Jump to content

वनस्पतिविचार/उत्तेजन व ज्ञानतंतुमीमांसा

विकिस्रोत कडून
प्रकरण १६ वें.
---------------
उत्तेजन व ज्ञानतंतुमीमांसा
---------------

 परिस्थितीच्या फरकामुळे जीवनकणांत फरक होऊन वनस्पतीच्या बाह्य रूपांत, रचनेत, तसेच जीवनक्रमांत बदल दिसू लागतो. पुष्कळवेळां अन्नरस तयार होत असतांना कांहीं अंतरबिघाड झाला असता त्याचा परिणाम तत्काल सजीव-तत्त्वावर होतो. त्याचप्रमाणे वनस्पतीस इजा झाली असता ती भरून काढण्याकरितां पुष्कळ शक्ति खर्च होते, व त्यामुळे जीवनचरित्रांत


१३६     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
कमी अधिक तफावत दिसते. फाजील अन्नग्रहण अथवा उपोषण वनस्पतीस होऊ लागले असता, त्याचा परिणाम केवळ बाह्य रूपांवरच न दिसतां अंतर्व्यवस्था व तेथील कार्ये ह्यांवरही होत असतो. शुद्ध ऑक्सिजन वायु कमी मिळू लागला असतां सेंद्रियपदार्थोद्भुत शक्तीचा जोर कमी होऊ लागतो. ह्या संबंधी अंतरफेरबदल व तदनुषंगिक कार्ये पूर्वी वेळोवेळी सांगण्यांत आली आहेत. अमूक एक विशिष्ट उष्णता वनस्पतीस हवी असते. त्यापेक्षां अधिक अगर कमी मिळाली असतां वनस्पतीची वाढ कमी अधिक होते. कडक उष्णता अथवा उष्णतेचा अभाव झाला असतां वनस्पतीची वाढ ख़ुटून जाते, व पुढे तीच स्थिति राहिली तर वनस्पती मरून जाते. विशिष्ट उष्ण हवेत अथवा सूर्यप्रकाशांत वनस्पती जोमाने उगवते. खरोखर ह्या विशिष्ट उष्णतेचे योगाने वनस्पति वाढीस एक प्रकारचे उत्तेजन मिळते. असे उत्तेजन बाह्य स्थितीप्रमाणे वनस्पतीस नेहमी मिळत असते, व त्या उत्तेजनानुसार वनस्पतीकडून प्रत्युत्तरही देण्यात येते. जी गोष्ट उष्णतेसंबंधी खरी, तीच गोष्ट हवेच्या फरकाविषयी असते. ह्मणजे विशिष्ट हवेत जिवनकणास विशिष्ट उत्तेजन मिळून त्याचे प्रत्युत्तर वनस्पतीच्या आरोग्यावर होत असते.  जीवनपदार्थांचा ठराविक उद्देश असल्यामुळे उत्तेजनांतील दोष नाहींसे करून सजीव-तत्त्व-परिस्थितीप्रमाणे उत्तेजित जीवनक्रिया चालविते. आपला एखादा अवयव आंखडून अथवा लांब करून बाह्य उतेजन व्यक्त न करितां निराळ्या रीतीने हळू हळू त्याचे दिक्दर्शन वनस्पति करित असते. आता लाजाळू अथवा डायोनिया वगैरे वनस्पती अशा नियमास अपवाद आहेत. कारण लाजाळूस स्पर्श केला असतां पाने गळून एकमेकांवर पडतात. तसेच डायोनिया मांसाहारी असल्यामुळे भक्ष्याचा स्पर्श झाला कीं, पाने उत्तेजित होऊन भक्ष्यास सुटून जाऊ देत नाहीत. अशा ठिकाणी स्पर्श-बाह्य-उत्तेजन होय. खरोखर वनस्पतीची परिस्थिति वेळोवेळी भिन्न भिन्न होत असते. जमिनीमध्ये मुळ्या पसरलेल्या असून हवेमध्ये फांद्या व पाने असतात. जमिनीतील परिस्थिति उष्णतेसंबंधी फारशी बदलत नसून पाण्याचे प्रमाण भिन्न भिन्न थरावर भिन्न भिन्न असते. हवेमध्ये मात्र उष्णता सारखी बदलते. तसेच वनस्पतीच्या कांहीं भागाची परिस्थिति ज्यास्त बदलत असते व कांहीं साधारणपणे थोडा वेळ कायम असते. अशा परिस्थितीत वनस्पतीस मिळणारे उत्तेजन

