आमची संस्कृती/ डॉ. केतकर यांचे समाजशास्त्रविषयक लेखन

विकिस्रोत कडून


आमची संस्कृती / ७७







 ७. डॉ. केतकर यांचे समाजशास्त्रविषयक लेखन



 डॉ. केतकरांचे समाजशास्त्रविषयक लेखन त्यांच्या सर्वच ग्रंथांतून पाहावयास सापडते. किंबहुना त्यांनी पीएच.डी.साठी लिहिलेल्या निबंधापासून तो अगदी शेवटी 'स्त्री' मासिकात लिहिलेल्या 'विचक्षणा कादंबरीपर्यंतचे त्यांचे सर्व लेखन प्राय: समाजशास्त्रावरच आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.
 'गांवसासू' ब्राह्मणकन्या' व 'विचक्षणा' ह्या कादंबच्या त्यांच्या कादंबरी लेखनकालातील प्रारंभ, मध्य व अंत दाखवितात; आणि या तिहींतही मध्य स्थितीतील हिंदू समाजाची तीन चित्रे आपल्याला पाहावयास सापडतात. त्यांच्या कादंबच्या म्हणजे समाजशास्त्रावरील सोदाहरण निरुपणेच होत. त्यांतील व्यक्तींवर आलेले प्रसंग त्या व्यक्तींपुरतेच मर्यादित नसतात, तर त्या सर्वांत गर्भित अर्थान्तरन्यास असतो. एका विशिष्ट सामाजिक परिस्थितीच्या कोंदणात असलेल्या व्यक्तीच्या हालचाली व मनोव्यापार ह्या दृष्टीने त्या व्यक्तींचे आयुष्य चितारलेले असते; आणि त्या विशिष्ट चित्रांत व्यक्ती व समाज ह्यांच्या अन्योन्य संबंधांचे सामान्य नियम सूचित केलेले असतात.
 हल्लीच्या कादंब-यांतून विशिष्ट व्यक्तींचे परस्पर संबंध व सूक्ष्म मनोविश्लेषण पाहावयास मिळते. त्या व्यक्तींवर आलेले प्रसंग दुस-या ७८/ आमची संस्कृती

कोणत्याही समाजातील व्यक्तींवर येऊ शकतील, तसेच त्यांचे मनोव्यापार दुसऱ्या कोणत्याही व्यक्तींवर लादता येतील असे असतात. पण केतकरांच्या कादंबर्यांतील स्त्री-पुरुषांना असे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व नाही. त्या सर्व एका विशिष्ट कालातील व्यक्ती असतातकेतकर केवळ स्त्री-पुरुषांचे परस्पर संबंध दर्शवून थांबत नाहीत तर व्यक्ती व सभाज हे द्वंद्व ते अतिशय मार्मिकतेने रंगवितात. व्यक्तीला आपल्या आकांक्षा पुरविण्याला समाजाची गरज लागते, पण समाजाने व्यक्तिस्वातंत्र्याला घातलेले बंधन नको असते. व्यक्ती व समाज ह्यांचे संबंध वयात येणारी मुले व आईबाप ह्यांच्या संबंधांसारखे काहीसे असूया, ईर्षा व प्रेम ह्या परस्परविरोधी भावनांनी बनलेले असतात; आणि प्रायः व्यक्तीला समाजाच्या बंधनांना झिडकारून टाकून आपल्या आकांक्षा पूर्ण करता येत नाहीत, असेच केतकरांच्या एकंदर कादंबर्यांतून दर्शविलेले आहे. त्यांच्या कादंबन्या म्हणजे समाजवर्णनाचे मूल्यवान नमुनेच आहेत. गांवसासू' कांदबरी हे हिंदुस्थानात नोकन्या मिळविणाच्या हिंदू नोकरशाहीच्या विलायतेत बनलेल्या समाजाचे अत्यंत मार्मिक चित्र आहे आय.सी.एस. व इतर परीक्षांसाठी हिंदुस्थानातून जाणारे विद्यार्थी, त्यांना जाळ्यांत अडकविण्याचा प्रयत्न करणाच्या सेवानिवृत्त आय.सी.एस. लोकांच्या मुलींच्या माता, वरिष्ठ व बड्या पगाराच्या नोकन्या करणारी हिंदुस्थानभर परसलेल्या हिंदू नोकरशाहीची एक नवीन बनू पाहणारी जात इत्यादी गोष्टी ह्या कादंबरीत चित्रित केल्या आहेत. पुढील कादंबन्यांत दिसून येणारी समाजशास्त्रविषयक चिकित्सा ह्या कादंबरीत प्रामुख्याने दिसून येत नाही; पण हीतही समाजशास्त्रज्ञाची त्यांची भूमिका त्यांनी रंगविलेल्या विनोदगर्भ व्यंगचित्रात स्पष्ट होतेह्या दृष्टीने ‘ब्राम्हणकन्या' ही त्यांची सर्वोत्कृष्ट कादंबरी आहे. मध्यम स्थितीतील शिकलेला ब्राह्मणवर्ग, त्यांतूनही

समाजसुधारणा म्हणून त्यांपैकी काहींनी स्वीकारलेला मार्ग व पुढील त्याच्या पिढीपुढे आलेला प्रश्न, हे ह्या कादंबरीतील मध्यवर्ती कथानक आहे. सुधारक आईबापांच्या संततीला समाजात स्थान कोणते आणि आईबापांनी ज्या समाजाला झिडकारले त्या समाजात मानाची जागा मिळविण्याची त्यांनी आकांक्षा धरणे म्हणजे निराशा पदरी बांधून घेणे होय हे दाखवून, अशा संततीने कोणता मार्ग चोखाळला असता तिला तो कल्याणप्रद होईल याचा चर्चा केतकरांनी केलेली आहे. ह्या कादंबरीत डॉ. केतकर यांनी ब्राह्मण

आमची संस्कृती / ७९

मध्यम वर्गावरून आपली दृष्टी यशस्वी रीतीने ब्राह्मणेतर मध्यम वर्गाकडे वळवली आहे; व एकाच गावामधील ह्या दोन समाजातील व्यक्तींचा त्या त्या समाजाच्या सीमारेषेवर कसा संबंध येतो ते दाखविले आहे.समाजशात्रदृष्ट्या ह्या कादंबरीत त्यांनी रंगविलेले मध्यम स्थितीतील ब्राह्मणवर्गाचे चित्र अमोल आहे‘विचक्षणा' कादंबरीत विवाहसंस्था वेश्यांचे सामाजिक स्थान ह्या विषयांचा विचार केला आहे. आतापर्यंतच्या सर्व मराठी कादंबच्यांतून व गोष्टीतून वेश्येचा उपयोग कथानक हृदयस्पर्श करण्याकडे केलेला दिसतो. काहींनी गृहस्थी कुटुंबाची वेश्याव्यवसायामुळे होणारी धूळधाण वर्णिली आहे, तर काहींनी वेश्या व त्यांची संतती ह्यांना आपला व्यवसाय सोडून गृहस्थाश्रमी बनण्यास कोणत्या सामाजिक अडचणी उत्पन्न होतात व त्यामुळे सदगुणी वेश्यापत्यांची कशी कुचंबणा होते हे दाखविले आहे. हा दुसरा प्रकार दर्शविण्याची टूम विशेषत:श्री. पु. य. देशपांडे ह्यांच्या बंधनाच्या पलीकडे’ ह्या कादंबरीपासून तरुण लेखकांनी उचलली आहे; व मागील पिढीत विधवांना वाङ्मयात जे स्थान होते ते आता वेश्यांना मिळू लागले आहेकेतकरांनी हा सोपा राजमार्ग टाकून आपली तीक्ष्ण शोधक बुद्धी ह्या प्रश्नाचे समाजशास्त्रदृष्ट्या विवेचनकरण्याकडे खर्चिली आहे. लोकानुरंजनजीबी कलावंतवर्गाला पिढीजाद कलोपासना न सोडता आपली कशी उन्नती करता येईल, व एकेका व्यक्तीला नव्हे तर सबंध वर्गालाच आपले सामाजिक स्थान बदलण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील ह्याबद्दल सांगोपांग चर्चा ह्या कादंबरीत केली आहे. तिच्या अनुषंगाने विवाहबाह्य स्त्री-पुरुष संबंधांना समाजात काय स्थान असावे ह्याचाही विचार केतकरांनी केला आहेआपल्या कादंबच्यांतून त्यांनी जे सिद्धांत प्रतिपादिले आहेत ते लोकांना पटोत वा न पटोत, पण हिंदू समाजाचे सध्याचे स्वरूप व हिंदूचे सामाजिक प्रश्न ह्यांवर केतकरांची कादंबरी विचार करावयास लावते व प्रत्येक प्रश्नावर विधायक स्वरूपाच्या सूचनाही करते.
 केवळ कादंबर्यांतून नव्हे, तर आपल्या निरनिराळ्या आत्मकथमपर लेखनातूनही डॉ. केतकर यांनी आपली दृष्टी व्यापक व समाजशास्त्रज्ञास साजेशीच ठेवली आहे. आपल्या आयुष्यातील एखादा प्रसंग जेव्हा ते वर्णितात, तेव्हा आपण त्या प्रसंगी अनुभविलेल्या सुख-दु:खाचे हुबेहूब वर्णन करून वाचकांच्या मनात सहसंवेदना उत्पन्न करण्याचा त्यांचा हेतू नसतो, तर ८० / आमची संस्कृती

