वनस्पतिविचार/जननेंद्रिये-फुले

विकिस्रोत कडून
प्रकरण १७ वें.
---------------
जननेंद्रियें-फुलें.
---------------

 मागील प्रकरणी पोषक अन्न मिळविणारी अवयवे व तत्संबंधी विचार करण्यांत झाला. अवयवांची बाह्य-रचना व अंतर-रचना तसेच प्रत्येकाची विशिष्ट कामें, कामास जरूर लागणाऱ्या विशिष्ट गोष्टी, वगैरेचे वर्णन करण्यात आले. आतां जननेंद्रियें, जननेंद्रियाचे प्रकार, निरनिराळी फुले, फुलांतील प्रमुख वर्तुळे, पुष्पाधार, फुलांची मांडणी, स्त्रीकेसर व पुंकेसर फुलें, इत्यादिकांचे वर्णन जननेंद्रियाखाली येते. तसेच अण्डाशय (Ovary), गर्भ (Embryo) परागपिटिका (Anther), पराग (Pollen), त्यांचे संमेलन व गर्भधारणा ( Fertilisation ), शिवाय फलें, बीजे व बीजोत्पादन वगैरे गोष्टींचा उल्लेख फुलांमध्ये अथवा जननेंद्रियामध्ये होऊ शकतो.


