सार्थ लघुवाक्यवृत्ती/ओव्या २२०१ ते २३००

विकिस्रोत कडून

<poem> परी जागृतीसी सत्वगुण । स्वप्नअवस्थेचा रजोगुण ।श्रुति बोलिली हें वचन । म्हणोनि बोलिलें ॥१॥असो मिथ्यासी कोणतेंही बोलतां । विरोध न कल्पावा चित्ता ।ज्या समयीं जो प्रसंग अपेक्षितां । मृगजलवत् बोलावें ॥२॥सुप्ति अवस्था कारणशरीरा । येथें तमोगुणचि असे सारा ।एवं सत्व रज तमाचे उद्गारा । जागर स्वप्न सुषुप्ति ॥३॥दृश्य साकार असे जितुकें । ते द्रव्यशक्तीचे पदार्थ तितुके ।म्हणून स्थूलासी बोलिलें निकें । द्रव्यशक्ति सर्व ॥४॥सत्रा तत्त्वें क्रिया करिती । म्हणोनि सूक्ष्मासी क्रियाशक्ति ।कारणीं गुप्त वासनेसी वस्ती । इच्छाशक्ति यास्तव ॥५॥स्थूल व्यापार नव्हे बोलिल्याविण । म्हणून वैखरी जागृतीलागून ।स्वप्नीं ध्यासरूप घडे मनन । यास्तव मध्यमा वाचा सुप्तिकाळीं वाचा पश्यंती ।तेवींच परसेही तेथेंचि वस्ती । कारण कं वेदांत संमती । चवथा देह नाहीं ॥७॥चार पाच नवं तेरा । देह बोलती मतवादी गिरा । तो वाउगाचि देहलोभ खरा । धरोनी स्थापिती ॥८॥विचारें पहातां अंतःकरणस्फूर्ति । तेचि मायादेवी मूळ प्रकृति ।त्याचें अधिष्ठान तो सच्चिन्मूर्ति । ब्रह्मप्रत्यगात्मा ॥९॥तयासी देह म्हणूनि कल्पितां । लाज न वाटे तयाच्या चित्ता ।परी ते अल्पज्ञ स्वरूप न जाणतां । बोलती तें काय खरें ॥स्थूल सूक्ष्म देह दोन खरे । येथें आढळेचि ना तिसरें ।दोन्हीहून न कळणें जें निर्धारें । तें कारणशरीर बोलिजे ॥११॥याहून महाकारण देह एक । ज्ञानासी बोलती मंद तर्क ।तरी तें ज्ञान असे कौतुक । सामान्य कीं विशेष ॥१२॥विशेष जरी ज्ञान कल्पिलें । तरी तें सूक्ष्म देहाकडे आलें ।अथवा सामान्य म्हणतां तं संचलें । चिद्रूप निर्विकार ॥१३॥तयासी देह ऐसें म्हणतां । त्याची जीभ कां न झडे तत्त्वतां ।त्या देहाची तूर्या अवस्था असतां । तरी प्रत्यया येती ॥१४॥जैशी जागृति स्वप्न सुषुप्ति । एका नसतां एकीची प्रतीति ।तैशी तूर्यावस्था तिहीं परती । कोठें कोणीं देखिली ॥१५॥जागृती माजीं विवेकसहित ।जाणीवदशा असे स्फुरत ।तैशीच स्वप्नीं किंवा सुषुप्तींत । लोप नसे तयेचा ॥१६॥जें तिहींमाजी सदा असे । तयेसी अवस्था म्हणून बोलणें कैसें ।जें तिहीं अवस्थांहून नसे । भिन्न प्रतीति योग्य समाधिकालीं जरी कोणी । तूर्या अनुभविली ऐशी मानी । तरी तया पुसावें कर्णीं । सविकल्प कीं निर्विकल्प ॥१८॥सविकल्प म्हणतां तेचि वृत्ति । सूक्ष्माकडे येत निश्चिती ।निर्विकल्प म्हणतां ते निवृत्ति । अंतःकरणाची ॥१९॥तें अंतःकरण विद्याअविद्यात्मक । तेंचि कारण शरीर आवश्यक ।