पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/144

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 हे जर पक्षाला मान्य होते, तर -

 ... संपूर्णपणे नागवले गेलेले शेतकरी -शेतमजूर यांचा विभाग एकीकडे आणि यंत्रसामग्री, खते, पाणी यांचा वापर करून, शेतमजुरांच्या श्रमावर शेती उभारू पाहणारा सुधारलेला (?) शेतकरी दुसरीकडे, असा देखावा दिसून येत आहे. तो पाहिल्यानंतर विषमता कमी होत आहे, असे म्हणण्याचे धाडस कोण करील?

 असा वैचारिक गोंधळ का, कोठून व कसा आला? शेतीक्षेत्राच्या अंतर्गत अनेक थर आहेत. त्यात परस्परसंघर्षही आहेत. शोषक-शोषित संबंधही आहेत; पण त्या शोषणाची सोडवणूक समग्र शेतीच्या मिळून होणाऱ्या शोषणाचा अंत झाल्याखेरीज होणे नाही हे पक्षाला स्वच्छपणे का दिसले नाही?


शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / १३७