Jump to content

सार्थ लघुवाक्यवृत्ती/ओव्या ११०१ ते १२००

विकिस्रोत कडून

<poem> क्रिया व्यवहार जितुके । बहुधाही बुद्धीचे तितुके । जीव आभासरूपें सर्व निकें । भासविलिया होती ॥१॥पूर्वींचे इश्र्वरनिर्मित । रूपादि हे पदार्थजात । जयासी ईक्षणादि प्रवेशांत । म्हणे श्रति ॥२॥ईक्षण म्हणजे अवलोकन । करी मायावी ईशान । तया इच्छेसरिसें निर्माण । होतें जालें ॥३॥गुण भूतें निर्माण जालीं । जयेतें अष्टधा प्रकृति बोलिली । ते अविद्याचि जडत्वा आली । स्थूल सूक्ष्म ॥४॥आकाश वायु तेज आप । पांचवें पृथ्वीचें रूप । यया भूतांपासून नामरूप । बहुधा जालें ॥५॥भूतांपासून जे जालें । भौतिकत्व वेगळालें । परी तें भोग्य भोक्तृत्वें निवडिलें । चंचळ जड ॥६॥जडत्वें चारी खाणी होती । साकारत्वें भिन्न भिन्न व्यक्ति । ब्रह्मादि तृणांत जगतीं । सान कीं थोर ॥७॥हे पंचीकृत भूतांचे जालें । जें पूर्वी उपक्रमी सांगितलें । त्यांत अपंचीकृत मिळालें । सूक्ष्म तत्व ॥८॥इतुकेंही ईशें पाहून । म्हणे हें सर्व जड मजविण । चलन न पावती तरी आपण । प्रवेशावें अंतरीं ॥९॥मग ईश्र्वरें रूप आपुलें । आच्छादुनी जीवत्व घेतलें । तेंचि चहूंखाणींत प्रवेशलें । तेव्हां व्यापारती सर्व ॥१०॥ते व्यापार तितुके जीवाचे । पुढें अनुक्रमें बोलिजे वाचे । परी प्रवेश होय निर्मित ईशाचें । ईक्षणापासूनी ॥११॥आकाशी शब्द स्पर्श वायूचा । तेजाचें रूप रस विषय आपाचा । गंध तो जाणावा पृथ्वीचा । एवं ही पंचभूतें ॥१२॥भौतिकत्वें ज्या चारी खाणी । अथवा तृणांत आदिकरूनी । या सर्वांमाजीं विषयश्रेणी । पंचधा असती ॥१३॥साकार जितुकें रूपासि आलें । तें नेत्रासी दृश्य जाईलें । म्हणोनि रूपादिनाम असें ठेविलें । रूप तेथें चारी ॥१४॥नाम कल्पना असे जीवाची । परी ओळखी व्हावी लागे रूपाची । म्हणोनि बोलावें वाउगेंची । अमुक नामें म्हणोनि रूप तेथें शब्द असे । स्पर्शही तेथेंच वसतसे । वास्तव्य केलें गंधरसें । म्हणोनि भौतिकत्व ॥१६॥श्रोत्रामुळें शब्द हें नाम । त्वचेस्तव स्पर्शासि उद्रम । चक्षूसाठीं रूपाचा अनुक्रम । रस जिव्हे प्रीत्यर्थ ॥१७॥घ्राणामुळें गंध जाला । एवं पंचधा भाव जीवें कल्पिला । परी ईश्र्वरें पदार्थमात्र निर्णिला । तेथें पंचविषया वस्ती ॥१८॥स्वर्ग मृत्यु लोक पाताळीं । जितुकें ब्रह्मांड अधोर्ध्व स्थळीं । सर्वीं या पंचभूतां वेगळीं । अणुही असेना ॥१९॥पांचावेगळा पदार्थ सहावा । नाहींच नाहीं न दिसावा । तस्मात् ब्रह्मगोळ जो हा आघवा । पंचभूतात्मक ॥२०॥पृथ्वीआदि हीं मुख्य भूतें । आणि भूतांपासून भौतिकें समस्तें । हे उभयही अनुक्रमें राहते । जाले ब्रह्मगोळीं ॥२१॥असो इतुकेंही ईशानिर्मित । रूपादि विषयात्म समस्त । हें दृश्य परी अबाधित । अतीत बंध मोक्ष ॥२२॥कवणासी बांधी ना सोडवी । उगीच निर्बाधरूपें असावी । यावरी बंधनरूपता उभवावी । कल्पित जीवें ॥२३॥सहजरूपादि हें निर्माण । याच्या ठायीं जीव हा आपण । उभवितां जाला दोषगुण । तेणेंचि बंध पावला ॥२४॥गुणदोषादिविकल्पाबुद्धिगाःक्रियाः ॥