Jump to content

सार्थ लघुवाक्यवृत्ती/ओव्या २६०१ ते २७००

विकिस्रोत कडून

जया स्वतां उत्थान असेना । कारण कीं निश्चय नव्हे उणा ।भलते अवस्थे सहसा उद्भावेना । संशय कधीं ॥१॥तया शास्त्रेंही सांगों येती । अथवा प्रवृत्ति लोकरीती ।परी पुन्हां नव्हेचि भ्रांति । ऐसे परतोत्थान नसे ॥२॥अखंडैकरस ब्रह्मात्मा । स्वतां निजांगें येर हें अनात्मा ।यया सत्यत्वचि नये रूप नामा । निखळ अद्धय निश्चयें ॥याचि नांवें पूर्ण ज्ञान । याचि नांवें पूर्ण समाधान ।हेंचि कैवल्यमुक्तीचें लक्षण । हेचि सहज समाधि ॥४॥ययाचि ज्ञानें हरिहर । नित्य मुक्तत्वें निरंतर । आणि सनकादि ज्ञात अपार । मागें जाहलें असती ॥५॥पुढें होणार आतां असती । येणेंचि ज्ञानें पावली तृप्ति ।हे सत्य सत्य त्रिधा वचनेक्ति । अन्यथा नव्हे ॥६॥ऐसें ज्ञान उत्तमाधिकारी । गुरुमुखें सच्छास्रानुकारी ।विचारें पावती अभेद अंतरीं । निःसंशय होउनी ॥७॥शाखा दावितांचि चंद्र लक्षिती । तैसे उपदेशमात्रें अभेदा पावती ।तेचि उत्तमाधिकारी धन्य जगतीं । तीव्रप्रज्ञ जे तस्मात् रविदत्ता सावधान । तूं पाहें स्वतां विचारून ।ऐसा अधिकार असे कीं पूर्ण । समाधान आकळावया ॥९॥बहु प्रकारें आम्ही तुजला । विवेचून अर्थ सांगितला । उपदेश प्रांजलपणें केला । जेवीं आंवळा हातींचा ॥२६१०॥परी तुज समाधान बाणलें । नाहीं ऐसें आम्हां कळलें । तस्मात् मंदप्रज्ञत्व दिसलें । प्रत्यक्ष आतां ॥११॥तरी तुज विचाररूप ज्ञानासी । अधिकार नसे निश्चयेंसी । तुवां कर्म अथवा उपासनेसी । जाऊन संपादावें ॥१२॥इतुकें बोलून मौन धरिलें । तेव्हां रविदत्ता कैसें जाहलें । वज्रचि काय मस्तकीं पडिलें । जाहलें शतचूर्ण ॥१३॥आहें कीं मेलों आठवेना । अंतःकरणा आली मूर्छना । शरीरीं येकवटता जाहली प्राणा । अतिक्रमण करूं पाहे ॥१४॥सर्व चळणवळण राहिलें । इंद्रिय ठाईंच्या ठाई निमालें ।श्र्वासही किमपि न चाले । थंड जाहलीं गात्रें ॥१५॥ऐशा लोटतां घटिका दोन । कांही प्राण पावला चलन ।दीर्घ श्र्वास घ्राणें दाटून । सोडिता जाहला ॥१६॥पुढें चिरकाळें मन उद्भवलें । तेव्हां हळुहळू नेत्र उघडिले ।परी नेत्रांसी कांही न दिसे पाहिलें । मन भ्रमलें म्हणोनि नंतर आठवीतसे मानसीं ।की सद्गुरूनें उपेक्षिलें मजसी । आतां कोणता उपाय जळचरासी ।जेवीं जीवनावीण ॥१८॥तया तळमळीसी काय पुसावें । तप्तपात्रीं कण भाजावे । शेखीं प्राणाचेंही उत्क्रमण नव्हे । उगी चरफड अंतरीं ॥१९॥