सार्थ लघुवाक्यवृत्ती/ओव्या ५०१ ते ६००

विकिस्रोत कडून

<poem> अनेकधा व्यापार असतां । एकचि ज्ञान जाणे समस्तां । अंधार कीं प्रकाश न म्हणतां । जाणे देहक्रिया ॥१॥ऐसें सर्व जागृतींत जाणे । स्वप्नही ओळखावें तेणें । तें दुजें जरी मानिजे कोणें । तरी जागरीं नाठवी ॥२॥स्वप्नींही विषय भासती । प्रत्यक्षविण बुद्धीच कल्पिती । ते ते भासरूपें उमटती । परी विषय पांच ॥३॥तेथें आपणही आहे एक । येर अन्य सुखदुःखदायक । त्या उभयांसीही प्रकाशक । एकलें ज्ञान ॥४॥याचि रीतीं स्वप्नं जागर । जाणिले ज्या ज्ञानें सविस्तर । तेंचि ज्ञान निर्विकार । जाणें सुप्तींतें ॥५॥सुप्तींत जाणणेंचि नाहीं । ऐसें न कल्पावें कोणीं कांहीं । हें बोलणें पुढें सर्वही । कळे अनुक्रमें ॥६॥प्रस्तुत दोनी अवस्था जेणें । जाणल्या असती ज्ञानें । तेणेंच सुप्ती अनुभवणें । बोलली एकरूपता ॥७॥ऐसिया नित्य अवस्था तीन । होत असती जीवालागून । परी तें एकलेंचि जाणे ज्ञान । आपुल्या प्रकाशें ॥८॥नैमित्तिक मूछा समाधि । होय जरी केव्हां कधीं । परी तयासीही ज्ञान आधीं । जाणतचि असे ॥९॥अमुक ज्ञाना कळल्याविण । किंचित्कार्य नव्हे आन । होयसें नायकों न देखों पूर्ण । तिहींही लोकीं ॥५१०॥दिवसा ज्या ज्ञानें जाणिलें । प्रकाशामाजीं अनुभविलें । त्याचि ज्ञानें ओळखिलें । सूर्याभावीं ॥११॥जेणें आजि जाणिलें सर्वें । तो उद्यां जाणेल स्वयमेवें । कालीचें शिळें आजीचें नवें । नव्हे सहसा ॥१२॥रविवारी तें मंदवारीं । बीज पौर्णिमा एकसरी । शुक्ल कृष्ण पक्षां भेद परी । ज्ञान तें एक ॥१३॥बारा मास वर्षें साठी । वाउगी नामाची परिपाठी । परंतु शत वर्षांही शेवटीं । एकलें ज्ञान जाणे ॥१४॥एवं मरणांत एक देह जाणिला । दुजिया होतांच पाहूं लागला । मध्यें संधीही ओळखिला । एकलें ज्ञानें ॥१६॥ऐसे अनंत देह होऊन गेले । बहुधा चतुर्युगही लोटले । ऐसें कल्पही उदंड जाले । परि तें जाणिलें ज्ञानें ॥१७॥नित्य कल्प नित्य कल्पाचा संधी । जाणत असे ज्ञान निरवधी । महाकल्पाचे लयाही कधीं । जाणिल्याविण न राहे ऐसें ज्ञान जें सदोदीत । उपकरणाविण प्रकाशित । तिहीं काळीं जें अबाधित । चिद्रूप एक ॥१९॥कधीहीं नाश नाहीं जयासी । तरी चिद्रूपचि कीं अविनाशी । तेंचि सद्रूप या दो लक्षणांसी । भेद सहसा नाहीं एवं सद्रूप तें चिद्रूप । तयासि अस्ति भाति हे जल्प । आतां तिसरें जें कां आनंदरूप । प्रियताही बोलिजे ॥२१॥हेंही स्वरूपलक्षण तिसरें । जें सर्वांचें अनुभवानुकारें । तेंचि बोलिजे रविदत्ता अरे । अल्प संकेतें ॥२२॥सर्वांसी सर्व प्रिय असती । ते कवणाचें निमित्त आवडती । ते विवेकें पाहतां कळों येती । कीं आपणाप्रीत्यर्थ ते ते जरी आवडती खरे । तरी क्षणाक्षणां न विटती सारे । आपणा उबग येतां येरे । भोग्यजाता उपेक्षी ॥२४॥पति स्त्रियेची आवडी धरी । क्षणां विटून परती सारी । तिनें प्रार्थिताही चाड न धरी । छळितां अधिक त्रासे ॥२५॥स्त्रियेसी भोगइच्छा नसतां । बळात्कारें भोगही घडतां । आवडी नुपजें कदां चित्ता । इच्छी तरी प्रिय वाटे ॥