बालमित्र भाग २/मोठा बाग

विकिस्रोत कडून

बाळमित्र. आपून मला हुकूम देतील तर मी त्यांची थोडी शे- वा चाकरी करायला जाईन ह्मणतों. राजा.- मीही तुज बरोबर येऊन त्यांचे समाधान करितो. त्यांजवर व मजवर प्रसंग एक सारखाच आहे, तथापि माझ्या पेक्षा त्यांचा फार नाश झा- ला. आतां मला असे वाटते की, नाश व दुःख हाँ कांहींच नाहीत; उलटे ह्यांत माझें हित झाले, को- णते की द्रव्य खर्च केल्याने मिळावयाची नाहीं अशी जी अमूल्य वस्तू ह्मणजे तुझ्या कुटुंबाच्या परिचयाची व तुझ्या स्नेहाची वृद्धि ती म्यां मि. ळविली; मोठा बाग. विद्याधर ह्मणून कोणी गहस्थ होता. त्यास प्रपंचा- च्या निर्वाहासाठी वडिलोपार्जित स्वास्थ्य वतनवाडी वगैरे सांगावयाजोगते काही नव्हते; तरी तो थोड्या- मध्ये संतुष्ट राहून योग्य आचरणाने वागत असे. आ- पल्यापाशी जे काय आहे तितक्यांत संतुष्ट असावें, ही गुह्य गोष्ट त्याला ठाऊक होती, ह्मणून द्रव्यदारां मिळणारे जे द्रव्यवंताचे विलासाचे पदार्थ त्यांवांचून त्यास काळहरण करणे अवश्य होते. तथापि दुसऱ्याचे विलास पाहून ते आपणास नाहीत ह्मणून तो खेद किमपि मानीत नव्हता, आणि थोडक्यांत संतुष्ट राहून मोठा बाग. आपल्या मुखांत किमपि अंतर पडू देत नव्हता. त्याला जन्मादारभ्य एकवेळ मात्र दुःख प्राप्त झाले होते, तें हेच की, त्याची सुशीळ पतिव्रता स्त्री मेली, पण त्या- समयी त्याचे अंत:करणाचे विसांव्यास एक नारायण नामें पुत्र राहिला होता. तो फार सुशील असे, तेणे करून त्याचे अंतःकरण तसेंच सुखी राहिले होतें. आपल्या स्थितीप्रमाणे पुत्रानेही मिळेल तेवढ्यांत संतुष्ट असावे, ह्याविषयींच्या विचाराकडे त्याने आपले मन योजिलें. नारायणही सद्गुणी, चतुर, व समंजस होता; हे त्याचे गुण पाहून संपत्तीच्या प्रत्येक पदार्था- मध्ये गुण असून दुर्गुण किती आहेत हे पुत्रास दाख- विण्याचा यत्न विद्याधराने मांडला. असा तो बाप अ. ल्पसंतोषाचे सुख आपण जातीने अनुभवून पुत्राचेही मनांत ठसवावें ह्याविषयींचा उद्योग करिता झाला. तो पुत्राचे कल्याणाची वांच्छा धरून मनांत ह्मणत असे की, स्वल्पांत देहाचा निर्वाह करून आनंदित अस- ल्याने श्रीमानापेक्षां ही सुखाचा लाभ अतिशीयत हो. तो. जो नमिळावयाचा पदार्थ त्यावर प्रीति व आशा ठेवणे हा केवळ मूर्खपणा होय. अशी बुद्धि जर पुत्रास मजकडून मिळेल तर इतरवस्तूं पेक्षां ती बुद्धि त्यास फार हितावह होईल, असे तो वारंवार चिंतन करीत असे. एके दिवशी विद्याधर नारायणास समागमें घेऊन एक फार रमणीय बाग होता तेथे गेला; असा बाग १५० बाळमित्र. नारायणाने कधीच पाहिला नव्हता. त्या बागांत नार- ळी, पोफळी, आंबे, अशोक, इत्यादि वृक्षांवी निबिङ छाया आहे; द्राक्षांचे मंडप, व जाई, जुई, चमेली, मोग- रा, गुलाब, शेवंती इत्यादि नाना प्रकारवीं फुल झाडे फुलली आहेत; पुष्पांचे परिमळाचा घमघमाट जिकडे तिकडे चालला आहे; जागी जागी कारंज्यांचे फवारे उडताहेत; हौदांतून कमळे फुलली