१६ वे ].    उत्तेजन व ज्ञानतंतुमीमांसा.    १३७
-----
भिन्न भिन्न असते. एकाच जागी दोन वनस्पति जरी असल्या, तरी दोहींस निरनिराळे उत्तेजन मिळेल. इतकेच नव्हे तर एकाच वनस्पतीच्या निरनिराळ्या भागास ज्याच्या त्याच्या परिस्थितीप्रमाणे वेगळे उत्तेजन मिळते. तसेच हवेमध्ये वाढणाऱ्या खोडादि भागांस दिवसा व रात्री वेगळे उत्तेजन मिळून, त्याप्रमाणे प्रत्युत्तरही वेगळे असते.

 पावट्याच्या जातींतील पुष्कळ झाडावर बाह्यउत्तेजनाचा परिणाम चांगला पाहण्यास आढळतो. सूर्यप्रकाशांतूनही झाडे अंधेरांत नेऊन ठेविली असतां पाने लागलीच गळतात, व पुनः सूर्यप्रकाशांत अंधारांतून आणिली असतां पूर्वीप्रमाणे सतेज दिसू लागतात. अंधारात येणारी ग्लानि सूर्यप्रकाशांत नाहींशी होते. प्रकाश व अंधकार ह्यांचा परिणाम वनस्पतीवर उत्तेजनात्मक होत असतो, व ह्याचे मोठमोठे चमत्कार पाहण्यांत येतात. वरचेवर प्रकाशांतून अंधारात अथवा उलट अंधारांतून प्रकाशांत वनस्पति आणिली असतां, कांहीं चमत्कार दिसुन पुढे तेच कमी कमी होत जातात. पुष्कळ वेळां वनस्पति रात्री आपली पाने एकमेकांवर रचून जणू झोपी गेली आहे असे वाटते, व पुनः सकाळी ती पाने जागी होऊन आपलें नित्यकर्म सुरू कृरितात. रात्री एकमेकांवर रचण्याने त्यांचे संरक्षण होऊन विश्रांतीही मिळते. विशेषेकरून संयुक्त पानांत असले चमत्कार नेहमी दृष्टीस पडतात.

 कोवळ्या स्थितीत वनस्पतीच्या पानांमध्ये निरनिराळी गति दृष्टीस पडते. याचे कारण पाने वाढत असतां दोन्ही बाजू सारख्या वाढत नाहींत. दोन्हीं बाजूच्या पेशींमध्ये निरनिराळे ताण असल्यामुळे हे चमत्कार घडतात. ज्या बाजूला अधिक ताण असतो, ती बाजू प्रथम वाढते; पण लवकरच दुसऱ्या बाजूकडील पेशी तणाणू लागतात व वाढ त्या बाजूकडे होऊ लागते. या प्रमाणे वाढीची दिशा एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे वळत जाते. असले वाढीचे प्रकार पानाच्या देठामध्येही आढळतात. पाने जुनी झाली असता, देठाचे बुडी जो सुजवटा येतो, तो फिरल्यामुळे पानास गति मिळते. ह्या सुजवट्यामधील पेशी समपरिमाणी असून दोन्ही बाजूकडील पेशी एक झाल्यावर तणाणू लागतात. त्यामुळे पान एकदां पडून पुनः उभे ताठते. पाने वाढतांना जी गति दिसते, त्यापेक्षा अशा ठिकाणी ही गति अधिक वेळ टिकते.

