पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/365

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संपर्क : ०९८५५०५००३३४ सुनीलकुमार लवटे (११ एप्रिल १९५०) एम. ए. पीएच. डी. (हिंदी) हिंदी भाषासाहित्याचे अध्यापन. महावीर महाविद्यालय, कोल्हापूर येथून प्राचार्य म्हणून निवृत्त. खाली जमीन वर आकाश हे आत्मचरित्र प्रकाशित. सरल्या ऋतूचं वास्तव हा कवितासंग्रह, स्वप्न आणि सत्य, विकसन, भाऊबीज, दुःख हरण हे कथासंग्रह प्रकाशित. भारतीय साहित्यकार, निराळे जग निराळी माणसं हे लेखसंग्रह प्रकाशित. रानफुले, अजून येतो वास फुलांना, सांजसावल्या हे ललितलेख संग्रह प्रकाशित. नाटककार शंकर शेष, यशपाल एक समग्र मूल्यांकन, हिंदी वेब साहित्य हे हिंदी ग्रंथ. अनेक ग्रंथांचा अनुवाद. पत्ता : 'निशांकुर', अयोध्या कॉलनी, राजीव गांधी रिंग रोड, सुर्वेनगरजवळ, कोल्हापूर, ४१६००७ मो. ९८८१२५००९३, मिलिंद जोशी प्राध्यापक, अभियांत्रिकी महाविद्यालय, भारती विद्यापीठ, पुणे. लेखक व वक्ते व्यवसायाने अभियांत्रिकी विषयाचे प्राध्यापक, पण वक्तृत्व व साहित्य हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे लखलखते पैलू. ‘तमाच्या तळाशी' आणि 'पानगळा' हे दोन कथासंग्रह. आणि 'प्राचार्य', संत साहित्य आणि आजची पिढी, ऐशी कळवळ्याच्या जाती या महत्वाच्या साहित्य कृती. तीन पुस्तकाचे संपादन व विटा ग्रामीण, सांगली डोंगरी आदी चार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. देशविदेशात शेकडो व्याख्याने आजवर दिली आहेत. पत्ता : B1 - 12, रविराज, टेरेस, सुखसागर, नगर कात्रज, पुणे - ४६ प्रा. पुष्पा भावे रुईया महाविद्यालय, मुंबई येथे मराठी भाषा साहित्याचे अध्यापन. संयुक्त महाराष्ट्र, गोवा मुक्ती संग्राम, दलित चळवळ, हमाल-माथाडी कामगार चळवळ, आणीबाणीविरोधी चळवळीत काम, स्त्री चळवळीत सक्रीय सहभाग. चर्चासत्रे, कार्यशाळात बीजभाषण, ३६६ ० अन्वयार्थ