केवळ आपल्या अनुभवजन्य ज्ञानाचा लाभ दुसच्या लोकांना देण्याची त्यांची इच्छा असते. अशा लिखाणात ममत्वाचा ओलावा व अंत:करणाला चटका लावणारे वर्णन, ही आढळत नाहीत; पण त्याच्या उलट, केतकर ही व्यक्ती, तिने केलेले सामाजिक प्रयोग, त्यांतील यशापयश व त्याची कारणमीमांसा ह्यांचे शास्त्रीय विवेचन आढळते. म्हणजे त्यांच्या आयुष्यातील एक एक प्रसंग हा एक सोदाहरण सोडविलेला सामाजिक प्रयोग बनतो. १९२० मध्ये श्री.शीलवतीबाई केतकर यांनी ब्राह्मण व इतर मध्यम वर्गातील विधवा स्त्रियांना काही उद्योग काढून द्यावा ह्या हेतूने ‘स्त्रीकर्मसदन’ नावाची एक संस्था काढली व सुमारे सहा महिने काम चालून ती संस्था १२०० रुपयाच नुकसान होऊन बंद पडली. केतकरांनी ह्या घटनेबद्दल पुढीलप्रमाणे लिहिलेले आहे- ‘१२०० रुपये गेले याबद्दल मला आज मुळीच दुःख होत नाही. त्या कामामुळे जो अनुभब मिळाला त्यामुळे.. गेलेले रुपये वसूल होतील, असा मला विश्वास वाटत आहेजरी १२०० रुपये नुकसान आले तरी स्त्री कामकज्यांच्या वाट्यास रुपये देखील आले नाहीत माल तीनचार ६०० आले हजारांचा झाला; पण भाडेकापड व जाहिरात यांनीच बरीचशी रक्कम खाल्ली. या कामात एक गोष्ट कळली ती ही की, एखाद्या विशिष्ट वर्गाला काम देण्यासाठी कारखाना काढावयाचा असेल तर जे काम काढायचे त्यात मालाची किंमत ज्यांत फार कमी आहे व मजुरीची किंमत ज्यात जास्त आह अशा तर्हेचा तो उद्योग असावा. या दृष्टीने छापखान्याचे काम श्रेष्ठ ठरते."
 कुटुंबसौख्याविषयी केतकरांनी प्रकट केलेले विचार त्यांच्या आयुष्यातील अनुभवजन्य ज्ञानाचेच आहेत. ते म्हणतात- ‘कुटुंबसौख्या विषयी विचार करताना मला असे वाटू लागले आहे की, ज्याच्या योगानं घरातील सर्व व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कामात गुंतल्या असतील, किंवा वैयक्तिक कष्टसाध्य महत्त्वाकांक्षेच्या मागे लागल्या असतील त्या कुटुंबात सौख्य साधारणपणे अधिक असते.
 तसेच मिस कोहन यांचे पाणिग्रहण करताना डॉ. केतकर यांनी त्यांना हिंदू धर्माची दीक्षा हिंदू मिशनरी संस्थेकडून न देववितां व्रात्यस्तोमविधीने देवविली आणि हिंदू समाजशास्त्राच्या आपल्या पुस्तकी ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष व्यवहारात करून दाखविला, ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. असो.
११

‘ज्ञानकोशमंडळाचा इतिहास', पृष्ठ ८८

आमची संस्कृती / ८१

 समाजशास्त्र हे मानवसमाजाइतके प्राचीन असले, तरी स्वतंत्र एक शास्त्र ह्या दृष्टीने त्याचा पद्धतशीर अभ्यास गेल्या शतकातच प्रथम सुरू झाला. ह्या शास्त्राच्या मर्यादा स्पष्टपणे आखताच येत नाहीत:कारण, मानवसमाजाच्या प्रारंभापासून आतापर्यंत मनुष्याच्या सर्वच व्यापारांचे ह्यांत परीक्षण करावयाचे असते.पूर्वी होऊन गेलेल्या मनुष्यसमाजांचा इतिहास, हल्ली जगात आढळणाऱ्या सुसंस्कृत व असंस्कृत समाजांचे निरीक्षण, आणि भविष्यकाळी मनुष्यसमाजाचे स्वरूप असेल व असावे ह्याविषयी चर्चा इत्यादी गोष्टीचा ह्या एका शास्त्रात समावेश होतो.
 केतकरांनी आपल्या ग्रंथांतन प्राचीन सुसंस्कृत समाजाचा इतिहास लिहिलेला आहे आणि विशेषकरून प्राचीन भारतीयांची वैदिक संस्कृती अभ्यासताना तिच्यापूर्वी मिसर व असीरिया देशांतील संस्कृचा विचार केला आहे. त्यांनी सध्याच्या हिंदू समाजाचे मार्मिक परीक्षण ‘हिंदुस्थान आणि जग’ ह्या ज्ञानकोशाच्या प्रस्तावनाखंडात केले असून हिंदू समाजाची पुनर्घटना कोणत्या स्वरूपाची असावी ह्यासंबंधीचा उहापोह 'Hindustan : its Formation and Future' व 'भारतीय समाजशास्त्र ह्या पुस्तकांतून केला आहे.
 अशा तहेच्या विस्तीर्ण विषयाचा अभ्यास करणार्यास दृष्टी एकमागी ठेवून चालत नाही. केतकर हे एक जातिवंत समाजशास्त्रज्ञ होते. त्यांची दृष्टी विशाल-एकाच वेळी विविध समाजांचे आकलन करण्यास योग्य अश तर होतीच, पण लहानसहान सामाजिक गोष्टींपर्यंत पोचण्याइतकी ती तीक्ष्ण व शोधकही होती. त्यांची पुस्तके वाचीत असता त्यांच्या तळटीपांतून व पुस्तकाला जोडलेल्या परिशिष्टांतून ही बुद्धीची तीव्रता व एका विषयावरून सुचलेले विचार दुसर्या विषयाला लावण्याची हातोटी दिसून येते. ‘History of Castes in India,'Vol.1 ह्या पुस्तकात (पृष्ठ ४८) त्यांनी मनूच्या तीन टीकाकारांची तुलना केली आहे व कोणाची टीका अधिक ग्राह्य आहे ते ठरविले आहे.

