोन्हीचं मी मिश्रण केलं म्हणून ती ‘फॅक्शन' कादंबरी आहे. त्यासाठी राजा जहिरशहा ते मुल्ला मोहमद उमर पर्यंतच्या सर्व वास्तव अफगाणी पात्रांच्या जीवन-प्रवासाचा अभ्यास करणं भाग होतं, तसंच फिक्शन म्हणून त्यांच्या अवतीभवती वावरणारी, नात्यातील पण वास्तवाशी मिळती जुळती- अशी तीन प्रमुख पात्रे अन्वर, करीमुल्ला आणि इलियास मला सुचले. त्यांचे कुटुंबीय व त्यांचा १९५० ते २००१ च्या अफगाणिस्थानी इतिहासाशी समांतर कालबद्ध प्रवास मला सत्य घटनांच्या संदर्भात चित्रित करण्यासाठी अभ्यास करावा लागला. पुन्हा हा इस्लाम देश म्हणून इस्लाम धर्म-परंपरांचा अभ्यास आला. दहशतवादाची मुळं धर्मात आहेत का ते शोधावं लागलं. तेथे रशियाप्रणीत सौर क्रांती झाली म्हणून कम्युनिझमचा अभ्यास करणंही क्रमप्राप्त होतं. अफगाणिस्थानची १९७९ ची कम्युनिस्ट क्रांती आणि तिला अफगाणांनी जिहाद पुकारत दिलेलं उत्तर हा कादंबरीचा प्रमुख संघर्ष बिंदू असल्यामुळे कम्युनिझम, जागतिक शीतयुद्ध, अमेरिकेचे धोरण अशा असंख्य बाबी आल्या. पुन्हा या संघर्षात पाकिस्तान प्रमुख खेळाडू होता आणि अलिप्त चळवळीत झहीरशहा असल्यामुळे भारताचाही काही रोल होता. हे सारे व्यापक पटलावरचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे अभ्यासल्यावरच माझी कादंबरी सिद्ध झाली. मराठीत तरी आंतरराष्ट्रीय विषयावरची एका देशाची कहाणी प्रथमच अवतीर्ण झाली आहे, या माझ्या म्हणण्याला कोणी मला चॅलेंज करू शकणार नाही.
 सुमारे सात-आठ वर्षे अभ्यास केला. असंख्य पुस्तके व संदर्भग्रंथ, वृत्तपत्रे वाचली आणि माझ्या प्रतिभेनं कथानकासाठी घटना, पात्रं व क्रम निवडला. माझ्यासमोर लिहिताना कुठलही 'मॉडेल' नव्हतं, ज्याला मी अनुसरून लिहावं. अंत:स्फूर्तीनं लिहीत गेलो. आपोआपचा फॅक्शनचा फॉर्म गवसला. वातावरण

निर्मितीसाठी काही पर्शियन शब्द वापरून उर्दूमिश्रित मराठी भाषा पात्रांच्या संभाषणासाठी वापरून मुस्लीम वातावरणनिर्मिती केली. कुठलही पात्रं थेट काळं किंवा पांढरं रंगवलं नाही, खरेखुरे सार्वजनिक नेते असल्यामुळे त्यांचं यथातथ्य चित्रण करताना त्यांचं वैयक्तिक जीवन व भावभावना मात्र प्रतिभेनं रचून त्यांचं मानवीकरण करायचा प्रयत्न केला. पण त्यांना मराठी ऐतिहासिक नायकांना जसं उंबरठ्यातकुटुंबजीवनात काहींनी बद्ध केलं तसं केलं नाही. जे देशावर राज्य करतात, त्यांचं लौकिक व सार्वजनिक जीवन महत्त्वाचं असतं. त्यांच्यासाठी कुटुंब नंतर असतं, हे वास्तवभान मी ठेवून त्यांचं चित्रण केलं! ही माझी लेखनप्रक्रिया मला स्वत:ला लेखक म्हणून बरीच समृद्ध करून गेली.
 मराठी लेखक प्रतिभावंत असल्यामुळे अभ्यास-चिंतन करीत नाहीत किंवा त्यांची गरज भासत नाही, हे मला स्वत:ला मुदलातच पटत नाही. तुम्ही जर स्वजीवनाच्या परिघाबाहेर जाणार नसाल तर बाब वेगळी; पण ज्यांना विशाल जीवनपट - मग तो मोठा समूह, देश-प्रांत वा जग या पातळीवर मांडायचा असतो किंवा विविध प्रश्न-समस्या मांडायच्या असतात त्यांना अभ्यास करावाच लागतो त्यामुळे प्रतिभेला नवे धुमारे फुटतात, हा माझा अनुभव आहे. त्यामुळे प्रतिभा व अभ्यासाचं द्वैत असतं हे मला मंजूर नाही.
 आणि चिंतन तर लेखकाला हवंच असतं. त्यासाठी ललितेतर वाचन, विविध शास्त्रांचं वाचन, आकलन व मनन हवं असतं. पुन्हा प्रश्न विचारणे, उत्तर शोधणे, माणूस वाचणे, माणसाचे जगण्याचे प्रश्न समजून घेणे - उदा. लिव्ह इन रिलेशनशिप, शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या, शहरीकरणामुळे माणसांचं तुटलेपण व एकटेपण; दहशतवाद, जात वास्तव, धर्मकारण, राजकारण व त्यातला सत्ता संघर्ष हे सारे सारे लेखकाला समजून घेणं आवश्यक असतं. त्यामुळे लेखक हा बहुश्रुत असलाच पाहिजे. आज इंटरनेट, गुगल सर्च, विकीपीडीया व इ-जर्नल्समुळे हव्या त्या विषयाची हवी ती माहिती संगणक उघडताच मिळू शकते. पण तिचं ज्ञानात रूपांतर करणं व त्याचा वापर करून कथानकातील पात्रांचं भवताल निर्माण करणं हे प्रतिभेचं काम आहे. पण त्याची आद्य व मूलभूत अट ही तुमचं चिंतन, तुमची बहुश्रुतता, तुमचे प्रश्न समजून घेणं व उत्तराचे विविध पर्याय तपासणं ही आहे. ती ज्या प्रमाणात जमते, तेवढी कलाकृती मोठी होते. मला वाटतं, जेव्हा अरुण साधंनी 'इन्किलाब विरुद्ध जिहाद'चं प्रकाशन करताना 'मला लक्ष्मीकांत देशमख यांचा हेवा वाटतो' असं म्हटलं, तेव्हा मी जिंकलो होतो. 'चंद्रकात बांदिवडेकराचं वाचल्यावर आनंदानं नाचणंच तेवढं बाकी होतं.' असं जेव्हा सौ. लीला बांदिवडेकरांनी मला फोननं सांगितलं, तेव्हा माझ्या परिश्रमाचं सार्थक झालं असं वाटलं!

प्रा. रूपाली शिंदे :
 'इन्किलाब विरुद्ध जिहाद'च्या प्रस्तावनेत 'अफगाणिस्थानच्या रूपाने आंतरराष्ट्रीय धार्मिक म्हणजे इस्लामी दहशतवाद' असं वेगळं स्पष्टीकरण का द्यावंसं वाटलं?
लक्ष्मीकांत देशमुख :
 अफगाणिस्थानमधला कट्टर इस्लामीयत्वातून सिद्ध झालेला दहशतवाद आता तालीबान, आयसिस, लष्करे तोयबा इत्यादीमुळे जगभर पसरला आहे हे सर्वश्रुतच आहे. तत्पूर्वी इस्रायल- अरबाच्या संघर्षामधून फोफावलेला अराफतचा दहशतवाद हा त्याच परिसरापुरता मर्यादित होता. पण अफगाणिस्थानचा धार्मिक दहशतवाद हा अमेरिका - रशियाच्या संघर्षाचा परिणाम होता. रशियाप्रेरित व त्यांनी सैन्य पाठवून जिवंत ठेवल्यामुळे अफगाणिस्थानमधील तराकी, अमीन बबराक करमाल व नजिबुल्ला यांची कम्युनिझमकडे झुकलेली राजवट (जिला मी इन्किलाब म्हणतो) उलथून पाडण्यासाठी धार्मिक नेत्यांनी लढा उभारला, तिला अमेरिकेनं बळ दिलं, तर पाकिस्ताननं आश्रय व लष्करी प्रशिक्षण दिलं. त्यातून काळाचे काटे मागे उलटणारा दहशतवादाचा पुरस्कार व समर्थन करणारा इस्लामी मूलतत्त्ववाद तालीबानच्या रूपानं उदयास आला व तो सीमारेषा ओलांडीत आज जागतिक झाला आहे. एका अर्थानं त्याची अफगाणिस्थान ही प्रयोगशाळा होती. ज्या अमेरिकेनं हा धर्माधिष्ठित दहशतवाद जोपासला, तो त्यांच्यावरच भस्मासुरासारखा उलटला व ट्विन टॉवर उद्ध्वस्त करून गेला. अमेरिकेचे वेडे साहस इराक व सीरियातील हस्तक्षेपामुळे दिसून आले. त्याचे भयंकर परिणाम आज जग भोगत आहे. त्यामुळे प्रस्तावनेत तसे म्हटले होते एवढेच. पण ते वास्तव निरीक्षण आहे हे मान्य करायला हरकत नसावी.
प्रा. रूपाली शिंदे :
 अफगाणिस्तानमधला कडवा व कट्टर धर्माभिमान आणि भारतात असलेला 'जमातवाद' यांच्यामध्ये नेमका कोणता फरक आहे?
लक्ष्मीकांत देशमुख :
 बराच फरक आहे असा माझा अभ्यास सांगतो. भारतातील जमातवादाला इतिहासातील हिंदू-मुस्लीम संघर्षाची पार्श्वभूमी आहे. नरहर कुरुंदकरांनी 'जागर' मध्ये याचे मूलग्राही विवेचन केले आहे, ते अजोड व बिनतोड आहे. मी कादंबरीत जे काही पाबाबत विवेचन केले आहे ते कुरुंदकरांच्या विचाराचा मागोवा घेणारे आहे. शरीयाप्रणित इस्लामी राज्य हे ध्येय अनेक इस्लामी राष्ट्र काही उघडपणे तर काही छुपेपणाने, बाळगतात. लष्करे तोयबा, आयसीस हे उघडपणे म्हणतात- भारतातही इस्लामी

संघटना- सिमी आदींचं कार्य आणि जामा मस्जिदचे इमाम आदींचे उद्दाम बोलणे, ओवेसी बंधूंची जहरी भाषा यामुळे दहशतवादी कृत्ये होताना दिसतात. पुन्हा गेली साठ वर्षे काश्मीर प्रश्न, पाकिस्तानने धगधगता ठेवला आहे. त्यासाठी दहशतवाद ही स्टेट पॉलिसी ते आचरतात. त्याची प्रतिक्रिया हिंदू समाजातून उमटते. एकीकडे काँग्रेसचा व समाजवाद्यांचा अतिरेकी स्वरूपाचा मुस्लीम अनुनय (मतांसाठी) तर त्याच्या दुसऱ्या टोकाला संघपरिवार व भाजप आदींची तीव्र प्रतिक्रिया- हिंदूंमधली (अनाठायी) भीती कुरवाळीत धर्मकारण करणं-उघड वा छुपं (तेही पुन्हा मतासाठी) यातून जमातवादाला खतपाणी मिळत चाललं आहे. यात दोन्ही राजकीय प्रवाह दोषी आहेत- जास्त काळ सत्ताधारी असणारे थोडे जास्त दोषी आहेत, असं म्हणता येईल. पण २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमधल्या झालेल्या पराभवानं काँग्रेसला आत्मचिंतन करायला भाग पाडलं व सत्तेवर आल्यामुळे व २० कोटी मुस्लिमांना अराष्ट्रीय समजून, दूर लोटून राज्य करणं शक्य नाही हे भान भाजपला आलं तर तो सध्याच्या फोफावलेल्या जमातवादाच्या पराभवाचा आरंभबिंदू ठरेल. पण हा समंजसपणा दोघांनीही एकाच वेळी दाखवायला हवा. पण हाच खरा प्रश्न आहे.
 तरीही भारतीय जमातवादाची तुलना अफगाणिस्थानच्या व आता खऱ्या अर्थाने जागतिक बनलेला धर्माधिष्ठित इस्लामिक दहशतवादाशी होऊच शकत नाही. कारण भारतात बळकट लोकशाही आहे, खुला मीडिया आहे, प्रोअॅक्टिव्ह, स्वतंत्र व निष्पक्ष अशी न्यायपालिका आहे आणि मुख्य म्हणजे आम भारतीय हा सहिष्णू, उदार व सेक्युलर आहे. अगदी संघपरिवारातील तथाकथित जहाल जमातवादी हे आंतरराष्ट्रीय धर्माधिष्ठित कट्टरपणाच्या तुलनेत अंशमात्रही जहाल व कट्टर नाहीत. त्यामुळे मला भाजपप्रणीत (तथाकथित) भगवी राजवट सत्तेवर आल्यामुळे भारताचं कसं होणार याची चिंता वाटत नाही. कारण आपली घटनाप्रणीत लोकशाही राजवट आहे. आणि ती पूर्णत: सेक्युलर आहे व तिचे रक्षण न्याययंत्रणा डोळ्यात तेल घालून करीत असते. रामजन्मभूमी- बाबरी मशिदीबाबतचा अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय म्हणजे धार्मिक, जटिल संघर्षमय प्रश्नांचा सुंदर असं सेक्युलर उत्तर आहे. तो जर सर्व स्टेक होल्डर्सनी मान्य केला तर भारतीय सेक्युलरझिमला बळकटी येईल.
 भारतीय सेक्युलॅरिझमला धोका आहे तो धर्मगटांना-जातसमूहांना 'व्होट बँक' समजून त्यांच्या जुनाट परंपरावादी वृत्तींना कुरवाळीत बळ देण्याचा. तो करण्यात कोणताही राजकीय पक्ष मागे नाही, ही खरी चिंतेची बाब आहे. जमातवाद हे त्याचं दृश्यरूप आहे. या पोपटाचा प्राण राजकीय पक्षांच्या स्पर्धात्मक धर्मगट व जात समूहांच्या तुष्टीकरणात आहे, त्याचा गळा घोटला की जमातवाद संपलाच म्हणून समजा. आणि भविष्यात हे घडू शकतं- शकेल, असा माझा अभ्यास सांगतो.

प्रा. रूपाली शिंदे :
 सर्वसामान्य माणूस सर्व प्रकारच्या संस्कारामधून आणि समस्यांमधून वाट काढीत जगत राहातो; टिकून रहातो. अफगाणी माणसाबाबतही हे दिसतं का? तिथला सामान्य माणूस दहशतवाद कसा पचवितो, गिळून टाकतो?
लक्ष्मीकांत देशमुख :
 प्रत्येक देशाची दहशतवादाशी सामना करण्याची क्षमता भिन्न असते. कारण तेथला धर्म, संस्कृती, संस्था यांच्या क्षमतेमध्ये फरक असतो. अफगाणिस्थानचा सामान्य माणूसही त्याचा चिवट धर्मश्रद्धा आणि लढाऊ, विजिगीषू वृत्तीच्या बळावर टिकून आहे. १९७९ पासून तो रक्तरंजित संघर्षाचा सामना करीत जगत आहे. आणि त्यातून सामुदायिक मन हे अधिक उदार होत आहे असं माझं निरीक्षण आहे. गेली दहा वर्षे अफगाणिस्थानमध्ये हमीद करजाईनं लोकशाही टिकवली व आता मतपेटीतून सत्तांतर झालं आहे. पण अमेरिकेच्या माघारी जाण्यानंतर काय होणार हा खरा प्रश्न आहे! अफगाणिस्थानची जनता दहशतवादाला कंटाळली आहे हे तर खरंच, पण तो संपणं हे त्यांच्या हाती नाही. कारण तालीबानचं शस्त्रसज्ज असणं व इस्लामिक राजवट आणण्यासाठी असणारं त्यांचं कडवं कडवटपण जोवर कायम आहे व त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरातून साथ मिळत आहे, तोवर दहशतवाद संपणं कठीण आहे. त्यामुळे सामान्य माणसांना काही वस्तुस्थिती स्वीकारून जगणं भाग आहे. लेखक म्हणून ही अफगाणी मानसिकता मला समजून घेणं इंटरेस्टिंग वाटतं. जगण्याचं बळ कसं मिळवायचं हा त्यांच्यापुढचा सर्वात मोठा सवाल आहे. घातपात, दहशतवादामुळे कोण केव्हा मरेल हे माहीत नाही, त्यामुळे ते दैववादी- फॅटॅलिस्टिक बनत धर्माकडे अधिक झुकू शकतात आणि दहशतवाद- संघर्ष कमी होण्याऐवजी वाढू शकण्याचीनजीकच्या भविष्यात तरी अशी भीती वाटते.
प्रा. रूपाली शिंदे :
 जगाच्या बाजारपेठांच्या सीमारेषा संपुष्टात येणे, तंत्रज्ञानातील संवाद-संपर्कक्रांती यांचा परिणाम, आपली 'ओळख' टिकवून ठेवणे त्यासाठी कर्मठपणा (धार्मिक) अंगीकारणं अफगाणिस्थानचा विचार करता गरजेचे वाटत असेल का त्या नागरिकांना?
लक्ष्मीकांत देशमुख :
 या प्रश्नाची गुंतागुंत प्रचंड आहे. हा खरं तर सर्वच इस्लामी देशांच्या संदर्भात प्रश्न प्रस्तुत ठरतो असं मला वाटतं. आधुनिक शिक्षण व तंत्रज्ञान, संवाद-संपर्क माध्यमानं माणूस उदार मानवतावादी बनतो असं होत नाही. उलट त्यामुळे धार्मिक