नेत्रांसीही अंधता आली । वाणीसी तों बोबडी वळली ।सर्व गात्रें कापूं लागलीं । मस्तक झाडितसे ॥२६२०॥बळें बोलतां येकाचें येक । शब्द होत असती भ्रामक ।चित्तासी फुटेचिना तर्क । हां हां मेलों म्हणे ॥२१॥कंठ सद्रद बाष्पें दाटला । नेत्रद्वारें पूर चालिला ।तो काहार नव जाय सोसवला । श्रवण करितां मुमुक्षा ॥२२॥ऐसे दोन मुहुर्त लोटल्यावरी । बलात्कारें अवस्था सारी ।उठोनि लोळे चरणावरी । उपेक्षूं नये म्हणे ॥२३॥अहो अहो सद्गुरुस्वामी । मी जळालों बाह्य अंतर्यामीं ।उपेक्षू नये पाववा विश्रामीं । अभय शीतळकरें ॥२४॥मी अन्यायी अपराधी परी स्वामीचा । मंदप्रज्ञ अनधिकारी साचा ।जैसा पुत्र मूर्ख समर्थ मातेचा । परी त्या माता नुपेक्षी जरी अन्यथा उपेक्षी माता । तरी तया दुजा उपाय कोणता । तेवीं दयाळूवें भज उपेक्षिता ।त्राता त्रैलोकीं नसे ॥२६॥हरिहर रूष्ट जाहले जरी । तरी तया सद्गुरु अस कैवारी । सद्गुरु कोपतां पुरारिमुरारि । संरक्षितीना ॥२७॥आतां कोणते मी कर्म करूं । अवघा स्वप्नांतील प्रकारू ।अथवा जाऊनियां पाय धरूं । कोण्या निर्बळाचे ॥२८॥गंथर्वनगरी चित्रींची सेना । त्यांत कवण थोर कवण साना ।तेवी हरिहरादि उपासना । आतां मज करणें अयोग्य मृगजळासी धरण बांधावें ।त्यांतील मासोळे अपेक्षावे । तैसे म्यां यज्ञादि कर्म करावें ।स्वर्गादि अपेक्षूनी ॥२६३०॥याची जोंवरी वोळखी न होती । तोंवरी केलीच केली जनरीती ।आतां मज अधिकार नसे पुढती । कर्म कीं उपासनेचा ॥३१॥करितां करितां जाहला शीण । भूस बडविलें सांडूनी कण ।संदिसें प्रारब्धउदयें दर्शन । श्रीचरणाचें जाहलें ॥३२॥मृगजळा देखोनि धांवतां । मृगा पाणी मिळालें अवचिता ।तेवीं अनंत पुण्याचिये सुकृता । जोडले श्रीचरण ॥३३॥ऐसा मज अलभ्य लाभ जाहला । तो केवीं जाय मनें त्यागिला ।जरी दयाळुवें ढकलून घातिला । तरी चरण न सोडी भुकेलिया अमृतपान । जोडतां केवीं फिरवी वदन । तृप्ति जाहलिया सहज आपण ।तेथेंचि शयन करी ॥३५॥तेवीं भवार्णवीं सद्गुरुपाय । नौका जोडलीसे निर्भय ।तेथें ब्रह्मामृताचा लाभ होय । जिव्हाग्रीं अकस्मात ॥३६॥तेथूनियां परत कवण । अविट तृप्ति जाहलियाविण । तृप्ति जाहलियाहि होय लीन । जेथील तेथें ॥३७॥मध्यें जरी परतें सारिलें । तरी तें मरेल जरी उपेक्षिलें ।हें उचित नव्हे दीनासी लोटिलें । समर्थ दातिया उदारा हें असो कामधेनूनें वत्सासी ।कीं मेघें अनन्य चातकासी । अथवा चंद्रें कधीं चकोरासी ।उपेक्षिलें न देखों ॥३९॥