पान:रामदासवचनामृत.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रामदासवचनामृत-दासबोध. [$3. कां सरिता गंगेसी मिळाली। मिळणी होतां गंगा जाली। मग जरी वेगळी केली। तरी होणार नाहीं सर्वथा ॥ १३ ॥ परी ते सरिता मिळणीमागें। वाहाळ मानिजेत जगें । तैसा नव्हे शिष्य वेगें । स्वामीच होये ॥१४॥ परिस आपणा ऐसें करीना। सुवर्ण लोहो पालटेना। उपदेश करी बहुत जना। अंकित सद्गुरूचा ॥ १५ ॥ शिष्यास गुरुत्व प्राप्त होये । सुवर्णे सुवर्ण करितां नये। म्हणौनि उपमा न साहे। सद्गुरूसी परिसाची ॥ १६ ॥ उपमे द्यावा सागर । तरी तो अत्यंतची क्षार । अथवा म्हणों क्षीरसागर । तरी तो नासेल कल्पांतीं ॥ १७॥ उपमे द्यावा जरि मेरू । तरी तो जड पाषाण कठोरू । तैसा नव्हे की सद्गुरु । कोमळ दीनाचा ॥१८॥ उपमे म्हणों गगन । तरी गगनापरीस तें निर्गुण। याकारणे दृष्टांत हीन । सद्गुरूस गगनाचा ॥ १९॥ धीरपणे उपमूं जगती । तरी हेही खचेल कल्पांतीं । म्हणौन धीरत्वास दृष्टांतीं । हीन वसुंधरा ॥०॥ आतां उपमावा गभस्ती । तरी गभस्तीचा प्रकाश किती। शास्त्रे मर्यादा बोलती। सद्गुरु अमर्याद ॥ २१॥ म्हणौनि उपमे उणा दिनकर । सद्गुरुज्ञानप्रकाश थोर । आतां उपमावा फणिवर । तरी तोही भारवाही ॥ २२ ॥ आतां उपमे द्यावें जळ । तरी ते काळांतरीं आटेल सकळ ॥ सद्गुरुरूप तें निश्चळ । जाणार नाहीं ॥ २३ ॥ सदगुरुसी उपमा अमृत । तरी अमर धरिती मृत्यपंथ। सद्गुरुकृपा यथार्थ। अमर करी ॥२४॥ - -