बालमित्र भाग २/लपंडाव

विकिस्रोत कडून

१६८ बाळमित्र. ह्याप्रमाणे विद्याधराने ईश्वराने कृपा करून दिलेल्या अन्नोदकावर संतुष्ट राहण्याचा उपदेश पुत्रास केला. ज्यास जन्मपर्यंत भय नाही असें वतन पुत्रास साधून देण्याविषयी उद्योग विद्याधराने मात्र केला. लपंडाव. साचंजानक ) नाटक, दोनअंकी. पात्र. रामराव ........कोणी गृहस्थ. शिवराम ... ....... रामरावाचा मुलगा. दुर्गा. मथुरा. . ... रामरावाच्या मुली. कावेरी. मनूलंगडी. . . . . . . . त्या मुलींच्या मैत्रिणी. वडीलरत्नपारखी." ........ शिवरामाचे मित्र. धाकटारत्नपारखी. तात्या ....... .... ओळखीचा मुलगा. भिव्या ..... • मोताददार. . . लपंडाव. १६९ स्थल, रामरावाची खोली. अंक १. रामरावाचे खोलीत घडवंचीवर कागदाचे रुमाल आ- णि पोथ्या आहेत, आणि कोपऱ्यांत एक शिंग आहे. प्रवेश.. शिवराम आणि दुर्गा. शिव.- (बाप माडीवरून खाली उतरत आहे त्यास ह्मणतो.) बाबा, तुह्मी काही काळजी करूं नका, ह्या पोथ्या मी जपून फळीवर ठेवीन. (हर्षाने उड्या मारीत खोलीचे वाहेर येतो.) आतां आनी चांगला चांगला खेळ खेळू (मांजर गेल्या आंगणा, उंदी- र करिती दणाणा, अशी ह्मण आहे. ) (दुगो आं- त येती, तीस हणतो,) बरें दुर्गा, आई बाहेर गे- ली : आपली मित्र मंडळी आली आहे की नाही ? दुर्गा- माझ्या मैत्रिणी आल्या, पण अझून तुझे मित्र आले नाहीत. शिव-हे तर वाजवीच आहे; मुली जशा सर्वदा खेळावयास रिकाम्या, तसे मुलगे नसतात; त्यांस १५ १७० बाळमित्र. खेळावयाला आणावयाचे झाल्यास ते विद्याभ्या. सावरून बळे ओढावे लागतात, मी पैज मारवों की, ते दोघे रत्न पारखी ह्यावेळेस अभ्यासात गुं. तले असतील. दुर्गा- हे मी पक्के जाणते की, आमची थट्टा करावी हाच त्यांचा अभ्यास असेल. पण रावजींनी आप- णांस येथे खेळण्याची आज्ञा खरोखरीच दिली आहे की काय १ ही आपली खोली तर अगदीच लहान पडली; येथें फिरतां देखील येत नाही. शिव.- मजसारख्या सद्गुणी मुलाने विचारल्यावर ते नाही कसे ह्मणतील, वेडे पोरी पण तूं त्या पो. थ्या संभाळ हो. दुगा- तूं काय मला शहाणपण शिकवितोस ? मला ठाऊक आहे; मी त्या सर्व सोईने रचून ठेवीन. शिव०- (आंगी प्रौढता आणून. ) तें काम अस्मा. दिकांचे त्याची वहिवाट मजकडे आहे. दुर्गा- खरेंचरे बाबा, तुझ्याहून दुसरा कोण चतुर आहे. पण तुज बरोबर मला काम करणे प्राप्त आहे. मी अगोदर मोठ मोठाल्या पोथ्या दुसरे ठि- काणी नेते. शिव.- छे छे, बायकांनी त्यांस हात देखील लावू. नये; पण एक एक पोथी घेऊन माझे हातावर बरीक रचीत जा, येवढें काम कर ह्मणजे पुरे. दुर्गा-बरें, का होईना. (ती एकेक पोथी त्याचे हालपंडाव. १७१ तावर रचिते; पोथ्यांचा गंज त्याचे हनवी पर्यंत झाला. ) आतां पुरे झाले शिव-( हनवटी वर करून.) आणखी एकठेव बरें; हाँ, पुरे आतां, पुष्कळ झालें. ( तो एक दोन पा. वले हळू हळू चालतो, तो सगळ्या पोथ्या खाली समईवर पडतात.) दुर्गा- (मोठ्याने हासून.) अहाहा ! तिकडेसच च. ळथ पाडली, पाहा ह्या सुंदर पोथ्या, ह्यांस रावजी कोणाला बोट देखील लावू देत नाहीत, आणि त्यांची अशी अवस्था झाली! आता हे समजल्या. वर रावजींस फारच आंनद होईल, आणि तुला बक्षीस मिळेल. शिव.- हा काही माझा अन्याय नव्हे, माझे हाता. चा अन्याय आहे,(तो पोथ्या उचलावयास ल. वतो, जंव जव तो उचलावयास जातो तंव तंव त्या आणखी आणखी ढासळतात.) काय बेख्या पोथ्या, यांना गोपाळा सारखें निष्ठून जावयास फा. पार कळतें. दुर्गा०- हे काम मी हात लावल्याशिवाय व्हावयाचे नाहीं; पहा मी ह्या आपले साडीचे ओंच्यांत घेते, तर तूं मेया खुंटी बसून ती चळथची चळथ माझे पदरांत टाक. शिव०- हा हा ! व्वां भली खाशी कल्पना काढली. (तो मेय खुंटी बसून तिचे साडीचे ओंच्यांत पो. १७२ बाळमित्र. ध्या ठेवितो.) दुर्गा- हळूच ठेव भाऊराया; पोथ्या चोळवटतील बरें; आतां मी ह्या दत्फराचे खोलीत नेते अँ. मुलांपेक्षा मुलीच शहाण्या असतात असे सर्वलोकांस मान्य करणे प्राप्त आहे आतां. शिव०- होय, तशा मुलींमध्ये तूंच मुख्य आहेस वाटते १ ह्मणूनच घरांत तूं रोज रोज उलाढाल करतेस ती नीट करण्याकरितां मथुरेस खटपट करावी लागते. दुर्गा- तुझाही पंतोजी तुजकडे नित्य नित्य न पाहता तर तुझे कागद तुला सांपडते तें मी पाहते. असो, पण आतां अवघ्या पोथ्या झाल्याना : शिव- होय, चल आतां; येथे काही राहिले नाही, (ती बाहेर जाते. शिवराम खोलीतला केर काढून जागा स्वच्छ करितो.) वाहवा! खाशी मजेची जागा बनली; आतां येथे खूब मौज होईल. पण ते अझून का येत नाहींत कोण जाणे ब्वा मला मित्राचे घरी जावयाचे झाले तर मी कधी उशीर लावीत नसतो. दुर्गा- (मातक्याने आंत येते, आणि आसपास फिरू- न पाहते.) बरीच जागा झाली, पण भाउराया हे शिंग कोठे तरी दडवून ठेवबा, आतां तुझे मित्र येतील त्यांचे दृष्टीस हे पडले तर ते सारा दिवस वाजवून वाजवून कपाळ उठवितील. १७३ लपंडाव. शिव० - बरें, मी ह्याला सांदीत लपवून ठेवितों, हे क- दाचित् माझ्या उपयोगी पडेल. पण तुझ्याच मै- त्रिणी आतां येथे येऊन कलकलाट करतील. पाहूं बरें आतां कोण बाजार भरवितो तें. दुर्गा- मी आपल्या मैत्रिणीस हाक मारावयास जाते. शिव० - माझ्या खिजमतगारास सांग की, माझे मित्र आले झणजे त्यांना मजकडे घेऊन ये. दुर्गा- बरें. (ती बाहेर जाते.) शिव०- ह्या शिंगाच्या आवाजामुळे कितीवेळ मी खे. .