Jump to content

संस्कृती/अरण्यकांड

विकिस्रोत कडून

पाच


अरण्यकांड


 रामाने आपल्या आयुष्यात चारदा गंगा ओलांडली. पहिल्या वेळेला विश्वामित्र त्याला व लक्ष्मणाला आपल्या यज्ञाच्या रक्षणार्थ घेऊन गेले त्या वेळी. दुसऱ्यांदा वामनाश्रमातून जनकाच्या यज्ञाला उत्तरेकडे गेले त्या वेळी. तिसऱ्यांदा कैकयीने वनवासाला पाठविले त्या वेळी व चौथ्यांदा लंकेहून सीतेला घेऊन परत येताना. ह्या दोन्ही वेळच्या प्रवासाचे जे वर्णन आहे, त्यातला काही भाग तुलना करण्यासारखा आहे. पहिल्या वेळेला रामाने गंगा ओलांडली, ती शरयूच्या संगमाच्या पूर्वेकडे, म्हणजे जवळजवळ हल्लीच्या बिहारच्या हद्दीशी. विश्वामित्र व राम जेथे गंगापार झाले, तेथे मलद आणि कारूष नावाची दोन समृद्ध राज्य पूर्वी होती. ती ताटका नावाच्या राक्षसीने नष्ट केली. तेथे त्या वेळी घोर अरण्य होते. काही मार्ग चालल्यावर ते वामनाश्रमात आले. तेथेच विश्वामित्रांचा यज्ञ चालू व्हायचा होता. रामाने व लक्ष्मणाने यज्ञाचे रक्षण केले. नंतर मैथिल जनकाच्या यज्ञाला आम्ही चाललो आहोत. तूही आमच्या बरोबर चल, असे ऋषींनी सांगितल्यामुळे विश्वामित्र व इतर ऋषी यांच्याबरोबर रामलक्ष्मण वामनाश्रमातून मिथिलेला जायला निघाले. गंगेच्या दक्षिणेकडे वसलेली गिरिव्रज नावाची दुर्गम राजधानी विश्वामित्राने लांबून रामाला दाखविली. त्या राजधानीच्या शेजारून समागधी नदी वाहत होती. पुढे महाभारतात वर्णन केलेली मगधराज जरासंधाची राजधानी ती हीच. म्हणजे या सर्व मंडळींनी मगधदेशात प्रवेश केला होता. एक रात्र सर्वजण शोण नदीच्या काठी निजले व नंतर ते गंगा ओलांडून लगेच विशाला नावाच्या नगरीला पोहोचले. हीच विशाला बुद्ध वैशाली-नगरी होती. हल्लीच्या बिहारमधील मुझफरपूरजवळच जुन्या काळातली वैशालीची

३६

।। संस्कृती ।।

वास्तू असावी, अशी कल्पना आहे. विशालानगरीतून पार झाल्यावर ते मिथिलानगरीच्या उपवनात पोहोचले. तेथेच त्यांना अहिल्या भेटली व तिचा उद्धार झाला. मिथिलेहून अयोध्येला येताना गंगापार व्हावे लागत नाही. जनकाने द्रुत पाठविले ते तीन रात्रींच्या मुक्कामानंतर अयोध्येला पोहोचले असे वर्णन आहे.

