सदस्य चर्चा:Subodh (CIS-A2K)

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
Wikisource-logo-mr.svg

नमस्कार Subodh (CIS-A2K),
मराठी विकिस्रोत वर आपले स्वागत आहे,
विकिस्रोत म्हणजे विकि तत्त्वानुसार स्वयंसेवी योगदान देणाऱ्या सदस्यांमार्फत गोळा केलेल्या, मुद्रितशोधन (प्रूफरीडिंग) केलेल्या, टीका-टिप्पण्या जोडलेल्या मराठी "स्रोत" दस्तऐवजांचे ग्रंथालय प्रकल्प आहे. हा प्रकल्प विकिमीडिया प्रतिष्ठान द्वारे चालवला जात असून विकिपीडिया या मुक्त ज्ञानकोश प्रकल्पाचा बंधू प्रकल्प आहे. विकिस्रोत हा विकिपीडिया प्रमाणेच संपादनासाठी सर्वांना खुला असलेला प्रकल्प आहे. विकिस्रोतात आढळणाऱ्या अस्सल दस्तऐवजांचे आणि विकिपीडियावरील ज्ञानकोशीय लेखांचा एकत्रित उपयोग वापरकर्त्यांना (अभ्यासकांना) आपल्या अभ्यास, संदर्भ, व संशोधनात्मक, उद्दिष्टांसाठी होऊ शकतो. आपले प्रताधिकार विषयासंदर्भातील सहकार्य आपल्या प्रयत्नांचे मूल्य जपण्याच्या दृष्टीने आणि मराठी विकिस्रोताचा दर्जा आणि विश्वासार्हतेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. आपणास काही शंका उद्भवल्यास येथे अवश्य नमूद करावे. आपले शंका समाधान करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आपल्याकडून विकिस्रोत वर भरपूर काम होवो हीच सदिच्छा. वाचा - विकिस्रोत:नवीन सदस्यांना मार्गदर्शन‎

आपले विनम्र, साहाय्य चमू

--टायवीन२२४०माझ्याशी बोला १९:१९, १३ एप्रिल २०१९ (IST)

अनुक्रमणिका:Arth shastrachi multatve cropped.pdf[संपादन]

Gnome-edit-redo.svgसुबोध कुलकर्णी: जी, आपण अनुक्रमणिका:Arth shastrachi multatve cropped.pdf हे पान हलवले होते त्याला मी उलटवले आहे. कृपया पूर्वी विकिमीडिया कॉमन्सवर असलेली प्रतिमा हलवावी व इथे त्याला हलवावे. त्याचे ५०० उपपाने आहेत त्याला सुद्धा हलवावी लागतील. ते झाल्यावर हे पूर्णपणे चांगले दिसून येईल. त्यामळे कृपया पान मूळ स्रोथातून हलविल्याशिवाय इथे हलवू नये. तिथे झाल्यावर इथे देखरेख करणे खूप कठीण काम आहे. धन्यवाद --टायवीन२२४०माझ्याशी बोला १९:२५, १३ एप्रिल २०१९ (IST)

अनुक्रमणिकेतील काही पुस्तकांमध्ये असलेल्या समस्यांबद्दल[संपादन]

नमस्कार. काही पुस्तकांच्या ओसीआरमध्ये समस्या आहे का? शिल्पकार_चरित्रकोश_खंड_६_-_दृश्यकला.pdf या पुस्तकाचा ओसीआर मजकूर गार्बेज दिसतो आहे. लोकमान्यांच्या सान्निध्यात - नरसिंह चिंतामण केळकर.pdf हे पुस्तकसुद्धा अस्तित्वात नाही, असा संदेश दिसतो आहे. --ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १७:४८, २७ एप्रिल २०२० (IST)

लोकमान्यांच्या सान्निध्यात...हे पुस्तक कॉमन्सवर पण नाही आहे. तसेच कोश हे दोन स्तंभात मजकूर असल्याने ओसिआर होऊ शकत नाहीत.सुबोध कुलकर्णी (चर्चा) १८:१९, २७ एप्रिल २०२० (IST)