पान:रामदासवचनामृत.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. रामदासवचनामृत-दासबोध. _ [ मृत्य न म्हणे बलाढ्य । मृत्य न म्हणे धनाढ्य। मृत्य न म्हणे आढ्य । सर्वगुणें ॥९॥ मृत्य न म्हणे हा विख्यात । मृत्य न म्हणे श्रीमंत । मृत्य न म्हणे हा अद्भुत । पराक्रमी ॥ १०॥ मृत्य न म्हणे हा भूपती । मृत्य न म्हणे हा चक्रवर्ती। मृत्य न म्हणे हा करामती । कैवांड जाणे ॥११॥ मृत्य न म्हणे हयपती । मृत्य न म्हणे गजपती। मृत्य न म्हणे नरपती। विख्यात राजा ॥१२॥ 'मृत्य न म्हणे वरिष्ठ जनीं । मृत्य न म्हणे राजकारणी। मृत्य न म्हणे वेतनी। वेतनधर्ता ॥१३॥ मृत्य न म्हणे देसाई । मृत्य न म्हणे वेवसाई। मृत्य न म्हणे ठाई ठाई । पुंडराजे ॥ १४ ॥ मृत्य न म्हणे वित्पन्न । मृत्य न म्हणे संपन्न । मृत्य न म्हणे विद्वज्जन । समुदाई ॥१७॥ मृत्य न म्हणे धूर्त । मृत्य न म्हणे बहुश्रुत। मृत्य न म्हणे हा पंड़ित । महाभला ॥ १८॥ मृत्य न म्हणे अग्निहोत्री । मृत्य न म्हणे हा श्रोत्री। मृत्य न म्हणे मंत्रयंत्री । पूर्णागमी ॥ २०॥ मृत्य न म्हणे शास्त्रज्ञ । मृत्य न म्हणे वेदज्ञ । मृत्य न म्हणे सर्वज्ञ । सर्व जाणे ॥२१॥ मृत्य न म्हणे रागज्ञानी । मृत्य न म्हणे ताळज्ञानी। मृत्य न म्हणे तत्त्वज्ञानी । तत्त्ववेत्ता ॥२३॥ १ युक्त. २ युक्त्या. ३ समुदाय असलेला.