१३८     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
वनस्पतीमधील जीवनकणांच्या सतेजपणांवर व आरोग्यावर असले चमत्कार अवलंबून असतात. कारण उत्तेजन ग्रहण करणे किंवा प्रत्युत्तर देणे ह्यासंबंधी शक्ति वरील गोष्टींवर अवलंबून असते. निरोगी व सशक्त जीवनकण उत्तेजनास प्रत्युत्तर नेहमी देतात. निरोगी स्थितीत त्यांची शक्ति प्रत्युत्तर देण्यासारखी असते. जमिनीत पाणी नसल्यामुळे वनस्पतिपोषक पदार्थ पुरेसे मिळत नाहीत, अथवा फाजील थंडी असली तर त्यामुळे ते कण निर्जीव होऊन उत्तेजन व प्रत्युत्तर चमत्कार बंद होतात.

 पाने जी वळतात त्यांचा उद्देश कधी कधी नाजुक पृष्ठभागाचे संरक्षण करण्याविषयी असतो. वळत राहिल्याने सुर्यकिरणापासून फारसा त्रास पहचत नाहीं. विशेष लक्ष्यात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की, संयुक्त पानांत पत्रें एकमेकांवर पडून आपापल्या नाजुक वरील पृष्ठभागाचे रक्षण करतात. कांहीं वनस्पतींमध्ये तर पानांची गुंडाळी होऊन पोटाकडील भाग पूर्ण झांकिला जातो.

 कुंड्या खिडकीत ठेविल्या असतां त्यांतील रोपे बाजूकडील येणाऱ्या प्रकाशाकडे वळलेली असतात. त्याचप्रमाणे अंधाऱ्या कोठडीत बीजें उगविण्याची व्यवस्था करावी. कोठडीत एका दिशेकडून प्रकाश येईल अशी तजवीज असावी. बीजापासुन उगवतीं रोपडी प्रकाश येणाऱ्या दिशेकडे जणुं लांब माना करून वळलेली असतात. ह्यांचे कारण खोडावर किंवा वाढत्या कोंबावर सूर्यप्रकाशाच्या उत्तेजक आकर्षणशक्तीचा परिणाम होतो. प्रकाशाकडे वाढती अग्रे वळणे म्हणजे प्रकाशाचे उत्तेजनास प्रत्युत्तर देणे होय. खोडावर प्रकाशाचा जो परिणाम दिसतो. त्याचे उलट परिणाम मुळ्यांवर होत असतो. ह्यामुळे मुळ्या प्रकाशाकडे न वळतां उलटपक्षी जमिनीत शिरून सूर्यप्रकाश टाळतात. म्हणजे प्रकाशाचे सर्व अवयवांवर सारखे उत्तेजन असते असे नाही, शिवाय प्रत्युत्तरही वेगळे असते.

 बिग्नोनियांची सूत्रे ( Tendrils ) याचप्रमाणे सूर्य प्रकाश टाळून अंधाराकडे वळतात, त्यामुळे ती भिंतींत शिरून बिग्नोनियाचे वेलास आधार मिळतो. प्रकाशापासून पानासही एक प्रकारचे उत्तेजन मिळते की, ज्या योगाने पानांतील हरिद्वर्ण सेंद्रिय पदार्थ बनविण्याचे काम व्यवस्थितपणे करितो. तसेच सूर्यकिरणें सारखी न पडू देतां जरूर तेवढा प्रकाश घेण्याची व्यवस्था पानें मागें पुढे वळून करून घेतात. प्रकाश सारखा पुष्कळ असेल तर तत्संबंधी चमत्कार

१६ वे ].    उत्तेजन व ज्ञानतंतुमीमांसा.    १३९
-----
पुष्कळ वेळ चालू राहतात. मंद प्रकाशांत नागमोडीप्रमाणे गती खोडाच्या वाढत्या अग्रास मिळत असते. एकपेशी वनस्पतीमध्ये सुद्धा उत्तेजनास प्रत्युत्तर मिळते.

