सार्थ लघुवाक्यवृत्ती/ओव्या १८०१ ते १९००

विकिस्रोत कडून

<poem> अविद्यात्मक मायास्फूर्ति । जीवेश त्रिगुण चत्वार वृत्ति । प्राण दशेंद्रियें वावरती । गोलकेंविण अंतरीं ॥१॥बोलणें ऐकणें पाहणें चालणें । स्पर्शणें आणि देणें घेणें ।खाणें रति विसर्ग गंध घेणें । आभासरूपें स्वप्नीं ॥२॥तेथें हर्ष खेद होती व्यापारीं । ऐसे गुणदोष नानापरी । हे असो सुप्तीही माझारी । गुणदोष असे ॥३॥तेथें मनबुद्धीचा आभाव । इंद्रिय प्राणादिकां नसे ठाव । येक स्फूर्तिमात्र स्वयमेव । असे अविद्यात्मक ॥४॥जीवेश प्रतिबिंबे दोन्ही । असती तया नेणीवपणीं । हाचि आनंदमय कोश वाणी । बोलिजे पांचवा ॥५॥येरवीं ज्ञानादि चारी कोश । यांचा तेथें होतसे नाश । नेणीवरूपेंचि असे विशेष । प्राज्ञ अभिमानही ॥६॥असो ऐसिया सुप्तीआंत । सुखाकरिता हा गुण प्रगटत । कांहीच न कळे दोष दिसत । व्यापाराविण ॥७॥जैसे एक पिंडीं अवस्थें तिहीं । गुणदोष असती सर्वदाही । तैसेंचि ब्रह्मादि कीटकांत सर्वही । गुणदोषें व्याप्त ॥८॥हे असो भौतिकांची कथा । परी महाभूतींही सर्वथा । असे गुणदोषाची व्यथा । सहजगति ॥९॥पुथ्वी अन्नरसें तारी हा गुण । तेणेंचि विषरूपें होय मरण । तेवींच जीवनें तृषा हरण । मरे बुडतां ॥१८१०॥अग्नि हा शीत निवारित । येऱ्हवीं दहन करी समस्त । मंद वायु सुखही देत । नातरी उडवी ॥११॥आकाशीं अवकाश वाड । हाचि गुण तेथें घबाड । शून्यपणें नेणवि निबिड । हाचि दोष ॥१२॥एवं आकाशादि देहांत तृण । आणि स्फूर्तिपासूनियां प्राण ।इतुके बत्तीसही संगूर्ण । गुणदोषें भरले ॥१३॥जैसा सजल साभास घट । तेथेंहि गुणदोष स्पष्ट । आणि ओघीं पडला जो बुद्धिनष्ट । तेथें गुणदोषां उणें नसे ॥१४॥तरंग मेघ सर्प चोर । रजत मृगजलादि विकार । तेथें जैसें हर्ष भय थोर । तेवींच बत्तिशीं गुणदोष ॥१५॥असो बत्तीसांचे रूपाहुनीं ं चित्प्रभा वेगळी पूर्णपणीं ।तैशीची बत्तिसांचे दोषगुणीं । न लिंपे सहसा ॥१६॥जैसें घटजल प्रतिबिंबासहित । आकाश व्यापून अलिप्त त्यांत ।मा तयाचे गुणदोषें मिश्रित । होईल कैसें ॥१७॥आणि नदींत वृक्षीं जो बैसला । तो पडियला याहून भिन्न संचला ।तो पडल्याचे गुणदोषें मेला । हें घडेना सहसा तरंगाचिये सारिसे पाणी । विकारा नपवे त्यांत असोनि । मा उद्भवलयीं दोषगुणीं । उद्भवे मरे केवीं ॥१९॥मेघे आकाश गजबजीना । मा पाझरें केवि सरिसें जीवना ।सर्पेंही रज्जु आच्छादेना । तरी चाले केवीं त्यासवें स्थाणु चोरा ऐसा नसतां । लुटील केविं हो पांथस्था । शिंप जाहलीच नाहीं साम्य रजता । तरी हर्ष खेद दे केवीं ॥