सार्थ लघुवाक्यवृत्ती/ओव्या ८०१ ते ९००

विकिस्रोत कडून

<poem> तस्मात् कांहीं साधनाविण । सुषुप्तिसुख असें गहन । अमुक एक प्रयोजन । पाहिजे ऐसें नाहीं ॥१॥जैसी पतिसंगे पतिव्रता । सुखैक भोगितसे तत्वतां । व्यापार सर्वही नेणतां । बहिरंतरीचे ॥२॥घरधंदा हें बहिर्व्यापार । आंतील तांबुलादि शृंगार । या दोहींचाही पडे विसर । मैथुनकाळीं ॥३॥तैसा जागृतीचा व्यापार वृत्तीनें । आणि स्वप्नींचाही भास नेणें । एक आत्मसुखीं समरसणें । त्यागुन द्वैता ॥४॥मैथुनकाळीं कामिनीसी । अंतर्बहिर्नेणवे शब्दासी । तेवीं आलिंगन पडे वृत्तीसी । स्वप्न जागर न स्मरे ॥५॥हेंही बोलणें द्वैताचें । सुषुप्तींत सुखग्रहण तरी कैचें । एक निवर्तन नव्हे नेणिवेचें । ह्मणोनि बोलावें ॥६॥असो रविदत्ता या निरोपणीं । सावध अससी कीं अंतःकरणीं । अस्ति भाति प्रियत्व तिन्ही । सुषुप्तींत आले ॥७॥स्वप्न जागृती दोन्ही नसती । भाति प्रियांतही मावळती । तरी त्या अवस्था सत्य होती । कोणे काळीं तरी ॥८॥तस्मात् जागृति स्वप्न असतां । उभयांसीही न ये सत्यता । अस्तित्वेंवीण भाति प्रियता । असे कवणासी ॥९॥भ्रमेंच जरी आहेसें मानिलें । तरी काय तेथें सत्यत्व आलें । वृक्षस्थें पडिलिया जरी देखिलें । तरी काय जळीं खरा ॥१०॥डोळे झांकितां पडिला न दिसे । तेव्हां मावळून वृक्षस्तीं समरसे । मा पाहतां काय जळीं असे । खरा पडिला ॥११॥तैसी जागृति स्वप्नव्यापारा । सत्यता नये सुप्तीमाझारा । मा असतां काय हा भास खरा । सत्यत्वें जाला ॥१२॥हे असो स्वप्नजागृती । जालीच नाहीं ना होणार पुढती । तरी काय वास्तविक हे सुषुप्ति । होईल तिहीं कालीं ॥१३॥कार्य जें का प्रत्यक्ष दिसलें । तें विवेकें मिथ्या केलें । मा त्याचें कारण जें अनुमानिलें । तें सत्य कैसें ॥१४॥कारण अज्ञान तों निःशेष नसे । कार्यामुळें मानिजे आहेसें । तें कार्यचि जालिया वायसें । तरी कारण तें कोठें ॥१५॥देहादिकां आपणसें मानिलें । तेव्हा जाणावें विस्मरण आपुलें । त्या देहद्वयाचें मीपण त्यागिलें । तरी उरे केंवी अज्ञान ॥१६॥जळीं पडिलाचि नाहीं खरा । तरी नेणपणासी कैंचा थारा । तेवीं मिथ्यत्व येतां उभय व्यापारा । अज्ञान नाहींच ॥१७॥परी सत्य आपण नेणिवेपरता । वृत्तीस कळावें अपरोक्षता । तेव्हांचि हे देहद्वय असतां । मिथ्या स्फुरती ॥१८॥जरी गुरु शास्त्राचे वचनीं । मिथ्या मानिलें विश्र्वास ठेवूनी । तरी ते नव्हे मिथ्या असोनि । स्वानुभवावीण ॥१९॥