पान:Aagarakar.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२५ गोपाळ गणेश आगरकर

त्या तोडतांना कुठे जखम झाली किंवा प्रसंगीं रक्त वाहूं लागलें तर त्याची पर्वा करतां कामा नये असें मनाशीं ठरवूनच आगरकरांनी लेखणी हातांत घेतली. × X >く या लेखणीनें पहिला हल्ला चढविला तो हिंदु समाजाच्या अत्यंत जीर्ण झालेल्या धर्मकल्पनांवर. पांच हजार वर्षांपूर्वीं या धर्मानें तेतीस कोटि देव जन्माला घातले, आकाशाच्या पलीकडे स्वर्ग-नरकाच्या वसाहती स्थापल्या आणि त्यांतल्या एका वसाहतीत अप्सरा आणि अमृत व दुसऱ्या वसाहतीत यमदूत आणि तप्त लोहरस असलीं बक्षिसें व शिक्षा ठेवून पाप-पुण्यांच्या हजारों भ्रामक कल्पना समाजांत प्रसृत केल्या. अस्तित्वांत नसलेल्या परलोकावर दृष्टि ठेवून इहलोकींचे जीवन माणसानें जगावें असल्या खोट्या तत्त्वज्ञानाची निर्मिति करून या धर्मानें खऱ्याखुऱ्या जीवनमूल्यांचा सामान्य मनुष्याला फारसा विचारच करूं दिला नाहीं. परिस्थिती पासून पोशाखापर्यंत या हिंदुसमाजांत सदैव बदल होत गेले. पण त्याच्या आरंभींच्या धर्मकल्पना मात्र जशाच्या तशाच राहिल्या. या विसंगतीचे परिणाम आगरकरांना सभेवार सर्वत्र दिसत होते. कॉलेजांत व्हॉल्टेअर वाचणारे घरीं गरुडपुराण प्रमाण मानून मृतात्म्यांची उत्तरक्रिया करीत होते! शेक्सपीअरच्या 'रोमिओ ॲण्ड ज्यूलिएट'या प्रेमकथेमध्यें रंगून जाणारे लोक आपल्या परकऱ्या पोरींचीं लग्नें लावीत होते आणि त्या बालवधूंपैकीं जिला दुर्देवानें वैधव्य येईल तिला न्हाव्यापुढें बसवून तिचे मुंडन करण्यांत धर्मपालनाचे समाधान मिळवीत होते. धर्म, देवता, परलोक, पुनर्जन्म यांच्याविषयींच्या जुन्या कल्पना जोंपर्यंत समाजाच्या मनावर ताबा गाजवीत आहेत तोंपर्यंत हीं विपरीत दृश्यें समाजांत दिसत राहणारच हें जाणून आगरकरांनीं निर्भयपणे सर्वांना बजावलें, 'आकाशांतून देव येथे कधीं आले नाहीत व येथून ते परत आकाशांत कधीं गेलेही नाहीत. आम्हीच त्यांना येथल्या येथें निर्माण करतों, त्यांच्या गुणांचे पोवाडे गातों आणि चाहील तेव्हां त्यांस नाहींसें करतों.जों जों बुद्धीचा विकास होत जाऊन कार्यकारणांचा संबंध चांगला कळू लागतो तों तों प्राथमिक वा पौराणिक कल्पना मिथ्या भासूं लागून भूत, पिशाच, देव, दानव वगैरे शुद्ध कल्पनेनें उत्पन्न केलेल्या