पान:रामदासवचनामृत.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Ji रामदासवचनामृत-दासबोध. [$ 30 उपोषणे निष्ठानेम । परम सायासीं केलें कर्म । फळचि पावती वर्म । चुकले प्राणी ॥ ३१ ॥ येज्ञादिकें कर्मे केलीं। हृदई फळाशा कल्पिली । आपले इच्छेने घेतली । सूति जन्माची ॥ ३२ ॥ करूनि नाना सायास । केला चौदा विद्यांचा अभ्यास। रिद्धि सिद्धि सावकाश । वोळल्या जरी॥३३॥ तरी सद्गुरुकृपेंविरहित । सर्वथा न घडे स्वहित। येमपुरीचा अनर्थ । चुकेना येणे ॥ ३४ ॥ जंव नाहीं ज्ञानप्राप्ती । तंव चुकेना यातायाती। गुरुकृपेंविण अधोगति । गर्भवास चुकेना ॥ ३५ ॥ ध्यान धारणा मुद्रा आसन । भक्तिभाव आणी भजन। सकळही फोल ब्रह्मज्ञान । जव तें प्रात नाहीं ॥ ३६ ॥ सद्गुरुकृपा न जोडे । आणी भलतीचकडे वावडे । जैसें आंधळे चाचरोन पडे । गारी आणी गडधरों ॥ ३७॥ जैसें नेत्रीं घालितां अंजन । पडे दृष्टीस निधान । तैसें सद्गुरुवचनें ज्ञान-प्रकाश होये ॥ ३८ ॥ सद्गुरुविण जन्म निर्फळ । सद्गुरुविण दुःख सकळ । सद्गुरुविण तळमळ । जाणार नाहीं ॥ ३९ ॥ सद्गुरुचेनि अभयंकरें। प्रगट होईजे ईश्वरें । संसारदुःखें अपारें । नासोनि जाती ॥ ४० ॥ मागें जाले थोर थोर । संत महंत मुनेश्वर । तयांसही ज्ञानविज्ञानविचार। सद्गुरूचेनी॥४१॥ १ प्राप्ति. २ हस्तगत झाल्या. ३ भटकतो: ४ चांचाइन. ५ खळग्यांत, -