आमची संस्कृती/ गोवधबंदीची चळवळ
या लेखामधले शेवटचे दोन अनुच्छेद ('सद्गुणांचे दुष्परिणाम' आणि 'ती अधर्मसहिष्णुता होती') स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या लेखनामधून उधृत केले आहेत.
संदर्भ - समग्र सावरकर वाड.मय, खंड ३ मधील
सहसोनेरी पाने, पृष्ठे १६४-६५, छेदक ४६२-४६६
प्रकाशक - शां. शि. सावरकर, १९९३.
५. गोवधबंदीची चळवळ
स्वत:ला हिंदुत्वनिष्ठ म्हणवणाच्या काही मंडळींनी आजकाल गोवधबंदीच्या चळवळीची धमाल उडवून दिली आहे. गोवधबंदीची चळवळ काही आजचीच नाही, पुष्कळ दिवसांची आहे. कधी कधी ती मंदावते, तर कधी जोरात येते. गेले काही दिवस ह्या चळवळीला जोर चढला आहे व तिचा हिंदू मंदिरातून व हिंदूंच्या व्रतोपवासांचे दिवस साधून फार जोराचा प्रचार चालला आहे.
ह्या चळवळीबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांनी एक उत्कृष्ट लेख पूर्वी लिहिलेला आहे. त्यांच्या लेखानंतर मी लिहिण्याची गरज नाही. हा त्यांचा लेख लोकांच्या डोळ्यांपुढे सध्या नाही म्हणून पुन्हा एकदा ह्या चळवळीबद्दल लिहिणे भाग पडत आहे. तरीसुद्धा सावरकरांचा लेख सर्व मराठी मासिकांनी व वर्तमानपत्रांनी पुन्हा एकदा छापावा अशी माझी आग्रहाची विनंती आहे.
हिंदू धर्म आहे तरी काय?
हिंदू धर्म आहे तरी काय,त्याची थोडक्यात राहोच, पण विस्ताराने तरी व्याख्या करणे शक्य आहे का, ह्याबद्दलही माझ्यापेक्षा हजारो पटींनी ज्येष्ठ व श्रेष्ठ लोकांनी विचार केलेला आहे. खुद्द लोकमान्यांनी ह्या बाबतीत केलेले विवेचन फार मार्मिक व मार्गदर्शक आहे. हिंदूचे एक असे दैवत नाही, एकच असा आचार नाही व मुक्तीचे साध्य साधण्यासाठी सांगितलेली साधनेही अनेक आहेत, असे हिंदू धर्माचे लक्षण लोकमान्य करतात. हिंदुस्थानचा गेल्या तीन हजार वर्षांचा इतिहास हेच पुन्हा पुन्हा सिद्ध करतो.
आपले स्वत:चे आचारधर्म आपण पाळावे व इतरांना त्यांचे पाळू द्यावे अशी प्रथा प्राचीन काळापासून भारतात अद्ययावत चालू आहे.
ह्याच कारणामुळे अनेक चालिरीती भारतात दिसतात. काही जमाती मांस खातात, काही खात नाहीत; काहींत मामा किंवा आत्याच्या मुलीशी लग्ने करतात, काहींत सर्व तऱ्हेचे निकट सापिंड्य लग्नाच्या बाबतीत निषिद्ध आहे; बऱ्याच जातींत स्त्रिया चोळी घालतात, तर काहींच्यात ही चाल निषिद्ध आहे; एक ना दोन, अशी उदाहरणे हजाराने सांगता येतील. एकाच समाजात राहणाऱ्या लोकांनी एकमेकांच्या भिन्न व्यवहाराबद्दल सहिष्णुता बाळगणे हे एक कर्तव्य आहे. ज्या वेळी एखाद्या व्यवहारामुळे एखाद्या व्यक्तीच्या व समाजाच्या न्याय्य व्यवहाराला अडथळा येईल, तेव्हाच अशा स्वातंत्र्याला राजाज्ञेने बंध घालता येईल. एखाद्या समाजाला आपले काही व्यवहार योग्य वाटले नाहीत, तर त्यांवर बंदी घालता येईल; एरवी दुसऱ्याचे न आवडणारे व्यवहार बंद करावयाचे असल्यास मतपरिवर्तन तेही दांडगाईन नव्हे हाच एक मार्ग न्याय्य व शिष्टसंमत आहे.
