Jump to content

सार्थ लघुवाक्यवृत्ती/ओव्या १७०१ ते १८००

विकिस्रोत कडून

<poem> परी शब्द असे ध्वनिरूपी । म्हणूनियां अशब्द चिद्रूपीं । तया असाम्यता गगना ॥१॥एवं भूतें भौतिकें ही साकार । आकाशादि तृणांत समग्र । हा एक जिन्नस जड प्रकार । याहून भिन्न चिद्रूप ॥२॥दुसरा जिन्नस जडचि असोनी । वाहणें असे चंचळपणीं । ऐसिये प्राणाचिये रूपाहुनी । चित्प्रभा वेगळी ॥३॥परप्रकाशें जाणों लागती । हा तिसरा जिन्नस विशेष विकृति । ययाहूनीही आत्मा चिन्मूर्ती । भिन्न असे सहज मूळ स्फूर्ति चौथा जिन्नस । जो कां हेतु सर्व विकारास । तयाच्याही रूपाहून निराभास । चित्प्रभा वेगळी ॥५॥प्रतिबिंबाचा प्रकार असे पांचवा । चित्तासारिखा आभास जाणावा । परी मुख्य चिद्रूपता स्वयमेवा । भिन्न ययाहुनी एवं मिथ्याभूत जिन्नस पांचही । उद्भवले परी जाहलेचि नाहीं । इतुकेही विकारजात सर्वही । या विलक्षण चिद्रूप पंचभूतें चारी खाणी । पांचवी ते मानसिकयोनी । एवं हे दहा प्रकार मिळोनी । जिन्नस पहिला जडरूप ॥८॥पंचप्राण कर्मेंद्रिय । हा दुसरा जिन्नस समुदाय । हा चंचळ असोनी जडमय । प्रकारें दाही ॥९॥मन बुद्धि ज्ञानेंद्रियपंचक । परप्रकाशें जाणती सकळीक । हा तिसरा असे एक । सप्त प्रकारें ॥१७१०॥चौथा जिन्नस मूळस्फूर्ति । माया अविद्या विद्या म्हणती । तयांसीच नाम आवरणादि शक्ति । परी प्रकार तीन एवं चार जिन्नस वेगळाले । पांचवें चित्प्रतिबिंब पडिलें । तयाचे दोनचि रूपें उमटले । जीव आणि ईश ॥१२॥एवं पांच जिन्नस सर्वे । पांचांचे बत्तीस होत अघवे । वेगळालीं रूपें आणि नांवें । ईशादि तृणांत ॥१३॥जडरूप जो पहिला जिन्नस । द्रव्यशक्ति नाम तयास । दुसरिया जिन्नसानी यास । क्रियाशक्ति बोलिजे ॥१४॥तिसरा जिन्नस ज्ञानशक्ति । चौथी स्फूर्ति आदिशक्ति । तयेशीच ह्मणावी इच्छाशक्ति । बीजरूप सर्वां ॥१५॥पांचवा जिन्नस चिदाभास । शक्ति जयाच्या तो शक्त जीवेश । असो ऐसे हे पांच जिन्नस । बत्तीस नामरूपें ॥१६॥पूर्व दृष्टांतीं स्मरावें । सजल घट सान थोर सर्वे । तैसेचि ब्रह्मादि कीटकांत आघवे । आणि महा भूतें जेवीं ॥१७॥जल तैसे देह सूक्ष्म । ब्रह्मादि कीटकांत सम । या सर्व समष्टीसी असे नाम । वाउगें हिरण्यगर्भ ॥१८॥या सूक्ष्माचे प्रकार तीन । प्राण आणि मन विज्ञान । चंचळ द्रव झळझळपण । जेवीं पाणी ॥१९॥तीन कोश परी दोन शक्ति । ज्ञानक्रिया सूक्ष्मीं असती । घटीं जलें जैशीं सांठवती तेवीं सान थोर देहीं ॥१७२०॥