२१॥सविता न बुडे मृगजलपुरीं । तो ग्रासिला केवीं मृगजलचरीं ।हें बोलता जैशी शिणे वैखरी । तैशीच ब्रह्मात्मया अरे जो मायेसी अतीत । तो मायाविकारें केवीं चळत । मायाचि तेथें उद्भवून नासत ।तो जैसा तैसा ॥२३॥अविद्या तया आच्छादिना । विद्याही ज्ञानें जाणेना । ईशाचे प्रेरणेंत गवसेना । सर्वज्ञही नव्हे ॥२४॥मुख्य ईशाऐसें नव्हे ब्रह्म । मा सर्वज्ञादि केवीं घे धर्म ।तेथून प्रेरकत्वादि नाना कर्म । हे तो अति दूरतर ॥२५॥जीवाचे रूपाऐसें नाहीं । मग किंचिंज्ज्ञधर्म स्फुरवणें तेंही ।आणि साभिमान घेऊन बैसे देहीं । याहून भिन्न म्हणणें नको ॥२६॥बुद्धिचिये धर्माप्रति । भय लज्जादि धारणा घृति । आशा चिंता निश्चय चित्तीं । भिन्न असे पूर्णपणीं ॥२७॥मनाचे संकल्पविकल्पासी । शोक मोहो कामदिकांसी ।चित्प्रभा वेगळी निश्चयेंसी । पूर्णपणीं असे ॥२८॥चित्ताचे चिंतनापासूनी । अहंकाराचे अहंकर्तव्याहुनी ।चित्प्रभा भिन्न पूर्णपणीं । केवळत्वें सहज ॥२९॥प्राणाचे विहरणाहूनी । क्षुत्पानादि धर्मांपासूनी । चित्प्रभा भिन्न पूर्णपणीं ं केवळत्वें सहज ॥१८३०॥श्रोत्राचिये ऐकण्याहूनी । त्वचेचे स्पर्शनापासूनी । चित्प्रभा भिन्न पूर्णपणीं । केवळत्व सहज ॥३१॥चक्षूचिये देखण्याहूनी । रसनेचे अशनापासूनी । चित्प्रभा भिन्न पूर्णपणीं । केवळत्वें सहज ॥३२॥घ्राणाचे सुगंध दुर्गंधाहूनी । चहूंवाणीचे वचनापासूनी ।चित्प्रभा भिन्न पूर्णपणीं । केवळत्वें सहज ॥३३॥हस्ताचे देण्याघेण्याहूनी । पादाचे गमन क्रियेपासूनी । चित्प्रभा भिन्न पूर्णपणीं । केवळत्वें सहज ॥३४॥उपस्थाचे रतिसुखाहुनी । गुदाचे विसर्गापासोनि । चित्प्रभा पूर्णपणीं । केवळत्वें सहज ॥३५॥देहाचे संमतीपासूनी । जन्मणें वाढणें यांहुनी ।चित्प्रभा भिन्न पूर्णपणीं । केवळत्वें सहज ॥३६॥बाल्य तारुण्य वृद्धाप्याहूनी । अंतकाल मरणापासुनी । चित्प्रभा भिन्न पूर्णपणीं । केवळत्वें सहजें ॥३७॥कुरूप सुरूप लावण्याहूनी । वर्ण आश्रमादिकांपासूनी । चित्प्रभा भिन्न पूर्णंपणीं । केवळत्वें सहज ॥३८॥स्त्रीपुरुष नपुंसकाहूनी । राजा कीं रंकादिकापासूनी ।चित्प्रभा भिन्न पूर्णंपणीं । केवळत्वें सहज ॥३९॥जागृतीचे पुचवृत्तीहुनी । व्यवहाराव्यवहारापासूनी ।चित्प्रभा भिन्न पूर्णंपणीं । केवळत्वें सहज ॥१८४०॥स्वप्नाचिये पंचवृत्तीहुनी । सुप्तीचिये नेणिवेपासूनी ।चित्प्रभा भिन्न पूर्णंपणीं । केवळत्वें सहज ॥४१॥जैशी सर्व प्रपंचाहूनी । तेवींच परमार्थापासुनी । चित्प्रभा भिन्न पूर्णंपणीं । केवळत्वें सहज ॥