 जसे प्रकाशाकडून वनस्पतीस उत्तेजन मिळत असते, तसेच गुरुत्वाकर्षणशक्तीपासूनही उत्तेजन वनस्पतीस मिळते. गुरुत्वाकर्षणशक्तीने मुळया जमिनीत पृथ्वीमध्यबिंदूकडे ओढिल्या जातात. जर मुळ्यावर गुरुत्वाकर्षणशक्तीचा परिणाम होतो, तर खोडावरही त्याचा परिणाम कां होऊ नये, असा प्रश्न उद्भवण्याचा संभव आहे. खोडावरसुद्धा गुरुत्वशक्तीचा परिणाम होतो, पण मुळांवर ज्या प्रकारचा तो होतो त्याच्या उलट खोडावर होतो, म्हणजे मुळ्यावर पृथ्वी मध्यबिंदूकडे आकर्षिली जातात, तर खोड त्यांचे उलट पृथ्वीमध्यबिंदूपासुन दूर नेले जाते, त्यायोगाने खोड सरळ जमिनीबाहेर वाढते. तसेच खोडावर फांद्या, पाने वगैरेचे जे एवढे मोठे ओझे असते, त्याचे वजन सहन करण्याची शक्ति गुरुत्वशक्तीमुळे त्यास प्राप्त होते. नाहीतर एवढ्या मोठ्या ओझ्याखाली पुष्कळसे वृक्ष वाकून जमिनीवर ओणवे पडले असते. पण उलट प्रकारच्या गुरुत्वाकर्षणशक्तीच्या प्रभावामुळे झाडे सरळ उभी राहू शकतात. तृणजातीमधील वनस्पति वाऱ्यानें अगर पावसाने जमिनीवर खाली ओणवीं पडून पुनः कांही दिवसांनी सरळ होतात. ह्याचे मुख्य कारण गुरुत्वशक्ति होय. जमिनीपासून झाड सरळ वाढण्यास गुरुत्वशक्तीच कारणीभूत असते.

 प्रकाश अगर गुरुत्वाकर्षणशक्ति ह्यामुळे मिळणारे उत्तेजन सर्व वनस्पतींत सारखे असते असे नाही. तसेच एकाच वनस्पतींत सर्व स्थितींत ते उत्तेजन एकच असणे शक्य नसते, त्यांत वारंवार फरक होत असतात.

 दुसऱ्या पदार्थांचा वनस्पतीस स्पर्श झाला असतां वनस्पतीस उत्तेजन मिळतें. याची उदाहरणे लाजाळू वगैरे. वनस्पती जमिनीत उगवतांना मुळांचा संबंध कठीण दगडाशी आला असतां मुळास एक प्रकारचे उत्तेजन मिळून मुळे आपली वाढण्याची दिशा बदलतात. कठीण जागा सोडून जिकडे मऊ जागा असेल, तिकडे मुळे वळतात. मुळाच्या अग्रास उत्तेजन मिळते खरे व त्यायोगाने पाठीमागील बाजू कमान करून वळते. कधी कधी कोवळ्या स्थितीत जर वाढत्या बिंदूस धक्का बसला असेल, तर मुळे उलट माघार न घेता त्या कठीण जागेवर वाढण्याचा प्रयत्न करतात, पण तेथील वाढ बंद झाल्यामुळे दुसऱ्या बाजूच्या पेशी वाढून नवीन मुळ्या सुटतात. वेलाचे वर चढत जाणे हेही

१४०     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
स्पर्शाच्या उत्तेजनामुळे होते. वेल चढतांना प्रथम एका बाजूस स्पर्श होतो व त्यामुळे वनस्पतीस उत्तेजन मिळून दुसरे बाजूस त्याचे प्रत्युत्तर मिळते. याप्रमाणे वळसे घालीत ते वर चढतात. विशेषेकरून सुत्रे ( Tendril ) असल्या उत्तेजनास प्रत्युत्तर देतात. परंतु सूत्रावर पावसाचे थेंब पडले असतां किंवा त्यांचा परस्पर स्पर्श झाला असतां, उत्तेजनगति दिसत नाही. वेलसुत्रांचे साहाय्याने वर चढतो, किंवा त्याचे अभावी ते स्वतः वळसे घेत वर चढतात. खोडाचे वळसे घेत वर चढणे म्हणजे स्पर्शजन्य प्रत्युत्तर चमत्काराचे दिग्दर्शन होय. अमरवेल वळसे घेत वर चढतो, पण आपले शरीरांतून जागजागी मुळ्या सोडून दुसऱ्या झाडाच्या शरीरांत घुसवितो. अमरवेलाच्या खोडाचा स्पर्श दुसरे खोडांशी होऊन केवळ वळसे घेण्यात उत्तेजित प्रतिक्रिया संपते असे नाही, तर त्याच्या खोडांतील पेशी जागृत होऊन मुळ्या उत्पन्न होतात. तेव्हां अशा ठिकाणी मुळ्या निघणे हाही उत्तेजनास प्रत्युत्तर प्रकार होय.