पाझर तैसें मूळ स्फुरण । जें चौथें जिनसाचें लक्षण । पांचवें ते जीवेशान । जलाकाशापरी ॥२१॥एवं घट मठ पिंड ब्रह्मांड । हे स्थावर जंगमादि जड । या विलक्षण कीं आत्मा गगनवाड । प्रत्ययें पहावें ॥२२॥सूक्ष्म देह वेगळाले । सान थोर पिंडी सांठवले । त्यांहून चिद्रूप प्रत्यया आले । जलाहून जेवीं गगन ॥२३॥मूळ स्फूर्ति कारण सर्वांसी । जे पाणियाचे उद्भवाऐसी । तया साम्यता कवणे काळेंसी । चिदाकाशा न घडे ॥२४॥हें असो प्रतिबिंब पडिलें । जलाकाशासम जीवेश उमटले । तें चिदाभासत्व न जाय उपमिलें । चिदाकाशाशीं ॥२५॥एवं जीवेश मूळ स्फूर्ति । आनंदमयता इतुक्याप्रति । मन बुद्धि प्राण इंद्रिया ह्मणती । त्रिकोशात्मक सूक्ष्म ॥२६॥स्थूलदेह तो अन्नमय । पंचकोश प्रकारें ऐशिये । जो पांच जिन्नसांचा समुदाय । बत्तीस प्रकार ॥२७॥या बत्तिसां परता पदार्थ असेना । जरी नामें असतीं अनेकधा नाना । इतुक्यांचेही रूपाहूनि भिन्ना । चित्प्रभा वेगळी चित्प्रभा एक उपलक्षण । परी सच्चिदानंद ब्रह्मात्मा सघन । यया बत्तिसांहून विलक्षण । जेवीं गगन सजल घटा ॥२९॥वेदांतशास्त्रीं जे पदार्थ दोन । एक सत्य एक मिथ्या संपूर्ण । मिथ्या तेचि बत्तीस भिन्नभिन्न । सत्य तो ब्रह्मात्मा ॥१७३०॥ऐसे हे दोन्ही निवडिले । दृष्टांतासहित स्पष्ट केले । आत्त्मस्वरूप तें भिन्न संचलें । येर बत्तिसांहुनी ॥३१॥ज्या रीतीं सजल सप्रतिबिंबाचा । दृष्टांत दिधला घटाचा । येणेंचि पाडें बोलिजेत वाचा । बहुधा दृष्टांत ॥३२॥नदींत बैसला वृक्षावरी । तैसा ब्रह्मात्मा निर्विकारी । मूळ स्फूर्तीपासून बत्तीस रूपें सारीं । प्रवाहीं पडलिया ऐशीं ब्रह्मात्मा जैसा सागर । बत्तीस रूपें तरंगाकार । ब्रह्मात्मा जेवीं गगन स्थिर । मेघादि सम बत्तीस ॥३४॥आत्मा ब्रह्म जेवीं दोरी । सर्पाऐशीं बत्तिसें सारीं । स्थाणु समान वस्तु निर्विकारी । पुरुषासम बत्तीस ॥३५॥ब्रह्मात्मा सघन जेवीं शिंप । रजतापरी बत्तिसासीं रूप । मृगजलवत सर्वांसी जल्प । सहस्रकर ब्रह्मात्मा ॥३६॥सत्य मिथ्या कळावया उद्योगें । दृष्टांत देणें लगती प्रसंगें । येऱ्हवीं कोणतें निर्विकाराजोगें । बोलूं ये वाचे ॥३७॥तस्मात् कोणेही रीतीं समजावें । मिथ्या तें मिथ्यात्वें त्यागावें । सत्य तें सत्य निश्चया आणावें । मुमुक्षें अंतरीं ॥३८॥पाहें रविदत्ता सावधान । सर्व सारांश आला ओलांडून । सत्समिथ्या गेलें निवडून । हातींच्या आंवळ्यापरी ॥३९॥ईशादि तृणांत हे बत्तीस । वाउगाचि भासला भास । या सर्वां विलक्षण निराभास । आत्मा ब्रह्म चिद्रूप ॥