ळ सोडून घरांत आलो असेन ९ ह्याचा आवाज मोठा द्वाड आहे, तो अझून माझे कानांत गुणगुण करतो आहे. माझे मित्रांचें घर येथून दोनशे पा- वले लांब आहे, आपण शिंग वाजवावे झणजे त्याची ललकारी ऐकून आतां लौकर धांवत येती. ल. ( तो शिंग कुंकतो.) अरे ! हे मोठे आश्चर्यच आहे. ते माडीवरून येताहेतसे वाटते, (तो का. नोसा घेतो.) होय होय, खरेंच ते दोघे पारखी आले. आतां चवरंगावर चवरंग मांडून, जसा को. णी गादीवर बसतो तसा मी बसेन. (तो चवरंगा- वर चवरंग मांडावयास लागतो. इतक्यांत दोघे पारखी येतात.) AMERALLUMARI खेड (पु.) १७४ बाळमित्र. प्रवेश २. शिवराम वडीलपारखी आणि धाकटा ला पारखी. शिव.- तुझी आंत येण्याची इतकी जलदी कां के. ली. दारापाशीं अंमळ थांबन मला गादीवर बसू द्यावयाचे होते. मी तुमाला मोठे समारंभाने आंत घेणार होतो. व०पा०- ही गादीना : ह्या गादीवर जरी तूं संभाळूनब. सतास तरी ह्यावरून खाली पडून हातापायांस एकादी दुखापत मात्र करून घेतास, आणखी काही नाही. शिव- खरेंच गड्या, अशा गत गोष्टी बखरीत पाहि. ल्या आहेत खन्या, व.पा.- हा माझा भाऊतर कांहीं तुजसारखा अ. सल्या गादीवर बसला नव्हताना पण ह्याने एके दिवशी जिन्याचे पायऱ्यांवरून लोटांगणे खात खात खाली पडून नाक ठेचून घेतले. धा०पा०- ख ख ख खरेंच, माझें नाक अझून दुखतें आहे, तो तो तो तात्या मोठा द्वाड पोर आहे. शिव- तान्या आज इकडे येणार आहे काय? व.पा.- ईश्वर करो की, नो इकडे नयेवो, तो इ. कडे यावयाचा आहे असें आझांला समजलें असतें तर आहीं घरांतून बाहेरच निघताना. धापा-दुदु दुसऱ्याला उपद्रव द्यावा इतकें मात्र लपडाव. १७५ त्याला कळते. शिव- हे कशावरून ह्मणतोस तूं १ व.पा.- दोन तीन दिवस झाले, मी आणि माझा भाऊ दोघेजण बाहेर जावयास निघालों होनों; मी अंमळ कशालासा मागे राहिलों, माझा भाऊ माडीवरून खाली उतरत होता; तों, तो कोणी क- डून येऊन जिन्याजवळच्या खोलीत बसला हो- ना कोण जाणे; त्याने हळूच बाहेर निघून एका एकी माझे भावाचे पाठीत धपका मारिला, तेव्हां माझा भाऊ घाबरून पाय निसरून जिन्यांत पडला तो खालीच आला. शिव- त्याचा स्वभाव कसा आहे ह्याची परीक्षा मी न्याचे तोंडावरूनच केली असती; त्याचे येथे हे ये. णे प्रथमच आहे. तुमच्या मुलांत माझे मुलास ये- ऊ देत जा, ह्मणून त्याचे बापाने आमचे रावजी पाशी फारफार आग्रहकरून सांगितले. व.पा.- ही मोठी वाईट गोष्ट झाली. त्याचा माझा आतांशी अबोला आहे. शिव.- तुही ते एक्या बिहाडी राहतां, ह्मणून रावजीनी रुकार दिल्हा. तर तो आल्याने तुह्माला संतोष होईल की नाही व.पा.-संतोष ? संतोष पुसाल तर तो दहापांच को. स दूर असता तर बरे होते. तो आमच्या शेजा- री आल्यापासून आमाला एक क्षणभर ह्मणाल १७६ बाळमित्र. तर सुख नाही. तोवारंवार आपणच खिडक्यांची भिगें फोड्न आह्मांवर आळ घालतो. शिव-त्याचे बापाजवळ ह्याचे गा-हाणे कोणी सांगत नाहीं. व०पा.- त्याचे बापाची प्रकृत एक तन्हेची आहे. कोणी जाऊन कांही सांगितले तर अंमळ त्यास रागें भरलासें करतो, आणि त्याबद्दल काही खाव- याला देऊन त्याचे लाड करतो. शिव- मी जर तुमचा बाप असतो तर कधी त्या बिन्हाडी राहतों ना, आणखी कोठे जाऊन राहि- लो असतो. ब.पा.- होय, खरी गोष्ट, आतां आमच्या बापानेही असाच निश्चय केला आहे. त्या घरधन्यास त्याने सांगितले की, आमी हे बि-हाड सोडून जातों, बाबा. आणि आमांसही ताकीद केली की, आ. जपासून तुह्मांला जरका तात्याशी बोलतां चालतां पाहिले तर मजसारिखा वाईट कोणी नाहीं; ह्याप्र- माणे आमांस सांगितले आहे. तात्या आमची थ- हाच करितो, परंतु लोकांचे आंगावर धूळ तर टा. कतो, चिचोंद्यातर सोडितो. काय एकेक की दोन दोन, किती गोष्टी सांगू? एके दिवशी तर एका बा- यकोच्या आंगावर तोटाच सोडला, ती अशी घाब- रली की, सारे लोक पाहून हसू लागले. अशी भलभलत्या खेळावर त्याची प्रीति फार आहे. आ. १७७ लपंडाव. णि तो तन्हेत-हेच्या रंगाचे मासे रस्त्यांत धरतो. शिव.- रस्त्यांत मासे धरतो झणजे १ व.पा.- होय जसे कोळी लोक गळ टाकून नदी- तले मासे धरतात तसा तो खिडकीत उभा राहून वाटेने जाणारे येणारे लोकांची पागोरी आंकडीने उचलून घेतो. कोणी गरीब गरीब त्याचे घराखाली गोष्टी सांगत उभे राहिले झणजे तात्याने लोकर लौकर माडीवर जाऊन एक चिंब्याची लांब आं- कडी घेऊन युक्तीनेच त्या गरिबाचें पागोटें वर उ- चलून घ्यावे. आणि आपण एक कुत्रे अगोदरच सिद्धकरून ठेवलेलेच असते त्याचे शेपटास त्या पागोट्याचे एक शेवट बांधून ते कुत्रे रस्त्यांत सो- डून द्यावे; त्या कुत्र्याने जिकडे जिकडे पळावें ति- कडे तिकडे त्याचे मागे पागोटें फरफटत जावें; मग न्या गरिबाने जेव्हां लांबवर मागें धांवावे तेव्हां; त्याचे हाती पागोटें लागावे. शिव.