देवळांचे हिंदू समाजातील स्थान
हिंदूचे सर्व थोर राजे ह्याच न्यायाने वागत आले. परकी राजांनी केलेली कृत्ये ह्याच कारणामुळे जुलमी व सर्वथैव निंद्य ठरली. दुर्दैव एवढेच की ह्या जुलमी व निंद्य प्रकाराला समाजातील सर्व शक्ती एकवटून प्रतिकार फार वेळा झाला नाही. प्रत्येकाने आपल्या मनाप्रमाणे आपल्या दैवताची पूजा करावी हे हिंदू धर्माचे तत्त्व आहे. त्याप्रमाणे वागणूक ठेवताना इतरांनी आमच्या दैवतांचे व मंदिरांचे पावित्र्य भ्रष्ट करता कामा नये, त्यासाठी प्राण खर्चा करू ही भावना हिंदूनी दाखविली नाही. नाहीतर हिंदू मंदिरांच्या मूर्तीची मोडतोड व त्या जागी चर्च व मशिदी ह्यांची स्थापना होती ना. ह्या बाबतीत असेही म्हणता येईल की, हिंदूची दैवतपूजा कौटुंबिक स्वरूपाची होती. त्यामुळे
मशीद व चर्च ह्यांना मुसलमान व ख्रिस्ती धर्मात जे विशिष्ट स्थान आहे ते देवळाला हिंदू समाजात नाही. काही का असेना, हिंदूची देवळे शेकडोंनी फुटली हे खरे. आता तरी आपण जागरूकपणे देवळांचे पावित्र्य ठेवण्यासाठी झटतो म्हणावे तर तेही नाही. कुठच्याही लहानमोठ्या देवळांत जा, स्वच्छता, प्रसन्नता व पावित्र्य ही अपवादानेच आढळतात. सर्व त-हेच्या बेवारशी व रोगी जनावरांचे वसतिस्थान म्हणजे हिंदू देवळांचे आवार झाले आहे. पुष्कर सरोवराच्या रम्य परिसरात एक प्रसिद्ध देऊळ ब्रह्मदेवाचे आहे. तेथे देवळाभोवतालच्या ओव-यांवरील गच्चीवर सर्व पुजारी व यात्रेकरू शौचविधी उरकतात! पूर्वी देवळांना भव्य आवारे असत, देवळाला वाट रुंद ठेवलेली असे. हल्ली देवळांची आवारे व शेजारील रस्ते पुजारी व दुकानदार ह्यांनी हळूहळू पुढे सरकून इतकी बळकावली आहेत की, देवळात जाण्याची वाट अरुंद बोळासारखी झालेली आहे. काही मंदिरांत तर पुजा-यांच्या किंवा भोप्यांच्या घरांतूनच जावे लागते. देवाचे आवार पूर्वी केवढे होते हे शोधून ते परत तेवढे करवले तर एक मोठे समाजकार्य होईल.
हिंदू देवळांतून व घरांतून भजन म्हणून एक कार्यक्रम असतो. गायन व नृत्य हे ईश्वरसेवेचे एक अंग फार प्राचीन काळापासून समजले जाते. अजूनही काही मंदिरांतून सकाळी व संध्याकाळी वीणावादन व गायन चालते. चिदंबरला रोज सकाळ-संध्याकाळ उत्कृष्ट भक्तिगीते गाइली जातात. जगन्नाथाच्या मंदिरात जयदेवाच्या गीतगोविंदाचा काही भाग रोज म्हटला जातो. अशा ठिकाणी मन काही क्षण का होईना, देवाच्या पायाशी स्थिरावते; पण कित्येक ठिकाणी भजनाच्या नावाखाली गायनाची, वाद्यांची व ज्या भक्ताने गीते रचिली त्याची विटंबना मात्र झालेली आढळते. प्रत्येक भक्ताच्या हातात टाळासारखे कर्कश वाद्य असते. त्याच्यावर आवाज चढवावा लागतो म्हणून प्रत्येक जण गळा फोडून
ओरडत असतो. माधुरीचा सर्वथैव लोप होऊन कर्कश, विसंवादी नाद मात्र उमटत असतो. देव बहिरा आहे अशी ह्या लोकांची ठाम समजूत झालेली असते. अशा भजनाने आसपासच्या वीस-पंचवीस घरांना त्रास होतो. ही दुष्ट प्रथा बंद पाडून सुस्वर सामुदायिक भजन करणे शक्य आहे. त्यामुळे हिंदचे दैवतपूजन जास्त मंगल होईल, पण तिकडे कोणी लक्ष देत नाही. एवढेच नव्हे तर अशी टीका करणारा नास्तिक व पाखंडी समजला जातो.
