पान:रामदासवचनामृत.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रामदासवचनामृत-दासबोध. [३५ संग सोडावा आपुला । मग पहावें तयाला। अनुभवी तो या बोला। सुखावेल गा ॥१९॥ . दा. ७. २. १२-१९. ३६. देवापेक्षां गुरु श्रेष्ठ आहे. सद्गुरुहून देव मोठा । जयास वाटे तो करंटा। सुटला वैभवाचा फांटा । सामर्थ्यपिसें ॥४०॥ सद्गुरुस्वरूप तें संत । आणी देवास मांडेल कल्पांत। तेथे कैंचें उरेल सामर्थ्य । हरिहरांचें ॥४१॥ म्हणोन सद्गुरुसामर्थ्य अधिक। जेथें आटती ब्रह्मादिक । अल्पबुद्धी मानवी रंक । तयांसि हे कळेना ॥४२॥ गुरुदेवास बराबरी। करी तो शिष्य दुराचारी। . भ्रांति बैसली अभ्यांतरीं। सिद्धांत नेणवे ॥४३॥ देव मानुषी भाविला। मंत्री देवपणासि आला। सद्गुरु न वचे कल्पिला। ईश्वराचेनि ॥४४॥ म्हणोनि सद्गुरु पूर्णपणें । देवाहून आधिक कोटिगुणें। जयासि वर्णितां भांडणें । वेदशास्त्रीं लागलीं ॥४५॥ असो सद्गुरुपदापुढे । दुजें कांहींच न चढे। देवसामर्थ्य तें केवढें। मायाजनित ॥४६॥ दा. ५. ३. ४०-४६. ३७. " म्हणौनि सद्गुरु वर्णवेना । हे गे हेचि माझी वर्णना." आतां सद्गुरु वर्णवेना। जेथें माया स्पर्शी सकेना। ते स्वरूप मज अज्ञाना। काय कळे ॥१॥ . TU .