- पण हा काही खेळ नव्हे, ही तर शुद्ध लो- कांस पीडा द्यावयाची गोष्ट आहे. व०पा.- ह्याहीपेक्षा त्याचे दुसरें आचरण फार वाईट आहे; कुत्रे, मांजर, कोंबडे, बगैरे जे काय त्याचे हाती सांपडेल त्याचा पाय मोडल्यावांचून सोडाव- याचा नाही. एके दिवशी त्याने वाटेंत सरांटे टा- किले होते, तेव्हां त्याचाच कोणी आप्तविषयी ति. कडून आला, तंव ते त्याच्या पायांला मो. १७८ बाळमित्र. डले, आणि तो बिचारा लंगडत घरी गेला. घर. च्या चाकर माणसाला उपद्रव झणजे किती करतो सांगू? मी खरेंच सांगतो त्याचा बाप जर चाकर माणसांस रोजमुरा आधी देताना तर कोणी त्याचे घरी राहतेना. शिव०- असें आहे त्यापक्षी मी त्यास अगत्य पाह-

  • णार; थहा करणाऱ्या पोरावर माझी भारी भक्ति

आहे. व.पा.- थहाही सर्वांस प्रिय आहे, परंतु त्याची थ. हाकरण्याची चाल कांही मुलखा निराळीच. तुला. ही हंसणे फार आवडते हे मला ठाऊक आहे, प. रंतु तूं कांहीं कोणास दुःख देत नाहीस; ह्या ब्रान्य कारव्यांला लोकांची दुर्दशा पाहून भारी हर्ष हो. तो आणि हंसू येतें. शिव०- मला त्याचे काही एक भय वाटत नाही, मी जशाला तसा होणारा आहे, ह्मणून मलाही बरेच झालें, मौज पहावयाला सांपडेल. व.पा.- तात्या येथे येणार असला तर माझ्या भा- वास घरी जावयाची आज्ञा या कशी, नाही तर तो आणखी एखादी दुखापत करील. थापा.- हो हो हो, खखरेंच, मी आपला जातो. शिव.- नाही, नाहीं, तूं जाऊंनको. मी काही त्या- च्या साठी तुमची मैत्री तोडणार नाही, त्याला न्या. च्या पायरीनेच ठेवीन, पण बाहेर कोणाचे पाय लपंडाव. वाजतात बरें तो तात्याच येत असेलसें वाटते. नाहीं तर माझी बहीण मुलींना घेऊन आली असेल. । प्रवेश ३. शिवराम, दुर्गा, वडीलपारखी, कावेरी, भीमा, आणि मनू. दुर्गा- भाउराया, बरें, मैत्रिणी आपले घरी आल्या न्यांस या, बसा, कांहीं हणावे की नाही? शिव०- बायकांतला कारभार कोणी करावा, त्यांत काही मर्यादा राहात नाही, हे मला समजतें. दुर्गा- मर्यादेने चालावें हे तुला समजते ९ बरे तर, पण तान्या कां अझून आला नाहीं (पारख्या- शी बोलते.) मी झटले तरी त्यास आपले बरोबर घेऊन याल. व.पा.- नको, नको, नको, ईश्वर कृपा करून आ- झाला त्याचे संगती पासून सोडवील तर बरें. मन- खरेंच, तात्यासारखा द्वाड पोर ह्या पृथ्वीत धुं. डाळल्याने सांपडणार नाही. कावेरी- त्याची रीत अशी आहे की, दुसन्यास त्रास देऊन आपण मौज पहावी. ह्यामुळे दुसऱ्याला दु- खवण्याविषयी त्याचे मन फार आहे. दुर्गा-तूंकांहीं भिऊंनको, मी ठाकठीकपणानेच वागेन, शिव०- होजीहो. दुर्गा, मुलींना तूं संभाळ (पार१८० बाळमित्र. ख्यांकडे पाहून ) तुह्मांला मी संभाळतो. व.पा.- मजविषयी चिंता नको; तो माझी थट्टा क- रणार नाही; माझा तुसडा स्वभाव त्याला पक्का माहीत आहे, पण माझ्या भावाविषयी मात्र मला अंमळ काळजी आहे. भीमा- तो मऊ लागलें झणजे कोपराने खणतो आ• णि कठीण लागले झणजे नांव घेत नाही, अशी . त्याची चाल आहे. दुर्गा- खरेच आहे, पहा, मांजराच्या मागे कुत्रे लागले असतां जेव्हां का ते मांजर शेपूट पिंजारून त्याचे आंगावर फुसकारून धांवते, तेव्हां कुत्रे शेपूट पाडू- न पळून जाते. तसाच तो आहे.. शिव- दुर्गा, तूं मांजरा प्रमाणे चाल. दुर्गा- तूं नरसिंह अवतार धर. पण सर्वांनी आतां खाली बसावे हे मला बरे वाटते. तो मेला कारया अझून येत नाही, मग कशा करतां उगीच उभे राहावें १ शिव- अगे उगी, तो आला पहा. प्रवेश ४, तात्या, शिवराम, दुर्गा, मथुरा, आणि वडील पारखी. तात्या- (शिवरामास व दुर्गास पाहून नमतो. ) मी । १८१ लपंडाव. तुमचा सेवक आहे, मजवर दया असावी; तुमचे रावजींनी मला तुह्मांमध्ये खेळावयाची आज्ञा दिली - आहे, ह्मणून मी आजचा दिवस तुह्मांमध्ये खेळेन. दुगा- मी घरधनीन आहे, ह्मणून तुला ह्या सर्व पाहु- ण्यांची वेगवेगळाली नांवें सांगितली पाहिजेत. हि- चें नांव कावेरीबाई. तात्या- अततत, हे नांव ऐकून मला फार आनंद - झाला. दुर्गा- आणि ह्याचे नांव- तात्या- आहा! याची माझी तर पक्की ओळख आहे, (भीमाकडे बोट दाखवून.) हिचे नाव काय बरे असेल ९ हिचें नांव साडेभावार्थी बाई असेल. ही फार भोळी दिसते. हिला लोकांस वांकोल्या दाख. वितां फार चांगल्या येतात. ( मग खोलीत लंगड- शाई घालीत घालीत मनीकडे बोट दाखवून ह्मण- तो.) हा तर लंगडशहा बादशहा; ही माराचे भया- ने पळता पळतां पडली, आणि पाय मोडला ह्मणू- न ही रोज रोज लंगडशाई खेळती. ( वडील पार- ख्याकडे बोट दाखवून ह्मणतो,) हे तर मोठे दो- वाचार्य, आह्मां गरिबांकडे पाहत देखील नाहीत. ( धाकट्या पारख्याकडे बोट दाखवितो,) ह्याचे नांव तर उघडच आहे; ह्याचे आईने ह्याची लहा- नपणी जीभ चांगली ओढली नाही, हाणून हा १८२ बाळमित्र. तुतुतु करितो, आणि ह्याजवरून तोत्रोपंत नांव पावला. शिव.