२६॥पुत्र प्रिय मातापितरां । यास्तव चुंबिती त्या लेंकरा । त्यांचे प्रीतीस्तव तरी तें अवसरा । कंटाळून रडे ॥२७॥मायबापें आपण रक्षिती । म्हणून आपणानिमित्त आवडती । आपणासि जे उपेक्षिती । त्यांची आवडी कोणा ऐसेंचि भ्राता मित्र स्वजन । पशु वृत्ति राज्यादि धन । आपणासाठी भोग संपूर्ण । आवडते होती ॥२९॥दुर्बाह्मण्य आपुलें जावें । यास्तव वेदशास्त्र पढावें । अति प्रेमें देवासी भजावें । परी सुखी व्हावें आपण ॥५३०॥मोक्षप्राप्ती आपणा व्हावी । यास्तव गुरुपदीं आवडी धरावी । श्रवणादि साधनेंही करावीं । आपुलीया हेतू ॥३१॥ऐसे जागृती आदि मोक्षावरी आपणा निमित्त आवडी सारी । तस्मात् ते ते प्रियताचि नव्हे खरी । उगी वरी वरी धरियेली आपुलें कार्य जोंवरी होणें । तोंवरी अन्यासी प्रीति करणें । तूं मज आवडता जीवें प्राणें । परी तें उपरोधिक ॥३३॥उपरोधिका म्हणावें खोटें । खोटें तें कधीं जाय पालटे । ऐशी आपुली आवडी कोठें । अन्या निमित्त ॥३४॥निमित्तावांचून सहज आवडी । आपुली आपणा असे गाढी । स्फूर्तिही न होतां घडफुडी । आहे तैशी आहे ॥३५॥स्फूर्ति म्हणजे मी किती आवडता । ऐसा भाव उत्पन्न न होतां । निरिच्छ आवडी असे तत्त्वतां । अकृत्रिमपणें ॥३६॥भाव उठे जया प्रीतीसी । अकृत्रिम न म्हणावें तिशीं । अन्यत्वीं उमटे ते आपैसी । नाशही पावे ॥३७॥उठे जे स्त्रियादिकांचे ठाईं । त्या प्रीतीसी राग नाम पाहीं । अप्राप्त वस्तूचे समुदायीं । इच्छा शब्दें बोलिजे ॥३८॥यागादि कर्मीं ते श्रद्धा । त्या आवडीसी नांव सुबुद्धा । गुरुदेवाचे चरणीं जे मेधा । प्रिति ते भक्ति ॥३९॥ऐशीं उठल्या प्रीतीसी नांवे । चारीही भिन्न भिन्न अपूर्वें । हीं असतीं सहेतुक सर्वें । म्हणून कुत्रिमरूप ॥५४०॥तैशी आवडी आपुली नसे । अभावीं भावीं सारखी असे । तस्मात् आत्मप्रियता ते वसे । अकृत्रिमपणें ॥५४१॥उत्पन्न होय तें नाश पावे । म्हणोनि उद्भवे तें प्रिति नव्हे । उत्पन्न न होतां जें स्वभावें । तेंचि प्रिय निर्हेतुक ॥ऐशी प्रियता आत्मरूपाहुनी । दुजी नाहीं नाहीं सत्य सत्य वाणी । जरी देहांत वृत्तीपासोनी । आवडी परी आत्मार्थ देहादिकांचीही जे प्रीति वाउगीच ते पुढें बोलिजेती । प्रस्तुत येथें ममत्व रीती । निषेधिली पुत्रादिकांची ॥४४॥असो आपली जे आत्मप्रियता । जे निर्हेतुक अकृत्रिमता । हाचि आनंद असे तत्त्वतां । लक्षण तिचें ॥४५॥आनंदलक्षणही कल्पांती । अविनाश पूर्ण सहज गती । तस्मात् हेंचि सद्रूप निश्चिंतीं । चिद्रूपही तेंचि ॥४६॥एवं अस्ति भाति प्रियरूप आत्मा । हाचि सच्चिदानंद परमात्मा । याहून भिन्न त्या त्या रूप नामा । भ्रम हा बोलिजे जैसा वृक्षीं बैसला तो आहे खरा । तोचि पहातसे पडिलिया नीरा । तोचि आवडता सहजत्वें सारा । अकृत्रिमपणें पडिला तो दिसे परी नाहीं । पाहेसा वाटे परी व्यर्थ तेंही । भजला काढा ऐशी प्रीति कांहीं । आभासा नसे ॥४९॥ वृक्षीं बैसल्याचा आहेपणा । त्यास्तव त्यासम दिसे जाणा । नेत्र उघडून जाला देखणा । परी तो वृक्षास्तव ॥५५०॥ तैसाचि आत्मा सहजगति सच्चिदानंद चिन्मूर्ति । त्याचें प्रतिबिंब पडिलें वृत्तीं । तो हा जीव आभास ॥५१॥आत्मत्वाच्या आहेपणें । जीव आहेसा केला मनें । जें आत्मयाचें चिद्रूप देखणें । तेणें होय जाणता ॥५२॥न कळून आपली प्रियता । मीपणें मानी आभास स्फुरतां । एवं वाउगी उमटली आत्मता । नोळखोनि आत्मा ॥५३॥तस्मात् येथें मुमुक्षूनें । स्वानुभवें विवेचन करणें । वास्तविक आत्मा तो अंग होणें । येर त्यागावा आभास ॥५४॥हा मी जीवासह वृत्तीसी । जाणतसें उद्भवलयासी । उद्भव आणि लय जयासी । तो मी नव्हें सहसा ॥५५॥जैसा पडिला पडिलियानें । मी नव्हें ऐसें जाणावें मनें । हा मी वृक्षीं बैसून पाहें नयनें । पडिलियासी ॥५६॥यासी प्रयत्न दुजा नसे । अज्ञानें जालें तें ज्ञानें नासे । येथें विचाराचि पाहिजे मानसें । दृष्टताद्राष्टांतीं ॥५७॥पाहणें नको गळ घालून । तेवीं न लगती नाना साधन । एक विचार पाहिजे परिपूर्ण । अंतवृत्तीचा ॥५८॥एकदां विचारें कळेना । तरी विवेचन करावें पुनःपुन्हां । आणि गुरुमुखें श्रवण मनना । ज्ञान होय तों करावें ॥सत्शास्त्र आणि सद्गुरू । आणि पाहिजे सद्विचारु । हीं तिन्हीही मिळतां वारंवारु । पाहिजे विवेचन ॥५६०॥अति प्रयत्नें जें म्हणितलें । तें इतुक्याच हेतु पाहिजे कळलें । एकदां न कळतां तरी पाहिलें । पाहिजे वारंवार ॥अधिकार नसतां बळें आणावा । अचाट बुद्धीनें विचार करावा । सद्गुरु धुंडून ठाईं पाडावा । बोधक स्वानुभवीं पूर्ण अधिकारी मुमुक्षूसी । सद्गुरु मिळे पूर्ण बोधासी । तरीही सत्शास्त्रेंवीण अन्यासी । भेदशास्त्रा काज नसे ॥जें कां अभेद प्रतिपादक । जेथें आत्मा परमात्मा एक । तेंचि सत्शास्त्र निश्चयात्मक । श्रवण करावें ॥६४॥एवं सद्गुरुमुखें सत्शास्त्रश्रवण । स्वतां विचारें विवेचन । वारंवार करणें या नांव प्रयत्न । अतिशयें करावें ॥६५॥असो तें विवेचन केवीं करावें । तरी रविदत्ता सावध असावें । मुख्य आणि आभास निवडावे । सप्रतीतीनें ॥६६॥आभास हा मिथ्या दिसे । बोधात्मा न दिसे परी असे । हा दृष्टांतद्वारां केला असे । कळे ऐसा संवाद ॥६७॥येणें उपदेशें मुख्य अधिकारी । खुणेसि पावे तीव्रप्रज्ञ जरी । तथापि मंद जो मध्यम प्रकारी । तया प्रतीति न बाणे तरी तयासी निरूपण । वारंवार पाहिजे श्रवण । तेवींच अंतरीं विवेचन । सर्वदा व्हावें ॥६९॥विवेचन म्हणजे मुख्य आभास । निवडावें भिन्न उपयांस । मुख्य आत्मा आपण निश्चयास । सदृढ यावा ॥५७०॥आभास तो मिथ्यात्वें त्यागावा । त्याचा किंचित् न घ्यावा । तरी तोचि संवाद ऐकावा । एकाग्र होउनी हा आभास कोठून कोठवरी । असे तो बोलिजे निर्धारीं । हें ऐकून तयाचा करी ।त्याग मिथ्यात्वें ॥७२॥यो जागृत्स्वप्नयोरेव बोधाभास्र विडंबना ॥स्थूलासहित ते जागृति । सूक्ष्मासह स्वप्नभ्रांति । या दोहीं अवस्थेप्रति । आभास विडंबन ॥७३॥आभास म्हणजे मिथ्या भासे । जळीं प्रतिबिंब व्यर्थ जैसें । तयामाजीं नांव आलें असे । जडासी जीववी ॥७४॥स्थूलदेह हा जडात्मक । हस्तपादादि आनख मस्तक । जो मागां बोलिला पांचभौतिक । पंचीकृत अन्नमय ॥