 रामाने दुसऱ्या वेळेला गंगा ओलांडली, ती वनात जाताना. ह्या वेळेला त्याने खूपच पश्चिमेकडे गंगा ओलांडली. शरयूच्या (सध्याची घोग्रा नदी) दक्षिणतीराने जाता-जाता त्याने तमसा (हल्लीची तॉस) नदी ओलांडली. काही मार्ग दक्षिणेकडे चालून गेल्यावर त्याला गंगेचे पात्र दिसले. गंगेच्या दक्षिण तीराला गेल्यावर एका मोठ्या झाडाखाली रामलक्ष्मण रात्रभर राहिले. दुसऱ्या दिवशी दिवसभर चालून ते गंगा-यमुनाच्या संगमावर प्रयागला भारद्वाजांच्या आश्रमात पोहोचले. भारद्वाजाच्या आश्रमापासून १० कोसांवर चित्रकूट पर्वत आहे असे सांगितले आहे. प्रयागच्या दक्षिणेकडे तो पर्वत होता. यात शंका नाही पण पश्चिमेकडे का पूर्वेकडे, ते मात्र दिलेले नाही. त्या पर्वतावर जाताना वाटेत त्यांना कालिंदी, अंशुमती अशा दोन नद्या लागल्या असे म्हटलेले आहे. कालिंदी व अंशुमती या दोन नद्या कोठच्या असाव्या, हे काही नीट समजत नाही.
 भरत भेटीनंतर रामाच्या असे लक्षात आले की, आपण जर चित्रकूटावर राहिलो, तर अयोध्यावासी नातेवाईक व पौरजन आपल्याला परत-परत भेटायला येतील व उगीच मुनिजनांच्या वसतीची शांती भंगेल, तेव्हा आपण चित्रकूट सोडून पुढे जावे. चित्रकूटाला लागून मंदाकिनी नावाची नदी होती. ही मंदाकिनी उत्तरेकडची गंगेची उपनदी असली पाहिजे. चित्रकूटाशेजारीच पंपा नावाची दुसरी नदी होती. चित्रकूटावर रामाला दोन मार्ग दाखविले. एका मार्गाने ऋषी जवळपास फळे वगैरे आणायला जात असत. दुसरा मार्ग दंडकारण्यात जात होता. रामाने तो मार्ग पत्करला व तो दंडकारण्यात शिरला. तेथे त्याला आश्रममंडल दिसले तेथे राहून दुसऱ्या दिवशी राम वनात शिरला. तेंव्हा त्याला विराग नावाचा राक्षस दिसला.

।। संस्कृती ।।

३७

त्याचा वध करून त्याने सांगितलेल्या मार्गाने तेथून दीड योजन दूर असलेल्या शरभंगाच्या आश्रमात गेला. तेथून बराच रस्ता तुडवून (३.६.२. गत्वा दूरमध्वानम्) राम सुतीक्ष्णाच्या आश्रमाला आला. तेथून दुसऱ्या दिवशी पंचाप्सरस नावाच्या सरोवराशेजारून जात ते दंडकारण्यातील मुनींच्या आश्रमात आले. तेथून राम निरनिराळ्या ऋषींचा पाहुणचार घेत १० वर्षे राहिला व परत सुतीक्ष्णाश्रमाला आला. सुतीक्ष्णाश्रमाहून चार योजनांवर अगस्त्य ऋषींच्या भावाचा आश्रम होता. तेथे तो दुसऱ्या दिवशी गेला. तेथून एका योजनावर अगस्त्य ऋषींचा आश्रम होता. तेथून दोन योजनांवर पंचवटी होती. तेथे रामाने

आश्रम बांधिला व ते तेथे राहू लागले.
 येथून जवळपासच कोठेतरी जनस्थान नावाचा प्रदेश होता. सीता नाहीशी झाल्यावर रामाने पंचवटी व जनस्थान धुंडाळले; पण ती सापडली नाही. जटायु मरणाच्या द्वारी पडलेला दिसला. त्याची क्रिया पश्चिमेला गेले. थोड्या वेळ्याने ते दक्षिणेकडे गेले. तीन कोस गेल्यावर त्यांना क्रौंचारण्य लागले. येथे त्यांनी कबंधाचा वध केला. कबंधाने त्यांना पुढचा मार्ग सांगितला. "पश्चिमेला बराच मार्ग गेल्यावर पंपा नावाच्या सरोवराच्या पश्चिम तीरावर तुम्हाला शबरीचा आश्रम व मातंगाश्रम दिसेल. पंपा ओलांडल्यावर ऋष्यमूक पर्वत दिसेल. तेथे त्यांनी सुग्रीवाशी सख्य करावे."
 ऋष्यमूकाहून पहिल्यांदा वानर व नंतर वानरसैन्यासह राम लंकेला कसे गेले, तो मार्गही रामायणात दिलेला आहे. पण त्याआधी रावण सीताहरण करण्यासाठी पंचवटीला कोणत्या मार्गाने आला, ते पाहू.
 रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक-कान कापल्यावर ती जनस्थानातच आपले भाऊ खर-दुषणांकडे गेली व रामाचा सूड घेण्यास तिनं सांगितले. खर, दूषण व त्यांचे सहाय्यक यांना रामाने मारल्यावर शूर्पणखा लंकेला आपला भाऊ जो रावण याच्याकडे गेली व तिने त्याची खूप निर्भर्त्सना केली, "तू असला कसला राजा? (अध्याय ३१) माझी काय दशा झाली, ते बघ. जनस्थानात असलेले तुझे सर्व भाऊ मारले गेले आहेत व ह्यातली तुला