- तूं लोकांला नांवे ठेवण्याविषयी इतका च- तुर आहेस तर त्वां मला काय नांव दिले १ तात्या- मी अझून तुला पुरता जाणत नाहीं; पण थोडक्याच अवकाशांत तुझेही गुण बाहेर काढीन. दुर्गा- तान्या, माझे बोलणे तुला फार कडू लागेल, मी जर तुझे गुण काढले तर मग कसे होईल ? ईश्वराचे इच्छे करून जो कोणाचे शरीरी स्वाभा- विक अवयव आहे तो काढून त्याची थट्टा करावी हे चांगले नव्हे; तूं इतका योग्यतेचा आहेस हे मला ठाऊक नव्हते, ह्यांस सर्व माहीत आहे. दु. सरे कोणी असते तर सांगते. पण हे सर्व माझे मि. त्र आहेत. ह्याजकरितां तोंडावर नक्षत्र पडलेल्या पोरास म्यां बोलाविलें ह्मणून हे मला शब्द लावी- त नाहीत. शिव.- शिवरामा, मी खरेंच सांगतो, तुझी बहीण बोलण्यांत मोठी चतर आहे. असा पंडित घरांत असल्यावर मग न्याय मनसुबा विचारावयास को. ठे बाहेर जावें नलगे. शिव.- ती खरे बोलण्याविषयी कोणाची भीड धरीत नाही, ह्मणून माझी प्रीत तिजवर फार आहे. तात्या- पण त्वां ऐकिलेंना ९ मी कसें खरें बोललों ते १ ह्मणून तुझी प्रीत मजवरही असावी. (दुर्गाकडे लपंडाव. पाहून नमतो.) दुसऱ्याचे गुण बाहेर काढण्याचे तुझें काम तें मी घेतलें, ह्मणून रागें भरूं नको, क्ष. मा कर, आतां आपण गडी धरूं. (तिचा हात धरितो.) दुर्गा- ( तान्यास हात धरूं देते.) बरें पण- तात्या- (अकस्मात् धाकट्या पारख्याकडे फिरून त्यास कुचेष्टेनें ह्मणतो, ) तूं चांगला पोर दिसतोस ह्मणून तुला भेटावेसे वाटते, थांब, (धाकटा पारखी त्यास भेटावयास भितो, तात्या त्यास बळात्काराने ओढितो, तेव्हां तो मूल रडू लागतो.) शिव.- सोड, सोड त्याला, नाही तर- तात्या- नाही तर काय करशील, माझ्या लहान- ग्या छबड्या १pany शिव०- मी लहान आहे खरा, परंतु माझ्या मित्रास सहाय होण्यापुते सामर्थ्य माझे आंगी आहे बरें! हे मी तुला अगोदर सांगून ठेवतो. तात्या- तर मी ही तुह्मांमध्ये तुमचा मित्र होण्यास येणार. त्यास पाहूं बरें अगोदर, तूं आपले मित्राचें साह्य कसे करतोस ते. (तो लागलाच धाकटे पा. रख्याचे अंगावर चालून जाऊन त्यास बिलगतो. शिवराम न्यास पाडतो आणि आपण त्याचे उरावर बसतो. इतर मुले त्यांस सोडवायास धांवतात.) शिव०- बायांनो, अंमळ कृपा करा आणि दूर व्हा; मी काही झाला मारीत नाही. कांतात्याजी, आ. १० बाळमित्र. तां कसा रंग आहे ? तुझी पाठ म्यां भुईस लावली असे वाटते. लात्या-(बळ करून उठावयास पाहतो.) अग आई, शिवराम्या, गचांडी सोडून माझे छातीवरून ऊठ, नाही तर मी मरतों आतां. शिव- अगोदर तूं आपल्या अपराधाची क्षमा मागून र घे, झणजे सोडीन. तात्या- (तापून ह्मणतो.) अरे जा, कश्यी क्षमा. तूं सोडतोस की नाही ? शिव०- अशाने मी सोडावयाचा नाही. त्वां सर्व मंड. ळीचा अनादर केला आहे, ह्यासाठी सर्वांपुढे नाक घांस, चुकलों मण, तोंडांत मारून घे, तर सोडतो. तात्या- बरें, बाबा, तूं ह्मणतोस तर करतो शिव०- मातक्यान जर असें करशील तर तुला आ- मी तळघरांत कोंडून टाकू, ह्मणजे तंटाच उरकेल. ( तान्यास उठू देतो, मग तो रागावला असे पाहून भ्यास ह्मणतो. ) इतकें रागें भरण्याचे कारण नाही, प्रथम तुजकडूनच आगळीक झाली. कावेरी- ( मथुरेस एकीकडे नेऊन ह्मणते ) तुझा भाऊ इतका धैर्यवान आहे हे माझे लक्षांत नव्हते. मथुरा- तो सिंहासारखा धैर्यवान आहे, तरी तो कधी कोणाशी कज्जा करीत नाही ह्या गांवांत ह्या- सारखा मुशीळ मुलगा दुसरा कोणी नाही. (सर्व लपंडाव. १८५ मंडळीस ह्मणते.) आतां उगीच कां खोळंबतां । कांहीं तरी खेळ काढा. पारख्यांनो, तुमच्या मनां- त काय खेळावयाचे आहे ९ । व०पा.- ते बायकांनीच ठरवावें. (तात्या वडीलपारख्यास व शिवरामास वांकोल्या दाखवितो.) दुगा- पहा, माझ्या शिवरामाच्या डोळ्यांत कसे पा- णी आहे तें! इतर मुलांनी ह्याचे शहाणपणाचा कित्ताच घ्यावा ! बरें तर, आतां आझी घरकुलांत भातुकली खेळू. तुह्मांला तर बुदबळांचा खेळ भारी आवडतो. चला, उठा माझे गड्यांनो, सर्वांनी मा- झ्या खोलीत यावें. तात्या- काय, तुझी सारे मला एकट्याला सोडून जातां शिव०- नाही नाही, मी तुज करितां येथे राहतो. पण मी कदाचित् बाहेर गेलो तर लौकरच येईन. तात्या- तूंही जातोस तर, ब्वा, मी काही दुसन्याचे घरांत एकटा राहणार नाहीं; मला भय वाटते. अंक २. प्रवेश १. शिवराम आणि तात्या. तात्या- मी तुजबरोबर आलो ह्याचे कारण असें आ१०६ बाळ मित्र. हे की, मी तेथे असल्याने तुह्मी सारे माझी एखा- दी थहा कराल. आतां तूंनि मीच येथे आहों, ह्या- करितां त्यांची थट्टा करण्याविषयी आपण काही तरी एखादी कल्पना योजूं. शिव- माझेही मनांत तेंच आले आहे. तात्या- मला वाटते की धाकट्या पारख्याची थट्टा करावी, हे बरें. कवि शिव०- छी छी, त्याचे मन दुखवावे अशी जर वां था योजिली असली तर त्याविषयी मी रुकार देणार नाही, हा मी आपले कानावर हात ठे. वितों. तात्या- कां ? असें कां अवघे लोक तर ह्मणतात की शिवराम मोठा थट्टेबाज आणि खेळाडू. शिव.