दुष्ट जलचरें जाहली जरी । तरी जळें टाकिलीं बाहेरी । ऐसी मातही श्रवणावरी । आली नाहीं अद्यापि ॥२६४०॥तेवीं सद्गुरूसी शरण आला । तो दयाळुवें पिटून घातिला ।ऐसा न देखों न ऐकिला । कवणेंही काळीं ॥४१॥परी मजविशीं उद्भवलें काय । हा नेणों कैसा उदेला समय ।परी मी न जाय हाचि निश्चय । उपेक्षितांही दयाळे मी मरमरून शतजन्म घेईन ।परी न सोडी हे चरण । हे प्रतिज्ञाचि सत्य प्रमाण ।अन्यथा नव्हे नव्हे ॥४३॥इतुकियावरीही समर्थें । उपेक्षूनिया दवडितां अनाथें ।काय उपाय कवणिया अर्थें । घडेसा नाहीं ॥४४॥परी दयाळूवें ब्रीद रक्षूनी । स्वीकारावें दीनालागुनी ।निववावें अभयवचनीं । हेंचि उचित ॥४५॥ऐसें विनऊनि पुढती पुढती । चरणीं लोळे नेत्राश्रु वाहती ।पुन्हां बद्धांजलि मागुती । पुन्हां नमस्कार ॥४६॥ऐसा अनन्य रविदत्त । देखतां स्वामी आनंदभरित । उचलूनि आलिंगिला त्वरित । म्हणती ना भी ॥४७॥तुजसी वाउगेंचि वाटलें । की मजला गुरूनें उपेक्षिलें ।परी आम्हीं नाहीं गा अंतरीं आणिलें । कीं त्यागावें ऐसें ॥अरे शिष्यासी अलभ्य गुरु । तेवींच गुरूसी अलभ्य लेंकरू ।तरी आम्ही उपेक्षा केवीं करूं । परी निर्धारु पाहतसों सदगुरुसी अनन्यभावें । जरी त्यागूनि शरण यावें । तेणें अबोधे परतोनि जावें । तरी वाहावें ब्रीद कासया ॥२६५०॥अनन्य मात्र शरण यावा । मग मंद कीं तीव्रप्रज्ञ बरवा । तो सद्गुरुनें उद्धरावा । सत्य सत्य त्रिवाचा ॥५१॥अनन्य म्हणिजे सद्गुरुविना । दुजे दैवतचि असेना । आणि अन्य विषयही दिसेना । निस्पृहत्व सर्व जगीं ॥५२॥याविण वरपंगीं वरी वरी । अनन्यत्व दावीं बहुपरी ।परी भाव नाहींच अंतरीं । असे तरी जायाचा ॥५३॥ऐसिया कुचीर शिष्यासी । उपेक्षितां दोष नाहीं गुरुसी ।मग तो तीव्रप्रज्ञ जरी श्रवणासी । जरी तो वंचक ॥५४॥तस्मात् सच्छिष्य अनन्य । तो असे मंद कीं तीव्रप्रज्ञ ।तोचि गुरुपासूनि होतसे धन्य । श्रवणें कीं अभ्यासें ॥५५॥तीव्रप्रज्ञ जो उत्तम अधिकारी । तो श्रवणमात्रें विवेचन करी ।दृढ अपरोक्ष समाधान अंतरीं । पावे बोलिल्या न्यायें मंदप्रज्ञासी ऐसे न घडे । अभ्यासें हळुहळु पवाडे । दृढ अपरोक्ष समाधान जोडे । तयाचि ऐसें ॥५७॥जो विचारे अपरोक्षता पावे । तेंचि अभ्यासें समाधान पावावें । हें अन्यथा कधींच नव्हे । शेवटी स्थिति एक ॥५८॥तस्मात् रविदत्ता सावधान । हा खेद टाकी होई स्वच्छ मन ।तूं जरी अससी मंदप्रज्ञ । तरी अभ्यासें मेळऊं ॥५९॥ऐसें अभयवचन ऐकतां । आनंद जाहला रविदत्ता । सर्व भवदुःखाची सोडून चिंता । श्रवणीं तत्पर होय ॥