दहशतवाद व कट्टरवादाचं समर्थन करणारं आकर्षक तत्त्वज्ञान बनवलं जातं. खरं तर हा वर्ग - अमिनची सौरक्रांती व १५-१६ वर्षांची डावी-पुरोगामी राजवट अनेक अर्थानी लोककल्याणकारी होती. मग अफगाणींना ती स्वीकारावी असं का वाटलं नाही? त्यातलं आंतरराष्ट्रीय कटकारस्थान व फूस सोडून द्या, पण दृश्य परिणाम म्हणून शिक्षण, जमीन सुधारणा व स्त्री स्वातंत्र्याची तेथे नवी पहाट झाली होती, ती आपल्या प्रगतीची आहे हे का त्यांना पटत नव्हतं? केमाल पाशा, राजा अमानुल्ला किंवा सद्दाम हुसेन हे सारे पुरोगामी राजकर्ते त्या त्या इस्लामी देशात आधुनिक जीवन पद्धती का स्थिरावू शकले नाहीत? असं काय तत्त्वज्ञान व विचारधारा इस्लाममध्ये आहे जी त्यांना आधुनिक लोकशाहीवादी व विज्ञाननिष्ठ बनण्यात अडथळा आणते? या साऱ्या प्रश्नांचा वेध मी 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' मध्ये घेतला आहे; पण तरीही समाधानकारक उत्तर सापडत नाही. भारतातही हमीद दलवाई मुसलमानांना पचत नाहीत. शबाना आझमी ही पुरोगामी न समजता जामा मस्जिदचे इमाम तिला 'नाचने गानेवाली औरत' असं हिणवतात. बॅ. अंतुले, हुसेन दलवाई वा असगर अली इंजिनिअर हे सर्वमान्य मुस्लीम नेतृत्व होऊ का शकलं नाही? या साऱ्या प्रश्नांचा विचार करून, त्यांच्या धर्मपरंपरा व जीवनपद्धतीचा विचार करीत वस्तुनिष्ठ उत्तरं शोधली पाहिजेत असं मला वाटते.
प्रा. रूपाली शिंदे :
 “जिहादी' माणसांचं अंतरंग, त्यांच्या संघटनेमधील सत्तास्पर्धा, निराशा, आशा, आंतरराष्ट्रीय स्तरावरील दहशतवादाची समस्या मांडताना हे चित्रण महत्त्वाचे का वाटले? दहशतवाद्यांचे पाय पण मातीचे आहेत हे दाखवणे लेखक म्हणून तुम्हास महत्त्वाचे का वाटले?
लक्ष्मीकांत देशमुख :
 जिहादी मानसिकता समजून घेणं हे जगासाठी महत्त्वाचं आहे, कारण दहशतवादापासून आज कोणतेही राष्ट्र मुक्त-अनटचड् राहिलेला नाही. भारत तर नाहीच नाही. पुन्हा इथं त्याची प्रतिक्रिया म्हणून हिंदूंचा कट्टरपणा काही प्रमाणात वाढताना दिसतो. भगवा दहशतवाद ही अतिशयोक्ती म्हटली तरी तशी काही कृत्ये अलीकडच्या काळात झाली आहेत. पण ती भारतापुरती मर्यादित आहेत. इस्लामसारख्या मोनोलिथिक, एकेश्वरवादी व एक धर्मग्रंथांची सत्ता मानणाऱ्या धर्मात कट्टरता तुलनेने अधिक आहे. त्यामानाने जागतिक व इस्लामप्रमाणेच मोनोलिथीक धर्म असूनही आज ख्रिश्चनांमध्ये कट्टरता दिसत नाही. सारी ख्रिश्चन राष्ट्रे रेनेसान्स नंतर भांडवलशाही मार्गाने श्रीमंत होताना दिसतात. धर्म म्हणून बौद्ध, जैन कट्टरतावादाचा पुरस्कार करीत नाहीत व

त्यांची अनुयायी राष्ट्रे त्यापासून अभुक्त आहेत. पंजाबमधील खलिस्तान चळवळीमुळे काही काळ शीख कट्टरवादाचा व दहशतवादी कृत्याचा भारताला परिणाम भोगावा लागला होता, पण तो आता शमला आहे. त्यामुळे जगासाठी आज इस्लामच्या नावाने चालणारा व देशांच्या सीमारेषा मोठ्या प्रमाणात ओलांडलेला दहशतवाद ही आणि चिंतेची बाब आहे. आणि अमेरिकेची युद्धखोर नीती, वेड्या साहसवादाने व जगाच्या नियंत्रणाचा ठेका घेतल्याप्रमाणे वागणाऱ्या अमेरिकेमुळे आगीत तेल ओतून ती अधिक भडकवावी, तसं या दहशतवादाला बळ मिळत आहे. म्हणून 'इन्किलाब' च्या माध्यमातून तालीबानी जिहाद्यांचं अंतरंग मी रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यांचेही पाय मातीचे आहेत व त्यांची ही धर्मनिष्ठा कडवी असूनही मूलभूत मानवी षड्विकारापासून ते मुक्त नाहीत आणि निसर्गनियम पाहाता ते शक्यही नाही; म्हणून ती शेवटी माणसे आहेत. त्यांचं हे मानवीपण मला लेखक म्हणून एक्सायटिंग वाटलं. ते मी येथे मांडलं आहे.
 पुढील काळात मला केव्हा तरी काश्मीरवर कादंबरी लिहायची आहे. तेथेही मला या विषयाचा सामना करावा लागणार आहे. कारण काश्मीर समस्येचा इस्लामी पैलू व धर्माधिष्ठित दहशतवाद हे रोकडे वास्तव मला तेथेही मांडावे लागणारच आहे. काश्मीरची ओळख म्हणजे शैव, बौद्ध, सूफी, इस्लाम व शीख धर्मातून विकसित झालेली खास ऐतद्देशिय सांस्कृतिक वारसा- धरोहर वा विरासत आहे. तिला 'काश्मीरियत' म्हणता येईल. ती खच्ची करून तिला कट्टर वहाबी इस्लामी परंपरेत परावर्तित करण्यासाठी पाकिस्तान व काश्मीरचे हुरियत नेतृत्व प्रयत्नशील आहे. पंडितांचं स्थलांतर फोर्सफुली घडवून आणत काश्मीर खोरं हिंदू-शीख विरहित करीत त्याचं पूर्ण इस्लामीकरण करीत ते पाकिस्तानला जोडण्यासाठी फाळणीचं राहिलेलं काम (अनफिनिशड अजेंडा) मानून प्रयत्न करणं, हे सारे पदर काश्मीर समस्येला चिकटलेले आहेत. त्यामुळे येथेही जिहादी अंतरंग जाणत पात्रांद्वारे मांडणं मला भाग आहे. पाहू या कसं जमतं ते!
प्रा. रूपाली शिंदे :
 आपण 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' वर बरेच बोललो आहोत. आता मी तुमच्या थीमबेस्ड कथासंग्रहबाबत विचारू इच्छिते. एक मध्यवर्ती प्रश्न घेऊन त्याभोवती अनेक कथा लिहिणं व त्या एकत्र कथासंग्रहाच्या रूपानं प्रसिद्ध करणं या मागे लेखक म्हणून तुमची काय भूमिका आहे?
लक्ष्मीकांत देशमुख :
 'कथांजली' व 'अंतरीच्या गूढगर्भी' या दोन कथासंग्रहात विविध विषयांवरच्या

कथा होत्या. पण त्यानंतर ओळीने (अर्थात १९९६ ते २०१४ दरम्यान) तीन थीमबेस्ड कथासंग्रह आले हे खरं आहे. या काळात इतरही कथालेखन झालं. ते 'अग्निपथ'मध्ये समाविष्ट आहे व २०१५ मध्ये प्रकाशित होणारा ‘मृगतृष्णा' या कथासंग्रहातही आहे. पण तीन थीमबेस्ड कथासंग्रह हा माझी मराठी साहित्याला दिलेली देणगी आहे, असे डॉ. आनंद पाटील म्हणतात. त्यांचा या बाबतचा सविस्तर लेखही ही मुलाखत ज्या ग्रंथात आहे त्या माझ्या साहित्यावरील समीक्षा ग्रंथात समाविष्ट आहे. पण या संदर्भात माझी भूमिका तुम्ही विचारली याचा आनंद आहे.
 पाणी! पाणी!!' मधील सर्व सोळा कथा पाणी टंचाई व दुष्काळाचा मानवी जीवनावर होणारा परिणाम दाखवणाऱ्या कथा आहेत. 'नंबर वन' हा कथा संग्रह खेळाडूंमधील माणूस दाखवणारा व खेळाशी निगडित जीवन असल्यामुळे त्याचे यश अपयश जीवन कसं प्रभावित करते हे दाखवणाऱ्या आहेत. 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' हा स्त्रीभ्रूण हत्या प्रश्नावरील आठ कथांचा संग्रह आहे. म्हणून हे माझे तीन थीमबेस्ड कथासंग्रह आहेत. हा एक नवा ठसठशीत असा साहित्यप्रयोग आहे व तो अपूर्व आहे, एवढे किमान श्रेय तरी माझ्या पदरी समीक्षकांनी टाकण्यास अनमान करू नये.
 मी असे थीमबेस्ड कथासंग्रह का सिद्ध केले? यापेक्षाही एकाच विषयावर वेगवेगळ्या कथा कशा सुचल्या व मी लिहिल्यावर त्या एकत्रित का छापाव्या वाटल्या (व प्रकाशकांनी तरी का छापल्या?) हा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे.
 पाणी टंचाई व दुष्काळ मी जवळून पाहिला आहे. त्याची व्यापकता व अनेक पैलू माझ्या लक्षात आले, जाणवले व मनाला भिडले. त्यात मला सलग मोठी कादंबरी दिसली नाही, तर वेगवेगळ्या पैलूंच्या कथा दिसल्या. सर्वप्रथम मी 'बांधा' ही कथा लिहिली, मग 'पाणी चोर' आणि लक्षात आलं की या एकाच प्रश्नाचे विविध पैलू असणारी बरीच कथाबीजं मनात आहेत, घटना व पात्रं आहेत. त्यांनाही वाट देत मग मी सलगपणे त्या कथा एकामागून एक लिहिल्या. आणि वाटलं की, त्या एकत्र छापणं योग्य राहील. सुदैवानं माझ्या प्रकाशकमित्र बाबा भांडना त्याचं वेगळेपण व मोल जाणवलं आणि 'पाणी! पाणी!!' हा कथासंग्रह प्रकाशित झाला. तसंच इतर दोन संग्रहांबाबत घडत गेलं!
 अरुण शेवते, विठ्ठल वाघ आदींनी एकाच विषयाभोवती कविता मालिका लिहिल्या आहेत. पण त्यांनी एकाच काव्यसंग्रहपुरता हा प्रयोग केला. मी गद्य साहित्यात तीन कथासंग्रह एकाच विषयाशी संबंधित लिहिल्यावर जाणीवपूर्वक थीमबेस्ड स्वरूपात प्रसिद्ध केले.
 जरी या तीन कथासंग्रहात विषयाचं एकारलेपण असलं तरी त्यात तोचतोचपणा

किंवा पनुरुक्ती अजिबात नाही असा माझा दावा आहे. प्रत्येक कथा त्या प्रश्नाचा वेगळा पैलू मांडते. प्रत्येक कथेचा 'व्हयू पॉईंट' भिन्न आहे. घटना आणि कथा-कथन एका कथेपेक्षा दुसऱ्या व सर्वच कथेमध्ये निराळे आहेत. संगीताच्या भाषेत सांगायचं झालं तर राग एक, पण प्रत्येक गाणं त्यावर आधारलेलं भिन्न भावना प्रगट करणारं असतं. तसंच या कथासंग्रहातील कथांचं आहे. यामुळे एका प्रश्नाचा व्यापक पट आणि आकलन ललित अंगानं वाचकांना होत जातं व तो जाणीव समृद्ध होत जातो, असं मला वाचकांच्या आजवर आलेल्या प्रतिक्रियांमधून जाणवलेलं आहे.
विनोद शिरसाठ :
 आता थोडं तुमच्या प्रशासकीय कामाकडे वळू या. कारण ते तुमच्या लेखनातून वेगळे काढता येत नाही. माझ्या मते प्रशासनात काम करताना तुमच्या कारकिर्दीचा उत्तरार्ध हा बराच वेगवान राहिला आहे. म्हणजेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त, क्रीडा संचालक, जिल्हाधिकारी व फिल्मसिटीचे एम. डी. असा हा कालखंड आहे. या काळातला प्रशासक व पूर्वार्धातला प्रशासक म्हणून तुम्ही त्यात काय साम्य व फरक करता? तसा तो राहिला आहे का?
लक्ष्मीकांत देशमुख :
 निश्चितच. कारण पूर्वाधात मी उपजिल्हाधिकारी व अप्पर जिल्हाधिकारी म्हणून १७-१८ वर्षे खालच्या पदावर काम केले, तेथे विभाग प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी असायचे. मात्र १९९६ साली मी आय.ए.एस. म्हणून पदोन्नत झालो व मी वर आपण म्हणलेली विभाग प्रमुखांची पदे भूषविली. हा उत्तरार्ध वेगवान यासाठी होता, की मला या प्रत्येक पदावर पदाची जी शासनविहित कामे आहेत ती करताना इतर अनेक सामाजिक व सांस्कृतिक कामे करता आली व काही 'आऊट ऑफ बॉक्स' उपक्रम राबवता आले.
 तथापी प्रशासकीय नोकरीच्या पूर्वार्धातही मला उत्तम काम करता आले. महसूल प्रशासनात असल्यामुळे पाणी टंचाई, दुष्काळ तसेच महापूर आदी, लेखक असल्यामुळे अधिक डोळसपणे संवेदनक्षमतानिशी कामे पार पाडली. नांदेड नगरपालिकेत मी आज ज्याला 'वन विंडो सिस्टीम' म्हणतात, ती तेव्हा सर्वप्रथम मी मराठवाड्यात सुरू केली होती व सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचा मी उच्चांक प्रस्थापित केला होता. स्वच्छता, पाणी पुरवठा व खड्डेविरहित रस्ते व शिक्षण आरोग्याचा दर्जा वाढविणे ही मूलभूत कामे केली. परभणीत असताना संपूर्ण साक्षरता अभियान यशस्वीपणे मुख्य संयोजक म्हणून राबवले व सुमारे सव्वादोन लाख प्रौढ खऱ्या अर्थाने साक्षर केले. त्यामुळे १९८१ साली स्त्री साक्षरतेमध्ये जो परभणी जिल्हा खालून

दुसरा होता, तो २००१ च्या जनगणनेत स्त्री साक्षरतेमध्ये राष्ट्रीय सरासरी गाठू शकला. हे काम मला मोलाचे वाटते. परभणीला १९९५ मध्ये ६८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचेही यशस्वीपणे आयोजनही मी कार्याध्यक्ष म्हणून केले होते. याखेरीज पुरवठा विभागातील भ्रष्टाचार मोडून काढणे, जमिनीचे रेकॉर्ड अद्ययावत करणे, दुष्काळात सहा-सहा महिने एक लाखावर मजुरांना रोजगार हमीचे काम उपलब्ध करून देणे, रो.ह.यो. निगडित फळबागांची मोहीम १९९०-९२ मध्ये मराठवाड्यात यशस्वीपणे राबवणे ही कामे मला करता आली. तरीही मी विभागप्रमुख नसल्यामुळे या काळात माझ्या कामांना मर्यादा होत्या.
 पण आय. ए. एस. झाल्यावर मी विभाग प्रमुख म्हणून काम केले, तेथे प्रत्येक क्षण विकासाचे आदर्श प्रशासन करण्याचे जे ध्येय मी प्रशासकीय सेवेत येताना बाळगले होते, जे स्वप्न पाहिले होते, ते साकार करण्यासाठी मी एकही दिवस सुट्टी न घेता काम करून माझं सर्वस्व पणाला लावून करायचा प्रयत्न केला. त्यात यशस्वी पण झालो. अकोला येथे मनपा आयुक्त म्हणून बी. ओ. टी. तत्त्वावर नफ्यात चालणारी सिटीबस सेवा, कचऱ्यापासून खत निर्मिती, उत्तम रस्ते, पाणी पुरवठा व ३५०० झोपडपट्टीचे वाल्मी योजनेअंतर्गत पक्क्या घरात रूपांतर अशी कामे केली. सांगलीला ५०० शाळांना प्रत्येकी तीन संगणक संच व पहिली ते सातवी पर्यंतच्या सर्व विषयांच्या व्हिडिओ सी. डी. देऊन शैक्षणिक गुणवत्तावाढीचा प्रकल्प, आरोग्य सेवा वाढवणे, याबरोबर २०० गावे हगणदारी मुक्त केली. जि.प.मध्ये जेंडर बजेट इंड्रोड्युस केले. मला त्या वेळी यशवंत पंचायत राज, म. गांधी उत्कृष्ट जिल्हा पुरस्कार पण मिळाले. क्रीडा संचालक म्हणून बालेवाडी पुणे येथे भारतातले सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारले व राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धांचे यशस्वी नेटके आयोजन केले; पण दिल्लीच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील भ्रष्टाचारामुळे इथेही तसेच झाले असे समजून प्रथम ए. जी., मग कॅग व शेवटी सार्वजनिक लेखा समितीने कसून चौकशी केली. त्यांना काही सापडले नाही. यामुळे मात्र हे माझ्या व्यवस्थापन कौशल्याची कसोटी पहाणारे यश काही प्रमाणात झाकोळले गेले याचा विषाद जरूर आहे. असो. कोल्हापूरला मी तलाठ्यांना लॅपटॉप देत 'इ-चावडी' प्रकल्प राबवला. आय.टी.चा वापर करून रॉकेल व धान्याचा काळाबाजार रोखला. मुख्य म्हणजे स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी कल्पकतेने डॉक्टर व समाज, राजकीय नेते, तथाकथित स्वयंसेवी संस्थांचा रोष पत्करूनही आय. टी आधारित 'सेव द बेबी गर्ल' ही ऑनलाईन सोनोग्राफी यंत्रणा व अॅक्टीव ट्रॅकरद्वारे मुलीच्या जन्माचे प्रमाण वाढवून दाखवले. त्यावर हायकोर्टाने मान्यतेची मोहर उठवली. राजस्थान व मध्यप्रदेशने हे मॉडेल स्वीकारले, पण महाराष्ट्र शासनाने काही निर्णय केला नाही. पण मी एक नवा पथदर्शक