आहेत; त्यांजवर अमर गुंजारव करिताहेत; मंदं शीतळ वायु झुळ झुळ वहात आहे; तेथील वागणारे मनुष्यांची मुखश्री मुप्रस- न्न होत आहे, असें तें अतिरमणीय स्थळ पाहून ना. रायणाचे अंत:करणास अतिआनंद झाला. एकदाच स- हस्रावधि रमणीय पदार्थ त्याचे दृष्टीत येतांच तो आ- श्वर्यात निमग्न झाला. आणि त्याची बुद्धि अगदी गुंग होऊन गेली. हे पाहून विद्याधराने पुत्राची चकभूल जावी ह्मणून तेथें एक बंगला होता त्या ठिकाणी त्या- स नेऊन भोजन घातलें. भोजन झाल्या नंतर नारा- यण आपल्या बापास ह्याप्रमाणे बोलं लागला. दादा, पाहिलेना तुझीं। इकडचे लोक कसे श्रीमत आहेत ते ? बागाचे दरवाज्यापाशी किती रथ उभे होते; आणि त्या लोकांचे आंगावर कसे भरजरी बादली पोषाक, व कंठी चौकडे वगैरे किती अलंकार होते. पहा, त्यांचे कसें भाग्य आहे ते, जें जें मनांत येईल ने ते घ्यावयास व करावयास ते समर्थ आहेत. असे आपणांस कां नाहीं बरें । ह्या लोकांपाशी रुपये फार मोठा बाग. आहेत तसे तुह्मांपाशीं कां नाहीत ? मी खरेंच सांगतों, आपण गरीब आहों में आतां माझे ध्यानात येऊ लागले, पाहिले असता ते तुह्मांपेक्षां सुरीतीने चाल- णारे नाहीत. मग असे होण्याचे कारण काय ? हे ऐकून विद्याधराने उत्तर दिले की, मुला, आह्मी गरीब आहों असी तुझी समजूत झाली काय ? तर आतां मी तुला सांगून ठेवितों की, आपण त्या लोकां- पेक्षा फार मातबर आहों. नारा०- तर मग तुह्मांपाशी इतका पैका आणि असा बाग कुठे आहे ? विद्या०- हा काय ? झापेक्षां मजजवळ पैका व बाग चांगला आहे. नारा०- काय ह्मणतां १ बाग तुह्मांपाशी आहे. तर मी कधी पाहिला नाहीं; दादा, तर तो मला दा- खवाना. विद्या- बरें, तुला एखादे दिवशी दाखवीन. नंतर एके दिवशीं विद्याधर पुत्रास, चल, तुला आ- पला बाग दाखवितों, असें ह्मणून, जेथून फार लांबवर देश दृष्टीस पडत होता अशा पर्वतावर त्यास घेऊन गेला. त्या पर्वताचे उजवे बाजूस एक फार मोठे रान आहे, ते असे की, त्याची हद्द काळे धारेशी लागलेली आहे; डावे बाजूस सुंदर मौजेचे हिरवेंचार कुरण आहे, व पिकांनी भरलेली शेते आहेत; पुढचे बाजूस फार मोठे मैदानांत पुष्कळ नद्यांचे प्रवाह वाहताहेत; जिकडे १५२ बाळमित्र. पहावे तिकडे मनुष्ये आपआपल्या कामांत तत्परतेने लागली आहेत, कोणेक ठिकाणी कुणबी शेने कापिताहेत; कोणेक ठिकाणी कोळी नद्यांत मासे धरिताहेत, कोणेक ठिकाणी कितीएक लोक शस्त्रे घेऊन मृगयेसाठी धांवताहेत, मेंढरांचे कळप व गुरांची खिल्लारें जिकडे तिकडे चरताहेत, व छायेत ब. सताहेत, असें फार सुंदर स्थळ पाहन विद्याधर व ना. रायण ह्यांस अतिशयित आनंद झाला, त्यासमयी ना. रायणाने बापास प्रश्न केला. नारा०- दादा, तुमचा बाग अझन कोणीकडे आहे ? आपण तेथे केव्हां जाऊन पोहोचूं १ विद्या- मुला, हल्ली आपण आपल्या बागांतच आ- हो, हाच माझा बाग. नारा- काय ९ हाच बाग १ हा बाग नव्हे, हातर डोंगर आहे. विद्या०- भोवताली पहा, जेथपर्यंत तझी दृष्ट पोहचते तेथपर्यंत