३८

।। संस्कृती ।।

त्याचा वध करून त्याने सांगितलेल्या मार्गाने तेथून दीड योजन दूर असलेल्या शरभंगाच्या आश्रमात गेला. तेथून बराच रस्ता तुडवून (३.६.२. गत्वा दूरमध्वानम्) राम सुतीक्ष्णाच्या आश्रमाला आला. तेथून दुसऱ्या दिवशी पंचाप्सरस नावाच्या सरोवराशेजारून जात ते दंडकारण्यातील मुनींच्या आश्रमात आले. तेथून राम निरनिराळ्या ऋषींचा पाहुणचार घेत १० वर्षे राहिला व परत सुतीक्ष्णाश्रमाला आला. सुतीक्ष्णाश्रमाहून चार योजनांवर अगस्त्य ऋषींच्या भावाचा आश्रम होता. तेथे तो दुसऱ्या दिवशी गेला. तेथून एका योजनावर अगस्त्य ऋषींचा आश्रम होता. तेथून दोन योजनांवर पंचवटी होती. तेथे रामाने आश्रम बांधिला व ते तेथे राहू लागले.

 येथून जवळपासच कोठेतरी जनस्थान नावाचा प्रदेश होता. सीता नाहीशी झाल्यावर रामाने पंचवटी व जनस्थान धुंडाळले; पण ती सापडली नाही. जटायु मरणाच्या द्वारी पडलेला दिसला. त्याची क्रिया आटपून ते पश्चिमेला गेले. थोड्या वेळ्याने ते दक्षिणेकडे गेले. तीन कोस गेल्यावर त्यांना क्रौंचारण्य लागले. येथे त्यांनी कबंधाचा वध केला. कबंधाने त्यांना पुढचा मार्ग सांगितला. "पश्चिमेला बराच मार्ग गेल्यावर पंपा नावाच्या सरोवराच्या पश्चिम तीरावर तुम्हाला शबरीचा आश्रम व मातंगाश्रम दिसेल. पंपा ओलांडल्यावर ऋष्यमूक पर्वत दिसेल. तेथे त्यांनी सुग्रीवाशी सख्य करावे."
 ऋष्यमूकाहून पहिल्यांदा वानर व नंतर वानरसैन्यासह राम लंकेला कसे गेले, तो मार्गही रामायणात दिलेला आहे. पण त्याआधी रावण सीताहरण करण्यासाठी पंचवटीला कोणत्या मार्गाने आला. ते पाहू.
 रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक-कान कापल्यावर ती जनस्थानातच आपले भाऊ खर-दुषणांकडे गेली व रामाचा सूड घेण्यास तिनं सांगितले. खर दूषण व त्यांचे सहाय्यक यांना रामाने मारल्यावर शूर्पणखा लंकेला आपला भाऊ जो रावण याच्याकडे गेली व तिने त्याची खूप निर्भर्त्सना केली, "तू असला कसला राजा ? (अध्याय ३१) माझी काय दशा झाली, ते बघ. जनस्थानात असलेले तुझे सर्व भाऊ मारले गेले आहेत व ह्यातली तुला

३८

।। संस्कृती ।।

काही बातमी नसावी इतके तुझे हेर गाफील आहेत." हे ऐकल्यावर रावण ताबडतोब आपल्या पागेमध्ये गेला व त्याने सूताला रथ जोडावयास सांगितला. उत्तम खेचरे लावलेला रथ सूताने तयार केला व रावण त्यात बसून निघाला.

