Jump to content

सार्थ लघुवाक्यवृत्ती/ओव्या ९०१ ते १०००

विकिस्रोत कडून

<poem> एवं मुळीं जे अहंब्रह्मस्फूर्ति । ते स्वरूपातें जाली विसरती । येथेंही कोणी शंका करिती । कीं ईश सर्वज्ञ कैसा ॥१॥जरी नेणणें मूळ पुरुषासी । तरी ईषासी सर्वज्ञता कैशी । तरी नुसधी विद्या उपाधि जयासी । तेणें जाणें सर्वांतें ॥२॥स्फुरणापासून जें जें जालें । ब्रह्मादि तृणांत उद्भवलें । तें तें जाणें ईक्षणें आपुलें । म्हणोनि सर्वज्ञ ॥३॥न जाणणें जें कां ब्रह्मीचें । तें तों सर्वपणांत नवचे । त्याविरहित होणें जितुकियाचें । जाणणें घडे ॥४॥मागुतीं म्हणसी ब्रह्म आसिकें । ईशासी न कळे निकें । तरी जीव केवीं जाणें कौतुकें । तरी अवधारी ॥५॥स्फुरणापासून जे त्रिगुण । त्या त्रिगुणांचे अंशें ईशान । देह धरितां जाला आपण । मानसिक साकार ॥६॥पुढें चारी खाणीही होती । पांचवी मानसिक योनी निश्चिती । एवं जे जे देवादि कीटकांत उद्भूति । इतुकीही साकार इतुक्याही आकारीं प्रवेश । जीवरूपें करी ईश । तेव्हां ज्ञानाज्ञान हें विशेष । प्रगटतें जालें ॥८॥विष्णु सदाशिव हे दोन्ही । तेथें अज्ञान नसे निपटूनी । स्वस्वरूपज्ञान ऐक्यपाणी । अपसयाची जाहलें ॥९॥नाहीं गुरु ना सच्छास्त्र । उत्पन्न होतांचि स्वरूप निर्धार । होता जाला कीं निर्विकार । अहंब्रह्मास्मिरूपें ॥९१०॥ऐसें स्वयेंचि ज्ञान जालें । किंचित् नेणणें तें निपटून गेलें । तयासी नित्यमुक्त असें बोलिले । सृष्ट्यादिही व्यापारीं ॥११॥पुढें गुरुमुखें एकमेकां । ज्ञानानुभूति निश्चयात्मका । प्रगटती जाली तया कौतुका । जीवन्मुक्ति नाम ॥१२॥तस्मात् जो कोणी विचारवंत । गुरुमुखें ज्ञान आकळित । तयाचें अज्ञान सर्व नासत । ब्रह्मात्मत्वीं । ऐक्य पावे ॥१३॥जया वृत्तीसी अज्ञान आलें । तया वृत्तीसीच ज्ञान उद्भवलें । त्या दोन्हीसहित स्फुरण मावळलें । पुढें अभिन्नता ऐशी कोणताही पदार्थ पाहतां । आरंभीं त्याची अज्ञातता । तो अमुक ऐसा वृत्तीसी कळतां । अज्ञान नासे ॥१५॥अज्ञान नासून ज्ञान जालें । तेंही ज्ञान स्फूर्तिरूप मावळलें । पुढें पदार्थमात्र स्वयें उरलें । हा स्वभावचि वृत्तीचा ॥१६॥तैशी गुरुमुखें बहिर्मुखता । वृत्तीची मोडून तत्त्वंतां । होय जेव्हां स्वरूपाकारता । अंतर्मुखत्वें ॥१७॥तेव्हां निरूपाचें अज्ञान । फिटोन वृत्तीसी होय ज्ञान । ते ज्ञानस्फूर्तीही मावळून । केवळ ब्रह्मात्मा उरे ॥१८॥यासीच बोलिजे अभिन्नता । हेचि बापा जीवनमुक्तता । तस्मात् जीवही पावे अपरोक्षता । तेथें संदेह नाहीं ॥