प्रकल्प राबवला हे काय कमी आहे? राळेगण सिद्धी व हिवरे बाजारप्रमाणे आदर्श गाव योजनेचे सार्वत्रिकीकरण झाले नाही म्हणून का त्याचे महत्त्व कमी समजायचे? तसेच या माझ्या 'सेव द बेबी' प्रकल्पाचे आहे. मी सर्वोत्तम काम केले याचे समाधान आहे. कोल्हापूरला कलेक्टर म्हणून अनेक सांस्कृतिक उपक्रम राबवले, तेही मला मोलाचे वाटतात. अनाथ बालकांसाठी काम करणाऱ्या बालसंकुलच्या दोन कोटीच्या दोन इमारती मला लोकवर्गणीतून उभारता आल्या याचं समाधान काय वर्णावं? शाहू स्मारक भवनाचे नूतनीकरण व विस्तारीकरण करून एका सांस्कृतिक केंद्राचे त्याला रूप दिले, राजर्षि शाहू महाराजांचा विचार थोडाफार राबविला, याचं समाधान काही और आहे. हे सर्व मला महत्त्वाचे वाटते.
 पूर्वार्धात व उत्तरार्धात प्रशासक म्हणून माझी तत्त्वं व कामे तशीच होती, पण आय.ए.एस. झाल्यावर अधिकार मिळाले, त्याचा वापर करून एक प्रशासक किती उत्तम काम करू शकतो याचा वस्तुपाठ घालून दिला. हे मला करता आलं ते माझ्या ध्येयवादामुळे व आदर्श प्रशासनाच्या स्वप्नामूळे. याचा मला लेखक म्हणून व एक भारतीय नागरिक म्हणून जरूर फायदा झाला असं वाटतं.
विनोद शिरसाठ :
 मराठीतले बहुतांश ललित लेखन 'खाउजा' म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण याबाबत नकारात्मक सूर लावतात असे दिसते. तुमच्याबाबत असे झालेले दिसत नाही. याचे कारण तुमचे प्रशासनातले अनुभव, की अन्य काही वेगळे कारण आहे? याबाबत आपले एकूण चिंतन तसेच साहित्याच्या संदर्भातले त्याचे महत्त्व आम्हांस जाणून घ्यायला आवडेल.
लक्ष्मीकांत देशमुख :
 भारतामध्ये १९९१ मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांनी अर्थकारणाच्या संदर्भात खुलेपणाचे म्हणजेच उदारीकरणाचे काही निर्णय घेतले. त्यांनी व पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहरावांनी ते अंमलात आणले, त्या काळातच माझी प्रशासकीय कारकिर्द बहरली, म्हणून याबाबत माझे चिंतन आपणास जाणून घ्यायचे आहे. एक लेखक- विचार करणारा (स्वत:ला विचारवंत समजत नाही, पण याबाबत मी बराच अभ्यास केला आहे) लेखक व प्रत्यक्ष शासनात काम करणारा प्रशासक अशा दुहेरी नात्यानं मी या प्रश्नाकडे कसा पाहातो याचं मी प्रथमदर्शनी असं उत्तर देईन की मी याकडे पॅग्मॅटिक नजरेने पहातो. 'खाऊजा बाजूने टिमकी वाजवत नाही की विरुद्ध जात टिऱ्या बडवत नाही. आज ती वस्तुस्थिती आहे व या एकविसाव्या शतकात तिच्यासह, तिच्या गुणदोषासह, साऱ्या जगताला व लोकांना जगावे लागणार आहे, हे एकदा आपण

स्वच्छपणे मान्य केले तर मग त्याला कसं समोर जायचं हे समजू शकेल.
 जागतिकीकरण ही काही या तीन-चार दशकातील बाब नाही. ती पूर्वापार चालत आलेली बाब आहे. जुन्या काळात भारताचा दक्षिण मध्य आशियाशी व्यापार होता, बुद्धधर्म अनेक देशांत पसरला होता. भारताचे जागतिक व्यापार-संबंध होते. भारतात वास्को द गामा आला होता, मग फ्रेंच, पोर्तुगीज व शेवटी इंग्रज आले. जहाज व विमानाने जग जवळ आले. हे सारे आधीच घडले आहे. मग माध्यमक्रांती झाली, आय. टी. व इंटरनेटचे युग आले व संपर्काच्या साऱ्या सीमारेषा अडथळाविरहित होत पुसल्या गेल्या. प्रत्यक्ष परदेशी जायला आज पासपोर्ट- व्हिसा लागतो, पण इंटरनेट व माध्यम साधनांमुळे घरबसल्या कुणाशीही संपर्क, चॅटींग करता येते. जगभरचे कार्यक्रम, सिनेमा, मालिका, खेळ, बातम्या पाहाता येतात. त्यामुळे जागतिकीकरण हा चर्चेचा विषय राहिला नाही, तर आज ती वस्तुस्थिती आहे.
 वास्तविक जागतिकीकरण (व उदारीकरण पण) हे अर्थकारणासाठी जगाने एकत्र येऊन नवीन धोरणात्मक व्यवस्था स्वीकारत्याचे दृश्यरूप आहे. भांडवल, पैसा, व्यापार व मनुष्यबळाचा मुक्त संचार हे या जागतिकीकरणाचे वैशिष्ट्य आहे. डाव्यांचा कितीही कडवा झापडबंद विरोध असला तरी आज जगानं जागतिकीकरण मोठ्या प्रमाणात स्वीकारले आहे व त्यानं देशांचा आर्थिक विकास झाला आहे व गरिबी पण बरीच कमी झाली आहे. भारतातही या दोन-अडीच दशकात जी प्रगती झाली आहे, आर्थिक विकास झाला आहे व ज्या प्रमाणात गरिबी कमी झाली आहे, त्यामुळे जागतिकीकरणामुळे फायदा झाला आहे हे मान्य केले पाहिजे. पण संपत्तीचे विषम वाटप, दादागिरी करणाऱ्या विकसित राष्ट्रांचे दडपण यामुळे अनेक चुकीचे निर्णय भारतात घेतले, त्यामुळे शेतीचा कुंठित झालेला विकास व शेतकऱ्यांच्या आत्महत्या, उत्पादन क्षेत्राची मंदी असे प्रश्न गंभीर झाले आहेत. तो दोष राजकर्त्यांच्या लघुदृष्टीचा व धोरणांचा आहे. एका व्यापक अर्थानं जागतिकीकरणाची ही काळी बाजू आहे. आणि लोककल्याणकारी राज्य प्रशासनाला आव्हान आहे शिक्षण, आरोग्य व मानवी विकासात गुंतवणूक कमी करणं हे जर जागतिकीकरणाच्या नावाखाली व तत्त्वाचा भाग म्हणून होत असेल तर ते चुकीचं आहे.असं म्हणणं भाग आहे. खाजगीकरण ही संकल्पना मानवी स्वार्थमूलक वृत्ती ओळखून निर्माण झालेली व्यवस्था आहे. समाजवाद व सहकार हे आदर्श आहेत, पण मानवी स्वभाव मूलत: स्वार्थी आहे, त्याला नफा व मालमत्तेची ओढ आहे. ती त्याची प्रमुख कार्यप्रेरणा आहे. काही ध्येयदारी व विचारी माणसं त्याला अपवाद असतात. जेव्हा म. गांधींसारखा युगपुरुष अवतरतो, तेव्हा काही काळ सर्व समाज, देश त्यानं भारावून स्वार्थत्यागाला तयार होतो. पण आता विसाव्या शतकाचा उत्तरार्ध व एकविसावे शतक हे जगभरच खुल्या

नेतृत्वाचं जग आहे. आता या पुढे गांधी, मंडेला, मार्टीन ल्युथर किंग निर्माण होतील की नाही ही शंका आहे. त्यामुळे व्यापक हित पाहाणारी समाजवादी व्यवस्था व परस्परांना साह्य करीत सर्वांचाच उद्धार व्हावा अशी प्रेरणा असलेली सहकारी चळवळ आता किती सडली आहे हे सांगायला नको. त्यामुळे जगात भांडवलशाही सर्वत्र फोफावली आहे. तिनं संपत्ती व समृद्धी निर्माण केली आहे, हे पण विसरून चालणार नाही. आज नारायण मूर्ती म्हणतात त्याप्रमाणे 'कंपॅनशेट कॅपिटलिझम'- उदारकरुणाधिष्ठित भांडवलशाही हवी आहे. या पार्श्वभूमीवर खाजगीकरण सार्वत्रिक झाले आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
 मी २००४-२००५ या वर्षभरात आय.आय.एम. बेंगलोरला पब्लिक पॉलिसीचा एक वर्षाचा अभ्यासक्रम- एम. बी. ए. केला होता. स्वांतसुखाय व ज्ञानाची प्रबळ प्रेरणा म्हणून. तेव्हा 'खाउजा'चा अभ्यास केला होता. पुन्हा प्रशासनात काम करताना सहकार क्षेत्र, व्यापारी आणि राज्यकर्त्याचे वर्तन, प्रेरणा व कामे-धोरणे पाहिल्यावर खाजगीकरण हे 'लेसर इव्हिल' म्हणून स्वीकारणं क्रमप्राप्त आहे. आणि जागतिकीकरण व उदारीकरण हे सर्व देशांनी एकत्र येऊन प्रश्न 'गॅट' व नंतर 'डब्ल्यु. टी. ओ.'च्या माध्यमातून स्वीकारल्यामुळे ते आजचे वास्तव आहे. त्याचे जसे फायदेशीर व सकारात्मक पैलू आहेत, तसंच त्यांचे काही नुकसानदायी नकारात्मक भागही आहे. देशाचे नेतृत्व जास्तीतजास्त फायदा कसा करून घेत नुकसान कसे टाळता येईल यासाठी दक्ष राहात कणखरपणे धोरणे आखेल तर आपली प्रगती वेगाने होऊ शकते. भारत यात कमी पडला म्हणून आजचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
 माझं हे तत्त्वचिंतन म्हणा, वा अभ्यास आहे; त्यामुळे मी लेखनात वा चर्चेत याबाबत पॅक्टिकल भूमिका घेतो. अकारण अज्ञानमूलक नकारार्थी सूर लादत नाही, एवढाच त्याचा मथितार्थ.
विनोद शिरसाठ :
 जागतिकीकरण व एकूणच 'खाउजा' आणि साहित्याकडे आपण कसे बघता? ह्याचे सूर तुमच्या लिखाणात उमटलेले आहेत असं तुम्हाला वाटतं का? मराठी साहित्यामध्ये जागतिकीकरणाचे किती प्रतिबिंब उमटले आहे असे तुम्हास वाटते?
लक्ष्मीकांत देशमुख :
 हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे विनोदजी. जागतिकीकरण आणि साहित्य यावर जगात सर्वत्र विचार चालू आहे. मी मात्र जागतिकीकरणाचा संस्कृतीच्या संदर्भात विचार करून मत मांडणं पसंत करेन. त्यात साहित्य हे येणारच.

 सांस्कृतिक अंगानं जागतिकीकरणाचा विचार केला तर असं लक्षात येईल की दळणवळण व संपर्कक्रांतीमुळे आज इतिहासात कधी नव्हे ते सर्व जग जवळ आलं आहे. जागतिकीकरणामुळे अर्थकारण, श्रमशक्ती, भांडवल आणि तंत्रज्ञानाची आयात-निर्यात व मोबिलिटी वाढली आहे. भारतातून बाहेर जाणारी माणसं काही दशकापूर्वी ब्रेनड्रेन संबोधिली जायची, पण आज तो व्यापक अर्थानं 'ब्रेनगेन' आहे, त्यामुळे भारताचा विकास होत आहे. भारतातले तरुण-तरुणी जगभर श्रमप्रधान व बौद्धिक क्षेत्रात मोठ्या संख्येने काम करीत आहेत. एकट्या अमेरिकेत तीस ते चाळीस लाख भारतीय आहेत. जागतिकीकरणामुळे जग हे एक वैश्विक खेडे झाले आहे. आय.टी.मुळे कल्पना, संशोधन, विचार आणि विचारसरणीचं प्रचंड प्रमाणात आदानप्रदान होत आहे. मल्टी नॅशनल कंपन्यांमुळे जगभर सर्वत्र एकाच बँडचे कपडे, खाद्य पदार्थ, शीतपेये आणि प्रसारमाध्यांमुळे सिनेमा, संगीत, नृत्य आणि जीवनशैली झपाट्यानं एकजिनसी होत आहे. एका अर्थानं शतकभर जे ती असणाऱ्या पाश्चात्त्य (पक्षी : अमेरिकन) जीवनशैली आणि इंग्रजी भाषेच्या प्रभावाखाली सर्व जग मोठ्या प्रमाणात आलं आहे. भारतापुरता विचार केला तर इथलं स्वदेशी एतद्देशीय त्याचा थोडाही पुरस्कार केला की त्याच्यावर संघविचाराचा असा शिक्का बसतो! ते कमअस्सल व अमेरिकन जीवनशैली आधुनिक व आजच्या युगाची म्हणून अनुकरणीय झाली आहे. त्यामुळे भारतात चौकोनी कुटुंब, वडीलधाऱ्यांना आता न सामावून घेणारी कुटुंब व्यवस्था, वाढते घटस्फोट, लिव्ह इन रिलेशनशिप, एल.जी.बी.टी.सारख्या बाबींचा वाढता स्वीकार, मोकळे स्त्री-पुरुष संबंध, औद्योगिक क्रांती व नव्या यंत्रामुळे मागील दोन दशकात कमी झालेले मानवी श्रम व सांस्कृतिक बाबीसाठी उपलब्ध झालेला मोकळा वेळ पुन्हा कमी होणं, वाढतं असामाजिकीकरण, मोबाईल, टी.व्ही. क्रांती, अन्न-कपडे व भाषेचे जागतिककीकरण व एकजिनसीपणा, वाढते स्थलांतर व अदेशीपणामुळं उखडली जाणं, कमी होणारी विविधता व स्थानिक महत्त्व- हे सारे सांस्कृतिक संदर्भ व बदल जागतिकीकरणाशी जोडले गेले आहेत. पुन्हा जागतिकीकरणाशी नीट सामना आपण करू शकत नसल्यामुळे बेरोजगारी, शेतकऱ्यांची विपन्न अवस्था, घसरलेली जीवनाची गुणवत्ताः शिक्षण, आरोग्य, सामाजिक क्षेत्रात कमी झालेली भांडवली गुंतवणूक, सरकारचा संकोच, विघातक विकास- नीतीमुळे होणारा पर्यावरणाचा हास व त्याचा मानवी जीवनावरचा होणारा गंभीर परिणाम हे सारे बदल म्हणजे सांस्कृतिक स्थित्यंतर आहे व त्याचे पडसाद साहित्यामध्ये पडणे अपरिहार्य आहे. कारण साहित्याचे भांडवल भवतालचे जीवन व माणसाची सुख-दुःखं असतात. पण या साऱ्या बदलाचा नीट आवाका समजून घेणे, त्याचा अन्वयार्थ लावणे हे लेखकासाठी अपरिहार्य आहे, तसे असले पाहिजे असे मला वाटते.