 रावण रथात बसल्यावर त्याला समुद्राच्या पलीकडील तीर, तिथल्या नावा, मोठमोठाले प्रासाद दिसत होते, असे वर्णन आहे. रावणाने समुद्र ओलांडला व तो मारीचाश्रमाला आला. म्हणजे रावणाने ओलांडलेला "समुद्र" रथातून ओलांडण्यासारखा होता. मारीचाश्रम कोठे होता? ह्या समुद्राकाठीचा ! हा समुद्र किंवा पाणथळ प्रदेश दुसऱ्याच एका गोष्टीत महाभारतामध्ये उल्लेखिलेला आहे. महाभारताच्या आदिपर्वाच्या २५ व २६ या अध्यायांमध्ये गरूडाने "एक मोठी वृक्षशाखा कोठे टाकू?" असे आपला बाप जो काश्यपऋषी याला विचारिले. "ब्राह्मण नसलेल्या अशा एका देशाचे नाव मला सांगा." काश्यपाने एक प्रदेश सांगितला. तेथे गरूडाने फांदी टाकली, असे वर्णन आहे. तो पर्वत कुठे असावा, हे मात्र धडसे कळत नाही. कोठेतरी उत्तरेस असावा असे वाटते. त्या पर्वतावरून गरुडाने उडी मारली व स्वर्गात जाऊन अमृतकुंभ आणला, असे वर्णन आहे. रामायणामध्ये मारीचाश्रमाचे वर्णन देताना ह्याच महावृक्षाची शाखा जेथे पडली व जेथून अमृत आणायला गरूड गेला ते स्थान, असे म्हटले आहे. ह्यावरुन हे स्थान कोठेतरी उत्तरेकडे असावे, असे वाटते. मारीच व रावण रथात बसून जनस्थानात गेले. त्यांनी वाटेत नाना नगरे व राष्ट्रे पाहिली (३.४०.८) असे वर्णन आहे. पण ते बरोबर वाटत नाही. मारीचाश्रमाहून निघून ते त्याच दिवशी, कदाचित एकदोन दिवसात, जनस्थानात गेले असावेत. हा सर्व प्रवास रथात बसूनच झाला. म्हणजे रावणाची लंका जनस्थानापासून फार लांब नसावी, असे वाटते.
 राम सीतेला शोधीत शोधीत साधारणपणे पश्चिमेकडे व दक्षिणेकडे जात होता. वाटेमध्ये त्याला निरनिराळे आश्रम व पर्वत लागले. पण त्याने गोदावरी नदी ओलांडली, असे कुठेच वर्णन नाही. रावणानेही ही गोदावरी नदी ओलांडल्याचा उल्लेख नाही. वानर जेव्हा दक्षिण दिशेला सीता शोधावयास गेले, तेव्हाही गोदावरीचा उल्लेख कुठे नाही. दक्षिण दिशेला ते विंध्याच्या अरण्यातून हिंडत होते (४.४८.१५ ) .