 निन्द्यास्वष्टासु चान्यासु स्त्रियो रात्रिषु वर्जयन।
 ब्रह्मचर्येय भवतेि यत्रतत्राश्रमे वसन।। मनु अ.३/५० ८२ / आमची संस्कृती

 हा मनूचा श्लोक मेधातिथि व कुल्लुक यांनी फक्त गृहस्थाश्रमी लोकांसाठीच आहे असे धरले आहे, आणि केतकरांच्या मते गोविंदराज ह्या महाराष्ट्रीय असलेल्या टीकाकाराने मात्र, संन्याशानेही संततिप्राप्तीसाठी काही ठराविक दिवशी गृहस्थधर्म आचरिला तरी त्यास पाप लागत नाही, असे प्रतिपादन ह्या श्लोकाच्या जोरावर केले आहे. ज्ञानेश्वरादि भावंडे ही संन्याशाची संतती म्हणून त्यांच्यावर जो एक आक्षेप होता तो दूर करून, महाराष्ट्रातील संतशिरोमणीच्या जन्मावर जी पातकाची छाया पडली होती ती नाहीशी करावी असा बहुतेक गोविंदराजाचा हेतु असावा, असे आपले मत केतकरांनी तळटीपेत प्रदर्शित करून गोविंदराजाचे इतर टीकाकारांपेक्षा भिन्न मत का असावे, ह्याची छाननी केली आहे (पृष्ठ ५०). त्याच पुस्तकातील दुस-या एक तळटीपेत, वर्णव्यवस्था मानववंशाच्या भिन्नतेवर उभारली आहे ह्या पाश्चात्य पंडितांच्या कल्पनेने हल्ली हिंदुस्थानातील अर्धशिक्षितांत काय गोंधळ माजला आहे ह्याचे त्यांनी वर्णन केले आहे (पृष्ठ ७८). जर्मनीत हिटलरशाहीच्या स्थापनेनंतर वंशभिन्नतेवरून वर्णव्यवस्था करण्यात आल्यामुळे वंशसंकर न करू देणार आपण हिंदू कसे श्रेष्ठ आहोत ह्यावर पुण्यात भाष्य करणाच्या कानडेशास्त्र्यांचे व्याख्यान ज्यांनी ऐकिले असेल, त्यांना वरील तळटीपच महत्त्व ताबडतोब कळेल.

 प्रस्तुत 'History of Castes in India,' ह्या पुस्तकाला मानववंश-शास्त्रावर केतकरांनी एक लहानसे परिशिष्ट जोडिले आहे. त्यात मानववंशशास्त्राचे स्वरूप कसे मर्यादित आहे व समाजशास्त्रात त्याचा उपयोग करताना कशी दक्षता बाळगली पाहिजे ह्यासंबंधी अतिशय मननीय विचार व्यक्त केले आहेत. निरनिराळ्या मानववंशाना व त्यांच्या शाखांना जी नावे योजावयाची ती संस्कृतिनिदर्शक नसावीत तर प्रदेशनिदर्शक असावीत, अशी सूचना त्यांनी केली आहे. आय, सेमिटिक, द्रविड ही सर्व नावे विशिष्ट संस्कृती धारण करणाच्या लोकसमूहांची आहेत व त्या लोकसमूहांत नाना नावांच्या मानववंशाच्या शाखा असतील म्हणून तेच शब्द मानववंशाबद्दल लावू नयेत, तर शक्य तेथे भौगोलिक- उदाहरणार्थ ‘उत्तरेकडील मानववंश' (Nordic), ‘भूमध्य-समुद्राजवळील मानववंश, (Mediterranean) अशा-सारख्या 

आमची संस्कृती / ८३

संज्ञा योजाव्यात म्हणजे घोटाळा होणार नाही, ही त्यांची सूचना प्रत्येक मानवशास्त्र व समाजशास्त्र अभ्यासणाच्याने मूलतत्त्व म्हणून ग्रहण करण्यासारखी आहे. धर्म किंवा संस्कृती ही प्रथम ज्या लोकांत उगम पावते तेथेच न राहता हळूहळू इतर भूप्रदेशांवर व लोकसमूहांत परसते, आणि म्हणून धर्मसंप्रदायनिदर्शक किंवा संस्कृतिनिदर्शक नावे, जेव्हा वंशाबद्दल किंवा रक्ताबद्दल बोलावयाचे असेल तेव्हा योजू नयेत, हे तत्त्व आता मानवशास्त्रांत सर्वमान्य झाले आहे. हे तत्त्व न कळल्यामुळे प्रथम पाश्चात्य पंडितांनी जेव्हा संस्कृत वाङमयाचा अभ्यास करून संस्कृत भाषा इतर काही युरोपीय भाषांसारखी आहे हे पाहिले तेव्हा लगेच हिंदूंचा व युरोपियांचा रक्तसंबंधही जोडून टाकिला. ब्राह्मण हा शब्द वर्गनिदर्शक व कर्मनिदर्शक आहे, तो काही रक्तशुद्धीचा पुरावा नव्हे, ही गोष्ट आपल्या इकडे पुष्कळांना कळलेली नाही. केतकरांची सावधगिरी न बाळगल्यामुळे मॅक्समुल्लरसाहेबांनी योजलेल्या 'आर्य' शब्दाने जो धुमाकूळ मांडला आहे तो तर आज जगाला उघड दिसतच आहे. यावरून डॉ. केतकर यांची सूक्ष्म व शोधक दृष्टी दिसून येते.
 'Hindustan : its Formation and Future' ह्या निबंधात केतकरांनी असेच एक परिशिष्ट धर्म ह्या संस्थेचे शास्त्रीयष्ट्या कसे परीक्षण करावे ह्याविषयी लिहिले आहे. यांत निरनिराळ्या देशांतील संप्रदायांचे परीक्षण पृथक पृथक करणे कसे आवश्यक आहे आणि धर्म कशाला म्हणावे व कशाला म्हणू नये ह्यासंबंधी विवेचन केले असून, ख्रिस्ती धर्म व हिंदू धर्म ह्या दोन्ही शब्दांत 'धर्म' शब्दाचा अर्थ निरनिराळा असल्यामुळे प्रत्येक समाजात धर्माचे स्वरूप काय हे निश्चित करण्याची आवश्यकता कशी उत्पन्न होते, हे दाखवून दिले आहे. एखाद्या क्षुल्लक गोष्टीचा विचार करताना झटकन मोठ्या तत्त्वावर येणे अथवा उलटपक्षी, मोठ्या तत्त्वाचा ऊहापोह चालला असता एखादी लहानशी गोष्ट लक्षात घेणे, म्हणजे विचार सरळ एक दिशेने न जाता त्यांचे इतस्तत: परिभ्रमण होणे, ही क्रिया दुस-या एखाद्या शास्त्राला बाधक झाली असती; परंतु समाजशास्त्राला ती फारच उपयुक्त अशी झाली आहे. ह्या क्रियेमुळे केतकरांचे विचार विस्कळीत, अफाट व क्वचित हास्यास्पदही वाटतात; परंतु त्यांच्या लेखनात कंटाळवाणेपणा कधीच वाटत नाही. त्यांचे लेखन नेहमी सूचनागर्भ असते, ८४ / आमची संस्कृती