 यंदाच्या जयपूर लिटरेचर फेस्टिवल मध्ये (२०१४ जानेवारी) 'ग्रीड फॉर ग्लोबलायझेशन इज किलिंग इंडियाज सोल' यावर एक फार उद्बोधक चर्चा झाली होती, तिची आठवण मला आज तुम्हांला उत्तर देताना व माझं प्रकट चिंतन अभिव्यक्त करताना होतेय. स्वामी अग्निवेश यांनी बोलताना फार मार्मिक टिपणी केली होती. ती (संदर्भ पाहात) मी सांगतो. ते असं म्हणाले होते, ते मी मूळ इंग्रजीतच देतो.
 'It is theocratisation of the market place which is distrubing me. By glorifying globalisation we are glorifying greed. Anew God is emerging from the market forces and there is no place any more for social and economic justice.'
 काहींना हे विधान व प्रतिक्रिया टोकाची वाटण्याचा संभव आहे. पण आज भारतात ते घडताना दिसतंय. काही भांडवलदार अर्थविकास हा नवा देव मानू लागले आहेत. आपण 'गरज' (नीड) आणि स्वार्थ आणि ओरडबडून घेणं (ग्रीड) यामधला फरक विसरत चाललो आहोत. त्यामुळे भारतात जागतिकीकरणाची काळी बाजू मोठ्या प्रमाणात दिसत आहे. ती अनेक देशांनी रोखली आहे, पण भारताचं खुजं व कमी बौद्धिक प्रतीचे नेतृत्व रोखू शकत नाही, हाच याचा मथितार्थ आहे. आज उजव्या पक्षाचं राज्य आहे व त्यांच्यासाठी स्वामी विवेकानंद हे ऑयडॉल आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या सुप्रसिद्ध १८९३ च्या जागतिक धर्मपरिषदेमध्ये याबाबत सर्व जगाला इशारा देताना जे म्हटले होते, ते लक्षात ठेवावं असं मी सुचवेन. स्वामीजी असं म्हणाले होते,
 'Shall India die? Then from the world all spirituality will be extinct, all ideality will be extinct and in its place will reign the duality of lust and luxury as the male and female dieties, with money as priest. Fraud, force and competition its ceremonies and human soul as its sacrifice. Such thing can never be.....
 असं काही होऊ नये म्हणून लेखक म्हणून माझी व सर्वांचीच काही एक जबाबदारी नाही का? आम्हां लेखकांच्या लेखनातून ही चिंता, हा हास आणि हे बदल प्रतिबिंबित होणार की नाही? माझ्यापुरतं बोलायचं झालं तर 'अंधेरनगरी'मध्ये 'लस्ट फॉर पॉवर अॅण्ड मनी' - म्हणजेच सत्ता व पैशाची लालसा व राजकारणाचे गुन्हेगारीकरण रेखाटले आहे. 'ऑक्टोपस' मध्ये मी 'ग्रीड' ही 'नीड' वर कशी मात करते व भ्रष्टाचार कसा पसरतो व त्यात मानवी मूल्ये कशी हतबल होतात यावर कलात्मक भाष्य केलं आहे. 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' मध्ये दहशतवाद, धार्मिक मूलतत्त्ववाद आणि सत्तेची लालसा व समाजावर नियंत्रण मिळवणे, स्त्रीला अधिक

गुलाम करणे आदी विषयावर पात्रांकरवी विस्तृत असं जीवनदर्शन आलं आहे. बालमजुरी हे शोषणाचं सर्वात वाईट व काळं रूप आणि विकृती आहे हे माझ्या 'हरवलेले बालपण' मध्ये अधोरेखित झालं आहे. याची तुमच्यासारख्या समीक्षक अभ्यासकांनी दखल घेत विवेचन केलं आहे. केवळ कलावादी- सौंदर्यवादी फूटपट्या लावीत त्याकडे कानाडोळा करणं योग्य नाही.
 एकूण मराठी साहित्यात जागतिकीकरणाबाबत व प्रभावित केलेल्या संस्कृतीजीवन व्यवहाराबद्दल किती आलं आहे, हे सांगण्याइतपत माझा अभ्यास नाही. तथापी राजन गवस, रंगनाथ पठारे, राजन खान आदींच्या साहित्यातून काही प्रमाणात तरी हे आलं आहे असं माझं मत आहे.
विनोद शिरसाठ :
 साहित्यविषयक आकलन आणि लेखन या संदर्भात तुमच्या कारकिर्दीचे काही टप्पे दाखवता येतील का? असे टप्पे येण्यास कारणीभूत ठरलेले घटक कोणते असावेत? अद्याप साहित्य व समाजाच्या आकलनाचे काही टप्पे बाकी आहेत असे आपणास वाटते का?
लक्ष्मीकांत देशमुख :
 (हसत) बापरे, हा तर फारच समीक्षकी थाटाचा प्रश्न झाला. दुर्दैवाने मी काही मराठीचा प्राध्यापक नाही. असो, विनोदाचा भाग सोडून देऊ या; पण खरंच हा प्रश्न भलताच अवघड आहे माझ्यासाठी. पण तरीही उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.
 एक बाब मात्र इथं नमूद करणं आवश्यक वाटतं की, मी उस्फूर्ततेवर भर देत लिहिणारा ललित लेखक आहे. मला एकादी कथा सुचली की, सुरुवात करताना जो वेळ लागेल तो दिला, की सलग एक-दोन वा तीन बैठकीत १५ ते २५ फुलस्केप पानांची कथा लिहून होते. माझ्याकडून त्यासाठी फार चिंतन, मनात ती घोळवत राहाणं असं होत नाही. दिवसभर व झोपेतही आपला मेंदू काम करीत असतो, त्या अर्थानं विचारचक्र चालू असतंच. त्या विचारचक्रात इतर सांसारिक बाबींप्रमाणे कथेचा विचारही असतो. पण उस्फूर्ततेवर माझा जास्त भर असतो. हीच बाब कादंबरी लेखनाची आहे. ती दीर्घ टप्प्याची असल्यामुळे तिथं प्रत्येक टप्प्यावर व प्रकरण/ भागापूर्वी चिंतन होणं अपरिहार्य आहे. पण मी सहजतेनं लिहितो, त्याचे पुनर्लेखनपूर्ण नवा ड्राफ्ट होत नाही. थोड्या दुरुस्त्या, थोडीशी भर वा थोडीशी काटछाट होते. अगदीच एकादा भाग पसंत पडलाच नाही तर नव्यानं लिहून होतं एवढंच.
 या पाश्र्वभूमीवर माझे साहित्यविषयक आकलन व लेखनाचे काही टप्पे दिसतात का? माझं वाचन अफाट आहे. मी नेहमी म्हणतो, वाचकाचा प्रवास (मराठीच्या

संदर्भात) बाबा कदम, सुहास शिरवळकर आदींच्या रंजक साहित्यापासून जी. ए., नेमाडे, शाम मनोहर आदींच्या गंभीर, आशयप्रधान व शैलीदार साहित्यापर्यंत व्हाया रंजक पण गंभीर लिहिणारे जयवंत दळवी, रत्नाकर मतकरी इ. द्वारे रुंदावत व सखोल होत गेला पाहिजे. माझा तसा होत गेला. शालेय वयात वर्ध्याच्या राष्ट्रभाषा समितीच्या बी. ए. समकक्ष पर्यंतच्या हिंदीच्या परीक्षा दिल्या. त्यामुळे हिंदी साहित्याचे वाचन सुरू झालं. पुढे इंग्रजीचं. त्यामुळे माझं साहित्यभान विस्तृत झालं व आकलनही. पुन्हा मला वृत्तपत्र-मासिक वाचायची पण भारी आवड- नव्हे, व्यसनच आहे. स्पर्धा परीक्षेच्या निमित्तानं अर्थशास्त्र, समाजशास्त्र इतिहास आदी मानव्य शाखांचा अभ्यास झाला. नांदेडला चालत्याबोलत्या नरहर कुरुदंकर नामक विद्यापीठाचाही स्वयंघोषित विद्यार्थी म्हणूनही अनेक विषयाचं सहजतेनं झानार्जन झालं. या साऱ्याचा परिपाक म्हणून आधी समाजाचं- समाज स्थितीचं व पर्यायानं साहित्याचं माझं आकलन वाढत गेलं !
 माझ्या काही सुरुवातीच्या कथांचे विषय हुंडा नाकारून अविवाहित राहाणं पत्करणारी स्त्री, क्रीडा स्पर्धा व खेळाडूंचे विश्व, सैल झालेले नातेसंबंध असे होते. पण तरीही माझ्या पहिल्या दोन संग्रहातील कथांचे विश्व माझ्या तरुण मनाचे प्रतिबिंब आणि भावभावना व्यक्त करणारे होते, त्या दृष्टीने 'स्वत:च्या मनाचा एक्सरे रिपोर्ट', 'माझे अबोलणेही', 'अभिमान' आदी कथांकडे मी आज पहातो. पण तरुणपणी कविता व गद्यात प्रेमकथा लिहिली पाहिजे, या अलिखित नियमाला मी अपवाद होतो हे मात्र नक्की. प्रेम, स्त्री-पुरुष संबंध, त्यातील गुंतागुंत याबाबतच्या काही कथा जरूर लिहिल्या. माझा आगामी कथासंग्रह 'मृगतृष्णा' अशाच काही कथांचा संग्रह आहे. खरं तर माझा मनस्वी स्वभाव, प्रेम संकल्पनेचं आकर्षण आणि स्त्रीबाबतची स्वाभाविक ओढ पाहाता मी प्रेमकथा का लिहिली नाही याचं मलाही कारण सापडत नाही. किंवा असं असेल का, त्यात मला वेगळं सांगण्यासारखं काही सुचलं नसेल... पण प्रथमपासून माझं प्रखर सामाजिक भान मला सामाजिक आशयाच्या, भोवतालच्या परखड वास्तवाच्या आणि माणसाच्या संघर्षपूर्ण जगण्याच्या कथा लिहायला प्रवृत्त करून गेलं. त्यामुळे माझ्या साहित्यविषयक आकलनाचे व लेखनाचे भिन्न भिन्न टप्पे आहेत, असावेत अशी माझी धारणा आहे.
 आणि मला हे पटतं की, लेखक कथाविषय निवडत नाही, तर त्याची प्रवृत्ती निवड करते. मी समाजात काय घडतं याचा अत्यंत जागरूक वाचक, निरीक्षक व अभ्यासक आहे. त्यातूनच मला चटकन नवं काही सुचतं. अगदी आजच (दिनांक २३ डिसेंबर २०१४ चं) उदाहरण देतो. गेले पंधरा दिवस संघ परिवाराचं शुद्धीकरणाचं, जे हिंदू पूर्वी धर्मांतर करून मुस्लीम-ख्रिश्चन झाले, त्यांना पुन्हा हिंदु धर्मात आणण्याचं 'घर वापसी' काम संसदेत गाजत आहे. यावर मला 'घर वापसी- पण गांवकुसाबाहेरची'

अशी कथा सुचली आहे. ती लवकरच लिहिणार आहे. मूळ दलित माणूस मुस्लीम होतो आणि 'घर वापसी'नं पुन्हा हिंदू होतो, पण त्याची जात कायम राहाते. त्याच्या धर्मांतर न केलेल्या भावावर त्यानं उच्चवर्णीय मुलीशी प्रेमविवाह केला म्हणून बहिष्कार चालू आहे. याला मुस्लीम असताना गाव बहिष्काराचा फटका बसत नाही, पण 'घर वापसी' करून पुन्हा तो हिंदू धर्मात, नव्हे, हिंदूमधील दलित जातीत परततो आणि त्याच्यावरही गांव-बहिष्कार टाकला जातो... अशा आशयाची कथा मला सुचली. हे मी यासाठी थोडं सविस्तर सांगितलं की मला नेहेमीच माझ्या सामाजिक भानामुळे अशा सामाजिक आशयाच्या कथा सुचतात. मी पुन्हा कोणत्याही इझमचा नाही, त्यामुळे डाव्या, उजव्या, मुस्लीम-बौद्ध धर्मीयांच्या संदर्भात त्यांचं माणूसपण व संघर्ष विसंगतीच्या व टकरावाच्या कथा सुचतात. त्यामुळे माझा असेल कोणता 'इझम' तर तो 'ह्युमॅनिझम' आहे असं मी मानत आलो आहे.
 समग्र सामाजिक भान व आकलन हे कोण्या एका मानवी मनाच्या आवाक्याबाहेरचे आहे. मी त्याला अपवाद नाही. पण तरीही ते सातत्याने वाढत आहे, त्याचे नवे नवे पैलू जाणवत आहेत. त्या अर्थानं माझी वाढ चालू आहे, खुंटलेली नाहीय. म्हणून त्या संदर्भात अजूनही लेखनाचं वैविध्य, सखोलता व उंची (जी गाठली आहे आजवर त्यापेक्षा अधिक) गाठायची आहे, असंच फार तर मला प्रांजळपणे कबूल करता येईल.
विनोद शिरसाठ :
 तुम्हांला मी थोडं मागे जाऊन पाहायला लावत एक प्रश्न विचारतो. आपण चांगले लेखन करू शकतो याची जाणीव साधारणपणे सुरुवातीच्या काळात कधी वाटले होते का? लेखक म्हणून काही महत्त्वाकांक्षा मनात ठेवली होती का?
लक्ष्मीकांत देशमुख :
 प्रत्येक जरी नाही तरी काही चांगल्या वाचकांना वाचनाच्या एका टप्यावर आपण लेखन करू शकतो याचा आत्मसाक्षात्कार होतो, असं जे म्हटलं जातं ते माझ्याबाबत नि:संशय खरं आहे. बालपणापासून वाचनाची गोडी लागली व समोर येईल ते वाचू लागलो. सहावी-सातवी दरम्यान कधी तरी चार-दोन बालकथा लिहिल्या गेल्या. तसंच काही कथा-लेख (शालेय हस्तलिखित मासिकात). नंतर कॉलेज सुरू झालं आणि गांभीर्यानं सतत नसलं, तरी अधून मधून कथालेखन सुरू झालं. साधारणपणे वयाच्या विशीमध्ये माझ्या कथांना तीन-चार कथालेखन स्पर्धेत प्रथम वा द्वितीय क्रमांकाचं बक्षिस मिळालं आणि जाणीव झाली, की आपण चांगलं- मुख्य म्हणजे वेगळा आशय असलेलं- लेखन करू शकतो. आणि त्यावेळच्या तरल तरुण भावविश्वात स्वत:चं वेगळेपण सिद्ध करण्यासाठी (इतरांना कुणाला? सांगायची

गरज आहे?) इंप्रेस करण्यासाठी पण आतून उत्कटतेनं वाटतं म्हणून लेखन सुरू झालं. मध्ये (पूर्ण न झालेलं) संशोधन- (त्यावरही मी लिहिलं होतं. जे नितांत वैयक्तिक म्हणून छापले नाही) आणि नोकरी- प्रथम बँक, मग स्पर्धा परीक्षा व उपजिल्हाधिकारीच्या कामात झोकून दिल्यामुळे मोठा गॅप पडला. पण वयाच्या पंचविशीत पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला. दुसरा त्यानंतर साताठ वर्षांनी आला. तरी मधल्या काळात लेखन सरूच होतं. स्वत:च्या मनात ही भावना मात्र होती की, आपण जरा वेगळं- लिकसे हटकर लिहीत आहोत.
 माझ्या लेखनाची यत्ता कोणती हे मला माहीत नाही, त्याचा न्याय निवडा मी नेहमीच वाचक व समीक्षकांवर सोडला आहे; पण एक ठामपणे विधान करू शकतो, माझ्या लेखनावर कुणाचीही छाप नाही. कुणाचेही मी अनुकरण केलेलं नाहीय, किंवा कुणाच्या शैलीचा अभ्यास करून तसं प्रभावाखाली येत लिहिण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. मराठीत मला अरुण साधू, रंगनाथ पठारे, जी. ए. कुलकर्णी आवडतात. पण त्यांचा माझ्या लेखनावर परिणाम झालेला नाही. मी हिंदी-इंग्रजीचंही बरंच वाचन केलं आहे. पण मी माझ्या स्वत:च्या जाणिवेतून घडत गेलेला लेखक आहे.
 लेखक म्हणून माझी काही खास अशी महत्त्वाकांक्षा होती, आहे असं मला वाटत नाही. पण सतत लिहावं आणि वाचकांना जे आवडावं, समीक्षकांना ते प्रभावित करावं ही इच्छा मात्र सदैव राहिली आहे. मला साहित्यविषयक बरीच पारितोषिकंही मिळाली आहेत, तरीही 'इन्किलाब' वा 'नंबर वन', 'बखर भारतीय प्रशासनाची' याला मला जी काही महत्त्वाची पारितोषिके मिळायला हवी होती, ज्यासाठी ह्या माझ्या साहित्यकृती पात्र होत्या असं मला वाटत होतं, त्या मिळाल्या नाहीत हे खरं. दोन पारितोषिकं मला मिळता मिळता राहून गेली. असं त्या पारितोषिक समितीमधल्या सदस्यांनीच नंतर सांगितले, तेव्हा खंत वाटण्याखेरीज काय हाती होतं? असो, भरपूर लिहिणं व लिहिलेलं छापलं जाणं ही प्राथमिक महत्त्वाकांक्षा आजही कायम आहे. पारितोषिक, सन्मान कुणाला नको असतात? मलाही ती गुणवत्तेच्या जोरावर मिळावेत ( मिळाले पण आहेत) असं वाटतं हे मात्र खरं!
विनोद शिरसाठ :
 'नंबर वन' हे पुस्तक क्रीडा संचालक म्हणून काम करताना २००८ साली प्रकाशित झालं आहे, पण त्या लेखनाची बीजं आधीच कधीतरी पडली होती. व संधी मिळताच उगवून आली असे काही झाले आहे काय?
लक्ष्मीकांत देशमुख :
 तुमच्या प्रश्नातच उत्तर सामावलं आहे. सुरवातीच्या लेखनात मी क्रीडापटूवर