१७ वे ].    जननेंद्रियें-फुलें.    १४५
-----
फुले ही वनस्पतीच्या सर्व अवयवामध्ये फार महत्त्वाची आहेत. कारण ती जननेंद्रिये असून त्यापासून पुढील वनस्पति अथवा बीज तयार होते. फूल ही संज्ञा जननेंद्रियास लावितात, उच्च वर्गातील फुलें विशिष्ट आकाराची असून त्यांची रचना क्षुद्र वर्गातील फुलांपेक्षा अगदी वेगळी असते. जी कल्पना उच्च वर्गातील फुलासंबंधीं करितां येईल, ती कल्पना सर्व प्रकारे क्षुद्र-वर्गात लागू पडत नाहीं. क्षुद्र-वर्गातील जननेंद्रियें अस्पष्ट असून निरनिराळ्या प्रकारची असतात. उच्च-वर्गातील फुलें रंगीत तसेच सुवासिक असतात. त्या फुलांत कांहीं विशिष्ट वर्तुळे असून, प्रत्येक वर्तुळाचे भाग स्पष्ट असतात. प्रत्येकाचा आकारही वेगळा असतो. फुलांस देंठ असुन फुलांची मांडणी विशिष्ट फांदीवर आढळते. क्षुद्र वर्गात फुलें पूर्णावस्थेस पोहोंचलीं नसतात. उच्च-वर्गाप्रमाणे गर्भ-संस्थापना झाल्यावर बीजोत्पादन होत नसते. शुद्र-वर्गात विशिष्ट भागांवर जनन-पेशी (Spore ) उत्पन्न होऊन त्यापासून वंशवर्धनं होते. स्त्रीपुरुषतत्वसंयोग शुद्र-वर्गातही आढळते. त्यापासून उच्च-वर्गात आढळणारें बीज तयार न होतां निराळ्या तऱ्हेचे बीज उत्पन्न होते. खरोखर स्त्रीपुरुष-संयोग होऊन उच्च-वर्गात तसेंच शुद्-वर्गात जें बीज उत्पन्न होते, त्यामध्ये तात्त्विकदृष्ट्या फरक नसतो. असो, तुर्त उच्च-वर्गीय फुलांचे वर्णन करून जागजागी शुद्र वर्गासंबंधानें उल्लेख करण्याचा विचार आहे.  कोणतेही फूल बारकाईने तपासून पाहिले असता आपणांस त्यामध्ये चार वर्तुळे साधारणपणे आढळतात. पानाप्रमाणे फुलांसही देंठ असतो. कांहीं फुलांत देंठ नसतो. फुलांची पहिली दोन बाह्य वर्तुळे साधारणपणे पानासारखींच असतात. पानांच्या शिरा, आकार, कडा, अग्रे वगैरे गोष्टींत ती पानाशी साम्य पावतात. फुलांमध्ये निरनिराळे रंग आढळतात, इतके रंग पानांत सार्वत्रिक आढळत नाहींत. फुलांतील पहिल्या वर्तुळांत पानासारखा हिरवा रंग असतो. कधी कधी दुसऱ्या वर्तुळामध्येही पहिल्याप्रमाणे हिरवा रंग आढळतो. जसे, हिरवा चाफा, सिताफळ, रामफळ, वगैरे. अशा वेळी पहिल्या दोन्हीं वर्तुळांत एकच रंग असल्यामुळे दोन्ही वर्तुळे एकाच प्रकारची दिसतात. ही बाह्य वर्तुळे आतील नाजुक वर्तुळांचे संरक्षण करीत असतात. पहिल्या वर्तुळांस नेहमी आढळणाच्या हिरव्या रंगावरून हरितदलवर्तुल (Calyx) अथवा पुष्पकोश असे नांव पडले आहे. दुसऱ्या वर्तुळास पीतदल वर्तुळ अथवा पुष्पमुकुट ( Co
१४६     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
rolla) असे म्हणतात. पहिल्या वर्तुळांत साधारणपणे तीन, चार व पांच भाग असतात. प्रत्येक दलास हरितदल अथवा सांखळी ( Sepal ) अशी संज्ञा आहे. दुसऱ्या वर्तुळांतील भागास पीतदल अथवा पांकळी असे म्हणतात. तिसरें व चवथें वर्तुळ पुरुष व स्त्री-व्यंजक आहे. म्हणजे तिसरे वर्तुळ पुंकेसर-कोश ( Androcium ) व चवथे स्त्रीकेसर-कोश (Gynoecium ) अशी निरनिराळी नांवे त्याच्या गुणधर्माप्रमाणे दिली आहेत. पुंकेसर-कोशांत निरनिराळे सुटे केसर असून त्यावर परागपिटिका असते. केसर म्हणजे पिटिकेचा दंड होय. पिटिकेस दोन किंवा चार कप्पे असून प्रत्येक कप्प्यांत परागकण असतात. प्रत्येक परागकणांत पुंस्तत्त्व असून त्यायोगाने गर्भधारणक्रिया साधिली जाते. स्त्रीकेसर कोशाचेही मुख्य तीन भाग असतात-१ अण्डाशय (Ovary ) २ परागवाहिनी (Style ) व त्यांवरील स्त्रीकेसराग्र (Stigma ) स्त्रीकेसरदल ( Carpel) अण्डाशयास आच्छादन करणारा पडदा होय. अण्डाशयामध्ये बीजाण्डे (Ovules) असतात. ह्याच कणापासून गर्भ-संस्थापना झाल्यावर बीज तयार होते. बीजाण्डांत पराग कणाप्रमाणे स्वीतत्त्व असुन हे परागकणांतील पुरुषतत्वाशी संयोग पावून गर्भीकृत होते, व त्याचा परिणाम म्हणजे बीजोत्पादन होय. स्त्रीकेसरदला ( Carpel ) च्या विशिष्ट भागास बीजाण्डे (Ovules ) चिकटलेली असतात. त्या भागास नाळ (Placenta ) म्हणतात. वाटाण्याची शेंग सोलून पाहिली असतां ज्या पांढऱ्या भागास दाणे चिकटलेले असतात त्यांसच नाळ म्हणतात. आतां कांहीं ठिकाणी दाण्यास नाळेपासून लहानसा देंठ येतो. स्त्रीकेसरदला (Carpel) वरील परागवाहिनी नेहमी असते असे नाही. शिवाय इतर वर्तुळाप्रमाणे स्त्रीकेसरदलांची संख्या व्यक्तिमात्र फुलांप्रमाणे निरनिराळी असते. स्त्रीकेसरदले संयुक्त अथवा अलग राहतात.  सर्वसाधारण फुलांत वरील प्रकारची व्यवस्था आढळते. पण आकस्मिक कारणांनी पुष्कळ फुलांत तसेच त्यांच्या वर्तुलदलांत कमी अधिक फरक झाला असतो. जवसाच्या फुलांत पांच साकळ्या (Sepal) पांच पांकळ्या (Petal) पांच पुंकेसर (Stamen)व पांच स्त्रीकेसर-दल (Corpel) आढळतात. म्हणजे प्रत्येक वर्तुळात दलें सारखी असुन त्यांची संख्याही सारखी असते. अशी सारखी पूर्ण फुलें फार थोडी असतात. कोणत्याही दलापासून अशा फुलात दोन सारखे

