पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/368

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

'तुकारामदर्शन' या ग्रंथास साहित्य अकादेमीचा पुरस्कार. पत्ता : २२ प्रोफाइल इडन, ९ वी गल्ली, प्रभात रस्ता, पुणे ०४ कै. प्रल्हाद वडेर दिवंगत कथाकार, समीक्षक, रुईया महाविद्यालय व मुंबई विद्यापीठातून एम. ए. पीएच. डी.; ना. सी. फडके : एक चिकित्सक अभ्यास या विषयावर पीएच डी. दीर्घकाळ गोवा विद्यापीठाच्या मराठी विभागात प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून निवृत्त. चढण व वीज हे कथासंग्रह अनुभव आणि आकार, अनुभव आणि आविष्कार, प्रमेय आणि प्रबंध हे समीक्षात्मक लेखसंग्रह. अरुण साधू (जन्म १७ जून १९४१) लेखक, पत्रकार, आंतरराष्ट्रीय राजकीय प्रश्नांचे अभ्यासक. मुंबई दिनांक, सिंहासन, बहिष्कृत, शापित, स्फोट, विप्लवा, त्रिशंकू, शोधयात्रा, तडजोड, झिपऱ्या, मुखवटा या कादंबऱ्या प्रकाशित. एक माणूस उडतो त्याची गोष्ट, बिनपावसाचा दिवस, मुक्ती, मंत्रजागर, बेचका, ग्लानिर्भवती भारत हे कथासंग्रह. जेव्हा ड्रॅगन जागा होतो, आणि ड्रॅगन जागा झाला, फिडेल चे आणि क्रांती, तिसरी क्रांती ही समकालीन राजकीय व सामाजिक विषयावरील पुस्तके. पत्ता : ४५, पत्रकारनगर, वांद्रे (पू.) मुंबई ५१. फोन - ०२२ - २६५९२५२८ अनंत मनोहर ज्येष्ठ मराठी लेखक. विपुल कादंबरी लेखन. विश्राम गुप्ते कादंबरीकार व समीक्षक अल तमीर, नारी डॉट कॉम, ईश्वर डॉट कॉम या कादंबऱ्या प्रकाशित. परीकथा आणि वास्तव, मेलेल्यांची गढी (अनुवाद) हे ग्रंथ. समकालीन कवितेवर विस्तृत लेखन (अतिरिक्त विशेषांक). विविध नियतकालिकातून अनुवाद व वाङ्मयविषयक लेखन. पत्ता : पी १४० / एफ, यामुंडा गार्डन्स, वृंदावन हॉस्पिटल मागे, करासवाडा, म्हापसा, गोवा ४०३५२६ मो. ९४२३८८६०६४ अन्वयार्थ 0 ३६९