ते नवी दृष्टी देते व जुन्या विषयाच्या विचाराला नवी दिशा दाखविते. जो जो लहानमोठा प्रश्न हाती घेतला त्यावर काही तरी नवे व विचारप्रवर्तक भाष्य करणारी त्यांची बुद्धी ‘संचारिणी दीपशिखेव रात्रौ' अशी वाटते.
 डॉ. केतकर यांचे समाजशास्त्रविषयक लेखन त्यांच्या प्रौढ विद्यार्थिदशेपासून तो प्राय: त्यांच्या मृत्यूपर्यंत अव्याहत चाललेले होते. ह्या काळात त्यांनी कादंबच्या व किरकोळ लेख सोडून खालील समाजशास्त्रविषयक ग्रंथ लिहिले :
 History of Castes in India' १९०९
 'Hindustan: its Formation and Future', १९११
 'Hindu Law,' १९१४
 ‘ज्ञानकोशाचे प्रस्तावना खंड,' १९२०-२३
 ‘भारतीय समाजशास्त्र, १९३६

 ह्या ग्रंथांचा विस्तार आणि त्यांनी सूचित केलेले विविध विषयांवरील सूक्ष्म वाचन केतकरांचे पांडित्य व व्यासंग ह्यांविषयी आपली खात्रा पटवितात. त्यांच्या पहिल्या दोन ग्रंथांतून जातिसंस्था, चातुर्वर्ण्य, हिंदू धर्माचे सामान्य स्वरूप व त्याचे इतर धर्माशी विसशत्व, हिंदू समाजाचा विशिष्ट रचना व त्यातील गुणदोष इत्यादी विषयांवर चर्चा केलेली आहे.पाश्चात्य पंडितांनी हिंदू समाजाचे जे निरीक्षण केले ते एकांगी व पूर्वग्रहदूषित होते. त्यामुळे भारतीय समाजाचा अभ्यास करू इच्छिणा-याला त्याचा फारसा उपयोग होण्यासारखा नाही. पण केतकरांचे ह्या विषयावर संशोधन असामान्य व मूलग्राही असे आहे. त्यांनी पाश्चात्त्य देशात अ करून पाश्चात्त्यांची संशोधनपद्धती आत्मसात केली व ते स्वतः असल्यामुळे त्यांना हिंदूंच्या समाजसंस्थेचे स्वरूप यथार्थपणे आकळता आले, आणि म्हणूनच त्यांचे लेखन मार्गदर्शक झाले आहे. वरील ३५ ग्रंथांतील विचार अधिक विस्ताराने व आग्रहाने ‘हिंदस्थान आणि जग, या विभागात मांडले आहेत. मूळ इंग्रजी ग्रंथांतच त्यांची विचाराचा " ठरून गेलेली आहे- विशेषत: ‘हिंदुस्थान आणि जग' ह्या विभागात हि धर्मावर व चातुर्वण्र्यावर त्यांनी प्रकट केलेले विचार काही ठिकाणी 'Hindustan : its Formation and Future' निबंधावरूनच शब्दश: मराठीत उतरविलेले आहेत. ह्या पुस्तकातच पुढे 

आमची संस्कृती / ८५

विस्ताराने केलेले ' Religion' ह्या इंग्रजी शब्दावरील मार्मिक भाष्य येऊन गेले आहे. ' Religion' ह्या शब्दाचा अर्थ मराठीत सर्वत्र 'धर्म' शब्दाने जो व्यक्त केला जातो तो बरोबर नव्हे. युरोपात जसा ख्रिस्ती धर्म आहे तसा हिंदुस्थानात हिंदू धर्म नाही. हिंदुस्थानात हिंदू समाज व हिंदू संस्कृती आहे, पण ख्रिस्ती धर्म ह्या अर्थाने अनेक रूढ धर्म आहेत. 'धर्म' शब्दाचा अर्थ पाहता तो 'Religion' ह्या शब्दाला समानार्थी होऊच शकत नाही. ‘पदार्थधर्माचिया शृंखला त्याते कोणी न भेदी', ह्या ओळीमध्ये ‘धर्म शब्दाचा जो अर्थ आहे तो मूळ अर्थ असून मानवधर्मशास्त्रात 'धर्म' म्हणजे मानवाने करावयाची कर्तव्ये ह्या अर्थी तो शब्द आला आहे. इंग्रजीमध्ये ज्याला ' Religion' म्हणतात त्याचे भाषांतर संप्रदाय, मत, मार्ग ह्यांसारख्या शब्दांनी- विशेषतः संप्रदाय' ह्या शब्दाने करता येईल आणि त्या अर्थाने हिंदूचा कोणता तरी एक संप्रदाय नसून अनेक संप्रदाय आहेत, हे त्यांनी स्पष्टपणे दाखविले आहे.
 पूर्वोक्त पहिले इंग्रजी निबंध ज्या काटेकोरपणाने व समतोल बुद्धीने लिहिले आहेत, ते गुण दुर्दैवाने केतकरांच्या पुढील लेखनात आढळत नाहीत. पुढे त्यांच्या लेखनात विविधता आली, त्यांच्या विचारांचे क्षेत्र व्यापक झाले, पण विवेचनात पुष्कळदा कमालीचा निष्काळजीपणा शिरला. ही विचारांची व लेखनाची शिथिलता विशेषत: त्यांच्या भारतीय समाजशास्त्र' ह्या नवीन पुस्तकात जागोजाग पाहावयास सापडते. मानववंशविषयक कोणते शब्द वापरावे ह्याबद्दल केतकरांनी १९०९ साली लिहिलेल्या परिशिष्टाचा उल्लेख वर आलाच आहे. १९११ साली 'Religion' ह्या शब्दाने व्यक्त होणा-या अर्थाचे सूक्ष्म परीक्षण करून त्याला त्यांनी संप्रदाय' हा शब्द सुचविल्याचेही वर सांगितलेच. अशा प्रकारे शास्त्रीय विवेचनात शब्दांच्या अर्थासंबंधी व व्याख्येसंबंधी पराकाष्ठेचा काटेकोरपणा दाखवून प्राचीन भारतीय परंपरा राखणारे केतकर व १९३६ साली लिहिलेल्या भारतीय समाजशास्त्र' ह्या पुस्तकात केवळ भाषाशैथिल्यामुळे जागोजाग घोटाळा उत्पन्न करणारे केतकर हे एकच काय, अशी शंका उत्पन्न होते! प्रस्तुत पुस्तकाच्या १९४ व्या पृष्ठावर आर्य रक्त' असा शब्दप्रयोग त्यांनी केला आहे आणि हिंदु समाजात अनेक मानववंशाचे लोक आहेत असे सांगणाच्या केतकरांनी ‘‘जातीच्या ८६ / आमची संस्कृती

चेहे-याची ठेवण हिंदू रक्ताच्या मिश्रणाने निवळली.'(!) असे वाक्य लिहिले आहे.