जे मळे, व शेते, करणे. व बाग बगाच आहेत ते सर्व माझे आहेत. नारा०- हे मी खरे समजणार नाहीं; उगीच तुझी माझी थट्टा करितां, दादा. विद्या०- नाहीं नाहीं, थहा नव्हे; मी खरेच सांगतो. तिं असे पहा की, मालकानें जें जें करावयाचे ते तें करावयाचा आधिकार मलाही आहे. मालका- प्रमाणे ह्यांपासून मलाही सुख मिळतें. मोठा बाग. १५३ नारा- ते कसे ते मला समजून सांगा. विद्या- बरें, हा सर्व मुलूख तुझाच जर असता तर तूं काय करतास १ नारा०- मी १ मालक आपले मालाचे जसें करितो नसे मीही करितो. विद्या-तें काय बरें नारा०- पहिल्याने तर ह्या रानांतली झाडी तोडून सर्पण पुष्कळ जमा करितो, मग हरणे धरावयास मृगयेस जातो, आणि बैल, गाई, मशी, इत्यादि जनावरें पुष्कळ बाळांगतो, शेतांचे दिवसांत शेतें कापून मुड्या घालून ठेवितो. विद्या- तूं ठीकच बोलतोस, नारायणा; तुझें मत आणि माझे मत एकच पडते; जसे तूं करीन ह्मण- तोस तसेच मी करीत आहे; ह्याविषयी पाहिजे तर तुझी खातरी करून देतो. नारा०- ती कशी करतां, दादा १ विद्या०- प्रथम मला जितकें सर्पण लागते तितकें हे लोक ह्या रानांतून तोडून आणून मला देतात. नारा०- बरें, तर, मी कधीच तुझाला ह्यालोकांस हु. कूम करतांना पाहिले नाही. विद्या- मला इतकी खटपट करणे नको, हुकमा. शिवाय ते आपाप माझे घरी आणून देतात. नारा०-लोक तुमचे घरी सर्पण आणून देतात हे खरे, पण तुह्मांला त्यांस पैसे द्यावे लागतात की नाही ? १५४ बाळमित्र. विद्या०- बरें, मी जर ह्या रानाचा खरा धनी असतों तर मला कांहींच खर्च न लागता की काय ? नारा०- मग कांहींच खर्च नको; लोक फुकट तुमचे घरी आणून पोहोचविते, त्यांस दमडी ही द्यावी लागतीना. विद्या०- तूं असें समजतोस काय ९ मला वाटते की, न्यास दुप्पट खर्च लागता. कसा तर. लांकडे तो- डावयास माणसे चाकरीस ठेविली पाहिजेत, त्यास कुन्हाडी वगैरे सामान दिले पाहिजे, ह्याला पैसे ख. र्चावे लागते की नलागते ? नारा०- बरे तर ही गोष्ट राहंद्या; पण तुझांला त्या रानांत मगयेस जाण्याचा अधिकार आहे काय? विद्या- मृगयेस स्वत: जाण्याचे काय कारण ! नारा०- हरणे धरून आणावयासाठी. विद्या-बरें, मला हरणे पाहिजेत तर मी पारध्यास सांगेन, त्याजकडे हरणे पुष्कळ असतात त्यांतून मला पारध केल्याशिवाय पाहिजेत तितकी मिळ- तील. त्यांत कदाचित् त्या रानांतली ही हरणे असतील. नारा.- पण त्यांस रुपये द्यावे लागतीलना ९ । विद्या- होय, पण पारध्यास दरमाहा द्यावा, आणि वाघरा, जाळी, फासे, घेऊन द्यावे, इतक्या खटपरी पेक्षां पैसा यकून घ्यावे ह्यांत फार सुख आहे. आम• चा शिकारखाना फार चांगला, सुंदर, बेताचा आहे. मोठा बाग. १५५ स्वां पाहिलेंना, त्यालोकांच्या शिकारखान्याचा नाश ती हरणे व पांखरें कसा करिताहेत तें: आणि त्यामुळे त्यांस केवढा उपाधि आहे तो १ तसे काही मला आहे ? मी कसा आपला बिनघोर आहे बरें ? नारा०- आणि ह्या कुरणांत गाई, मशी, मेंढरे, चरत आहेत ही सर्व तुमचीच आहेत ? विद्या०- होय, माझीच आहेत; तुला में रोजरोज लोणकढें तूप, दूध, दही, लोणी मिळते ते कोठून ? ह्याच गाई मशींचें. नारा०- पण दादा, हे सर्व कळप, व खिलारें, व शेने भाते, नद्या, ही सर्व जर तुमची आहेत, तर मात- बर लोकांचे येथे जसे रोज नानाप्रकारचे भोज- नास पदार्थ असतात तसे तुमच्या येथे कां नाहीतर विद्या०- बरें, पण मानबर लोकांचे पात्रावर जितके पदार्थ असतात तितके सारे ते खातात की काय ? नारा०- असें नाही, त्यांतून जितके त्यांस रुचतात तितकेच ते खातात. विद्या- मी काही पावावर पदार्थ वाढल्यावर मग निवडा निवड करीत नाही, अगोदरच पाहून पा. हिजेत तितकेच शिजवितों, उगीच नासावयास अ- धिक शिजवीत नाही. तसे मजजवळ नाही खरें, पण जर फार पदार्थ करावे तर माजोन्या सारिखे यकावे कसे अधिक खावे तर पोट मोठे केलें पाहिजे, झणजे ठीक पडेल. १५६ बाळमित्र. नारा- पण दादा, मातबर लोक जसे नानाप्रकारचे उत्तम भोजन करितात, तसे काही तुह्मी करीत नसालसे वाटते. विद्या०- येवढें बरीक असमंजसपणे बोललास. मु. ला, ऐकिले, त्यांपेक्षा ही मी अतिशय करून उत्त- म भोजन करितो. श्रीमंतलोक तोंडास रुचि याव- यासाठी चटण्या कोशिंबिरी इत्यादि नानाप्रकारचे पदार्थ करितात, ती रुचि मजपाशी स्वतःसिद्ध आहे. नारा०- बरें, श्रीमंत लोकांपाशीं न्यांचे इच्छे पुरते द्र- व्य आहे, तसें तुह्मांजवळ कां नाही विद्या- त्यांपेक्षाही मजजवळ विशेषेकरून आहे, ते कसें ह्मणशील तर मला इच्छा नाही. नारा- पण, मला वाटते की, इच्छेची शांति करावी ह्यांत फार सुख आहे. विद्या०- नाहीं; इच्छेची शांतिकरण्यापेक्षा इच्छाच नहोऊ द्यावी ह्यासारखें मुख दुसरें नाही. नारा०- मला वाटते की ईश्वर मातबर लोकांस सोने रुपे फार देतो, तस्मात् त्याची कृपा तुजपेक्षा मातबर लोकांवर अधिक आहे. विद्या०- तुला आठवण नाही की, सोमवारचे दिवशी मी तुला जेवणांत जिलिबी वाढली होती, तिजवर तुझी भारी आवड बसली होती नारा०- होय दादा, तुमी मला ती एकच वाढली होती. विद्या०- तूं आणखी मागत होतास, पण दुरडीत पु. मोठा बाग. १५७ ष्कळ जिलिब्या असतां मी तुला वाढल्या नाहीत. ह्याचे कारण काय ते तुझ्या लक्षात आले नारा०- हेच कारण असेल की, फार खाल्ल्याने का दाचित् अजीर्ण होईल. विद्या- होय, हेंच, पण मी केलें तें ठीक केले की नाहीं नारा- ठीकच केलें, दादा. तुमची ममता मजवर भा. री आहे; मला आरोग्य होण्याविषयी तुझी तत्पर आहां हे मी पक्के जाणतों. ते दिवशी तुमचे मनांत असें आलें असेल की, ह्या जिलिब्या खातेवेळेस तर सास गोड लागतील पण पुढे ह्यांपासून कांहीं विकार होईल. असे नसते तर तुझी आणखी वा- ढावयास कांहीं नाबर नव्हता, हे मला समजनें. विद्या- देव मजपेक्षां तुजवर ममता कांही कमी क. रितो, असें तुला वाटते काय नारा.