।। संस्कृती ।।

३९

 तेथे हिंडता-हिंडता त्यांना एक मोठी गुहा (४.४९.७ महाबिलम् ) दिसली. तीत ते महिनाभर अडकून पडले. त्या बिळातून स्वयंप्रभा नावाच्या बाईने त्यांची सुटका केली. “डोळे मिटून घ्या, मी तुम्हाला या गुहेबाहेर नेते," असे ती म्हणाली. गुहेबाहेर नेल्यावर त्यांना डोळे उघडायला सांगून तिने सांगितले, "हा विंध्य पर्वत. हे प्रस्त्रवण नावाचे शिखर, व खूप पाणी असलेला हा सागर " (४.५२.१२). वानर येथे विचार करीत बसलेले असताना संपाती नावाचा जटायूचा भाऊ त्यांना दिसला. तोही सांगतो की ह्या विंध्याच्या शेजारी सागर आहे. तो ओलांडला की, त्रिकूट नावाचा पर्वत आहे. तेथेच एका शिखरावर लंका नावाची राक्षसाची राजधानी आहे. रावण कोठच्या मार्गाने गेला, त्या मार्गाचेही वर्णन संपातीने केले. संपातीचा मुलगा सुपाश्च म्हणून होता. तो विंध्य पर्वताच्या महेंद्र नावाच्या शिखराशी एक पलीकडे जायला अरुन्द मार्ग होता, तेथे उभा होता. ह्या मार्गाला महेन्द्रद्वार असे नाव दिले आहे. (४.५८.१३). ह्याच ठिकाणाहून एक नदी वाहत होती. तिथे पलीकडे समुद्र होता. ह्या दारातून जायला एक अगदी अरुंद रस्ता होता. त्या रस्त्यावर द्वार राखून सुपाश्च उभा असता त्याला एक प्रचंड काळाकभिन्न पुरूष एका बाईला धरून नेताना दिसला. "कृपा करून मला रस्ता दे" असे त्या पुरुषाने म्हटल्यावर सुपाश्च बाजूला झाला व त्याने रस्ता दिला. हाच पुरूष रावण व ती बाई मैथिली सीता असावी, असे संपाती म्हणाला. संपातीने त्यांना महेंद्र पर्वताचा मार्ग दाखविला. तेथून 'ती पाहा लंका' म्हणून लंकाही दाखविली. अगस्त्याश्रम गोदावरीजवळ नसून कोठेतरी विंध्यात होता, असे महाभारतात वर्णन आहे (३.४८.१५ ) प्रो. शेजवलकर ह्यांनी तो बुंदेलखंडातील कालंजर पर्वताशेजारी असावा, असे म्हटले आहे.

 किष्किंधाकांडाचे संपादक प्रो. मांकड आपल्या प्रस्तावनेत हा सर्व मार्ग देतात. दक्षिणेकडील पी. एस. अय्यर ह्या संशोधकाने 'रामायण अँड लंका' असे पुस्तक लिहिले आहे. त्यामध्येही ह्या सर्व गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. ह्या गृहस्थांनी हिंदुस्थानचा नकाशा हाती घेऊन वर दर्शविलेली सर्व स्थाने शोधून काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी ही लंका नर्मदेच्या उत्तरेलाच आहे, असे ठरविले आहे.

४०

।। संस्कृती ।।

 पंपा विंध्य पर्वतात आहे, असा उल्लेख बाणाच्या कादंबरीत आहे. कादंबरीतील पोपट "मी विंध्याच्या अरण्यात पंपेशेजारी जन्मलो." असे म्हणतो. पुराणामध्येही किष्किंधा हे स्थान विंध्यातच दशार्ण, भोज, विदिशा वगैरेजवळ आहे, असे म्हटले आहे (भारत-वर्षः करफेल पृ.४८) कलकीपुराणामध्ये सिंहलद्वीप रेवा ऊर्फ नर्मदेच्या जवळपास कोठेतरी आहे, असे दिले आहे. तेथील राजकन्येला नर्मदा नदीवरील वाऱ्याने त्रास होत होता असे दिले आहे. त्याचप्रमाणे सिंहलद्वीपाच्या राजकन्येने वरण्यास आलेल्या बऱ्याच राजपुत्रांना स्त्रीरूप दिले होते. त्या राजपुत्रांनी नर्मदेत स्नान केल्यावर त्यांना पुरूषरूपाची प्राप्ती झाली, असे म्हटले आहे. म्हणजे एके काळी सर्व रामायणकथा नर्मदेच्या उत्तरेस विंध्याच्या परिसरात झाली, असे दिसते.