२६६०॥गुरू म्हणती गा पाडसा । आम्ही तुजसीं बोलिलों सहसा ।कीं कर्म अथवा उपासना करीं जैसा । अधिकार तूज असे याचा अर्थ तुज न कळतां । उपेक्षिले म्हणून मानिलें चित्ता । तरी तयाचें तात्पर्य ऐकें आतां ।निवांत होऊनी ॥६२॥विचारद्वारा जें पावावें । त्या स्थितीतें अभ्यासें पावे । त्या अभ्यासाचें लक्षण समजावें । तेचि उपासना ॥६३॥उपासना म्हणिजे लक्ष्य ब्रह्मात्मा । ऐक्यत्वें निवडिला परमात्मा ।याचें अनुसंधान जरी महात्मा ।निदिध्यासरूपें अभ्यासानाम निदिध्यासन । तेंचि बापा ध्यातृध्यान । हेंचि कीं निर्गुण उपासन । कर्तृतंत्ररूपें ॥६५॥तयाचेहहि प्रकार दोन । येक सगुण येक निर्गुण ।ते पुढें प्रांजल असे निरूपण । कळेल ऐकतां ॥६६॥तेचि उपासना करी जाई । ऐस बालिलों निःसंशयीं ।यांत उपेक्षिलें कवणें काई । आतां कर्माचें रूप ऐकें ॥६७॥हाही उपासनेचा अभ्यास । जरी न ठाके निदिध्यास । तरी तेणें आदरावें कर्मास । बोलिजे तेवीं ॥६८॥कर्म म्हणिजे देहाची क्रिया । मन आणि दशेंद्रिया । अर्पण करोनि गुरुपायां । गुरुभक्ति करावी ॥६९॥कायिक वाचिक मानसिक । गुरुसेवा हेचि कर्म एक ।यावांचून जें यज्ञादिक । तें प्रवृत्तीचें ॥२६७०॥तें जेव्हां आरंभीं त्यागिलें । तेव्हांचि मुमुक्षत्व पावलें ।तेंचि कर्म तया योजिलें । न जाय मुमुक्षा ॥७१॥तस्मात् गुरुभक्ति हेंचि कर्म । जेणें सर्व कर्म धर्म पावती विराम ।आणि झडकरी देतसे विश्राम । जें विचारज्ञानें पाविजे ॥७२॥ऐशिया गुरुभक्तीच्या योगें । अधिकारही पूर्वील नलगे । सांग होतसे लागेवेगे अल्पचि काळें ॥७३॥मग पूर्वीचें मुमुक्षुत्व जयासी । तो तरी सहज लागे उपासनेसी ।हे असो वस्तुतंत्रही ज्ञानासी । पात्र होय ॥७४॥ऐसें कर्म हे गुरुभक्ति । जया घडे साधकाप्रति । बहु काय बोलावें पुडती । मुक्ति तळहातीं त्याचे ॥७५॥तस्मात् रविदत्ता गुरुभक्ति ऐशी । आदरावी तुवां मानसीं ।तरी त्वरित ज्ञानासी हात्र होशी । ऐसा हेतु आमुचा ऐसें ऐकतांचि रविदत्तासी । अति आनंद जाहला मानसी । जेवीं भरतें दाटे समुद्रासी । तेवीं उचंबळे ॥७७॥आधींच शर्करेची आवडी । वरी वैद्यें दिधली तेचि पुडी ।तेवीं गुरुभक्तीची अति गोडी । तेचि आज्ञा त्यावरी ॥७८॥पूर्वी जाई ऐसे उपेक्षिलेसें म्हणतां । वरी गुरुभक्ती करी आज्ञापितां ।तें कैसे जाहलें रविदत्ता । दृष्टांतें सांगूं ॥७९॥कोणी येकें परिस मारिला । तेणें शतचूर्ण मस्तक जाला ।