पान:रामदासवचनामृत.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. साक्षात्कार. ६३७] साक्षात्कार. नकळे नकळे नोति नेति । ऐसें बोलतसे श्रुति। तेथे मज मूर्खाची मति । पवाडेल' कोठे ॥ २॥ मज न कळे हा विचारु । दुहूनि माझा नमस्कारु । गुरुदेवा पैलपारु । पाववी मज ॥३॥ होती स्तवनाची दुराशा । तुटला मायेचा भर्वसा। आतां असाल तैसें असा । सद्गुरु स्वामी ॥ ४॥ मायेच्या बळें करीन स्तवन । ऐसें वांछित होतें मन । माया जाली लज्जायमान । काय करूं ॥५॥ नातुडे मुख्य परमात्मा। म्हणौनि करावी लागे प्रतिमा । तैसा मायायोगें महिमा । वर्णीन सद्गुरूचा ॥६॥ आपल्या भावासारिखा मनीं । देव आठवावा ध्यानीं। तैसा सद्गुरु हा स्तवनीं । स्तऊं आतां ॥७॥ जय जयाजि सद्गुरुराजा । विश्वंभरा विश्वबीजा। परमपुरुषा मोक्षध्वजा । दीनबंधू ॥ ८॥ तुझीयेन अभयंकरें। अनावर माया हे वोसरे। जैसे सूर्यप्रकाशे अंधारें। पळोन जाये ॥९॥ आदित्य अंधकार निवारे । परंतु मागुतें ब्रह्मांड भरे। नीसी जालिया नंतरें । पुन्हां काळोखें ॥ १० ॥ तैसा नव्हे स्वामीरावो । करी जन्ममृत्य वाव । समूळ अज्ञानाचा ठाव । पुसून टाकी ॥११॥ सुवर्णाचे लोहो कांहीं। सर्वथा होणार नाहीं। तैसा गुरुदास संदेहीं । पडोंचि नेणे सर्वथा ॥ १२ ॥ .. १ शिरेल. २ निशा.