 श्री. अय्यर व प्रो. मांकड यांच्या मताप्रमाणे लंका कोठे असावी, हे खाली दिले आहे - विंध्य पर्वतात कैमूर व भंडर अशा दोन श्रेणी आहेत. ह्या श्रेणींत वानर सीतेला शोधीत होते. तिच्या आसपास ऋक्षपर्वत, माल्यवान पर्वत असावेत. कैमूर पर्वत सध्या कटांगी नावाच्या गावाजवळ उतरतो व संपतो. येथेच वानरांची व संपातीची भेट झाली असावी. येथून उत्तरेकडे दीड मैलावर कटाव (खिंड) नावाचे एक ठिकाण आहे. श्री. अय्यर म्हणतात की, तेच महेंद्रद्वार असावे. कैर नदी ह्या ठिकाणी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. तिच्या प्रवाहामुळेच येथे खिंड निर्माण झाली आहे. ह्या खिंडीतून जायला अतिशय अरुंद रस्ता आहे. ह्याच रस्त्याने रावण सीतेला घेऊन गेला असावा. कटावहून पूर्वेकडे गेल्यावर थोड्याच अंतरावर एक टेकडी आहे. तिलाच हल्ली 'मंढरा' म्हणतात मंढरा हे महेन्द्रक या संस्कृत शब्दाचे प्राकृत रूप आहे. कैमूरश्रेणीत कंडव नावाची एक नदी आहे. ह्या नदीला हिरण नावाची दुसरी नदी मिळते. जबलपूरच्या उत्तरेला सुमारे १८ मैलांवर ह्या नद्या इंद्राणा नावाच्या एका खेड्याच्या भोवतालून जातात. इंद्राणाच्या दक्षिणेला हिरण नदीवर सिंधलदीव म्हणून एक खेडे आहे. इंद्राणाच्या आसपास बऱ्याचशा टेकड्या आहेत. इंद्राणाच्या शेजारीच टिकुडी नावाचे एक खेडे आहे. वर दिलेली मंढरा नावांची टेकडी इंद्राणापासून सुमारे ११।। मैल आहे. इंद्राणा सखल भागात वसलेले असल्यामुळे मंढरापासून इंद्राणापर्यन्तचा भाग पावसाळ्यात पाण्याने भरलेला असतो. म्हणजे येथे १०-११ मैलांचा एक जलसंचय होतो.

।। संस्कृती ।।

४१

 हा जलसंचय कोठेही अतिशय खोल नाही. रावणाचा रथ जटायूने मोडल्यावर रावण सीतेला घेऊन गेला, असे सुपाश्वाच्या वर्णनावरून दिसते. तो आकाशमार्गे गेला वगैरे भाग अतिशयोक्त, काव्यमय किंवा मागाहून घुसडलेला असावा. राम वानरसेना घेऊन 'समुद्र'तीरी आला. तेव्हा तोही म्हणतो की, सर्व वानर पायी पायी दुसऱ्या तीराला पोहोचतील (६.२२.३). नलाने सेतू बांधला त्यासाठी त्याने दगड आणी झाडे (६.२२.५४.६७)ह्यांचा उपयोग केला. म्हणजे जेथे जेथे पाणी जरा खोल होते तेथे तेथे दगड आणि लाकडे टाकून तात्पुरता मार्ग तयार केला.