४२॥बद्ध मुमुक्षु साधकाहूनी । तेवींच सिद्धाचे देहापासूनी ।चित्प्रभा भिन्न पूर्णंपणीं । केवळत्वें सहज ॥४३॥श्रवण मनन निदिध्यासांहुनी । तेवींच समाधिसुखापासुनी ।चित्प्रभा भिन्न पूर्णंपणीं । केवळत्वें सहज ॥४४॥जेवा येक पिडतादात्म्याहूनी । तेवीं कीटकादि ब्रह्मयापासूनी ।चित्प्रभा भिन्न पूर्णंपणीं । केवळत्वें सहज ॥४५॥पृथ्वीचे धारणादिकांहूनी । आपाचे क्लेदनापासोनी ।चित्प्रभा भिन्न पूर्णंपणीं । केवळत्वें सहज ॥४६॥तेजाचे दहनादिकांहूनी । वायुचे विहरणापासूनी ।चित्प्रभा भिन्न पूर्णंपणीं । केवळत्वें सहज ॥४७॥आकाशाचे शून्यपासुनी । अवकाशादि धर्माहूनी ।चित्प्रभा भिन्न पूर्णंपणीं । केवळत्वें सहज ॥४८॥जैसें घटजल जलाभासी । गगन भिन्न पूर्णपणेंसी ।अथवा सर्पादि नाना दृष्टांतासी । रज्जावादि भिन्न ॥४९॥तेणें रीतीं पिंड ब्रह्मांड । मायास्फूर्तीचें मिथ्या बंड ।या सर्वांहून ब्रह्मात्मा निबिड । सहजीं भिन्नरूप ॥१८५०॥पूर्वपदीं ईशादि तृणांत । रूपादि विकारजात समस्त । त्याहून भिन्न चिद्धन अनंत । निरोपिलें असे ॥५१॥यया पदीं ईशादि तृणादिकांचे । गुणदोष जे धर्म सर्वांचे । तितुक्यांहुनही विलक्षण सांचे । केवलत्वें बोलिलें ॥५२॥हें आजि बोलिलें म्हणोन । नूतन भिन्न नव्हे विकाराहून । पहिलेंचि असे चिद्रूप पूर्ण । अनंत कल्पें होतां ॥५३॥चिद्रूप एक नाम घेतलें । हें उगेचि उपलक्षण केलें । परी सच्चिदानंद अनंत संचलें । परिपूर्ण सर्वांहुनी ॥५४॥ऐसा आत्मा ब्रह्म परिपूर्ण । तेंचि कीं स्वयें सर्व असून ।कैसें हे नेणो पडिलें अज्ञान । अभिमानें अन्य जाहलें ॥५५॥स्फुरणादि देहांत नसून जाहले । उपाधीसी उपाधीनें देखिलें । देखिल्यासाठीं सत्यचि केलें । मी हाचि म्हणोनी ते देह तरी बहुत होती । एक त्यागून एक पावती । परी मीपण याचे न त्यागिती । कवणेंही काळीं ॥५७॥अन्य योनीस तों काय म्हणावें । मूढचि असती पश्वादि सर्वें । परी देव दैत्य मानवें । हे तो ज्ञानाधिकारी ऐक्यज्ञानासी पात्र असतां । नेणती कोणी ब्रह्मात्मैक्यता । बळेंचि घेऊन बैसले अहंता ।देहबुद्धीची ॥५९॥मीच जन्मलों मीच सुरूप । मीच स्त्री पुरुष मीच कुरूप । मीच वाढतों तरुण वृद्धाप्य । पावलों मीच मरें ॥६०॥नेणें देहीं बहु समुदाय । नेणती कैसा व्यापार होय ।उगाचि देह हा मांसमय । सचेतनचि मानी ॥६१॥मी चालतों बोलतों पाहतों । देतों घेतों वास घेतों । खातों स्पर्शतों सुख भोगितों । पूर्वकर्मवशें ॥६२॥