पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/369

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विष्णू वासमकर (१ - ६ - १९५८) विलिंग्डन महाविद्यालय, सांगली येथे मराठीचे प्राध्यापक. संदर्भ आयुष्याचे हा कवितासंग्रह प्रसिद्ध. समग्र दत्तांकुर या कवितासंग्रहाचे संपादन. मराठीतील कलावादी साहित्यविचार या विषयावर पीएच. डी., नियतकालिकांतून लेख प्रसिद्ध. पत्ता : दत्तब्रह्म, विकास कॉलनी, विश्रामबाग, सांगली ४१६४१५ अभिजित वैद्य ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते. आरोग्यविषयक व इतर वैचारिक लेखन. पत्ता : तोरणा, मनमोहन पार्श्वनाथ, बिबवेवाडी, पुणे ३७ मो : ९८२२०९०७५५ दत्ता घोलप भाषा साहित्याचे तरुण संशोधक. काही काळ मराठीचे अध्यापन. भालचंद्र नेमाडे यांच्या कादंबऱ्यांचे आविष्कारविशेष या विषयावर पीएच. डी., विविध नियतकालिकातून वाङ्मयविषय लेख प्रसिद्ध. पत्ता : मु. दडशिंगे पो. सौंदरे ता. बार्शी, जि. सोलापूर ४१३४११ मो. ७५८८५०५०७९ अजित साळके विज्ञान व सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते. विपुल वैचारिक लेखन. संमती भरत ज्ञानविज्ञान समुदायाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष. विपुल वाचन व त्यावर व्याख्याने. पत्ता : ३९६ / २ / २, स्वाती समर्थ कॉलनी, शाहुपुरी, सातारा, फोन : ९८२२२३३६४१ प्रकाश पवार प्राध्यापक, राज्यशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. राजकीय विश्लेषक व अभ्यासक. भारतातील राजकीय प्रक्रिया व महाराष्ट्रातील राजकारण या विषयाचे अभ्यासक. महाराष्ट्राच्या नव्या राजकारणाची पुनर्रचना, समकालीन राजकीय चळवळी : नवहिंदुत्ववाद व जातसंघटना, नेतृत्वाची जडण घडण ही पुस्तके प्रकाशित. काही ग्रंथांचे संपादन व विविध नियतकालिकांतून लेखन प्रसिद्ध. ३७०० अन्वयार्थ