परी लोहाचा वर्ण पालटला । तेणें दुःख नासून सुख होय तैसें जा म्हणतां दुःख वाटलें । तें गुरुभक्ति करीं म्हणतां गेलें । अतिशय सुखची उफाळलें ।महालाभ देखतां ॥८१॥तया आनंदे नाचूं लागे । वस्त्र उडवीतसे वेगें । वाहवा म्हणोन चरणा लागे । प्रदक्षणा करी ॥८२॥या लाभापरता लाभ नाहीं । धन्य मी प्राप्त जाहलों पाहीं ।म्हणून नाचे उभवून बाही । आनंदें दाटोनी ॥८३॥गुरुभक्ति मज प्राप्त होतां । उपासनाहि आली हातां । ज्ञानही जाईल केउता । मातेविण पुत्र ॥८४॥मिळतां एक वृक्षाचें मूळ । वृक्ष तो हातां आला सकळ ।पत्रें शाखा पुष्प फळ । जाईल कोठें ॥८५॥तैसी गुरुभक्तीची प्राप्ती । सहपरिवारे मोक्षसंपत्ति । ज्ञान साधन विचारादि होती । दास साधकाचे ॥८६॥अहो केवढा लाभ जाहला । काय हो मोक्षाचा ध्वज उभारिला ।पार नाहीं माझिये भाग्याला । यया त्रिभुवनीं ॥८७॥तस्मात् अहोरात्र गुरुभक्ति । सेवाचि करीत अतिप्रीती । ओवाळून सांडीन मुक्ति । गुरुचरणावरूनी ॥८८॥कायेसी अखंड गुरुसेवा । वाणीसी गुरुभजनाचा ठेवा ।मनासी निदिध्यास सदैवा । गुरुध्यानाचा ॥८९॥कायेसी किंवा मनासी । वाणीसी कीं सर्वेंद्रियासी ।उसंतचि नेदी कवणासी । गुरुसेवेविण ॥२६९०॥आतां मज गुरुसेवेपरतें कांहीं । या त्रैलोक्यीं काज नाहीं ।प्राप्तव्य नसे सहसा कांहीं । गुरुभक्तीपरतें ॥९१॥काय हो सद्गुरुने कृपा केली । माझी मनवांछा पुरविली ।ऐशी चित्तवृत्ति आनंदली । रविदत्ताची ॥९२॥हें पाहून सद्गुरु शंकर । म्हणती हा आधींच गुरुभक्तीसी तत्पर ।यासी नाहीं म्हणेल अधिकार । ऐसा कवणु ॥९३॥जरी कांहींशी प्रज्ञा मंद । तेहि अभ्यासें होय विषद । सहजी ज्ञान होईल अभेद । अपरोक्ष दृढतर ॥९४॥तस्मात् यासी आधीं अभ्यास । सांगावा उपासनारूप निदिध्यास ।सत्वरचि पावेल अपरोक्षास । येथें संशय नाहीं परी आधी यासी पुसावें । जितुकें निरूपण जाहलें बरवें । त्यांत कोणतें बाणलें अनुभवें ।तें कळलिया पुढें बोलूं ॥९६॥ऐसे विचारून मानसीं । आचार्य म्हणती रविदत्तासी । काय जे अनुभव असेल तुजसी । ते ते बोलून दाखवी ॥९७॥पूर्वींपासून जें निरूपण । जैसें जैसें जाहलें विवेचन । सत्य मिथ्या हे प्रकार दोन । विचारा आले ते सांगें ॥९८॥ऐसें सद्गुरुचें वचन ऐकतां । आनंदोनि जाहला साष्टांगें नमिता ।सवेंचि जाहला विनविता । श्रद्धांजलि बैसोनी जी जी समर्था कृपा करून ।उपदेशिलें दीनालागून । तितकें उच्चारावें केवीं निरूपण ।परी यथामती निवेदूं ॥२७००॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.