१९॥एकदा सांगता नाहीं कळलें । तरी वारंवार पाहिजे श्रवण केलें । तैसेंचि मनन निदिध्यासन आपुलें । केलेंचि पुन्हां करावें याचि हेतु अतिप्रयत्नेंशीं । अभ्यासावें दिवा कीं निशीं । मागें बोलिलों आम्ही तुजसीं । तस्मात् मुमुक्षें यत्न करावा ॥२१॥ऐसें गुरुमुखें वचन ऐकतां । रविदत्त घाली दंडवता । अति सप्रेमें झाला विनविता । जी जी ताता सद्गुरु ॥२२॥अहो धन्य मी सर्व उपेक्षून । श्रीचरणा आलों शरण । आतां कृतकृत्य जालों हें अप्रमाण । न घडे कल्पांतीं ॥२३॥कामधेनूचें वासरूं । भुकेलें न राहे निर्धारु । तेवीं मज वोळलासी सद्गुरु । आतां सांकडें काय ॥२४॥मी जरी मंदप्रज्ञ असे । तरी वारंवार श्रवण अभ्यासें । ऐक्यता पावेन कृपेसरिसें । मज चिंता कासया ॥२५॥मज पुसावें काय न पुसावें । हेहीं कळेना स्वभावें । परी गुरुमायेनें लेववावें । अपत्या वाक्यनगें ॥२६॥तथापि आर्षपणें तें लेकरूं । छंद घे भलताचि अंलकारू । भलते स्थानीं परिकरू । लेववीं ह्मणे ॥२७॥तें स्थान नव्हे त्या नगाचें । परी जननीस कौतुक बाळाचें । तेवीं माझिये आर्षप्रश्र्नाचें । कोडें पुरवावें ॥२८॥जागृति नाहीं स्वप्नाआंत । स्वप्न नसे सुषुप्तींत । तेवींच सुषुप्तिही नसे दोहींत । तेव्हां अवस्था मिथ्या ॥२९॥अस्ति भाति प्रिय आत्मा । याची तिही अवस्थेंत गरिमा । तोचि सत्य या रूपनामा । वास्तवपणा नसे ॥९३०॥जागृतींत अथवा स्वप्नामाजीं । आत्मा ज्ञानघन असे सहजीं । परी विशेषत्वें जें वृत्ति दुजी । ते आच्छादि सामान्या सुषुप्तींत जरी सामान्य प्रगटे । वृत्तीचें विशेषत्व वोहटे । परी अनुभवासी न भेटे । प्रत्यक्ष वृत्तीसी ॥३२॥वृत्तीसी न कळतां सघन । केवीं जाईल हें अज्ञान । भ्रांतीच न फिटतां अन्यथा भान । न जाय सहसा ॥३३॥एवं जागर स्वप्नीं विशेषामुळें । सच्चिदानंद वृत्तीसी न कळे । सुप्तींत तो स्वानुभवाचे डोळे । असून अनुपयोग ॥३४॥तस्मात् सच्चिद्धन आत्मयाचें । वृत्तीसी ज्ञान केधवां साचें । होय यया बरळ या प्रश्र्नाचें । सांकडें फेडावें जी ॥३५॥ऐशी रविदत्ताची ऐकतां वाणी । स्वामीसी अति हर्ष जाला मनीं । म्हणती भला अससी अवधानी । प्रश्र्नही करिसीं नेटका आतां असावें सावधान । जागृतीमाजीं सच्चिद्घन । दाखवूं ऐकावें निरूपण । एकाग्रभावें ॥३७॥जागरेपि धियस्तूष्णीं भावः शुद्धेन भास्यते ॥जागृति कालींही उगें असतां । गुणादि विकार किंचित् नसतां । आत्मस्वरूप सामान्यता । शुद्धभावें भासे ॥३८॥