Jump to content

पान:रामदासवचनामृत.pdf/90

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
§३०]
४७
साक्षात्कार
गेले बहुतां बळांचे । गेले बहुतां काळांचे ।
गेले बहुतां कुळांचे । कुळवंत राजे ॥ ४८ ॥
गेले बहुतांचे पाळक । गेले बुद्धीचे चाळक ।
गेले युक्तीचे तार्किक । तर्कवादी ॥ ४९ ॥
गेले विद्येचे सागर । गेले बळाचेडोंगर ।
गेले धनाचे कुबेर । मृत्यपंथें ॥ ५० ॥
गेले बहुत पुरुषार्थाचे । गेले बहुत विक्रमाचे ।
गेले बहुत आटोपाचे[] । कार्यकर्ते ॥ ५१ ॥
गेले बहुत शस्त्रधारी । गेले बहुत परोपकारी ।
गेले बहुत नानापरी । धर्मरक्षक ॥ ५२ ॥
गेले बहुत प्रतापाचे । गेले बहुत सत्कीर्तीचे ।
गेले बहुत नीतीचे । नीतिवंत राजे ॥ ५३ ॥
गेले बहुत मतवादी । गेले बहुत कार्यवादी ।
गेले बहुत वेवादी । बहुता परीचे ॥ ५४ ॥
गेली पंडितांची थाटें[] । गेली शब्दांची कचाटें[]
गेली वादकें अचाटें । नाना मतें ॥ ५५ ॥
गेले तापस्यांचे भार । गेले संन्यासी अपार ।
गेले विचारकर्ते सार । मृत्यपंथें ॥ ५६ ॥
गेले बहुत संसारी । गेले बहुत वेषधारी ।
गेले बहुत नानापरी । नाना छंद करूनी ॥ ५७ ॥
गेले ब्राम्हणसमुदाये । गेले बहुत आचार्ये ।
गेले बहुत सांगों काये । किती ह्मणोनि ॥ ५८ ॥

  1. व्याप.
  2. समुदाय.
  3. बंडे