 ह्या वरील तर्काला पोषक असे आणखी एक दोन मुद्दे आहेत. कालिदासाच्या वेळी लंका म्हणजे सध्या ज्याला लंका म्हणतात ते असे लोक निश्चित धरून चालत होते. रघुवंशातील तेरावा सर्ग वाचताना तीच लंका कालिदास धरून चाललेला आहे, पण विमान लंकेहून अयोध्येपर्यंत जाताना ज्या मार्गाचे वर्णन केले आहे, तो मात्र जरा विचार करायला लावण्यासारखा आहे. पहिले १६ श्लोक समुद्राचे वर्णन आहे. नंतर दोन लोक किनाऱ्याचे वर्णन आहे. त्या नंतर कुठच्याच दक्षिण भूभागाचे वर्णन येत नाही. एकदम २२ व्या श्लोकात जनस्थानाचा उल्लेख आहे. नंतर माल्यवान पर्वताचा; नंतर पंपासरोवराचा, त्यानंतर गोदावरी नदीतून उठलेल्या सारसपक्ष्यांचा आणि पंचवटीचा. ह्यापुढे ओळीने अगस्त्याश्रम, पंचाप्सरस सरोवर, नंतर सुतीक्ष्ण, नंतर शरभंगाचा आश्रम, नंतर चित्रकूट, त्याच्याभोवताली वाहणारी मंदाकिनी नदी, नंतर अत्रींचा आश्रम, मग गंगायमुनांचा संगम आणि त्यापुढे शरयू नदी व अयोध्या. राम ज्या क्रमाने दंडकारण्यात पोहोचला, त्याच्या बरोबर उलट क्रमानेच हे वर्णन केलेले आहे. जनस्थान व माल्यवान यांचा उल्लेख पंपेच्या आधी आहे. माल्यवान पर्वत व गोदावरी ही परस्परांपासून किती दूर होती, ह्याचा मात्र काहीच बोध होत नाही. रामायणातही पंपेचा उल्लेख येतो तो सीताहरणानंतर. पण ते स्थान गोदावरीच्या दक्षिणेला का उत्तरेला, हे मात्र कळत नाही.

४२

।। संस्कृती ।।

 डॉ. व्ही. एम. कुलकर्णी ह्यांनी जैन रामायणावरती बडोद्याच्या 'जर्नल ऑफ ओरिएन्टल इन्स्टिट्यूट' मध्ये १९५९-६० मध्ये दोन लेख लिहिले आहेत. जैन महाराष्ट्री भाषेत विमलसूरी नावाच्या कवीने 'पउमचरिय' नावाचे रामचरित्र लिहिले आहे. हा ग्रंथ सुमारे ख्रिस्त - शतक दुसरे या काळात लिहिला असावा, असे दिसते. पण ज्याप्रमाणे कृष्णकथा जैनांच्या पवित्र धार्मिक ग्रंथाचा भाग समजली जाते, त्याप्रमाणे रामचरित्र समजले जात नाही. रामचरित्रावर जैनांनी पुष्कळच वाङ्मय लिहिलेले आहे. १०-१२ कवींनी रामकथा लिहिलेली आहे. ह्या सर्व कथांतून राम, सीता, दशरथ, भरत वगैरे सर्व मंडळी जिनोपासक होती, असे दाखविले आहे. विमलसूरी कथेच्या आरंभी असे सांगतों की ही कथा गुरुपरंपरेने आपल्याला प्राप्त झालेली आहे. माझ्यापुढे गुरुकडून आलेली एक नामावली आहे (नामावलियनिबध्दम् आयरियपरांपरागयं सर्व वोच्छामि पउमचरियंम). अशा तऱ्हेचे नामावलीचे श्लोक व त्या श्लोकात साररूपाने सांगितलेल्या कथा जैन वाङ्मयात आहेत. त्यांना 'उवएसमालाकहा' (उपदेशमालाकथा) असे म्हणतात. अशाच तऱ्हेच्या नामावलीवरून सूरीने आपले रामायण रचिले असे त्याचे म्हणणे आहे. डॉ. कुलकर्ण्याच्या म्हणण्याप्रमाणे विमलसूरीच्या पुढे ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात रचिलेले मूळ वाल्मीकि रामायण होते. त्यांनी वाल्मीकि - रामायणातील व पउमचरियातील साम्यस्थळे दाखविली आहेत. रामकथा, सीताकथा व रावणकथा लोकगीतांच्या रूपाने प्रसृत होत्या व कुशीलव नावाचे गायक त्या कथा रस्तोरस्ती गात असत, असेही दिसते. वाल्मीकीच्या रामायणात व पउमचरियात जी साम्यस्थळे आहेत, ती ह्या मूळच्या लोकागीतामध्येही असतील. काही साम्य नसलेली जी स्थळे आहेत, ती ह्या मूळच्या लोकागीतामध्येही असतील. काही साम्य नसलेली जी स्थळे आहेत, ती जैनधर्माचा प्रसार करण्याच्या पद्धतीने उघडउघड लिहिलेली आहेत. पण काही स्थळे अशी आहेत की, ती वाल्मीकि रामायणाशी जुळत नाहीत; ती का जुळत नाहीत, ह्याचा उलगडा होत नाही.