१७ वे ].    जननेंद्रियें-फुलें.    १४७
-----
भाग करितां येतात. कारण प्रत्येक दलाचा आकार तसेच संख्या हीं सारखी सारखी असतात. निरनिराळ्या कारणांनी वर्तुलदलांत फरक होत जाऊन वेगवेगळ्या आकाराची फुले तयार होतात. अव्यवस्थित फुलांत सारखे दोन भाग वाटेल त्या ठिकाणी करितां येणार नाहींत.

 द्विदलधान्य तसेच एकदलधान्य वनस्पतींत फुले वेगवेगळ्या प्रकारची असतात. बाह्य आकारांत फारसा फरक नसून फुलांच्या वर्तुलदलांच्या संख्येत फेरबदल असतो. द्विदलधान्यवनस्पतींत वर्तुलदले चार किंवा पांच असतात. दलें अधिक असली तर चार अथवा पांच संख्येचे गुणोत्तर झाले असते. एकदल वनस्पतीमध्ये दलांची संख्या तीन अथवा तिन्हीचे गुणोत्तर असते. ह्यामुळे कोणतेही फूल वर्तुलदलांची संख्या मोजून एकदलवनस्पतीपैकी आहे किंवा द्विदल वनस्पतीपैकी आहे, हे सहज ओळखता येणार आहे. गुलछबु, कांदा, लसुण, केळी, तरवार, नाकदवणा, गहूं, जोंधळा, वगैरेची फुलें तपासून वरील गोष्टीची सत्यता पहावी. ही फुलें एकदलवनस्पतीची आहेत. तसेच कापूस वाटाणा, मूग, तूर, अंबाडी, गुलाब, वगैरे फुलें द्विदलवर्गापैकी असून प्रत्येक वर्तुलांत दलांची संख्या पांच पांच आढळते.

 साधारणपणे फुलामध्ये चार वर्तुळे असतात. पण पुष्कळ वेळा एखाद्या वर्तुळाचा अभाव असतो. जसे भोपळा, कारली, दोडका वगैरे. कधी पहिले वर्तुळ नसते, तर कधी दुसरे वर्तुळ नसते. झेंडूच्या फुलांत पुष्पकोश नसतो. एरंडीच्या फुलांत पुष्पमुगुट नसतो. गहूं, जोंधळा, ओट वगैरेमध्ये दोन्ही बाह्य वर्तुळे नसतात. कांहीं फुलांत पुंकोश नसून बाकीची तीन वर्तुळे असतात. जसे भोंपळा, काकडी, वगैरे. अशा फुलांस केवल-स्त्रीकेसर फुलें म्हणतात, (Pistillate) व जेव्हां स्त्रीकोशाचा अभाव असून बाकीची वर्तुळे असतात, अशा वेळी त्या फुलास केवल-पुंकेसर फुलें (Staminate) म्हणतात. चारी वर्तुले असणाऱ्या फुलास पूर्ण (Complete) फुलें म्हणतात. तसेच जेव्हा वर्तुलाची दलें सारख्या आकाराची आढळतात, त्यास व्यवस्थित फुलें म्हणतात, जसे कापूस, लिली, वगैरे. पावट्याच्या पाकळ्या अव्यवस्थित असतात, विशेषे करून फुले व्यवस्थित किंवा अव्यवस्थित ठरविण्यास फुलांच्या पाकळ्या सारख्या आहेत किंवा नाही, हे पाहतात. नाहीं तर प्रत्येक वर्तुळ व्यवस्थित अथवा अव्यवस्थित आपआपल्या वर्तुळाकार मानाने म्हणता येईल.

