पान:रामदासवचनामृत.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६ १७॥ .] साक्षात्कार. मृत्य न म्हणे योगाभ्यासी। मृत्य न म्हणे संन्यासी। मृत्य न म्हणे काळासी। वंचू जाणे ॥ २४॥ मृत्य न म्हणे हा सावध । मृत्य न म्हणे हा सिद्ध। मृत्य न म्हणे वैद्य प्रसिद्ध । पंचाक्षरी ॥ २५ ॥ मृत्य न म्हणे हा गोसावी । मृत्य न म्हणे हा तपस्वी ।. मृत्य न म्हणे हा मनस्वी । उदासीन ॥ २६ ॥ मृत्य न म्हणे ऋषेश्वर । मृत्य न म्हणे कवेश्वर । मृत्य न म्हणे दिगंबर । समाधिस्थ ॥ २७॥ मृत्य न म्हणे हठयोगी। मृत्य न म्हणे राजयोगी। मृत्य न म्हणे वीतरागी। निरंतर ॥ २८॥ मृत्य न म्हणे ब्रह्मचारी। मृत्य न म्हणे जटाधारी। मृत्य न म्हणे निराहारी । योगेश्वर ॥ २९॥ . मृत्य न म्हणे हा संत । मृत्य न म्हणे हा महंत । मृत्य न म्हणे हा गुप्त । होत असे ॥ ३० ॥ मृत्य न म्हणे स्वाधेन । मृत्य न म्हणे पराधेन । सकळ जीवांस प्राशन । मृत्यचि करी ॥ ३१ ॥ येक मृत्यमार्गी लागले । येकी आर्ध पंथ क्रमिले। येक ते सेवटास गेले । वृद्धपणीं ॥ ३२ ॥ मृत्य न म्हणे बाळ तारुण्य । मृत्य न म्हणे सुलक्षण मृत्य न म्हणे विचक्षण । बहु बोलिका ॥ ३३ ॥ मृत्य न म्हणे हा आधारू । मृत्य न म्हणे उदारु । मृत्य न म्हणे हा सुंदरु । चतुरांग जाणे ॥ ३४ ॥ मृत्य न म्हणे पुण्य पुरुष । मृत्य न म्हणे हरिदास । मृत्य न म्हणे विशेष । सुकृती नर ॥ ३५ ॥ . .