गोवधबंदीची चळवळ दडपणाची!
ख्रिस्ती व मुसलमान, विशेषत: मुसलमान, लोकांचे अनुकरण करून आततायीपणा करण्याकडे मात्र प्रवृत्ती वाढू लागली आहे. वेदवाङ्मय, इतिहास व पुराणे हे जसे आमचे धर्मग्रंथ आहेत तसेच ते जुन्या चालिरीती व इतिहास ह्यांचे कोठार आहेत. भारताच्या प्राचीन इतिहासाचे संशोधन करावयाचे तर ह्या ग्रंथांचा फार काटेकोरपणे अभ्यास करावा लागतो. त्यात सारखी भर पडत गेली आहे. ती भर कोणती व पूर्वीचा शक्य तितका जुना ग्रंथ कोणता, हे शोधून काढणे आवश्यक आहे. अशा अभ्यासात पूज्य दैवते व व्यक्ती ह्यांच्या चरित्रावर उलटसुलट टीका होणे अपरिहार्य असते. अशा वेळी भावना दुखावल्याचा हलकल्लोळ करणे रास्त नाही. जुन्या पंडितांचे ग्रंथ, स्वमतमंडन व परमतखंडन करताना त्यांनी केलेली विधाने पाहिली म्हणजे कसल्याही तऱ्हेचे पावित्र्यविडंबन करण्याचे त्यांनी ठेविले नाही हे दिसून येईल. चीड येईल असे लिखाण लिहिण्याच्या बाबतीत ह्या प्रतिवादी भयंकर पंडितांच्या मानाने हल्लीची पिढी कच्चीच आहे असे दिसून येईल. जैनांनी सनातन्यांच्या इतिहास व पुराणग्रंथांचा जो विचका केला आहे तितका दुसऱ्या कोणीच केला नसेल. शैवांनी वैष्णवांची व वैष्णवांनी शैवांची जी निंद्य चेष्टा केली आहे तितकी इतर धर्मीयांनीसुद्धा हिंदूची केलेली नाही.
ह्या गोष्टी येथे सांगण्याचे कारण असे की, हिंदुत्वाचा अभिमान धरणारे लोक, काही अपवाद वगळल्यास, स्वत:ची शुद्धी न करता इतरावर व्यर्थ दडपण आणू पाहत आहेत. गोवधबंदीची चळवळ ही अशा चळवळींपैकी आहे. तिला तर्काचा, इतिहासाचा, धर्माचासुद्धा आधार नाही. जे हिंदू राजे धर्मरक्षणार्थ प्राणपणाने लढले व ज्यांच्या हातात राज्यसत्ता होती, त्यांनीही सरसकट गोवधबंदी अमलात आणली नाही. शिवाजी महाराजांच्या राज्यात भररस्त्यात गाय मारू देत नसत; गाय मिरवणुकीने नेऊन मारू देत नसत; पण मुसलमानांनी गाय मारावयाची नाही व गोमांस खावयाचे नाही अशी बंदी नव्हती. खुद्द पुण्याला पेशव्यांच्या ब्राह्मणी राज्यातही संपूर्ण गोवधबंदी होती असा खात्रीदायक परावा सापडत नाही. मग आताच गोवधबंदीची चळवळ का उसळली! हिंदू धर्माबद्दल काही विशेष आस्था वा काही नवी मानवी मूल्ये ह्या आंदोलनाच्या बुडाशी आहेत असे वाटत नाही. जी तरुण मंडळी ह्यांत पडली आहेत ती सद्भावनेनेच कार्य करीत असणार, पण त्यांनी शांतपणे विचार करावा अशी त्यांना आग्रहाची विनंती आहे.
