महाबळेश्वर/पाणी.

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
पाणी
---------------

 येथील लोखंडी मातीचें पूट कोठेंही फार घट्ट नसल्यामुळे जमिनींत पाण्याचा तळ लौकर लागतो. क्षेत्र महाबळेश्वरांत ज्या विहीरी आहेत, त्यांस आठ किंवा दहा फुटांवर कृष्णाबाईच्या पाण्यासारखे गोड पाणी लागतें; यामुळे येथें विहीर काढण्यास खर्च कमी येतो ह्मणून अर्थातच येथें तर घरोघरीं विहिरी असणे अगदीं साहजिक आहे. परंतु मालकमपेठेस पाणी लागण्यास ४० पासून ६० फूट पावेतों विहीर खोदावी लागते, व पाण्याचा सांठा असणें जरूर - - 

असल्यास आणखी ज्यास्त खोल विहीर केल्यावांचून होत नाही. पुन्हां इतक्यांच खोलीवरून तिचें बांधकाम करून घ्यावें लागतें, यामुळे येथें विहिरी बांधण्यास बराच खर्च येतो. या साठी येथें सर्वच बंगल्यांना आणि घरांना विहिरी आहेत असें नाहीं.

 मालकमपेठेपासून एक मैलावर पुण्याकडून येणारे रस्त्याचे बाजूस, एक सरोवर आहे त्यास येथील लोक वेण्यातलाव असें ह्मणतात. यानें २८|२९ एकर जमीन व्यापिली आहे. याची खोली अदमासें १०| १२ फूट आहे. हा तलाव सातारचे राजाकडून बांधिला गेला आहे. वेण्या नदीचा उगम याचे वरच्या बाजूस आहे, परंतु या उगमाच्या पाण्याशिवाय पुष्कळ झऱ्यांचे पाणी यांत येऊन पडतें. या तलावाच्या नजिकच्या उंच डोंगराळ प्रदेशांतील कांहीं बागांतील विहीरीचें पाणी या सरोवराच्या योगानें वर आलें आहे. या सरोवरापासून निघणारा प्रवाह शेवटीं वेण्या नदीच्या पात्रांत जाऊन पडतो. ह्या डोंगराच्या उंच उंच भागांतून जे लहान लहान ओढे किंवा झरे निघतात, त्यांचे पाण्याचा उपयोग, त्यांच्या आसपासच्या जमी

नीच्या शेतकामास फार होते. तो असा कीं, ठिकठिकाणीं त्यांचे पाट बांधून नेऊन शेतांतील पिकांस त्यांचें पाणी पाजतात. नंतर उपयोग विरहितचे त्यांचें पाणी मोठ्या प्रवाहास जाऊ देतात. त्यांचीं नांवें व ठिकाणें पुढें येतील.

 म्युनिसिपालिटीकडून व्यवस्था होत असलेले सार्वजनिक असे दोन तलाव आहेत; एक बिशप तलाव, मालकम टेंकडीच्या पायथ्याशी; व दुसरा एलफिन्स्टन तलाव किंवा तिकोनी विहीर, महाड रस्त्याचे बाजूस आहे ती. यांतील पाणी उन्हाळ्यांत फार माफक रीतीनें लोकांस दिलें जातें. कदाचित् कोणी जास्त पाणी नाशील ह्मणून बंदोबस्ताकरितां दोनही ठिकाणी म्युनिसिपालिटीकडील रखवालदार ठेविलेले असतात. बाहेरील लोकांस सुपरिंटेंडेंटसाहेब यांजकडे अर्ज करून येथील पाणी नेण्याची परवानगी मागावी लागते. याबद्दल त्यांचा असा ठराव आहे कीं, मालकांपैकीं थोर मनुष्यास अर्धी / पखाल मुलांस / आणि नोकर लोकांस / पखाल पाणी दररोज स्वयंपाकाकरितां व पिण्याकरितां द्यावें. या ठरावाच्या हिशेबानें रोज 

पाणी किती लागणार हें त्या परवानगी अर्जात आगाऊ कळवावें लागतें. येथून पाणी नेण्याबद्दलची भिस्ती लोकांची मजूरी मालकांस तलावापासून बंगल्यांच्या लांबीच्या मजलीप्रमाणें कमज्यास्त पडते. साहेब लोक व पारशी लोक हें पाणी कातडयाच्या पखालींतून भिस्तीलोकांकडून नेतात. परंतु बंगल्यांत राहणारे हिंदु लोक किंतानाच्या कापडाच्या पखाली करून त्यांतून पाणी आपल्या जातीच्या माणसांकडून आपल्या बंगल्यावर नेवावितात. पाण्यासंबंधानें इतका बंदोबस्त करण्याचें कारण इतकेंच आहे कीं, उन्हाळ्यामध्यें येथील सर्व विहिरींना व तलावांना पाणी बरेंच कमी असतें; तेव्हां पाण्याचा अद्वातद्वा खर्च केल्यानें सर्व लोकांस पाणी पुरावयाचें नाहीं, तोटा येईल हें मनांत आणून ही तजवीज केली आहे. रुचकरपणांत व गुणकारीपणांत येथील सर्व ठिकाणचें पाणी सारखेच आहे.

 याशिवाय दुसरे पुष्कळ झरे व विहिरी येथें आहेत, परंतु त्यांवर म्युनिसिपालिटीचा कांहीं प्रतिबंध नाही. त्यांची माहिती पुढें दिली आहे. 