१४८     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

 फुलांत पुंकोश व स्त्रीकोश एके ठिकाणी असल्यामुळे परस्पर स्त्री-पुरुषसंयोगास सुलभ पडते. प्राणीवर्गात एकाच जागीं स्त्री व पुरुष व्यंजक अवयव नसतात. दानव्या सारख्या क्षुद्र प्राण्यांत दोन्ही स्त्री व पुरुषव्यंजक अवयव एकाच जीवाच्या शरीरावर आढळतात. पण स्त्रीव्यंजक अवयवास गर्भधारणा साधण्यास त्याच शरीरांवरील पुरुषव्यंजक अवयव उपयोगी पडत नाहीत. दोन दानवें परस्पर एकमेकांस चिकटून परस्पर फायदा करून घेतात. दोन्हीमध्ये गर्भधारणा होऊन दोन्हीपासून पुढे प्रजोत्पत्ती होते. केवल स्त्रीकेसर फुले दुसऱ्या केवल-पुंकेसर फुलांतील परागकणांमुळे गर्भीकृत होतात. परागकण स्त्रीकेसर फुलास पोहोचविण्याची वेगवेगळी नैसर्गिक योजना असते.

 पानांची मांडणी फांदीवर कांही विशिष्ट प्रकारची असते. तद्वतच फुलाच्या वर्तुळदलांत कांहीं विशिष्ट रचना आढळते. ‘एक झाल्यावर एक' (Alternate) २, समोरासमोर. (Opposite ) ३, वर्तुळाकृति ( Whorled ) ह्या तीन रचना पानांत असतात. फुलांतील वर्तुळ दलें बहुतकरून पुष्पदंडावर वर्तुळाकृतींत येतात. जसे खोडावरील अथवा फांदीवरील अंतरकांडी संकुचित होऊन परस्पर संलग्न होतात, व त्या संलग्न जागेपासून पानांचा झुपका येत असतो, त्याचप्रमाणे पुष्पदंडावरील अंतर कांडी संकुचित होऊन ती चारी वर्तुळे जणू एका जागेपासून निघाली आहेत असे वाटते.

 एखादे वेळेस पहिल्या अगर दुसऱ्या वर्तुळांत दलांची वाढ अधिक होऊन त्यास चमत्कारिक स्वरूप येते. तेरड्याचे फुलांत पुष्पकोशामध्ये एक उलटी सांकळीवर ( Sepal ) चिकटली असते. नॅस्टिरशियम फुलामध्ये तेरड्याप्रमाणे एक पाकळी दुसऱ्या पाकळीवर उलटी आली असते. आगस्त्याचे फुलांत पांच पांकळ्या असून एका पाकळीची वाढ जास्त होऊन जिभेसारखी ती लोंबत राहते, दोन पांकळ्या पक्ष्याच्या पंखाप्रमाणे दिसतात, व उरलेल्या दोन्हीस बोटीसारखा आकार येतो. कित्येक फुलांची वर्तुळे द्विगुणित झाली असतात, अथवा नुसती वर्तुळे द्विगुणित न होतां वर्तुळांची दलें द्विगुणित होतात. अफूच्या फुलांत पुंकेसर वर्तुळ द्विगुणित असते. बारबरी नांवाच्या वनस्पतीची फुलं ह्याच प्रकारची असतात. पहिली तीन वर्तुळे द्विगुणित होतात. फुलांत पांकळ्या द्विगुणित अथवा बहुगुणित असतात. विशेषेकरून