मीच पापपुण्यात्मक कर्म । अंगें करितसें स्वपरधर्म । तेंचि भोगीन अचुक जन्म । उत्तमाधम घेऊनी ॥६३॥मागां हे बहुधा निरूपिलें । अकर्तियानें कर्तृत्व घेतलें ।लोकद्वयीं संचरू लागलें । जन्ममरणप्रवाही ॥६४॥तेंचि प्रस्तुत प्रसंगा ऐसें । मीपण दाविलें कांहीसें । हें असो जागृतीचें पिसें । मीपण स्वप्नींही गळेना ॥६५॥तेथें देहध्यासासी मी म्हणून । बैसला सुखदुःखें पावे शीण । तैसेंच सुप्तीमाजीं नेणीवपण । अभिमानें घेतलें ॥६६॥एवं जागृति स्वप्न सुषुप्ति । देहबुद्धिची न फिटे भ्रांति । ऐसेचि जन्मती आणि मरती । अनंत कल्पवरी ॥६७॥अनंत जन्मी अनंत साधन । करितां देहबुद्धि नव्हे न्यून । जरी पावले सत्यलोकादि स्थान । तरी बंधन तुटेना ॥६८॥हे देहबुद्धि तेव्हांचि हरे । जईं ब्रह्मात्मज्ञान साचोकारें । ब्रह्मात्मज्ञानही होय निर्धारें । निपटून देहबुद्धि जातां रज्जु रज्जुत्वें तेव्हांचि मिळे । ज्या समयीं सर्प मावळे । सर्पही तयाचि समईं पळे । यथार्थ रज्जु कळतां ॥१८७०॥एवं हे परस्परें साह्यभूत । एक मावळे एक होय निश्चित । ब्रह्मबुद्धीनें देहबुद्धि गळत । देहाभावीं ब्रह्मात्मा ॥७१॥तस्मात् मुमुक्षें एक करावें । आपुलें ब्रह्मत्व दृढ धरावें ।देहबुद्धीसीं बळें त्यागावें । विवेचनें करूनी ॥७२॥येथें रविदत्ता ऐसें म्हणसी । कीं ब्रह्मत्व कैसे अन्य जीवासी । तरी ऐकावी उपपत्ति कैशी । श्रुति अनुभवसिद्ध ॥७३॥पलंगी राजा निजेला । तो स्वप्नीं अत्यंज जाहला । दारोदारीं हिंडो लागला । अन्यासी तूं राजा म्हणे ॥७४॥तैसा आत्मा ब्रह्म स्वयें आपण । मायेनें देह केला निर्माण । तोचि होऊन बैसला कृपण । अन्य साकारा देव म्हणे तो महारपणा खरा न होये । तरी झोंप जाता कां राजपदा नये ।राजाचि असतां स्वप्नं जरी न जाये । तरीही खरा राजा ॥७६॥तैसा अज्ञानकालीं जीवपणा । किंचितही सत्यत्वें असेना ।जीवत्व जातां होय अंगें देखणा । तरी जीव ब्रह्म नव्हे कैसा जो वृक्षीं बैसलियामुळें । पडलियाचें रूप उफाळे । तो भ्रम जरी यथार्थ निवळे । तरी पडिलाचि कीं वृक्षस्थ ॥७८॥तैसा कीं जीव हा अज्ञानें जाहला । चिताऐसा भास दिसला । तें अज्ञान निमित्तां ऐक्य पावला । तस्मात् जीवचि ब्रह्म ॥७९॥घटजलीं आकाश बिंबलें । तें काय गगनींहून भिन्न पडिलें । तैसें बुद्धीस्तव आत्मया जीवत्व आलें । तरी काय मुके ब्रह्मत्वा ॥८०॥ अन्यें दोरीसी मानिला विखार । तरी कां दोरपणा मुके दोर । तैसा जीवत्व कल्पी अहंकार । तरी कां ब्रह्मत्व गेलें शिंपपणा उणाचि न होता । उगाचि रजतभाव कल्पी चित्ता । तैसाचि जीवपणा हा आरोपितां । ब्रह्मत्व न जाय तरंगाचेंचि अंग पाणी । मेघ नाहीच गगन गगनीं । तैसा जीवचि ब्रहात्मा पूर्णपणीं । दुजा नाहीं नाहीं ॥