तो स्वानुभव जागृतींत यावा । आपण निजात्मा । हा प्रत्यय व्हावा । तरीच देहाचा मीपणा जावा । निपटूनियां ॥८२०॥तें निरोपण पुढें तुज । कीजेल तया रीती समज । येथें बोलिलें असे सहज । सत्य मिथ्या कळावया ॥२१॥तिहीं काळीं जें एकरूप आहे । तो आत्मा सत्य विवेकें पाहे । केव्हां न राहे । तें तें मिथ्या अनात्मा ॥२२॥जागृतीमाजीं स्वप्नजागृति । निःशेषच हरपून जाती । तस्मात् एक होता दोन्ही मावळती । ह्मणोनि अवस्था मिथ्या ॥२४॥आत्मा जो अस्ति भाति प्रिय तिहीं अवस्थेत एकला अद्वय । तस्मात् सत्य आत्मा हा निश्चय । विवेकें निवडावा ॥२५॥एवं असज्जडदुःखरूप अनात्मा । वृत्त्यादि देहांत भास जीवात्मा । आणि एक मुख्य ब्रह्मप्रत्यगात्मा । अस्तिभातिप्रियात्मक ऐसे सत्य मिथ्या दोन्ही । यथार्थ निवडिले निरूपणीं । हेंचि विवेचन मुमुक्षूंनीं । अत्यादरें करावें ॥२७॥येथेंही रविदत्ता कोणाची । आशंका असे मंदप्रज्ञाची । तेचि अवधारी आधीं साची । पुढें उत्तर बोलूं ॥२८॥दोनची पदार्थ निवडिले । सत्यमिथ्या हे वेगळाले । या दोहींतून अज्ञान जालें । तेंचि कवणा ॥२९॥दृष्टांतही जो दिधला । जळीं बुडे आणि वृक्षीं बैसला । हेही दोनची परि विस्मर जाला । वृक्षीं बैसणारा ॥८३०॥जळीं पडला तो नाहींच खरा । तेथें भाव नसे स्मरविस्मरा । तस्मात् वृक्षीं जयासी असे थारा । तोचि विसरला आपण तैसें स्थूलादि तों हें जड असे । वृत्त्यादि चंचल पाणिया ऐसें । त्यांत प्रतिबिंब जीव हा आभासे । हें तरी मिथ्या ॥३१॥तयासी जाणणें कोठें खरें । कीं तो मुख्य आत्मया विसरें । तस्मात् मुख्य आत्मा जो निर्विकारें । तयासीच अज्ञान ॥३३॥आत्मा आपआपणा विसरला । जीवाकडे पाहूं लागला । त्यासीच मी म्हणून बैसला । तस्मात् अज्ञान आत्मा ॥३४॥ऐशी मंदप्रज्ञाची आशंका । येणें निर्विकारा आला झोंका । तरी याचें उत्तर सावध ऐका । जे जे श्रवणार्थी ॥३५॥हें निरूपण उपक्रमी । प्रांजळ केलें असे आम्ही । तथापि हा संशय अंतर्यामीं । फिटावया बोलूं ॥३६॥वृक्षीं बैसलिया जाली विस्मृति । हे सत्य परी पहावी पुरती । पहिली सर्वांगदेखणी दशा होती । नेत्र झांकितां कीं उघडितां आंधारी आपआपणा । प्रत्यक्ष जरी दिसेना । परी नखशिखांत असे देखणा । हा मी म्हणोनी ॥३८॥ऐसिया सामान्य देखणिया । विशेष देखणेंही बोलणें वांया । तेथें विस्मरण पडलें कैसिया । परी सांगा ॥३९॥सामान्य नखशिख जो देखतां । तेथें नेत्र उघडोनि पाहता । तेंचि एकदेशी पाहणें खालुता । मुख्य सामान्य हें नव्हे ऐसें एकदेशी पाहणें उद्भवले । तया पाहण्यासी विस्मरण जाईलें । हे दोन्हीही असती नाथिले । पुरुषाच्या ठायीं ॥