- नाही, तुहीं फारदां सांगितले की, गरिबापा- सून मातबरा पर्यंत देवाची कृपा सारखीच आहे. विद्या०- तर मग देवाला द्रव्य देण्यास कठीण काय आहे. नारा०- कांहीं कठीण नाहीं, जशी मी पायांखालची माती देण्यास समर्थ आहे, तसा तो द्रव्य देण्यास समर्थ आहे. विद्या- तूं ह्मणतोस की, देवाची कृपा मजवर आहे, १४ १५८ बाळमित्र. व द्रव्य देण्याचे त्यास काही कठीण नाहीं; असे जर आहे तर तुला द्रव्य कां दिले नाहीं । ह्याव. रून काय समजावे. नारा०- जे मी द्रव्य इच्छितों तें नाशास कारण हो. विद्या- ह्या विषयी तुझी पक्की खातरी आहेना । नारा०- होय, पक्की आहे. आतां मी तुलां पुढे निरु- तर झालों तथापि, दादा,- विद्या- तथापि दादा कशाला, काय तुझे मनांत अ. सेल ते बोलसना नारा०- हा सर्व देश तुमचा हे काही माझ्या मनांत खरे भासत नाही. विद्या०- कां बरें, ह्याचे काय कारण नारा- तुझांला आपल्या इच्छे प्रमाणे ह्याचा उपभोग करतां येत नाही ह्मणून. विद्या- गांवांत एक मोठा नामांकित पुरुष जगत् शेट झणून आहे तो तुला ठावका आहे ? नारा०- होय, शहराचे भोवताले जे मोठे मोठे बाग आहेत ते त्याचेच नव्हत १ विद्या.- हो हो, ते सर्व त्याचेच आहेत. पण त्यास इच्छे प्रमाणे आपल्या सर्व बागांचा उपभोग घड. तो काय नारा.- नाही, दादा, नो बिचारा द्राक्षांचा एक दाणा- देखील त्यांतला खात नाही. मोठा बाग. १५९ विद्या- को बरें तो मालक आहे, आणि त्याचे बागांत नानाप्रकारचे पदार्थ आहेत, मग का उप. भोग करीत नाही नारा०- उपभोग करावा खरा, पण त्यांतून जर तो कांहीं खाईल, तर त्याची प्रकृति अगदी बिघडेल. विद्या- ह्यावरून असे समज की आपल्या जवळ ज. री चांगले पदार्थ अनुकूळ आहेत, तरी एखादा स. मय असा येतो की, त्यापदार्थाचा उपभोग इच्छे प्रमाणे करता येत नाही, काही तरी अडचण अ- सते. माझीही अवस्था तशीच आहे, ह्मणून मला इच्छेप्रमाणे ह्या माझे बागाचा उपभोग करवत ना. ही. ते कसें ह्मणशील तर, जगत शेटास जशी प्र. रुतीची अडचण आहे तशीच मला द्रव्याची अड. चण आहे; बरे, तूंच सांग की, ह्या दोघांतून दैव. वान् कोण आहे? नारा०- खरेंच दादा, ज्याची प्रकति चांगली तो दैववा- न. प्रकृति नीट नाही तर उपभोगाचे सर्व विषय व्यर्थ आहेत. पण तुह्मांला कधी घोड्यावर बसणे आवडतें। विद्या०- मला वाटते ते समयी मी घोड्यावर बसून वि. लास करतो. नारा.- तर तुमचे कुरण आहे, मग तुझी घोडा बाळ- गून त्यास येथील गवत कापून कां नेत नाहीं विद्या- मुला, मी तसेंच करितो. ज्या घोड्यावर मी १६० बाळमित्र. बसतों तो घोडा ह्या कुरणातल्या कापलेल्या गव. ताच्या पेंढ्या खात असेल. नारा.- पण मी तुमचे पागेत कधी घोडा पाहिला नाही. विद्या-ईश्वर कृपेनें मला इतका खर्च नाही. नारा- तर मग जेव्हां तुह्मांला घोड्यावर बसण्याची इच्छा होत असेल तेव्हां कांहीं बसणे घडत न. सेल. विद्या-छी, छी! तूं चकून बोलतोस, मी असा ख- बरदार आहे की, जेव्हां घोड्यावर बसल्याने आ- पले हित आहे असे वाटते तेव्हांच मात्र मी बसा. वयाची इच्छा करितों; आणि व्यासमयी एक दोन रुपयांचा खर्च भाड्यास करितों ह्मणजे पाहिजे त. सा घोडा मिळतो. तितका खर्च करण्या पुरते ईश्व. राने