 डॉ. केतकरांच्या लेखनातील दुसरा दोष प्राचीन भारताविषयी त्यांना वाटत असलेल्या आत्यंतिक जिव्हाळ्यामुळे उत्पन्न झाला आहे. त्यांचे लेख वाचीत असता जगात भारतीयांपूर्वी दुसरा एखादा सुसंस्कृत समाज होऊन गेला असेल असे वाटतच नाही. भारतीय संस्कृतीचे गोडवे गाताना भारतीय संस्कृतीपेक्षाही प्राचीन अशा मिसर व असीरिया ह्या देशांतील आर्यपूर्व सेमाईट संस्कृतीचे केतकरांना सर्वस्वी विस्मरण होतेसे दिसते. आर्य संस्कृतीविषयी केतकरांचा अभिनिवेश पाहिला म्हणजे त्यांच्या थोडे अगोदर परलोकवासी झालेल्या सर ईलियट स्मिथ ह्या समाजशास्त्रज्ञाची आठवण होते. केतकरांना जो अभिमान भारतीयांविषयी वाटे, अगदी तसाच अभिमान स्मिथ यांस मिसरदेशीय संस्कृतीविषयी वाटे. मिसरदेशीय संस्कृती जगात सर्वांत जुनी असून सर्व प्राचीन समाजांत जी संस्कृती दृष्टोत्पत्तीस येते तिच्या निर्मितीला चालना मिसरी संस्कृतीने दिली, आणि तिची घटनादेखील मिसरा समाजघटनेवरूनच ठरविली गेली, असा त्यांचा ठाम सिद्धांत होता. मिसरी संस्कृती भूमध्यसमुद्राभोवतालचे प्रदेश आक्रमूनच राहिली नाही, तर इराण, हिंदुस्थान यवद्वीप, पॅसिफिक महासागरातील अनेक बेटे ह्या मार्गाने प्रवास करीत अमेरिकेतील पेरू व मेक्सिको या देशापय पोचली, असे सिद्ध करण्याचा प्रयत्न स्मिथ यांनी व त्यांच्या अनुयायान केला आहे. निरनिराळ्या समाजातील संस्कृती ही त्या त्या समाजाने इतरांपासून अलिप्त राहून अगदी एकट्याने घडवून आणिलेली अ" कधीच नसते, तर ती मुख्यत्वेकरून इतर समाजाकडून घेतल उसनवारीवर उभारलेली असते, आणि सर्व जगाला सांस्कृतिक भाडव इजिप्तने पुरविले, अशा दुहेरी स्वरूपाचा त्यांचा सिद्धांत आहे. पैकी पहिल्या भागाच्या बुडाशी असलेले “मानवी संस्कती है। मानवसमाजाच्या दळणवळणाचे प्रतीक होय, हे तत्व आता समाजशास्त्राच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक होऊ पहात आहे आणि मिसरी संस्कृती प्राचीनतम असल्यामुळे ह्या सिद्धांताच्या दुस-या भागातही सत्यांश आहे. डॉ. केतकरांच्याप्रमाणे स्मिथसाहेबांचे

आमची संस्कृती / ८७

लिखाणही स्वतंत्र बुद्धीचे व विचारास चालना देणारे असे आहे; पण दोघांतही अतिरंजकता हा शास्त्रज्ञास न शोभणारा दोष राहून गेला आहे.
 केतकरांनी आपल्या समाजशास्त्रविषयक कामगिरीस 'History of Castes in India' ह्या पीएच.डी.साठी लिहिलेल्या निबंधापासून आरंभ केला, हे वर सांगितलेच आहे. ह्या निबंधात मुख्यत्वे मनुस्मृतीत जातिसंस्थेसंबंधी जे उल्लेख आले आहेत त्यांबद्दल विवेचन आहे आणि पर्यायाने अर्वाचीन जातिसंस्था व प्राचीन वर्णसंस्था ह्यांविषयीही अतिशय उद्बोधक विचार केलेला आहे. ह्या निबंधांत केतकरांनी खालील गोष्टी प्रामुख्याने सांगितल्या आहेत :- चातुर्वर्ण्य हे जातिसंस्थेपासून भिन्न आहे. त्याचा जातिसंस्थेशी जनकत्वाचा संबंध येत नाही. अर्वाचीन जाती धंद्यावरून, देशावरून, संप्रदायावरून वगैरे पडलेल्या आहेत. जातिसंस्थेची उभारणी बहुतांशी पवित्रापवित्रतेच्या कल्पनांवर झालेली आहे. जाती ब्राह्मणांनी उत्पन्न केलेल्या नाहीत, इतकेच नव्हे तर वेद व वेदांगे ह्यांचे ज्ञान असलेल्या मनूला जातिसंस्थेचे अस्तित्व जाणवले, परंतु तिचा विस्तार व कारणमीमांसा मात्र आकळता आली नाहीत. तो स्वतः ब्राह्मण असल्यामुळे निरनिराळ्या जाति व त्यांचे आचार ह्यांचे खोल ज्ञान त्याला नव्हते. त्याला चातुर्वर्ण्य मात्र माहीत होते आणि त्याने जातींची उत्पत्ती देताना स्वत:च्या माहितीच्या ज्या दोन गोष्टी- चातुर्वर्य व वर्णसंकर- त्यांचा उपयोग करून त्यामुळे जाती उत्पन्न झाल्या, असे प्रतिपादन केले आहे; आणि हीच चुकीची मीमांसा आजपर्यंत जातिसंस्थेसंबंधी हिंदू समाजात केली जाते. मनूने निरनिराळ्या जातींना जी प्रायश्चित्ते सांगितली आहेत, त्यांचाही विचार करून निरनिराळ्या जातींमधील उच्चनीचभाव त्यामुळे कसा व्यक्त होतो हे ह्या ग्रंथात कतकरांनी दाखविले आहे. त्यांच्या मते ब्राह्मणव्यतिरिक्त जातींना जी कडक शासने सांगितली आहेत ती नित्य अंमलात येतच होती असे नव्हे. तर केवळ दहशत बसावी म्हणून मनूने कडक भाषा वापरलेली आहे. दुस-या बाजूने ब्राह्मणांना जे अधिकार (न्यायदानाचे काम इत्यादी) असावे असे मन् म्हणतो, ते देणे न देणे राजाच्या इच्छेवर अवलंबून असल्यामुळे ते नेहमीच मिळत असत असेही नाही. विशेषत: क्षत्रिय, वैश्य व शूद्र ह्यांचे अधिकार नेहमीच स्पष्ट व त्यांच्या मर्यादा पूर्णपणे ८८ / आमची संस्कृती

आखलेले असे नसत, हे केतकरांनी ‘मृच्छकटिक' नाटकांतील उदाहरणे देऊन सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.*
 ह्याच पुस्तकाच्या एका प्रकरणात चातुर्वण्र्याच्या बुडाशी हिंदूचे तत्त्वज्ञान काय आहे ह्याचेही डॉ. केतकरांनी विवेचन केले आहे. कर्म, कर्मफल, पुनर्जन्म इत्यादी कल्पनांमुळे हिंदूंना, विशेषत: ब्राह्मणांना आपण खालील जातींवर अन्याय करीत आहो अशी भावना नसे, व शूद्रांना आपण हीन जन्मास येऊन मागील जन्मीचे कर्मफल भोगीत आहो असे वाटून आपणांवर होणाच्या अन्यायाची जाणीव नसे, असे केतकरांनी प्रतिपादिले आहे. पण ह्या तत्त्वज्ञानामुळे चातुर्वण्र्याची उभारणी झाली असे म्हणता येणार नाही. समाजसंस्थांचा उगम प्रथम व त्यांना जुळणाच्या तत्त्वज्ञानाची उभारणी नंतर, ह्या समाजशास्त्रातील अगदी साध्या तत्त्वाकडे केतकरांनी दुर्लक्ष केले होते असे दिसते. भारतीयांचा इतिहास पाहिला तर तेथे जातीजातीतील स्पर्धा व अन्यायाची जाणीव अगदीच नव्हती, असे दिसून येत नाही. ह्या स्पर्धेचा व असूयेचा बुद्धाने चांगला फायदा घेतला, हे विधान डॉ. केतकरानाच आपल्या निरनिराळ्या ग्रंथातून जागजागी केले आहे.
 ह्या ग्रंथातील वैशिष्ट्य म्हणजे हिंदू संस्कृतीसंबंधी केतकराचा भूमिका हे होय. सर्व ग्रंथ अमेरिकेतील मध्य स्थितीतील शिकलेल्या लोकांना उद्देशून लिहिल्यासारखा असून त्यांत जागोजाग हिंदूच्या समाजव्यवस्थेचे अर्धवट समर्थन आणि ती रानटी असल्याबद्दलची अर्धवट मान्यता दिलेली आढळते. एवढेच नव्हे, तर जातिसंस्था हा हिंदू