 जमिनीत मुळे उगवतांना पाण्याचा परिणाम मुळांवर होतो. जेथे पाणी असेल तिकडे मुळ्या नेहमी वळतात. पाण्यामध्ये जणू आकर्षणशक्ति असून ती मुळ्यांना ओढीत असते. अशा वेळेस मुळ्यांवर दोन शक्तीचा जोर असतो. एक गुरुत्वाकर्षणशक्ति व दुसरी पाण्याची शक्ति; प्रथम मुळे गुरुत्वाकर्षण शक्तीस मान देतात, पण जरा जमिनीत गेल्यावर ती पाण्याचे जागीं वळू लागतात. कोवळ्या मुळांवर हा परिणाम लवकर होतो. आळंब्याचे तंतु पाणी शोधीत जातात. शिवाय त्यास हवेतून पाणी शोषण्याची शक्तिही असते. त्या तंतूंवरसुद्धा पाण्यामुळे उत्तेजित परिणाम होतो. खरोखर मुळाच्या अग्रास पाण्यापासून उत्तेजन मिळते; पण, अग्र प्रत्युत्तर न देतां अग्रामागे असलेला वाढता बिंदु प्रत्युत्तरादाखल वळू लागतो.

 वनस्पतीच्या अंतररसाच्या घटकावयांत फेरबदल झाला असतां जीवनकार्यात फरक होतात, म्हणजे अंतररसांत फरक झाल्यामुळे जीवनकण उत्तेजित होऊन जीवनकार्यात फरक करून प्रत्युत्तरक्रिया करितात. तद्वतच बाह्य रासायनिक फरक झाले असतां ते उत्तेजित होतात. उच्च वर्गाच्या वनस्पतीपेक्षा क्षुद्रवर्गीय वनस्पति अशा उत्तेजनात्मक प्रतिक्रिया जास्त दर्शवितात. एकपेशीमय वनस्पतीवर सुद्धा नेहमी ऑक्सिजनवायूचा परिणाम होतो. ऑक्सिजनवायूकडे ह्या वनस्पति जण धांव घेतात. ऑक्सिजनवायूचे उत्तेजन पहा
१६ वे ].    उत्तेजन व ज्ञानतंतुमीमांसा.    १४१
-----
वयाचे असेल, तर एका काचेच्या तुकड्यावर पाण्याचे थेंबांत एका बाजूस ह्या पेशीमय वनस्पति ठेवाव्यात, व दुसरे बाजूस त्याचप्रमाणे हिरवळ वनस्पति पाण्यांत ठेवाव्यात. हा काचेचा तुकडा सूर्य प्रकाशांत ठेविला असतां हिंरवळ घनस्पति कार्बन संस्थापन करून ऑक्सिजनवायू हवेत सोडू लागतात. दुसरे बाजूस असणाऱ्या थेंबांतील एकपेशीमय वनस्पति आपली मूळ जागा सोडून ऑक्सिजन वायूकडे जाऊ लागतात. ऑक्सिजन वायूचा उत्तेजित परिणाम ह्यांवर होतांना चांगला स्पष्ट दिसतो. उसाच्या साखरेपासून शैवालतंतूवर असाच उत्तेजित परिणाम होत असतो. फर्न किंवा सिलॅॅजिनेलॉस नांवाच्या क्षुद्र वनस्पतीपासून पाण्यांतून जी पूंजातीतत्त्वे स्त्रीजातीतत्त्वाकडे आकर्षित होतात, त्याचे कारण स्वीतत्त्वामध्ये मॅलिक अॅसिड असते. ह्या आमलाचा परिणाम पुंजातीतत्त्वावर नेहमी होतो. पाण्यातून हीं पुंतत्त्वे जातांना वाटेत हे आम्ल एका नळीत धरिले असता ती सर्व पुंतत्त्वे नळीकडे धाव घेऊन पुढे स्त्रीजातीतत्वांकडे जात नाहीत. असले चमत्कार वारंवार पाहण्यांत आल्याकारणाने एवढे सिद्ध ठरतें कीं; बाह्य रासायनिक वस्तूंचे जीवनकणांस उत्तेजन मिळून प्रत्युत्तर त्याजकडून चमत्काररूपाने मिळते.