आतां तूर्या म्हणुनियां तर्क । कवणासी करिसी ॥२०॥तथापि तेचि तूर्या मानिसी । तरी ब्रह्मानुभव कैंचा तुजसी ।केव्हां वृत्तीसवें भरंगळसी । केव्हां पडसी शून्यीं ॥२१॥उगें चाटपणें बडबडितां । तूर्या उन्मनी आल्लेख उल्लेखता ।हें सर्वहि वृत्तिसापेक्षता । तया चिद्रूपज्ञान कैचें ॥२२॥असो तया मंदासी काय काज । परी ते धन्य साधक सिद्ध महाराज ।जे वृत्तीनें अनुभविती कीं निजीं निज अंगें ब्रह्म जाहले ॥२३॥त्रिपुटीसहित ब्रह्मानुभव । तयासी सविकल्प हें नांव । तें कर्तृतंत्रलक्षण स्वयमेव । पुढें कळे निरूपणीं ॥२४॥जो त्रिपुटी त्यागें निजांगें जाहला । तो वस्तुतंत्र सिद्धत्वें संचला ।हाही निरूपणें जाय कळला । प्रसंगानुसार ॥२५॥सूक्ष्म देहाचाचि तळवट । निःशेष अज्ञानाचा भरोनि घोट ।जाहला आत्मा ब्रह्म निघोट । निजांगें तोचि धन्य ॥२६॥येर हे मतवादी सेवकासी । राजा कल्पूनिया निश्चयेंसी ।वाउग्या कल्पना करून देहासी । वाढविती आवडी ॥२७॥प्रत्यगात्मया म्हणती अभिमानी । तूर्या अवस्था ते मूर्घ्नि स्थानीं ।निरानंद भोगया महाकारणीं । आणि अर्धमात्रा प्रत्यगात्मा मी ब्रह्मस्फूर्ति ।ऐशी जी अभिमानात्मक वृत्ति । हे तों सूक्ष्मदेहाची जाति ।चिदाभास जीवाची ॥२९॥तो अभिमान मुख्य आत्मया । होईल कैसा ब्रह्म अद्वया ।तस्मात् यथार्थ स्वरूप मतवादिया । कळलेंचि नाहीं ॥३०॥अर्धमात्रा कीं निरानंदभोग । स्थान मान कैचें पूर्ण जें असंग ।अद्वय ब्रह्म निर्विकार अभंग । तो विकारी जीव कैसा तस्मात् साधकेंएक करावें ।मतवाद्याचे कुतर्क त्यागावे । देहत्रय पंचकोश निरसावे ।चवथा प्रत्यगात्मा ब्रह्म ॥३२॥आणीकही चार चार जितुके । वेद मुक्ति शून्यादि तितुके ।हे वादी चहूंवरी कौतुकें । स्थापिती प्रमाणादि ॥३३॥ते ते सर्वही विसर्जुनी । देहत्रय पहावें विचारूनी ।अवस्था स्थान अभिमानी । त्यागून ब्रह्म व्हावें ॥३४॥देहत्रय हे मुख्य अनात्मा । चवथा निर्विकार ब्रह्म आत्मा ।हें यथार्थ जाणेल तो महात्मा । साधक धन्य धन्य ॥३५॥येथें कोणी म्हणेल मंदमति । कीं चार देह बोले मांडुक्यश्रुति ।तरी ते अवधारा एकाग्र चित्तीं । देहत्रयचि बोले चतुर्थ पाद म्हणून सांगत । परी तो देह म्हणून न बोलत । जरी देहच तरी कासया शाश्र्वत ।म्हणती श्रुति ॥३७॥तो अंतःप्रज्ञ। ना नव्हे उभयात्मक प्रज्ञ । अदृश्य अग्राह्य असंज्ञ ।अलक्षण आत्मा ॥३८॥एक आत्माचि प्रत्यय सार । सर्व प्रपंचाचा उपसंहार । तयासी या तिहींस्तव उच्चार । चौथा ऐसा केला ॥३९॥परी तो चौथा नव्हे निश्चयात्मक । जेथें एकपणाचा नसे संपर्क ।तोचि शिव शाश्र्वत साधक । देहत्रयत्यागें जाणती तस्मात् रविदत्ता पाहे पुरता ।