गोमांसभक्षणाचा इतिहास
गोमांसभक्षणाचा इतिहास मोठा उद्बोधक आहे. गाय, बैल, शेळ्या व मेंढ्या ह्यांचे कळप पाळणारे बहुतेक लोक ह्या ना त्या स्वरूपात ह्या प्राण्यांचे मांस खातात व त्यांचे कातडे पांघरण्यासाठी, पादत्राणे करण्यासाठी, वाद्या करण्यासाठी वगैरे नाना तऱ्हेच्या उपयोगासाठी वापरतात. पूर्वी आर्य भारतात आले तेव्हा त्यांच्याजवळही अशा तऱ्हेचे कळप होते व त्या प्राण्यांचे दूध, मांस व कातडे यांचा उपयोग ते सर्रास करीत असत. उष्ण प्रदेशात मांस लवकर नासते व म्हणून जनावर मारले की, शक्य तितक्या लवकर ते खाऊन संपवावे लागते. शेळी मेंढीसारखे जनावर ५-१० जणांना संपवता येते; पण गायबैलांचे मांस संपवायला चांगली ५० माणसे लागतील. त्याचप्रमाणे शेळ्या-मेंढ्या एकाएका मालकाजवळ खंडोगणती असतात, तर गुरे १० नीच मोजावी लागतात. युरोपातील थंड प्रदेशात, विशेषतः हिवाळ्यात मांस आठवडेच्या आठवडे टिकू शकते. एखादे गुरूं मारून ठेवले तर एक कुटुंब कित्येक दिवस त्यावर जगू शकेल. भारतातील उष्ण हवेत ते शक्य नव्हते त्यामुळे गुरू मारणे म्हणजे एक मोठा मेजवानीचा प्रसंग समजला जाई व कोणी थोर ऋषी आले तरच गाईचे कोवळे मांस शिजवले जाई. ब्राह्मणांचा सर्वांत मोठा सन्मान करणे किंवा पाहुण्याचा सन्मान करणे म्हणा- ह्या विधीला मधुपर्क असे नाव आहे व त्यांत गोमांस अवश्य म्हणून उल्लेख आहे. आर्य पादत्राणे वापरीत व ती गाईबैलांच्याच कातड्याची असत. म्हैस बाळगणे जुन्या आर्यांना ठाऊक नव्हते. प्राचीन आर्याचे पंचगव्य (गाईपासून झालेले पाच पदार्थ) म्हणजे दूध, दही, तूप, लोणी व मांस असे होते.
एकंदरीनेच आर्यांना मांस वर्ज्य नव्हते. मुंज झाल्यापासून ब्रह्मचर्याची दीक्षा सुटेपर्यंत आयुष्य अतिशय साधेपणे व कष्टाने घालवावे असा नियम होता. तेवढ्या वेळात ज्या गोष्टी वर्ल्स होत्या त्यांत मध, मांस वगैरे खायला रुचीकर लागणारे पदार्थ होते. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी की, ह्या ब्रह्मचर्याच्या काळात सर्वच तऱ्हेचे मांस वर्ज्य होते, फक्त गोमांस वर्ज्य असे नव्हते.
धर्म कमकुवत करू नका!
एकंदरीनेच मांस खाण्याविषयी ब्राह्मणांचे मत कसे होत गेले व त्यातही गोमांस निषिद्ध कसे व कधी झाले हे नीट सांगता येत नाही. फिलाडेल्फिया विद्यापीठात प्रो. ब्राऊन म्हणून एक संस्कृत पंडित आहेत. त्यांनी ह्या विषयावर लिहिलेला एक लेख नुकताच पाहण्यात आला. त्यांतही प्रो. महाशयांना ह्या प्रश्नाचा नीटसा उलगडा झाला नाही, असे दिसते, पण त्यात त्यांनी असे दाखवून दिले की, हा निषेध असूनही हिंदू भारतात निरनिराळ्या जमाती गोमांस भक्षण करीत असे उल्लेख सापडतात. ब्राह्मणांना एकंदर मांसभक्षण निषिद्ध झाले ते बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा पाडाव करता करता त्यांतील काही तत्त्वे सनातन्यांनी स्वीकारली म्हणून झाले, की मध्ययुगात जैन मताचा प्रसार झाला त्यामुळे झाले, हेही ठामपणे सांगता येत नाही. ह्याबाबत एक लक्षात ठेवणे जरूर आहे की, हिंदुस्थानाबाहेरील बुद्धधर्मीय मांसभक्षण- गोमांसभक्षण धरून- करतात. काही कारणामुळे ब्राह्मणांना मांसभक्षण व त्यातूनही गोमांसभक्षण निषिद्ध झाले; पण निषेध हा हिंदू धर्माचा गाभा असे मानता येणार नाही व हिंदू धर्माच्या नावाखाली गोवधबंदीची चळवळ करणे म्हणजे लोकांची दिशाभूल करणे व हिंदू धर्मात एक निषेध दृढमूल करून तो धर्म आणखीच कमकुवत करणे होय.