१७ वे ].    जननेंद्रियें-फुलें.    १४९
-----
पुंकेसरांची संख्या अधिक होते. जासवंदी, कापूस, लोकॅट, स्ट्राबेरी वगैरेमध्ये पुंकेसरांची संख्या अधिक असते. एकदल वनस्पतीमध्ये फुलांची वर्तुळे त्रिदळी असतात, असा साधारण नियम आहे. पण पुष्कळ वेळां पुंकेसराची दोन वर्तुळे होऊन प्रत्येकांत तीन तीन दले आढळतात. जसे, घायपात, नाकदवणा वगैरे. पिवळा कण्हेर, कृष्णकमळ, रुई. मांदार वगैरे फुलांत पांकळ्यासारसे भाग एकवटून त्यांचे एक निराळे वर्तुळ बनते. सोनचाफ्यामध्ये पहिली दोन्ही वर्तुळे पिवळी असून दलांची संख्या दहांपेक्षा अधिक असते. मोहरीचे पुंकेसर सहा असून पैकी चार लांब व दोन आखूड असतात. दोन पांकळ्यांचे समोर लांब पुंकेसरांची एक जोडी असून, उरलेल्या दोन पाकळ्यांसमोर एक एक लहान केसर असतो. प्रत्येक पाकळ्या समोरासमोर पुंकेसर असल्यामुळे द्विगुणित भाव होतो. साधारण नियम असा आहे की, वर्तुळाची दुले दुसऱ्या वर्तुळाच्या समोर न येतां एक झाल्यावर एक येत जातात; म्हणन समोरासमोर प्रत्येक वर्तुळाची दले झाली असतां द्विगुणित भाव आहे, असे समजण्यास हरकत नाही.  वर सांगितलेच आहे की, वर्तुळाचे स्वभावामुळे केवळ पुंकेसर फुलें अथवा केवल स्त्रीकेसर फुले उत्पन्न होतात. पुष्कळ वेळां वर्तुळांतील कांहीं दलें नाहीशी होतात. जसे मोहरींत सहाच पुंकेसरदले असतात. वास्तविक आठ असली पाहिजेत. शिवाय स्त्रीकेसरदलें दोनच असतात. जवसासारखी फुले सार्वत्रिक थोडीच आढळतात. कापसाच्या फुलांत स्त्रीकेसर दलें तीन असतात. बाकीचीं दळे पांच पांच असतात. पुंकेसरदले मात्र पुष्कळ असून ती सर्व एकमेकांस चिकटून त्यांची जणू एक नळी स्त्रीकेसरदलासभोंवती असते. मुळ्याचे फुलांत स्त्री-केसरदले भाग दोन असून पहिली वर्तुळे चार दलांची असतात. झेंडूच्या फुलांत पहिले वर्तुळ बहुतेक नाहीसे असते; अथवा त्या जागी दोन केसासारखे भाग असतात. दुसऱ्या व तिसऱ्या वर्तुळांत प्रत्येकी पांच दले असतात. पण चवथ्या वर्तुळांत दोनच दले असतात. कधी कधी पुंकेसरापासून पाकळ्या बनत असतात. जसे, कर्दळी, गुलाब, जास्वंद वगैरे. जासवंदीमध्ये पुंकेसर अर्धवट पांकळ्याप्रमाणे होऊन त्यावर कधी कधी परागपिटिकाही असते. परागपिटिका पाहून पूर्ण खात्री होते की, ती पांकळी नसून पुंकेसरापासून पाकळी बनत आहे. धने, बडीशोप, ओवा, शोपा,

१५०     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
इत्यादिच्या फुलांत पुष्पकोशाचे भाग कमी अधिक वाढतात, त्यांत सारखेपणा अगदी नसतो. पुष्कळ वेळां वर्तुळाची जागा बदलली असते. हा जागेंतील फरक, दलें द्विगुणित झाल्यामुळे होतो अथवा कांहीं दलांच्या अभावामुळे ही असाच फरक उत्पन्न होतो. पुष्कळ फुलांत दुसऱ्या व तिसऱ्या वर्तुळांत जागेसंबंधी घोटाळा असतो. असा घोटाळा उत्पन्न झाल्यामुळे दलें परस्पर एकमेकांसारखी होत जातात. जसे, जासवंद.