 ह्या स्थळांपैकी रामाच्या दक्षिणेकडील प्रवासाचे वर्णन हे एक होय. वर्णनात राम प्रयागहून निघाला, तो निरनिराळ्या ऋषींच्या आश्रमांवरून नर्मदेला पोहोचला, असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे पयुष्णी म्हणजे पूर्णा-

।। संस्कृती ।।

४३

तापी नदीचाही उल्लेख आहे. म्हणजे राम दक्षिणेकडे गेला, तो मार्ग वाल्मीकिच्या रामायणाहून भिन्न असा दिला आहे. विमलसूरीनंतर दोन तीन शतकांनी कालिदास झाला, तेव्हा सध्याच्या संशोधित आवृत्तीमध्ये दिलेला मार्ग रामायणात होता, असे दिसते. तोपर्यंत भारताच्या दक्षिण टोकाला असलेले लंकाद्वीपही लोकांना माहीत झाले होते. इतके असून रामायणात काय किंवा रघुवंशात काय, लंका ते विंध्य येथपर्यंतच्या भूभागाचे वर्णनच येत नाही. तेथपर्यंतचे वर्णन मात्र अगदी काटेकोरपणे आलेले आहे. लोकगीतांत असलेल्या रामायणात राम दक्षिणेकडे गेला, ह्यापेक्षा कदाचित जास्त काही नसेलच. दक्षिणेचे मार्गही निराळे होते, एक मार्ग दिला. म्हणजे विमलसुरीपर्यंतच्या काळात राम कुठच्या मार्गाने विमलसुरीने त्यातला गेला, हे सर्वमान्य झालेले नव्हते.

 ह्या सगळ्या विवेचनावरून असे वाटते की, रामकथेतील प्रसंग शरयू नदीपासून मध्य प्रदेशाच्या मध्यापर्यंत घडलेले असावेत. पुढे कधीतरी पहिल्यांदा गोदावरी नदी व मागाहून सध्याची लंका त्यामध्ये शिरली. हा प्रकार कालीदासाच्या वेळेपर्यंत झाला पण तरीही किष्किंधा म्हणजे तुंगभद्रेच्या तीरावरील हल्लीचे हंपी हे समीकरण ब-याच मागाहून झालेले दिसते. ते कधी झाले, ह्याचा शोध करणे भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने फार उपयुक्त होईल. कालिदासाच्या काव्यावरून (मेघदूत) राम सध्यांच्या आसपास दक्षिणेकडे उतरला असे दिसते. किष्किंधा कृष्णेच्याही दक्षिणेला व पूर्वेच्या रस्त्याने न जाता नाशिकला आला ही कथा, हे दोनही भाग फार उत्तरकालीन असावेत, असे वाटते.
 सध्याची संशोधित आवृत्ती बाराव्या शतकाची आहे. त्यात ही किष्किंधा कोठे, ह्याचा पत्ता लागत नाही. हा म्हणजे उत्तरकाल बाराव्या शतकापुढचा होता, असे समजण्यास हरकत नाही.
 भवभूतीच्या उत्तर राम चरितात व रामायणाच्या उत्तरकांडात राम परत एकदा दक्षिणेला गेल्याचे वर्णन आहे; पण सबंध उत्तरकांडच प्रक्षिप्त मानिल्यामुळे गंगापार होऊन दक्षिणेकडे जाण्याचा तो प्रसंग वरच्या वृत्तांतातून गाळलेला आहे.

४४

।। संस्कृती ।।