दूधपुरवठा नि गोवध
गोवधामुळे भारतातील लोकांना पुरेसे दूध मिळत नाही असाही एक सर्वथैव खोटा प्रचार गेल्या महाशिवरात्रीला झाला. भारतात निम्मे लोक म्हशीचे दूध पितात; त्यांचे दुग्धपान युरोपाप्रमाणे सर्वस्वी गाईवर अवलंबून नाही. शिवाय ज्यांना दूध मिळत नाही त्यांना खायला व प्यायलाही नीट मिळत नाही. सर्वांना दूध घेण्याची ऐपत आहे व इच्छा आहे पण पुरेसा पुरवठा नाही अशी परिस्थिती असती, तर एक महत्त्वाचे अन्न म्हणून त्याचे रेशनिंग करण्याची मागणी पुढे आली असती. जे दूध पीत नाहीत ते दारिद्र्यामुळे. त्यांना- निदान गरीब लहान मुलांना- दूध मिळावे म्हणून सरकारचे व कित्येक सार्वजनिक संस्थांचे प्रयत्न चालू आहेत. त्या प्रयत्नांना हातभार लावून सर्वांना दूध मिळावे असा प्रयत्न करण्याचे टाकून दुधाचा पुरवठा व दूध घेण्याची ऐपत ह्या गोष्टीशी ज्यांचा संबंध नाही अशा गोवधबंदीच्या चळवळीत सामर्थ्य खर्च करणे म्हणजे वेळेचा अपव्यय व बहुजन समाजाची दिशाभूल जाणूनबुजून करणे होय.
ज्या देशांतून सरसकट गोवध होतो, जेथले गरीबगुरीब गोमांस खातात, तेथे गाईचे दूध उत्तम मिळते व त्याची किंमतही मुंबई-पुण्यास द्यावी लागते त्यापेक्षा कमी पडते. गोवधाचा दूध-पुरवठ्याशी संबंध मुळीच नाही.
गाईम्हशीच्या दुधाचा उल्लेख आला म्हणून थोडे विषयांतर करून एक गोष्ट नमूद करते. गाईचे दूध मुलांना मानवते म्हणून ते म्हशीपेक्षा चांगले हेही एक अजब तर्कट आहे. म्हशीच्या दुधाची साय काढली व त्यात पाणी घातले तर मुलांना ते उत्तम मानवते व प्रौढांना तर म्हशीचे दूध चांगलेच मानवते. म्हशीचे दूध गोडीने व कसाने गाईच्या दुधापेक्षा जास्त चांगले असते. त्याचे दही पण गाईच्या दह्यापेक्षा घट्ट व रुचकर असते. शिवाय गाईला होणारे बरेचसे रोग म्हशीला होत नाहीत. युरोपमध्ये काही प्रदेशांतून गाईंना फार मोठ्या प्रमाणात क्षयरोग झालेला असतो व ते दूध प्यायल्याने माणसालाही तो रोग होतो, म्हणून पाश्चराइज्ड (जंतुरहित) न केलेले असे खेडेगावचे दूध पिऊ नका असे सांगणाच्या धोक्याच्या सूचना प्रजेला देतात. स्वित्झर्लंडमध्ये गाई बऱ्याच प्रमाणात अशा रोगाने पछाडलेल्या असतात, म्हणून बहुतेक दुधाचे चीझ व चॉकोलेट बनवून टाकतात. कारण ह्या दोन पदार्थाच्या कृतींत रोगजंतू मरून जातात. तेव्हा गोदुग्धाच्या धारेत वाहवून न जाता उत्तम सकस दुधाचे रांजणच जणू अशा आपल्याकडील ओबडधोबड, काळ्या म्हशीचेही स्मरण ठेवले तर कृतज्ञता व्यक्त केल्यासारखे होईल.
