Jump to content

आमची संस्कृती/ आकांक्षा

विकिस्रोत कडून
template error: please do not remove empty parameters (see the style guide and template documentation).

१४. आकांक्षा


 फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा ते मार्च संपेपर्यंत आणि मग एप्रिलचा शेवटचा आठवडा हे दिवस आले की मी अगदी बेचैन होते. सुदैवाने पुण्याच्या बाहेर दौ-यावर असले तर माझ्या मनाच्या यातना वाचतात, पण त्याला काही पळून जाता येत नाही. दरवर्षी त्याच दिवसांत त्याच कहाण्या, तेच अश्रू, तोच उद्वेग, तेच वैफल्याचे प्रदर्शन!- मन पिचून गेले तर नवल नाही. मी कंटाळलो, माझे परिश्रम व्यर्थ गेले, असे त्याला सारखे बोचत राहते. एका शिक्षकाच्या मनात असे विचार येतात ते काही विषय वाईट शिकवला म्हणून नव्हे, कामचुकारपणा केला म्हणून नव्हे, तर त्याहीपलीकडे जाऊन आयुष्यातील काही मूल्ये उराशी बाळगून ती मूल्ये इतरांच्या जीवनात उतरविण्याचा केलेला खटाटोप व्यर्थ जातो म्हणून.
 फेब्रुवारीत चाचणी परीक्षेचा निकाल लागतो व त्यात पास होणाच्या म्हणजे सर्व विषयांत पास आणि फक्त एका विषयात नापास होणाच्या विद्यार्थ्यांना विद्यालयीन परीक्षेस बसण्याची परवानगी मिळते. हा निकाल लागल्यापासून घरी वर्दळ सुरू होते. त्यांत नापास विद्यार्थी, त्यांचे आईवडील व इतर मित्रमंडळी सर्व असतात. सर्वांचे म्हणणे एकच- मूल नापास झाले असले तरी कृपा करा व परीक्षेस बसण्याची परवानगी द्या.

 पास-नापासांची सीमारेषा
 पास म्हणजे काय ह्याचा जरा विचार करू या. शेकडा तेहतीस टक्के मार्क मिळाले की एका विषयात पास--म्हणजे विषय बहुतांश (सदुसष्ट टक्के) माहीत नसला तरी पास! एखाद्या चांभाराने वहाण सदुसष्ट टक्के बिघडवली तर तुम्ही ती घ्याल का? एखाद्या आचा-याने शंभरात फक्त तेहतीस जिलब्या चांगल्या केल्या तर तुम्ही त्याला पैसे द्याल का? शेतक-यांनी कामचुकारपणा करून फक्त एकतृतीयांशच शेते पिकविली तर ते व त्यांच्याबरोबर सर्व भारतही नष्ट व्हावयास वेळ लागणार नाही. शेतकरी, चांभार, हमाल, कोष्टी वगैरे निरक्षर गरीब शंभर टक्के काम करून समाजाला पोसतात, अंगभर वस्त्र लेववितात आणि विद्यार्थ्यांना मात्र समाजाला मोबदला म्हणून तेहतीस टक्के मेहनतसुद्धा करवत नाही का?
 हे तेहतीस टक्के सुद्धा वास्तविक तेहतीसपेक्षा कमी असतात. पाच प्रश्न घातले ते सर्वच्या सर्व सोडवले व त्यांतून तेहतीस टक्के मार्क मिळाले असे कधीच नसते. विद्यार्थ्याने जितके प्रश्न सोडवायचे असतात त्यांच्यापेक्षा चाळीस टक्के प्रश्न जास्त काढावे लागतात. पुष्कळदा काढलेल्या प्रश्नांच्या निम्मेच प्रश्न सोडवले तरी काम भागते. सबंध वर्षभर शिकवलेला विषय दहा प्रश्नांत कसा आटोपता येईल? त्यांतूनही त्या दहा प्रश्नांतील कोणतेही पाच सोडवायचे म्हणजे तर कित्येक विभाग सर्वस्वी सोडून देता येतात. जे पाच प्रश्न सोडवले त्यांतील तेहतीस टक्के म्हणजे त्या विषयाचे ज्ञान झाले- नव्हे तो विषय थोडा कळला असे म्हणता येईल का?
 विषयाच्या ज्ञानाची ही तयारी विद्यार्थ्यांना पुरे वाटते, पण त्यांना कामाला लावणा-यांना ती अगदीच तोकडी वाटते. नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये विद्यार्थी निरनिराळ्या जागांसाठी अर्ज करतात. सर्व बी.एस्सी. पास; पण मुलाखतीमध्ये रसायनशास्त्राबद्दल विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देता येत नाहीत. दोनचार कारखानदारांनी बी.एस्सी. मुले ज्ञानात किती तोकडी असतात ते मुद्दाम घरी येऊन उदाहरण देऊन सांगितले व "काय हो, हे सुद्धा का तुम्ही शिकवीत नाही?" म्हणून खोट्या साळसूदपणे विचारले. त्यांना काय उत्तर देणार?