मला सामर्थ्य दिले आहे. नारा०- भाडे, ते काय ? त्यापेक्षा एक मोठा रथ अ. सावा, न्यास खासे मजेचे घोडे लावून त्यांत बसून विलास भोगावा, हे मला चांगले वाटते. विद्या- ते चांगलेच आहे, पण एक्या रथाचे मागे खटपट किती आहे बरें? तुटले मोडले नीट कराव- यास सुतार लोहार वगैरे ह्यांची नित्य गरज लाग- ती; आणि घोड्यांस जर काही आजार झाला, किवा गाडीवान हरि नसला, तर त्याचे काम बंद होते; ती दोनी यथास्थित असली तरच तो चालावयाचा, मोठा बाग. १६१ त्यांतही आणखी रथ उलटण्याचा धोका आहे. खाण्याची स्वस्थता असल्याने मनुष्य स्वस्थ बसते, व्यायाम घडत नाही, त्यामुळे प्रकृत बिघडी; म- णून मी तुला, नारायणा, खरेच सांगतों, मला पा- यी चालावयाचे पडतें ह्याचे मला काही एक वाईट वाटत नाही. बरें, आतां सूर्य अस्तास चालला, लौकर घरी गेले पाहिजे, नाही तर रात्र होईल, आंधार पडेल; पण माझा बाग पाहून तुला काही आनंद झाला ? नारा- दादा, तो तुमचा खरा बाग असता तर मला संतोष झाला असता. हे ऐकून विद्याधराने हास्य वदन केले, आणि उ. भयतां, पितापुत्र, घरी जावयाकरितां पर्वतावरून चा. लते झाले. त्यासमयीं असे झाले की, ते दोघे वाटेने जात असतां एक्या शेतांत जळबंब पाणी साचलेले, त्यांचे दृष्टीस पडले, तेव्हां हा तलावच आहे असे त्यां- स भासले. विद्या- अरे कर्मा ! ह्या अवघ्या शेतांत पाणी कसे भरलें आहे हे! नदीचा बांध फुटला काय : अरे- रे, ह्या सालचा तर दाणा अगदी बुडाला असें दि. सते. नारा०- शेताचे मालकास में वर्तमान समजले असतां त्यास फार दुःख होईल. विद्या- त्याचा केवळ इतकाच नाश झाला असें ना. १६२ बाळमित्र. ही; आतां या शेताचा बांध फुटला आहे तो बां. धावयास त्याला मनस्वी पैका लागेल; ह्या खर्चाखा- ली ह्या शेताचे दहा वर्षांचे पैदास्तीपेक्षा अधिक ज. र बूड नहोईल तर त्याचे प्रारब्ध सबळ. नारा०- अबब ! फार नाश झाला तर. विद्या-(कांही पुढे जाऊन.) ह्या ठिकाणी पाण- चक्की होती नाही नारा०- पाणचक्की तर, दादा, ती आपल्या पुढेच आहे. विद्या- अरे होय, खरे; तीच आहे; तिचा शब्द मला ऐकू आला नाहीं झणून श्रांति पडली. पण मी प्रतिज्ञा करतों की, महापूर येऊन ती चक्की वाहून गेली. ( उभयतां जवळ जाऊन पहातात, तो तिचा अगदी विध्वंस झाला आहे.) अरे अरे, -गरीब बिचारा, इचा धनी त्याने आतां काय करा- वें ९ येवढे नुकसान भोगावयास मोठा दौलतदार म. नुष्य असावा ह्मणजे ठीक. नारा०- माझ्याही मनांत फार वाईट वाटते. पण, दा. दा, सूर्य मावळला तरी अझून ते गवंडी तेथें काम करितात, हे काय? विद्या०- मला ठाऊक नाही, पण विचारले असतां समजेल. (गवंड्यांस हाक मारून पुसतो.) रे गवं. ड्यांनो, तुह्मी इतक्या रात्रीस काम कां करीत आहां गोडी- ह्या ठिकाणी आह्मांस सारे रात्र जागून काम मोठा बाग. केले पाहिजे; कालचे रात्री एथें चोर आले होते, त्यांनी आंत जावयासाठी बागाची भिंत फोडून बं- गल्यांतील सरंजाम चोरून नेला. चोरी झाल्याची गोष्ट आज