४१॥ऐसें एकेदशी जरी पाहतसे । परी बैसला त्यांचें विस्मरण नसे । विसरेच तरी मुंगी कळतसे । स्पर्शतां तें कवणा ॥४२॥मी पडलों मज काढा म्हणे । विसरे तरी केवीं होय बोलणें । तस्मात् सर्वांगी जें असें देखणें । तया लोप नाहीं ॥४३॥तस्मात् सामान्य देखणेंदशेसी । विकार नव्हे निश्चयेंसी । आणि जळींही पडलियासी । स्मर ना विस्मर ॥४४॥मध्येंच तिसरे जालें उत्पन्न । तेंचि कीं पडणारासी कारण । हाचि दृष्टांत समान । विचारें पहावा ॥४५॥किंचित् वृत्तीचे स्फुरण नसतां । वृत्ति अभावाचा जो जाणता । तेथें ज्ञान कीं अज्ञान वार्ता । लावी कवणा ॥४६॥तेथें न होऊन स्फुरण जालें । जैसे रज्जूवरी सर्प उमटले । तेचि माया तयें नाथिले । पण अनादि ॥४७॥निर्विकार जो सामान्य देखणा । जैसा तैसा परिपूर्णपणा । त्या अनंतरूपी माया स्फुरणा । उद्भव जाला ॥४८॥जितुकें स्वरूप सच्चिद्धन । तितुकें जरी होतें स्फुरण । तरी हें स्वरूपाचें लक्षण । म्हणों येतें ॥४९॥समुद्रामध्ये जैशी राई । इतुकी स्फूर्तीची असे नवाई । तेही वंध्यापुत्राची आई । जाहली ना होणार पुढें ॥८५०॥एकेकाहून दशगुणें वाड । सप्तावरणात्मक हें ब्रह्मांड । येवढें विस्तीर्ण तें असे झाड । या मायाबीजाचें ॥५१॥येवढी विस्तीर्ण जे पृथ्वी । उदकाचे एकदेशीं जाणावी । तिच्याही दशगुणें वोळखावी । ब्रह्मांडरचना ॥५२॥त्यामाजीं स्वर्ग मृत्यु पातळ । वसिन्नले हे सकळ । अवघा मिळून हा भुगोळ । सप्तद्वीप असे ॥५३॥त्या द्वीपामाजीं जंबुद्वीप । त्यांत नवखंडें अल्प अल्प । त्यांत भरतखंडामाजीं जल्प । नाना ग्रामें पुरें ॥५४॥त्यांत एका ग्रामा एक घर । त्या घरायेवढेंही नाहीं शरीर । तया शरीरीं उमटला प्रकार । स्फूर्तिविकाराचा ॥५५॥हें असो देह मानवाचा । परी अत्यंत सान जो कीटकाचा । त्यांतही विकार या वृत्तीचा । उमटे इतुकाची ॥५६॥एवं स्फूर्ती ब्रह्मादिकांपासून । कीटकांत विभागली संपूर्ण । तितुक्याचि देहासी मी म्हणून । बैसली असे ॥५७॥एवं स्फूर्तिचा सानपणा ऐसा । स्वरूपाचे एकेदेशीं अल्पसा । तेथेंचि ज्ञानाज्ञानाचा ठसा । उमटला असे ॥५८॥ब्रह्मात्मयाचें स्वरूप केव्हढें । की जयाच्या एकेदशीं ब्रह्मांडें । आकाशही जेथें बापुडें । समुद्रीं राई ॥५९॥जयाचा अंतचि न लगे किती । शेवटचे नाहीं जयाप्रति । परि समजावया दृष्टांतीं । कांहींसें आकाश ॥८६०॥आकाशाचाही अंत न लगे । तैसाचि ब्रह्मात्मा निजांगें । गगनावीण नसती रिते जागे । तेवीं आत्मा सघन ॥