- ते खरे, पण मी कोणाचें मन दुखवावयाचा नाही. बरें, तूं कोणती युक्ति योजितोस पाहूं बरें। तात्या- ह्या पहा दोन मुया मजपाशी आहेत, ह्यांच्या अणकुच्या वर करून ह्या मी दोहों गाद्यांत घालून ठेवतों, झणजे एका एकी कोणाचे ध्यानात येणार नाही, मग त्या दोन गाद्या दोघी जणींस तूं बसा. वयास दे, मी जर द्यावयास जाईन तर त्या सम- जतील, आणि ह्मणतील की, ह्यांत कांहीं तरी कृत्रिम आहे, ह्याकरितां तूंच दे. मग जेव्हांका मु. या टोचतील तेव्हां त्यांना तोंड दाखवायाला अशी लाज वाटेल की काय सांगू वाहवा, ह्या गोष्टीची लपंडाव. १८७ कल्पना करतांना देखील हंसता हंसतां पोट फुटते. तुझी भोळी बहीण ह्यांत फार आनंद पावेल. शिव०- पण मी जर तुला असें करीन तर मग तु. ला कसें वाटेल ९. तात्या- त्यांची माझी गोष्ट वेगळी, त्या मूर्ख आहेत. शिव.- न्या कशा मुर्ख १ त्या अशी वाईट थहा क- रीत नाहीत ह्मणून तूं त्यांस मूर्ख हणतोस काय ? तात्या-तूं मोठा बालांटी आहेसरे, बरें ही कल्पना तुझ्या मनासं येत नाही तर दुसरी कल्पना तुला । सांगू? शिव.- बरें, सांग तर. तात्या-पहा, हा मजजवळ बळकट सुई दोरा आहे; त्या बसल्या असतील तेथे आपण जाऊन एकाने त्यांस बोलावयाच्या हंसायाच्या नादांत लावावें,आणि एकाने हळूचकन त्यांच्या साड्या बसकराशी शि. वून टाकाव्या, मग जेव्हांका त्या उठतील तेव्हां कशी मौज होईल पण. वाहवा, काय खाशी क. ल्पना आहे ! शिव.- शाबास ! बरेंच सांगतोस; त्यांच्या चिरड्या फागव्या, आणि त्यांस आईबापांनी खूप ठोकावे, असें तुझ्या मनांत आहे चाटते ? तात्या- काय ती मौज ह्यांतच आहे. शिव०- कोणाचा नाश नकरितां दुसन्या रीतीने मौ. ज होणार नाही की काय ? बाळमित्र. तात्या- पण, मला काही त्या नाशाचे योगाने दुःख होत नाही. शिव०- तर तूं आपल्या मात्र स्वार्थावर दृष्ट देतोस, लोकांचे बरें वाइटाकडे अगदीच पहात नाहीस. तात्या- आह्मी, ब्वा, खेळ खेळं लागलों झणजे आ- मांला काही तरी चेष्टा केली पाहिजे. ह्यासाठी तु . ला सांगतों, मन लंगडी आणि पारखी ह्यांस भिव. विले पाहिजे. शिव०- ते चांगले नव्हे; तुला जर कोणी भिवविले तर मग कसे होईल ? तात्या- चल, आतांच का होईना. ज्याचे मनांत म. ला भिववायाचे असेल त्याने खुशाल भिववावे; म. जकडून कांहीं मनाई नाही. शिव०- (एकीकडे होऊन हळच बोलतो.) तें आतां आमीच पाहूं. (मोठ्याने) बरेंतर, पोरांस भेडवा- वयाची कल्पना कशी काय आहे ? तात्या- मजपाशी राक्षसाचा एक मुखवय आहे, तो मी घरी जाऊन घेऊन येतो, तूं लहान लहान मु. लीस मात्र एकीकडे आण; मग पहा कशी मौज होईल ती. हा मी आतांच आलों मण. शिव- हळूच आपणाशी बोलतो) थांब, मी एक तु. जकरितां चांगला मुखवटा आणितों. ( मोठ्याने, पण तात्या, तात्या !- तात्या- काँ? काय ह्मणतोस १ लपंडाव. १८९ शिव- त्यांस एकीकडे आणले झणजे त्या भितील खन्या. हे मलाही बरेच वाटते. पण, तात्या, ह्या खोलीत एक खराच मोठा ब्रह्मराक्षस आहे. आप. ण येथे दोघेजण एकटेच आहों, जर का तो आला वर आपणांस जीवंत सोडणार नाही, खाऊनच टाकील. नात्या- ही काय तूं राक्षसाची गोष्ट बोलतोस १ शिव०- मी खरेंच बोलतों; तो यावयाचा झाला ह्मण - जे अगोदर दणदण पाय वाजतात, मग एकाएकी मशाला लागलेल्या दिसतात; त्याच्या बराबर पुष्कळ भुतावळ असते. ( अंमळ घाबरल्याचे सौ- ग घेतो.) हे पहा, पाय ऐकू येतात; आतां कसे करावे? तात्या- ( अंमळ घाबरून ह्मणतो.) अरे कर्मा, आतां राक्षस येथे येतो की काय ? शिव०- (तात्यास एका कोपन्यांत नेऊन हळच कांपत कांपत बोलतो.) येथे ब्रह्मराक्षस असता ह्याचे कारण लोक असे सांगतात की, ह्या खोलीत एक रुपण पुरुष राहात होता, त्याजवळ द्रव्य पु- कळ होते, मग तो मेला तेव्हां समंध होऊन ह्या खोलीत राहिला आहे. ह्या करितां इकडे कोणी येत देखील नाहीं. तात्या- (हे ऐकतांच त्याचा चळकांप होतो, आ- णि बोबडी वळते.) दुसरे कोणाला तरी लौकर १९. बाळमित्र. हाक मार, कां तर माझा जीव धसघस करतो; मा. झ्याने येथे उभे रहावत नाही, मी पळून जातो. शिव. कशीगे भ्याली! आतांच ना तूं धटाईच्या गो- ष्टी सांगत होतास १ तात्या- मी काही भ्यालों नाहीं; तूं असे समजू नको, पण मी मुखवटा आणावयास जातो. शिव.- बरें तर, जा तूं, मी येथे सर्व तयारी करून छेवितों. मग भली खाशी मौज होईल तात्या- वाहवा ! तर मग आतां आमचे हसता हस- तां पोट फुटेल. शिव-ते तर फारच भितील. तात्या- खरेंच, गड्या, तर मी लौकर येतो. (नो बाहेर निघून जातो.) शिव.