 ‘पण मृच्छकटिकांतील राजा आदर्शभूत राजा होता, असा त्याचा नाटकात कोठेच उल्लेख नाही. एवढेच नव्हे, तर तो क्षत्रिय तरी होता की नाही ह्यास शंका येते. ह्या नाटकात क्षुद्र सेनापतीचा जो उल्लेख आहे तो तर उघड विंदागर्भ व राजाची अव्यवस्था दर्शविणारा आहे.(चंदनकवीरक-संवाद पा९ मच्छकटिक, अं.६, श्लो.२२/२३) आणि तो केतकरांनी शूद्रास उच्च जा मिळत असत, ह्या विधानांच्या पुष्ट्यर्थ द्यावा ह्याचे आश्चर्य वाटते. उलट निरनिराळ्या जातींनी करावयाचे धंदे व त्यांचे चातुर्वण्र्यातील स्थान ठरलेले अस हे पंचतंत्रातील सेनापती झालेल्या कुंभाराच्या गोष्टीवरून चांगलेच दृष्टोपत्तीस येते

(पंचतंत्र ४, कथा ३). 

आमची संस्कृती / ८९

समाजाला झालेला एक दुष्ट रोग आहे असेही ते म्हणतात. एखादी गोष्ट दोषरहित नसूनसुद्धा आपल्याला आवडते - आवडते म्हणण्यापेक्षा तिच्याबद्दल आपणास आपुलकी वाटते; पण दुस-या लोकांसमोर ह्या आपुलकीच्या भावनेबद्दल थोडी लज्जा, थोडा अभिमान वाटत असतो, अशी काहीशी द्विधा वृत्ती हिंदूंच्या जातिसंस्थेविषयी केतकरांची ह्या ग्रंथात ठिकठिकाणी दिसून येते. हळूहळू पुढील ग्रंथातून ही द्विधा वृत्ती नाहीशी झाली व हिंदूच्या समाजघटनेविषयी केवळ अभिमान तेवढा शिल्लक राहिला; आणि शेवटी हिंदूंच्या समाजरचनेचे त्यांना एवढे कौतुट वाटू लागले की, अशी रचना ज्या अर्थी दुस-या कोणत्याही समाजाला साधली नाही त्या अर्थी त्यांनी ती हिंदूपासून शिकून घ्यावी व त्यामुळे जगाचे कल्याणच होईल, अशा त-हेची विचारसरणी ‘हिंदुस्थान आणि जग' व 'भारतीय समाजशास्त्र' या त्यांच्या ग्रंथांतून आढळते.
 केतकरांच्या पहिल्याच ग्रंथाचे इतके विवेचन करण्याचे कारण, ह्या निबंधात त्यांनी पुढे इतर ग्रंथांतून विस्ताराने चर्चिलेल्या बहुतेक सामाजिक संस्थांचा व प्रवृत्तींचा उल्लेख केला आहे. तसेच ह्यांत वरील प्रश्नांकडे पाहण्याची केतकरांची जी दृष्टी थोड्या अंशाने ठरून गेली आहे तीच पुढेही कायम राहिली आहे. ह्याच विषयांच्या अनुषंगाने लिहिलेले दुसरे पुस्तक 'Hinduism: its Formation and Future' हेही अतिशय वाचनीय झाले असून ज्ञानकोशातील हिंदुस्थान आणि जग' ह्या विभागात वरील विषयाचीच सांगोपांग चर्चा आली आहे. बुद्धपूर्व जग' ह्या विभागातील अर्ध्या भागात हिंदूंची ग्रंथनिर्मिती व समाजघटना पुन: विस्तारपूर्वक विचारात घेतली आहे; आणि त्यांचे शेवटचे पुस्तक ‘भारतीय समाजशास्त्र' ह्याच विषयाला वाहिलेले आहे. मात्र ज्ञानकोशापर्यंतची त्यांची ग्रंथनिर्मिती व विचारपद्धती बरीच समतोल वृत्तीची आढळते, तर भारतीय समाजशास्त्र' ह्या पुस्तकात केवळ शास्त्रज्ञाची भूमिका जाऊन हिंदू धर्माभिमान्याची भूमिकाच अधिक उठावदार रीतीने दिसते; आणि  'The more he thinks on the caste system, the better he understands his own burden. As one looking at a cancer would like to turn away his eves so a Hindu would like to discontinue his thoughts:/History of Castes in India, P.29. At present the various tribes and castes feel strong repulsion against one another, and this fact is a clear manifestation of our savagery.' (Ibid, p.28). ९० / आमची संस्कृती

केवळ चातुर्वण्र्याचीच नव्हे, तर अर्वाचीन जातिसंस्थेची व विशेषतः ब्राह्मणांचीच वकिली जोराने व आग्रहाने केलेली आढळते.
 ब्राह्मणांची विद्या व त्यांचे संस्कृतिरक्षणाचे कार्य ह्याबद्दल केतकरांना विशेष अभिमान होता. त्यांच्या मते हिंदुस्थानांतील निरनिराळ्या वन्य व इतर जातींचा हिंदू समाजात अंतर्भाव करून व त्यांच्या दैवतांना आपल्या दैवतांमध्ये स्थान देऊन ब्राह्मणांनी समाजसंवर्धन केले. निरनिराळ्या लोकांना आपली संस्कृती व प्रादेशिक धर्म न सोडता हिंदू समाजाचे घटक होता येई, हा हिंदू धर्माचा एक विशेष आहे. हिंदूंचे धर्मशास्त्र फक्त काही विशिष्ट लोकांकरिता व प्रदेशाकरिता नसून सर्व मानवजातीकरता लिहिलेले आहे. त्यात सर्व जगाच्या कल्याणाची इच्छा बाळगून आचारधर्म सांगितला आहे. ह्या सर्वसंग्राहक व परमतसहिष्णू वृत्तीची ख्रिस्त व महंमद यांच्या अनुयायांशी तुलना करता हिंदूचे श्रेष्ठत्व दिसून येते.
 ख्रिस्ती व महंमदी धर्म इतरांना आपल्यांत आणण्याचा आटोकाट प्रयत्न करितात; पण तसे करताना इतरांनी आपल्या पूर्वीच्या दैवतांचा त्याग करून सर्वस्वी ख्रिस्ती व महंमदी दैवतांचे व धर्मतत्त्वाचे ग्रहण केले पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. ह्या असहिष्णू मनुष्यप्रणीत संप्रदायांनी मनुष्यजातीची सर्वांगीण उन्नती होणे असेल, तर आपले आग्रही परस्परद्वेषजनक संप्रदाय नाहीसे होऊन त्या जागी सर्वसंग्राहक; सर्व मानवजातीला लागू पडतील अशा धर्मतत्त्वे प्रचारात आली पाहिजेत; आणि अशी धर्मतत्त्वे हिंदू धर्मात असल्यामुळे हिंदू भारतावर डॉक्टरमहाशयांनी जगाच्या उन्नतीची मोठीच जबाबदारी टाकलेली आहे. हिंदू समाजाची उन्नती करण्यासाठी लहान जाता नष्ट करून चातुर्वर्ण्य ठेवावे, अशी त्यांची ‘हिंदुस्थान आणि जग' ह्या पुस्तकात विचारसरणी आहे; पण पुढे ‘भारतीय समाजशास्त्र' लिहिताना जातिसंस्था व जात्यभिमान ह्याही गोष्टी चांगल्याच आहेत असे प्रतिपादून, त्या संबंध समाजास उपकारक अशी कृत्ये कशी करू शकतील एवढ्याचाच उहापोह केला आहे.