६१॥परी आत्मा असे ज्ञानघन । आकाश शब्दगुणीं अज्ञान । म्हणोनि भेद हा भिन्नभिन्न । स्वरूप गगनाचा ॥६२॥आकाशीं पोकळपणा वसे । स्वरूप सघन भरलें असे । आकश आवकाशरूप भासे । निराभास ब्रह्म ॥६३॥परी आकाशाचा पोकळपणा । वाउगी करीतसे कल्पना । दृष्टीसी बैसले पदार्थ नाना । ते ते घन वाटती ॥६४॥इकडे तिकडे पदार्थ असे । मध्यें भावी कांही नसे । उगाची पोकळपणा दिसे । परी ते पोकळ न म्हणावें ॥६५॥आकाश जरी कोठें नसावें । तरी पोकळ ऐसें म्हणों यावें । सर्वध्यापक असतां स्वभावें । आकाश कैंचा ॥६६॥तस्मात् आकाशही व्यापक पूर्ण । तैसाची ब्रहात्मा सधन । दोहींचा अंत पाहणें । कवणा न घडे ॥६७॥आकाशी गड एक निर्मिला । त्यांतही अवकाश सांठवला । बाहेरी तो किती अंत लागला । न वचे कवणा ॥६८॥तसाची ब्रह्मात्मा परिपूर्ण । त्यामाजीं ब्रह्मांड झालें निर्माण । त्या ब्रह्मांडी आत्मा हा सघन । बाह्य तो अमर्याद ॥६९॥मठपाधीमुळें गगना । आंत बाहेरी जाहली कल्पना । गगनामाजीं गडाची रचना । तया मठीं आकाश ॥८७०॥तैशीच ब्रह्मांड उपाधि जाहली । त्यास्तव अंतबाह्य कल्पना केली । ब्रह्मीं ब्रह्मांडरचना उद्भवली । ब्रह्मांडीं ब्रह्म ॥७१॥मठामाजीं घट भिन्न भिन्न । त्या घटा आंत बाहेर गगन । आकाशीमाजीं घट तोही पूर्ण । गगनें भरिला ॥७२॥तैसें ब्रह्मांडी नाना पिंड । त्या आंत बाहेरी आत्मा वाड । आत्मयामाजीं देहाचा पवाड । कीं देहीं आत्मा ॥७३॥जो ब्रह्मांडीं तोचि पिंडीं असे । एकाचि घटीं मठींही आकाश जैसें । राईसमस्थळ रितें नसे । आत्मया गगनावीण ॥७४॥पाहें पाहें रविदत्ता येवढा । आत्मा सघन पूर्ण उघडा । त्यांत देहाचा साकार बापुडा । त्यामाजीं ते स्फूर्ति ॥७५॥इतुकी सानसी हे वृत्ति । सर्व जगातें जाली कल्पिती । म्हणोनि हेंच कारण सर्वांप्रती । इसीच माया हें नाम ॥७६॥इचा सानपणा तरी येवढा । परी उठतांं गवसणी घाली ब्रह्मांडा । परंतु ब्रह्मात्मा जो किती उघडा । इसी जाणवेना ॥७७॥तो जाणे यया स्फुरणासी । परी हे न जाणे बापुडी तयासी । इचिया आद्यमध्यअवसानासी । स्वप्रकाशें जाणे ॥७८॥जेधवां हे उत्पन्न नव्हती । तेधवां स्वप्रकाश चिन्मूर्ति । ज्ञान कीं अज्ञान नसतां चित्तीं । स्वसंवेद्य असे ॥७९॥तोचि अविनाश ज्ञानघन । अनंद अनंत परीपूर्ण । तयाचें यथार्थ केलें निरूपण । तुज यथामति मागां ॥८८०॥तो आत्माचि असे अज्ञान । मानीत असती मूर्ख जन । तयाचें व्हावया निरसन । बोलणें लागे ॥८१॥ब्रम्हात्मा कैसा किती केवढा । तयाचा साकल्य जाला निवडा । वृत्त्यादि देहांत हा बापुडा । उद्भवही कळला ॥