जीवकृत म्हणजे बुद्धीनें केलें । व्यापारादि नामभेद कल्पिले । तेंचि क्रियात्मक पाहिजे ऐकिलें । मुमुक्षें त्यागार्थ ॥२५॥गुण म्हणजे हें हें चांगुलें । हें ओंगळ तें तें दूषिलें । येणेंरीतीं जीवें कल्पिलें । गुणदोषात्मक ॥२६॥हे प्रिय पदार्थ हे अप्रिय । हें सुखकर हें दुःखद होय । हे अनुपयोगी हे हे उपाय । गुणदोष कल्पना ॥२७॥हे पुण्यात्मक असती । हे पापात्मक ओळखिती । हे ग्राह्य हे अग्राह्य असती । हे गुणदोष कल्पना ॥२८॥हे वंद्य निंद्य उंच नीच । हे सफळ हे निर्फळ आहाच । हे थोर सानसे उगेच । हे गुणदोष कल्पना ॥२९॥हे सुंदर हे ओखटे । हे हे श्रीमान हे करंटे । हे वडील हे असती धाकुटे । हे गुणदोष कल्पना ॥३०॥हे सजातीय हे विजातीय । हे चंचळ हा जड प्रकार होय । ही स्त्री नपूंसक पुरुष होय । हे गुणदोष कल्पना ॥३१॥हे स्वकीय हे परके । हे आप्त माझे हे येर असिके । हा मी तो तूं हें हें निकें । हे गुणदोष कल्पना ॥३२॥हे स्वामी हे सेवक । हा राजा हे येर रंक । हा अधर्मी हा धार्मिक । हे गुणदोष कल्पना ॥३३॥हे कीटक ओंगळ अधम । हे पतंगादि मध्यम । हे पानकिडे किती उत्तम । हे गुणदोष कल्पना ॥३४॥हे हिवरादि वृक्ष अधम । बोरी बाभळी हे मध्यम । धात्री शमी पिंपळ उत्तम । हे गुणदोष कल्पना ॥३५॥काउळे होले हे पक्षी अधम । चिमण्या साळ्यादि मध्यम । रांवे नीळकंठादि उत्तम । हे गुणदोष कल्पना ॥३६॥हे श्र्वानशुकरादि अधम हे गायहरिणादि उत्तम । हे गुणदोष कल्पना ॥३७॥हे अंत्यजादि अधम । हे क्षुद्र गोपादि मध्यम । हे विप्र आणि द्विज उत्तम । हे गुणदोष कल्पना ॥३८॥हे दैत्यराक्षसादि अधम । हे पितरगंधर्वादि मध्यम । हे देव सर्वांत उत्तम । हे गुणदोष कल्पना ॥३९॥यक्ष गंधर्वादि अधम । इंद्रादि देव हे मध्यम । विष्णु आदि हे उत्तम । हे गुणदोष कल्पना ॥११४०॥ऐसेचि तृण पाषाणाआंत । अथवा संपूर्ण वस्तुजात । उत्तमाधम भाव संकेत । हे गुणदोष कल्पना ॥४१॥येथें शंका ऐसी करिसी । कीं हे निर्माणचि जालीं ऐशी । जैसियासी कल्पना करिता तैशी । दोष तो कोणता ॥४२॥तरी ययाचें उत्तर ऐकावें । जालें असती तैसे स्वभावें । तयावरीच वाउगे भाव कल्पावे । उत्तमाधम मध्यम ॥४३॥पाहेपा एकचि पाणी असतां । हे ओहळ अधम मध्यम सरिता । भागीरथी आदि उत्तम तत्वतां । हेंचि गुणदोष ॥४४॥प्रेताग्नि तो असे अधम । सहज अग्नि तो मध्यम । होमादिकांचा तो उत्तम । हेचि गुणदोष ॥४५॥हा कर्कंश वायु अधम । हा समान वायु मध्यम । हा मंदवायु शीतळ उत्तम । हेचि गुणदोष ॥४६॥हें मेघें आकाश दूषिलें । हें पहा कैसें असे स्वच्छ जालें । या रीतीं एकासीच भाविलें । हेचि गुणदोष ॥४७॥हे भूमि किती पवित्र । हे पहा कुश्चळ अपवित्र । तैसेंचि कुग्राम हें क्षेत्र । हेचि गुणदोष ॥४८॥ऐसेंचि अवघें कर्म धर्म क्रिया । आश्रम गुण विद्या अविद्या । हें हें चांगलें हें हें वायां । हेचि गुणदोष ॥४९॥हा सुदिन हा दुर्दिन । कुमुहूर्त भाऊन । उगाचि संशयीं पडे आपण । हेचि गुणदोष ॥५०॥असो ऐसें किती बोलावें । धरणीही लिहितां न पुरवे । परी अल्प संकेतें समजावें । सर्वही गुण दोषात्मक ॥५१॥येथें हे कल्पिसी ऐसें । गुणदोष वेदेंचि सांगितले जैसे । तैसेचि जीवही भावीतसे । तरी बाध तो कोणता ॥