- (एकटाच आपण बोलतो.) भलारे, तूं वर. कडांस भिववावयास पाहतोस, आणि मी भ्यावया- चा नाही अशी प्रतिज्ञा भोगतोस, तर पहा, मी तुलाच भिववावयाची युक्ति करीन, प्रवेश २. शिवराम, दुर्गा, मथुरा, कावेरी, मनू , आणि वडील पारखी. दुर्गा- शिवरामा, तान्याला रस्त्यांतून धावत जातांना आहीं आतां पाहिले, तर कोणी काय केलें न्या. लपंडाव. १९१ ला. न्याशी नुशी कांहीं खटखट झाली की काय ? शिव०- नाहीं नाहीं, तो तर मला आपला जिवलग मित्र मानितो; त्याचे मनांत लहान मुलांची कांहीं थहा करावयाची आहे; त्यास मी बाह्यात्कारी अ- नुकूळ होतों, आणि असा काही मनसुबा करतों की तोच फसेल; मग पुनः आमचे घराकडे ढुंकून पाहणार नाही असे वाटते. दुर्गा- बरे कोणता मनसुबा करणार आहेस तूं ? शिव०- माझा मनसुबा तुला लौकरच कळून येईल, पण मला तुी बोलावयास आतां तिळमात्र अव. काश नाहीं; तो आतां येईल, तो आल्याचे पूर्वी मला सर्व तयारी करून ठेविली पाहिजे, ह्मणून मला अंमळ बाहेर जावयाची आज्ञा दे. कावेरी-बरें तर, जा, पण लौकरच परत येहो, तुझा मनसुबा आमांस फार ऐकावासा वाटतो. शिव- सर्व तयारी करून मी तुझांस अगत्य सांगेन. (तो बाहेर निघून जातो.) दुर्गा- अहाहा, फार चांगले दोधे मित्र मिळाले आ- हेत, पाहूं, बरे, दोघांच्या मसलतीने काय ठरतेंतें. व.पा.- दुर्गाबाई, शिवरामाला केवळ तात्याचे ओ- ळीत बसवू नका. मनू- पारखी, तूं ठीक बोललास, एक मर्यादेचा, भ. ला, आणि एक द्वाड ब्रात्य; त्याला त्याला को लावतां १९२ बाळमित्र. कावेरी- शिवराम जर तात्याला येथून काढून लाव- ण्याची काही युक्ति योजील तर आनांवर त्याचा फार उपकार होईल, तो ह्या ठिकाणी असल्याने आह्मांस कद्धी चैन पडणार नाही. दुर्गा- मला असे धोरण दिसते की, शिवराम तात्यास अमर्याद शिक्षा करील. व.पा.- असे कसे होईल? शिवराम जर तान्याची तशी खूप था करील, तर त्या योगेंकरून त्याला शिकविल्यासारिखें होईल. मग आपल्या मुलास चां- -गल्या चालीचा उपदेश मिळाल्यामुळे शिवरामाची युक्ति ऐकून तात्याचा बाप फार संतोष पावेल, अ. से मला वाटते. शिवरामासारखा तात्या असता, तर त्याचा बाप त्याकरतां आपलें अर्धे द्रव्य संतो- बाने खर्च करता. मन- दुर्गा, तूं आपल्या भावाच्या युक्तीस विघ्न करूं. नको. दुर्गा- पण मने, माझा स्वभाव अंमळ प्रखर आहे, आतां मी येथें तुह्मांमध्ये मुख्य असतां आईस वा. ईट वाटेल असें काम इकडे होऊ देणार नाही. मन- त्याच्या मनांत आहे तसे त्याला आजचा दिव- स करूंदे, ह्याचा अन्याय आह्मी आपल्या आंगाव- र घेऊ. शिव- ( आनंदाने हंसत येतो. ) तात्या आतां के. व्हां का येईना; त्याला खेळावयास घेण्याकरिता लपंडाव. आह्मी तयार आहों. दुर्गा- पण मला सांग, त्वां काय मनसुबा केला आ. हे तो. कावेरी- आझांला सांग, आह्मी त्यांत येतो. शिव०- नाही, नाहीं, बायांहो; त्याचे काही कारण नाही; माझ्या मनसुब्यांत अंमळ धिंगामस्ती हो- णार आहे, ह्यासाठी मी तुझांस आह्मांमध्ये घेणार ना. ही; म्यां मोतदारास सांगून अगोदरच ठाकठीक क. रून ठेविलें आहे; माझ्या मनांतली गोष्ट त्या मोत. दाराचे मनांत ठसली आहे, तो मला साह्य करील. दुर्गा- पण तूं कांहीं आझाला आपला मनमुबा अ. झून कळू देत नाहींसना १ शिव०- मी तुझांला इतकें सांगून ठेवितों; आतां आ- पण लपंडाव मांडूं ह्मणजे तात्याचे मनांत संशय ये- णार नाही, प्रथम मी तात्यास आंधारामध्ये सांपडे- न, मग जो कोणी माझे डोळे बांधील त्याने हात- चलाखी करून मला पहावयास वाट ठेवावी, म. णजे मी तात्यासच धरीन, मग त्याचे डोळे बांध. ल्यावर तुमी सर्व खोलीतून दिवा विझवून बाहेर निघून जा, आणि आह्मां दोघांस मात्र त्या ठिकाणी अ द्या, मग जेव्हां तुमची गरज लागेल तेव्हां मी तुहाँस बोलावीन. व.पा.- तो जर धबाधबी करूं लागला तर मग का बाळमित्र. से करशील? शिव०-अरे, जाऊंदे, न्याच्याने काय व्हावयाचे आ- हे पाहिले नाहीं मघां, एक कलथी दिली तर क. सा भोंपळया सारखा बदकन आदळला तो? तो ट. णक दिसतो खरा, पण अगदी फोपसा आहे, ह्या- चा अनुभव मी अगोदरच घेतला आहे. अतां ल- हान मुलांस इकडे घेऊन ये. तात्या आला ह्म- णजे त्यांची कदाचित् थहा करील, अगे मथुरे, तू जाऊन त्यांस घेऊन ये. मथुरा- होय, ( ती बाहेर निघून जाते.) शिव- माझे डोळे बांधतेवेळेस वाट ठेवावयाचे तुह्मां- स पके स्मरण असूद्या, आणि जेव्हां मी तुझांस खूण करीन तेव्हां वाटेचे नीट संधान ठेवून दिवा विझवून पळून जा. कावेरी- होय होय, आतां ध्यानांत आले. शिव- अगे उगी, कोणी येतो आहे. ( दाराजवळ जाऊन हळूच कानोसा घेतो. ) हाँ तो आला, आतां आपण लौकर खेळावयास लागू या, नाहीं तर त्याचे मनांत संशय येईल. अगोदर झटकन कोणाचे तरी डोळे बांधा. कावेरी- पहिला डाव मजवर आहे. (मन कावेरीचे डोळे बांधिते.) ( सर्व मुले खेळू लागतात.) लपंडाव. १९५ प्रवेश ३ शिवराम, तात्या, कावेरी, आणि मनू. (तात्या आंत येतांच कावेरीस चिमटा घेतो, ती हात लांब करून त्याला धरते. ) कावेरी- हा तर तात्या आहे, त्याने मला चिमटा घे. तला ह्यावरून तोच आहे हे मी पक्के जाणते. शिव.