लिहिलं. 'ब्रदर फिक्सेशन' व 'अखेरचे षटक' या कथांना मानाच्या कथास्पर्धात पारितोषिके मिळाली होती. खरं तर मी त्या अर्थानं खेळाडू नाही, पण खेळात प्रचंड रस आहे. त्याहीपेक्षा कलाजगताप्रमाणे क्रीडाजगतातील खेळाडू, त्यांचं वर्तन, त्यांची मानसिकता व त्यांचे जय-पराजय- मला कायम एक माणूस म्हणून व एक लेखक म्हणून आव्हान देत आले आहेत. त्यातूनच या क्रीडा-कथा लिहून झाल्या. मग २००७-२००८ मध्ये मी राज्याचा क्रीडा संचालक झालो व त्याच काळात आंतरराष्ट्रीय स्तरावरची राष्ट्रकुल युवाक्रीडा स्पर्धांचं आयोजन झालं, त्यात माझा सहभाग होता. त्या निमित्तानं खेळाडू, खेळांची असोसिएशन्स आणि खेळांचं जवळून दर्शनआकलन झालं आणि एकामागून एक क्रीडा कथा सुचत गेल्या. आणि त्या लिहून प्रकाशित झाल्या. 'नंबर वन' नंतरही मी तीन / चार क्रीडा विषयक कथा लिहिल्या. अगदी २०१४ च्या 'अष्टपैलू' या क्रीडाविषयक दिवाळी अंकातही फ्री फॉल जंप आणि अॅडव्हेंचर स्पोटर्सवर शीतल महाजन आणि कृत्रिम पायानं एव्हरेस्ट जिंकणारी अरुजिमा सिन्हाच्या कामगिरीचे अनोखं मिश्रण करून एक पूर्ण काल्पनिक पण वास्तवावर आधारित साहसी क्रीडाकथा लिहिली आहे. नूरा (म्हणजे खोटी लढत देऊन मुद्दाम हार पत्करणे) कुस्तीवर पण एक कथा लिहिली आहे, जिच्यावर आगामी काळात चित्रपट येण्याची शक्यता आहे. त्याची पटकथा व संवादही लिहून तयार आहेत. तसंच 'नंबर वन' मधील 'फिरून नवी जन्मेन मी' वर 'जगज्जेती' नामक सिनेमाची पटकथा, संवाद मी लिहिले आहेत. जर सिनेमाचं जमलं नाही तर त्याचं रूपांतर नंतर कधी तरी कादंबरीत करेन.
विनोद शिरसाठ :
 तुमची जडणघडण मराठवाड्यात झाली असल्याकारणाने पाणी टंचाई केंद्रभागी असलेला 'पाणी! पाणी!!' कथासंग्रह आला असावा. 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' लिहायला तुमचे आई-वडील ज्या हैद्राबाद संस्थानात (निजाम राजवटीत) जन्मले, वाढले व तुमचंही बालपण त्याचा भाग असणाऱ्या मराठवाड्यात गेलं म्हणून ती पार्श्वभूमी कारणीभूत असणार, त्यातून बाहेर आल्यावर बराच काळ लोटल्यावर आणि वेगळ्या प्रदेशात राहिल्यानंतर पूर्वीच्या त्या लेखनात काही अधिक-उणे दिसतं का?
लक्ष्मीकांत देशमुख :
 तुमचा हा प्रश्न मी जरा वेगळ्या पद्धतीने विचारात घेऊन उत्तर देतो. हे खरं की, मी मूळचा मराठवाड्याचा. आज पुण्यात असूनही मराठवाड्याच्या मातीचा टिळा मी अभिमानाने मिरवतो. त्या भागात माझं बालपण, कॉलेज जीवन आणि नोकरीची पहिली पंधरा-वीस वर्षे, म्हणजे साधारणपणे चाळीशी-पंचेचाळीशी पर्यंतच्या आयुष्याचा काळ

तेथेच मी घालवला. त्या काळात त्या भागात पाणीटंचाई मी जवळून पाहिली, अनुभवली. एक सहज आठवण झाली म्हणून सांगतो... मुरुम, तालुका उमरगा हे माझे मूळ गाव. शालेय वयात उन्हाळ्याच्या सुट्टीत तेथे मी जात असे. तेथे पाणी टंचाई खूप होती. एका सार्वजनिक विहिरीवरून पिण्याचं पाणी शेंदून आणावं लागायचं. मला पोहरा-घागर दोरीला लावून उघड्या विहीरीत सोडून पाणी शेंदता येत होतं. उस्मानाबदला फरशी गल्लीत आमचं वास्तव असताना दुरून पाणी आणावं लागायचं. तसंच प्रशासनात सातत्यानं दुष्काळाशी सामना करावा लागला. आणि परभणीला १९९५९६ ला असताना कधीतरी पहिली कथा ‘बांधा' लिहिली, मग 'पाणी चोर'; आणि लक्षात आलं की कितीतरी पाणी टंचाईचे संदर्भ मनात भिनलेले आहेत. ते मग अलगद बाहेर आले, त्या कथा झाल्या. आणि माझा पहिला एका प्रश्नाभोवती केंद्रित झालेला थीमबेस्ड कथासंग्रह किंवा कथामालिका झाली. आज पंधरा वर्षानी तो कथासंग्रह वाचतो किंवा २०१० साली त्यातील सहा कथांची नामवंत कलावंताच्या आवाजातली कथा- वाचनाची ऑडीओ सीडी आली तेव्हा त्याचा विचार केला तर वाटलं की आपण फार संयमानं लिहिलंय. पाणी टंचाई व दुष्काळाचं वास्तव कितीतरी जास्त दाहक आहे व ग्रामीण माणसावर त्याचा होणारा परिणाम कितीतरी खोल आहे.... तो मला पूर्ण समग्रतेनं पकडता आला नाहीय. आजही महाराष्ट्र तहानलेला आहे, नव्हे, त्याची ती तहान वाढलेली आहे... हे मागेपुढे कदाचित लिहीनही. आज सांगता येत नाही.
 'इन्किलाब'चं बीजही मला १९९४-९५ मध्ये परभणीत असतानाच सुचलं. कारण त्यावेळी अफगाणिस्थानमध्ये कम्युनिस्ट राजवट चालू होती. मुजाहिदीननी सत्ता काबीज करून जेव्हा १९९६ मध्ये नजिबुल्लाहला भर चौकात सरे आम फाशी दिली आणि शरीयाप्रणीत राजवट आणली- स्त्रियांचं शिक्षण बदं करीत त्यांना बुरख्यात बंदिस्त केलं, तेव्हाच हे कादंबरीचं कथानक व ‘इन्किलाब विरुद्ध जिहाद' हा संघर्ष सुचला. त्याला माझी मराठवाडी पार्श्वभूमी कारणीभूत होती- असणार. कारण माझ्या भागात- खास करून शहरात- जिल्हा मुख्यालयी मुस्लीमांची लक्षणीय लोकसंख्या आहे. आणि माझे अनेक मुस्लीम मित्र आहेत. उर्दू शायरी व मुशायराचं मला वेड होतंते आजही कायम आहे. परभणी-खुलताबादच्या उरुसात कव्वाली ऐकणं हाही माझा शौक होता. पुन्हा नरहर कुरुंदकरांमुळे मुस्लीम प्रश्न, इस्लाम, भारतीय फाळणीवरचं वाचन झालं. रफिक झकेरिया, असगर अली इंजिनिअर आदींचे ग्रंथ जिज्ञासेपायी वाचत गेलो. ही माझी पार्श्वभूमी मला 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' चं कथानक सुचण्यास कारणीभूत ठरली असणार. पुन्हा मला जगातील अनेक प्रश्न ललित अंगानं अस्वस्थ करतात. जपानमधील अणुस्फोटामुळे १९७०-७५ पर्यंत अणुविकृत माणसं जन्मास येणं - त्यावरची माझी 'हिबाकुशा' ही कथा आहे ही श्रीलंकेमधील तामिळ- सिंहली

संघर्ष पण मला अस्वस्थ करतात. काश्मीर समस्या मला भारत-पाक संबंधाची एक भळभळती जखम म्हणून विद्ध करते. त्यावर मी लवकरच 'इन्किलाब' सारखी बृहद्कादंबरी लिहायला घेणार आहे. पुन्हा मला हैद्राबादचा मुक्ती संग्रामही सतत खुणावत असतो. थोडक्यात जागतिक समस्या मला लेखक म्हणून खुणावत असतातपण प्रामुख्याने मुस्लीम जगत व इस्लाममधला संघर्ष- कट्टरता व मॉडरेटमधला संघर्ष-अधिक वेधक वाटतो.
 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' ही कादंबरी मराठवाड्यात असतानाच लिहून झाली. आज दहा वर्षानी २०१५ मध्ये तिची संपादित जनावृत्ती प्रकाशित होणार आहे. तिला मी नव्याने उपोद्घात (प्रोलॉग) व उपसंहार (इपिलॉग) लिहिण्याचं ठरवलं आहे. त्याचं कारण, मला ती कमी, उणं वाटते हे नाही तर मी ज्या टप्प्यावर ही कादंबरी संपवली त्यानंतर आज एक वर्तुळ पूर्ण करून पुन्हा एकदा अफगाणिस्थान हा तालिबान्यांच्या ताब्यात जाण्याची चिन्हं दिसत आहेत. म्हणून थोडी भर टाकायची आहे.
 इतराप्रमाणे मलाही माझ्या प्रकाशित लेखनात नंतर काही उणिवा दिसू लागतात. कारण त्यानंतर आपली समज, आकलन वाढलेलं असतं. अधिक अनुभवाचं गाठोडं जमा झालेलं असतं; पण हे असं होणं क्रमप्राप्त असतं. तरीही मी जे लिहिलं त्यावर . खूश असतो. स्वत:चं मूल कितीही वेडब्रिदं असलं तरी आईला ते प्रिय असतं, तसंच लेखन म्हणून माझी निर्मिती मला आवडते; कारण ती माझी असते, तिचा मी रचयिता असतो.
विनोद व रूपाली :
 मुलाखत छान झाली. तुम्ही सर्वच प्रश्नांना मनापासून उत्तरे दिली. तुमचं हे साहित्याचं चिंतन मराठी वाचक, समीक्षक आणि अभ्यासकांना विचारप्रवृत्त करेल, यात आम्हां दोघांना शंका वाटत नाही. आपण एवढा वेळ दिला, त्याबद्दल आभार.
लक्ष्मीकांत देशमुख :
 धन्यवाद !

'प्रेमचंद' परंपरेचा पाईक

भ. मा. परसावळे

भ.मा.परसावळे -
 सर्वप्रथम नांदेड येथे भरणाऱ्या ३६ व्या मराठवाडा मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आपली निवड झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन! हा आपल्या आजवरच्या २० पुस्तकांच्या रूपाने केलेल्या साहित्य सेवेचा उचित गौरव आहे असे मी मानतो.
लक्ष्मीकांत देशमुख -
 आभारी आहे. मला ज्या असंख्य वाचक व साहित्यिक मित्रांचे फोन व एस. एम. एस. येत आहेत, त्यामुळे मी भारावून तर गेलो आहे, पण त्यापेक्षा अधिक विनम्र झालो आहे.
परसावळे -
 आता मुलाखतीकडे वळू या. माझा पहिला प्रश्न. हा जरी जुना असला तरी महत्त्वाचा आहे तो विचारतो. आपल्या लेखनाच्या प्रेरणा कोणत्या?
देशमुख -
 प्रत्येक माणसाला व्यक्त होण्याची सहज प्रेरणा असते, तशीच मन मोकळं करण्यासाठी ती गरजही असते. पण ज्यांना प्रतिभेचे वरदान मिळाले असेल, असे कलावंत नाटक - सिनेमा असेल वा नृत्य, संगीत अशा विविध कला माध्यमातून अभिव्यक्त होत असतात. मी शब्दात व्यक्त होणार नाही अशा अलौकिक प्रतिभेचा थोडा स्पर्श झालेला छोटा कलावंत आहे व कथा-कादंबरी हे माझे अभिव्यक्तीचे माध्यम आहे.
 आत्माविष्कार ही कलावंताच्या कलेची पहिली व अखेरची प्रेरणा असते, पण कलावंत हा समाजाचा जबाबदार घटक असतो आणि आपल्या काळाचं 'प्रॉडक्ट' अपत्य असतो. त्यामुळे त्याची कलाप्रेरणा केवळ मनाचा अविष्कार नसते, तर

समाजातील माणसांच्या सुख-दुःखाची, संघर्ष लढ्याची प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष कृतीद्वारे वा सहानभतीने जाणून घेऊन ती व्यक्त करणे व माणसाला जगण्याला बळ देणे, त्याला प्रसंगी पेटवणं तर कधी रिझवणं अशा पद्धतीने आपल्या प्राप्त व विकसित होणाऱ्या प्रतिभारंगात मिसळून व्यक्त होते.
 मी स्वत:ला सामाजिक प्राणी समजतो व माझी नाळ सदैव माणसाच्या दु:ख वेदनेशी जोडलेली गेलीय असं वाटतं. खरं तर टॉलस्टॉयनं म्हणल्याप्रमाणे सुखाच्या - आनंदाच्या कहाण्या फार एक दोन होतील, पण दु:ख, वेदना आणि संघर्षाच्या शेकडो कथा होऊ शकतात. मला तर प्रत्येक माणसाचं दुःख, संघर्ष हा माझ्या लेखनाचा कच्चा माल वाटतो. अशा माणसाचं अंतरंग प्रतिभा, स्वानुभव, चिंतन आणि मनन करून जाणणं व शब्दाच्या माध्यमातून प्रकट करीत माणसाच्या दुःख - वेदनेशी संघर्ष करणाऱ्या त्याच्या विजिगीषू वृत्तीला बळी देणं ही माझ्या लेखनाची सर्वात प्रबळ प्रेरणा आहे, असं मी मानतो.
 आज एकविसाव्या शतकातलं जग स्फोटक बनलं आहे. गरिबी, मूल्यांचा हास, दशहतवाद, क्रौर्य आणि सत्तेमुळे होणारी दडपशाही यामुळे सामान्य माणूस निराश, हतबल व कुंठित झाला आहे. त्याला स्वर देत आत्मभान मला देता येईल व त्याचा जगण्याचा विश्वास अंशमात्रानं का होईना वाढवता येईल का हा माझ्या सतत प्रयत्न राहिला आहे. आपल्या देशापुरतं बोलायचं झालं तर इंडिया विरुद्ध भारत हा संपन्नता विरुद्ध अभाव, विकृतीच्या टोकापर्यंत पोचलेला सुखभोग विरुद्ध भूक व जगण्यसाठी चोरी खून करण्यापर्यंत मजबुरीनं पोचलेली दुसरी असह्य विकृती आणि आत्महत्त्येपर्यंतची निराशा व संपलेपणाचा विषम संघर्ष आहे. तो आपल्या लेखनातून प्रकट होताना वाचकांना मी काय देऊ शकतो, याचं मी सातत्यानं भान बाळगतो. तसेच 'हॅव नॉट' म्हणजेच 'नाही रे' वर्गाची बाजू घेत त्यांच्या कथा लिहिणे ही पण माझी एक स्वाभाविक प्रेरणा आहे, तसेच ते विचारपूर्वक बनवलेले तत्त्वज्ञान आहे. मात्र त्यासाठी कोणताही एक 'इझम' वा तत्त्वज्ञान हा मानवी कल्याणाचा अक्सीर रामबाण इलाज आहे. असे मी मानीत नाही. माझा असेल इझम तर तो नि:संशयपणे निखळ मानवतावाद आहे.
 पुन्हा, मी पूर्णत: व्यक्तीवादी व व्यक्तिस्वातंत्र्याचा भोक्ता आहे. प्रत्येकाला कायद्याच्या चौकटीत, इतरांना त्रास होणार नाही एवढी काळजी घेत मनचाहे जगायचा पूर्ण अधिकार आहे. मग आंतरजात - धार्मिक विवाहाची बाब असो, होमो सेक्युॲलीटाचा प्रश्न असो, 'लिव्ह इन' मध्ये राहात लग्नसंस्थेला नकार देण्याचा प्रश्न असो - येथे माणसाचं वर्तन त्याच्या स्वत:च्या नैतिकतेच्या कसोटीवर मी पारखायचा प्रयत्न करतो, मग त्याचं / तिचं हे वर्तन समाज मान्यतेच्या चौकटीत बसो वा न बसो .....

