पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/367

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नंदकुमार मोरे (१३ डिसेंबर १९७८) एम. ए. पीएच. डी. शिवाजी विद्यापीठाच्या (कोल्हापूर) मराठी विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत. समाजभाषाविज्ञान आणि मराठी कादंबरी, भाषासंवाद समीक्षापद्धती : सिद्धान्त आणि उपयोजन हे ग्रंथ प्रकाशित. उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठीचा महाराष्ट्र शासनाचा सन २०१२ चा नरहर कुरुंदकर पुरस्कार. विविध नियतकालिकांतून लेखन. पत्ता : सहा. प्राध्यापक, मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर मो. ९४२२६२८३०० चंद्रकांत बांदिवडेकर हिंदी भाषा साहित्याचे नामवंत प्राध्यापक. तौलनिक भाषासाहित्याचे अभ्यासक, देशीवाण, मर्मवेध, लक्षवेधी, कादंबऱ्या. साहित्याचे मर्म, शोध आणि बोध हे समीक्षाग्रंथ. आधुनिक हिंदी साहित्य : आणि अंतरंग, चंद्रकांत देवताले की कविता, कविता स्वभाव, कविता की तलाश या हिंदी ग्रंथांचे संपादन. पत्ता : सी - २, ब्लॉक नं. ७, स्टेट बँक नगर, पंचवटी, पाषाण, पुणे ०८ फोन ०२० - २५८८७९२७ कै. ग. प्र. प्रधान (१९२२-२०१०) फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे इंग्रजी भाषा साहित्याचे अध्यापन. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, साधना साप्ताहिकाचे संपादक, विधान परिषदेवर सदस्य व विरोधी पक्षनेते. आठा उत्तराची कहाणी ही कादंबरी प्रकाशित. भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू, ज्ञानाचे उपासक, लोकमान्य टिळक, आगरकर लेखसंग्रह या ग्रंथांचे लेखन. सदानंद मोरे तत्त्वज्ञान विभाग, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे येथून प्राध्यापक म्हणून निवृत्त. इतिहास, तत्त्वज्ञान आणि महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराचे साक्षेपी अभ्यासक. महाराष्ट्रेतिहासावर मौलिक स्वरूपाचे लेखन. तुकारामदर्शन, लोकमान्य ते महात्मा, गर्जा महाराष्ट्र हे बृहदग्रंथ प्रसिद्ध. उजळल्या दिशा आणि शिवचरित्र ही नाटके, त्रयोदशी हा संतसाहित्यविषय ग्रंथ, नाशिक येथील पहिल्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. संतसाहित्य आणि महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळींचा सांधा जोडण्यात विशेष योगदान. ३६८ ० अन्वयार्थ