 एकंदरीत बाजूचा सूर्यप्रकाश, गुरुत्वशक्ति, स्पर्श, पाण्याचे अस्तित्व, अथवा रासायनिक उत्तेजन ह्यांचा परिणाम वनस्पतीवर नेहमीं दृष्टोत्पत्तीस येतो. पेशींचा निरनिराळा ताण व त्यामुळे उत्पन्न होणारी गति ही चमत्कारांचे निदर्शक होत.

 ज्ञानतंतु:--वरील विवेचनावरून असे अनुमान काढिता येईल की, प्राणिवर्गाप्रमाणे वनस्पतिवर्गासही ज्ञान असते व ते व्यक्त करणे म्हणजे उत्तेजनास जबाब देणे होय. प्राणिवर्गामध्ये ज्ञानतंतु व तत्संबंधी जी विशिष्ट व्यवस्था आढळते, ती वनस्पतिवर्गामध्ये सांपडणे कठीण आहे. तथापि वनस्पतीस थोडेबहुत ज्ञान असते व ते त्या निरनिराळ्या गोळींनी व्यक्त करीत असतात. शिवाय सर्व प्राणिवर्गामध्ये एकच प्रकारची ज्ञानव्यवस्था कोठे असते ? क्षुद्र प्राण्यापासून तो उच्च प्राण्यापर्यंत ज्ञानतंतूची पायरी हळू हळू अधिक जास्त होत असते. क्षुद्र प्राण्यांत ज्ञानतंतु असतात किंवा नाही याची शंका वाटते; पण जसे जसे प्राणी अधिक उच्च वर्गीय असेल त्या मानाने अधिक ज्ञानतंतु व मेंदूची विशिष्ट रचना आढळते. ज्या प्राण्याची शरिरचना साधी असते, त्यामध्ये ज्ञानतंतुव्यव
१४२     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
स्थाही साधी असते. तसेच ज्या प्राण्यांची शरीररचना संकीर्ण असते त्यामध्ये ज्ञानव्यवस्थासुद्धां संकीर्ण आढळते. प्राण्यास कोणतेही सुक्ष्म उत्तेजन जरी मिळाले तरी ज्ञानतंतूंकडून त्यांस ते सहज समजते, व ते सहन करण्याची त्याची शक्ति असते; व त्यास जबाब देणे अथवा उत्तरादाखल निरनिराळ्या प्रतिक्रिया करणे, किंवा हावभाव करणे, वगैरे गोष्टी ज्ञानतंतुमुळेच घडत असतात. ह्यांवर अम्मल करणारी शक्ति सजीवतत्वामध्ये असते, व तत्संबंधी व्यवस्था तेच करीत असते. उच्च प्राण्यांत डोकें हें मज्जातंतूचे केंद्रस्थान आहे, त्यापासून खाली सर्व शरीरभर मज्जातंतु खेळले असतात. सर्व तंतूचा एकमेकांशी संबंध असल्यामुळे कोठेही शरीरावर कांही झाले तरी त्याचे ज्ञान ताबडतोब शरीरांस माहित होते.  आतां वनस्पतिवर्गात इतकी उच्च ज्ञानव्यवस्था असणे शक्य नाही. तथापि त्यामध्ये क्षुद्र प्राण्याप्रमाणे थोडी बहुत असते एवढे खरे. त्यांत संकीर्णता असू शकणार नाहीं. उत्तेजनास प्रत्युत्तर वेळचे वेळेस जीवनकणांकडून मिळत असते. वनस्पतीच्या वयमानाप्रमाणे जीवनकणांची उत्तेजित होण्याची अथवा प्रत्युत्तर देण्याची शक्ति कमी अधिक असते. उत्तेजनास कांहीं तरी वेडेंवाकडे प्रत्युत्तर मिळते असे नाही, तर प्रत्युत्तराने कांहीं विशिष्ट उद्देश साधला जातो. तसेच थोड्याशा उत्तेजनामुळे त्याचा परिणाम फार मोठा होऊन बराच वेळ तो राहतो; ही गोष्ट सुद्धा विसरता कामा नये. म्हणून जोराचे उत्तेजन म्हणजे जोराची प्रतिक्रिया अथवा साधे उत्तेजन म्हणजे साधी प्रतिक्रिया, असे प्रमाण ठरविता येत नाहीं. कृष्णकमळाच्या सूत्रांत सूक्ष्म जरी स्पर्श झाला, तथापि त्यापासून पुष्कळ वेळपर्यंत त्यास गति मिळते. ड्रासेरा अगर डायोनिया नांवाच्या मांसाहारी वनस्पतीमध्ये पानास सुक्ष्म जरी स्पर्श झाला तरी त्याचे ज्ञान त्यास ताबडतोब होऊन आपल्या भक्ष्यास पकडून ठेवण्याची ती पाने व्यवस्था करितात. तसेच खरें भक्ष्य आहे किंवा कसे, ह्याचेही ज्ञान त्यांस होत असते. फॅॅलरिज Phalaris नांवाची रोपड़ीं सूक्ष्म प्रकाशाकडे सुद्धा वळतात. असल्या सूक्ष्म प्रकाशाचे ज्ञान प्राणीवर्गातील श्रेष्ठ मनुष्याच्या डोळ्यांतही असणे शक्य नसते. पण त्यास दुरूनच त्याची छाया ओळखतां येते, म्हणजे प्राणवर्गात असणारी ज्ञानतंतुव्यवस्था येथेही असते, असे कबूल करणे या वरील गोष्टीमुळे भाग आहे.

