पान:रामदासवचनामृत.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५१ कार - - $3r] - साक्षात्कार. स्वधर्मकर्मी पूज्य ब्राह्मण । परी ज्ञान नव्हे सद्गुरुविण । ब्रह्मज्ञान नसतां सीण। जन्ममृत्य चुकेना ॥२०॥ सद्गुरुविण ज्ञान कांहीं। सर्वथा होणार नाहीं। अज्ञान प्राणी प्रवाहीं। वाहातचि गेले ॥ २१ ॥ ज्ञानविरहित जें जें केलें । तें तें जन्मास मूळ जालें। म्हणोनि सद्गुरूची पाउलें । सदृढ धरावीं ॥ २२ ॥ जयास वाटे देव पहावा । तेणे सत्संग धरावा। सत्संगेंविण देवाधिदेवा । पाविजेत नाहीं ॥२३॥ नाना साधनें बापुडौं । सद्गुरुविण करिती वेडीं। गुरुकृपेविण कुडकुंडीं। वेर्थचि होतीं ॥२४॥ कार्तिकस्नाने माघस्नानें । व्रतें उद्यापने दाने। गोरांजनें धूम्रपाने । साधिती पंचाग्नी ॥ २५ ॥ हरिकथा पुराण श्रवण । आदरें करिती निरूपण। सर्व तीर्थे परम कठिण। फिरती प्राणी ॥ २६ ॥ झळफलित देवतार्चनें । स्नाने संध्या दर्भासनें। टिळे माळा गोपीचंदनें। ठसे श्रीमुद्रांचे ॥ २७॥ अर्घ्यपात्रे संपुष्ट गोकर्णे। मंत्र यंत्राची तांब्रपणे। नाना प्रकारची उपकरणें । साहित्यशोभा॥२८॥ घंटा घणघणा वाजती । स्तोत्रं स्तवनें आणी स्तुती। आसने मुद्रा ध्याने करिती । प्रदक्षिणा नमस्कार ॥२९॥ पंचायत्न पूजा केली । मृत्तिकेची लिंगें लाखोली। बेलें नारिकेळे भरिलों । संपूर्ण सांग पूजा ॥३०॥ १ . रण. २ पोकळ. ३ एकप्रकारचे साधन. ४ पंचायतन. 35820 --- - - -