 ‘हिंदुस्थान आणि जग' ह्या विभागात हिंदू समाजव्यवस्थेतील दोष' (पृष्ठ ३८१) ह्या सदराखाली दोषाविष्करण करण्याचा प्रयत्न केला आहे. पण ती न साधता जो मोठा दोष म्हणून म्हटले आहे तो खरोखर तसा नव्हे, अशीच भावना वाचणान्यांची होते. सर्वांत मोठा दोष म्हणजे दृढीकरणाची अल्पता हा होय. 

आमची संस्कृती / ९१


हिंदू समाजात परस्परांहून विभक्त अशा तीन हजारांहून अधिक जाती व त्याहीपेक्षा अधिक पोटजाती आहेत. हा प्रकार म्हणजे अलीकडे उत्पन्न झालेले अत्यंत भयंकर द्वैत असे जगाला दिसते. पण हे जे द्वैत दिसते त्याचा अर्थ एका समाजाचे अनेक तुकडे पडले असा नाही, तर दृढीकरणाचे कार्य अपूर्ण राहिले असा आहे.' (पृष्ठ ३८२) एक मोठे बलिष्ठ राष्ट्र निर्माण करण्याचा उपदेश करणारे व्यापक विचार आणि भावना हिंदुस्थानात उदय न पावल्याने येथे पाहिजे ते ऐक्य घडून आले नाही. जातीची कल्पना व नंतर एकदम मानव्याची कल्पना अशा दोनच ऐक्याच्या कल्पना प्राचीन हिंदू लोकांस अवगत होत्या. हिंदूंनी जरी सर्वव्यापी असे समाजव्यवस्थाशास्त्र निर्माण केले तरी सर्व जग आपले म्हणून स्वीकारील असे ह्या व्यवस्थेचे स्वरूप नव्हते व नाही. हिंदुस्थानचे राजेरजवाडे ब्राह्मणांची मदत घेऊन जग जिंकू शकले नसते तर, किंवा ब्राह्मण इतर सर्व लोकांचे पुरोहित झाले असते तर, त्यांच्या सामाजिक विचारांना सर्वत्र मान्यता मिळाली असती. (ही वाक्ये जशीच्या तशी Hinduism: its Formation and Future' ह्या ग्रंथात पाहावयास सापडतात.)

 ह्या वाक्यांमध्ये केतकरांचे हिंदू समाजशास्त्राबद्दलचे विचार पूर्णत्वाने दिसून येतात. 'हिंदुस्थान आणि जग' ह्या विभागात (पृ.२३५ ते ४४२) चातुर्वर्ण्य संस्था व ती टिकविण्यास काय प्रयत्न करावे ह्याबद्दल ब-याच विस्ताराने विचार केला आहे. त्यात मुख्य कल्पना खालीलप्रमाणे आहेचातुर्वर्ण्यसंरक्षण हा आपला प्रथमधर्म आहे. समाजात चार वर्ण आहेत, अधिक नाहीत. प्रत्येक वर्णाचे पृथकत्व गुणविभिन्नतामूलक आहे. निरनिराळे वर्ण व समाज ह्यांचा संबंध अवयव व अवयवी असा आहे. अध्ययनादी क्रिया, संरक्षणादी क्रिया, द्रव्योत्पादक व्यवहार व लोकांची सेवा या क्रिया ज्या समाजात नाहीत असा समाज असणे अशक्य आहे; व चातुर्वण्र्याचे अस्तित्व स्वाभाविक आहे. मग ह्या गोष्टीचे संरक्षण ते काय करावयाचे?' ह्या प्रशाला केतकर उत्तर देतात की, 'आपले वर्णभिन्नत्व केवळ क्रियाभिन्नत्वमूलकच नाही- आपले चातुर्वर्ण्य संस्कारांकित आहे. आणि चातुर्वर्ण्य टिकवायचे असेल तर (१) संस्कार वर्णानुरूप असून गुणकर्मावरच अवलंबून पाहिजे. (२) वर्णनिर्णयार्थ इतिहासापेक्षा सद्य:कालीन प्रत्ययास अधिक महत्त्व पाहिजे ही क्रिया करताना एखाद्या व्यक्तीस कर्मानुसार उच्च किंवा नीच वर्णात घालावयाचे असल्यास त्याने आपल्या कुलाचा व बांधवांचा संबंध सोडावा की 

आमची संस्कृती / ९१


हिंदू समाजात परस्परांहून विभक्त अशा तीन हजारांहून अधिक जाती व त्याहीपेक्षा अधिक पोटजाती आहेत. हा प्रकार म्हणजे अलीकडे उत्पन्न झालेले अत्यंत भयंकर द्वैत असे जगाला दिसते. पण हे जे द्वैत दिसते त्याचा अर्थ एका समाजाचे अनेक तुकडे पडले असा नाही, तर दृढीकरणाचे कार्य अपूर्ण राहिले असा आहे.' (पृष्ठ ३८२) एक मोठे बलिष्ठ राष्ट्र निर्माण करण्याचा उपदेश करणारे व्यापक विचार आणि भावना हिंदुस्थानात उदय न पावल्याने येथे पाहिजे ते ऐक्य घडून आले नाही. जातीची कल्पना व नंतर एकदम मानव्याची कल्पना अशा दोनच ऐक्याच्या कल्पना प्राचीन हिंदू लोकांस अवगत होत्या. हिंदूंनी जरी सर्वव्यापी असे समाजव्यवस्थाशास्त्र निर्माण केले तरी सर्व जग आपले म्हणून स्वीकारील असे ह्या व्यवस्थेचे स्वरूप नव्हते व नाही. हिंदुस्थानचे राजेरजवाडे ब्राह्मणांची मदत घेऊन जग जिंकू शकले नसते तर, किंवा ब्राह्मण इतर सर्व लोकांचे पुरोहित झाले असते तर, त्यांच्या सामाजिक विचारांना सर्वत्र मान्यता मिळाली असती. (ही वाक्ये जशीच्या तशी Hinduism: its Formation and Future' ह्या ग्रंथात पाहावयास सापडतात.)

 ह्या वाक्यांमध्ये केतकरांचे हिंदू समाजशास्त्राबद्दलचे विचार पूर्णत्वाने दिसून येतात. 'हिंदुस्थान आणि जग' ह्या विभागात (पृ.२३५ ते ४४२) चातुर्वर्ण्य संस्था व ती टिकविण्यास काय प्रयत्न करावे ह्याबद्दल ब-याच विस्ताराने विचार केला आहे. त्यात मुख्य कल्पना खालीलप्रमाणे आहेचातुर्वर्ण्यसंरक्षण हा आपला प्रथमधर्म आहे. समाजात चार वर्ण आहेत, अधिक नाहीत. प्रत्येक वर्णाचे पृथकत्व गुणविभिन्नतामूलक आहे. निरनिराळे वर्ण व समाज ह्यांचा संबंध अवयव व अवयवी असा आहे. अध्ययनादी क्रिया, संरक्षणादी क्रिया, द्रव्योत्पादक व्यवहार व लोकांची सेवा या क्रिया ज्या समाजात नाहीत असा समाज असणे अशक्य आहे; व चातुर्वण्र्याचे अस्तित्व स्वाभाविक आहे. मग ह्या गोष्टीचे संरक्षण ते काय करावयाचे?' ह्या प्रशाला केतकर उत्तर देतात की, 'आपले वर्णभिन्नत्व केवळ क्रियाभिन्नत्वमूलकच नाही- आपले चातुर्वर्ण्य संस्कारांकित आहे. आणि चातुर्वर्ण्य टिकवायचे असेल तर (१) संस्कार वर्णानुरूप असून गुणकर्मावरच अवलंबून पाहिजे. (२) वर्णनिर्णयार्थ इतिहासापेक्षा सद्य:कालीन प्रत्ययास अधिक महत्त्व पाहिजे ही क्रिया करताना एखाद्या व्यक्तीस कर्मानुसार उच्च किंवा नीच वर्णात घालावयाचे असल्यास त्याने आपल्या कुलाचा व बांधवांचा संबंध सोडावा की 

