Jump to content

पान:रामदासवचनामृत.pdf/100

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
§३८ ]
५७
साक्षात्कार.

सद्गुरूसी म्हणावें कल्पतरू। तरी हा कल्पनातीत विचारू ।
कल्पवृक्षाचा अंगिकारू । कोण करी ॥ २५ ॥
चिंतामात्र नाहीं मनीं । कोण पुसे चिंतामणी ।
कामधेनूची दुभणी[] । निःकामासी न लगती ॥ २६ ॥
सद्गुरु म्हणों लक्ष्मीवंत । तरी ते लक्ष्मी नाशिवंत ।
ज्याचे द्वारी असे तिष्ठत । मोक्षलक्ष्मी ॥ २७ ॥
स्वर्गलोक इंद्रसंपती । हे काळांतरों विटंबती[]
सद्गुरूकृपेची प्राप्ती । काळांतरी चळेना ॥ २८ ॥
हरीहर ब्रम्हादिक । नाश पावती सकळिक ।
सर्वदा अविनाश येक । सद्गुरुपद ॥ २९ ॥
तयासी उपमा काय द्यावी । नाशिवंत सृष्टी आघवी ।
पंचभूतिक उठाठेवी । नचले तेथें ॥ ३० ॥
म्हणौनि सद्गुरु वर्णवेना । हे गे हेचि माझी वर्णना ।
अंतरस्थितीचिया खुणा । अंतर्निष्ठ जाणती ॥ ३१ ॥

दा. १. ४. १-३१

३८. सद्गुरूचे लक्षण.
म्हणोनि निःकामताविचारु । दृढबुद्धीचा निर्धारु ।
तोचि सद्गुरु पैलपारु । पाववी भावाचा ॥ ४४ ॥
मुख्य सद्गुरूचे लक्षण । आधी पाहिजे विमळ ज्ञान ।
निश्चयाचे समाधान । स्वरूपस्थिती ॥ ४५ ॥
याही वरि वैराग्य प्रबळ । वृत्ति उदास केवळ ।
विशेष आचारे निर्मळ । स्वधर्मविषई ॥४६॥

  1. दुभतीं.
  2. नाश पावतात.