पान:रामदासवचनामृत.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६३२] साक्षात्कार. ३२. याच जन्मी परमेश्वराचा साक्षात्कार होणे शक्य आहे. संसारत्याग न करितां । प्रपंचउपाधी न सांडितां। जनामध्ये सार्थकता। विचारेंचि होये ॥ २४ ॥ हे प्रचिताचे बोलणें । विवेकें प्रचित पाहणें । प्रचित पाहे तें शाहाणे । अन्यथा नव्हे ॥ २५ ॥ सप्रचित आणी अनुमान । उधार आणी रोकडें धन । मानसपूजा प्रत्यक्ष दर्शन । यास महदांतर ॥ २६ ॥ पुढे जन्मांतरी होणार । हा तो अवघाच उधार। तैसा नव्हे सारासार । तत्काळ लाभे ॥ २७ ॥ तत्काळचि लाभ होतो। प्राणी संसारी सुटतो। संशय अवघाचि तुटतो। जन्ममरणाचा ॥२८॥ याचि जन्में येणेंचि काळे । संसारीं होइजे निराळे । मोक्ष पाविजे निश्चळे । स्वरूपाकारें ॥ २९॥ ये गोष्टीस करी अनुमान । तो सिद्धचि पावेल पतन। मिथ्या वदे त्यास आण । उपासनेची ॥ ३०॥ हे येथार्थचि आहे बोलणें । विवेकें सीघचि मुक्त होणें । असोनी काहींच नसणे। जनामधे ॥३१॥ देवपद आहे निर्गुण । देवपदी अनन्यपण। हाचि अर्थ पहाता पूर्ण । समाधान बाणे॥ ३२ ॥ देहींच विदेह होणे। करून कांहींच न करणे । जीवन्मुक्तांची लक्षणे । जीवन्मुक्त जाणे ॥ ३३ ॥ ___दा, ६. ९. २४-३३. १शपथ.