आमची संस्कृती / ९३


 ब्राह्मणांच्या विद्येविषयी किंवा संस्कृतिरक्षणाच्या कामगिरीविषयी कोणाचे दुमत होणार नाही. पण त्यांचे समाजघटनाशास्त्र व समाजधारणाशास्त्र दोषरहित खासच नव्हते. ब्राह्मणांनी तयार केलेली घटना व शासनसंस्था आपल्या वर्गापुरतीच होती. इतर वर्गानी ब्राह्मणांच्या व्यवहारांत- अधिकारक्षेत्रात ढवळाढवळ केल्यास काय शासन असावे एवढ्यापुरता इतर वर्गाशी त्यांचा संबंध होता. क्षत्रिय हे शासनकर्ते असल्यामुळे काही काळ त्यांना मोठा दर्जा देऊन संभाळून घेण्याचे काम ब्राह्मणांनी केले; पण इतर सामान्य जनांसाठी त्यांनी काय केले? खालील जातींचा विवाहसुद्धा ते धार्मिक विधी म्हणून मानण्यास तयार नव्हते. त्यांनी शूद्र म्हटलेल्या लोकांत ज्या हजारो जाती होत्या त्यांतील व्यक्तींचे नियंत्रण त्या त्या जातींतील वृद्धांच्या पंचायतीकडून होई; त्या गोष्टी ब्राह्मणांपर्यंत येतच नसत. एवढेच नव्हे, तर ज्या जातिसंस्थेने हिंदू समाजधारणेचे मुख्य कार्य आजपर्यंत केले ती जातिसंस्थासुद्धा ब्राह्मणांनी उत्पन्न केली नाही, असे केतकरच सांगतात.
 केतकरांच्या मते परमतसहिष्णुता व परधर्मातील दैवतांचे आत्मीकरण हे। दोन हिंदु समाजाचे मोठे गुण आहेत. पण हीच वृत्ती बुद्ध, ख्रिस्त व महंमद ह्यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या सर्वच सुसंस्कृत समाजांत दिसून येते. इजिप्त, असीरिया आणि नंतर ग्रीक व रोम या सर्वच ठिकाणी लोकांनी हिंदूंच्यासारखे तेहतीस कोटी देव जमविलेच होते; व परधर्मीय म्हणजे अमक्या एका दैवतावर विश्वास ठेवणारा म्हणून कोणाही मनुष्याचा छळ करण्याकडे ह्या जुन्या संस्कृतीची प्रवृत्ती नसे. छळ झाला तो फक्त ख्रिस्ती यहुदी लोकांचा आणि तो त्यांच्या स्वत:च्या आततायीपणामुळे व असहिष्णुतेमुळे. त्यांनी जर ‘आमचा देव तेवढाच खरा' असा हटवादीपणा केला नसता, तर त्यांच्या संप्रदायाला कोणी विचारले देखील नसते. ख्रिस्तपूर्व संस्कृतीत सर्वच धर्म सामाजिक व प्रादेशिक स्वरूपाचे होते; आणि त्यांना इतर कोणी प्रतिस्पर्धी नसल्यामुळे त्यांचे विधिनिषेध सर्वच मानवांना उद्देशून होते. हे वैशिष्ट्य फक्त हिंदू धर्मापुरतेच होते असे नाही, ही गोष्ट डॉ. केतकरांनी लक्षात घेतलेली दिसत नाही.
 ख्रिस्ती व महंमदी धर्माच्या आक्रमणामुळे हिंदू समाजाच्या दृढीकरणास वेळ मिळाला नाही, हेही केतकरांचे म्हणणे बरोबर नाही. चातुर्वर्ण्य व जातिसंस्था ह्यांच्या द्वारे निरनिराळ्या भारतीय समाजाचे एकीकरण झाले हे ९४ / आमची संस्कृती

खरे, परंतु ह्याच कल्पनांत सध्या दिसून येणा-या द्वैताचा उगम आहे हे विसरता कामा नये. बहुतेक नव्या जातींना शूद्र म्हणून समाजात नीच स्थान देणे, म्हणजे दृढीकरण करणे खासच नव्हे. हिंदूंच्या घटनापद्धतीने समाजाचे संपूर्ण दृढीकरण होणेच शक्य नव्हते. शूद्र म्हणून ब्राह्मणांनी दूर केलेल्या वर्णातून महंमद, ख्रिस्त व बुद्ध ह्यांना मुख्यत्वे अनुयायी मिळाले. अर्थात आपले सध्याचे राज्यकर्ते ब्रह्मद्वेष पसरवितात असेच न म्हणता ब्राह्मणद्वेष सामान्य जनतेत केव्हाही चटकन पसरविता येई हे म्हणणे इतिहासास धरून होईल. महंमदी व ख्रिस्ती धर्म मनुष्यप्रणीत, अतएव असहिष्णू व दुराग्रही संप्रदायस्वरूपाचे आहेत, आणि त्यांच्या आक्रमणाचा इतिहास जुन्या संस्कृतीचे संवर्धन करून नव्याची भर घालण्याच्या स्वरूपाचा नसून मुख्यत: विध्वंसनाचा आहे, हे प्राचीन भारताविषयीचे केतकरांचे विधान बव्हंशी खरे आहे; आणि सध्याच्या रानटी समजल्या जाणा-या मनुष्यजातींचा इतिहास पाहिला तर ह्या म्हणण्याची सत्यता अधिक पटेल. हे सर्व जरी खरे, तरी खालच्या वर्णाच्या लोकांना आकर्षक भासणारे ह्या संप्रदायातील मानवांच्या समतेचे तत्त्व आहे, हे मान्य केले पाहिजे. भारतीयांच्या एका काळच्या उज्वल संस्कृतीकडे पाहून हिंदू धर्माचे सर्वव्यापी व प्रभावी स्वरूपात पुनरुज्जीवन होईल, अशी केतकरांची कल्पना होती.
 मनुष्यप्रणीत संप्रदायांच्या द्वेषमूलक व स्पर्धाजनक मगरमिठीतून मनुष्यांची सुटका होऊन सर्व जग सहिष्णू व परस्परसाहाय्यक धर्मतत्त्वाच्या अंमलाखाली सुखाने नांदेल, हे गोड स्वप्न केतकरांप्रमाणेच जगातील इतर आशावादीही आपल्यापुढे रंगवीत आहेत. मात्र जगातील अन्याय विषमता केवळ धर्मभिन्नत्वामुळे उत्पन्न झालेली नसून ती ब-याच अंशी आर्थिक गोष्टींवरून आलेली आहे, हा सिद्धांत आता सर्वमान्य झाला आहे; आणि आर्थिक विषमता नाहीशी झाली म्हणजे सर्वास ला पडणाच्या साधारण मानवधर्माची निर्मिती होईल, अशी कित्य समाजशास्त्रज्ञांना व समाजधुरीणांना आशा आहे. केतकरासारख्या आत्यंतिक आशावादी समाजशास्त्रज्ञाच्या कामगिरीचे सिंहावलोकन छ' आशावादावरच संपविणे योग्य होणार नाही काय?