पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/371

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 रूपाली शिंदे
 फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे मराठी भाषा साहित्याचे अध्यापन. विविध नियतकालिकांतून
 समीक्षात्मक लेखन प्रसिद्ध
 पत्ता : मराठी विभाग, फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे

 विनोद शिरसाठ
 साप्ताहिक साधनाचे संपादक. 'सम्यक सकारात्मक' हा साधनामधील निवडक संपादकीयचे
 संकलनाचे पुस्तक प्रकाशित. 'निवडक नरहर कुरुंदकर' या पांच खंडात प्रकाशित
 होणारा प्रकल्पाचे संपादक. पहिला खंड 'व्यक्तिवेध' प्रकाशित व दुसरा खंड 'ग्रंथवेध'
 प्रकाशनाच्या मार्गावर
 पत्ता : संपादक, साधना साप्ताहिक, १२६ सदाशिव पेठ, पुणे ३०

 मेघा पानसरे (३१ - ११ - १९६५)
 एम. ए., पीएच. डी.
 शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषाविभागत रशियन भाषासाहित्याचे अध्यापन. अनुवादक,
 रशियन साहित्यसंस्कृतीवर व बालवाङ्मयाची काही पुस्तके प्रकाशित. तळघर (मॉक्झिम
 गॉर्की) या नाटकाचा मराठी अनुवाद. सिर्योझा, गाणारे पीस ही बालवाङ्मयाची दोन
 पुस्तके प्रकाशित. आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात सहभाग.

 पत्ता : सहा. प्राध्यापक, विदेशी भाषा विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर ४१६००४.
 मो. ९८२२४०१८०६

३७२ □ अन्वयार्थ