५२॥तरी याचें उत्तर ऐकावें । जीवें आवडतें उत्तर घ्यावें । न आवडे तें तें अव्हेरावें । वेदवचन जरी ॥५३॥वेदवचनें गुणदोष केले । म्हणोनि तेंचि असे स्वीकारिलें । तरी काय हें वचन नाहीं ऐकिलें । तें कां न व्यावें ॥५४॥गुणदोष पाहणें तो दोष । गुणदोष न पाहणें हा गुण विशेष । तरी या वचनें कां निर्दोष । होऊन न परतावें ॥५५॥येथें भाविसी अंतःकरणीं । का बहूवचनें गुणदोषालागुनी । ऐखादे वचन असतां निवर्तनी । प्रमाण कैसें घ्यावें ॥५६॥तरी गोत्रज मरता सुतक धरावें । ऐसें कश्चित वचन असेल स्वभावें । जें जनीं बळकट धरावें । स्वप्नीं न विस्मरतां आणि ब्रह्मचि जीव अभिन्नपाणीं । अनंत या वाक्याच्या आयणीतरी कां सहसा न मानिती कोणी । तस्मात आवडे शास्त्र असो पदार्थमात्रासी गुणदोष । कल्पून घेतसें शोक हर्ष । हेचि बुद्धीची कल्पना विशेष । निर्मित जीवाचें ॥५९॥पूर्वी ईशनिर्मित जितकें । भोगाचें उपेगा आणि तितुकें । हेंचि जीवाचें करणें असिकें । कल्पनायोगें ॥११६०॥जैशी बापें कन्या निर्मिली । ते भर्त्यासी भोग्य जाली । तैशी ईश्र्वरें सर्व सृष्टि केली । ते भोगा आली जीवाचे ॥६१॥येक स्त्री निर्मिली ईश्र्वरें । तेथें कल्पना करिती हे सारे । त्यांत कवणाचें मानावें खरें । हे बरें पहा ॥६२॥बंधु म्हणे हे माझी भगिनी । पुत्र म्हणे हे माझी जननी । भतो म्हणे हे माझी पत्नी । भोग्य क्रीडेसी ॥६३॥देवर म्हणे भ्रातृभार्या । पितरें म्हणताति कन्या तया । सासू जाली असे जांवया । विहिण व्याह्याची ॥६४॥ऐसे कितेक कितेकापरी । बोलताती स्वजनें सारीं । परंतु एकचि असे जे नारी । ते भेदावली नाहीं ॥६५॥परी हे माझी माझी म्हणून बैसले । सदृढ प्रेमाचें बंधन पडिलें । ते मेलिया रडती आपणही मेले । सुखदुःखें शिणोनी परी अज्ञानें वासना बेडी । पहिली ती न सुटे सांकडी । उगीच जन्मती मरती बापुडीं । उंच नीच योनी ॥६७॥येथें तुझी होईल भावना । कीं जीवें उगीच केली कल्पना । परी दुजी कोणती केली रचना । ईशनिर्मितावरी ॥६८॥पहिली स्त्री असतां खरी । येणें कोणती निर्मिली दुसरी । आणि भावनेनें सुखदुःखा माझारी । कैसा पडे ॥६९॥तरी या आक्षेपाचे उत्तर । दिधलें पाहिजे साचार । आधीं जीवें निर्मिलें तो प्रकार । पुढें बंधनरूप बोलूं ॥११७०॥ईशें निर्मिली मांसमयी । ते गोचर असे इंद्रियसमुदायीं । दुजी जीवें ही मनोमयी । निर्मिली अंतरीं ॥७१॥मांसमयी सन्निध नसतां । अथवा ते मरोनिही जातां । परी मनोमयची वासने आंतौता । स्मरतां उभी राहे ॥७२॥मांसमयी चक्षूनें पहावी । मनोमयी मनें आठवावी । ते भासतांचि तळमळी जीवीं । आहा भेटेल कधीं ॥७३॥त्या तळमळीनें परमार्थ नातुडे । आणि येथें स्त्रीसुख न जोडे । परी मरतांचि पुनःपुन्हा सांकडें । जन्ममृत्यूचें ॥७४॥मांसमयीनें येथें बांधिलें । सोडून न जाती कांही केलें । मनोमयीनें बंधन पडिलें । परलोकाचें ॥७५॥तस्मात् मनोमय निर्मित जीवाचें । भिन्न निर्मिताहून ईशाचें । आणि याहूनही जीवसृष्टीचें । प्रत्यक्षपण असे ॥७६॥तृण पाषाणाची घरें करावीं । मृत्तिकेच्या धातु निपजवी । धातूचीं पात्रें नगें घडावीं ं बहु कारागिरीनें ॥