पान:रामदासवचनामृत.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रामदासवचनामृत-दासबोध. असो ऐसे सकळही गेले । परंतु येकचि राहिले। जे स्वरूपाकार जाले । आत्मज्ञानी॥ ५९॥ दा. ३. ९. १-२९. ३१. “ सर्व सांडून शोधा मजला." याकारणे सर्व सांडावें । येक देवास धुंडावें। तरीच वर्म पडे ठावें । कांहीएक ॥ २१॥ नाना सुखें देवें केलीं। लोकें तयास चुकलीं। ऐसीं चुकतांच गेलीं । जन्मवरी ॥२२॥ सर्व सांडून शोधा मजला । ऐसें देवचि बोलिला । लोकीं शब्द अमान्य केला। भगवंताचा ॥२३॥ म्हणोन नाना दुःखें भोगिती । सर्वकाळ कष्टी होती। मनी सुखचि इच्छिति । परी तें कैंचें ॥२४॥ उदंड सुख जया लागलें । वेडे तयास चुकलें। सुख सुख म्हणतांच मेलें । दुःख भोगितां ॥ २५ ॥ शहाण्याने ऐसें न करावें। सुख होये तेंचि करावें। देवास धुंडित जावें । ब्रह्मांडापरतें ॥२६॥ मुख्य देवचि ठाई पडिला । मग काये उणे तयाला। लोक वेडे विवेकाला । सांडूनि जाती ॥२७॥ विवेकाचे फळ तें सुख । अविवेकाचे फळ ते दुःख । यांत मानेल तें आवश्यक । केले पाहिजे ॥ २८ ॥ कर्तयासी वोळखावें। यास विवेक म्हणावें। विवेक सांडितां व्हावें । परम दुःखी ॥२९॥ .. दा. १३. ७. २१-२९...