७५॥अपंचीकृत जीं तत्त्वें सत्रा । तोचि लिंगदेह स्थूलामाझारा । राहून करितसे देहव्यापारा । एकमेकां साह्यपणें ॥७६॥स्थूलाविण लिंगदेहासी । घेतां नये भोग्यजातासी । सूक्ष्मविणही स्थूल जडासी । व्यापार कैचा ॥७७॥म्हणून स्थूलदेहीं राहून । लिंगदेह करी विषयग्रहण । तया व्यापारा नामें दोन । स्वप्न आणि जागृति ॥७८॥अंतःकरणवृत्ति ज्ञानेंद्रिय द्वारां । पंच विषयांचे येत सामोरा । भोक्ता जीव हा होय त्वरा । या नांव जागृति ॥७९॥हे पांच तत्त्वांचे व्यापार पांच । कर्मेंद्रियांचीही क्रिया तैशीच । हें मागें सांगितलें आहाच । स्पष्ट करोनी ॥५८०॥इंद्रियाविषय प्रत्यक्ष नसतां । त्यांचा ध्यास घेऊन अतौता । बुद्धीच कल्पी जीव तया भोक्ता । ते अवस्था स्वप्नं ऐसे हे स्वप्न जागृती दोन । व्यापार होती सर्व जीवांलागून । मिथ्यात्वें प्रतिभास असोन । भ्रांतीनें सत्य मानिलें अस्ति भाति प्रियरूप आपुलें । जें कां मुख्यात्याम्याचें लक्षण बोलिलें । तेंचि या आभासासी मानिलें । बिंबाचें प्रतिबिंब जेवीं या आभासाचे लक्षण । असज्जड दुःख संपूर्ण । हें टाकून आरोपी अज्ञान । अस्ति भाति प्रिय हेंचि ॥८४॥प्रतिबिंबित देहद्वयांत । तो जीवही नेणोनि भ्रांत । उगाची सर्वही संघात । मी म्हणोन बैसला ॥८५॥आणि तया सर्व संघाता । अस्ति भाति आरोपी प्रियता । हेंचि जाण विडंबन तत्त्वतां । असे तें त्यागिजे ॥८६॥हस्त आहे पाद आहे । उदर कंठ मस्तक आहे । नख केश सर्व आहे । हेंचि विडंबन ॥८७॥श्रोत्र आहे त्वचा आहे । चक्षू जिव्हा घ्राण आहे । वाचा पाणी पाद आहे । हेंचि विडंबन ॥८८॥उपस्थ गुदही मीच आहें । प्राण अपान व्यान आहें । उदान आहें समान आहें । हेंचि विडंबन ॥८९॥उपप्राणादि वायु आहें । अहंकार चित्त मीच आहें । बुद्धि मन अंतःकरण आहें । हेंचि विडंबन ॥५९०॥गुण असती वृत्ति आहे । जीव असे सर्वही आहे । एवं अस्तित्वरूप सर्वां पाहे । हेंचि विडंबन ॥९१॥तैसेंचि हस्तासी अंधारी कळे । पाद नखासी लागतां कळे । उदर कंठा बोटासी कळे । हेंचि विडंबन ॥९२॥नख शिख अवघियांस कळे । दृष्टीसी पार्श्र्वभागासी कळे । मागें पुढें अधोर्ध्व कळे । हेंचि विडंबन ॥९३॥श्रोत्रासी शब्द कळतसे । त्वचा हे स्पर्शा जाणतसे । डोळा रूपा ओळखीतसे । हेंचि विडंबन ॥९४॥जिव्हा हें रसातें जाणे । सुगंध जाणून घेतसे घ्राणें । वाचा बोलोनियां जाणे । हेंचि विडंबन ॥९५॥पाणी जाणें घेणें देणिया । उपस्थ जाणे मैथुनक्रिया । गुद जाणे विसर्गा यया । हेंचि विडंबन ॥९६॥प्राण जाणे व्यान जाणें । उदान समान अपान जाणे । उपप्राणांसही होय जाणणें । हेंचि विडंबन ॥९७॥अहंकार सर्वा जाणतसे । चित्त चिंतना ओळखीतसे । एवं हे अवघेचि जाणती । हेंचि विडंबन ॥९८॥वृत्ति जाणे गुण जाणती । जीव तो जाणे सहजगती । एवं हे अवघेचि जाणती । हेंचि विडंबन ॥९१॥ऐसें जडरूप सर्व असतां । ज्ञानरूपचि मानिलें तत्त्वतां । कोणीच नाही जाणिल्या परता । हेंचि विडंबन ॥६००॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.