 याची चौकशी केले होती का?
 भेटायला येणा-यांत गरीब-श्रीमंत सर्व असतात. गरिबांचे बाप पुष्कळदा हताश होऊन ढसाढसा रडतात. तुमच्या मुलाचे भवितव्य केवळ एका परीक्षेवर ठरविलेले नाही. पाहा; तो तिमाहीत नापास आहे, सहामाहीत नापास आहे व आता चाचणी परीक्षेत नापास आहे. तुम्हांला मुलगा नापास झाला म्हणून कार्ड पाठविले होते. मुलगा वेळच्या वेळी कॉलेजात जातो का, लेक्चर ऐकतो का, अभ्यास करतो का, ह्याची कधी चौकशी केली होतीत का?' सर्वांचे उत्तर नकारार्थी असते. अशांची समजूत काढणार कशी? काहीही सांगा, उत्तर एकच- ‘आता तो अभ्यास करील. त्याचे वर्ष बुडवू नका.' वर्षाच्या पहिल्या दिवशी मुलांना सांगण्यात येते, ‘बाबांनो, रोजी रुपया ह्याप्रमाणे तुम्ही शिक्षणाची फी देता. हा शिक्षकवर्ग, हे वाचनालय, ह्या प्रयोगशाळा ह्यांचा भरपूर उपयोग करा. अशी संधी तुमच्या हजारो देशबांधवांना मिळालेली नाही. तुम्हांला परत मिळणार नाही. खेळ खेळा, वादविवाद सभा गाजवा, नाटक-सिनेमे पाहा, कॅफेत गप्पा छाटा, पण सर्व अभ्यास झाल्यावर.' मुलांना वाटतं ही चर्पटपंजरी संपणार कधी?
 टर्म भरायचे नियम, निबंध लिहावयाचे नियम, आठवड्यांतून काही दिवस व्यायाम करण्याचे नियम असे निरनिराळे नियम पहिल्या वर्षापासून अगदी एम.ए.पर्यंत असतात. ते न पाळणारे थोडथोडेच विद्यार्थी असते तर इतके वाईट वाटण्याचे कारण नाही. पण त्यांतले बरेचसे नियम मोडूनही टर्म मिळावी अशी ब-याच विद्यार्थ्यांची इच्छा असते. कोणी सहामाहीत नापास (शेकडा पाच-सहा मार्क मिळवून) तरी होतात, किंवा कोराच पेपर देतात, कोणी निबंध पुरेसे लिहीत नाहीत. अशांची संख्या अगदी वरच्या परीक्षांना काय असते ह्याची ठोकळ कल्पना पुढील कोष्टकावरून येईल.