त्याचं निवडीचं व जगण्याचं स्वातंत्र्य मला मोलाचं वाटतं. ते जपावंसं वाटतं. या विचारश्रद्धेतूनही मी आजवरचं माझ ललित लेखन केलं आहे. ही पण माझी लेखनाची एक प्रेरणा आहे.
 अंतिमतः एवढं म्हणता येईल की माझं लेखन हे माणसाच्या सुखापेक्षा दुःख - संघर्षाचे कलात्मक वर्णन वास्तवतेला सोडचिठ्ठी न देता होत असतं व पुढेही होत राहील.
परसावळे -
 आपण खुऱ्या अर्थाने समकालीन लेखक आहात असे मला वाटते. हे सहज घडत गेले का दायित्व म्हणून आपण स्वीकारले आहे?
देशमुख -
 तुम्हाला मी आजच्या वर्तमानाला अर्थात समकालीन लेखक वाटतो ही माझ्यासाठी सकारात्मक कॉम्प्लीमेंट आहे असे मी मानतो. याचे उत्तर सोपं नाही. पण ते देण्याचा प्रयत्न करतो. मराठी वाचकांना पुराण - इतिहासात रमायला आवडतं. राजकीय नेते हे जाणून मतपेटीसाठी 'पुनरुज्जीवनवादा' ला उजाळा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे जुन्या काळाचे व त्याकाळच्या नायकांना देवत्व बहाल करणारे लेखन बरेच होत आहे. दुसरा लेखनाचा प्रकार म्हणजे 'नॉस्टेल्जीक' होत गेलेल्या लेखनाचा. मला वाटतं की, मराठी माणूस अजूनही भूतकाळात जास्त रमतो. त्यामुळे लेखकही तसं लिहीत असतील. पण माझी स्मरणरंजनाची व इतिहास - पुराणात रमण्याची वृत्ती नाही. त्यामुळे त्यापासून मी बचावलो आहे. भविष्यात मला काश्मीर समस्या, हैद्राबाद मुक्ती संग्राम व जात-धर्म संघर्ष चितारणारी एक ऐतिहासिक कादंबरी - असं ऐतिहासिक स्वरूपाचं जरूर लिहायचं आहे, पण त्यातला विचार व प्रेरणा आजच्या आधुनिक संवेदनाच्या असतील, हे मी खात्रीनं सांगेन. त्यामुळे मी भूतकाळात रमणारा लेखक नाही, तसेच विज्ञानकथा लेखकांप्रमाणे भविष्याचा वेध घेणारा लेखक नाही.
 मी खऱ्या अर्थाने वर्तमानात जगणारा व आजच्या काळाचं प्रॉडक्ट असलेला मी एक माणूस व एक लेखक आहे. सबब तुम्ही मला समकालीन लेखक म्हणू शकता. इथं कदाचित एक धोका माझ्यासारख्या समकालीन लेखकाबाबत उद्भवतो. तो हा, की उद्या हे साहित्य शिळं तर होणार नाही? माझं उत्तर साफ आहे. कालिदास, शेक्सपिअर, प्रेमचंद व मंटोसारखे कालजयी लेखक पण आज किती वाचले जातात? त्यामुळे भविष्यकाळातील वाचकाची मी बिलकुल चिंता करीत नाही. आज जो माझ्या भोवतालचा समाज आहे, माणसं आहेत, त्यांच्यात मी गुंतलेला असतो. लेखक म्हणून तसेच कलावंत म्हणून त्यांच्या खाजगी जीवनाविषयी मला निकोप कुतूहल

लेखक म्हणून आहे. ते जाणून व समजून घेत मी आजच्या माणसासाठी लिहितो. मला इथं साहिरचं गाणं तत्त्वज्ञान म्हणून एकदम मान्य आहे. 'ये पल उजाला है. बाकी अंधेरा है. ये पल गवाना ना. ये पल ही तेरा है. जीनेवाले सोच ले यही वक्त है करले पुरी आरजू.' म्हणून तुम्ही म्हणला नसतात तरी मी स्वत:ला वर्तमानाचा, समकालीन लेखक म्हणून घेतलं असतं. समकालीनत्व हा माझ्या लेखनाचा 'यु. एस. पी.' आहे म्हणा ना!
 पण याचा अर्थ असा नाही की, समकालीन लेखन हे क्षणजीवी असतं, मौलिक नसतं. मानवी भाव-भावना, माणसाचे षड्रिपू हे सार्वत्रिक व कालातीत एका अर्थाने सनातन आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर टॉलस्टॉयच्या 'अॅना कॅरेनिना' मधली विवाहबाह्य संबंधाची कथा एका अर्थानं त्या काळाची जितकी होती, तितकीच ती आजची, तसेच वैश्विक व कालातीत आहे. कारण समाजव्यवस्थेसाठी विवाहसंस्था माणसानं निर्माण केली व विवाहबाह्य संबंध निषिद्ध मानले. पण स्त्री-पुरुष आकर्षण व प्रेम हे जेव्हा उत्कट व असीम असतं तर मग कधी-कधी विवाह संबंध व नैतिकतेची चौकट ओलांडली जाते. हे काल, आज व उद्याचं पण वास्तव आहे. महाभारताचं युद्ध हे सत्ता, जमीन व संपत्तीचं होतं, त्यात सत्-असत्ची सरमिसळ पाहायला मिळते. त्यामुळे ते आजही जिवंत आहे. सबब आजचं सर्वच समकालीन लेखन हे क्षणजीवी असेल असं समजायचं कारण नाही. ते उद्या पण समकालीन वाटू शकेल, जर परिस्थिती व मानवी भावना - संस्कृतीत बदल झाला नाही तर. मी गंमतीनं विंदा करंदीकरांची एक कविता थोडी बदलून असं म्हणेन की, 'लिहिणाऱ्याने लिहीत जावे. वाचणाऱ्यांनी वाचत जावे. वाचता वाचता वाचकांनी एक दिवस लेखकाचे मन व्हावे!' आणखी एक बाब लक्षात घेतली पाहिजे ती ही की, माणस हा मर्त्य आहे आणि चिरंजीवत्व हे शाप आहे माणसासाठी. त्यामुळे मला जीवनाचे हे क्षणभंगुरत्व व मर्त्यपणा मान्य आहे व माझ्या लेखनालाही तो न्याय लागत असेल तर मला वाईट वाटायचं कारण नाही.
 माझ्या लेखनातलं समकालीनत्व हे नैसर्गिक आहे, तसंच मी ज्या वातावरणात जगत - वाढत गेलो, जे वाचन - चिंतन केलं आणि प्रशासकीय सेवेत मनापासून लोकांसाठी संवेदनक्षमतेनं काम करताना माणसं, प्रश्न व समस्या कळल्या, त्यातूनच माझं समकालीन वर्तमानाचं दर्शन घडविणारं लेखन घडत गेलं असावं, असं माझं मत आहे.
परसावळे -
 मानवी दुःखाला भिडणारा हा आपला स्थायीभाव असल्याचे आपल्या लेखनातून

प्रत्ययास येतो. तसेच आपली पात्रे सगळ्याच जाती - धर्मातून परंतु निम्न स्तरातून आलेली दिसतात. हे कसे घडले?
देशमुख -
 कोणत्याही लेखकाला जे अंत:करणातून व प्रतिभेने स्फुरते, त्याप्रमाणे तो लिहीत जातो. माझेही तसेच आहे. आजवर जगण्यातून तसेच वाचन - चिंतनातून निरीक्षणातून सहअनुभूतीनं जे भावलं ते मी लेखनातून प्रकट करीत गेलो. त्यामुळे तुमचा हा प्रश्न ऐकताना क्षणभर मी स्तिमित झालो. आणि जाणवलं की, आपलं निरीक्षण खरं आहे. माझ्या अनेक कथांची प्रमुख पात्रे ही निम्न स्तरातून आली आहेत. उदाहरणार्थ, आता बोलताना आठवलं की माझ्या 'रात्र' या पहिल्याच कथासंग्रहातला नायक हा रात्री पावसाळ्यात बेडूक पकडून स्थानिक सायन्स कॉलेजात प्रयोगासाठी व डिसेक्शनसाठी पुरवणारा दलित सुशिक्षित आहे. 'पाणी! पाणी!!' मधील सारी पीडित माणसं व त्यांची सुख-दु:खे ग्रामीण दुष्काळी महाराष्ट्राचे आहेत. माझी पहिली कादंबरी 'सलोमी' ही धर्म परंपरेच्या जाचात काचून गेलेल्या एका बंडखोर मुस्लीम स्त्रीची कहाणी आहे. 'बास्टर्ड कथेतलं मध्यवर्ती पात्र एका पारधी स्त्रीच्या व एका उच्चवर्णीयांच्या संयोगातून जन्मलेल्या व सदैव बंडखोरी आणि 'प्रोटेस्ट' करणाऱ्या तरुणाचं आहे. त्यामुळे आपले निरीक्षण बऱ्याच प्रमाणात माझ्या किमान निम्म्या लेखनाला लागू पडतं.
 हे असं का घडलं असावं? मला वाटतं, माझी स्वाभाविक 'नाही रे' वर्गाशी असलेली बांधिलकी. तसेच प्रथम उप-जिल्हाधिकारी, मग कलेक्टर आदी पदावरून महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात काम करताना प्रामुख्यानं ग्रामीण महाराष्ट्राचा संबंध आला. तळागाळातल्या माणसांचे प्रश्न सोडविणे हे या खात्याचं काम. माझ्यावरील गांधीवादी व युक्रांदीय संस्कारानं माझी वैचारिक तसेच भावनिक बांधिलकी दलित, शोषित व ग्रामीण शेतकऱ्यांशी सहजतेनं जुळत गेली. काम करताना त्यांचं जे जीवनविश्व पाहायला, अनुभवयाला मिळालं ते टीपकागदाप्रमाणे लेखक म्हणून माझ्या मनात टिपलं गेलं असणार. त्यातूनच माझे कथाविषय मला गवसत गेले.
 पण परसावळेजी, मला आत्मकेंद्री व उपभोगाच्या दुनियेत रमलेल्या श्रीमंत व उच्च मध्यमवर्गीय जीवनाचं फारसं आकर्षण कधीच नव्हतं, नाहीय. मी जरी चांगल्या नोकरीमुळे उच्च मध्यमवर्गीयात - आर्थिक बाबीचा विचार करता - सामील झालो असलो तरी माझे संस्कार व जीवनमूल्यं ही आजही मध्यमवर्गीय आहेत. त्यात साधी राहाणी बसते. तसेच, मला श्रीमंतीची मनात कुठेतरी एका बाजूला भीती वाटते, तर दुसऱ्या बाजूला तिटकाराही. त्यामुळे त्यांचं विश्व माझ्या साहित्यात फारसं आलेलं

नाही. याच्या जोडीला ग्रामीण भागातील मध्ययुगीन संस्कार, अहंकार व पीळ अजूनही नसानसात बाळगून असलेल्या जमीनदार व राजकारण्यांबद्दलही मला श्रीमंताप्रमाणे एक प्रकारचा सूक्ष्म तिटकारा आहे. अर्थात लेखक म्हणून त्यांनाही जाणणं माझी अपरिहार्यता आहे. पण त्यांच्यासाठी खचितच माझी सहानुभूती असत नाही. माझी ही मानसिकताच कदाचित माझ्या लेखनाचे विषय ठरवीत असावी. नव्हे असते.
 मुख्य म्हणजे कोणत्याही प्रमुख लेखकाचं लेखन पहा, ते दुःख, वेदना व जगण्याच्या संघर्षाची कहाणी सांगत असतं. टॉलस्टॉयच्या एका कादंबरीचं पहिलंचं वाक्य आहे, 'जगात सुखी माणसाच्या कथा सर्वत्र समान असतात, मात्र प्रत्येकाच्या दुःखाची कहाणी मात्र भिन्न असते.' मला हे मान्य आहे. म्हणून दुःख-वेदनेला भिडणं व लेखन करणं ही माझी स्वाभाविक प्रेरणा आहे. त्यामुळे माझी ही पात्रे कदाचित वंचित घटकातून आणि निम्न स्तरातून आली असणार. माझं हे विवेचन तुम्हाला पटायला हरकत नाही.
परसावळे -
 आपण विशिष्ट स्वरूपाची बांधिलकी मानत नसला तरी आपणास जवळची वाटणारी विचारधारा व लेखक कोणते?
देशमुख -
 कोणत्याही सच्चा कलावंताप्रमाणे मी स्वत:ला कोणत्याही विचारधारा व इझमशी कधी बांधून घेतलेले नाही. कारण जगात अंतिम व कालत्रयी न बदलणारं असं सत्य नसतं, हे माझं ठाम मत आहे आणि दुसऱ्या विरोधी बाजूतही सत्याचा अंश असतो, असं मी मानतो. कोणतीही एक विचारधारा मानवी कल्याणाचं अंतिम उत्तर असत नाही. त्यामुळे विचारधारेपेक्षा माणसं व त्यांचं सुख - दुःख मला अधिक महत्त्वाचं वाटतं. तरीही या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर गांधीवाद मला सर्वात जवळची आपली विचारधारा वाटते. कारण तिनं अंत्योदयाचं स्वप्न पाहिलं आहे. तसेच, खरा भारत हा खेड्यात वसलेला आहे - हे गांधीचे मत मला ग्राह्य वाटतं. त्यांनी घटना करणाऱ्या संविधान सभेच्या सदस्यांना मार्गदर्शन करताना जो तावीज - मंत्र दिला होता ती माझी विचारधारा आहे, असं मी म्हणू शकतो. बापूचा तो मंत्र असा होता, 'जेव्हा तुम्ही (राज्यकर्ते, शासक इ) शंकित व्हाल, तेव्हा सर्वात दीन पददलित माणसाचा चेहरा नजरेसमोर आणा आणि स्वत:ला विचारा की, माझ्या कामानं या माणसाच्या जीवनात काही फरक पडणार आहे का? मग तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. आणि तुमची संभ्रमावस्था नाहीशी होत मार्ग दिसू लागेल.' भारतानं आज घटनात्मक संसदीय लोकशाही स्वीकारत समता, स्वातंत्र्य आणि बंधुभावाचा उद्घोष

करीत लोककल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी कटिबद्धता स्वीकारली आहे, ती उदार, मानवतावादी व बरीचशी समाजवादी स्वरूपाची विचारधारा आहे. तीच माझी वैचारिक नाळ आहे व विचारधारा आहे. माझ्या लेखनातून हे उमटलं आहे असं जर वाचक - समीक्षकांना जाणवलं तर मी माझ्या वैचारिक नाळेशी सातत्यानं जुडला गेलो आहे असं मी समजेन.
 मी एक अक्षरश: अफाट वाचक आहे. सर्व प्रकारचे साहित्य मी वाचतो. कारण कोणत्याही विचारधारेपेक्षा मानीव जीवनाची कक्षा मोठी असते, त्यामुळे केवळ मी माझ्या विचारधारेचंच वाचत नाही. तरीही मला आवडणारे लेखक सांगायचे झाले तर प्रेमचंद, टागोर, शरदचंद्र चटर्जी व सआदत हसन मंटोचं नाव घेईन. जागतिक वाङ्मयात मला शेक्सपिअरच्या शोकांतिका, टॉलस्टॉय, पर्ल बक हे लेखक भावतात. इंग्रजीत लेखन करणाऱ्या भारतीयांमध्ये मला आर. के. नारायण व अलीकडचे अमिताब घोष व विक्रम सेठ आवडतात. मराठीत मला अरुण साधू, रंगनाथ पठारे, सर्व दलित वाङ्मय आणि विशाल मानवतावादी असलेलं म्हणून पु. ल. देशपांड्यांचे 'गणगोत'व 'व्यक्ती आणि वल्ली' आवडतात. विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, गिरीश कर्नाड, भैरप्पा, दुष्यंत कुमार, चंद्रकांत देवताळे, कुर्तुल ऐन हैदर, मनू भंडारी, कमलेश्वर; दि. बा. मोकाशी, गंगाधर गाडगीळ व भावे हे मराठीचे पहिल्या फळीचे नवकथाकार; माझ्या मराठवाड्याचे बी. रघुनाथ आणि अलीकडचे राजन गवस, मंगेश डबराल ही काही आता बोलताना आठवलेली नावे माझे प्रिय लेखक म्हणता येतील. याखेरीज वैचारिक वाङ्मयाचा विचार केला तर नरहर कुरुंदकर, सदानंद मोरे, शेषराव मोरे, रफिक झकेरिया, अरुंधती राय हे मला विलक्षण भावतात.
परसावळे -
 लेखनात व जगण्यात मूल्यांची जपणूक करताना निर्भयपणे अनेकदा आपण जोखीम पत्करलेली दिसते. त्याचा काही उपद्रव झाला का?
देशमुख -
 प्रशासकीय सेवेत भ्रष्टाचार व बिनकायदेशीर कामांना नकार दिल्यामुळे राजकीय नेते व मंत्र्यांशी अनेकदा माझे वाद झाले, दडपणं आली व माझ्या निम्म्या बदल्या या मी त्यांच्याशी जुळवून घेत नाही (म्हणजे काय त्याचा अर्थ काय हे सांगायची गरज नाही)- म्हणून झाल्या आहेत. पण माझ्या तत्त्वासाठी व स्वच्छ कामासाठी ती मोजलेली किंमत होती. पण ती तशी फार मोठी होती, असं मी मानत नाही. पण एकूणच निःस्पृह अधिकाऱ्यांना बदनामी व तक्रारीला अधिक प्रमाणात सामोरं जावं लागतं, असं माझं निरीक्षण व अनुभव आहे. एक खोटी निनावी तक्रार माझ्याविरुद्ध