८३॥चित्रांचे निजांग ते भिंती । घटाचें निजरूपची माती । तैशी आभासीं स्वरूपता चिती । तिहींही काळीं ॥८४॥नगाचें अंगचि की सुवर्ण । चोराचें दिसणें स्थाणु आपण ।तैसा जीवचि परमात्मा चिद्घन । येथें संशय तो काय ऐशिया बहूत दृष्टांत उपपत्ति । साम्यता पडे या नांव युक्ति । येथें कोणी मानील विशाळमति । कीं नुसधी युक्ति अप्रमाण ॥८६॥तरी त्या विशाळमतीसी पुसावें । कीं त्वां शास्त्र तरी पाहिलें आघवें । श्रुतिमाउलीचे घोष बरवे । अनंत होत असती जीव ब्रह्मत्व एक लक्षण । तया महावाक्य हें अभिधान । कोठें भागत्यागें करी ग्रहण । कोठें मुख्यत्वें ऐक्य ॥८८॥तत्त्वमसि या वाक्येंकडून । अर्थ घेईजे भाग त्यागून । तैसेंचि अहंब्रह्मास्मि जें वचन । अहंत्यागें ब्रह्मप्राप्ति ॥८९॥अहं पदाचा त्याग बोलिला । तरी सर्वांश न जाय त्यागिला । विशेष त्यागून सामान्य पावला । निजांगें ब्रह्मत्व ॥९०॥हें पुढें असे निरूपण । अहं कैसें ब्रह्म कवण । येथें जीवब्रह्मैक्य प्रमाण । भागत्यागें दाविलें ॥९१॥अयमात्मा ब्रह्म या वाक्यासी । काज नसे भागत्यागासी । प्रत्यगात्मा आणि पूर्णासी । सहज ऐक्य ॥९२॥जैसें जलाकाश त्यागून आकाश घ्यावें । तैसें जीवत्व त्यागून ब्रह्मत्व लक्षावें । हें भागत्याग लक्षण समजावे ऐक्यत्वाविशीं ॥९३॥तैसें नलगे घटाकाशासी । आंतील बाहेरील एकरसी । ऐसेंचि ब्रह्म प्रत्यगात्मयासी । मुख्यत्वें ऐक्य ॥९४॥हे असो अनंत श्रुति । जीवब्रह्मैक्यता साधिती । ह्या गर्जना होती त्या नायकती । श्रोत्रपुटें तुझीं ॥९५॥ऐसें सप्रमाण सयुक्तिक । जीवब्रह्माचि पुर्ण एक । तस्मात् साधकें निश्चयात्मक । विचारें ब्रह्म व्हावें ॥९६॥नुसधी श्रुति युक्तीच प्रमाण । बोलणें नव्हें आहाच वचन । अनुभवसिद्ध जीव ब्रह्मपूर्ण । प्रतिपाद्य असे ॥९७॥पाहें पाहें ब्रह्मविद ब्रह्म । निजांगें होऊन पावलें उपरम । मागें जाहलें पुढें होणार नेम । असती वर्तमानीं ॥९८॥बोधमात्रें श्रीसद्गुरूचें । अज्ञान फिटतांचि साधकाचें । आपुलें ब्रह्मत्व जें साचें । प्राप्त जयाचें तया ॥९९॥ऐसा अनुभव ब्रह्मविदाचा । आणि साधकही पावतसे साचा । जरी जीवब्रह्म म्हणतां कैचा । तरी बहू विरोध तस्मात् श्रुति युक्ति अनुभवें कडोन । बोलतां कानकोंडें नव्हे वचन ॥१९००॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.