विद्यार्थ्यांपैकी शेकडा ७५ पास केले. त्यांतील जवळजवळ ५० टक्के नीट सर्व विषयांत पास झालेले होते व २५ टक्के निरनिराळ्या विषयांत नापास झालेले पण वर्षाचा अभ्यास व तिमाही वगैरे परीक्षांचे मार्क वगैरे बघून वर चढवलेले होते. उरलेले २५ टक्के जे नापास झाले ते एक तर दोन-तीन विषयांत तरी नापास झालेले किंवा एका विषयात अतिशय मार्कांनी गेलेले व इतर विषयांत पण जेमतेम मार्क मिळालेले असे होते. ह्या कॉलेजचा इंटर आर्टसचा व इंटर सायन्सचा रिझल्ट गेल्या वर्षी अनुक्रमे ६० व ७५ टक्के लागला होता व तसाच पुढे लागेल असे धरले म्हणजे पहिल्या वर्षी पास म्हणून वर घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी जे विद्यार्थी नापास होऊन वर गेले होते तेच बहुतांशी एक वर्ष कॉलेजची फी भरून, परीक्षेची फी भरून, नापास होणार हे स्पष्टच दिसते. वर्ष फुकट गेले ही हळहळ आता वाटते व म्हणून वर घालण्याची जी धडपड, ती कशी व्यर्थ जाते हे ह्यावरून दिसून येईल. त्यापेक्षा कच्च्या विषयाची शिकवणी घेऊन तो समजून घेऊन एका वर्षाने बसले तर चांगले; वर येण्याची शक्यता असते. अभ्यास समजल्यामुळे इंटरच्या वर्षातही नीट पास होऊन डॉक्टरीकडे किंवा इंजिनिअरिंगकडे जाण्यास लागणारी श्रेणी मिळण्याचीही शक्यता वाढते.
 पण टर्म भरावयाचे निरनिराळे नियम मोडूनही टर्म कशी भरता येईल यातच ब-याच जणांची बुद्धी खर्च होते. सर्व उपाय थकले म्हणजे आजारीपणाचे सर्टिफिकेट देणारे डॉक्टर भेटतात. अशा त-हेचे सर्टिफिकेट मागण्यात आपण काही गैर करतो असे वाटतच नाही व सर्टिफिकेट देणा-या डॉक्टरनाही काही वाटत नाही. काही मुलांनी तर डॉक्टरांची खोटी सही करून पत्रके तयार केलेली आहेत.
 श्रीमंत आईबापांना तर असल्या क्षुल्लक कारणांसाठी मुलाला अडकवून ठेवल्याचे आश्चर्य वाटते. 'अहो, तिमाही, सहामाहीचं काय सागता! त्यांत नापास झाला तर त्याचे काय? मूल आहे, उनाडणारच. आता पाहा तो अभ्यास करील व नक्की पास होईल' असे कित्येक पालकांनी हसत सांगितले.
 अपराधी आम्हीच?
 ‘वर्ष बुडवणे, अडवून ठेवणे, निराश करणे,' ही वाक्ये ऐकून आपण

 टर्मबाबतचे नियम किती विद्यार्थी पाळतात?

वर्ग विद्यार्थ्यांची संख्या अटी पाळून संख्या टर्म मिळवलेले अटी न पाळलेले पैकी ज्यांना मेहेरबानीने टर्म मिळाले टर्म न मिळालेले
ज्यु.बी.ए. ४२६ २०८ २१८(५१%) १९८ २०
ज्यु.एम.ए. ११३ ४६ ६७(५९.५) ३७ ३०
ज्यु.बी.एस्सी ३८७ १५२ २३५(६१%) १७२ ६३
ज्यु.एम.एस्सी १७ १० ७(४१%) -

 एका ज्युनिअर एम.एस्सी. वर्षाखेरीज अटी न पाळणाऱ्यांची संख्या निम्म्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. विद्यार्थ्यांना लेक्चरे ऐकण्यास सोपे जावे म्हणून एम.ए.ची सर्व लेक्चरे सकाळी ठेवली आहेत. एम.ए.ची फी दोन वर्षे मिळून रुपये ४०० व एम.एस्सी.ची रु. ६००. एवढे पैसे भरून युनिव्हर्सिटीच्या सर्वोच्च परीक्षांना बसणाच्या विद्यार्थ्यांची ही अनास्था भयानक नाही का? इतक्या विद्यार्थ्यांना खाली ठेवायचे कसे म्हणून त्यातील ब-याच जणांना टर्म दिली आहे. हेच उनाड विद्यार्थी वर्षाच्या शेवटी रात्रीचे दिवस करून अभ्यास करून परीक्षा देतात व इतके गचाळ पेपर लिहिलेले विद्यार्थी पास कसे करावे हा प्रश्न पडतो. त्याचबरोबर इतक्यांना नापास तरी कसे करायचे हा प्रश्न येतो. मग ते पास होतात व दुर्दैवाने शिक्षक म्हणून शाळा कॉलेजांत शिकवावयास येतात.