सकाळी समजली, ह्मणून बरे झालें, रात्रीच गूल झाली असती तर फार वाईट होते. विद्या०- कां ९ का १ असे का ह्मणतां १ गौडी- कारण की, चोरांनी बंगला जाळावयाची त- यारी करून ठेविली होती. त्यांचा मनसुबा असा होता की, आपण सांपडतों असें झाल्यास बंगल्या- ला आग लावून द्यावी, आणि त्या गडबडीत नि- घून जावे; परंतु ती आपली गुपचूप चोरी झाली ह्मणूनच बरे झाले. बागाचा धनी ह्मणत होता की, मी मोठा भाग्यवान; जर कदाचित मजकडून रात्री चोरांस उपद्रव लागला असता तर माझे डोळ्या देखत येवढी इमारत जळाली असती; आतां इतकें- च मात्र, भितीची दागदुजी केली, आणि काही नवा सरंजाम खरेदी केला ह्मणजे झालें. फारतर एक रामोशी चाकरीस ठेवावा लागेल. विद्या- (हे ऐकून मुकाट्याने अंमळ दूर जाऊन ह्मणतो.) नारायणा, हा इतका अनर्थ झालेला पाहून तुला दुःख वाटत नाहीं नारा०- मला हो कां तिन्हाईत ठिकाणी दुःख, माझें कांहीं नासले नाही. विद्या०- पण अशी नुकसानी जर तुझी झाली असती १६४ बाळमित्र. तर १ जसे त्या बागाचे धन्याने आज सकाळी पा- हिले तसें त्वां पाहिले असते, ह्मणजे पाणचक्की वाहवली, व शेतांत पाणी शिरलें, व चोरी झाली, हे अनर्थ पाहिले असते तर तूं दुःखरहित अस- तास काय नारा.- शंभर वाट्यांनी अतिशयेंकरून दुःखांत बुडा. लों असतो. विद्या- अशी दु:खें तुला नित्य नित्य भोगावयाची जर प्राप्त होती तर आतां जसा तूं सुखी आहेस तसा तेव्हां असतास काय? नारा०- नाही, मी तर कधीही सुखी नसतो, केवळ दुःखसमुद्रात बुडून गेलो असतो. विद्या- तर, बाबा, नारायणा, असेंच आहे; ज्यां- पाशी संपत्ति फार आहे त्यांचे मागे असे अनर्थ नित्य आहेत, त्यांचे अंतःकरण सदा सर्वदा द्र. व्यांतच गुंडाळलेले असते; शेवटी द्रव्यच त्यांचे नाशास कारण होते. एखादे साली खरपड पडले, किंवा कांहीं एक योनलेली गोष्ट व्यर्थ झाली ह्म- णजे इतक्यानेच त्यांची नुकसानी होर्ता; मग त्या लोकांस असे वाटते की, खर्च कमी केला असतां आपली प्रतिष्ठा उणी पडेल, ह्याभयाने ते अधिक अधिक खर्च करितात. जों जो त्यांचे द्रव्यास खां- च पडत जाती तो तों ते अधिक खर्च करून आप. ण संपन्न आहों असें लोकांत सोंग आणितात. मोठा वाग. १६५ अशी जी लयास जाणारी प्रतिष्ठा तिचा सांभाळ त्यांस विशेष करून करावा लागतो, अशा वागणु- केचा परिणाम शेवटी असा होतो की, चाकरांचा रोजमुरा थकतो, ह्यामुळे ते नाना प्रकारे त्रास दे. तात, काम नीट करीत नाहीत, व आज्ञा पाळीत नाहीत, व अमर्यादेचे भाषण करितात, व घरांत चोरी मारी करितात; पुत्रास सद्गुण न शिकविता द्रव्य वाढवावयाची इच्छा करितात, तेणे करून पुत्र कुमार्गी लागून चोरी लबाडी अशी नीच कम करूं लागतात; आपण कर्जभरू होतात; मग ज्यां. च देणे ते घरदार विकून घेतात, व येणे ते कोणी देत नाही, अशी अनेक प्रकारची संकटें उभी रा- हिली झणजे त्यांच्या आंगी द्रव्याचा दम पहिला असतो तो अगदी निघून जातो; मग त्यांची अव- स्था काय पहावी १ दरिद्राने पीडिले