७७॥अनेकपरीचें करणें नाना । कल्पनेनें करिती रचना । तितुकें बोलतां तें सरेना । कर्तव्यता जीवाची ॥७८॥परी जितुकें स्थूलानें निर्मिलें । तेणें जीवासी नाहीं बांधिलें । निर्बाध असती पदार्थ जेतुले । ईश सृष्टापरी ॥७९॥मनोमयाची जे प्रीति । हेचि जीवासी बंधनरूप असती । हेंचि सांगूं एका दृष्टांतीं । निर्बाध बाधक ॥११८०॥पुत्र देशांतरा गेला । तो स्वतःसिद्ध सुखरूप असिला । परी कोणीं वंचकें सांगितलें कीं मेला । तेव्हां रडे अट्टहास्यें अथवा पुत्र मृत्यूही पावतां । नायकें जोंवरी त्याची वार्ता । तोंवरी न रडे सुखें वर्ततां । दुःख तें नव्हो ॥८२॥पुत्राचा मृत्यू नव्हे दुःखकारी । अथवा वांचणें नव्हे सुखकारी । तस्मात् कल्पनाचि मात्र सारी । सुखदुःखप्रद ॥८३॥कल्पनेंनें कांहीं एक भावावें । तेव्हांचि सुखदुःखादि व्हावें । ना तरी पदार्थ असतां न घडावें । सुखदुःख कदा ॥८४॥निद्रेंत कवणाचे पुढें मांगें । स्त्री सर्प दोनी असतां प्रसंगें । परी ते कल्पनेवीण दंगे । सुखदुःखाचे न होती ॥८५॥एवं जीवसृष्टि तेचि बाधक । ईशसृष्टि निर्बाधक । हें जाणिजे निश्चयात्मक । सत्य सत्य त्रिवाचा ॥८६॥एतदर्थ तितीर्षु साधक जन । अनेकधा श्रवणादि अभ्यासेंकडून । करिती जीवद्वैताचें हनन । तेव्हांचि सुखी होती निःशेष हानि जीवद्वैताची । हेचि पराकाष्ठा जीवन्मुक्तीची मिथ्यात्वदृष्टि ईशसृष्टाची । निःशेष हानि नको ॥८८॥ईशसष्टीचे पदार्थ जितुके । परी ते द्विविध असती तितुके । मिथ्यात्वें पाहणें तेंचि निर्बाधकें । साधकें गुरुशास्त्रें ॥८९॥गुरु सच्छास्त्रावीण कांहीं । साधका तरणोपाय नाहीं । म्हणोनि साधकत्व तया पाहीं । उपयोगी परमार्था ॥९०॥तैशीच जीवसृष्टि दोन रीती । शास्त्रीय अशास्त्रीय म्हणविती । शास्त्रीय अहंब्रह्मास्मि अनुभूति । आणि संपत्ति श्रवणादि हे जीवसृष्टि परी उपयोगी । मुक्ति येणेंचि जीवालागीं । यावीण अशास्त्रीय जे वाउगी । त्यागावी साधकें ॥९२॥अशास्त्रीयाचेही प्रकार द्विविध । एक मंद एक तीव्र द्वंद्व । तीव्र ते जाणावे कामक्रोध । मंद ते मनोराज्य ॥९३॥मनोराज्य तें हे कल्पना । जे सांगितली उंच नीच भावना । तिचा परिणाम जे करी यातना । कामादि जीवासी ॥९४॥तस्मात् कामादि आणि मनाची । कल्पनारूप सृष्टि जीवाची । त्यागिली पाहिजे अंतरींची । निपटूनि साधकें ॥९५॥उंचनीच भावरूपें कल्पना । हें जागृतीचे विषयसुख नाना । अहंब्रह्मास्मि प्रतीति गहना । हे मोक्षप्रद सुखद ॥९६॥एवं जागृतीपासून जीवाची । मोक्षापर्यंत रचना साची । त्यांत त्यागणें आग्रहणाची । वेवादणी सांगितली ॥९७॥तैसेचि ईशसृष्ट पदार्थजात । ईक्षणापासोनि प्रवेशांत । रूपरसादि हे विख्यात । सांगितले स्पष्ट ॥९८॥असो रूपरसादि या पदार्थावरी । जीव कल्पनारूप क्रिया सारी । हे बुद्धिगत भावना खरी । नसोनि भावी जीव ॥९९॥ताःमतेःक्रियाःविषयैःसार्धंचितिःभासयंती ॥त्या क्रिया ज्या बुद्धिवृत्तीच्याविषयासहित कल्पना जीवाच्या तितुक्या येकदांचि प्रकाशवीसाच्या ॥१२००॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.