 वर्ष फुकट गेल्यावर-
 युनिव्हर्सिटीच्या परीक्षांना बसून नापास झाला म्हणजे विद्यार्थी व पालक ह्यांना काही करता येत नाही. पण पहिल्या वर्षाची परीक्षा म्हणजे घरची. त्यात आधी परीक्षा घेऊ नये व घेतलीच तर नापास करू नये अशी ब-याच जणांची अपेक्षा असते.
 खरोखरच पास होऊ नयेत असे कितीतरी विद्यार्थी पास केले जातात. यंदा एका कॉलेजात पहिल्या वर्षाच्या परीक्षेला बसलेल्या बुडून जातात. माझा मुलगा उनाडला, त्याने अभ्यास केला नाही म्हणून तो नापास झाला, हे सत्य त्यांना कधीही दिसत नाही. मुलगा सर्व परीक्षांत जेमतेम तिस-या वर्गात पास झाला आहे, त्याची बुद्धी बेताचीच आहे, हे त्यांना कधीही उमजत नाही. मुलगा खोटे बोलून फसवीत आहे हे प्रमाणे देऊन सिद्ध केले तरी ते कधीही पटत नाही.

 ‘मुलगा हुशार आहे पण-'
 मुलगा हुशार आहे हे पालुपद काहींचे असते. चारही परीक्षांत मूल नापास आहे असे दाखविले तर म्हणतात, तिमाही-सहामाहीत नसेल अभ्यास केला, पण आता करील व पास होईल. मुलगा प्रॅक्टिकलला आला नाही, तास चुकवतो, असे पत्र घातले तरीही तिकडे लक्ष देत नाहीत. मुलगा नेमाने जात असे; चुकून हजेरीबुकात नाव राहिले असेल असेही एका पित्याने सांगितले! मुलगा वर्गात गैरहजर राहतो असे एका पालकांना कळवले तर त्यांनी मुलाचे नाव त्या कॉलेजातून काढून त्याला दुसरीकडे घातले. मुलगा नापास झाला हे कळल्याबरोबर येऊन प्रिन्सिपॉलना भेटून कच्चा विषय नीट करून घेण्यास काय उपाय योजावे ह्याची चर्चा करून त्याप्रमाणे करणारेही एकदोन लोक भेटले. पण अशी आईबापे अपवादात्मकच. काही मुले परीक्षेच्या रिझल्टचे कार्ड कधी येणार ते हेरून ते आईबापांच्या हातीच न लागू देण्याची चलाखी दाखवतात. सर्वात वाईट वाटते ते हे की, अशा त-हेच्या मुलाखती घेण्यासाठी आईबापांना पुढे करून मुले बहुधा मागेच राहतात.
 काही मुले इतकी आत्मकेंद्रित असतात की, त्याचा सदसदविवेक जागा करणे मोठे कठीण होऊन बसते. एका मुलाने परीक्षेत कॉपी केली होती, म्हणून त्याला एक वर्ष परीक्षेला बसू न देण्याची शिक्षा झाली होती एक दिवस घरी पत्र आले की, "हे पत्र तुम्ही वाचीत असाल त्या वेळी मी मेलेला असेन. झालेल्या प्रकारामुळे मी आत्महत्या करण्याचे योजले आहे." पत्र वाचून हृदयात विलक्षण कालवाकालव झाली. बिचारा आईबापांपासून दूर. काय भलतेच करून बसला, अशी हुरहूर वाटली. पत्रावर सुदैवाने पत्ता होता. त्याचे बि-हाड शोधून काढले. सुदैवाने त्या मुलाने आत्महत्या केली नव्हती. त्याला बोलावून घेतले व झाल्या दुष्ट व अपराधी आहोत असे वाटू लागते. फॉर्म दिलेल्या मुलांत नक्की पास कोण होतील व नक्की नापास कोण होतील त्याचा अंदाज (तिमाही, सहामाही व नऊमाही परीक्षांच्या निकालावरून) बांधून त्याच्या याद्या केल्या व दोन वर्षे हा अंदाज कितपत बरोबर येतो ते पाहिले; तर असे दिसून आले की, जवळजवळ शंभर टक्के अंदाज बरोबर आला. फॉर्म ज्यांना मिळत नाही ती तर सर्वस्वी नालायक असतात. त्यांना फॉर्म न देणे म्हणजे त्यांच्या आईबापांचे परीक्षेच्या फीचे पैसे वाचवणे होते.
