आमची संस्कृती
पहिली आवृत्ती : १९६०
दुसरी आवृत्ती : २००६
पुनर्मुद्रण : २००९
पुनर्मुद्रण : २०१०
पुनर्मुद्रण : २०१४
पुनर्मुद्रण : २०१६
संस्थापक :
रा. ज. देशमुख
डॉ. सुलोचना देशमुख
प्रकाशक :
देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा. लि.,
पुणे ४११ ०३०
मुखपृष्ठ :
रवी पांडे
© जाई निंबकर
किंमत :
२००/- रुपये
अक्षर रचना
एस. एम. इंटरप्रायसेस
श्री. सुरेश माने
गोकुळनगर, कोंढवा रोड, पुणे ४८.
मुद्रक
श्री जे प्रिंटर्स प्रा. लि.
१४१६, सदाशिव पेठ, पुणे - ४११ ०३०.
दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने...
'आमची संस्कृती' या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रदीर्घ कालावधीनंतर प्रकाशित होत आहे. डॉ. इरावती कर्वे यांनी सन १९४८ ते १९६० च्या दरम्यान लिहिलेले लेख या पुस्तकात समाविष्ट झालेले आहेत.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एका नव्या समाजव्यवस्थेची निर्मिती हे प्रमुख आव्हान भारतीय नेतृत्वापुढे होते. या आव्हानाला आर्थिक, धार्मिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक असे अनेक पदर होते. या संदर्भात नवी मूल्ये, नवी कायदेप्रणाली निर्माण करणे समाजधुरिणांना आवश्यक वाटत होते या निमित्ताने समाजात जे विचारमंथन चालू होते, त्याचे दर्शन आपल्याला या पुस्तकातील विविध लेखांतून होते .
शास्त्रज्ञाकडे केवळ बुद्धिमत्ता व संशोधनातील चिकाटी असेल तर तो आपल्या क्षेत्रात यशाची शिखरे गाठू शकतो, पण याच्या जोडीला त्याच्याकडे उपजत शहाणपणा, न्याय बुद्धी, सामंजस्य आणि मूल्यांची जाणीव असेल तर त्याचे लिखाण आणि त्याचे आयुष्य हे समाजापुढे आदर्श म्हणून राहतात.
हे लेख वाचत असताना डॉ. इरावती कर्वे यांची ही भूमिका आणि वैशिष्ट्ये आपल्याला अतिशय स्पष्टपणे समजून येतात.
दिवंगत व्यक्तीची 'उणीव' भासते आहे असे सांगण्याची एक पद्धतच आपल्याकडे पडून गेली आहे. हे लेख वाचत असताना ही 'उणीव' खरोखरच कशी असते याचे भान आपल्याला येईल.
डॉ. इरावती कर्वे यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षात 'देशमुख आणि कंपनी' ही आवृत्ती प्रकाशित करीत आहे ही आमच्या दृष्टीने विशेष आनंदाची घटना आहे.
नव्या पिढीतील वाचक या आवृत्तीचे स्वागत करीत या अपेक्षेने ही आवृत्ती त्यांच्या हातात सुपूर्द करीत आहोत.
एस.
अनुक्रम
| १. | संस्कृती म्हणजे काय? | १ |
| २. | हिंदूच्या सांस्कृतिक इतिहासाचे मर्म | १८ |
| ३. | साहेब आणि आमची संस्कृती | २९ |
| ४. | भारतातील वन्य समाज | ३९ |
| ५. | गोवधबंदीची चळवळ | ५३ |
| ६. | सामाजिक स्थित्यंतर घडविण्यातील व्यक्तीचे कार्य | ६४ |
| ७. | डॉ. केतकर यांचे समाजशास्त्रविषयक लेखन | ७७ |
| ८. | कऱ्हाड अधिवेशनाचे अध्यक्षीय भाषण | ९५ |
| ९. | नवीन हिंदू कायद्याचे समाजशास्त्रदृष्ट्या परीक्षण | १०३ |
| १०. | भारतीय भाषा आणि इंग्रजीचे स्थान | ११८ |
| ११. | दोन पिढ्या | १२९ |
| १२. | आम्ही बायका | १४१ |
| १३. | कॉलेजातील शिक्षण व परीक्षा-पद्धती | १५७ |
| १४. | आकांक्षा | १७१ |