वनस्पतिविचार/जनन
वाल अथवा पावटा.--पावट्याचे बी घेऊन बाह्य निरीक्षण केलें असता असे आढळून येईल की, बाहेरील बाजूस पांढुरकी त्वचा असून एका बाजूस पांढरा लहान पट्टा असतो. एक दोन दिवस पाण्यात भिजत घातलेला पावटा फुगून त्याची बाह्य त्वचा अगदी सुटी होते. टरफल सोलून काढिलें असतां परस्परांस चिकटलेल्या दोन डाळिंबी, आंतील अंगास आढळतात. टरफल काढावयाचे पूर्वी जरा बोटाने दाबिलें असतां पांढऱ्या पट्यापाशी आंतून पाणी बाहेर येते. हे पाणी एका छिद्रांतून येत असते. डाळिंबी उकलून पाहिले असतां मध्यभागी एक कोंब असतो. कोंबास दोन अग्रे असतात. पैकी एक अग्र वरील छिद्रांतून निघून खाली जाते, व दुसरें अग्र वर वाढते. डाळिंबीमध्ये पौष्टिक अन्न असते. बीज उगवू लागले असतां डाळिंबींतील अन्न कमी होत जाते, व त्यामुळे त्यास सुरकुत्या पडतात. वर जाणाऱ्या अग्रावर पाने येत जातात, पण खाली जाणा-या अग्रावर पाने येत नाहीत. प्रथम खालील अग्र, वरील अग्रापेक्षा अधीक जोराने वाढते. खालील अग्रावर तसेच त्याच्या पोटशाखांवर बारीक केस येतात.
पावटा हा द्विदल धान्य वनस्पतिपैकी आहे. कारण त्याच्या बीजांत दोन बीजदलें ( Cotyledons ) असतात. शिवाय त्याचा वाढता कोंब डाळिंबीच्या मध्यभागी असतो. ही स्थिति द्विदल धान्य वनस्पतीच्या बीजांमध्ये नेहमी आढळते. खाली जाणारा कोंब बीजछिद्रांतून ( Micropyle ) बाहेर पडतो, हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. बीजांतील अन्न बीज उगवू लागले
एरंडीः-वरील कवची चकाकीत, रंगीबेरंगी चिटांप्रमाणे असून बुडाशी कांहीं भाग पांढरा, उंच असतो. कवची जाड व कठीण असते. पांढऱ्या उंच जागेमध्ये पावट्याप्रमाणे बीजछिद्र ( Micropyle) असते. चार पांच दिवस एरंडी भिजवून ठेविली असतां ती फुगते. कवची काढून टाकिली म्हणजे आंत पांढरें आवरण आढळते. हे आवरण जाड व तेलकट असते. हळू हळू हें तेलकट आवरण काढून टाकावे म्हणजे मध्यभागांत कागदाप्रमाणे पातळ, सफेद दोन डाळिंबी आढळतात. डाळिंबीच्या बुडाशी मध्यभागी वाढता कोंब आढळतो. कोंबाचे एक अग्र बीजछिद्रांतून खाली बाहेर पडते, व दुसरें अग्र पांच सहा दिवस तसेंच बीजदलांनी आवरीत राहते. जाड तेलकट आवरणांतील तेल कमी होऊन आंतील पातळ बीजदले मोठी होऊ लागतात. वाढता वाढत तेलकट भाग नाहीसा होऊन पातळ डाळींबी मोठ्या वाढून हिरव्या होतात. म्हणजे बीजदले वाढून पहिली हिरवी पाने कोंबावर दिसूं लागतात. |
बीजदलें ( Cotyledons ) व आदिमूल (Radicle ) ह्यांमध्ये एक लांब दांडा येतो. हा दांडा बीजदलाखाली आदिमुळाचे वरचे बाजूवर असतो. ह्या दांड्यामुळे बीजदले, त्यावरील तेलकट वेष्टण व मध्यभागी असणारा कोंब हे वर उचलले जातात. जेव्हां खोड चांगले वाढते तेव्हा हा मध्ये आलेला दांडा खोडाचा एक भाग होतो. असला मध्यभागी येणारा दांडा पावट्यामध्ये इतका मोठा वाढत नाहीं.
पावट्याचे डाळिंबीत पौष्टिक अन्न असते, पण एरंडीचे डाळिंबीत पौष्टिक अन्न नसून डाळिंबीच्या सभोवती जें तेलकट वेष्टण आढळते, तेच एरंडचें अन्न होय. एरंडी उगवू लागली असतां, हे अन्न कमी होऊन अगदी निःसत्त्व होते. एरंडी सुद्धा द्विदल धान्यवनस्पति वर्गापैकी आहे.