 काही मुले वर्षभर किंवा वर्षाचा बराचसा भाग खरोखरच कशा ना कशा तरी आजाराने ग्रासलेली असतात. ती कुठच्याच परीक्षांना सबंध बसलेली नसतात. लेक्चरचे व प्रॅक्टिकलचे त्यांचे बरेचसे तास बुडालेले असतात. त्यांचे व त्यांच्या आईबापांचे म्हणणे असे की, उरलेल्या वेळात ती रात्रीचा दिवस करून अभ्यास करतील व पास होतील. कॉलेजच्या पहिल्या वर्षाच्या परीक्षेत ती नापास झाली तर आजारी म्हणून त्यांना पास करून घ्यावे असा आग्रह होतो. आजारीपण ही काही अंशी आपत्ती असते; त्यामुळे कर्तव्य करता आले नाही तर सहानुभूती वाटेल, पण कर्तव्य पार पाडल्याचे सर्टिफिकेट कसे देता येणार? शिवाय ब-याच वेळा हे आजारीपण हलगर्जीपणामुळे किंवा निव्वळ मानसिक कारणांमुळे येते असा अनुभव ब-याच विद्यार्थ्यांबाबत आलेला आहे. ह्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला नसतो व ते परीक्षेच्या आधी काही दिवस किंवा नेमके त्या दिवशी आजारी पडतात. त्यांना फणफणून ताप येतो. आजार खराखुरा असतो, पण त्याचे कारण मात्र रोगजंतू किंवा डास नसून त्याचे अपराधी मन असते. आपण कर्तव्य केले नाही ह्या अपराधाच्या जाणीवेतून निसटून जाण्यासाठी ते शरीराला रोगी बनवते व शरीराकडे बोट दाखवून म्हणते, ‘काय करावे हो, आयत्या वेळी आजारी पडलो!' (मानसशास्त्रष्ट्या ही उदाहरणे फारच अभ्यासनीय असतात व नीतिशास्त्रष्ट्या अतिशय मननीय असतात.)
 मुले व आईबाप ह्यांचे परस्पर संबंधही त्या प्रकरणाचा गुंता वाढवतात. स्वत:चे पोट मारून, जीवापलीकडे कष्ट करून आईबाप मुलांचे शिक्षण करतात. मुलांबद्दलचे त्यांचे प्रेम त्यांना खरोखर वेडे करून टाकते. तारतम्य, सदसदविवेक, व्यवहार सर्व काही ह्या प्रेमाच्या प्रवाहात प्रकाराची त्याच्याजवळ चर्चा केली. झाली गोष्ट वाईट झाली, आपल्या हातून होऊ नये ते झाले, ह्याची जाणीव त्याला झालेली दिसली नाही. त्याच्या मते त्याचे वर्ष फुकट गेले ते त्याला परत मिळावे. सर्वच विषय अतिशय कच्चे होते तो पास होणे शक्यच नव्हते. तेव्हा पुढे नीट अभ्यास करा- पोटासाठी काही व्यवस्था हवी असल्यास आपण बघू. ज्या आईबापांनी तुम्हांला इतके वाढवले त्यांच्या श्रमांचा मोबदला आत्मघात हाच का? जगात पहिले अपयश आले की अशी कच खाऊन कसे चालेल? आपल्या हातून वाईट वर्तन झाले तर शिक्षा भोगण्याची तयारी नको का? - एक ना दोन परोपरीने किती सांगितले, तरी त्याचे आपले एकच उत्तर-- माझे वर्ष फुकट गेले! अती खोदून विचारले तर काय म्हणे, “बरं सर, झाली चूक तर क्षमा करा व पुढच्या वर्गात घाला." सर म्हणतातच आहेत तर करा चूक कबूल, पाहावे त्याने वळले तर, अशी ही भूमिका होती. त्याच्या वडिलांना सर्व हकीगत कळवून मुलावर नजर ठेवण्यास सांगितले. त्यांचे उत्तरच आलं नाही. मुलगा सहा महिने आत्महत्येची पत्रे लिहीत होता. पुढे काय झाले कोण जाणे!