तोचि तूं आत्मा ब्रह्म तत्त्वतां । हे सत्यप्रतीति त्रिविधता । अन्यथा नव्हे नव्हे ॥हा देह साकार पंचभूतांचा । जड दुःखरूप अस्थिमांसाचा ।तुज निर्विकारा विकार कैंचा । आहे तैसा अससी ॥४२॥तया देहाचे व्यापारा । जागृति अवस्था बोलिजें गिरा । तुज ब्रह्मात्मया निर्विकारा अवस्था कैंची ॥४३॥तया जागृतीसी नेत्रस्थान । कल्पिलेंसे सर्वांग जागरण ।तूज ब्रह्मात्मया स्थान मान । कवण बोले ॥४४॥हे आकारमात्रा प्रणवाची । तुज अनिर्वचनीया साकारता कैंची ।याचा अभिमान घेणें ही करणी जीवाची । तूं निरभिमान साक्षी ॥४५॥सत्वगुण कीं द्रव्यशक्ति । वाचा वैखरी तुज न स्पर्शती ।या रूपगुणदोषांहून केवळ चित्ती । तो तूं अससी ब्रह्मात्मा सत्रा तत्त्वात्मक देह सूक्ष्म ।हे क्रीडती देहाचें करूनि धाम । या तिहीं कोशां तूं अधिष्ठान परम ।सर्वातीत आत्मा सत्रांची क्रीडा जे जे होणें । तया स्वप्नावस्था अभिधान । तूं तो ब्रह्मात्मा सच्चिद्घन । अवस्थातीत ॥४८॥स्वप्नावस्थेचें स्थान कंठीं । तुज निर्देश न करी कोणी बोटीं ।उकार मात्रा भासकता गोमटी ॥४९॥ तूं ब्रह्मात्मा भासातीत वाउगा देहाध्यास घेउनी ।कर्तेपणें जो तैजस अभिमानी । हे तुझिये प्रतिबिंबाची करणी ॥२२५०॥तूं निरभिमान बिंबात्मा आठवून सुखःदुख भोगणें घडे ।तें सूक्ष्माचें सूक्ष्मासी सांकडें । तुज आत्मयासी भोक्तृत्व न जोडे ॥५१॥कवणेही काळीं रजोगुण क्रियाशक्ति मध्यमा । वाणी आदि विकार सूक्ष्मा । तूं निर्विकार ब्रह्मपरमात्मा ।गुणविकारातीत ॥५२॥नेणपण जें कारणशरीर । उगाचि मानिलासे विकार । तया नेणिवेचा होसी भासकर । तरी तुज नेणीव कोठें ॥५३॥बुद्धीसीं निर्व्यापारता आली । तये नांवें सुषुप्ति ठेविली ।ते अवस्था तुज नाहीं बोलिली । ब्रह्मप्रत्यगात्मया ॥५४॥सुप्ति अवस्थेंचें स्थान हृदय । तूं स्थानमानातीत अद्वय ।मी नेणता म्हणून घेता होय । तो अभिमानी प्राज्ञ ॥५५॥अविद्येमाजी जो बिंबला । तेणें नेणीवपणा बळें घेतला ।तो अभिमान तुज नाहीं स्पर्शला । ब्रह्मप्रत्यगात्मया ॥५६॥सर्व विकार विश्रांतीस आले । तुजमाजीं सहजसुख पावले ।पांथस्थ वृक्षछाये सुखी जाहले । तूं आत्मा वृक्ष अभोक्ता तमोगुण आणि इच्छाशक्ति । तेवींच विकारी वाणी पश्यंती । तूं आत्मा ब्रह्म चिन्मूर्ति ।गुणविकारातीत ॥५८॥एवं स्फूर्तीपासून देहापर्यंत । जितुका उद्भवला हा संघात । या रूपाहून विलक्षण अत्यंत । तें तंर ब्रह्म अससी ॥५९॥इतुकीं ही तत्त्वें बत्तीस । मिळून देहत्रय पंचकोश ।इतुक्यांचे रूपाहुनि जो चिदंश । ते तूं ब्रह्म अससी ॥२२६०॥जैसें घटजल जलाकाशासी । भिन्न महदाकाश पूर्णपणेंसी ।