१७४०॥यया बत्तिसांमाजी असोनी । विलक्षण ब्रह्मात्मा पूर्णपणीं । हे बत्तीस स्वस्वविकार पावोनी । आपेआप नासती ॥४१॥हे उद्भवतां तया निर्विकारा । विकार करूं न शकती निर्धारा । लय पावतां तो ब्रह्म चिन्मात्रा । विकार कल्पी कोण असो सर्वांचे रूपाहूनी । आत्मा ब्रह्म पूर्णपणीं । मा बत्तिसाचे व्यापारालागोनी । आतळे कैसा ॥४३॥अमुक अमुक तत्त्वें मिळतां । व्यापार होतसे कर्मापुरता । तया गुणदोषात्मकाची वार्ता । ब्रह्मात्मया केवी ॥४४॥तथापि अज्ञान जनीं मानिली । तरी ही आत्मत्वीं नाहीं स्पर्शिली । वाउगीच स्वतां जाऊन पडली । जन्ममरणप्रवाहीं तेचि गुणदोष जीवें कल्पिलें । जे गत श्र्लोकीं निरोपिलें । तेचि मागुति पाहिजे बोलिले । मीपण त्यागावया ॥४६॥जैसा आत्मा सर्व रूपाहूंन । सहजीं सहज परिपूर्ण । तैसाचि गुणदोषा विलक्षण । सहज परी बोलिजे ॥४७॥गुणदोषाभ्यांकेवलचिति विविक्ता गुणदोषाहुंनी केवल चिति । वेगळाचि असे सहजगति ं बत्तीस जरी विकारा पावती । तरी ते निर्विकार ॥४८॥येथेंही रविदत्ता सावधान । हें निष्कर्षाचें असे निरोपण । गुणदोषांहून विवेचन । होय आत्मरूपाचें ॥४९॥गुणदोष म्हणजे व्यर्थ कल्पना । अज्ञानें माथां घे मीपणा । सहजीं होताती व्यापार नाना । ते ते आपणा मानीत तो मीपणा जरी न मानितां ॥१७५०॥तरी व्यापार होतीलचि तत्त्वतां । परी मीपणें घेतसें बद्धता । सहज होतां मुक्ता ॥५१॥आधीं सहज कैसे होत असती । तेंचि बोलिजे अल्प रीती । सहजचिं गुणदोष उमटती । सहज चिति वेगळी ॥५२॥प्रथम स्थूल देह अन्नमय । जो रक्तरेतापासून होय । पंचवीस तत्वांचा समुदाय । पंचीकृताचा ॥५३॥रक्तरेत मिळतां जठरीं । गर्भ वाढूं लागे अंतरीं । गुण वाढे सांग गर्भ जरी । सलादि होतां दोष ॥५४॥जन्मकाळीं आडवा भरतां । हाचि दोष शिणतसे माता । यथा युक्त सहजीं जन्मतां । गुण होय स्वपरा ॥५५॥स्वरूप सांग तरी तो गूण । अरूप व्यंग दोषाचें लक्षण । पुढें वाढूं लागतां विपरीतपण । हाचि दोष ॥५६॥गुण होय सरळ वाढतां । पुढें पावला तारुण्यता । तेथेंही गुण होय युक्त वर्तता । अन्यथा दोष ॥५७॥वृद्धकाळीं तो दोष बहुत । गुणही असती किंचित । मृत्यूकाळ तो कठिण अत्यंत । त्वरें मरतां गुण ॥५८॥एवं जन्मापासून मरणवरी । सहजीं देह नाना विकारी । गुण दोष उमटतीच निर्धारी । हें अन्यथा नव्हे ॥५९॥तितुके गुणदोष जरी सांगावे । तरी धरणी लिहितां न पुरवे । तस्मात अल्प संकेतें समजावें । गुणदोषांचें पात्र हें मग असो देव कीं मानव । कीटक अथवा गो अश्व । स्थावर कीं जंगम स्वयमेव । परी देह तेथें गुणदोष ॥