 वर्तुळाची दले सुटी असतात असे नाही. कधी कधी ती दलें परस्पर चिकटलेली असतात, अथवा त्या वर्तुळाचा संबंध दुसऱ्या वर्तुळाशी येतो. हा संयोग दोन प्रकारचा असतो. जेव्हा एकाच वर्तुळांतील सर्व दलें परस्पर संलग्न होतात, तेव्हां अशा संयोगास ' परस्परदलसंयोग' (Cohesion) म्हणतात. कापसांतील सांकळ्या तसेच पुंकेसर हीं, परस्पर चिकटलेली असतात. सांकळ्या एकमेकांस चिकटून त्यांचे वाटीसारखे वर्तुळ तयार होते. पुंकेसर परस्पर संयोग पावून त्यांची नळी स्त्रीकेसर-कोशा-भोंवती असते. मूग, वाटाणे वगैरे फुलांत सांकळया वरीलप्रमाणे परस्पर संयुक्त असतात. धोत्रा, वांगी, तंबाखू, मिरच्या, कानव्हालव्हुलस, भोंपळा, दोडका, सूर्यकमळ वगैरे फुलांत दुसऱ्या वर्तुळांतील दले ऊर्फ पांकळ्या परस्पर-संयुक्त असतात. लिंब, संत्रं, जासवंद. वगैरे फुलांत पुंकेसर परस्पर चिकटलेले असतात. कांदे, लसुण, नाकदवणा, कापूस, धोत्रा, नारिंग वगैरे फुलांत स्त्रीकेसरदलें एकमेकांस लागून अण्डाशय संयुक्त झाला असतो; अथवा पुष्कळ अण्डाशय एकमेकांस चिकटलेले असतात. अशा ठिकाणी ‘संयुक्त' हा शब्द दलापूर्वी योजून त्यांचा संयोग (Cohesion ) दर्शविला जातो. जसे संयुक्त पाकळ्या, संयुक्त पुं अथवा स्त्रीकेसर वगैरे वगैरे. संयुक्त शब्दाचे उलट वियुक्त शब्द सुट्या दलापूर्वी योजतात. जसे, वियुक्त अथवा सुट्या पाकळ्यां. उदाहरण, कापूस, सुटे पुंकेसर, जसे गुलाब, सुटी स्त्रीकेसरदले जसे हरिणखुरी,सुई, हिरवाचाफा वगैरे.

 जेव्हां ऐका वर्तुळाचा दुसऱ्या वर्तुळाशी संयोग अंसतो, त्यांस 'परस्पर-वर्तुळ-संयोग ' ( Adhesion ) असे म्हणतात. धोत्र्याचे फुलांत पुंकेसरकोश द्वितीय वर्तुळाशीं संयुक्त असतो. साधारण पहिली तिन्ही वर्तुळे चवथ्या वर्तुळाखाली असून चवथ्या वर्तुळाचा अथवा अण्डाशयाचा वरील तिन्हीं वर्तुळाशी कांहीही संबंध नसतो. अशा वेळी अण्डाशयास ‘ उच्चस्थ'

१७ वे ].    जननेंद्रियें-फुलें.    १५१
-----
( Superior ) म्हणतात. जेव्हां अण्डाशय उच्चस्थ असतो, त्यावेळी इतर तिन्ही वर्तुळे अधःस्थ ( Inferior) असतात, पण जेव्हां अण्डाशय प्रथम वर्तुळाशी संयुक्त असतो तेव्हां त्यास अधःस्थ अण्डाशय म्हणतात. अधःस्थ अण्डाशय असतांना उरलेली तिन्ही वर्तुळे उच्चस्थ असतात, अधःस्थ अगर उच्चस्थ ही संज्ञा संयोगाप्रमाणे वर्तुळास दिली जाते. पेरू, मटलाई, दोडके, वगैरे फुलांत अण्डाशय अधःस्थ असून इतर तिन्ही वर्तुळे उच्चस्थ (Superior ) असतात. तंबाखू, मिरची, तूर, उडीद वगैरे फुलांत अण्डाशय उच्चस्थ असून पहिली तिन्ही वर्तुळे अधःस्थ असतात. द्वितीय व तृतीय वर्तुळे पुष्कळ वेळां परस्पर संलग्न असतात. बहुतकरून जेव्हां पाकळ्या संयुक्त असतात अशा वेळी पुंकेसर पाकळ्यांशी चिकटलेले असतात, जसे, कण्हेर, तंबाखू, वगैरे. कांदे, गुलछबु, भुईकमळ वगैरेमध्ये पहिलें व दुसरे वर्तुळ एकाच रंगाचे असून त्या दोहोंत फारसा फरक नसतो. अशा प्रकारची फुलें एकदल-वनस्पतीमध्ये पुष्कळ आढळतात.