एक राजकीय पवित्रा
हिंदच्या देवळातील काही प्रकार वर वर्णन केलेच आहेत. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे देवळाच्या आवारात मोकाट सुटलेले गाईबैल व कुत्री चालतात, पण काही जातींची माणसे मात्र आलेली चालत नाहीत. काशीच्या देवाचे नाव विश्वेश्वर आहे. सबंध विश्व राहोच, पण हिंदूतल्या सगळ्या जातींनासुद्धा तो देव जवळ करीत नाही. तो पतितपावन तर नव्हेच नव्हे. तो दुसऱ्यांना पावत करीत नाही, तर स्वत:च दलितांच्या स्पर्शाने पतित होतो! हरिजनांनी मंदिरप्रवेश केला म्हणून विश्वेश्वराचे नवे देऊळ बांधणान्यांचा कडकडून निषेध शिवरात्रीची पर्वणी साधून का बरे केला गेला नाही! स्वधर्मीयांच्या आचारविचारांची दखल का बरे घेतली गेली नाही! इतरांनी अमके खावे का नाही, अमके जनावर मारावे की नाही ह्याची विवंचना करण्याचे कारण काय? हा खटाटोप धर्माच्या उन्नतीसाठी नसून एक राजकीय पवित्रा मात्र आहे. मोकाट सुटलेली ही मोठी जनावरे दुकानदारांच्या मालात तोंड घालतात व रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्याला ढुशा देतात. रस्त्याने जाणाच्या गुरांचा पादचाऱ्यांना, विशेषत: शाळकरा मुलांना फार त्रास होतो. कधी कधी जिवावर बेतते. त्या गुरांच्या मागून भर रस्त्यावर थांबून शेण गोळा करणाच्या बायका पाहून मानभावांचा शेनपुंजी दृष्टांत सात शतकांनंतरही खरा आहे ह्याची प्रचिती पटली, तरी येणाऱ्या जाणाच्या वाहनाखाली ह्या बाया सापडणार की काय अशी सारखी भिती वाटते. गुरांवर योग्य नियंत्रण व मोकाट जनावरे जप्त करण्याची ताबडतोब व्यवस्था झाली पाहिजे. पण वर म्हटल्याप्रमाणे धर्माच्या नावाखाली माणसांपेक्षा जनावरांनाच जास्त किंमत दिली जात आहे.
धर्मसंरक्षणाच्या खुळचट कल्पना
आमची संस्कृती / ६१
पाहिलेले आहे. गाडीचा आकार सुधारून जोखड व गाडीची पुढची बाजू यांत भरपूर अंतर ठेवण्याबद्दल लोकांचे मन वळवले तर बैल दुवाच देतील. गोमांस खाणा-यांच्या प्रदेशांत गुरांना जी वागणूक मिळते ती भारतातील हिंदू कधीही देत नाहीत. भारतात गोधन इतके निकृष्ट आहे की, गोमांसखाऊ विलायतेत जेवढे दूध दर गाईमागे मिळते त्याच्या एकचतुर्थांशही येथे मिळत नाही. बैलांची काम देण्याची शक्तीही कमी असते. गुरे जास्त व चारा कमी म्हणून गुरांना चांगले खाणेपिणे क्वचितच मिळते. गंगा व ब्रह्मपुत्रा ह्या नद्यांच्या खो-यांतून नुकताच माझा एक प्रवास झाला. गुरांचे शेकडो कळप वाटेत भेटले; पण त्यांतील फार थोडी गुरे सशक्त व पुष्ट दिसली. बाहेर हाडे निघालेली, थकली-भागलेली गुरेच अधिक. हा उन्हाळा तरी काढतील की नाही, असे त्यांना पाहून वाटले. जेथे जेथे अशा गुरांचे कळप, तेथे तेथे शेजारच्या वृक्षांवरून मोठमोठी गिधाडे बसलेली पाहून अंगावर काटा आला. एखादे दुसरे गुरू तरी ४/५ मैलांत रोज मरतेच. मेजवानी मिळण्यासाठी फक्त उंच वृक्षावर वाट पाहावयाची एवढेच ह्या गिधाडांचे काम. अशी भुकेने व रोगाने मेलेली जनावरे हिंदुस्थानात खूपच असतात. त्यांच्या कातड्यांपासून केलेल्या पादत्राणांना ‘अहिंसक' चपला म्हणतात. ही अहिंसेची चेष्टा की जाणूनबुजून स्वीकारलेले औदासिन्य? इतर धर्माचे लोक गुरे कसाईखान्यात एका घावाने मारतात. आम्ही हिंदू त्यांना उपाशी-तापाशी ठेवून मारतो. कायद्याने पहिल्या त-हेच्या वधाला बंदी व्हावी आमचे हे मागणे व त्यामुळे हिंदुधर्मसंरक्षण होईल ही आमची कल्पना! खरोखर ह्या प्रचाराला बळी पडण्याइतके आपण खुळे झालो आहोत का?
हट्टाग्रह का?
आमची संस्कृती / ६३
ते ते हिंदू राजे आणि सारे हिंदू जगत मोठ्या प्रौढीने आत्मस्तुती करीत असे. अशा ह्या गोमुखी हिंदू धर्माच्या परधर्मसहिष्णू अनुयायांकडून त्या व्याघ्रमुखी मुसलमानी समाजाचे नि:शेष निखंदन केले जाण्याची लवलेशही शक्यता नव्हती हे काय सांगावयास हवे?
