Jump to content

चित्रा नि चारू

विकिस्रोत कडून
दोन शब्द



 गोड गोष्टीतील हा दहावा भाग.ही दहा भागांची माला आता पुरे. हे दहाही भाग श्री. केशवराव ढवळे यांनी सुंदर रीतीने छापून मराठी वाचकांस दिले. श्री. ढवळे यांस धन्यवाद.

 दहाव्या भागातील ही गोष्ट तामीळ भाषेतील आहे.धुळे जेलमध्ये भेटलेल्या एका तामिळी मित्राने तामीळ वाङ्मयांतील नवलकथांमधील गोष्टी मला सांगितल्या होत्या. त्या गोष्टींपैकीच ही एक. मूळच्या कादंबरीचे नाव मला माहीत नाही. परंतु त्या मित्राने ही गोष्ट जेव्हा सांगितली तेव्हा ती मला आवडली होती. त्याने सांगितलेली गोष्ट मनात ठेवून ही गोष्ट मी लिहून काढली आहे. वाचक गोड करून घेवोत.

 गोड गोष्टींची ही माला पूर्ण झाली.

 आता पुढे काय ? देवाला माहीत.


साने गुरुजी
अ नु क्र म णि का
********************
चि त्रा नि  चा रू
चित्रा
महंमदसाहेबांची बदली १०
चित्रेचे लग्न १४
सासूने चाललेला छळ ३१
चित्रावर संकट ३९
चित्राचा शोध ४७
चित्रेच्या वडिलांना वेड लागते ५३
चित्राची कहाणी ६०
आमदार हसन ६८
आनंदी आनंद ७४