 कमळामध्ये फुलांतील वर्तुळाची मांडणी फिरकीदार असते. सांकळ्या बाह्यभागी असून पाकळ्या पांढऱ्या अथवा गुलाबी असतातै. येथेही सांकळया व पांकळ्या ह्यामध्ये फारसे अंतर नसते. कांहीं सांकळयाापासून पाकळ्या बनत असतात. कांहीं पाकळ्या मध्यभागाकडे लहान लहान झाल्या असतात. त्यांचा आकार जणू पुंकेसराप्रमाणे झाला असतो. गुलाब अथवा जासवंद ह्या फुलांत पुंकेसरापासून पाकळया बनतात; पण कमळामध्ये पांकळ्यापासून पुंकेसर तयार होतात. म्हणजे एका वर्तुळांतील दलें कमी अधिक वाढीप्रमाणे दुसऱ्या वर्तुळांतील दलाप्रमाणे बनत असतात. बागेमध्ये गुलाब, मदनबाण, मोगरा इत्यादि फुलांत पांकळ्यांची वाढ अधिक होते. तसेच त्यांमधील पुंकेसर अथवा स्त्रीकेसर दलें पूर्णावस्थेस पोहचत नाहींत, अथवा त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असते. पण त्याच्या मूळ अगर जंगली स्थितीत पाकळ्या फार मोठ्या असून सर्व वर्तुळाची वाढ होते. पुंकेसर अथवा स्त्रीकेसरदलें कमी झाल्यामुळे वंशवर्धन खुटेल असे वाटण्याचा संभव आहे; पण नैसर्गिक तजवीज वेगळी असते. शिवाय झाडांची परंपरा, कलमें, चष्मे, दाब, वगैरे करून वंश राखिला जातो. कलमाने मूळ गुण व जातीधर्म अस्सलरीतीने पुढील रोप्यांत कायम राहतात. बीज पेरून जी रोपे तयार



१५२     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
होतात. त्यामध्ये मूळ अस्सल गुण राहतील किंवा नाही ह्यांची शंका असते. जेथे जेथे पुंकेसर अथवा स्त्रीकेसरकोश लुप्त होत जातात, त्या त्या वनस्पतींत नैसर्गिक कलमें होऊन त्या वनस्पतीचा वंश वाढविला जातो. जसे, जाई, जुई, मोगरा वगैरे. जाईचे कलम आपोआप होत असते. फांदीच्या सांध्यापाशी मुळे सुटून जमिनीत घुसतात, व ह्या रीतीने पुष्कळ स्वतंत्र रोपे होतात.

 बहुदलधान्य वनस्पतींत फुलामध्ये वर्तुळाची मांडणी फिरकीदार असते. ह्यामध्ये फुले एकलिंगी असतात, म्हणजे केवळ पुंकेसर अथवा स्त्रीकेसर फुले असतात. दोन्हीं स्त्रीपुरुपतत्त्वे एकाच फुलांत असत नाहींत. सुरु, देवद्वार वगैरे उदाहरणे बहुदल-धान्य-वनस्पतीपैकी आहेत, अननसांमध्ये फुलांची मांडणी वरीलप्रमाणेच असते. देवद्वाराचें फळ शंकाकृती असून त्यांची स्त्रीकेसरदलें, फळ वाळल्यावर लांकडी होतात. प्रत्येक स्त्रीकेसरांवर दोन बीजें असतात. येथे बीजें उघडी असून आतील भागी त्यांचा संबंध स्त्रीकेसरांशी असतो. एकदल अथवा द्विदल वनस्पतीमध्ये नेहमीं बीजें स्त्रीकेसर-दलानीं आच्छादित असतात. पण बहुदलधान्य वनस्पतीमध्ये बीजें आच्छादित नसून उघडी राहतात. हा फरक अगदी स्पष्ट असतो. ह्यामुळे सपुष्प वर्गाचे दोन मुख्य भेद केले आहेत.