ती अधर्मसहिष्णुता होती ।
परधर्मसहिष्णुता! आणि हा सदगुण! जेथे तो परधर्म आपल्या स्वधर्माशी सहिष्णुतेने वागत असेल तेथे त्या परधर्माशी सहिष्णुतेने वागणे हा सदगुण असू शकेल; परंतु ज्या मुसलमानांचे महंमद गझनीपासूनचे सुलतानामागून सुलतान, शहा, बादशहा आपल्या तक्तावर बसताना ‘इस्लाम धर्माच्या गौरवार्थ काफरांच्या हिंदू धर्माचा उच्छेद करून टाकणे हाच माझा धर्म आहे, हीच माझी प्रतिज्ञा आहे.' अशी शपथ घेऊन ‘तक्तावर' बसत आले आणि अशी अत्याचारी धार्मिक आक्रमणे हिंदूंवर एक सहस्र वर्षे करीत आले, त्यांच्या भाषांतील त्या तशा मुसलमानी धर्माशी, त्या तशा परधर्माशी परधर्मसहिष्णुतेने वागणे म्हणजे स्वधर्माच्या गळ्यावर स्वहस्ते सुरा चालविणे होते. ती परधर्मसहिष्णुता नसून अधर्मसहिष्णुता होती. ती सहिष्णुता नसून तो षंढपणा होता. पण हे सत्य एक सहस्र वर्षांच्या अघोर अनुभवांनंतरही त्या काळच्या हिंदूंच्या ध्यानी आले नाही. ते, तशा धर्माशीही सहिष्णुतेनेच वागणे हा स्वधर्म समजत. हिंदू जातीचा भूषणभूत नि विशिष्ट ‘सदगुण' समजत!
हे हिंदू जाती! तुझ्या अध:पाताला कारणीभूत झालेल्या दुर्गुणांपैकी प्रमुख दुर्गुण जर कोणते असतील तर हे तुझे सदगुणच होत!!
अहिंसा, दया, शत्रुस्त्रीदाक्षिण्य, शरणागत शत्रूना अभयदान, क्षमा वीरस्य भूषणम', परधर्मसहिष्णुता इत्यादी सदगुणांच्या, देशकालमात्राचा विवेक न करता, तू केलेल्या नेभळ्या नि आंधळ्या अवलंबनानेच तुझा त्या सहस्रवर्षव्यापी हिंदु-मुसलमान- महायुद्धामध्ये धार्मिक क्षेत्रात असा भयंकर पराभव झाला. कारण- पात्रापात्र विवेकशून्य।आचरिला जरी सदगुण।तो तोचि ठरे दुर्गुण।सदधर्मविघातक।।'
- १९५८
६२ / आमची संस्कृती
चुरा हे उत्तम खत आहे. त्यांची चरबीही उपयुक्त असून तिचा मोठ्या प्रमाणावर व्यापार चालतो. ह्या राष्ट्रीय संपत्तीचा सर्व त-हेने भरपूर उपयोग कसा करता येईल, ह्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण जनतेला हवे. धर्माच्या नावाखाली भावना चेतवून द्वेषबुद्धी निर्माण करण्याने राष्ट्राचे कधीही हित होणार नाही.
गोवधाने हिंदूंच्या भावना दुखावतात; डुकरे मारणे किंवा खाणे मुसलमानांना निषिद्ध आहे, तर अल्पतम प्राणी म्हणजे ढेकूण, उवा, पिसवा वगैरेंसुद्धा मारणे जैन धर्माच्या विरुद्ध आहे. सर्वांनी एका राज्यात राहावयाचे म्हटले तर प्रत्येकाला शक्य तर आपले आचारधर्म पाळण्याची मुभा देता येईल, पण इतरांवर बंधन कसे घालता येईल? ज्या हिंदूंना गाई पूज्य वाटतात त्यांनी रोज त्यांना नमस्कार करावा, व आपली पापे नष्ट करावीत; त्यांचे दूधतूप खावे; पण इतरांनी त्यांच्याच समजुतीप्रमाणे वागावे असा आग्रह योग्य नाही.
