पान:रामदासवचनामृत.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रामदासवचनामृत-दासबोध. [33 ____३३. बद्ध मनुष्याचे वर्णन. परमार्थाचा अनादर । प्रपंचाचा अत्यादर। संसारभार जोजारं । या नांव बद्ध ॥ ३७॥ सत्संगाची नाहीं गोडी । संतनिंदेची आवडी। देहेबुद्धीची घातली बेडी । या नांव बद्ध ॥ ३८ ॥ हाती द्रव्याची जपमाळ । कांताध्यान सर्वकाळ । सत्संगाचा दुष्काळ । या नांव बद्ध ॥ ३९॥ नेत्रीं द्रव्यदारा पाहावी । श्रवणीं द्रव्यदारा ऐकावी। चिंतनी द्रव्यदारा चिंतावी। या नांव बद्ध ॥ ४० ॥ काया वाचा आणि मन । चित्त वित्त जीव प्राण । द्रव्यदारेचे करी भजन । या नांव बद्ध ॥४१॥ इंद्रियें करून निश्चळ । चंचळ होऊ नेदी पळ। द्रव्यदारेसि लावी सकळ । या नांव बद्ध ॥४२॥ द्रव्य दारा तेंचि तीर्थ । द्रव्यदारा तोचि परमार्थ । द्रव्यदारा सकळ स्वार्थ । म्हणे तो बद्ध ॥४३॥ वेर्थ जाऊं नेदी काळ । संसारचिंता सर्वकाळ । कथा वार्ता तेचि सकळ । या नांव बद्ध ॥४४॥ दा. ५. ७. ३७-४४. . ३४. गुरूची आवश्यकता. ब्राह्मणे पाविजे देवाधिदेवा । तरी किमर्थ सद्गुरु करावा। ऐसें म्हणाल तरी निजठेवा । सद्गुरुविण नाहीं ॥१९॥ १ जोराचा, अत्यंत.