 फुलांतील चारी वर्तुळे ज्यावर असतात त्यासं पुष्पाधार ( Thalamus ) म्हणतात. जेव्हां फुलांत देंठ असतो, अशा वेळेस देंठाचे अग्र म्हणजे टोंक हेच पुष्पधार बनते. जेव्हां देठ असत नाहीं, तेव्हां ज्यांवर ती वर्तुळे आढळतात, त्यांसच पुष्पाधार म्हणतात. फुलांच्या वर्तुळाप्रमाणे पुष्पाकार ही निरनिराळ्या आकाराचे असतात. वाटोळ्या, पसरट, शंक्वाकृती, पेल्यासारखा, उभ्या नळीप्रमाणे असे आकार पुष्कळ वेळां पाहण्यांत येतात. स्ट्राबेरी अथवा तुतींमध्ये पुष्पाधार शंक्वाकृती असतात. गुलाबांत पुष्पाधार पेल्यासारखा खोलगट असतो. सुर्यकमळांत तो पसरट व रुंद असतो. अंजीर, पिंपळ, वड वगैरेमध्ये जी फळे म्हणून समजण्यांत येतात, त्यांचा बाह्य भाग हा पुष्पाधार असतो. फळ पिकल्यावर तो भाग मऊ होऊन खाण्यांत त्याचाच उपयोग होतो. उंबराच्या फळांचा बाह्य तांबडा भाग पुष्पाधारच आहे. ही फळे कापून पाहिली असतां आतील भागास लहान लहान फुलें दृष्टीस पडतील.
१८ वे ].   पुष्पबाह्य वर्तुळे (पुष्पकोश Calyx पुष्पमुगुट Corolla).   १५३
-----


 कधी कधी पुष्पाधार इतक्या जोराने वाढतो की, फुलाचे पोटांतून तो बाहेर पडून त्याची लांब दांडी बनते व त्या दांडीवर पुन पानें वगैरे येतात. गुलाब अथवा तीळ ह्यांमध्ये ह्या प्रकारे वाढलेला पुष्पाधार कधी कधी पाहण्यांत येतो, तिळवणीचे फुलांत पहिली दोन्ही वर्तुळे खाली राहून मधून पुष्पाधार देंठासारखा वाढतो, व पुढे त्यावर पुंकेसर व स्त्रीकेसरदलें येतात. अशा ठिकाणी पुष्पाधार अण्डाशयाचा देंठ बनून जातो. आंबा, लिंबु, सताप, वगैरेच्या फुलांत पुष्पाधार अण्डाशयास टेंकूसारखा उपयोगी पडतो. अशा ठिकाणी ह्याचा आकार वर्तळाकृति अथवा वळ्यासारखा असतो. असल्या पुष्पाधारास कर्णिका ( disc ) म्हणतात. धने, ओवा, बडीशोपा, वगैरे फळांत पुष्पाधार जास्त वाढून त्यासच दोन्ही बाजूकडे स्त्रीकेसर दलें चिकटून प्रत्येकांत एक एक बीज आढळते. कधी कधी बीजांडाचा (ovales ) संबंध स्त्रीकेसर दलांशी न राहता ती केवळ पुष्पाधारावरच आढळतात. अशा वेळी पुष्पाधार नाळेसारखा उपयोगी पडतो. त्यांतूनच बीजांडास पोषक अन्नादि पदार्थ मिळतात. चंदन, पपया, वगैरे उदाहरणे ह्या जातीची आहेत.

---------------