- त्वां खरेंच ओळखलें, पण तो अझून खेळा- वयास लागला नाही, तर आतां नव्याने डाव मांडूं. तात्या- शिवरामाने खरी गोष्ट सांगितली. कावेरी- बरे तर, आतां नवा डाव नवा पाव, मी ज. र आतां तुला फिरून धरले तर मग तुझे डोळे बां. धून डाव घेईन; रडी खाऊ देणार नाही. तात्या- बरें बरें, आतां फिरून खेळू. ( बगलेतला मु. खवटा काढून शिवरामास निमुरता दाखवितो.) कां चांगला आहेना १ शिव०- ( त्यास पाहून अंमळ कावराबावरा होतो.) अरे बापरे, फारच भयंकर आहे; ह्यास पाहून म- लाच अगोदर भय वाटते; आता हा लपवून ठेवू आणि ह्या खेळावयाच्या नादांत लागल्या ह्मणजे हळूचकन आपण बाहेर निघून जाऊं. तात्या- (शिवरामाच्या कानाशी लागतो.) होय हो. य, अगोदर मी पोरीवारींची थट्टा करतो. बाळमित्र. शिव.- (तात्याशी हळूच बोलतो.) मी अगोदर कावेरीचे डोळे बांधून तिला फिरवीन; ती मला धरील तेव्हां तिचे मनांत असें येईल की, हा ता. त्याच आहे; मग तिजवरच डाव येईल. तात्या- ( हळूच बोलतो.) बरें बरें, मीही तिला मागून जाऊन धक्का देईन. मन- तुझी खेळ विरस करतां; तुमची मसलत काय ती लौकर होऊंद्या कशी. तात्या- सारी उगीच कां उभी राहिलां? आमी तया• र आहों. शिव.- (जणू कावेरीस धक्का द्यावा अशा बेताने तिचे मार्गे मागें फिरतो, तात्या घडवंची आणावयास घरांत जातो, असे पाहून शिवराम कावेरीस हळूच ह्मणतो. ) कावेरी, आतां मी तझ्या वाटेत येतो, (कावेरीने अडखळून पडावें ह्मणून तात्या तिचे वाटेत एक घडवंची आणून ठेवितो, शिवराम त्या घडवं. चीस एकीकडे ठेवून आपण त्या जागी मेटाखुटी बस- तो, आणि तिला ऐकू जाई असा काही शब्द करितो, नीचांचपत चांचपत जाऊन न्यास धरिते, आणि हा कोण आहे? असें सोंग आणते.) कावेरी- ( अंमळ गुटमळून त्यास चांचपून झणते.) हा शिवराम आहे! शिव-(खिन्न झाल्या सारखे दाखवितो.) होय,मीच आहे; काय, गड्या, मीच सांपडलों किरे; गोष्ट लपंडाव. १९७ वाईट झाली. कावेरी- ( डोळ्यावरचे फडकें सोडून. ) आहा, मला पाडावयाचा मनसुबा केला होता कायर हे काम तात्या वांचून कोणी करणार नाही, हे मी पक्के जाणते. पण मी आतांच ह्याचे वढे काढीन. ( ती शिवरामाचे डोळे बांधिते, आणि पहावयास अंमळ. शी वाट ठेवून त्यास चालीप्रमाणे विचारते. ) तुझे बापाचे पागेंत किती घोडे आहेत. शिव-तीन, एक काळा, एक पांढरा, व एक तांबडा. कावेरी- तर तीन वेळां फोर (शिवरामास तीन वेळां फिरवून ह्मणते,) आतां जो कोणी तुझ्या हाती ला. गेल त्याला धर. शिव- (चांचपत चांचपत इकडे तिकडे फिरतो,सर्व पो- रांस आंगावर घेतो, कोणी थापडी मारली तरी त्यास मारूं देतो, आणि कावेरीचे मागे लागल्याची हुल- कावणी दाखवून एकाएकी तात्यासच जाऊन ध. रितो.) आहा, भली सांपडलीगे, हा कोणी पोर दिसतो, हा तात्या तर नव्हे : ( मग डोळ्यां वरचे फडकें काढून.) होय, तोच ! तात्या- (शिवरामास हळूच ह्मणतो.) पण त्वां मला कशा करितां धरिलें बरे शिव-(हळूच सांगतो.) तूं कांही चिंता करूं. न. को; मी धाकट्या पारख्याला तुझ्या आंगावर ह. कलून देईन. १९८ बाळामित्र. तात्या- (हळूच ह्मणतो.) बरे तर गड्या, तूं पाह- शील मी त्यास कसा बारीक चिमटा घेतों तो, अ. सा की, रक्तच निघेल. (शिवराम तात्याचे डोळे बांधून वरकड सर्व मुलांस खोलीतून बाहेर जाव. याची खूण करितो, ती दिवा विझवून दुसरे खो- लीत जातात. दिवे विझाल्या नंतर मोतदार तो- डास काळे लावून, वर चुन्याचे ठिपके देऊन, डोईस मेंढराच्या लोकरीची टोपी घालून, फाटक रकटें नेसून, हातांत टेंभा घेऊन दाराजवळ येतो, शि- वराम त्याला तेथेच उभे रहावयाची खुण करितो.) शिव.- (तात्यास खोलीचे मध्यभागी उभे करून विचारतो.) तुझे बापाचे पागेंत किती घोडे आहेत तात्या- तीन, एक काळा, एक तांबडा, आणि एक पांढरा. शिव०- अरे, मुलांनो, आतां पहा कशी मौज होईल ती, तंवर तुह्मी आप आपल्या जाग्यावर उभीरहा. (लटके पर नेटकें बोलून ह्मणतो. तात्या तूं तीन वेळां फीर, जो कोणी हातांत सांपडेल त्यास ब- ळकट धर. ( तात्या फिरूंलागल्यावर शिवराम शि- ग घेऊन येतो, व मोतद्दारास घागरमाळा वाजवाव- याची खुणेने आज्ञा देतो, मग आपण बोलतो. ) राक्षस आलारे आला, पळ तात्या, जीवघेऊन प- ळ. (मग मोठा गलबला करून दार लावितो, आणि मोतद्दाराचे पाठीमागे लपून शिंगांतून शब्द काढून १९९ लपंडाव. बोलतो. ) कायरे तूं माझें द्रव्य घ्यावयास आलास काय? तात्या-( भयानें लटलट कांपतो, आणि घाबरून डो- ळ्यावरचे फडके काढावयास विसरतो. आणि मो. ख्याने किंकाळी फोडून बोंब मारितो. ) अरे शिव- रामा, अरे पारख्यानों, धांवा, लौकर या, माझ्या उ- रावर राक्षस बसला. शिव०- (शिंगाचे आवाजांतून ह्मणतो. ) त्या सर्वांस मी भय दाखवून पळविलें, आतां तूं डोळ्यावरचे फडकें काढून माझे तोंड पहा. तान्या डोळ्यावरचे फडके न काढितां भय पावन हातांनी बळकट तोंड झांकतो; जसा जसा राक्ष- स पुढे येतो