परी गुणाचे विकार समजावे । जे किमपि जेथें नसावे । तरीच उगेपणाचें रूप फावे । उदासवृत्ति नामें ॥३९॥सत्व रज तम तिन्ही गुण । यांचें अंतःकरणीं आरोहण । होतां भाव होती भिन्न भिन्न । एकल्या वृत्तीसी ॥९४०॥परी येक येतां दोन जाती । तिहींची एकत्र नसे वस्ती । जेवीं दोन खालीं एक वरती । कांटे सराटियाचे ॥४१॥तेवी सत्त्वगुण उभयतां । रजमता तळवटी खालुता । रजचि जेव्हां उदया येतां । तम सत्त्वा उठों नेदी ॥४२॥तम जेव्हां येतां उदया । उद्भवू नेदी यया उभयां । ऐसे गुणाचे स्वभाव वृत्तीचिया । ठायीं असती ॥४३॥तया तिहींचे स्वभाव तीन । भिन्न भिन्न तिहींचे लक्षण । धीर मूढ शांत विचक्षण । विवंचून पाहती ॥४४॥घोर म्हणजे रजाची वृत्ति । मूढ तेचि तमाची गति । सत्त्वगुणाची असे शांति । परी विकाररूपें ॥४५॥त्यांत घोरवृत्ती विकार । बोलिजताती सविस्तर । येणेंचि जनममरण वेरझार । जीवाची न चुके ॥४६॥अमुक पदार्थ मज असावा । अप्राप्त तो प्राप्त व्हावा । दृष्ट श्रुत तो यत्नें साधावा । या इच्छा नांवी काम ॥४७॥त्यासी प्रतिबंध जेणें केला । मग तो असो थोर धाकुला । परी तो वैरी वधीन पहिला । या नांव क्रोध ॥४८॥प्रारब्धें प्राप्त जे जे विषय । यांचा कधीही न व्हावा क्षय । अति आवडीनें करी संचय । या नांव लोभ ॥४९॥ऐसे हे काम क्रोध लोभ तिन्ही । जीवासी व्याघ्रचि अविद्यारानीं । बळें घोळसून जन्ममरणीं । कल्पांत बंधनीं घालिती कांहीं न सुचावें तो मोहो ॥५०॥बहु संशय तो संदेहो । वचनें न मानी तो दुराग्रहो । निग्रह ही घोरवृत्ती ॥५१॥दंभ तोचि जनीं दाखवावा । आपुला चांगुलपणा मद जाणवा । मत्सर द्वेष साभिमान घ्यावा । हेही घोरवृत्ति ॥५२॥स्वजनाचा कळवळा ते प्रीति । क्रीडा विहार विषयासक्ति । नटनाट्यादि आवडती । हेही वृत्ति घोर ॥५३॥कामना असूया तिरस्कार । फलाविषयीं बहु आदर । प्रपंचाविषयीं बहू सादर । हेही घोरवृत्ति ॥५४॥भय लज्जा निंदा प्रयत्न । शोक साक्षेप कृतघ्न । आर्जव मैत्री बहुभाषण । हही घोर वृत्ति ॥५५॥ऐसें कोठवरीं बोलावें । प्रपंचाचें लक्षण बरवें । दान कर्म धर्म हीं आवघे । राजोगुणीं घोरवृत्ति ॥५६॥आतां तमोगुण तो निरर्थक । प्रपंच ना परमार्थ ना लौकिक । वृथामात्र आयुष्याचा घातक । मूढवृत्ति ॥५७॥सदां आळस असावा । असावधता प्रमाद जाणावा । किंवा काळ निद्रेंत जावा । हे मूढवृत्ति ॥५८॥सत्त्वगुणाची शांतवृत्ति । क्षमा तितिक्षा दया शांति । विरक्ति श्रद्धादि संपत्ति । शम दम प्रकार ॥५९॥श्रवण मनन सारासार । मुमुक्षुता परमार्थ उद्गार । त्यागाचि करी सर्व संवसार । हेचि शांतवृत्ति ॥