 वाळूंज- हा झरा मुंबई पाइंट व कार्न्याक पाईंट याच्या दरम्यान आहे. याचें पाणी गव्हरमेंट हौसकडे उपयोगास नेलें जाते.

 धबधबी- हा झरा सिडने पाईंट व ग्लेंगोरी बंगल्याच्या दरम्यान आहे.

 शिपायाचें पाणी-हा झरा रोझकाटेज बंगल्याच्या पलीकडील सखल भागांत आहे.

 गव्याच्या झरा- गोऱ्या लोकांच्या स्मशानाचे पश्चिम बाजूस आहे.

 मंडलिक झरा- सनीसाइड बंगल्याच्या कंपैाडांत आहे.

 वुडलँड व न्यूजंट- हे झरे या नांवचे बंगल्यांच्या कंपौन्डांतच आहेत.

 कणसु स्प्रिग- रेडक्यासल बंगल्याचे पश्चिमेस आहे.

 फाउंटन स्प्रिंग - यास येथील लोक तामनदी ह्मणतात. हा सासून पाईंट रस्त्यावर फौंटन हाटेल नजिक आहे.

 स्वारांचा झरा - यास मोठा नळ ह्मणतात. या ठेिकाणचें पाणी गांवांत बांधून आणण्याचा घाट घालून 

काम सुरू केलें होतें. परंतु तें कांहीं कारणामुळे अपुरेंच सोडून दिलें गेलें. हा मोठा झरा बांधून काढलेला आहे. तो पूर्वेस नेल्सनलाज व ग्लेनमोर बंगल्यांच्या जवळ आहे.

 गोठणीचें पाणी- पूर्वेस ब्लुव्हॉली रस्त्यावर आहे.

 वार्चेस्टरस्प्रिंग- पश्चिमेस वार्चेस्टर बंगल्याच्या मागील बाजूस आहे.

 टायगरपाथ स्प्रिंग- दक्षिणेस टायगरपाथच्या फूट रस्त्यानें लागतो.

 रांजणवाडी स्प्रिंग- पूर्वेस साजन हिल्लच्या पायथ्याशीं आहे.

 मुरारजी क्याॅॅसल स्प्रिंग- पूर्वेस सासूनपाइंटकडे जातांना डावे हातास मुरारजी क्याॅॅसल बंगल्याच्या कपौन्डांत आहे.

 टेलरस्प्रिंग- निरालाज व माऊंटडग्लस या बंगल्याचे जवळ आहे.

या सर्व झऱ्यांचे पाणी फारच गोड, सतेज, निर्मळ, व क्षेत्र महाबळेश्वराच्या कृष्णोदकाच्या प्रमाणे असतें. त्याच्या गोडीचे वर्णन करितांच येत 

नाहीं म्हटलें तरी चालेल. एकाच कृष्णा नदीचें पाणी परंतु महाबळेश्वरीं त्याची रुचि व पुढे दाहा कोसांवर वांईस गेल्यानंतरची त्याच पाण्याची रुचि या दोहोंमध्ये जमीनअस्मानीचा फरक दिसतो. तो फरक समजण्यास दोन्ही ठिकाणचें पाणी प्रत्यक्ष पिऊन पाहिलें पाहिजे; शब्दांनीं वर्णन करणें व्यर्थ आहे. महाबळेश्वरच्या पाण्यामध्ये स्वच्छता इतकी असते कीं, तें पंचपात्रींत किंवा पेल्यांत घातलें ह्मणजे भांडयाचे अतिसूक्ष्म डाग पाण्याच्या स्वच्छतेमुळे एकदम दिसून येतात. या हवेला तहान फार लागत नाहीं. शिवाय पाण्याचे आंगीं विलक्षण गारठा असतो यामुळे थोडक्या पाण्यानेंच समाधान वाटतें, ही एक येथें मोठी मजा आहे.

 वरील वर्णनावरून येथें पाण्याचें बरेंच दुर्भिक्ष आहे, निदान पाणी मिळण्यास फार अडचणी असतात असें मात्र कोणी समजूं नये अद्वातद्वा खर्च करण्यास मात्र नहरांत पाणी नाहीं, पण अवश्य तितके मिळण्यास अडचण पडत नाहीं. नुकताच पावसाळा संपून हिंवाळ्यास सुरुवात होते अशा 

समयास डोंगरांतून ठिकठिकाणी झरे वाहत असतात, ते इतके कीं बहुतकरून उंबराचा वृक्ष दृष्टीस पडला ह्मणजे मुळाशी झुळझुळ वाहणारा लहानसा तरी झरा हटकून सांपडतो. तथापि उन्हाळ्यामध्यें पाणी विपुल असावें तसें नसतें. कित्येक ठिकाणी दूर अंतरावरून, व दरडी चढून पाणी आणावें लागतें. कृष्णा आदि करून नद्यांचे उगम महाबळेश्वरी आहेत, तथापि वाहतें पाणी मुबलकपणें सांपडत नाहीं, असें ह्मटलें तरी चालेल, वेण्या तलावांतून एक लहानसा प्रवाह निघून वेण्येचे खोऱ्यांत पडतों हें खरें, परंतु तिकड़े जाण्याचा फार लांबीचा पल्ला असल्यामुळे तो केवळ परीट लोकांस उपयोगी पडणेसारखा आहे. येथें बहुतेक ठिकाणी विहिरींचें पाणी काढून गुजारा करावा लागतो, व त्या फार खोल असल्यामुळे त्यांतून पाणी शेंदून काढण्याची फार मेहनत पडते.


---------------