पान:रामदासवचनामृत.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

33.] साक्षात्कारः भोगून अभोक्ता म्हणती। हे तो आवधीच फजिती। लोक उगेच बोलती। पाहिल्याविण ॥ ३१ ॥ अंतकाळ आहे कठीण । शरीर सोडिना प्राण। बराड्यासारिखें लक्षण । अंतकाळीं ॥ ३२॥ . दा. १७. ६. २६-३२. ____३०. मृत्यूचे सामर्थ्य संसार म्हणिजे सर्वच स्वार । नाहीं मरणास उधार । मापी लागले शरीर । घडीने घडी ॥१॥ नित्य काळाची संगती। नकळे होणाराची गती। कर्मासारिखे प्राणी पडती । नाना देसी विदेसीं ॥२॥ सरतां संचिताचें शेष । नाहीं क्षणाचा अवकाश। भरतां न भरतां निमिष्य । जाणे लागे ॥३॥ अवचितें काळाचे म्हणियोरे । मारित सुटती येकसरे । नेऊन घालिती पुढारे । मृत्यपंथें ॥४॥ होतां मृत्याची आटाटी। कोणी घालून सकती पाठीं। सर्वत्रांस कुटाकुटी। मागे पुढे होतसे ॥ ५॥ मृत्यकाळ काठी निकी । बैसे बळियाचे मस्तकीं। महाराजे बळिये लोकीं । राहों न सकती ॥६॥ मृत्य न म्हणे किं हा क्रूर । मृत्य न म्हणे हा झुंजार। मृत्य न म्हणे संग्रामशूर । समरांगणीं ॥७॥ मृत्य न म्हणे किं हा कोपी । मृत्य न म्हणे हा प्रतापी। मृत्य न म्हणे उग्ररूपी । माहाखळ ॥ ८॥ १ दुकळलेला. २ शिपाई, ३ यातना.४ खरोखर.