६१॥केचित गुणचि दोषाकार होती । केव्हां दोष गुणाऐसे उमटती । परी साकार । तितुकें जाहलें असती । सहजीं गुणदोषात्मक ॥६२॥असो स्थूलदेहा अंतरीं प्राण । तेथेंही असती दोषागुण । गुण वाटे होतां पिंड पोषण । अन्यथा दोष ॥६३॥हें असो दहाही इंद्रिय । मन बुद्धि स्फूर्ति मायामय । विद्या अविद्या जीवेश उभय । हें सर्वही जितुकें ॥६४॥हें सर्वही मिथ्यस्वें जाहलें । जाहलें तया गुणदोष लागले । ते धर्मधर्मी पूर्वी सांगितले । धर्म तेथें गुणदोष ॥६५॥सर्प चोर उमटतां भीति । रजत भासतां हर्षें मति । तैसे हे ईशादि तृणांतीं । बत्तीस गुणदोषात्मक ॥६६॥व्यापारापूर्वीं वेगळाले । देहीं असतां स्थिर उगले । तेथेंही गुणदोष असती संचले । मा व्यापारी तो उत्कर्ष ॥६७॥व्यापारी बहु तत्वें मिळती । जेव्हां जागृदादि अवस्था होती । तया समयीं तों अतिविकृति । गुणदोषाची ॥६८॥अंतःकरणास्फूर्ति वायु व्यान । तयाचें द्वारें वाणी श्रवण । बोले ऐके परस्परेंकडोन । होऊन भोग्यभोक्ता ॥६९॥अन्य बोलतां ऐके सावध । तो अंतःकरणीं आदळे शब्द । तेव्हांचि उठे प्रिति काम कीं क्रोध । हेचि अति गुणदोष येथें रविदत्ता ऐसें मानिसी । कीं पांचचि तत्वें व्यापारासी । परी ईशादि देहांत बहु तत्वांसी ं अपेक्षा असे ॥७१॥अंतःकरण व्यान श्रोत्र वाचा । पांचवा उच्चार शब्दाचा । हा व्यापार ययाची पांचांचा । परी अन्यासीही अपेक्षी साकार देह तो पाहिजे। जीवे तो विषय हा स्फुरविजे । विद्या अविद्यात्मक स्फूर्ति सहजे । असे व्यापारीं ॥७३॥मन बुद्धि चित्त अहंकार । हेही पाहिजेताति समग्र । हें असो ईशही निरहंकार । प्रेरी गुणदोषां ॥७४॥जेवी सेनोचा जय पराजय । तो राजयासी आरोप होय ।तैसे शुभ कीं अशुभ होतां कार्य । ईशावरी आरोप ॥७५॥राजआज्ञेवत ईश प्रेरी । परी तो अकर्ता असे निरहंकारी ।अन्यें कर्तृत्व आरोपिजे जरी । तरी तो नित्यमुक्त ॥७६॥ईशाचि मुक्त ह्मणणें काय । जीवही बद्ध कदां न होय । परी अंकर्तृत्वाची नेणे सोय । ह्मोणोनि साभिमानें बद्ध ॥७७॥असो जीवेश विद्या अविद्यास्फूर्ति । मनादि चत्वार अंतःकरणवृत्ति ।व्यान श्रोत्र वाचा शब्द निश्चिती । हा इतुका संघ मिळे ॥७८॥तेव्हां ऐकणें बोलणें दोन्ही । व्यापार होत असती जनीं । आणि गुणांचीही होय उभवणी । सत्वादिकांची ॥७९॥बोलणार जो गुणें उठें । तरी ऐकणार कामक्रोधें दाटे ।तेथें दोषचि अधिक पेटे । मग परस्परे कलह ॥१७८०॥बोलका सत्वगुणीं मधुर । तरी शांतता पावे ऐकणार ।