तसतसा तो मागे हटतो.) शिव०- अरे काठ तोंडावरचा रुमाल ! ऐकतोस की नाही ९ (तात्या थरथर कांपत कांपत डोळ्यावरचा रुमाल काढितो, परंतु डोळे उघडून पहावयास भितो; शेक्टी राक्षसास पाहतांच मोठ्याने किंकाळी फोडतो, आणि अगदी गर्भगळित होऊन जागचे जागी थिजून राहतो; मग इकडे तिकडे फिरून दा- राजवळ येतो; दार गच्च लावलेले पाहून पायांत पाय गुंतून तोंडघशी पडतो, आणि भयामुळे त्याचे तोंडाकडे न पाहतां भुईत मान घालून बसतो.) शिव०- तूं काय माझे हातांतून पळून जावयास पा. हतोस काय १ . बाळमित्र. तात्या- ( भयाने बोबडी वळली आहे, ह्मणून गुंतत गुंतत बोलतो.) मी काही तुमचा अन्याय केला नाही; मी कधी तुमचे द्रव्यही नेलें नाहीं. शिव- त्वां कधीच अन्याय केला नाही काय ९ र. स्त्यांत येणारे जाणारे मनुष्यांचे आंगावर धूळ को- णरे टाकतो ९ आणि लोकांची पागोटी आंकडीने कोणरे उचलीत असतो ? कुत्री चिमण्या ह्यांचे हा- त पाय कोण मोडीत असतो. लहान पोरांस पाडा- वयाकरितां माझ्या खोलीत घडवंची कोणीरे अणू- न ठेविली १ असे असे अपराध तुजकडून काहीच घडले नाहीत काय ? आणि मुलांस भेडावायासारी तुजजवळ आतां मुखवटा नाहीरे ? तात्या- महाराज, तुह्मी ह्मणतां इतकेंही खरेंच आहे; आतां माझ्या अपराधाची क्षमा करावी; मी आप- ल्या आईबापांचा एकुलताएकच आहे; आजपासून असें करणार नाही. शिव० तुझें बोलणे खरें कशावरून : "ह्यास जामीन कोण आहे? तात्या- तुझी जी मुलें आतां पळवून लाविली त्यांना आणा, झणजे ती जामीन होतील. शिव- तूं खरेंच बोलतोस तर माझ्या हातावर हात मार. तात्या- नाहीं महाराज, मी खरेंच सांगतों. शिव.- बरें तर, आतां मी तुला सोडितों, पण खबलपंडाव. २०१ रदार, आजपासून असें करशील. माझ्या मनांत तुला खावयाचे असते तर केव्हांच ह्या खिडकीतून घेऊन गेलो असतो. ( राक्षस तो टेंभा आंधारांत गरगर फिरवून निघून जातो, तेणे करून तात्या भेदरून बेशुद्ध होऊन भुईवर पडतो. ) । प्रवेश ४, रामराव, तात्या, शिवराम, मोताद्दार, कावेरी, आणि मनू. राम- ( हातांत दिवा घेऊन येतो. ) कसलारे इकडे गलबा आहे हार तात्या-(मान वर नकरितां बोलतो.) मी काही गलबा केला नाही, महाराज ब्रह्मराक्षसबावा. अतां तुझी माझे जवळ येऊ नका. राम- (तात्या भुईवर पडलेला पाहून. ) हा कोण भुईवर पडला आहे ? तात्या- तुह्मी आतांच मला रूपाकरून सोडून दिले आणि असें ह्मणता राम- वेड्यासारखा तूं असें काय बोलतासे १ मी केव्हां कृपा केली? तात्या- महाराज मी काही पैका न्यावयास आलों नाही. राम- पैक्याचे गाणे काय बोलतोस हे आहे तरी बाळमित्र. काय तुझें नांव तात्या, मी तुला ओळखत नाही की काय? तात्या- होय होय, महाराज, तेच माझें नांव; पण आतां तुझी माझा प्राण घेऊ नका. शम- मला आश्चर्य वाटते. तं' येथें कां पडलास : (दिवा खाली ठेवून तान्यास भुईवरून उचलून धरतो.) तात्या-(पहिल्याने पळन जावयाकरितां कवेतून निसावयाचा यत्न करितो, मग रामरावास ओ. +ळखून ह्मणतो. ) रावसाहेब, तुमीच आहां तो गेला कायर ( भोवताली कावरा बावरा पाहून मो. ख्याने आरोळी फोडून ह्मणतो. ) तो राक्षस आहे तो पहा तिथे आहे. (शिवराम दार उघडितो, स- र्व मुलें खदखदां हांसत आंत येतात. ) राम- अरे पोरांनो, कायरे आहे ? शिव.- (पुढे येऊन.) तुमचा मोतदार आहे की नाही, तोच राक्षस, तो पहा रगटें नेसला आहे. मोत- (ते सोंग यकून.) होय, महाराज, मींच सोंग घेतले होते, राम- शाबास शिवरामा, फार चांगल्या शाहणपणाचा खेळ काढला. शिव०- म्यां ठीकच केलें, सगळ्यांना विचाराना ? ह्यानेच अगोदर भिववायाची मसलत काढली की, आपण लहान पोरांस भेडावू. तो ह्याचा मनोरथ लपंडाव. २०३ म्यां सिद्धीस जाऊ दिला नाही. पहा पाहिजेतर ह्याजजवळ एक मुखवटा आहे, तो ह्याने काढावा. राम- (तात्यास ह्मणतो,) कायरे १ खरेच कायरे हैं ? तात्या०- (तो मुखवटा रामरावापुढे टाकितो.) आतां माझ्याने बोलवत नाही, हा मुखवटा घ्या रावजी. राम- तर मग तुला आतांची योग्य शिक्षा झाली. कावेरी- आमी दुर्गाबाईपासून मागून घेतले होतें की, शिवराम तात्याची जी थट्टा करील ती करूंद्या. तर ही त्याला बरीच अद्दल घडली. मन- अगोदर तो आमची जी थट्टा करणार होता ती जर तुझांस समजली असती तर मग. राम-कायरे तात्या, तूं प्रथमारंभी आजच आलास- ना ९ आणि त्वां अशी पुंडाई मांडली १ अरे मुलीं- ची मर्यादा ठेवून खेळावें तें यकून त्यांची थट्टा क. रणार होतास काय ? निघ येथून; जा आपल्या घरास, जर का आजपासून तुला माझे पोरां बरो- बर खेळतांना पाहिले, तर मी मुलाजा करणार ना- हीं; कान उपटून हातावर देईन. म्यां तुला हांकू- न लावले हे ऐकून तुझा बाप तुझ्या अपराधाचा चांगली शिक्षा करील; जा कसा येथून, तोंड दाख- वू नको, ( तात्या लाजून निघून जातो.) मुलांनो, तुझी आजपासून अशी कोणाची वाईट थट्टा करी- त जाऊ नका; कदाचित' कोणी तुमचा कसाही जरी अपराध केला तरी असा खेळ खेळत जाऊं