तेवीं स्थूलसूक्ष्मांसह प्रतिबिंबासी । भिन्न चिद्रूप ब्रह्म तूं ॥६१॥सर्वांचे रूपाहून भिन्न जे चिती । ते लिंपेल केंवी गुणदोषाप्रती ।तस्मात् जागृदादि विकार न स्पर्शती । तें तूं ब्रह्म अससी ॥६२॥घटादिकांचे व्यापार । गगना न स्पर्शती अणुमात्र । तेवीं न स्पर्शती अभिमानादि विकार । जयासी तें तूं ब्रह्म ॥६३॥सद्रूप चिद्रूप आनंदरूप । त्यावरी हें सर्व नामरूप । हा अवघा नव्हेसी तूं आरोप । अधिष्ठान ब्रह्म आत्मा ॥६४॥तो तूं ब्रह्म आत्मा आजी । नवा न होसी पहिलाची सहजीं ।कल्पना मात्र भाविली जे दुजी । ते सांडितां तेंचि तूं तेंचि तूं ऐसेंही बोलता ।विरोध मानिसील तत्त्वतां । कीं हा तूं या शब्दा अपरोक्षता ।तें परोक्ष जाहलें ॥६६॥तरी याचें ऐकावें उत्तर । जरी तें तूं शब्द अपरपर । हा उपाधीस्तव भासमात्र । परी स्वतंत्र एकरूप ॥६७॥जेवीं तूं राजा राजपदीं । होतासी सुखरूप शय्येविशदीं ।तोचि तूं स्वप्नीं मेळऊन मांदी । भीक मागसी अंत्यज गृहीं या कंगालाचे उपाधीकरितां ।तो तूं राजा म्हणावें तत्त्वतां । हा भिकारी नव्हेसि जाहलासी जो आतां । ऐसाचि प्रकार हाही ॥६९॥राजा म्हणजे सच्चिदानंद ब्रह्मा । तेंचि तूं अंगें आत्माराम । हें हें बत्तीस स्वप्नस्थ रूप नाम । नव्हेसि ओळखी भ्रम हा हाचि मी ऐसें जें वाटलें । यास्तव हें तूं नव्हेसि उपदेशिलें । परी हें अपरोक्ष नाहींच जाहलें ।तरी तें परोक्ष केवीं ॥७१॥हें नाहींच तें तूं अससी । येथें परोक्षता अपरोक्षता कैशी । तथापि भाविसी जरी मानसीं । तरी हे उपाधि सांडी ॥७२॥जैसें स्वप्नगत कंगालत्व त्यागिलें । तरी राजाचे राजपद तें संचलें ।तैसें सर्व हें मिथ्यात्वें निरसिलें । तरी तूं ब्रह्मब्रह्मीं ऐता हे उपाधि ईश सर्वज्ञापासून । साकारपर्यंत जितुकें तृण । हे पूर्वींच आम्हीं केली निरसन ।धर्मधर्मीसहित ॥७४॥येथें विरोध तरी असे कैंचा । मुळींच त्याग सर्वज्ञ किंचिज्ज्ञाचा ।हा अवघाची भ्रम स्वप्नींचा । जाहला तेव्हांचि नाहीं जीवेशाचें मात्र ऐक्यकरण ।तरी वाच्य विरोधामुळें न होणें । जैसा तो हा देवदत्त म्हणणें ।येथें विरोध ॥७६॥म्हणोनि जहदजहल्लक्षणा । केली पाहिजे एकीकरणा ।हेंही अल्पसें बोलूं वचना । दृष्टांत द्राष्टांतीं ॥७७॥तो म्हणजे काशीदेश । तेथें उष्णकाळ तरुण विशेष ।देखिला होता सदंत शामकेश । त्यासी बहू दिन जाहले ॥७८॥तोचि आतां ययादेशीं । देखिला असे वर्षाऋृतुसी । दंतभग्न श्वेतकेशी । वृद्ध हा पाहिला ॥७९॥काशी देश आणि हा देश । उष्ण पर्जन्यकाळ कीं शाम श्वेतकेश ।तरुण जरा सदंत अदंतास । अति दिसे विरोध म्हणोनि तो आणि देश एथीचा ।