 आत्महत्येची पत्रे
 आणखी अशीच हकीगत आठवते. हा मुलगा मॅट्रिक परीक्षेपासूनच रागावलेला होता. त्याच्या मताने तो फर्स्ट क्लासात यावयास हवा होता, पण आला सेकंड क्लासात! कॉलेजातील पहिल्या वर्षातही कोणत्याही परीक्षेत सर्व विषयांत पास झालेला नाही. वार्षिकच्या वेळी घरातल्या माणसांना सांगितले, की सर्व पेपर उत्तम गेलेले; फक्त गणिताच्या पेपरचा एक भाग तेवढा वाईट गेलेला. रिझल्ट लागायच्या आधी ह्या मुलान आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. का- तर वडील वृद्धपणी काम करून फीचे पैसे भरतात. आपण तर नापास होणार; त्यापेक्षा वडिलांना भार नका म्हणून मरूनच जावे! बिचारी बहीण आजारी असतानाही धडपडत येऊन माझ्या भावाला पास करा म्हणून याचना करून घाईघाईने गेली. कारण भाऊ जिवाचे काही बरेवाईट करील म्हणून त्याच्यावर पहारा ठेवायला दृवा. मला वाटले की, एखाद्या पेपरचा थोडा भाग कठीण गेला म्हणून घाबरण्याचे कारण नाही. पहिल्या वर्षाचे रिझल्ट बरेच सौम्य लागतात; मुलगा पास होऊन जाईल. तरी जीव सुचित नव्हताच. संध्याकाळी रिझल्ट कळला, त्यात समजले की मुलगा तीन प्रमुख विषयांत अगदी वाईट मार्क मिळून नापास झाला आहे. जरी वाईट वाटले तरी मनात असे आले की, सर्व विषयांत उत्तम पास होणार वगैरे सर्व फसवणूक होती, हे बहिणीच्या ध्यानात येईल व ती भावाची कानउघाडणी करील, अनुभव मात्र अगदी वेगळाच आला. बहिणीला रिझल्ट कळवला तर ती म्हणे की, तुमच्या परीक्षकांनी पेपर नीट तपासले नाहीत. माझा भाऊ एका विषयांखेरीज सर्वात पास- म्हणजे उत्तम पास झाला असला पाहिजे अशी त्याची खात्री आहे! तिला त्या मुलाच्या वर्षांतील परीक्षांचे रिझल्ट काढून दाखवले तरी तिचे म्हणणे कायमच! भाऊ उनाडला किंवा त्याला विषय कळलेच नाहीत; आपल्याला प्रश्न नीट सोडवता आले नाहीत हे त्याला कळले तरी नाही किंवा कळूनही त्याने सर्व कुटुंबांची वंचना केली- ह्यांपैकी कोठल्याच निष्कर्षापर्यंत पोचायला तिचे मन तयार नव्हते. मुलाचे पेपर घरी आणून ते तपासूनही पाहिले- अर्थात तिला न कळवता. त्यांत परीक्षकांचे मार्क देणे योग्यच दिसले. कारण, नापास झालेल्या विषयांचे मुलाला काहीच ज्ञान नाही असे दिसून आले, असल्या प्रकरणांतून मनस्ताप होतो तो नुसत्या कटकटीमुळे नाही. अशा घटनांमुळे कर्तव्यशून्यता, आत्मवंचना, सदसदविवेकबुद्धीचा संपूर्ण अभाव इत्यादींचा जो आविष्कार होते त्यामुळे.