१६ वे ].    उत्तेजन व ज्ञानतंतुमीमांसा.    १४३
-----
ज्ञानतंतूंची व्यवस्था वनस्पतिवर्गात कमी दर्जाची असते. तसेच ज्ञानतंतू अमूक एका ठिकाणी सांठविले आहेत असे नाही. वस्त्र्याने अथवा चाकूने कापून परिछेदांत ज्ञानतंतूची विशिष्ट जागा पाहण्यास मिळेल अशी स्थिति नसते. जीवनकणास ज्ञान असून ते वेळोवेळी व्यक्त होते. प्राणिवर्गाप्रमाणे जसे डोक्यांत अथवा इतर जागी त्यांचे लहान लहान ज्ञानपिंड आढळतात, त्याप्रमाणे वनस्पतिवर्गात आढळणे शक्य नाहीं, तसेच एकाच अवयवांवर पुष्कळ उत्तेजने एकाचवेळी जरी मिळाली, तथापि त्या सर्वांस निरनिराळे प्रत्युत्तर ते अवयव देते. मुळाचे अग्रास एकाचवेळी, जमिनीचा स्पर्श, गुरुत्वशक्ति तसेच जमिनीतील पाण्याचे वेगवेगळे प्रमाण, हीं तीन उत्तेजने मिळत असून ह्या तिन्ही उत्तेजनांस वेगवेगळ्या प्रतिक्रिया ते करीत असते. आतां मुळाच्या अग्रांत ह्या तिन्हीस उत्तर देणारी शक्ति कोठे सांठविली आहे, हे पाहिले असतां कांहींच कळणार नाहीं. अग्राजवळील वाढत्या बिंदूतील जीवनकणच ह्या सर्वांस प्रत्युत्तरे देतात. जीवनकणांत अशा प्रकारची उत्तेजनास प्रत्युत्तर देण्याची शक्ती असते. जीवनकणांस संकुचित अथवा दीर्घ होण्याची शक्ती असते, त्यामुळे शरीरातील पाण्याचा प्रवाह थांबविणे अथवा सारखा सुरू राखणे त्यांस करता येते. वनस्पतीचे मुख्य कर्तव्य म्हणजे शरीरातील पाण्याच्या प्रवाहाची सुयंत्रित व्यवस्था करणे होय. कारण त्यावरच जीवनकणांचे अस्तित्त्व अवलंबून असते.