होऊन लो- कांच्या नरकांत बड़न भयां भयां करीत अन्नाचे मागे हिंडतात. नारा- (आंग थरारून.) काय भयंकर गोष्ट सां- गितली ही! विद्या- खरेच आहे; अशा गोष्टीचा दाखला पाहिजे तर संपन्न असून दरिद्री झालेले असे मनुष्य गां- वांत पुष्कळ दाखवितों. त्यांकडे पाहिले असतां अविचार आणि धन द्रव्य ह्यांचा दम, ह्यांचा परि- णाम शेवटी कोणत्या रीतीने होतो ह्याची समजूत १६६ बाळमित्र. होईल, आणि द्रव्यादिकें करून जे अंध आहेत त्यांचे डोळे उघडतील. संपत्ति ही दुपारच्या सा-६ - वली प्रमाणे आहे. नारा०- तर ईश्वराने आपणांस साधारण स्थितीत है. विले आहे हे ठीकच केले; त्यांत आपणावर ईश्व- पराची कृपा आहे असें तुह्मी मानितांना ? विद्या- होय खरेच आहे; कोणतीही गोष्ट दूरवर विचार करून करावी; अगोदर लोभ जिंकला पा. हिजे; इच्छाकरणे तरी आपली योग्यता व वैभव पाहून करावी; अमर्याद इच्छा करूं नये; सर्वदा संतोष वृत्ति असल्याचे पोटी कोणत्याही पदार्थाची कमती वाटत नाही. पहा बरें, मला कांहीं मुख कमी आहे की काय १ तूंही तशी वृत्ति ठेवशील तर तुलाही काही कमी नाही, आणि तुला तरी वडिलांपेक्षां विशेष मुख भोगण्या विषयी इच्छा क. शी होईल. अरे, सर्व पृथ्वी माझी आहे, अशी भा. वना असली हणजे सर्व माल आपलाच आहे. काम मात्र यथा योग्य केले पाहिजे, मग उदरपूर्ति सहज होते. ईश्वराने पर्वताच्या मध्य भागाप्रमा- में जी चांगली स्थिति तीत तुला ठेविले आहे; पर्व ताच्या माथ्यावर वायु इत्यादिकांचा उपद्रव, आणि तळी ओढे नाले दलदल. ह्या प्रमाणे संपत्तीच्याही नीन स्थिति आहेत, अतिशयित संपत्ति पर्वताच्या माथ्या प्रमाणे आहे, मध्यम संपत्ति मध्यभागाप्रमामोठा बाग. णे, व कनिष्ठ संपत्ति खालच्या भागाप्रमाणे आहे; पर्वताच्या मस्तकावर जसा वायूचा झपाटा फार त. सा अतिशयित संपत्तिवानास राजा चोर इत्यादिरूप वायूचा झपाटय भारी लागतो. पर्वताचा मध्यभाग जसा निर्वात असतो तशी मध्यम संपत्ति निरुपद्रव असते; पर्वताच्या खालच्या भागांत चिखल ओढे नाले असतात, ह्मणून तेथे चालणारास जसें पाऊ. ल कावयास कठीण पडते तसे कनिष्ठ संपत्तिवाना स हरएक मनांत आणलेली गोष्ट करावयास अव. घड पडती; ह्यासाठी जे वरल्या प्रदेशींचे संपत्तिवान लोक आहेत त्यांजकडे कधी कधी दृष्टि योजावी, पण कशा करितां ९ त्यांचे संपत्तीची ईर्षा करावया- साठी नव्हे, त्यां भोंवताला जो संकटाचा वेढा आहे तो आपणाला नाही ही ईश्वराने मोठी आप- णावर कृपा केली हे मनांत आणावयासाठी, आ- णि कधी कधी खालच्या प्रदेशी असणारे जे दरि- द्रीलोक त्यांजकडेही दृष्टि योजीत जावें, पण त्यांचे गरिबीचा उपहास करण्या करितां नव्हे, त्यांपेक्षा आपणास ईश्वराने मुखी ठेविलें आहे हे मनांत आणावयाकरितां असें अवश्य केले पाहिजे. हा जो मी तुला उपदेश केला हा दृढ मनांत धरून तसा वर्तत जा, आणि पुढे आपल्या पुत्रासही असें- च शिखवीतजा, ह्यांत हित फार आहे; असे बोलत बोलत ते पितापुत्र उभयतां घरी पोहोचले.