पान:रामदासवचनामृत.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रामदासवचनामृत-दासबोध. [.३० आतां असो हे बोलणें । मृत्यापासून सुटिजे कोणें । मागे पुढे विश्वास जाणे । मृत्यपंथें ॥ ३६॥ . च्यारी खाणी च्यारी वाणी । चौयांसी लक्ष जीवयोनी। जन्मा आले तितुके प्राणी । मृत्य पावती ॥ ३७॥ मृत्याभेणे पळों जातां । तरी मृत्य सोडिना सर्वथा। मृत्यास न ये चुकावितां । कांहीं केल्या ॥ ३८॥ मृत्य न म्हणे हा स्वदेसी । मृत्य न म्हणे हा विदेसी । मृत्य न म्हणे हा उपवासी। निरंतर ॥ ३९॥ .. मृत्य न म्हणे थोर थोर । मृत्य न म्हणे हारहर। मृत्य न म्हणे अवतार । भगवंताचे ॥४०॥ श्रोती कोप न करावा । हा मृत्यलोक सकळांस ठावा। उपजला प्राणी जाईल बरवा । मृत्यपंथें ॥४१॥ येथे न मनावा किंत । हा मृत्यलोक विख्यात । प्रगट जाणती समस्त । लहानथोर ॥४२॥ ऐसें जाणोनियां जीवें । याचें सार्थकची करावें। जनीं मरोन उरवावें । कीर्तिरूपें ॥४४॥ येरवी प्राणी लहान थोर । मृत्य पावती हा निर्धार । बोलिलें हें अन्यथा उत्तर । मानूंचि नये ॥ ४५ ॥ गेले बहुत वैभवाचे । गेले बहुत आयुष्याचे। गेले अगाध महिमेचे । मृत्यपंथें ॥४६॥ गेले बहुत पराक्रमी । गेले बहुत कपटकर्मी। गेले बहुत संग्रामी । संग्रामसौर ॥४७॥ १ सर्व लोकांस. २ किंतु, संशय. ३ शूर.:...:...:..