पर्जन्य उष्णकाळ मासाचा । तरुण आणि वृद्ध आतांचा । त्यागावा सहसा ॥८१॥शामकेश किंवा सदंत । श्वेतकेश आणि त्यागावे अदंत ।मुख्य तोचि हा देवदत्त । पुरुष मात्र घ्यावा ॥८२॥तैसा तच्छब्दें तो ईश्र्वर । त्वं म्हणजे जीव अनेश्र्वर । अससी म्हणतां सत्य जरी उत्तर । परी विरोध भासे ॥८३॥ईश सर्वज्ञ विद्या हे उपाधि । जीव किंचिज्ज्ञ अविद्या संबंधीं ।ही लक्षणें एकमेकां विरोधी । तरी ऐक्य कधीं नव्हे ऐसेंचि तो या सर्व जगाचा कर्ता ।हा जन्मून सुखदुःख भोक्ता । नियम्य नियंता ऐशी हे विषमता ।तरी समता केली ॥८५॥तस्मात् किंचिज्ज्ञ आणि सर्वज्ञ । विद्या अविद्या विरोधी दोन । कर्ता भोक्ता नियंत्यादि लक्षण । सांडिजे विरोधास्तव ॥८६॥ईश हा प्रतिबिंब जयाचा । जीवही उभारला तयाचा ।तोचि आत्मा ब्रह्म ह्मणतां कैंचा । असे विरोध ॥८७॥जीवेशाचें वाच्य त्यागुनी । लक्ष्याशीं ऐक्य पूर्णपणीं ।येथें परोक्षापरोक्ष म्हणोनी । केली पाहिजे लक्षणा ॥८८॥तैसा नव्हे आमुचा पक्ष । वाच्य नाहींच एकरूप लक्ष्य ।तो तूं आहेस म्हणतां प्रत्यक्ष । विरोध नाहीं ब्रह्मात्मया ॥८९॥हें ईशादि तृणांत पहिलें । मिथ्या म्हणून स्वतां निरसलें ।अखंडैकरस सहज उरलें । तें तूं ब्रह्म आत्मा ॥२२९०॥अस्ति भाति प्रियरूप आत्मा । सच्चिदानंद ब्रह्म परमात्मा ।ऐथें विरोध कोणता रूप कीं नामा । तरी त्यागावें काई तें तूं म्हणतां या शब्दासी । विरोध दिसला आहाच बुद्धीसी । परी या त्यागितां सर्व मिथ्यासी ।तें तें जाय सहज ॥९२॥येथें रविदत्ता मागील स्मरावें । पूर्ण दृष्टांता आठवावें । वृक्षीं बैसला तो आणि वाहावे । जो कां प्रवाहा ॥९३॥पडिला तो कधी नाहींच नाहीं । वृक्षस्थ तो एकचि सर्वदाही ।अरे हा तूं नव्हेसि तोचि तूं पाही ।वृक्षीं बैसला तो तैसाचि तो सर्वांचा अधिष्ठान । हा संघ नव्हेसि तूं आपण । तस्मात् मायादि तृणांत त्यागून ।उरसी तो तूं ब्रह्मात्मा माया अविद्या ईश । बुद्धयादि देहांत सर्व अनेश । याचें मुख्य रूपचि मिथ्या फोस ।तरी धर्म सत्य कैसे याचि हेतु सर्व रूपांहूनी । आणि सर्व गुणदोषांही पासूनी । चित्कला विलक्षण बोलिलें व्याख्यानीं । तो तूं ब्रह्म आत्मा ॥९७॥हें सत्य सत्य पुनः पुनः सत्य । तोचि तूं ब्रह्म आत्मा आदित्य ।हे नव्हेसि बत्तिसही अनित्य । धर्म अथवा धर्मी ॥९८॥हा तत्त्वमसि वाक्याचा उपदेश । काढून दिधला तुज सारांश ।आतां हा दृढ करी कीं मी अविनाश अन्य मीपण त्यागें ॥९९॥येथें संशय जरी असे तुज । तरी पुसावें बापा सहज ।तें प्रगट करूं जरी असतां गुज । न बोलावया योग्य ॥२३००॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.