अन्नाच्या आवरणासंबंधीं जो फरक एरंडी व पावटा ह्यामध्ये असतो तो विशेष लक्षात ठेवण्याजोगा आहे. पुष्कळ बीजांत पहिल्याप्रमाणे अन्न बीज-
मका-मक्याचा एक दाणा घेऊन तपासला असतां वरील अंग पिवळे व चापट आढळते. एका बाजूस पांढरी खांच असते. पांढऱ्या खांचेवर एक बारीक खरखरीत चिन्ह असते. एक दोन दिवस पाण्यात भिजविलेला दाणा परीक्षणास चांगला असतो. कारण त्यामुळे तो दाणा मऊ होऊन आंतील भाग स्पष्ट दिसतात. पिवळे फोल काढून टाकल्या नंतर बुडाजवळ बीजछिद्र ( Micropyle ) पाहण्यास विसरू नये. मक्यांत पावट्याप्रमाणे दोन डाळिंबी असत नाहींत, मक्याचा उगवता गर्भ एका बाजूस असतो व सभोवती अन्नाचे वेष्टण असते, अन्नाचे बाह्य वेष्टण कठीण व पिवळे असून आंतील भाग पांढऱ्या पिठाचा असतो. मका उगवू लागला असतां उगवत्या कोंबाचें खाली जाणारे अग्र, बीज-छिद्रांतून बाहेर पडते. हे अग्र थोडेसे वाढल्या नंतर दुसरी दोन तंतुमय अग्रे मक्यांतून निघतात, व तिन्ही मिळून मक्यांची प्राथमिक मुळे तयार होतात. वर जाणारे कोंबाचे अग्र सुद्धा ह्याच रीतीने वाढू लागते. त्यावर पाने पावट्याप्रमाणे सुटीं प्रथम दिसत नाहीत. पानाच्या बुडाकडील भाग वाढत्या कोंबासभोंवती गुंडाळलेला असतो व पाने एकामागून एक येऊ लागतात. पावट्याचे मुख्य मूळ प्रथम जमिनीत लांब वर घुसून त्यावर पुढे पोटमुळे येतात, अशी स्थिति येथे नसते. सर्व मुळे साधारणपणे एकाच लांबीरुंदीची असून ती सर्व तंतूमय असतात. त्यांचे मुख्य मूळ असे कोणतेच नसते. मक्यांत गर्भ बाजूस असून त्यांत एकच बीजदल ( Cotyledon ) अथवा डाळिंबी असते, म्हणूनच मका एकदल धान्य वनस्पतिपैकी आहे. गहूं बाजरी, ज्वारी, वगैरे धान्ये ह्याच वर्गाची आहेत.
मक्याचे दाण्यांत असणारे पौष्टिक अन्न, बीज उगवू लागले असता त्यास उपयोगी पडते, व जेव्हां मुळे व खोड चांगले वाढतात त्यावेळेस त्या दाण्यांतील अन्न कांहीं शिल्लक राहत नाहीं; कारण ते उगवत्यास्थितींत खर्च होते. येथे एवढे लक्षात ठेवावें कीं, एरंडीप्रमाणे मक्यांत गर्भाभोंवतीं अन्नाचा पदर असतो. पावट्यासारखे बीजदलांत अन्न सांठविलेले नसते. मक्याचा दाणा
खजूरः-ह्या बीजावर तांबूस रंगाचे फोल असून मध्ये सरळ चीर असते. वरच्या बाजूस मध्यभागी लहान आडवी चीर असून थोडा खोलगटा अढळतो. ह्या खोलगट जागेत ह्याचे बीजछिद्र असते. बीजांतील अन्न कठीण व टणक असून बीज उगवण्यास पुष्कळ दिवस लागतात. कधी कधी दोन तीन महिनेही लागतात. कुंड्यांत बी पेरिले असतां उगवण्यासंबंधी चमत्कार पाहण्यास अधिक बरे. त्या खोलगट जागेतून एक लांब दांडा बाहेर पडतो. त्य दांड्याचे अग्र फुगट असते. काही दिवसांनी त्या फुगट अग्रांतून दोन वाढते कोंब निघतात. पैकी एक कोंब वर जातो व त्यावर पाने येतात; म्हणून त्यास प्रथम खोड म्हणतात व दुसरा खाली जमीनीत घुसतो म्हणून त्यास आदिमूळ म्हणतात. मक्याप्रमाणे येथील मुळे तंतूमय होतात. खरोखर त्या खोलगट जागेत प्रथम गर्भ संकुचित असतो. खाली जाणाऱ्या दांड्यांतून गर्भाचे दोन्ही कोंब खाली जातात व पुढे खोड वर वाढते व मुळे जमिनीत शिरतात.
वरील सर्व उदाहरणांत अशा प्रकारची स्थिति आढळत नाही; पण येथे मात्र दोन्ही कोंब आपली मूळे जागा सोडून दुसरे ठिकाणी आल्यावर वाढू लागतात, मक्याप्रमाणे हा गर्भ मगजवेष्टित ( Albuminous ) असतो. खजूर एकदल धान्यवर्गापैकी आहे; बीजांतील अन्न इतरांप्रमाणे उगवत्या स्थितीत उपयोगी पडते. दोन्ही कोंब बाहेर पडल्यावर बीज तपासून पाहावे. त्यांतील पूर्वीचा कठीणपणा जाऊन त्यांत पोकळी बनते. ह्या सर्व बीजांत एक अगर दोन डाळिंबी असतात. गर्भाचे कोंब दोन असून एक जमिनीत शिरतो, व दुसरा बाहेर ह्वेमध्ये वाढतो. डाळिंबीमध्ये अगर गर्भासभोवती अन्नाचा साठा असतो. हा सांठा प्रत्येक बीजांत थोडा बहुत असतो, बीज उगवू लागले असता त्यास बाहेरून अन्न मिळविण्याची सोय नसते, म्हणून ही सोय परमेश्वराने केली आहे. ह्या अन्नाचा फायदा घेऊन गर्भाचें दोन्ही कोंब वाढतात. हे अन्न स्वतंत्र स्थितीस पोहोचेपर्यंत पुरते.
बीज ही स्थिती बालतरूंची निद्रितावस्था म्हणण्यास हरकत नाही व त्यांचे जनन म्हणजे निद्रा संपून जागृतावस्था प्राप्त होणे हे होय. बीज हा बालरोपा
असून तो योग्य परिस्थितीमध्ये ठेविला असता त्यास जागृती मिळून तो जोमाने वाढू लागतो. .