 विसंगत महत्त्वाकांक्षा
 मुलाच्या बुद्धीचे अचून निदान करणारे आईबाप अपवाद म्हणूनसुद्धा आढळणे कठीण. अशा बिचा-यांची महत्त्वाकांक्षा पाहून जीव दडपतो. मॅट्रिकमध्ये जेमतेम ४० टक्के मार्क मिळालेला प्रत्येक मुलगा नुसते कॉलेजात जायची इच्छा धरतो असे नाही, तर इंजिनियर व डॉक्टर होण्याची त्याची महत्त्वाकांक्षा असते. ह्या दोन्ही विषयांच्या कॉलेजांतर पहिल्या वर्गात आलेली किंवा खूप वर दुस-या वर्गात आलेली मुले आहेत, त्यांचे मॅट्रिकचे व पहिल्या वर्षांचे मार्कही उत्तमच असतात. पण मुलाची बुद्धी मापायचे हे ठोकळ प्रमाण आईबापांना मुळीच पटत नाही. त्यांच्या अंत:करणप्रवृत्ती त्यांना सांगतात की, 'मुलगा बुद्धिवान आहे. कमी मार्क मिळाले ह्याला कारणे आजार, परीक्षकांची चूक, आयत्या वेळी घाबरणे अशी कितीतरी आहेत. काही गरीब आईबाप आपले खेड्यांतील बिऱ्हाड मोडून, शेती सोडून, मुलाला पुढे इंजिनियर किंवा डॉक्टर करायचे म्हणून पुण्यात येऊन बसतात. ही माणसे मुलगा पहिल्या वर्षात नापास झाला किंवा इंटर सायन्समध्ये त्याला फॉर्म मिळाला नाही की धाय मोकलून रडतात- मुलाच्या वतीने रदबदली करतात. ते ऐकून व दरवर्षी परत परत पाहूनही मनाला भयंकर वदना होतात.
 एक म्हातारे गृहस्थ मुलाला सायन्सला घ्या म्हणून सांगायला आले होते. हे स्वत: एका हायस्कुलात मास्तर होते. मुलाचे वय १९ की २०. जेमतेम शेकडा ३४/३५ टक्के मार्क मिळवलेले. मुलगा एवढ्या मोठेपणी कसा मॅट्रिक झाला म्हणून विचारले, तर गृहस्थांनी सांगितले, ‘की नववी दहावी व अकरावी ह्या तिन्ही वर्षात मुलगा एकएकदा नापास झाला. आता मॅट्रिक झाला आहे. इंटर सायन्स होऊन इंजिनिअरींगच्या परीक्षेकडे पाठवणार आहे.’ बिचारा मुलगा स्तब्ध उभा होता. बापाच्या महत्त्वाकांक्षेचा की वेड्या प्रेमाचा तो बळी! त्याची किंवा त्याच्या बापाची आम्हांला समजूत घालता आली नाही. म्हाताऱ्याचे पाण्याने डबडबलेले डोळे आठवले की कीव येते, पण त्याहीपेक्षा राग येतो. मुलाच्या नावापुढे पदवीची अक्षरे लागावीत म्हणून दुसऱ्या एकाने जिवाचे रान केले व मुलाच्या जन्माचे वाटोळे केले. बाप मेला. पण मुलगा जिवंतपणी रोज मरत आहे; ‘आकांक्षापुढति जिथे गगन ठेंगणे!' पण आकांक्षा म्हणजे काही जेट विमाने नव्हेत, की मनात आले म्हणजे क्षणात पृथ्वीच्या कक्षेपलीकडे उडता येईल, गगनाला हात पोचवायचे तर प्रयत्नांचे पहाड रचावयास नकोत का? काही ध्येय डोळ्यांपुढे ठेवून सतत निरलस उद्योग करणे, आत्मपरीक्षण प्रांजलपणे करणे, ह्याऐवजी स्वप्नरंजन , आत्मवंचना व सतत स्वत:ची कीव करीत बसणे एवढे दिसते. मुलांच्या लिखाणातून काही काही वेळा हे स्वप्नरंजन फारच उत्तम तऱ्हेने प्रत्ययास येते. फर्ग्युसन कॉलेजच्या नियतकालिकाच्या मार्च १९५५ च्या अंकात ‘स्कॉलर' म्हणून एक गोष्ट कोणी विद्यार्थ्याने लिहिली आहे. त्यांतला नायक सर्व विषयात शंभर मार्क मिळवी. 'विजेच्या दिव्याचे बटन दाबल्यावर दिवा लागेल एवढ्या वेळात तो इलेक्ट्रिसिटीवरील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देई.'