सदगुणांचे दुष्परिणाम
परंतु उलटपक्षी जेथे जेथे हिंदू राज्य प्रबळ होऊन त्यांच्या सत्तेखाली पराभूत आणि हतबल अशी लक्षलक्ष मुसलमान प्रजा आलेली होती, तेथे तेथे त्या मुसलमानांवर, हिंदूवर पूर्वी झालेल्या अत्याचाराचा सूड उगविण्यासाठी- मुसलमान हिंदूची करीत, त्याप्रमाणे त्यांची सरसकट शाका, शिरच्छेद, करून टाकण्याची तर गोष्ट दूरच पण ते परधर्मीय म्हणूनच त्या मुसलमान प्रजेला काडीइतकाही धार्मिक उपद्रव हिंदूंकडून होत नसे. उलट त्यांना सामुदायिक नमाज, ताबुतासारखे सार्वजनिक उत्सव हिंद अधिका-यांच्या संरक्षणाखाली करता येत. नव्या नव्या मशिदी नि धर्मस्थाने उभारून आपल्या धर्माचा व्याप नि वैभव सुखाने वाढविता येई; हिंद नागरिकांप्रमाणेच नव्हे तर अधिक सौम्यपणे नि सवलतीने मुसलमान नागरिकांना त्या त्या काळच्या हिंदूंच्या राज्यात नैर्बाधिक अधिकार भोगता येत त्या वस्तुस्थितीलाही इतिहासाच्या पानापानाचा आधार आहे.
आमची संस्कृती / ६५
त्यांनी प्रतिपादिलेल्या ब-याचशा सुधारणा आज घडूनही आल्या आहेत; पण इतके असूनही त्यांचे निबंध आजही आवडीने वाचावेसे वाटतात; कारण, अमक्या तमक्या विशिष्ट आचारविचारांत सुधारणा झाली पाहिजे, एवढेच त्यांचे प्रतिपादन नसून सबंध समाजाच्या कल्याणाची त्यांना तळमळ आहे व ते कल्याण कसे साध्य करावयाचे त्या मार्गाचे त्यांनी केलेले विवेचन आजही मार्गदर्शक आहे- नव्हे आजच्या स्वातंत्र्याच्या कालात ते पूर्वीपेक्षाही जास्त लागू पडते. ते म्हणतात “धर्म, राज्य व सामाजिक व्यवहार यांतील भेद एकसमयावच्छेदेकरून होणारा आहे.समाजाच्या एकाच बुडख्याला ह्या तीन खांद्या किंवा हे तीन अंकुर एकदम फुटतात. आजच्या कालात हे तत्त्व इतके सर्वसामान्य आहे की, प्रत्येक राजकीय पक्षाची घोषणा ही समाजरचनेबद्दलची मूलभूत घोषणा होऊन बसली आहे. समाजवादी राज्यपद्धती' हे शब्दच ह्या नव्या वृत्तीचे द्योतक आहेत. दुर्दैवाने एका बाबतीत आजची पिढी आगरकरांच्या फारच मागे आहे. ती म्हणजे वरील त्रयीपैकी धर्माची- विशाल अर्थाने म्हणायचे म्हणजे क्रियेच्या मागे नीतीची किंवा धर्माची- जी घट्ट न ढळणारी भावना पाहिजे, तिचा विचार होत नाही. साध्य काय ह्याबद्दल ब-याच अंशी एकमत असूनही साधनांबद्दल दुफळी तरी माजते किंवा जाणूनबुजून लोकांच्या डोळ्यांत धूळ फेकली जाते. हा दंभ किंवा ढोंगीपणा यावर आगरकरांनी आग पाखडली होती. आपणही तसेच करावयास पाहिजे. आगरकर ज्या सुधारणा हव्या म्हणत होते त्या मिळाल्या, टिळकांनी ज्या स्वराज्यासाठी जिवाचे रान केले तेही मिळाले. पंचशील, लोकशाही राज्यपद्धती, समाजवाद, सत्य आणि अहिंसा ह्या तत्त्वांचा प्रत्येक व्यासपीठावरून जयजयकार चालला आहे. इतके असूनही प्रत्येक विचारवंत महाराष्ट्रीयाचे मन अंधाराने भरून राहिले आहे. आगरकरांनी प्रतिपादिलेली मुख्य सुधारणा झाली नाही. 'धैर्य नाही, उत्साह नाही, खरा देशाभिमान नाही, खरी धर्मश्रद्धा नाही. अहोरात्र क्षुद्र स्वार्थावर दृष्टी लागली असल्यामुळे आपल्या विचाराचा व आचाराचा भावी संततीवर काय परिणाम होईल त्याचा कोणीही फारसा विचार करीत नाही,' असे ते ‘गुलामांचे राष्ट्र' या लेखांत म्हणतात ते आजही खरे आहे. आम्हा गुलामांचे कपडे बदलले, बायका शिकू लागल्या; कारण आम्हांला हे सर्व