पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/364

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

समीक्षणपर लेखन. विविध वाङ्मयीन नियतकालिकातून सातत्याने लेखन प्रसिद्ध. आकाशवाणीवर कथा सादर. काही काळ संशोधन साहाय्यक म्हणून काम. साहित्य अकादेमीच्या प्रवासी शिष्यवृत्तीतून राजस्थान राज्याचा अभ्यास दौरा. पत्ता : मु. पावलेवाडी, पो. रिळे, ता. शिराळा, जि. कोल्हापूर ४१५४०८. मो. ९८८१२४१८८७ ना. धों. महानोर (१६ सप्टें १९४२) नामवंत कवी, कादंबरीलेखक. रानातल्या कविता, पावसाळी कविता, अजिंठा, प्रार्थना दयाघना, जगाला प्रेम अर्पावे, गाथा शिवरायाची, पक्ष्यांचे लक्ष थवे, तिची कहाणी, गंगा वाहू दे निर्मळ, पानझड हे कवितासंग्रह प्रकाशित. गांधारी ही कादंबरी, गावातल्या गोष्टी हा कथासंग्रह व पळसखेडची गाणी हा लोकगीतांचा संग्रह प्रसिद्ध. शेतीसाठी पाणी, यशवंतराव चव्हाण, शरद पवार आणि मी, त्या आठवणींचा झोका, ऐसी कळवळ्याची जाती ही पुस्तके प्रकाशित. विधानसभेवर सदस्य म्हणून काम. शेतीविषय लेखन. साहित्य अकादेमी व जनस्थान पुरस्काराने गौरव. शंकर सारडा (४ ऑगस्ट, १९३७) नामवंत समीक्षक, संपादक, पत्रकार. काही पुस्तके काही लेखक, गुलमोहर, पुस्तकांचं जग, दूरदेशीचे प्रतिभावंत, ग्रंथविशेष, अक्षरभेट हे समीक्षाग्रंथ. काही ग्रंथांचे अनुवाद व बालवाङ्मय प्रसिद्ध. महाराष्ट्र साहित्य पत्रिका, ललित व रविवार आवृत्त्यांचे संपादन. पत्ता : इ - १०, पाटील रीजन्सी, १५ एरंडवन, कलिंग हॉटेलमागे, ऑफ कर्वे रोड, पुणे - ०४ फोन - २५४२२२२३ मंगेश कश्यप पर्यावरण अर्थशास्त्राचे तज्ज्ञ आणि सिरम या संस्थेचे संचालक. त्यांनी किर्लोस्कर मासिकातील विचार विश्व व साहित्याचा अभ्यास करून पीएच. डी. संपादन केली. 'किर्लोस्करीय'. मनस्वी महांबरे, व्यवस्थापन तज्ज्ञ. ज्ञानेश्वर 'तेजोनिधी आणि इंग्रजीमध्ये Ecological Economics ह्या पुस्तकाचे लेखन. अन्वयार्थ । ३६५