 मज्जातंतू व त्याचे विशिष्ट पिंड Ganglia ह्यांकडून बाह्य उत्तेजनाचे ज्ञान प्राण्यास होत असते. सर्व मज्जातंतूचा एकमेकांशी परस्पर संबंध असल्यामुळे उत्तेजित ज्ञान सर्व शरीरास कळते, अथवा त्याचे केंद्रस्थान जे डोकें तेथे पोहोंचून त्याचे प्रत्युत्तर तेथूनच देण्यात येते. वनस्पति-शरीरांतील सजीव पेशींचा संबंध जीवकणांच्या सूक्ष्म-तंतूंनी जोडिला असतो. पेशीमित्तिका रंध्रमय असून त्यांतूनच जीवतंतू परस्पर जोडिले असतात. जसे, प्राण्यामध्ये एका ठिकाणचे ज्ञान दुसऱ्या ठिकाणी केवळ ज्ञानतंतूंकडून जागजागी पोहोंचविले जाते, तद्वतच वनस्पतीमध्ये जीवतंतूंकडून एका पेशींतून दुसऱ्या पेशींत ज्ञान अथवा उत्तेजन पाठविले जाते. ही व्यवस्था खरोखर उच्चवर्गीय मज्जातंतूच्या व्यवस्थेसारखी असते, ह्यांत संशय नाहीं.

 मज्जातंतूची कार्ये जशी प्राण्यामध्ये विशिष्ट प्रकारची असतात, तशी कार्ये वनस्पतिवर्गात आहेत काय, हे अजूनी कांहीं ठरलें नाहीं. तसेच पेशींतून जीव
१४४     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
तंतूंची साखळी जशी सर्व शरीरभर असते, तथापि त्यापासून विशिष्ट उत्तेजनात्मक ज्ञानाशिवाय इतर ज्ञान वनस्पतींस होत नसते. मज्जातंतूकडून पुष्कळ काम करून घेतले असतां तो जसा, थकून कामाला निरुपयोगी होतो; तद्तूच जीवनकण काही वेळ उत्तेजनास प्रत्युत्तर देतात, पण पुढे त्याकडून प्रत्युत्तर येत नाहीं, कांहीं वेळ विश्रांती मिळाली असतां पुनः ते ताजेतवाने होऊन पूर्वीप्रमाणे उत्तेजनास प्रत्युत्तर देण्यास योग्य होतात.

 इतक्या गोष्टी असूनही वनस्पतीमध्ये जागृति आहे किंवा नाहीं, ह्याची शंका आहे. जागृति असल्याबद्लचा पुरावा अजून आढळला नाहीं. उत्तेजन किंवा प्रत्युत्तर ही सर्व एकांगी दिसतात. नको किंवा होय म्हणणारी जागृतीसत्ता कोठेही आढळांत येत नाहीं. जीवनकणांच्या नेहमीच्या क्रिया निरनिराळ्या असून त्यांत साधेपणा आढळतो. जीवनकणांस उपजत बुद्धी नसावी असे वाटते. जी गोष्ट नको असते, तिचा प्रतिकार जीवनकणांस प्रथमपासून करितां येत नाही. मागाहून जरूर नसणाऱ्या वस्तूंचे अन्य तऱ्हेनें विसर्जन करितां येते.

---------------