केमिस्ट्रीत त्याला शंभर मार्क मिळावयाचे. पण एवढे मार्क्स देणे म्हणजे स्वत:चा अपमान स्वत:च्या हाताने करून घेणे होय, ह्या कल्पनेने प्रोफेसरमहाशय त्याला ४-५ मार्क कमीच देत!' मेकॅनिक्सच्या पीरियडला केवळ सरांची गंमत करण्यासाठीच तो वर्गात असे, इतकेच!’ त्याला लॅंग्वेजेस इतक्या सुंदर येत की, तो आर्टसचा विद्यार्थी आहे असे वाटावे’ सर्व लेख अचाट आहे, पण सर्वांवर कळस पुढील वाक्यांत आहे. प्रॅक्टिकल्स सोडून त्याला कॉलेजात येण्याची फारशी जरुरी पडत नसे. मागच्या वर्षभर त्याचा रोलकॉल त्याचा पार्टनर देत होता व ह्या वर्षीही तेच चालू होते. त्याला खेळताही उत्तम येत होते. कॉलेज अगदी हरण्याच्या बेतात असताना त्याने कसलीही पर्वा न करता भराभर चार-सहाचे टोले मारून कॉलेजला विजयश्री मिळवून दिली!'

 ज्ञानयोग की जादू-जुगार योग?
 जगात कोणत्याही गोष्टीत काही कार्यकारणसंबंध आहे हे ह्या लेखक-विद्यार्थ्यांच्या गावीही नाही. विद्यार्थी म्हणून काही कर्तव्ये आहेत ह्याचा विचारसुद्धा मनात येत नाही. कसलीही पर्वा न करता हाताचे पट्टे फिरवून धावा काढता येतात ही त्यांची कल्पना. कोठचीही सिद्धी प्राप्त करून घेण्यासाठी ध्यान, मनन, सतत प्रयत्न व अभ्यास पाहिजे म्हणून पिढ्यान पिढ्यांच्या गुरुजनांनी सांगितलेले ह्यांच्या कानांवरून गेलेलेच नाही. ह्यांना ज्ञानयोग माहीत नाही, कर्मयोग माहीत नाही. जादू व जुगार योग तेवढे माहीत असावेत असे वाटते. अभ्यास न करता पास व्हावे, नापास झाले तरी दया व्हावी, कॉपी केली तरी शिक्षा होऊ नये, पेपर कठीण येता कामा नये, नेहमीपेक्षा त्याचे वळण निराळे असता कामा नये, अशा ह्यांच्या आकांक्षा! गोष्टींतून, लेखांतून व पत्रांतून गुरुजनांबद्दल काढलेले उदगार इतके हीन व असंस्कृत असतात की वाचताना उद्वेग येतो. नुकतेच एक निनावी पत्र पाहिले, त्यात वसतिगृहातील गैरव्यवस्थेबद्दल तक्रार होती. तक्रार रास्त होती की नाही हा प्रश्न निराळा, पण ती मांडण्याची पद्धत विशेषच उद्दाम व चारित्र्यहीन वाटली. रेक्टरांबद्दल (हे सर्व कॉलेजात शिक्षक असतात) 'निर्लज्ज, बेजाबदार' वगैरे विशेषणे ओळीओळीगणिक विखुरलेली. गड्याला किंवा कारखान्यातील मजुराला उद्देशून अशा त-हेने बोलण्याची कोणा मालकाची छाती नाही. शिक्षकाबद्दल मात्र कोणीही काहीही बोलले तरी चालते. पालकांपैकी कोणी गरीब म्हणून, कोणी पैसेवाले म्हणून, कोणी अधिकारी म्हणून, कोणी विधानसभेचे मेंबर म्हणून सारखे दडपण येते. पुरेसे मार्क मिळाले नाहीत तरी पास करा, टर्म भरली नाही तरी भरल्याचे सर्टिफिकेट द्या, पुरेसे मार्क नाहीत तरी सायन्सकडे घ्या, रेसिडेन्सीत जागा द्या, एक ना दोन- ह्या धमकीवजा प्रार्थना ऐकून ऐकून शेवटी असेच वाटते की, आयुष्यभर विद्यार्थिजीवन व कॉलेजजीवन ह्यांत अभ्यासाची, सदाचरणाची व विवेकाची एक विशिष्ट मर्यादा राखण्यासाठी केलेली खटपट व्यर्थ आहे. काहीकाही विद्यार्थी व आईबाप ह्यांच्या अमर्याद आकांक्षा व त्याचबरोबर नैतिक मूल्यांचा संपूर्ण अभाव ह्यांच्यातून वाट काढायची कशी?

- १९५७


 संस्कृतीमधील वाईट गोष्टींचे उच्चाटन करण्याचा
 प्रयत्न करीत असताना व्यक्ती किंवा वर्ग
 ह्याबद्दल द्वेष किंवा सूडभावना ठेवता कामा नये.
 वाईट समूळ नाश करावे, वाइटाचे पोषण
 करणाच्या वर्गाची तसे करण्याची शक्ती
 नाहीशी करावी; पण लक्षात ठेवावे की, सर्वच
 एका संस्कृतीचे बळी आहेत. समाजसुधारकाची
 वृत्ति न्यायनिष्ठुर पण निर्वेर पाहिजे; नाहीतर
 सुधारणा न होता नवी वैरे, नवी शल्ये व नवे
 रोग मात्र निर्माण होतील! ज्ञानदेवांच्या
 अमृतवाणीने सांगायचे तर
  अज्ञान प्रमादादिक। कां प्राक्तनीही सदोखी
  निंद्यत्वाच्या सर्वविखी। खिळिले जे॥
  तया आंगीक आपुले। देउनिया भले।
  विसरविजती सकें। सलती तियें।
 अशी समाजसुधारकाची व समाजसेवकाची वृत्ति पाहिजे.


देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा. लि.