अकोल्यात असताना झाली होती, पण ती खोटी व बिनबुडाची असल्याचं नंतर सिद्धही झालं. पण त्या काळात मला विलक्षण त्रास झाला हे खरं.
 लेखनातही मी धाडसानं चाकोरीबाहेरचं लेखन केलं आहे. माझ्या 'इन्किलाब विरुद्ध जिहाद'मध्ये आज जगाला ज्याचा सर्वाधिक धोका आहे त्याचं समग्र चित्रण केलं आहे. मूठभर कट्टर मुस्लीम लोकांच्या कडव्या दहशतवादाचा धोका जो जाणवतो आहे, अनुभवास येत आहे, त्याची सुरवात अफगाणिस्थान मध्ये झाली व त्याचंही पाप शीतयुद्धातील स्पर्धेमुळे तत्कालिन सोवियत युनियन व प्रामुख्यानं अमेरिकेचं आहे. सांगलीला या कादंबरीवर बोलताना मी मुस्लीम दहशतवादावर बोलतो आणि त्याची भडक व विपर्यस्त बातमी एका वृत्तपत्रात बातमी आली व तत्काळ मुस्लीम समाज आणि तथाकथित पुरोगामी समाजाची संतप्त प्रतिक्रिया उमटली. मी जे सांगितलं ते सत्य होतं. पण मी मुस्लीमविरोधी आहे अशी राळ उठवली गेली. पण आक्षेप घेणाऱ्यांनी मी भेटत गेलो व माझी बाजू सांगत गेलो. त्यांना माझा मुस्लीम समाज व इस्लाम - हादिसचा किती सखोल अभ्यास आहे हे जाणवतं गेलं व मग विरोध मावळला गेला. तरीही पोलिसांकडे तक्रारी गेल्याच. मला वरून विचारणा झाली, पण तेवढंच. कोल्हापूरला असताना एका धर्मांतरित दलित ख्रिश्चन लेखकाच्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी सनातनी व रूढीबद्ध हिंदू समाजाच्या जाचामुळे अनेक दलितांनी धर्मांतर केलं व ख्रिश्चनांनी दयेच्या भावनेतून जे गरिबांसाठी काम केलं, तेवढं त्या काळी हिंदू समाजानं केलं नाही, असं मी बोललो, तेव्हा त्याची हिंदू धर्माभिमान्यांकडून तीव्र विरोधी प्रतिक्रिया आली. पण तेही वादळ काही दिवसात शांत झालं. माझ्या एका लेखामुळे मी अकोल्याच्या नगरसेवकांची बदनामी केली म्हणून शासनाकडे तक्रार काही नगरसेवकांनी केली, पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला केवळ एका ओळीची लेखी समज देऊन ती फाईल बंद केली.
 आज मी तुम्हाला हे सहजतेनं सांगत आहे, पण त्या काळात मला त्याचा किती त्रास झाला हे माझे मलाच माहीत. पण एक मनात पक्कं होतं की, मी लेखनाप्रती अत्यंत प्रामाणिक होतो व त्यापासून ढळणार नव्हतो. सलमान रश्दी वा तसलीमा नसरीनप्रमाणे मला काही जीवे मारण्याची धमकी मिळालेली नव्हती व मला विजनवास किंवा देशांतराचा धोका नव्हता. पण मी माझ्यापुरती छोटी चकमक खंबीरपणे जरूर लढली असं म्हणेन. यामुळे की काय, हे दोन्ही लेखक मला विलक्षण भावतात. त्यांच्या लेखनासाठी, पण त्याहीपेक्षा अधिक त्यांनी अभिव्यक्ती - स्वातंत्र्यासाठी मोजलेल्या किंतीसाठी!
 मला येथे या निमित्ताने एक व्यापक प्रश्न उपस्थित करायचा आहे. तो म्हणजे वाढती असहिष्णू प्रवृत्ती आणि बेताल झुंडशाहीच्या धोक्याचा. त्यांचा मुकाबला

करायला राज्यकर्ते मतपेट्यांच्या राजकारणासाठी करतात किंवा तेही प्रतिगामी व जाती-धर्माच्या संकुचित विचारात अडकलेले असल्यामुळे आतून त्यांनाच साथ देतात. तसेच बुद्धिमंत समाजही झापडबंद आहे व तो निवडक - सिलेक्टीव्ह प्रतिक्रिया देतो. तथाकथित कडवे पुरोगामी विचारवंत जेवढे हिंदू जमातवादावर व मूलतत्त्वांवर तुटून पडतात, तेवढे किंवा फारच कमी प्रमाणात मुस्लीम जमातवादावर प्रहार करतात. त्यामुळे उजव्यांच्या 'स्युडो - सेक्युलर' टीकेला बळ मिळतं. दुसरा प्रवाह हा महाराष्ट्रातील ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाच्या पार्श्वभूमीचा आहे. त्यामुळे ब्राह्मणांवर होणाऱ्या टीकेप्रमाणे (ती अगदी रास्त व योग्य आहे.) बहुजन समाजाच्या प्रतिगामित्वाच्या ऊहापोह करीत टीका करीत नाहीत. म्हणून माझं असं मत आहे की, कोणत्याही जाती - धर्माचा विचार न करता जे जे अनिष्ट, प्रतिगामी व मूलतत्त्ववादी - जमातवादी आहे, त्याचा विरोध व निषेध करण्यात आपण सारेच कुठेतरी कमी पडतो! ज्याप्रमाणे १९३०-४० च्या दशकात हिंदी-उर्दू पुरोगामी लेखकांनी 'प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोशिएशन' स्थापून १९३६ साली प्रेमचंदच्या अध्यक्षतेखाली पहिली सभा घेऊन पुरोगामित्वाचा व 'नाही रे' च्या बांधिलकीचा उद्घोष करीत हिंदू मुस्लीम दोन्ही धर्मातील कट्टरतेचा निषेध केला होता. त्यामुळे भारतीय साहित्यात एक नवी चैतन्याची लाट पसरली व साहिर, कैफी आझमी, इस्मत चुगताई, कृष्ण चंद्र, राजेंद्र सिंग बेदी सारखे पुरोगामी व गरिबांशी प्रतिबद्धता असलेले लेखक-कवी पुढे आले; तसचं काही आज महाराष्ट्रात देशपातळीवर करण्याची घडण्याची आवश्यकता आहे, असं मी नि:संदिग्धपणे सांगेन.
परसावळे -
 दलित - मुस्लीम हे आपल्या लेखनाचे प्रमुख विषय राहिले आहेत. या दोन्हीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे? देशमुख - माझी 'दौलत' ही 'सलोमी' मधली लघुकादंबरी, माझ्या कथासंग्रहातील 'बंद लिफ्ट', 'उदक', 'भूकबळी' सारख्या कथा या दलित-शोषित वर्गाच्या प्रश्नाबाबत आहेत. तर माझी 'इन्किलाब विरुद्ध जिहाद'ही बृहद् कादंबरी मुस्लीम समाजाविषयी आहे. माझा एक आगामी कथासंग्रह, ज्याचे नाव मी निश्चित केले आहे ते म्हणजे 'पांचवी शहाबानो' - हा मुस्लीम समाजाच्या व्यथा - वेदना व जगण्याच्या कहाण्या सांगणारा असेल. त्यात समाविष्ट होणाऱ्या सर्व कथा विविध दिवाळी अंकांतून प्रकाशित झाल्या आहेत. आता पुस्तकरूपाने येतील. म्हणजेच मी बऱ्याच प्रमाणात दलित व मुस्लीम समाजावर लेखन केलं आहे हे निश्चित.
 मी मूळचा मराठवाड्याचा. निजामी राजवटीमुळे मुस्लीम परंपरा व धर्म -

रिवाजाचं ज्ञान मराठवाडी माणसांना स्वाभाविकपणे असतं. मलाही ते आहे. थोडं अधिक मी ज्या शहरात लहानाचा मोठा झालो त्या उस्मानाबाद, नांदेड, परभणी व औरंगाबादामध्ये मुस्लीम समाज मोठा आहे. मला पुन्हा उर्दू - हिंदी वाचनाची बालपणापासून गोडी होती. माझे बरेच मुस्लीम मित्र होते व आहेत. त्यामुळे या समाजाला मला जवळून पाहता समजता आलं. पुन्हा वैचारिक भूमिकेमुळे मला हे भान होतं व आहे की, हा समाज फाळणीमुळे 'आयडेंटिटी क्रायसिस' मधून अजूनही जात आहे. अनेक दंगलीमुळे व शिक्षण-रोजगारात मागे पडल्यामुळे आधार व दिलाशासाठी धर्माला जास्त चिटकून रहात असल्यामुळे मुस्लीम समाज त्यातून बाहेर आला नाही असं मला वाटतं. एकसंघ देशासाठी व आपल्या हिंदू-मुस्लीम गंगाजमुनी संस्कृतीच्या रक्षणासाठी व ती दृढमूल करण्यासाठी मुस्लिमांसोबत हिंदू समाजाची तादात्म्यता हवी. माझं हे भान या समाजाकडे सहानुभूतीने पहायला मला प्रवृत्त करून गेलं असणारं. त्यामुळे त्यांच्याबाबत मी बऱ्यापैकी लेखन केलं.
 हीच बाब दलित वर्गाची. घटनेनं अस्पृश्यता नाहीशी केली तरी सवर्णांच्या एका फार मोठ्या वर्गाची मानसिकता अजूनही जुनीपुराणी व वर्णवर्चस्वाची आहे, प्रतिगामी आहे. ती मला तीव्रतेने बोचते. त्यामुळे दलित वर्गाशी माझी वैचारिक नाळ जुळलेली आहे असं मी मानतो. मुख्यत: डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या प्रचंड प्रतिभा व वैचारिक लेखनानं मी प्रभावित झालेला एक लेखक आहे. पुन्हा माझ्या तरुणपणातच मराठी साहित्यात दलित वाङ्मयाचं नवं चैतन्यमय पर्व सुरू झालं होतं. लक्ष्मण गायकवाड, गौतमीपुत्र कांबळे व दिवंगत प्र. ई. सोनकांबळेचं मैत्र माझं दलितभान सखोल करत होतं. पुन्हा प्रशासनात काम करताना दलित अत्याचारचे प्रश्न सोडवणे, त्या समाजावर अनेक गावात सामुदायिक बहिष्कार टाकला जातो, त्यामुळे त्यामध्ये हस्तक्षेप करणे आदीमुळेही माझ्या संवेदनशील मानवर व विचारांवर परिणाम झाला. त्यातून माझं दलितांविषयीचं लिखाण होत गेलं!
 पुन्हा मी मघाशी प्रेमचंदाचा उल्लेख केला, त्याचं स्मरण देतो. त्यांनी 'नाही रे' वर्गाच्या प्रश्नांवर लेखन केलं पाहिजे असं जाहीरपणे सांगितलं होतं. त्यांची 'कफन' ही एकच कथा त्यांची दलित शोषितांबाबतची प्रतिबद्धता सिद्ध करायला पुरेशी आहे. मी या महान लेखकाच्या विचारांचा एक छोटा समर्थक आहे. त्यामुळे मुस्लीम व दलितवर्गाच्या समस्येवर लेखन करून मी प्रेमचंद परंपरेचा आणि अभिमान बाळगावा अशा पुरोगामी परंपरेच्या पाईक आहे याचं समाधान व सार्थ अभिमान आहे.
परसावळे -
 आपली 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' ही बृहद कादंबरी दूरदर्शी व पूर्णत: जागरूक
अन्वयार्थ □ ३५५

लेखकाची कलाकृती आहे. आपले म्हणणे वाचकांपर्यंत त्याद्वारे पोचवण्यात आपण यशस्वी झालात का? या कादंबरीत आपण कोणत्या पात्राद्वारे व्यक्त झाला आहात?
देशमुख -
 हा प्रश्न फारच व्यापक आहे, पण त्याचं उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. तुम्हांस व अनेकांना हे खुळेपणाचं वाटेल, पण मला टॉलस्टॉयच्या 'वॉर अँड पीस' च्या तोडीची नव्हे (ते शक्य नाही हे मी जाणतो), पण त्या जातकुळीची खरी - खुरी जागतिक म्हणता येईल अशी कादंबरी लिहायची होती. त्यासाठी धर्म व दहशतवादाच्या मिश्रणातून साकारलेला अतिरेकी धर्मवाद व मूलतत्त्ववाद आणि इतिहासाचे काटे उलटे फिरविण्याचा खुळा पण जिद्दीचा प्रयत्न - यामुळे एक देश अक्षरश: कसा बरबाद होतो हे मी या कादंबरीद्वारे रेखाटलं आहे. अफगाणिस्थानमध्ये पुरोगामी डावी विचारसरणी १९७९ मध्ये सत्तेवर आल्यावर धार्मिक मूलतत्त्ववाद्यांनी धर्माच्या नावाने जिहाद करीत ती कशी पराभूत केली व देशाला पुन्हा कसं मध्ययुगात ढकललं...... हे मानवतेसाठी किती भयंकर आहे, विचार करायला लावणारं आहे व जगाच्या भवितव्यासाठी ती धोक्याची घंटा कशी आहे, हे सांगण्यासाठी ही बृहद् कादंबरी मी लिहिली. मराठीतच काय, भारतात अशा प्रकारची तात्त्विक लढाई चितारणारी व त्याच वेळी सामान्य माणसांच्या भीषण रक्तलांछित लढ्यामुळे झालेल्या शोकांतिकेची गाथा कुणी लिहिली नसेल, असा मी आत्मस्तुतीचा दोष पत्करून आणि 'आपुली आपण करी जो स्तुती तो एक मूर्ख' या उक्तीप्रमाणे मूर्खपणाचा लावला जाणारा शिक्का सहन करूनही म्हणेन. पण चंद्रकांत बांदिवडेकर, अनंत मनोहर, अभिजित वैद्य, प्रल्हाद वडेर, शंकर सारडा व विश्राम गुप्ते सारखे मोजके समीक्षक वगळता माझ्या या कादंबरीची समीक्षकांनी फारशी दखल घेतली नाही, याचा मला खेद व खंत आहे. पण मी त्याबाबत काय करू शकतो? पण चोखंदळ वाचकांनी दाद व पसंती फार उत्साहवर्धक होती. असो.
 डावी, उजवी व दोन्हीचा सुवर्णमध्य साधणारी उदारमतवादी पुरोगामी लोकशाही विचारधारा अशा तीन प्रवाहाचा संघर्ष तीन पात्रांमार्फत व त्यांच्या जीवनप्रवासातून 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' मध्ये मी मांडला आहे. त्या पैकी मी पुरोगामी उदारमतवादी इलियासच्या पात्रातून वैचारिक स्वरूपात व्यक्त झालो आहे असं मला वाटतं.
परसावळे -
 कलात्मक अभिव्यक्ती व रुळलेल्या तंत्रापेक्षा मानवी मूल्यांचे संप्रेषण आपणास अधिक महत्त्वाचे वाटते असे माझे निरीक्षण आहे. तसेच तुमच्या प्रभावी परखड ध्येयवादी आशयापुढे तुमचे समीक्षकही सूचक स्तंभित झालेले दिसतात. यावर तुमची