९६०॥सदा सत्संग आवडे । सच्छास्त्राचें अति कोडें । सर्वभूती आत्मता जोडे । हेचि शांतवृत्ति ॥६१॥ऐसें हे चिन्ह शांतवृत्तीचें । हेलावे उठती सत्त्वगुणाचे । परी ते दोनी उत्पन्न सुखाचे । नाश पावनां दुःख ॥६२॥तयासी केवळ सुख न म्हणावें । सुखदुःख वृत्तीनें शीण पावे । तस्मात् हे विकार जाणावे । सत्त्ववृत्तीचे ॥६३॥हे वृत्ति रज तमा निर्दाळी । पाडी परमार्थाचिये सुकाळीं । उद्भवतां मात्र होय वेगळी । निमतां मेळवी सुखा ॥६४॥तस्मात् उद्भवतां होतसे विकार । यास्तव केवळ सुख नोव्हे निर्विकार । एवं घोर मूढ शांत प्रकार । तीन त्रिगुणांचे जोवरी उद्गार त्रिगुणांचे । घोर मूढ कीं शांतवृृत्तीचे । हे दायक असती सुखदुःखाचे । तों काल कैचें आत्मसुख या तिहीं वेगळी उदास वृत्ति । उगीच समान वृत्तीची स्थिति । त्रिगुणाचीहि नव्हेचि उत्पत्ति । सहजपणें स्तब्धता इंद्रियाविषयांचें विस्मरण । विवेकादिकांहि नातळे मन । आळसादि नसतां सावधान । हे उदासवृत्ति ॥६८॥स्तब्धता परी जड नव्हे । सावध परी न हेलावे । उगेपणही न स्मरावें । हे उदासवृत्ति ॥६९॥ऐसिया सामान्य वृत्तिमाजीं । निजात्म सुख प्रगटे सहजीं । ते काळीं अनुभवावया दुजी । वृत्ति नसे ॥९७०॥सुखकार वृत्ति गोचर । अनुभवितसे तदाकार । तेथें हेचि मुख ऐसा उद्गार । तरी तया सुखा मुके ॥७१॥तेथें सुखरूप होऊनि असावें । आठवूं जातां भिन्न पडावें । परी तें सामान्यवृत्ती अनुभवे । मौनेंचि अंतरीं ॥७२॥पुढें वृत्ति उद्भवतां करी मनन । म्हणे काय होतों सुखसंपन्न । तया सुखांतून हेलावून । वृत्ति उमटे ॥७३॥जीवनावरून वायु जातां । किंचित् दूर धांवे शीतळता । तेवीं उगेपणापासून निघता । वृत्ति सुखाकार निघे ॥७४॥अन्यपदार्थ वृत्ति धरी । तेव्हां तें सुख हरपे निर्धारी । वायु तेवीं जातां बहू दुरी । शीतळता लोपे ॥७५॥जरी तैशीच वृत्ति हेलावून । पुन्हां त्या सुखीं होय लीन । न अवलंबी पदार्थ आन । तरी तें सुख न लोपे । ॥७६॥जरी वायू जळींच भ्रमे । तरी शीतळता न गमे । तेवीं वारंवार अनुक्रमें । वृत्ति उठे विरे सुखीं ॥७७॥तरी सुख तें न ओहटे । तदाकारत्वें स्वयें भेटे । वृत्ति हेलावून पुन्हां आटे । तया मुखामाजीं ॥७८॥परी हा अभ्यास पाहिजे केला । तरीच साधका जाय अनुभवला । तो अभ्यास पुढें असे बोलिला । तेणें रीतीं कळे ॥७९॥असो जागृतीमाजी ही बुद्धिवृत्तीचा । उगेपणा होय जेव्हां साचा । तत्काळीं स्वात्मसुखाचा । अनुभव होय ॥९८०॥