८२॥आतां ज्ञान अज्ञान हें कवणासी । आहे निश्चयेसी । जे कां मायास्फुरण एकदेशी तेथेंचि हे दोन्ही ॥८३॥स्फुरण होतांचि हें सहजीं । ब्रह्मात्मा व्यापून आला त्यामाजीं । तोचि जाणता आणि हे दुजी । स्फूर्ति चंचळ ॥८४॥सर्वांग जो असे देखणा । तो जाणोचि उठतां स्फुरणां । परी त्या जाणणिया आणि चळणा । उत्पत्ति नाश आहे ॥८५॥म्हणोनि तें शबलब्रह्म म्हणावें । प्रकृति पुरुष हीं याचीं नांवें । चंचलत्व तें प्रकृतिरूप जाणावें । जाणणें तो पुरुष ॥८६॥हेचि शिवशक्ति सविशेष । अर्धनारीनटेश्र्वर विशेष । या उभयांचा परस्परें संतोष । आणि साह्य एकमेकां ॥८७॥ऐशी द्विविध रूपें एक स्फूर्ति । ज्ञान अज्ञान आलें तिजप्रति । इकडे स्फुरणा जाणें सहजगति । हेंचि ज्ञान ॥८८॥स्फुरणा इतुकेंचि जाणणें उठिलें । तयासीच ज्ञान ऐसें बोलिलें । याविरहित जें पूर्ण संचलें । तें जाणिलें नाहीं ॥८९॥तया न जाणणिया नांव अज्ञान । स्फुरण जाणिलें तेचि ज्ञानाजोंवरी हे दोन्ही न होती उत्पन्न । तों काल ज्ञाता ना अज्ञाता इकडे कळणें उद्भवतां स्फुरणाचें । तिकडे न कळणें होय स्वस्वरूपाचें । तस्मात् एका स्फूर्तीमुळें उभयांचे । विकार जाहले तेथून जें जें उत्पन्न जालें । तें तें जड चंचल नाथिलें । स्फुरणा अधिष्ठान जें संचलें । तें सत्य निर्विकारी ॥९२॥या उभयांसी ज्ञान ना अज्ञान । तस्मात् मध्यें स्फूर्तीसी हे दोन । तेंचि या सर्व जगासी कारण । सत्य सत्य त्रिवाचा ॥९३॥ज्ञान हा विकार वृत्तीचा । तैसा उद्भव हा न कळणियाचा । स्वरूपीं विकाराचि नसतां ज्ञानाचा । मा अज्ञान कासया ॥९४॥आत्मत्वीं अज्ञानाचि असतें । तरी सुप्तींत नेणीव केवीं प्रकाशितें । लय साक्षित्वें अनुभवितें । हें निरोपिलें मागां ॥९५॥तस्मात् आत्मा जाणता ना नेणता । ज्ञानघन उभयांपरता । ज्ञातता आणि दुजी अज्ञातता । एका वृत्तीसी दोन्ही ॥९६॥असो स्फूर्तीचें जें जाणणें । तेंचि ज्ञानविद्या ही म्हणणें । तेचि विक्षेपशक्तीचीं लक्षणें । निमित्ताकरण तेंचि ॥९७॥तयेमध्यें शुद्ध जाणणें आलें । तेंचि प्रतिबिंबरूपें कल्पिलें । तयासी ईश नाम ठेविलें । नियंतृत्व सर्वांचें ॥९८॥स्फुरणामाजीं जें नेणीव । न कळे स्वस्वरूप स्वयमेव । तेचि अविद्या अज्ञानही नांव । आणि आवरणशक्ति ॥९९॥तयामाजीं जाणणें आलें । त्या प्रतिबिंबा जीव नांव ठेविलें । तेंचि सुखदुःखा भोगूं लागलें । तेव्हां जन्मे मरे ॥९००॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.