प्रतिक्रिया?
देशमुख -
 हा तुमचा खराखुरा समीक्षकीय पठडीतला प्रश्न झाला. पण तुमच्या निरीक्षणाशी मी सर्वसामान्यपणे सहमत आहे. कलात्मक अभिव्यक्ती व रुळलेल्या तंत्रापेक्षा वा त्याची फारशी पर्वा न करता - विचार न करता मानवी मूल्यांचे प्रक्षेपण करणारे माझे लेखन असल्यामुळे आशयामुळे माझी लेखनशैली साकारत व घडत गेली असं मला वाटतं. मी सुबोध लेखक आहे, पण वाचकशरण नाही. सोपं-साध्या भाषेत लिहिणारा आहे. पण अशा सोप्या पण आशयसंपन्न लेखकाची प्रेमचंद व सआदत हसन मंटो ते मराठीतील आचार्य अत्रे, व्यंकटेश व ग. दि. माडगूळकर आदींची सशक्त परंपरा आहे, त्याचा मी एक अनुयायी आहे. त्यामुळे अव्यक्त मनाच्या धूसर आवर्तनाचं दळण मांडणं मला जमत नाही. माझी ती प्रकृती नाही व शैली पण. अर्थात, 'जो जो वांछील तो ते लिहो' प्रमाणे सर्व प्रकारचे साहित्य प्रकार वाचकापुढे आले पाहिजे. कारण वाचकांनाही निवडीचे स्वातंत्र्य हवे. मात्र अमुक प्रकारचं साहित्य श्रेष्ठ व इतर नाही, असा काही साहित्यिक कंपूशाहीचा जो आग्रह व प्रभाव आहे, तो मला मान्य नाही. पण अशांचे दडपण न घेता व त्यांना आवडेल की नाही याचा विचार न करता मी माझ्या स्वतंत्र शैलीनं लिहितो.
 आज सर्वत्र मूल्यांची घसरण आपण पाहात आहोत. भ्रष्टाचार, सत्ताकारण आणि कमालीचा विकृत उपभोग, हव्यास आणि पराकोटीचा व्यक्तिवाद यामुळे आपल्या भवतालचे वातावण कमालीचे प्रदूषित झाले आहे. पुन्हा पुनरुज्जीवनवादी शक्ती वरचढ होत आहेत. धार्मिक उन्मादाला खतपाणी मिळत विपरीत वळण लागलं जात आहे. झुंडशाहीमुळे सहिष्णुतेला आपण जणू काही मूठमाती दिलीय की काय असं आजचं कुंठित - भयग्रस्त वातावरण आहे. अशा अस्वस्थ व अंधारलेल्या भवतालात सिनिक - कुत्सित वा तटस्थ होणं फार सोपं आहे. कारण फक्त टीका केली की आपलं उत्तरदायित्व संपतं, असा कलावंत-साहित्यिकांचा ग्रह झाला की काय अशी मला रास्त शंका वाटते. पण मग समाज बदलायचा कोणी? संस्कृती जपायची कोणी? घटनेतील उद्देशिकेत मांडलेल्या महान लोककल्याणकारी तत्त्वांप्रमाणे वागत, कृती करत देश बदलायचा कोणी? ज्याच्याबद्दल तमाम साहित्यिकांना तुच्छता, चीड व संताप वाटतो (ही भावना रास्त आहे) त्या राजकारण्यांनी? मग आपण काय पांच वर्षातून एकदाच मतदान करून - तेही अनेकदा न करता - निवडून आलेल्यांच्या नावाने चडफडत फक्त खडे फोडायचे? मला आपल्या अनेक साहित्यिक व कलावंतांची ही शहामृगी वृत्ती साफ नामंजूर आहे. उत्कट स्वप्न पाहणे व देशाच्या उद्याच्या सुंदर

भविष्यासाठी आपल्या लेखणीनं वाचकांच्या मनात विचार पेरणं हेही आम्हा साहित्यिकांचे काम आहे. त्यामुळे माझ्या लिखाणात ध्येयवाद असेल, आशावाद असेल तर तो एक साहित्यिक - कलावंत म्हणून मी माझं उत्तरदायित्व निभावत आहे असं मी म्हणेन.
परसावळे -
 आता थोडा वेगळा प्रश्न. साहित्यातून लेखकाचे आत्मचरित्र शोधू नये असं म्हणलं जातं. पण तुमच्या 'अंधेरनगरी' कादंबरीतला मुख्याधिकारी व 'ऑक्टोपस' मधला कलेक्टर तर तुमच्या स्वत:च्या जीवन व अनुभवावर बेतलेला आहे असे जाणवते. तुमचे यावर काय मत आहे?
देशमुख -
वाचकापुढे एकदा प्रकाशित झालेली कादंबरी आली की तिचा लेखकाशी संबंध संपतो असं म्हटलं जातं. ते मला सर्वस्वी मान्य आहे. कादंबरीतला अनभुव व पात्रे वाचकांना किती भावतात हे महत्त्वाचं असतं. तरीही आपल्या प्रश्नाचं मी प्रमाणिकपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे.
 मला हे मान्य केले पाहिजे की, या दोन कादंबरीमधले नायक मुख्याधिकारी व झालेली आहेत. मी स्वतः प्रशासक म्हणून स्वच्छ, मानवी स्पर्श देत काम करणारा व भ्रष्टाचार न करणारा आहे. तशी माझी प्रतिमा व लौकिक आहे. या दोन्ही कादंबऱ्याचे हे दोन उच्चपदस्थ अधिकारी मी तसेच रेखाटले आहेत. त्यांच्यामध्ये मी बऱ्याच अंशानं उतरलो आहे. किंबहुना ललित लेखनात लेखकाचे विचार, चिंतनाबरोबर त्याच्या जीवनातले काही अनुभव, प्रसंग व त्याला भेटलेली माणसे कधी जशीच्या तशी येतात, तर कधी त्यात कलात्मक बदल होऊन येतात. माझ्या 'अंधेरनगरी' व 'ऑक्टोपस' या दोन्ही कादंबऱ्यात मध्ये असंच काहीसं झालं आहे. पण अर्थातच वाचकांना वाचताना ही दोन पात्रे केवढी सच्ची वाटतात, मनाला भिडतात हे महत्त्वाचं. त्या दृष्टीने दोन्हीचं झालेलं स्वागत व वाचकांची खुशी पत्रं व फोन संदेशानं मला लेखनाचे मन:पूत समाधान लाभले आहे असं म्हणता येईल.
परसावळे -
 स्वच्छ चारित्र्य व दृष्टीसंपन्न रचनात्मक कार्यामुळे आपण एक श्रेष्ठ दर्जाचे अधिकारी म्हणून महाराष्ट्रात ओळखले जाता. आपल्या प्रशासकीय क्षेत्रातील सामाजिक कार्याबद्दल काय सांगू शकाल?

देशमुख -
 माझ्यासाठी माझं लोखन जेवढं व जितकं महत्त्वाचं आहे, तेवढंच व तितकंच प्रशासनही. मी स्वेच्छेने बँकेतील अधिकारी-पदाची आरामाची नोकरी सोडून प्रशासकीय सेवेच्या धकाधकीत आलो. त्यामागे प्राप्त अधिकार व पदाच्या माध्यमातून काही चांगले काम करण्याचा एक (अनेकांना भाबडा व आऊटडेटेड वाटणारा) ध्येयवाद होता. माझ्या ३२ वर्षाच्या प्रशासकीय सेवेत मला प्रत्येक ठिकाणी जनतेला न्याय व दिलासा देता आला, काही चाकोरी बाहेरची काम करता आली, तसेच पदाचा वापर करून काही भरीव सांस्कृतिक व शैक्षणिक कामही करता आले. त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रशासन सेवेत मी माझ्या स्वत:च्या वेगळा असा ठसा उमटवला आहे असे मला वाटते!
 मी केलेली काही मोजकीच कामे मी सांगेन. मी मेल्यानंतरही ज्या कामासाठी कदाचित काही काळ आठवला जाईल ते काम म्हणजे स्त्रीभ्रूणहत्येविरुद्ध शोधलेल्या आय. टी. सोल्यूशनचे. सायलेंट ऑर्जव्हर किंवा अॅक्टिव ट्रॅकर या यंत्राची निर्मिती करून गर्भलिंग परीक्षा करणाऱ्या डॉक्टरांवर वेसण घालता येते व त्याद्वारे घसरलेले स्त्री जन्माचे प्रमाण वाढू शकते हे मी सप्रमाण सिद्ध केले आहे. कलेक्टर कोल्हापूर म्हणून याबाबत पथदर्शक काम केल्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात याबाबत जनजागृती झाली. देशपातळीवर नॅसकॉम व 'टाईम्स ऑफ इंडिया' चा 'सोशल ऑनर' पुरस्कार - तोही अनुक्रमे मुख्यमंत्री व पंतप्रधानांच्या हस्ते मिळाल्यामुळे माझे काम वाखाणले गेले. आज माझा उपक्रम देशामधील किमान १०० जिल्ह्यात चालू आहे. माझ्या या कामामुळे काही हजारात, नव्हे - लाखात गर्भात मारल्या जाण्याऐवजी कन्या जन्मास आल्या, याचं मला अपार समाधान आहे. हे काम मला करता आलं, स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी 'आऊट ऑफ बॉक्स' उत्तर मला प्रतिभेनं शोधता आलं, या बद्दलं मी स्वत:ला भाग्यशाली समजतो. या एका कामामुळे माझी प्रशासकीय कारकिर्द सफल झाली असं मी मानतो. फुले-कर्वेप्रमाणे मी पण स्त्रीबाबत भरीव काम केलं आहे असं माझी पत्नी म्हणते, त्यातला अतिशयोक्तीचा भाग आपण सोडून देऊ. पण स्त्री-पुरुष समतेचा विचार करताना आधी ढासळलेला सेक्स रेशो दुरुस्त करून स्त्री - पुरुषामधील किमान संख्यात्मक समता तरी यावी यासाठी मी हे काम केलं.
 दुसरं काम मी केलं ते 'ई-चावडी'. प्रत्येक तलाठ्यास लॅपटॉप व लॅपटॉपवर सात बारा व जमिनीचे पूर्ण रेकॉर्ड असं याचं स्वरूप होतं. माझा हा उपक्रम राज्याने स्वीकारला असून राज्याच्या जवळपास ८०% तलाठ्यांकडे लॅपटॉप आहेत, त्यामुळे त्यांच्या कामात पारदर्शकता, जलदता आली आहे. ग्रामीण भागासाठी याचं किती

महत्त्व आहे हे शहरी माणसांना कळणार नाही. पण हेही मला करता आलं ते माझ्या 'आऊट ऑफ बॉक्स' उत्तरे शोधण्याच्या प्रतिभेमुळे.
 सांगली जिल्हा परिषदेमध्ये असताना सुमारे ४५० शाळांना प्रत्येकी तीन संगणक आणि इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या वर्गाच्या सर्व डीव्हीडीज देऊन आणि शिक्षकांना त्यांचं प्रशिक्षण देऊन शैक्षणिक गुणवत्तावाढीचा अभिनव कार्यक्रम राबवला. माझी आजही भावना व विश्वास आहे की, ई-लर्निंग ही काळजी गरज आहे व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक बाब आहे. मी हे २००५ मध्ये केलं. आज अनेक ठिकाणी त्याचं अनुकरण होत आहे.
 १९९३-९४मध्ये परभणीला मी समन्वयक म्हणून संपूर्ण साक्षरता अभियान राबवून सुमारे सव्वादोन लाख प्रौढ निरक्षर स्त्री - पुरुषांना साक्षर केले व १९९१ च्या जनगणनेत जो जिल्हा खालून दुसरा होता, तो २००१ च्या जनगणनेनुसार स्त्री साक्षरतेमध्ये राष्ट्रीय सरासरीपर्यंत पोचला गेला. हेही माझ्या हातून महत्त्वाचं काम झालं असं मी मानतो. त्यासाठी वर्षभर दररोज सायंकाळी बाहेर पडून मध्यरात्रीपर्यंत साक्षरता वर्गांना भेटी देणे व कार्यालयीन वेळात नियोजन, बैठका व अंमलबजावणीचा आढावा घेणे असं मी स्वत:ला या कामात एका ध्येयानं झपाटून जात झोकून दिलं होतं. त्यामुळे हे अभियान यशस्वी झालं. 'निशाणी डावा अंगठा' कादंबरी व सिनेमामध्ये व्यंग शैलीत त्यातील गैरप्रकार दाखवले. अनेक ठिकाणी तसे प्रकार वास्तवात घडले होते हे मी नाकारत नाही. पण माझ्या परभणी जिल्ह्यात साक्षरतेची आकडेवरी वस्तुनिष्ठ होती, हे कर्वे सामाजिक संस्थेनं १५० गावातील साक्षरता केंद्रांना भेटी देऊन जो अहवाल दिला त्यावरून सप्रमाण सिद्ध होतं. येथे माझा ध्येयवाद व झपाटलेपणा हे गुण माझ्या कामी आले.
 परभणीला १९९६ साली मी सहकाऱ्यांच्या मदतीने ६८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेतले, ते अत्यंत नेटके व अनेक नवे पायंडे पाडणारं होतं. तसे उपक्रम नंतरही फारसे राबविले गेले नाहीत. पण ते जाऊ दे. कोल्हापूरला मी शाहू भवन स्मारकाचे नृतनीकरण व विस्तारीकरण करून त्याचे नाटक, सिनेमा, चित्रशिल्प, परिसंवाद व पुस्तकांच्या एक सांस्कृतिक केंद्रात रूपांतर केलं, त्याचं मला अपार समाधान आहे. कलेक्टर म्हणून कोल्हापूरच्या बाल कल्याण व रिमांड होमचा मी पदसिद्ध अध्यक्ष होतो. तेथे वाढल्या संख्येने येणाऱ्या अनाथ मुलांना सामावून घेण्यासाठी व त्यांना उत्तम निवास सुविधा देण्यासाठी लोकवर्गणीद्वारे दोन कोटी रुपयांच्या इमारती (तीन तीन मजल्यांच्या) बांधून ६०० बालकांच्या निवासाची सोय केली. स्त्रीभ्रूण हत्या रोखण्याइतकचं महत्त्वाचं असं हे काम माझ्या हातून घडलं याचं मनस्वी समाधान वाटतं.

 खूप काही सांगता येईल, पण विस्तारभय व स्वस्तुतीचा संकोच म्हणून फार तपशिलात न जाता एवढंच सांगेन की, नोकरशाहीला अनेक अधिकार असतात व चांगल्या अधिकाऱ्यांना लोक साथ देतात. हे त्यांचं सामर्थ्य असतं. त्याचा वापर करून अनेक लोककल्याणकारी कामं व उपक्रम राबवता येतात. मी माझ्या प्रत्येक पोस्टिंगच्या पदी असं काही ना काही केलं आहे. त्यामुळे माझी जशी दक्ष प्रशासक म्हणून ख्याती आहे, तसाच एक उपक्रमशील अधिकारी म्हणूनही लौकिक आहे. त्यामुळे मी माझी प्रशासकीय सेवा छानपैकी एंजॉय केली आणि यशस्वी पण...
परसावळे -
 फारच छान. यापैकी अनेक कामे मी पाहिली व अनुभवली आहेत. असो. आता पुन्हा साहित्याकडे वळू या. आपल्या लेखनास मिळालेले मान-सन्मान, पुरस्कार व प्रशंसक याबद्दल थोडक्यात काय सांगू शकाल?
देशमुख -
 मला आजवर राज्य शासनाचे तीन पुरस्कार दोन कथासंग्रहासाठी ('अंतरीच्या गूढ गी' व 'पाणी! पाणी!!') व एक कादंबरी 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' साठी मिळाले आहेत. या खेरीज म. सा. प. पुणे व औरंगााबदचे प्रत्येकी दोन व इतर वाङ्मयीन संस्थेचे डझनभर पुरस्कार प्राप्त झाले आहेत. पण विजय तेंडुलकरांनी त्यांच्या आवडत्या ५० पुस्तकात माझ्या 'अंधेरनगरी' चा समावेश करणे, म. द. हातकणंगलेकरांनी 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' ची तुलना टॉलस्टाय व डोस्टोवस्कीशी करणे; चंद्रकांत बांदेवडकरांनी माझ्या 'अंधेरनगरी' व 'इन्किलाब' वाचून उत्तेजित होऊन उस्फूर्त प्रतिक्रिया देणं हे मला पुरस्कारापेक्षाही मोलाचे वाटतात. वाचकांच्या प्रतिक्रिया या बहुतांश प्रशंसेच्या राहिल्या आहेत. माझ्या एकाही पुस्तकाचं परीक्षण करताना एकादी समीक्षकानं झोडपलं नाही, उलट बहतेक समीक्षा ही प्रशंसा व लेखनातील वेगळेपणा बाबतची व ती मौलिक होती, या आशयाची होती.
परसावळे -
 भविष्यातील प्रकल्प?
देशमुख -
 अनेक आहेत. यावर्षी दोन ललित पुस्तके प्रकाशित होत आहेत. तसेच उदगीर येथील नियोजित साहित्य संमेलनाच्या निमित्तानं निवडक लक्ष्मीकांत देशमुख' व माझ्या साहित्यावरील समीक्षा अशी दोन पुस्तके, ज्यांचे संपादन डॉ. रणधीर शिंदे करीत आहेत, जी प्रकाशित होत आहेत. तसेच दोन कादबंऱ्यांचे सध्या लेखन चालू

आहे. मुख्य म्हणजे मला माझ्या प्रशासकीय अनुभवावर आधारित कादंबरी त्रयी केव्हा तरी लिहायची आहे. साहिर लुधियान्वी व श्याम बेनेगलवर पुस्तक लिहिण्यासाठी अभ्यास चालू आहे. पुन्हा 'इन्किलाब' सारखी काश्मिर प्रश्नावरची एक बृहद् कादंबरी मला खुणावते आहे. शिवाय तीन कथा-संग्रह निघतील एवढ्या कथा विविध दिवाळी अंकात प्रकाशित झाल्या आहेत, त्यांचे संकल्न करून ती पुस्तकेही यथावकाश येतील. आणखी एक विषय मला आकिर्षत करत आहे तो म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कोल्हापूरनजिक वळीवडे येथे पोलंडचे दहा हजार निर्वासित स्त्री-पुरुष आले होते. त्यांच्या जीवनसंघर्षावर मला कादंबरी लिहायची आहे.
परसावळे -
 धन्यवाद देशमुखर्जी. तुम्ही फार स्पष्टपणे विनासंकोच व मनमोकळी उत्तरे दिली व आपल्या साहित्य विषयक कल्पना नेमकेपणानं मांडल्या त्या वाचकांना आवडतील, तसेच समीक्षक व विचारवंतांना विचार करायला भाग पाडतील असं मला वाटतं.
देशमुख -
 मी आपला अत्यंत आभारी आहे.

पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/362 पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/363 पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/364 पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/365 पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/366 पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/367 पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/368 पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/369 पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/370 पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/371 मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/372