जरी वृत्ति होय गुणाकार । तरी त्या सुखाचा पडे विसर । सुखदुःखें शिणे विकार । धरी अन्याचा ॥८१॥रविदत्ता तूं ऐसें म्हणसी । कीं सुख होतसे शांतवृत्तीसी । परी नाश होय जेव्हां तयेसी । म्हणोनि विकारी ॥८२॥तैशीच उदासवृत्ति ह स्वयमेव । तेथें स्वसुखाचा अनुभव । इचाही नाश होय सदैव । तरी त्यातें अंतर कोणतें ॥८३॥उगेपणा जे उदासवृत्ति । आणि सत्त्वगुणाची शांतवृत्ति । उद्भव सुखाचा दोहींप्रती । आणि नाशही सारिखा ॥८४॥तस्मात् तिशीं इशीं कोण अंतर । कल्पिसी ऐसा निर्धार । तरी पाहें पुरतें महदंतर । तया ययासी ॥।८५॥सत्त्वगुणाची जे शांतवृत्ति विकारसुखें सुखी होती । अथवा विवेकें जरी सुखानुभूति । घेऊन मी सुखी भावी ॥८६॥तें सुख मीं घेतलें । मींच मुखरूप ऐसें भाविलें । परी तें सुख नव्हे जें संचलें । अनुभाव्यरूप ॥८७॥मानिलें तें क्षणभरी राहे । पुन्हां दुःखरूपता लाहे । तस्मात् शांतवृत्तींत सुख आहे । म्हणे कवणु ॥८८॥तैशी नव्हे उदासवृत्ति । उगेपणें त्या सुखा अतौती । मिळोन जाय सहजगति । वेगळी न निघे ॥८९॥मी सुखी आहे हा उद्गार । नाहींच नेघे अणुमात्र । परी मी असे तत्सुखाकार । हेंही नाहीं ॥९९०॥क्षणभरी तरी स्थिर राहे । परी त्या सुखीं ऐक्यता लाहे । उठून जरी हेलावे पाहे । तरी विकार न घेतां मिळे ॥९१॥उठतांही अन्य सुखाचा विकार । नेघे म्हणोनि निर्विकार । पुन्हां होता तत्दाकार । ऐक्यत्वा मिळे ॥९२॥मागृति म्हणसी कीं विकार पावतां । तें सुख न जाय तत्त्वता । परी पाहें अंतरीं पुरता । तें न नासे वृत्ति नासे ॥९३॥पहिलें सुख अखंड भरलें । वृत्ति सुखदुःखीं तरी संचलें । मात्र वृत्तिसीच सुखदुःख जालें । वेगळी पडली म्हणानी ॥९४॥जेव्हां वृत्तीनें विकार सांडिला । तिहीं गुणाचा अभाव जाला । सहजगति उगेपणा उरला । तेव्हां मिळे त्या सुखीं ॥९५॥क्षणभरीं सुखीं समरसली । तदाकारत्वा अनुभूति बोलिली । पुन्हां तेथोनि विकार पावली । तें सुख त्यागोनी ॥९६॥म्हणोनि सुख वृत्तीचें हरपलें । परी निजसुख नाहीं उणें झालें । तें नासे तरी विकार जातां भेटलें । वृत्तिस सुख केवीं तस्मात् तें सुख असे निबिड । जें सुषुप्तीमाजीं निरोपिलें वाड । तेथेंच जागृतीमाजीं होतसे पवाड । उदासवृत्ति ॥९८॥तैसें शांतवृत्तींत कोठें । वाउगी सुखाचि म्हणून उठे । परी तें मुख नव्हे मानिलें गोमटें । तेही आटे सुखदुःखें ॥९९॥तस्मात् तिन्हीही वृत्ति त्यागून बुद्धिवृत्तीचें उगेपण । त्या उदासवृत्तीच्या भावें कडून । जागरी सुख भेटे ॥१०००॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.