तेव्हां गुणचि उमटे परस्पर । संवादसुख होय ॥८१॥एवं संघ मिळतां गुणदोष उमटती । गुण तरी अतिशय उठे प्रीती ।दोष तरी मारिती कीं मरती । ऐसें कार्य गुणदोषांचें ऐसा व्यापार गुणदोषात्मक । सांगितला संघाचा एक । ऐसेचि चारी होती आणिक ।तेही संक्षेपें बोलूं ॥८३॥मन समान त्वचा पाणी । स्पर्शविषय पांचवा मिळुनी । व्यापार स्पृष्टव्य देणीं घेणीं । अन्य तत्वें अपेक्षी ॥८४॥देह बुद्धि अहंकार चित्त । विद्या अविद्या स्फूर्तिसहित । जीव ईशा साह्य असत । आणि गुणही तिन्ही ॥८५॥डोळे झांकुन जरी बैसला । परी स्पर्श होतां अंतरीं कळला ।सर्प जरी दचकुन मेला । स्त्री तरी सुखावे ॥८६॥बुद्धि उदान नयन चरण । पांचवा रूप विषय पूर्ण । होत असे पाहणें चालणें । परी अन्य तत्वें अपेक्षी ॥८७॥देह मन चित्त अहंकार । विद्या अविद्यात्मक स्फूर्ति प्रकार ।त्रिगुण आणि जीव ईश्र्वर । साहाकारा असती ॥८८॥सन्मुख देखतां रूप चांगुलें । तरी हर्षुन अति सुख जाहलें ।विरूप पाहून भय घेतलें । एवं गुणदोषात्मक ॥८९॥चित्त प्राण जिव्हा उपस्थ । पांचवा रसविषय यथार्थ । अशन रति होय उपस्थित । परी अन्य तत्त्वें अपेक्षी ॥१७९०॥देह अहंकार मन बुद्धि । विद्या अविद्यात्मक स्फूर्ति आधीं । जीवेश त्रिगुणांची मांदी । साह्यत्वा असती ॥९१॥चांगुला पदार्थ जिव्हा खाय तेव्हां सुखरूपता पुष्टि होय । अन्यथात्वें मरोनि जाय । ऐसा गुणदोष रसीं ॥९२॥तैसेंचि रतिसुख भोगितां । उत्पत्ति होय कीं मरे अवचिता । ऐशी गुणदोषाची सहजता । असे व्यापारी ॥९३॥अहंकार अपान घ्राण । गुद गंधविषय जाण । विसर्ग होय गंधग्रहण । परी अन्य तत्वें अपेक्षी ॥९४॥देह मन बुद्धि आणि चित्त । विद्या अविद्या स्फूर्तिसाहित । जीवेश त्रिगुणादि उपेक्षित । मिळतां व्यापार घडे ॥९५॥सुगंधें अत्यंतचि सुखावें । दुर्गंधें कासाविस व्हावें । विसर्गें वांचावें कां मरावें । एवं गुणदोष गंधीं ॥९६॥जीव व्यापार उंदड करिती । कृष्यादि अथवा कर्में निपजती । परी अवघ्या पांचाचि वृत्ति । ब्रह्मादि कीटकांत ॥९७॥एका देहाचे पांच समजतां । सर्वांचे अनुभवा येती तत्वां । असे पंचविषय जागृति असतां । होती गुणदोषात्मक हेचि पांच व्यापार स्वप्नीं । होत असती जीवा लागोनी । जरी देह विषय प्रत्यक्षपणीं । नसती तेथें ॥९९॥परी देहाचा आणि विषयाचा । आभास घेऊनियां साचा । व्यापार करीत असे गुणदोषांचा । अन्य जो उरला संघ विद्या ॥१८००॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.